Showing posts with label साहित्य दरबार. Show all posts
Showing posts with label साहित्य दरबार. Show all posts

Sunday, 11 December 2016

आजची बचत ; उद्याचे भविष्य

 *साहित्य  दर्पण Whatsapp समूह* 
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"''''''''''''
     यांचे द्वारे आयोजित
 साहित्य दरबार वैचारिक लेखमाला स्पर्धा 
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"''''''''''''
 दिनांक - _11/12/2016_
 वार - रविवार
~~~~~~~~~~~~~~~~
 वेळ - सकाळी 10:00 ते 7:00
~~~~~~~~~~~~~~~~
★★★★★★★★★★
विषय:-
*आजची बचत ; उद्याचे भविष्य*
(वेळ, पैसा, पाणी, वीज, कागद आणि इतर काहीची बचत यावर लेख अपेक्षित)
★★★★★★★★★★
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"''''''''''''
 स्पर्धेचे नियम -
 ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे....
 आपला लेख किमान 100 आणि कमाल 500 - 700 शब्दांच्या मर्यादेत असावे. त्यात व्याकरणाच्या चूका कमी असावेत.
 स्वनिर्मित लेख असावा. कुठलीही कॉपी नसावी 
 लेखाखाली आपले पूर्ण नाव, गाव मोबाईल नंबर आणि email id अवश्य लिहावे. अन्यथा लेख स्पर्धेतुन बाद समजले जाईल.
स्पर्धेतील निवडक लेख संयोजक वृत्तमानपत्रातून प्रकाशित करतील याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी.
 या  स्पर्धेचा निकाल ग्राफिक्स सह खालील blog वर आणि आपल्या साहित्य दर्पण वर पाहण्यास दिनांक _13 डिसेंबर 2016_ रोजी सायंकाळी 9:00 pm वाजता मिळेल.  त्यासाठी वारंवार चौकशी करु नये.
••••••••••••••===============••••••••••••
*यशस्वी जीवनात वेळेचे नियोजन*

भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासून वेळेचे महत्त्व सांगितलेले आहे. शालेय जीवनात आपण वेळेचे महत्त्व जणून न घेता त्याचा अपव्यय म्हणजे वाया घालवित राहलो, तर भविष्यात यशस्वी जीवन कधीच जगु शकत नाही. जगात कुणी श्रीमंत असतील वा गरीब असतील सगळ्याजवळ वेळ मात्र समसमान आहे. जे कुणी वेळेचा सदुपयोग करतील तेच जीवनात प्रगती करू शकतील. जगात तीन गोष्टी प्रसिध्द आहेत ज्या की एकदा गेल्या नंतर परत मिळविता येत नाहीत. त्या म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण, तोंडातून बाहेर पडलेला शब्द आणि सर्वात महत्वाची म्हणजे गेलेली वेळ. आजची गेलेली वेळ कितीही पैसा खर्च केला आणि कितीही धडपड केली तरी परत मिळविता येत नाही. त्यामुळे आपणा जवळ उपलब्ध असलेल्या वेळेचे योग्य नियोजन करता येणे आवश्यक आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपी जाईपर्यंत उपलब्ध वेळाचे वेळापत्रक तयार करावे. ज्याप्रकारे शाळेतील वेळापत्रकाप्रमाणे तासिका आणि अभ्यासक्रम यांचे नियोजन केले जाते. त्यामुळेच शाळेतील सर्व प्रक्रिया योग्य पध्दतीने घडत असतात. आपल्या जीवनातील सकाळी झोपेतुन उठणे, खाने, खेळणे, शाळा, शिकवणी, टी. व्ही. पाहणे आणि अभ्यास करणे या सर्व क्रियांच्या वेळा वेळापत्रकात नमूद करून त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केल्यास वर्षभरात ठरविलेली सारेच ध्येय साध्य होताना दिसून येतात. फक्त दहावी आणि बारावी हे अति महत्वाचे वर्ष आहे म्हणून बाकी च्या वर्षात अभ्यास न करता याच वर्षात खुO अभ्यासा केल्याने यश मिळत नाही. अभ्यासात सातत्य आणि नियामितपणा ठेवल्यास महत्वाच्या वर्षी कोणत्याही विषयाची भीती वाटत नाही आणि अभ्यासा डोईजड वाटत नाही. मित्राशी गप्पा मारत बसणे, जास्त वेळ टी व्ही पाहणे, आणि खेळणे इत्यादी प्रकारात वेळेचे नियोजन केल्यास त्याचा नक्कीच उपयोग होतो. आपल्या मेंदुला आणि मनाला वेळापत्रकाची सवय लागली की, "हे काम पूर्ण करा " अशी म्हणण्याची वेळ कोणावरसुद्धा येणार नाही. 
 - नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
  9423625769
  nagorao26@gmail.com


[12/11, 11:41 AM] 
ghanashyam borade:
 साहित्य दरबार लेखन स्पर्धा 
स्पर्धेसाठी लेख

विषय -आजची बचत उद्याचे भविष्य 

बचत या शब्दाचा अर्थ आणि व्याप्ती किंबहुना हि संकल्पना खुप व्यापक आहे , हे सर्वांनाच माण्य करावे लागेल . बचत हा शब्द उच्चारला कि आपल्या समोर एकच पर्याय दिसतो तो म्हणजे पैशाची बचत करणे होय , कारण आजपर्यंत फक्त पैशाची विविध मार्गाने बचत कशी करता येईल पैसे शिल्लक कशे पडतील एवढंच आपण शिकलो आहोत , पर्यायाने व्यवहार करताना , वस्तु खरेदी करताना पैसा वाचेल आणि तो पैसा कुठे व कसा सुरक्षित राहील यासाठी आपण बॅंकेचा शोध घेतो 
नी पैसा गुंतवणूक करतो . त्यामध्ये बचत खाते, आर डी , एफ डी , फंड वगैरे बरेच मार्ग आहेत . परंतु खऱ्या अर्थाने केवळ पैसा बचत केला म्हणजे आपले भविष्य उज्वल झाले असा अर्थ घ्याल तर पैश्याव्यतिरिक्त आपण भविष्यात काही वाचवू शकणार नाही .आपल्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या असंख्य गोष्टी वस्तु आहेत , त्या कदाचित आपल्याकडे सध्या  भरपूर प्रमाणात उपलब्ध असतील पण उद्या भविष्याचे काय ? तुमच्या लक्षात आलं असेल मी नैसर्गिक संसाधनाबद्दलल बोलतोय . आपण ज्या पर्यावरणात राहतो तिथल्या संबंध नैसर्गिक साधन संपत्तीचा सर्रास वापर आपण करत असतो , ही गोष्ट आपल्या लक्षात सुद्धा नसते पण होय नैसर्गिक संपत्तीची आपण अतिरेकी लुट करतो हे माण्यच करावे लागेल . पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण झाल्यापासुन सजीव आणि निर्जीव घटकात अंतरक्रिया होत आलेल्या आहेत नी पुढेही होणार त्यालाच ecosystem (परीसंस्था) म्हणतात  . पृथ्वीवर राहणारा प्रत्येक जीव हा जास्तीत जास्त अजैवीक घटकावर अवलंबून असतो . याचं उदाहरण द्यायचे झाल्यास पृथ्वीवर असलेली अन्नसाखळी माणवाला अन्न मिळणारा प्रार्थमिक घटक वनस्पती असून तो सजीव आहे , ह्या वनस्पती सुर्यप्रकाश आणि कार्बन डाय ऑक्साईड व पाणी वापरून अन्न तयार करतात नी माणसाला अन्न पुरवठा करतात याचा अर्थ सजीव घटकांची निर्जीव घटका सोबत अंतरक्रिया होतात एवढं सांगायचा हा अट्टाहास आहे .
             आपण सर्वजण केवळ आजचा विचार करतो उद्याची चिंता आम्ही करत बसत नाही . काहींचा गोड गैरसमज आहे की माणसाकडे पैसा असला म्हणजे सारं काही मिळवता येतं, त्यांना खऱ्या अर्थाने निसर्ग नियम माहीत नसावा . ज्या गोष्टी नैसर्गिक आहेत त्या वापरायला आज तरी पैसे द्यायची गरज नाही पण हि संप्पत्ती भविष्यात टिकून राहील असे सांगता येत नाही . काही साधने जसे पाणी , झाडे, खनिजे ,विज, पेट्रोलियम निसर्गाचे देन आहेत , त्याचा वापर जास्त होत आहे, तेव्हा येणार्या काही वर्षात त्यांचे प्रमाण कमी होणार आहे . आपल्या पुढच्या पिढीला हि साधने लागणार आहेतच ती त्यांना भविष्यात पुरावीत त्यासाठी आज प्रत्येकाने आवश्यक तेवढीच संसाधने वापरणे गरजेचे आहे . आज पर्यावरणाचा विविध मार्गाने ऱ्हास , प्रदूषण होत आहे , याला जवाबदार आपणच आहोत . वाढत्या प्रदूषणमुळे विविध रोगांना आमंत्रण आपणच दिले आहे . भविष्यात आपल्याला सक्षम , निरोगी , सुदृढ पिढी निर्माण करायची असेल तर आजच उपाय गरजेचा आहे . तेव्हा आजची बचत उद्याचे भविष्य ठरवेल . एवढंच या निमित्ताने सांगावसं वाटतं . 

घनश्याम बोह्राडे बुलडाना 
समुह क्रमांक 19
मो 8308432625


[12/11, 12:21 PM] 
Subhadra Sanap: 
*📚साहित्य दरबार वैचारिक लेखमाला*📚
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*विषय: आजची बचत; उद्याचे भविष्य*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
         लहान असताना पाहिलेला एक प्रसंग, वडिल शेतकरी असल्यामुळे सुटी असली की लहान मोठ्या कामासाठी आम्हाला मदतीला घ्यायचे.बाजरीचे खळे चालु होते.भलीमोठी सुडी (सुडी म्हणजे बाजरी काढनी झाल्यानंतर कनसासहीत त्याच्या पेंढ्या वाळुन त्याचे एकच रचलेले मोठे बुचाड)होती. मोडणी होत आली होती.वडील एका बीळाच्या मागोव्याने कुदळीने खोदत होते.मला समजेना हे काय करताहेत.पण थोड्याच अंतरावर भलामोठा कणसाचा ढिग होता .उंदिर त्या सुडीतील धान्य तर खात होताच,पण पुढील काळासाठी ठेवत होता.या उदाहरणावरुन एक लक्षात घेतले पाहिजे,भलेही तो उंदिर शेतकर्याच्या कष्टाचे खातोय व साठवतोय. पण  ती एकप्रकारची बचतच समजुया.
   मी आज काही मुद्याला अनुसरुन बचतीचे फायदे व ती बचत कशी करता येईल हे सांगु इच्छिते.
*वेळ*: वेळेच्या बाबतीत बचत करा असं मी म्हणनार नाही.Time is mony.अशी एक म्हण आहे .खरोखर वेळ कुणासाठी थांबत नाही.आजचे काम आत्ताच करा ,उद्याचे काम आजच करा .म्हणजेच वेळेची बचत करा .जीवनातील प्रत्येक क्षण महत्वाचा आहे .गेलेली वेळ आपल्या आयुष्यात परत कधीही येत नाही .आणि मग पश्चातापाशिवाय पर्याय उरत नाही.
   *पैसा*:चंगळवादी संस्कृतीमध्ये कितीही पैसा असला तरीही पुरत नाही.आजची काटकसर उद्यासाठी कामी येत असते .मानसाच्या गरजा वाढल्या. नको त्या सुखसोयीच्या मोहापायी माणुस भरकटत जात आहे. त्यासाठी प्रत्येक गोष्टीचे नियोजन हवे .आपले उत्पन्न ,गरजा व त्यातुन राहनारी शिल्लक म्हणजेच बचत .अनावश्यक बाबी टाळुन माणुस बचत करु शकतो. त्यासाठी आपल्या मनाची तयारी करावी लागते.आवश्यक आहे तो खर्च तर करायलाच पाहिजे ,पण जिथे गरज नाही असा खर्च टाळुन आपण बचत करु शकतो .माणसाच्या मुलभुत गरजा अन्न,वस्र,निवारा या आहेत. यात चंगळवाद कसा होतो पहा:उदा अन्न : बाहेरचे चमचमीत खाण्याची सवय लागली तर,घरचे अन्न बेचव लागते. ज्यावेळी आपण प्रवासात असतो तेव्हा बाहेर खावेच लागते.पण काही लोक असे आहेत त्यांना हॉटेलच्या जेवनाची चटक लागलेली असते.एक लक्षात घ्या घरचे व बाहेरचे अन्न यात जमिन अस्मानाचा फरक आहे.  आता दोघेही नोकरीला घरी हम दो हमारा एक या कुटुंबात बाहेर जेवायला जाण्याचे प्रमाण जास्त असु शकते .पण घरीच आपण सकस व चवदार अन्न बनवले तर बाहेरचे ते जिभेचे चोचले पुरवनारे निकृष्ट प्रकारचे अन्न खाण्याची इच्छा होणार नाही .परिणामी बचत होईल .
वस्र: कपडे चांगले असावेत आजकाल राहणीमानावर फार भर आहे .कधी कधी तर व्यक्तिच्या राहाणीमानावरुन त्याची गरीबी, श्रीमंती याचा अंदाज बांधला जातो. राहणी साधी असली तरी विचार उच्च असावेत.मानसाचा बराचसा व अनावश्यक खर्च हा कपड्यावर होतो हे प्रत्येकाने आपले आत्मपरिक्षण करुन सांगावे. आपल्या किती ड्रेस असावेत,?मुलांना किती ड्रेस असावेत?,कपाटात किती साड्या पाहिजेत? हा एक संशोधनाचा विषय आहे.पण आपण इथे बचत करु शकतो एव्हडच मला सांगायचे आहे.
निवारा: माणसाने खरे तर मानुसकी कमवावी,खुप सारे चांगले मित्र कमवावेत. पण खर्या सुखाला पारखा झालेला माणुस खोट्या सुखामागे धावतो. एका कुटुबातील चार लोकांसाठी किती रुमचे घर असावे? मी तर अस म्हणेल ,जितके घर मोठे तितकी मानसाची मनं दुरावतात.खरतर घर छोटेच असावं व खुप सारा प्रेम, जिव्हाळा तिथे ओतप्रोत भरलेला असावा *घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती ,तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती* यासाठी नियोजन पूर्वक घरासाठी आवश्यक असेल तो खर्च करावा पण, अनावश्यक खर्च टाळुन बचत करता येवू शकते.आज बचत केलेला पैसा नक्कीच अडीअडचनीला कामी येवू शकतो. म्हणुन मानसाने बचत करायलाच पाहिजे.
   *पाणी* गेल्या दोन चार वर्षामध्ये पाऊस पडला नव्हता. आणि दुष्काळाची दाहकता काय असते याचा अनुभव मराठवाड्यासह अवघ्या महाराष्ट्राने घेतलेला आहे.हंडाभर पाण्यासाठी किती वणवण फिरावं लागत होत हे आपण अनुभवले आहे. यातुन आपण काय घेनार आहोत. पाऊस दरवर्षी पडेलच याचा नेम नाही. म्हणुन आहे त्या पाण्याचा वापर योग्य ते नियोजन करुन केला पाहिजे. त्यासाठी पाणी काटकसरीने वापरणे आवश्यक आहे.पाणी हे जीवन आहे. त्याचे उपयोग : पिण्यासाठी व मानवी जीवनात इतर कामासाठी,जनावरांना पिण्यासाठी, शेतीसाठी,औद्योगिकीकरणासाठी यासाठी पाण्याची गरज लागते.माणुस पाणी किती वापरतो यापेक्षा तो ते कसे वापरतो याला जास्त महत्व आहे.पाणी वाया जानार नाही याची काळजी घेणे म्हणजेच पाण्याची बचत होय. शेतीसाठी पाणी वापरतांना आधुनिक तंत्राचा वापर केला तर पाण्याची बचत होवू शकते. उदा: ठिबक सिंचन,तुषार सिंचन यामुळे पाण्याची बचत होवु शकते.
तसेच कारखाण्यातील पाणी वापर करतांना वाया जाणार्या पाण्यावर प्रक्रिया करुन ते पाणी इतर कामासाठी वापरले पाहिजे.तसेच पावसाचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब केला पाहीजे उदा: जलपुनर्भरन ,पाणी अडवा पाणी जिरवा यामुळे आपण पाण्याची साठवणुक करु शकतो. व योग्य वापरामुळे बचत करु शकतो.
*वीज*अति वीज वापर केल्यामुळे लोडसेडिंगला सामोरे जावे लागते हे आपल्याला माहित आहे .वीज मिळण्याचे मार्ग म्हणजे जलविद्युत,औष्णिक विद्युत,पवनउर्जा,सौरउर्जा हे आहेत. भरपूर पाणी असेल तर जलउर्जा मिळेल. आज आपल्या हे लक्षात येईल की विज हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनलाय . म्हणुन तिची बचत करुन ती दिर्घकाळ टिकावी असे वाटत असेल तर,जास्तित जास्त सौरउर्जेचा वापर करावा. वीज बचतीचे अनेक मार्ग आहेत .जसे *घरात आवश्यक तेवहडीच वीज वापरावी.सेलो बल्पचा वापर करावा.पाणी तापविण्यासाठी सोलार वापरावे. विजचोरी टाळावी. यातुनच वीजबचत करता येईल.
*कागद*आजकाल सगळीकडे पेपरलेसचा बोलबाला आहे. तरीही अनेक ठिकाणी कागदाची गरज भासतेच. तरी पण कागद जपून वापरुन बचत करुया.
*इंधन*इंधनाची बचत करणे मानवी जीवनासाठी फार आवश्यक आहे.इंधनाचे साठे मर्यादित असल्याकारणाने ते जपून वापरावे.त्यासाठी पायी चालणे. आठवड्यातुन एखाद्या दिवशी सायकल वापरणे,अशा पर्यायामुळे इंधन बचत तर होईलच शिवाय आरोग्य संवर्धनही होईल.
   या सर्व बचतीचा भावी जीवनात नक्कीच फायदा होणार आहे. गरज आहे आपल्या इच्छाशक्तिची .थोडस नियोजन व थोडी काटकसर किती फायद्याची आहे .
    करुया बचत आपण सारे
    उज्वल भविष्य घडविण्यारे
    आस आहे इच्छा शक्तिची मोठी
    बचत करुया उज्वल भविष्यासाठी

      सौ.खेडकर सुभद्रा त्रिंबकराव
     मुख्याध्यापिका जि.प.प्रा.शा.
    किट्टीआडगांव ता.माजलगांव जि.   बीड.      समुह क्र.20       मो नं.     9403593764


[12/11, 1:28 PM]  Kalpna Jagadale
*साहित्य दरबार वैचारिक लेखमाला*
📚••••••••••••••••••••••••••••••📚

*विषय- आजची बचत, उद्याचे भविष्य*

📚••••••••••••••••••••••••••••••📚


“वेध भविष्याचा घेतांना नित्य भुत 
नि वर्तमानकाळाचाही विचार व्हावा
अनुभवाच्या याच शिदोरीतुनी जीवन
प्रवास हा प्रत्येकान सुखकर तो  करावा”

वरिल माझ्या चारोळीतुन आपणास आपले उदयाचे भविष्य उज्वल, प्रकाशय, सुखावह,  जर करावयाचे असेल तर नक्कीच आपणास सदोदित भुतकाळीतील चुकातुन सुयोग्य शिकवण घेवून वर्तमानात त्याची रूजवण करून भविष्य हे यशस्वीरित्या मार्गक्रमीत करायचे आहे.

आपले वडिलधारे नेहमी म्हणतात “जसे पेरावे तसेच उगते” म्हणजेच आजवर आपला नक्कीच हा येणारा उदया हा अवलंबुन असतो म्हणुनच असेही म्हटले जाते की, “जैसे ज्याच कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर”.आणि जे सदविचारी असतात ते नेहमीच याचा विचार करून वागतात आणि म्हणुनच की काय पंरतू प्रत्येक पालक हा आजकाल आपल्या पाल्याच्या मनी सुसंस्काराची रूजवण ही जाणिवपुर्वक करत असतो. त्यातीलच *पैसे बचत* ही एक उत्तमप्रतिचे मुल्य रूजवणुक आहे . त्यानुषंगाने मुलाना लहानपणापासुन *गल्ला*
नावाची घरातच उघटलेली *बचत बँक* असते. ती मुलच या बँकेचे कर्ताधर्ता असतात.त्याच्याकडील बचतीचा पैसा हा त्यांना मनस्वी जणू गर्भश्रीमंतीचा रोजच नवनवा असा आनंद नि अनुभूती देऊन जातो, देतही असतो.मग सुरू होते त्यांची बचतीची सवय,जी त्यांना त्यांचे भविष्य स्वप्न रोज रंगवतांना रोजच बचत व्हावी ही रूजवणही कळतनकत होत राहते.आणि कालांतराने हा गल्ला पुर्ण भरला जातो आणि मग तो फोडून त्यातुन सायकल,घड्याळ,खेळणी, काहीची शिकवणीची वार्षिक फिस,काहीचे आई -बहिणीसाठी मदत, या व अश्या नानाप्रकारची ही *पैसे गल्ला बचत योजना* उपयोगी पडते ,ज्याप्रमाणे  “बडत्यास काडीचा आधार” ही बचत बँक कित्येकाच्या आयुष्यात कायमस्वरूपी बचतीची रूजवणुक करून जाते.

मुलांनामध्येच स्रीयां ही बचत रजवणुक करत नाही तर स्वत: ही  बचत करतात आणि वेळेप्रसंगी उपयोगी पाडतात.येवढेच काय ताज उदाहण बचतीचे म्हणजे *मोदी निर्णय*  1000-500 नोटा बंदी झाली आणि गृहीणींचे डब्यातील ,साड्याच्या घड्यातील पैसे, शेजारणीकडील हात उसणे पैसे, गुंडाळून ठेवलेली गाठोडीतील पैसे,
या व अश्या कित्येक प्रकारातुन गृहीणीच्या आवडीचे  *पैसे बचत ठेव घोडाळा* जणू काळ्या पैशागत उघडकिस अदृश्य स्वरूपात प्रत्येक घरांघरातुन उघडकिस आला आणि हाच महिला वर्ग आपल्या इच्छा मारून ,मन मारून किती पैसा रूपी बचत ही आपल्या संसारूपी गाडा ओढण्यास करतात हे ही तितक्याच प्रखरषाने जाणवले व अनुभवलेही.मला तर वाटत त्यांच्या या बचतीसाठी त्यांचा यथोचित असा  पतिराजा कडून सन्मानच हा  व्हायला हवा होता.परंतू झाले *उलटेच पितळ उघडे पडल्यागत* सगळी पैसारूपी बचत पतीराजांस देवून *बुडत्या बचत बँकेची ती राणी* झाली.परंतू यातुन एकच म्हणावेस वाटते की प्रत्येक महिला ही पैशाची बचत ही अंत्यत उत्तमप्रकारे करू शकते हे तिने यातुन पुराव्यानिशी सिद्ध केले आहे.याचमुळे की काय कित्येक नवऱ्यांची कर्ज फिटली,  उसनवारी मिटली, लग्न कार्य पार पडली, अडलीनडली सर्व कामे ही या *महिला पैसा बचत  योजनेमुळेच* शक्य झाली.

अशाप्रकारची पैसा *आजची बचत* योजना ही प्रत्येकाच्या आयुष्यातली *उदयाचे सुकर भविष्य* साध्य झाल्या शिवाय राहणार नाही हे नक्कीच नमुद करावेसे वाटते.


📚••••••••••••••••••••••••••••••📚

सौ.कल्पना जगदाळे, घिगे.बीड
        समुह.क्र.@★8

📚•••••••••••••••••••••••••••••📚


[12/11, 1:56 PM] Manisha Wani: 
।। स्पर्धेसाठी लेख।।
   
      ।।आजची बचत,उद्याचे भविष्य।।

    प्रथमच जेव्हा मी वयाच्या बाविसाव्या वर्षी नोकरीला लागले तेव्हा जवळ बोलावून माझ्या परमपूज्य वडिलांनी अभिनंदन करून आशिर्वाद दिला व एक उपदेश दिला,
"आजपासून तू नोकरदार महिला झालीस.दर महिन्याला हातात पगार येईल.पैसे पाहून मन हरकून जाईल,स्वकष्टाच्या पैशाची किंमत काही वेगळीच असते.तरी पगार हाती आल्यावर पगाराचा ८० टक्के भाग बचत करायचा व २० टक्के भागातच आपला खर्च निभवायचा.हे असं काही वर्ष केल्यावर प्रथम एक घर घ्यायचं व संसारात पडल्यावर हीच बचत ४० टक्क्यावर येवून थांबवायची".
        आजही मी माझ्या वडिलांच्या सल्ल्यावर चालते आहे.बचतीची सवय ही बालवया पासूनच लागत असते.लहान असतांना वडिलांनी आम्हा भावंडांना महाराष्ट्र बेंकेची"मी आलेय मिंटी एक खारोटी"ह्या पिगी बेंक योजनेत खाते उघडून दिले होते.दर महिन्याला पन्नास,शंभर किंवा त्याहून जास्त रक्कम जमा करायचे नवीनच व्यसन आम्हा भावंडांना लागले होते.व हे जमा झालेले पैसे सुद्धा आम्हीच बेंकेत जमा करायला जायचो.
   बालपणी ज्या मुलांना बचतीचे महत्व व सवय लावण्यात येते ती मुले मोठी झाल्यावर उधळमापले पणाने वागत नाहीत हा माझा स्वानुभव आहे.बरं हे झालं पैशांच्या बचतीच्या बाबतीत.
     जिवनात माणसाला अनेक प्रकारची बचत करावी लागते.आता तुम्ही म्हणाल,आज पर्यंत आम्ही पाणी बचत,पैसा बचत,वीज बचत व कागद बचत ह्या विषयी खुप ऐकलय व अमलांतही आणलय.
   पण आज मी तुम्हाला ह्या सर्व बचतीं पेक्षाही एक उत्तम बचतीचे महत्व सांगणार आहे.तर त्या बचतीचे नांव आहे,"शब्द बचत".जर आयुष्यात प्रत्येक व्यक्तीने शब्द बचत केली व मोजकेच शब्द योग्य त्या ठिकाणी वापरले तर कुणीही दुखावले जाणार नाही असे मला वाटते.तर चला मग आपण शब्द बचत कशी व केव्हा करायची ते शिकू या.
   १)जर तुम्हाला कुणी खुप दुखावले व बरे वाईट बोलले तर साहजिकच आहे तुम्ही त्याला उलटून बोलणार.समोरच्याने दहा शब्द वापरले असतील तर तुम्ही पंचवीस शब्द वापरणार.पण नाही....
तुम्ही एकच काम करायचं,एक मोठा श्वास घ्यायचा व राग बाहेर फेकायचा...ही प्रक्रीया तीन चार वेळेस केल्यावर तुम्हाला शब्द बचत करायची हे लक्षात येईल व तुम्ही पंचवीस शब्द न उच्चारता शांत पणे तिथून निघून जायचे......
    तर ही झाली तुमची २५शब्दांची बचत.

२) बऱ्याच वेळेस आपणास वाटते समोरच्या व्यक्तीने आपण सांगू तसेच वागले पाहिजे.कदाचित ते त्या व्यक्तीसाठी उचीत सुद्धा असेल.परंतू समोरची व्यक्ती जर ऐकण्याच्या मन:स्थितीत नसेल तर आपण आपले शब्द व वेळ व्यर्थ वाया घालवू नयेत.
  ह्यावर एकच उपाय करावा.आपणास त्या व्यक्तीला ज्या सुचना द्यायच्या आहेत त्या एका कागदावर लिहून पत्ररुपी सुचना त्याच्या कडे पोहोचवणे.
म्हणजे आपले शब्दही वाचलेत व आपला निरोपही त्या व्यक्तीपर्यंत पोहोचला.

३)अनेकदा असे होते आपण लोकांना फुकटचा सल्ला द्यायला पुढे सरसावतो.बऱ्याचदा ही व्यक्ती आपल़्या जवळची सुद्धा नसते.आपण बस मधे किंवा रेल्वेच्या प्रवासात सहप्रवाशांना सुद्धा फुकटचे सल्ले द्यायला सोडत नाही.कित्येकदा लोकं आपल्याला हसतात देखील.तर सार्वजनिक ठिकाणी आपण शक्य होईल तेवढे वादाचे विषय टाळावेत व फुकटचे सल्ले देवू नयेत.

४)क्रोध येणाऱ्या व्यक्तीने जर शब्द बचत अंमलात आणली तर त्या व्यक्तीला रक्तदाब व डायबिटीस सारखे आजार होण्याचा धोका टळतो.ज्या गोष्टींमुळे
आपणास मानसिक त्रास होतो अशा गोष्टीं पासून आपण चार हात लांबच रहावे.वाद वाढविणारे व वाद करणारे लोकं ह्यांच्या पासून दूर राहण्यातच आपल्याला फायदा आहे.

   मला वाटते जगात जर प्रत्येकाने शब्द बचत केली तर माणसाची प्रकृती चांगली राहील व तो रोगमुक्त होईल.जर आपणास शब्द वापरायचेच आहेत तर मग फक्त आणी फक्त सुखावणारेच शब्द वापरा व जेणे करून वादविवाद टळतील असे धोरण अवलंबवा.
    सरळ,सोपे व साधे शब्द वापरण्यावर बचतीची सक्ती नाही कारण आजकाल असे शब्द व असे शब्द वापरणारी माणसं ही दुर्मिळच आहेत.
  चला तर मग आजपासून आपण वाईट,दु:ख दायक,क्लेशदायक,निराशाजनक व असंतुष्टात्मक शब्दांची बचत करू या व अशा शब्दांच्या ऐवजी सुखकारक, प्रसन्नदायक व प्रोत्साहनपर शब्दांचा नित्य जीवनात वापर करू या.व आपल्या सोबतच इतरांचेही जीवन फुलवू या.

        शब्दाने फुलते काव्य
        काव्याने खुलते रचना
        रचनेस मिळतो आकार
        आकारात होतो साक्षात्कार...

       ।।शब्द बचत,योग्य बचत।।
   
धन्यवाद..

सौ.मनिषा वाणी.
सुरत.११.१२.२०१६.
०९४२६८१०१०९.


[12/11, 3:21 PM]  Sangita deshamukh Vasmat
*आजची वेळेची बचत=उद्याचे भविष्य*
       स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारत हा देश विकसनशील देश असे आपण म्हणतो.आज भारत स्वातंत्र्य मिळूनही सत्तरीकडे झुकला तरीपण भारताला विकसित देश आपण म्हणू शकत नाही. कारण यामागे आपल्या  भारतीय नागरिकांचा बेजबाबदारपणा ! अनेक थोर देशभक्तांच्या बलिदानानंतर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले याचा विसर आपल्याला पडलेला दिसतो. म्हणूनच आजचे तरुण किंवा आपण कोणतीही बाब अविचारीपणाने वापरतो. आणि देशाच्या विकासाला खीळ बसवतो. यात पाणी,पैसा,वीज,इंधन अशा बाबींचा समावेश होतो. काळाची गरज पहाता या सर्व बाबींचा वापर हा सद्सद्बुध्दीने करायला हवा. तेवढीच महत्वाची बाब वेळ ही सुध्दा आहे. 
        'Time is money" असं म्हणतात. वेळेला पैशाइतके महत्व असेल तर मग या वेळेचा वापर कसा करायला हवा! स्वामी विवेकानंद म्हणतात,"पैशापेक्षाही मौल्यवान वेळ आहे. कारण पैशाला दुहेरी मार्ग आहे.!" खरच आहे,एकवेळ गेलेला पैसा परत मिळवता येतो,तो साठवता येतो,उसना देता घेता येतो मात्र वेळ  एकमार्गी आहे. एकदा गेलेली वेळ परत येत नाही,ती कोणाकडे मागता येत नाही आणि पैशाप्रमाणे ती साठवता येत नाही,तसेच तिची देवाणघेवाणही जमत नाही.म्हणून वेळ पैसा नाहीतर पैशापेक्षा जास्त काळजीपूर्वक आणि विवेकाने वापरण्याची गरज आहे. 
      पण याच बाबीकडे आजच्या तरुणांचे दुर्लक्ष होताना दिसते. आज आपण प्रत्येक घरात पाहिले तर काय चित्र दिसते? आजच्या तरुण पिढीच्या उमेदीच्या काळात हातात पुस्तके दिसण्याऐवजी हाताह मोबाईल दिसतो आहे. रात्रंदिवस हा तरुणवर्ग फेसबुकवर,व्हाट्सॅपवर चॅटिंग करणे,मेसेजेसची देवाणघेवाण करणे,इंटरनेटवर वेळ घालवताना  दिसून येतात. ज्यांना भारताचे भावी आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाते,भारताचे स्वप्न ज्यांच्या मनगटात लपलेले आहे ते तरुण जर याकाळात आपला असा अमूल्य वेळ वाया घालवत असतील तर देश विकसनशीलकडून विकसित राष्ट्र म्हणून कसा प्रवास करेल? 
     राष्ट्राचा विचार जरी सोडला आणि वैयक्तिक पातळीवर जरी विचार केला तरी ही पिढी आपले भविष्य कोणत्या दिशेने नेत आहे,याचाही विचार व्हावा. आज अभ्यास करून स्वत:च्या पायावर उभे रहाणाच्या काळात आपला वेळ मोबाईलवर घालवत असेल तर त्याच्या आईवडिलांच्या स्वप्नाना तो मूठमाती देत असतो. रात्रभर तो मोबाइलचा वापर करून उशीरा उठत असेल तर त्याचे भविष्य तो आजच झोपवत असतो. आज या विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण नको वाटतो,पण आज झोपून घालवलेला वेळ पुन्हा याना मिळतो का? आज जर या तरुणांनी थोडे कष्ट घेऊन ध्येय गाठण्याचा प्रयत्न केला तर उद्याच्या भविष्यात त्याला नक्कीच त्याच्या मनाप्रमाणें वेळ वापरता येईल. व त्याचे भविष्य उज्ज्वल होईल. असा वाया जाणाऱ्या वेळेची बचत करून हा वेळ अभ्यास,अवांतर वाचनासाठी वापरला तर याचा उपयोग भविष्यात नक्कीच उत्तम होईल. म्हणून वेळेचा उपयोग  जर आज विवेकाने,डोळसपणे केला  तर ती उज्ज्वल भविष्याची बचत ठरेल.
*संगीता देशमुख@१४ 
स्पर्धेसाठी


[12/11, 5:14 PM] 
 Vrishali Wankhede
*साहित्य दरबार लेखमाला*✍🏻.......

*आजची बचत*......*उद्याचे भविष्य*

*बचत* हा शब्द संपूर्ण जीवनाचा *सार* सांगून जातो. 

शाळेला स्वर्ग समजणारे माझे आई-बाबा, रोज सकाळी दोन तास ७ ते ९
घरी शाळा भरवायचे.कारण जे विद्यार्थी ज्या विषयात मागे आहेत त्यांना सकाळी स्वतः चे कामे करतांना शिकवणे चालू असायचे, आई ने तर चक्क अंगणात चूल मांडून (वेळेअभावी) स्वयंपाक नी सोबतच तिच्या अवती--भोवती शाळेतील मुलांचा गोंगाट.
मला तो प्रसंग तेव्हा मुळीच आवडायचा नाही, पण आई--बाबा म्हणायचे वेळ बघून कामे करावी लागतात. मुलांना शिकवायला वेळ अपुरा पडतो, म्हणून हे वेळेची बचत नी स्वकामे चालू, कारण १० वाजता पुन्हा शाळेत निघणे असायचे.

शून्यातून विश्व कसे निर्माण करायचे हि कला आई--बाबांना चांगलीच अवगत होती. वेळेची बचत, नी पैशाची बचत त्यांनी कशी जोपासली हे आम्ही आता अनुभवत आहे.
माझा बालपणीचा वर्गमित्र अजूनही भेटीला आला कि सांगतो वेळ- -पैसे बचत तुझ्या आई-बाबाकडून शिकलो म्हणून आज मी पोलीस अधिकारी असून माझ्या लेकरांना बचतीचे धडे देऊ शकतो.
आजच्या मुलांना वेळेचेही भान नसावे हे दुर्भाग्यच तर पैशाची बचत दूरच. पण संस्काराचा खरा ठेवा क्षणोक्षणी कामी येतोच.
त्यातूनच बचतीचे मार्गही सुचतात हे तितकेच खरे. कारण घड्याळच्या काट्यावर नजर ठेऊन दिवस भर योजलेल्या कामांची सर्कस करावी लागते, कारण वेळ निघून गेल्यावर फक्त निराशा हाती येते. 
संपूर्ण सृष्टीवर निसर्ग नियम चालतो पण पूर्वजांनी अनुभवलेले काही थरारक जीवनचित्रे आठवतात नी अंगावर शहारा येतो, आपल्या पुढील पिढीसाठी सुद्धा पाणी बचत हि काळाची गरज आहे. जीवन दान देणारे पाणी एक दिवस मुळीच मिळणार नाही हि कल्पना सुद्धा करवत नाही. जिथे पाणी २० किलोमीटर अंतरावरून आणावे लागत आहे तेच आपल्यासाठी एक आव्हान आहे, आपली पुढची पिढी जर असे काही भोगणार नाही असे वाटत असेल तर नक्कीच पाण्याचा वापर अगदी कामापूरता केला तरच योग्य राहील. नैसर्गिक दृष्ट्या आपले पाल्य बचतीचे सर्व धडे आपल्यापासूनच गिरवत असते. म्हणून आधी आपली बचत बाबतची वर्तणूक अगदी योग्य हवी.
कुठलाही अती प्रमाणात वापर जीवनशैली नाश करतो. तेच संस्कार मुलांवर अलगद होतात.

उद्याची सकाळ कशी होईल हे कुणालाच माहित नाही म्हणून रोजची बचत परिवर्तन घडून आणणारच.
बचतीतून आपण अनेक अनाथांना घासातला घास देऊन जगवू शकतो. बचत फक्त स्वतः साठीच न करता ज्यांना आज अन्न--वस्त्र , शिक्षणाची खरोखर गरज आहे त्यांच्यासाठीसुद्धा करायला हवी. कारण आपल्याला कुटुंबकर्ता सोबतच *आदर्श नागरिक* सुद्धा बनायचे आहे.
म्हणूनच आपल्याला इतरांना देखील पैसा बचत सोबतच पाणी, झाडे, वीज, खनिजे, पेट्रोलियम इतर हि नैसर्गिक बचत बद्दल महत्व पटवून द्यायचे आहे. 

अगदी बेताची परिस्तिथी असलेले कुटुंब सुद्धा पाल्याच्या भवितव्यासाठी पैशाची बचत करीत असतात, पण त्या पाल्यांनी सुद्धा जाणीव ठेऊनच शिक्षण घ्यायला हवे , तेव्हाच त्या बचतीचे खरे चीज होते. काही पालक जीवाचा आकांत करून पैसा जमवतो स्वपाल्यकरिता पण होते नेमके उलटेच , त्या पाल्याला उधळपट्टीचा रंग चढलेला असतो , म्हणून पालकांची जाणीव ठेऊन त्यांनी वागायला हवे.

आजची बचत उद्याच्या दैदिप्यमान प्रकाशात नक्की नेणारच. म्हणून आपले पूर्वज सांगतात कि, उद्याचा आंधार आपणच बाजूला सारून तिथे फक्त प्रकाश अनुभवायचा, आजच्या बचतीने उद्या नक्कीच दिवस प्रकाशित होणार.

आज माझाच मुलगा माझ्या आई--बाबांच्या बचतीतून शिक्षण घेत आहे, हे आवर्जून सांगावेसे वाटते.

त्यांनी बचत करून शिक्षणाची पुंजी सुरक्षित ठेवली, म्हणून त्यालाही जाणीव कळली.

म्हणून बचत हि काळाची गरज आहे, तीच जीवन यशस्वी करते......
आणि आपल्याला आदर्श नागरिक बनवते.....

*वृषाली वानखडे**75**

*अमरावती*✍🏻.....
-------------------------------------- ----
 *स्पर्धेसाठी*🙏🏻
---------------------------------/

[12/11, 5:18 PM] VaishLi Deshmukh
 *बचतीचा महामंत्र भविष्याचा वेध*


आला सास ,गेला सास, देवा तुझ रे तंतर अरे जगण मरण ऐका  सासाच अंतर ।
       असे बहिणाबाई सांगून गेल्या. जीवन जगत असताना आपल्याला हाच अनुभव येत असतो. येणारा कोणताही क्षण हा जीवनाच्या शेवटचा क्षण असू शकतो हे माहीत असतानाही माणूस जीवन जगणे सोडतो का ? म्हणून वर्तमानात जगत असताना आपल्याला भविष्याचा विचार करावाच लागेल. वेळ ही वाहत्या नदीसारखी असते ,एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला , तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही कारण ,नदीच्या प्रवाहाबरोबरच गेलेल पाणी ,कधीही परत येत नाही , असच वेळेचे आहे एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही म्हणून वेळेचे महत्व लक्षात घेऊन प्रत्येकाने जीवन जगायला पहिजे."आप्त हे सुखाचे , दिल्या घेतल्याचे , दुःखाचे सोबती नाही कुणी."हे तेवढेच खरे 
म्हणून पैशाची बचत महत्वाची आहे. आपण कमावलेल्या मिळकतीतून बचत करून आपले येणाऱ्या समस्या सोडवाव्या. बचत खाते ,आर डी ,महिला ,दैनिक खाते बचत गटा मार्फत आपल्या पैशाची गुंतवणूक करुन आपल्या अडचणीच्या काळात ते उपयोगात आणावे.
         मानवी जीवनात अतिशय महत्वाचा घटक म्हणजे पाणी. आज पाण्याचा शोध हा चंद्रावर केला जात आहे ,परंतु पृथ्वीवरच्या पाण्याचा योग्य वापर माणसाला करता आला नाही त्यामुळे येणाऱ्या काही वर्षात फक्त ,माणसाच्या डोळ्यात ते पाणी उरेल की काय ?अशी शंका मनात येत आहे.पृथ्वीवर 75%पाणी असून त्यात पिण्याचे पाणी फक्त 3% आहे म्हणून पाण्याच योग्य वापर केला तरच आपल्याला पिण्याला पानी मिळेल.म्हणून पाण्याची योग्य बचत करायला पाहीजे.पानी आडवा पाणी जिरवा ,पाण्याचा नियोजित वापर करून संचय करायला पहिजे.
           माणसाच्या जीवनात विजेला महत्वाचे स्थान आहे. वीज तयार करण्याचे स्त्रोत म्हणजे नैसर्गिक साधन संपती. त्यावरही मानवाने हल्ला केला असून संपूर्ण पर्यावरण आज संकटात आले आहे. त्यामुळे या नैसर्गिक साधन संपतीचा आपण नीट वापर केला पाहीजे. जास्तीत जास्त झाडे लाऊन व उर्जेचा नियोजित वापर करायला पाहीजे.
          कागदाचा शोध चीन मध्ये लागला. तेव्हापासून विकासाला चालना व गती मिळाली. कागदावर आपले विचार ,कल्पना अक्षरांच्या साह्याने आपण मुद्रित करू शकलो. परंतु त्याच कागदाच महत्व आपण विसरून बसलो आहो. आज आपल्या परिसरात अजूबाजूने कागदाचा कचरा दिसून येतो व परिसर घाण होते. कागदाची योग्य वापर करणे ,जमा झालेली रद्दी विकणे हया गोष्टी प्रत्येकाने केले तर ,स्वच्छ व सुंदर भारत घडायला वेळ लागणार नाही, तसेच रोगराई पसरणार नाही.
मानवाच्या जीवनात नैसर्गिक व अनैसर्गिक प्रत्येक घटक महत्वाचा आहे. याच घटकाचा वापर करून मानव चंद्रावर रहायला जाण्याचे स्वप्न बघत आहे.आपल्या भोवताली जे काही दिसत ते मानवांनीच तयार केल आहे. यात शंका नाही निसर्गाने जे दिल ते मानवाच्या हातांन सुंदर केल.निसर्गानी दिलेल्या जमिनीवर पीक काढली ,पाण्याच्या प्रवाहाने वीज ,तलाव बांधारे बांधले ,काळ्या खडकातून सुंदर लेन्या साकारल्या. म्हणून निसर्गाच्या प्रत्येक घटकाचा आपण योग्य वापर करून , प्रत्येक घटकाचे योग्य नियोजन व जतन केले पहिजे.
       प्रा. वैशाली देशमुख 
        कुही नागपूर
         @ 34


[12/11, 6:05 PM] Dilip Choudhari
📚साहित्य दरबार वैचारिक लेखमाला📚                  ✍🏼विषय-आजची बचत ,उद्याचे भविष्य ✍🏼                              आज चंगळवादाने थैमान घातलेय.माणूस म्हणतोय मी नसल्यावर पैसा कामाला येणार नाही परंतु आपण दिर्घकाळ राहणेच महत्त्वाचे आहे.नकारात्मक विचारशक्ती फारच फोफावली आणि त्यावर मात करण्यासाठी मी काही उपाय सुचवू इच्छितो .                          मानवी जीवन जगत आसताना छोटा प्राणी मुंगीचे उदाहरण घ्या -संचय म्हणजेच बचत.पावसाळा सोडला तर अविरतपणे धान्य संचय करते अन् बाकी कठीण प्रसंगी त्याचा उपयोग करतात.                        थेंबे थेंबे                        तळे साचे                       हि म्हण आपण म्हणतो पण खर्च करताना थोडाही विचार करत नाही याला काय म्हणावे.       माझे स्वतःचे उदाहरण पहा- माझी आई लहानपणी गरीबीमुळे शेतात काबाडकष्ट करुन आमचे पालनपोषण करायची.शेतातील शंभर रुपये आल्यावर तीसच  खर्च करायची आणि सत्तर रुपये बँकेत टाकायची.आम्ही भावंडे रडायचो तरी पैसे अनावश्यक देत नव्हती .राग यायचा जँम पण इलाज नव्हता.जेव्हा त्याच बचतीच्या पैश्यातून मी डी.एड्.करु शकलो आणि बहिणींची लग्ने बिन कर्जाची झाली तेव्हा माझे डोळे खाडकन उघडले आणि लहानपणीचा राग कुठल्या कुठे पळाला.      बाळाचे पाय                          पाळण्यात दिसतात         म्हणजेच आज पैशाची बचत भविष्याची नांदी ठरणार आहे.बचत ही  पैसा ,इंधन ,वीज ,पाणी आणि पर्यावरणातील घटक यांची महत्त्वपुर्ण आहे.मातीचा गल्ला गायब झालाय.फिरणे चारचाकीशिवाय नाहीच.शौचास दूरवर जायला मोटारसायकल लागतेच.घरात लाईट बंद करणे विसरलोय आपण.कपडे वारंवार बदलणे फँशन झालीय.दुकानातून आलेला कागद रद्दीतच जातो.या गोष्टी जर टाळल्या तर प्रपंचाला मदतच होईल.                                      
बचत बचत करता करता कधी कधी मोठीच चूक होते बरं का....मुलांना शिक्षण देताना पैश्याचा विचार केला तर अपेक्षित प्रगती होत नाही म्हणजेच या ठिकाणी पैसा शाळा ,क्लासेस आणि शैक्षणिक बाबीवर खर्च करावाच लागतो म्हणजेच कुठे उलटे पण असते.
जैसी  करणी
वैसी भरणी 
याप्रमाणे मानवाने सुरुवातीपासूनच घरात संस्कार ,मूल्य  ,पर्यावरण आणि बचतीचे धडे स्वानुभवनातून दिले तर जीवन नक्कीच
 सुखकर होईल.
श्री .दिलीपराव चौधरी 
मु.पो.तांदुळवाडी ता.वाशी
 जि.उस्मानाबाद 
अनुक्रमांक @७९
भ्रमणध्वनी ९४२२११८६०४
ई मेल dilipchoudhari1979@gmail .com


[12/11, 6:17 PM] Surajkumari
 *साहित्य दरबार लेखन स्पर्धा*

विषय ....पाणी वाचवा

जल हि जीवन है
पाणी म्हणजे जीवन हे वाक्य खुपदा ऐकलं होते पण गेल्या काही वर्षात हे सत्य होताना दिसत होते.
 निसर्गाचे लहरी पणा कमी पाऊस यांच्या मुळे महाराष्टात 
मुख्य म्हणजे मराठवाड्यात पाण्याची भिषण टंचाई दिसुन आली. 
 पाणी टंचाई मुळे, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या ...
भविष्यात पाणी टंचाई होऊ नये म्हणून आताच योग्य ते पाऊस उचलायला हवे. पाण्याचे योग्य ते नियोजन कराला हवे .
"पाणी आडवा पाणी जिरवा",या वाक्या ला सत्यात उरवायला हवे
सुरूवात स्वतः पासुन करावी लागेल. प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी पार करावी लागेल ..
पावसाळ्याया पुर्वीच नदी,धरने,तलाव यांचा गाळ काढुन  योग्य ती साफ सफाई करावी लागेल.
घरातील सांड पाण्याचा वापर योग्य प्रमाणात करावा लागेल.
साडंपाण्याचे खड्डे घरोघरी तयार करायला हवेत .
शेतकऱ्यांनी ही नवीन तंत्रज्ञानचा
वापर केला पाहिजे ठिंबक सिंचन 
 तुषार सिंचन ईत्यादी आणी कमी पाण्यावर शेती करण्यावर भर देऊन पाण्याची योग्य ती बचत केली पाहिजे. त्या मुळे पाण्याची योग्य ती बचत होईल.
   कारखानदाराने हि वपरलेल्या पाण्याचे पृथकरन करून त्या पाण्याचा परत वापर केला पाहिजे जेने करून भविष्यात पाणी टंचाई भासणारा नाही.
 तेलगंना सरकारने प्रत्येक घरा सममोर शोष खड्डा करणे जसे सक्तीचे केले आहे. काही आर्थिक मदत करून पाणी जीरवा पाणी वाचवा हि मोहिम  अमंलात आणली आहे ...सक्तीची केली आहे.
तसे महाराष्ट्र सरकारने हि हे काम  हाती घेतले पाहिजे पाऊसाच्या पाण्याचे योग्य ते नियोजन होईल ...
अन्न वत्र निवारा ह्या मुख्य गरजा आसल्या तरी  पाणी हि प्रमुख गरज आहे जीवणाची त्या साठी पाणी वाचवाय ला पाहिचे जेने करून परत पाण्यासाठी कुणालाही जीव गमवावा लागनार नाही ...
"जल तो कल है"
"जल ही जीवन है"
 "पाणी आडवा पाणी जीरवा"
 "आपले भविष्य सुखकर करा"
 भविष्यात पाण्या  कमतरता भासनार नाही याची विशेष काळजी घ्या ....
.....पाणी वाचवा जीवन सुरक्षीत
करा ...
पाणी म्हणजे जीवन ...पाणी वाचवा...............

............सुराजकुमारी गोस्वामी हैद्राबाद....[93]


[12/11, 6:48 PM] Balaji Choudhari
🔺🔺🛏🛏🛏🛏🛏🔺🔺
साहित्य दर्पण आयोजित .....
🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏
*वैचारिक लेख माला स्पर्धा*
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
*स्पर्धेसाठी*......
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*थेंबे थेंबे तळे साचे*
या म्हणीप्रमाणे कोणतीही भौतिक बाब ही थोड्या थोड्या बचतीनेच साठते .तिचा विनियोग हवा तेव्हा करता येतो.
बचत म्हणजे काय हे लहानपणापासूनच आपल्यावर संस्कार झालेले आहेत.आपल्यापैकी बर्याच जणानी लहानपणी ताटात शिल्लक ठेवण्याबद्दल बोलणे खाल्ले असणार .कुठे सांडले ,विनाकारण कुठे धान्य पडले तर मोठी माणसे रागवायची म्हणायची "बाबानो खाऊन संपवा टाकून संपवू नका".किती मोठी शिकवण आहे बचतीची !
*बचत म्हणजे काय?*
दैनंदिन जीवनातील प्रत्येक बाबीचा काटकसरीने वापर करणे व भविष्यासाठी त्या त्या बाबी साठवणे अशा सर्व बाबींचा समावेश बचतीमध्ये येतो.मग ती पैसा आसो ,पाणी ,वीज कागद,इंधन या सर्वांचा समावेश यात होतो.बचतीचा उपयोग स्वतः पासून केला तर तो राष्ट्र हिताच्या दृष्टीने फार मोठा हातभार होतो.
आज आपल्याला बचत ही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवणे काळाची गरज बनली आहे.
सगळ्या उद्योग जगतात नफा व विक्री यांचे गुणोत्तर काढले तर किती टक्के असेल 5  ?% मी तर म्हणेन ते दहा टक्के आहे .याचा अर्थ असा की दहा रु.ची वस्तू विकली  तर एकंदर जगताला एक रु.चा नफा होईल पण आपण एक रु.ची बचत केली तर त्याचा आर्थ दहा रु.ची कमाई होईल.
🔺🔺🔺🔺🔺
*पैसा*
🔺🔺🔺🔺🔺
पैशाची बचत करणे या धावपळीच्या व स्पर्धेच्या काळात अवश्यक पण कठीण बाब झालीय.भौतिक बाबींची नाहक आवड ,चंगळवाद ,प्रत्येक बाबीचा योग्य वपुरेपूर वापराचा अभाव फारच कठीण झाले आहे.आपल्या नोकरदारांचेच घ्या,पगाराचे आकडे तर मोठे फुगीर वाटतात पण हातावर किती नगदी पडतात?हा चिंतनाचा विषय झालाय.त्यात बचतीचे प्रमाण आत्यल्प आहे.एका जागतिक सर्व्हेनुसार *जपानमधील लोकांची बचतीची सवय 80% आहे .त्या मानाने भारतातील लोकांची बचतकरण्याची सवय 50% च आहे त्याचा परिणाम आज जपान विकसित वबलवान राष्ट्र आहे तर आपला भारत विकसनशील*.
पैशाची बचत भावी प्रत्येक बाब मग शिक्षण ,आरोग्य ,लग्न,स्थावर मालमत्ता ,घर इ.वैयक्तिक बाबीसाठी खुप उपयोगाला येतो.प्रत्येकाने बचत ही नियोजनबद्ध रितीने करणे हीच काळाची गरज आहे.देशहितासाठी सुध्दा पैशाची बचत हे मी तर म्हणेन राष्ट्रसेवाच होय.
🔺🔺🔺
*वेळ*
🔺🔺🔺
एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही.वेळ फार अमुल्य आहे .वेळेचा सदुपयोग म्हणजेच बचत होय.वेळेचे नियोजन फार अवश्यक आहे.आजच्या या स्पर्धेच्या युगात आपण वेळ सांभाळलीच पाहिजे .मुलाना लहान वयातच वेळेचे महत्त्व सांगून वेळापत्रकच बनवून द्यावे .कारण येणारी पिढी वेळेचे महत्त्व जाणणारी बनली तर देशाला प्रगतीसाठी त्याचा उपयोग होणार नव्हे देश प्रगतीपथावर जाणारच.
🔺🔺🔺🔺
*पाणी*
🔺🔺🔺🔺
*जल है तो कल है*
या हिंदी उक्तिनुसार पाणी हे जीव आहे .त्याचा वापर काटकसरीने करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे.2016
या वर्षात पाण्यासाठी किती तडफडावे लागले हे सांगण्याची गरज नाही.अनेकजणाना आपले जीव गमवावे लागले.लातूरला तर कधी नाही ते इतिहासात पहिली वेळ रेल्वेने पाणी आणून तहान भागवण्याची वेळ आपल्यावर आली हे कशामुळे झाले?
केवळ बचत नकरण्यामुळे.काटकसर न करण्यामुळे.पाण्याचे अतिशय लहान लहान पण मोठ्या प्रभाव देणाऱ्या बचतीच्या बाबी आहेत.
🔹आंघोळीला जर एक बादली पाणी लागत असेल तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने चार मग पाणी कमी घ्यावे.समजा पाच व्यक्ती असतील तर दिवसाला वीस मग पाणी बचत होते.महिन्याला सहाशे मग वाचतात.आणि वर्षाला 7200 मग .
🔹कपडे धुताना सुध्दा वरीलप्रमाणेचच धक्षतेने वापर करावा
🔹फरशी पुसताना
🔹शेतीला जास्तीत जास्त तुषार सिंचन ,ठीबक सिंचनाचा वापर करणे गरजेचे आहे.
🔹पाणी जिरवले पाहिजे .अडवले पाहिजे .पावसाचे पाणी रेन हारवेस्टिंग केले पाहीजे.

*वीज*
🔺🔺🔺🔺
आजकाल वीजेच्या वापराचा अतिरेक झालाय ,आज आपल्या देशात सण वार आशा सर्व बाबीत अमाप वीज वापर सुरु आहे.भारत देशात दर वर्षाला पाच हजार कोटी रु.फक्त वीज दुरुस्ती व सरळ व्यवस्थापनावर खर्च होत आहेत.
यासाठी अपारंपारीक स्त्रोतांचा वापर काळाची गरज आहे.सौर उर्जेचा वापर आपल्या देशात फक्त दिड टक्के होतोय त्यातल्या त्यात तामिळनाडुत जास्त होतोय.हे प्रमाण वाढले पाहिजे .सिलिकाॕन च्या चकत्या वापरुन सौरउर्जेचे विद्युत उर्जेत रुपांतर करता येथे.अमेरीकेसारखा बलाढ्य राष्ट्र शेतकऱ्यांच्या शेती भाडेतत्वावर घेतात व सौरउर्जेचा वापर करतात.तर तेथील शेतकरी मक्याचे उत्पन्न काढून 30000 डाॕलर पर्यंत उत्पन्न काढतात.
याचा आर्थ आपल्या भारतासारख्या विकसनशिल राष्ट्रांला या अनुकरणाची फारच गरज आहे.
शेवटी असे म्हणता येईल दैनंदिन जीवनातील प्रत्येक बाबीचा वापर काटकसरीने नियोजनबद्ध करणे हे वैयक्तिक व देशहिताच्या दृष्टीने अत्यंत अवश्यक आहे.बचतीचे संस्कार येणाऱ्या पिढीला देणे ही काळाची गरज आहे.प्रत्येक चालू पिढीने पुढील पिढीसाठी आदर्शवादि बाबी देणे खरे कर्तव्यच आहे.म्हणून देशहित ,राज्यहित व वैयक्तिक हित अशा दृष्टीने आपण पैसा ,वीज ,वेळ इंधन, पाणी , कागद ,या सर्व बाबींचा काटकसरीने वापर करु या .यांची बचत करुन एक नवीन व बलवान असा भारत देश बनवून पुढील पिढीला सोपवू या.



♦♦🛏🛏🛏🛏🛏♦♦
चौधरी बालाजी सर
लातूर
स.क्र.  82
🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🙏🛏🛏🛏🛏


[12/11, 6:49 PM] 18 bhagyasri chalakh
     🌷🌷 स्पर्धेसाठी🌷🌷
*आजची बचत :उद्याचे भविष्य*
          वेळ, पैसा याची बचत करण्यासाठी माणुस खूप धडपडत असतो. वेळ आणि पैसा यांच्या बचतीसाठी नवनवीन उपाय शोधत असतो. कारण वेळ आणि पैसा हे जगण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. पण ज्या निसर्गानी आपल्याला निर्माण केले आहे त्या निसर्गाच्या आणि निसर्गानी विनामुल्य दिलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बचतीचा विचार कोण करणार ? निसर्गानी बऱ्याच गोष्टीचा साठा करून ठेवला आहे, उदाहरणात पाणी, कोळसा, खनिजे इ.  पण याचा अर्थ असा होत नाही की निसर्गाने केलेली बचत तो साठा कधी संपणार नाही. त्याच्या अति उपयोगमुळे तो साठा संपण्याच्या मार्गावर आहे.

          *दगडी कोळसा* निसर्गाची खूप मोठी देणगी आहे. कोळसा तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात.  पण मनुष्य त्याचा उपयोग करताना अतिरेक केला. आता कोळश्याच्या खाणी संपण्याच्या मार्गावर आहे. कोळश्याचा अनावश्यक वापर कमी झाला पाहिजे. नाहीतर अशी वेळ येईल आमच्या येणाऱ्या पिढीला म्हणजेच भविष्यातल्या पिढीला दगडी कोळसा नावापुरते माहित असेल. फक्त कोळसाच नाही तर इतर सर्व प्रकारच्या नैसर्गिक गोष्टी.

         *बचत* निसर्गाची, नैसर्गिक संपत्तीची झाली पाहिजे. माझ्या मते बचत म्हणजे फक्त साठवून ठेवने होत नाही. जर आपण एखाद्या नैसर्गिक वारसा जपत असु तर ती सुद्धा एका प्रकारची बचतचं होय. 

          जीवनात फक्त पैसा आणि वेळ नका वाचवू.  एखाद्या नैसर्गिक पर्यटनाला भेट देत असाल तर त्याचं संरक्षण करा.  निसर्गाने दिलेल्या नैसर्गिक गोष्टीचा दुरउपयोग  न करता त्याची बचत करा जेणे करुन आपल्या भविष्य पिढीला सुद्धा त्याचा उपयोग करताना आला पाहिजे.

                         ✍भाग्यश्री चलाख 
                          📱9146615473
     Id: chalakhb1998@gmail.com
                              41

[12/11, 6:53 PM] 
 *आजची बचत -उद्याचे भविष्य*

     ( *TIME NEVER COME BACK*)
        ( *वेळ*)

*====================*

*टाईम इज मनी* *....टाईम म्हणजेच वेळ आणि वेळ म्हणजेच पैसा* *आयुष्यात वेळे एवढे मौल्यवान काहिही नाहि गेलेले सर्व काहि आणि नसलेले सर्व काहि तुम्ही मिळवू शकता जर तुमच्या कडे वेळ शिल्लक असेल तर अन्यथा नाही * एक सेकंद ,एक मिनीटाचे महत्व त्यांना विचारा ज्यांचा एक मिनीटाने इंटरव्हू गेलाय, एक मिनीट उशिरा ट्रीटमेंट मिळाल्या मुळे प्राण गेलाय*
  *वेळे बाबत लिहावे तेवढे कमीच, सर्व काहि वेळच करू शकते* *वेळे एवढे ताकदवर आणि मौल्यवान दूसरे काहिही नाहि*
 *आध्यात्मिक भाषेत सांगायचे झाले तर मनुष्याला कर्म करण्याला  प्राप्त झालेला वेळ म्हणजेच जन्म आणि मृत्यु या मधील कालावधी म्हणजेच आयुष्य होय*  *योगाभ्यासाच्या भाषेत सांगायचे झाल्यास आपला प्रत्येक श्वास म्हणजे  आपले आयुष्य ..* *म्हणजेच त्याला मिळालेला वेळ ,म्हणूनच म्हंटले जाते कि क्रोध हा आयुष्य कमी करतो ,कारण जेव्हा आपण रागात किंवा आवेशात असतो त्यावेळी आपण  जलद गतीने श्वाच्छोश्वास करीत असतो ,जितके जितके आपके श्वास जास्त होतात तितकेच आपले आयुष्य कमी*  *म्हणूनच आध्यात्म आणि योग हेच सांगतो कि आपले श्वास म्हणजेच आपले आयुष्य किंवा आपल्याला मिळालेला वेळ होय म्हणूनच योगाभ्यासा मध्ये श्वासांवर नियंत्रण ठेवण्याला खुपच महत्व दिले गेले आहे तसेच आपण सर्वानी कथा ऐकलि असेलच कि भीमाला लहान पणी दुर्योधन  जेव्हा खड्यात टाकून जेव्हा वरून माती सुद्धा टाकून देतो तरीही भीमाला काहिही होत नाहि कारण त्या वेळी भीम शवासन म्हणजेच श्वासाचे आसन करीत असतो*
  *आजच्या काळात Time management)* *सारखे अभ्यासक्रम निघालेत ,का?*
*तर वेळेचे योग्य नियोजन* *करण्याला खूप महत्व आहे* *वेळेचे व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे.कोणतेही काम आपण करतो पण त्या* *कामाची गुणवत्ता तेव्हाच सिद्ध होते ज्यावेळी त्या कामासाठी लागणारा वेळ, पैसा,मनुष्यबळ तसेच त्याची उपयुक्तता जर योग्य असेल तरच ते काम गुणवत्ता पूर्ण म्हणता येईल*  *ज्याने जीवनात वेळेचे नियोजन केले आहे त्याने जीवनात वेळेची बचत केली आहेच*
  *आपण अनेक वेळा आपले मित्र ,नातेवाईक किंवा शेजारी तसेच सहकारी यांना  मॉर्निंग वॉक किंवा योगा, प्राणायाम या साठी वेळ मिळत नाहि हि सबब देवून ती कामे जी खूप अत्यावश्यक आहे ती टाळतांना बघतो पण...*  *आपण कधीतरी हा विचार करुन बघतो का ?कि जी लोक हे सर्व करतात त्यांच्या कडे दिवसाचे चोवीस तासच आहेत न?जसे की आपल्या कडे पण तेवढेच.मग का ती लोक ते सर्व नियमित करतात आणि सबब सांगणारे का नाहि करू शकत?उत्तर आपल्या कडेच आहे त्यांनी जीवनाचे, आयुष्याचे, श्वासांचे नियोजन करुन त्याचे योग्य व अत्यावश्यक काय याचे व्यवस्थापन केले आहे आणि आपण नाहि*
*सर्वाना दिवसाचे चोविस तासच मिळतात पण.. काही लोक त्या वेळेत खूप काही करू शकतात आणि आपण नाहि ?*
*वेळ म्हणजेच पैसा ,कारण आपल्या कडे जितका वेळ तितके आपले कार्य आणि जेवढे कार्य तेवढाच पैसा*
*सर्व काही पेशानी मिळवीता येईल पण, आयुष्यातून निघुन गेलेली वेळ नाहि, आणि गेलेली वेळ निघुन जाणे म्हणजेच योग्य वेळी योग्य संधी गमविणे आहे* , *आणि  संधी गमविणे म्हणजेच खूप मोठा तोटा किंवा नुकसान होय मग ते व्यवसायाचे असो ,नोकरी मधील असो किंवा शारीरिक ,आर्थिक किंवा बौद्धिक असो,* *योग्य वेळी योग्य वेळ न खर्च करणे म्हणजेच जीवनात खूप मोठे नुकसान च करणे होय*
*म्हणून आजच्या तरुण पिढीने अभ्यास,व्यायाम,खेळ ,वाचन,लेखन,आणि आध्यात्म यांची अचूक आणि त्या सर्वाची योग्य वेळी आणि योग्य तेवढाच वेळ अशी आकर्षक आणि रेखीव सांगड घालणे खूप महत्वाचे* *कारण सर्व काहि वेळच ठरविते पण..तिचा योग्य सम्मान केला तरच*

*=====================*
*मंजुषा देशमुख@३६*
   *अमरावती*


[12/11, 7:18 PM] Bhumre: 
काळजी पूर्वक पैसे खर्च करा  

आज काल बचत म्हणजे  सर्व ठिकाणी बचत करावीच लागणार आहे , काही ठिकाणी विनाकारण खर्च  करून मोठेपणा दाखवतात ,
उठाव फक्त पैसे उधळायला प्रश्न  नाही इथे विषय आहे पैशामुळे होणारी लग्न कार्य, वाढदिवस , पार्टी , विनाकारण पेट्रोल जाळणे , आणि खास करून मोठे लोक पैशाची किंमत कमी करतात त्यांच्यासाठी काम महत्वाचे असते ,असले पाहिजे  पण जिथे नुकसान फार होते पण दिसत नाही धावपळीत कुणाचे लक्ष जाते का प्रवास करताने किती खर्च किती शिदोरी कुणी सोबत घेऊन जाताना दिसताच नाही बोट इतके असतील जे अजूनही पैशाची किंमत करतात , 
प्रत्येक गोष्टीत काटकसर करतात , काटकसर नेमकी काय तर  जेवढे हवे आहे तेवढे घेतले पाहिजे आता प्रश्न नको की काय घेतात प्रत्येक गोष्टीत काटकसर पाहिजे , मग ज्ञान तर खुप घेतले पाहिजे पण अस हि नाही की खूप ज्ञान प्राप्त करण्यासाठी चुकीची माहिती हाती नको लागायला, 
लग्नकार्यांत खूप खर्च करा पण सगळे नियोजन असले पाहिजे अन्न वाया जाऊ देने ही एक गंभीर बाब मनामध्ये ठेवून मोजकेच वाढले पाहिजे , आता काय आली स्वतः घायचे आणि जेवायचे बफे पद्दत , ज्यांना गरजच नाही ते जास्तीचे जेवण ताटात घेतात आणि नाही सरले की तसेच न फेकून दिले जाते पर्याय नसतो ना तेव्हा ,
वाढदिवसालाही पैसे उधळण  पार्टी  , जर घरगुती कार्यक्रम करतात घरी असल्याने काळजी घेतली जाते पण बाहेर पार्टी तरुणांची दारू पिणे हे हमखास ठरलेले असते , मग झिंगून ते काय किती उधळण करतात काय तर  आनंद  पहिला जातो ना  हे थांबले पाहिजे.
खास करून छोट्या गोष्टी कुणाच्या लक्षात येत नाही  खर्च करताने आपण किती काही गोष्टी ची विनाकारण संपवतो किंवा फेकून देतो ,
आपले चांगले दिसण्यासाठी जुन्या गोष्टीचा वापर टाळतो नेमकी काय करतो , ती वस्तू अडगळीत पडली कि नवीन वस्तू येते पैसे खर्च झाले , 
प्रत्येक वस्तूचा पुरेपुर फायदा घेतला पाहिजे , 
आता अजून एक प्रश्न निर्माण झाला कि जुन्या काही वस्तू ने काम लवकर काम होत नाही म्हणजे वेळ वाया जातो , 
आजकाल तरुणांना भारी स्मार्ट फोन पाहिजे गरज नसताने ज्यांना गरजेचे आहे त्यांना मिळत नाही हा नशिबाचा खेळ आहे , गरिबी आणि श्रीमंती यामध्ये खुप फरक जाणवतो पैशाने श्रीमती  असलेली लोक  पैसे वाचवत नाही याच बरोबर पैशामुळे खूप गोष्टीही ते सहज फेकून देतात , 
आजकाल पैशाला महत्व आहे कि गुणांना आहे हेच कळत नाही , 
माणसात माणुसकीचे गुण कमी होत जात आहे 
ते वाचवणे फार गरजेचे आहे , 
म्हणजे एक उदाहरण घ्या की एखादा भूकेने व्याकुळ झाला आहे आणि बाहेर कुठे असतान जर हॉटेलात गेला तर जो फक्त जेवण करून भूक मिटवले पण त्याच हॉटेल मध्ये काही फक हौस म्हणून येतात , इथे अन्न वाया जातेच पैसे वाया जातात , आणि वेळ ही वाया जाते ती कशी तर बघा भूक नसताने  हॉटेल मध्ये जाणे वेळ वाया घालवने आहे , 
अजून खुप काही गोष्टी आहेत पण  , 
तुमचा वेळ न घेता थांबतो तुम्ही समजदार आहात  कारण मला असे वाटत आहे ज्या अर्थी वाचन करत आहात  तुम्ही  नक्की अशा  गोष्टीचा विचार करतात , पण ज्यांच्या  पर्यंत  ही माहिती जाणे गरजेचे आहे तेच मात्र दुलक्ष करून , पैशे उधळतात  त्या बरोबर इतर गोष्टी ही नकळत वाया जाणारच , 
तर काळजी पूर्वक पैसेखर्च करा , 
तरच तुम्ही चांगले गुण टिकतील ...
_____________________________

नाव :- धनराज भुमरे पाटील 
मु. पो. पाचोड , ता. पैठण ,जि. औरंगाबाद , 
ई-मेल :- dhanrajbhumarepatil@gmail.com 
Mo:- 7218613434

स्पर्धेसाठी नाही...

"आजची बचत ,उद्याचे भविष्य"


         आज आपण पाहतो की,प्रत्येक व्यक्ति ही आपापल्या कार्यात अशी गुंतली आहे की,स्वतःला मनसोक्त जगण्यास वेळ नाही.उत्तरोत्तर मानवी जीवन सुसह्य होत आले आहे,हे आपण जाणतोच."तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार"या उक्तिप्रमाणे मानवाने मानवाचे जीवन सुकर बनवले.नवनवीन यंत्राचा शोध व मानवाची सततची धडपड यातूनच नविन यंत्राचा शोध लागला,नविन साधने वापरात आली जसे की संगणक ,मोबाईल, विमाने, रेल्वे, वाहतुकीची साधने,वीज अशा अनेक सुखसोयी मानवाच्या जीवनात आल्यामुळे जगणे सोपे झाले आहे.पण निसर्गाचा नियम आहे"अति तेथे माती"याप्रमाणे जसाजसा या साधानांचा वापर वाढला तसातसा निसर्गाचा ऱ्हास होऊ लागला आहे.त्यामुळे आज आपल्यासमोर अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत.या समस्या निपटून काढायच्या असतील व भविष्यात येणारे अस्मानी संकट टाळायचे असेल तर आजपासूनच आपल्याला योजना आखाव्या लागणार आहेत."गरज ही शोधाची जननी आहे",जेंव्हा मानवाला गरज भासली तेंव्हा शोध लागलेले आहेत,पण भविष्याची गरज पाहता आजपासूनच आपल्याला बचतीची सवय लावून घेणे आवश्यक आहे.
              बचत म्हंटल्यानंतर सर्वांच्या नजरेसमोर एकच बाब येते ती म्हंजे पैसा.रोजचे जीवन जगताना व्यवहारात या ना त्या कारणासाठी पैसा लागतोच,सर्व खर्च भागवून उरलेला पैसा आपण भविष्यासाठी बचत म्हणून बँकेत ठेवतो किंवा कुठेतरी गुंतवितो आणि हे आवश्यकच आहे.कधी कोणते संकट येईल हे सांगणे कठिन असते.त्यामुळे ही बचत आवश्यकच आहे.पण आज जसे आपण पैसे बचतीचे मार्ग अवलंबितो त्याप्रमाणे पाणी, वीज,वृक्ष,खनिजे यांची बचत कशी करता येईल याचा सारासार विचार आवश्यक आहे.जीवन जगन्यासाठी "अन्न ,वस्त्र आणि निवारा" या मुलभुत गरजा भग्विन्यासाठी मानवी जीवन पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे.या निसर्गाकडून भरभरुन घेताना आपण याचे कांही देणे लागतो हे विसरता कामा नये. आपण आज जी नैसर्गिक साधनसंपत्ति वापरत आहोत यालाही मर्यादा आहेत हे विसरु नये. आज आपण जी वाहने वापरतो ही सर्व पेट्रोलियम इंधनावर अवलंबून आहेत.ज्या वेगाने याचा ऊपसा होऊन संपूर्ण विश्वात याचा वापर होत आहे,हा वापर असाच राहिला तर भविष्यात हे सर्व साठे शिल्लक राहणार नाहीत मग त्यावेळेसचे जीवन पुन्हा पूर्वपदावर येईल व अनंत अडचनीचा सामना मानवाला करावा लागेल.यासाठी शक्यतो सार्वजनिक वाहनांचा वापर सर्वानी केला पाहिजे,विनाकारण होणारा इंधनाचा गैरवापर टाळला पाहिजे.प्रत्येकानी जर ही गंभीर समस्या गंभीरतेने हाताळली तर नक्कीच आपण ईंधन बचत करु शकतो.
         पाणी तर सर्वाना आवश्यक आहे.मागच्या वर्षी संपूर्ण भारत पाण्याच्या समस्येने होरपळताना दिसला.ही वेळ का आली?आणि ही वेळ पुन्हा आली तर?असे प्रश्न मनात येतात आणि कोरडा विचार करुन कांही साध्य होणार नाही.यासाठी पाण्याचा वापर जपून केला पाहिजे,घरगुत्ती वापरापासून ते औद्योगिक वापरात पाण्याचा अतोनात वापर होतो.पाणी प्रदूषित होते आणि याचे परिणाम आपण जाणतोच .पावसाचे पाणी वाहत जावून नद्याना मिळते, नद्यांचे पाणी समुद्राला व सागरातील पाणी आपण वापरु शकत नाही त्यासाठी water harvesting चा वापर केला पाहिजे.पाणी जमिनित मुरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.कोणीतरी म्हंटलेल आहे "तीसरे महायुद्ध झाले तरी, पाण्यासाठी होईल" ही भविष्यवाणी टाळायची असल्यास जनजागृति होणे आवश्यक आहे.याचबरोबर वृक्षबचत ही तर काळाची गरज आहे.वृक्ष म्हणजे सर्व सजीवांचा श्वास आहे.अमाप वृक्षतोडीमुळे प्रथ्वीचे वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही.ग्लोबल वार्मिंगचा वाढता ईशारा हेच सांगतो की वेळीच जागे व्हा,वृक्ष लावा,वृक्ष जगवा.प्रत्येकानी जागरूकता दाखवली पाहिजे व झाडे लाऊन त्यांना जगवन्याचा प्रयत्न केला तरच आपले जगणे सुकर होईल,अन्यथा येणाऱ्या काळात संकटाचा महापुर येऊ शकतो.याबरोबरच विजेचा वापर किती होतो आहे,प्रत्येक घरात,प्रत्येक ठिकाणी विजेची साधने मोठ्या प्रमाणात वापरात आहेत याचा वापर गरजेपुरताच करणे आवश्यक आहे.प्रत्येकाला वाटते माझ्या एकट्याने काय होणार ? "थेंबे थेंबे तळे साचे" या म्हणी प्रमाणे प्रत्येकानी थोडी थोडी विज कमी वापरली तर सव्वाशे करोड लोकसंख्येचा आपला देश ,किती विजेची बचत होऊ शकते.आपण एका खोलीत बसलेलो असताना दुसऱ्या खोलीतील विजेचे दिवे,पंखे,tv चालूच असतात या सर्व छोट्या बाबी आहेत म्हणून आपण दुर्लक्ष करतो.पण ह्याच छोट्या बचति भविष्यकाळात आपल्याच कामी येणार आहेत.शासन सुद्धा लोकामध्ये विजबचतीची जागृति करत आहे पण आपण वेळीच जागृत होउन विजबचत केलि पाहिजे.श्रीमंत लोकांची आलिशान राहणी,त्यांच्या पार्ट्या यामध्ये तर पैश्याच्या अपव्ययाबरोबरच विजेचा सुद्धा अपव्यय होतो,सर्वत्र झगमगाट असतो. लाखो रुपये विजबिल भरलेले आपण tv ,वर्तमानपत्रात आपण पाहतो,अशा लोकांनी खरच विचार करण्याची गरज आहे.
            खरच आज प्रत्येकाने वेळेचा सदुपयोग केला पाहिजे,याला बचत म्हणता येणार नाही,पण ज्या बाबिच्या बचतींची अत्यंत आवश्यकता आहे,वीज,ईंधन,पर्यावरण,झाडे,पैसा या सर्वांचा काटकसरिने वापर केला तर उद्याचे भविष्य उज्ज्वल असेल.वर्तमानात आपण सर्वजण मजेत जगताना भविष्याचे जीवन अंधकारमय बनवू नये. तरुण पिढी स्टाइलिश जीवन जगताना वेगवेगळ्या छंदापायि पैशाचा अमाप खर्च करू लागली आहे,याची वेळीच दखल घेवून प्रत्येकानी निसर्गानि दिलेले हे अनमोल उर्जास्त्रोत काटकसरिणे व आवश्यक तेवढेच वापरले तर नक्कीच सर्वांचे भविष्य सफल व उज्जवल बनू शकते यात तिळमात्र शंका नाही ...
        श्री सगर पंढरी 
          धर्माबाद 9405628375


[12/11, 7:28 PM]  Vrishali Wankhede
*साहित्य दरबार लेखमाला*
सहभागी स्पर्धक यादी*
🙏🏻✍🏻..............




1)  घनश्याम बोऱ्हाडे

2) सुभद्रा खेडकर

3) कल्पना जगदाळे

4)मनीषा वाणी

5) संगीता देशमुख

6) वृषाली वानखडे 

7) वैशाली देशमुख

8) दिलीप चौधरी

9) सुरजकुमारी गोस्वामी

10) बालाजी चौधरी

11) भाग्यश्री चलाख

12) मंजुषा देशमुख

13) धनराज भुमरे

14) पंढरी सगर

🙏🏻💐💐💐💐💐💐💐💐

Sunday, 13 November 2016

साहित्य दरबार वैचारिक लेखमाला

साहित्य दरबार वैचारिक लेखमाला


पाल्याचे करियर - स्वप्न की स्वप्नाचे ओझे

*मुलांना आळशी बनवू नये*


प्रत्येक पालकाची मनापासून एक इच्छा असते की आपला पाल्य मोठ्या पदावर नोकरी करावे, त्याला निदान पाच आकडी पगार मिळावे अर्थात तो सुखी जीवन जगावे. यासाठी प्रत्येक पालक आपल्या पोटाला चिमटा देऊन लेकरांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. त्यास काय हवे, नको ते सर्व हट्ट पूर्ण करतात. हा सर्व अट्टाहास फक्त आणि फक्त मुलांनी यशस्विता मिळविण्यासाठी असते.
मूल जन्माला आल्यापासून पालकांची आपल्या लेकरां विषयी काळजी सुरु होते. आज तर फार मोठ्या प्रमाणावर ही काळजी वाढली आहे असे वाटते. पूर्वी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार तेवढा झाला नव्हता. त्या काळात पालक मंडळी मुलांची अजिबात काळजी करीत नसे. जे शिकायच किंवा जे काही करायचे ते स्व बळावर करायचे. त्यासाठी आई बाबा समोर हात पसरण्याची सोय नव्हती. जवळपास कमवा आणि शिका हे धोरण जरी नसेल तरी कमीत कमी खर्च करायचे, बचत करून शिक्षण पूर्ण करण्याची सवय मुलात होती. त्यामुळे ते शिक्षण घेऊ शकले. घरच्या परिस्थितीची जाणीव त्यांना होती, त्यामुळे घरी पैसे मागताना त्यांना कसे तरी वाटायचे. घरी पैसे मागण्यापेक्षा चार पैसे कुठून मिळविता येईल यांच्या अनुभवी ज्ञानाने ते समृध्द होत गेले. शाळा-कॉलेजमधील सुट्टीच्या काळात आई बाबांच्या कामात मदत करायचे, जमलेच तर मजूरीला जाऊन पैसा एकत्र करायचे, त्यातील लागेल ते तेवढेच पैसे घेऊन बाकी रक्कम आई बाबाला देऊन मुले परत शाळा कॉलेजला जायची. म्हणजे मुलांचे शिक्षण तेंव्हा पालकाना ओझे वाटायचे नाही. उलट त्यांच्या शिक्षणाने पालकाना अभिमान वाटायचे. उच्च शिक्षण घेणाऱ्याची संख्या कमी असल्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्या बरोबर एखादी साधी नोकरी पण लागूंन जायची. जो शिकला त्यास हमखास नोकरी, अशी त्यावेळी स्थिती होती. कारण शिक्षण घेणेच फार कठीण होते. अश्या या कठीण परिस्थितीमध्ये ज्याचे शिक्षण पूर्ण होतसे त्यास चांगली नोकरी मिळून जात असे. आपल्या मुलाने अमके करावे तमके व्हावे असे पालकाना मूळी वाटतच नव्हते. म्हणजे पालक आपल्या मुलांच्या प्रति स्वप्न पाहतच नव्हते त्यामुळे स्वप्न पूर्ण होण्याची काळजी त्यानं वातायची नाही.
या विपरीत आजची परिस्थिती आहे आजचे पालक आणि पाल्य हे दोघेही पूर्वीच्या परिस्थितीपेक्षा भिन्न आहेत त्यामुळे आज सर्वत्र चित्र वेगळीच दिसत आहे
यशस्वी मुले हे कोणत्याही पालकाचे खरे बैंक बैलेंस आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. यासाठी एक उदाहरण म्हणजे एक पालक ज्याच्या कडे गडगंज संपत्ती होती . पैश्याची काही कमतरता नव्हती. त्यांना एकुलता एक मुलगा होता. अगदी लहानपणापासून लाडात वाढलेला, प्रत्येक गोष्ट हवी तेंव्हा त्याला मिळायची. यात कधी तो हट्टी झाला अन कधी तो वाया गेला हे कळलेच नाही. त्यांच्या कडे खुप संपत्ति असून देखील वाया गेलेल्या मुलास वळणावर आणता आले नाही. याऊलट त्यांच्या शेजारच्या गरीब घरातील मुलगा ज्याचे एक वेळचे खायचे वांदे होते, तो शिकून चांगल्या नोकारीला लागला. त्यामुळे त्यांचे घर चांगल्या स्थितीत दिसत होते तर सुखी समाधानी असलेले घर दुखी दिसत होते. त्याच मुळे मुले जर सुसंस्कारी आणि चांगल्या विचारांची निघाली तर पालक वर्गास कशाचे ही कमी नसते. त्यामुळे प्रत्येक पालकानी आपल्या लेकरांना संस्कारी करणे चांगले असते.पण याचा विचार मात्र कोठे ही होत नाही.
आपली लेकरे शिकून डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर अशा मोठ्या पदावर काम करावे, अशी स्वप्न प्रत्येक पालक पाहत असतो आणि मग त्यासाठी जीवाचे आटापिटा करून त्यांना शिकविले जाते. ज्या वयात मुले खेळावे, नाचावे, बागड़ावे त्या वयात त्यांना प्ले स्कुल मध्ये भरती केल्या जाते. एखाद्या तुरुंगात कोंडल्याप्रमाणे त्या चिमुकल्या मुलांना शाळेत डांबले जाते. येथूनच पाल्याच्या करियर विषयी पालक स्वप्न पाहू लागतो. मुलांची अतिकाळजी आणि अतिसुरक्षा मुलांना कमकुवत बनविते. तेच जर त्यास स्वातंत्र्य मिळाले किंवा त्यांच्यावर बंधने टाकली नाही तर त्यांचा विकास चांगला होतो. मूल समजदार होते. आज मुलांना गुणवत्तापूर्ण उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी प्ले ग्रुप मध्ये प्रवेशासाठी दहा हजार रुपयापासून पालक खर्च करीत आहेत. पालकाना पैश्याची अजिबात तमा नाही.  तर त्यांना हवय पाल्याना चांगले शिक्षण. त्यासाठी ते कोणत्याही पातळी वरुन विचार करीत आहेत. इयत्ता आठव्या वर्गापर्यंत मोफत शिक्षण असून देखील आजचा पालक या वर्गापर्यंतच्या शिक्षणा साठी लाखो रुपये खर्च करीत आहे, जे की नक्की अपेक्षित नाही. मात्र पालकाकडे आज पैश्याची कमतरता नाही. वाटेल तेवढा पैसा खर्च करण्याची पालकाची तयारी आहे. मुलांनी अभ्यासाव्यतिरिक्त काहीच  करू नये असे आजच्या पालकाची मनःस्थिती आहे. त्यामुळे मुले आळशी बनत चालले आहेत. विद्यार्थी दशेत पालकांचे जे स्वप्न अपूरे राहिलात ते आपल्या मुलांनी पूर्ण करावे अशी विचारधारा करणारी मंडळी समाजात दिसून येतात. आपल्या मुलांचे काय विचार आहेत, त्याची आवड निवड काय आहे हे सर्व बाबी बाजूला सारुन मी म्हणेल ते मुलाने केले पाहिजे असा हट्ट आजच्या पालक वर्गात दिसून येत आहे. त्यासाठी त्यांच्या डोक्यावर पालकांच्या स्वप्नाचे ओझे स्पष्ट दिसत आहेत. त्याचमुळे आज कित्येक मुले उच्च शिक्षण घेऊन सुध्द बेकारीच्या अवस्थेत इकडे तिकडे सैरभैर भटकत असताना दिसत आहेत. पालकांच्या अपेक्षाच्या ओझ्या खाली मुलांना काहीच म्हणता येत नाही. मुलांना काय समजते त्याला कोणत्या विषयाची गोडी आहे आणि कोणता विषय अवघड जात आहे याचा अजिबात विचार न करता त्याची प्रवेश प्रक्रिया पालक आपल्या मनावर पूर्ण केली जाते. मुळात प्राथमिक शिक्षण हे प्रत्येकाच्या शिक्षणाचा पाया असतो. हा पाया अगदी मजबूत आणि चांगल्या प्रकारे बनविण्यात आले तर भविष्यात त्याची काळजी करण्याची गरज नसते. दहावी बारावीला इंग्रजी विषय  अवघड जाते म्हणून पहिल्या वर्गापासून इंग्रजीत शिकविण्याचा पालकांचा आग्रह सध्या वाढीस लागला आहे. खरोखरच पहिल्या वर्गापासून इंग्रजी शिकले तरच सर्व कळते अन्यथा कळत नाही असे आहे का ? याचा अजिबात विचार न करता पालक गरीब असो वा श्रीमंत प्रत्येक जण आपल्या पाल्याना इंग्लिश कॉन्वेंट स्कुलमध्ये प्रवेशा घेण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. एक दोन वर्ष तेथील शिक्षण झाले की आपली मराठी शाळा भली रे बाबा म्हणत त्यास दोन तीन वर्षांनी या मराठीच्या शाळेत आणि पुन्हा सेमीच्या शाळेत असे करीत असताना मुलाची अवस्था मात्र धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी होत आहे.
आज कित्येक पालक आपली मराठी शाळा बरी म्हणून इकडे धावत आहेत. या गतिमान स्पर्धेच्या युगात आपला पाल्य कोणत्याही स्पर्धेत उतरला पाहिजे आणि यश मिळविला पाहिजे असे वाटणे साहजिक आहे. मात्र ज्याच्याकडे क्षमता आहे तोच येथे यशस्वी होतो हे ही खरे आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाले की पालक नाराज होतात. तुझ्यासाठी एवढं सार केल आणि तू असे मार्क मिळविला असे म्हणत त्यांच्या मनात नाराजी तयार करतात. त्यामुळे मुले जीवनात कधीच यशस्वी होत नाहीत. आपल्या मुलांचे करियरची निवड करतांना पालकानी आपल्या स्वप्नाचा बंगला त्यांच्या समोर उभे न करता. मुलांचे स्वप्न काय आहे याचा एक वेळ विचार केल्यास मुले नक्की यशस्वी होतात.
मुलांनी चांगले शिकावे, त्याची प्रगती व्हावी म्हणून जे पालक सर्व सुखसोई मुलांना उपलब्ध करून देतात. त्यांची मुले पालकांचे स्वप्न पूर्ण करताना दिसत नाहीत तर या उलट ज्या मुलांना कोणत्याच सुविधा नाहीत ते मात्र यश मिळवित आहेत. याचाच अर्थ पैश्याने सर्व काही मिळविता येत नाही. त्यासाठी सर्वप्रथम मुलांची तीव्र ईच्छा असणे फार महत्वाचे आहे. बाप कमाई वर मौजमजा करणाऱ्याना रूपयाचे महत्त्व कळतच नाही त्यामुळे आपल्या शिक्षणावर कोण किती खर्च करायला लागलेत हे त्यांना कळत नाही त्यामुळे ते बेफिकिर वृत्तीने जीवन जगतात. जेंव्हा आप कमाई चालू होते त्यावेळी मात्र डोळे उघडतात, परंतु वेळ गेलेली असते. मुळात हाच फरक असल्यामुळे सुविधा नसलेली मुले सुद्धा प्रगती करताना दिसून येतात. जेथे पालक खुपच आशा ठेवून किंवा आपल्या पाल्याकडून अपेक्षा ठेवून राहतो. तिथे यश मिळेलच असे ठळकपणे सांगता येत नाही. त्यामुळे मुलांवर आपल्या अपेक्षाचे ओझे टाकण्यापेक्षा त्यास योग्य वेळी मार्गदर्शन करून त्यास यशस्वी जीवन जगता येईल असे जर केले तर पालक समाधानी होऊ शकतो. मुलांची अधिक घेतलेली काळजी मुलांना आळशी बनविते. ही गोष्ट ही लक्षात घेणे गरजेचे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर 

*📚साहित्य दरबार वैचारिक   लेखमाला*📚
➖➖➖➖➖➖➖➖➖
*पाल्याचे करिअर: स्वप्न की स्वप्नाचे ओझे*
➖➖➖➖➖➖➖➖➖
    मुलाचं लग्न झालं की वेध लागतात नातवाचे.आणी ज्यावेळी ही गोड बातमी कळते तेव्हा घरातील प्रत्येकजन वेगवेगळ्या प्रकारचे उपचार करु लागतो. कुणी म्हणतो बालाजी तांबेची औषध घ्या. कुणी गर्भसंस्कारचे पुस्तक आणतो . कुणी आनखी काहीतरी. किती हे सोपस्कार! मुल जन्माला येण्याअगोदर पासुन किती जागरुकता? पण हि प्रक्रिया नैसर्गिक आहे . त्याला नैसर्गिकच राहु द्या .
      आधुनिक तंत्राने हे सिध्द केलय कि मुल जन्माला येताना तो चिखलाचा गोळा नसतो. ते मुल ऐकते ,पहाते,संवेदनशिलता घेवुन ते जन्माला येते. आता गरज असते वयानुसार त्याला योग्य मार्गदर्शनाची.
     आजच्या धकाधकीच्या , धावपळीच्या व विविध प्रदुषणयुक्त वातावरणामध्ये प्रत्येक पालक आपल्या पाल्याच्या बाबतीत सतर्क आहे . नेमक काय कराव  हा गहन प्रश्न पालकांसमोर आहे. प्रत्येक पालकाचं एक स्वप्न असतं .आणी ते पूर्ण करण्यासाठी तो अहोरात्र झटत असतो. मुलगा डॉक्टर,इंजिनिअर, किंवा मोठा अधिकारी व्हावा हि अपेक्षा पालकाची असणं चुक आहे असं मी म्हणनार नाही. अपेक्षा जरुर ठेवा पण , त्या दृष्टीने आपले वर्तन, घरातील वातावरण, असायला हवे.  लहान वयातच मुलांचा कल आपल्या लक्षात आला पाहिजे.तो जर अभ्यासात रमत असेल तर मात्र त्याला त्याच्या कलाप्रमाणे घडण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलेच पाहिजे. पण एखादा पाल्य कितीही सांगुन अभ्यासच करत नसेल तर, आपण तेही  स्विकारुन त्याची आवड ओळखुन त्याच्या आवडीनुसार त्याला घडवले पाहिजे.सचिन तेंडुलकर अभ्यासात मागे होता पण , त्याने त्याचं करिअर उज्वल केले.व क्रिकेट क्षेत्रात देशाची मान उंचावली.
   मुलाने फक्त डॉक्टर,इंजिनिअर किंवा उच्चपदस्थ अधिकारी व्हावे या चाकोरीच्या बाहेर आपण पडत नाहीत. आणि आपली मत बळजबरीने मुलांवर लादल्यामुळे कधी कधी खुप वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागते. हे मी  या प्रसंगी सांगु इच्छिते.पाल्याचे करिअर घडवतांना पालकांच्या मनात त्यांच्या जीवनातील काही अतृप्त इच्छा असतात व त्या इच्छा आपल्या मुलाच्या माध्यमातुन पुर्ण व्हाव्यात अशी पालकाची भावना असते .आणी माझ्या मते ती चुक नाही.
       या प्रसंगाने मी माझी मुलं कशी घडली याबद्दल थोड सांगणार आहे. 
याअगोदर संघर्षमय जीवनप्रवास हा लेख मी लिहीला होता.मला दोन मुल एक मुलगी मोठा मुलगा आरोग्य विभागात चांगल्या पदावर आहे.दुसरा मुलगा डॉ प्रदिप MBBS DOMS DNB आहे मुलगी डॉ सौ तृप्ती सांगळे-सानप ही MBBS DGO आहे. आज हि मुले शिकली पण कशी हे मी तुम्हाला सांगणार आहे.
   आमचे एकत्र कुटुंब होते . तीन रुमच्या एकाच घरात आठ दहा माणसं व पै पाहुने असायचे.घरात टि व्ही नाही. आणी त्यावेळी मोबाइल तर नव्हतेच.त्यामुळे शिक्षणातील हे दोन दुष्मण माझ्याकडे नव्हते.दुष्मण यासाठी म्हणेल की ,या साधनांचा फायदा जरुर असेल पण कितीतरी पटीने तोटा आहे हे विसरता येणार नाही .मुलं तासनतास टि व्ही समोरुन हालत नाहीत. मोबाइल तर कळायला लागायच्या अगोदर मुलं वापरतात लहाण मुलांचं कौतुक वाटतय पण ते किती घातक आहे.याचा कधी विचार केलाय का?मी तर म्हणेल गरज काय आहे मोबाइलची?खरच मुलांना जर शिकवायचे असेल तर या दोन गोष्टी मुलांपासुन दुर ठेवा.मी कधीही मुलांचे फाजील लाड केले नाहीत . खाने पिणे रहाणे या व्यतिरिक्त बाबीला जास्त महत्व दिले. मी मुलांचे गृहपाठ, वर्गपाठ पाहतांना अगोदर वहीचे मागचे पान पहायची .कारण मुले वर्गात शिक्षक शिकवतांना जर लक्ष देत नसतील तर ती वहीच्या शेवटच्या पाणावर काहीतरी करतात हे माझे पक्के मत झालेलं.म्हणुन हा उपद् व्याप .मुलांनी हेच खावं तेचं खावं असे मी कधीही केले नाहीत .भुक लागली तर चटणी भाकरी पण चवदार असते हे मुलांना बालपनापासुन शिकवल्यामुले आजही माझी मुलं जेवनाच्या बाबतीत कसलीही तक्रार न करता अन्न हे पूर्णब्रम्ह समजतात.लहाण वयात त्यांना आजी आजोबा,काकाकाकु,मामामामी आत्या मावशी यांचे सानिध्य मिळुद्या.आपण काय करतो तीन वर्षाचे मुल झाले की प्ले ग्रुप,नर्सरी,एल केजी,युकेजी माझ्या मते अशा शिक्षणाने आपण मुल नाही एक यंत्र घडवतोय. मुलांना कळायला लागेपर्यंत खरतर मातृभाषेतुनच शिकवावे असं माझ ठाम मत आहे.इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा खेड्यापाड्यापासुन कहर झालेला आहे .काही ठराविक शाळा असतीलही चांगल्या पण, बहुतांश इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मुलांचा विकास चांगला होइल याची शाश्वती नाही.खरं तर मुलांना बालपण उपभोगु द्यावं लहाण वयातील आपण लादलेली बंधन कधी कधी मुलांना शिक्षणाबद्दलची अनास्था निर्माण करु शकतात. मुलांना भरपूर खेळु द्या,बागडु द्या .कुटुंबाचा सहवास त्याला जास्तीत जास्त मिळायला पाहिजे स्वच्छंदी जीवन जगण्याचा काळ आपण हिरावुन घेतोय का?हा ही विचार कधी कधी मनात डोकावतो. कारण आईवडील दोघेही नोकरीला असतील तर ते मुलं सांभाळायला घरचे कोणी असेल तर ठिक ,नसता त्या बालमनावर काय काय परिणाम होत असतील,? याचाही विचार व्हायलाच पाहिजे.आनखी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, मुलांच्या जडन घडणी साठी जसं घरातील वातावरण निकोप असावं तसच बाहेर मुलं कोणासोबत खेळतात ,काय खेळतात हे सुध्दा आपण पाहिले पाहीजे. संगत चांगल्या मुलांचीच असावी . कधीकधी वाईट मुलांच्या संगतीत राहुन मुलं बिघडण्याचा धोका असतो.तसेच मुलांना कधीही हिनवु नका तु मठ्ठ आहेस, तुला काही येत नाही, अशा प्रकारची वाक्ये मुलांचे खच्चीकरण करु शकतात. उलट मुलांना प्रोत्साहन देत राहिले पाहिजे.तु हे करु शकतोस, मला खात्री आहे,अशामुळे मुलांमधील आत्मशक्ती जागृत होवून ती प्रयत्नवादी बनु शकतात. तसेच मुले घडत असतांना मुलगा मुलगी समान माना .एकाच कुटुंबात मुलामुलीमधील भेदभाव मुलांच्या बालमनावर प्रभाव पाडु शकतो. मुलाच्या राहणी मानाकडेही पालकांनी जरासे लक्ष दिलं पाहिजे.साधी सोज्वळ राहणी असावी अशा मताची मी आहे.
    मी माझ्या मुलांना घडवतांना ही काळजी घेतली मोठा मुलगा  हा अभ्यासात ठिक होता दहावी पर्यंत मराठी शाळेतुनच शिकला.बारावीनंतर वडीलांची खुप इच्छा होती त्यानं डॉक्टर व्हावं म्हणुन, कारण गुणवत्ता असुनही पैशाअभावी त्यांना डॉक्टर होता आले नव्हते .आणी ती खंत त्यांना नेहमी असायची. पण तो कॉम्प्यूटरइंजिनियरला गेला पण तेही शिक्षण त्याला अवघड वाटु लागल्याने आम्ही त्याच्यावर दडपण न देता इंजिनिअरींग सोडुन बीएस्सी ला अडमिशन घेतले.म्हणजे मुलांवर आपली मतं लादु नका .मुल शिकत असतांना मी त्यांना कधी बळजबरीने अभ्यासाला बसवल्याचं मला तरी आठवत नाही.आजच्यासारख्या ट्युशन तेव्हा नसायच्या.आता शाळेत फक्त उपस्थिती साठी जायचे व सगळा अभ्यासक्रम ट्युशन मध्ये शिकुन घ्यायचा ही प्रथाच पडल्यासारखे झालेय की काय असे वाटते.वास्तविक  पाहता एखाद्या शाळेत जर त्या विषयाचे पारंगत शिक्षक असतील तर फक्त शाळेत शिक्षकाने चांगले शिकवावे कारण तोच अभ्यासक्रम शाळेत आणी ट्युशन यात शिकवला जातो व त्यात तुलना केली जाते .सध्या या ट्युशनच्या बाजारात पालकाची ससेहोलपट मात्र होतेय. 
   एका कुटुबात तर मी एक पाटी वाचली *येथे बारावीचा विद्यार्थी आहे ,कामाशिवाय थांबु नये*किती हा अट्टाहास. तेव्हा मुलांना घडवतांना घरातील वातावरणाचा, नैतिक मूल्यांचा,विचार जास्त करावा .मुलांच्या अनावश्यक गरजा जरा जपूनच पुर्ण कराव्यात.असं माझ वैयक्तिक मत आहे. लहानपणापासुनच भरपुर पैसा कमवायचा ,व या पैशासाठीच डॉक्टर ,इंजिनिअर किंवा उच्चपदस्थ व्हायचं हि संकल्पना मनात ठेवुन वाटचाल करु नये .आपण कुणाच्या तरी कामी यावे वआपल्या हातुन थोडीशी का होईना जनसेवा घडावी असा विचार पाल्यांच्या मनावर बिंबवला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांना आईबापाच्या कष्टाची जानीव व्हावी. या जाणिवेचे बाळकडु त्यांच्या जीवनात त्यांना कामी येतील. कालच एक बातमी वाचली एका जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांच्या गाडीचे चालक सेवानिवृत झाल्यानंतर त्यांचा सन्मान ज्या पध्दतीने केला ,ते पाहुन खरच मनातील त्यांचा आदर तर वाढला .व दसपटीने त्यांच्यावर संस्कार करणारे त्यांचे आईवडिलांबद्दलचे विचार मनात आले.असे संवेदनशिल अधिकारी  जर असतील तर माणसा माणसातील अंतर कमी होईल. 
      मुलांवर संस्कार करतांना  आपणही हेच पहायचे आहे शिक्षणासोबतच नैतिक मूल्यांची जोपासना करण्यासाठी त्याचे सबलीकरण करायचे आहे. तसेच त्याची आवड लक्षात घेवून त्या क्षेत्रात त्याला पारंगत करण्यासाठी पालक हे दिशादर्शक असावेत. कधीकधी मुलांना अपयशालाही सामोरे जावे लागते अश्या प्रसंगी मात्र पालकाची भुमिका महत्वाची ठरते. कधीकधी मुलांच्या मनावर खुप दडपन असते. बाबांची हि इच्छा आहे ,मला इतके मार्कस् मिळालेच पाहिजेत,मग यातुन जर मुलांना अपयश आलं तर ती कोणतीही टोकाची भुमिका घेवू शकतात.म्हणुन आई म्हणुन मी एक सुचवु शकते ,आईने त्या मुलांची मैत्रिण बनलं पाहिजे.  माझ्या मुलीच्या बाबतीत घडलेला प्रसंग बारावीची मिरिट असलेली माझी मुलगी CET ला एक मार्कावरुन मेडिकलचा नंबर हुकला.वडिलांची खुप इच्छा डॉक्टरच व्हायचे. अशा परिस्थितीत तिने रिपिट करण्याचं ठरले.परंतु मी तिला नेहमी प्रेरणा तर द्यायची पण हेही सांगायची की ,बाळा तु तर शिकलंच पाहिजे पण टेन्शन नाही घ्यायचे. मी तिचे डी एड ला अॅडमिशन घेतले होते. पण तिची जिद्द कायम, कारण वडिलांची इच्छा पूर्ण करायची होती.म्हणुन मी तिची मैत्रिण होते,बहिण होते ,अशा प्रसंगी खरच आईची भुमिका महत्वाची असते हे लक्षात घेतले पाहिजे.
  आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांना वहायला लावू नये.त्यांच्या आवडीचे त्यांना शिकायला मिळावे यासाठी पालकांनी रत्नपारखी व्हावे. मुलांचा कल लवकरच ओळखावा व त्यांना त्या क्षेत्रात प्रेरणा द्यावी. तो शेतकरी झाला तरी चालेल पण सुजान नागरिक झाला पाहिजे .कोणत्याही क्षेत्रात काम केले तरी प्रामाणिकपणे व मेहनतीने काम केले तर काहीही कमी पडत नाही हे त्याच्या मनावर बिंबवले पाहिजे.
       मुलांना व्यसनापासुन दुर ठेवावे.त्यासाठी स्वत:निर्व्यसणी असावे .आपला आहार, विहार,राहणी ही आदर्श असावी. मी ठामपणे सांगू इच्छिते ज्या कुटुंबातील बाप  शिगारेट ,दारु,तंबाखु, बाहेरचे चमचमित अन्न, यापासुन दुर आहे त्यांची मुलं कधीच बिघडणार नाहित .म्हणुन आदर्श पिढी घडवायची तर खुप जागरुक रहा कारण हवा ,पाणी , अन्न यासोबतच शैक्षणिक प्रदुषण खुप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.या प्रदुषणातुन आपल्या पाल्याला वाचवायलाच हवं🙏🙏🙏🙏🙏*🙏
      सौ.खेडकर सुभद्रा त्रिंबकराव
       मुख्याध्यपिका जि.प.प्रा.शा.
       किट्टीआडगांव ता.माजलगांव
        जि .बीड समुह क्र.20(मो नं9403593764)



*स्पर्धेसाठी लेख*

*विषय -पाल्यांचे करिअर -स्वप्न की स्वप्नाचे ओझे...*

एकविसाव्या शतकातील आजची ही शिक्षण पद्धती काळानुरूप , गरजेनुसार शिक्षण क्षेत्रात भरपूर प्रमाणात बदल घेऊन आली आहे .
यामध्ये विद्यार्थी विकास , मुल्याची जोपासना, सामाजिक जाणीव , व्यवसायभिमुख शिक्षण वगैरे विविध पैलूचा समावेश करुन एक आदर्श समाज घडावा त्या दृष्टीने विद्यार्थी -शिक्षक आणि पालक असा त्रिशंकू घटक निर्माण केला जेणेकरून शाळेत विद्यार्थी व शिक्षक काय करतात . आजची शिक्षण पद्धत कशी आहे . याची माहिती पालकांना सुद्धा असावी त्या दृष्टीने प्रत्येक शाळा , महाविद्यालयात पालक सभा , पालक समीत्या तयार केल्या गेल्यात. उद्देश एकच आहे विद्यार्थी घडला पाहिजे . मग त्यासाठी कसे व किती प्रयत्न करायचे याचे ठराविक मापदंड नाही . शिक्षण प्रक्रीयेतील महत्वाचा घटक बनल्यामुळे पालकांना आपल्या पाल्याची प्रगती अभ्यासता आली आणि खर्या अर्थाने पालकांची पाल्याविषयीची अपेक्षा वाढली ,आणि ज्या गोष्टीपासून पालक दूरावलेला होता किंवा ज्या गोष्टी पालकांना मिळू शकल्या नाहीत त्या सर्व पाल्यास मिळाव्या म्हणून धडपडतो आणि आपण सांगू तेच व तसेच पाल्यानेही ऐकावे असा आग्रह नकळत घराघरातून होताना दिसतो अर्थात आपल्या अपेक्षांचं ओझं पालक पाल्यावर लादतात असं स्पष्ट शब्दात सांगायला काहीच हरकत नाही . आणि मग त्यापुढे खरी कसरत निर्माण होते या पवित्र नात्यामध्ये त्यामध्ये कधी कधी शिक्षक सुद्धा अपसोकच ओढल्या जातो . याची भरपूर उदाहरणे पहायला मिळतील . 
                  तसं बघायला गेलं तर सक्तीचं , अवाजवी शिक्षण नको अर्थात दहावी पर्यंत शिक्षण सारखेच आहे त्यापुढील शिक्षणासाठी मात्र निवड ठरलेली असते त्यानुसार आपल्या शैक्षणिक कुवतीप्रमाणे करिअर करताना योग्य व झेपेल तेच क्षेत्र विद्यार्थाने निवडायचे आहे त्यामध्ये पालकाने केवळ मदत करायची आहे . एक प्रकारचे सहकार्य करायचे आहे त्यांच्यावर विशिष्ट क्षेत्रात जाण्याची सक्ती करणे टाळले  पाहिजे कारण तसे केल्याने काय होईल हे फारसं स्पष्टीकरण देण्याइतका अद्यान पालकवर्ग निश्चितच नाहीये.
                 एक सुविचारी पालक आपल्या अपेक्षांचं ओझं पाल्यावर कधीच लादत नाही आणि कोणत्याही परिस्थिती मध्ये शिक्षणात तरी सक्ती करूच नाही , कारण तसे केल्यास पालक आणि पाल्य यामधील नातं अधिक घट्ट होण्यापेक्षा त्यामध्ये दुरावा निर्माण होतो . लता मंगेशकर यांनी गायनक्षेत्र , सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेटक्षेत्र , अमिताभ बच्चन यांनी अभिनयक्षेत्र निवडलं नसतं तर कदाचीत त्यांच्या कार्याची ओळख एक इमेज समाजात पहायला मिळाली नसती . एक स्वची ओळख निर्माण झाली नसती . आज तुम्ही आम्ही जे करतो ते सुद्धा नावासाठीच आणि प्रतीष्ठेसाठीच , पैसा हा गौन आहे ते फक्त एक जगण्यासाठी लागणार्या गोष्टी मिळवून देणारं माध्यम आहे . आजकाल कोणत्याही क्षेत्रात पैसा हा मिळतोच पण त्या क्षेत्रात गेल्यावर अगदी मनापासून काम होतं का ते तपासणं गरजेचे आहे . ज्या ठिकाणी तुम्ही नोकरी व्यवसाय करता त्यात तुम्ही समाधानी नसाल तर जीवनाचं गणितच चुकल्या सारखं होऊन जातं . म्हणून करीअर निवडताना सक्ती नकोच .
             आजकाल आपण कोणत्याही गोष्टीचं अनुकरण करायला जास्त शिकलो कारण हा जमाना शो ऑफ अर्थात प्रदर्शन करायचा आहे . कामापेक्षा पुढे पुढे करणारी माणसे बड्या लोकांना आवडतात अश्या लोकांच्या पंगतीत बसायला निश्चितच कोणालाही आवडणार नाही . आणि अश्या गोष्टी करण्याच्या फंद्यातही पडू नये . कारण पाल्यावर सक्ती केली तर असं करण्याची वेळ त्यांच्यावर न चाहता येऊन लाचारीचे जीवन नकळत प्रदान करू शकते ,तेव्हा तमाम पालकांना सांगायचा उद्देश एकच आहे . मुलांना करिअर निवडताना मार्गदर्शक बना विरोधक नाही त्यामुळे पाल्यासही तुमच्या विषयी विश्वास व स्वतः विषयी अभिमान निर्माण होऊन आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रात पदार्पण केलं . याच्याएवढं समाधान त्यांना कुठेच मिळणार नाही दिवसेंदिवस पाल्य अधिक प्रगती करत त्यांच्या प्रगतीचा आलेख उंचावत जाईल त्यामध्ये प्रथम त्याचं आणि पर्यायाने पालकाचंही नाव होईल . मला तरी वाटते प्रत्येक पालक आपल्या पाल्याच्या प्रगती साठी एवढं निश्चितच बलीदान आणि योगदान देईल , यात तिळमात्र शंका नाही .

घनश्याम बोह्राडे 
समुह क्रमांक 19 
मो 8308432625


 *वैचारिक लेखमाला स्पर्धेस*

*पाल्याचे करिअर : स्वप्न की स्वप्नांचे ओझे!*

        आजकाल 'पाल्याचे करिअर' हा शब्द जिथे-तिथे परवलीचा बनला आहे.जो-तो आपल्या स्वतःच्या,नि पालक आपल्या पाल्याच्या करिअर चीच चर्चा करताना आढळतात.करिअरची नेमकी व्याख्या काय? याचे उत्तर कोणालाच नेमकेपणाने सांगता येते हे शक्य नाही.केवळ भौतिक सुख-सुविधांची मुबलक प्रमाणात पुर्तता करता यावी यास्तव मोठ्या पगाराची नोकरी अथवा भरपूर अर्थार्जन करता येणारा व्यावसाय करता येणे नि त्यादिशेने वाटचाल करण्यास उपयुक्त मार्गाच्या दिशेने जाणे म्हणजे करिअर! व त्यासाठी शिक्षणात जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी स्व-क्षमतेची,अभिरूचीची किंवा पाल्याच्या क्षमतेची,त्याच्या अभिरुचीची जाणीव न ठेवता वरील मृगजळामागे दिशाहीन  धावत राहणे हेच करिअर की काय ही शंका पालक नि पाल्य दोहोंच्या वर्तनातून आज पदोपदी पाहायला मीळते.
         खरेतर स्वतःचे करिअर नेमके कोणते नि ते कसे घडवावे याचा नेमकेपणाने विचार करण्याची संधी स्वतः पाल्यास आहे हे चित्र फार दुर्मिळ ठिकाणी पाहायला मिळते.बहुतांश कुटुंबात पाल्याच्या करिअरची दिशा ही पालकच ठरवतात नि त्याच्या पुर्ततेस्तव पाल्यावर अवास्तव अपेक्षांचे ओझे लादताना दिसतात.आपणांस जे लाभले नाही ते माझ्या मुलांना मिळाले पाहिजे या पालकाच्या मानसिकतेला बहुतेक करून भौतिक सुखाचीच किनार असते.या खोट्या भ्रमात राहून पालक आपल्या पाल्यास या जिवघेण्या स्पर्धेत ऊर फुटेस्तोवर पळण्यास भाग पाडतो.नि पाल्यही आपल्या पालकाच्या स्वप्नाखातर प्रचंड मानसिक दबावात स्वतःला रेटण्याचा प्रयास करतो. हा त्याचा प्रयास बहुतेकवेळा अपयशी किंवा असमाधानी ठरतो त्यातून त्याच्या स्वतःच्या नि पालकांच्या वाट्याला निराशा येते.या नैराश्यतेतून बाहेर पडणे ज्या मुलांना जमत नाही ती मुले व्यसनाधीन होणे किंवा आत्महत्त्येच्या मार्गाचा स्वीकार करतात की जो पूर्णतः योग्य नाही.
             आपल्या पाल्याने त्याच्या आयुष्यात पुढे जाऊन डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावे नि त्यासाठी त्याने विज्ञान शाखेतच प्रवेश घ्यावा ,12 वी नंतर मेडिकल, इंजिनिअरींग प्रवेशासाठीच्या प्रवेशपरिक्षेत यश मिळवावेच या हट्टाहसाने पेटलेला पालक आपल्या पाल्याच्या; त्याच्या स्वप्नांचा,विचारांचा,इच्छेचा क्वचितही विचार करताना दिसत नाही.याचे परिणाम व्हायचे तेच होतात. अनिच्छेने आत्मप्रेरणेशिवाय  केलेले कोणतेही कार्य कधीच यशस्वी होत नाही . यातून जीवनात तणावाची स्थिती निर्माण होते नि तणावपूर्ण  मनस्थितीत विचारांचा लोप होतो.यातून मुले बंडखोर,चिडचिडी,एकलकोंडी,व्यसनी होण्याचा संभव अधिक निर्माण होतो.काही प्रसंगात पालक व पाल्याचे याबाबतीत योग्य समायोजन नाही झाले तर तणावग्रस्त मुले आत्महत्त्या करतात.
               आजकाल तर पालक आपल्या पाल्याच्या करिअर ची दिशा त्याच्या जन्मापुर्वीच ठरवत आहे हे खरेच भयाण वास्तव आहे.त्यादिशेने हे पालक त्याची शाळानिश्चीती करणे,ट्यूशन निश्चीती करणे,विविध संस्कारशिबिरांना? त्यास धाडणे,सतत त्याच्या शिक्षणाबाबत जागरूक? रहाणे, हे असले अजब प्रयास करून पाल्याच्या करिअरचे स्वप्न स्वतःच पाहतात की जे स्वतःपाल्याच्या दृष्टिआड असते. नि अशा अदृश्य स्वप्नांमागे धावण्याचा,धावण्यास लावण्याचा अकल्पित प्रकार पालक करतांना दिसतात.जीवनात स्वबळावर,स्वसमजुतीने आचंबित करणारे यश संपादन करून आपले करिअर घडविलेली अनेक यशस्वी माणसांची चरित्रे पाहता त्यांच्या जडण-घडणीत त्यांचे स्वतःचे विचार,प्रयत्न असल्याचे दिसते.या यशस्वी माणसांच्या पालकांनी त्यांच्यावर कोणत्याही स्वतःच्या अपेक्षांचे ओझे,बंधन लादल्याचा कुठेही उल्लेख नाही. तरीही आजचा सुजाण पालक याच्या विपरीत वागताना दिसतो.आजकाल एखादया घरातील पाल्य 10वी किंवा 12 वी स आहे किंवा एखादी प्रवेशपरीक्षा देणार आहे हे त्या घरातील आई-वडिलांच्या तणावग्रस्त चेह-यांना पाहून कोणासही सहज लक्षात येते.आपल्या पाल्यांच्या करिअरची स्वप्ने स्वतः रेखाटून त्यात पाल्यास आपल्याच अपेक्षेचे रंग भरायास सांगणे नि उत्तम कलाकृतीची अपेक्षा करणे योग्य ठरते का? या प्रश्नाचे उत्तर जोपर्यंत पालक मुल घडविणे म्हणजे फुलास त्याच्याप्रमाणे उमलू देणे त्याचा रंग ,रूप ,आकार, गंध त्याला हवा तो धारण करू देणे,त्यावर आपल्या अपेक्षांचे बंधन न लादता  आपण केवळ योग्य तितके ,योग्य ते खत-पाणी देणे हे घडत नाही तोपर्यंत अनुत्तरितच असेल.

  @  -----स्वलिखित दि.13/11/2016
*श्री.सुनील विलास अस्वले.(समूह क्र.4)*
मु.पो.वडणगे,ता.करवीर, जि.कोल्हापूर
पदवीधर अध्यापक वि.मं.पोहाळे/आळते,
ता.पन्हाळा,जि.कोल्हापूर.
मोबा.9049211785
sunilaswale80@gmail.com
suvarnvilas.blogspot.com


पाल्याचे करियर
स्वप्न की स्वप्नाचे ओझे?

पाल्याचे करियर हा सध्याचा प्रत्येक पालकांचा एक ज्वलंत &काळजीची बाब,घटक,विषय ठरला आहे.प्रत्येक आई वडील मूल जन्माला येण्या अगोदरपासूनच भविष्यात त्याने काय केले पाहिजे,कोणत्या क्षेत्रात करियर केले पाहिजे अशी स्वप्ने पाहतात.मूल जन्मल्यापासून सतत त्याचा पाठपुरावा केला जातो.त्या मुलाला मोकळा स्वासच मिळत नाही.सतत त्याच्या कानावर त्याला पावलोपावली तुला मोठ झाल्यावर अमुक करायचे.तमुक करायचे असे त्याला सतत बोलले जाते.
    खर तर मूल ही मातीचा गोळा असतात असे म्हटले जाते परंतु ते चुकीचे आहे.लहानशा,इवल्याशा नाजुक जीवाकडे एक महाशक्तिशाली मेंदू असतो,परंतु आपल्याला त्याची जाणीव नसते.जन्मापूर्वीच त्या मेंदुमधे दहा ते बारा महापद्म एवढ्या प्रचंड संख्येने पेशींची वाढ झालेली असते.
       जन्मलेल्या एक दिवसाच्याही नवजात बालकालाही गंध, वास समजतो.पहिल्या चार दिवसात रंग समजतो.प्रत्येक बालकाकडे उपजत ज्ञान असते हे विसरून चालणार नाही.जन्मताच आईच दूध चोखायला कोण सांगत?ते स्वतः च शिकत असत.रांगण्यापासून उठण्यापर्यन्त सर्व क्रिया कोण करत?ते स्वतः च पडत झडत करत  असत.मग तो मातीचा गोळा कसा असू शकतो?
या विषयासंधर्भात  
       प्रा.ग.प्र.प्रधान म्हणतात,'मुले ही मातीचे गोळे असतात&त्यांना थोपटून घड़वायच असत,ही कल्पना चुकीची आहे,मूल तर फूल असतात त्यांना त्यांच्या आंतरिक उर्मिन फुलू द्यायच असत'.
     प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करायलाच हव.तोही निर्णय घेऊ शकतात ही मानसिकता आंगी बानायला हवी.फक्त त्याचा निर्णय योग्य की अयोग्य हे पाहून योग्य तेथे मार्गदर्शन करावे.आपण पाहिलेले स्वप्नच ,आपण ठरवलेल्या गोष्टीतच मुलांनी करियर करावे ही जबरदस्ती,अट्टहास कशासाठी?त्यालाही स्वातंत्र्य आहे,बुद्धिमत्ता आहे,पालकांनी फक्त आपला पाल्य योग्य मार्गाने जातो आहे की नाही पहावे .मग पालकांनाही & पाल्यानाही  दोघांनाही एक खरोखर सत्यात उतरणारे स्वप्न वाटेल ,त्याचे ओझे वाटणार नाही.
प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना स्वावलंबी बनवल पाहिजे.स्वतः ची कामे स्वतः करणे,स्वतः चे निर्णय स्वतः घेण्याची सवय लावली पाहिजे.म्हणतात ना,'आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही'.मोठेपणी कर्तुत्ववान बनविन्यासाठी कार्यक्षमतेचे धड़े लाहानपनापासूनच द्यायला हवेत.वेळ श्रम &पैसा या गोष्टीचे संयोजन करणे हे लाहानपनापासूनच घरातील छोटया छोट्या व्यवहारातून शिकवायला हवे.छोट्या वस्तु ,गोष्टी निवडीचे स्वातंत्र द्यावे,म्हणजे भविष्यात मोठे मोठे योग्य निर्णय घेऊ शकेल.
  कधी कधी आपण म्हणतो,रम्य ते बालपण',किंवा'लाहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा'.कारण बालपण म्हणजे खेळण्याचे बागडण्याचे वय.पण सध्याच्या काळात ही सर्व गैरसमजूत वाटते.कारण अनेकदा मुलांना कसलेच अधिकार दिले जात नाहीत.म्हणून मुलांचे बालपण रम्य करायचे असेल तर त्यांना स्वतः च्या आयुष्याबाबत थोडासा अधिकार,निवड करण्याची संधी द्यायला हवी.मुलांना काय कळतय?त्यांचे निर्णय बरोबर कसे असतील?त्यांना सारासार विचार करण्याची,चांगली वाईट कळण्याची बुद्धि कुठे असते.असे पालकांना वाटते.लहानपनापासूनच मुलांना छो टया छोट्या गोष्टी निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे.
उदा: 
*चार पाच शर्ट मधून एखादा शर्ट निवडण्यास सांगणे,
*कोणते फळ आवडते ते विचारणे,
*कोणती भाजी आवडते,अशा प्रकारे सवय लावावी.
      पालकांनी मुलांच्या भविष्याबद्दल
अवाजवी चिंता करणे सोडले पाहिजे.आजच्या कृतिचा आनंद घ्यायला हवा.मुलांना सुसंस्कारित घाडवन्याचा प्रयत्न केला पाहिजे.मुलांनी डॉक्टर,इंजिनियर झालेच पाहिजे.असे पालकांना वाटते.पण या झालेच मधला च खुप घातक ठरतो.त्यामुळे मुलांच्या मनावर ताण येतो,हसत खेळत राहणार आपल् फुलासम मूल कोमेजुन जाते.म्हणूनच मुलांना त्यांच्या कलेकलेन घडू द्यायला हव.पाकळी पाकळी ने फुलू द्यायला हव.अतिअपेक्षा ,अवाजवी ध्येय ,जोर-जबरदस्ती,मानसिक ताण हा स्वतः वर व् मुलांवरही येऊ नये याची काळजी पालकांनी घ्यायला हवी.
     ज्याप्रमाणे जीजाऊ मासाहेबांनी शिवाजी घडवण्यासाठी त्याला शुर विरांच्या, भीम ,कृष्णाच्या गोष्टी सांगीतल्या तसे पोषक वातावरण निर्मान केले.त्याच प्रमाणे पालकांची भूमिका आता' कुंभाराची' नाही.माळ्याची आहे.उत्तम विचारांच माती,खत,पाणी घालायच ,मशागत करायची पण नंतर मात्र फुलरूपी मुलांना आपली आपण उमलु द्यायच.
         पालक आणि पाल्य यांच्यात वाद न घडता संवाद घडला,ते जर एकमेकांचे मित्र बनून राहिले तर मुलांचे करियर हे ओझे न वाटता ते एक पालक व् पाल्य दोघांसाठी सत्यात उतरणार सुंदर असे स्वप्न बनेल.


मीनाक्षी माळकर
68



🎯 साहित्य दरबार वैचारिक लेखमाला.....
🎯विषय : पाल्यांचे करिअर- स्वप्न की स्वप्नाचे ओझे.....


आजच्या स्पर्धेच्या युगात सर्व पालक आपल्या पाल्यांच्या बाबतीत फारच जागरूक आहेत ही अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे. आणि का असू नये असायलाच हवे कारण या आधुनिक काळात स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेलतर स्वतःला सिद्ध करण्याची धमक मुलांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे.त्यांचे करिअर उत्तम घडवायचे असेलतर पालकांनी त्या दिशेने सुरवात करत असताना प्रथम आपल्या पाल्यांचे अगदी बारकाईने निरिक्षण करावे कि त्याची रुची कशात आहे कारण हे अत्यंत आवश्यक अशी बाब आहे मुलांची रुची आवड ज्या विषयात ज्या गोष्टीत आहे त्यातच त्याला करिअर करण्यास प्रोत्साहन द्यावे आपण आपले मत किंवा आपली आवड त्यांच्यावर लादू नये यामुळे विपरित परिणाम होऊ शकतात प्रत्येकच पालकांना वाटते की माझा पाल्य डॉकटर,इंजिनियर,यासरख्याच उंच्च पदावर कार्यरत व्हावा, पण विचार करावा लागेल की जरी निसर्गाने बुद्धी सर्वांना सारखी दिली असलीतरी विचार करण्याची क्षमता आवड निवड या बाबी सर्वांच्याच सारख्या असूच शकत नाहीत म्हणून मुलांची आवड त्यांचा कल लक्षात घेणे गरजेचे आहे. आता याचेही कष्ट पालकांना जास्त घेण्याची गरज नाही आजच्या युगाला आपण आधुनिक युग म्हणतो या युगात विज्ञानाने ऐवडी प्रगती केली आहे की मुलांचा बुध्यांक आपण तपासून पाहू शकतो व त्या नुसार त्यांना त्यांच्या आवडत्या विषयात करिअर करण्यास प्रोत्साहन देऊ शकतो त्यातच। मुलांचे खरे भवितव्य घडू शकते कारण प्रत्येक व्यक्तीत काही सुप्त गुण असतात आणि त्यांना त्यात प्रेरणा मिळालीतर ते खूप उत्तम प्रकारे त्यांच्या कलागुणांना जोपासून त्यांचे भविष्य उज्जवल करू शकतात तेव्हा गरज असते ती फक्त त्या गुणांना ओळखण्याची त्यांच्या आगळ्या वेगळ्या सृजनात्मक कौशल्याला  प्रेरणा देण्याची या मुळे मुले कसल्याही दबावाखाली किंवा तणावाखाली राहणार नाहित आपण पाहतो सध्याच्या परिस्थितीत जेव्हा दहावी बारावीचा निकाल लागतो त्यावेळी अनेक मुले वेग वेगळ्या तणावात असतात कारण त्यांच्या निकालाचे अंदाज अगोदरच त्यांच्या पालकांनी बांधलेले असतात काहींनीतर पुढे कुठे कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे हे सुद्धा ठरवून ठेवलेले असते या वाढत्या अपेक्षेच्या ओझ्याखाली दबलेलीली कित्येक निरागस मुले मुली नको त्या वयात अतिशय टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवतात अशा भयानक प्रसंगाला सामोरे जाण्याची वेळ कोणालाच येऊ नये .
      आपण पाहतो मुळातच काही पालकांनातर त्यांचा मूळ हेतूच माहित नसतो इतरांच्या मुलांनी जे केले तेच आपल्याही मुलाने करावे ही अपेक्षा करने चुकीचे आहे प्रत्येकाची चिकित्सकवृत्ती ,सृजनशीलता हि पूर्णपणे वेगळी असते आणि या वेगळ्या विचार करण्याचा पद्धतीनेच अनेक शास्त्रज्ञ निर्माण झाले.मानासशात्रीय दृष्ट्या अनुभवातून शिकलेल्या गोष्टी दिर्घकाळ स्मरणात राहतात म्हणून एखादी गोष्ट मुलांना समजवताना त्यांना स्वतःला काही अनुभव येऊ द्यावेत या मुळे त्यांच्यात स्वअध्ययनाची गोडी निर्माण होईल आणि आवड असेलतर मुले पुन्हा पुन्हा एकाच गोष्टीकडे आकर्षित होताना दिसतात उदा: काही मुलांना चित्रकलेत आवड असते ती मुले पुन्हा पुन्हा रंग ,चित्र, किंवा निरीक्षण याच गोष्टीकडे आकर्षित होतात,आणि शास्त्रीय दृष्ट्या हे खरे आहे की ज्या मुलांमध्ये निरिक्षण शक्ती जास्त असते ते कला शास्त्रात प्रगती करतात म्हणून अपल्याला काय हवं आहे किंवा आपल्याला जे आवडते तेच मुलांनी करावे हा हट्ट प्रथम पालकांनी सोडायलाच हवा आणि असे केलेतरच आपण आपल्या पाल्यांचे खरे मार्गदर्शक ठरू शकतो कारण जशी मुले आपल्या समोर लहानाची मोठी होतात तशातच त्यांच्यात अनेक अवस्थाही येत असतात जसे ,बाल्य अवस्था,किशोर अवस्था,या अवस्थेत मुलांमध्ये झपाट्याने बदल होतात तसेच त्यांच्या मानसिक क्षमतेतही बदल होत असतात अशात अनेक वेळा मुलांमध्ये काही न्यूनगंड निर्माण होतात व ते आपल्या पालकांपासून दुरावत जातात आणि पालकांचे सांगणे शिकवणे त्यांना पटत नाही त्यापेक्षा आपण त्यांच्या वयाचा विचार करून प्रथम त्यांचा मित्र ,मैत्रीण बण्याचा प्रयत्न करावा जेणे करून मुले त्यांच्या सर्व समस्या आपल्याला निसंकोचपणे सांगतील व त्यामुळे आपल्याला योग्य निर्णय घेणे सोईचे ठरेल म्हणून प्रत्येक पालकांचे आद्य कर्तव्य हे आहे की आपण आपल्या पल्याची बोद्धीक क्षमता सर्वप्रथम पडताळून मुलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात करिअर करण्यास प्रोत्साहन द्यावे,त्याच्यावर आपली आवड लादन्यापेक्षा त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्रगती करण्यास 
त्यांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न करावा......
मुलांना कमवून ठेवण्यापेक्षा त्त्यांनाच कमवण्यालायक बनवू  आपल्या पाल्यांचे करिअर त्यांच्या आवडीनुसार घडवण्यास त्यांना प्रेरित करू......




✍जोगदंड जयश्री
62......



विषय -पाल्यांचे करिअर -स्वप्न की स्वप्नाचे ओझे...

            आपण सारे स्वप्नांवर जगत असतो . आपला इतिहास कितीही कठीण प्रसंगातून मार्गक्रमण करत आलेला असला तरी आणि वर्तमान कितीही आक्रमक असला तरी आपण आपल्या मनाला सतत  बजावत असतो हेही दिवस जातील . भोग सरल सुख येईल असं आपण म्हणत दिवस सारत असतो .आपली अर्धवट राहिलेली स्वप्न आपल्या मुलाबाळांनी पूर्ण करावीत म्हणून प्रयत्न करत असतो . त्यांच्या भविष्यात आपलं सुख शोधत असतो आणि हे काही चुकीच किंवा अशक्यप्राय असं नाही .मुलांच्या मनात स्वप्न पेरावीत , त्या स्वप्नप्राप्तीसाठी त्यांना प्रयत्न करायला प्रोत्साहन द्यावे . मुलांच्या व आपल्या स्वप्नपूर्तीचा आनंद मिळवावा .
              पण सध्य परिस्थिती पाहता मन सुन्न व्हायची वेळ आली आहे .मूल दोन अडीच वर्षाचे झाले की लगेच त्याची रवानगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत होत आहे .शाळेतून घरी आल्यावर लगेच ट्युशनसाठी म्हणून पाठवले जात आहे . आपण शाळेच्या , शिक्षणाच्या नावाखाली मुलांचे बालपण हिरावून घेत आहोत हे कसं आपल्याला कळत नाही याचे नवल वाटते आहे . दोन अडीच वर्षे वय असणाऱ्या चिमुकल्या जीवांना स्पर्धेच्या गोंडस नावाखाली वेठीस धरतो आहोत . होमवर्क म्हणून रात्री उशिरापर्यंत त्यांना जागवलं जातं .शेजारच्या किंवा आप्तस्वकीयांच्या मुलांशी तुलना केली जाते .पण मुलांच्या मानसिकतेचा विचार केला जात नाही . 
               मुलं मोठी होऊन शाळेत जाऊ लागली की तर ही स्पर्धा जीवघेणी ठरावी एवढया क्रूरपणे राबवली जाते . मुलांना सतत अभ्यासावरून बोललं जातं . मी एवढे कष्ट करून तुला शिकवतो आहे त्याच चीज कर .शेजारच्या काकांचा मुलगा डॉक्टर होतोय तू निदान इंजिनिअर तरी हो  असं त्याला सारखं सांगितलं जातं पण त्याची अभिरुची कशात आहे हे लक्षात घेतलं जात नाही . त्यालाही काही स्वप्न असू शकतात याचा विचार केला जात नाही . 'शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकास' ही संकल्पना असतानाही पालक सर्वांगीण विकास करण्याऐवजी त्याला पंगू करू पाहताहेत असं वाटत . स्वप्न पाहणं चुकीच नाही पण अवास्तव स्वप्न पाहून मुलांना दडपण देऊन त्यांच्या स्वातंत्र्याचा गळा दाबू नका .
              समाजात वाढती व्यसनाधीनता हा प्रश्न  गंभीर स्वरूप धारण करतो आहे याचे मुख्य कारण म्हणजे नैराश्य आहे . नैराश्याची कारणे अनेक आहेत . दैनंदिन जीवनातील दगदग , स्पर्धा व जगण्याची धडपड यातून आलेला अपेक्षाभंग सर्वांना दुःखाच्या खाईत लोटतो आहे .तारुणांमध्येही याच समस्येतून व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढते आहे . 'थ्री इडियट्स' या चित्रपटातील प्रसंग समाजात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत जो तो धावतो आहे . प्रेशर कुकर मधल्या हवेसारखी मुलं स्वप्नाच्या ओझ्याखाली दाबली जात आहेत .
                पालकांना मुलांना लवकरात लवकर कुठेतरी स्थिर करायचे आहे त्यामुळे तेही फक्त त्यांना कामायाब बनवण्याच्या मागे धावत आहेत . काबील बनण्याचे स्वप्न कोणीच पाहत नाही की काय ?असा प्रश्न निर्माण होतो आहे . बरं या सर्व स्पर्धेच्या कोंडीत फक्त मूलच सापडली आहेत असे नाही तर पालकही सापडली आहेत . तेही प्रचंड अस्वस्थता अनुभवत आहेत . काही पालक तर ह्रदयविकाराने त्रस्त झाले आहेत कारण काय तर मुलाचे अपयश सहन करू शकले नाहीत .
                  ही सगळी जीवघेणी स्पर्धा कशासाठी तर कुणाशी तरी आपली तुलना चालू आहे म्हणूनच ना .पैश्याच्या , प्रतिष्ठेच्या मुखवट्याच्या मागे धावण्यात आपण विसरतो आहोत की 'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती' असंही काही असतं .आपण सारे निर्मात्याची सुंदर कलाकृती आहोत . आपल्या साऱ्यांना निर्मात्याने वेगळं बनवलं आहे ते या जीवनाचा आनंद घेता यावा म्हणून पण आपण मात्र या जीवनाचा आनंद घेण्याऐवजी सतत अवास्तव स्वप्नांच्या मागे धावतो आहोत मुलांना धावायला भाग पाडत आहोत .  मुलांच्या सुप्त इच्छा जाणून घ्या .त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा प्रयत्न करा . 
               मुलांना मोकळा श्वास घेऊ द्या .त्यांना तुमच्या स्वप्नांच्या दडपणाखाली कोंडून ठेऊ नका . त्यांच्याशी संवाद साधत वातावरण प्रसन्न व मोकळे ठेवा .मुलांच्या मनाप्रमाणे लेखक , विचारवंत , समीक्षक , डॉक्टर , इंजिनिअर किंवा खेळाडू जे बनायचे असेल ते बनू द्या . सचिन तेंडुलकर यांच्या वडिलांनी तो गायकच बनवा अशी अपेक्षा केली असती तर आज आपल्या देशाला क्रिकेट जगताला एवढा महान खेळाडू भेटला असता का ? अमिताभ बच्चन यांच्या वडिलांनी अमिताभ खेळाडू बनवा म्हणून ताण दिला असता तर आपण एका सिनेसृष्टीतील ऋषितुल्य महानायकाला पाहिलो असतो का ? 
                  समाजाची रचना सर्व घटकांनी पूर्ण होणारी असते .समाजात डॉक्टर , इंजिनिअर , शिक्षक , प्राध्यापक ,शेतकरी , व व्यापारी हवे असतात तरच समाज संतुलित राहतो अन्यथा असंतुलित समाज निर्माण होईल . 'शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकास' ही शिक्षणाची व्याख्या समाजात रुजवली पाहिजे . आपण गुणग्राहक व गुणसंग्राहक बनलं पाहिजे निकोप व सुशिक्षित समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ."संपत्ती साठी संतती निर्माण करण्यापेक्षा संपत्ती निर्माण करू शकणारी चारित्र्यसंपन्न संतती निर्माण करावयास हवी'.मुलांना महापुरुषांची चरित्र वाचायला द्या त्यांचे चरित्र त्यांना प्रेरणा देत राहतील . मुलांना फुलाप्रमाणे फुलू द्या .  आपल्या अवास्तव स्वप्नांसाठी मुलाचे आयुष्य कोमेजून टाकण्यापेक्षा जगण्याची मूल्य रुजवणारी स्वप्न मुलांच्या मनात रुजवा. तुमचे , त्यांचे , आपल्या समाजाचे व देशाचे भवितव्य सूर्यप्रकाशासारखे प्रकाशमान होईल यात वाद नाही ...
   - ऋषिकेश गंगाधरराव देशमुख 
मु पो : शिळवणी ता : देगलूर जि : नांदेड 
संपर्क :९९२३०४५५५०


स्पर्धेसाठी लेख...
विषय- पाल्याचे करिअर --स्वप्न कि स्वप्नांचे ओझे
   सध्या आई -वडिलांच्या स्वप्नांचे व अपेक्षांचे ओझे आपल्या जावळासोबत घेऊनच हसत हसत नव्हे तर स्वप्न व अपेक्षा कशा पूर्ण करू शकणार ? या चिंतेतच बाळ जन्माला येते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही . पूर्वी मुला -मुलींची नावे आधी ठरविली जात असत परंतु आता मुलगा किंवा मुलगी डाॅक्टर होणार कि इंजिनिअर हे अगोदर ठरविले जाते आणि हे अपेक्षांचेव स्वप्नांचे ओझे घेऊनच त्याचे बालपण कधी संपते व कधी तो तरूणपणाचा ऊंबरठा ओलांडतो हे त्यालासुद्धा कळत नाही .
हे स्वप्न व अपेक्षा पुर्ण करण्यासाठी त्याच्या जीवाचा आटापिटा सुरु होतो. परंतु त्याच्या आवडीच्या क्षेत्राचा विचार आई -वडिल करायला विसरतात. अपेक्षा व स्वप्न पूर्ण करू न शकल्याने आई-वडिलांप्रमाणे त्या मुलांवरसुद्धा वेगवेगळ्या प्रसंगांना व संकटांना सामोरे जाण्याची वेळ येते .
   लता मंगेशकर , अमिताभ बच्चन , सचिन तेंडुलकर व असे अनेक महान व्यक्तींवर त्यांच्या आई-वडीलांनी आपले स्वप्न लादले असते तर कदाचित सारे जग एका महान गायिका ,अभिनेता , खेळाडु यांना मुकले असते याचा विचार आई-वडिलांनी आपल्या मुलांबद्दल स्वप्न पाहतांना केला पाहीजे.
  सध्या दहावीत घेतली जाणारी कल चाचणी विद्यार्थ्यांचा कल शिक्षकांना व पालकांना कळावा व मुलांनी आपल्या आवडत्या आकाशरूपी क्षेत्रात स्वच्छंदी विहार करून आपल्या सोबतच पालक , शिक्षकांना देशाचा प्रगती , विकासाचा साक्षीदार बनवुन आपल्या वेगळ्या व अनोख्या व्यक्तीमत्त्वाचा ठसा लोकांच्या मनावर कायमचा ठेवु शकतात.
  आई-वडिलांनी आपल्या पाल्यावर आपल्या " स्वप्नांचा बाॅम्ब " टाकुन त्यांचे जीवन उद्ध्वस्त न करता त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांना करिअर तन-मनाने करू द्यावे तरच संशोधन , प्रगती , विकास होऊन आपल्यासोबत आपल्या देशाचे भवितव्य उज्ज्वल होऊन जगाच्या स्पर्धेत टिकुन राहु शकतात ते सुद्धा अव्वल स्थानी.
नरेंद्र म्हस्के ,शिरपूर ( धुळे ) @ 65


 

पाल्याचे करिअर : स्वप्न की स्वप्नाचे ओझे
कोवळ्या मनावर ओरखडे ओढणारे निर्दयी पालक
त्या मनाला निर्दयी म्हणण्याचीही उसंत देत नाहीत. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी एक म्हण आहे. पण पाळण्याच्या बाहेर पाय ओढायला उतावीळ झालेले पालक आजकाल आपणास दिसतात. जे आपल्या आयुष्यात प्राप्त झाले नाही.आपल्याला जे मिळाले नाही किंवा मिळवता आले नाही ते आपल्या पाल्याद्वारे आपणास मिळावे हा सुप्त स्वार्थ आणि समाजातील प्रतिष्ठा (खोटी) मिळविण्यासाठी  आपला पाल्य उच्चशिक्षित चांगल्या नोकरीच्या पदावर असला पाहिजे ही प्रबळ इच्छा बाळगून असणारे पालक मुलांच्या वयाचा वेळेचा किंवा त्याच्या भावनाचा थोडाही विचार  करताना दिसत नाहीत. आपण आपल्या भावना त्यावर लादून त्याच्या मानसिकतेत घडवण्याचे की बिघडवण्याचे बीज रोपण करत आहोत हेच मुळी आपणास कळत नाही. मुळात मुलांना शाळेत दाखल करत असताना पासून अप्रत्यक्ष एक एक ओझं आपण त्यावर लादायला चालू करतो. त्याच्या कलागुणाला वाव दिला पाहिजे हे जसे खरे आहे त्यापेक्षा त्या गुणांसाठी त्याला किती राबवायचं हे महत्वाचं आहे. यातूनच करिअरच्या नावाखाली मुलं घाण्याच्या बैलाप्रमाणे राब राब राबवली जातात. टिव्हीवर असणारे रिअॅलीटी शो तर येवढे बोकाळलेत की पालकही आपल्या पाल्यांना अशा शो मध्ये दाखल करुन त्याचे करिअर बनविण्याचा अट्टाहासी प्रयत्न करत असतात. त्याचे वय वा त्याचा अनुभव लक्षात न घेता त्याला अक्षरशः अशा शो मध्ये ढकलले जाते. बाल मानसिकतेचा विचार न करता अवास्तव स्वप्नांचे ओझे करिअरच्या गोंडस नावाने बालकांवर लादले जाते. माहिती आणि तंत्रज्ञान याचा विस्फोट होत असताना ज्ञान घेण्याची प्रखर जिज्ञासा मुलांकडे असताना कांही वेळा केवळ पालकांच्या इच्छेखातर मुलांना स्वतःच्या इच्छेला तिलांजली देऊन अनिच्छेने एखादे क्षेत्र निवडावे लागते. पण अशा वेळी काय घडते किंवा काय बिघडते याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते.परीक्षा
काळात तर फार नवलाई घडून येत असते. पालक
बेचैन असतात. आणि परीक्षा म्हणजे करिअरची
लक्ष्मण रेखाच समजून पाल्याला ट्रिटमेंट दिली जाते
पालकांच्या धावपळीकडे पाहिले की खरंच फार विचित्र वाटते.अकारण आणि अवास्तव ओझे आपल्या मुलांच्यावर लादुन मोठया न पेलवणा-या स्वप्नात मुलांना ढकलुन दिले जाते.स्पर्धेला जीवघेनं रूप मुलांपेक्षा पालकंच आणतात.परीक्षा जवळ येईल तसं मुलांवर अनेक बंधनं लादली जातात,नव्हे मुलांचे दहावी बारावीचं वर्ष घरातील वातावरण बदलून टाकते.आणि घरातील लोकांच्या सवयी सुद्धा बदलून जातात...मी माझ्या मुलीच्या दहावीच्या परीक्षेदरम्यान कधी नियम केले नाहीत किंवा वर्षभर टि.व्ही.बंद ठेवला नाही.फक्त सध्याची सर्वत्र असणारी परिस्थिती आणि त्यात टिकण्याची इच्छाशक्ती याबाबत फक्त जणीव निर्माण करत होतो.त्याचा परिणाम म्हणजे मुलींने दडपण न घेता अभ्यास केला.आणि दहावीत ९१टक्के तीला गुण घेता आले.या उलट  मी असेही पालक पाहिलेत कि रात्र रात्र मुलांना जागवून  त्याला चहा बनवुन देउन स्वत:ही त्याच्याबरोबर जागत राहुन अभ्यास घेत.परिणामी मुलाच्या आरोग्यावर परिणाम होऊन त्या मुलांने ना पालकाचे स्वप्न पूर्ण केले.ना स्वत:चे.तेव्हा मला यवढेच वाटते की पालकांनी अवास्तव आपेक्षांचे ओझे मुलांनवर न लादता व कोणताही जाचक बंधनं न तयार करता केवळ जाणिव जागृतीचे काम करावे.मुले हुशार आहेतच ती त्यांचा मुक्काम नक्की गाठतील. पण स्वप्न पाहण्यात गुंगवणारे आणि स्वप्नांचे ओझे देणारे पालक दिवास्वप्न बघणारा पाल्य आपण घडवत आहोत याबाबत अनभिज्ञअसतात कि जाणीवपूर्वक
तसे वागतात हा संभ्रमाचा प्रश्न आहे. खरे तर करिअरचा विचार करता आपाल्या आयुष्यात आपणास जे क्षेत्र निवडायचे आहे. त्यावर एकाग्र होऊन पाल्यात केवळ जाणीव जागृती केली तर भविष्य आधिक सोयस्कीर होईल. शिक्षण निवडीशी संबंधीत असणारा हा करिअर शब्द जीवनाला स्थैर्य आणि समाधान देणारा आहे. पण याच्या बाजू समजून घेण्याऐवजी करिअरबाबत स्वप्न आणि त्याचं अवास्तव ओझं लादन्याचं कर्तव्य पालकांकडून होत असतं. करिअरची वाटचाल करताना कौशल्याची कसोटी महत्त्वाची असते. प्राप्त परिस्थितीवर स्वार होऊन वाटचाल केली पाहिजे. अपयश हे कदाचीत येऊ शकते पण तो आपला शेवटचा थांबा नाही त्याला तुुडवून पुढं गेलं पाहिजे.आपली कुवत, गुणवता, कौशल्ये, परिस्थिती आदिचा सार्वगिंक विचार करिअर निवडताना व्हावा.
यात पालकापेक्षा पाल्यांचा वाटा व सहभाग महत्वाचा आहे. नसता करिअरच्या वाटेवर स्वप्नाचं ओझं वाहता वाहता जीव मेटाकुटीला यायचा आणि
शेवटी हाती धुपाटणे यायचे.

              श्री. हणमंत पडवळ
    मु.पो. उपळे(मा.)ता. जि. उस्मानाबाद.
               .8698067566.


🌺स्पर्धेसाठी🌺

किती अट्टहास किती तडजोड आपल्या मुलांनी मोठ व्हावं म्हणून.
हीच मनी सदैव आस,त्यांची स्वप्न मुलांनी तरी पूर्ण करावी.जे त्यांना मिळाले नाही ते सर्व मुलांना मिळावे.जे त्यांना करता नाही आले ते मुलांनी करावे. अशी सर्व पालंकाची आपल्या मुलांकडून असते इच्छा छान.

पण या धावपळीचा जगात,स्पर्धेच्या युगात
पालक मुलांना किती तरी क्लासेस लावतात.
त्यांना वेळापत्रक बनवून त्यानुसार वागयला भाग पडतात.काही मुलांची संमतीने ते हे सर्व करतात तर काही जोर जबरदस्तीने .कधी यश तर कधी अपयश पदरी पडते.बिचारे ते तर कधी पालक या नात्यात भरडले जातात, कोण चुक कोण बरोबर सांगणे तसे अवघडच आहे ...

पण कधी चुकून माकून अपयश पदरी पडलेच तर काहीना पचवायला जड जावून ती मुले मृत्युला जवळ करतात.स्वप्नांचे ओझे की स्वप्न पूर्तिचा
आनंद. प्रश्न छोटा आहे.पण खोलवर विचार करणारा आहे कसे वागावे पालकांनी.कसे वागावे मुलांनी.स्वप्न कुणाची .कोणी सांगावे 
कोणी काय करावे, ज्याने त्याने आपली जबाबदारी ओळखूनच वागावे...
पालकांनी आपले अनुभव मुलांशी शेयर करून समजून सांगावे, एक मित्र बनून मार्गदशन करावे, ही काळाची गरज आहे...

🌹कविता शिंदे🌹...६७