Saturday, 5 November 2016

मुक्त कविता लेखन स्पर्धा

📕📗साहित्य दर्पण 📝🔏

💈💈द्वारा आयोजित 📺📻

📑📃साहित्य सेवा 🖊✏

भाग ::--- *25वा (पंचविसावा)*

खास कविता स्पर्धा
★★★★★★★★
_5 ऑक्टोबर2016_
वार :::- _शनिवार_
================
वेळ सकाळी 10:00 Am ते सायंकाळी 7 :00Pm वाजेपर्यंत
~~~~~~~~~~~~~~~
विषय :---मुक्त खुली कविता
~~~~~~~~~~~~~~~
संयोजक:--आप्पासाहेब सुरवसे,लाखणगांवकर
____________________
संकल्पना:-- मारुती खुडे सर, माहुर
____________________
परीक्षक --
*अमोल अलगुडे , निलंगा*
_____________________
ग्राफिक्स -- *सुवर्ण विलास सर*

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯

*मुक्तकविता स्पर्धेसाठी*

*पणती न तू दिप...*

चंद्र' तारे नभातील
खेळायला देऊ का तुला
सांग सांग चिमुकले
काय हवं तुला

नको रुसू मजवरी
माझ्या फुलपाखरा
तुझ्या हसण्यातच
माझा आनंद खरा

नाच-बागड मनसोक्त
जसे मयूर करी नॄत्य
तुझ्या मुखकमली विराजू दे
हास्य असेच नित्य

निरागस तुझे बोल बोबडे
ओठातून तुझ्या येती असे
ऐकताच तयांना
माझा मी न राहत असे

दुड दुड तुझ्या पावलांची
पाहून हरपते मन माझे
घेण्या कवेत तुजला
अधीर होते मन माझे.

पणती न असशी
आहेस दिप तू जीवनी माझ्या
तुझ्या जन्माने उजळल्या
दशदिशा जीवनाच्या माझ्या.

*----- *सु*वर्ण *वि*लास *4*

📕साहित्य दर्पण व्दारा आयोजित 📕
              साहित्य सेवा
****************************
भाग----- पंचविसावा

खास कविता स्पर्धा

दिनांक ------5---11---2016
***************************
विषय--- मुक्त खुली स्पर्धा

*उचल*    (अष्टाक्षरी )
***********
दिवाळीची लगबग
खरेच आता संपली
शेकोट्यांनी जागोजागी
उब खरी पांघरली

शेकोटीच्या भोवती ही
चर्चा रंगात येतसे
पाऊस पाणी पेरणी
वेळ पुन्हा येत नसे

ऊस तोडणी करण्या
कारखान्याला जाणार
मुलांबाळाना सोबत
कसे हो आता नेणार

त्यांच्या साठी गावी आता
वस्तीगृह चालणार
पोटासाठी मायबाप
दुरदेशी हो जाणार

जाताना ही मायबाप
खोटेखोटे हसणार
परी डोळ्यांत ही त्यांच्या
आसु किती दाटणार

नापिकीला कंटाळून
कर्ज घेतले व्याजाने
सावकारी दट्टा भारी
जीव जाई विळख्याने

*उचल*मुकादमाची
कशी फेडावी चिंतेत
रात्रंदिन कोयत्याने
ऊस तोडीतो भ्रांतेत

आयुष्याची परवड
जगण्याला अर्थ नाही
काय असा गुन्हा केला
दारिद्रय आमच्या ठाई

ईश्वर असेल जगी
तर एकच मागणे
कधी टळेल आमचे
*उचल*विना जगणे
********************
मीना सानप  बीड @  7
9423715865
स्पर्धेसाठी  
****************************

📕साहित्य दर्पण व्दारा आयोजित 📕
              साहित्य सेवा
****************************
भाग----- पंचविसावा

खास कविता स्पर्धा

दिनांक ------5---11---2016
***************************
विषय--- मुक्त खुली स्पर्धा
********
*विरह दुःख*

तु माझ्या प्रेमाची पणती होती
मी त्यातली जळनारी वात
तूला कधीच कळली नाही
वातीच्या जळण्याची बात

तुला आठवते का आपल्या
बागेतिल भेटीत तु खुष होती
स्वार्थी समाजाची सर्व बंधने
विसरून माझ्या मिठीत होती

एकत्र होतो तेंव्हा प्रेमात
खूप हसत फिरत  होतो
आज तुझ्याशिवाय मी
ऐकटाच रडत फिरत होतो

तुझ्या- माझ्या नात्यामध्ये
गैरसमज त्यांनी केला आहे
त्यातच तुझ्या मनात माझ्या
प्रेमाबद्दलचा  बदल झाला आहे

मला दुःख त्यांचे नाही की
प्रेमात गैरसमज असा केला
वाईट याचे वाटते की तु
त्यावर विश्वास कसा केला?

माझ्या मनात चूक कुणाची या
प्रश्नाचे वादळ उठायाला लागल
त्यात आपल्या प्रेमाच गलबत
मात्र दिशाहीन फिरायला लागल

तू माझी साथ सोडली की राणी
मला जग सुद्धा परके होत गेले
तूला नाही समजली जगाची रीत
इथे लोक वेळेनुसार बदलत गेले

तू माझी झाली नाहीस तरी पण
तू मात्र तुझ्या संसारात सुखी रहा
कधी माझी आठवण आली तर
आपल्या प्रेमाच्या भेटी आठवत रहा

अनिल रेड्डी (लातूर )
@ 56

****************************
***शिक्षणाची वारी***
शिक्षणाने घडल्यात पिढ्या भारी
आज का  वाढलीय बेकारी
शिक्षणाची निघालीय वारी।
शिक्षणाची निघालीय वारी।।

आमचा मास्तर होता गावाचा
आज का नाही तो कामाचा।
पूज्यावर घेता येत नाही त्याला हातच्याचा।।
म्हणे बदलत्या जगाचे ज्ञान लई भारी,
शिक्षणाची निघालीय वारी।

शिक्षकाने कसे हो शिकवायचे
अनेक तंत्र आले मूल्यमापनाचे।
अकारी विकारी नाही गणित अंकाचे।।
म्हणे ज्ञानाचा दिवा लागेल घरोघरी
शिक्षणाची निघालीय वारी।

मांडला ठेकेदारांनी बाजार,
खालचा वर करून किती झाले बेकार।
पैशासाठी शिक्षणाची चाललीय उठाठेव।।
म्हणे आरक्षणाशिवाय नाही पर्याय
ही शक्कलच लई भारी
शिक्षणाची निघालीय वारी।

सरकार बदलले की बदले शिक्षणक्रम,
त्यात नुसते एकावर एक उपक्रम
आठवडयाची झालीय प्रतवारी।।
म्हणे खिचडीला आलीय चव भारी
शिक्षणाची निघालीय वारी।

काय होईल नव्या पिढिचे
नापास न करता निर्णय झालाय वर्गवाढीचा।
कमी झाले मुल,
त्यात काय चुक मराठी शाळेचा।
म्हणे मायबोलीपेक्षा इंग्रजी लई भारी ।
शिक्षणाची निघालीय वारी----
सय्यद जावेद 85

*मुक्त कविता स्पर्धेसाठी...*

स्त्री जीवनी तुला हा , संघर्ष फार आहे,
अन्याय सोसणारी , तू एक नार आहे |

गर्भात तू मुलीने , वंशास का मरावे ??
ही खंत नेहमी ह्रदया , बोचणार आहे |

या वेदना मनीच्या , ह्रदयात साठलेल्या ,
प्रारब्ध भोग का सारा , तू भोगणार आहे |

बदनाम आज तू , त्यांच्या वस्तीत झाली ,
का आज आयती तू , झाली शिकार आहे |

ही बंधने जगाची , सारी तुझ्याचसाठी ,
का साखळ्या पिढीच्या , तू बांधणार आहे |

दे झुंज अस्तित्वाशी , तू दामिनी बनूनी ,
सौदामिनी नभी , केव्हा चमकणार आहे |

_____संतोष शेळके ✍🏻 @24

स्पर्धेसाठी मुक्त कविता
*मामाचा गाव*

सुट्टी लागता शाळेला
गाव मामाचा गाठला
आज्जी लाड करी किती
कंठ मायेनं दाटला

सण दिवाळीचा मोठा
आज्जी करी लाडू गोड
करंज्याची ती चवड
माया भरली गोड... गोड...

मामा आणतो फटाके
मामी आणते कपडे
किती पुरवती लाड
असा मामाचा गाव गडे

चार मामा चार माम्या
मामेबहिणीही चार
मामेभाऊ होते पाच
गोकुळ आनंदाचे फार

आता पालटले दिवस
गेले संपून बालपण
नाही कोणाकडे वेळ
वाटती कोरडे सण

देती शुभेच्छा सणाला
तेवढेच समाधान मनाला
ज्याचा त्याला प्रिय प्रपंच
रहा सुखी हेच मागणे देवाला

... सौ. शशिकला बनकर, भोसरी
@35

🌹मुक्त कविता 🌹
🌹स्पर्धेसाठी 🌹
   नियम.....
कोणी न मजला देवा
मी असे रे एकलीच
रहा जा इकडे तिकडे
नको तुझा सहवासाच..
कंटाळलो मी तुजला
तू असे आम्हाला त्रास
जा ग येथे नको राहू
जन्म देऊन झाले उदास...
जपले तुझे बालपण
न केला कधी उपहास
माझे बाळ म्हणुनी
ओढले तुला कुशीस...
रात्र रात्र जागले मी
येता तुला सर्दी ताप
खोकते मी आता बाळा
तुला होतो त्याचा ताप...
नको करू निराधार
तूच असे माझा प्राण
जपण्या तुझ्या बाळाला
राहू दे माझ्यात त्राण...
जपेन मी वंश माझा
आहे तू माझा वारस
होशी तू ही म्हातारा रे
विसरु नको नियमास....
********************
स्नेहलता कुलथे
मोबा 7588055882
क्र.37🌹

मुक्त कविता स्पर्धेसाठी कविता
--------------------------------------
" भाऊबीज "

बहिणीच्या पंखा खाली
वाढला हा धाकटा बंधु
लढतो सीमेवर आज
त्याच्या देशभक्तीला आज वंदू !
भाबडी माया माझी
तुझ्या काळजाला जाणीव
तुझ्याविन नसे काही
तुझी मोठी रं उणीव !
नको मला तुझं काही
नको साडी आणी चोळी
तुला रोजच घासून
जाते शञूची रं गोळी !
तुला मिळावे आवक
हिच देवाकडं मागणी
यावे विजयी होवूनी
हिच मागते ओवाळणी
आज आली भाऊबीज
जीव होई वर खाली
माझ्या राजाला यावर्षी
सुट्टी आसल का दिली !
पडतो आतड्याला पीळ
तुझी रोज रे आठवण
भारताच्या रक्षणाची
केलीस ह्रदयात साठवण !
माझे कितीतरी भाऊ
आज सीमेवर लढतात
देशाच्या समृद्धीची स्वप्न
त्यांच्या डोळ्यात पडतात !

      -आबासाहेब निर्मळे.
पेठ वडगांव,कोल्हापूर.
9028090266.
क्र-३१
(स्पर्धेसाठी कविता )

📕*साहित्य दर्पण प्रस्तुत कविता स्पर्धा*📕
                 *गुरूजी*
मास्तर होतो तेव्हा कसं
मुलांना शिकवत होतो
पाढे परवाचा पाठांतर
सगळच घेत होतो

झालो मग पोष्टमास्तर
टपाला साठी मरमर
बायको ओरडते सतत
पसारा तुमचा घरभर

नंतर झालो आचारी
खिचडी काही सुधरेना
ग्रॅमचा ताळमेळ जुळेना
चवीने खानारे मिळेना

आचारी करुन झाला
मास्तरचा फोटोग्राफर होणार
पहात राहा बिच्यार्याचे
आणखी काय हाल होणार

छडी काही आता वाजत नाही
विद्या घमघम येत नाही
रडवेल्या तोंडानं मास्तर
हसा मुलांनो म्हणत राही

थंडीमुळे हमखास आता
रस्त्यावर दिसनार नाही कुल्फी
सरकारी आदेश आलाय आता
गुरुजी काढणार मुलांसोबत सेल्फी
 
           खेडकर सुभद्रा बीड
       समुह क्र २०
       मो नं.   (9403593764)

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*साहित्य दर्पण* -आयोजित.....

*मुक्त कविता स्पर्धा*
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*स्पर्धेसाठी*
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

कवितेचे नाव.--

*जा रे गुरुला शरण*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*देह देवाचे मंदिर*
*आत आत्मा तो नश्वर*
*जाता गुरुला शरण*
*होई त्याचा साक्षात्कार*

*मी मोठा मी असा*
*अहंकार तो घातक*
*जाता गुरुला शरण*
*नष्ट करी रे पातक*

*खर्या सुखाची चव वेगळी*
*राजहंसासारखी    रे    खेळी*
*जाता गुरुला शरण*
*चढे जीवना झळाळी*

*नाही भौतिकाची चाड*
*राहता गुरुच्या जवळी*
*सर्व दुःख तो निवारी*
*तरुन नेई तो संसारी*

*जीव होई कासावीस*
*गुरु जवळी नसता*
*सुखी संसाराची चावी*
*त्याच्या जवळी असता*

*जा रे गुरुला शरण*
*मुक्ति होईल जीवाची*
*नको करु व्यर्थ बाबी*
*होईल प्राप्ती रे आत्म्याची*

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*चौधरी बालाजी सर*- *लातूर*
    स.क्र.   82
*9689542178*
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
(लग्न झाल्यावर पहील्या दिवाळ सणाला आलेल्या लेकीला सासर ची माणसं कशी आहेत असे आई विचारते ,तेव्हा लेकीचं उत्तर तिच्याच शब्दांत ! )
चाल -फिटे अंधाराचे जाळे
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*आहे सासर गुणाचं !*
आहे    सासर   गुणाचं
सारी   माणसे  मधाळ
किती   कवतुक   करू
वाटे   ठेंगणे  आभाळ ॥धृ॥

लेकीवानी     वागविते
माझी मायाळू गं सासू
घेते   काळजी   घराची
डोळा येत नाही  आसू
बाबासारखे      सासरे
माझा  करती  सांभाळ
आहे   सासर    गुणाचं
सारी  माणसे   मधाळ ॥१॥

दिर धाकटा तो  माझा
बंधू  शोभतो  गं  आई
जीव     लावते   नणंद
जशी मोठी माझी ताई
इतकीशी   होत   नाही
तुझ्या लेकीची आबाळ
आहे   सासर    गुणाचं
सारी   माणसे   मधाळ ॥२॥

फुलापरीस      जपतो
मला कुंकवाचा    धनी
राजा  राणीचा  संसार
असा मिळाला जिवनी
नाही चिंता ती कशाची
आली सुखाची सकाळ
आहे   सासर    गुणाचं
सारी  माणसे    मधाळ ॥३॥
✍ पी.नंदकिशोर (प.शि.)
आकोट    @43
(स्पर्धेसाठी मुक्त कविता )

मुक्त कविता स्पर्धेसाठी✍

         *सेल्फिचा छंद*

सरल झाले अवधड
ऑनलाइन बेधुंद
गुरूजींनी बाळगावा
आता सेल्फिचा छंद

आल्या आल्या शाळेत
आधी परिपाठ घ्यावा
डाटा सगळा पटापट
ताजा कंप्यूटरला द्यावा

10-10चा गट करुन
सेल्फ़ी गटात काढावी
आधारसह ती मग
सरलवर अपलोड करावी

दुपारच्या जेवणाची
ताटं ही सजवावी
जेवतांना पोरांसोबत
सेल्फ़ीही काढावी

सेल्फ़ीच्या या नादाने
पोरं होतील येडी पिशी
वाकडे तिकडे तोंड
उभी दिसेल गुरुजीपाशी

नवे नवे प्रयोग आले
शासन झाले सक्त
धडे नको पुस्तक नको
सेल्फ़ी काढा फक्त

               ✍प्रणाली काकडे✍
                समूह क्रमांक pk38

🌹मुक्त कविता🌹

   🎯  स्त्री यातना....🎯

गर्भात असतांनाच होतो
सुरु तुला मारण्याचा खेळ
जन्म देणाऱ्या तुझ्या मातेचा
होई इथे पदो पदी छळ

सोसून मरण यातना
जरी दिला तिने लेकीला जन्म
चिंता सदा तिच्या जिव्हारी
लेक माझी असुरक्षित असे आजन्म

टपून बसलेल्या तुझ्या शत्रूंना
   का कुठेच बसेना आळा
  लाज टांगूनी वेशीला....
आता गाठली त्यांनी शाळा

पवित्र त्या ज्ञानमंदिरा
  फासताना काळिमा
अत्याचारी नराधमांना
वाटली ना कशाची तमा

कोवळ्या तुझ्या जीवाची
करतात ते लाही लाही
तोडावीत त्यांच्याही देहाची लक्तरे
काय असे यातना कळावी त्यांनाही

पिडिताही असते कोणाची
मुलगी,बहीण, पत्नी,आई
न्याय मिळावा सर्वांसाठी
असू दे मग ती कोणत्याही
जाती धर्माची अनुयायी

सांगे माय दुःख लेकीचे
मागते मागणे निर्वाणीने
लेकिवीना माती मोल जीवन
नका कर्म करू लाजिरवाणे

✍जोगदंड जयश्री
    @jj 62......

🌹मुक्त कविता 🌹
🌹स्पर्धेसाठी 🌹
   नियम.....
कोणी न मजला देवा
मी असे रे एकलीच
रहा जा इकडे तिकडे
नको तुझा सहवासच..
कंटाळलो मी तुजला
तू असे आम्हाला त्रास
जा ग येथे नको राहू
जन्म देऊन झाले उदास...
जपले तुझे बालपण
न केला कधी उपहास
माझे बाळ म्हणुनी
ओढले तुला कुशीस...
रात्र रात्र जागले मी
येता तुला सर्दी ताप
खोकते मी आता बाळा
तुला होतो त्याचा ताप...
नको करू निराधार
तूच असे माझा प्राण
जपण्या तुझ्या बाळाला
राहू दे माझ्यात त्राण...
जपेन मी वंश माझा
आहे तू माझा वारस
होशी तू ही म्हातारा रे
विसरु नको नियमास....
********************
स्नेहलता कुलथे
मोबा 7588055882
क्र.37🌹

"अंधारातील वात"
इंद्रधनुचे गीत गातात माणसे
रंगात रंगुनी बेधुंद होतात नि
रंग तयाचे पुसतात माणसे... ॥

फुलपाखरांची भारी दुनिया
आवडीने म्हणतात चला पाहुया...
गोडीने जवळ जातात नि
पंख तयाचे छाटतात माणसे.... ॥

नजरेत बसतो फुलांचा नजारा
प्रियतमास हवा असतो गजरा
फुलांचे ताटवे बघता बघता
कळ्यांना का खुडतात माणसे....॥

इंदधनु फुलपाखरु वा फुलांचे
जगणे कुठे उरते स्वतःचे...
तसेच जगणे ठरते की
गर्भात वाढत्या बाळीचे....॥

अंधारात प्रकटते एक वात
वातीलाच का विझवतात माणसे... ॥

               श्री. हणमंत पडवळ
       मु.पो. उपळे(मा.)ता. जि. उस्मानाबाद.
                 8698067566
                       क्र : 48

    ...........आई............
-------------------------------------
आली मज आठवण
आई तुझी आज गं....
होतो मी लेकरु जेव्हा
आता ही तुझ्या हृद्यात गं....!!१!!

कसलेच नव्हते भय अन
कसलीच न चिंता जगताना....
तुझ्या मायेच्या निवार्यातली ती
मजा येई पदरा आडून बघताना...!!२!!

सुंदर होते ते जगणे बहरणे
तुझ्या सहवासात असताना ,..
गहीवरतात वाटा मनाच्या
शब्द तु पेरलेले स्मरताना....!!३!!

आई शब्द कवटाळावा खरा
अगदी काळजाच्या घावाशी....
पापपुण्याचे व्रण भरुन निघे
जेव्हा प्रामाणिक या देवाशी....!!४!!

रोमां रोमांत वारा संचारावा
आई हाक उभ्या जगताची....
नका दुखवू कधीच माया
नात्यांत धार आपल्याच रक्ताची.....!!५!!

कोण म्हणे तेहत्तीस कोटी देव
किती करे तयांची पुजा आरती....
कळले ज्यांना, दैव लाभले आई
जुळून आली अमृतगंध नाती.....!!६!!

भाग्य माझ्या आयुष्याचे आई
उजळूनी या देहात संस्कारली....
आई ! आई ! आई! माऊली
शब्दांत माझ्या माय उद्धारली.....!!७!!

रोहिदास होले .....७१
गोपाळवाडी ,दौंड ,पुणे..

मुक्त कविता स्पर्धेसाठी.....
           ##     देश    ##
देश असावा असा शानदार
लोकसंख्येच्या भस्मासुरास करावे सिमापार
देशात नसावी शत्रुता
शत्रुंना शिकवावी मित्रता ।।
देशात एकतेची यावी लाट
समाजकंटकांना करावे भुईसपाट
नसावी मत्सर,द्वेषाची भावना दुरवरी
मंदिर,मस्जिद,गुरुद्वारा,चर्च शेजारी शेजारी ।।
शांततेचाअसावा जणु नंदनवन
मनात असावी बुद्धांची आठवण
देशासाठी ज्यांनी केले बलिदान
त्यांना पुजावे मायबापासमान।।
नरेंद्र म्हस्के , शिरपूर ( धुळे ) @ 65

       ।।स्पर्धेसाठी।।
   
   सांगाना बाबा???

सांगाना बाबा कुठे तुम्ही गेलात?

सुखाची दारं बंद करून गेलात...

असं कोणतं ठिकाण होतं बरे

तुम्हाला सोबत नको होती?

येता जाता तुम्हाला तर

आईच सोबत हवी होती

रमलात कुठे इतके तुम्ही

कि परतूनच नाही आलात?

सांगाना बाबा कुठे तुम्ही गेलात?

सुखाचे दरवाजे बंद करून गेलात..

रडणारे डोळे आमचे सुकू लागले

येणाऱ्या वाटेत धुकं जमू लागले

आशेचा किरण का मंदावू लागला

मनातली भिती का खरी ठरू लागली?

येतो म्हणून सांगून गेलात आणी

अजून का नाही परतलात?

सांगाना बाबा कुठे तुम्ही गेलात?

सुखाचे दरवाजे बंद करून गेलात...

आईच्या डोळ्यात भावच नाहीत

अश्रूंनाही आता रडवतच नाही

खुश ठेवा तिला म्हणून सांगून गेलात

उपाय मात्र तुम्ही सोबत घेवून गेलात

सुटकेचा निश्वास सोडून गेलात

आम्हाला कोड्यात टाकून गेलात

सांगाना बाबा कुठे तुम्ही गेलात?

सुखाचे दरवाजे बंद करून गेलात...

जगावं कि मरावं कळतच नाही

सुखाची पावलं ही फिरकत नाही

आधार माझा निखळून पडलाय

ओझं मणाचं वर देवून गेलाय

अवचित जाण्यात काय होती मजा?

लेकी साठी मागे का नाही फिरलात?

सांगाना बाबा तुम्ही कुठे गेलात?

सुखाचे दरवाजे बंद करून गेलात...



सौ.मनिषा वाणी.

सुरत.५/११/२०१६.

०९४२६८१०१०९.

🎯 मुक्त कविता स्पर्धेसाठी 🎯

✍ अष्टाक्षरी ✍

🌹🌹ओढ सख्याची 🌹🌹
धुंद या कातरवेळी
मन माझे वेडावते...
ओढ घेते सख्याकडे
मिलनास आसुसते !!

सजले मी तुझ्यासाठी
उभी राहीले गवाक्षी...
नेत्री माझ्या आतुरता
चंन्द्रही देतोय साक्षी !!

येरे सखया साजणा
मी तूझी अभिसारिका...
नेत्र माझे पाणावले
विलंबता रे घटीका !!

आनंदले , सुखावले
पाहताच तव द्वारी...
हर्षाने मी मोहरले
आली सखयाची स्वारी !!

विसावता मी कवेत
थरथरली ही काया...
होता श्वासांचे मिलन
प्रफुल्लीत झाले राया !!

✍ 55 अश्लेषा मोदी
             सांगोला💐💐

स्पर्धेसाठी घ्या ----
     *पती-पत्नी बदली-एकत्रीकरण व्यथा*

     (चाल-देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबरठा नाही-दुनियादारी)

देवा तुझ्या झेड्.पी.मध्ये रिक्त पद नाही
सांग कुठं बदली घेऊ कळंनाच काही
देवा कुठं आणू तीला मला सांग ना
नोकरीवाली बायको केली माझा रे गुन्हा
देवा लेकरांची हाक ऐक एकदा तरी
नवरा-बायको आण एका शाळेवरी
आसपास पैसे खाती का दिलास वाव तू
साहेबा पेक्षा कारकुनाला का दिलास भाव  तू

का कधी कुठे जी.आर्. विरले,
कायदे हरले

स्वप्न भेटीचे आज नव्याने खुडले
अर्थ सारे पेन्शनचे कोलमडले

आसपास पैसे खाती का दिलास वाव तू
साहेबा पेक्षा कारकुनाला का दिलास भाव  तू
देवा लेकरांची हाक ऐक एकदा तरी
नवरा-बायको आण एका शाळेवरी

का रे रोज तंटा या ह्या घरट्या मधी
शिकवायला तुला गुरूजी नव्हते रे का कधी
गुरूजीचा तू जल्म घे, गाव  जो सोडला जोडू दे

का धीर सुटले, स्वप्न मिटले, लाच लागे
शासनाला प्रश्न कसे ना पडले?
हृदयांचे अंतर कसे ना कळले?

देवा लेकरांची हाक ऐक एकदा तरी
नवरा-बायको आण एका शाळेवरी
आसपास पैसे खाती का दिलास वाव तू
साहेबा पेक्षा कारकुनाला का दिलास भाव  तू

------ *विनोद गादेकर* @ 87 ,कुसळंब,(बार्शी .)
     जि. सोलापूर. मो.9404511015

_*काया*_
स्वप्न सांधल्या शरीरावर
चांदणे किरण दाटले
चंद्राच्या शितल प्रकाशी
दवबिंदू हे मुखी थाटले

विटलेल्या शरीराचा
सुटला दुर्गंध वारा
नाक,डोळे रुसवे फुगवे
मुखातून चाले धुमारा

बहुमोल या 'कायेची'
किंमत ना कळली तेव्हा
मुखमंडली दंतवंती
व्यसनात गुंतला तेव्हा

आता पळाले इंद्रिये
दुर दुर देशांतरी
मग कळाली महती त्यांची
सोडून गेल्यावरी

उठ आता सावध हो
रोख भविष्याची दोरी
गेले ते न येणे माघारी
राहिल्याशी अवरी

  गजानन पवार @81

          बलात्कारे
डोक्यात घोळतसे
लैंगीकतेचे विचार
तसेच आचरण
घडतसे.........

लैंगीक शोषण
चौथीच्या मुलींचे
गुरु स्थानी कसे
बसवते..........

चांगले जेवण
देतसे आमिष
शरीराची भूक
भागवते.......

आश्रमती शाळा
विदयेची मंदिर
लैंगिकतेचे शोषण
गाठीतसे.........

स्त्री पुरुष दोघेही
शामील सारेच
दोष दयावा कोणा
कळेणासे........

ज्ञान तेथे मान
सांगती सुजान
नागडी नग्नता
विवस्त्रते........

अशा सैतानांना
दयावी काय शिक्षा
दोरीचा तो फास
शरमतसे.........

कोणती ती जात
कोणता तो धर्म
सभ्यतेची लफ्तरे
लटकते.........

आजही स्त्री फक्त
भोग वस्तूच असे
असे कसे आचार
विचारते...........

दुसरे आई बाबाच
भरवसा खऱ्यांचा
विश्वासघातकी करी
बलात्कारे...........

किशोर झोटे@ 32
औरंगाबाद.

मुक्त कविता स्पर्धा....

बोल सुखाचे....

बोल सुखाचे बोलत गेले
बंध नवे मी जोडत गेले

आयुष्याला जपता जपता
मोह जगाचा सोडत गेले

नाव जगी या करण्यासाठी
माळ गुणाची ओवत गेले

प्रारब्धाने जे दान दिले
भोग तयाचे भोगत गेले

अस्तित्व जगी जपण्यासाठी
नियम जगाचे तोडत गेले

स्वप्न खरे हे करण्या करिता
दैव विधाने खोडत गेले

धुंद नशा या जगण्याची बघ
पाषाणाला फोडत गेले

निर्मला सोनी.
[11/5, 5:52 PM] Prachi Tai Deshmukh: अद्भूभूत रमणीय जलाशय  सुंदर
परि नच ये मानससरोवराची सर
स्वर्गभूमी ती नितांत सुंदर
राजहंस तू मानसीचा
आलास येथे बहु दूरवर
राजस राजाबिंडे रुप तव मनोहर
नित्य सानिध्य गौरीशंकर शिखर
कैलासाचा पती भोळा शिवशंकर
उभारुन पंख घे भरारी सुंदर
जवळ कर मानस सरोवर
प्राची देशपांडे

🌹भाऊ बिज.🌹स्पर्धेसाठी.

पवित्र  नात्याच बंधन
भाऊबीजेचा  गं  मान
वाट बघती  नयन
ताटी   सजली निरांजन.

  या चंद्रमोळी झोपडीत माझ्या
  आज ये ना  भाऊराया
  कौतुके मुले म्हणती मामा
  आमुची तुजवर आभाळमाया...

सजून झोपडीचे अंगण
रेखिली  रांगोळी सुंदर
तबकही सजविले ते छान
नटखट कलंदर ये लवकर. ..

   ओवाळू दे लाडक्या भाऊराया
   तव हास्याचा चंदनी सडा
   भाऊबीजेचा मांडला सोहळा
   नयनांच्या भिजल्या रे कडा...

गरीब जरी बहिण तुझी
मायेने ओथंबली पुरती
डोंगरमाथ्यावर बसे लपून
लपाछपी खेळ खेळे भोवती...

  सोहळा मांडला  भाऊबीजेचा
  याला  टिळा लावू तरी कशी
  अती लडिवाळ तू रे भोळा
  जाऊन बैसला ऊंच आकाशी...

   काय घालणार तू ओवाळणी
   रितेच  ठेवू नको हे ताट
   आईचं दुसर रूप बहिण
   पदराचा  शेव केला पाट...

आपुले हे  अतूट  नातं
राहू  दे अखंड  तेवत
मुलांचा हा लाडका चंदामामा
हृदयी प्रीत  ठेव  जागत....

     पुष्पा सदाकाळ भोसरी.
  

*_व्याभीचार_*

लांडगे सर्व एकत्र आले
इथे कुत्र्याला शोधू लागले
कुत्र्याने शुभ्र वसन पांघरले
नजरा चोरून पळू लागले
समीप येता त्यातच मिळाले
आता कुत्रे लांडगे एक झाले
*दोघे आपसपर भेद विसरले
*दोघे मिळून लचके तोडू लागले

                     बंडोपंत कुलकर्णी सोलापूर
                  

      *रंगमंच*
आयुष्याच्या रंगमंचावरचे
दोन घडीचे पाहुणे आपण
उगा का चिंता जीवाला
करतो नश्वर शरिराचे राखण

करून ठेवला अपार साठा
जमिन-जुमला,गाडी-बंगला
सोडता हे शरिर सुंदर
अस्थिकलश झाडावर टांगला.

पैसा-पैसा करूनी वेड्या
रामनाम घेतले ना मुखा
पैसा राहिला तिजोरीत
काय घेतले बरोबर,म्हणे तुका

सुंदर कायेचा मोह अनावर
भोग भोगिले नानापरी
ठेवले ना बंधन आसक्तीवर
शेवटी मणभर लाकडे तनावरी

मोह,काम सारे मायेचे खेळ
परि त्याविना न वाटे कशास अर्थ
दिला न कधी सत्कर्मासाठी वेळ
अर्थापुढे विसरलो परमार्थ

अमर नाही येथे कोणीच
नियतिच्या हातचे बाहुले
येता निरोप देवाघरचा
सोडतो क्षणात शरिर सानुले

सोडा अहंकार,सोडा मीपणा
नाही या जगी,आपुले काही
पाळुन मानवधर्म,करु थोडे सत्कर्म
नाम कार्याचे गाजवेल दिशा दाही
*🌹नीता आंधळे*🌹
       *अहमदनगर*
    *९९२१९९७०२६*
              *२२*

     *तुझी भावना*
*~~~~~~~~~~~~~~ ~~~*

किती दाटवशील तू
*भावना* मनीच्या
    होवू देत जा तू जरा....
  मोकळ्या  कळ्या शब्दांच्या

किती भावतेस तू
*हसऱ्या* मुखात
उमटु देत जा तू जरा....
वेदना  सुन्न मनी च्या

काय  ठावूक तू
*घडलीस* बोलके
कोणत्या मातीची तू जरा....
सांगशील  कधी  वेदना

कुठे लपतेस तू
*डाव* नियतीचा
हसवून जातेस तू जरा....
का चोरट्या मनां ना

कधी होईल  तुझी
*कामना* पूर्ण
कितीदा घेशील तू जरा...
शोध खऱ्या खुऱ्या  माणसाचा

*~~~~~~~~~~~~~~~~~*

*मंजुषा देशमुख @36*
*अमरावती*

🎯  *प्रेम नि लफडं* 🎯

आपलं म्हणजे प्रेम असतं
इतरांचं म्हणजे लफडं असतं
म्हणूनच या जगात जगणं
खडतर अन् मुश्किल असतं

भाव आणि भावनांचा बाजार
प्रेमाच्या व्यवहारात जीत-हार
कधी शिरजोर तर कधी लाचार
त्याग नि समर्पणाचाच सार

प्रेमाचा मोह अन् नशा
प्रत्येकाच्या भिणती अंगात
कितीही आवर घातली तरी
भावनांचे काटे,शहारे संचारतात

प्रेमाची परिभाषा ती काय
सुप्त इच्छा मनात एकच हाय
भेटावे- बोलावे नि काय- काय
तुझ्या विना करमतच नाय

जाता जात नाही ती जात
उभ्या भिंती खऱ्या प्रेमात
मानव जातीस काळीमा फासतात
लैला-मजनू रक्तांच्या थारोळ्यात

आवर घालावी हावऱ्या मना
नका करू प्रेमाचा तो गुन्हा
कल्पनेत न रमावे, यावे भाना
पण का घडतो तो पुन्हा-पुन्हा
✍🏼🖊🖍🖊🎯🖋🖊
*_श्री . आप्पासाहेब सुरवसे_*
         *_लाखणगांवकर_*
         *AK47*

परीक्षक व संकलक- अमोल अलगुडे

1 comment:

  1. Casino Player Reviews - JTG Hub
    Casino 나주 출장샵 Player Reviews and Ratings by Casino Player. 보령 출장안마 JTG's casino offers all the 포항 출장샵 essential tools for online 전라남도 출장마사지 entertainment and a wide range 천안 출장샵 of gaming options. Our

    ReplyDelete