📚 *साहित्य दर्पण Whatsapp समूह* 📚
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"''''''''''''
यांचे द्वारे आयोजित
🗽 साहित्य दरबार वैचारिक लेखमाला स्पर्धा 🗽
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"''''''''''''
📆 दिनांक - _18/12/2016_
🛢 वार - रविवार
~~~~~~~~~~~~~~~~
🕰 वेळ - सकाळी 10:00 ते 7:00
~~~~~~~~~~~~~~~~
★★★★★★★★★★
*विषय :- मला माणूस व्हावेसे वाटते ..........*
★★★★★★★★★★
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"''''''''''''
🔦 स्पर्धेचे नियम -
💥 ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे....
💥 आपला लेख किमान 100 आणि कमाल 500 - 700 शब्दांच्या मर्यादेत असावे. त्यात व्याकरणाच्या चूका कमी असावेत.
💥 स्वनिर्मित लेख असावा. कुठलीही कॉपी नसावी
💥 लेखाखाली आपले पूर्ण नाव, गाव मोबाईल नंबर आणि email id अवश्य लिहावे. अन्यथा लेख स्पर्धेतुन बाद समजले जाईल.
💥 स्पर्धेतील निवडक लेख संयोजक वृत्तमानपत्रातून प्रकाशित करतील याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी.
💥 या स्पर्धेचा निकाल ग्राफिक्स सह खालील blog वर आणि आपल्या साहित्य दर्पण वर पाहण्यास दिनांक _20डिसेंबर 2016_ रोजी सायंकाळी 9:00 pm वाजता मिळेल. त्यासाठी वारंवार चौकशी करु नये.
•••••••••°°°°°°°°°•••••••••°°°°°°°°°•••••••••
मला माणूस व्हावेसे वाटते......
माणूस म्हणून जन्माला आला आहेस तर माणूस म्हणून जगावे असा उपदेश प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळतो. घरात वाडवडील तेच सांगतात, शाळेत शिक्षक तेच माणुसकीचे धडे देतात, समाजात प्रतिष्ठित मंडळी सुद्धा त्याच विषया वर बोलताना दिसून येतात. संत, महात्मा, किंवा विचारवंत देखील याच विषयी लोकांना मार्गदर्शन करतात. पण तरी देखील माणुसकी नावाची वस्तू प्रत्येक ठिकाणी का दिसत नाही असा एक प्रश्न मला नेहमी पडत आला आहे आणि त्याचे उत्तर अजून तरी सापडले नाही असेच म्हणावे लागेल. कारण आज ही बरेच लोकांना माणुसकी काय असते हे कळले नाही असे वाटते. त्यामुळे सर्वप्रथम मला माणूस व्हावेसे वाटते, येथूनच मग खऱ्या माणुसकीला प्रारंभ होते.
ग्रामीण भागात वावरत असताना पदोपदी माणुसकीचा अनुभव येतो आणि त्या अनुभवाने माणूस प्रगल्भ बनतो. एकमेका सहाय करू अवघे धरु सुपंथ याची खरी प्रचिती ग्रामीण भागात दिसून येते. माणुसकी नावाची वस्तू आजही जिवंत आहे ते फक्त ग्रामीण भागात. एकमेकाबद्दल प्रेम, माया, ममता, आपुलकी या सर्व बाबी मला शहरापेक्षा ग्रामीण भागात जास्त दिसून येते. शहरात प्रत्येकजण फक्त धावत असतो. कधी कधी तर तो कुठे आणि कशासाठी धावतो हेच त्याला माहित नसते. पैशाच्या बळावर सर्व मिळविता येते, या विचारातून माणुसकी मिळविण्याचा प्रयत्न असफल होतो कारण माणुसकी ही विकत मिळणारी वस्तू नाही.
आज माणूस पैसा कमाविण्यासाठी माणुसकी ही विसरून चालला आहे. म्हणून वाटते की सर्व प्रथम माणूस व्हायला शिकणे आवश्यक आहे. घरातील मुलांना अगदी लहानपणापासून मानवतेची शिकवण देणाऱ्या बाबी जाणीवपूर्वक केल्या तर त्यांचा अनुकूल परिणाम आपणास पाहण्यास मिळेल. लहान मुले खूपच संवेदनशील असतात. टीप कागद प्रमाणे सर्व छोट्या छोट्या बाबी आत्मसात करतात. याचा आपण जरासे देखील विचार न करता त्यांच्या समोर कसे ही वागले जाते. ज्याचा की लहान मुलांवर विपरीत परिणाम होतो. पुन्हा आपणच म्हणणार की आजकालची पोरे खूपच फास्ट आहेत, मुले बिघडली आहेत असे बोलतो. त्यांना कोणी बिघडविली ? आपणच. आपली माणुसकी संपली की आपण कसे ही वागतो आणि त्याचा प्रभाव आपल्या सोबत असलेल्या बालकावर पडत असते. तीच पिढी माणुसकीहीन वागायला सुरु करते. त्यामुळे आई आणि वडिलांनी मुलांचे काळजीपूर्वक संगोपन करणे आवश्यक आहे. गरजू व्यक्तीला मदत करणे ही खरी माणुसकी पण गरजू माणसे ओळखावी कशी ? हा ही एक प्रश्न आहे. जो उठतो तो मी गरीब आहे मला मदत करा असे म्हणतो. देशात भिकारी लोकांची संख्या तर एवढी वाढली की ज्याला काम करावेसे वाटत नाही ते हातात कटोरा घेऊन भीक मागण्यास तयार होत आहे. रेल्वेस्थानक, बसस्थानक या ठिकाणी यांची भरमसाठ संख्या वाढू लागली. मग या सर्वावर कुणी माणुसकी का दाखवित नाहीत. यांचे वर जर माणुसकी दाखवायला हवी पण तसे होत नाही. कारण काही खोटी मंडळीनी ही हा सोपा मार्ग धरला आहे पैसे कमविण्यासाठी. सामाजिक कार्य हातात घेऊन काम करीत असताना माणूस म्हणून जगण्याचा आनंद मिळतो यात शंका नाही. म्हणून बरेच लोक या सामाजिक कार्यात सर्वस्वी अर्पण करून काम करीत आहेत. ते प्रसिध्दीसाठी असे कार्य अजिबात करीत नाही. तर त्यातून त्यांना निस्वार्थ सेवा करायची आहे. आपण कधी इतरासाठी एक क्षण काम केले आहे काय ? हे स्वतः च्या मनाला विचारून पहा. नेहमी स्वतःसाठी आणि स्वतः च्या कुटुंबासाठी जगत असताना इतरांना वेळ देताच आले नाही तेंव्हा आपणास काय माहित ? खाने, पिने, उठने, बसने, झोपणे या सर्व क्रिया मी करतो तसे प्राणी आणि पक्षी देखील करतात मग त्यांच्यात आणि माझ्यात फरक तो काय हे समजून जो वागतो तो माणूस. म्हणून मित्रांनो मला नेहमी माणूस व्हायला आवडते आणि तुम्हाला ......... जरा विचार करा.
- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
•••••••••°°°°°°°°°•••••••••°°°°°°°°°•••••••••
*📕साहित्य दरबार वैचारिक लेखमाला*📕
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🙏विषय: मला माणूस व्हावेसे वाटते*🙏
🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀
माणूस हा समाजशील प्राणी आहे.तो एकटा राहु शकत नाही.इतर प्राण्यापेक्षा तो वेगळा आहे.सर्वात बुध्दीमान समजला जाणारा प्राणी हा माणुस आहे.आणि माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे.म्हणूनच मला माणुस व्हावेसे वाटते.
अश्मयुगातला माणुस अन्नाच्या शोधार्थ भटकंती करत रहायचा.कालांतराने त्याच्या लक्षात आले की आपण जर समुहाने राहिलो तर ,आपण स्थिर राहु शकतो. एकमेकांच्या सहकार्याने जीवन जगु शकतो. आणि तेव्हापासुन माणूस समुहाने राहु लागला. माणुस होणे म्हणजे काय? तर,माणसासारखे रहायचे.
मी थोडं खेड्यातील संस्कृती बद्दल सांगते. खेड्यातील शेजारधर्म कसा पाळला जातो?.एकमेकांच्या सुखा दु:खात सहभागी होण्यामुळे माणसामाणसा मधील दरी कमी झालेली आपणास पहावयास मिळते.एखाद्याच्या घरी काही कार्यक्रम असेल तर सगळे कसे एकजुटीने ते कार्य पार पाडतात.तिथे गरीब श्रीमंत असा भेदभाव नसतो.तेच शहरी संस्कृती मध्ये पहा,सगळे काही पैशावर अवलंबुन.पैसा असल्यावर सगळे काही होते असा गोड गैरसमज काही मंडळीचा असतो.पैशाने तुम्ही सगळे काही करु शकता पण ,पैशाने माणुस व त्यातील माणुसकी विकत घेवू शकत नाहीत.*म्हणुनच मला माणुस व्हायचय*.
माणुस म्हटले कि त्याला जीवनामध्ये अनेक रुपात यावे लागते.कधी त्याला नात्याच्या जबाबदारीत रहावे लागते .कधी शेजारधर्म पाळावा लागतो.कधी आपल्या व्यवसायाशी निगडीत लोकांशी संबंध येतो. प्रत्येक ठिकाणी जर आपण डोळसपणे वागलोत तर ,आपल्या हातुन चांगली कार्य होतील व ती अविस्मरणिय राहतील.
आता मी एक स्री आहे मग माझी कर्तव्य काय ? याची जाणिव सर्वप्रथम व्हायला हवी.मी आईवडिलांची मुलगी असतांना कसे राहिले पाहिजे.विद्यार्थी असतांना मी चांगला अभ्यास केला पाहिजे .बाह्य जगाला न भुलता मी जे चांगले आहे त्याचाच स्विकार केला पाहिजे.आईवडिलांची मान शरमेने खाली जाईल असे कोणतेही कृत्य माझ्या हातुन घडणार नाही याची काळजी मीच घेतली पाहिजे.सासरी गेल्यानंतर तिथल्या लोकांशी जमवुन घेण्याचं कसब वापरुन मी सासरच्या लोकांना जिंकुन घेतल पाहिजे.त्यांच्या मनामध्ये मी माझे अस्तित्व निर्मान केल पाहिजे.सुन म्हणुन माझे सर्वांप्रतीचे कर्तव्य मी पार पाडले पाहिजेत.मी जशी वागते,रहाते,बोलते याचे अनुकरण माझी मुल करणार आहेत व ती पण तशीच वागणार आहेत .हा अनुभव मी त्यांना माझ्या अनुभूतीतुन देणार आहे.याची जाणीव असने फार गरजेच आहे. ज्यावेळी मी सासु या रुपात येणार आहे तेव्हा मी माझ्या चांगुलपणामध्ये तसुभरही कमी पडणार नाही.सुनेला मुलीप्रमाने वागणुक देईल व माझे घर आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेल.तरच मी माणुस आहे याचा मला सार्थ अभिमान असेल.
माणुस म्हणुन जीवन जगत असतांना शेजारी पाजारी यांच्याशी असलेले संबंध सलोख्याचे व ते संबंध कायम चांगले रहावेत यासाठी प्रयत्नशिल असावे. माणुसकी विकत घेता येत नाही ती मिळवावी लागते ही जाणिव सतत आपल्याला असली पाहिजे.
आपल्या आजुबाजुला असे अनेक गरजु, अनाथ, निराधार असतील थोडे उघड्या डोळ्यानी पाहिले तर आपल्या लक्षात येईल.तसेच कितीतरी लोक असे असतात कि ते काहीना काही संकटात सापडलेली असतात. त्यांना थोडासा आधार दिला तर एखादे घर उध्द्वस्त होण्यापासुन आपण वाचवू शकतो.इथे माणुसकीने वागण्याची गरज आहे.
तसेच माणुस झाल्यानंतर वेगवेगळे दान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.उदा.अन्नदान,रक्तदान,नेत्रदान,वस्रदान,कन्यादान हे दान करण्याचे भाग्य प्राणीमात्रामध्ये फक्त माणसालाच शक्य आहे.म्हणुनच माणूस व्हा, माणसासारखे रहा व माणसाला जगूद्या.
इतिहासाचे दाखले देतांना आपल्याला हे लक्षात येईल की,जे महात्मे होवून गेले त्यांनी संपत्तीचा मोह कधीच धरला नाही पण मानुसकीची कास सोडली नाही.म्हणुनच ते अजरामर झाले.संत तुकाराम महाराजांचे चरित्र जर आपल अनुभवले तर,आपल्याला ते माणुसकीचा जिवंत झरा असल्याचा प्रत्यय येईल.म्हणुनच माणुस होण्याचा प्रयत्न करा.कितीही संपत्ती कमवली तरी ती इथेच ठेवून जायचे आहे. कष्टानेच कमवा व सत्कर्म करत रहा .लोकांच्या कामी या. अडल्या नडल्यांना मदत करा.कर्तव्यात कसूर करु नका.सपत्तीच्या अती लालसेपोटी हैवाण बनू नका.मनुुष्य जन्म हा अनमोल आहे त्या जन्माचे सार्थक करा. आपल्याकडुन नकळतही कोनी दुखावले जानार नाही याची काळजी घेतली पाहिजे
*या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे*
शेवटी येव्हढच म्हणेल जन्म म्हणजे ऐलतीर मृत्यू म्हणजे पैलतीर मग या प्रवासात फक्त माणुस बनुन रहा.माणुस गेला तरी त्याचे नाव मागे घेतील असे वर्तन असावे.
सौ.खेडकर सुभद्रा त्रिंबकराव
मुख्याध्यापिका जि.प. प्रा.शा.
किट्टी आडगांव ता.माजलगांव
समुह क्र.20
मो. न.9403593764
ई मेल szsanap@gmail.com
•••••••••°°°°°°°°°•••••••••°°°°°°°°°•••••••••
आपण माणूस कधी होणार ?
"मानसा मानसा ,
कधी व्हशीन मानूस
लोभासाठी झाला
मानसाचा रे कानूस !"
या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या 'माणूस' या कवितेतील ओळी संपूर्ण मानवजातीच्या वर्तनावर भाष्य करणाऱ्या आहेत .
सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य प्राणी बुद्धिमान व श्रेष्ठ समजला जातो . त्याने त्याच्या बुद्धीचातुर्यावर ते सिद्धही केले आहे .एकेकाळी पोटाच्या भुकेसाठी भटकंती करणारा माणूस आज बोटांवर जगाशी जोडला गेला आहे . शोध ही ज्ञानाची जननी आहे आणि कायम नाविण्याच्या शोधात मनुष्याने नवनवीन शोध लावले आहेत . प्रत्येक शोधानंतर त्याच्या जीवनाला एक वेगळे वळण प्राप्त झाले आहे . त्याला आपण प्रगती असे नाव दिले . अन्न , वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा भागविण्यासाठी धडपडणारा जीव आज संपूर्ण पृथ्वीवर अधिराज्य गाजवतो आहे . निसर्गातील प्रत्येक दुसऱ्या जीवाला घाबरणारा माणूस आज साऱ्यांचा मालक म्हणून मिरवत आहे . ही प्रगती त्याने त्याच्या बुद्धीच्या सामर्थ्यावर मिळवली आहे यात शंकाच नाही .पण या साऱ्या प्रवासात तो त्याचे माणूसपण मात्र शाबूत ठेऊ शकला नाही याचे जरा दुःख वाटते . ही प्रगती त्याला अंतर्मुख होऊ दिली नाही असं म्हणावं लागेल का ? की अन्य काही कारणे असू शकतात तेच कळत नाही .
आज कुटूंबव्यवस्था शेवटच्या घटका मोजत आहे . आधी संयुक्त कुटुंबपद्धती होती नात्यांमध्ये गोडवा होता . प्रेम , जिव्हाळा , माया या गोष्टी कुटुंबातून सहज मिळायच्या पण त्यावेळी त्याचे महत्व वाटले नाही . आज या सार्यांना आपण पारखे होत आहोत . आजीबाईंचा बटवा हरवला आहे . हरवत चालला आहे . पूर्वी लोक कमी शिकलेली असायची पण शहाणी असायची आजकाल लोक खूप शिकत आहेत पण ते शहाणपण काही पाहायला मिळत नाही . शिक्षणाने व्यापक वृत्ती वाढायला हवी होती मात्र इथे संकोचित वृत्तीच वाढीस लागलेली पाहायला मिळते आहे . वृद्धाश्रमांची संख्या झपाट्याने वाढत आहे ही बाब काही फार आनंददायक नाही . नात्यांची वीण अशीच विस्कटत राहिली तर आपण परत एकलकोंडे बनत जाऊ . परस्पर स्नेह साऱ्याच नात्यांमध्ये नावापुरता उरलेला आहे . समजूतदारपणाच्या बागेतच मैत्रीची , स्नेहाची फुले फुलत असतात .पण तो समजूतदारपणा कुठेतरी लुप्त होतो आहे .
सामाजिक जीवनातही माणूस म्हणून आपण आपली कर्तव्य पार पाडत आहोत का ? तर याचे उत्तर निश्चितच नाही असे आहे . आज जो तो नुसते विचार फेकून मारतो आहे . पण वर्तन त्या विचारांशी कुठेच सुसंगत असे ठेवत नाही . स्वार्थ हा जगण्याचा शिष्टाचार बनला आहे . सामाजिक जाणीवा बोथट होत आहेत . दुसऱ्याच्या दुःखाने कळवळणारा माणूस मुर्ख ठरवला जातो आहे . नाकाच्या सरळ चला नसत्या भानगडी कशाला ही मनोवृत्ती वाढली आहे . एकीकडे अशी मनोवृत्ती असणारी माणसं आहेत तर दुसरीकडे आपल्या सत्तेचा , बाळाचा वापर करून काही लोक त्यांची अमानुष सत्ता याच समाजातील लोकांवर निरंकुशपणे गाजवत आहेत . खून , मारामाऱ्या , दरोडे आणि बलात्कार यांचे वाढते प्रमाण मन विषण्ण करणारे आहे . समाजात कुणीच सुरक्षित नाही . ही कसली आणि कुठली अराजकता समग्र भवताल व्यापून टाकली आहे तेच कळत नाही . आपला प्रवास दिवसेंदिवस उध्वस्ततेकडेतर जात नाही ना ? अशी शंका मनात उपस्थित होते आहे .
आपली सगळी स्पर्धा एकमेकांना कमी दाखवण्यासाठी चालू आहे . आर्थिक चढाओढ कुठल्याही थराला जाण्यास प्रेरक ठरते आहे . श्रीमंतीचे ओंगळवाणे प्रदर्शन करण्यासाठी सारेजण धडपड करत आहेत . एकमेकांना तुच्छ लेखण्यात आपण सारेच व्यग्र होत आहोत .समाजात गरीब श्रीमंतांची खूप मोठी दरी निर्माण झालेली आहे .श्रीमंताला अजून श्रीमंत व्हायचे आहे तर गरिबाला पोटभर जेवण मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतो तरी त्याच्या जेवणाची भ्रांत फिटेल की नाही याची खात्री देता येत नाही .
खरंतर सृष्टीनिर्मात्याने जगात केवळ दोनच जाती निर्माण केल्या आहेत . एक स्त्री आणि दुसरी पुरुष . स्त्री आणि पुरुष यामुळे सृष्टीसृजन चालू असतं मात्र आम्ही पुढे धर्म , जात यामध्ये गुरफटून गेलो .बरं सर्व धर्मांचे अधिष्ठान मानवताच असताना आम्ही मानवताप्रणित विचारांनी वागतो का ? मानवता पुनरुज्जीवित करणाऱ्या महापुरुषांनाही आम्ही आमच्यात वाटून घेतल्यासारखं वागत आहोत . खरंतर महापुरुष सर्वांचे असतात . त्यांना कधीच कुठल्या समूहात अडकवून ठेवता येत नाही .येणारही नाही . त्यांच्या विचारांचा जागर सतत मनात , बुद्धीत तेवत रहायला पाहिजे . आम्ही डोक्यावर मिरवतो आहोत पण त्यांची खरी जागा डोक्यात आहे .हे कायम लक्षात ठेवावे .
आज समाजात प्रत्येकाला काही ना काही बनायचे आहे . लोक सभा संमेलनातून मोठमोठ्या व्यासपीठांवरून नुसते विचार मांडत आहेत . स्वतः महापुरुष बनू पाहत आहेत पण वर्तनानेच महापुरुष बनता येते . माणसाच्या बोलण्यात आणि कृतीत फरक असला की ते दांभिकता वाढीस लागते .त्यामुळे आपला प्रवास आपण सर्वात आधी आपण माणूस होण्यासाठी करू या .
- ऋषिकेश गंगाधरराव देशमुख
मु पो : शिळवणी ता : देगलूर
जि : नांदेड
संपर्क : ९९२३०४५५५०
•••••••••°°°°°°°°°•••••••••°°°°°°°°°•••••••••
वैचारिक लेखमाला
साहित्य दरबार दि.१८/१२/२०१६
विषस:मला माणुस व्हावे वाटते......
माणुस म्हणजे काय तर ज्याला मन असतं,भावना असतात,ज्याच्याजवळ दयाळुपणा खच्चुन भरलेला असतो.प्रेम,सहकार्यवृत्ती,सहनशिलता,नम्रता ज्याच्या अंगी असतात तो *"माणुस"*.या जगात कोणीही आपला मित्र किंवा शत्रु म्हणुन जन्माला येत नाही.मनुष्याचे मोठेपण त्याच्या वयावर नाही तर त्याच्या विचार व कर्तृत्वावर अवलंबुन असते.तुमच्या विचारातुन तुमचे व्यक्तिमत्व झळकत असतं.त्याकडे तुमचे नसले तरी इतरांचे लक्ष असते.तुमचे विचार समजले की तुम्ही समजलात.म्हणुन सुंदर विचार करा आणि सुंदर व्यक्तिमत्व घडवा.माणसांत माणुसकी असावयास हवी.तर ही माणुसकी म्हणजे तरी काय ?शब्द खुप छोटा .पण शब्द छोटा असो की मोठा .माणुसकी हा केवळ शब्दच नाही तर रोजच्या जगण्यातुन हद्दपार झालेला,माणुसकी गहाळ करणारा शब्दच म्हणावा लागेल. ही माणुसकी म्हणजे प्रेम, भावना,आपुलकी,माणसाने माणसाची केलेली कदर म्हणजे माणुसकी. ही माणुसकी ओळखायची असेल तर जिवनात येणा-या छोट्या-मोठ्या प्रसंगातुन,अनुभवातुन माणुसकी समजुन येते.
माणुस म्हणुन जगताना खुप काही व्हावसं वाटतं.माणसातली माणुसकी आता हरवत चाललीय.*इथे कुणी ना कुणाचा,बोलबाला फक्त पैशाचा,पैसेवाल्याचा*.मला वाटतं मी डॉक्टर बनावं,माणसातला देव व्हावं.रुग्णांची निस्वार्थी सेवा करावी.कुणाच्या कुटुंबाचा आधार बनावं.कुणाचे दुखा:श्रु पुसुन सावरावं त्याचं कुटुंब.कधी कुणाच्या उपयोगी पडावं तर कधी कुणाचा आधार बनावं.स्त्रीमन समजुन घेताना तिच्या खंबीरतेस साथ द्यावी.तिच्यातील कलागुणांचे कौतुक करावे.म्हणुन व्हावसं वाटतं मला माणुस. वृध्दांनाही मन असतं,असतात त्यांनाही भावना,समजुन घ्यावे वाटते माणुस बनुन त्यांनाही. घालवावा वाटतो रिकामा वेळ त्यांच्यासोबत.माणुस म्हणुन जगताना व्हावे वाटते पालकांच्या स्वप्नांच्या ओझ्याखाली दबुन गेलेला विद्यार्थी.वाट करावी वाटते रिकामी त्याच्या प्रगतीची.म्हणुन मला माणुस व्हावे वाटते. देशाच्या सिमेवर तैनात जवानांचा गर्व वाटतो.देशाचे रक्षण रात्रंदिवस करतात,कधी मृत्युलाही कवटाळतात.त्यांच्या कुटुंबियांना धीर देऊन या शोकसागरातुन बाहेर काढावे.वाटते धीर देऊन आधार द्यावा त्या कुटुंबियांना. म्हणुन मला माणुस व्हावे वाटते. माणुस बनुन या सा-यांच्याच दु:खात साथ देऊन त्यांच्या जीवनात सुखाची हिरवळ बनावी वाटते व करावे वाटते सा-यांच्याच जीवनाचे नंदनवन..माणसाने माणसांशी माणसासारखे वागावे वाटते.म्हणुन मला माणुस व्हावे वाटते......
संगीता भांडवले
वाशी,उस्मानाबाद
@१६
९९२३४४५३०६
iamsangitabhandwale@gmail.com
•••••••••°°°°°°°°°•••••••••°°°°°°°°°•••••••••
मला माणूस व्हावेसे वाटते....
वाटते माझ्यासाठी मीच एकदा मरावे
मरणांती पुन्हा एकदा जीवन स्मरावे...
उबग आला जीवनाचा आणि या जगण्याचा. काय करावे कसे जगावे? जगावे की मरावे... ?जगावे तर का जगावे ? मरावे तर का मरावे... ? जगावे पण कोणासाठी...? असे एक ना दोन अनेक प्रश्न प्रत्येकाच्या वाट्याला केव्हांना केव्हा नक्कीच येतात. पण प्रत्येक जन बगल देऊन जगत असतो प्रत्येक प्रश्नाला.मी केवळ माझ्या बाबत बोलतोय असं नाही तर समस्त मानवांबाबत हे केव्हा तरी घडलेले असतेच असते. का बरं वाटावं माणसांना असं. का उबग यावा जगण्याचा, का कंटाळा वाटावा आयुष्याचा.... चौऱ्याऐंशी लक्ष योनी भ्रमनानंतर हा दुर्लभ मानवी देह प्राप्त होतो म्हणतात मग तरीही या देहाचा त्याग करण्याचा उतावीळपणा का करतात माणसं... का नको वाटतं आयुष्य जगणं. आश्मयुगानंतर खऱ्या अर्थानं मानवी उत्क्रांती झाली. आणि पुढे चाकाचा शोध लागला आणि माणूस धावू लागला, तो येवढा सुसाट धावता झाला की मागे वळून तर पाहिले नाहीच पण तो अजूनही धावतोच आहे. सुख आणि दुःख सोबत घेऊन जन्माला आलेला माणूस फक्त सुखाचा शोध घेऊ लागला. गौतम बुद्धांना पण जग दुःखानी भरलेले दिसले मानवी दुःखाचा संहार करण्यासाठी त्यावेळी त्यांनी राजघराण्याचा व राजवैभवाचा त्याग केला. त्यांनी सुखी जीवनाचे सुत्र आणि मंत्र दिले पण ते कोणी अंगिकारले..? क्षणात सारी सुखं पायाशी लोळण घेतील असा आविर्भाव अंगीकारून माणूस जगत आणि वागत आला.आणि आजही त्याच भ्रमात फिरतो आहे. या सुखासाठी तो वाट्टेल ते आणि वाट्टेल तसे वागायला तयार आहे. याच पार्श्वभूमीवर अधारीत अनेक बातम्या रोज पेपरमध्ये वाचतो आणि टीव्हीवर पाहतो आपण. संपून गेली नैतिकता आणि नाशिबी आली अगतिकता. अशी सर्वत्र परिस्थिती दिसते आहे. वाढलेली लोकसंख्या आक्राळविक्राळ रुप धारण करते आहे. भारत जरी सुजलाम सुफलाम असला तरी एकंदरीत जगाचा विचार करता भूकमारी समस्या जगाच्या बहुतेक ठिकाणी दिसून येते. आपल्या येथे भूकमारी जरी जास्त प्रमाणात नसली तरी दारिद्रय आहेच. त्याच्या झळा सोसणारा खूप मोठा वर्ग इथे आहे. आणि त्यांच्यांच बाजूला श्रीमंतीच्या छत्राखाली अनेक रोग संभाळत ऐशारामात जीवन जगणारा एक वर्ग आहे. या श्रीमंताना कीव दया किंवा माणूसकी या गोष्टीशी कांही देणंघेणं असत नाही. प्राणीमात्रांच्या जमिनी हिरावून वृक्षवेलींचा संहार करून सर्वत्र सिंमेटचीच
जंगले निर्माण करणारा माणूस त्यांच्याशी क्रुर वागत आला आहे, वागतो आहे. जिथे जिथे माणूस पोहचला तिथे तिथे गहाण झाली.आणि शांतीही हरवली. प्राणीमात्राचे बाबत तर माणूस असे तसे वागतोच आहे पण त्यांने नातीगोती तरी कुठं सोडली आहेत..! भाऊबंदकीमध्ये येवढ्या तेवढ्या कारणाने तो सतत भांडत आला आहे. कधी दार अंगणासाठी तर कधी जमीन बांधासाठी. तर कधी संपती, मालमता या साठी. अशा वेळी तो माणूस, माणूस न राहता दानवी रुप धारण करतो. माणूसकी कुठंच उरत नाही. त्याच्यात राक्षस आणि पशु संचारतो. अशी आपल्याच आसपास कितीतरी उदाहरणे दिसतील.खरं तर पशुना धनाची इच्छा आपेक्षा नसते पण तीच आपेक्षा आणि इच्छा माणसाला पशु बनविते.केवळ धनाच्या लालसेने वागणे बरबटलेले नाही तर त्याही पुढं जाऊन माणूस कळस करत आहे. वासनांध होऊन भारतीय संस्कृतीला छेद घालण्याचा प्रयत्न आज माणसांकडून होतो आहे. भान हरपून नारी महती गाणारी परंपरा पायदळी तुडवत निघालेला माणूस खरंच माणूस राहिला नसून त्याच्या माणूसपणावर शंका निर्माण होईल असे त्याचे वागणे झाले आहे. याही पुढे गेलेला माणूस वासनेने केवळ आंधळाच नव्हे तर वासनेच्या पूर्ण कैफेत मदमस्त होऊन नात्यावरच झडप घालतो आहे. तेव्हा नियतीही हातबल होते. अशी ही मानवतेची नीच पातळी माणूस ओलांडू लागला आहे. आणि मती गुंग करुन आगळ्याच विचारचक्रात माणूसकीला ढकलत आहे. पशुनाच जणू आव्हान देऊन आपले वागणे बदलत आहे आणि पशुपेक्षाही हिन माणसांना वागता येते हेच जणू दाखवत आहे. स्वातंत्र्यात स्वैर वागणारा माणूस भ्रुणाला मारून त्याचे स्वातंत्र्यच नव्हे तर आस्तित्वच मिटवत आहे. ही किळस आणि चीड आणणारी कृती माणूस कसा काय करु शकतो. ज्याची बायको स्त्री आहे,ज्याची आई स्त्री आहे, ज्याची बहिण स्त्री आहे, ज्याची मैत्रीण स्त्री आहे, त्याला पोटी मुलगी का नको वाटत असेल...? असा
माणूस असतो..?
माणूसपण हरवलेल्या माणसाच्या कळपात माणूस म्हणून राहणारा संवेदनशील माणूस गुदमरल्याशिवाय राहणार नाही. चौकाचौकात आणि पावला पावलावर माणूसकीचा खून होत असताना आणि स्वैराचार हाच आपला आचार आणि विचार म्हणून जपणारा माणसांचा काफिला बघितल्यावर मन उद्विग्न होतं आणि मग हेच बेेचैन मन अपसूक म्हणून जातं.... मला माणूस व्हावसं वाटतं.... !!!
श्री. हणमंत पडवळ
मु.पो.उपळे (मा.) ता.जि. उस्मानाबाद.
•••••••••°°°°°°°°°•••••••••°°°°°°°°°•••••••••
*माणूस व्हायचंय मला....!*
मला लहानपणी शाळेतल्या बाईनी,तुला मोठेपणी काय व्हायचं?" असे विचारले. तेव्हा शाळेतल्या बाईवर लळा असल्याने आणि त्याच आदर्श वाटत असल्याने,"मला मोठेपणी शिक्षिका व्हायचंय", असे उत्तर दिले होते. पण आज समज आल्याने आजूबाजूला पाहिले तर वाटते,या जगात सगळ्या प्रकारची लोकं आहेत. पण या सर्वांमध्ये हरवत चालला तो माणूस आणि त्याच्यातील माणुसकी! म्हणून शिक्षक,डॉक्टर,वकील,इंजिनिअर हे सर्व होण्याचे स्वप्न पहाण्याआधी मी म्हणेन,मला माणूस व्हायचंय! आज माणसाची फार गरज आहे.
"देख तेरे संसार की हालत क्या हो गयी भगवान,
कितना बदल गया इंसान!?
असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपावी एवढी वाईट स्थिती आज माणसाची झाली आहे. शहरीकऱणात खेडे ओस पडून शहरे सुजू लागली आहेत. मातीच्या घरातील ओलावा जाऊन फ्लॅट सिस्टीम आली आणि हळूहळू माणुसकीही फ्लॅट होऊ लागली आहे.गावात एखादी वाईट घटना घडली तर अख्खे गाव उपाशी रहायचे. खऱ्या अर्थाने सुतक धरायचे. आज शेजारच्या घरात काय चाललय,हे पाहण्याएवढाही वेळ आता लोकाना उरला नाही. घरातही वृध्दांना स्वतःचीच मुले,नातवंडे विचारत नाहीत. शेजारी कोणती वाईट घटना घडली तर "बरं झालं आपल्याला असं झालं नाही" ही लोकांची प्रतिक्रिया येऊ लागली आहे. अपघात डोळ्यासमोर घडला तर आपल्याला काय करायचे अशा बेदरकारपणे किंवा आपल्यामागे पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा लागेल, या भीतीने लोक अपघातग्रस्ताकडे दुर्लक्ष करुन निघून जात आहेत. देशात विषमतेची दरी एवढी मोठी आहे की,एकीकडे अनेक आजारामुळे डॉक्टर जेवण कमी करा म्हणून सांगताहेत तर दुसरीकडे दारिद्र्यामुळे लोक उपाशी रहात आहेत. अशावेळी आपल्या भरलेल्या ताटातील एकेक घास जरी वंचिताला दिला तरी देशातील विषमता बरीच कमी होऊ शकते. पण एवढा समाजाबद्दल विचार करायला लोकांकडे माणुसकीच उरली नाही.माणुसकी म्हणजे माणसाने माणसासोबत माणसासारखं वागावं,एवढी साधी माणुसकीची व्याख्या जरी श्रीमंतानी अनुसरली तर देशात समानता येऊन माणुसकीचा विकास होऊ शकतो. आपण ज्या समाजात रहातो त्या समाजाचे ऋण आपण माणुसकीतूनच जोपासू शकतो. म्हणून मला वारंवार वाटते, माणूस व्हायचंय मला !सद्या हरवत चाललेली संवेदनशीलता ही माणुसकीला मारक ठरत आहे. माणूस माणसापासून दूर होत चालला. माणसापेक्षा पैसा जोडणे महत्वाचे वाटत आहे. माणसाला इतर प्राण्यांपेक्षा वेगळे मन नावाचे इंद्रिय आहे. म्हणून विज्ञानाची कितीही प्रगती झाली तरी माणसाला भावनिक आधाराची गरज आहे आणि ही गरज पूर्ण होते ती माणसाकडूनच,यंत्राकडून नाही! म्हणूनच बहिणाबाई चौधरी विचारतात,
"माणसा माणसा कधी होशील माणूस रे.....?"
म्हणून मला वाटते,मला माणूस व्हायचंय....!
*संगीता देशमुख @१४*
स्पर्धेसाठी
•••••••••°°°°°°°°°•••••••••°°°°°°°°°•••••••••
📕साहित्य दरबार वैचारिक लेखमाला📕
*---------------------------------*
विषय-- *मला माणूस व्हावेसे वाटते*
****************************
*गुण असावे आपुल्या जवळी*
*परोपकार,भूतदया,आपुलकी*
*दुर्बलांना साह्य करुन,प्रेम द्यावे*
*धर्म हाच जाणा आज माणुसकी*
माणुसकी म्हणजे तरी नेमके काय?
दुसऱ्याच्या नेत्रातले ओघळणारे अश्रु पाहुन गलबललेलं आपलं ह्दय,हिच खरी माणुसकी,दुसऱ्याच्या सुखदुःखात समरस होणे म्हणजे माणुसकी. म्हणजेच माणसानं माणसाला माणसासारखं वागवण होय.पुर्वीया भावना अंतरंगात उमटत होत्या,चेहऱ्यावर प्रतिबिंबीत होत होत्या पण आज माणुसपण *गारठलंय*आज माणुसकीच माणसाला विचारते *माणसा ,माणसा कधी होशील माणूस*?
ग्रामीण भागात आपण म्हणतो प्रेम जिव्हाळा ,माया,ममता आहे असेलही परंतु 21व्या शतकात वावरत असताना दलितांना गावाबाहेरच राहावे लागते .हे कशाचे द्योतक आहे?
कुठे हरवली माणुसकी ? घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावणारा माणूस स्वतःच्या आईवडीलांना नीट सांभाळीत नाही तर तो समाजासाठी काय करणार ?प्रेम हे मानवी जीवनाचं सार आहे,ह्दयाचा आधार आहे,मनाची शांती अन् बुद्धीची तृप्ती आहे.आपापल्या परीने प्रत्येक प्राण्यांना प्रेमाची तहान आहे आणि ही तहान फक्त माणूस झाल्यावरच आपण भागवू शकतो आणि म्हणूण
*मला माणूस व्हायचे आहे*.
अश्म म्हणजे दगड.या अश्मयुगीन कालात माणूस भटकंती करत होता कच्चे मांस, कंदमुळे खाऊन आपली उपजीविका करत होता.म्हणजे त्याच्या जीवनाला स्थैर्य नव्हते. कालांतराने अग्नीचा, चाकाचा शोध लागला आणि काही प्रमाणात त्याची भटकंती कमी झाली.तो समुहात राहु लागला,शेती करु लागला.वस्ती करुन राहिल्याने एकमेकांच्या सुखदुःखात समरस होऊ लागला आणिअशिक्षित असुनही माणूस म्हणुण जगु लागला.कालांतराने वस्तीचे रुपांतर वाडीत, व वाडीचे रुपांतर गावात झाले.त्यावेळी बलुतेदारी पध्दती होती एकमेकांना कामात मदत करायची धान्याच्या रुपात कामे करवून घेतली जायची.सण ,उत्सव , लग्न समारंभ इ. कार्य एकमेकांच्या सहकार्याने साजरे केले जायचे. आता मात्र सहानुभूती राहिलेली नाही.
परवा एक विचित्र अनुभव आला, एका कुटुंबात व्यक्तीचे निधन झाले होते अंत्यविधीसाठी मजुर लावले होते. कुठे हरवली माणुसकी ?
याचे कारण आपण कोणाच्या सुखदुःखात समरस होत नाही, आपल्या साठी कोण येईल. आजचा काळ म्हणजे *जन हे सुखाचे, दिल्याघेतल्याचे*
*अंतकाळीचे नाही कुणी*
प्रत्येक क्षेत्रात माणुस दुसऱ्याच्या उमेदीचे पंख छाटताना दिसत आहे. दिवसा ढवळ्या माणुसकीचे खुन होताना दिसतायत.कारण *नारीत्व*जिला शाप ठरतयं ती आजची स्त्री मधुमेहाप्रमाणे पोखरलेल्या समाजाच्या भोगवादात आणि हुंड्याच्या अग्नीत जळून राख होत आहे.बहरण्यासाठी जन्म घेतलेली हि वेल डोलण्या आधीच सुकुन जात आहे.आज आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतुन प्रत्येक व्यक्तीने विचार केला तर आपली भारतीय संस्कृती माणुसकीच्या नावावर तरु शकेल.
आज समाजात नैतिक मुल्यांची राखरांगोळी झालेली दिसते आणि म्हणुण प्रत्येक शाळेत नैतिक मुल्ये शिकवावी लागतात. आज प्रत्येक व्यक्ती पैशाच्या हव्यासापुढे मला काय त्याचे देणे घेणे या भावनेतुन वागतो आहे समाज रक्षिणी म्हणजे आजची स्त्री सुरक्षित राहिली नाही.पशुत्वाचा संचार झालेला मानव समाजाची कशी प्रगती साधणार ? आज समाजात विभक्त कुटुंब पध्दती आहे त्यामुळे नाती टिकुन राहीली नाहीत .आजोबा आजी, काका काकु ही सर्व नाती दुरावली आहेत त्यामुळे नवीन पिढीवर संस्कार होताना दिसत नाहीत म्हणुण युवा पिढी भरकटताना दिसते आहे .कमी वयातली मुले व्यसनाच्या अधीन झालेली दिसतात.
या जगात प्रत्येकाला काही ना काही द्यावे लागते व घ्यावे लागते. मनुष्यजात ही परस्परांच्या सहकार्यावर आधारित आहे.आपल्या प्रत्येक गरजांच्या मागे हजारो हात असतात.मनुष्य आस्तिक असो वा नास्तिक त्याला दान हे द्यावेच लागते. प्रति क्षण आपले देणेघेणे चालु असायला हवे.श्वास घेताना सुध्दा आयुष्याचा क्षण दिलेला असतो.ज्या दिवशी द्यायला क्षण नसेल त्या दिवशी श्वास ही घेता येणार नाही. याचे भान प्रत्येकाला असायला हवे.
*बोरी बाभळी उगाच जगती*
*चंदन माथी कुठार*
असं जीवन आपले नसावे जगायच तर चंदनाप्रमाणे जगा.
म्हणुण संत तुकाराम महाराज म्हणतात.*तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी तैसे तुम्ही जगी असावे * चंदन ज्याप्रमाणे आपला गुण इतरांना देऊन आपल्या पात्रतेचे बनवतो तसे प्रत्येकाने माणुस म्हणुण इतरांच्या उपयोगी पडावे.
त्यावेळी संत बहिणाबाईनां पडलेला प्रश्न *अरे, अरे माणसा, कधी होशील माणुस*याचे उत्तर काही अंशी मिळेल.
***************************
मीना सानप बीड @ 7
9423725865
minasanap1970@gmail.com
•••••••••°°°°°°°°°•••••••••°°°°°°°°°•••••••••
*मला माणूस व्हावेसे वाटते*
---------आपल्या अवती--भोवतीचा स्वार्थीपणाचा कोष तोडून आपल्या माणसासाठी व समाजहितासाठी जो जगतो तोच खरा माणूस.
भारतीय कुटुंब व्यवस्था हि पुरुषावर अवलंबून आहे , तसेच स्त्रीवरही आहे. उदार दृष्टिकोन सांभाळून स्वतःचे व्यक्तीमत्व परस्परांच्या सामंजस्यतून संसाराचा रथ पुढे यशस्वीपणे चालत राहतोच. आपल्या घरातील व समाजातील आदर्श व्यक्तीचा आदर्श आपल्या संस्कारात अलगद मुरलेला असतोच, पण यातूनही अनेक व्यक्ती संस्कार विसरलेले आढळतात. कित्येकदा त्यांना तू माणूस आहे जनावर नाही हि जाणीव करून द्यावी लागते. अचूक , तत्वज्ञानी, प्रगल्भ विचारवंतांच्या पोटी सुद्धा एखादा विचित्र अविचारी , कुकर्म करणारा व्यक्ती जन्माला येतो. तो माणूस म्हणून जगतो पण त्यापासून सर्वांना त्रास सहन करावा लागतो, तो सुसंस्कारित असूनही का असा वागतो? असे अनेक प्रश्न पडतात. पण समाजात अनेक दोन चेहरे असणारे व्यक्ती अनुभवायला मिळत आहे. फक्त खेडे विभाग आणि शहरी विभाग यात तुलना करता येणार नाही. कारण मोठमोठ्या शहरामध्ये काही आदर्श, समाजहीत जोपासणारे, अनाथांची मातृत्वता सांभाळणारे व्यक्ती मी जवळून बघत आहे. फरक फक्त एवढाच खेड्यात कमी लोकसंख्यामुळे लक्ष्य लवकर केंद्रित होते म्हणून बरे वाईट व्यक्ती पारखले जातात. काही व्यक्ती तर आपणहून स्वतः काही न करता खोट्या वागण्याने उदयास येतात आणि आदर्श बनण्याचा देखावा करतात.
--------------ज्याने स्वतःला जिंकले त्याने जग जिंकले, स्वतः चे कुटुंब स्वबळावर तर प्रत्येक व्यक्ती सांभाळतो.पण जीवन जगत असतांना जो इतरांचेही आधार बनतो, अनाथांचा वाली बनतो, भुकेल्यांचा कैवारी बनतो, संसाराचा सारथी बनतो, आई--वडिलांची आधार काठी बनतो आणि समाजाचा आदर्श बनतो तोच खरा माणूस.
--------------खोटे मुखवटे परिधान केलेले व्यक्ती समाजात फार वावरतांना दिसत आहे. यांना माणूस नावाची व्याख्या काहीच यांच्या अंगी नसावी. हे व्यक्ती स्वतःच्या घरातही आदर्श नसतात, घरातील आपल्याच लहान मुलांवर काय परिणाम होईल याची जाणीव सुद्धा त्यांना नसावी? यांना माणूस म्हणावे का? असे व्यक्ती समाजात दोन चेहऱ्यांना सामोरे आणतो, त्यांना आदर्श बहुतेक कळत नसावा. अश्यांना माणूस म्हणावे का?
आपले पूर्वज अशिक्षित होते पण संस्कार, आदर्श यांनी ते रुजलेले होते, समाजहिताचे, निस्वार्थी जगण्याचे तंत्र त्यांना उपजत होते, म्हणून ते माणूस होते.
--------------चला आपणही निस्वार्थी सेवेने समाजाचा आदर्श होऊ या....
माणूस म्हणून जगूया....
*वृषाली वानखडे*
*अमरावती*75
**************************
•••••••••°°°°°°°°°•••••••••°°°°°°°°°•••••••••
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*साहित्य दरबार वैचारिक लेखामाला*.......
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*मला माणूस व्हावेसे वाटते*
♦♦🛏🛏🛏🛏🛏♦♦
*जो खांडावया घावो घाली*
*का लावणी जयाने केली*
*दोघा एकचि साउली*....
*वृक्षु दे जैसा*....
या ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीतील बाराव्या अध्यायातील ओवीनुसार मला माणूस व्हायचय.या ओवीचा अर्थ असा की झाड तोडणार्यालाही सावली देते व लावणाऱ्यालाही.
भौतिक बाबींच्या पुर्ण आहारी गेलेल्या या चंगळवादी जगात माणूस माणसाला खरच पारखा झालाय .कोणाचं काय चाललय ,हे पाहायला जाणून घ्यायला कुणालाच इथे वेळ नाही.कोणी कोणाच्या भावना समजून घ्यायला तयार नाही.कोणाच्या सुखात दुःखात कशालाच द्यायला वेळ नाही.किती लाजीरवाणी व्यथा माझ्या या सुसंस्कृत आशा भारत देशात पाहायला मिळत आहे!
यापेक्षा पुर्वीचा माणूसच फार चांगला होता.अप्रगत असला तरी त्याना नैतिकता माहित होती.ऋषी परंपरानी पुण्यवान माझ्या भारत देशात आज स्त्री सुरक्षित नसावी? या भरतभुमीतील माणूस माणसाला कुत्र्या मांजरागत ठार मारतोय!दया नाही माया नाही परमेश्वरा कधी माणूसकी जागी होईल या देशातील लोकांची!
अनाचार किती बोकाळला....
अत्याचार .....
किती ..कुणावर.....
या देशातील स्त्रीवर?
जिला आपण देवीचं स्थान पुर्वापार देत आलो.लहान मुला मुलीवर ?
ज्याना आपल्या संस्कृतीने ....म्हटले मुले म्हणजे देवाघरची फुले !
आणि अशी देवाघरची फुले दरदिवशी संपवली जात आहेत!.
*मला हा अत्याचार संपवणारा माणूस व्हायचय!*
मला आसाही माणूस व्हायचे आहे..
*माणूस माझे नाव*
*दहा दिशांच्या रिंगणात या*
*पुढेच माझी धाव*
*माणूस माझे नाव*
मला प्रगतीही करायची आहे व संस्कृतीही पाळायची आहे.मला बाबा आमटेंचा सच्चा अनुयायी व्हायचे आहे!खरी मानवतेची सेवा करायची आहे.मला दिन दुंखितांची दुःख वाटून घ्यायची आहेत.मला असा माणूस व्हायचे आहे.
मला सिंधुताईंचे अनुकरण माझ्या आचरणात आणून खरी सेवा करायची आहे.काय माझ्या सिंधूताईने हालअपेष्टा सहन केल्या .धन्य आहेत सिंधुता सपकाळ.त्याही वेळेस माणूसकी कुठे गेली होती?असा अंतर्मानाला प्रश्न पडतो.मला सावित्रीबाईंचा ठेवा सातत्याने पुढे चालवावयाचा आहे .असा माणूस मला व्हायचा आहे.
आज तरुण पिढी वाया गेल्यात जमा होत आहे ही फार मोठी गंभीर बाब तुमच्या माझ्यासमोर अव्हान म्हणून उभे आहे.या तरुणामधील खरा माणूस मला जागा जागा करायचा आहे .ते जर मी करु शकलो नाही तर देशातील संस्कृती नष्ट व्हायला वेळ लागणार नाही.
गाडगेबाबांचा स्वच्छतेचा धडा मला पुन्हा नव्या जोमाने व प्रामाणिकपणे आचरणात आणावयाचा आहे.
अहो आजकाल भोतिकवादाच्या खाईत गेलेला माणूस कुणाच्या दुःखात सुद्धा सहभागी होत नाही.
एखाद्या अपघात रस्त्यावर झाल्यावर उघड्या डोळ्यानी ते आपण पाहतो पण कोणी त्याच्या मदतीला जात नाही .मला ही वृत्तीच बुडातून हाणून पाडायची आहे.
विद्यमान प्राणिजगतात माणूस प्रचंड सामर्थ्यशाली प्राणी आहे.सुमार बुद्धीच्या या मानवाने आपली सत्ता सर्वावर सिद्ध केलीय.बुद्धीवैभवामुळे तो नियतीने वैभव त्याला दिलय म्हणून तो सर्वार्थाने सुखी झाला असं अजिबात नाही.नितिमत्ता माणसांच्या वैचारिक प्रगल्भपणाचे द्योतक असते.जीवशास्त्राच्या भाषेत माणूस निसर्गाचे अपत्य आहे.*दुसऱ्याच्या दुःखाने व्यथित होऊन डोळ्यांत साठलेले दोन अश्रु म्हणजे संस्कृती .
मला माणसासोबतच नाही तर प्रत्येक प्राणीमात्रासोबत माणुसकीने वागायचे आहे.मला असा माणूस व्हायचे आहे.
जगाच्या पाठीवर धर्म अनेक आहेत पण खरा धर्म म्हणजे साने गुरुजींच्या भाषेत मानवता आहे.ही मानवता मला सातत्याने टिकवायची आहे.
माणूस चंद्रावर गेला .अनेक शोध लावले संशोधन केले हे अतिशय चांगले आहे.पण हे करताना आपल्या संस्कृतीचे जतन झाले पाहिजे .मला हे जतन करायचे आहे.मला पुढील पिढीला आदर्शवादी धडे देण्यासाठी स्वतः नैतिक बनायचे आहे.
*जगाच्या कल्याणा संताच्या विभुती*.. *देह कष्टविती परोपकारे*....
या संत तुकाराम महाराजांच्या शिकवणीला आचरणात आणायची गरज आहे व मी ते आणाणारच.
*नौजवानो भारत की तकदीर बना दो*....
*फुलों को इस गुलशनसे काटों कों हटा दो*
मला या बाबी पुर्ण करायच्या आहेत.
स्वतःपुरतं जगतात ते तर पशुवत झालं पण मला इतरासांठी जगायचं आहे.
या माझ्या भारत देशात....
एक उच्च नैतिकता मला प्रस्थापित करायची आहे.एक उच्च अध्यात्मवाद निर्माण करुन गेलेलं या देशाचं खरे वैभव मला परत आणायचं आहे.
पुढील पिढीला एक उच्च आदर्श निर्माण करुन म.गांधी ,डाॕ.आंबेडकर यांची उच्च विचारधारा मला माझ्या आचरणात आणून एक वेगळा आदर्श द्यायचा आहे.
एक सुजलाम सुफलाम भारत तर घाडवायचाच आहे पण एक ताकदवान नितीवान अध्यात्मवादी भारत बनवून जगाच्या नकाशात एक उच्च माणूस काय आसतो हे दाखवून द्यायचे आहे.
योग प्राणायामाचे धडे या पिढीला देऊन महर्षी पतंजलींची साधना मला करायची आहे.निरोगी जीवन जगण्याची कला मला शिकायची आहे.वपुढील पिढीला देऊन एक नैतिकतेचे ऋण मला फेडायचे आहेत.
शेवटी मी असे म्हणेन की खरा माणूस कसा असतो याचे आदर्श द्योतक बनून माझा भारत देश जगात उंचावर नेऊन ठेवायचा आहे.
♦♦♦🛏🛏♦♦♦
*चौधरी बालाजी सर*
🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏
*लातूर.....स.क्र.82*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
•••••••••°°°°°°°°°•••••••••°°°°°°°°°•••••••••
*स्पर्धेसाठी लेख*
विषय - मला माणूस व्हावेसे वाटते.
शाळेत वर्ग 11 वी च्या मुलांसोबत दोन तीन दिवसापुर्वी सहज बारावीनंतर पुढे काय ? या विषयांवर चर्चा केली , त्यामध्ये मुलांनी विविध क्षेत्रात जाण्याची तयारी दर्शवली . कोणी म्हणे मी डॉक्टर होणार , कोणी इंजिनिअर , एक म्हणाला नेव्ही मध्ये जाणार , चार दोन पोरं एन डि ए चे स्वप्न रंगवत होते . तर कोणी म्हणे मी वकील होईल . काहींनी तर चक्क बारावीनंतर मार्कानुसार क्षेत्र निवडणार असल्याने सध्या काही सांगता येणार नाही अशी गंमतही केली . मला वाटलं आयुष्याची भावी शर्यत जिंकण्यासाठी प्रत्येक जन काही ना काही बनणारच आहे आणि टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी मरेपर्यंत जगण्याची धडपड करणारच आहे . माणूस जन्माला आला म्हणजे तो मरणारच पण हा माणव जन्म मिळाल्यावर तो किती जन सार्थकी लावतात हा खरा प्रश्न आहे . मी मुलांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर सापडलं नव्हतं . म्हणून मी स्वताच खुलासा केला .मी म्हणालो प्रत्येकाने आपला भविष्यती व्यवसाय सांगितला पण माणूस बनणार असल्याची वाच्यता कोणी केली नाही . पहिले माणसाने सच्चा माणूस बनुन माणूसकी जोपासायला हवी नंतर व्यवसाय करत पैसा कमवावा , त्यासाठी विविध क्षेत्र आहेतच कि , पण माणसाला माणूस बनवण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे माणूसकी .
आज माणूसकी माणसात शिल्लक नसल्याची खंत व्यक्त करत विषय आटोपता घेतला पण तेवढ्याने माझं समाधान झालं नव्हतं . म्हणून मी सुद्धा या विषयावर सखोल विचार केला तेव्हा कळलं की माणूसकीचा संबंध हा संस्कारातून येतो . ज्या घरातून चांगले विचार मिळतात तो व्यक्ती आपल्याआधी दूसर्याचा विचार नक्कीच करतो . त्यासाठी मोठ्या शाळेमधील मोठ्या अर्थात उच्च वर्गात शिक्षण घेण्याची गरज ती काय ? शाळेतून भलेही पुस्तकी शिक्षण भरमसाठ मिळेल पण माणूसकीचे धडे गिरवण्यासाठी संस्कारच हवेत .तेंव्हा शाळेतून कितीही ज्ञानाचे धडे गिरवा माणूसकी प्रत्येकांत असेलच हे सांगता येत नाही . तुम्ही आयुष्यभर कितीही डिग्री मिळवत बसलात पण तुम्हाला तुमच्या कुटुंबाची जाणीव नसेल तर तुमचं शिक्षीत असणं व्यर्थ आहे . त्यापेक्षा एखादा अडानी पण सुसंस्कृत कधीही परवडला .
देवाणे आपण सर्वांना इतका छान माणव जन्म दिला आहे पण तो सत्कर्मी कसा लावावा याची अक्कल फारच थोड्या लोकांना दिलीय . बरेच सुशिक्षित स्टंडर्ड जीवन जगण्याच्या नादात शरीराची राखरांगोळी करत व्यसन करताना दिसत आहेत . यांच्या घरात पैसा आणि खाण्यासाठी सुकाळ असतो पण समाधान किंवा प्रतिष्ठा असेलच याची शाश्वती नाही किंवा हे माणूसकीचे पुजक असतील हे सुद्धा निश्चित सांगता येणार नाही . या उलट खेड्यात राहणारा आमचा गरीब माणूस निस्वार्थपणे कधीही पाठीशी उभा राहतो .कदाचीत गडगंज संपत्ती त्याकडे नसेल पण माणूसकी त्यामध्ये ठासुन भरलेली असते , हो आणि त्याला केव्हाही आवाज द्या तो तयार असेल. समाज प्रबोधन करणारे समाजात भलेही सापडतील पण माणूसकी शिकवणारे वर्ग आजही पहायला मिळाले नाहीत .
म्हणून सर्वप्रथम मला माणूस व्हावेसे वाटते अन् माझ्या कडून होईल तेवढी व्यक्ती व समाजाची अर्थात माणसाची सेवा करायला आवडेल . कदाचीत सतत कोणत्या न कोणत्या मार्गाने मुलांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकी पेशात मला आयुष्यभर सेवा करण्याची संधी नियतीने सुद्धा दिली असेल . कारण विद्यार्थी हा आजचा नागरीक आणि उद्याचे भविष्य आहे . मी तर म्हणेल विद्यार्थी म्हणजे जीवंत फाईल आहेत संपूर्ण आयुष्यभर कितीतरी फाईली हताळण्याचं , विद्यार्थी घडवण्याचं भाग्य शिक्षकाला मिळते . पाहिजे तसा आकार मुलांच्या मनाला , आयुष्याला देता येतो . एवढंच आजच्या या निमित्ताने सांगावसं वाटतं .
*माणूसकी नसते गड्या **
*कुठेच विकत भेटत**
*शोधावी लागते प्रत्यक्ष**
*ती माणसे अनुभवत*
घनश्याम बोह्राडे
बुलडाना (19)
मो 8308432625
•••••••••°°°°°°°°°•••••••••°°°°°°°°°•••••••••
मला माणुस व्हावेसे वाटते...
आपण सर्वजण मानवच असताना माणुस व्हावेसे वाटते या विषयावर लेख लिहताना मन किती दुःखी होते हे शब्दात व्यक्त करु शकत नाही.मुळात माणसाने माणसासारखे वागावे म्हणन्याची वेळ का आली?आणि ही वेळ कुणी आणली?या सर्व गहन प्रश्नांची उत्तरे एकच आहेत ,ते म्हणजे मानव.विश्वनिर्मात्याची सर्वात अनमोल व सुंदर रचना म्हणजे मानव.पण हाच माणूस आज माणुसकी विसरून भलत्याच मार्गावर भटकताना दिसतो.आसपासच्या परिसरातील अनेक घडामोडी आपण पाहतो ,अनुभवतो ,ऐकतो, वर्तमानपत्र,tv या सारख्या माध्यमातून रोजच माणुसकिला काळीमा फासणाऱ्या घटना आपण पाहतो तेंव्हा मनाला चटका बसतो. मन हळवे होते,वाटते की हे असे नाही व्हायला पाहिजे पण लगेच आपल्या मनाच्या संवेदना लुप्त होतात,झाले गेले सर्व विसरून आपण आपल्या कामात मग्न होतो.आज समाजातून मानुसकीचे धिंडवडे काढणारे अनेक प्रसंग पाहतो,माणसाला पशुसारखे वागताना पाहतो पण आजही माणुसकी जपणारी माणसे या भूतलावर आहेत,यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे.माझ्या मनात सतत एक विचार घुटमळत असतो की मी किती सुदैवी आहे मला हा मानवाचा जन्म भेटला,काय शाश्वती आहे आयुष्याची ,मानवी जीव म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा आहे कधी फुटेल कांही सांगता येत नाही.म्हणून एक एक क्षण आपल्या अयुष्याचा मूल्यवान आहे,होईल तितके सत्कार्य करण्याचा प्रयत्न जर सर्वानी केला,एकमेकांच्या सुखदुःखाचे भागीदार जर आपण बनलो तर !किती सुंदर भासेल हे जीवन.
सुरुवातीच्या काळाचा विचार करता भटकंती करणारा हा मानव माणुसकी जपन्यासाठीच एकत्र आला. नात्यांची ओळख झाली ,परीवार किंवा कुटुंब ही संकल्पना माणसाला समजली.एकमेकांच्या सहवासातून एकमेकांची ओढ निर्माण झाली.जसजसा काळ लोटला तसतसा माणूस प्रगतिचे आलेख पादाक्रांत करु लागला.चढाओढ, मोह,गर्व ,यातून मानवी भावना बदलल्या व स्पर्धा निर्माण झाली.सम्पत्तिसाठी,वारसाहक्कासाठी,शौर्य गाजविन्यासाठी मानसामाणसात स्पर्धा निर्माण झाली मग रक्ताचे पाट वाहिलेले आपण सर्वानी भूतकाळातल्या इतिहासातून अनुभवलेले आहोत.आज मात्र एकाच परिवारात एकाच आईबापाच्या पोटी जन्माला आलेली भावंडे या ना त्या कारणासाठी वाद घालताना आपण पाहतो.असे का होत असेल?.मी जेंव्हा लहान होतो तेंव्हा पहायचो की सख्खे भावंडे भांडून घेत आहेत तेंव्हा वाटायचे हे असे का भांडत आहेत,जसा जसा मोठा झालो आज समजू लागलेल आहे का मानसे वैर्यासारखि वागतात.मी ठरवलेल आहे की मला अस नाही बनायच !पैश्यासाठी ,शेतीच्या तुकडयासाठी ,एकमेकांचा जीव घेणारे हे मानव नसून राक्षस आहेत.इतिहास साक्षी आहे जो कोणी या भूतलावर जन्माला आला ,रिकाम्या हाताने आला आणि मृत्यूनंतर जातानाही रिकाम्या हाताने गेला.किती राजे महाराजे, झाले कोणीही जाताना एक दमडिही घेऊन गेला नाही मग आपण का संपत्ति,पैसा,देह यांचा गर्व करावा,अरे कमवायचेच असेल तर माणुसकी कमवा ना ती मृत्युनंतरहि अमर राहते.
आदर्श घ्यायचा असेल तर पहा गौतम बुद्धाकडे ज्यानी आयुष्यभर कमावलेलि संपत्ति क्षणात त्यागली. बायको आणि लेकरांचाहि मोह त्यांनी त्यागला. आपणाला आज इतका मोठा त्याग करण शक्य नाही पण एकमेकांना साथ देणे, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होने शक्य आहे.आणि हे सर्व करायचे म्हणजे एकदम अस वेगळ कांही करण्याची गरज नाही.आपण कमावलेल्या संपत्तिचा थोडासा तरी भाग समाजकल्याणासाठी खर्च करावा, निदान गरजूना मदत तरी करावी.सर्वात महत्वाचे आहे जाती ,धर्माच्या ,पंथाच्या नावाखाली जो समाज विभागलेला आहे आणि या भेदातून जे कलह ,वाद निर्माण होत आहेत यात मानुसकिचा बळी चाललेला आहे.हिंदू -मुस्लिम वाद असो किंवा स्त्रियांवर होणारा अत्याचार असो ही संपूर्ण मानवजातीला काळीमा फासनारी बाब आहे.कधी कधी वाटते की आपल्यापेक्षा ते पशु बरे आहेत निदान ते तरी त्यांचा धर्म पाळतात.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी म्हंटलेल आहे "माणसाला माणसासारखे जो वागवतो तो खरा धर्म होय".आणि हे अगदी खरे आहे.आज धर्माच्या नावाखाली कित्येक मानसांचे बळी जाताहेत,याला लगाम बसले पाहिजे .युद्ध करणे याचा पर्याय नाही,"आज विश्वाला युद्धाची नाही तर बुद्धाच्या विचारांची गरज आहे".काय आहेत बुद्धाचे विचार तर मानुसकीचे दूसरे नाव आहेत बुद्धांचे विचार.प्रत्येकाने जर अशा थोर महात्म्यांचे विचार अंगिकारले तर संपूर्ण विश्व शांतिने नांदेल.फक्त गौतम बुद्धांचेच विचार अंगिकारा असे कांही नाही किती संत होऊन गेलेत या भारतभूमित संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर,संत बसवेश्वर,छत्रपति शिवाजी महाराज,डॉ.ए पी जे अब्दुल कलाम,डॉ.आंबेडकर, महात्मा फुले अशा हजारो संत महापुरुषानि त्यांच्या आयुष्याची समृद्ध गाथा आपल्या समोर मांडलेली आहे.ही सर्व देव माणसे होती आपणाला देव बणने तर शक्य नाही निदान मानव तरी बनुया.
विसरु नको मानवा
मानुसकीची नाती..
जगताना ठेव सद्विचार
कांही येणार नाही सोबती..
एकमेकांना देवुनी साथ
उजळवू मनुसकीची किर्ती..
खरेच चार दिसांचे आपले आयुष्य ,सर्वावर मायेची ,प्रेमाची बरसात करुया ,सोबत काय घेवून जायचे आहे पैसा की माणुसकी ही प्रत्येकाने ठरवुया व माणूस म्हणून जन्मलो माणूस बनूनच जगुया.....
-श्री सगर पंढरी @83@
धर्माबाद 9405628375
•••••••••°°°°°°°°°•••••••••°°°°°°°°°•••••••••
No comments:
Post a Comment