Sunday, 27 November 2016

साहित्य दरबार



जागतिक एड्स दिन

खबरदारी हाच उपाय

संपूर्ण जगात 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स निर्मूलन दिवस म्हणून साजरा केला जातो. ‘एड्स’ हा शब्द उच्चारताना किंवा ऐकताना काळीज धस्स करते. हा रोग कुणाला झाला असे कळले की अंगावर काटे उभे राहतात आणि त्या रुग्णला वेगळ्या नजरेने पाहिले जाते.पूर्वी कर्करोग म्हणजे कॅन्सर हा सर्वांत भयानक रोग असे मानले जात असे. कॅन्सर म्हणजे माणूस कॅन्सल असे बोलले जायचे. मात्र जसे ही ‘एड्स’ विषयी लोकांना कळायाला लागले तसे मोठ्या रोगाच्या यादीत वरच्या क्रमांकावर एड्स ला पाहण्यात येऊ लागले. विज्ञानाच्या प्रगती मुळे कॅन्सरवर आता इलाज शक्य झाले आहे. समाजात अनेक रुग्ण यातून वाचले आहेत असे आढळून येतात. वैद्यकीय उपचार किंवा शस्त्रक्रिया करून कॅन्सर बरा होऊ शकतो. मात्र एड्सचे तसे नाही त्यामुळे लोकांच्या मनात या रोगाविषयी खुप भीती निर्माण झाली आहे. सन १९८६ साली भारतातल्या मद्रासच्या वेश्या वस्तीत पहिल्या एड्सच्या रुग्णाचं निदान झालं. त्या पाठोपाठ अनेक मोठमोठ्या शहरातून एड्स ची तपासणी झाली अशा ठिकाणी अनेक रुग्ण सापडू लागले आणि एड्स नावाचा भस्मासुर देशात उत्पन्न झाल्याची बातमी बघता बघता देशात सगळीकडे पसरली. लोकांना याविषयी सुरुवातीला काहीच माहित नव्हते मात्र आज 30 वर्षा नंतर या रोगा विषयी प्रत्येक जण जाणुन आहे. आजतागायत एड्स ह्या आजारावर कसलाही इलाज, औषध, लस यांचा शोध लागला नाही. यावर उपचार नसल्यामुळे खबरदारी हाच सर्वोत्तम उपाय आहे याची माहिती सुध्दा लोकांना आत्ता झाली आहे. याविषयी एक अनुभव मला प्रकर्षाने सांगावेसे वाटते, सकाळी सकाळी त्या बातमीने सारा गाव दुःखात बुडाले होते. कारण गावातील एक तरुण तिसीच्या आतील युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या मरणावर लोक काही बाही बोलत होते, एकमेकाच्या कानात कुजबुजत होते. त्यास महारोग झाला होता, वाचणे शक्य नव्हते, बरे झाले गेला तो, असे अनेक बोलणे कानावर पडत होते. यावरून माहिती मिळाली की तो एड्सचा रुग्ण होता आणि गेल्या पाच-सहा महिन्यापासून अंथरुणावर पडून होता. पैसे कमविण्यासाठी दोन वर्षापूर्वी मोठ्या शहरात गेला होता. भरपूर मेहनत करून खुप संपत्ती कमविली आणि परत आपल्या गावी आला मात्र येताना एड्स नावाचा रोग घेऊन आला होता. लग्न होऊन वर्ष ही उलटले नव्हते. एके दिवशी खुप ताप चढली म्हणून दवाखान्यात नेले. तेथे रक्त तपासण्याचे निमित्त झाले अन कळले की HIV पॉजिटिव आहे. असे कळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. जसे ही ही गोष्ट बायकोला कळली तसे तिने सर्वात पहिल्यांदा त्याचा त्याग केली. मागे पुढे कश्याचाही विचार न करता तिने घर सोडण्याचा विचार केला. हा जबर धक्का त्यास बसला. तो पूर्वीच शरीराने खंगला होता आत्ता मनाने ही खचला होता. काही दिवसानंतर ही गोष्ट घरात कळाली तेंव्हा घरात चिंतेचे वातावरण तयार झाले. घरातल्या लोकांनी त्यास वेगळ्या खोलीत टाकले, त्यांचे सर्व साहित्य वेगळे करण्यात येऊ लागले म्हणजे जवळपास त्यास वाळीत टाकल्यासारखी वागणूक मिळाली. गावात फिरणे कमी झाले. लोकांचा संपर्क कमी झाला. रोज थोडी शक्ती कमी होऊ लागली. मोठ्या शहरात त्यांच्या हातून झालेल्या चुकाची आत्ता त्यास पश्चाताप वाटत होता पण त्यांच्या हातात काही उरले नव्हते. अखेर तो दिवस उजडला आणि त्याचा शेवट झाला. वास्तविक पाहता तो त्याच दिवशी मेला होता, ज्यादिवशी त्याची बायको त्याला सोडून गेली होती. वास्तविक पाहता ज्याठिकाणी गरज होती मानसिक आधार द्यायची त्याठिकाणी ती मागे पुढे विचार न करता त्यास सोडून गेली. तिने जर आधार दिला असता तर काही दिवस आनंदात जगला असता. घरच्यानी सुद्धा त्यास खुप हीन वागणूक दिली ज्यामुळे त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण झाले आणि मी कधी एकदा मरतो की असे त्याला वाटू लागले.
     प्रातिनिधीक स्वरूपातील ही कहाणी एका युवकाची नाही तर देशात असे अनेक युवक आहेत जे की कळत नकळत या आजाराशी जोडल्या गेले आहेत. एड्स रुग्णाची संख्या लाखाच्या घरात आहे. दहा वर्षा पूर्वीची संख्या आज नक्कीच नाही याचे सारे श्रेय आरोग्य विभागला जाते, ज्यानी या विषयी खुप जनजागृती केली आणि त्यावर नियंत्रण मिळविले. ज्या चार कारणा मुळे एड्स चा प्रसार होतो ती कारणे आत्ता सर्व लोकांना कळून चुकले आहे. मात्र तरी सुध्दा काही ठिकाणी याचे रुग्ण जेंव्हा आढळून येतात तेंव्हा परत काळजी वाढू लागते.
योग्य वयात योग्य वेळी समज मिळाली तर त्यांचे जीवन सूकर होते. मात्र भारतात लैंगिक शिक्षण हा विषय काढला की लोकं नाक मुरडतात. त्यांना अस्वस्थ वाटायला लागते. पण जेंव्हा पोरगा हातून वाया जातो त्यावेळी विचार करतो की मी एकदा तरी त्याच्या सोबत याविषयी का बोललो नाही. तसा हा विषय खुलेपणाने किंवा मोकळ्या मनाने बोलण्यासारखा नाही. म्हणून त्यास लपवून बोलेल्या जाते. यामुळे मुले सुद्धा व्यक्त होत नाहीत. मग मित्राकडून चुकीची माहिती मिळविली जाते आणि हा त्याच्या आहारी जातो. आजकाल तर मोबाईलमुळे मुले अजुन जास्त बिघडत चालली आहेत. पूर्वी जे लपून छपुन पाहिले जायचे ते आत्ता एका क्लिकवर पाहायला मिळत आहे. त्यामुळे युवा पिढी नको त्या गोष्टी आत्मसात करीत आहेत. व्यसन करणारी पिढीवर फार लवकर याचा प्रभाव जाणवत आहे. ज्या तरुण पिढी वर भारताची प्रगती अवलंबून आहे ती पिढी अश्या रोगाच्या विळख्यात जखडल्या जात आहे. यापासून वाचण्यासाठी खबरदारी घेणे हाच सर्वोत्तम उपाय आहे, असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर 
  मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
  9423625769
  nagorao26@gmail.com

♦♦♦🔵🔵🔵♦♦♦🔵🔵🔵♦♦♦🔵🔵🔵♦♦♦

[11/27, 2:44 PM
 विषय

जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त

भरकटलेली युवा पिढी

                
               १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स निर्मूलन दिन म्हणून पाळला जातो . १९८१ साली एड्स या रोगाचा पहिला रुग्ण आढळला आणि त्यानंतर सर्वात वेगाने त्याचा फैलाव संपूर्ण जगभरात झाला . सर्व जगाला , जगातल्या सर्व वैद्यानिकांना यावर अजूनही कायमचे औषध सापडलेले नाही . या रोगाची कारणे , लक्षणे व संरक्षित उपाय सापडले आहेत पण कायम स्वरूपी उपाययोजना काही शक्य झाली नाही . 
                 आधी कर्करोग हा भयानक रोग वाटत होता मात्र त्यावर उपचार निघाले आणि त्यातून रोगी पूर्णपणे बरा होऊ लागला . आता जागतिक पातळीवरील सर्वात भयंकर रोग म्हणून एड्स या रोगाकडे पाहिले जाते . संपूर्ण जगभरातील संशोधक या रोगावर औषध शोधण्यासाठी अविरत प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत मात्र अजूनतरी त्यांना त्यात यश आले नाही . यावर उपाय एकच तो म्हणजे या रोगाविषयी जनजागरण करणे व तो होणार नाही याची दक्षता घेणे .
                     एड्स हा रोग मुख्यतः या चार कारणांमुळे होतो  . (१) HIV बाधित रुग्णाची सुई इंजेक्शन देण्यासाठी वापरल्याने . (२) HIV बाधित रुग्णाचे दूषित रक्त दुसऱ्या रुग्णाला दिल्याने .(३)HIV बाधित गर्भवती मातेकडून मुलांना होऊ शकतो. (४) असुरक्षित लैगिंक संबंधातून . 
                    यातील वरची तीनही कारणे सध्या नगण्य आहेत . कारण कुठल्याही रुग्णालयात आता प्रत्येक रुग्णाला वेगळी सुई वापरली जाते . रक्तदान करण्याअगोदर रक्तदात्याची एच आय व्ही ची चाचणी घेतली जाते . दूषित रक्त घेतले जात नाही . व गर्भवती स्त्रीच्या गर्भावस्थेतच ही चाचणी घेऊन बाधित आढळली तरी मुलाला त्यापासून वाचवता येऊ लागले आहे . मात्र असुरक्षित लैगिंक संबंधातून याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो आहे .  या संबंधात वापरली जाणारी सुरक्षिततेची साधनेही सुरक्षितता देऊ शकतीलच अस नाही .  म्हणून जग या रोगाच्या विळख्यात त्रस्त झाले आहे .
                        एका विशिष्ट वयात म्हणजे सोळाव्या सतराव्या वर्षी माणसाच्या लैगिंक भावना उफाळून येत असतात . त्या वयात माणसाच्या शरीरात प्रचंड मोठ्या उलथापालथी घडत असतात . विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल प्रचंड लैगिंक आकर्षण निर्माण झालेले असते . चांगल्या वाईटाची जाण नसते आणि अशा बेसावध वयात लैगिंक परिपूर्तीसाठी कुठलेही पाऊल उचलले जाण्याचा धोका असतो . म्हणून जनजागृती होणे आवश्यक आहे .
                        समाजात नैतिक मूल्याची जोपासना होणे गरजेचे आहे . आज औद्योगिक प्रगती होते आहे . नविणवी क्षितिजे दृष्टीपथात येत आहेत . दिवसेंदिवस जगण्याची पद्धती बदलते आहे . गावही शहरं होऊ लागले आहेत .  कुटूंबव्यवस्था शेवटच्या घटका मोजत आहे .  याचा अदृष्य फटका असा की आपण एकलकोंडी बनत चाललो आहोत . पूर्वी आईवडील घरी असायचे त्यामुळे मुलांना चांगले संस्कार होत असत आता आईवडील वृद्धाश्रमात असतात . पालक नोकरी व्यवसायानिमित्त घराबाहेर त्यामुळे तरुणांना टीव्ही पाहणे , इंटरनेटवरच्या मायाजालात स्वतःला रमवावे लागते आहे .इंटरनेटच्या माध्यमातून खूप चांगली माहिती मिळते पण कितीही चांगली वेबसाईट असुद्या त्यावर जाहिरात मात्र सेक्स विषयी हमखास पाहायला मिळते . यातून अल्लड वयाच्या मुलांना भावनिक उलथापालथीना झुंझुन माहित नसतं  हा फरक जाणकारांनी लक्षात घ्यायला हवा .
                       मुलांचे संगोपन होत असतात त्यावर आपल्या समाजातील वेगवेगळ्या घटकांचाही प्रभाव पडत असतो . आपण समाजशील आहोत समाजाचे प्रतिबिंब आपल्यात उमटत असते तेव्हा रोज होणाऱ्या  विविध घटना आपल्याला घडवत असतात .  
                     समाजात "लिव्ह इन रिलेशिनशीप" रुजू पाहत आहे . लग्न करून एकमेकांना समजून घेण्यासाठी कुणाकडे आता वेळ नाही . तरुणपिढी गरजा भागविण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी करताना दिसतात . 
                    आपल्याला भूक लागल्यानंतर अन्न लागते तसेच लैगिंकता ही शारीरिक भूकच आहे तिचे दमन करता येणार नाही मात्र सुरक्षित संबंध असणे खूप गरजेचे आहे .
                     दिवसेंदिवस तरुणाईच्या लाठा बेकारी , बेरोजगारीशी झुंजत आहेत . लैगिंक शिक्षणाविषयी शिक्षणव्यवस्था मूग गिळून गप्प बसली आहे .लैगिंक ज्ञान प्राप्त झाले तर तरुण पिढी धोखा ओळखेल मात्र तसं होताना दिसत नाही . 
                     पोटासाठी , मजबुरीपोटी वैश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया या रोगाच्या विळख्यात सापडल्या आहेत .तसेच काही पुरुष वेश्याव्यवसाय करणारेही या रोगाच्या मगरमिठीत अडकलेत . संपूर्ण जग या रोगाच्या हाहाकाराने त्रस्त झालेले आहे . या रोगाच्या जनजागृतीसाठीच तर जागतिक आरोग्य संघटनेने १ डिसेंबर हा दिवस 'जागतिक एड्स निमूलन दिन' म्हणून घोषित केला आहे ....
                    शेवटी फलित एकच आहे की संयम राखला जावा .आरोग्य महत्वाचे "आरोग्यम धन संपदा " किंवा "सर सलामत तो पगडी पचास" या  म्हणी पूर्वजांनी खूप विचार करून निर्मिल्या आहेत . "तरुणांनो शांती रखो , सोना मिलेगा". या समस्येचा सामना सारे मिळून करू या .चला जग एड्समुक्त करू या  ....
      - ऋषिकेश गंगाधरराव देशमुख
मु पो : शिळवणी ता : देगलूर जि : नांदेड 
संपर्क : ९९२३०४५५५०

♦♦♦🔵🔵🔵♦♦♦🔵🔵🔵♦♦♦🔵🔵🔵♦♦♦

[11/27, 3:20 PM] 
📕साहित्य दर्पण व्दारा आयोजित 📕
      वैचारिक लेखमाला स्पर्धा
****************************
विषय--जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त -----
*भरकटलेली युवा पिढी*
****************************
मानवी जीवन हे सुखदुःखाच्या उभ्या नि आडव्या धाग्यांनी विणलेलं एक भरजरी वस्त्र आहे. या वस्त्रात शंभर धागे दुःखाचे , आणि असला तर एखादा धागा सुखाचा असतो. अशा दुःखमय जीवनात आनंदाची, सौख्याची हिरवळ पसरावयाची असेल तर आपले मुल सुविचारी, सदाचारी, बुद्धिमान असायला हवे असे प्रत्येक आई-वडीलांना वाटते, आणि ते वाटायलाच हवे .कारण यापेक्षा त्यांचा स्वर्ग निराळा नसतो.
               आयुष्याच्या वाटेवर सुख- दुःखाच्या क्षणांना ज्यामुळे न्याय देता येतो ते संस्कार. संस्कार हे खरे तर संस्कृतीचे शिलेदार असतात. पुरुष हा वंश सातत्य राखतो, पण चिवटपणे संसार सांभाळते आणि नकळत आपल्या बाळावर सुसंस्कार करते ती स्त्रीच, त्याच्या प्रत्येक क्षणाची साक्षीदार असते ती त्याला जन्म देणारी माताच. मुलावर आईच्या माध्यमातून प्रत्येक  चांगल्या वाईट गोष्टीचे पडसाद उमटत असतात, हेच पडसाद जन्मभर मुलांसोबत असतात आणि यालाच आपण गर्भशिदोरी किंवा संस्कार असे म्हणतो. असे रुढी परंपरा, चालीरितीतुन आलेले असंख्य  अनुभव आपण जीवनात कळत नकळत स्विकारित असतो. मुलांच्या  जडणघडणीत आयुष्य प्रवास सुखकर होण्यासाठी आपल्या मुलांना संस्काराची अत्यंत गरज आहे. मुल हे अनुकरणप्रिय असते. संस्कार म्हणजे मुलांच्या सार्वांगिण विकासात त्याला कळत-नकळत दिलेले अनुभव होय . म्हणुण देशाची भावी पिढी निकोप घडविणे हे प्रत्येक  कुटुंबाची जबाबदारी आहे. नव्हे नव्हे ते आद्य कर्तव्य आहे.
*भरकटणे*याचा अर्थ चांगल्या मार्गावरुन चालण्याऐवजी मार्ग सोडून दुसरीकडेच जाणे होय. आपला भारत देश हा तरुणांचा देश म्हणुण ओळखला जातो. म्हणजेच जगात सर्वात जास्त तरुण आपल्या देशात आहेत . पण आज आपली युवा पिढी ही अनेक व्यसनांनी पोखरलेली आहे.
या तरुण पिढीवर बालपणीच नकळत संस्कार झालेले असतात. चांगल्या संस्कारास जबाबदार घटक म्हणजे आई , कुटुंब, परिसर , वातावरण इ. बाबी वरुन  मुलांची वागण्याची , विचारांची दिशा ठरते. आणि त्यातुनच त्यांचे संस्कारित व्यक्तीत्व घडत असते.म्हणुणच म्हणतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी.पण बीज चांगले रुजण्यासाठी जमीन मशागत, खत इ. बाबींची गरज असते. तरच वृक्ष चांगला जोपासणार यात शंका नाही.
उदा. कावळा  ही काळा व कोकीळा ही काळी हे कळण्यासाठी वसंत ऋतु यावा लागेल आणि मग आवाजावरुन कळेल की कुहूकुहू करणारी कोकीळा आहे. म्हणजेच ज्यांच्या वर चांगले संस्कार ते कोणत्याही परिक्षेत यशस्वी होणार हे त्रिकाल सत्य  आहे.
संस्कार क्षम मन मोहावर विजय मिळवते.
आज चित्र बदलत चाललंय तरुणाई किंवा युवा पिढी अनेक व्यसनाच्या अधीन होताना दिसते आहे. चोरी, खून, बलात्कार अशा घाणेरड्या बाबीमध्ये आपली युवा पिढी अडकलेली दिसते. व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे तरुण पिढी अनेक जीवघेण्या आजारांना बळी पडलेली दिसते. त्यामध्ये प्रामुख्याने  *एड्स* या भयानक आजाराने ग्रासलेली आहे. याला अनेक कारणे आहेत .
1) बेरोजगारी 2 ) राजकारण 3 )व्यसनामुळे मतीमंत झालेली बुद्धी 
या व अशा अनेक कारणामुळे तरुणाई बिघडली आहे .राजकारणात मोठमोठे पुढारी निवडणूक काळात तरुणांचा फार मोठ्या प्रमाणात वापर करुन घेतात.व निवडणूक संपली की त्यांना वा-यावर सोडतात. ढाबा संस्कृती मुळे ही आजचे तरुण बिघडलेले दिसतात. एकदा सवय लागली की ती पुर्ण करण्यासाठी निरनिराळे मार्ग अवलंबिले जातात. तसेच देशात फोफावलेला वेश्या-व्यवसाय .यामुळे सारासार विचार करण्याची कुवत नष्ट झालेली आहे . ही तरुण पिढी असुरक्षित शा.संबंध  ठेऊन एड्स ग्रस्त आणि अनौरस संततीला जन्माला घालुन हा रोग वा-यासारखा पसरवित आहेत. आजची युवा पिढी इंटरनेट, गुगल इ.माध्यमाव्दारे नवनवीन माहीती मिळवताना दिसतात. आणि पालकांनाही त्याचे काहीच सोयरसुतक नाही मुलांनी हट्ट केला की पालक त्याला कर्ज काढून गाडी घेऊन देतात, महागडा मोबाईल देतात परंतु त्यांच्यावर नियंत्रण नसल्यामुळे  मुले चुकीच्या मार्गाने जातात पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण, करुन तेथील संस्कृती त वापरणारी वेषभूषा ,मद्यपान, धुम्रपान रात्रभर चालणाऱ्या पार्ट्या या बाबींची भूल आपल्या तरुणाईला पडते. फेसबुक, व्हाट्सअँप, इंटरनेट यावरुन मुले मुली मैत्री करतात .त्यातुनच त्यांना परस्परांविषयी वाटणारे आकर्षण  त्यांना मृत्यूच्या खाईत नेते. यावेळी पालकांनी त्यांचे मित्र बनुन चांगले वाईट विचार आणि कृती समजावुन सांगणे गरजेचे आहे परंतु पालकांना आपल्या मुलांकडे पहायला अजिबात वेळ नाही. ही बाब शासनाच्या लक्षात आल्यामुळे इ.10 वी पासुन *लैंगिक शिक्षण* अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहे. त्यामुळे मुलांना त्याचे वाईट परिणाम अभ्यासिता येत आहेत.इ10वी मध्ये एड्स विषयी माहिती दिली आहे.
एड्स चे विस्तारित रुप --Acquired Immuno Defeciency Syndrome असे आहे. एड्स हा रोग सर्वात आधी 1981 U SAमध्ये आढळून आला. एप्रिल 1986 मध्ये भारतातील चेन्नई येथे आढळून आला. यालाच आपण HIV असे ही म्हणतो.(*ह्युमन इम्युनो डिफेसिंयनसी व्हायरस ) विषाणूमुळे संक्रमित असलेल्या व्यक्तीकडून हा रोग दुस-या व्यक्तीला होतो. हा रोग इतर सामान्य आजारासारखा जवळ बसल्याने, हस्तांदोलन केल्याने होत नाही तर तो असुरक्षित शारीरिक संबधामुळे होतो.परंतु या आजारात व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते त्यामुळे एड्स ग्रस्त व्यक्ती साध्या आजारालाही लगेच बळी पडतात पहिल्या स्टेप मध्येच व्यक्तीचे वजन 10% कमी होते. , एक महिनाभर या व्यक्तीला खोकला आणि हगवण या सारखे आजार होतात. एड्सग्रस्त व्यक्ती रक्तदान करु शकत नाही.कारण रक्तातुन हा आजार संक्रमित होतो. संक्रमित झालेल्या व्यक्तीला समाजाकडून अवहेलना होऊ नये म्हणुण या व्यक्तीची माहिती गुप्त ठेवली जाते. हा रोग कधीच बरा होत नाही फक्त औषधोपचाराने व्यक्तीचे आयुष्य थोड्या प्रमाणात वाढू शकते.हे सर्व ज्ञान युवा पिढीला व्हावे  , जेणेकरुन युवा पिढी सुरक्षित राहिल भारतीय संस्कृती ही संयम आणि समाधान यावर उभारलेली भाव्य वास्तु होय. कारण एड्स हा रोग परदेशी संस्कृती तुनच आपल्याकडे आला आहे. म्हणुण तरुण पिढीला आवाहन आहे आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहणे
विवाहबाह्य शारीरिक संबंध टाळणे. या सर्व बाबींचा युवा पिढीने गांभिर्याने विचार केला तर भरकटलेली युवा पिढी निश्चितच देशाला यातुन सावरु शकेल.  

मीना सानप  बीड @ 7
Minasanap1970@Gmail.com
♦♦♦🔵🔵🔵♦♦♦🔵🔵🔵♦♦♦🔵🔵🔵♦♦♦

[11/27, 5:55 PM] ‪+91 75888 76539‬


साहित्य दर्पण आयोजित ......

वैचारिक लेख.स्पर्धा ....
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
         *भरकटलेली पिढी*
🍄🍄🍄🍄🍄🍄🍄🍄🍄
स्पर्धेसाठी.....
🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏

*संघर्षाच्या आधीच हार मानलीस तू*
*कर्तबगारी आधीच गमावलीस तू*
*जीवन हा संघर्ष आहे तोच नको म्हणतोस तू*
*अरे जगण्याआधीच संपलास तू*
            या कुसुमाग्रजांच्या काव्यासारखी अवस्था आजच्या
 तरुणाची झालेली जाणवते.आजची पिढीच पुर्णपणे विनाशाच्या गर्तेत जात आहे असे वाटते.खरे पाहता कोणत्याही राष्ट्राची खरी ताकद तिथला तरुण असतो.जर तरुण धष्टपुष्ट असेल तर देश शक्तिशाली म्हणायला काहीच हरकत नाही.
आजची पिढी पुर्णपणे संगणक ,मोबाईल व सोशल मिडीया यांच्या आहारी गेलेली जाणवते.
आजच्या या काळात समाज बिघडवण्याचे उत्तम काम सोशल मिडीया ,मोबाइल बजावत आहेत.
काय ते चित्रपट बनवत आहेत?
त्यातून वाईट तेवढे घेण्याचेच काम आजच्या पिढीकडून होत आहे.इंटरनेटने तर आता काय काय नुकसान होणार हे वर्णन करणेच अशक्यप्राय बाबआहे.आणि पालक मात्र  सर्रास मुलाना अँड्राॕइड मोबाईल देत स्वतःला धन्य मानत आहेत.इंटरनेटवर सर्वच बाबी पहायला ऐकायला मिळतात पण नेमकं वाइटच बाबी घेण्यात आजचा तरुण आघाडीवर दिसतो.
मुले फार अनुकरण प्रिय असतात .खुन ,भांडणे ,दरोडे ह्या बाबीकडे तरुणाई झुकण्याचे कारणच बेरोजगारी आहे.तरुणाना शैक्षणिक आर्हताधारक झाल्यावर लगेच नोकरी  कामधंदा जरमिळाला तर गुन्हेगारी एकदम नगण्य राहील.
आजच्या तरुणापुढे आदर्शवादी व्यक्ती असणे फार गरजेचे आहे पणा सोशल मिडियावाल्याकडून चांगल्या व्यक्तीना वाइट दाखवण्याचं फार चुकीचं काम होत आहे.अण्णा हजारे ,बाबा आमटे,सिंधुताई याना सुद्धा नावे ठेवण्याचे चुकीचे काम आपल्या समाजात होत आहे हे फार गंभीर आहे.
आदर्शवादाची चिरफाड आज सर्रास केली जात आहे त्यामुळे नेमकं चांगले कशाला म्हणावे हेच आजच्या पिढीला समजणे कठीण झाले आहे.
एकदा मी पुण्यात पबच्या बाजूला थांबलो होतो .पब काय हेच माहित नव्हते.पण काय ते युवा मुले मुली हातात हात घालून सरळ आत जात आहेत ,सिगारेट काय ओडत आहेत
पाहून मन विषण्ण झालं .वाटलं काय होणार उद्या या पिढीचं?
ज्यांच्या पायावर डोकं टेकवावं अशी माणसं समाजापासून दुर ठेवून तरुणाना बिघडवण्याच काम सध्या सुरु आहे.
सोळा वर्षे वयापासून पुढील मुले सिगारेट ओढतात,दारु पितात,अफु ,चरस ,गांजा ओढतात.
ज्या वयात पुरुषार्थ गाजवायचा असतो त्या वयात ही पिढी नशापान करुन लेझीम खेळत ,नालीत ,रस्त्यावर गाढवासारखी लोळते आहे .
*नौजवानो भारत की तकदीर बना दो*
*फुलों को इस गुलशन से काटों को हटा दो*
ही आदर्शमय अपेक्षा कशी पुर्ण होणार?
संस्कारहीन पिढी उपजत आहे.चित्रपट पाहुन तर कहर झालाय.
प्राथमिक शाळेतील निष्पाप बालके सुद्धा म्हणायला लागली,ज्या मुलाचे नाव शाळेत प्रशांत आहे त्याला मुले म्हणतात,  *"काय परशा अर्ची कुठय तुझी?*
हे वाक्य सर्व पिढीला पवित्र ग्रंथासारखी भासत आहेत.थोरामोठ्यांचा मान राहिला नाही .आई वडीलाना मान देणे नाही.
मुलाला शिक्षण घ्यायला ठेवले की शिक्षण सोडून वाईट करण्याचे काम आजच्या पिढीकडून होत आहे.चारित्र्याला शुन्य किमत देत आहेत हे आजचे तरुण!
त्यामुळेच बलात्कार ,छेडछाड असे विविध गुन्हेगारी या तरुणाईत घुसत आहे.
एड्स दिनाबद्दल या पिढीला फारच संस्कार देण्याची गरज वाटते कारण एकदा एड्स झाला की तो बरा होतच नाही फक्त आयुष्य वाढवता येते.हा रोग 1)स्त्री पुरुष शरीरसंबधाने(दोहोपैकी एक एड्सबाधित आसल्यास)
2)एड्सबाधित व्यक्तीचे रक्त चढवल्याने 
बाधित व्यक्तीचे इंजेक्शन सुई वापर इ.बर्याच कारणानी होतो.
एड्स कोणकोणत्या कारणामुळे होतो त्यापासून दक्ष कसे रहावे हे आजच्या पिढीला सांगणे अत्यंत गरजेचे आहे.
हा रोग झाल्यावर शरीरातील पेशीवरच एड्सचा विषाणू हल्ला करतो.रोगप्रतिकारक क्षमता कमी फार वेगाने होते.म्हणूनच जागतिक आरोग्य संघटनेने एक डिसेंबर हा दिवस एड्स जनजागृतीसाठी सुरु केला आहे.मुलाना योग्य वयात लैंगिक शिक्षण देऊन जागरुक ठेवणं अवश्यक आहे.
भगवंताने दिलेले हे  शरीर अत्यंत अनमोल आहे .आजच्या या भरकटलेल्या पिढीला या सर् बाबींची जागरुकता करुन देणे फार अवश्यक आहे.
या पिढीला चित्रपट ,टि.व्हि.बघु द्या पण चांगले बाबी बघु द्या.आपला मुलगा कुठे जातोय तो काय करतोय शाळा काॕलेज व्यवस्थित करतोय का हे काळजीने पाहणे गरजेचे वाटते.
आजच्या तरुणाईसोबत पालकानी मित्रत्वाने वागले पाहिजे.मुलाना लहान वयातूनच या चांगल्या गोष्टींचे संस्कार द्यावेत.त्यांच्यात नैतिक मुल्यांचे धडे इतक्या शक्तिने रुजवा की कितीही बाहेर वाईट बाबी त्याने पाहिल्या तरी त्याच्यावर त्त्याचा कसलाच परिणाम झाला नाही पाहिजे.
आजच्या या पिढीला चारित्र्यवान घडवायचे असेल तर योग प्राणायामाचे धडे देणे अवश्यकच आहे 
*करो योग रहो निरोग*
हे ब्रीद त्यांच्यात बाणवलेच पाहिजे.
चांगल्या बाबी त्यांच्यावर रुजवल्याच पाहिजे.मुलाना प्राणायाम जर योग्य वयातच सवयी लावल्या तर नीतीवान पिढी तयार होईल.योग्य सवयीनी युक्त अशी पिढी तयार होईल.देशभक्त पिढी तयार होऊन भारत देश एका उच्च अशा अध्यात्मवादी ,नीतीवादी व्यासपीठावर जाणार यात शंकाच नाही.
🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏

*चौधरी बालाजी सर
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
स.क्र.  82

♦♦♦🔵🔵🔵♦♦♦🔵🔵🔵♦♦♦🔵🔵🔵♦♦♦


[11/27, 6:18 PM] 
भरकटलेली युवापिढी
सुसंगती सदा घडो | सुजनवाक्य कानी पडो |
                     असे मोरोपंतानी केकावलीत सांगितले. याचा अर्थ नेहमी चांगल्या माणसाच्या सहवासात रहावे तर सुवचन, चांगले विचार ऐकावेत. तरुणांनी हे वाक्य ध्यानी ठेवून मैत्री करावी. त्यातूनच जीवनाला योग्य वळण मिळते. भरकटलेली युवक व युवती विनाकारण गप्पा, पार्ट्या,फिरण, टॅटू काढण याकडे अवास्तव लक्ष देतात. पूर्वी वातावरण असे नव्हते. सत्ययुगात राम जन्माला आले तर द्वापार युगात कृष्ण यांचा आदर्श आजही आपण घेतो त्यांची नितीमुल्ये जपण्याचा प्रयत्न करतो. पण कलियुगात नितीमत्ता ढासळू लागली. हि नितीमत्ता कमी होण्याचे प्रमाण तरुण युवा वर्गात जास्त आहे. आत्ताची तरुण पिढी ब्रम्हचर्य, संसारीक जबाबदारी, माता-पित्याची सेवा करत नाही. मग हि युवा तरुण तरुणी भोगवादाकडे आणि चंगळदाकडे जास्त झुकले आहेत भावनेपेक्षाही क्षणिक फायद्याला व सुखाला महत्त्व देत आहेत. यांची मैत्री हि २ ते  ३ किंवा कमी कालावधीची असते.
 “युवा पिढी स्वातंत्र्यातून स्वैराचाराकडे वळू लागली आहेत. हा स्वैराचार  आपणाला अनेक बॉलीवूड गण्यातून पाहायाला मिळतो. गाण्याचे बोल एकले तरी कितीच भरकटली आहे हे लक्षात येते. मुन्नी बदनाम हुई  तर कुठे डीजे वाले बाबू गाणे हि धार्मिक असो कि सांस्कृतिक कार्यक्रमातून वाजत असतात. अशा गाण्यांना काहीच बोध नसतो उलट तरुणांना व शालेय वयातील मुले आकर्षित होऊन दिशाहीन जीवनाला सामोरे जातात. अशा युवक व युवतीचे उमेद संपून जीवनाच्या कठीण प्रसंगात अडकून निराशेच्या गर्तेत जातात तर काही जण आत्महत्येचा प्रयत्न करतात. म्हणजे नेमके असे होते कि शिक्षण किंवा करिअर करण्याच्या वयात हि तरुण पिढी वाईट मार्गाला लागतात. एकमेकांच्या आकर्षणातून शरीर उपभोग करण्यातच सुख मानतात. म्हणजे आपली राम लक्ष्मण यांचे वारस असलेली पिढी त्यांचासारखा संयमी व परस्त्री मातेप्रमाणे समजत नाही. या भरकटण्यातूनच दुर्धर आजार उद्भवला आहे. तो आजार आहे एडस्. 
                एड्स हा आजार सोप्या भाषेत सांगायाचे झाले तर मानवी शरिरातील पांढऱ्या पेशी ज्या सैनिकाप्रमाणे आपल्या शरीरात येणाऱ्या  घातक शत्रू जीवाणू व विषाणू यांच्यापासून संरक्षण करतात पण HIV 
( Human Immunodeficiency Virus ) विषाणू याच संरक्षक पांढऱ्या पेशीवर हल्ला करतात . आणि त्यांचे शरीरातील वाढ क्षीण होऊन अनेक आजार होतात . व हि आजाराची मालिका सुरूच राहते. यात ताप येणे, कमजोर वाटणे, डोळ्यात सूज येणे, जुलाब होणे, त्वचेचे विकार व अल्सर होणे. अशी समान्य लक्षणे दिसू लागतात. पण वजन अतिशय वेगाने कमी झाल्यास व आजाराचे प्रमाण वाढल्यास एड्स ची तपासणी एलिझा अंटीबॉडी टेस्ट, वेस्टर्न ब्लॅाट टेस्ट मधून माहित होते. परंतु या रोगावर कोणताही प्रभावी इलाज आला नाही. आता पर्यंत शास्त्रज्ञांनी माकड व उंदरावर चाचणी घेवून एड्सचा उपचार केला पण अजून मानवावर झाला नाही. 
              एड्सचा विषाणू पसरण्याचे आणखी एक कारण आहे आपली मानवाची जनुकीय रचना. ह्यातील ज्या भागामुळे विषाणू पूर्ण शरीरभर पसरत आहे, त्याचा अभ्यास करून जेनेटिक उपचार पद्धती शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच एड्स वर प्रतिबंधक असणारी लस काढण्याचे शोध होत आहे. या आजरावरही मानव कुष्ठरोग, देवी, कॅन्सर याप्रमाणे मत करेल यात काही शंका नाही. पण तोपर्यंत आपण सर्वानी काळजी व प्रतिबंध हा औषधाच्या रुपात न घेता वागणुकीतून घ्यायचा आहे. एड्स होण्याचे मुख्य कारण शारीरिक संबंध हे सुरक्षित नसतील तर या रोगाचा प्रादुर्भाव होतो. संबंध ठेवताना सुरक्षित व खबदारी घेवून करावेत, त्यामुळे   लिव्ह-इन रिलेशनशिप याला बळी न जाता मजबूत टिकणारा संसार करावा. रामचा आदर्श ठेवत एक पतीत्व व एक पत्नीत्व असावे. 
                दुसरे कारण इंजेक्शन सिरीन एकदा वापरली कि इलेक्ट्रिक बॉक्स मध्ये जाळून काढावी. दुसऱ्यासाठी एकच सुई डॉक्टर यांनी वापरू नये तसे होत असल्यास आपण स्वतः न वापरण्यास सांगावे. तिसरे कारण आहे बाहेरुन विकत आणले रक्त पेशंटला द्यायचे असल्यास एड्स बाधित आहे का तपासून घ्यावे. तसेच गरोदर मातांची एड्स चाचणी ग्रामीण भागातील असो कि शहरी भागातील करूनच घ्यावी यात चारित्र्यावर शंका नसून पुढील पिढीला व लहान बालके याची बळी ठरू नयेत. 
   एड्सग्रस्त माणसासोबत आपल वागण हे माणुसकी जपत ठेवाव. कारण असा प्राणघातक आजार झाल्यानंतर  यांचा आधार व्हावा हीच त्यांची अपेक्षा असते. एड्स हा आजार संसर्गजन्य नाही हा आजार स्पर्शातून, पाण्यातून किंवा हवेतून प्रादुर्भाव करत नाही. एड्सग्रस्त बालकांना सलमान खान यांच्या ‘बिंग ह्युमन’ संस्थेमार्फत दत्तक  घेतेवून चांगले जीवन देण्यासाठी प्रयास केले जातात. ही प्रशंसनीय बाब आहे!  आपण हि दृष्टीकोन बदलून एड्सग्रस्त व्यक्तीच्या  विरोधात न राहता एड्स रोगाच्या विरोधात राहून या विषाणूचा खात्मा करण्यासठी सदा सतर्क राहू !
     सर्वजण जरी पाश्चीमात्त्य नव्याचा पुरस्कार करत असलो तरी, भरकटायचं नाही तर एड्सविषयी जनजागृती शालेय ते वृध्द पर्यंत देवूया.शालेय ते महाविद्यालयीन  अभ्यासात शरीरसंस्था तसेच रोग व कारणे दिली आहेत. याच वेळी शिक्षकांनी आणखी संदर्भ देत याची वेगाने पसरत जीव घेणारा आजार याची माहिती द्यावी. १ डिसेंबर रोजी जागतिक एडसनिर्मुलन दिनाचे औचीत्य साधून पथनाट्य , नाटिका सदर कराव्यात. उदाहरणार्थ पांढऱ्या पेशी पांढरे कपडे घालून , काही जण लाल कपडे असलेले तांबड्या पेशी, व एडसचे विषाणू बनलेले काळे कपडे घालून नाटक करतील यात विषाणू पांढऱ्या पेशीवर हल्ला करून शरीर संस्था मोडकळीस आणतात. 
    भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो कारण भारतात तरुणांची म्हणजे युवक-युवतीची संख्या जास्त आहे. देशाचे आधारस्तंभ असलेले तरुण पिढीने एड्स विषयक जागरूक रहायच आहेच.आपले अनमोल आयुष्य योग्य मार्गावर ठेवत विषयवासनांपासून दूर थोडक्यात टी. व्ही. व मोबाईल याचा सदुपयोग करायचा. करीयरीस्टिक होण्याकडे लक्ष द्यावे हीच आत्मसन्मानाची पायरी आहे. 
     
     
एडसनिर्मूलन करुनी, तरुण पिढी घडवा |
जनजागृती करुनी , निरोगी देश घडवा ||


निता आरसुळे- तांबे 
मोब. नं ८६५२४५००३२
neetaaarsule@gmail.com

♦♦♦🔵🔵🔵♦♦♦🔵🔵🔵♦♦♦🔵🔵🔵♦♦♦


[11/27, 6:27 PM] ‪+91 83089 33700‬

      स्पर्धेसाठी.............. 
                                                           भरकटलेली युवा पिढि..

     "ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.स्वप्न मनात धरलेल कधीच सोडू नका.पावलो पावली येतील कठिण प्रसंग फक्त चंद्र तारकांना स्पर्श करण्यासाठी जमिनीला सोडू नका !! " या ओळी आजच्या तरुण,देशाचे आधारस्तंभ असलेल्या  युवा पिढीला सांगाव्याशा वाटल्या,कारण आजची तरुण पिढी ही कुठे तरी वाट चुकलेल्या वाटसरुसारखी आपली वाट विसरुन चाललेला आहे, अस मला वाटते.
          "युवाशक्ती हिच देशाची एकमेव संपत्ती आहे, म्हणून तरुणांनी आपल्या उद्देशांवर आणि विधायक स्वप्नांवर विश्वास ठेवून कार्य केले की, हमखास यश मिळेल."असे भारताचे माजी दिवंगत राष्ट्रपती,अवकाश व अनुशक्ती क्ष्रेत्रात प्रगती करणारे थोर संशोधक ए.पी.जी.अब्दुल कलाम आपल्याला सांगून गेले,पण आजची युवा पिढी आपल्या उद्देशावर व विधायक स्वप्नांना आकार देण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न करीत आहेत का ? हा प्रश्न प्रत्येकाला भेडसावताना  दिसून येतो.
        आज देशातील युवा पिढी भरकटलेल्या अवस्थेत दिसून येते.आजची बहुसंख्य तरुण पिढी ही तंबाखू गुटका,दारु, सिगारेट,गांजा ,अफू यासारख्या अमली पदार्थाच्या सेवनात गुरफटून आपली अमुल्य शक्ती वाया घालवित आहे.
एकवीसाव्या शतकात आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना आपण पक्षाप्रमाणे उडायला शिकतो,  माशाप्रमाणे समुहात पोहायला शिकतो पण जमिनीवर माणसाप्रमाणे वागायला शिकतो का ?या प्रश्नांचे उत्तर आपण आज शोधायला पाहीजे असे मला वाटते.
       आजची युवा पिढी ही समाज आणि राष्ट्राचे खऱ्या अर्थाने कर्णधार असून उद्याचे ते डॉक्टर, इजीनियर ,शास्रज्ञ,साहित्यिक व कलाकार म्हणून आपल्या राष्ट्राचे खरे दिपस्तंभ बनणार आहेत परंतु आजची युवापिढी स्मार्टफोन,इंटरनेटच्या जाळ्यात अडकून पडली आहे विज्ञानरुपी साप आजच्या युवापिढीला डंख मारत आहे त्यामुळे हे जहरापेक्षाही विषारी विष युवा पिढीच्या नसानसात भिनत आहे.
         मानवी शरीरात  ३०,००० जनुके(जीन्स ) आहेत आणि हे अश्मयुगातील मानवी पूर्वजांच्या जनुकांशी जुळतात ही क्रांतीकारी बातमी  नवसहस्त्रकात आपल्याला समजली. त्यावरुन हे लक्षात येते पूर्वकाळापासून मानव हा उत्क्रांतीच करत आलेला आहे.मग आजचा तरुण आपल्या ध्येयप्राप्तीकरीता मागे का हटत आहे याचा विचार आपण करायला हवा.आजची तरुण पिढी स्मार्टफोनच्या नादात आपला अमुल्य वेळ वाया घालवित आहे.त्यामुळे तंत्रज्ञानाचे हे वरदान आजच्या युवा पिढीला भस्मसात तर करीत नाही ना ? हा प्रश्न आपल्यापुढे उभा आहे .. 
          नेटवरील अश्लील चित्रफित, अश्लिल चॅटिंगमध्ये गुंतून आपल्या वैचारिक क्षमता आहार,विचार व कुटूंबातील लोकांशी संवाद विसरत आहे.त्यामुळे त्याची शैक्षणिक पातळी घसरत चालली आहे.त्यामुळे गुन्हेगारी,बलत्कार,गुंडगिरी चोरी आदि वाममार्गाकडे वळला आहे.म्हणून Arise awake and stop not ,till the goal is reached.... आजच्या युवकांनी ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न करायला हवा.त्यांनी आपल्यासमोर फुले ,आंबेडकर,सावरकर व युवाशक्तीला प्रेरणा देणारे अब्दुल कलाम यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला पाहिजे.
तसेच आजचा युवक भरकटत का चालला आहे याचा विचार करणे गरजेचे आहे.विध्यार्थीदशेत आई वडिल,शिक्षक यांनी त्यांच्यावर योग्य संस्कार केले पाहिजे.आई वडिलांनी मुलाला उत्साही, कामसू तर शिक्षकांनी त्यांच्या कल्पनाशक्तीला वाढवून त्यांच्यासमोर आदर्श ठेवला पाहीजे. नवप्रवर्तक पिढीच 
पूर,दुष्काळ,भूकंप,अपघात अशा संकटात धावून जाते हे विसरुन चालणार नाही. भगतसिंग ,राजगुरु सुभाषचंद्र बोस तसेच देशाचे संरक्षण करणारे आपले जवान शहिद होत आहेत हेही विसरुन चालणार नाही.
          भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ४७ मध्ये सार्वजनिक आरोग्यासाठी,मादक पदार्थावरील मार्गदर्शक तत्वे समाविष्ट आहेत तेव्हा त्यांची अंमलबजावणी करुन आमली पदार्थ विक्रिवर बंदि आणावी.तसेच युवा पिढीला व्यसनमुक्ति व एडसमुक्ती जनजागृतीचे धडे द्यावेत तसेच युवा पिढीने आत्मसंयम, आत्मजाणीव व सुधारणा हे तीन गुण अंगीकारायला हवे.तरच आपला देश "सोनेकी चिडिया" बनण्यास मदत होईल आणि येणाऱ्या नवीन पिढीस आदर्श ठरल्याशिवाय राहणार नाही.उठा !जागे व्हा!आणि ध्येयप्राप्त होईपर्यत थांबू नका.

प्रा. वैशाली देशमुख
रा. कुही जि. नागपूर.. 

♦♦♦🔵🔵🔵♦♦♦🔵🔵🔵♦♦♦🔵🔵🔵♦♦♦

[11/27, 6:40 PM] 
साहित्य दरबार  वैचारिक लेखमाला स्पर्धा

विषय: जागतिक एडस दिनानिमित्त-
        *भरकटलेली युवापिढी*
                                दि.२७/११/२०१६
दरवर्षी १ डिसेंबर हा जागतिक एडस दिन म्हणुन पाळला जातो. जगभर फैैलावलेल्या एडस (Acquired immune Definitely Syndrome)या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी यासाठी जागतिक राष्ट्रसंघाने UNO(United Nations Organization)घोषित केले आहे.१९८१साली एडस या रोगाचा पहिला रुग्ण आढळला.आणि त्या नंतर वेगाने या रोगाचा फैलाव संपुर्ण जगभरात झाला.या रोगाची कारणे,लक्षणे व उपाय सापडलेत पण अजुनही हा रोग संपु्र्णपणे बरा होण्यासाठी एखादी लस शोधण्यास संशोधकास अपयश आले आहे.म्हणुन यावरती खबरदारी हाच उपाय आहे. म्हणुनच जागतिक पातळीवर सर्वात महाभयंकर रोग म्हणुन या रोगाकडे पाहिले जाते.
       समाजामध्ये बदल घडवुन आणण्यासाठी युवाशक्तीच महत्वाचा वाटा उचलु शकते.भारतातील युवाशक्ती ही अन्य शक्तीपेक्षा प्रभावशाली आहे.जगाला विळखा घालु पहात असलेल्या 'एड्स'या आजाराला थोपविण्यासाठी युवाशक्ती हातभार लावु शकते.जगात एडस या रोगाचा प्रसार झपाट्याने होत आहे. १९९८ अखेर ३३४ लाख व्यक्तिंना एच.आय.व्ही.विषाणुंची बाधा झाल्याचे वैद्यकिय अहवालावरुन दिसुन येते.या रोगाचा प्रसार होण्यामागे याबाबतचे असलेले अज्ञान दुर करणे आवश्यक आहे. युवापिढी नेहमी धोका पत्करण्यामध्ये अग्रेसर असतात.परंतु त्यांचे मन संस्कारक्षम असते.पालकांनी योग्य वयातच त्यांच्यावर संस्काराची बिजे रुजविण्याचे काम करणे गरजेचे आहे. युवकांमध्ये या रोगाबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे.
          परंतु हीच बाब सध्या चिंतेचा विषय बनत चाललेली आहे.आजचा युववर्ग हा चुकीच्या मार्गाने जात आहे. पालकांकडे असणारा पैसा व ही चैनी मुले यातुन अनेक गंभीर बाबींना सामोरे जावे लागत आहे.त्याचे वेळोवेळी समुपदेशन होणे गरजेचे अाहे पण तसे होताना दिसत नाही.किशोरवयीन वयापासुनच मानवी लैंगिकता व  लैंगिक संबंधातुन पसरणारे आजार आणि एच आय व्ही जंतुसंसर्ग याबाबतची माहीती त्यांच्या या जडणघडणीच्या काळातच होणे अपेक्षित आहे.परंतु पालक व शिक्षक यांनी या तरुणाईला लैंगिकतेबाबत चर्चा व योग्य व्यासपीठ निर्माण करणे गरजेचे आहे.
       'जवान हुँ,नादान नहीं'हे तरुण वर्गाने बोलायला शिकले पाहिजे.आजची युवापिढी देशाचे उज्वल भविष्य समजले जाते परंतु आधुनिक तंत्रज्ञानाने परिपुर्ण असलेल्या एकविसाव्या शतकात युवापिढीला विविध व्यसनांनी ग्रासले आहे.युवापिढी पार भरकटली आहे.शरीराला अपायकारक असणा-या तंबाखु,सिगारेट आदि व्यसनांच्या विळख्यात युवक गुरफटलेले आहेत.हा व्यसनांचा विळखाच युवापिढीला अत्यंत घातक ठरत आहे.सध्या या तरुणाईवर सिनेमा,मिडीया,सोशल नेटवर्किंग साईट यांचाच प्रचंड प्रभाव आहे पण त्याचबरोबर देशामध्ये चाललेले पाश्च्यात्याचे अंधानुकरण आणि आपल्या संस्कृतीला प्रतिगामी ठरवुन खोट्या जीवन पद्धतीचा
'पुरोगामी' म्हणुन समावेश केला जात आहे. सिनेमा,मिडिआ,तसेच राजकारणी वर्ग यांचा पण या युवापिढीला भरकटण्यास हातभार आहे असे म्हणले तर वावगे होणार नाही.
     एडस या आजारावर अजुनही म्हणावे तसी लस उपलब्ध नाही,परंतु सुरक्षिततेच्या सवयी व आरोग्यामय जीवनशैलीचा अंगीकार करुन तो सहज टाळता येतो.तरुण अवस्थेत मुले जास्त जंतुसंसर्गप्रणव असतात.मानवी लैंगिकतेबाबत त्यांना अधिक कुतुहल असते.वाईच संगतीमुळे मुले या मार्गाकडे जावु शकतात.हे रोखण्यासाठी जनजागृती व प्रतिबंध केला पाहिजे.

संगीता भांडवले
वाशी, उस्मानाबाद
@१६
♦♦♦🔵🔵🔵♦♦♦🔵🔵🔵♦♦♦🔵🔵🔵♦♦♦

[11/27, 6:43 PM] ‪+91 86001 38525‬
🌹 *साहित्य दर्पण*🌹
  *वैचारिक लेखमाला स्पर्धा*

*""भरकटलेली युवा पिढी""*

      भारताला स्वातंत्र होऊन जवळपास ७ दशके होत आली. तेव्हाचा भारत व आताच भारत या मध्ये जमिन अाभाळा एवढा फरक आहे. पुर्वीचे तरूण *इंक्लाब जिंदाबाद, भारत माता की जय* या सारखे घोषना देत असायचे. आई म्हाणायची मरायचंच आहे तर देशा साठी मर बायकां सारखा घरात बसायच असेल तर बांगड्या भर बांगड्या. अनं आताची या पोराला घरातुन बाहेरच येऊ देत नाही, समाज सेवा तर सोडा राव. तरी पण हे कार्ट गपचीप गाडी घेऊन गावातील गल्ली बोळानं हॉर्न वाजव हिंडतं. त्यावर *चायनाच्या* मोबाईल वर लावलेलं *शांताबाई, बाई वाड्यावर या* असली गाणी काय बंद करत नाही.
    कधी कधी वाटतं तंत्रज्ञान कुठ गेलय. अनं खरच आपण या तंत्रज्ञाना बरोबर चालत आहोत का? शहरातील तरूणा  बरोबर खेड्यातील ही तरूण काही मागे राहीले नाहीत. पण हे *दोन्ही तरूण तंत्रज्ञानाचा खरच योग्य वापर करतात का.* आजची युवा पिढी इंटर नेट मुळे कुठ तरी भरकटत चालली आहे. प्रत्येक युवा पिढी ही शारिरीक वासनेला बळी पडत आहे. ती एक शरीराची गरज आहे, हे मी मान्य करतो पण ते त्यासाठी काही वयोमर्यादा आहे. ज्या वयात मुलांच शिक्षण घेण्याच वय असतं त्या वयात ते पोरीला घेऊन फिरायला जातयं. ह्या युवा पिढीतील ७५% ते ८०% तरूण-तरूणी *पॉर्न क्लिप व वेब साईड* ग्रासलेली आहे. यातुनच युवा पिढीत वासनेची भुक निर्माण होते, अन हीच भुक भागली नाही तर *लैंगीक छळ, छेडछाड, बलात्कार* या सारखी कृत्य घडत जातात. याच वासनेला बळी पडुन तरूण-तरूणी याच्यातील अनैतिक संबध. मग काळ मानगुटीवर येऊन बसल्या सारखा *एच आय व्ही* सारखे रोग झपाट्याने वाढत आहेत.
     वाढत्या लोकसंखेत हा *एच आय व्ही* हा सुद्धा तेवढ्याच वेगाने वाढत आहे. हा वाढण्याचे कारण म्हणजे *पेशा ने वैश्या व्यवसाय* करणारी नसुन *समाजात प्रतिष्ठीने रहाणारी तुमच्या आमच्या सारख्या व्यक्ती आहेत* आपणच कित्येक बाहेर अनैतिक संबध ठेवतो व *लाज वाटते* म्हणुन त्याची दक्षता घेत नाहीत. मग आपल्या पेक्षा त्या *वैश्या* बऱ्या नाहीत का किमान त्या या रोगावर उपाय नाही म्हणुन त्या आहे त्या उपाय योजनेचा अवलंब तरी करतात.
              प्रत्येक देशाचे भवितव्य हे त्या देशातील तरूण पिढीच्या खांद्यावर असते. पण; आपले देशात तर सर्वात जास्त आहेत पण हे *व्यसन, वासना, स्वार्थी पणा, पैशावरील अती प्रेम* याच्या अधिन झाले आहेत मग आपल्या देशाचे भवितव्य तरी काय असेल या गोष्टीचा विचार तरी मनात आला तरी चिंता वाटु लागते. 
          *स्वामी विवेकानंद* म्हणाले होते *मला सामर्थवान व धैर्यशाली १०० तरूण द्या मी देशाचे भवितव्य बदलुन दाखवतो* पण *सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशात आज ही आशे १०० तरूण भेटले नाही ही एक सर्वात मोठी शोकांकीता आहे*
जय हिंद
🙏🏻🙏🏻🙏🏻
नागेश टिपरे *@९१*
♦♦♦🔵🔵🔵♦♦♦🔵🔵🔵♦♦♦🔵🔵🔵♦♦♦

[11/27, 7:43 PM] 
वैचारिक लेखमाला स्पर्धा...

   *भरकटलेली युवा पिढी*
---------------------------

      आजचा युवक म्हणजे, आपले उद्याचे भविष्य.. तसं आपण उद्याच्या आशेनेच आजच्या तरूणाकडे पहात असतो. आजच्या राजकिय, सामाजिक, शैक्षणिक इत्यादी सर्वच क्षेत्रात बदलासाठी व विकासासाठी, युवकांचा वाटा खुप मोलाचा आहे. बौद्धीक व वैचारिक पातळीवर आजचा युवक बराच पुढे आहे. 

     संगणक, मोबाईल्स यांमार्फत सोशल मिडियासारख्या तंत्रजानाचा युवा पिढीवर खुप मोठा पगडा आहे. आज राजकिय दृष्ट्या पहावयाला गेलो तर, मोठ - मोठे बदलाव होण्यासाठी हाच युवक कारणीभूत ठरला आहे. तसेच साता-समुद्रापलिकडे  आपला युवक देशाचे नाव रोशन करत आहे.

        वाढत्या जागतिक स्पर्धेच्या मानाने पहायचे तर, आजचा तरूण ब-याचशा कारणाने पिछाडीवर आहे. त्यासाठी कारणीभूत आजचा पालकवर्ग व संस्कार ह्या गोष्टी कारणीभूत आहेत. आज पाहिले तर, घरातील आई -वडिल हे दोघेही नोकरी करत असल्याने व छोटा कुटूंब प्रणालीमुळे शक्यतो, " आपण दोन, आपला एक" या तत्वानेच कुटूंब नियोजन राबविले जाते. यामुळे होते काय की, आई - वडिल नोकरीनिमित्त पुर्ण दिवस बाहेर असल्याने, मुलांवर पुरेसा व व्यवस्थित लक्ष पुरवले जात नाही. त्यामुळे मुलेही ब-याचदा वेगळ्या वळणावर जातात. तसेच मुलगा एकुलता एक असल्याने, पालकवर्गाकडून सहजपणे मुलांचे हट्ट व शौक पुरवले जातात.. परिणाम काय तर ?? मुलांना वाईट संगती लागून ती पब्ज, डिस्को, पार्ट्यांच्या तालावर थिरकतात आणि नको नको ती नशा करतात.. माझ्या स्वत:च्याच कवितेतील कडव्याचा संदर्भ द्यायचा झाला तर.., 
  " लागून व्यसन, नशेत बुडाली |
    वाहत चालली , तरूणाई ||
खरोखरच, दारू, सिगारेट, ड्रग्ज यांसारख्या आरोग्य घातक व्यसनातून युवक बळी जात आहे.

     याचप्रमाणे संगणक व मोबाईल्स यांमुळे सोशल मिडियाच्या मोठ्या बाजार सवलतींमुळे तरूण जास्त प्रमाणात फेसबुक, वॉट्स अप यांच्यात व्यस्त राहून बौद्धीक पातळी ढासळत आहे. इंटरनेटच्या वाईट प्रभावाखाली , " ब्लू फिल्म " यांसारख्या सेक्युलर गोष्टींच्या आहारी जावून, त्यांतून मोठ्या प्रमाणात अस्लिल पणा व बलात्कार सारख्या घृणास्पद घटना त्याच्या हातून सर्रास घडतात. म्हणून यासाठी मोठ्याप्रमाणात संस्कारीत मुल्य जोपासली गेली पाहिजेत..

      तरूण घडताना गरज आहे, उच्च संस्कारांची... ऐतिहासीक वारसा असलेल्या व भारतीय संस्कृतीत संस्कारांची पूर्वीपासून जोपासना करण्यात आली आहे. याबरोबर आज गरज आहे, नैतिक मुल्य व व्यक्तिमत्व विकास यांसारख्या गोष्टीची.. एक प्रसिद्ध वाक्य आहे, " We don't need followers, we  need ideals.." म्हणजेच सर्वांग विकासासाठी एखादं आदर्श व्यक्तिमत्व नेहमीच उपयोगी ठरतं.. आजच्या युवकांच्या दृष्टीने त्यांना आदर्श व्यक्तिमत्वाची उदाहरणे द्यायची झाली तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, यांसारख्यांनी आपल्या कार्यातून  एक आदर्श उभं करणा-या व्यक्तिमत्वाची उदाहरणे देणे खुप हितावह ठरेल. 

       तसेच अपयश, बेरोजगारी, व्यसन अशा वाईट घटकांमुळे ध्येयांना गाठताना, आजचा तरूण कुठेतरी कमी पडतो. मग, अशा तरूणांन मध्ये धैर्य, मनोबळ वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

 "  ध्येयाच्या वेदना मनाला होऊ दे,
वार तुझ्या प्रत्येक क्षणास होऊ दे..!
अशक्य सुद्धा म्हणेन शक्य आहे,
इतका गर्व तुझ्या बुद्धीच्या मीपणास होऊ दे..!!"

  खरंच, आज तरूण जगला ,तरच उद्याचे भविष्य टिकून राहिल.. म्हणून पालकवर्गाकडून मुलांवर बाळपणापासूनच संस्कार रूजवण्यासाठी गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे, तरच पुढचा तरूण घडेल, देश घडेल..संत तुकोबा म्हणतात, " शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी.."

---संतोष एकनाथ शेळके @२४
मु. पो. कळंब, ता. कर्जत, रायगड
मो. नं. 8237329804
shelke.santosh8@gmail.com


[11/27, 9:25 PM] 
 वैचारिक लेखमाला स्पर्धा..

     ..भरकटलेली युवा पिढी..

 आजचे बालक हे उद्याचे जबाबदार नागरिक बननार आहेत.हे आपण सर्वजण जानतोच ,प्रत्येक पालक आपल्या पाल्यांची योग्य ती काळजी घेत असतो.बालकांच्या जन्मापासून त्याला हवी नको ती गोष्ट ,या सर्व बाबिकडे बार्काइने लक्ष दिले जाते.जशी जशी मुले मोठी होवू लागतात तशी तशी त्यांची विचार करण्याची क्षमता रुंदावत असते.लहानपणी पुरवलेले हट्ट, वाढत्या वयाप्रमाने बदलत जातात .आज भारताची प्रगतिकडे वाटचाल चालु आहे.भारताचे माजी राष्ट्रपति डॉ.अब्दुल कलामांचे स्वप्न होते की 2020 साली भारत आर्थिक महासत्ता होणार!पण आजच्या भरकटलेल्या युवा पिढीकडे पाहिल्यास असे वाटते की हे कलामांचे स्वप्न स्वप्नच राहणार की काय?
      लोकामधे जागरूकता निर्माण करण्यासाठी व एखाद्या विशिष्ट बाबींची माहीती होण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ,राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळे दिवस आपण साजरे करतो,जसे की मानवी हक्क दिन(10 डिसेंबर),आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन,तंबाखू विरोधी दिन,जागतिक एड्स दिन(1डिसेंबर),आंतरराष्ट्रीय महिला दिन (8 मार्च).प्रत्येक बाबींचे महत्व पटवून देण्यासाठी वर्षातील एक दिवस आपण एक विशिष्ट बाबिसाठी देत असतो.एक दिवस tv, वर्तमानपत्र   सर्वत्र याची चर्चा होते आणि नंतर लगेच सर्वाना विसर पडतो,यामुळेच आज वेगवेगळ्या समस्या वाढलेल्या आहेत.
    आजच्या युवा पिढीने स्वामी विवेकानंद,महात्मा गांधी,डॉ.आंबेडकर, भगतसिंग,अब्दुल कलाम,कल्पना चावला यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासारखेच बनावे असा सारासार विचार आपण करतो ,पण बहुदा यांच्या विचारांचा विसर पडल्यासारखे वाटते.वेगवेगळे व्यसन करणे, नशिल्या पदार्थाचे सेवन करणे, तंबाखू ,गुटखा,सिगारेट,दारु,चरस,गांजा यासारख्या अनेक नशिल्या पदार्थाच्या आहारी जावून ही पिढी कुठल्या दिशेने चालली आहे कुणास ठावूक? याचा शेवट खुपच भयंकर आहे.
       ही व्यसनाधिनता ग्रामीण व शहरी भागात सर्रासपने चालु आहे.शिकली सवरलेली युवा पिढी सुरुवातीला enjoy म्हणून असे पदार्थ सेवन करतात व मग ते व्यसन बनते, तो पदार्थ मिळाला नाही तर ते विचित्र वागतात व यातूनच मग कँसर ,किडनीचे आजार,यकृताचे आजार,एड्स याची लागण होते व परिणामी शरीर निकामी होते.अशा या व्यसनामुळे देशातील युवा पिढी बर्बाद होत आहे.
      कँसर व ईतर आजारावर लोक चर्चा करताना दिसतात पण एड्स सारख्या विषयावर चर्चा होताना दिसत नाही.एड्स हा व्यसन नाही पण या महाभयंकर आजाराने आजची तरुण पिढी पुरती बर्बाद होताना दिसत आहे.AIDS चे पूर्ण रूप आहे Acqired Immuno Defficiency Syndrom आणि हा रोग HIV(Human Immuno Virus) नावाच्या विषाणुमुळे होतो.एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी सर्वात पहिल्यांदा हा आजार दक्षिण मध्य आफ्रिकेत दिसून आला.20 व्या शतकात याचा प्रसार संपूर्ण विश्वभर झाला.1980-81 मध्ये अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे Hiv बाधित 5 रुग्ण आढळून आले.पूर्ण विश्वात 4 करोड लोक एड्सग्रस्त आहेत.NACO (National Aids Control Organisation)च्या अहवालानुसार भारतात जवळजवळ 20 लाख 40 हजार लोक एड्सबाधित आहेत.2013 मध्ये भारतात 1लाख 30 हजार लोकांचा मृत्यु एड्समुळे झाला आहे,भारतात एड्सचा पहिला रुग्ण 1986 साली आढळला होता,आज ही संख्या झपाट्याने वाढत आहे.
        HIV विषानुंचि लागण कशी होते याची माहीती करुण घेणे आवश्यक आहे .याची अनेक कारणे आहेत त्यापैकी महत्वाचे म्हणजे 1)असुरक्षित शरीरसंबंध 2)पुरुषांचे पुरुषांशि संबंध 3)ड्रग्सचा नशा करताना वापरलेल्या इंजेक्शनमुळे 4)याबरोबरच दाढ़ी करण्यासाठी वापरले जाणारे ब्लेड,रक्तदान करताना वापरले जाणारे इंजेक्शन व गरोदर मातापासून जन्म घेणाऱ्या बाळास् hiv ची लागण होऊ लागली आहे.
         भारतात जर विचार केला तर सर्वत्रच एड्सबाधित रुग्ण आपल्याला आढळतील 15 ते 49 वयोगटातील एड्सबाधित रुग्णांचे प्रमाण 83%आहे.यात आघाडीवर राज्ये आहेत 1)आंध्रप्रदेश -5लाख रुग्ण 2)महाराष्ट्र-4लाख 20 हजार 3)कर्नाटक-2 लाख 50 हजार 4)तामिलनाडु-1लाख 50 हजार या राज्याबरोबरच अनेक राज्यात ही संख्या वाढतच आहे आणि वाढतच राहणार.एड्सवर कायमचा उपचार नाही पण आपण हा आजार होऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे.शरीरसंबंध ठेवताना पुरुषानी कंडोमचा वापर केला पाहिजे व स्त्रियांसाठी सुद्धा वेगवेगळे साधने आहेत यासाठी लोकामध्ये जागृती करने आवश्यक आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे पालकांनी आपल्या पाल्यांना सर्वच बाबदित योग्य मार्गदर्शन केले पाहिजे.आपण भारतीय लोक लैंगिक विषयावर सहसा खुलुन बोलत नाही पण सर्व पालकांनी यावर चर्चा केलि पाहिजे,कोणत्या बाबी चांगल्या कोणत्या वाईट हे जर मुलाना वेळीच सांगितले तर मुले चांगल्या गोष्टीकडे वळतील.
           शालेय अभ्यासक्रमात सुद्धा लैंगिक शिक्षण हा विषय compulsory केला पाहिजे ,सर्वच लोक जेंव्हा जागृत होतील तेंव्हा नक्कीच भारताची युवा पिढी भरकटनार नाही.मुले ज्यावेळेस तासनतास मोबाइल वर असतील त्यावेळी ते काय करत आहेत याची माहीती पालकांनी ठेवावी ,जेनेकरुण आपल्या मुलांचे भवितव्य उज्वल होईल........

       -श्री सगर पंढरी @83@
         धर्माबाद 940562837

[11/27, 10:43 
भरकटलेली युवा पिढी
वादळात दिवा लावण्याचं सामर्थ बाळगून कोणतंही तुफान सहज झेलू हा दुर्दम्य आत्मविश्वास बाळगून सैर वावरणारा आजचा युवक. बुद्धीचा नि ज्ञानाचा जणू परमोच्च बिंदू गाठलेला आजचा युवक. सुसाट सुटलेला वाऱ्याचा झोतच जणू आजचा युवक. भारताच्या भविष्याचा आधारस्तंभ आणि जणू भविष्यच आजचा युवक. लोकशाही बळकट करण्यातील महत्त्वाचा घटक आणि जागतिक निरिक्षणात सर्वात तरुण देशात राहणारा आजचा आमचा युवक. भारतीय संस्कार आणि संस्कृती नावाजलेलीच नव्हे तर अनुकरणीय आहे.संस्कार आणि संस्कृतीचा अवमेळ का आणि कशामुळे होत आहे. याच्या तळाशी आणि मुळाशी जाण्याचा जर प्रयत्न केला, तर भारतीय राजकारणास विकृत येत चाललेले रुप आणि त्याचा हिस्सा होणारा आजचा युवक. हीच मुख्य कारण आपल्या लक्षात येईल. परंतु राजकिय फायदयासाठी अनेक वायदे केल जातात आणि युवकांना भडकावले जाते. तसेच त्यांचा वापर करुन घेऊन नेतेमंडळी आपली राजकिय पोळी भाजून घेतात.वाढत्या लोकसंख्येमुळे हाताला काम नसणारा युवक अशा राजकारण्यांच्या जाळ्यात सहज सापडतो. आणि मग चालू होतो त्याच्या आयुष्याचा भरकटण्याचा प्रवास. पण राजकारण्यांना ना त्याच्या आयुष्याचे देणे घेणे ना त्याच्या भरकटण्याचे. रिकामे हात आणि रिकामे डोके सहज फसून जाते आणि उतार बघत बघत वाहते. कोणाच्या हातात थोडेफार पैसे आले तर कोण गप्प बसणार..? पुढे पुढे चालताना
अडथळ्यावर मात करत पुढेच जाण्याची उर्मी आणि धमक त्याच्या अंगात असतेच असते. पण तो चालतो तो मार्ग राजमार्ग नक्कीच नसतो. पण अंगातील रग उधान आणते मनाला, आणि मग तो युवक जुमानत नाही कोणाला. काम चलावू पैसा हातात आला की अॅनराईड मोबाईल ही पहिली पसंत होऊन जाते आणि मग सैराट जीवन म्हणजे
काय हे फक्त त्यांच्याकडे बघितल्यानंतर कळते. उसळती जवानी आणि इंटरनेटसह हातात मोबाईल,
सारं विश्वच मग कवेत घेतल्याचा आणि कवेत असल्याचा अविर्भाव आजच्या युवकांच्या वर्तनात दिसू लागलेला असतो. आश्लिलता सहज त्याला मिळू लागली. आणि त्याच त्या गुंगीत तो राहू लागल्याचे चित्र शहरी आणि ग्रामिण दोन्ही भागात पाहायला मिळते. नशा आणि वेशा हा जणू छंदच युवकांना जडू पाहत आहे. आणि मग यातूनच उद्भवतात एचआयव्ही रूग्ण आणि असाहय वेदना देणारे असाध्य असे एड्स सारखे रोग.ढाबा संस्कृतीचा दिवसेनदिवस होत चाललेला प्रचार आणि प्रसार, मादक पदार्थाची सहज उपलब्धता यामुळे तर आजच्या युवकाचा स्वतःवरचा ताबा सुटताना दिसतो आहे. अध्यात्माचा पाया असणाऱ्या महाराष्ट्रात सुध्दा युवकांच्या ओठावर ओवीऐवजी शिवी दिसू लागली. शाहू महाराजाचां वारसा चालवणाऱ्या महाराष्ट्रात युवक कुस्त्याच्या फडाऐवजी कला केंद्राच्या फडावर  रमू लागला. शौर्याचे धैर्य अंगात बाणविण्याऐवजी कैफीत राहून लैला मिळावी म्हणून झिंगणारा युवक हाडाची काडं घेऊन बेभान वावरताना दिसतो आहे. वेसनाचा आधार त्याला फरफटत वाम मार्गावर केव्हा घेऊन जातो हे त्यालाही कळत नाही. उतारावरून ओघळणारे पाणी थोपवणे अवघड असते म्हणून ते तसेच वाया जावू दयावे काय..? त्याला किमान योग्य आणि निर्णायक दिशा तरी आपण दयावी. भरकटणारी युवा पिढी आपण तशीच भरकटू देणार 'काय...? त्यास थांबवणे, रोकणे वा त्यातून बाहेर काढणे आपले सर्वांचे कर्तव्य नाही का..? उज्वल भारताच्या भवितव्यासाठी सशक्त निरोगी आणि उत्साही मनोवृत्तीची आवश्यकता आहे.ती मिळवण्यासाठी व मिळवून देण्यासाठी आपले सर्वांचे एकसंघ प्रयत्न आत्यंत महत्वाचे आहेत. चला ठाण मांडू मनी नि भारत भू ला सशक्त निरोगी आणि कर्तृत्ववान युवकांच्या सशक्त बाहूबलीतून आकारयुक्त आणि रोगमुक्त बणवू या.....!!!
                    श्री. हणमंत पडवळ.
   मु.पो.उपळे (मा.)ता. जि. उस्मानाबाद


Thursday, 17 November 2016

नाद चारोळी स्पर्धा यश - अपयश

📚 *साहित्य दर्पण* 📚

आयोजित नाद चारोळी स्पर्धा

------भाग - ३१ वा------

      विषय : यश - अपयश

संकल्पना: सौ. कल्पना जगदाळे

संयोजक : आप्पासाहेब सुरवसे

परिक्षक :  सौ. सुनिता मचाले

संकलन : संतोष शेळके

ग्राफिक्स : अनिल लांडगे

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

स्पर्धेतील संकलित  चारोळ्या:
यश आणि अपयश
जिवनाचे दोन अंग..
यशामुळे घडे माणूस
अपयश करे अपेक्षा भंग

घनश्याम बोह्राडे
बुलडाना स.क्र 19
*स्पर्धेसाठी*

विजयी आनंद
वसे यशात
पराभवाचे दु:ख
दिसे अपयशात

❎स्पर्धेस नाही❎

कल्पना जगदाळे
@8★बीड

यश आणि अपयश म्हणजेच जीवन
फरक फक्त 'अ' चा असतो
अपयशाने माणूस खचतो
यशाने मात्र तो हसतो
****************************
मीना सानप  बीड @7
9423715865
स्पर्धेसाठी👆

यश आणि अपयश जीवनात
हात हाती घेऊन येतात बरोबर
प्रयत्न असतील भरपुर तर
यश मिळतेच खरोखर
***************************
मीना सानप बीड @7
9423715865
स्पर्धेसाठी नाही

 
अपयशाने न जाता खचुन
अविरत प्रयत्नांनी यशाला आणावे  खेचून...
रचवा असा आदर्श अदभुत
आगळा वेगळा इतिहास दाखवावा रचून.........

✍जोगदंड जयश्री
    @jj62....
🌹स्पर्धेसाठी👆�🌹

*स्पर्धेसाठी*👉
*********

*कर्तृत्वाच्या झाडाला नेहमीच*
*मेहनतीचा मोहर हमखास येतो*
*यशाचे फळे चाखतांना मात्र*
*अपयशाचा कडवटपणा जाणवतो*

         🎯 *मारुती खुडे*@18

स्पर्धा*
~~~~~~~~~~~~~~
यश~अपयश दोन्ही
एका नाण्याच्या बाजू..!
प्रयत्नांती यश पदरी,
हेच असे माप तराजू..!!
------------जी.पी @81

: नाद चारोळी स्पर्धेसाठी...

कुणीतरी हारले म्हणून
कुणीतरी जिंकत असते...
मित्रा एका यशापयशाने
जिंदगाणी संपत नसते...
........ निलेश कवडे  @44

**
स्पर्धसाठी
-----------------
जीवन जगने,संघर्ष करणे
हा आहे मानवतेचा धर्म
श्रम करून प्रयत्न करणे
हे आहे यश-अपयशाचे वर्म.
मीर खेडकर@(6)बीड

       *स्पर्धेसाठी*
*~~~~~~~~~~~~~~~~~*

*यश थोडे दूर आहे अपयश सांगत असतं*

*सोडू नको प्रयत्न ते प्रेरणा देत असतं*

*होशिल तू पण सफल एक दिवस*

*अपयश च यशाच पहिल पाऊल असतं*

*====================*

*मंजुषा देशमुख@३६*
*अमरावती*

स्पर्धेसाठी.
                  चारोळी .

       यशाची  ही  फुलं
      
      अपयशाने होती गुल

      उध्वस्त होता  मन

     जगण्याची करी भुल.

               पुष्पा सदाकाळ भोसरी
              @ 50.

स्पर्धेसाठी

जिवनाच्या संघर्षात येतात
यश अपयशाचे अनेक प्रसंग...
तावून सुलाखून यश येतेच
असतील जर स्नेहीजन संग !!


55 अश्लेषा मोदी

*स्पर्धेसाठी*- - - - - -

*प्रेमळ नात्यास जपने म्हणजे*
*या आयुष्याचे खरे यश आहे!*
*स्वार्थीपानात मायेचे नाते दूर*
*जाणे हे जीवनाचे अपयश आहे!*

*अनिल रेड्डी लातूर ५६

"कष्टाच्या यशाचं चांदणं पसरताच

रातराणी कशी बहरून येते

अपयशाचं गाठोडं अापसूक

आळसावर आरूढ होते "

............जयश्री पाटील🖌
       स्पर्धेसाठी🏹👆🏻

स्पर्धेसाठी
यश मिळो वा अपयश
खचू नये कंदी .
अपयश ही  समजा एक सुवर्ण संधी .

कविता बडवे
बीड

■..नादचारोळी स्पर्धेसाठी..■

आत्मविश्वासासारखा गुरु नाही
अपयशाशिवाय जीवन सुरु नाही.
पराजयातून जय मिळवणे कमाल आहे
कष्टाशिवाय मिळालेल्या यशास मोल नाही.
   -श्री सगर पंढरी @83@
       धर्माबाद

स्पर्धेसाठी

काळा पैसा कुणालाच पचत नाही
स्वार्थाने मिळालेले यश टिकत नाही
यश - अपयश जीवनाचा भाग आहे
स्थितप्रज्ञ अपयशाने कधी खचत नाही

©सौ. शशिकला बनकर
@35

🍁स्पर्धेसाठी🍁

यश कोणीच पाहिलेले नसते
पण सर्वांना हवे हवेच असते.......!

वाटचाल यशाची होत असताना
अपयशाला तेथुन निसटावे लागते....!!

_____📝कवी:-गजेंद्र(गजानन)

स्पर्धेसाठी चारोळी
भाग - ३१ वा

आयुष्यात प्रत्येकाच्याच
येते सुख-दुःखाची वेळ ।
यश-अपयश म्हणजे असतो
ऊन - सावलीचा खेळ ।।

✍🏻✍©:- अनिकेत जयंतराव देशमुख. (अनु)
               रा- गोपालखेड , ता. जि. अकोला.
                   

यशापयशाने खचू नको
तू निर्धाराने लढत रहा
लाखो वाटा मिळतील तुजला
गड जीवनाचा चढत रहा  !!

   -आबासाहेब निर्मळे.
पेठ वडगांव,कोल्हापूर
9028090266.
क्र-३१
स्पर्धेसाठी
--------------

🌹नादचारोळी स्पर्धेसाठी नाही🌹
1)
सत्य आणि साहस
ज्यांच्या मनी वसे..
यश अपयशाची
त्यांना तमा नसे..
2)
लढन्याची धमक ज्यांच्या अंगी
मनात ठाम आत्मविश्वास..
यशाची हीच गुरुकिल्ली
यश मिळणार त्यांना हमखास..
3)
अपयशाची भीती नको
तु मनातून कार्य कर..
यश मिळणार नाही सहजासहजी
संकटाची नौका तू पार कर..
4)
कष्टाला मिळे साथ नशिबाची
ठेव जिद्द मनी संकटाला समोर जाण्याची..
अचूक ध्येय ,सोबत सत्याचा मार्ग
हीच गुरुकिल्ली आहे यश मिळविण्याची..

-श्री सगर पंढरी @83@
     धर्माबाद

स्पर्धेसाठी नाही

चुकून सुटली एकच सुवर्ण संधी
जीवनभर मग अपयशाची
आली मंदी
यशाचा सुगंध सर्वदूर पसरतो
संधींची फक्त वाजावी नांदी

... सौ. शशिकला बनकर
@35


...नादचारोळी स्पर्धेसाठी ..

यश अपयशाला पचविणे

आई वडीलांनी संस्कारले..

जगतोय त्यांच्याच छायेत

म्हणून संकटांनीही तारले...

रोहिदास बापू होले ..७१
गोपाळवाडी ,दौंड ,पुणे..
१७/११/२०१६

*स्पर्धेसाठी नादचारोळी*

अपयशाचे चटके सोसत
चढवी  यशाची  पायरी
सत्याने अपयशाला नमवावे
तोच खरा सुखी असे संसारी

     खेडकर सुभद्रा बीड 20@
  

----------स्पर्धेकरीता----------

अपयशा मागून यश,
हे जीवनात येत असत.!                         अपयश आल म्हणून
कधीच रडायचं नसत.!

------बालाजी लखने(गुरू)------
        उदगीर जिल्हा लातुर
        भ्र...८८८८५२७०४
        अ. क्र. (25)

अपयशाची येथे तरी,
खरे नसावी भिती।।
अपयशाच्या वनातूनी,
यशाची वाट जाती।।


✒अनिल लांडगे उंडणगाव@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

✖स्पर्धेसाठी नाही...✖

*नाद चारोळी स्पर्धेस*

जीवन सागरात
येईल वादळ अपयशाचे
मात कर तयांवरती
पाहून स्वप्न यशाचे.

----सुवर्णविलास 4


अपयशी होण्याचे साहस,
ज्याच्या ठायी असते।।
बाळगून जिद्द,घेता कष्ठ,
तयास कमी काही नसते।।


✒अनिल लांडगे उंडणगाव@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

✖स्पर्धेसाठी नाही...



स्पर्धेसाठी....

उगा मनात तू  धैर्य खचू नको ,

येणा-या अपयशाच्या वादळाशी..!

प्रयत्ननांनी दे परीक्षा ध्येयाची ,

अन् यशाची  घे भरारी आकाशी..!!

___ संतोष शेळके ✍ @२४

स्पर्धेसाठी

यश-अपयश जीवनाच्या बाजू दोन
एक हसवते तर दुसरे रडवते
सवय असावी दोघांची जीवाला
रहस्य जीवनाचे ह्यात दडलेले असते...

मनिषा वाणी..
सुरत..
@२



होता तृष्णाक्रांत व्याकुळ,
जलही लागे अमृतापाडे।।
अपयशाच्या खाणीतूनी,
हिरा यशाचा तो सापडे।।


✒अनिल लांडगे उंडणगाव@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

✖स्पर्धेसाठी नाही...✖

यश असो वा अपयश,
करावी त्यावर मात....
करतो जो प्रयत्न सदा,
मिळते नशिबाची साथ...

कविता शिंदे  --- ६७

सुख -दुःखाच्या वाटेवर,
यश अपयश येत राहत...
लढतो जो वादळाशी कायम,
त्याच जगणं सफल होत असत...

कविता शिंदे  --- ६७

स्पर्धेसाठी ...

यशाशी करत रहा तू मैत्री सदा
अपयशाला ही कधी विसरु नको
धैर्य आणि प्रयत्नांची बांधून बंधने
तू लढ लढाई जीवनाची हरु नको...

निर्मला सोनी.( 28)

अपयशाची जरी अली पायरी
तरी न घेता माघारी
करावे प्रयत्न दिनरात्री
यश गवसेल सोनेरी
श्रुती  खडकीकर
61
नवी मुंबई

प्रयत्नाची असेल कास
    यश असो वा अपयश
          त्यावर नेहमीच तू
              करशील मात....

कविता शिंदे ....६७

स्पर्धेसाठी ::
जीवनाच्या परिक्षेत
यश आणि अपयश
कर्तृत्वाच्या आलेखात
भूमिका ठरे श्रेयस
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे
@39



येता पदरी जरी अपयश,
दैवास दोष देत सुटतात।।
परि अपयशाच्या मातीतूनच,
यशाचे अंकुर हे फुटतात।।


✒अनिल लांडगे उंडणगाव@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

👆👆स्पर्धेसाठी...👆👆

_अपयश हीच यशाची पहिली_
_असते म्हणे खरी पायरी_
_जीवननौका हाकत हाकत नेतो_
_हसत हसत आनंदाने पैलतीरी_

✍🖊🖍🖋🎯🖋🖊

*_श्री. आप्पासाहेब सुरवसे_*
_AMKSLWOMIAW_
     *_AK47_*
❎ *~_स्पर्धेसाठी नाही_~* ❎

🍁स्पर्धेसाठी🍁
*********************
यश आणी अपयश

हिच मूळ भ्रान्ति

याला ओलांडले तर

घड़ेल नक्कीच क्रान्ति

49 नलिनी वागीकर(सायली)

*ग्रुप बाहेरील चारोळी*

यश अपयश हे
जीवनाचे सार आहे
यश सारथी तर
अपयश लगाम आहे
✍🖋🖊
*प्रा. वैशाली देशमुख*
कुहू जिल्हा नागपुर

_तुझ्या माझ्या भांडणात_
_यश मिळते नित्य तुलाच_
_दुरावताना तू सखे अपयशास_
_कवेत घ्यावे वाटते मलाच_
✍🖊🖍🖋🎯🖋🖊
*श्री आप्पासाहेब सुरवसे*
_AMKSLWOMIAW_
     *_AK47_*

❎ *~_स्पर्धेसाठी नाही_~* ❎

सर्धाकरिता
यशाची धुंदी नसावी मना
खचनेही नसावे अपयशाने.....
ओठावरती गीत असावे
जणू तेच जीवनगाणे... ॥
          श्री. हणमंत पडवळ.


        *यश - अपयश*

यशाला असते म्हणे देवाच्या
त्या समजुतीची खंबीर साथ
नशीबाला दोष न देता प्रयत्नाने
अपयशावर होवू शकते मात

✍🖊🖋🖍🎯🖋🖊
*श्री . आप्पासाहेब सुरवसे*
_AMKSLWOMIAW_
         *_AK47_*

❎ *~_स्पर्धेसाठी नाही_~* ❎

🔹🔹🔹🔹🔹
नाद चारोळी स्पर्धा
🔹🔹🔹🔹🔹

अपयशाचे झेलून घाव
पुढेच पुढे चालत राहिलो
जिद्दीने अन् नवजोमाने
आज यशाचे शिखर पाहिलो ।।

:- संजय खाडे ,
गट क्र .७६.
औरंगाबाद .
मो. 9421430955
sanjaykhade511@gmail.com

🌿❌स्पर्धेसाठी नाही❌🌿
************************
यश आणी अपशय

एकाच नाण्याचा दोंन बाजू

यश नाहि मिळाले तर

अपयशाला पाणी पाजु

49 नलिनी वागीकर(सायली)

नाद चारोळी स्पर्धेसाठी...
अपयश सारण्या दूर
प्रयत्नाचे बळ ।
मेहनतीच्या वृक्षाला
यशाचे फळ ।।
नरेंद्र म्हस्के , शिरपूर ( धुळे ) @ 65

*स्पर्धेसाठी नाही*

अपयशानंतर मिळालेल्या यशाचा आनंद
नेहमीच दीर्घकाळ टिकतो
संधी शोधतो नवनिर्मिती करतो
आयुष्याला कलाटणी देतो
... सौ. शशिकला बनकर @35

*स्पर्धेसाठी नाही*
- - - *चारोळी*- - -
*यश येता कार्याला*
*श्रेय घेता स्वतःवर*
*अपयशा चे खापर*
*मात्र फोडता इतरावर*

*अनिल रेड्डी लातूर @ 56*

*नाद चारोळी स्पर्धेसाठी*

ऊर फुटोस्तर  कर शेती
नाही मिळणार तुला यश 
शेतकऱ्याचा पुत्र तू
माथी लिहिलंय तुला अपयश
*संजयकुमार माचेवार@१२वसमत

*नादचारोळी स्पर्धेसाठी*
"नको अपयशाचा खेद
नको यशाचा माज,
क्षणभंगुरतेच्या यशाला
नको गर्वाचा साज!!"
संगीता देशमुखी@१४

नादचारोळी स्पर्धेसाठी
🔅🔅🔅🔅🔅🔅
आज गाठले शिखर उंच
ध्वज उभारला यशाचा
अपयशाची पर्वा नाही
मोदींना पाठिंबा पुर्ण देशाचा

योगिनी चॅटर्जी #52
〰〰〰〰〰〰〰

जीवनात प्रत्येकाच्या सुरू असतो
नेहमीच पाठशिवणीचा खेळ 
यश,अपयश येतच राहील
महत्वाचे आहे परीश्रम अन वेळ !
✍ पी.नंदकिशोर
आकोट जि.आकोला
@ 43 (नाद चारोळी स्पर्धेसाठी )

दिल्या ओळीतल्या शब्दांची मोडतोड होते
यश अपयशाचे लंगडे समर्थन ते
प्रतिभा थिजलेली त्यांची पाडती कविता
कान टोचणे अप्रिय समूहाचे बनते
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे

अपयशानेच माणूस
कणखर बनतो खरा
हमखास यशासाठी
जोमाने प्रयत्न करा

मीना सानप  बीड @7
9423715865
स्पर्धेसाठी नाही

… *यश -अपयश*…

*पचवतो अपयश यशाने*
*तोच राहतो अजय*
*पराजयवरच अवलंबून*
*असतो नेहमी जय*

*कल्पना जगदाळे*
   *@8★बीड*
  *👆🏿स्पर्धेसाठी👆🏿*

काळा पैसा बाहेर निघणे
हे खरंच मोठे यश आहे
सामान्य टेकला मृत्यूपंथे
अपयश हे कोणाचे आहे

किशोर झोटे@32
औरंगाबाद.
👆 स्पर्धासाठी👆

अपयशाने कधीही खचु नका
ती तर पहिली पायरी यशाची
यश निश्चीतच मिळते नंतर
भिती बाळगु नका अपयशाची

      खेडकर सुभद्रा20@
  मो नं 9403593764

    स्पर्धेसाठी नाही

यश मिळाल्यास जग सारे वंदी
अपयशी झाल्यास सा-या जगाचे बंदी
पण यशाची चढू देऊ नका धुंदी
कारण अपयश देत असते नवी संधी

         शैलजा ओव्हाळ/चिलवंत
                    @ 73
               स्पर्धेसाठी

उतावीळपणे चालविती कलम
शब्द शक्तीला करिती सवंग, क्षीण
वापरती यशापयशाचे मलम
उपदेश ऐकावयाचा येतो शीण
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे
@39

🎯स्पर्धेसाठी🎯
जीवनरुपी परीक्षेत
यश मिळो वा अपयश
हिंमतीने करावा सामना
प्रयत्नांती लाभते सुयश!

संगीता भांडवले
वाशी, उस्मानाबाद
@१६

यश -अपयश सोबतच असतात
अपयश देते नेहमी यशाची चाहूल
प्रयत्नांची कास धरुन सोडू नका संधी
कारण अपयश च असते यशाचे पहिले पाऊल

मीना सानप बीड @7
स्पर्धेसाठी नाही

🎯 *नाद चारोळी स्पर्धा* 🎯

अपयशाचा घाव उर्मीने सोसावा
यशाचा तो सरताज चढवावा
परी सच्च्या खिलाडू वृत्तीचा
बाणा अंगी नित्य बानवावा

✍🖊🖋🖍🎯🖋🖊
*श्री . आप्पासाहेब सुरवसे*
_AMKSLWOMIAW_
        *AK47*
❎ *~_स्पर्धेसाठी नाही_~* ❎

स्पर्धेसाठी ::
********************
जीवनाच्या रंगमंच्याला शोभे
पडदे यशा-अपयशाचे....!!
एक उघडतो तर दूसरा पडतो
अपयशाला ओढून नायक बना जगाचे..!!
********************
सय्यद जावेद 85

*नाद चारोळी स्पर्धेसाठी*

यश अपयशाचे प्रतिबिंब,
सुख-दुःख रूपे दर्पण सन्मुख होते..!
दर्पणात दिसणारे ते भाव,
ह्रदयी आठवण रूपे रूजून राहाते..!

           बंडोपंत कुलकर्णी सोलापूर
           समूह क्रमांक १३

स्पर्धा करीता

लक्षवेधी करावा प्रयास
लढण्याची असावी धमक
संकल्पना रुजवा मनात
मार्गक्रम यशाचे गमक

निता आरसुळे तांबे,@४५