मुक्त कविता लेखन स्पर्धा दिनांक 31 डिसेंबर 2016
[12/31, 1:12 PM] +91 77750 26914: स्पर्धेसाठी
वाहनांची ती गर्दी किती
नियमांचा केला बोजवारा,
प्रत्यकाला घाई आज
चौका चौकात लांब रांगा.
वेगाची ती मर्यादा सुटली
चालणाऱ्यांच्या जीवावर उठली,
उशीरा निघून लवकर पोहचण्याची
स्पर्धाच जणू होऊ लागली.
नियमांच्या फलकावर जाहिरातीचे
पोस्टर आले,
स्पीड ब्रेकरच्या अगोदरचे
पांढरे पट्टे गायपच झाले.
सिग्नल वरची झेब्रा क्रॉसिंग
नावालाच उरली,
वेगात आलेली कार जणू
वाऱ्यासारखी निघून गेली.
रास्ता सुरक्षा सप्ताह आला
जो तो नियम सांगून गेला,
खड्डे पडलेल्या रस्त्यावर
वेग मर्यादा लावून गेला.
*पप्पू मोहरकर*
@56
[12/31, 1:34 PM] 10 Meena Sanap: 📕साहित्य दर्पण व्दारा आयोजित📕
मुक्त कविता स्पर्धा
****************************
*आठव मैत्रीचा*
****************************
आज अचानक कसा मित्रांचा विचार आला
मनामध्ये डोकावले तर खुप बदल झाला
बालपणीचा काळ होता फार फार सुखाचा
आज मात्र उपदेश सुध्दा नाही बघा फुकाचा
असायचे माझे तुझे,वाटा माझा मी घेईन
नाही दिले तर आईकडे तक्रार तुझी नेईन
लहानपणी भांडण जास्त होत असायचे
एक दोन दिवस मुद्दाम रुसुन जरा बसायचे
लहानपणी आईच्या प्रेमळ पदराची ओढ
मोठेपणी स्वतःच्याच धुंदीत वाटत असते गोड
कुठे हरवली ती मैत्री निस्वार्थ आपुल्या मनाची
कुठे अडखळली वाट आज निखळ झ-याची
भरकटले सगळे त्यात मी ही वाट चुकलो
फक्त मी पणाने आज ख-या मैत्रीला मुकलो
बांध घातले निखळ मैत्रीला आज दुष्ट स्वार्थाने
कधी दिसेल आता मैत्री निस्वार्थ प्रेमाने
मैत्रीत असावेत भाव प्रेमळ सौख्याचे
बंध गुंफावेत जरा कृष्ण आणि सुदाम्याचे
मैत्रीचे नाते निखळ प्रकाशात फुलापरी फुलावं
सानिध्यात दोघांच्या हर्ष हिंदोळ्यावर झुलावं
रोज सोबत खेळायचे,रडायचे,हसायचे
गेले ते दिवस सोबतीचे ,किती सुंदर असायचे
****************************
मीना सानप बीड @ 7
9423715865
स्पर्धेसाठी 👆
*****************************
[12/31, 1:37 PM] Jaisri Jogdand: 🍁मन...🍁
का मन असे कधी बेचैन होते
सैरा वैरा धावत सुटते
जवळ असुनी सर्व काही
काहीच नाही माझे असे का वाटते
धावणाऱ्या लाटांनाही
मिळतोच ना किनारा
अस्थिर माझ्या मनाला
का कुठेच मिळेना थारा
फुलां फुलात होऊन सुगंध
अलवार विरतो मंद वारा
श्वासात अडकुन पडलेला
हा विश्व का सारा
श्वासातही असते आठवण
नाजूक प्रेम बंधाची साठवण
ती साठवणही आता नकोशी आहे
कळत नाही करावी कशी तिची पाठवण
नको तेव्हढा वाढतोय हा
नको असलेल्या बंधाचा पसारा
भावनेच्या बाजारात नाही आता
कुणी कोणाला समजून घेणारा
दिखाऊ खेळ सगळीकडे सारा
दिखाऊपणा ना पटणारा मनाला
अंतरीचे दुःख समजेल का कुणाला
विखुरतो आहे स्वप्नांचा मनोरा
त्या स्वप्नांसह विखुरताना
ना उरेल अर्थ या जीवनाला..
.
✍जोगदंड जयश्री
62....
.
[12/31, 3:03 PM] Sangita Bhandwale: 🏵मुक्तकविता स्पर्धेसाठी🏵
🌹दि.३१/१२/२०१६🌹
🎯।।बालकविता।।🎯
🎯*रानपाखरं*🎯
हिरव्यागार शिवारात
गर्द झाडांची दाटी
ठरलेल्या असतात
इथेच रोज गाठीभेटी
अवखळ निरागस
उनाड ते बालपण
आठवांच्या शिदोरीचे
विसरत नाहीत क्षण
कधी सुरपारंब्या
कधी माकड उड्या
बालपणीच करता येतात
अवखळपणाच्या खोड्या
बालपणी काय कळावी
जगण्याची रितभात
स्वप्न मात्र पाहतो
काय व्हावे आयुष्यात
आनंदी आनंद वाटे
फांदीवर झुलताना
हर्षित ही रानपाखरे
स्वच्छंद बागडताना
संगीता भांडवले
वाशी ,उस्मानाबाद
@१६
[12/31, 4:42 PM] Shashikala 2: मुक्त कविता स्पर्धेसाठी
*निसर्गकन्या*
मुक्त विहरतो रानोमाळ
निसर्गकन्या आम्ही आनंदात
निसर्गाच्या कुशीत वाढलो
परिस्थितीवर करून मात
जीवनाच्या शाळेत आमुच्या
रोज आनंदाचा पडतो सडा
शुद्ध हवा अन् शुद्ध पाणी
मोकळा आहे मनाचा वाडा
माझेच प्रतिबिंब हसते आहे
दिलखुलास माझ्याशी आज
या फांदीवरून त्या फांदीवर
सोबत निसर्गाचा आहे साज
इथे ना कसली आहे स्पर्धा
निरागसतेची फुलली फुले
फाटक्या कपड्यात श्रीमंती
सुखी आम्ही गरीबाची मुले
नकोच दप्तर नकोच पुस्तक
नकोच आम्हा ते क्रीडांगण
सिमेंटच्या जंगलापासून दूर
निसर्ग मिळाला आहे आंदण
सुख सारे वेचावे हसत खेळत
वाटत सुटावे आज खुषाल
स्वातंत्र्याचा अर्थ ना ठावूक
परि सुख अमूचे आहे विशाल
... सौ. शशिकला बनकर, भोसरी, पुणे
@35
[12/31, 4:52 PM] sagar pandhari: मुक्त कविता स्पर्धेसाठी...
________________________
कसा रुततो पायात आमच्या काटा
कसे जातो आम्ही तुडवित चिखलांच्या वाटा..
कसे राबतो शेतात रात्रंदिन,बघण्या हे जगणे
साहेब या इथे अन शेतकऱ्यांना भेटा..
काढुनि सावकारी कर्ज
करितो शेतीची मशागत..
कधी येणार बळीराजाच राज्य
स्वप्न झाले हे स्वप्नागत..
नाही पायात वहाण नाही अंघभर वसन
दिवसभर सोसत उन्हाचे चटके..
भरण्या पोटाची टीचभर खळगी
माझा बळीराजा कुठकुठ भटके..
देता पावसाने दडी
नजर फिरे आकाशात..
निसर्गाने केला जर असा घात
शेतकऱ्यांना कोण देई मदतीचा हात..
कसा फेडील शेतकरी सावकाराचे कर्ज
कसा देईल शिक्षण लेकराबाळास
काय करेल शेतकरी अशा बिकट अवस्थेत
लावणार कुणाकडे मदतीची आस
जीव आहे प्यारा सर्वास
परी पर्याय नसे शेतकऱ्यास..
संपवूनि जीवन यात्रा आपुली
स्वतःस लावे तो गळफास..
सरकार असे मायबाप परी सवड नाही त्यास
म्हणे रोजच घडते असे आम्ही काय करणार खास..
लावा कांहीतरि तजवीज आखा आराखडा खास
मग तेंव्हाच येईल शेतकऱ्यात आत्मविश्वास..
________________________
-श्री सगर पंढरी 83 धर्माबाद
9405628375
[12/31, 5:01 PM] 2 Manjush Deshamukh: *मुक्तकविता स्पर्धेसाठी*
*=====================*
*शुद्ध*
(सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या मुली च्या आईची मनस्थिती)
*थडग्यावर तुझ्या मी*
*अश्रू गाळले होते, ते*
*तुझ्यासाठी नव्हे तर*
*तुझ्या संपण्या साठी होते*
*दिव्या मध्ये तेल मी*
*तेव्हाच घातले होते*
*अंधाराचे भय नव्हे तर*
*उजेडात जायचे होते*
*तुझ्या संपण्याने मी*
*एकटिच राहिले होते*
*आनंद -दुखांच्या क्षणांना*
*सोबती कुणीच नव्हते*
*शेवटि जाता जाता*
*सारेच आले होते*
*पंगतीला तुझ्या सारे*
*कोल्हे लांडगे होते*
*बापाला तुझ्या सारे*
*तोडून बोलले होते*
*ते सर्व दुरचे नाहि तर*
*फार जवळचेच होते*
*तुझ्या जाण्याने काही*
*फरक पडला नाहि*
*आताहि जगत आहेत*
*जगत तेव्हाहि होतेच*
*केले जे सर्वांमुळे*
*ते सर्वच व्यर्थ होते*
*आले जे सर्व तेथे*
*सारेच स्वार्थी होते*
*=====================*
*मंजुषा देशमुख@३६*
*अमरावती*
[12/31, 5:04 PM] +91 97306 89583: स्पर्धेसाठी...
*नववर्ष*
जुन्या वर्षाला
राम राम ठोका
भल्या बुऱ्या क्षणांना
मनातुन फेका...१
उणी दुणी नको
गैरसमज विसरा
झाले गेले भूलुन
नवजीवन साकारा...२
नववर्ष स्वागता
गोडधोड करुया
योग्य आहार विहाराचा
संकल्प धरूया...३
नव्या उमेदीचं
नवं गीत गाऊया
येणाऱ्या वर्षात
आनंदाने न्हावुया...४
कु.प्रणाली काकडे
समूह क्रमांक pk38
[12/31, 5:33 PM] nagorao yeotikar: *।। नववर्ष शुभेच्छा ।।*
नव्या आशा, नवे विचार
नववर्ष शुभेच्छा करा स्वीकार
झाले गेले विसरूनी
मरगळ सारे झटकुनी
उद्याचे स्वप्न करू साकार
नववर्ष शुभेच्छा करा स्वीकार
विद्येची सदा आस धरु
नव्या कलेचा अभ्यास करू
नवजाताला देवू आकार
नववर्ष शुभेच्छा करा स्वीकार
वैर संपवू नि मित्र बनूया
सुखदुःखात एकत्र येऊ या
करूया आत्ता बरा आचार
नववर्ष शुभेच्छा करा स्वीकार
- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
।। स्पर्धेसाठी ।।
[12/31, 5:44 PM] +91 75885 88900: 🌼मुक्तकविता स्पर्धेसाठी🌼
~~~~~~~~~~~~~~~
भाऊ
भाऊ आहे छोटा
खुपच आहे छान
तो वडीलांच्या जागी
माझा जीव की प्राण
भाऊ आहे प्रेमळ
जशी दुधावरची साय
सुखदःखात साथ देई
होऊन वडील आणि माय
भाऊ आहे पाठीराखा
भाऊ आहे दयाळु
त्याची माया फार आहे
भाऊ आहे मायाळु
भाऊ आहे लहान
तरी मला समजावितो
माझे कुठे चुकले तर
मला सांभाळुन घेतो
देवाकडे मागणे माझे
त्याला सदा आनंदी ठेव
त्याचे दःख दुर करोनी
त्याला सदा सुखी ठेव
भाऊ असा मिळायला
लागते नशीब थोर
देवा हीच प्रार्थना माझी
अखंड राहो प्रेमाची डोर
~~~~~~~~~~~~~~~
स्मिता बेंडे@९५----------------
[12/31, 5:47 PM] 608 Rohidas hole: मुक्त कविता स्पर्धेसाठी
!!!! शिवारात माझ्या !!!!
-----------------------------
बहरतो माझा मळा
आई बाप तिथं राबे....
गाम गाळत गाळत
सदैव पाठीशी उभे..
हिरवं सपान फुलले
कष्टाची झाली फुले.....
आनंदाने गाणी गात
गवताची पाती डुले....
रानची पाखरं रानात
मायेचा पतंग गगनात.....
चिव चिवाट भारीच
दाणे टिपती अंगणात ....
शिवाराची ख्याती न्यारी
खुलं आकाश पांघरूण ....
माया ममतेची कुस ती
काळी आई घेई सावरुन....
डौल माझ्या बैल राजाचा
साहेबांवानी शोभे रुबाब....
मेहनतीला नाही थकवा
चोख कामांस लाजवाब...
वाट वळणाची, शालू नेसून
दिमाखात स्वागताला ऊभी....
उन सावली संगतीला मिळे
मी जन्माल्या गावाची खुबी....
असेल कसे वैभव महालाचं
सुख दुख आहे छपरात....
आपुलकिने नांदे सारा संसार
जगामध्ये हे आश्चर्यचकित ...
रोहिदास होले ....
गोपाळवाडी ,दौंड ,पुणे..
[12/31, 5:55 PM] Hanmant Padwal: रस्ता आणि खड्डे
चालताना रस्त्याने
गाडीचा गाडीचा
सुटला गं तोल माझ्या गाडीचा...॥
गाडी गं माझी लई महागाची
तशीच माझ्या लई आवडीची
खड्ड्यात गेली नि फुसs झाली..
अन तुटला गं ब्रेक माझ्या गाडीचा....॥
रस्ता होता वळणाचा
तसाच तो खडयाचा....
झेलीत झोल संभाळत तोल
तुटला गं गिअर माझ्या गाडीचा ......॥
खडड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा
विचारात पडणारा होतो वेडा
चालताना विचार करा हाडाचा
आणि सांभाळा तोल पुन्हा गाडीचा....॥
श्री.हणमंत पडवळ
मु.पो. उपळे( मा.)ता.जि. उस्मानाबाद
8698067566.
स्पर्धेसाठी👆🏾
[12/31, 6:04 PM] ghanashyam borade: कविता -नव वर्षाचे स्वागत
येतील अच्छे दिन
म्हणून वाट मी पाहतो
सरत्या वर्षाला विसरून
नव्याचे स्वागत करतो.
हाल अपेष्टा सोसून
गेला सामान्यांचा जीव
जाती पाती विसरून
गरीबीची करा किव.
स्वप्न उराशी बाळगून
थाटला शेतकऱ्यांनी संसार
फाटकीच झोळी शिवुन
फेडतोय कर्जाचा भार..
पगार असून नावापुरता
रडतोय नुसता कर्मचारी
पैसा असून खात्यावर
उधार घेण्याची वेळ आली .
व्यापारी वर्गही भलता
नाराजच दिसतो आहे
सरत्या वर्षात व्यवसाय
भलता मंदीत चालु आहे .
नको पोकळ आश्वासन
भरीव कामगिरी हवी
येत्या नवीन वर्षात तरी
सगळ्यांची चांदी व्हावी .
घनश्याम बोह्राडे बुलडाना 19
(स्वरचीत कविता )
*स्पर्धेसाठी कविता*
[12/31, 6:04 PM] 12 Anil Landge: साहित्य दर्पण आयोजित…
मुक्त काविता स्पर्धा...
*’सावित्री’*
सावित्री तु सोसलेल्या,
जाचाची अंतरी सय आहे।।
अन् घरो-घरीच्या लेकीला,
छळवादाचे भय आहे।।
सावित्री तुझ्या कार्याचं,
नित्यची स्मरण आहे।।
आजही तुझ्या लेकीचे,
गर्भातच मरण आहे।।
फुळत्या कळीस न खुडणे,
पाळावया हे बंधन आहे।।
क्रंतिज्योती सावित्रीला,
हेच खरे वंदन आहे।।
✒अनिल लांडगे उंडणगाव@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050
© copy right
[12/31, 6:07 PM] Kishor Jhote: मुक्तकाव्य स्पर्धा
आदिवासी
( सहाक्षरी )
आदिवासी आम्ही
जंगलचे राजे
येतील का येथे
विकासाचे वारे ?.....
लेकरं लहानी
हिंडती वनी ते
उघडतील का
शिक्षणाची व्दारे ?.....
निसर्गाची साथ
जन्मता लाभते
त्यातच मग का
आम्ही हो मरावे ?....
माणूस म्हणून
गीणतीच नाही
कोणीच नाही का
आमच्या बाजूचे ?....
शिक्षणाचा हक्क
असे जगण्याचे
हक्क आमचे का
कोणी हो लुटले ?.....
वर्षाचे नवे त्या
करता स्वागते
यंदा थांबेल का
मृत्यू कुपोषणे ?....
किशोर झोटे@32
☝ स्पर्धासाठी☝
[12/31, 6:07 PM] +91 95529 80089: मुक्त कविता स्पर्धेसाठी...
## नववर्षाचे स्वागत करु ##
लोकसंख्येला आळा घालुन
देशाचे हित साधु
चला नववर्षाचे स्वागत करु ।।
व्यसनाचे भूत पळवुन
प्रत्येकाला सुदृढ बनवु
चला नववर्षाचे स्वागत करु ।।
भ्रष्टाचाराचे उच्चाटन करुन
देशाला प्रगतीपथावर आणु
चला नववर्षाचे स्वागत करु ।।
बळीराजाचे हित जोपासुन
शेतीला आता फुलवु
चला नववर्षाचे स्वागत करु ।।
बुद्ध-महाविरांची आठवण देऊन
घरोघरी मंत्र शांतीचा देऊ
चला नववर्षाचे स्वागत करु ।।
नरेंद्र म्हस्के , शिरपूर ( धुळे ) @ 65
[12/31, 6:17 PM] Nita Andhale: स्पर्धेसाठी
भल्या-बु-या आठवणी
सोडून देऊ या वळणावर
बांधून नव रेशीमगाठी
प्रेम करूया या जगण्यावर
दिवस ना हा रोज सारखा
विश्वास देतो मिञसखा
जीवलग कधी देतो धोखा
बहुरुपी हा घालून बुरखा
जीवनरूपी ही फुलझडी
नवरंग उधळे घडोघडी
वाढवून वाणीत साखरगोडी
माणूसकीची फुलवू फुलवाडी
बांधून घट्ट धागे रेशमाचे
पक्के करूया नाते मैञीचे
मळे फुलवून साहित्याचे
उंचवूया नाव दर्पणचे
नीता आंधळे
अहमदनगर
*२२*
[12/31, 6:21 PM] Manisha Wani: ।।स्पर्धेसाठी ।।
।।स्फुर्ती गीत।।
चला लढू या चला घडू या
उठता बसता असे शिकूया।
करू प्रचार मानवतेचा
कित्ता गिरवूया स्वच्छतेचा
अभिमान बाळगू स्वदेशाचा
असेच सारे पुढे जाऊया।
नव्हती कुणास पर्वा आमुची
होती लेकरे जरी एका मातीची
होता ध्यास आम्हास एकची
साक्षर बनूनी देश घडवू या।
भरडलो गरिबीच्या जात्यात
अंधार होता सारा पुढ्यात
निर्धार मनावर असा कोरूया
निर्मळ विश्वास पुढे नेऊया।
सौ.मनिषा वाणी.
सुरत.२९.१२.२०१६.
०९४२६८१०१०९.
[12/31, 6:40 PM] Pushpa Sadakal: . . स्पर्धेसाठी.
स्री.
स्री अमूल्य रत्नांची खाण
सार् या विश्वाची ती शान
का करता तिचा अवमान
मिळवून देवू आदर सन्मान..
संसाराची असे सारथी
झटते रात्रंदिन सारखी
पती परमेश्वर ती मानती
स्वातंत्र्याला आपुल्या पारखी..
तुझीच ती रामाची सिता
व्रत वैकल्य ही अघोर करते
सुवासिनी नखशिखांत नटते
लालचुटुक भाळी चंद्र कोरते...
मरणप्राय यातनात मुल जन्मते
नवसंजीवन तिजला मिळते
यातनात ही सुखाचा महापूर
ऋण मातृत्व फेडीत राहते...
सौंदर्याचा जरी ती अविष्कार
काम रगाड्याचा केवढा भडिमार
विसरून भान स्वतःचे
काळजीने दायित्व निभावणार ...
बंधानाच्या तोडून साखळ्या
मुक्त होऊ द्या आता तिला
कमीपणाचे सोडून जिणे
अभिमानाचे स्थान स्त्रित्वाला .
तू संसाराची रणरागिणी
सप्तपदीने शोभली अर्धांगिनी
वाट पाही दारी सांजवेळी
काळजी ओविला चिंतामणी..
संस्कारांचे करीत जतन
नात्यांना केले नेहमीच वंदन
मानापमानाचे सोशित घाव
दुःख संकटांचे करीत पलायन.
तिच जिजाऊ ती सावित्री
बाळाची ती मायमाऊली
कर्तुत्वाची लखलख झळाळी
गृहस्वामिनी संसाराची शोभली..
पुष्पा सदाकाळ भोसरी.
@50. 9011659747.
[12/31, 6:40 PM] +91 96737 33673: पराभव .....
💐स्पर्धेकरिता 💐
पराभव झाला म्हणून का खचलास
यश मिळाले नाही म्हणून का हरलास
पराभव पत्करून संपेल का आयुष्य
एक नेम चुकला तर मोडेल का धनुष्य
जीवन हे सुख -दुःखाचे आहे संगम
हार -जीत मध्ये प्रगतीचा आहे उगम
दिप बनून प्रकाश देत असत जळायचं
काजळी आली तरी झटकून चालायचं
नियतीच्या वाटेत हक्काने टाकावे पाऊलं
प्रयत्नांच्या शिखरावरं यशाची लागेल चाहुलं
शून्याने विश्व निर्माण करी कणखरता
पराभवाने उत्तुंग जिद्द भरारी ची क्षमता
वळवशील तू नद्या, नमवशील डोंगरा
अडवशील सागरा, जिंकशील अंबरा
चाल, टाक पाऊले ,उचल अभय हात
भ्यावयास जन्मशी,काय रे या जगात
विसर तु आता झाला जिवनी पराभव
इच्छाशक्ती प्रबळ कर,घे यशाचा अनुभव
........✍🏻
उज्वला कोल्हे
कोपरगाव
[12/31, 6:43 PM] Surajkumari: *स्पर्धेसाठी*
जात
जात तुझी जात माझी
जाती साठी लढले
कित्येक महात्मे
मरे पर्यत लढले
जात माझ्या मालकीची
ना जात तुझ्या मालकीची
जन्माला आल्या बरोबच
लेबल लागतात जात ची
मरे प्रत्येक जात नाही
जात माणसाची
माणूस मरतो पण मरत
नाही जात माणसाची
एक दिवस आसा उगवेल
सोन्याचा स्वप्न माझे
जात विसरून जातील
माणसे आपली
उरेल फक्त आणी फक्त
माणसा मधील माणूसकी
-----------सुरजकुमारी गोस्वामी
[93]
[12/31, 7:11 PM] +91 94053 72401: स्पर्धेसाठी
स्वागत नववर्षाचे
मित्रमैत्रीणीनो सरत्या वर्षाला
समाधानाने निरोप देऊया...
आगमन आहे नववर्षाचे
हर्षोल्हासाने स्वागत करूया...
गतवर्षीच्या अनुभवांची
शिदोरी बांधून घेऊया...
कटू आठवणी मागे टाकून
हर्षोल्हासाने स्वागत करूया...
उत्साहातही भारंभार
संकल्प नकोच ठरवूया...
सहजसोपे संकल्प घेऊनी
हर्षोल्हासाने स्वागत करूया...
संकल्प असावे मानवतेचे
सत्य,अहिंसा अंगीकारूया...
बनु सुजाण नागरीक देशाचे
हर्षोल्हासाने स्वागत करूया...
हेवेदावे,अहंकार सोडूनी
नात्यांनाही उमलते ठेऊया...
नवी उमेद देत आयुष्याला
हर्षोल्हासाने स्वागत करूया...
आगमन आहे नववर्षाचे
हर्षोल्हासाने स्वागत करूया...
@ 55अश्लेषा मोदी @
[12/31, 7:17 PM] VaishLi Deshmukh: स्पर्धेसाठी
प्रयत्न माझे.....
प्रयत्न माझेच होते
माझ्यात विश्वास जागविनारा
तूच होता
शब्द माझेच होते
त्या शब्दाना आकार देणारा
तूच होता
स्वप्न माझेच होते
त्या स्वप्नांना साकारणारा
तूच होता
पंख माझेच होते
त्या पंखांना बळ देणारा,
तूच होता
जीवन माझेच होते
त्या जीवनाला अर्थ देणारा
तूच होता
प्रा.वैशाली देशमुख
कुही ,नागपूर
34@
कसे बघता बघता ,
ReplyDeleteवर्ष सरायला आले
उभी ठाकली दाराशी
नववर्षाची पाऊले
थांबतो न कुणासाठी
अशी 'काळाची ' महती
क्षण, दिन ,रात ,मास
सदा पुढेच पळती
सुख दुःखाची शिदोरी ,
आहे माझिया पदरी
पुढे खुणावते आहे ,
रम्य स्वप्नांची नगरी
झाल्या काही चुका आणि
गेली दुखावली मने
माफ करा जनलोक
नाही दुसरे मागणे
जीवनाचे झाले पहा
आणि एक वर्ष कमी
सोडू राग व्देष सारे ,
उद्याची न येथे हमी
येऊ घातले आहेत
दिन निखळ हर्षाचे
चला मिळून स्वागत
करू नविन वर्षाचे��
..... ..... ..... .....