Sunday, 28 August 2016

बेरोजगार

[8/28, 10:06 AM]
📚 साहित्य  दर्पण Whatsapp ग्रुप  📰🖊
     द्वारा आयोजित

🗽    साहित्य दरबार    🗽
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

🚩भाग :- ( 19वा)- एकोणीसावा 🚩
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
📆 दिनांक - _28/07/2016_
🛢 वार - रविवार
~~~~~~~~~~~~~~~~
🕰 वेळ - सकाळी 10:00 ते 7:00


★★★★★★★

††††††††††††††††††

*भारतातील बेरोजगारी :एक यक्षप्रश्न*

==================
💥 संकल्पना :--↓↓
श्री.ना सा येवतीकर सर
**************************
💥 संयोजक --↓↓
श्री आप्पासाहेब सुरवसे
************************
💥 परीक्षक -  *ऍडवोकेट   श्री अजित पुरोहित सांगली*
""''''''''''""""''''''''''''''''''''''''''"'''''''''''''''''""""
💥संकलन --
 जी पी पवार पाटिल सर
~~~~~~~~~~~~~~~
💥 ग्राफिक्स :--श्री बी क्रांति सर
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"'
🔦 स्पर्धेचे नियम -

💥ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे....
💥 आपला लेख किमान 100 आणि कमाल 500 - 700 शब्दांच्या मर्यादेत असावे.
💥 लेखाखाली आपले पूर्ण  नाव, गाव आणि मोबाईल नंबर अवश्य लिहावे.

💥स्पर्धेतील निवडक लेख संयोजक वृत्तमानपत्रातून प्रकाशित करतील याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी ..

💥 या  स्पर्धेचा निकाल ग्राफिक्स सह खालील blog वर  आणि साहित्य दर्पण वर पाहण्यास दिनांक _29ऑगष्ट 2016_ रोजी सायंकाळी 9:00 Pm वाजता मिळेल.  त्यासाठी वारंवार चौकशी करु नये.
💥साहित्य दर्पण ग्रूपच्या बाहेरील लेखक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात...

📩 त्यासाठी .

🎾 खालील पैकी कोणत्याही एका मोबाईल नंबरवर किंवा फ़ेसबुक वर आपले लेख पोस्ट करावे ....

👤 आप्पासाहेब सुरवसे,लाखणगांवकर
📱 09403725973

👤 नासा येवतीकर, धर्माबाद
📱 09423625769

👤 श्री मारुती खुडे सर माहुर
📱09823922702
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[8/28, 11:00 AM] nagorao26
*तरुण भारत देश घडवू या .....!*
जगात लोकसंखेच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर असलेला देश आहे. आज भारत देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटी च्या वर पोहोचली आहे. यात 20 % बालक आणि 20 %  वृध्द तर बाकी 60 % च्या वर तरुणाची संख्या आहे हे विशेष म्हणूनच भारताला तरुणाचा देश असे संबोधले जाते. ज्या देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुणाची संख्या असेल तर त्या देशाची प्रगती लक्षणीय आणि वेगात असायला पाहिजे. पण नेमके उलट या ठिकाणी पाहायला मिळते. आमच्या कडे मनुष्यबळ, शक्ती आणि युक्ती सर्व आहे, तरी भारत आज स्वातंत्र्याच्या सत्तरीत असून देखील प्रगती पथावरच आहे म्हणजे अजून ही रस्त्यावर आहे त्याला अजून खूप काही करणे शिल्लक आहे. असे का ? आज आपण जपान या देशाच्या विकासाकडे पाहिलो तर लक्षात येईल की त्या देशाने कमी वेळात एवढी प्रगती कशी केली असेल ? त्याला एकमेव कारण म्हणजे तेथील कोणताच व्यक्ती रिकामा नसतो, बेरोजगार नसतो. तो सदानकदा काही ना काही काम करीत असतो. आळस हा माणसाचा शत्रू आहे हे गौतम बुध्दाचे वचन त्यांनी आत्मसात केले म्हणून आज जपान मधील प्रत्येक वस्तु देश विदेशात आढळून येते. वास्तविक पाहता जपानची लोकसंख्या भारतच्या तुलनेत फार कमी आहे परंतु तेथे बेरोजगार कमी आहेत हे विशेष. त्याउलट आपल्या देशात दिसून येते. येथे आपल्या देशात आळस हा माणसाचा शत्रू नसून मित्र बनला आहे. काम करणाऱ्या युवकापेक्षा बेरोजगार युवकांची संख्या भरमसाठ आहे. व्यक्तीच्या हाताला काम असेल तर त्या ठिकाणी फक्त त्या व्यक्तीचा विकास होत नसून त्याच्या सोबत त्याच्या कुटुंबाचा, समाजाचा, गावाचा, राज्याचा पर्यायाने देशाचा विकास होतो. परन्तु आपल्या देशातील युवकांना रोजगार का मिळत नाही किंवा युवक असे भटकण्याच्या कोंडीत का सापडत आहेत ? यावर विचार करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्याच्या शंभरीत तरी भारत जगाच्या नकाशावर ठळक उठून दिसण्यासाठी आज या समस्येची उकल शोधणे किंवा यावर संशोधन करून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

* बेरोजगार युवक - देशात सध्या दोन प्रकारचे बेरोजगार युवक आढळून येतात. अशिक्षित आणि सुशिक्षित बेरोजगार. अशिक्षित मंडळी त्यांना ज्याप्रकारचे काम जमते त्याप्रकारचे काम ढोर मेहनत करीत करतात. त्याचा म्हणावा तसा मोबादला त्याला मिळत नाही म्हणून खूप कष्ट आणि काम करून देखील त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा विकास होत नाही. त्याच्याकडे शक्ती आहे मात्र त्या शक्तिचा वापर योग्य प्रकारे कसा करावा याचे ज्ञान नसल्यामुळे त्याची पूर्ण मेहनत त्याचा विकास करू शकत नाही. त्यासाठी या युवकांना प्रथम आपल्या शक्ती आणि त्याच्या किमतीची जाणीव करून द्यायला हवी. अश्या बेरोजगार युवकाची संख्या तुलनेने कमी आहे. मात्र सुशिक्षित बेरोजगार युवकाची संख्या भरपूर आहे ज्याचा विपरीत परिणाम देशाच्या विकासवर होत आहे.
वयाची 18 वर्षे पूर्ण झाली की तो भारताचा सक्षम नागरिक बनतो. त्याला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होतो. या वयापर्यन्त त्याचे उच्च माध्यमिक शिक्षण देखील पूर्ण झालेले असते. येथून पुढे त्याच्या जीवनाला कलाटणी मिळणार असते. या वयात घेतलेल्या निर्णयावर संपूर्ण आयुष्य अवलंबून असते. येथील निर्णय अचूक असणे आवश्यक असतात आणि येथेच चूका होताना दिसून येत आहे म्हणून खूप मोठी समस्या निर्माण होत आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेताना मुलांना भविष्यातील त्यांचे चित्र दाखविण्याचे काम शिक्षणाच्या माध्यमातून येथे करायला पाहिजे. काही व्यावसायिक शिक्षणाची ओळख येथे झाल्यास मुले त्या अभ्यासक्रमाकडे वळु शकतील.त्यांच्या मध्ये व्यवसाय विषयी गोडी निर्माण होईल. सर्वच मुले हुशार नसतात त्यामुळे त्यांच्या क्षमता ओळखून तसे शिक्षण घेण्याची सुविधा या स्तरावर मिळाले तर योग्य राहते. मात्र याच ठिकाणी मुलांना मार्गदर्शन मिळत नाही आणि भविष्यात ते भटकतात. एखादे कौशल्यपूर्ण शिक्षण पूर्ण केल्यास शिकलेल्या माणसाला त्यात मार्ग सापडतो. मात्र युवक या क्षेत्रात येण्यास तयार नाहीत.त्यांना बेकार फिरणे आवडत आहे मात्र काम करणे अजिबात आवडत नाही. कारण त्यांना या विषयी काहीच गंध नसतो, त्यांच्या मध्ये काम करण्याची चेतना जागीच केल्या जात नहीं. आज श्रमप्रतिष्ठा हे मूल्य कमी होत चालले आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. याचाच विपरीत परिणाम युवकाच्या जीवनावर झाला आहे किंवा होत आहे. रिकाम्या माणसाच्या डोक्यात भुताचा वास असतो असे इंग्रजीत एक वाक्य आहे त्यानुसार बेरोजगर युवक म्हणजे रिकामी डोके त्यामुळे त्यांच्या डोक्यात नेहमी भुताचा वास असतो. ते देशाच्या प्रगतीचे विचार करण्याऐवजी देश विघातक किंवा वाईट काम करण्यास प्रवृत्त होत आहेत. समाधानकारक जीवन जगण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे पैसा आणि पैसा कमविण्यासाठी काम करावे लागते. दे रे हरी पलंगावरी च्या वृत्तीनुसार आळसी बनलेल्या युवकांना काम न करता झटपट खूप पैसा मिळावा अशी अपेक्षा असते आणि त्यासाठी ते कोणतेही काम मग ते चांगले असो किंवा वाईट याचा अजिबात विचार न करता काम करायला तयार असतात. याचाच गैरफायदा काही लोक घेतात. देश विघातक कार्य करणारे काही समाजकंटक लोक अश्या गरजू युवकाना अलगद जाळ्यात अडकवितात आणि मग सुरु होतो त्याचा जीवघेणा प्रवास. ते अश्या दलदल मध्ये फसतात की त्यांची ईच्छा असून देखील त्यांना बाहेर पडता येत नाही. दहशतवादी किंवा नक्षलवादी बनण्यात युवकाची संख्या मोठी असण्यामागे हेच कारण नसेल कश्यावरुन ?
हाताला काम नसल्यामुळे हे युवक वाईट व्यसनाच्या विळख्यात अडकले आहेत. दारु पिणे, तंबाखू खाणे, चरस, गांजा, अफु याचे सेवन करणे आणि समाजात गैरवर्तन करणे असे प्रकार वाढीस लागले त्यास फक्त एकच कारण आहे ते म्हणजे युवकाच्या हाताला काहीच काम नसणे. त्यामुळे युवकास काम देणे गरजेचे आहे. रिकामटेकडे इकडून तिकडे फिरणे, दिवसभर अन रात्रभर फेसबुक आणि व्हाट्सएप्प सारख्या सोशल मिडियाचा जास्त वापर करणे, मित्रासोबत अवांतर गप्पा मारत बसणे याशिवाय सध्या युवकांना दूसरे काहीच काम दिसत नाही. सुखदेव राजगुरु आणि भगत सिंग यांच्या सारखी स्फूर्ती आजच्या युवकात दिसून येत नाही कारण आज आपण स्वतंत्र आहोत आपणास त्यासाठी कोणाला भांडण करत बसायचे काम नाही. याची जाणीव त्यांना झाली आहे. सर्व काही आयते मिळत आहे त्यांना त्यासाठी वेगळे कष्ट करण्याची गरज नाही. मुले रिकामी हाताने फिरत आहेत याची काळजी त्या युवकापेक्षा त्याच्या पालकाना जास्त आहे. शिक्षण घेतलेला युवक आज शेतात काम करायला तयार नाही. मग एवढं शिक्षण घेऊन काय फायदा असे त्याचे बोलणे असते. यात युवकाची स्थिती मात्र धोबी का कुत्ता सारखी झाली आहे ना घरचा ना घाटचा. काम नसलेल्या व्यक्तीला समाजात दुय्यम स्थान असते असे म्हणण्यापेक्षा कुणी ही विचारत नाही. समाजात आपली पत आणि प्रतिष्ठा मिळविण्यासाठी काम करणे अत्यंत महत्वाचे आहे.
देशातील गलिच्छ राजकरणाचे युवक बळी पडत आहेत. हुशार राजकारणी मंडळी या युवकांचा निवडणुकीच्या कामासाठी तात्पुरता वापर करतात आणि निवडणूक संपल्यावर वाऱ्यावर सोडून देतात. काही ठिकाणी असे दिसून आले आहे की बरीच नेते मंडळी आपल्या सोईसाठी काही युवकाचे पालनपोषण करतात. त्यांना आळशी बनवितात. यामुळे आत्ता युवकांनी जागे होऊन स्वतः राजकारणात शिरकाव करणे आवश्यक आहे त्या शिवाय देशाची प्रगती अशक्य आहे. युवकांनी रोजगाराच्या मागे न धावता आपण रोजगार तयार करणे देशाची गरज आहे. आज भारत देशाला नरेंद्र मोदी सारखे हुशार पंतप्रधान लाभले आहेत. त्यामुळे जगाचा भारत देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोण देखील बदलला आहे. मेक इन इंडिया सारखे उपक्रम देशात चालू झाले आहेत. आज देशाला हुशार, उद्योगी आणि कर्तबगार युवकाची खरी गरज आहे. युवक मित्रांनो आळस झटका आणि कामाला लागून एक समृद्ध भारत घडवू या.

- नागोराव सा येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
  09423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[8/28, 1:44 PM]
 *भारतातील बेरोजगारी: एक यक्षप्रश्न*

              भ्रष्टाचार,गुन्हे,महागाई या जश्या  भारतातील प्रमुख अडचणी आहेत,तसेच "बेरोजगारी" ही एक महत्वाची अडचण आहे,ज्याकडे दुर्लक्षच केल जात.हा 'बेरोजगारीचा' यक्ष प्रश्न सोडवण्यात आत्तापर्यंत किंचीतही यश आल नाही अस दिसुन येत..
बेरोजगारी वाढायला अनेक कारण आहेत.काही जणांची पात्रता असते,पण काही थोडक्या कारणांमुळे त्यांना "बेरोजगार" नावाचा ठप्पा सहन करवा लागतो.जसे कि अनुभवाची कमी,मागासवर्गीय आरक्षण ई.  या बेरोजगारीला नेमक कोणास कारणीभुत ठरवाव हे काही सांगता येत नाही.
आजकल विद्यापीठाची डिग्री घेतलेल्या कित्येक व्यक्ती बेरोजगार म्हणुनच आहेत.त्यांची पात्रता असुनही त्यांना दोन वेळच अन्न खाण्यासाठी पैसे कमवण अवघड जात.
मुळात बेरोजगारी वाढते कश्याने?
शहरातील झगमगाट पाहुन तसेच तशा ऐशोराम मिळावा म्हणुन खेड्यांतील व लहान गावांतील युवक शेतीभाती सोडुन शहरांकडे स्थंलांतर होतात.प्रत्येकाला नोकरी/रोजगार मिळतोच अस नाही.हातावर पोट असल्यासारख त्या त्या दिवशी कमवुन खातात.काहीजणांना आपली शिक्षणपद्धती अवघड-गुंतागुंतीची वाटते,काहीजणांची शिक्षण पुर्ण करण्याची अर्थिक पात्रता नसते.अशे युवक शिक्षण पुर्ण करु शकत नाहीत.तेही नंतर हळु हळु बेरोजगारीचा हिस्सा बनतात.आपल्या हिरव्यागार भारत देशात अनेक रंगाच्या अडचणी आहेत,त्यामध्ये बेरोजगार जास्त प्रमाणात आहे.
काहीठिकाणी फक्त अनुभवींना व कास्ट वाल्यांना प्राधान्य दिल जात.अशावेळी त्या कामाची पात्रता असतानाही ,पण  अनुभव नसलेले व ओपन कॅटॅगीरी मध्ये असलेले लोक हतबल राहतात.दुसरा मार्गही नसतो त्यांच्याकडे.
              'बेरोजगारी एक यक्ष प्रश्न' म्हणजे नेमक काय->पात्रता असणा-यांना त्यांच्या पात्रतेचा रोजगार कधी मिळणार?जे शैक्षणिकरित्या कमडोर आहेत,त्यांना कोणतातरी रोजगार मिळणे शक्य नाही का?आपली युवा पीढीच जर अशी हतबस राहिली तर प्रगती होणार तरी कशी??
हे व असे बरेच प्रश्न आहेत,जे खरच यक्ष आहेत.
विषय 'भारतातील' बेरोजगारीचा आहे,तर यासाठी आपल सरकार ही काही अंशी कारणीभुत असणारच.सरकारकडुन ब-याचशा संधी असतात,पण त्याही काही ठिकाणी दडपल्या जातात.लोक रोजगार करतील,मग कमवतील ही,मग आवश्यकतेसाठी खर्चही करतील,मग त्या खर्चाचा 'कर' हा असतोच,जो देशाच्या अर्थव्यवस्थेवर चांगला फायदेशीर होऊ शकतो.
2020 ला महासत्ता बनण्याच डाॅ.कलामांच स्वप्न पुर्ण होईल अस चित्र दिसत नाही.बेरोजगारीसारखे
प्रश्न जर *यक्षप्रश्न* बनुन राहणार असतील तर शक्यच नाही ते.
            एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे."जर योग्य मोबदला मिळत असेल तर कोणतही काम(चांगल) करायला लाजु नये"
ही बेरोजगारी हचवायची असेल तर यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण गरजेज आहे..सरकारणे,युवकांनी व पुर्ण सिस्टम ने.
आजकालचे युवक 'आशा' लवकर सोडतात.निराशेत तसच कोणाचातरी सहारा घेऊन बेरोजगारच राहतात..संधीचा पुरेपुर वापर करुन या समस्येला घालवता येऊ शकतच.
शेवटी प्रयत्नांती परमेश्वर.

निलेश सुरेश आळंदे.
गडहिंग्लज.(मो.8857912164)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[8/28, 1:53 PM] ‪+91 86980 67566‬
*भारतातील बेरोजगारी :यक्ष प्रक्ष*
रिकामे डोके सैतानाचे घर असते. हे आपण खूप वर्षापासून ऐकत आलेलो आहोत. एकविसाव्या शतकाचा सूर्य क्षितिजावर आला तो अनेक नवी स्वप्न घेऊन, त्याच वेळी लोकसंख्येचा भस्मासूर अनेक प्रश्न घेऊन दुसऱ्या बाजूनं येताना आपण पाहिला. भारतासारख्या मोठ्या देशात वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक मोठे प्रश्न तयार होत आहेत.
प्रश्न आणि तेही यक्ष असतील तर....?
भारतातील बेरोजगारी हा आज यक्ष प्रश्न आहे. महाकाय भारत आणि या भारतातील बेरोजगार तरुण ही मोठी समस्या होऊ शकते अर्थात आज चहूबाजूने एकामागून एक समस्या उद्भवताना दिसतात, या समस्या सोडविताना होणारी दमछाक, सर्वत्र बदलत चाललेली जीवनशैली , राजकिय पक्षाची विस्तारवादी धोरणं ही तरुणांना बिघडवणारी आहेत. आणि त्यातल्या त्यात बेरोजगार तरुण याला बळी पडताना दिसतात.
*"नळी आणि बाटली"* ला भूलवून या बेरोजगार तरुणांचा वापर करून घेऊन राजकिय पक्ष स्वतःचा स्वार्थ साधवून घेतात आणि मग पुढं हीच
पोरं टपोरीगिरी करत जीवन कंठतात. कधी याच्या तर कधी त्याच्या दावणीला बांधली जातात ही बेरोजगार तरुणं. रिकाम्या हाताला आणि रिकाम्या डोक्याला काम नसतं तेव्हा ते हात आणि ती डोकी नको त्या मार्गाकडं वळत असतात. जागतिक पातळीवर दहशत पसरवलेली इसीससारखी दहशतवादी संघटना अशा रोजगार नसलेल्या रिकाम्या हाताच्या आणि रिकाम्या डोक्यांच्या तरुणांना जवळची वाटू लागलीे. दिल्लीतील निर्भया प्रकरण असो वा कोपर्डीतील प्रकरण आणि अशी उजेडात न आलेली कितीतरी प्रकरणं जी रिकाम्या डोक्यांमुळे आणि रिकाम्या हातामुळे घडतात आणि घडत राहतीत. इंटरनेटच्या माध्यमातून आता जग अधिक जवळ आलेलं आहे. आईबापाच्या धाकात न राहणारी आणि अगदीच सैराट झालेली पिढी हातात महागाडा मोबाईल कोणत्याही पद्धतीनं प्राप्त करते आणि नको त्या साईटवर ( संकेतस्थळावर ) तासनं तास रमताना दिसतात. नसता फेसबुक व्हॉट्स अॅप वर चॅटिंग  मध्ये गुंग झालेली दिसतात. याच माध्यमातून नको त्या नव्या नव्या योजना डोक्यात जन्माला येतात. आणि त्या योजना साकारण्यासाठी वाम मार्गावर चालणारी ही बेरोजगार पिढी यक्षप्रश्न म्हणून समाजापुढे पर्यायाने देशापुढे आज उभी आहे. संस्कार नावाची गोष्ट सांगण्यापूर्ती आणि लिहण्यापूर्तीच शिल्लक राहिली.विकृतविचारधारा रिकाम्या डोक्याच्या आवडीची झाली आणि माणूसकी गोठून गेली संवेदना हरवून बसली. ज्या देशात असा असंस्कृतपणा वेगाने वाढू लागतो त्याच्या भविष्याबाबत चिंता वाटणे स्वभाविक आहे. जगात सर्वात तरुणांचा असणारा आपला देश पण दे रे हरी पलंगावरी असं म्हणत मोठं होणारी तरुण पिढी आळसाला चिकटू लागली. आणि तीच पुढं यक्षप्रश्न बनून गेली..
आता विचारा बरोबरच आचारही बदलण्याची गरज आहे.. देश मोठया अपेक्षाने आपणाकडे बघतो आहे. चला देश बदलू देश घडवू... !!
     
                    श्री. हणमंत पडवळ
             मु.पो. उपळे (मा.) ता. उस्मानाबाद.
                            क्र : -  48.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[8/28, 3:25 PM] ‪+91 90285 74285‬
 भाग १९ वा साहित्य दरबार स्पर्धेसाठी
भारतातील बेरोज़गारी  : एक यक्षप्रश्न
अखिल जगतामध्ये भारत लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रंमाकावर आहे. आपल्या देशाची लोकसंख्या १०० कोटीहून अधिक आहे. ज्या  भारत  देशात  पूर्वी  सोन्याचा धूर निघत  होता त्या देशात  आज ज्या  मुख्य  समस्यांना तोंड  द्यावे  लागते त्यातील  एक  महत्वाची समस्या म्हणजे प्रचंड  बेरोजगारी ची  समस्या आहे. एका सम्पन्न देशावर ही  वेळ  का  आली  याचा  खोलवर  जावून  विचार  केला  सर्वात  आधी बोट  सत्ता राबवणाऱ्य राजकीय  नेत्याकडे  जाते. बेरोजगारी नाहीशी  करण्यासाठी भारतात  असलेल्या उपलब्ध साधनसम्पत्ति चा वर्षानुवर्षे वापरच केला  गेला नाही. बेरोज़गारी वाढन्याचि कारणे शोधली गेली  नाहीत, तरुणांना आसणारे व्यावसायिक  शिक्षण देण्यासाठी शिक्षण पद्धतीत बदल केला गेला नाही, रोजगार निर्मीती केंद्रे  स्थापन  केली  नाहीत आणि स्वातंत्र्या नंतरच्या ७० वर्षाच्या  कालखंडात केवळ  सत्ताधीशांच्या प्रचंड इच्छा शक्तिचा अभाव  हेच भारतातील वाढत्या  बेरोजगारीचे  प्रमुख कारण आहे
         प्रती वर्षी लाखोच्या  संख्येने युवक पदव्यांची नुसती कागदी प्रमाणपत्र  घेवुन महाविद्यालया तून बाहेर पडतात त्यांच्या हातात  पदवी  असते परंतु व्यावसायीक ज्ञानाचा अभाव असल्यामुळे त्यांना आत्मविश्वासाने एखादा व्यवसाय उभा  करता येत  नाही, पदवी हातात  पडल्यावर युवकांचे  लोंढे नोकरीच्या शोधात भटकत असतात आणि प्रत्येकाला  नौकरी  मिळण्याईतपत व्यवसयाची निर्मीती झालेली  नसल्याने बेरोजगार युवकांची संख्या दिवसोदिवस  वाढते  आहे
 बेरोजगारी कमी करण्यासाठी काय करता येवू शकते..
सर्वप्रथम समाजात नोकरदार हाच सर्वोत्तम ही कल्पना  दूर केली पाहिजे
युवकांना अधीकाधिक व्यावसायीक  शिक्षण दिले पाहिजे
यूवकांना व्यवसाय उभारणीसाठी प्रोत्साहन दिले पाहिजे
राष्ट्रीयक्रूत बॅकानीं युवकांना कमी व्याजदरात कर्ज दिले  पाहिजे
या बरोबरच  अनेक उपाययोजना अमलात आणता येतील जेणेकरुन यावर मात करता  येवू  शकेल.
                 सध्या प्रधामंत्री महोदयानी मेक इन इंडीया हा  उपक्रम चालू केलेला  आहे  त्यावर
टिकां करीत वेळ घालवण्यापेक्षा आलेल्या  संधीचा पुरेपूर उपयोग  करून घ्यावा आणि बेरोजगारी या संकटावर मात करावी. रिकामे मन सैतानाचे घर असू शते पण उद्योगी मन कूबेराचे भांडार असते, युवकांनी  अपयशाची  भिती न  बाळगता उद्योगात पडले पाहिजे. उद्योगात पडा, पळता येत  नसेल  तर चाला, चालता येत  नसेल  तर  रांगा. रांगाताही येत नसेल तर एकएक इंच पुढे  सरकां पण घाबरु नका, कारण  प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत  नाही.
              विधीज्ञ अमोल देशमुख - ५७ माजलगाव
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[8/28, 3:41 PM] ‪+91 94231 53509‬
 *साहित्य दरबार*

*भारतातील बेरोजगारी : एक यक्ष प्रश्न*

     *जहाँ डाल डाल पे सोने की चिडियाँ करती है बसेरा , वो भारत देश है मेरा.* असे सुवर्णमयी वर्णन केलेल्या आमच्या देशात आज बेरोजगारांचे रिकामे हात पाहिले की, मन अगतिक होवून जाते.
         रिकामे डोके सैतानाचे घर, असे आपण संबोधतो. मग हे डोके जर रिकामे राहू नये असे वाटत असेल तर, नक्कीच त्या हातांना काम हवे. वर्षानुवर्ष भारत हा प्रगतशील देश आहे असे संबोधले जाते. त्यामुळे एक समस्या सुटत आली की , दुसरी समस्या आपल्या समोर उभी राहते, त्यातच बेरोजगारी ही तर न संपनारी समस्या असे वाटते.
           औद्योगिक क्रांती झाली आणि ही बेरोजगार समस्या निर्माण झाली. मशीन व तंत्रज्ञान याचा वापर वाढला आणि मनुष्यबळाचा वापर कमी होत गेला. त्या क्रांतीने इकडे बेरोजगार वाढले. ज्या देशात मनुष्यबळ कमी आहे त्यांसाठी हे वरदान होते , मात्र भारता सारख्या देशासाठी ही क्रांती उपयोगी ठरताना दिसत नाही.आपल्या देशात मनुष्यबळ सहज उपलब्ध होवू शकते.
           कारखानदारीने कामगार वर्ग वाढला मात्र आज अनेक कारखाने बंद पडत आहे किंवा कामगार कपात होत आहे, त्यामुळे सामाजिक स्वास्थ बिघडत चालले आहे. ग्रामिण व शहरी भागात या बेरोजगारीच्या समस्या वाढताना दिसत आहे.
         त्याचाच परिणाम म्हणून वर्तमान पत्र उघडले की प्रत्येक पानावर आज दरोडा, लुटमार, चोरी , ऑनलाईन फसवणूक, सायबर क्राईम इ. प्रकार घडत आहेत. बेरोजगारीने या प्रकारात वाढ झालेली आहे असे ठोकपणे आपण सांगू शकतो.
      आज गाडी चा दरवाजा ठोठावून
भीक मागणारे हात , उदया गाडी अडवून लुटमार न करोत सामाजिक स्वास्थ नक्कीच बिघडणार आहे. शिकून शिक्षितांचे लोंढेच्या लोंढे आज बाहेर पडत आहे व त्या हातांना काम देण्याची कोणतीच भक्कम योजना आमच्या सरकारी यंत्रणेकडे दिसत नाही.आम्ही सपशेल अपयशी झालो आहोत.
          हाताला हवे काम, कामाला मिळावा योग्य दाम, मात्र तसे होतांना आज दिसत नाही. सरकारी नोकऱ्याची मारामार त्यातच करार तत्वाचा वापर करून नोकर भरती होत आहे.कामाचा दर्जा खालावणे बरोबरच वेगळ्या समस्या निर्माण होत आहे. अनेक विदयार्थी घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करू न शकल्याने नशापान व आत्महत्या प्रकाराकडे वळतांना दिसत आहेत.
         अखेरचा कळस म्हणजे या बेरोजगारी मुळे अनेक युवा वर्ग अनेक खतरनाक अशा दतशतवादी संघटनेकडे वळतांना आपनास दिसत आहेत. तसेच बाहेर प्रांतातील येणारे लोंढे त्यामुळे होणारा प्रांतवाद ही सुद्धा नवी समस्या उदयास आली आहे. त्याच प्रांतवादातून धार्मिकता विवाद उत्पन्न झाले आहेत.
         आम्ही जर उदयाची सुंदर भारताची स्वप्न पाहणार असू तर, प्रत्येकाला काम कसे मिळेल या बाबद विचार मंथन करुन रोजगार निर्मितीचे नवे क्षेत्र शोधावे लागतील. या युवा शक्तीने सत्ता परिवर्तन केले आहे, हीच युवा शक्ती बेरोजगार होवून रस्त्यावर उतरली किंवा चुकिचा मार्गावर मार्गक्रम करायला लागली तर....
        आपल्याला त्यांना आवर घालणे कठिण होईल ,वेळीच आपण ही वादळा पुर्विची शांतता ओळखायला हवी, कारण ही बेरोजगारीची समस्या तुमच्या आमच्या उंबरठ्यावर येवून ठेपली आहे असे वाटते ...

*किशोर भीमराव झोटे@32*
*औरंगाबाद*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[8/28, 3:47 PM]
भारतातील बेरोजगारी-- यक्षप्रश्न                    
भारताची सुजलाम सुफलाम म्हणून ओळख आहे.पण या देशाला सदैव एक चिंता ग्रासतेय ती म्हणजे येथील बेरोजगारी...लोकसंख्येच्या शर्यतीत भारत अव्वल स्थान स्थापन करेल यात तीळमाञ शंका नाही,परंतू अनेक लोकांचा उदर निर्वाह पोटा पाण्याचा प्रश्न अजूनही अनूत्तरीतच आहे...पदवी घेतलेले तरुण ही नोकरीच्या शोधात भरकटलेत,.. अशिक्षित पणाचा तर उच्चांक असेल कदाचित ....कुटुंबातील कर्त्यानी रक्ताचे पाणी करुन आपल्या लाडक्या लेकरांना उच्च शिक्षणाचे द्वार खुले केले ..अमाप कष्ट करुन शिकवले घडविले,हे सत्य नाकारता येत नाही ..पण बेरोजगारीच्या किडीने आपला माणुस पोखरलाय...आज त्याला निर्भिडपणे जगता येत नाही. कुटूंबाचा बोजवारा वाहून  वाहून तो पुरता बेजार झालाय. याचं मुळ म्हणजे बेरोजगारी .. वाढती लोकसंख्या ,ढासळलेली अर्थव्यवस्था , खाकी बगळ्यांनी केलेली गलीच्छ राजकारण हे ही तितकंच झोंबनारं सत्य बेरोजगारीला खतपाणी घालणारं कारण असावं असं नक्कीच वाटतं...माणसाच्या तीन गरजा म्हणजे अन्न ,वस्ञ,निवारा भागणं म्हणजे याला प्रगती नाही म्हणता येणार, शिक्षण ,नवे नवे तंत्रज्ञान या सर्व गोष्टी यशो प्रगती पथावर पोहचल्या पाहिजे...तरंच भारत बलशाली महासत्ता होऊ शकतो. त्याच बरोबर बेरोजगारी चा प्रश्न ही बर्यापैकी मार्गी लागू शकतो ,आज कित्येक कुटुंब दारिद्रेत जगतंय. जिथे पोटापाण्याचा प्रश्न सुटू शकत नाही ..तिथे समाजासाठी आपल्या देशासाठी माणुस काहीच प्रगती करु शकत नाही..बेरोजगारीचे जर मुळ उपटून टाकायचे असेल तर सरकारने छोट मोठे उपक्रम राबवून,लघूउद्योगांना चालना देऊन मोकळे हात राबवावे...तरच कुठेतरी आशेचा किरण उगवेल..आणी प्रगतीचा चढता आलेख नक्कीच उंचावल्या शिवाय रहाणार नाही.तुम्ही आम्ही जेव्हा राबते होऊ तेव्हा हर एक चिंता नक्कीच मिटली जाईल.चार पैसे मिळतील..त्यातून शिक्षण कुटूंब उदरनिर्वाह योग्य दिशेने वाटचाल राहिल...हळू हळू बेरोजगारी नाहिसी होईल.          
रोहिदास होले ,..७१            
गोपाळवाडी ,दौंड ,पुणे......          
मो. ९०२८३४१५३६
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[8/28, 3:50 PM]
साहित्य दरबार_
==================

_भारतातील बेरोजगाहारी_-
_एक यक्षप्रश्न_

==================

भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात प्रामुख्यान शेती हा व्यवसाय चालला जात असे परंतु जसजशी बौद्धीक प्रगती झाली तशी माणसामध्ये *लाज* ही वाढत गेली मग ती लाज ही मुक्त वागण्याची,बोलण्याची,खाण्याची, बसण्याची,हसण्याची,अश्या अनेक लाजेत महत्वाची *लाज* म्हणजे *काम* करण्याची लाज जास्त वाटू लागली आपण इतके शिकलो मग त्याला साजेसच काम असावं कोणतही काम करण म्हणजे आपल्या प्रतिष्ठेला लाजवणार असेल आणि याचमुळे ठणठणीत हट्टेकट्टे तरूण हे *बेरोजगारी*च्या विळख्यात आडकली आहेत.

एके ठिकाणी वाचलेली गोष्ट..
दोघे मित्र असतात एक साधरण हुशार नि दुसरा चागंला हुशार पंरतु आरक्षणामुळे कमी हुशार हा पोलीस नि दुसरा चोर बनतो नि तोच त्याला पकडतो. आता यातुन हाच बोध होतो की हुशारी असून देखील त्याचा योग्य तो वापर होत नाही नि ही तरूण पिढी नको त्या अवमार्गाला लागते नि बोरोजगारीला सामोरे जाते आहे. आजकालच्या तरूणांना दुसरी गोष्ट कमी श्रमात जास्त पैसा हवाय मग त्यासाठी शाँर्टकट निवडण्याच्या नादात काहीच कामधंदा करत नाहीत. शिवाय प्रसार माध्यमाला बळी पडून केवळ ऐशोआराम नि चैन याकडे तरूण पिढी वळत आहे.

योग्य वयात *योग्य मार्गदर्शनाचा अभावही* बेराजगारीला कारणीभूत ठरत आहे.कारण शाळा काँलेजातुन त्याच्यात योग्य ती दिशा दिली म्हणजे त्याच दिशेन ती झपाटली जातील परंतू इथे विपरीत प्रकार घडतांना दिसतो काही पाल्य गडगंज श्रीमंताची असतात मग ती इतर मुलांना व्यसनाच्या विळख्यात ओढतात नि मग हिच मुल भरकटून दिशाहिन होतात पर्यायी पुन्हा बेरोजगारीच्या कारखाण्यात भर म्हटल्यासारखी भर ही होते.
आजकाल *हम दो हमारे दो* यामुळे मुल लाडावलीत मग काय आईवडिलांच्या जिवावर ऐशोअराम नि मग पुन्हा वेळ निघुन गेलास पुन्हा *बेरोजगारीचाच यक्षप्रश्न*


सरतेशेवटी मी हेच म्हणेल बेरोजगारी ही जाणिवपुर्वक निर्माण झालेली नि केलेली या तरूण मुलांची आहे.आज रिओ मध्ये या अबला म्हणवणाऱया कोवळ्या पोरीसोरी उतुंग कामगिरी करतात मग हा आदर्श का ठेवत नाहीत ही तरूण मुल ? आता एकच *झणझणीत सत्य*आपणासमोर मी मांडते की का हो कोणी म्हणते का आमची मुलगी बेरोजगार आहे ? नाहीच म्हणू शकत कारण ती या पुरूषप्रधान म्हणवणाऱया देशात घरात बसुनही लघुउद्योग नि कुटीरद्योग करते,धुणीभांडी करते,विणकाम,करते,पार्लर चालवते,शिवणकाम करते  मग तिथ विचार नसतो हे तिला साजस दिसेल कि नाही . ती फक्त रिकामी राहणे पंसत करत नाही नि बेरोजगार म्हणवणही म्हणुनच या तरूण पिढीन कामाची *लाज* जर बाजूला सारली तर नक्कीच  *भारतातील बेरोजगारीचा यक्षप्रश्न* हा सुटल्या शिवाय राहणार नाही.

तरूणानो विचार करू नका कामाला लागा नि बेरोजगारीचा ठपका मिटवण्यास सिद्ध व्हा!!!!!!!
🖊🖊🖊📖🖊🖊🖊

*कल्पना जगदाळे@8★बीड*

       *👆🏿स्पर्धेसाठी👆🏿*

👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[8/28, 4:10 PM]
🌹 साहित्य दर्पण ग्रुप आयोजीत 🌹
                📕साहित्य दरबार📕

🙏भारतातील बेरोजगारी➖एक यक्ष प्रश्न  🙏
    माणसाच्या तीन मुलभूत गरजा आहेत त्या म्हणजे अन्न वस्र व निवारा या गरजा पूर्ण करण्यासाठीच माणूस अहोरात्र झटत असतो
    आजचा चिंतनाचा विषय म्हणजे बेरोजगारी माझ्या मते बेरोजगारी ची अनेक कारणे आहेत त्यापैकी पहिले कारण म्हणजे आजची शिक्षण पध्दती शिक्षण हे व्यवसायाभिमुख असावे असे म्हटले जाते पण प्रत्यक्षात तस होत नाही वारंवार बदलनारे शैक्षणिक धोरण यामुळे शिक्षणाचा बट्याबोळ झालेला आहे फक्त कागदी घोडे नाचवण्यात किंवा शिक्षणवरचे प्रयोग करण्यातच एक एक अभियान संपत आहे प्राथमिक शिक्षणापासूनच मुलांना व्यवसाय शिक्षणाचा कल पाहून संधी दिली पाहिजे अनेक काम ही कुशल कामगाराकडुन करुन घेण्यासारखी आहेत त्यात सुतारकाम लोहारकाम टेलरकाम गवंडीकाम कुंभारकाम सोनारकाम चप्पल तयार करणे अशी कितीतरी मोठी यादी आहे की जी दैनंदिन जीवनासी लागणार्या वस्तुशी निगडीत आहे आज आपण पहातो की काही कामे हि जातनिहाय करावयाची आहेत असा गोड गैरसमज माणसामध्ये निर्माण झालेला आहे परंतु हिच कामे जर आवडीनुसार केली गेली तर त्यातील गुणवत्ता तर वाढेलच पण बेरोजगाराच्या हाताला कामही मिळेल व थोड्याफार प्रमाणात जातीची लेबलं कमी होण्यास मदत होईल शालेय अभ्यासक्रमात त्यासाठी प्राधान्य देणे आवश्यक आहे
  बेरोजगारीचे दुसरे कारण आहे लोकसंख्या➖लोकसंखेच्या बेसुमार वाढीमुळेच बेरोजगारी वाढली असे म्हटले तरी वावगे ठरनार नाही खाणारी तोंडे जास्त व काम करणारे कमी यामुळे कुटुंब विस्कळीत झालेली पहायला मिळतात म्हणुन  शासनाच्याधोरणा प्रमाने मर्यादित कुटुंब असावीत
     तिसरे कारण आहे अंधश्रध्दा व रुढी परंपरा माणसाने कोनतेही काम करण्याची तयारी ठेवली पाहिजे➖खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी➖ अशी काहीजनांची मानसिकता असते काम करण्याची लाज वाटते किंवा मी जर हे काम केल तर मला लोक काय म्हणतील असा विचार काहीजन करतात यामुळे कधी कधी उपासमारही होवू शकते
   खरतर प्रत्येकाला वाटते मला नोकरी असावी पण ते शक्य नसते पण मिळेल ते काम करण्याची मानसिकता जर ठेवली तर कुणीही बेरोजगार राहणार नाही फक्त त्या कामावर निष्टा असावी
    भारत हा शेतीप्रधान देश आहे खरतर आधुनिक तंत्र ज्ञान वापरुन शेती केली तर किती तरी फायदा होवू शकतो त्यासाठी  शिकलेल्यांनी शेती डोळसपणे करावी शेती करणे म्हणजे कमीपणा नाही हे लक्षात घेतले पाहीजे जे बाजारात विकते ते पिकवले पाहिजे
      तरुन पिढी ही आळसी ऐतखावू बनत आहे आणी त्यातुन गुन्हेगारी वाढत आहे हे आपण लक्षात घेतले पाहीजे जर या गोष्टीला वेळीच आळा घातला नाही तर याचे परिणाम भयानक होणार आहेत भारतातील दारिद्र्यही याला एक कारण आहे म्हणूनच प्रत्येक व्यक्तिच्या हाताला काम मिळालेच पाहिजे एकिकडे भरमसाठ संपत्ती जमा करत आहेत तर दुसरी कडे खायला अन्न नाही हि विषमताही दूर होने गरजेचे आहे
          खेडकर सुभद्रा बीड (२०)
    मो नं(९४०३५९३७६४)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[8/28, 4:15 PM] ‪+91 99752 32602‬
📚 साहित्य  दर्पण Whatsapp ग्रुप  📰🖊
     द्वारा आयोजित

भारतातील बेरोजगारी :एक यक्षप्रश्न

बेरोजगारी ही अशी अवस्था आहे रोजगार करू ईच्छिनारयांचि संख्या जास्त असने पण रोजगार उपलब्ध नसणे. याला आपन ढोबळ मानाने बेरोजगारी मनु शकतो.
बेरोजगारी चे बरीच कारणे आहेत.
त्यात मुख्य कारण लोकसंख्या. भारतात सन 1981-1991 दरम्यान लोकसंख्येत तब्बल 16 कोटिंची वृद्धि झाली तेंव्हा पासुनच बेरोजगारीन भारताला ग्रासल आहे.
इ.स. 2010 मधे बेरोजगारीचा दर 10 टक्के होता तो 2011 मधे 9.5 तर 2015 मधे 5-6 टक्के आहे.
बेरोजगारी दरात म्हणावी तशी घट होत नाहिए. त्याला पन बरेच कारणे आहेत. आपल्या शैक्षणिक संस्थानातुन बाहेर पडनारे अकुशल विद्यार्थी. म्हणजेच सुशिक्षत बेरोजगार.
त्यांचा अकुशलतेमुळे त्याना रोजगारासाठी दरोदार भटकाव लागत आहे. अशी अकुशल विद्यार्थी पास कसे होतात तो वेगळा प्रश्न आहे त्या त्या महाविद्यालय व विद्यापीठांना माहीत.
भारतात शेकडो इंजिनीरिंगची महाविद्यालय आहेत त्यातून हाजारो विद्यार्थी पदव्या घेऊन बाहेत पड़त आहेत पण कुशेलतिची कमतरता असल्याने फक्त 5-10 टक्केना चांगला रोजगार उपलब्ध होत आहे तर 25-30 टक्के नाम मात्र पगारावर नोकरी करतात.

तसेच लाखो विद्यार्थी दरवर्षी विविध पदव्या घेऊन बाहेर पडतात.पण सरकारी नियोजन व अकुशलता त्यांना रोजगार भेटू देत नाही.
भारतात सगळ्यात कमी बेरोजगारी गुजरात मधे आहे 1.2 टक्के म्हणजेच गुजरात मधे दर हजार व्यक्ती मागे 12 व्यक्ति बेरोजगार, महाराष्ट्रात 28 तर कर्नाटकात 18. सिक्किम व हिमाचल प्रदेशात सर्वात जास्त बेरोजगारी आहे. तिथे प्रमाण हजारामागे 100 पेक्षा जास्त आहे.
भारतातील ग्रामीण क्षेत्रातील बेरोजगारी 4-5 टक्के आहे.तर शहरीभागात 5 टक्के.
शेती क्षेत्रात 12 महीने रोजगार उपलब्ध होत नसतो त्यामुळे सुद्धा सत्र निहाय बेरोजगारी कमी जास्त होते त्यांच्याकडे दूसरा प्रयाय उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.
भारत सरकारने बेरोजगारी दूर करण्यासाठी अनेक योजना आखल्या व अंमलबजावणी झाली राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम, जवाहर रोजगार योजना, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना (मनरेगा)  आता स्किल इंडिया, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया त्यामुळे थोड़ा फार फरक नक्कीच पडला आहे.
पण उत्तर प्रदेश सरकारन बेरोजगारीच चांगल पालन पोषण ( मतांच पोषण) करायच ठरवल आहे, कारण तिथ बेरोजगार भत्ता दिला जातोय त्यासाठी 80 लाख जनांनी नोंदनिही केलि आहे. आशा योजनांनी बेरोजगारी कशि दूर जाईल ते आखिलेषच सांगु शेकतील.
केंद्र व राज्य सरकरांनी एकत्रीत काम केल पाहिजे.

                                                                                                             अमोल अलगुडे
                                                                                                                  निलंग                                                                                                        9975232602

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[8/28, 5:19 PM]
📚साहित्य दर्पण व्दारा आयोजित 📚
साहित्य दरबार वैचारिक लेखमाला
***********************
भाग------एकोणविसावा
दिनांक ---28-8-2016
***********************विषय---भारतातील बेरोजगारी---एक यक्ष प्रश्न
***********************
भारत हा 70 % खेड्यानी बनलेला देश आहे.या खेड्यांचा विकास झाल्या शिवाय देशाची प्रगती अशक्य आहे .कारण आज 50%युवक हा खेड्यात बेरोजगारीच्या विळख्यात सापडला आहे. देशाचा विकास हा त्या देशातील तरुणाईंच्या कतृत्वावर अवलंबुन असतो.त्याशिवाय देशाची अर्थव्यवस्था बळकट कशी होणार ? आज देशात अनेक तरुण बेरोजगार असल्यामुळे भारतापुढे अनेक समस्यापैकी बेकारीची समस्या आ वासुन उभी आहे.
बेकारी वाढण्याची अनेक कारणे आहेत.शिक्षणव्यवस्था हे एक प्रमुख कारण आहे .जपान प्रमाणे आपल्या देशातही व्यावसायिक शिक्षण हे प्राथमिक स्तरापासुनच असणे आवश्यक आहे.जेणेकरुन विद्यार्थी प्राथमिक शिक्षण पुर्ण केले की स्वतः व्यवसाय करीन खेड्यातील तरुण शहराच्या झगमगाटाला पाहून शहराकडे आकृष्ट होतात आणि खारी समस्या तेथुनच सुरु होते.कारण बेरोजगारीलाअनेक कारणे आहेत.तंत्र शुध्द शिक्षणाचा अभाव,लोकस.ख्येचा भस्मासुर,आणि तरुणांना बिघडवणारी राजकीय पक्ष. ही कारण प्रकर्षाने जाणवतात.शिकुन तरुण मुलं नुसत्या पदव्या गोळा करीत आहेत आणि बेकार होत आहेत.तर काही तरुण अर्ध्या वर आपले शिक्षण सोडून बेकार होत आहेत.तांत्रिक शिक्षण न घेतल्यामुळे कुशल कारीगिर मिळत नाहीत आणि मग वेळ वाचवण्यासाठी बरीचशी कामे यंत्रामार्फत करुन घेतली जातात.म्हणजेच बेकारीत भर पडते.उज्वल भवितव्याच्या पुर्ततेसाठी प्रयत्न, जिद्द, चिकाटी हे गुण आजच्या तरुणामध्ये  दिसत नाहीत.त्यामुळे तरुण उदासिन बनतात.दैवाला बोल लावत हा तरुण आळसाला कुरवाळत बसतो.आळशी मनुष्य हा दगडासारखा असतो.रिकामे हात आणि रिकामे डोके या बेकार तरुणांना स्वस्थ बसु देत नाहीत.मग त्यातुन गुन्हेगारीचा जन्म होतो , गुन्हेगारीतुन व्यसनधिनता वाढीस लागते. या सर्व गोष्टी राजकारण्यांच्या लक्षात येत नाहीत का ? पण स्वतः ची तुंबडी भरण्याच्या हव्यासापुढे त्यांना काही सोयरसुतक नाही "गाव जलो हनुमान बाहर".
आज आपण पहातो शहरे आणि खेडी यात प्रचंड दरी आहे, खेडूत हे निरक्षर आहेत

त्याचे तोटे ते पिढ्यान् पिढ्या भोगत आहेत अडाणी पणा मुळे ना नोकरी ना धंदा ना विकासाची ओढ, धनवान बुद्धिमान थोडे अडाणी दरिद्री नारायणच भरपुर . रिकामपण वेळेचआणि बुद्धीच ! फावला वेळ पारावर फुकट दवडला जातो, दारिद्रय रेषा डोक्यावर
राहुन मान अडकते सावकारी पाशात, जीव घेतात ते पाश.
खेड्यांत अनेक सुविधांचा अभाव असतो हे खरे पण आपणाला चित्र बदलायचे आहे ना ?मग शिकलेली माणसे खेड्यात गेली तर साक्षरता, आरोग्य  तंत्रज्ञान या गोष्टीचे ज्ञान आपल्या बांधवाना दिले तर काही प्रमाणात सावकारीचे पाश ढिले होतील आधुनिक शेतीने हरितक्रांती होईल आणि काही अंशी बेरोजगारीला आळा बसेल.
मुलांजवळ पात्रता  आहे पण मुलाखतीला गेल्यावर अनुभवाला प्राधान्य , पण मी म्हणते नोकरी दिली गेली नाही तर अनुभव कोठून मिळणार. आणि भ्रष्टाचार, वशिले बाजी या आनेक कारणांमुळे बेकारीत वाढ होत आहे.कोशल्य असुनही न्याय मिळत नाही म्हणजेच समाजवादाने व्यक्तिगत कौशल्य मारले जाते तर भांडवलशाही पिळवून टाकते राष्ट्रांच्या प्रगती साठी या दोन्ही गोष्टीचा योग्य वापर व्हायला पाहिजे. तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन  मिळाले पाहिजे.उद्योग धंदे वाढले परंतु मनुष्यबळाचा वापर न केल्यामुळे आणखी बेकारी वाढली .
बेकारी वाढण्याचे आणखी  एक कारण म्हणजे जातीयता. जात हि माणसाची पात्रता ठरवु लागली , परीणामी लायकी , बुद्धिमत्ता , कार्यक्षमता नसलेले उच्च पदस्थ झाले.मग राष्ट्रांला दिशा योग्य कशी मिळणार ?
          प्रांतियता हे ही एक कारण बेरोजगारीचे आहे.बेरोजगार असल्यामुळे आजचा तरुण अनेक चुकीचे निर्णय घेत आहेत्यांच्यात  जीवनाचा खटारा दुःखाच्या  चाकोरीतुन रें-रें करीत चालला आहे. या तरुणांना पैशाचा मोह दाखवून त्यांच्या कडुन देशविघातक कृती करवुन घेतल्या जात आहेत त्यामुळे आजचा तरुण व्यसनाच्या विळख्यात अडकला आहे. जीव तळतळतो तो आई बापाचा  ! आपला मुलगा वाईट वळणाला गेला हे दुःख  उराशी घेऊन ते मरणाला जवळ  करतात.बेरोजगारीमुळे आजचे तरुणआपल्या मुलांना शिक्षण ही देऊ शकणार नाहीत मग उद्याचा भारत कसा असेल, कर्जात जन्म,सरळ व्याजात वाढ,आणि चक्रवाढ व्याजात मृत्यू !! असा देश बघायचा नसेल तर शासनानी   नोकर भरती करावी ,संस्थाना मान्यता देऊन चरायला कुरणे देऊ नयेत,व्यावसायिक शिक्षण द्यावं,पात्रतेवर नोकरी असावी ,मनुष्य बळाचा वापर करणाऱ्या कारखान्यांना परवानगी द्यावी, आणि तरुणानी कोणत्याही कामाची लाज  न बाळगता काम उत्साहाने करावे. नोकरीवर अवलंबुन न राहता तांत्रिक प्रशिक्षण घेऊन स्वतःचा स्वतंत्र  व्यवसाय उभारावा , शासनाने बँके मार्फत कमी व्याज दरात आर्थिक पाठबळ द्यावे .तरच आपला भारत देश बेरोजगारीच्या विळख्यातुन सही सलामत बाहेर पडेल.
***********************
स्पर्धेसाठी
सौ.मीना सानप बीड @ 7
9423715865
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[8/28, 5:48 PM] ‪+91 87962 61088‬
 🌹 स्पर्धेसाठी 🌹

भारतातील बेरोजगारी (बेकारी) हा भारतासाठी यक्ष प्रश्न आहे ....
प्राचीन काळामध्ये भारत आर्थिक दृष्टि ने पूर्णत: सम्पन्न देश होता. त्यामुळे  भारताला ‘ सोने की चिड़िया ‘ असे संबोधले जात असे . पण आज भारत आर्थिक दृष्टि ने विकासशील देशांमध्ये येतो . आज ईथे  कुपोषण आणी बेरोजगारी आहे . आज आपल्या देशात जी अव्यवस्था व्याप्त आहे , त्याचं मुळ बेरोजगारी ची बिकट समस्या आहे . लूट-मार , चोरी डाका, हड़ताळ ईत्यादी  चे हे दुष्परिणाम आहेत . बेरोजगारी म्हणजे काय थोडक्यात पहा ....बेकारी म्हणजे किमान वेतन स्विकारून  व्यक्ती काम करण्यास तयार असणे परंतु कामाची उपलब्धता नसणे. बेकारी म्हणजे व्यक्तीला उत्पन्नाचे साधन कुठलेही नसणे असेही म्हणता येते. अर्थव्यवस्थेच्या पातळीवर रोजगार इच्छुकांच्या संख्येपेक्षा कामाची उपलब्धता कमी असेल, तर त्या अर्थव्यवस्थेत बेकारी किंवा बेरोजगारी आहे असे म्हणता येते. भारतात विशेषत: ग्रामीण भागात बेरोजगारीची समस्या तीव्र आहे असे मानतात कारण कामाची उपलब्धता कमी आहे. बेकारीमुळे दारिद्र्य येते. देशातीला काम करण्याजोग्या वयोगटातील एकूण लोकसंख्या भागिले बेरोजगार लोकांची संख्या असा भागाकार मांडला की देशातील बेकारी दर काढता येतो. अशी सरासरी काढताना अनेक गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात जसे देशाच्या शासनाची धोरणे, देशातील जनतेचा वयोगट वगैरे. बेकारी ही समाजासाठी एक वाईट गोष्ट आहे तरीही काही प्रमाणात बेकारी असणे नैसर्गिक आहे...

 भारतात  बेरोजगारी ची समस्या चे निरसन शक्य नाही  तरीही प्रत्येक समस्येवर  उपाय असतोच..
या समस्येवर  उपाय  करण्यासाठी  मानसीकता बदलण्याची  गरज आहे . मनोभावना बदलण्याची  गरज आहे

 तात्पर्य – कोणत्याही  कामाला कमी न समजणे कींवा  कमी न लेखने
युवावर्गाची मानसीकता  ही असायला  हवी  की  शिक्षण  घेवुन  स्वावलंबी  बनने....

 एक कविता ....ती अशी. ..
                   
मैं एक बेरोजगार हूं
                   
               
 बड़े-बुजुर्गों की नजर से
                     
मैं आज बेकार हूं।
               
 इम्प्लॉयमेंट एक्सचेंज मेरा
                       
आज शिवाला है,
                   
 फॉर्म भरते-भरते मेरा
                 
 निकल गया दिवाला है।
                     
अब अंतिम आसरा
                 
केवल बेरोजगारी भत्ता है,
                   
जिसकी कि निर्णयकर्ता
                       
आने वाली सत्ता है।
                   
गहन धूप हो या बरसात
                   
 मैं करता हूं एक ही बात,
                     
हे ईश्वर! कहीं से कर दो
                 
एक अदद नौकरी की बरसात।
                         
नौकरी बन गई है
                 
सामाजिक हैसियत का पैमाना,
                     
  उसने आज तोड़ दिया
  सामाजिक समरसता का ताना-बाना।
               
नौकरी पर्याय है नौकरशाही की
             
नौकरी पर्याय है लालफीताशाही की,
                 
तमाम डिग्रियां और उपलब्धियां
                       
नौकरी की मुहताज हैं
  रोजगार पाने वाला हर व्यक्ति सरताज है।
         
   ऐसे में है प्रभु! एक बेरोजगार क्या करे?
               क्या नौकरी खोजने का रोजगार करे?......

📝 पियु जाधव 📝
       🌹 पुणे 🌹

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~









No comments:

Post a Comment