Wednesday, 17 August 2016

नाद चारोळी

*ओवाळते तुला भाऊराया*

🎯🎯🎯🎯🎯🎯🖋

📚 साहित्य  दर्पण Whatsapp ग्रुप  📰🖊
   -----------  द्वारा आयोजित  ------------

🗽    नाद चारोळी स्पर्धा   🗽
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

🚩भाग :- *18 वा-आठरावा*🚩
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
*ख़ास नारळी  पौर्णिमा नि रक्षाबंधन या पवित्र नात्यांच्या सणा निमित्त*

==================
📆 दिनांक - 17 ऑगष्ट 2016
🛢 वार - गुरूवार
~~~~~~~~~~~~~~~~
🕰 वेळ - सकाळी 09:00 ते सायंकाळी 7:00
==================
📝  *विषय* :- *ओवाळते तुला भाऊराया*
                  किंवा
                 _अतूट धागा पवित्र नात्यांचा_
                     
==================
💥 संकल्पना :→वृषाली वानखेडे,अमरावती
**************************
💥 संयोजक--:-
आप्पासाहेब सुरवसे बीड -उस्मानाबाद
************************
💥 *घनश्याम बोरहाड़े मेहकर*
""''''''''''""""''''''''''''''''''''''''''"'''''''''''''''''''''''''''
संकलक -→संतोष शेळके
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
💥 ग्राफिक्स -अनिल लांडगे सर औरंगाबाद
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"'
🔦 स्पर्धेचे नियम -
💥 *ग्रुप मधील व्यक्तींनी पुन्हा  व्ययक्तिक एडमिन यांना चारोळी पाठवू नये.*

💥ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे....
💥 जास्तीत जास्त पाच चारोळी पोस्ट करण्याची मुभा आहे

💥 पाच पैकी  फक्त एकाच चारोळी खाली "स्पर्धेसाठी" असा उल्लेख करणे आवश्यक आहे.

💥 चारोळीखाली आपले पूर्ण  नाव, गाव आणि मोबाईल नंबर अवश्य लिहावे.
💥 चारोळी मध्ये विषयातील शब्द असावेत.
💥चारोळीत दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत यमक असावे.
💥 या  स्पर्धेचा निकाल ग्राफिक्स सह खालील blog वर  आणि साहित्य दर्पण वर पाहण्यास दिनांक *_19_ ऑगष्ट 2016_* रोजी रात्री ठीक _9:00Pm_ वाजता मिळेल.  त्यासाठी वारंवार चौकशी करु नये.
💥साहित्य दर्पण ग्रूपच्या बाहेरील कवी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात...

📩 त्यासाठी .

🎾 खालील पैकी कोणत्याही एका मोबाईल नंबरवर किंवा फ़ेसबुक वर आपली चारोळी पोस्ट करावी

👤 *नासा येवतीकर, धर्माबाद*
📱 09423625769

👤 *मारुती खुडे सर ,माहुर*

📲📱9823922702

*श्री. आप्पासाहेब सुरवसे*
📱📲 9403725973

साहित्य दर्पण वरील नाद चारोळी स्पर्धा क्रमांक 18 निकाल संबंधी

*परीक्षकाचे मत*

रक्षाबंधन निमित्त ही स्पर्धा 18.8.16 रोजी घेण्यात आली
या स्पर्धेच्या निकालाची जवाबदारी
अर्थात परिक्षणाचे काम माझ्या कडे देण्यात आले . त्यानुसार प्रत्येक चारोळीस न्याय देण्याचा प्रयत्न सर्वतोपरी केला . सदर स्पर्धेत एकूण 40 चारोळ्या समविष्ट असून एकापेक्षा एक सरस होत्या त्यामुळे परिक्षणाचे काम एक आव्हान होते .
तरी प्रत्येक चारोळीस नीट वाचून समजून त्यामधील विषयानुरूप 20 चारोळ्या निवडल्या आणखी त्यामधुन 10 निवडून क्रमांक ठरवले     ...... कदाचित एखाद्या वेळी काही चुक राहिली असेल तर कोणीही नाराज न होता मला समजून घ्यावे .
कारण प्रांजळ उद्देशाने हा निकाल तुमच्या समोर मांडला .पुन्हा एकदा काही तृटी असल्यास क्षमा असावी

साहित्य दर्पण चे आभार

घनश्याम बोह्राडे
( आपला एक सहकारी )
============================
नादचारोळी स्पर्धा क्रमांक
18 मधील विजेत्या चारोळी

********************
    *प्रथम क्रमांक*
....1......

ओवाळिते तुला भाऊराया
दिन आज रक्षाबंधनाचा
बांधते मनगटावर सुरेख
 अतूट धागा पवित्र नात्यांचा

प्राची देशपांडे


....2........

ओवाळते तुला भाऊराया
मागते एकच मागणी
माता-पित्याची कर सेवा
त्यांची करू नको विभागणी
             
 शैलजा ओव्हाळ बीड 73
 ....................................

*द्वितीय क्रमांक*


....1......

"ओवाळिते भावाला
बांधून बंधन राखीचे,
हो समर्थ करण्या रक्षण
समस्त स्त्री जातीचे"

*संगीता देशमुख,वसमत*@१४

......2........

*ओवाळते तुला भाऊराया*

*मी ओवाळते तुला भाऊराया,*
*बहीणीची हीच ती अजोड माया*
*काळपरत्वे दूर तुझी गं छाया,*
*भेट ह्रदयाने ही राखीत किमया ..!*
           
 बंडोपंत कुलकर्णी सोलापूर
             समूह क्रमांक १३
...................................

*तृतीय क्रमांक*


.........1.........

देवाने हजार वर्षाचे आयुष्य तुला दयावे,
माझ्या वाटणीचे सौख्य ही तुला दयावे
दान देवाला मागते ओवाळून तुज भाऊराया
प्रत्येक जन्मी तुलाच माझा भाऊ बनवावे...

निर्मला सोनी (28 )

........2.........

दुरावा आहे फार तरीही
जवळीक आहे ना मनात
ओवाळते तुला भाऊराया
यश तुझेच मागते औक्षणात

योगिनी चॅटर्जी #52
..................................

                  *उत्तेजनार्थ*
.........1.............                             ओवाळीते तुला भाऊराया -------------धागा गुंफे प्रेम नात्यांचे प्रतिक !!      --नको भेट वस्तू,मागणे मायेचे !          -आयुष्याची साथ दे सात्त्विक !!       -----------------------------------------रोहिदास होले ,.....    ७१             गोपाळवाडी ,दौंड ,पुणे....
.....................................

......२.........


*_ओवाळीते तुज भाऊराया_*

*_आज पंचप्राणांच्या ज्योतींनी_*

*_ओवाळनी नको मज पैशाची_*

*_नाते सजवू रेशीम धाग्यांनी_*


          *प्रणाली काकडे**
_________________________

         *लक्षवेधी*

 . . . . . . 1......

साहित्य दर्पण आयोजित...
नाद चारोळी स्पर्धेसाठी...

*ओवाळते तुला भाऊराया*


बहीण ओवाळते भावाला,
तो रक्षाबंधनाचा सणं।।
टिकवण्या बहीणीचं नात,
लेक वाचवणार का पणं।।


✒अनिल लांडगे उंडणगाव@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050

................................

...........२..........

देशाचे तू करतो रक्षण
उभा  रात्रंदिवस सीमेवर
आठवणींच्या अनंत ज्योती
ओवाळिन भाऊराया जन्मभर

© सौ.शशिकला बनकर, भोसरी
@35

____________________________
 . . . . . . . निकाल समाप्त .......

आजच्या चारोळी स्पर्धेतील सर्व
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन ...

धन्यवाद




1 comment: