*साहित्य दर्पण Whatsapp समूह*
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"''''''''''''
यांचे द्वारे आयोजित
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"''''''''''''
यांचे द्वारे आयोजित
साहित्य दरबार वैचारिक लेखमाला स्पर्धा
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"''''''''''''
दिनांक - _11/12/2016_
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"''''''''''''
दिनांक - _11/12/2016_
वार - रविवार
~~~~~~~~~~~~~~~~
वेळ - सकाळी 10:00 ते 7:00
~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~
वेळ - सकाळी 10:00 ते 7:00
~~~~~~~~~~~~~~~~
★★★★★★★★★★
विषय:-
*आजची बचत ; उद्याचे भविष्य*
(वेळ, पैसा, पाणी, वीज, कागद आणि इतर काहीची बचत यावर लेख अपेक्षित)
*आजची बचत ; उद्याचे भविष्य*
(वेळ, पैसा, पाणी, वीज, कागद आणि इतर काहीची बचत यावर लेख अपेक्षित)
★★★★★★★★★★
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"''''''''''''
स्पर्धेचे नियम -
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"''''''''''''
स्पर्धेचे नियम -
ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे....
आपला लेख किमान 100 आणि कमाल 500 - 700 शब्दांच्या मर्यादेत असावे. त्यात व्याकरणाच्या चूका कमी असावेत.
स्वनिर्मित लेख असावा. कुठलीही कॉपी नसावी
लेखाखाली आपले पूर्ण नाव, गाव मोबाईल नंबर आणि email id अवश्य लिहावे. अन्यथा लेख स्पर्धेतुन बाद समजले जाईल.
स्पर्धेतील निवडक लेख संयोजक वृत्तमानपत्रातून प्रकाशित करतील याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी.
या स्पर्धेचा निकाल ग्राफिक्स सह खालील blog वर आणि आपल्या साहित्य दर्पण वर पाहण्यास दिनांक _13 डिसेंबर 2016_ रोजी सायंकाळी 9:00 pm वाजता मिळेल. त्यासाठी वारंवार चौकशी करु नये.
••••••••••••••===============••••••••••••
*यशस्वी जीवनात वेळेचे नियोजन*
भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासून वेळेचे महत्त्व सांगितलेले आहे. शालेय जीवनात आपण वेळेचे महत्त्व जणून न घेता त्याचा अपव्यय म्हणजे वाया घालवित राहलो, तर भविष्यात यशस्वी जीवन कधीच जगु शकत नाही. जगात कुणी श्रीमंत असतील वा गरीब असतील सगळ्याजवळ वेळ मात्र समसमान आहे. जे कुणी वेळेचा सदुपयोग करतील तेच जीवनात प्रगती करू शकतील. जगात तीन गोष्टी प्रसिध्द आहेत ज्या की एकदा गेल्या नंतर परत मिळविता येत नाहीत. त्या म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण, तोंडातून बाहेर पडलेला शब्द आणि सर्वात महत्वाची म्हणजे गेलेली वेळ. आजची गेलेली वेळ कितीही पैसा खर्च केला आणि कितीही धडपड केली तरी परत मिळविता येत नाही. त्यामुळे आपणा जवळ उपलब्ध असलेल्या वेळेचे योग्य नियोजन करता येणे आवश्यक आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपी जाईपर्यंत उपलब्ध वेळाचे वेळापत्रक तयार करावे. ज्याप्रकारे शाळेतील वेळापत्रकाप्रमाणे तासिका आणि अभ्यासक्रम यांचे नियोजन केले जाते. त्यामुळेच शाळेतील सर्व प्रक्रिया योग्य पध्दतीने घडत असतात. आपल्या जीवनातील सकाळी झोपेतुन उठणे, खाने, खेळणे, शाळा, शिकवणी, टी. व्ही. पाहणे आणि अभ्यास करणे या सर्व क्रियांच्या वेळा वेळापत्रकात नमूद करून त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केल्यास वर्षभरात ठरविलेली सारेच ध्येय साध्य होताना दिसून येतात. फक्त दहावी आणि बारावी हे अति महत्वाचे वर्ष आहे म्हणून बाकी च्या वर्षात अभ्यास न करता याच वर्षात खुO अभ्यासा केल्याने यश मिळत नाही. अभ्यासात सातत्य आणि नियामितपणा ठेवल्यास महत्वाच्या वर्षी कोणत्याही विषयाची भीती वाटत नाही आणि अभ्यासा डोईजड वाटत नाही. मित्राशी गप्पा मारत बसणे, जास्त वेळ टी व्ही पाहणे, आणि खेळणे इत्यादी प्रकारात वेळेचे नियोजन केल्यास त्याचा नक्कीच उपयोग होतो. आपल्या मेंदुला आणि मनाला वेळापत्रकाची सवय लागली की, "हे काम पूर्ण करा " अशी म्हणण्याची वेळ कोणावरसुद्धा येणार नाही.
- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
nagorao26@gmail.com
[12/11, 11:41 AM]
ghanashyam borade:
साहित्य दरबार लेखन स्पर्धा
स्पर्धेसाठी लेख
विषय -आजची बचत उद्याचे भविष्य
बचत या शब्दाचा अर्थ आणि व्याप्ती किंबहुना हि संकल्पना खुप व्यापक आहे , हे सर्वांनाच माण्य करावे लागेल . बचत हा शब्द उच्चारला कि आपल्या समोर एकच पर्याय दिसतो तो म्हणजे पैशाची बचत करणे होय , कारण आजपर्यंत फक्त पैशाची विविध मार्गाने बचत कशी करता येईल पैसे शिल्लक कशे पडतील एवढंच आपण शिकलो आहोत , पर्यायाने व्यवहार करताना , वस्तु खरेदी करताना पैसा वाचेल आणि तो पैसा कुठे व कसा सुरक्षित राहील यासाठी आपण बॅंकेचा शोध घेतो
नी पैसा गुंतवणूक करतो . त्यामध्ये बचत खाते, आर डी , एफ डी , फंड वगैरे बरेच मार्ग आहेत . परंतु खऱ्या अर्थाने केवळ पैसा बचत केला म्हणजे आपले भविष्य उज्वल झाले असा अर्थ घ्याल तर पैश्याव्यतिरिक्त आपण भविष्यात काही वाचवू शकणार नाही .आपल्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या असंख्य गोष्टी वस्तु आहेत , त्या कदाचित आपल्याकडे सध्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतील पण उद्या भविष्याचे काय ? तुमच्या लक्षात आलं असेल मी नैसर्गिक संसाधनाबद्दलल बोलतोय . आपण ज्या पर्यावरणात राहतो तिथल्या संबंध नैसर्गिक साधन संपत्तीचा सर्रास वापर आपण करत असतो , ही गोष्ट आपल्या लक्षात सुद्धा नसते पण होय नैसर्गिक संपत्तीची आपण अतिरेकी लुट करतो हे माण्यच करावे लागेल . पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण झाल्यापासुन सजीव आणि निर्जीव घटकात अंतरक्रिया होत आलेल्या आहेत नी पुढेही होणार त्यालाच ecosystem (परीसंस्था) म्हणतात . पृथ्वीवर राहणारा प्रत्येक जीव हा जास्तीत जास्त अजैवीक घटकावर अवलंबून असतो . याचं उदाहरण द्यायचे झाल्यास पृथ्वीवर असलेली अन्नसाखळी माणवाला अन्न मिळणारा प्रार्थमिक घटक वनस्पती असून तो सजीव आहे , ह्या वनस्पती सुर्यप्रकाश आणि कार्बन डाय ऑक्साईड व पाणी वापरून अन्न तयार करतात नी माणसाला अन्न पुरवठा करतात याचा अर्थ सजीव घटकांची निर्जीव घटका सोबत अंतरक्रिया होतात एवढं सांगायचा हा अट्टाहास आहे .
आपण सर्वजण केवळ आजचा विचार करतो उद्याची चिंता आम्ही करत बसत नाही . काहींचा गोड गैरसमज आहे की माणसाकडे पैसा असला म्हणजे सारं काही मिळवता येतं, त्यांना खऱ्या अर्थाने निसर्ग नियम माहीत नसावा . ज्या गोष्टी नैसर्गिक आहेत त्या वापरायला आज तरी पैसे द्यायची गरज नाही पण हि संप्पत्ती भविष्यात टिकून राहील असे सांगता येत नाही . काही साधने जसे पाणी , झाडे, खनिजे ,विज, पेट्रोलियम निसर्गाचे देन आहेत , त्याचा वापर जास्त होत आहे, तेव्हा येणार्या काही वर्षात त्यांचे प्रमाण कमी होणार आहे . आपल्या पुढच्या पिढीला हि साधने लागणार आहेतच ती त्यांना भविष्यात पुरावीत त्यासाठी आज प्रत्येकाने आवश्यक तेवढीच संसाधने वापरणे गरजेचे आहे . आज पर्यावरणाचा विविध मार्गाने ऱ्हास , प्रदूषण होत आहे , याला जवाबदार आपणच आहोत . वाढत्या प्रदूषणमुळे विविध रोगांना आमंत्रण आपणच दिले आहे . भविष्यात आपल्याला सक्षम , निरोगी , सुदृढ पिढी निर्माण करायची असेल तर आजच उपाय गरजेचा आहे . तेव्हा आजची बचत उद्याचे भविष्य ठरवेल . एवढंच या निमित्ताने सांगावसं वाटतं .
घनश्याम बोह्राडे बुलडाना
समुह क्रमांक 19
मो 8308432625
[12/11, 12:21 PM]
Subhadra Sanap:
*📚साहित्य दरबार वैचारिक लेखमाला*📚
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*विषय: आजची बचत; उद्याचे भविष्य*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
लहान असताना पाहिलेला एक प्रसंग, वडिल शेतकरी असल्यामुळे सुटी असली की लहान मोठ्या कामासाठी आम्हाला मदतीला घ्यायचे.बाजरीचे खळे चालु होते.भलीमोठी सुडी (सुडी म्हणजे बाजरी काढनी झाल्यानंतर कनसासहीत त्याच्या पेंढ्या वाळुन त्याचे एकच रचलेले मोठे बुचाड)होती. मोडणी होत आली होती.वडील एका बीळाच्या मागोव्याने कुदळीने खोदत होते.मला समजेना हे काय करताहेत.पण थोड्याच अंतरावर भलामोठा कणसाचा ढिग होता .उंदिर त्या सुडीतील धान्य तर खात होताच,पण पुढील काळासाठी ठेवत होता.या उदाहरणावरुन एक लक्षात घेतले पाहिजे,भलेही तो उंदिर शेतकर्याच्या कष्टाचे खातोय व साठवतोय. पण ती एकप्रकारची बचतच समजुया.
मी आज काही मुद्याला अनुसरुन बचतीचे फायदे व ती बचत कशी करता येईल हे सांगु इच्छिते.
*वेळ*: वेळेच्या बाबतीत बचत करा असं मी म्हणनार नाही.Time is mony.अशी एक म्हण आहे .खरोखर वेळ कुणासाठी थांबत नाही.आजचे काम आत्ताच करा ,उद्याचे काम आजच करा .म्हणजेच वेळेची बचत करा .जीवनातील प्रत्येक क्षण महत्वाचा आहे .गेलेली वेळ आपल्या आयुष्यात परत कधीही येत नाही .आणि मग पश्चातापाशिवाय पर्याय उरत नाही.
*पैसा*:चंगळवादी संस्कृतीमध्ये कितीही पैसा असला तरीही पुरत नाही.आजची काटकसर उद्यासाठी कामी येत असते .मानसाच्या गरजा वाढल्या. नको त्या सुखसोयीच्या मोहापायी माणुस भरकटत जात आहे. त्यासाठी प्रत्येक गोष्टीचे नियोजन हवे .आपले उत्पन्न ,गरजा व त्यातुन राहनारी शिल्लक म्हणजेच बचत .अनावश्यक बाबी टाळुन माणुस बचत करु शकतो. त्यासाठी आपल्या मनाची तयारी करावी लागते.आवश्यक आहे तो खर्च तर करायलाच पाहिजे ,पण जिथे गरज नाही असा खर्च टाळुन आपण बचत करु शकतो .माणसाच्या मुलभुत गरजा अन्न,वस्र,निवारा या आहेत. यात चंगळवाद कसा होतो पहा:उदा अन्न : बाहेरचे चमचमीत खाण्याची सवय लागली तर,घरचे अन्न बेचव लागते. ज्यावेळी आपण प्रवासात असतो तेव्हा बाहेर खावेच लागते.पण काही लोक असे आहेत त्यांना हॉटेलच्या जेवनाची चटक लागलेली असते.एक लक्षात घ्या घरचे व बाहेरचे अन्न यात जमिन अस्मानाचा फरक आहे. आता दोघेही नोकरीला घरी हम दो हमारा एक या कुटुंबात बाहेर जेवायला जाण्याचे प्रमाण जास्त असु शकते .पण घरीच आपण सकस व चवदार अन्न बनवले तर बाहेरचे ते जिभेचे चोचले पुरवनारे निकृष्ट प्रकारचे अन्न खाण्याची इच्छा होणार नाही .परिणामी बचत होईल .
वस्र: कपडे चांगले असावेत आजकाल राहणीमानावर फार भर आहे .कधी कधी तर व्यक्तिच्या राहाणीमानावरुन त्याची गरीबी, श्रीमंती याचा अंदाज बांधला जातो. राहणी साधी असली तरी विचार उच्च असावेत.मानसाचा बराचसा व अनावश्यक खर्च हा कपड्यावर होतो हे प्रत्येकाने आपले आत्मपरिक्षण करुन सांगावे. आपल्या किती ड्रेस असावेत,?मुलांना किती ड्रेस असावेत?,कपाटात किती साड्या पाहिजेत? हा एक संशोधनाचा विषय आहे.पण आपण इथे बचत करु शकतो एव्हडच मला सांगायचे आहे.
निवारा: माणसाने खरे तर मानुसकी कमवावी,खुप सारे चांगले मित्र कमवावेत. पण खर्या सुखाला पारखा झालेला माणुस खोट्या सुखामागे धावतो. एका कुटुबातील चार लोकांसाठी किती रुमचे घर असावे? मी तर अस म्हणेल ,जितके घर मोठे तितकी मानसाची मनं दुरावतात.खरतर घर छोटेच असावं व खुप सारा प्रेम, जिव्हाळा तिथे ओतप्रोत भरलेला असावा *घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती ,तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती* यासाठी नियोजन पूर्वक घरासाठी आवश्यक असेल तो खर्च करावा पण, अनावश्यक खर्च टाळुन बचत करता येवू शकते.आज बचत केलेला पैसा नक्कीच अडीअडचनीला कामी येवू शकतो. म्हणुन मानसाने बचत करायलाच पाहिजे.
*पाणी* गेल्या दोन चार वर्षामध्ये पाऊस पडला नव्हता. आणि दुष्काळाची दाहकता काय असते याचा अनुभव मराठवाड्यासह अवघ्या महाराष्ट्राने घेतलेला आहे.हंडाभर पाण्यासाठी किती वणवण फिरावं लागत होत हे आपण अनुभवले आहे. यातुन आपण काय घेनार आहोत. पाऊस दरवर्षी पडेलच याचा नेम नाही. म्हणुन आहे त्या पाण्याचा वापर योग्य ते नियोजन करुन केला पाहिजे. त्यासाठी पाणी काटकसरीने वापरणे आवश्यक आहे.पाणी हे जीवन आहे. त्याचे उपयोग : पिण्यासाठी व मानवी जीवनात इतर कामासाठी,जनावरांना पिण्यासाठी, शेतीसाठी,औद्योगिकीकरणासाठी यासाठी पाण्याची गरज लागते.माणुस पाणी किती वापरतो यापेक्षा तो ते कसे वापरतो याला जास्त महत्व आहे.पाणी वाया जानार नाही याची काळजी घेणे म्हणजेच पाण्याची बचत होय. शेतीसाठी पाणी वापरतांना आधुनिक तंत्राचा वापर केला तर पाण्याची बचत होवू शकते. उदा: ठिबक सिंचन,तुषार सिंचन यामुळे पाण्याची बचत होवु शकते.
तसेच कारखाण्यातील पाणी वापर करतांना वाया जाणार्या पाण्यावर प्रक्रिया करुन ते पाणी इतर कामासाठी वापरले पाहिजे.तसेच पावसाचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब केला पाहीजे उदा: जलपुनर्भरन ,पाणी अडवा पाणी जिरवा यामुळे आपण पाण्याची साठवणुक करु शकतो. व योग्य वापरामुळे बचत करु शकतो.
*वीज*अति वीज वापर केल्यामुळे लोडसेडिंगला सामोरे जावे लागते हे आपल्याला माहित आहे .वीज मिळण्याचे मार्ग म्हणजे जलविद्युत,औष्णिक विद्युत,पवनउर्जा,सौरउर्जा हे आहेत. भरपूर पाणी असेल तर जलउर्जा मिळेल. आज आपल्या हे लक्षात येईल की विज हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनलाय . म्हणुन तिची बचत करुन ती दिर्घकाळ टिकावी असे वाटत असेल तर,जास्तित जास्त सौरउर्जेचा वापर करावा. वीज बचतीचे अनेक मार्ग आहेत .जसे *घरात आवश्यक तेवहडीच वीज वापरावी.सेलो बल्पचा वापर करावा.पाणी तापविण्यासाठी सोलार वापरावे. विजचोरी टाळावी. यातुनच वीजबचत करता येईल.
*कागद*आजकाल सगळीकडे पेपरलेसचा बोलबाला आहे. तरीही अनेक ठिकाणी कागदाची गरज भासतेच. तरी पण कागद जपून वापरुन बचत करुया.
*इंधन*इंधनाची बचत करणे मानवी जीवनासाठी फार आवश्यक आहे.इंधनाचे साठे मर्यादित असल्याकारणाने ते जपून वापरावे.त्यासाठी पायी चालणे. आठवड्यातुन एखाद्या दिवशी सायकल वापरणे,अशा पर्यायामुळे इंधन बचत तर होईलच शिवाय आरोग्य संवर्धनही होईल.
या सर्व बचतीचा भावी जीवनात नक्कीच फायदा होणार आहे. गरज आहे आपल्या इच्छाशक्तिची .थोडस नियोजन व थोडी काटकसर किती फायद्याची आहे .
करुया बचत आपण सारे
उज्वल भविष्य घडविण्यारे
आस आहे इच्छा शक्तिची मोठी
बचत करुया उज्वल भविष्यासाठी
सौ.खेडकर सुभद्रा त्रिंबकराव
मुख्याध्यापिका जि.प.प्रा.शा.
किट्टीआडगांव ता.माजलगांव जि. बीड. समुह क्र.20 मो नं. 9403593764
[12/11, 1:28 PM] Kalpna Jagadale
*साहित्य दरबार वैचारिक लेखमाला*
📚••••••••••••••••••••••••••••••📚
*विषय- आजची बचत, उद्याचे भविष्य*
📚••••••••••••••••••••••••••••••📚
“वेध भविष्याचा घेतांना नित्य भुत
नि वर्तमानकाळाचाही विचार व्हावा
अनुभवाच्या याच शिदोरीतुनी जीवन
प्रवास हा प्रत्येकान सुखकर तो करावा”
वरिल माझ्या चारोळीतुन आपणास आपले उदयाचे भविष्य उज्वल, प्रकाशय, सुखावह, जर करावयाचे असेल तर नक्कीच आपणास सदोदित भुतकाळीतील चुकातुन सुयोग्य शिकवण घेवून वर्तमानात त्याची रूजवण करून भविष्य हे यशस्वीरित्या मार्गक्रमीत करायचे आहे.
आपले वडिलधारे नेहमी म्हणतात “जसे पेरावे तसेच उगते” म्हणजेच आजवर आपला नक्कीच हा येणारा उदया हा अवलंबुन असतो म्हणुनच असेही म्हटले जाते की, “जैसे ज्याच कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर”.आणि जे सदविचारी असतात ते नेहमीच याचा विचार करून वागतात आणि म्हणुनच की काय पंरतू प्रत्येक पालक हा आजकाल आपल्या पाल्याच्या मनी सुसंस्काराची रूजवण ही जाणिवपुर्वक करत असतो. त्यातीलच *पैसे बचत* ही एक उत्तमप्रतिचे मुल्य रूजवणुक आहे . त्यानुषंगाने मुलाना लहानपणापासुन *गल्ला*
नावाची घरातच उघटलेली *बचत बँक* असते. ती मुलच या बँकेचे कर्ताधर्ता असतात.त्याच्याकडील बचतीचा पैसा हा त्यांना मनस्वी जणू गर्भश्रीमंतीचा रोजच नवनवा असा आनंद नि अनुभूती देऊन जातो, देतही असतो.मग सुरू होते त्यांची बचतीची सवय,जी त्यांना त्यांचे भविष्य स्वप्न रोज रंगवतांना रोजच बचत व्हावी ही रूजवणही कळतनकत होत राहते.आणि कालांतराने हा गल्ला पुर्ण भरला जातो आणि मग तो फोडून त्यातुन सायकल,घड्याळ,खेळणी, काहीची शिकवणीची वार्षिक फिस,काहीचे आई -बहिणीसाठी मदत, या व अश्या नानाप्रकारची ही *पैसे गल्ला बचत योजना* उपयोगी पडते ,ज्याप्रमाणे “बडत्यास काडीचा आधार” ही बचत बँक कित्येकाच्या आयुष्यात कायमस्वरूपी बचतीची रूजवणुक करून जाते.
मुलांनामध्येच स्रीयां ही बचत रजवणुक करत नाही तर स्वत: ही बचत करतात आणि वेळेप्रसंगी उपयोगी पाडतात.येवढेच काय ताज उदाहण बचतीचे म्हणजे *मोदी निर्णय* 1000-500 नोटा बंदी झाली आणि गृहीणींचे डब्यातील ,साड्याच्या घड्यातील पैसे, शेजारणीकडील हात उसणे पैसे, गुंडाळून ठेवलेली गाठोडीतील पैसे,
या व अश्या कित्येक प्रकारातुन गृहीणीच्या आवडीचे *पैसे बचत ठेव घोडाळा* जणू काळ्या पैशागत उघडकिस अदृश्य स्वरूपात प्रत्येक घरांघरातुन उघडकिस आला आणि हाच महिला वर्ग आपल्या इच्छा मारून ,मन मारून किती पैसा रूपी बचत ही आपल्या संसारूपी गाडा ओढण्यास करतात हे ही तितक्याच प्रखरषाने जाणवले व अनुभवलेही.मला तर वाटत त्यांच्या या बचतीसाठी त्यांचा यथोचित असा पतिराजा कडून सन्मानच हा व्हायला हवा होता.परंतू झाले *उलटेच पितळ उघडे पडल्यागत* सगळी पैसारूपी बचत पतीराजांस देवून *बुडत्या बचत बँकेची ती राणी* झाली.परंतू यातुन एकच म्हणावेस वाटते की प्रत्येक महिला ही पैशाची बचत ही अंत्यत उत्तमप्रकारे करू शकते हे तिने यातुन पुराव्यानिशी सिद्ध केले आहे.याचमुळे की काय कित्येक नवऱ्यांची कर्ज फिटली, उसनवारी मिटली, लग्न कार्य पार पडली, अडलीनडली सर्व कामे ही या *महिला पैसा बचत योजनेमुळेच* शक्य झाली.
अशाप्रकारची पैसा *आजची बचत* योजना ही प्रत्येकाच्या आयुष्यातली *उदयाचे सुकर भविष्य* साध्य झाल्या शिवाय राहणार नाही हे नक्कीच नमुद करावेसे वाटते.
📚••••••••••••••••••••••••••••••📚
सौ.कल्पना जगदाळे, घिगे.बीड
समुह.क्र.@★8
📚•••••••••••••••••••••••••••••📚
[12/11, 1:56 PM] Manisha Wani:
।। स्पर्धेसाठी लेख।।
।।आजची बचत,उद्याचे भविष्य।।
प्रथमच जेव्हा मी वयाच्या बाविसाव्या वर्षी नोकरीला लागले तेव्हा जवळ बोलावून माझ्या परमपूज्य वडिलांनी अभिनंदन करून आशिर्वाद दिला व एक उपदेश दिला,
"आजपासून तू नोकरदार महिला झालीस.दर महिन्याला हातात पगार येईल.पैसे पाहून मन हरकून जाईल,स्वकष्टाच्या पैशाची किंमत काही वेगळीच असते.तरी पगार हाती आल्यावर पगाराचा ८० टक्के भाग बचत करायचा व २० टक्के भागातच आपला खर्च निभवायचा.हे असं काही वर्ष केल्यावर प्रथम एक घर घ्यायचं व संसारात पडल्यावर हीच बचत ४० टक्क्यावर येवून थांबवायची".
आजही मी माझ्या वडिलांच्या सल्ल्यावर चालते आहे.बचतीची सवय ही बालवया पासूनच लागत असते.लहान असतांना वडिलांनी आम्हा भावंडांना महाराष्ट्र बेंकेची"मी आलेय मिंटी एक खारोटी"ह्या पिगी बेंक योजनेत खाते उघडून दिले होते.दर महिन्याला पन्नास,शंभर किंवा त्याहून जास्त रक्कम जमा करायचे नवीनच व्यसन आम्हा भावंडांना लागले होते.व हे जमा झालेले पैसे सुद्धा आम्हीच बेंकेत जमा करायला जायचो.
बालपणी ज्या मुलांना बचतीचे महत्व व सवय लावण्यात येते ती मुले मोठी झाल्यावर उधळमापले पणाने वागत नाहीत हा माझा स्वानुभव आहे.बरं हे झालं पैशांच्या बचतीच्या बाबतीत.
जिवनात माणसाला अनेक प्रकारची बचत करावी लागते.आता तुम्ही म्हणाल,आज पर्यंत आम्ही पाणी बचत,पैसा बचत,वीज बचत व कागद बचत ह्या विषयी खुप ऐकलय व अमलांतही आणलय.
पण आज मी तुम्हाला ह्या सर्व बचतीं पेक्षाही एक उत्तम बचतीचे महत्व सांगणार आहे.तर त्या बचतीचे नांव आहे,"शब्द बचत".जर आयुष्यात प्रत्येक व्यक्तीने शब्द बचत केली व मोजकेच शब्द योग्य त्या ठिकाणी वापरले तर कुणीही दुखावले जाणार नाही असे मला वाटते.तर चला मग आपण शब्द बचत कशी व केव्हा करायची ते शिकू या.
१)जर तुम्हाला कुणी खुप दुखावले व बरे वाईट बोलले तर साहजिकच आहे तुम्ही त्याला उलटून बोलणार.समोरच्याने दहा शब्द वापरले असतील तर तुम्ही पंचवीस शब्द वापरणार.पण नाही....
तुम्ही एकच काम करायचं,एक मोठा श्वास घ्यायचा व राग बाहेर फेकायचा...ही प्रक्रीया तीन चार वेळेस केल्यावर तुम्हाला शब्द बचत करायची हे लक्षात येईल व तुम्ही पंचवीस शब्द न उच्चारता शांत पणे तिथून निघून जायचे......
तर ही झाली तुमची २५शब्दांची बचत.
२) बऱ्याच वेळेस आपणास वाटते समोरच्या व्यक्तीने आपण सांगू तसेच वागले पाहिजे.कदाचित ते त्या व्यक्तीसाठी उचीत सुद्धा असेल.परंतू समोरची व्यक्ती जर ऐकण्याच्या मन:स्थितीत नसेल तर आपण आपले शब्द व वेळ व्यर्थ वाया घालवू नयेत.
ह्यावर एकच उपाय करावा.आपणास त्या व्यक्तीला ज्या सुचना द्यायच्या आहेत त्या एका कागदावर लिहून पत्ररुपी सुचना त्याच्या कडे पोहोचवणे.
म्हणजे आपले शब्दही वाचलेत व आपला निरोपही त्या व्यक्तीपर्यंत पोहोचला.
३)अनेकदा असे होते आपण लोकांना फुकटचा सल्ला द्यायला पुढे सरसावतो.बऱ्याचदा ही व्यक्ती आपल़्या जवळची सुद्धा नसते.आपण बस मधे किंवा रेल्वेच्या प्रवासात सहप्रवाशांना सुद्धा फुकटचे सल्ले द्यायला सोडत नाही.कित्येकदा लोकं आपल्याला हसतात देखील.तर सार्वजनिक ठिकाणी आपण शक्य होईल तेवढे वादाचे विषय टाळावेत व फुकटचे सल्ले देवू नयेत.
४)क्रोध येणाऱ्या व्यक्तीने जर शब्द बचत अंमलात आणली तर त्या व्यक्तीला रक्तदाब व डायबिटीस सारखे आजार होण्याचा धोका टळतो.ज्या गोष्टींमुळे
आपणास मानसिक त्रास होतो अशा गोष्टीं पासून आपण चार हात लांबच रहावे.वाद वाढविणारे व वाद करणारे लोकं ह्यांच्या पासून दूर राहण्यातच आपल्याला फायदा आहे.
मला वाटते जगात जर प्रत्येकाने शब्द बचत केली तर माणसाची प्रकृती चांगली राहील व तो रोगमुक्त होईल.जर आपणास शब्द वापरायचेच आहेत तर मग फक्त आणी फक्त सुखावणारेच शब्द वापरा व जेणे करून वादविवाद टळतील असे धोरण अवलंबवा.
सरळ,सोपे व साधे शब्द वापरण्यावर बचतीची सक्ती नाही कारण आजकाल असे शब्द व असे शब्द वापरणारी माणसं ही दुर्मिळच आहेत.
चला तर मग आजपासून आपण वाईट,दु:ख दायक,क्लेशदायक,निराशाजनक व असंतुष्टात्मक शब्दांची बचत करू या व अशा शब्दांच्या ऐवजी सुखकारक, प्रसन्नदायक व प्रोत्साहनपर शब्दांचा नित्य जीवनात वापर करू या.व आपल्या सोबतच इतरांचेही जीवन फुलवू या.
शब्दाने फुलते काव्य
काव्याने खुलते रचना
रचनेस मिळतो आकार
आकारात होतो साक्षात्कार...
।।शब्द बचत,योग्य बचत।।
धन्यवाद..
सौ.मनिषा वाणी.
सुरत.११.१२.२०१६.
०९४२६८१०१०९.
[12/11, 3:21 PM] Sangita deshamukh Vasmat
*आजची वेळेची बचत=उद्याचे भविष्य*
स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारत हा देश विकसनशील देश असे आपण म्हणतो.आज भारत स्वातंत्र्य मिळूनही सत्तरीकडे झुकला तरीपण भारताला विकसित देश आपण म्हणू शकत नाही. कारण यामागे आपल्या भारतीय नागरिकांचा बेजबाबदारपणा ! अनेक थोर देशभक्तांच्या बलिदानानंतर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले याचा विसर आपल्याला पडलेला दिसतो. म्हणूनच आजचे तरुण किंवा आपण कोणतीही बाब अविचारीपणाने वापरतो. आणि देशाच्या विकासाला खीळ बसवतो. यात पाणी,पैसा,वीज,इंधन अशा बाबींचा समावेश होतो. काळाची गरज पहाता या सर्व बाबींचा वापर हा सद्सद्बुध्दीने करायला हवा. तेवढीच महत्वाची बाब वेळ ही सुध्दा आहे.
'Time is money" असं म्हणतात. वेळेला पैशाइतके महत्व असेल तर मग या वेळेचा वापर कसा करायला हवा! स्वामी विवेकानंद म्हणतात,"पैशापेक्षाही मौल्यवान वेळ आहे. कारण पैशाला दुहेरी मार्ग आहे.!" खरच आहे,एकवेळ गेलेला पैसा परत मिळवता येतो,तो साठवता येतो,उसना देता घेता येतो मात्र वेळ एकमार्गी आहे. एकदा गेलेली वेळ परत येत नाही,ती कोणाकडे मागता येत नाही आणि पैशाप्रमाणे ती साठवता येत नाही,तसेच तिची देवाणघेवाणही जमत नाही.म्हणून वेळ पैसा नाहीतर पैशापेक्षा जास्त काळजीपूर्वक आणि विवेकाने वापरण्याची गरज आहे.
पण याच बाबीकडे आजच्या तरुणांचे दुर्लक्ष होताना दिसते. आज आपण प्रत्येक घरात पाहिले तर काय चित्र दिसते? आजच्या तरुण पिढीच्या उमेदीच्या काळात हातात पुस्तके दिसण्याऐवजी हाताह मोबाईल दिसतो आहे. रात्रंदिवस हा तरुणवर्ग फेसबुकवर,व्हाट्सॅपवर चॅटिंग करणे,मेसेजेसची देवाणघेवाण करणे,इंटरनेटवर वेळ घालवताना दिसून येतात. ज्यांना भारताचे भावी आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाते,भारताचे स्वप्न ज्यांच्या मनगटात लपलेले आहे ते तरुण जर याकाळात आपला असा अमूल्य वेळ वाया घालवत असतील तर देश विकसनशीलकडून विकसित राष्ट्र म्हणून कसा प्रवास करेल?
राष्ट्राचा विचार जरी सोडला आणि वैयक्तिक पातळीवर जरी विचार केला तरी ही पिढी आपले भविष्य कोणत्या दिशेने नेत आहे,याचाही विचार व्हावा. आज अभ्यास करून स्वत:च्या पायावर उभे रहाणाच्या काळात आपला वेळ मोबाईलवर घालवत असेल तर त्याच्या आईवडिलांच्या स्वप्नाना तो मूठमाती देत असतो. रात्रभर तो मोबाइलचा वापर करून उशीरा उठत असेल तर त्याचे भविष्य तो आजच झोपवत असतो. आज या विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण नको वाटतो,पण आज झोपून घालवलेला वेळ पुन्हा याना मिळतो का? आज जर या तरुणांनी थोडे कष्ट घेऊन ध्येय गाठण्याचा प्रयत्न केला तर उद्याच्या भविष्यात त्याला नक्कीच त्याच्या मनाप्रमाणें वेळ वापरता येईल. व त्याचे भविष्य उज्ज्वल होईल. असा वाया जाणाऱ्या वेळेची बचत करून हा वेळ अभ्यास,अवांतर वाचनासाठी वापरला तर याचा उपयोग भविष्यात नक्कीच उत्तम होईल. म्हणून वेळेचा उपयोग जर आज विवेकाने,डोळसपणे केला तर ती उज्ज्वल भविष्याची बचत ठरेल.
*संगीता देशमुख@१४
स्पर्धेसाठी
[12/11, 5:14 PM]
Vrishali Wankhede
*साहित्य दरबार लेखमाला*✍🏻.......
*आजची बचत*......*उद्याचे भविष्य*
*बचत* हा शब्द संपूर्ण जीवनाचा *सार* सांगून जातो.
शाळेला स्वर्ग समजणारे माझे आई-बाबा, रोज सकाळी दोन तास ७ ते ९
घरी शाळा भरवायचे.कारण जे विद्यार्थी ज्या विषयात मागे आहेत त्यांना सकाळी स्वतः चे कामे करतांना शिकवणे चालू असायचे, आई ने तर चक्क अंगणात चूल मांडून (वेळेअभावी) स्वयंपाक नी सोबतच तिच्या अवती--भोवती शाळेतील मुलांचा गोंगाट.
मला तो प्रसंग तेव्हा मुळीच आवडायचा नाही, पण आई--बाबा म्हणायचे वेळ बघून कामे करावी लागतात. मुलांना शिकवायला वेळ अपुरा पडतो, म्हणून हे वेळेची बचत नी स्वकामे चालू, कारण १० वाजता पुन्हा शाळेत निघणे असायचे.
शून्यातून विश्व कसे निर्माण करायचे हि कला आई--बाबांना चांगलीच अवगत होती. वेळेची बचत, नी पैशाची बचत त्यांनी कशी जोपासली हे आम्ही आता अनुभवत आहे.
माझा बालपणीचा वर्गमित्र अजूनही भेटीला आला कि सांगतो वेळ- -पैसे बचत तुझ्या आई-बाबाकडून शिकलो म्हणून आज मी पोलीस अधिकारी असून माझ्या लेकरांना बचतीचे धडे देऊ शकतो.
आजच्या मुलांना वेळेचेही भान नसावे हे दुर्भाग्यच तर पैशाची बचत दूरच. पण संस्काराचा खरा ठेवा क्षणोक्षणी कामी येतोच.
त्यातूनच बचतीचे मार्गही सुचतात हे तितकेच खरे. कारण घड्याळच्या काट्यावर नजर ठेऊन दिवस भर योजलेल्या कामांची सर्कस करावी लागते, कारण वेळ निघून गेल्यावर फक्त निराशा हाती येते.
संपूर्ण सृष्टीवर निसर्ग नियम चालतो पण पूर्वजांनी अनुभवलेले काही थरारक जीवनचित्रे आठवतात नी अंगावर शहारा येतो, आपल्या पुढील पिढीसाठी सुद्धा पाणी बचत हि काळाची गरज आहे. जीवन दान देणारे पाणी एक दिवस मुळीच मिळणार नाही हि कल्पना सुद्धा करवत नाही. जिथे पाणी २० किलोमीटर अंतरावरून आणावे लागत आहे तेच आपल्यासाठी एक आव्हान आहे, आपली पुढची पिढी जर असे काही भोगणार नाही असे वाटत असेल तर नक्कीच पाण्याचा वापर अगदी कामापूरता केला तरच योग्य राहील. नैसर्गिक दृष्ट्या आपले पाल्य बचतीचे सर्व धडे आपल्यापासूनच गिरवत असते. म्हणून आधी आपली बचत बाबतची वर्तणूक अगदी योग्य हवी.
कुठलाही अती प्रमाणात वापर जीवनशैली नाश करतो. तेच संस्कार मुलांवर अलगद होतात.
उद्याची सकाळ कशी होईल हे कुणालाच माहित नाही म्हणून रोजची बचत परिवर्तन घडून आणणारच.
बचतीतून आपण अनेक अनाथांना घासातला घास देऊन जगवू शकतो. बचत फक्त स्वतः साठीच न करता ज्यांना आज अन्न--वस्त्र , शिक्षणाची खरोखर गरज आहे त्यांच्यासाठीसुद्धा करायला हवी. कारण आपल्याला कुटुंबकर्ता सोबतच *आदर्श नागरिक* सुद्धा बनायचे आहे.
म्हणूनच आपल्याला इतरांना देखील पैसा बचत सोबतच पाणी, झाडे, वीज, खनिजे, पेट्रोलियम इतर हि नैसर्गिक बचत बद्दल महत्व पटवून द्यायचे आहे.
अगदी बेताची परिस्तिथी असलेले कुटुंब सुद्धा पाल्याच्या भवितव्यासाठी पैशाची बचत करीत असतात, पण त्या पाल्यांनी सुद्धा जाणीव ठेऊनच शिक्षण घ्यायला हवे , तेव्हाच त्या बचतीचे खरे चीज होते. काही पालक जीवाचा आकांत करून पैसा जमवतो स्वपाल्यकरिता पण होते नेमके उलटेच , त्या पाल्याला उधळपट्टीचा रंग चढलेला असतो , म्हणून पालकांची जाणीव ठेऊन त्यांनी वागायला हवे.
आजची बचत उद्याच्या दैदिप्यमान प्रकाशात नक्की नेणारच. म्हणून आपले पूर्वज सांगतात कि, उद्याचा आंधार आपणच बाजूला सारून तिथे फक्त प्रकाश अनुभवायचा, आजच्या बचतीने उद्या नक्कीच दिवस प्रकाशित होणार.
आज माझाच मुलगा माझ्या आई--बाबांच्या बचतीतून शिक्षण घेत आहे, हे आवर्जून सांगावेसे वाटते.
त्यांनी बचत करून शिक्षणाची पुंजी सुरक्षित ठेवली, म्हणून त्यालाही जाणीव कळली.
म्हणून बचत हि काळाची गरज आहे, तीच जीवन यशस्वी करते......
आणि आपल्याला आदर्श नागरिक बनवते.....
*वृषाली वानखडे**75**
*अमरावती*✍🏻.....
-------------------------------------- ----
*स्पर्धेसाठी*🙏🏻
---------------------------------/
[12/11, 5:18 PM] VaishLi Deshmukh
*बचतीचा महामंत्र भविष्याचा वेध*
आला सास ,गेला सास, देवा तुझ रे तंतर अरे जगण मरण ऐका सासाच अंतर ।
असे बहिणाबाई सांगून गेल्या. जीवन जगत असताना आपल्याला हाच अनुभव येत असतो. येणारा कोणताही क्षण हा जीवनाच्या शेवटचा क्षण असू शकतो हे माहीत असतानाही माणूस जीवन जगणे सोडतो का ? म्हणून वर्तमानात जगत असताना आपल्याला भविष्याचा विचार करावाच लागेल. वेळ ही वाहत्या नदीसारखी असते ,एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला , तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही कारण ,नदीच्या प्रवाहाबरोबरच गेलेल पाणी ,कधीही परत येत नाही , असच वेळेचे आहे एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही म्हणून वेळेचे महत्व लक्षात घेऊन प्रत्येकाने जीवन जगायला पहिजे."आप्त हे सुखाचे , दिल्या घेतल्याचे , दुःखाचे सोबती नाही कुणी."हे तेवढेच खरे
म्हणून पैशाची बचत महत्वाची आहे. आपण कमावलेल्या मिळकतीतून बचत करून आपले येणाऱ्या समस्या सोडवाव्या. बचत खाते ,आर डी ,महिला ,दैनिक खाते बचत गटा मार्फत आपल्या पैशाची गुंतवणूक करुन आपल्या अडचणीच्या काळात ते उपयोगात आणावे.
मानवी जीवनात अतिशय महत्वाचा घटक म्हणजे पाणी. आज पाण्याचा शोध हा चंद्रावर केला जात आहे ,परंतु पृथ्वीवरच्या पाण्याचा योग्य वापर माणसाला करता आला नाही त्यामुळे येणाऱ्या काही वर्षात फक्त ,माणसाच्या डोळ्यात ते पाणी उरेल की काय ?अशी शंका मनात येत आहे.पृथ्वीवर 75%पाणी असून त्यात पिण्याचे पाणी फक्त 3% आहे म्हणून पाण्याच योग्य वापर केला तरच आपल्याला पिण्याला पानी मिळेल.म्हणून पाण्याची योग्य बचत करायला पाहीजे.पानी आडवा पाणी जिरवा ,पाण्याचा नियोजित वापर करून संचय करायला पहिजे.
माणसाच्या जीवनात विजेला महत्वाचे स्थान आहे. वीज तयार करण्याचे स्त्रोत म्हणजे नैसर्गिक साधन संपती. त्यावरही मानवाने हल्ला केला असून संपूर्ण पर्यावरण आज संकटात आले आहे. त्यामुळे या नैसर्गिक साधन संपतीचा आपण नीट वापर केला पाहीजे. जास्तीत जास्त झाडे लाऊन व उर्जेचा नियोजित वापर करायला पाहीजे.
कागदाचा शोध चीन मध्ये लागला. तेव्हापासून विकासाला चालना व गती मिळाली. कागदावर आपले विचार ,कल्पना अक्षरांच्या साह्याने आपण मुद्रित करू शकलो. परंतु त्याच कागदाच महत्व आपण विसरून बसलो आहो. आज आपल्या परिसरात अजूबाजूने कागदाचा कचरा दिसून येतो व परिसर घाण होते. कागदाची योग्य वापर करणे ,जमा झालेली रद्दी विकणे हया गोष्टी प्रत्येकाने केले तर ,स्वच्छ व सुंदर भारत घडायला वेळ लागणार नाही, तसेच रोगराई पसरणार नाही.
मानवाच्या जीवनात नैसर्गिक व अनैसर्गिक प्रत्येक घटक महत्वाचा आहे. याच घटकाचा वापर करून मानव चंद्रावर रहायला जाण्याचे स्वप्न बघत आहे.आपल्या भोवताली जे काही दिसत ते मानवांनीच तयार केल आहे. यात शंका नाही निसर्गाने जे दिल ते मानवाच्या हातांन सुंदर केल.निसर्गानी दिलेल्या जमिनीवर पीक काढली ,पाण्याच्या प्रवाहाने वीज ,तलाव बांधारे बांधले ,काळ्या खडकातून सुंदर लेन्या साकारल्या. म्हणून निसर्गाच्या प्रत्येक घटकाचा आपण योग्य वापर करून , प्रत्येक घटकाचे योग्य नियोजन व जतन केले पहिजे.
प्रा. वैशाली देशमुख
कुही नागपूर
@ 34
[12/11, 6:05 PM] Dilip Choudhari
📚साहित्य दरबार वैचारिक लेखमाला📚 ✍🏼विषय-आजची बचत ,उद्याचे भविष्य ✍🏼 आज चंगळवादाने थैमान घातलेय.माणूस म्हणतोय मी नसल्यावर पैसा कामाला येणार नाही परंतु आपण दिर्घकाळ राहणेच महत्त्वाचे आहे.नकारात्मक विचारशक्ती फारच फोफावली आणि त्यावर मात करण्यासाठी मी काही उपाय सुचवू इच्छितो . मानवी जीवन जगत आसताना छोटा प्राणी मुंगीचे उदाहरण घ्या -संचय म्हणजेच बचत.पावसाळा सोडला तर अविरतपणे धान्य संचय करते अन् बाकी कठीण प्रसंगी त्याचा उपयोग करतात. थेंबे थेंबे तळे साचे हि म्हण आपण म्हणतो पण खर्च करताना थोडाही विचार करत नाही याला काय म्हणावे. माझे स्वतःचे उदाहरण पहा- माझी आई लहानपणी गरीबीमुळे शेतात काबाडकष्ट करुन आमचे पालनपोषण करायची.शेतातील शंभर रुपये आल्यावर तीसच खर्च करायची आणि सत्तर रुपये बँकेत टाकायची.आम्ही भावंडे रडायचो तरी पैसे अनावश्यक देत नव्हती .राग यायचा जँम पण इलाज नव्हता.जेव्हा त्याच बचतीच्या पैश्यातून मी डी.एड्.करु शकलो आणि बहिणींची लग्ने बिन कर्जाची झाली तेव्हा माझे डोळे खाडकन उघडले आणि लहानपणीचा राग कुठल्या कुठे पळाला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजेच आज पैशाची बचत भविष्याची नांदी ठरणार आहे.बचत ही पैसा ,इंधन ,वीज ,पाणी आणि पर्यावरणातील घटक यांची महत्त्वपुर्ण आहे.मातीचा गल्ला गायब झालाय.फिरणे चारचाकीशिवाय नाहीच.शौचास दूरवर जायला मोटारसायकल लागतेच.घरात लाईट बंद करणे विसरलोय आपण.कपडे वारंवार बदलणे फँशन झालीय.दुकानातून आलेला कागद रद्दीतच जातो.या गोष्टी जर टाळल्या तर प्रपंचाला मदतच होईल.
बचत बचत करता करता कधी कधी मोठीच चूक होते बरं का....मुलांना शिक्षण देताना पैश्याचा विचार केला तर अपेक्षित प्रगती होत नाही म्हणजेच या ठिकाणी पैसा शाळा ,क्लासेस आणि शैक्षणिक बाबीवर खर्च करावाच लागतो म्हणजेच कुठे उलटे पण असते.
जैसी करणी
वैसी भरणी
याप्रमाणे मानवाने सुरुवातीपासूनच घरात संस्कार ,मूल्य ,पर्यावरण आणि बचतीचे धडे स्वानुभवनातून दिले तर जीवन नक्कीच
सुखकर होईल.
श्री .दिलीपराव चौधरी
मु.पो.तांदुळवाडी ता.वाशी
जि.उस्मानाबाद
अनुक्रमांक @७९
भ्रमणध्वनी ९४२२११८६०४
ई मेल dilipchoudhari1979@gmail .com
[12/11, 6:17 PM] Surajkumari
*साहित्य दरबार लेखन स्पर्धा*
विषय ....पाणी वाचवा
जल हि जीवन है
पाणी म्हणजे जीवन हे वाक्य खुपदा ऐकलं होते पण गेल्या काही वर्षात हे सत्य होताना दिसत होते.
निसर्गाचे लहरी पणा कमी पाऊस यांच्या मुळे महाराष्टात
मुख्य म्हणजे मराठवाड्यात पाण्याची भिषण टंचाई दिसुन आली.
पाणी टंचाई मुळे, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या ...
भविष्यात पाणी टंचाई होऊ नये म्हणून आताच योग्य ते पाऊस उचलायला हवे. पाण्याचे योग्य ते नियोजन कराला हवे .
"पाणी आडवा पाणी जिरवा",या वाक्या ला सत्यात उरवायला हवे
सुरूवात स्वतः पासुन करावी लागेल. प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी पार करावी लागेल ..
पावसाळ्याया पुर्वीच नदी,धरने,तलाव यांचा गाळ काढुन योग्य ती साफ सफाई करावी लागेल.
घरातील सांड पाण्याचा वापर योग्य प्रमाणात करावा लागेल.
साडंपाण्याचे खड्डे घरोघरी तयार करायला हवेत .
शेतकऱ्यांनी ही नवीन तंत्रज्ञानचा
वापर केला पाहिजे ठिंबक सिंचन
तुषार सिंचन ईत्यादी आणी कमी पाण्यावर शेती करण्यावर भर देऊन पाण्याची योग्य ती बचत केली पाहिजे. त्या मुळे पाण्याची योग्य ती बचत होईल.
कारखानदाराने हि वपरलेल्या पाण्याचे पृथकरन करून त्या पाण्याचा परत वापर केला पाहिजे जेने करून भविष्यात पाणी टंचाई भासणारा नाही.
तेलगंना सरकारने प्रत्येक घरा सममोर शोष खड्डा करणे जसे सक्तीचे केले आहे. काही आर्थिक मदत करून पाणी जीरवा पाणी वाचवा हि मोहिम अमंलात आणली आहे ...सक्तीची केली आहे.
तसे महाराष्ट्र सरकारने हि हे काम हाती घेतले पाहिजे पाऊसाच्या पाण्याचे योग्य ते नियोजन होईल ...
अन्न वत्र निवारा ह्या मुख्य गरजा आसल्या तरी पाणी हि प्रमुख गरज आहे जीवणाची त्या साठी पाणी वाचवाय ला पाहिचे जेने करून परत पाण्यासाठी कुणालाही जीव गमवावा लागनार नाही ...
"जल तो कल है"
"जल ही जीवन है"
"पाणी आडवा पाणी जीरवा"
"आपले भविष्य सुखकर करा"
भविष्यात पाण्या कमतरता भासनार नाही याची विशेष काळजी घ्या ....
.....पाणी वाचवा जीवन सुरक्षीत
करा ...
पाणी म्हणजे जीवन ...पाणी वाचवा...............
............सुराजकुमारी गोस्वामी हैद्राबाद....[93]
[12/11, 6:48 PM] Balaji Choudhari
🔺🔺🛏🛏🛏🛏🛏🔺🔺
साहित्य दर्पण आयोजित .....
🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏
*वैचारिक लेख माला स्पर्धा*
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
*स्पर्धेसाठी*......
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*थेंबे थेंबे तळे साचे*
या म्हणीप्रमाणे कोणतीही भौतिक बाब ही थोड्या थोड्या बचतीनेच साठते .तिचा विनियोग हवा तेव्हा करता येतो.
बचत म्हणजे काय हे लहानपणापासूनच आपल्यावर संस्कार झालेले आहेत.आपल्यापैकी बर्याच जणानी लहानपणी ताटात शिल्लक ठेवण्याबद्दल बोलणे खाल्ले असणार .कुठे सांडले ,विनाकारण कुठे धान्य पडले तर मोठी माणसे रागवायची म्हणायची "बाबानो खाऊन संपवा टाकून संपवू नका".किती मोठी शिकवण आहे बचतीची !
*बचत म्हणजे काय?*
दैनंदिन जीवनातील प्रत्येक बाबीचा काटकसरीने वापर करणे व भविष्यासाठी त्या त्या बाबी साठवणे अशा सर्व बाबींचा समावेश बचतीमध्ये येतो.मग ती पैसा आसो ,पाणी ,वीज कागद,इंधन या सर्वांचा समावेश यात होतो.बचतीचा उपयोग स्वतः पासून केला तर तो राष्ट्र हिताच्या दृष्टीने फार मोठा हातभार होतो.
आज आपल्याला बचत ही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवणे काळाची गरज बनली आहे.
सगळ्या उद्योग जगतात नफा व विक्री यांचे गुणोत्तर काढले तर किती टक्के असेल 5 ?% मी तर म्हणेन ते दहा टक्के आहे .याचा अर्थ असा की दहा रु.ची वस्तू विकली तर एकंदर जगताला एक रु.चा नफा होईल पण आपण एक रु.ची बचत केली तर त्याचा आर्थ दहा रु.ची कमाई होईल.
🔺🔺🔺🔺🔺
*पैसा*
🔺🔺🔺🔺🔺
पैशाची बचत करणे या धावपळीच्या व स्पर्धेच्या काळात अवश्यक पण कठीण बाब झालीय.भौतिक बाबींची नाहक आवड ,चंगळवाद ,प्रत्येक बाबीचा योग्य वपुरेपूर वापराचा अभाव फारच कठीण झाले आहे.आपल्या नोकरदारांचेच घ्या,पगाराचे आकडे तर मोठे फुगीर वाटतात पण हातावर किती नगदी पडतात?हा चिंतनाचा विषय झालाय.त्यात बचतीचे प्रमाण आत्यल्प आहे.एका जागतिक सर्व्हेनुसार *जपानमधील लोकांची बचतीची सवय 80% आहे .त्या मानाने भारतातील लोकांची बचतकरण्याची सवय 50% च आहे त्याचा परिणाम आज जपान विकसित वबलवान राष्ट्र आहे तर आपला भारत विकसनशील*.
पैशाची बचत भावी प्रत्येक बाब मग शिक्षण ,आरोग्य ,लग्न,स्थावर मालमत्ता ,घर इ.वैयक्तिक बाबीसाठी खुप उपयोगाला येतो.प्रत्येकाने बचत ही नियोजनबद्ध रितीने करणे हीच काळाची गरज आहे.देशहितासाठी सुध्दा पैशाची बचत हे मी तर म्हणेन राष्ट्रसेवाच होय.
🔺🔺🔺
*वेळ*
🔺🔺🔺
एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही.वेळ फार अमुल्य आहे .वेळेचा सदुपयोग म्हणजेच बचत होय.वेळेचे नियोजन फार अवश्यक आहे.आजच्या या स्पर्धेच्या युगात आपण वेळ सांभाळलीच पाहिजे .मुलाना लहान वयातच वेळेचे महत्त्व सांगून वेळापत्रकच बनवून द्यावे .कारण येणारी पिढी वेळेचे महत्त्व जाणणारी बनली तर देशाला प्रगतीसाठी त्याचा उपयोग होणार नव्हे देश प्रगतीपथावर जाणारच.
🔺🔺🔺🔺
*पाणी*
🔺🔺🔺🔺
*जल है तो कल है*
या हिंदी उक्तिनुसार पाणी हे जीव आहे .त्याचा वापर काटकसरीने करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे.2016
या वर्षात पाण्यासाठी किती तडफडावे लागले हे सांगण्याची गरज नाही.अनेकजणाना आपले जीव गमवावे लागले.लातूरला तर कधी नाही ते इतिहासात पहिली वेळ रेल्वेने पाणी आणून तहान भागवण्याची वेळ आपल्यावर आली हे कशामुळे झाले?
केवळ बचत नकरण्यामुळे.काटकसर न करण्यामुळे.पाण्याचे अतिशय लहान लहान पण मोठ्या प्रभाव देणाऱ्या बचतीच्या बाबी आहेत.
🔹आंघोळीला जर एक बादली पाणी लागत असेल तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने चार मग पाणी कमी घ्यावे.समजा पाच व्यक्ती असतील तर दिवसाला वीस मग पाणी बचत होते.महिन्याला सहाशे मग वाचतात.आणि वर्षाला 7200 मग .
🔹कपडे धुताना सुध्दा वरीलप्रमाणेचच धक्षतेने वापर करावा
🔹फरशी पुसताना
🔹शेतीला जास्तीत जास्त तुषार सिंचन ,ठीबक सिंचनाचा वापर करणे गरजेचे आहे.
🔹पाणी जिरवले पाहिजे .अडवले पाहिजे .पावसाचे पाणी रेन हारवेस्टिंग केले पाहीजे.
*वीज*
🔺🔺🔺🔺
आजकाल वीजेच्या वापराचा अतिरेक झालाय ,आज आपल्या देशात सण वार आशा सर्व बाबीत अमाप वीज वापर सुरु आहे.भारत देशात दर वर्षाला पाच हजार कोटी रु.फक्त वीज दुरुस्ती व सरळ व्यवस्थापनावर खर्च होत आहेत.
यासाठी अपारंपारीक स्त्रोतांचा वापर काळाची गरज आहे.सौर उर्जेचा वापर आपल्या देशात फक्त दिड टक्के होतोय त्यातल्या त्यात तामिळनाडुत जास्त होतोय.हे प्रमाण वाढले पाहिजे .सिलिकाॕन च्या चकत्या वापरुन सौरउर्जेचे विद्युत उर्जेत रुपांतर करता येथे.अमेरीकेसारखा बलाढ्य राष्ट्र शेतकऱ्यांच्या शेती भाडेतत्वावर घेतात व सौरउर्जेचा वापर करतात.तर तेथील शेतकरी मक्याचे उत्पन्न काढून 30000 डाॕलर पर्यंत उत्पन्न काढतात.
याचा आर्थ आपल्या भारतासारख्या विकसनशिल राष्ट्रांला या अनुकरणाची फारच गरज आहे.
शेवटी असे म्हणता येईल दैनंदिन जीवनातील प्रत्येक बाबीचा वापर काटकसरीने नियोजनबद्ध करणे हे वैयक्तिक व देशहिताच्या दृष्टीने अत्यंत अवश्यक आहे.बचतीचे संस्कार येणाऱ्या पिढीला देणे ही काळाची गरज आहे.प्रत्येक चालू पिढीने पुढील पिढीसाठी आदर्शवादि बाबी देणे खरे कर्तव्यच आहे.म्हणून देशहित ,राज्यहित व वैयक्तिक हित अशा दृष्टीने आपण पैसा ,वीज ,वेळ इंधन, पाणी , कागद ,या सर्व बाबींचा काटकसरीने वापर करु या .यांची बचत करुन एक नवीन व बलवान असा भारत देश बनवून पुढील पिढीला सोपवू या.
♦♦🛏🛏🛏🛏🛏♦♦
चौधरी बालाजी सर
लातूर
स.क्र. 82
🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🙏🛏🛏🛏🛏
[12/11, 6:49 PM] 18 bhagyasri chalakh
🌷🌷 स्पर्धेसाठी🌷🌷
*आजची बचत :उद्याचे भविष्य*
वेळ, पैसा याची बचत करण्यासाठी माणुस खूप धडपडत असतो. वेळ आणि पैसा यांच्या बचतीसाठी नवनवीन उपाय शोधत असतो. कारण वेळ आणि पैसा हे जगण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. पण ज्या निसर्गानी आपल्याला निर्माण केले आहे त्या निसर्गाच्या आणि निसर्गानी विनामुल्य दिलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बचतीचा विचार कोण करणार ? निसर्गानी बऱ्याच गोष्टीचा साठा करून ठेवला आहे, उदाहरणात पाणी, कोळसा, खनिजे इ. पण याचा अर्थ असा होत नाही की निसर्गाने केलेली बचत तो साठा कधी संपणार नाही. त्याच्या अति उपयोगमुळे तो साठा संपण्याच्या मार्गावर आहे.
*दगडी कोळसा* निसर्गाची खूप मोठी देणगी आहे. कोळसा तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. पण मनुष्य त्याचा उपयोग करताना अतिरेक केला. आता कोळश्याच्या खाणी संपण्याच्या मार्गावर आहे. कोळश्याचा अनावश्यक वापर कमी झाला पाहिजे. नाहीतर अशी वेळ येईल आमच्या येणाऱ्या पिढीला म्हणजेच भविष्यातल्या पिढीला दगडी कोळसा नावापुरते माहित असेल. फक्त कोळसाच नाही तर इतर सर्व प्रकारच्या नैसर्गिक गोष्टी.
*बचत* निसर्गाची, नैसर्गिक संपत्तीची झाली पाहिजे. माझ्या मते बचत म्हणजे फक्त साठवून ठेवने होत नाही. जर आपण एखाद्या नैसर्गिक वारसा जपत असु तर ती सुद्धा एका प्रकारची बचतचं होय.
जीवनात फक्त पैसा आणि वेळ नका वाचवू. एखाद्या नैसर्गिक पर्यटनाला भेट देत असाल तर त्याचं संरक्षण करा. निसर्गाने दिलेल्या नैसर्गिक गोष्टीचा दुरउपयोग न करता त्याची बचत करा जेणे करुन आपल्या भविष्य पिढीला सुद्धा त्याचा उपयोग करताना आला पाहिजे.
✍भाग्यश्री चलाख
📱9146615473
Id: chalakhb1998@gmail.com
41
[12/11, 6:53 PM]
*आजची बचत -उद्याचे भविष्य*
( *TIME NEVER COME BACK*)
( *वेळ*)
*====================*
*टाईम इज मनी* *....टाईम म्हणजेच वेळ आणि वेळ म्हणजेच पैसा* *आयुष्यात वेळे एवढे मौल्यवान काहिही नाहि गेलेले सर्व काहि आणि नसलेले सर्व काहि तुम्ही मिळवू शकता जर तुमच्या कडे वेळ शिल्लक असेल तर अन्यथा नाही * एक सेकंद ,एक मिनीटाचे महत्व त्यांना विचारा ज्यांचा एक मिनीटाने इंटरव्हू गेलाय, एक मिनीट उशिरा ट्रीटमेंट मिळाल्या मुळे प्राण गेलाय*
*वेळे बाबत लिहावे तेवढे कमीच, सर्व काहि वेळच करू शकते* *वेळे एवढे ताकदवर आणि मौल्यवान दूसरे काहिही नाहि*
*आध्यात्मिक भाषेत सांगायचे झाले तर मनुष्याला कर्म करण्याला प्राप्त झालेला वेळ म्हणजेच जन्म आणि मृत्यु या मधील कालावधी म्हणजेच आयुष्य होय* *योगाभ्यासाच्या भाषेत सांगायचे झाल्यास आपला प्रत्येक श्वास म्हणजे आपले आयुष्य ..* *म्हणजेच त्याला मिळालेला वेळ ,म्हणूनच म्हंटले जाते कि क्रोध हा आयुष्य कमी करतो ,कारण जेव्हा आपण रागात किंवा आवेशात असतो त्यावेळी आपण जलद गतीने श्वाच्छोश्वास करीत असतो ,जितके जितके आपके श्वास जास्त होतात तितकेच आपले आयुष्य कमी* *म्हणूनच आध्यात्म आणि योग हेच सांगतो कि आपले श्वास म्हणजेच आपले आयुष्य किंवा आपल्याला मिळालेला वेळ होय म्हणूनच योगाभ्यासा मध्ये श्वासांवर नियंत्रण ठेवण्याला खुपच महत्व दिले गेले आहे तसेच आपण सर्वानी कथा ऐकलि असेलच कि भीमाला लहान पणी दुर्योधन जेव्हा खड्यात टाकून जेव्हा वरून माती सुद्धा टाकून देतो तरीही भीमाला काहिही होत नाहि कारण त्या वेळी भीम शवासन म्हणजेच श्वासाचे आसन करीत असतो*
*आजच्या काळात Time management)* *सारखे अभ्यासक्रम निघालेत ,का?*
*तर वेळेचे योग्य नियोजन* *करण्याला खूप महत्व आहे* *वेळेचे व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे.कोणतेही काम आपण करतो पण त्या* *कामाची गुणवत्ता तेव्हाच सिद्ध होते ज्यावेळी त्या कामासाठी लागणारा वेळ, पैसा,मनुष्यबळ तसेच त्याची उपयुक्तता जर योग्य असेल तरच ते काम गुणवत्ता पूर्ण म्हणता येईल* *ज्याने जीवनात वेळेचे नियोजन केले आहे त्याने जीवनात वेळेची बचत केली आहेच*
*आपण अनेक वेळा आपले मित्र ,नातेवाईक किंवा शेजारी तसेच सहकारी यांना मॉर्निंग वॉक किंवा योगा, प्राणायाम या साठी वेळ मिळत नाहि हि सबब देवून ती कामे जी खूप अत्यावश्यक आहे ती टाळतांना बघतो पण...* *आपण कधीतरी हा विचार करुन बघतो का ?कि जी लोक हे सर्व करतात त्यांच्या कडे दिवसाचे चोवीस तासच आहेत न?जसे की आपल्या कडे पण तेवढेच.मग का ती लोक ते सर्व नियमित करतात आणि सबब सांगणारे का नाहि करू शकत?उत्तर आपल्या कडेच आहे त्यांनी जीवनाचे, आयुष्याचे, श्वासांचे नियोजन करुन त्याचे योग्य व अत्यावश्यक काय याचे व्यवस्थापन केले आहे आणि आपण नाहि*
*सर्वाना दिवसाचे चोविस तासच मिळतात पण.. काही लोक त्या वेळेत खूप काही करू शकतात आणि आपण नाहि ?*
*वेळ म्हणजेच पैसा ,कारण आपल्या कडे जितका वेळ तितके आपले कार्य आणि जेवढे कार्य तेवढाच पैसा*
*सर्व काही पेशानी मिळवीता येईल पण, आयुष्यातून निघुन गेलेली वेळ नाहि, आणि गेलेली वेळ निघुन जाणे म्हणजेच योग्य वेळी योग्य संधी गमविणे आहे* , *आणि संधी गमविणे म्हणजेच खूप मोठा तोटा किंवा नुकसान होय मग ते व्यवसायाचे असो ,नोकरी मधील असो किंवा शारीरिक ,आर्थिक किंवा बौद्धिक असो,* *योग्य वेळी योग्य वेळ न खर्च करणे म्हणजेच जीवनात खूप मोठे नुकसान च करणे होय*
*म्हणून आजच्या तरुण पिढीने अभ्यास,व्यायाम,खेळ ,वाचन,लेखन,आणि आध्यात्म यांची अचूक आणि त्या सर्वाची योग्य वेळी आणि योग्य तेवढाच वेळ अशी आकर्षक आणि रेखीव सांगड घालणे खूप महत्वाचे* *कारण सर्व काहि वेळच ठरविते पण..तिचा योग्य सम्मान केला तरच*
*=====================*
*मंजुषा देशमुख@३६*
*अमरावती*
[12/11, 7:18 PM] Bhumre:
काळजी पूर्वक पैसे खर्च करा
आज काल बचत म्हणजे सर्व ठिकाणी बचत करावीच लागणार आहे , काही ठिकाणी विनाकारण खर्च करून मोठेपणा दाखवतात ,
उठाव फक्त पैसे उधळायला प्रश्न नाही इथे विषय आहे पैशामुळे होणारी लग्न कार्य, वाढदिवस , पार्टी , विनाकारण पेट्रोल जाळणे , आणि खास करून मोठे लोक पैशाची किंमत कमी करतात त्यांच्यासाठी काम महत्वाचे असते ,असले पाहिजे पण जिथे नुकसान फार होते पण दिसत नाही धावपळीत कुणाचे लक्ष जाते का प्रवास करताने किती खर्च किती शिदोरी कुणी सोबत घेऊन जाताना दिसताच नाही बोट इतके असतील जे अजूनही पैशाची किंमत करतात ,
प्रत्येक गोष्टीत काटकसर करतात , काटकसर नेमकी काय तर जेवढे हवे आहे तेवढे घेतले पाहिजे आता प्रश्न नको की काय घेतात प्रत्येक गोष्टीत काटकसर पाहिजे , मग ज्ञान तर खुप घेतले पाहिजे पण अस हि नाही की खूप ज्ञान प्राप्त करण्यासाठी चुकीची माहिती हाती नको लागायला,
लग्नकार्यांत खूप खर्च करा पण सगळे नियोजन असले पाहिजे अन्न वाया जाऊ देने ही एक गंभीर बाब मनामध्ये ठेवून मोजकेच वाढले पाहिजे , आता काय आली स्वतः घायचे आणि जेवायचे बफे पद्दत , ज्यांना गरजच नाही ते जास्तीचे जेवण ताटात घेतात आणि नाही सरले की तसेच न फेकून दिले जाते पर्याय नसतो ना तेव्हा ,
वाढदिवसालाही पैसे उधळण पार्टी , जर घरगुती कार्यक्रम करतात घरी असल्याने काळजी घेतली जाते पण बाहेर पार्टी तरुणांची दारू पिणे हे हमखास ठरलेले असते , मग झिंगून ते काय किती उधळण करतात काय तर आनंद पहिला जातो ना हे थांबले पाहिजे.
खास करून छोट्या गोष्टी कुणाच्या लक्षात येत नाही खर्च करताने आपण किती काही गोष्टी ची विनाकारण संपवतो किंवा फेकून देतो ,
आपले चांगले दिसण्यासाठी जुन्या गोष्टीचा वापर टाळतो नेमकी काय करतो , ती वस्तू अडगळीत पडली कि नवीन वस्तू येते पैसे खर्च झाले ,
प्रत्येक वस्तूचा पुरेपुर फायदा घेतला पाहिजे ,
आता अजून एक प्रश्न निर्माण झाला कि जुन्या काही वस्तू ने काम लवकर काम होत नाही म्हणजे वेळ वाया जातो ,
आजकाल तरुणांना भारी स्मार्ट फोन पाहिजे गरज नसताने ज्यांना गरजेचे आहे त्यांना मिळत नाही हा नशिबाचा खेळ आहे , गरिबी आणि श्रीमंती यामध्ये खुप फरक जाणवतो पैशाने श्रीमती असलेली लोक पैसे वाचवत नाही याच बरोबर पैशामुळे खूप गोष्टीही ते सहज फेकून देतात ,
आजकाल पैशाला महत्व आहे कि गुणांना आहे हेच कळत नाही ,
माणसात माणुसकीचे गुण कमी होत जात आहे
ते वाचवणे फार गरजेचे आहे ,
म्हणजे एक उदाहरण घ्या की एखादा भूकेने व्याकुळ झाला आहे आणि बाहेर कुठे असतान जर हॉटेलात गेला तर जो फक्त जेवण करून भूक मिटवले पण त्याच हॉटेल मध्ये काही फक हौस म्हणून येतात , इथे अन्न वाया जातेच पैसे वाया जातात , आणि वेळ ही वाया जाते ती कशी तर बघा भूक नसताने हॉटेल मध्ये जाणे वेळ वाया घालवने आहे ,
अजून खुप काही गोष्टी आहेत पण ,
तुमचा वेळ न घेता थांबतो तुम्ही समजदार आहात कारण मला असे वाटत आहे ज्या अर्थी वाचन करत आहात तुम्ही नक्की अशा गोष्टीचा विचार करतात , पण ज्यांच्या पर्यंत ही माहिती जाणे गरजेचे आहे तेच मात्र दुलक्ष करून , पैशे उधळतात त्या बरोबर इतर गोष्टी ही नकळत वाया जाणारच ,
तर काळजी पूर्वक पैसेखर्च करा ,
तरच तुम्ही चांगले गुण टिकतील ...
_____________________________
नाव :- धनराज भुमरे पाटील
मु. पो. पाचोड , ता. पैठण ,जि. औरंगाबाद ,
ई-मेल :- dhanrajbhumarepatil@gmail.com
Mo:- 7218613434
स्पर्धेसाठी नाही...
"आजची बचत ,उद्याचे भविष्य"
आज आपण पाहतो की,प्रत्येक व्यक्ति ही आपापल्या कार्यात अशी गुंतली आहे की,स्वतःला मनसोक्त जगण्यास वेळ नाही.उत्तरोत्तर मानवी जीवन सुसह्य होत आले आहे,हे आपण जाणतोच."तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार"या उक्तिप्रमाणे मानवाने मानवाचे जीवन सुकर बनवले.नवनवीन यंत्राचा शोध व मानवाची सततची धडपड यातूनच नविन यंत्राचा शोध लागला,नविन साधने वापरात आली जसे की संगणक ,मोबाईल, विमाने, रेल्वे, वाहतुकीची साधने,वीज अशा अनेक सुखसोयी मानवाच्या जीवनात आल्यामुळे जगणे सोपे झाले आहे.पण निसर्गाचा नियम आहे"अति तेथे माती"याप्रमाणे जसाजसा या साधानांचा वापर वाढला तसातसा निसर्गाचा ऱ्हास होऊ लागला आहे.त्यामुळे आज आपल्यासमोर अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत.या समस्या निपटून काढायच्या असतील व भविष्यात येणारे अस्मानी संकट टाळायचे असेल तर आजपासूनच आपल्याला योजना आखाव्या लागणार आहेत."गरज ही शोधाची जननी आहे",जेंव्हा मानवाला गरज भासली तेंव्हा शोध लागलेले आहेत,पण भविष्याची गरज पाहता आजपासूनच आपल्याला बचतीची सवय लावून घेणे आवश्यक आहे.
बचत म्हंटल्यानंतर सर्वांच्या नजरेसमोर एकच बाब येते ती म्हंजे पैसा.रोजचे जीवन जगताना व्यवहारात या ना त्या कारणासाठी पैसा लागतोच,सर्व खर्च भागवून उरलेला पैसा आपण भविष्यासाठी बचत म्हणून बँकेत ठेवतो किंवा कुठेतरी गुंतवितो आणि हे आवश्यकच आहे.कधी कोणते संकट येईल हे सांगणे कठिन असते.त्यामुळे ही बचत आवश्यकच आहे.पण आज जसे आपण पैसे बचतीचे मार्ग अवलंबितो त्याप्रमाणे पाणी, वीज,वृक्ष,खनिजे यांची बचत कशी करता येईल याचा सारासार विचार आवश्यक आहे.जीवन जगन्यासाठी "अन्न ,वस्त्र आणि निवारा" या मुलभुत गरजा भग्विन्यासाठी मानवी जीवन पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे.या निसर्गाकडून भरभरुन घेताना आपण याचे कांही देणे लागतो हे विसरता कामा नये. आपण आज जी नैसर्गिक साधनसंपत्ति वापरत आहोत यालाही मर्यादा आहेत हे विसरु नये. आज आपण जी वाहने वापरतो ही सर्व पेट्रोलियम इंधनावर अवलंबून आहेत.ज्या वेगाने याचा ऊपसा होऊन संपूर्ण विश्वात याचा वापर होत आहे,हा वापर असाच राहिला तर भविष्यात हे सर्व साठे शिल्लक राहणार नाहीत मग त्यावेळेसचे जीवन पुन्हा पूर्वपदावर येईल व अनंत अडचनीचा सामना मानवाला करावा लागेल.यासाठी शक्यतो सार्वजनिक वाहनांचा वापर सर्वानी केला पाहिजे,विनाकारण होणारा इंधनाचा गैरवापर टाळला पाहिजे.प्रत्येकानी जर ही गंभीर समस्या गंभीरतेने हाताळली तर नक्कीच आपण ईंधन बचत करु शकतो.
पाणी तर सर्वाना आवश्यक आहे.मागच्या वर्षी संपूर्ण भारत पाण्याच्या समस्येने होरपळताना दिसला.ही वेळ का आली?आणि ही वेळ पुन्हा आली तर?असे प्रश्न मनात येतात आणि कोरडा विचार करुन कांही साध्य होणार नाही.यासाठी पाण्याचा वापर जपून केला पाहिजे,घरगुत्ती वापरापासून ते औद्योगिक वापरात पाण्याचा अतोनात वापर होतो.पाणी प्रदूषित होते आणि याचे परिणाम आपण जाणतोच .पावसाचे पाणी वाहत जावून नद्याना मिळते, नद्यांचे पाणी समुद्राला व सागरातील पाणी आपण वापरु शकत नाही त्यासाठी water harvesting चा वापर केला पाहिजे.पाणी जमिनित मुरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.कोणीतरी म्हंटलेल आहे "तीसरे महायुद्ध झाले तरी, पाण्यासाठी होईल" ही भविष्यवाणी टाळायची असल्यास जनजागृति होणे आवश्यक आहे.याचबरोबर वृक्षबचत ही तर काळाची गरज आहे.वृक्ष म्हणजे सर्व सजीवांचा श्वास आहे.अमाप वृक्षतोडीमुळे प्रथ्वीचे वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही.ग्लोबल वार्मिंगचा वाढता ईशारा हेच सांगतो की वेळीच जागे व्हा,वृक्ष लावा,वृक्ष जगवा.प्रत्येकानी जागरूकता दाखवली पाहिजे व झाडे लाऊन त्यांना जगवन्याचा प्रयत्न केला तरच आपले जगणे सुकर होईल,अन्यथा येणाऱ्या काळात संकटाचा महापुर येऊ शकतो.याबरोबरच विजेचा वापर किती होतो आहे,प्रत्येक घरात,प्रत्येक ठिकाणी विजेची साधने मोठ्या प्रमाणात वापरात आहेत याचा वापर गरजेपुरताच करणे आवश्यक आहे.प्रत्येकाला वाटते माझ्या एकट्याने काय होणार ? "थेंबे थेंबे तळे साचे" या म्हणी प्रमाणे प्रत्येकानी थोडी थोडी विज कमी वापरली तर सव्वाशे करोड लोकसंख्येचा आपला देश ,किती विजेची बचत होऊ शकते.आपण एका खोलीत बसलेलो असताना दुसऱ्या खोलीतील विजेचे दिवे,पंखे,tv चालूच असतात या सर्व छोट्या बाबी आहेत म्हणून आपण दुर्लक्ष करतो.पण ह्याच छोट्या बचति भविष्यकाळात आपल्याच कामी येणार आहेत.शासन सुद्धा लोकामध्ये विजबचतीची जागृति करत आहे पण आपण वेळीच जागृत होउन विजबचत केलि पाहिजे.श्रीमंत लोकांची आलिशान राहणी,त्यांच्या पार्ट्या यामध्ये तर पैश्याच्या अपव्ययाबरोबरच विजेचा सुद्धा अपव्यय होतो,सर्वत्र झगमगाट असतो. लाखो रुपये विजबिल भरलेले आपण tv ,वर्तमानपत्रात आपण पाहतो,अशा लोकांनी खरच विचार करण्याची गरज आहे.
खरच आज प्रत्येकाने वेळेचा सदुपयोग केला पाहिजे,याला बचत म्हणता येणार नाही,पण ज्या बाबिच्या बचतींची अत्यंत आवश्यकता आहे,वीज,ईंधन,पर्यावरण,झाडे,पैसा या सर्वांचा काटकसरिने वापर केला तर उद्याचे भविष्य उज्ज्वल असेल.वर्तमानात आपण सर्वजण मजेत जगताना भविष्याचे जीवन अंधकारमय बनवू नये. तरुण पिढी स्टाइलिश जीवन जगताना वेगवेगळ्या छंदापायि पैशाचा अमाप खर्च करू लागली आहे,याची वेळीच दखल घेवून प्रत्येकानी निसर्गानि दिलेले हे अनमोल उर्जास्त्रोत काटकसरिणे व आवश्यक तेवढेच वापरले तर नक्कीच सर्वांचे भविष्य सफल व उज्जवल बनू शकते यात तिळमात्र शंका नाही ...
श्री सगर पंढरी
धर्माबाद 9405628375
[12/11, 7:28 PM] Vrishali Wankhede
*साहित्य दरबार लेखमाला*
सहभागी स्पर्धक यादी*
🙏🏻✍🏻..............
1) घनश्याम बोऱ्हाडे
2) सुभद्रा खेडकर
3) कल्पना जगदाळे
4)मनीषा वाणी
5) संगीता देशमुख
6) वृषाली वानखडे
7) वैशाली देशमुख
8) दिलीप चौधरी
9) सुरजकुमारी गोस्वामी
10) बालाजी चौधरी
11) भाग्यश्री चलाख
12) मंजुषा देशमुख
13) धनराज भुमरे
14) पंढरी सगर
🙏🏻💐💐💐💐💐💐💐💐
मुली खूप छान चौधरी .....
ReplyDelete