Wednesday, 4 May 2016


📚 साहित्य  दर्पण Whatsapp ग्रुप  📰🖊
     द्वारा आयोजित

🗽    नाद चारोळी स्पर्धा   🗽
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

🚩भाग :- 3 रा दुसरा🚩
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
📆 दिनांक - 05 मे 2016
🛢 वार - गुरूवार
~~~~~~~~~~~~~~~~
🕰 वेळ - सकाळी 10:00 ते 7:00
==================
📝  विषय:- " मैत्री -एक नातं हवहवसं " 
==================
💥 संकल्पना :→आप्पासाहेब सुरवसे,लाखणगांवकर
**************************
💥 संयोजक--ना सा येवतीकर
************************
💥 परीक्षक -सौ. सुरेखा जाधव ,उस्मानाबाद
""''''''''''""""''''''''''''''''''''''''''"''''''''''''''''''''''''''''
💥 संकलन- जी पी पवार पाटिल,हिंगोली
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
💥 ग्राफिक्स - क्रांती बुद्धेवार सर, धर्माबाद
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"'
🔦 स्पर्धेचे नियम - 

💥ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे....
💥 जास्तीत जास्त पाच चारोळी पोस्ट करण्याची मुभा आहे 

💥 पाच पैकी  फक्त एकाच चारोळी खाली "स्पर्धेसाठी" असा उल्लेख करणे आवश्यक आहे.

💥 चारोळीखाली आपले पूर्ण  नाव, गाव आणि मोबाईल नंबर अवश्य लिहावे.
💥 चारोळी मध्ये विषयातील शब्द असावेत.
💥चारोळीत दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत यमक असावे.
💥 या  स्पर्धेचा निकाल ग्राफिक्स सह खालील blog वर  आणि साहित्य दर्पण वर पाहण्यास दिनांक 06 मे रोजी सायंकाळी 7:00 वाजता मिळेल.  त्यासाठी वारंवार चौकशी करु नये. 

💥साहित्य दर्पण ग्रूपच्या बाहेरील कवी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात...

📩 त्यासाठी .

🎾 खालील पैकी कोणत्याही एका मोबाईल नंबरवर किंवा फ़ेसबुक वर आपली चारोळी पोस्ट करावी ....

👤 आप्पासाहेब सुरवसे,लाखणगांवकर
📱 09403725973

👤 नासा येवतीकर, धर्माबाद 
📱 09423625769
================================

📝📕साहित्य दर्पण 📘📖
💈नाद चारोळी स्पर्धा💈
🔑  भाग~-- 3 -तिसरा   🔑
"~मैत्री -एक  नातं हवहवसं~"
==================

जीवनात यशस्वीतेसाठी,
एक नात हवहवसं असतं।।
रक्ताच्याही नात्यावरचं ते,
‘मैत्री' त्याचं नाव असतं।।

✒अनिल लांडगे उंडणगाव @27
9689675050
9021261820
********************************
मैत्रीचे नाते जसा
महापुरी लव्हाळा
नातेगोते वाहून जाती
उरे प्रेमाचा जिव्हाळा।

प्रा सौ शांता ठुबे.
अहमदनगर(19)
********************************
गुंफता गुंफून झाल..
मैत्रीचं एक नात हवहवस
तुझ्या माझ्या सुखदु:खात
तेच ते उमलणार नवंनवस

- महेश देसले
Mdesale29999@gmail.com 
८८०६६४६२५०
********************************
आपल्या माघारी ही 
आपलं गुणगान व्हावं 
जातीधर्माच्या पल्याड 
अशी आपली मैत्री असावं

नागोराव सा. येवतीकर @ 26
मु. येवती ता. धर्माबाद 
09423625769
********************************
मित्रा आठवते का आपली मैत्री
अभ्यास केला एकत्र  नि खेळलो संगे
पोटासाठी गेलो दोघे दोन दिशांना
आठवण तुझी येताच सायंकाळ रंगे 
  @२१ सुनिल बेंडे वसमत
********************************
जीवनात चांगल्या मित्रांची 
नेहमीच असते प्रतीक्षा 
खरी मैत्री कळते जेंव्हा 
संकट काळात होते परीक्षा 

नागोराव सा. येवतीकर @ 26
मु. येवती ता. धर्माबाद 
09423625769
********************************
मैत्री म्हणजे निस्वार्थाची फित 
मैत्री म्हणजे विचारांची जीत 
मैत्री एक नातं नित्य हवहवसं
मैत्री म्हणजे ओठांवर स्मित 

... सौ शशिकला बनकर, भोसरी, पुणे 
@35 
मोबाइल :  9763667401
********************************
मुला - मुलींच्या मैत्रीकडे 
लोकं " सैराट " वाणी पाहतात 
निखळ मैत्री काय फक्त 
मुला - मुलांमध्येच होतात ? 

नागोराव सा. येवतीकर @ 26
मु. येवती ता. धर्माबाद 
09423625769
********************************
मैत्री म्हणजे उत्साहाचं वलय 
मैत्री म्हणजे विश्वासाचं देवालय 

मैत्री म्हणजे मोकळा श्वास 
मैत्री म्हणजे एकत्र अभ्यास 

मैत्री म्हणजे निस्वार्थाची फित
मैत्री म्हणजे विचारांची जीत 

मैत्री जपते नाती जोडलेली 
मैत्री लावते शीस्त तोडलेली 

मैत्री देते फुकटचा सल्ला 
मैत्री गाठले लांबचा पल्ला 

मैत्री सुखदुःखात आधार 
मैत्री कृष्ण सुदामा सारखी सुंदर 

मैत्री असावी सुरक्षित 
अन सतत विकसित 

©कवयित्री सौ. शशिकला बनकर 
********************************
धनिकांच्या पंगतीला
मित्र असती हजार
सुदामा तर केव्हाच
झालाय हद्दपार....
जयश्री पाटील, वसमत 
********************************

आज सुदामा आहे हजर
सोबत सुविचारांची शिदोरी
मैत्री म्हणजे नाही शिरजोरी
मैत्री आधार आयुष्यभरी
.... सौ.शशिकला बनकर
================================

मैत्रीचं नातं जसा
संधी प्रकाश
जीवनाची संध्याछाया
रंग उधळी आकाश।
   शांता ठुबे
================================

मैत्री म्हणजे काय आहे
जशी गवळ्यासाठी गाय आहे 
ओळख माझ्या जगण्याची मित्रा
तुझ्या मुळेच सर्व दूर आहे
मंजुषा देशमुख
================================

एक नात हव हवस
श्रीकृष्णालाही  भुलविणार
रंकाच्या पंगतीतून
राजच्या पंगतीत बसविनार
मंजुषा देशमुख
================================

मैत्रीचे् नाते
जशी समईची ज्योतं
मनाच्या अंधारी
ठेवी प्रकाश तेवत।
शांता ठुबे 19
================================

एक नात मीराचं
कृष्णा सोबत मैत्रीच
सैराट होते मन तीचे
वैराग्य त्या मूर्तीच
मंजुषा देशमुख @40
================================

सुखात सहभाग
दु:खात साथ.
जीवनाच्या वाटेवर
मैत्रीचा हात. 
शिरीष गिरी धारुर
जि बीड @ 58
================================

" सैराट " झालं मन तिचं
" सैराट " झालो मी पण
करमत नाही जीव कसे
असे मैत्रीची ओढाताण
नागोराव सा. येवतीकर @ 26
मु. येवती ता. धर्माबाद
09423625769
-------------------------------------
तुझ्या-माझ्या मैत्रीची खुण
ना संदेश, ना चिठ्ठी,ना पुरावा
सोबत घालवलेले काही क्षण
हाच माझ्याकडे अमुल्य ठेवा!
    संगीता भांडवले(16)
   वाशी, उस्मानाबाद
  ९९२३४४५३०६
~~~~~~~~~~~~~~~~~~
सर्वच  मिळवीता  येतं जगात
  मैत्री मिळावीता  येतं नाहि
    एकदा गमविलेली मैत्री
   पुन्हा  कमविता येतं नाहि
    सौ मंजुषा देशमुख
          अमरावती, @40
         ९४२८८४१४०
================================

मैत्री असावी निरपेक्ष
ह्दयाला ह्दय जोडनारी.
क्षणभंगुर जीवनाला
मायेचा ओलावा देणारी................
शिरीष गिरी.धारुर
जि. बीड @ 58
================================

तुमच्या विना मित्रानों
झाले जिवन माझे सुने,,,,
एकटा पडलो मि इथे
रडवतात मला आपल्या मैत्रीचें क्षण जुने,,,,,
📝विशाल मोरे @52
7387737148
================================

(1)
स्वप्नांच्या हिंदोळ्यावर अलवार
झंकारणारे अबोल सूर मी व्हावे
हव्याहव्याशा मैत्रीच्या ह्या नात्यात
सप्तसुरांचे सुरेल गीत तू व्हावे
(2)
मैत्री तुझी माझी, एक नातं हवहवसं
रुक्ष वाळवंटातल्या हिरवळीसारखं
पहिल्या पावसात भिजल्यासारखं
इंद्रधनुच्या सप्तरंगांनी सजल्यासारखं
           
  ....  पुजा विलास(23)
================================

मैत्री एक नातं
हवहवसं वाटणारं
सुखात अन दुःखात
वेळेवर भेटणारं
टी शंकर @33
================================ 

1]
नाते तुझे नि माझे युगायुगाचे
 दुःखात ही वाटे हवेहवेसे
 हे बंध मैत्रिचे हळुवार जपायचे
लाविले अंतरी रोप इवलेसे
2]
 नाते मैत्रिचे हवेहवेसे
गगन ठेंगणे त्यापुढे
लोभसवाणे तीचे रुपडे
पार्थ कृष्ण ही फिके पडे 
3]
मैत्रिचे हळुवार नाते
वेलीचे गुलाब अन् काटे
पाळणा ही पानांचा
 हवाहवासा वाटे
4] 
नाते मैत्रिचे दिवा अन् वातीचे
 वात जळते की दिवा
 कोडे न उलगडे मानवा
नाश तिमिराचा करण्या प्रकाश हवा
   सौ.मीना सानप,बीड  @7
        9423715865
================================

धुकधुकणा-या स्पंदनाना, चैतन्याचा साज चढावा,
संवेदनाची लकेर व्हावी, अंतरी ती साठत जावा
असा आपला सहवास ठरावा,
      रूणानुबंध हा आठवावा...
       रूणानुबंध हा आठवावा..!
- संतोष वाढवे
09657898729
ग्रुप बाहेरील
================================

मैत्रि असावी फुलासारखी
   सुगंध  तिचा दरवळू द्या
जखडू नका नाते बंधनात
अलगद  तिला उमलु द्या
मिरा खेडकर...6...
================================

मैत्री एक नात
आयुश्यभराची साथ, 
कोलमडले जग जरी, 
नाही सुटेल तो हात
- वृषाली वानखेडे
================================

"सदैव खळाळी मैत्रिचा झरा
ना गाजावाजा ना आमंत्रण
अलगद ह्रदयातून जपावा
एकमेव अमुल्य आभूषण
...जयश्री पाटील.
================================

झाडाचं पातं
वाऱ्यावर डोलतं
मैत्रीचं हे नातं सर्वांना
नेहमी हवहवसं वाटतं...
✍🏼🖊🖋🎯🖋🖊
आप्पासाहेब सुरवसे
         AK 47
AMKSLWOMIAW
================================

जिवा-सखा ही मित्रांची
जगावेगळी आदर्श जोडी
मैत्रीच्या नात्यात नसो दुरावा
असावी फक्त साखरेची गोडी
✍🏼🖊🖋🎯🖋🖊
आप्पासाहेब सुरवसे
         AK 47
AMKSLWOMIAW
================================

मित्रत्वामध्ये केंव्हाही नसावी
कपटी ,गर्वाची, लबाड शाळा
प्रियेच्या केसांत गजरा गुंफावा
तव मोगऱ्यांचा फुलावा मळा
✍🏼🖊🖋🎯🖋🖊
आप्पासाहेब सुरवसे
         AK 47
AMKSLWOMIAW
================================

मित्रांने मित्रांच्या जीवासाठी
दिली प्राणाची कुर्बानी
त्या मित्रत्वाच्या नात्याचा
आदर्श घ्यावा आपण सर्वांनी
✍🏼🖊🖋🎯🖋🖊
आप्पासाहेब सुरवसे
         AK 47
AMKSLWOMIAW
================================

मैत्री
मैत्री नसते निव्वळ प्रेम
मैत्री असते जगण्याचा श्वास.
मैत्री नसते क्षणभंगुर
मैत्री असते अतूट विश्वास.
     रत्नाकर जोशी
          जिंतूर
    8275231641
ग्रूप बाहेरील
================================

एकमेकांना जपत
फुलवायचं मैत्रीचं नात
कधी कात टाकत तर
कधी ज्योत लावत
- स्नेहल विजय आयरे
मुंबई
09223362293
ग्रूप बाहेरील
================================

राजकाराणात किती असतो
वैर , आकस, आणि दुजाभाव
पण मैत्रीच्या नात्याला जागायचे
मोदी पवार नि मुंडे विलासराव
✍🏼🖊🖋🎯🖋🖊
श्री.आप्पासाहेब सुरवसे
       लाखणगांवकर
AMKSLWOMIAW
@🌹AK 47🌹
================================

मनाने  निर्मिले
नाते  पवित्र
मनाने जोडलेले
सच्चे  मित्र
--- शफी बोल्डेकर.
       हिंगोली.
9421461181.
🌹🌹🌹🌹🌹🌹
ग्रूप बाहेरील
================================

तुझी मैत्री,एक नातं हवंहवंसं ....
दिवसा सूर्य,रात्री चंद्रा सारखं ..
फुलवी जीवन,मार्गदर्शन असं
अहंकाराने करू नको पारखं ...
प्रा. सौ.संगिता भालसिंग 25
अहमदनगर
================================
ग्रुप बाहेरील
धकाधकीच्या आयुष्यात
असावं काही हवहवसं
मैत्रीचं एक नातं
असावं एक गोडसं
🖊🖊
अजय धोटे
7507808990

************************
ग्रुप बाहेरील
मैत्री एक नातं हवहवसं
विचार सोबतीला दिव्याजसे
हे शिडकावे पावसाचे
उगवते फूल नवे नूतन जसे
🖊🖋
संजयकुमार मांजरमकर
नांदेड
*******************************
ग्रुप बाहेरील 
नातं मैत्रीचं आपलं
जणु डोळा आणि पापणी
करण्या संरक्षण  डोळ्याचं
पहा लवते पापणी
🖊🖋🖊
नरेंद्र मस्के 
शिरपुर  धुळे
*******************************

सुंदर क्षण,अलवार आठवांचे
हवेहवेसे  एक नाते मैत्रीचे....
वेदनेला हळुवार फुंकर देऊन
फिके पडले नाते रक्ताचे
***********************
सौ सुरेखा जाधव  उस्मानाबाद 24 
*******************************
मैत्रीच्या या नात्याला
बंध न जातीवर्णाचे
आयुष्याच्या वळणावर
वाटे सदा हवेहवेसे.

अ.नं .22
स्मिता देशपांडे 
सोलापूर 
9637991478
*******************************

1)मैत्रीत असते  ती मधूरा भक्ति
    नसते कसलीच अपेक्षा
   असते चांदण्याची अवीट शक्ति
    क्षितिजा पलिकडील कक्षा

2) मैत्री नाजुक धाग्यांची
     मैत्री ओढ लावणारी
     मैत्री नितळ प्रेमाची
     मैत्री याद जपणारी

3) मैत्रीला रस, रंग,रूप नसतं
    भाव शब्दांच्या पलिकडील
    सुंदर विणलेलं नातं गवसतं
    मांगल्याच्या लेण्या मधील

4)मैतरानं केलेली मदत
    मनानं घातलेली साद
    नात्यात बंधाची दौलत
    हाच खरा प्रतिसाद !!
🍁नंबर 5 स्पर्धेसाठी---🍁
5) मैत्री असते श्रावणपाऊस
     विध्द मना तनाला सुखवित
     आभाळाचं  नातं हव हवस!
     अंतरायाचे  गीत लुभावित
  ==================
कुंदा पित्रे --
शिवाजी पार्क,दादर
मुंबई.28
*******************************

मैत्री तुझी नी माझी,
वाटते सर्वांना नकोनकोशी,
काय दडलय तुझ्या मैत्रीत भुजंगा,
वाटते मज ही रोज हवीहवीशी.
- क्रांती बुद्धेवार @ 01
*******************************

 मैत्रीत माझ्या नि तुझ्या
भाव आहे सौख्याचे
नेहमी आपल्यात असू दे
बंध कृष्ण-सुदाम्याचे
✍🏻गणेश @5
*******************************

मित्र श्वास माझा 
मी  त्याचे ठोके,,,
मित्र वारा माझा 
मी त्याच झोके
🖊🖋🖊
.विशाल मोरे
   *******************************                 

मैत्री असावी पाण्यासारखी           
त्यात मिठ अन साखर.  
सारखीच वाटावी                                           माझ्या सखीची आठवण 
कायम ह्रदयी असावी                                 सुभद्रा खेडकर @ 20
*******************************

"तुझ्या माझ्या मैत्रीला
नकोच कोणता किनारा,
चार हाताचं बळ देऊ
दुर्बल,वंचितांना सहारा"
   - संगीता देशमुख,वसमत @14
*******************************

 मैत्री माझी अन तिची                         
जशी चंद्रासवे रोहिणी                         
दोघींचे खेळ अजुन दिसतात.                 
भासतात तव अंगणी   
खेडकर सुभद्रा @ 20
*******************************

सैराट मनाला लागे
बंधन एक नवंनवंसं
प्रत्येकाला भुलवी
मैत्रीचं नातं हवंहवंसं

- दिनेश चौडेकर@36
*******************************

 प्रत्येकाला इतर धर्माचा
एकतरी मित्र असतो
मैत्रीच्या पवित्र नात्यात
कधीच धर्म नसतो.
- शफी बोल्डेकर, 
हिंगोली.
9421461181
ग्रूप बाहेरील
*******************************

स्वार्थाची, मौजेची
मैत्री कधी न जडो
जुळताना मैत्रीचे धागे
अहंकार गळून पडो

तत्त्व अन् विचारांसाठी
मैत्रीची गुंफन व्हावी
त्या सत्याच्या लढ्याची 
इतिहासाने गाणी गावी.

संजय खाडे ,औरंगाबाद 
मो.9421430955
*******************************

जर खरी मैत्री हवी असे 
तर बघू नका 
जात..
फक्त द्या वेळोवेळी
आपल्या मित्रास 
साथ..
विशाल मोरे
@52
*******************************
 मैत्री नेहमी असते 
फक्त बहरण्यासाठी
कधी न संपण्यासाठी
सतत जपण्यासाठी 
..... निलेश कवडे @ 44
*******************************

 अंतरंगातून सतत पाझरनारं
अंतर्बाह्य चिंब भिजवणारं
मैत्री एक नातं हवहवसं
उणीवेला जाणीव देणारं 
- सुनील रेगुलवाड ( सुनील रे )
 7588151939
ग्रूप बाहेरील
************************************
(1)

मैत्री तुझी नि माझी
असे बिनधास्त
सुख-दु:खात सदैव 
असे एकमेकास साथ
*************************************
(2)

मैत्री तुझी मृग कस्तुरीचा
जिवन सुगंधुन जाई
मैत्री तुझी गंध फुलाचा
मन बहरुन जाई
*************************************
(3)

मैत्री हे फूल कस
निस्वार्थपणे उमलत.....
स्वार्थी नात्यापेक्षा
मैत्री हे नात हवहवस वाटत..
**************************************
(4)

जन्मासोबत जन्मली
नातीगोती सारी........
जन्मानंतर जन्मली 
मैत्री ही लय भारी.......
**************************************
(5)

मैत्री एक नाते हवहवसे वाटते
ना वय,जात-धर्म यासी बाटते
जीवनी हे पान सदैव साठते
ना मृत्यू यासी कधी गोठते...

कल्पना जगदाळे@8बीड
9921967040
*******************************

 मैत्री तुझी माझी, 
बासरीचा सुर, 
नैनी बसला रे नुर, 
तुझ्या संगतीचा असर.
वृषाली वानखेडे

मैत्री गाठ असावी जन्माची,
तुझ्यामाझ्या नात्याची, 
मरनाच्या दारातून 
माघारी नेनारी.
- वृषाली वानखेडे 
*******************************
मैत्री जात धर्मा 
पलीकडचं नातं 
मैत्री माणूसकी 
दळणारं जातं 

 शरद ठाकर 
सेलू जि परभणी
*******************************

 तुझ्या माझ्या मैत्रीचे
धागे कधी ना तुटणार
दोन मन विचार एक
फोडण्या हिंमत ना जुटणार
🖊🖊🖊
महेंद्र गणपत गवई
इसोली ता चिखली 
बुलढाणा
*******************************

मैत्री हे नात जिव्हाळ्याचं       
एकमेकींच्या विश्वासाचं         
कौटुंबिक धाग्यापेक्षा         
मजबूत अतूट प्रेमाच !
- श्रीमती वैभवी विष्णू तावडे, बोरिवली (पूर्व)
09757335365
*******************************

स्वार्थाची, मौजेची
मैत्री कधी न जडो
जुळताना मैत्रीचे धागे
अहंकार गळून पडो

तत्त्व अन् विचारांसाठी
मैत्रीची गुंफन व्हावी
त्या सत्याच्या लढ्याची 
इतिहासाने गाणी गावी.
( स्पर्धेसाठी)

संजय खाडे ,औरंगाबाद 
मो.9421430955
*******************************

 बालपणीच्या मैत्रीला,     
नसतेच कसली बेगडी झूल 
म्हणूनच तिची सर्वांना, 
आयुष्यभर पडते भूल

मैत्रीसारखे नितळ निर्व्याज,
तरल सुंदर नाही नाते 
मातृप्रेमानंतर जग, 
तिचेच तर गोडवे गाते

तुमच्या माझ्या स्वभावातल्या
 जपून ठेवत खोडकर मुला 
अंतरंगातील एका कोपर्‍यात,
 झुलत राहतो मैत्री झुला

श्रीमती भारती सहदेव सावंत, ठाणे
09594030417
ग्रुप बाहेरील
*******************************
मैत्री तुझी न माझी      
आषाढ घनासारखी     
बरसली तर धों धों          
नाही तर नुसतीच कोरडी  ✍दिपक@9
**************************
मैत्री असावी लोण्या प्रमाणे,
जपावे तिला सोन्या प्रमाणे,
फूल मैत्रीचे अत्यंत कोमल,
बंध हे वाटावे श्वासा प्रमाणे...

निर्मला सोनी.
================================





2 comments:

  1. साहित्यप्रेमी आणि कष्टाळू व्यक्तिमत्वाचा ब्लॉग.।।

    ReplyDelete
  2. खुप सुंदर सर

    ReplyDelete