Wednesday, 24 August 2016

टर्निंग पॉइंट

[8/24, 3:28 PM] ‪+91 90117 42342‬
 🌺माझ्या जीवनातील टर्निंग पॉईंट🌺
                              प्रत्येकाच्याच जीवनात असा एखादा क्षण येतो क़ि ज्यामुळे आपले अख्खे आयुष्यच बदलून जाते.अशाच एका क्षणाने मझेही आयुष्य बदलून गेले.ज्या जीवनाचा मला कंटाळा आला होता त्या जीवनाला मी हसतमुखाने स्विकारल ते याच क्षणामुळे तो क्षण म्हणजे 'माझे लग्न'.पण हा सुखद क्षण येन्या अगोदर खुप दुःखाचे डोंगर पार करावे लागले.ती माझी कहानी मी माझ्या कवितेतून मांडणार आहे.माझे हे सुख दुःखाचे क्षण माझ्या। दर्पण परिवरासोबत शेअर करायला आवडेल मला. प्रथम हा विषय निवडल्यामुळे ना.सा.सरजींचे आभार व कौतुकही करते.कारण माझ्या मनातील। विचारांच्या दाटीला यामुळे शब्दातून व्यक्त करायला मोकळी वाट मिळाली.                    
 माझ ही होत एक गोजीरवान घर                         त्यात होती आईची माया, आबाची छाया, भाउच प्रेम ताईची साथ जगावेगळी होती माझ्या आईची माया। म्हणून कोनतेच काम गेले नाही वाया।जगावेगळी होती माझ्या आबाची माया ,जसी वृक्षाएवढी छाया।भाऊ ची होती मला साथ , डोक्यावर असे आशीर्वादाचा हात।ताई ची होती केविलवानी काया ,करत होती माझ्यावर मनस्वी माया।।
     एक दिवस हेच गोजिरवाने घर झाले बेघर ।
कदाचित नियतिला हे पहावल नसाव।।
बाप गेला सोडून मला एकटिला टाकून                
भाऊनी सोडली साथ गेला आशीर्वादाचा हात ताई गेली लग्न करून धरून पतिचा हात नाही मिळाली मला तिची ही साथ।। या घरटयातील सर्व पाखरे उडून गेली राहिलो फक्त मी&आई।😌😌घरात दोघीच घर खायला उठायच. कोणी कोणाला दुःख सांगायच दोघीहि समदुःखी. तरीही आई माझ्यासाठी जगत होती.अशा परिस्थितितही आईने माझे शिक्षण थांबू दिले नाही.मला आश्चर्य वाटे तिचे जणू सवित्रीच् वाटे मज.अखेर तो प्रसंग आला.माझ्या मिस्टरांचे स्थळ आले.माझी हुंडा न घेण्याची अट मान्य केली.पण अजुन तो फोन कॉल आठवतोय,'हॅलो,मी नवरा मुलगा बोलतोय.मी तुझ्याशि लग्न करायचे ठरवले आहे पण तुमची हरकत नसेल तर. याविषयी तुमचे मत काय? 'ह्या एका वाक्याने माझ्या मनात विचारचक्र सुरु झाल.जो व्यक्ती अत्तापसुन माझ्या मनाचा विचार करतोय हाच माझ्यासाठी योग्य वर आहे  असे समजून मी होकार दिला.ज्या दिवसी मी वरमाला घालून पतिसोबत घरी आले.त्या दिवसापासून त्यांनी मला नव्या उमेदिने जगायला शिकवले लग्नआगोदर मरनालाही वेळप्रसंगी जवळ करनारी मी आज वेगवेगळी आव्हान स्वीकारुन ती पुर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे हे फक्त माझी आई आणि पतिमुळे होउ शकले.माझ्या पतीने  मला स्वप्न पाहायला शिकवले.खंबीर होऊन परिस्थितीशी लढायला शिकवले.पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.वेळोवेळी मला प्रेरणा दिली.माझ्या कालगुणांना वाव दिला.या विशाल आकाशात भरारी घ्यायला शिकवल. कोणतेही बंधन घातल नाही .मला माझ्या पतीचा खुप अभीमान आहे.

चार शब्द प्रेमाचे उमटले।  
माझ्या ओठी, शब्दांची झाली।    
फुले फक्त माझ्या योगेशसाठी।

मीनाक्षी माळकर @68
चौसाळा ,ता.जि.बीड।      
मो.न.9404028645

===================================================
[8/24, 7:20 PM] ‪+91 82373 29804‬
*टर्निंग पाॅइंट*

  शिर्षक : हौस माझी लिहिण्याची
***************************

          आयुष्य हे विधात्याच्या
           वहीतील पान असतं..!
           रिकामं तर रिकामं
           लिहिलं तर छान असतं..!!

अगदी कमी वयातच ही कविता कानावर पडली. मनात विचार केला, खरच आपल्या आयुष्याच्या वहीत आपणालाच लिहायचे आहे. मग त्या आयुष्याची वही जर कर्मरूपी शब्दांनी अशी लिहायची की, दोन लोक ती वही वाचुन चांगले म्हणतील..

असं वाटत तर होते, त्यावेळी समजत नव्हते की, नक्की काय ते..! अभ्यासाने घडत तर होतो, पण घरात अठरा - विश्व दारिद्र्य व आईवडिल अडाणी.. मग मार्गदर्शक कोणी नव्हते. जसे शाळेतुन धडे मिळतील तसाच पुढे जात होतो.

इयत्ता आठवीत गेल्यानंतर समजु लागले की, भविष्यात आपणाला कोणीतरी व्हायचे आहे. आईवडिलांचे नाव करायचे आहे. पण समोर एकच आदर्श तो म्हणजे " शिक्षक ".. मनाची पक्की खुणगाठ बांधली की आपण शिक्षक व्हायचे, त्यात बहुतेक शिक्षक हे चांगले कवी व लेखक बनतात, असेच काहीतरी करू या.. मनाने तयार होऊ लागलो व त्यासाठी माझ्या अंगी उपजत गुण उतरू लागले.

बारावी उच्च श्रेणीने पास झालो, पण डि. एड्. प्रक्रिया खोळंबली, खंडपीठाने निर्णय दिला की, राज्यस्तरीय प्रवेश प्रक्रिया व्हावी, त्यानुसार माझा नंबर औरंगाबाद ( वैजापुर ) येथे अनुदानीत कॉलेजमध्ये लागला.

आतापर्यंत ठिक होते, पण परीस्थितीनुसार मला औरंगाबाद जाणे व शिकणे शक्य नव्हते. त्यामुळे गाडी आय. टी. आय. पर्यंतच अडकली. पाहीलेले सर्व स्वप्न परीस्थितीमुळे विस्कटले. पण मनातील शिक्षक प्रेम व कवी मन कमी झाले नाही. आय. टी. आय. करतानाच खाजगी शिकवण्यांतुन शिक्षकी पेशाची हौस पुर्ण करत होतो. परंतु काहीतरी करावे या उद्देशाने आय.टी. आय. शिक्षण पुर्ण केले.

शिक्षक बनण्याच्या स्वप्नांनी मी पुर्ण कोलमडुन गेलो होतो, कारण उच्च् अध्यापकीय शिक्षणही माझ्यासारख्याला महागडं होत. खाजगी शिकवण्याच पुढे चालु ठेवल्या, पण लिहिण्यासाठीही मन लागत नव्हते.तशी हौस तर खुप होती..

आयुष्याच्या प्रत्येक क्षणांवर प्रेम कर..
अस्तित्वाच्या घनघोर रणांवर प्रेम कर..
या उक्तीप्रमाणेच जात असता, मनातील कवी मनाने आता ह्रदयात जागा फिक्स केली होती. पण वेळेअभावी लिहिता येत नव्हते. नंतर MSEB मध्ये नोकरीची संधी आली व स्विकारलीही. या नोकरीत काम करताना खुप वेळ मिळत राहिला व त्यातुन समाजकार्याची आवड म्हणुन "राजा शिवछत्रपती परिवार " या सोशल मिडियावरी माहिती मिळाल्याला वॉट्स ग्रुप बरोबर सहभागी झालो आणि लिहित असता या परिवारातुन चाहतावर्ग वाढला, यांमार्फत खुप पाठींबा मिळत होता व कौतुकाची थापही.

यातुनच पुढे जात असता, मिळाला परिवार " साहित्य - दर्पन " आणि माझ्या आयुष्याला नविन दिशा मिळाली. आता या परिवारातुन मी काही नविन लिहायला शिकत आहे. त्यामुळे माझ्या लेखनीची धार वाढत आहे. म्हणतात ना, ध्येय व उद्दिष्ट समोर ठेऊन प्रयत्न करत राहिल्याच नक्कीच मार्ग सापडतो. अगदी तसाच *टर्निंग पॉइंट* माझ्या आयुष्यात आला. म्हणुन आता थांबणे नाही..

✍🏻 संतोष ए. शेळके
मु.पो. कळंब, ता. कर्जत, जि. रायगड
मो. नं. 8237329804 @24

===================================================
[8/24, 9:06 PM] ‪+91 86980 67566‬
 "टरनिंग पॉइंट"
जीवनाचे रंग प्रत्येकाच्या वाट्याला वेगवेगळया प्रकारे येतात..ज्याला जो रंग आवडतो तो त्याला
निवडता आला पाहिजे नि आपलासा करता आला तर आपोआपच त्याच्या जीवनात सौख्याचं इंद्रधनुष्य निर्माण झाल्यावाचून राहत नाही.पण ब-याचवेळा आपल्या मनात असते एक, आपण करतो एक आणि घडते मात्र निराळेच कदाचीत यालाच लोक नशीब म्हणत असतील.आता आपलं नशीब फिरवण्याचं वा त्याच त्या गोष्टी गिरवण्याचं आपल्याच हातात असतं. बहुतेक वेळा जीवनात नैराश्य येतं आणि मग जीवनयात्रा संपवून टाकावी अशी भावना होते.तशा घटना जीवनात  खरंच पुन्हा पुन्हा घडतात आणि मग आपली धारणा पक्की होते की आता जगण्यात आर्थच नाही.पण समस्या या खरंच तुम्ही कोण आणि कसे आहात हे आजमवण्यासाठी आलेल्या असतात,ते आव्हान स्विकारुन जीवन जगले
पाहिजे.प्रवाहाबरोबर तर कचरासुद्धा सहज वाहून
जातो थोडं प्रवाहाच्या विरूद्ध उभं राहता आलं
पाहिजे.सदैव्य तुम्हाला अनुकूल अशी परिस्थिती
कशी राहिल आणि का राहावी.लढण्यात आणि
लढून उभं राहण्यात जी मजा आहे ती सहज आणि सुलभतेत नक्कीच नाही.म्हणून जीवनातील आव्हानांना स्विकारा आणि जगा.
संकटांना तुमचा ताबा घेऊ देऊ नका,संकटावर स्वार व्हा अन बघा कशी गंमत असते ती....पण
आपण तिथं पर्यंत पोहचतच नाही. असे कांही क्षण जीवनात येतात आणि बदलून जातं सारं जीवन. टरनिंग पॉईंट त्याचंच तर नाव.

                  श्री.हणमंत सोपान पडवळ
             मु.पो.उपळे(मा.)ता.जि.उस्मानाबाद.
            मो.8698067566/9881234383.

===================================================
*टर्निंग पाॅइन्ट*—
                  *एका ध्येयपूर्तीसाठी*

शिक्षकदिन जवळ आला की डी एड प्रवेशाची आठवण झाल्या शिवाय राहत नाही. कारण माझ्या जीवनाचा टर्निंग पाॅईंट तोच होता.
आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे ३२ वर्षापूर्वी कोकणात तालुक्याच्या ठिकाणी राहून एवढा खर्च परवडणारा नव्हता ,तेव्हा लग्न झालेल्या ताईने एका अटीवर दहावी नंतर पुढील शिक्षणासाठी मुंबईत स्वतःच्या घरी नेण्याचे  कबूल केले. तिची  दहावीतील गुणांची अट मी तिच्या अपेक्षे पेक्षाही  उत्तमरित्या पूर्ण केली होती.त्यामुळे मुंबईचा मार्ग माझ्यासाठी मोकळा झाला होता.
पण नशिबानी संकट वाढवून ठेवली होती.
मुंबईत प्रवेशासाठी अर्ज केल्यानंतर प्रवेशाची पहिली यादी लागली होती .माझ्यापेक्षाही  कमी गुण  मिळालेल्या व्यक्तींनाही प्रवेश सहज मिळाला होता .माझे शिक्षिका होण्याचे स्वप्न आता पूर्ण कसं होणार या चिंतेत मी होते.
तरी पुढील याद्यांची प्रतिक्षा करण्यापलिकडे माझ्या हातात काही नव्हते.पण शेवटी घडायचे तेच ठरले कोणत्याच यादीत नाव लागले नाही.
माझी उदासिनता कोणापासून लपून राहू शकली नाही.अनेक मार्ग सुचवले गेले, पण मी मात्र ठाम.शिक्षिकाच होणार , या ध्येयापुढे काहीच सुचत नव्हते. डीएड काॅलेजही चालू झाली होती.
शेवटी ताईला राहावेना ती रागातच मला म्हणाली तुझा निर्णय एवढा ठाम आहे तर शिक्षणमंत्र्यांना का कळवत नाही ?तिच्या या  वाक्याने अजून आपल्यापुढे एक मार्ग खुला असल्याची जाणीव झाली. शिक्षण मंत्र्यांना खरंच पत्र लिहिले.खरी परिस्थिती त्यात मांडली.दोन अडीच महिने मी घरी बसून फक्त वाचनाची आवड जोपासली.बाकी काही नाही.एकेक दिवस पुढे सरकत होता,आणि एकेदिवशी चक्क पोस्टमननी दारात माझं नाव पुकारले.मी धावत जाऊन पत्र उघडलं तर काय मला डीएड काॅलेजमध्ये प्रवेश पावसाळी अधिवेशात सहमत होऊन आध्यादेश काढून मिळाला होता,विशेष बाब म्हणजे माझ्यामुळे मुंबई बाहेरील विद्यार्थ्यांनाही प्रवेश खुला केला झाला होता.
    आज मुंबईतील नामंकित शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे, इच्छितध्येय गाठल्यामुळे  शिक्षकी पेशातही मानाचा मुंबई महापौर पुरस्कार, IES  संस्थेतून आदर्श शिक्षिका म्हणून सुवर्ण पदकाची मानकरी ठरले.
शिक्षिका  होण्याचे ध्येय हा जीवनाचा टर्निंग पाॅईंट ताईच्या एका निर्णयाने घडू शकला होता. मला सदैव तिच्या ऋणात राहावे असे वाटते.
*सौ. स्नेहल विजय आयरे*
 *पत्ता*— २०३/१४आम्रपाली
               चारकोप सेक्टर —२
                कांदिवली पश्चिम
                मुंबई ४०००६७.

मोबाईल नं — ९२२३३६२२९३
समूह क्रमांक — ७७


===================================================
........आणि मी शिक्षक झालो
माझे वडिल प्राथमिक शिक्षक होते. आई अक्षरशत्रू, तिला मराठीसुद्धा बोलता येत नाही. कारण ती पूर्वीची आंध्रप्रदेश आणि आत्ताच्या तेलंगण राज्यातील. त्यामुळे अर्थातच माझी मातृभाषा मराठी नसून तेलगू होती. शाळेत मराठी आणि घरात तेलगू काय पंचायत होते हे आपण समजू शकता ? म्हणजे आजच्या इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या मुलासारखे घरात मराठी शाळेत इंग्रजी .....? त्यामुळे मराठी फक्त वाचन करायचो पण आकलन शून्य. हे सातव्या वर्गापर्यन्त असेच चालू होते. माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी धर्माबादच्या हुतात्मा पानसरे शाळेत प्रवेश मिळाला आणि हाच माझ्या जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरला. मी जर कदाचित या शाळेत आलो नसतो आणि ज्या ठिकाणी होतो गावात त्याच ठिकाणी राहिलो असतो. या शाळेत मला माझ्या आवडत्या मराठीसाठी तुरे सर व गणित साठी डी डी कुलकर्णी सर, नलवार सर, आणि देबडवार सर व इतर विषयाला चांगले शिक्षक मिळाले म्हणून माझ्या अभ्यासात सुधारणा झाली. आज मी ज्या ठिकाणी स्थिर जीवन जगत आहे त्यास अर्थातच ह्या शाळेचा सिंहाचा वाटा आहे. मला माझ्या या शाळेचा नेहमीच अभिमान आहे. माझ्या प्राथमिक शाळेने मला वाचन्यास शिकविले तर माध्यमिकने लिहायला शिकविले. मी शिक्षक व्हावे असे घरातील सर्वांची ईच्छा होती आणि मला ही त्याविषयी आकर्षण होते. पण मी दहावी पास झालो त्याच वर्षी डी एड ला प्रवेश मिळविण्यासाठी बारावी ची अट टाकण्यात आली. त्यामुळे अजुन दोन वर्षे शिकण्याशिवय पर्याय नव्हता. त्यामुळे नांदेड येथील यशवंत महाविद्यालयात अकरावी व बारावी विज्ञान साठी प्रवेश घेतला. आत्ता डी एड ऐवजी डोक्यात डॉक्टर किंवा इंजीनियर होण्याचे स्वप्न पडू लागले. त्यानुसार अभ्यास ही केला. पण माझे ते स्वप्न कमी गुण मिळाल्यामुळे पूर्ण होऊ शकले नाही. डी एड ला सुध्दा स्पर्धा वाढली होती, पहिल्या दोन यादीत नाव नसल्याचे पाहून मी खुप निराश आणि खिन्न झालो. घरातील सर्व सदस्य माझ्यावर अर्थातच नाराज होते. तशात बी एस्सी साठी नांदेडच्या साइंस कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. कॉलेज नियमित सुरु झाले. साधारणपणे 20 - 25 दिवसानंतर डी एड ची तीसरी यादी लावण्यात आली आणि माझे त्यात नाव होते. मला खुप आनंद झाला आणि अजिबात वेळ न दवडता लगेच डी एड ला प्रवेश घेतला. शिक्षक होण्यासाठी मार्गस्थ झालो
नागोराव सा. येवतीकर 
मु. येवती ता. धर्माबाद
साहित्य दर्पण समूह क्रमांक 26
09423625769

===================================================



===================================================



===================================================


           साहित्य दर्पण क्रमांक-48.

No comments:

Post a Comment