Sunday, 28 August 2016

बेरोजगार

[8/28, 10:06 AM]
📚 साहित्य  दर्पण Whatsapp ग्रुप  📰🖊
     द्वारा आयोजित

🗽    साहित्य दरबार    🗽
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

🚩भाग :- ( 19वा)- एकोणीसावा 🚩
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
📆 दिनांक - _28/07/2016_
🛢 वार - रविवार
~~~~~~~~~~~~~~~~
🕰 वेळ - सकाळी 10:00 ते 7:00


★★★★★★★

††††††††††††††††††

*भारतातील बेरोजगारी :एक यक्षप्रश्न*

==================
💥 संकल्पना :--↓↓
श्री.ना सा येवतीकर सर
**************************
💥 संयोजक --↓↓
श्री आप्पासाहेब सुरवसे
************************
💥 परीक्षक -  *ऍडवोकेट   श्री अजित पुरोहित सांगली*
""''''''''''""""''''''''''''''''''''''''''"'''''''''''''''''""""
💥संकलन --
 जी पी पवार पाटिल सर
~~~~~~~~~~~~~~~
💥 ग्राफिक्स :--श्री बी क्रांति सर
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"'
🔦 स्पर्धेचे नियम -

💥ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे....
💥 आपला लेख किमान 100 आणि कमाल 500 - 700 शब्दांच्या मर्यादेत असावे.
💥 लेखाखाली आपले पूर्ण  नाव, गाव आणि मोबाईल नंबर अवश्य लिहावे.

💥स्पर्धेतील निवडक लेख संयोजक वृत्तमानपत्रातून प्रकाशित करतील याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी ..

💥 या  स्पर्धेचा निकाल ग्राफिक्स सह खालील blog वर  आणि साहित्य दर्पण वर पाहण्यास दिनांक _29ऑगष्ट 2016_ रोजी सायंकाळी 9:00 Pm वाजता मिळेल.  त्यासाठी वारंवार चौकशी करु नये.
💥साहित्य दर्पण ग्रूपच्या बाहेरील लेखक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात...

📩 त्यासाठी .

🎾 खालील पैकी कोणत्याही एका मोबाईल नंबरवर किंवा फ़ेसबुक वर आपले लेख पोस्ट करावे ....

👤 आप्पासाहेब सुरवसे,लाखणगांवकर
📱 09403725973

👤 नासा येवतीकर, धर्माबाद
📱 09423625769

👤 श्री मारुती खुडे सर माहुर
📱09823922702
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[8/28, 11:00 AM] nagorao26
*तरुण भारत देश घडवू या .....!*
जगात लोकसंखेच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर असलेला देश आहे. आज भारत देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटी च्या वर पोहोचली आहे. यात 20 % बालक आणि 20 %  वृध्द तर बाकी 60 % च्या वर तरुणाची संख्या आहे हे विशेष म्हणूनच भारताला तरुणाचा देश असे संबोधले जाते. ज्या देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुणाची संख्या असेल तर त्या देशाची प्रगती लक्षणीय आणि वेगात असायला पाहिजे. पण नेमके उलट या ठिकाणी पाहायला मिळते. आमच्या कडे मनुष्यबळ, शक्ती आणि युक्ती सर्व आहे, तरी भारत आज स्वातंत्र्याच्या सत्तरीत असून देखील प्रगती पथावरच आहे म्हणजे अजून ही रस्त्यावर आहे त्याला अजून खूप काही करणे शिल्लक आहे. असे का ? आज आपण जपान या देशाच्या विकासाकडे पाहिलो तर लक्षात येईल की त्या देशाने कमी वेळात एवढी प्रगती कशी केली असेल ? त्याला एकमेव कारण म्हणजे तेथील कोणताच व्यक्ती रिकामा नसतो, बेरोजगार नसतो. तो सदानकदा काही ना काही काम करीत असतो. आळस हा माणसाचा शत्रू आहे हे गौतम बुध्दाचे वचन त्यांनी आत्मसात केले म्हणून आज जपान मधील प्रत्येक वस्तु देश विदेशात आढळून येते. वास्तविक पाहता जपानची लोकसंख्या भारतच्या तुलनेत फार कमी आहे परंतु तेथे बेरोजगार कमी आहेत हे विशेष. त्याउलट आपल्या देशात दिसून येते. येथे आपल्या देशात आळस हा माणसाचा शत्रू नसून मित्र बनला आहे. काम करणाऱ्या युवकापेक्षा बेरोजगार युवकांची संख्या भरमसाठ आहे. व्यक्तीच्या हाताला काम असेल तर त्या ठिकाणी फक्त त्या व्यक्तीचा विकास होत नसून त्याच्या सोबत त्याच्या कुटुंबाचा, समाजाचा, गावाचा, राज्याचा पर्यायाने देशाचा विकास होतो. परन्तु आपल्या देशातील युवकांना रोजगार का मिळत नाही किंवा युवक असे भटकण्याच्या कोंडीत का सापडत आहेत ? यावर विचार करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्याच्या शंभरीत तरी भारत जगाच्या नकाशावर ठळक उठून दिसण्यासाठी आज या समस्येची उकल शोधणे किंवा यावर संशोधन करून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

* बेरोजगार युवक - देशात सध्या दोन प्रकारचे बेरोजगार युवक आढळून येतात. अशिक्षित आणि सुशिक्षित बेरोजगार. अशिक्षित मंडळी त्यांना ज्याप्रकारचे काम जमते त्याप्रकारचे काम ढोर मेहनत करीत करतात. त्याचा म्हणावा तसा मोबादला त्याला मिळत नाही म्हणून खूप कष्ट आणि काम करून देखील त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा विकास होत नाही. त्याच्याकडे शक्ती आहे मात्र त्या शक्तिचा वापर योग्य प्रकारे कसा करावा याचे ज्ञान नसल्यामुळे त्याची पूर्ण मेहनत त्याचा विकास करू शकत नाही. त्यासाठी या युवकांना प्रथम आपल्या शक्ती आणि त्याच्या किमतीची जाणीव करून द्यायला हवी. अश्या बेरोजगार युवकाची संख्या तुलनेने कमी आहे. मात्र सुशिक्षित बेरोजगार युवकाची संख्या भरपूर आहे ज्याचा विपरीत परिणाम देशाच्या विकासवर होत आहे.
वयाची 18 वर्षे पूर्ण झाली की तो भारताचा सक्षम नागरिक बनतो. त्याला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होतो. या वयापर्यन्त त्याचे उच्च माध्यमिक शिक्षण देखील पूर्ण झालेले असते. येथून पुढे त्याच्या जीवनाला कलाटणी मिळणार असते. या वयात घेतलेल्या निर्णयावर संपूर्ण आयुष्य अवलंबून असते. येथील निर्णय अचूक असणे आवश्यक असतात आणि येथेच चूका होताना दिसून येत आहे म्हणून खूप मोठी समस्या निर्माण होत आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेताना मुलांना भविष्यातील त्यांचे चित्र दाखविण्याचे काम शिक्षणाच्या माध्यमातून येथे करायला पाहिजे. काही व्यावसायिक शिक्षणाची ओळख येथे झाल्यास मुले त्या अभ्यासक्रमाकडे वळु शकतील.त्यांच्या मध्ये व्यवसाय विषयी गोडी निर्माण होईल. सर्वच मुले हुशार नसतात त्यामुळे त्यांच्या क्षमता ओळखून तसे शिक्षण घेण्याची सुविधा या स्तरावर मिळाले तर योग्य राहते. मात्र याच ठिकाणी मुलांना मार्गदर्शन मिळत नाही आणि भविष्यात ते भटकतात. एखादे कौशल्यपूर्ण शिक्षण पूर्ण केल्यास शिकलेल्या माणसाला त्यात मार्ग सापडतो. मात्र युवक या क्षेत्रात येण्यास तयार नाहीत.त्यांना बेकार फिरणे आवडत आहे मात्र काम करणे अजिबात आवडत नाही. कारण त्यांना या विषयी काहीच गंध नसतो, त्यांच्या मध्ये काम करण्याची चेतना जागीच केल्या जात नहीं. आज श्रमप्रतिष्ठा हे मूल्य कमी होत चालले आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. याचाच विपरीत परिणाम युवकाच्या जीवनावर झाला आहे किंवा होत आहे. रिकाम्या माणसाच्या डोक्यात भुताचा वास असतो असे इंग्रजीत एक वाक्य आहे त्यानुसार बेरोजगर युवक म्हणजे रिकामी डोके त्यामुळे त्यांच्या डोक्यात नेहमी भुताचा वास असतो. ते देशाच्या प्रगतीचे विचार करण्याऐवजी देश विघातक किंवा वाईट काम करण्यास प्रवृत्त होत आहेत. समाधानकारक जीवन जगण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे पैसा आणि पैसा कमविण्यासाठी काम करावे लागते. दे रे हरी पलंगावरी च्या वृत्तीनुसार आळसी बनलेल्या युवकांना काम न करता झटपट खूप पैसा मिळावा अशी अपेक्षा असते आणि त्यासाठी ते कोणतेही काम मग ते चांगले असो किंवा वाईट याचा अजिबात विचार न करता काम करायला तयार असतात. याचाच गैरफायदा काही लोक घेतात. देश विघातक कार्य करणारे काही समाजकंटक लोक अश्या गरजू युवकाना अलगद जाळ्यात अडकवितात आणि मग सुरु होतो त्याचा जीवघेणा प्रवास. ते अश्या दलदल मध्ये फसतात की त्यांची ईच्छा असून देखील त्यांना बाहेर पडता येत नाही. दहशतवादी किंवा नक्षलवादी बनण्यात युवकाची संख्या मोठी असण्यामागे हेच कारण नसेल कश्यावरुन ?
हाताला काम नसल्यामुळे हे युवक वाईट व्यसनाच्या विळख्यात अडकले आहेत. दारु पिणे, तंबाखू खाणे, चरस, गांजा, अफु याचे सेवन करणे आणि समाजात गैरवर्तन करणे असे प्रकार वाढीस लागले त्यास फक्त एकच कारण आहे ते म्हणजे युवकाच्या हाताला काहीच काम नसणे. त्यामुळे युवकास काम देणे गरजेचे आहे. रिकामटेकडे इकडून तिकडे फिरणे, दिवसभर अन रात्रभर फेसबुक आणि व्हाट्सएप्प सारख्या सोशल मिडियाचा जास्त वापर करणे, मित्रासोबत अवांतर गप्पा मारत बसणे याशिवाय सध्या युवकांना दूसरे काहीच काम दिसत नाही. सुखदेव राजगुरु आणि भगत सिंग यांच्या सारखी स्फूर्ती आजच्या युवकात दिसून येत नाही कारण आज आपण स्वतंत्र आहोत आपणास त्यासाठी कोणाला भांडण करत बसायचे काम नाही. याची जाणीव त्यांना झाली आहे. सर्व काही आयते मिळत आहे त्यांना त्यासाठी वेगळे कष्ट करण्याची गरज नाही. मुले रिकामी हाताने फिरत आहेत याची काळजी त्या युवकापेक्षा त्याच्या पालकाना जास्त आहे. शिक्षण घेतलेला युवक आज शेतात काम करायला तयार नाही. मग एवढं शिक्षण घेऊन काय फायदा असे त्याचे बोलणे असते. यात युवकाची स्थिती मात्र धोबी का कुत्ता सारखी झाली आहे ना घरचा ना घाटचा. काम नसलेल्या व्यक्तीला समाजात दुय्यम स्थान असते असे म्हणण्यापेक्षा कुणी ही विचारत नाही. समाजात आपली पत आणि प्रतिष्ठा मिळविण्यासाठी काम करणे अत्यंत महत्वाचे आहे.
देशातील गलिच्छ राजकरणाचे युवक बळी पडत आहेत. हुशार राजकारणी मंडळी या युवकांचा निवडणुकीच्या कामासाठी तात्पुरता वापर करतात आणि निवडणूक संपल्यावर वाऱ्यावर सोडून देतात. काही ठिकाणी असे दिसून आले आहे की बरीच नेते मंडळी आपल्या सोईसाठी काही युवकाचे पालनपोषण करतात. त्यांना आळशी बनवितात. यामुळे आत्ता युवकांनी जागे होऊन स्वतः राजकारणात शिरकाव करणे आवश्यक आहे त्या शिवाय देशाची प्रगती अशक्य आहे. युवकांनी रोजगाराच्या मागे न धावता आपण रोजगार तयार करणे देशाची गरज आहे. आज भारत देशाला नरेंद्र मोदी सारखे हुशार पंतप्रधान लाभले आहेत. त्यामुळे जगाचा भारत देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोण देखील बदलला आहे. मेक इन इंडिया सारखे उपक्रम देशात चालू झाले आहेत. आज देशाला हुशार, उद्योगी आणि कर्तबगार युवकाची खरी गरज आहे. युवक मित्रांनो आळस झटका आणि कामाला लागून एक समृद्ध भारत घडवू या.

- नागोराव सा येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
  09423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[8/28, 1:44 PM]
 *भारतातील बेरोजगारी: एक यक्षप्रश्न*

              भ्रष्टाचार,गुन्हे,महागाई या जश्या  भारतातील प्रमुख अडचणी आहेत,तसेच "बेरोजगारी" ही एक महत्वाची अडचण आहे,ज्याकडे दुर्लक्षच केल जात.हा 'बेरोजगारीचा' यक्ष प्रश्न सोडवण्यात आत्तापर्यंत किंचीतही यश आल नाही अस दिसुन येत..
बेरोजगारी वाढायला अनेक कारण आहेत.काही जणांची पात्रता असते,पण काही थोडक्या कारणांमुळे त्यांना "बेरोजगार" नावाचा ठप्पा सहन करवा लागतो.जसे कि अनुभवाची कमी,मागासवर्गीय आरक्षण ई.  या बेरोजगारीला नेमक कोणास कारणीभुत ठरवाव हे काही सांगता येत नाही.
आजकल विद्यापीठाची डिग्री घेतलेल्या कित्येक व्यक्ती बेरोजगार म्हणुनच आहेत.त्यांची पात्रता असुनही त्यांना दोन वेळच अन्न खाण्यासाठी पैसे कमवण अवघड जात.
मुळात बेरोजगारी वाढते कश्याने?
शहरातील झगमगाट पाहुन तसेच तशा ऐशोराम मिळावा म्हणुन खेड्यांतील व लहान गावांतील युवक शेतीभाती सोडुन शहरांकडे स्थंलांतर होतात.प्रत्येकाला नोकरी/रोजगार मिळतोच अस नाही.हातावर पोट असल्यासारख त्या त्या दिवशी कमवुन खातात.काहीजणांना आपली शिक्षणपद्धती अवघड-गुंतागुंतीची वाटते,काहीजणांची शिक्षण पुर्ण करण्याची अर्थिक पात्रता नसते.अशे युवक शिक्षण पुर्ण करु शकत नाहीत.तेही नंतर हळु हळु बेरोजगारीचा हिस्सा बनतात.आपल्या हिरव्यागार भारत देशात अनेक रंगाच्या अडचणी आहेत,त्यामध्ये बेरोजगार जास्त प्रमाणात आहे.
काहीठिकाणी फक्त अनुभवींना व कास्ट वाल्यांना प्राधान्य दिल जात.अशावेळी त्या कामाची पात्रता असतानाही ,पण  अनुभव नसलेले व ओपन कॅटॅगीरी मध्ये असलेले लोक हतबल राहतात.दुसरा मार्गही नसतो त्यांच्याकडे.
              'बेरोजगारी एक यक्ष प्रश्न' म्हणजे नेमक काय->पात्रता असणा-यांना त्यांच्या पात्रतेचा रोजगार कधी मिळणार?जे शैक्षणिकरित्या कमडोर आहेत,त्यांना कोणतातरी रोजगार मिळणे शक्य नाही का?आपली युवा पीढीच जर अशी हतबस राहिली तर प्रगती होणार तरी कशी??
हे व असे बरेच प्रश्न आहेत,जे खरच यक्ष आहेत.
विषय 'भारतातील' बेरोजगारीचा आहे,तर यासाठी आपल सरकार ही काही अंशी कारणीभुत असणारच.सरकारकडुन ब-याचशा संधी असतात,पण त्याही काही ठिकाणी दडपल्या जातात.लोक रोजगार करतील,मग कमवतील ही,मग आवश्यकतेसाठी खर्चही करतील,मग त्या खर्चाचा 'कर' हा असतोच,जो देशाच्या अर्थव्यवस्थेवर चांगला फायदेशीर होऊ शकतो.
2020 ला महासत्ता बनण्याच डाॅ.कलामांच स्वप्न पुर्ण होईल अस चित्र दिसत नाही.बेरोजगारीसारखे
प्रश्न जर *यक्षप्रश्न* बनुन राहणार असतील तर शक्यच नाही ते.
            एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे."जर योग्य मोबदला मिळत असेल तर कोणतही काम(चांगल) करायला लाजु नये"
ही बेरोजगारी हचवायची असेल तर यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण गरजेज आहे..सरकारणे,युवकांनी व पुर्ण सिस्टम ने.
आजकालचे युवक 'आशा' लवकर सोडतात.निराशेत तसच कोणाचातरी सहारा घेऊन बेरोजगारच राहतात..संधीचा पुरेपुर वापर करुन या समस्येला घालवता येऊ शकतच.
शेवटी प्रयत्नांती परमेश्वर.

निलेश सुरेश आळंदे.
गडहिंग्लज.(मो.8857912164)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[8/28, 1:53 PM] ‪+91 86980 67566‬
*भारतातील बेरोजगारी :यक्ष प्रक्ष*
रिकामे डोके सैतानाचे घर असते. हे आपण खूप वर्षापासून ऐकत आलेलो आहोत. एकविसाव्या शतकाचा सूर्य क्षितिजावर आला तो अनेक नवी स्वप्न घेऊन, त्याच वेळी लोकसंख्येचा भस्मासूर अनेक प्रश्न घेऊन दुसऱ्या बाजूनं येताना आपण पाहिला. भारतासारख्या मोठ्या देशात वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक मोठे प्रश्न तयार होत आहेत.
प्रश्न आणि तेही यक्ष असतील तर....?
भारतातील बेरोजगारी हा आज यक्ष प्रश्न आहे. महाकाय भारत आणि या भारतातील बेरोजगार तरुण ही मोठी समस्या होऊ शकते अर्थात आज चहूबाजूने एकामागून एक समस्या उद्भवताना दिसतात, या समस्या सोडविताना होणारी दमछाक, सर्वत्र बदलत चाललेली जीवनशैली , राजकिय पक्षाची विस्तारवादी धोरणं ही तरुणांना बिघडवणारी आहेत. आणि त्यातल्या त्यात बेरोजगार तरुण याला बळी पडताना दिसतात.
*"नळी आणि बाटली"* ला भूलवून या बेरोजगार तरुणांचा वापर करून घेऊन राजकिय पक्ष स्वतःचा स्वार्थ साधवून घेतात आणि मग पुढं हीच
पोरं टपोरीगिरी करत जीवन कंठतात. कधी याच्या तर कधी त्याच्या दावणीला बांधली जातात ही बेरोजगार तरुणं. रिकाम्या हाताला आणि रिकाम्या डोक्याला काम नसतं तेव्हा ते हात आणि ती डोकी नको त्या मार्गाकडं वळत असतात. जागतिक पातळीवर दहशत पसरवलेली इसीससारखी दहशतवादी संघटना अशा रोजगार नसलेल्या रिकाम्या हाताच्या आणि रिकाम्या डोक्यांच्या तरुणांना जवळची वाटू लागलीे. दिल्लीतील निर्भया प्रकरण असो वा कोपर्डीतील प्रकरण आणि अशी उजेडात न आलेली कितीतरी प्रकरणं जी रिकाम्या डोक्यांमुळे आणि रिकाम्या हातामुळे घडतात आणि घडत राहतीत. इंटरनेटच्या माध्यमातून आता जग अधिक जवळ आलेलं आहे. आईबापाच्या धाकात न राहणारी आणि अगदीच सैराट झालेली पिढी हातात महागाडा मोबाईल कोणत्याही पद्धतीनं प्राप्त करते आणि नको त्या साईटवर ( संकेतस्थळावर ) तासनं तास रमताना दिसतात. नसता फेसबुक व्हॉट्स अॅप वर चॅटिंग  मध्ये गुंग झालेली दिसतात. याच माध्यमातून नको त्या नव्या नव्या योजना डोक्यात जन्माला येतात. आणि त्या योजना साकारण्यासाठी वाम मार्गावर चालणारी ही बेरोजगार पिढी यक्षप्रश्न म्हणून समाजापुढे पर्यायाने देशापुढे आज उभी आहे. संस्कार नावाची गोष्ट सांगण्यापूर्ती आणि लिहण्यापूर्तीच शिल्लक राहिली.विकृतविचारधारा रिकाम्या डोक्याच्या आवडीची झाली आणि माणूसकी गोठून गेली संवेदना हरवून बसली. ज्या देशात असा असंस्कृतपणा वेगाने वाढू लागतो त्याच्या भविष्याबाबत चिंता वाटणे स्वभाविक आहे. जगात सर्वात तरुणांचा असणारा आपला देश पण दे रे हरी पलंगावरी असं म्हणत मोठं होणारी तरुण पिढी आळसाला चिकटू लागली. आणि तीच पुढं यक्षप्रश्न बनून गेली..
आता विचारा बरोबरच आचारही बदलण्याची गरज आहे.. देश मोठया अपेक्षाने आपणाकडे बघतो आहे. चला देश बदलू देश घडवू... !!
     
                    श्री. हणमंत पडवळ
             मु.पो. उपळे (मा.) ता. उस्मानाबाद.
                            क्र : -  48.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[8/28, 3:25 PM] ‪+91 90285 74285‬
 भाग १९ वा साहित्य दरबार स्पर्धेसाठी
भारतातील बेरोज़गारी  : एक यक्षप्रश्न
अखिल जगतामध्ये भारत लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रंमाकावर आहे. आपल्या देशाची लोकसंख्या १०० कोटीहून अधिक आहे. ज्या  भारत  देशात  पूर्वी  सोन्याचा धूर निघत  होता त्या देशात  आज ज्या  मुख्य  समस्यांना तोंड  द्यावे  लागते त्यातील  एक  महत्वाची समस्या म्हणजे प्रचंड  बेरोजगारी ची  समस्या आहे. एका सम्पन्न देशावर ही  वेळ  का  आली  याचा  खोलवर  जावून  विचार  केला  सर्वात  आधी बोट  सत्ता राबवणाऱ्य राजकीय  नेत्याकडे  जाते. बेरोजगारी नाहीशी  करण्यासाठी भारतात  असलेल्या उपलब्ध साधनसम्पत्ति चा वर्षानुवर्षे वापरच केला  गेला नाही. बेरोज़गारी वाढन्याचि कारणे शोधली गेली  नाहीत, तरुणांना आसणारे व्यावसायिक  शिक्षण देण्यासाठी शिक्षण पद्धतीत बदल केला गेला नाही, रोजगार निर्मीती केंद्रे  स्थापन  केली  नाहीत आणि स्वातंत्र्या नंतरच्या ७० वर्षाच्या  कालखंडात केवळ  सत्ताधीशांच्या प्रचंड इच्छा शक्तिचा अभाव  हेच भारतातील वाढत्या  बेरोजगारीचे  प्रमुख कारण आहे
         प्रती वर्षी लाखोच्या  संख्येने युवक पदव्यांची नुसती कागदी प्रमाणपत्र  घेवुन महाविद्यालया तून बाहेर पडतात त्यांच्या हातात  पदवी  असते परंतु व्यावसायीक ज्ञानाचा अभाव असल्यामुळे त्यांना आत्मविश्वासाने एखादा व्यवसाय उभा  करता येत  नाही, पदवी हातात  पडल्यावर युवकांचे  लोंढे नोकरीच्या शोधात भटकत असतात आणि प्रत्येकाला  नौकरी  मिळण्याईतपत व्यवसयाची निर्मीती झालेली  नसल्याने बेरोजगार युवकांची संख्या दिवसोदिवस  वाढते  आहे
 बेरोजगारी कमी करण्यासाठी काय करता येवू शकते..
सर्वप्रथम समाजात नोकरदार हाच सर्वोत्तम ही कल्पना  दूर केली पाहिजे
युवकांना अधीकाधिक व्यावसायीक  शिक्षण दिले पाहिजे
यूवकांना व्यवसाय उभारणीसाठी प्रोत्साहन दिले पाहिजे
राष्ट्रीयक्रूत बॅकानीं युवकांना कमी व्याजदरात कर्ज दिले  पाहिजे
या बरोबरच  अनेक उपाययोजना अमलात आणता येतील जेणेकरुन यावर मात करता  येवू  शकेल.
                 सध्या प्रधामंत्री महोदयानी मेक इन इंडीया हा  उपक्रम चालू केलेला  आहे  त्यावर
टिकां करीत वेळ घालवण्यापेक्षा आलेल्या  संधीचा पुरेपूर उपयोग  करून घ्यावा आणि बेरोजगारी या संकटावर मात करावी. रिकामे मन सैतानाचे घर असू शते पण उद्योगी मन कूबेराचे भांडार असते, युवकांनी  अपयशाची  भिती न  बाळगता उद्योगात पडले पाहिजे. उद्योगात पडा, पळता येत  नसेल  तर चाला, चालता येत  नसेल  तर  रांगा. रांगाताही येत नसेल तर एकएक इंच पुढे  सरकां पण घाबरु नका, कारण  प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत  नाही.
              विधीज्ञ अमोल देशमुख - ५७ माजलगाव
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[8/28, 3:41 PM] ‪+91 94231 53509‬
 *साहित्य दरबार*

*भारतातील बेरोजगारी : एक यक्ष प्रश्न*

     *जहाँ डाल डाल पे सोने की चिडियाँ करती है बसेरा , वो भारत देश है मेरा.* असे सुवर्णमयी वर्णन केलेल्या आमच्या देशात आज बेरोजगारांचे रिकामे हात पाहिले की, मन अगतिक होवून जाते.
         रिकामे डोके सैतानाचे घर, असे आपण संबोधतो. मग हे डोके जर रिकामे राहू नये असे वाटत असेल तर, नक्कीच त्या हातांना काम हवे. वर्षानुवर्ष भारत हा प्रगतशील देश आहे असे संबोधले जाते. त्यामुळे एक समस्या सुटत आली की , दुसरी समस्या आपल्या समोर उभी राहते, त्यातच बेरोजगारी ही तर न संपनारी समस्या असे वाटते.
           औद्योगिक क्रांती झाली आणि ही बेरोजगार समस्या निर्माण झाली. मशीन व तंत्रज्ञान याचा वापर वाढला आणि मनुष्यबळाचा वापर कमी होत गेला. त्या क्रांतीने इकडे बेरोजगार वाढले. ज्या देशात मनुष्यबळ कमी आहे त्यांसाठी हे वरदान होते , मात्र भारता सारख्या देशासाठी ही क्रांती उपयोगी ठरताना दिसत नाही.आपल्या देशात मनुष्यबळ सहज उपलब्ध होवू शकते.
           कारखानदारीने कामगार वर्ग वाढला मात्र आज अनेक कारखाने बंद पडत आहे किंवा कामगार कपात होत आहे, त्यामुळे सामाजिक स्वास्थ बिघडत चालले आहे. ग्रामिण व शहरी भागात या बेरोजगारीच्या समस्या वाढताना दिसत आहे.
         त्याचाच परिणाम म्हणून वर्तमान पत्र उघडले की प्रत्येक पानावर आज दरोडा, लुटमार, चोरी , ऑनलाईन फसवणूक, सायबर क्राईम इ. प्रकार घडत आहेत. बेरोजगारीने या प्रकारात वाढ झालेली आहे असे ठोकपणे आपण सांगू शकतो.
      आज गाडी चा दरवाजा ठोठावून
भीक मागणारे हात , उदया गाडी अडवून लुटमार न करोत सामाजिक स्वास्थ नक्कीच बिघडणार आहे. शिकून शिक्षितांचे लोंढेच्या लोंढे आज बाहेर पडत आहे व त्या हातांना काम देण्याची कोणतीच भक्कम योजना आमच्या सरकारी यंत्रणेकडे दिसत नाही.आम्ही सपशेल अपयशी झालो आहोत.
          हाताला हवे काम, कामाला मिळावा योग्य दाम, मात्र तसे होतांना आज दिसत नाही. सरकारी नोकऱ्याची मारामार त्यातच करार तत्वाचा वापर करून नोकर भरती होत आहे.कामाचा दर्जा खालावणे बरोबरच वेगळ्या समस्या निर्माण होत आहे. अनेक विदयार्थी घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करू न शकल्याने नशापान व आत्महत्या प्रकाराकडे वळतांना दिसत आहेत.
         अखेरचा कळस म्हणजे या बेरोजगारी मुळे अनेक युवा वर्ग अनेक खतरनाक अशा दतशतवादी संघटनेकडे वळतांना आपनास दिसत आहेत. तसेच बाहेर प्रांतातील येणारे लोंढे त्यामुळे होणारा प्रांतवाद ही सुद्धा नवी समस्या उदयास आली आहे. त्याच प्रांतवादातून धार्मिकता विवाद उत्पन्न झाले आहेत.
         आम्ही जर उदयाची सुंदर भारताची स्वप्न पाहणार असू तर, प्रत्येकाला काम कसे मिळेल या बाबद विचार मंथन करुन रोजगार निर्मितीचे नवे क्षेत्र शोधावे लागतील. या युवा शक्तीने सत्ता परिवर्तन केले आहे, हीच युवा शक्ती बेरोजगार होवून रस्त्यावर उतरली किंवा चुकिचा मार्गावर मार्गक्रम करायला लागली तर....
        आपल्याला त्यांना आवर घालणे कठिण होईल ,वेळीच आपण ही वादळा पुर्विची शांतता ओळखायला हवी, कारण ही बेरोजगारीची समस्या तुमच्या आमच्या उंबरठ्यावर येवून ठेपली आहे असे वाटते ...

*किशोर भीमराव झोटे@32*
*औरंगाबाद*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[8/28, 3:47 PM]
भारतातील बेरोजगारी-- यक्षप्रश्न                    
भारताची सुजलाम सुफलाम म्हणून ओळख आहे.पण या देशाला सदैव एक चिंता ग्रासतेय ती म्हणजे येथील बेरोजगारी...लोकसंख्येच्या शर्यतीत भारत अव्वल स्थान स्थापन करेल यात तीळमाञ शंका नाही,परंतू अनेक लोकांचा उदर निर्वाह पोटा पाण्याचा प्रश्न अजूनही अनूत्तरीतच आहे...पदवी घेतलेले तरुण ही नोकरीच्या शोधात भरकटलेत,.. अशिक्षित पणाचा तर उच्चांक असेल कदाचित ....कुटुंबातील कर्त्यानी रक्ताचे पाणी करुन आपल्या लाडक्या लेकरांना उच्च शिक्षणाचे द्वार खुले केले ..अमाप कष्ट करुन शिकवले घडविले,हे सत्य नाकारता येत नाही ..पण बेरोजगारीच्या किडीने आपला माणुस पोखरलाय...आज त्याला निर्भिडपणे जगता येत नाही. कुटूंबाचा बोजवारा वाहून  वाहून तो पुरता बेजार झालाय. याचं मुळ म्हणजे बेरोजगारी .. वाढती लोकसंख्या ,ढासळलेली अर्थव्यवस्था , खाकी बगळ्यांनी केलेली गलीच्छ राजकारण हे ही तितकंच झोंबनारं सत्य बेरोजगारीला खतपाणी घालणारं कारण असावं असं नक्कीच वाटतं...माणसाच्या तीन गरजा म्हणजे अन्न ,वस्ञ,निवारा भागणं म्हणजे याला प्रगती नाही म्हणता येणार, शिक्षण ,नवे नवे तंत्रज्ञान या सर्व गोष्टी यशो प्रगती पथावर पोहचल्या पाहिजे...तरंच भारत बलशाली महासत्ता होऊ शकतो. त्याच बरोबर बेरोजगारी चा प्रश्न ही बर्यापैकी मार्गी लागू शकतो ,आज कित्येक कुटुंब दारिद्रेत जगतंय. जिथे पोटापाण्याचा प्रश्न सुटू शकत नाही ..तिथे समाजासाठी आपल्या देशासाठी माणुस काहीच प्रगती करु शकत नाही..बेरोजगारीचे जर मुळ उपटून टाकायचे असेल तर सरकारने छोट मोठे उपक्रम राबवून,लघूउद्योगांना चालना देऊन मोकळे हात राबवावे...तरच कुठेतरी आशेचा किरण उगवेल..आणी प्रगतीचा चढता आलेख नक्कीच उंचावल्या शिवाय रहाणार नाही.तुम्ही आम्ही जेव्हा राबते होऊ तेव्हा हर एक चिंता नक्कीच मिटली जाईल.चार पैसे मिळतील..त्यातून शिक्षण कुटूंब उदरनिर्वाह योग्य दिशेने वाटचाल राहिल...हळू हळू बेरोजगारी नाहिसी होईल.          
रोहिदास होले ,..७१            
गोपाळवाडी ,दौंड ,पुणे......          
मो. ९०२८३४१५३६
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[8/28, 3:50 PM]
साहित्य दरबार_
==================

_भारतातील बेरोजगाहारी_-
_एक यक्षप्रश्न_

==================

भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात प्रामुख्यान शेती हा व्यवसाय चालला जात असे परंतु जसजशी बौद्धीक प्रगती झाली तशी माणसामध्ये *लाज* ही वाढत गेली मग ती लाज ही मुक्त वागण्याची,बोलण्याची,खाण्याची, बसण्याची,हसण्याची,अश्या अनेक लाजेत महत्वाची *लाज* म्हणजे *काम* करण्याची लाज जास्त वाटू लागली आपण इतके शिकलो मग त्याला साजेसच काम असावं कोणतही काम करण म्हणजे आपल्या प्रतिष्ठेला लाजवणार असेल आणि याचमुळे ठणठणीत हट्टेकट्टे तरूण हे *बेरोजगारी*च्या विळख्यात आडकली आहेत.

एके ठिकाणी वाचलेली गोष्ट..
दोघे मित्र असतात एक साधरण हुशार नि दुसरा चागंला हुशार पंरतु आरक्षणामुळे कमी हुशार हा पोलीस नि दुसरा चोर बनतो नि तोच त्याला पकडतो. आता यातुन हाच बोध होतो की हुशारी असून देखील त्याचा योग्य तो वापर होत नाही नि ही तरूण पिढी नको त्या अवमार्गाला लागते नि बोरोजगारीला सामोरे जाते आहे. आजकालच्या तरूणांना दुसरी गोष्ट कमी श्रमात जास्त पैसा हवाय मग त्यासाठी शाँर्टकट निवडण्याच्या नादात काहीच कामधंदा करत नाहीत. शिवाय प्रसार माध्यमाला बळी पडून केवळ ऐशोआराम नि चैन याकडे तरूण पिढी वळत आहे.

योग्य वयात *योग्य मार्गदर्शनाचा अभावही* बेराजगारीला कारणीभूत ठरत आहे.कारण शाळा काँलेजातुन त्याच्यात योग्य ती दिशा दिली म्हणजे त्याच दिशेन ती झपाटली जातील परंतू इथे विपरीत प्रकार घडतांना दिसतो काही पाल्य गडगंज श्रीमंताची असतात मग ती इतर मुलांना व्यसनाच्या विळख्यात ओढतात नि मग हिच मुल भरकटून दिशाहिन होतात पर्यायी पुन्हा बेरोजगारीच्या कारखाण्यात भर म्हटल्यासारखी भर ही होते.
आजकाल *हम दो हमारे दो* यामुळे मुल लाडावलीत मग काय आईवडिलांच्या जिवावर ऐशोअराम नि मग पुन्हा वेळ निघुन गेलास पुन्हा *बेरोजगारीचाच यक्षप्रश्न*


सरतेशेवटी मी हेच म्हणेल बेरोजगारी ही जाणिवपुर्वक निर्माण झालेली नि केलेली या तरूण मुलांची आहे.आज रिओ मध्ये या अबला म्हणवणाऱया कोवळ्या पोरीसोरी उतुंग कामगिरी करतात मग हा आदर्श का ठेवत नाहीत ही तरूण मुल ? आता एकच *झणझणीत सत्य*आपणासमोर मी मांडते की का हो कोणी म्हणते का आमची मुलगी बेरोजगार आहे ? नाहीच म्हणू शकत कारण ती या पुरूषप्रधान म्हणवणाऱया देशात घरात बसुनही लघुउद्योग नि कुटीरद्योग करते,धुणीभांडी करते,विणकाम,करते,पार्लर चालवते,शिवणकाम करते  मग तिथ विचार नसतो हे तिला साजस दिसेल कि नाही . ती फक्त रिकामी राहणे पंसत करत नाही नि बेरोजगार म्हणवणही म्हणुनच या तरूण पिढीन कामाची *लाज* जर बाजूला सारली तर नक्कीच  *भारतातील बेरोजगारीचा यक्षप्रश्न* हा सुटल्या शिवाय राहणार नाही.

तरूणानो विचार करू नका कामाला लागा नि बेरोजगारीचा ठपका मिटवण्यास सिद्ध व्हा!!!!!!!
🖊🖊🖊📖🖊🖊🖊

*कल्पना जगदाळे@8★बीड*

       *👆🏿स्पर्धेसाठी👆🏿*

👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[8/28, 4:10 PM]
🌹 साहित्य दर्पण ग्रुप आयोजीत 🌹
                📕साहित्य दरबार📕

🙏भारतातील बेरोजगारी➖एक यक्ष प्रश्न  🙏
    माणसाच्या तीन मुलभूत गरजा आहेत त्या म्हणजे अन्न वस्र व निवारा या गरजा पूर्ण करण्यासाठीच माणूस अहोरात्र झटत असतो
    आजचा चिंतनाचा विषय म्हणजे बेरोजगारी माझ्या मते बेरोजगारी ची अनेक कारणे आहेत त्यापैकी पहिले कारण म्हणजे आजची शिक्षण पध्दती शिक्षण हे व्यवसायाभिमुख असावे असे म्हटले जाते पण प्रत्यक्षात तस होत नाही वारंवार बदलनारे शैक्षणिक धोरण यामुळे शिक्षणाचा बट्याबोळ झालेला आहे फक्त कागदी घोडे नाचवण्यात किंवा शिक्षणवरचे प्रयोग करण्यातच एक एक अभियान संपत आहे प्राथमिक शिक्षणापासूनच मुलांना व्यवसाय शिक्षणाचा कल पाहून संधी दिली पाहिजे अनेक काम ही कुशल कामगाराकडुन करुन घेण्यासारखी आहेत त्यात सुतारकाम लोहारकाम टेलरकाम गवंडीकाम कुंभारकाम सोनारकाम चप्पल तयार करणे अशी कितीतरी मोठी यादी आहे की जी दैनंदिन जीवनासी लागणार्या वस्तुशी निगडीत आहे आज आपण पहातो की काही कामे हि जातनिहाय करावयाची आहेत असा गोड गैरसमज माणसामध्ये निर्माण झालेला आहे परंतु हिच कामे जर आवडीनुसार केली गेली तर त्यातील गुणवत्ता तर वाढेलच पण बेरोजगाराच्या हाताला कामही मिळेल व थोड्याफार प्रमाणात जातीची लेबलं कमी होण्यास मदत होईल शालेय अभ्यासक्रमात त्यासाठी प्राधान्य देणे आवश्यक आहे
  बेरोजगारीचे दुसरे कारण आहे लोकसंख्या➖लोकसंखेच्या बेसुमार वाढीमुळेच बेरोजगारी वाढली असे म्हटले तरी वावगे ठरनार नाही खाणारी तोंडे जास्त व काम करणारे कमी यामुळे कुटुंब विस्कळीत झालेली पहायला मिळतात म्हणुन  शासनाच्याधोरणा प्रमाने मर्यादित कुटुंब असावीत
     तिसरे कारण आहे अंधश्रध्दा व रुढी परंपरा माणसाने कोनतेही काम करण्याची तयारी ठेवली पाहिजे➖खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी➖ अशी काहीजनांची मानसिकता असते काम करण्याची लाज वाटते किंवा मी जर हे काम केल तर मला लोक काय म्हणतील असा विचार काहीजन करतात यामुळे कधी कधी उपासमारही होवू शकते
   खरतर प्रत्येकाला वाटते मला नोकरी असावी पण ते शक्य नसते पण मिळेल ते काम करण्याची मानसिकता जर ठेवली तर कुणीही बेरोजगार राहणार नाही फक्त त्या कामावर निष्टा असावी
    भारत हा शेतीप्रधान देश आहे खरतर आधुनिक तंत्र ज्ञान वापरुन शेती केली तर किती तरी फायदा होवू शकतो त्यासाठी  शिकलेल्यांनी शेती डोळसपणे करावी शेती करणे म्हणजे कमीपणा नाही हे लक्षात घेतले पाहीजे जे बाजारात विकते ते पिकवले पाहिजे
      तरुन पिढी ही आळसी ऐतखावू बनत आहे आणी त्यातुन गुन्हेगारी वाढत आहे हे आपण लक्षात घेतले पाहीजे जर या गोष्टीला वेळीच आळा घातला नाही तर याचे परिणाम भयानक होणार आहेत भारतातील दारिद्र्यही याला एक कारण आहे म्हणूनच प्रत्येक व्यक्तिच्या हाताला काम मिळालेच पाहिजे एकिकडे भरमसाठ संपत्ती जमा करत आहेत तर दुसरी कडे खायला अन्न नाही हि विषमताही दूर होने गरजेचे आहे
          खेडकर सुभद्रा बीड (२०)
    मो नं(९४०३५९३७६४)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[8/28, 4:15 PM] ‪+91 99752 32602‬
📚 साहित्य  दर्पण Whatsapp ग्रुप  📰🖊
     द्वारा आयोजित

भारतातील बेरोजगारी :एक यक्षप्रश्न

बेरोजगारी ही अशी अवस्था आहे रोजगार करू ईच्छिनारयांचि संख्या जास्त असने पण रोजगार उपलब्ध नसणे. याला आपन ढोबळ मानाने बेरोजगारी मनु शकतो.
बेरोजगारी चे बरीच कारणे आहेत.
त्यात मुख्य कारण लोकसंख्या. भारतात सन 1981-1991 दरम्यान लोकसंख्येत तब्बल 16 कोटिंची वृद्धि झाली तेंव्हा पासुनच बेरोजगारीन भारताला ग्रासल आहे.
इ.स. 2010 मधे बेरोजगारीचा दर 10 टक्के होता तो 2011 मधे 9.5 तर 2015 मधे 5-6 टक्के आहे.
बेरोजगारी दरात म्हणावी तशी घट होत नाहिए. त्याला पन बरेच कारणे आहेत. आपल्या शैक्षणिक संस्थानातुन बाहेर पडनारे अकुशल विद्यार्थी. म्हणजेच सुशिक्षत बेरोजगार.
त्यांचा अकुशलतेमुळे त्याना रोजगारासाठी दरोदार भटकाव लागत आहे. अशी अकुशल विद्यार्थी पास कसे होतात तो वेगळा प्रश्न आहे त्या त्या महाविद्यालय व विद्यापीठांना माहीत.
भारतात शेकडो इंजिनीरिंगची महाविद्यालय आहेत त्यातून हाजारो विद्यार्थी पदव्या घेऊन बाहेत पड़त आहेत पण कुशेलतिची कमतरता असल्याने फक्त 5-10 टक्केना चांगला रोजगार उपलब्ध होत आहे तर 25-30 टक्के नाम मात्र पगारावर नोकरी करतात.

तसेच लाखो विद्यार्थी दरवर्षी विविध पदव्या घेऊन बाहेर पडतात.पण सरकारी नियोजन व अकुशलता त्यांना रोजगार भेटू देत नाही.
भारतात सगळ्यात कमी बेरोजगारी गुजरात मधे आहे 1.2 टक्के म्हणजेच गुजरात मधे दर हजार व्यक्ती मागे 12 व्यक्ति बेरोजगार, महाराष्ट्रात 28 तर कर्नाटकात 18. सिक्किम व हिमाचल प्रदेशात सर्वात जास्त बेरोजगारी आहे. तिथे प्रमाण हजारामागे 100 पेक्षा जास्त आहे.
भारतातील ग्रामीण क्षेत्रातील बेरोजगारी 4-5 टक्के आहे.तर शहरीभागात 5 टक्के.
शेती क्षेत्रात 12 महीने रोजगार उपलब्ध होत नसतो त्यामुळे सुद्धा सत्र निहाय बेरोजगारी कमी जास्त होते त्यांच्याकडे दूसरा प्रयाय उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.
भारत सरकारने बेरोजगारी दूर करण्यासाठी अनेक योजना आखल्या व अंमलबजावणी झाली राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम, जवाहर रोजगार योजना, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना (मनरेगा)  आता स्किल इंडिया, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया त्यामुळे थोड़ा फार फरक नक्कीच पडला आहे.
पण उत्तर प्रदेश सरकारन बेरोजगारीच चांगल पालन पोषण ( मतांच पोषण) करायच ठरवल आहे, कारण तिथ बेरोजगार भत्ता दिला जातोय त्यासाठी 80 लाख जनांनी नोंदनिही केलि आहे. आशा योजनांनी बेरोजगारी कशि दूर जाईल ते आखिलेषच सांगु शेकतील.
केंद्र व राज्य सरकरांनी एकत्रीत काम केल पाहिजे.

                                                                                                             अमोल अलगुडे
                                                                                                                  निलंग                                                                                                        9975232602

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[8/28, 5:19 PM]
📚साहित्य दर्पण व्दारा आयोजित 📚
साहित्य दरबार वैचारिक लेखमाला
***********************
भाग------एकोणविसावा
दिनांक ---28-8-2016
***********************विषय---भारतातील बेरोजगारी---एक यक्ष प्रश्न
***********************
भारत हा 70 % खेड्यानी बनलेला देश आहे.या खेड्यांचा विकास झाल्या शिवाय देशाची प्रगती अशक्य आहे .कारण आज 50%युवक हा खेड्यात बेरोजगारीच्या विळख्यात सापडला आहे. देशाचा विकास हा त्या देशातील तरुणाईंच्या कतृत्वावर अवलंबुन असतो.त्याशिवाय देशाची अर्थव्यवस्था बळकट कशी होणार ? आज देशात अनेक तरुण बेरोजगार असल्यामुळे भारतापुढे अनेक समस्यापैकी बेकारीची समस्या आ वासुन उभी आहे.
बेकारी वाढण्याची अनेक कारणे आहेत.शिक्षणव्यवस्था हे एक प्रमुख कारण आहे .जपान प्रमाणे आपल्या देशातही व्यावसायिक शिक्षण हे प्राथमिक स्तरापासुनच असणे आवश्यक आहे.जेणेकरुन विद्यार्थी प्राथमिक शिक्षण पुर्ण केले की स्वतः व्यवसाय करीन खेड्यातील तरुण शहराच्या झगमगाटाला पाहून शहराकडे आकृष्ट होतात आणि खारी समस्या तेथुनच सुरु होते.कारण बेरोजगारीलाअनेक कारणे आहेत.तंत्र शुध्द शिक्षणाचा अभाव,लोकस.ख्येचा भस्मासुर,आणि तरुणांना बिघडवणारी राजकीय पक्ष. ही कारण प्रकर्षाने जाणवतात.शिकुन तरुण मुलं नुसत्या पदव्या गोळा करीत आहेत आणि बेकार होत आहेत.तर काही तरुण अर्ध्या वर आपले शिक्षण सोडून बेकार होत आहेत.तांत्रिक शिक्षण न घेतल्यामुळे कुशल कारीगिर मिळत नाहीत आणि मग वेळ वाचवण्यासाठी बरीचशी कामे यंत्रामार्फत करुन घेतली जातात.म्हणजेच बेकारीत भर पडते.उज्वल भवितव्याच्या पुर्ततेसाठी प्रयत्न, जिद्द, चिकाटी हे गुण आजच्या तरुणामध्ये  दिसत नाहीत.त्यामुळे तरुण उदासिन बनतात.दैवाला बोल लावत हा तरुण आळसाला कुरवाळत बसतो.आळशी मनुष्य हा दगडासारखा असतो.रिकामे हात आणि रिकामे डोके या बेकार तरुणांना स्वस्थ बसु देत नाहीत.मग त्यातुन गुन्हेगारीचा जन्म होतो , गुन्हेगारीतुन व्यसनधिनता वाढीस लागते. या सर्व गोष्टी राजकारण्यांच्या लक्षात येत नाहीत का ? पण स्वतः ची तुंबडी भरण्याच्या हव्यासापुढे त्यांना काही सोयरसुतक नाही "गाव जलो हनुमान बाहर".
आज आपण पहातो शहरे आणि खेडी यात प्रचंड दरी आहे, खेडूत हे निरक्षर आहेत

त्याचे तोटे ते पिढ्यान् पिढ्या भोगत आहेत अडाणी पणा मुळे ना नोकरी ना धंदा ना विकासाची ओढ, धनवान बुद्धिमान थोडे अडाणी दरिद्री नारायणच भरपुर . रिकामपण वेळेचआणि बुद्धीच ! फावला वेळ पारावर फुकट दवडला जातो, दारिद्रय रेषा डोक्यावर
राहुन मान अडकते सावकारी पाशात, जीव घेतात ते पाश.
खेड्यांत अनेक सुविधांचा अभाव असतो हे खरे पण आपणाला चित्र बदलायचे आहे ना ?मग शिकलेली माणसे खेड्यात गेली तर साक्षरता, आरोग्य  तंत्रज्ञान या गोष्टीचे ज्ञान आपल्या बांधवाना दिले तर काही प्रमाणात सावकारीचे पाश ढिले होतील आधुनिक शेतीने हरितक्रांती होईल आणि काही अंशी बेरोजगारीला आळा बसेल.
मुलांजवळ पात्रता  आहे पण मुलाखतीला गेल्यावर अनुभवाला प्राधान्य , पण मी म्हणते नोकरी दिली गेली नाही तर अनुभव कोठून मिळणार. आणि भ्रष्टाचार, वशिले बाजी या आनेक कारणांमुळे बेकारीत वाढ होत आहे.कोशल्य असुनही न्याय मिळत नाही म्हणजेच समाजवादाने व्यक्तिगत कौशल्य मारले जाते तर भांडवलशाही पिळवून टाकते राष्ट्रांच्या प्रगती साठी या दोन्ही गोष्टीचा योग्य वापर व्हायला पाहिजे. तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन  मिळाले पाहिजे.उद्योग धंदे वाढले परंतु मनुष्यबळाचा वापर न केल्यामुळे आणखी बेकारी वाढली .
बेकारी वाढण्याचे आणखी  एक कारण म्हणजे जातीयता. जात हि माणसाची पात्रता ठरवु लागली , परीणामी लायकी , बुद्धिमत्ता , कार्यक्षमता नसलेले उच्च पदस्थ झाले.मग राष्ट्रांला दिशा योग्य कशी मिळणार ?
          प्रांतियता हे ही एक कारण बेरोजगारीचे आहे.बेरोजगार असल्यामुळे आजचा तरुण अनेक चुकीचे निर्णय घेत आहेत्यांच्यात  जीवनाचा खटारा दुःखाच्या  चाकोरीतुन रें-रें करीत चालला आहे. या तरुणांना पैशाचा मोह दाखवून त्यांच्या कडुन देशविघातक कृती करवुन घेतल्या जात आहेत त्यामुळे आजचा तरुण व्यसनाच्या विळख्यात अडकला आहे. जीव तळतळतो तो आई बापाचा  ! आपला मुलगा वाईट वळणाला गेला हे दुःख  उराशी घेऊन ते मरणाला जवळ  करतात.बेरोजगारीमुळे आजचे तरुणआपल्या मुलांना शिक्षण ही देऊ शकणार नाहीत मग उद्याचा भारत कसा असेल, कर्जात जन्म,सरळ व्याजात वाढ,आणि चक्रवाढ व्याजात मृत्यू !! असा देश बघायचा नसेल तर शासनानी   नोकर भरती करावी ,संस्थाना मान्यता देऊन चरायला कुरणे देऊ नयेत,व्यावसायिक शिक्षण द्यावं,पात्रतेवर नोकरी असावी ,मनुष्य बळाचा वापर करणाऱ्या कारखान्यांना परवानगी द्यावी, आणि तरुणानी कोणत्याही कामाची लाज  न बाळगता काम उत्साहाने करावे. नोकरीवर अवलंबुन न राहता तांत्रिक प्रशिक्षण घेऊन स्वतःचा स्वतंत्र  व्यवसाय उभारावा , शासनाने बँके मार्फत कमी व्याज दरात आर्थिक पाठबळ द्यावे .तरच आपला भारत देश बेरोजगारीच्या विळख्यातुन सही सलामत बाहेर पडेल.
***********************
स्पर्धेसाठी
सौ.मीना सानप बीड @ 7
9423715865
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[8/28, 5:48 PM] ‪+91 87962 61088‬
 🌹 स्पर्धेसाठी 🌹

भारतातील बेरोजगारी (बेकारी) हा भारतासाठी यक्ष प्रश्न आहे ....
प्राचीन काळामध्ये भारत आर्थिक दृष्टि ने पूर्णत: सम्पन्न देश होता. त्यामुळे  भारताला ‘ सोने की चिड़िया ‘ असे संबोधले जात असे . पण आज भारत आर्थिक दृष्टि ने विकासशील देशांमध्ये येतो . आज ईथे  कुपोषण आणी बेरोजगारी आहे . आज आपल्या देशात जी अव्यवस्था व्याप्त आहे , त्याचं मुळ बेरोजगारी ची बिकट समस्या आहे . लूट-मार , चोरी डाका, हड़ताळ ईत्यादी  चे हे दुष्परिणाम आहेत . बेरोजगारी म्हणजे काय थोडक्यात पहा ....बेकारी म्हणजे किमान वेतन स्विकारून  व्यक्ती काम करण्यास तयार असणे परंतु कामाची उपलब्धता नसणे. बेकारी म्हणजे व्यक्तीला उत्पन्नाचे साधन कुठलेही नसणे असेही म्हणता येते. अर्थव्यवस्थेच्या पातळीवर रोजगार इच्छुकांच्या संख्येपेक्षा कामाची उपलब्धता कमी असेल, तर त्या अर्थव्यवस्थेत बेकारी किंवा बेरोजगारी आहे असे म्हणता येते. भारतात विशेषत: ग्रामीण भागात बेरोजगारीची समस्या तीव्र आहे असे मानतात कारण कामाची उपलब्धता कमी आहे. बेकारीमुळे दारिद्र्य येते. देशातीला काम करण्याजोग्या वयोगटातील एकूण लोकसंख्या भागिले बेरोजगार लोकांची संख्या असा भागाकार मांडला की देशातील बेकारी दर काढता येतो. अशी सरासरी काढताना अनेक गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात जसे देशाच्या शासनाची धोरणे, देशातील जनतेचा वयोगट वगैरे. बेकारी ही समाजासाठी एक वाईट गोष्ट आहे तरीही काही प्रमाणात बेकारी असणे नैसर्गिक आहे...

 भारतात  बेरोजगारी ची समस्या चे निरसन शक्य नाही  तरीही प्रत्येक समस्येवर  उपाय असतोच..
या समस्येवर  उपाय  करण्यासाठी  मानसीकता बदलण्याची  गरज आहे . मनोभावना बदलण्याची  गरज आहे

 तात्पर्य – कोणत्याही  कामाला कमी न समजणे कींवा  कमी न लेखने
युवावर्गाची मानसीकता  ही असायला  हवी  की  शिक्षण  घेवुन  स्वावलंबी  बनने....

 एक कविता ....ती अशी. ..
                   
मैं एक बेरोजगार हूं
                   
               
 बड़े-बुजुर्गों की नजर से
                     
मैं आज बेकार हूं।
               
 इम्प्लॉयमेंट एक्सचेंज मेरा
                       
आज शिवाला है,
                   
 फॉर्म भरते-भरते मेरा
                 
 निकल गया दिवाला है।
                     
अब अंतिम आसरा
                 
केवल बेरोजगारी भत्ता है,
                   
जिसकी कि निर्णयकर्ता
                       
आने वाली सत्ता है।
                   
गहन धूप हो या बरसात
                   
 मैं करता हूं एक ही बात,
                     
हे ईश्वर! कहीं से कर दो
                 
एक अदद नौकरी की बरसात।
                         
नौकरी बन गई है
                 
सामाजिक हैसियत का पैमाना,
                     
  उसने आज तोड़ दिया
  सामाजिक समरसता का ताना-बाना।
               
नौकरी पर्याय है नौकरशाही की
             
नौकरी पर्याय है लालफीताशाही की,
                 
तमाम डिग्रियां और उपलब्धियां
                       
नौकरी की मुहताज हैं
  रोजगार पाने वाला हर व्यक्ति सरताज है।
         
   ऐसे में है प्रभु! एक बेरोजगार क्या करे?
               क्या नौकरी खोजने का रोजगार करे?......

📝 पियु जाधव 📝
       🌹 पुणे 🌹

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~









Wednesday, 24 August 2016

टर्निंग पॉइंट

[8/24, 3:28 PM] ‪+91 90117 42342‬
 🌺माझ्या जीवनातील टर्निंग पॉईंट🌺
                              प्रत्येकाच्याच जीवनात असा एखादा क्षण येतो क़ि ज्यामुळे आपले अख्खे आयुष्यच बदलून जाते.अशाच एका क्षणाने मझेही आयुष्य बदलून गेले.ज्या जीवनाचा मला कंटाळा आला होता त्या जीवनाला मी हसतमुखाने स्विकारल ते याच क्षणामुळे तो क्षण म्हणजे 'माझे लग्न'.पण हा सुखद क्षण येन्या अगोदर खुप दुःखाचे डोंगर पार करावे लागले.ती माझी कहानी मी माझ्या कवितेतून मांडणार आहे.माझे हे सुख दुःखाचे क्षण माझ्या। दर्पण परिवरासोबत शेअर करायला आवडेल मला. प्रथम हा विषय निवडल्यामुळे ना.सा.सरजींचे आभार व कौतुकही करते.कारण माझ्या मनातील। विचारांच्या दाटीला यामुळे शब्दातून व्यक्त करायला मोकळी वाट मिळाली.                    
 माझ ही होत एक गोजीरवान घर                         त्यात होती आईची माया, आबाची छाया, भाउच प्रेम ताईची साथ जगावेगळी होती माझ्या आईची माया। म्हणून कोनतेच काम गेले नाही वाया।जगावेगळी होती माझ्या आबाची माया ,जसी वृक्षाएवढी छाया।भाऊ ची होती मला साथ , डोक्यावर असे आशीर्वादाचा हात।ताई ची होती केविलवानी काया ,करत होती माझ्यावर मनस्वी माया।।
     एक दिवस हेच गोजिरवाने घर झाले बेघर ।
कदाचित नियतिला हे पहावल नसाव।।
बाप गेला सोडून मला एकटिला टाकून                
भाऊनी सोडली साथ गेला आशीर्वादाचा हात ताई गेली लग्न करून धरून पतिचा हात नाही मिळाली मला तिची ही साथ।। या घरटयातील सर्व पाखरे उडून गेली राहिलो फक्त मी&आई।😌😌घरात दोघीच घर खायला उठायच. कोणी कोणाला दुःख सांगायच दोघीहि समदुःखी. तरीही आई माझ्यासाठी जगत होती.अशा परिस्थितितही आईने माझे शिक्षण थांबू दिले नाही.मला आश्चर्य वाटे तिचे जणू सवित्रीच् वाटे मज.अखेर तो प्रसंग आला.माझ्या मिस्टरांचे स्थळ आले.माझी हुंडा न घेण्याची अट मान्य केली.पण अजुन तो फोन कॉल आठवतोय,'हॅलो,मी नवरा मुलगा बोलतोय.मी तुझ्याशि लग्न करायचे ठरवले आहे पण तुमची हरकत नसेल तर. याविषयी तुमचे मत काय? 'ह्या एका वाक्याने माझ्या मनात विचारचक्र सुरु झाल.जो व्यक्ती अत्तापसुन माझ्या मनाचा विचार करतोय हाच माझ्यासाठी योग्य वर आहे  असे समजून मी होकार दिला.ज्या दिवसी मी वरमाला घालून पतिसोबत घरी आले.त्या दिवसापासून त्यांनी मला नव्या उमेदिने जगायला शिकवले लग्नआगोदर मरनालाही वेळप्रसंगी जवळ करनारी मी आज वेगवेगळी आव्हान स्वीकारुन ती पुर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे हे फक्त माझी आई आणि पतिमुळे होउ शकले.माझ्या पतीने  मला स्वप्न पाहायला शिकवले.खंबीर होऊन परिस्थितीशी लढायला शिकवले.पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.वेळोवेळी मला प्रेरणा दिली.माझ्या कालगुणांना वाव दिला.या विशाल आकाशात भरारी घ्यायला शिकवल. कोणतेही बंधन घातल नाही .मला माझ्या पतीचा खुप अभीमान आहे.

चार शब्द प्रेमाचे उमटले।  
माझ्या ओठी, शब्दांची झाली।    
फुले फक्त माझ्या योगेशसाठी।

मीनाक्षी माळकर @68
चौसाळा ,ता.जि.बीड।      
मो.न.9404028645

===================================================
[8/24, 7:20 PM] ‪+91 82373 29804‬
*टर्निंग पाॅइंट*

  शिर्षक : हौस माझी लिहिण्याची
***************************

          आयुष्य हे विधात्याच्या
           वहीतील पान असतं..!
           रिकामं तर रिकामं
           लिहिलं तर छान असतं..!!

अगदी कमी वयातच ही कविता कानावर पडली. मनात विचार केला, खरच आपल्या आयुष्याच्या वहीत आपणालाच लिहायचे आहे. मग त्या आयुष्याची वही जर कर्मरूपी शब्दांनी अशी लिहायची की, दोन लोक ती वही वाचुन चांगले म्हणतील..

असं वाटत तर होते, त्यावेळी समजत नव्हते की, नक्की काय ते..! अभ्यासाने घडत तर होतो, पण घरात अठरा - विश्व दारिद्र्य व आईवडिल अडाणी.. मग मार्गदर्शक कोणी नव्हते. जसे शाळेतुन धडे मिळतील तसाच पुढे जात होतो.

इयत्ता आठवीत गेल्यानंतर समजु लागले की, भविष्यात आपणाला कोणीतरी व्हायचे आहे. आईवडिलांचे नाव करायचे आहे. पण समोर एकच आदर्श तो म्हणजे " शिक्षक ".. मनाची पक्की खुणगाठ बांधली की आपण शिक्षक व्हायचे, त्यात बहुतेक शिक्षक हे चांगले कवी व लेखक बनतात, असेच काहीतरी करू या.. मनाने तयार होऊ लागलो व त्यासाठी माझ्या अंगी उपजत गुण उतरू लागले.

बारावी उच्च श्रेणीने पास झालो, पण डि. एड्. प्रक्रिया खोळंबली, खंडपीठाने निर्णय दिला की, राज्यस्तरीय प्रवेश प्रक्रिया व्हावी, त्यानुसार माझा नंबर औरंगाबाद ( वैजापुर ) येथे अनुदानीत कॉलेजमध्ये लागला.

आतापर्यंत ठिक होते, पण परीस्थितीनुसार मला औरंगाबाद जाणे व शिकणे शक्य नव्हते. त्यामुळे गाडी आय. टी. आय. पर्यंतच अडकली. पाहीलेले सर्व स्वप्न परीस्थितीमुळे विस्कटले. पण मनातील शिक्षक प्रेम व कवी मन कमी झाले नाही. आय. टी. आय. करतानाच खाजगी शिकवण्यांतुन शिक्षकी पेशाची हौस पुर्ण करत होतो. परंतु काहीतरी करावे या उद्देशाने आय.टी. आय. शिक्षण पुर्ण केले.

शिक्षक बनण्याच्या स्वप्नांनी मी पुर्ण कोलमडुन गेलो होतो, कारण उच्च् अध्यापकीय शिक्षणही माझ्यासारख्याला महागडं होत. खाजगी शिकवण्याच पुढे चालु ठेवल्या, पण लिहिण्यासाठीही मन लागत नव्हते.तशी हौस तर खुप होती..

आयुष्याच्या प्रत्येक क्षणांवर प्रेम कर..
अस्तित्वाच्या घनघोर रणांवर प्रेम कर..
या उक्तीप्रमाणेच जात असता, मनातील कवी मनाने आता ह्रदयात जागा फिक्स केली होती. पण वेळेअभावी लिहिता येत नव्हते. नंतर MSEB मध्ये नोकरीची संधी आली व स्विकारलीही. या नोकरीत काम करताना खुप वेळ मिळत राहिला व त्यातुन समाजकार्याची आवड म्हणुन "राजा शिवछत्रपती परिवार " या सोशल मिडियावरी माहिती मिळाल्याला वॉट्स ग्रुप बरोबर सहभागी झालो आणि लिहित असता या परिवारातुन चाहतावर्ग वाढला, यांमार्फत खुप पाठींबा मिळत होता व कौतुकाची थापही.

यातुनच पुढे जात असता, मिळाला परिवार " साहित्य - दर्पन " आणि माझ्या आयुष्याला नविन दिशा मिळाली. आता या परिवारातुन मी काही नविन लिहायला शिकत आहे. त्यामुळे माझ्या लेखनीची धार वाढत आहे. म्हणतात ना, ध्येय व उद्दिष्ट समोर ठेऊन प्रयत्न करत राहिल्याच नक्कीच मार्ग सापडतो. अगदी तसाच *टर्निंग पॉइंट* माझ्या आयुष्यात आला. म्हणुन आता थांबणे नाही..

✍🏻 संतोष ए. शेळके
मु.पो. कळंब, ता. कर्जत, जि. रायगड
मो. नं. 8237329804 @24

===================================================
[8/24, 9:06 PM] ‪+91 86980 67566‬
 "टरनिंग पॉइंट"
जीवनाचे रंग प्रत्येकाच्या वाट्याला वेगवेगळया प्रकारे येतात..ज्याला जो रंग आवडतो तो त्याला
निवडता आला पाहिजे नि आपलासा करता आला तर आपोआपच त्याच्या जीवनात सौख्याचं इंद्रधनुष्य निर्माण झाल्यावाचून राहत नाही.पण ब-याचवेळा आपल्या मनात असते एक, आपण करतो एक आणि घडते मात्र निराळेच कदाचीत यालाच लोक नशीब म्हणत असतील.आता आपलं नशीब फिरवण्याचं वा त्याच त्या गोष्टी गिरवण्याचं आपल्याच हातात असतं. बहुतेक वेळा जीवनात नैराश्य येतं आणि मग जीवनयात्रा संपवून टाकावी अशी भावना होते.तशा घटना जीवनात  खरंच पुन्हा पुन्हा घडतात आणि मग आपली धारणा पक्की होते की आता जगण्यात आर्थच नाही.पण समस्या या खरंच तुम्ही कोण आणि कसे आहात हे आजमवण्यासाठी आलेल्या असतात,ते आव्हान स्विकारुन जीवन जगले
पाहिजे.प्रवाहाबरोबर तर कचरासुद्धा सहज वाहून
जातो थोडं प्रवाहाच्या विरूद्ध उभं राहता आलं
पाहिजे.सदैव्य तुम्हाला अनुकूल अशी परिस्थिती
कशी राहिल आणि का राहावी.लढण्यात आणि
लढून उभं राहण्यात जी मजा आहे ती सहज आणि सुलभतेत नक्कीच नाही.म्हणून जीवनातील आव्हानांना स्विकारा आणि जगा.
संकटांना तुमचा ताबा घेऊ देऊ नका,संकटावर स्वार व्हा अन बघा कशी गंमत असते ती....पण
आपण तिथं पर्यंत पोहचतच नाही. असे कांही क्षण जीवनात येतात आणि बदलून जातं सारं जीवन. टरनिंग पॉईंट त्याचंच तर नाव.

                  श्री.हणमंत सोपान पडवळ
             मु.पो.उपळे(मा.)ता.जि.उस्मानाबाद.
            मो.8698067566/9881234383.

===================================================
*टर्निंग पाॅइन्ट*—
                  *एका ध्येयपूर्तीसाठी*

शिक्षकदिन जवळ आला की डी एड प्रवेशाची आठवण झाल्या शिवाय राहत नाही. कारण माझ्या जीवनाचा टर्निंग पाॅईंट तोच होता.
आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे ३२ वर्षापूर्वी कोकणात तालुक्याच्या ठिकाणी राहून एवढा खर्च परवडणारा नव्हता ,तेव्हा लग्न झालेल्या ताईने एका अटीवर दहावी नंतर पुढील शिक्षणासाठी मुंबईत स्वतःच्या घरी नेण्याचे  कबूल केले. तिची  दहावीतील गुणांची अट मी तिच्या अपेक्षे पेक्षाही  उत्तमरित्या पूर्ण केली होती.त्यामुळे मुंबईचा मार्ग माझ्यासाठी मोकळा झाला होता.
पण नशिबानी संकट वाढवून ठेवली होती.
मुंबईत प्रवेशासाठी अर्ज केल्यानंतर प्रवेशाची पहिली यादी लागली होती .माझ्यापेक्षाही  कमी गुण  मिळालेल्या व्यक्तींनाही प्रवेश सहज मिळाला होता .माझे शिक्षिका होण्याचे स्वप्न आता पूर्ण कसं होणार या चिंतेत मी होते.
तरी पुढील याद्यांची प्रतिक्षा करण्यापलिकडे माझ्या हातात काही नव्हते.पण शेवटी घडायचे तेच ठरले कोणत्याच यादीत नाव लागले नाही.
माझी उदासिनता कोणापासून लपून राहू शकली नाही.अनेक मार्ग सुचवले गेले, पण मी मात्र ठाम.शिक्षिकाच होणार , या ध्येयापुढे काहीच सुचत नव्हते. डीएड काॅलेजही चालू झाली होती.
शेवटी ताईला राहावेना ती रागातच मला म्हणाली तुझा निर्णय एवढा ठाम आहे तर शिक्षणमंत्र्यांना का कळवत नाही ?तिच्या या  वाक्याने अजून आपल्यापुढे एक मार्ग खुला असल्याची जाणीव झाली. शिक्षण मंत्र्यांना खरंच पत्र लिहिले.खरी परिस्थिती त्यात मांडली.दोन अडीच महिने मी घरी बसून फक्त वाचनाची आवड जोपासली.बाकी काही नाही.एकेक दिवस पुढे सरकत होता,आणि एकेदिवशी चक्क पोस्टमननी दारात माझं नाव पुकारले.मी धावत जाऊन पत्र उघडलं तर काय मला डीएड काॅलेजमध्ये प्रवेश पावसाळी अधिवेशात सहमत होऊन आध्यादेश काढून मिळाला होता,विशेष बाब म्हणजे माझ्यामुळे मुंबई बाहेरील विद्यार्थ्यांनाही प्रवेश खुला केला झाला होता.
    आज मुंबईतील नामंकित शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे, इच्छितध्येय गाठल्यामुळे  शिक्षकी पेशातही मानाचा मुंबई महापौर पुरस्कार, IES  संस्थेतून आदर्श शिक्षिका म्हणून सुवर्ण पदकाची मानकरी ठरले.
शिक्षिका  होण्याचे ध्येय हा जीवनाचा टर्निंग पाॅईंट ताईच्या एका निर्णयाने घडू शकला होता. मला सदैव तिच्या ऋणात राहावे असे वाटते.
*सौ. स्नेहल विजय आयरे*
 *पत्ता*— २०३/१४आम्रपाली
               चारकोप सेक्टर —२
                कांदिवली पश्चिम
                मुंबई ४०००६७.

मोबाईल नं — ९२२३३६२२९३
समूह क्रमांक — ७७


===================================================
........आणि मी शिक्षक झालो
माझे वडिल प्राथमिक शिक्षक होते. आई अक्षरशत्रू, तिला मराठीसुद्धा बोलता येत नाही. कारण ती पूर्वीची आंध्रप्रदेश आणि आत्ताच्या तेलंगण राज्यातील. त्यामुळे अर्थातच माझी मातृभाषा मराठी नसून तेलगू होती. शाळेत मराठी आणि घरात तेलगू काय पंचायत होते हे आपण समजू शकता ? म्हणजे आजच्या इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या मुलासारखे घरात मराठी शाळेत इंग्रजी .....? त्यामुळे मराठी फक्त वाचन करायचो पण आकलन शून्य. हे सातव्या वर्गापर्यन्त असेच चालू होते. माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी धर्माबादच्या हुतात्मा पानसरे शाळेत प्रवेश मिळाला आणि हाच माझ्या जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरला. मी जर कदाचित या शाळेत आलो नसतो आणि ज्या ठिकाणी होतो गावात त्याच ठिकाणी राहिलो असतो. या शाळेत मला माझ्या आवडत्या मराठीसाठी तुरे सर व गणित साठी डी डी कुलकर्णी सर, नलवार सर, आणि देबडवार सर व इतर विषयाला चांगले शिक्षक मिळाले म्हणून माझ्या अभ्यासात सुधारणा झाली. आज मी ज्या ठिकाणी स्थिर जीवन जगत आहे त्यास अर्थातच ह्या शाळेचा सिंहाचा वाटा आहे. मला माझ्या या शाळेचा नेहमीच अभिमान आहे. माझ्या प्राथमिक शाळेने मला वाचन्यास शिकविले तर माध्यमिकने लिहायला शिकविले. मी शिक्षक व्हावे असे घरातील सर्वांची ईच्छा होती आणि मला ही त्याविषयी आकर्षण होते. पण मी दहावी पास झालो त्याच वर्षी डी एड ला प्रवेश मिळविण्यासाठी बारावी ची अट टाकण्यात आली. त्यामुळे अजुन दोन वर्षे शिकण्याशिवय पर्याय नव्हता. त्यामुळे नांदेड येथील यशवंत महाविद्यालयात अकरावी व बारावी विज्ञान साठी प्रवेश घेतला. आत्ता डी एड ऐवजी डोक्यात डॉक्टर किंवा इंजीनियर होण्याचे स्वप्न पडू लागले. त्यानुसार अभ्यास ही केला. पण माझे ते स्वप्न कमी गुण मिळाल्यामुळे पूर्ण होऊ शकले नाही. डी एड ला सुध्दा स्पर्धा वाढली होती, पहिल्या दोन यादीत नाव नसल्याचे पाहून मी खुप निराश आणि खिन्न झालो. घरातील सर्व सदस्य माझ्यावर अर्थातच नाराज होते. तशात बी एस्सी साठी नांदेडच्या साइंस कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. कॉलेज नियमित सुरु झाले. साधारणपणे 20 - 25 दिवसानंतर डी एड ची तीसरी यादी लावण्यात आली आणि माझे त्यात नाव होते. मला खुप आनंद झाला आणि अजिबात वेळ न दवडता लगेच डी एड ला प्रवेश घेतला. शिक्षक होण्यासाठी मार्गस्थ झालो
नागोराव सा. येवतीकर 
मु. येवती ता. धर्माबाद
साहित्य दर्पण समूह क्रमांक 26
09423625769

===================================================



===================================================



===================================================


           साहित्य दर्पण क्रमांक-48.

Saturday, 20 August 2016

खेळ



📚 साहित्य  दर्पण Whatsapp ग्रुप  📰🖊*
..................आयोजित...............

*🗽  साहित्य दरबार वैचारिक लेखमाला  🗽*
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

🚩भाग :- (आठरा ) 🚩
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
📆 दिनांक - 21/08/2016
🛢 वार - रविवार
~~~~~~~~~~~~~~~~
🕰 वेळ - सकाळी 10:00 ते 7:00
★★★★★★★★★★★★★★

*विषय - शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्त्व*
†††††††††††††††††† †††††††††
💥 संकल्पना :- ना सा येवतीकर
**************************
💥 संयोजक - आप्पासाहेब सुरवसे
************************
💥 परीक्षक - किशोर झोटे औरंगाबाद 
""''''''''''""""''''''''''''''''''''''''''"'''''''''''''''''""""'''""""''''''''''''''''''''''''''"''''''
💥संकलन --
 जी पी पवार पाटिल
~~~~~~~~~~~~~~~
💥 ग्राफिक्स :- क्रांती बुद्धेवार
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"'
🔦 स्पर्धेचे नियम -

💥ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे
💥 आपला लेख किमान 100 आणि कमाल 500 - 700 शब्दांच्या मर्यादेत असावे.
💥 लेखाखाली आपले पूर्ण  नाव, गाव आणि मोबाईल नंबर अवश्य लिहावे.

💥स्पर्धेतील निवडक लेख संयोजक वृत्तमानपत्रातून प्रकाशित करतील याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी ..

💥 या  स्पर्धेचा निकाल ग्राफिक्स सह खालील blog वर  आणि साहित्य दर्पण वर पाहण्यास दिनांक _23 ऑगष्ट 2016_ रोजी सायंकाळी 9:00 वाजता मिळेल. त्यासाठी वारंवार चौकशी करु नये.
💥साहित्य दर्पण ग्रूपच्या बाहेरील लेखक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात...

📩 त्यासाठी .

🎾 खालील पैकी कोणत्याही एका मोबाईल नंबरवर किंवा फ़ेसबुक वर आपले लेख पोस्ट करावे ....

👤 आप्पासाहेब सुरवसे,लाखणगांवकर
📱 09403725973

👤 नासा येवतीकर, धर्माबाद
📱 09423625769

👤 श्री मारुती खुडे सर माहुर
📱9823922702
~~~~~~~~*************~~~~~~~~~~~~~
📕 साहित्य दरबार वैचारिक लेखमाला भाग १८📕
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌷 शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्व  🌷
⚽🏌⛷🏂🏐🏹🏏🏑⚾🏸
🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
       मुलांची मानसीक भावनीक वैचारिक अशा गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांची गरज भासते आजची पिढी हि आळशी ऐतखाऊ बनत चालली आहे कारण लहान वयापासुन दिशा देण्याचे जे काम आहे तिथे काहीतरी चुकतेय अस मला वाटतेय मुलांनी शालेय जीवनात कशाला महत्व द्यावे याला काही मर्यादा राहिलेल्या नाहीत आज आपण पहातो तासन तास मुले टि व्ही समोरुन उठत नाहीत मोबाईल फेसबुक हॉट्सअप याला तर वयाचे बंधनच राहिले नाही यामुळे दिशाहीन पिढी निर्मान होत आहे  याचा जरा गाभिर्याने विचार करायची गरज आहे 
     पुर्वी कशी मुले वेगवेगळ्या खेळात रमायची विटिदांडू सुरपारंब्या लगोर लपंडाव लपाछपी असे अनेक पारंपारिक खेळ गल्लीबोळातुन चालायचे शालेय जीवनात खेळाला खुप महत्व आहे या बालवयात मुलांना योग्य व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन मिळाले तर मुलांना खेळाची आवड निर्मान होईल परंतु आपल्या शिक्षण पध्दतीमध्ये खेळाला दुय्यम स्थान आहे कुठल्याही शाळेत तज्ञ क्रिडाशिक्षक उपलब्ध नाहित खेळाचे जे नियम असतात ते मुलांपर्यंत जातच नाहीत परिणामी खेळ म्हणजे फक्त मुलांनी मैदानावर हव्या तशा उड्या मारायच्या असा होतोय हि वस्तुस्थिती आहे आणी याचा परिणाम बालकावर होतो
    मुलांना शालेय अभ्यासक्रमात खेळाचे तंत्रशुध्द शिक्षण मिळायला पाहिजे सचिन तेंडुलकरची बँटिंग पहायला मुलांना खुप आवडते पण सचिन तेंडुलकर निर्मान व्हावेत व त्यासाठी कठोर मेहनत घेण्याची तयारी असावी अश्या पिढ्या निर्मान होण्याची आज गरज आहे  सध्या ऑलिम्पिक सामने रिओमध्ये सुरु आहेत त्यामध्ये इतर देशाच्या तुलनेत भारत मागे आहे आपल्या देशाची मान उंचावण्याचे काम खेळाडु सिंधू व साक्षी या विरांगणांनी केले आहे हि एक अभिमानाची गोष्ट आहे हिच प्रेरणा घेवून खेळाला प्राधान्य क्रम देवून शाळास्तरावर खेळ शिकविले जावेत त्यासाठी तज्ञ क्रिडाशिक्षक उपलब्ध करुन द्यावेत मुलांच्या खेळाच्या स्पर्धा व्हाव्यात आणी बालवयापासुन मुलांमध्ये खेळाची आवड निर्मान होण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा खेळामध्ये मुली कुठेच कमी नाहीत हे भारतीय खेळाडु साक्षी हिने कुस्ती मध्ये पदक मिळवुन दाखवुन दिले आहे
       खरतर खेळाला फार पुर्वीपासुन महत्व आहे रामायण महाभारतातही त्याचे दाखले मिळतात छत्रपती शिवाजी महाराजांना मॉ जिजाऊ यांनी खेळाचे महत्व पटवुन दिले त्यामुळे त्यामुळे त्यानाही त्याचा फायदा झाला खेळामुळे संघटन वाढते हे त्यंनी महाराष्ट्राला दाखवुन दिले
      यासाठी आता शासन दरबारी खेळाचे महत्व वाढवण्याचे प्रयत्न व्हावेत प्राथमिक शाळेपासुन प्रत्येक शाळेत पूर्णवेळ क्रिडाशिक्षक नेमावा इतर विषया प्रमाने नव्हे त्याहीपेक्षा जास्त महत्व खेळालाा द्यावे फक्त कागदोपत्री नव्हे प्रत्यक्ष कृती हवी  आता शाळेत विनावेतनावर कला कार्यानुभव व क्रिडाशिक्षक भरलेत पण ते विनावेतन काम कसे करतील
          खेळामुळे मुलांचे आरोग्य चांगले राहील मुले सुदृढ बनतील व भारताचे भावी नागरिक चांगले घडतील असा मला विश्वास आहे
               खेडकर सुभद्रा बीड
              अनु क्रं(२०) 
              मो नं (९४०३५९३७६४)
~~~~~~~~*************~~~~~~~~~~~~~
*शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्व*

रिओ ऑलिम्पिक मध्ये भारत पदक तालिकेत आपले खाते उघडते किंवा नाही याबाबत प्रत्येक भारतीयांच्या मनात शंका निर्माण होत असताना साक्षी मलिकने कुस्तीत कास्य पदक जिंकून 125 कोटी भारतीयांची शान राखली तर बैडमिंटनपटु पी व्ही सिंधुने रौप्य पदक मिळवित सर्व भारतीयांची मान उंचावली. तसे पाहिले तर इतर देशाच्या तुलनेत आपली एवढी मोठी लोकसंख्या असून सुध्दा पदक मिळण्याच्या बाबतीत खुपच मागे का आहे ? यावर विचार करणे आवश्यक आहे. खरे तर खेळाची सुरुवात प्राथमिक शाळेपासून व्ह्ययला पाहिजे.
उत्तम आरोग्य असेल तर त्याचे डोके सुध्दा उत्तम असते अश्या अर्थाची एक म्हण वाचण्यात येते. त्याचा अर्थ शालेय जीवनापासून लक्षात घ्यायला हवे. कारण प्राथमिक शिक्षणाची सुरुवात शाळेत होते आणि याच ठिकाणी त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्या जाते. मुलाचा शारीरिक,भावनिक विकास होण्यासाठी खेळ आवश्यक आहे. मुले खेळण्यात जास्त वेळ घालू लागली की पालकाची ओरड ठरलेली असते की आत्ता किती वेळ खेळणार ? चल बस अभ्यासाला. ही नेहमीची पालक वर्गाची ओरड प्रत्येक घरात दिसून येते. यास पालकाना दोष देऊन चालणार नाही कारण सध्या परिस्थितीच आहे तशी खेळापेक्षा अभ्यासाला महत्व जास्त देण्यात येते.
संगणकच्या युगात काही चांगले घडत आहे तर काही वाईट सुध्दा घडत असताना दिसत आहेत. मोबाईल नावाच्या जादुई खेळणीने मुलांचे सर्वच खेळ हिरावुन घेतले आहे असे वाटते. पूर्वी ग्रामीण भागातील शाळा आणि रिकामी जागा मुलांच्या खेळाने भरून जात असत. शहरात खेळाची मैदाने सायंकाळी आणि रविवारच्या दिवशी मुलांनी फुलून जायचे. पण आज हे चित्र फार कमी पाहायला मिळत आहे. कारण आज मुले घरात बसल्या ठिकाणी मोबाईल वर सर्व खेळ खेळत आहेत. मैदानी खेळ कमी झाले. त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होत आहे. त्यांचा मेंदू काम करेनासे झाले आहे. शरीर जड होत आहे. मुलामध्ये चैतन्य नावाची वस्तु सापडत नाही. या सर्व बाबीवार एकच उपाय ते म्हणजे शारीरिक खेळ. मुलांचा अभ्यास तेंव्हाच चांगला होऊ शकतो ज्यावेळी त्यांचे मन प्रसन्न असेल आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी त्यांना मैदानावर खेळण्यास नेणे गरजेचे आहे. मैदानावर फिरणे असो खेळ खेळणे असो वा इतर काही करणे यामुळे मुलांना ताजी हवा मिळते जे की शरीरला आवश्यक आहे आणि मन प्रफुल्लित होते. म्हणून मुलांना नुसते अभ्यास करा असे म्हटल्याने मुलांचा अभ्यास नीट होणार नाही. ते आपल्या धाकामुळे वाचन लेखन अभ्यास करतील पण त्यांच्या लक्षात राहणार नाही, हे ही तेवढेच सत्य आहे त्यामुळे रोज सकाळी आणि सायंकाळी थोडा तरी वेळ खेळ खेळणे आवश्यक आहे. पण आज आपल्या मुलांची सकाळ आणि सायंकाळची वेळ ही शिकवणीमध्ये जात आहे. शाळेत सुध्दा खेळाचा एक तास असतो मात्र शाळेत किती व कोणकोणते खेळ शिकवल्या जातात हा एक संशोधन करण्याचा विषय होऊ शकतो. त्यास शिक्षक दोषी आहेत असे नाही कारण तेथे खेळाच्या शिक्षकाची कमतरता भासते. आज कित्येक शाळेत खेळाचे शिक्षकच नाहीत तर काही शाळेत खेळाचे मैदान उपलब्ध नाही तर मुले काय खेळतील आणि कुठे खेळतील ? कधी कधी मुले ज्यांच्या शाळेत मैदान आहे तेथे खेळताना दिसून येतात त्यांना कोणाचे मार्गदर्शन नसते, ना कोणाचा कानमंत्र ते आपले उगीच खेळ खेळत असतात. परंतु त्यांना चांगला गुरु मिळाला तर अनेक स्तरावर आपले नाव व कीर्ती मिळवू शकतात. शाळेत शिकलेल्या खेळाचा आयुष्यात फायदा होतो. शालेय जीवन संपल्या वर आपले कोणत्याच खेळाकडे लक्ष जात नाही कारण त्या खेळाविषयी जी रूची शाळेत तयार व्ह्ययला पाहिजे ते होत नाही. शाळेतील खेळ पावसाळी आणि हिवाळी खेळापूरती औपचारिकपणे पूर्ण केल्या जाऊ नये. 
शालेय अभ्यासक्रमात खेळाचा तास हा शेवटचा असतो ज्यात सहसा काहीच होत नाही कारण मुलांना घरी जाण्याचे वेध लागलेले असते. दुपारची पूर्ण वेळ खेळासाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे. शाळेतून विविध प्रकारच्या खेळाची तयारी होणे अपेक्षित आहे. यासाठी शासनाने या बाबिकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. निदान सहाव्या वर्गापासुन तरी खेळाच्या शिक्षकांची नेमणूक करणे आवश्यक आहे. ज्यामुळे मुले योग्य दिशेत मोकळेपणाने खेळ खेळतील. एखाद्या खेळात निपुण व्हायाचे असेल तर विषय शिक्षकच फक्त त्यास न्याय देऊ शकतो. तीन वर्षापूर्वी कला , कार्यानुभव आणि क्रीडा विषय शिकविण्यासाठी अंशकालीन निदेशकची नेमणूक करण्यात आली होती. तेंव्हा मुले त्या विषयात अभ्यास करताना आनंदात होती. पण त्यांचा आनंद दीर्घकाळ टिकू शकले नाही. कारण पुढे त्यांची नेमणूक रखडली. प्रत्येक सहावी ते दहावीच्या वर्गासाठी क्रीडा शिक्षक असेल तर भविष्यात साक्षी आणि सिंधू मोठ्या प्रमाणावर तयार होतील. अशी आशा करण्यास हरकत नाही. कोणत्याच सोई सुविधा उपलब्ध नसेल तर आपली मुले स्पर्धेत कशी राहतील याचा विचार करणे आवश्यक नाही काय ?
जर आत्तापर्यन्तच्या ऑलिम्पिक चा इतिहास पाहिले असता भारत देश सन 1900 पासून यात सहभाग घेत आहे. आजपर्यन्त भारताने 9 सुवर्ण चार रौप्य आणि 12 कास्य असे एकूण 25 पदक गेल्या 116 वर्षात मिळविले आहे आणि गेल्या 20 वर्षाचा मगोवा घेतल्यास असे लक्षात येते की सन 1996 पासून भारताने एक सुवर्ण, तीन रौप्य आणि नऊ कास्य पदकाची कमाई केली याचाच अर्थ गेल्या वीस वर्षपासुन भारताचा ऑलिम्पिक मधील सहभाग वाढला असून जास्तीत जास्त खेळ खेळून पदक मिळविण्याच्या दिशेने प्रयत्न चालू आहेत म्हणण्यास हरकत नाही. मात्र अजूनही मुलांना या खेळाच्या बाबतीत अधिक जागृत करून त्यांना खेळाकडे आकर्षित करणे आवश्यक आहे. शाळा स्तरापासून ते देश स्तरापर्यन्त विविध स्पर्धाचे आयोजन करून खेळाडूना प्रोत्साहन मिळवून देणे याची आत्ता खरी गरज आहे.
- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद

  09423625769
~~~~~~~~*************~~~~~~~~~~~~~
[8/21, 1:24 PM] ‪+91 96574 35292‬
शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्व 
               
            "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,जो जो ते घेईल तो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही." 
          - डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
   खरोखरच अन्न,वस्त्र, निवारा याबरोबरच शिक्षण ही मानवाची मूलभूत गरज आहे. "चारित्र्याचा विकास म्हणजे शिक्षण" चारित्र्याचा विकास करायचा म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे,आणि हा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर शालेय अभ्यासक्रमात इतर विषयांबरोबरच खेळाला महत्व दिले पाहिजे. ही गरज ओळखूनच शासनाने शालेय अभ्यासक्रमात कला, कार्यानुभव आणि शा.शि. याविषयांचा समावेश केलेला आहे. 
           रीओ ऑलिंपिकच्या पदतालिकेमधील भारताचे स्थान पाहून शरमेने मान खाली झुकते. जर शालेय अभ्यासक्रमात खेळाचा समावेश आहे मग आपण मागे का? आपल्या कडे गुणवत्ता नाही का? खाशाबा जाधव, पी टी उषा, अभिनव बिंद्रा, मेरी कोम, साक्षी, सिंधू अश्या आँलिंपिक पदक विजेत्यांचा विचार करता अभिमानाने सांगावस वाटत की गुणवत्तेमध्ये भारत कुठेच कमी नाही. मग अडचण कुठे आहे?
             अडचण आहे यशस्वी अंमलबजावणीची, भ्रष्टाचाराची, कुचकामी प्रशासन यंत्रणेची. शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट सर्व विषयांना सारखाच न्याय दिला पाहिजे. त्यासाठी प्राथमिक 
शाळेपासूनच खेळाचा शिक्षक असला पाहिजे जो विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करू शकेल आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आणि पालकांचेही उदबोधन करेल. शासन दरबारी ही खेळासाठी विशेष प्रयत्न झाले पाहिजे व योजना कागदोपत्रीच न राबवता त्यांची यशस्वी अंमलबजावणी झाली पाहिजे.
        शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्व जाणून त्यानुसार कार्यवाही व यशस्वी अंमलबजावणी केली तर निश्चितच आँलिंपिक मधील भारताचे स्थान सर्वात वरचे असेल.

              शैलजा ओव्हाळ /चिलवंत 
                           बीड 
                          @ 73 
                 स्पर्धेसाठी
~~~~~~~~*************~~~~~~~~~~~~~

[8/21, 2:37 PM] Yogini Hyd
शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्व 

◯‍◯‍◯‍◯‍◯ स्पर्धेसाठी◯‍◯‍◯‍◯‍◯

जिवनात अनेक प्रकारच्या समस्यांनी मानव सतत घेरलेला आहे . खेळ खेळण्याने समस्या आणि तणाव थोड्या फार प्रमाणात कमी होण्यास मदत होते . 

शिक्षणाने मनुष्याचा मानसिक विकास होतो . पण मानसिक विकासा बरोबरच शारीरिक 
विकासही आवश्यक आहे. व्यायाम आणि खेळ यामुळे सर्वांगिण विकास होतो . तसेच शरीराच्या विभिन्न अंगाचे संचालन व्यवस्थितपणे होते . म्हणुनच जगभरात खेळांना खुप महत्व दिले जाते. 

शाळेत खेळांना महत्व आहेच . शाळेत वार्षिक खेळ महोत्सव होत असतात . विभिन्न खेळांचे प्राथमिक शिक्षण शाळेतच दिले जाते . खेळांमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो, मुले उत्साही बनतात. शालेय खेळांमधिल जित किंवा हार मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव शिकवतात. हरण्यामुळे आपल्यातील कमतरता शोधून नविन उमेदीने पुढच्या वेळी जिंकण्याचा प्रयत्न करतात . आणि जिंकण्यामुळे मुलांमध्ये नव्या उत्साहाचा संचार होतो . 

खेळ स्पर्धांमध्ये ऑलंपिक स्पर्धा जी दर चार वर्षी होते  अत्यंत मोठी मानली जाते . 
तसेच क्रिकेट , बुद्धीबळ, सॉकर, हॉकी अशा अनेक खेळ स्पर्धा जगभरात होत असतात. 
खेळाडूंना खूप सन्मान दिला जातो . सरकारी नौकरीत त्यांना प्राधान्य दिले जाते . समाजात आदर असतो .  

मग खेळाचे इतके महत्व मानव जिवनात असताना जागतिक स्तरावर भारत देशाची प्रतिमा  आणखी उंच पोचवण्यास आपण सुद्धा प्रयत्न करूया. आणि खेळाडूंना भरभरून  पाठिंबा देऊया. 

योगिनी चॅटर्जी #52 
🏅🏅🏅🏅🏅
🏅~~~~~~~~*************~~~~~~~~~~~~~🏅
[8/21, 5:04 PM] 
📚साहित्य दर्पण व्दारा आयोजित📚
***********************
    साहित्य दरबार
वैचारिक लेखमाला स्पर्धा
***********************
विषय---शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्व
***********************
भाग----अठरावा
दिनांक --21-8-2016
****************-******
आपण सारे खेळूया !
गमंत जमंत खेळूया !
रबरी चेंडू झेलूया ! टप टप टप
एक., दोन, तीन, चार मोजुया !
या चार ओळी जेव्हा आपण इ-1 ली च्या वर्गात म्हणतो तेव्हा त्या मुलांचे चेहरे तपासा त्यांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वहात असतो..म्हणजेच खेळ ही गोष्ट लहान मुलांच्या अत्यंत  आवडीची आहे कारण शाळेत येण्या पुर्वीचे त्यांचे विश्व हे आई, घर , खेळ एवढेच असते.
खेळणे ही एक सहज प्रवृत्ती आहे.आणि या सहज प्रवृत्तीचा आपणाला अध्यापनात उपयोग करुन घ्यायचा आहे आणि म्हणुण शासनाने अभ्यासक्रमात  शा. शि.हा विषय अंतर्भूत केला  आहे.खेळामुळे आनंददायी,  क्रियाशिल,व मनोरंजनातुन शिक्षण देता येते.शिक्षणातुन विद्यार्थ्यांचा सार्वांगिण विकास होतो.सार्वांगिण विकास म्हणजे शारीरिक, मानसिक, बौद्धिक , इ. शरीर, मन,आणि बुद्धी .शरीर चांगले असेल तर बुद्धी चांगली विकसित होऊन मानसिक विकास होतो.वर्गातला शिक्षक मुलांच्या बुद्धिमत्तेला आणि कलागुणांना चालना देतो, तर मैदानावरचा शिक्षक
मुलांच व्यक्तीमत्व घडवतो व  त्यांच्यात खिलाडू वृत्ती , आणि स्पर्धात्मकभाव जागविण्याच महान कार्य करीत असतो.म्हणुण शालेय अभ्यासक्रमात खेळाला अनन्य साधारण महत्व आहे
           उद्याचा भारत आजच्या शाळेतुन घडत आहे
विद्यार्थ्यांचा सार्वांगिण विकास साधत असतांना भूत काळाचे ज्ञान, वर्तमानाचे भान आणि भविष्याची जाण फक्त शिक्षकालाच असु शकते.शाळा हा घटक समाज व राष्ट्रांच्या प्रगतीच्या दृष्टीने  अतिशय महत्वाचा घटक आहे, प्रगतीची बीजे शाळेत पेरली जातात, आणि त्याचा उपयोग समाज उन्नती साठी होतो.आणि म्हणुण निकोप व आरोग्यदायी पिढी घडवण्याचे काम शासनाने शिक्षकांवर सोपवले आहे.शा.शि. हा विषय अभ्यासक्रमात अंतर्भूत केला खरा पण त्यासाठी लागणारा तज्ञ क्रिडाशिक्षक प्रत्येक  शाळेला देणे गरजेचे असताना  दिला नाही.मग शाळेतलाच शिक्षक शेवटचा तास खेळाचा घेतात .कोणाचीच मानसिकता नसते मुलांना नुसते खेळा म्हणायचे काय खेळणार मुले कबड्डी किंवा खो-खो यांचे नियम वर्गात सांगुन उपयोग होणार नाही त्यासाठी मैदानावर जाऊन ,मैदान आखुन प्रत्यक्षखेळुन नियम समजावता येतात.परंतु कुचकामी नियोजन, कागदोपत्री अहवालआणि A,C त बसुन देखरेख काल्यावर जागतीक किर्तीचे खेळाडू कसे तयार होणार ? 
त्यामुळे प्राथमिक शिक्षणात खेळाला जागतीक दर्जा देणे अपेक्षित आहे ना प्रत्येक शाळेला एक क्रिडाशिक्षक, खेळाचे साहित्य(दर्जेदार) मैदान द्या उपलब्ध करुन आणि पहा माझा शिक्षक बांधव देशाला किती सुवर्ण पदक मिळवून देतो ते !
आज आपण पहातो आँलिंपिंक मध्ये भारताची पिछेहाट होते परंतु त्यासाठी खेळाडूचा दोष नाही तर आपल्या देशाच नियोजन परिणामकारक नाही सुविधांचा अभाव आहे.म्हणुण खेळासाठी लागणाऱ्या भौतिक सुविधा पुरवाव्या जेणे करुन क्रिडाशिक्षणाचा पाया प्राथमिक शाळेत पक्का होईल.
             पुर्वीच्या काळी आपण पहातो सर्व निसर्ग सानिध्यात खेळ खेळले जायचे उदा. विटीदांडू, लगोरी,सुरपारंब्या,नेमबाजी, पोहणे इ.या खेळामधुन अनेक फायदे होत ,ह्दयाचा दमदारपणा, स्नायुची ताकद, लवचिकता , शरीरधारणा.
शिवाजी महाराज, श्रीकृष्ण, अर्जुन हे सर्व शारीरिक चापल्यतेचे खेळ खेळले. आज आपण पहातो शाळेतुन घरी आले कि T.V,समोरुन मुले उठत नाहीत मैदानी खेळ  खेळत नाहीत त्यामुळे अगदी लहान मुलांना शुगर बी.पी. सारखे आजार होत आहेत लोकांची मानसिकता बदलली शिक्षण आणि नोकरी हेच जीवनाचे ध्येय बनले .झट मंगनी पट शादी"
फक्त बौध्दिक ज्ञान मिळवणे एवढाच हेतु .त्यामुळेमुले पुस्तकातला किडा अशी अवस्था झाली .
खेळामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो संघटन चातुर्य येते निर्णयक्षमता विकसित होते यश-अपयश पचविण्याची ताकद येते त्यामुळे मुले स्थितप्रज्ञ होतात
उत्तम आरोग्याची फळे देणारा खेळ हा अमृतवेल आहे. खेळ आणि विनोद मानसिक थकवा दुर करुन उत्साह देणारे टाँनिक आहे, खेळा  मुळे क्रिडासंस्कृतीची निर्मिती होते , तसेच अव्वल दर्जाच्या  क्रिडापटुला नोकरीमध्ये आरक्षण मिळते.शेवटी एवढे सांगावेसे वाटते ग्रामिण भागातील डोंगरद-यात चपळ असणारी मुले आईवडीलांच्या दारिद्रयामुळे सकस आहार ,मार्गदर्शनाचा अभाव यामुळे मागे राहतात ...शासनाने शिक्षकामार्फत अशा मुलांचा शोध घेऊन त्यानां सर्व मोफत सुविधा दिल्या पाहिजेत.कागदावर नियोजन नको.तरच आपल्या देशात जागतीक किर्तीचे खेळाडू तयार होतील यात शंका नाही.
***********************स्पर्धेसाठी
सौ.मीना सानप बीड @ 7
9423715865
~~~~~~~~*************~~~~~~~~~~~~~

[8/21, 5:23 PM] 
शालेय अभ्यासक्रमात  खेळाचे महत्त्व .👯🏃

एक नाही दोन नाही बेरीज वजाबाकी नाही. तीन नाही चार नाही भूमिती ची सजा नाही. दिवस उद्याचा सवडीचा .रविवार माझ्या आवडीचा .
या गाण्याप्रमाणे तमाम मुलांना रविवार हा आवडीचा वाटतो कारण या दिवशी मुलांना खेळायला वेळ मिळतो .म्हणजे मुलांना खेळायला नक्कीच आवडते .पण आजच्या काळातील पालक मुलांना रविवारी सुद्धा विविध क्लास ,ट्युशन यात इतके गुंतवून टाकतात की त्याना खेळायला वेळ मिळतच नाही .खरे म्हणजे मुलांना मैदानी खेळ खेळू दिले पाहिजेत .त्यामुळे त्यांच्यातील उत्साह वाढून मानसिक ताण कमी होतो ,खेळा मुळे शरीर बळकट होते , मुलांना हार जीत पचवण्याची सवय लागते ,सहकार्य व्रुत्ती ,खिलाडूपणा व्यवहारी द्न्यान हे गुण मुले  नकळत शिकत असतात .शालेय वेळापत्रकात शा .शिक्षणा साठी काही तासिका ठेवलेल्या आहेत पण त्यामध्ये प्रशि क्षित    शिक्षक नसल्यामुळे खेळ गौण होतो यात ग्रामीण भागात अजुनही 7वी पर्यंतचे मुले सुट्टीत तरी शास्त्रशुध्द नाही तरी स्वच्छंद खेळताना दिसतात .पण शहरी भागात अवस्था वेगळीच दिसते .शहरी विद्यार्थी हा "रेसचा  घोडा "असल्याप्रमाणे घड्याळाच्या काट्यांसारखा धावताना दिसतो .त्याचाच परीणाम म्हणजे अगदी लहान   
वयातील मुलांना बी .पी ,शुगर ,थाय्रोइड ,ओबीसिटी ई .आजार झालेले पहायला मिळतात .मुलांच्या शारीरिक प्रगतीतील सर्वात मोठा अडसर म्हणजे टि .व्ही आणि मोबाईल आहे .ह्या दोन शत्रूमुळे मुलांचा खेळण्याचा आनंदच निघून गेला आहे .मधे पंतप्रधान मोदीजीनी  विचारले की किती मुलांना खेळून खेळून घाम येतो ?त्याचे उत्तर नक्कीच नकारा र्थी  असेल .मध्यंतरी पाच दिवसांचा आठवडा होणार असे सुरु होते तेव्हा मला खूप आनंद झाला कारण मुलांना 2दिवस खेळायला मिळेल आणि  आपल्या सारखे जे शिक्षक पालक  आहेत त्यानाही आपल्या मुलांना वेळ देता येईल.मी तरी माझ्या मुलाला रविवारी पूर्ण दिवस खेळण्यासाठी देतेच .रविवारी तो फक्त जेवणापुरता घरी येतो आणि जाम खुश असतो .खूप खेळतो .पण सर्व पालकांनी आपल्या मुलांना हा आनंद घेऊ द्यावा .माझ्या घरी केबल ,डिश नाही .त्यामुळे टि. व्ही कुणीच बघत नाही .तो वेळ खेळात घालवतात .पण मी जेव्हा बाहेर टि .व्ही .ला चिकटून बसलेली मुले पाहते ,तेव्हा खूप वाईट वाटते .त्या मुलांचे जेवण, नाश्ता  सर्व टि .व्ही  समोरच असते .त्यांच्या सोबत सम्पूर्ण कुटुम्ब टि .व्ही त रंगलेले असते ,पण सर्व सुजाण पालकांनी टि व्ही .चे फॅड जरा कमी करून मुलांना खेळण्यास प्रव्रुत्त केले तर सर्व मुले निरोगी होतील आणि आपला देश खेळामध्ये नक्कीच पुढे जाईल .मला आठवते आमच्या लहानपणी आम्ही खूप मैदानी खेळ खेळायचो.खेळ सम्पला  की सगळे मिळून कुणाच्या तरी घरी अंगत पंगत असे प्रत्येकाला एक एक घास द्यायचा त्यामुळे एकमेकांना वाटून खाण्याची सवय लागायची .आता मात्र देणे घेणे सोडा पण आपण टि व्ही समोर बसून जेवताना कुणी  
आले आहे किंवा ताटातील जेवण सम्पले आहे .हे देखील लक्षात येत नाही .असो .एकंदरीत शालेय जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे .तेव्हा मुलानो -पुस्तक नंतर वाचा ....
आता खेळा नाचा......
खेळा नाचा.........

कविता बडवे 
70@बीड 
8275942282
~~~~~~~~*************~~~~~~~~~~~~~


[8/21, 5:53 PM] ‪+91 75880 55882‬: 🌹साहित्य दरबार🌹
शालेय अभ्यासक्रमात 
खेळाचे महत्त्व 🇮🇳
***********************
स्नेहलता कुलथे 
**************                 
शेजारच्या घरातून आवाज आला,अरे चिंटू,कुठे गेला असेल?पोर घरात बसेल तर नशीब ,
सारखा बाहेर पळतो.अहो ऐकलं का?,नवीन कार्टून पॅक टाका बरं,चिंटू घरात बसतच नाही.संवाद ऐकला मी तर अवाक् झाले.लहान मुलांनी कायम एका जागी बसावे ,जास्तीची हालचाल करु नये,असे प्रत्येक आईला वाटते सारखा टिव्ही पाहिला तरी चालते किवा शाळेत देखील" हाताची घडी तोंडावर बोट ठेवा ",मगच मी तुम्हाला खेळायला सोडणार नसता नाही.असे देखील बरेचदा मुलांना म्हटले जाते.
         परंतु खरेच काहो,मुलानी त्यांच्या हातापायाची हालचाल केली नाहीतर त्यानी खाल्लेल्या अन्नाचेपचन होईल का?मुले सुदृढ होतील का?एका जागी बसुन काय होईल ?अनेक प्रश्न उद्भवतात.उलट लहानपणापासून 
घरात ,शाळेत मुलांना खेळण्याची सवय लावली पाहिजे. मुलानी खूप खेळावे म्हणजेच त्याच्या शारीरिक वाढीसाठी त्याचा उपयोग होईल.आपण म्हणत असतो,मुलगा खूप छान गेम खेळतो परंतु "नेटखर्च करण्यापेक्षा त्याला नेटाने खेळु द्या ",म्हणजे शरीर ,सुदृढ व मेंदू सतेज राहील व मुले सतेज व निरोगी राहतील.
     विद्यार्थ्यांना मैदानावर खेळवणे आपले कर्तव्य आहे.तसे पाहिले तर विद्यार्थ्यांना खेळण्याची खूप आवड असते.शिकवताना जर आपण चलायचे का?कबड्डी खेळायला ...शून्य मिनिटात पुस्तक बंद ..चला ना मॅडम....खेळायला. .लेकराना खूप आवड असते.परंतु शालेय अभ्यासक्रमात अजून देखील खेळाचे वेगळे असे तास मात्र उपलब्ध झाले नाहीत .अंशकालीन शिक्षक आले होते तेव्हा थोड्याप्रमाणात हौस झाली तशी पण गरज मिटली नाही.आमच्या शाळेतील एक विद्यार्थी जालन्याला मामाकडे शिकायला गेला व दोन महिन्याने परत शाळेत भेटायला आला व म्हणाला,मॅडम,माझा नेमबाजीत प्रथम क्रंमाक आला.मला आश्चर्य वाटले आणि आपल्या दुबळेपणाची कीव आली.मी किट्टी आडगावला राहिलो असतो तर माझा नंबर आला असता का?मॅडम आणि हो,अजून आपण खूप लांब आहोत याची जाणीव झाली.
       आपण लंगडी ,कबड्डी खेळ घेतो आपण स्वतः प्रशिक्षीत नसतो व त्यामुळे खेळाचे विशेष मार्गदर्शन करु शकत नाही.आज आमच्या शाळेमध्ये शारीरिक शिक्षकाची खूप गरज आहे.मुलांना खेळण्यासाठी जर आपण उत्तेजन दिले तर चांगल्या प्रतीचे खेळाडू आपण निर्माण करु शकतो.
      आज जागतिक पातळीवर सचिन तेंडुलकरचे नाव लोकप्रिय आहे परंतु आचरेकरासारखे आदर्श प्रशिक्षक त्याला लाभले.अर्जुन मोठा धनुर्धर झाला परंतु उतम प्रशिक्षक द्रोणाचार्य भेटले.विद्यार्थी हुशार असुन चालत नाही तर त्याला घडवणारा शिक्षक देखील प्रशिक्षीत पाहिजे.
        मग सांगा मित्रांनो, मुलानी मैदानावर मारामारी केली,लहान लहान पत्ते करुन खेळले,खेळत खेळत मारामारी केली,विद्यार्थी मोबाईलवर खेळले.या सर्व गोष्टी  आम्हाला विचार करायला भाग पाडतात.
         प्रशिक्षीत शिक्षकानी त्याना खेळाचे मार्गदर्शन केले.जगाच्या पातळीवर खेळाला किती महत्व आहे?याचे धडे शाळेमधुन दिले तर निश्चितच मुलांना त्याचे बाळकडु मिळेल.व विद्यार्थी ज्ञानप्राप्ती बरोबर क्रीडाप्राप्तीकडे लक्ष देइल.आपण खेळात सहभाग घेतला तर आपल्या गुणामध्ये देखील वाढ होऊ शकते.याचे मार्गदर्शन मिळु शकते.शासनाने देखील जि.प.च्या शाळेमधुन क्रिडाशिक्षकाची पदे भरली पाहिजेत जेणेकरून करुन विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच खेळाची माहिती मिळेल पर्यायाने विद्यार्थी चपळ व चिवट तयार होतील.
        आज रिओ ऑलिंपिक मध्ये भारताला सर्वात कमी पदके मिळाली आहेत.कारण काम करण्याची चिकाटी अजुनही आमच्याकडे कमीच पडते.आम्ही अजुनही out putदेत नाही गुण मिळणार असतील तल अभ्यास करतो.आणि हो म्हणुनच खेळांची गुणवत्ता विद्यार्थ्यांच्याअंगी बाणवायची असेल तर अभ्यासक्रमात ,शाळेत खेळाचे प्रशिक्षीत शिक्षकनेमुन विद्यार्थ्यांना खेळाचे धडे देणे अत्यंत गरजेचे आहे.तेव्हा शाळेशाळेमधुन खेळाडु तयार होतील व भारताचे नाव जगाच्या पातळीवर सर्वांच्या नजरेस पडेल.
         भारतदेश हा खेड्यानी बनलेला आहे.सध्या मात्र मोठ्या शहरामध्ये पालक स्वतः पाल्यानकडे लक्ष देत आहेत व खाजगी प्रशिक्षकाकडुन स्वत:च्या पाल्याला शिक्षण देत आहेत.मोठमोठ्या खेळात प्राविण्य मिळवत आहेत.
       परंतु 'खेड्याकडे चला'हे गांधीजीचे बोल आज पुन्हा आठवण्याची गरज वाटु लागली आहे.खेड्यातील विद्यार्थी जो खरोखर प्रामाणिक आहे जिद्दी आहे.शाळेतुन मिळणा-या वही,पाठ्यपुस्तके ,मिळणा-या शालेय पोषण आहारावर उदरनिर्वाह करणारा विद्यार्थी अतिशय परिस्थितीच्या चक्रा अडकलेला आहे.याच शाळेतून खेळ जगताचे ज्ञान, प्रशिक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे.तोच खेळ जगतात भारताची धुरा सामर्थ्यपणे पेलणार आहे.
"सामर्थ्य आहे चळवळीचे
जो जे करील तयाचे,परंतु 
प्रशिक्षीत प्रशिक्षकाचे
अधिष्ठान पाहिजे "🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌹🕊🕊🕊🌹🕊🌹
स्नेहलता कुलथे 
मोबा 7588055882
क्र.37🌹
~~~~~~~~*************~~~~~~~~~~

[8/21, 6:03 PM] 
📕 साहित्य दरबार वैचारिक लेखमाला भाग १८📕
⚽🏀🏈⚾🎾🏐🏉
🎯 *शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्व*🏆
🏌⛷🏂🏹🚣🏊
   *अभ्यास कर*.....मग,खेळायला सोडतो....या वाक्याच्या दवाबखाली भारत आजवर हजारो ऑलिम्पिक पदकाना मुकलेला आहे, 
*चमक रही है बेटिंया, बन माथे का बिंदू,बढा रहा सन्मान देश का...साक्षी और सिंधू*.....
खरंच सध्या रिओ ऑलिम्पिक मधील साक्षी आणि सिंधु च्या यशाने सर्वजण भारावून गेले आहेत,काही क्षण का होईना,पण सगळ्यांच्या मनात अचानक खेळाचे वारे वाहू लागले.आज शिक्षक आणि त्या अगोदर एक खेळाडू म्हणून नेहमीच माझ्या दृष्टीने खेळाला महत्व आहे.आज या पेश्यातील माझे पदार्पण हे खेळामुळेच झाले, ते माझ्या अतिशय जिद्दी आणि महत्वाकांक्षी क्रीडाशिक्षकांमुळेच. नसानसांत खेळ भिणवला गेला आहे,आज हि मैदानात उतरल्यावर पाय खेळायला धावतात.शालेय जीवनात खेळ किती महत्वाचा आहे,हे मी स्वता:हून अनुभवले आहे.मैदानावरील तो सराव, स्पर्धांमधील ती चुरस खरंच आपला भावनिक,मानसिक आणि शारीरिक विकास घडवून आणते.संघटन,खिलाडूवृत्ती हि त्या काळातच नकळत आपल्यामध्ये रुजते.
सध्याच्या संगणकाच्या युगात हे मैदानीखेळ आता मागे पडत आहेत याची प्रकर्षाने जाणीव होतेय,मुलांनी कसं मनसोक्त खेळावं,सर्व एनर्जी हि त्या मैदानातच खर्ची करावी,म्हणजेच मनमुरादपणे मुले अभ्यासाकडे वळतील.शाळेतील आठवड्याच्या दोन तासिका ह्या मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अपुऱ्याच आहेत.बरं त्यापेक्षा *मुलांच्या क्षमतेनुसार*,त्यांच्या खेळातील उत्तम कामगिरीसाठी  *योग्य खेळाची* निवड हि देखील तेवढीच महत्वाची आहे,.त्या-त्या भौगोलिक परिस्थितीला अनुकूल अशा खेळाची निवड करणे,आणि त्याला अनुसरून पोषक वातावरणाची निर्मिती करणे ,ही तेथील   क्रीडाशिक्षकाची खरी कसोटी आहे,मुलांना खेळाचे *बाळकडू* हे त्यांच्या *शालेयजीवनातच*दिले गेले पाहिजे.एकाग्रता,निर्णयक्षमता हि त्या वयातच खेळातून बहरू लागते.आपला विद्यार्थी हा कोणत्या खेळात पुढे जाईल,हे चाणाक्षपणे शिक्षकांनी हेरले पाहिजे.कारण या देशाला श्री.गोपीचंद सारख्या गुरूंची नितांत गरज आहे.त्यांचा त्यांच्या शिष्यावर असलेला विश्वास व त्याच्या यशासाठी स्वतःवर लावलेले निर्बंध हेही तितकेच  वाखाणण्यासारखे आहेत,आणि तरंच नवे दर्जेदार खेळाडू भावी पिढीतून तयार होतील.
शेवटी एवढंच म्हणेन,कि एक सुदृढ,संयमी,सर्वगुण संपन्न विद्यार्थी,भविष्यातील सुजाण नागरिक जर आपल्याला घडवायचा असेल तर ,त्याला मोकळ्या मैदानावर लोळू दे,मनसोक्त हुंदडू दे,पोटभर खेळू दे.तरंच *भविष्यात ऑलिम्पिक मध्येच काय,तर जगाच्या प्रत्येक स्पर्धेत आपला  विद्यार्थी,खेळाडू हा *अव्वल स्थानावर* असेल आणि तोही *मानसिक ,भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या *निरोगी* आणि *सक्षम*!!!!
     श्रीमती सुनिता संदिप महाडीक, 

मोबाइल क्रं 9029317787 
मुंबई,कांदिवली

~~~~~~~~*************~~~~~~~~~~
[8/21, 6:05 PM] ‪+91 98603 14260‬
 शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्व
 स्पर्धेसाठी
***********************
सध्या आँलिम्पिकचे वारे समाजात आहे आपल्या खेळाडूंनाही त्यात यश मिळाले आहे 
आमची पिढी शाळेत शिकत असताना शारिरिक शिक्षणाचा वेगळा तास असायचा .व्यायाम मैदानी खेळ,याला महात्व होते सूर्र्यनमस्कारांनी दिवास सुरु होई 
आताच्या पिढीला ३वर्षापासूनच शाळेत घातले जाते
वाघिणीच्या दुधाला महत्व आल्यामुळे मुलांना इंग्रजी माध्यमाच्या घातले जाते मुलांवर अभ्यासाचा ताण पाठीवरच्या दफ्तराचे ओझे
वाढलेय ट्यूशन ,हाँबी क्लासेस यातून वेळ मिळाला तर टीव्हीचा इडियट बाँक्स मोबाईलवरचे गेम्स पोकेमन इ,आंतरजालावरील खेळ यामुळे मुलं मैदानी खेळ विसरलीयत.
 आईबाबा नोकरी करणारे त्यामुळे घरशाळा पाळणाघर यांत मुलांचे बालापण हरवून गेलेय 
फ्लँट सिस्टिम बंगले संस्कृती यात एकमेकांशी शेजा-याशी संवादही होत नाही कधी कधी.
माणसाचे जीवन घड्याळाच्या काट्याला बांधले गेलेय.लंगडी हुतूतू कब्बडी खोखो लगोरी हे खेळ विसरुन गेलेता सारे ,
शाळेपासून हे खेळ नव्याने पुनरुज्जिवित झाले पाहिजेत .
पालकांनीही वेळत वेळ काढून मुलांच्या आरोग्यासाठी मुलांना मैदानावर पाठविले पाहिजे
 मैदानी खेळांमुळे प्रतिकार शक्ती वाढते आरोग्य चांगले लाभते,गांवपातळीवर शालेय पातळीवर जिल्हा आणि राज्यपातळीवरमुलाःना खेळाचे महत्व पटवून देऊन स्पर्धा घेऊन हार जीत काही असो खेळले पाहिजे ही जाणीव करुन देऊन तसे प्रयत्न झाले पाहिजेत आपले खेळ राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता मिळाली पाहिजे.
खेळाचे महात्व पटवून दिले पाहिजे.
प्राची देशपांडे 
 समूह क्र,१५
~~~~~~~~*************~~~~~~~~~~

[8/21, 6:06 PM] ‪+91 86980 67566‬
स्पर्धेसाठी
*शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्व*

पी टी चे सर : "सांग गण्या ,  रियो ओलम्पिक मधे  भारताले मेडल काउन नाही भेटलं....?"
गण्या : "गुर्जी , मेडल कसं भेट्न...?
तुमी आमाले  पीटी मंधी निसते  कागदंच येचाले लावता अन् गवत उपटाले लावता................!!!"
 वरील विनोद नुकताच व्हॅट्स अॅपवर वाचायला मिळाला. विनोदाचा भाग सोडला तर खूप कांही सांगून जातो हा विनोद आणि वास्तव सांगतो आहे हा विनोद. शाळेत फूलणारी मुलं शाळेचं जसं वैभव आहे तसंच ते देशाचं भाग्य आहे. पण या खेळकर वयात शरीरात साठलेली उर्जा बाहेर पडण्याऐवजी गुणवतेच्या नावाखाली तीचे दमण होताना दिसते आहे. पुन्हा रोष गुरुजींवरच आणि दोषही गुरुजींनाच दिला जातो. पण पालकांच्या अवास्तव आपेक्षांचे ओझे पेलत पेलत दमछाक
करत पुढे निघालेला विधार्थी, खेळ, क्रिडा बाबत उदासिन झालेला दिसतो आहे.गुरुजी पण गुणवत्तेच्या ध्यासाने पछाडलेले आहेत. शासन आणि पालक यांना वही पुस्तकातील गुणवत्ता हवी असते.क्रिडांगणावरील गुणवता नंतरची बाब असते. अशा परिस्थितीत पीटीचा तास केवळ वेळापत्रकातील रकान्यात शोभून दिसतो. आणि प्रसन्न बागेतील ही फुलं कोमेजून जाऊ लागली.
सव्वाशे कोटी लोकसंख्याच्या देशात ऑलंपिक पदक तालीका बघताना लाज वाटावी अशी परिस्थिती असताना ज्या देशात ऐवढी लोकसंख्या असूनही स्त्री सन्मान जपला जात नाही. निर्भयाची इज्जत वाचवू शकलो नाही, त्याच देशातील साक्षी मालिक आणि पी.व्ही. सिंधू या दोन महिलांनी देशाची इज्जत वाचवली.
पण हा प्रसंग सांगण्याचा हेतू येवढाच की आमचे अभ्यासक्रम हे ज्यांचे सरकार येईल त्यांच्या विचारानी तयार होतात. नवा शिक्षणमंत्री नवी धोरणे राबवतो.निशब हे की तीन तीन महिन्याला मंत्री बदलत नाही. खेडोपाडयात शाळांची अवस्था पाहिली तर पुरेसे मैदान नाही. प्रशिक्षक असा शिक्षक वर्ग मुलांना प्राप्त होत नाही.आडातच नसेल तर पोवऱ्यात कोठून येणार...?गावोगावी शाळेच्या जवळ असणाऱ्या तालमी आज पाहिला मिळत नाहीत. कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण यांच्या तासिका अभ्यासक्रमात असतात पण प्रत्यक्षात त्याकडे धड गुरुजीचे लक्ष असते ना प्रशासनाचे शिवाय
याचे फारशा गांभिर्याने मूल्यमापनही होत नाही.
कांही कांही वेळा मूलं मैदानावर तर सर किंवा गुरुजी अन्यत्र व्यस्त असे चित्र दिसते. सव्वाशे कोटीचा देश कोणत्याही खेळात नैपुण्य दाखवू शकत नाही. ही केवळ क्लेषदायीच नव्हे तर आत्मपरिक्षण करण्याजोगे आहे. क्रिडा किंवा खेळाचा विषय अशाच प्रसंगी मोठ्या चवीने चाबलाला जातो. जेव्हा अॅालंपिक किंवा अन्य स्पर्धा असतात. शालेय सारावरून या कामी कांही बद्दल वा हालचाल व्हावी यासाठी कोणी झटताना दिसत नाही. चार भिंतीत डांबून दिलं जाणारं शिक्षण किती बौद्धीकता वाढवते, स्वच्छंदपणे, आनंदाने आणि मुक्तपणे हसत खेळत शिक्षण दिले तर पदक तालीकेकडे डोळेला लाऊन बसण्याची वेळ येणार नाही. सदृढ शरीर बनविण्याची प्रत्येक शाळा ही केंद्र बनली पाहिजे. गुणवत्तेच्या नावाखाली भोंगळ आणि कुचकामी पिढी बनवीत आपण एकविसाव्या शतकापर्यंत पोहचलो खरे पण काय दिले काय कले हा हिशोब जुळवला तर बाकी काय राहिल याचाही विचार व्हावा. शरीर कसदार बनवण्याच्या वयातच पुस्तकांच्या झापडया बांधून मुलांना बालपण कोमेजण्याच्या स्थितीत नेवून ठेवतो. शालेय अभ्यासक्रमात क्रिडेचं महत्त्व जाणून आणि ओळखून विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करुन दिली पाहिजे.
           
                     श्री. हणमंत पडवळ
        मु.पो. उपळे ( मा.)
ता. जि. उस्मानाबाद.
                        48.
~~~~~~~~*************~~~~~~~~~~

[8/21, 6:31 PM] ‪+91 94207 84086‬: स्पर्धेसाठी

⚽🏀🏈⚾🎾🏐🏉🎱⛳🏌🏓🏸🏑🏒🏹🏂⛷🏏🎿🚣🏊🏄🏻🏋🏻🚴🏽⛹🏻🏅🎖🏇🏆🏆🏆🏆

नमस्कार!!!
मी ही चित्र मुद्दामहून घेतलीत कारण आपल्यापैकी बर्याच जणांना वरील चेंडूपैकी काही चेंडूची नावेही माहीत नाहियेत आणि  विविध खेळांची नियमावली सुध्दा! 
खरंच आपल्याकडे खेळाच्या दृष्टीने पाहीले तर शालेय जीवनात म्हणावे तसे महत्व दिले गेले नाही.उगाच एखादा तास तोही मुलांच्या मनावर खेळला जातो.रोजच्या रोज नियमीत खेळ घेवून त्या विद्यार्थ्यांमधले कौशल्य वाढीस लागले पाहिजे, त्यांना बालपणापासूनच खेळाचे महत्त्व पटले पाहिजे. रोज सरावामुळे त्यांच्यातील निपुणता वाढीस लागेल.रोज घाम गाळेपर्यंत खेळल्यामुळे भूक वाढते शरीर तंदुरूस्त व निरोगी बनते.आत्मविश्वास निर्माण होतो.पण हे सारं आमच्या अभ्यासक्रमात नाहीचय नुसता शाळेचा धाक वशिस्त दाखवण्यासाठी क्रिडा शिक्षकाची नेमणूक !!
या ठिकाणी मला एक संस्कृत श्लोक आठवला त्याची प्रचिती आज येते आहे इतक्या वर्षानी..
"आसाक्षी सिंधूपर्यंता यस्य भारत भुमिका |
सर्वे भवन्तु अत्र गौरवान्वित कन्यकाः|"
अर्थ -साक्षीपासून ते सिंधूपर्यंत म्हणजे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतची
जी भारतभूमी आहे तेथील सर्व मुली गौरवान्वित होवोत.
 आपल्या संस्कृत भाषेची ताकत पहा इतका जुना श्लोक आता लागू  तंतोतंत लागू पडतोय.
    तरीही अजूनही ग्रामीण भाग मागासलेलाच आहे.कारणं सांगून जमणार नाही उपाययोजना राबवल्या गेल्या पाहीजेत.
 आता माझ्याच मुलाचे उदाहरण देते.त्याला टेबलटेनिसची प्रचंड आवड.त्याचे पप्पा त्यातील चॅम्पीयनच म्हणा.त्याला आम्ही बाहेरून कोच ( प्रशिक्षक) लावला.पण शाळेतून काहीही प्रतिसाद नाही.शाळेतून प्रॅक्टीस घ्या म्हटले तर म्हणे तुमच्या तुम्हालाच करावे लागेल.
कारण हे शाळेत कंपलसरी नाही म्हणे.मग आम्ही घरीच टेबल खरेदी करून सराव केला आणि राज्यस्तरीय पर्यंत त्याने मजल मारली.आता बघा नाव कोणाचे झाले शाळेचेच ना !
     परवा माझ्या वाचण्यात एक विनोद आला पण तो विनोद मनाला चटका लावून गेला तो असा शिक्षक विचारतात- गण्या, मला सांग ,भारताला का बरं आॅलिंपिकमध्ये एकही सुवर्णपदक मिळाले नाही ?तर गण्या म्हणतो कसं काय मिळंण सर पी.टी.च्या तासाला तुम्ही आमाला मैदान साफ करायला लावू राह्यले.
     वरील विनोदात आत्मपरीक्षणाची गरज मला भासते.निपुण क्रिडा शिक्षक
काळाची नितांत गरज आहे.प्रत्येक खेळाची माहिती शाळेतून दिली गेली पाहिजे. ग्रामीण भागात ठराविक खेळापलीकडे दुसरे काहीच माहित नाही ही शोकांतिका आहे.
हे चित्र पालटायचे असेल भारताला ऑलिंपिकमध्ये सर्वच खेळामध्ये सुवर्णपदक मिळवायचे असेल तर शालेय अभ्यासक्रमात क्रिडा शिक्षणाचा समावेश करण्याशिवाय दूसरा पर्याय नाही.तरंच सोन्याचा पदकाचा पूर येईल.असे मला वाटते.साक्षी सिंधुचा अभिमान वाटतो.
🏆भारतमाता की जय🏆
🎖🏅भारतमाता की जय🏅🎖
    श्रीमती माळेवाडीकर रोहिणी ,
36,माजलगाव.
~~~~~~~~*************~~~~~~~~~~
[8/21, 6:36 PM
~साहित्य दरबार~
~~~~~~~~~~~~~~~~
_शालेय आभ्यासक्रमात खेळाचे महत्व_

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

*खेलोगे कुदोगे तो होगे खराब*
*पढोगे लिखोगे तो बनोगे नवाब*

अशी म्हण मी नेहमीच एकत आले.कारण आपल्या मध्यमवर्गीय समाजात खेळास फारसे महत्व दिले जात नाही. पहिले स्थान शिक्षण नंतर खेळ हा आपला मध्यमवर्गियांचा पक्का केलेला समज.शाळेच्या क्रीडा स्पर्धेत पहिला नंबर आल्यास आपण कोणासही उठसुट सांगत बसत नाही परंतु कुठे मेडिकल,इजिंनिअरिंग लागला तर मात्र चर्चेला जणु पेव फुटत.कारण खेळ खेळून काय कोणाच पोट भरत हा आपल्या मध्यवर्गियांचा समज.शिकूनसवरून एक गडगंज पगाराची नौकरी मिळाली की आरामात आयुष्य कटत नि साऱया आयूष्याचीच चिंता मिटते. पण कधी कोणाच्या मनासही आपल्या पाल्याला व्यावसायिक क्किडापटू बबनवण्याचा विचार साधा स्पर्शुनही जात नाही.हि उदासिनता का ?  याचा कधी विचार केलाय का आपण ? 

खरे पहता जशी मुळ खोलवर रूजली की  झाड हे कधी कमकुवत बनत नाही तसाच हा खेळाबाबतीतचा उदासिनपणा हा शालेय जिवनापासुनच दूर होऊ शकतो आपण खेळाची आवड मुलाना शालेय जीवनात रूजवायास हवी प्रथम आनंद म्हणुन त्यास खेळ खेळू द्याव व हळूहळू व स्पर्धेत त्यास उतराव आणि मग आवड निर्माण झाल्यास मुल बरोबल आरोग्याची फायदे व देशासाठी खेळून व्यावसायिक बाजूही जपली जाऊ शकते हे सर्वाच्या लक्षात येईलच आणि खेळाबाबतची उदासिनताही दूर होईल नि नक्कीच भविष्यात घराघरात खेळडू जन्माला येतील यात शंकाच नाही. 

आपण शालेय जीवनात क्रिडा प्रकाराकडे नेहमीच दुय्यम स्थान दिले गेले आहे. शाळेत जर प्रत्येक वर्षी मुलांना वेगवेगळ्या क्रिडा स्पर्धेत भाग घेवून त्यास जर जिल्हा,विभाग,राज्य..नि पुढे अशा पातळीवर जाणिवपुर्वक लक्ष देवून प्रोत्साहन दिल तर नक्कीच भावी भारतात आँलिम्पिक मध्ये अनेक पदके जिंकली जातील यात शंकाच नाही.परंतु शासकिय दरबारातुन मात्र याकडे फारश्या आशादयक वृत्तीन पाहिल जात नाही आणि हव्या त्या सुविधाही पुरवल्या जात नाही.शाळेत मुलांनमध्ये खुप खेळाबाबत उर्मी असते परंतु त्यात यथायोग्य साथ मिळते का ? त्या योग्य प्रशिक्षण मिळत का ? पुरक साहित्य,कोच,क्रीडागंण मिळत का ?  या न अशा अनेक प्रश्नात आपला शालेय जीवनातील क्रिडा प्रकार हा आडकला आहे.

खरे पाहता शाळेत मुल 7तास अभ्यास करून केविलवाणी होतात म्हणुन 8 वा तास खेळाचा ठेवला जातो जणेकरून मुल उत्साही व्हावी व आरोग्य सुदृढ रहाव व निरोगी बनाव.मुलांना शाळेतील खेळ हा मुलांच्या मनावर केलेला एक प्रकारचा संस्कारच म्हणावयास हवा.जेणेकरून मुल उत्साही,ताकतवान,नि खेळाडू वृत्तीची बनतील.अशाप्रकारे शालेय जीवनापासुनच जर खेळाच बाळकडू आपण मुलांस देत गेलो तर नक्कीच मुलांना स्व:ताच्या निरोगी शरिराबरोबर देशालाही त्यांच्या खेळाचा नक्कीच फायदा होईल.याचसाठी प्रत्येकानी चिकीटीन शालेय जीवनापासुनच आपल्या आवडीचा खेळप्रकार निवडून त्यात पुढे प्रगती करावयास हवी व देशाच नाव उंचावण्यात अग्रक्रमी व्हावे.

परंतु काही लोक मात्र खेळाकडे एक मनोरंजनाच साधन म्हणुन पाहत आहेत.परंतु आता मात्र सिंधू नि साक्षीच्या यशाकडे पाहून नव्या पिढीच्या नजरेत मात्रहे क्षेत्र विविध आपेक्षनी भरलेल दिसत आहे. आणि नोकरशाही मानसिकता आता बदलू पाहत असतांना दिसत आहे.क्रिडेलाही एक व्यावसायिक क्षेत्र म्हणुन निवडण्याची मानसिकता नक्कीच हि रिओ नि बदलवली आहे असे म्हणावे वाटते.नि शालेय जीवनात यापुढे नक्की उत्साहित उर्मीन पाहून जोमाने भावी खेळाडू तयार होतील ही आपेक्षा आपण नक्कीच बाळगू शकतो.

म्हणुनच प्रत्येकान शालेय जीवनापासुन खेळ खेळावीत व ती आवड जोपासावी व, सर्वानीच खेळाबाबत जागृत राहून भावी खेळाडू शाळेत तयार करावेत हीच देशाची शाळेकडून आपेक्षा राहिल! !!!!!
....................................🖊
*कल्पना जगदाळे@8★बीड*

      _👆🏽स्पर्धेसाठी👆🏽_

👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿
~~~~~~~~*************~~~~~~~~~~


[8/21, 6:37 PM] ‪+91 94207 84086‬: 
साहित्य दरबार स्पर्धेसाठी

शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्त्व -

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती अत्यंत आवश्यक आहे.आणि ह्या दोन्ही दृष्टीने सक्षम असणाराच जिवघेण्या स्पर्धेत टिकून राहू शकतो.
        प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक व शारीरिक अवस्थेची जडणघडण मुख्यतःबालपणी होत असते आणि शालेय जीवन हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे.शाळेमध्ये विद्यार्थ्यांची मानसिक व शारीरिक स्थिती उत्तम असेल तरपुढील आयुष्यात तो किंवा ती कूठेच कमी पडणार नाही आणि यासाठी शालेय स्तरावर खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
         भारतात प्रामुख्याने महाराष्ट्रात शालेय जीवनात खेळाला फारसे महत्व दिले गेले नाही.शालेय स्तरांवर दोन-तीन प्रकारचे खेळ वगळता इतर खेळाबाबत विद्यार्थी अनभिज्ञ राहतो आणि पालकही उदासिन असतात किंबहुना खेळप्रकाराकडे दुर्लक्ष करतात.शासनाचे क्रीडा धोरण कुचकामी आहे,शाळा व्यवस्थापनाला व क्रीडा शिक्षकाला त्यात फारसे स्वारस्य नाही त्यामुळे शालेय स्तरावर विद्यार्थी खेळामध्ये प्रावीण्य मिळवू शकत नाही.
       बॅडमिंटनसारख्या खेळात प्राविण्य मिळवायचे असल्यास तीन वर्षापासूनच सुरूवात करावी लागते अथक परीश्रम घ्यावे लागतात प्रशिक्षक नेमावा लागतो तर कुठे पुढे विविध टप्प्यांवर काही प्रगती दिसून येते.परंतु शालेय स्तरावरची असलेली शिक्षक,पालक आणि सरकारचे उदासिन धोरण जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत आपण आंतरराष्ट्रीय स्तरांवर काहीही भव्यदिव्य यश मिळवू शकत नाहीत.
      यासाठी सरकारने क्रीडा प्रशाला,क्रीडा विद्यापीठे स्थापन करायला हवीत.ग्रामीण भागातले एकलव्य शोधायला हवेत,आणि अगदी वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार क्रीडा प्रकारात समाविष्ट करून भविष्यातील सिंधू, सायना ,साक्षी तयार करायला हव्यात.शालेय स्तरांवर जोपर्यंत खेळाला महत्त्व दिले जात नाही,शासनाचे शालेय क्रीडा धोरण जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील पदकांचा दुष्काळ संपणार नाही....

अॅड.अमोल देशमुख, 
क्र.57,माजलगाव.
~~~~~~~~*************~~~~~~~~~~
[8/21, 6:48 PM] ‪+91 95529 80089‬
शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्व
"आरोग्य हिच संपत्ती " कारण पैसा गमावला तर परत मिळविता येतो परंतु आरोग्याची गाडी रुळावरुन घसरली तर सुृृदृढतेचे लक्ष्य गाठणे अशक्य आहे . सुदृढतेचा वृक्ष बहरण्यासाठी त्यांची मुळे शालेय जीवनात आणि शालेय अभ्यासक्रमात शारिरीक शिक्षणाचा अर्थात खेळाचा समावेश करुन त्याची मुळे घट्ट रोवली गेली पाहीजे.त्यामुळे अभ्यासासोबत खेळाची गोडी निर्माण होते. 
विद्यार्थ्याच्या शारिरीक, मानसिक ,भावनिक , सामाजिक म्हणजेच सर्वांगिण विकास होण्यासाठी खेळ महत्वाची भुमिका बजावत असते.विद्यार्थ्यांना खेळासोबतच त्या खेळाचे बेसिक तंत्रज्ञान माहीत असणे आवश्यक आहे व हे त्याला या ठिकाणी अवगत होते ,मग तो शालेय स्तरावरुन तालुकास्तरावर तेथुन जिल्हा नंतर विभाग त्या नंतर राज्य मग राष्ट्रिय शेवटी आंतरराष्ट्रिय स्तरावर पोहचुन देशाला एक ऊत्कृष्ट खेळाडु लाभतो.आणि हे केवळ शालेय अभ्यासक्रमात असलेल्या खेळामुळे शक्य होते .
आंतरराष्ट्रिय स्तरावर चमकण्यासाठी , पदके मिळविण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात खेळाचा समावेश अत्यंत महत्वाचा आहे . याचा ऊपयोग फक्त पदकांसाठीच नव्हेतर भावी पिढी अधिक सुदृढ होण्यासाठी सुद्धा तितकेच आवश्यक आहे .
नरेंद्र म्हस्के , शिरपूर @ 65
~~~~~~~~*************~~~~~~~~~~

[8/21, 7:03 P
🍃🌾🍁🌺🌻🌷🌼💐

*शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्व*

शालेय जीवनात खेळाला अतिशय महत्वाचे स्थान आहे.खेळ म्हटला कि मुलंच्या चेह-यावर एक वेगळाच आनंद पहायला मिळतो  कारण मुलांच्या शारीरिक क्षमते बरोबर मुलांच्या शारिरीक गुणांचा विकास हा फक्त खेळामुळे होतो,पण पालक हे खेळाकडे फक्त मनोरंजन,व्यायाम या दृष्टिने पाहतात.परंतु खेळामुळे मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो आणि म्हणुननच मुलांची शारीरीक क्षमता वाढताना खेळाला महत्व दिले पाहिजे.मुलाची शारीरीक,मानसिक,सामाजीक,बौध्दिक जडण घडण ही फक्त खेळामुळे च घडते  शालेय आभ्यक्रमात खेळाला खुप महत्व असले पाहिजे मुलाच्या दैनंदिन जीवनात अभ्यास,लिखान,वाचन, पाठांतर,या गोष्टिमुळे त्यांची शारीरीक क्षमतेकडे दुर्लक्ष झाले होते पण परंतु अभ्यासक्रमात त्याच पध्दतीने खेळाला महत्व दिले पाहीजे.जेणे करून खेळ खेळता खेळता मुलांध्ये अनेक गुणांचा विकास होतो त्या मध्ये संघभावना,हार पराजय याची शिकवण,नियमाचे पालन,सहकार्याची भावना,एकजुटता ईत्यादी अनेक गुणांचा विकास होतो. म्हणुन शालेय अभ्यासक्रमात खेळाला महत्व  दिले पाहिजे.  ''आज आपण पाहतो कि आपल्या देशाला आँलंपिक या जागतीक स्पर्ध्देत एक  मेडल मिळवण्यासाठी किती प्रयत्न करावे लागताता कारण की आपल्या शालेय अभ्यासक्रमात खेळाला दुय्यम स्थान दिले आहे परंतु पाश्चात्य देशात खेळाला शालेय अभ्यासक्रमात एक अविभाज्य घटक मानला जातो, तिथे मुलांना शाळेत फक्त त्यांच्यातील क्रिडा गुणांच्या कौशल्याला वाव मिळेल हीच शिकवण देतात. आपण हि आपल्या आभ्यासक्रमात शालेय जीवनात खेळाला महत्व दिले पाहिजे त्यासाठी आपल्याला पालकांची मानसिकता, मुलांची आवड,निवड, आणि शारीरीक महत्व या गोष्टिकडे लक्ष देवुन आपल्या देशाचे भवितव्य असणा-या मुलांच्या  शालेय जीवनात खेळाला एक महत्व देऊन त्यांचा सर्वांगीण विकास केला पाहिजे ''

🍁🌺🌻🌷🌼🌹🍂🍃🌾
आवुलवार कविता मँडम 
स शि जि प प्रा शा किट्टी आडगाव 

~~~~~~~~*************~~~~~~~~~~
[8/21, 7:18 PM] ‪+91 84469 46555‬: साहित्य दरबार स्पर्धेसाठी 
*"शालेय आभ्यासक्रमात खेळाचे महत्त्व"*

     मुले ही देवाघरची फुले, अशी उक्ती आम्ही आजपर्यंत ऐकत आलो आहोत. मुलांचा निरागस भाव पाहून ही म्हण अस्तित्वात आली असावी, असे प्रथम दर्शनी दिसून येते. मुले ही फुला प्रमाणे नूसते निरागसच नसतात तर फुलाप्रमाणे शांत पराधिन असतात. कारण फुले ही देवाच्या मस्तकावर जाणार आहेत वा त्यांना उमलताच चुरगळून टाकणार, हे फुलांना माहित नसते. तसे मुलांना भविष्यातील अडथळे माहित नसतात. त्यावेळी खेळ हे मुलांना घडविण्याचे कार्य करीत असते.
         ज्यात शारीरिक कसरती सोबतच मानसिक कसरत असते व दोन्हीच्या समन्वयातून प्रयत्न करून ध्येय आणि उद्दिष्ट साध्य करायचे, त्यास खेळ म्हणावे. या खेळातून खेळाडूचे चारित्र्य तसेच मानसिक तंदुरूस्ती देते. जर शारीरिक आणि मानसिक संतुलन बनवून ठेवणारे शिक्षण मुलांना शालेय जीवनात शैक्षणिक रूपात मिळणे, हे याठिकाणी महत्त्वाचे ठरते. मुले निरागस व कोमल असल्याने त्यांच्यावर खेळरूपाने संस्कार होणे आवश्यक आहे. त्यांच्यावर असे संस्कार झाल्यावर त्यांच्यात अनेक प्रकारचे बदल व प्रगती दिसून येतात.
        मुलांना खेळातून शरीर व मानसिक स्वाथ्याचे महत्त्व कळेल. त्यामुळे मुले नियमित खेळ खेळून आपली शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राखतील व निरोगी जीवन व्यतीत करतील. खेळात प्रत्यक्ष क्षणा क्षणाला तात्काळ त्याच ठिकाणी निर्णय घेत खेळ पुढे न्यायचे असते. खेळाच्या सरावाने मुलांमध्ये निर्णय क्षमता वाढते. जीवनात येणाऱ्या कठीण प्रसंगात ते स्वतः निर्णय घेऊन त्या प्रसंगातून सहज बाहेर पडतील. जीवन जगण्याची उमेद त्यांच्यात येईल. त्याचा उपयोग त्यांना भविष्यात संसारीक व व्यावहारिक जीवन जगताना होऊन त्यांना जीवन आनंदाने व उत्साहाने जगता येईल. 
       खेळ खेळताना वैविध्यपूर्ण स्वभाव असलेल्या अनेक लोकांच्या संपर्कात येऊन त्यांच्याशी त्याचे संबंध निर्माण होतील. लोकांनी आपले वैयक्तिक व व्यावहारिक संबंध सांभाळायचे शिक्षण त्यांना शालेय जीवनातूनच मिळत जाईल. त्यातून मुलांच्या स्वभावात परिपक्वता येईल. त्याला सामाजिक प्रश्न व आपल्या कर्तव्याची जाणीव यातून होईल. हा भाग त्याचा व्यावहारिक जीवनास परिपक्वता देईल. इतरांना समजून घेण्याची पात्रता त्याच्या अंगी येईल. इतरांना समजून घेण्याची पात्रता ही खेळातील डावपेचातून शिकता येते. ही पात्रता आली म्हणजे तो समाजाभिमुख होईल. या सर्व गोष्टींची जाणीव झाल्याने ते शिस्त शिकतील. त्यांच्या अंगी एक प्रकारची नैतिक शिस्त येईल व त्या शिस्तीतून सर्व जीवनाची घडी बसेल. याच शिस्तीतून त्याचे कर्म सुरू होतील. त्यामुळे त्याचे कर्म कर्तव्य जाणून होत असल्याने रितसर व प्रामाणिक असतील. त्यामुळे शालेय आभ्यासक्रमात खेळांची महत्त्व असल्याने शालेय आभ्यासक्रमात खेळ हा विषय गरजेचा आहे.
       
              बंडोपंत कुलकर्णी सोलापूर 

              समूह क्रमांक १३
~~~~~~~~*************~~~~~~~~~~
@@@@@@......धन्यवाद.....@@@@@@
~~~~~~~~*************~~~~~~~~~~