Tuesday, 3 May 2016

चित्र शलाका

Chitra Shalaka

📚साहित्य दर्पण आणि SPS@Fun 📚

🔆 सयुंक्त विद्यमाने आयोजित🔆

🕹चित्रशलाका 🕹

  ⭕भाग ----1  पहिला  ⭕
=================
संकल्पना :-सौ सुरेखा जाधव
×××××××××××××××××××
संयोजक:-प्रा संगीता भालसिंग
+++++++++++++++++++
संकलन:--श्री.आप्पासाहेब सुरवसे
************************
परीक्षक:-प्राचार्या शांता ठुबे
~~~~~~~~~~~~~~~~~

निसर्गाची किमया
जातीविरहित प्रेमाची
मांजर नि वासराच्या
हिरवळ साक्षीला मैत्रीची

✍🏼🖊🖋🎯🖋🖊
आप्पासाहेब सुरवसे
    लाखणगांवकर
AMKSLWOMIAW
 🌹 AK 47 🌹
👉🏾स्पर्धेसाठी नाही 👈🏾
👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾
रक्ताचे सख्खे भाऊ
नाही रहातएक दिलाने
शिका या मुक्या प्राण्या
कडून कसे जगावे प्रेमाने
✒🖋🖋🖋
प्राचार्या शांता ठुबे
अहमदनगर
(स्पर्धेसाठी नाही)
🐅🐅🐅🐅🐅🐅🐅
🌺🌺चित्रशलाका🌺🌺

पशू-पक्ष्यात देखिल एकमेकांविषयी
बघा किती माया असते.
छानदार हिरवळीवर पहूडलेली
वासरू अन् मांजराची काया असते.

नागनाथ धोंगडे. ..@34
🐃🐃🐃🐃🐃🐃🐃
सांग वासरा रुसलास का?
आई पासून दुरावलास का?
येऊन ये जरा निज माझ्या पाशी
बघ प्रेमाने तू माखलास का?

- महेश देसले
@४
🐂🐂🐂🐂🐂🐂🐂
🍁🌺स्पर्धेसाठी🌺🍁
प्राण्यांचे चिञ पहा
दिसते किती साजरं
पहुडले वासरा पाशी
त्याच्या छायेत मांजर
@२१ सुनिल बेंडे
🐄🐄🐄🐄🐄🐄🐄

स्पर्धेसाठी चारोळी

जातीधर्मावरुन
नका करु हत्या
या मुक्या प्राण्याकडुन
काहीतरी बोध घ्या !
     ...संगीता भांडवले
🐪🐪🐪🐪🐪🐪🐪
📝 चित्रशलाका 📝

जरी भिन्न आमुच्या जाती
तरी भिन्न आमुच्या नाती
विसरून सारे काही
एकमेका प्रेम करती
- नागोराव सा. येवतीकर
धर्माबाद, नांदेड
🐫🐫🐫🐫🐫🐫🐫
-----चित्रशलाका-----
दर्शन घडले मानवतेचे
हवी कशाला नातीगोती
हिरवळी वर बसले जीव मुके
करी लाभा विन प्रिती

   सौ.सानप मीना, बीड  @7
🐘🐘🐘🐘🐘🐘🐘
✒स्पर्धेसाठी🖋
मुक्या प्राण्यातही आहे
आपुलकीची जान,
जात- धर्मासाठी लढतोस,
ठेव माणुसकिचा मान...!
---------------------------------------
तुझी-माझी मैत्री
जगावेगळी आहे,
वासरू नी मांजरीची जोडी
हिरवळीत शोभुन दिसते आहे...!
---------------------------------------
निपचीत पडून होतो
हिरवळ शांततेत,
म्याव म्हणत आलीस,
मैत्रीन झालीस, न जाणता भेद...!

✍🏻भाग्यश्री चलाख.
नागपूर
मो.नं :9146615473
@41
🐈🐈🐈🐈🐈🐈🐈
अबोल प्रेम

मुक्या प्राण्यांचे अबोल प्रेम
निर्दयी माणसा ,तू शिक जरा...
वासरु नि मांजरीच्या डोळ्यांत
बघ ,वाहतोय भूतदयेचा झरा ...

सौ.भालसिंग संगिता
अहमदनगर
०३ में २०१६
साहित्य दर्पण अणि spsfun.com
आयोजित चित्रशलाका स्पर्धा
***********************
ही शलाका स्पर्धेत नाही
🐎🐎🐎🐎🐎🐎🐎
" वासरा-मांजराचा लळा पाहण्या
   अवघी सृष्टी स्तब्ध जाहली
   अरे मानसा मोज श्रिमंती
   किती खूश तू  उंच महाली "................जयश्री पाटील.
🐇🐇🐇🐇🐇🐇🐇

तुझी माझी अतूट मैत्री
मांजरीला म्हणतंय वासरु
जरी झाली ताटातूट तरी
तू मला कधी नको विसरु ...!!

सौ.पूजा विलास दंडगव्हाळ
नाशिक - सटाणा
०३ में २०१६
spsfun.com
साहित्य दर्पण अणि spsfun.com
आयोजित चित्रशलाका स्पर्धा भाग०१
माझी सहभागी रचना
🕊🕊🕊🕊🕊🕊🕊
स्पर्धेसाठी चारोळी

जातीधर्माचे फेकूनीया जोखड
ऊब मायेची शोधती मुके प्राणी
विश्वासाच्या पायावर घेत निद्रा
निस्वार्थी मैत्रिची गाती मूक गाणी

© सौ.शशिकला बनकर, भोसरी, पुणे
@35
🐿🐿🐿🐿🐿🐿🐿

"चित्रशलाका"

"मनी अन् वासरु जरी आम्ही भिन्न
जातीधर्माचे मुळी न आम्हा बंध,
एकदिलाने,संगतीने आम्ही नांदू
मानवापरी न बनू आम्ही धर्मांध"
✒🖋✒✒
   संगीता देशमुख,वसमत
🐍🐍🐍🐍🐍🐍🐍

चारोळी...
साहित्य दर्पण आयोजित...
चित्रशलाका स्पर्धेसाठी...

माणूसच माणसाचा,
इथे चिरतोय गळा।।
वासराला पहा कसा,
लागला मांजराचा लळा।।

✒अनिल लांडगे उंडणगाव@27
9689675050/
9021261820
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
स्पर्धेसाठी

नाव ना कोणते जगी मायेचे,
जग सारे भूकेले मित्र प्रेमाचे,
स्वार्थी आहे जात माणसाची,
निस्सीम प्रेम वाटे प्राण्यांचे...

निर्मला सोनी.
🐆🐆🐆🐆🐆🐆🐆

प्राणीमात्रांवर करायला हवी दया
माणसांतली हरवली आहे माया
मुक्या जीवांचा असाही भाव
शिवत नाही त्यांना मोह-माया

✍🏻गणेश  @5
🐩🐩🐩🐩🐩🐩🐩
स्पर्धेसाठी चारोळी

जरी जात वेगळी...
जरी नांवे अनेक...
आम्ही ना मानव...
आम्ही प्राणी....
बघा आहोत एक...
  ...संगीता भांडवले
🐲🐲🐲🐲🐲🐲🐲
स्पर्धेसाठी👉🏻👉🏻👉🏻👉🏻

मुक्या प्राण्यांची असते
अशी ही माया
जात-पीतीच्या बंधनाने
भिजत नाही काया

✍🏻गणेश
🐎🐎🐎🐎🐎🐎🐎
-----------------------

स्पर्धेसाठी(चित्रशलाका-1)
👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾

मुक्या जीवाकडून शिक मानवा बंधुभावाची रित
सोडून व्देषाची भावना
गाऊ बंधुप्रेमाचे गीत

--कल्पना जगदाळे@8बीड
-----------------------
-----------—----------

✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻
माणसापेक्षा आजकालची जनावरे बरी
बंधुभावाची रित माणसापेक्षा
मुक्या जीवास कळली खरी
-----------------------
जात,धर्म,पंथ घेवून इथे मानवाचा
रंक्तरंजीत बंधुभाव फुलत आहे
माणसापेक्षा जनावरात आजकाल
जास्त भाईचारा खुलत आहे
-----------------------
मुक भावना परी
प्रीत आहे बोलकी
जातीधर्मा वरहित
हिरवळीवरती मुके जीव डोलती


-----------------------
—कल्पना जगदाळे@8बीड.-----------------------
🐍🐢🐍🐍🐍🐢🐍
हिरव्यागार शेतामध्ये
प्रेमाचा अंकुर फुलला.  वासरापाशी मांजर जावून
आपुलकीचा धडा शिकवला
शिरीष गिरी
🐆🐊🐋🐳🐠🐟🐡
तिच्या ओठांचा स्पर्श ओठांना झाला..
पण गुलकंद मिळवण्याची इच्छा अपूर्णच राहीलि..
तिने झटकले दूर,म्हणून काय जाहले..
इच्छा जीवंत अजूनही संपूर्णच राहिली..!

 ऋषिकेश
🌷🌼🌼🌼🌼🌼🌼
चित्र लेख


सांगुन जाती मुके प्राणी
मानव जातीला हो धडा
शिकवी जनाना आदॆशाचा लढा
हिरवळ वर करती ज्ञानाचा सडा

स्पधॆसाठी  मिरा सानप
🐅🐅🐅🐃🐃🐴🐴
🍁साहित्यदर्पण--चित्रशलाका🍁-चारोळीस्पर्धा-- भाग --01  🍁 दि.02.05.2016
मनी वासरूने मानले ना जाती, धर्म !!
शोधला लडिवाळ आसरा !
मानवा आता तरी  हे शिक
वर्म !!
तर सुखी होशिल भवसागरा!
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁प्रेषक-- कुंदा पित्रे
शिवाजी पार्क ,मुंबई
9324742706
🐓🐓🐓🐓🐓🐓🐓
📝  चित्रशलाका📝

          भाग--१
   (साहित्य दर्पण आयोजीत)

कशाला हवे मोजमाप मैत्री ला

जिथे असू आपण आश्वस्त

जगण्याला या अर्थ हि मिळतो

दुनिये मध्ये मैत्रीच  शाश्वत

   🍁🍁स्पर्धेसाठी🍁🍁

@~40

      सौ~मंजुषा देशमुख
                अमरावती
         📝📝📝📝📝
🌹🌻🌺🌻🌹🌻
[03/05 6:59 PM] Sangeeta Bhandawale: स्पर्धेसाठी चारोळी

विविधतेतुन एकतेचा संदेश
देतेय मांजर अन् वासरु
जातीधर्माच्या नावाखाली
नका हत्या करु !
     ...संगीता भांडवले
[03/05 6:59 PM] Sangeeta Bhandawale: स्पर्धेसाठी चारोळी

मायेच्या हिरवळीवर
कसं पहुडलंय
मांजर अन् वासरु
आपण पण भेदभाव विसरु!
    ....संगीता भांडवले

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
 संकलन
AK 47
AMKSLWOMIAW

1 comment: