Tuesday, 8 November 2016

चित्र चारोळी स्पर्धा

चित्र चारोळी स्पर्धा

*साहित्यिकमित्रांनो नमस्कार....*

🌻सचित्र दर्पण चारोळी🌻

*साहित्य दर्पण समुह* तर्फे आयोजीत  *सचित्र दर्पण चारोळी* स्पर्धेत  आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. या आनंदी उपक्रमात सर्वानी उत्साहाने सहभाग नोंदवून पुरेपूर आनंद घ्यावा ही अपेक्षा आहे. ..

💐स्पर्धेचा चारोळी पोस्ट करण्याचा कालावधीः..

    मंगळवार-- दि08 नोव्हेंबर 2016

सकाळी 10 :00ते  सायंकाळी 7 :00 वाजेपर्यंत असेल.

  यानंतर पडलेली चारोळी स्पर्धेत ग्राह्य धरली जाणार नाही...

💐स्पर्धेचा निकाल -  
बुधवार दि=09 नोव्हेंबर 2016 रोजी  देण्यात येईल.

स्पर्धेचे नियम :-

💐आधी स्पर्धेचे सर्व नियम निट वाचून घ्या मान्य असतील तरच या स्पर्धेत भाग घ्यावा अन्यथा भागच घेऊ नये. 
परीक्षक देतील तो निर्णय मान्य करावा लागेल.परीक्षकांच्या निर्णयाला 
आव्हान देऊ नये .प्रश्न विचारुन वाद घालू नये. 
💐 आम्ही हा उपक्रम केवळ
साहित्य सेवा अणि आनंद यासाठी
केलेला आहे, त्यामुळे सर्वानी आनंदाने सहभाग घेऊन,शोभा वाढवावी.

💐स्पर्धेत चारोळीच म्हणजे 4 च ओळींचीच कविता पोस्ट करावी.

💐दिलेल्या चित्रावर आधारीत
  रचना असावी,चित्राचे सूक्ष्म
  अवलोकन करावे.

💐दुसर्‍या आणि चौथ्या ओळीत यमक यावे. चारोळी सुटसुटीत चार ओळीत टाईप करावी.
💐एडीट चारोळी चालणार नाही.

💐चारोळी दिलेल्या विषयावरच लिहावी. विषय बदल्यास डिलीट करण्यात येईल. एक स्पर्धक केवळ एकच चारोळी पाठवू शकतो. 
अनेक रचना पोस्ट केल्यास
स्पर्धेतून बाद करण्यात येईल.

💐फोटो वर टाईप केलेली चारोळी चालणार नाही. ..

💐 इंग्रजी अक्षरात रचना टाइप नसावी.
💐 मराठी शुद्धलेखना कड़े विशेष
      लक्ष द्यावे.
💐 निकालानंतर अभिनंदनाच्या कमेंट शिवाय इतर कोणतीच वादग्रस्त कमेंट करु नये. कमेंट डिलीट केली जाईल.

💐ही स्पर्धा अधिकाधिक चांगली पारदर्शी होण्याकरीता आम्हाला आपल्या चांगल्या सहयोगाची गरज आहे. हा एक आपलाच परिवार आहे खेळीमेळीत स्पर्धा पार पडावी हीच अपेक्षा.

💐एखाद्या वेळेस काही तांत्रिक अडचणींमुळे रिझल्ट देण्यास विलंब झाला तर कृपया आम्हाला सहकार्य करावे ही विनंती. .

💐यशस्वी प्रथम 10 क्रमांक
      घोषित केले जातील

   💐 विजयी रचना आमच्या  ब्लॉग वर पोस्ट केल्या जातील.

💐चला विलंब नका करु उचला लेखणी 
   अन् लिहा भरभर. 
   सर्वानी सहभागी व्हावे ही विनंती. 
      आपले कृपाभिलाषी...

💐💐-💐💐

      *साहित्य दर्पण* 
~एडमिन कोअर कमिटी~

🌹🌹💐💐💐💐💐💐

*साहित्य दर्पण द्वारा आयोजित*

_सचित्र दर्पण चारोळी_
★★★★★★★
भाग :---सत्ताविसावा{28-वा }
दिनांक :--8 -11 -2016
वार –→मंगळवार
~~~~~~~~~~~~~
_संकल्पना_
*अनिल लांडगे , औरंगाबाद* 
~~~~~~~~~~
*संयोजक*
*श्री. आप्पासाहेब सुरवसे लाखणगांवकर* 
=================
परीक्षक
*सौ आशाताई तेलंगे*
^^^^^^^^^^^^^^^^^
~ग्राफिक्स****
सौ नीता अरसुळे जालना
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*सचित्र चारोळी स्पर्धा*

उन्हातान्हात बसुनी 
करतो मी काम
अभ्यासासाठी कोठे
मिळतो आराम .....?

- नासा @ 26

★★★★★★★★★★
*सचिञ चारोळी स्पर्धा*

शाळा बुडवूनि रस्त्यावरती
मी मांडी घातली अशी
माझ्या नशीबातली आमावास्या
आता संपणार तरी कशी?

   -आबासाहेब निर्मळे.
पेठ वडगांव ,कोल्हापूर.
9028090266
क्र -३१
स्पर्धेसाठी चारोळी
-----------------------
★★★★★★★★★★

सचित्र दर्पण चारोळी

पोटाची विझवता विझवता 
भागवतो मि ज्ञानाची भुक आहे
गरीबीची सरत नाही रात्र
हेच काय ते मोठ दुःख आहे

                अमोल अलगुडे
                      स क्र 51
★★★★★★★★★★

चारोळी - स्पर्धेसाठी

शिक्षणाची खूप असली इच्छा मनी पण
परिस्थितीमुळे काही शिकता येत नाही
करतो मदत बापा त्याच्या अडानीपणाने
स्वार्थाच्या बाजारात माल विकता येत नाही

अनिल रेड्डी लातूर @ 56

★★★★★★★★★★
स्पर्धेसाठी चारोळी

हरवले बालपण जबाबदारीची जाण 
करावया स्वप्नपुर्ती करतो कष्ट अपार
आहे जरी गरीब जपतो स्वाभिमान 
अभ्यास करताना मी करतो व्यापार

... सौ. शशिकला बनकर, भोसरी 
@35
★★★★★★★★★★

अक्षरांच्यासाठी आयुष्य 
लागले पणास
उद्याच्या भविष्यासाठी
रात्रंदिन अभ्यास

       शशिकांत हिंगोणेकर
★★★★★★★★★★

गरीबीची जाणीव आहे 
म्हणून कमावून शिकतो 
शिकल्याने मोठेपण येते
प्रत्येकजण असेच सांगतो

घनश्याम बोह्राडे 19
*स्पर्धेसाठी चारोळी*
★★★★★★★★★★
स्पर्धेसाठी.

           चारोळी.

गरीबीचे  हे  वरदान  लाभले

जबाबदारीची  जाण सत्य उमगले

फूटपाथवरच्या दिव्यांमधे करून अभ्यास

उज्वल भविष्याचे स्वप्न  पाहिले.

    पुष्पा सदाकाळ 
        @ 50.9011659747.

★★★★★★★★★★
🌹चित्र चारोळी 🌹
    स्पर्धेसाठी 
व्यवहारे शिकावे परी
न सोडे हट्ट शिक्षणाचा
भुकेले न जगी कमी
प्रश्न सोडवी जीवनाचा
******************
स्नेहलता कुलथे 
मोबा 7588055882
क्र.37🌹
★★★★★★★★★★
🎯 *सचित्र चारोळी स्पर्धा*

चित्त आहे माझे अभ्यासात
गाठणार आहे नवी ऊंची
अंधश्रद्धेच्या या गोल बाजारात
विकतोय बिब्बा, लिंबू, मिरची

✍🏿🖊🖍🖋🎯🖋🖊
*_श्री . आप्पासाहेब सुरवसे_*
_AMKSLWOMIAW_
          *AK47*
★★★★★★★★★★

"वजनकाट्यावर तोलतो मी
अभ्यासाचा भार सारा
लिंबू-मिरचीच्या साथीनं
बालमजुरीचा देतोय नारा"
........जयश्री पाटील🖌

★★★★★★★★★★
🌠सचित्र चारोळी स्पर्धा🌠

कोण देतो आधार कुणासाठी
वजनकाटा धरीला मी हाती पोटासाठी..
संघर्षातूनि घेतो शिक्षण समृद्धिसाठी
हा लढा आहे आयुष्यातील तिमीर दूर सारण्यासाठी..
     -श्री सगर पंढरी@83@
(स्पर्धेसाठी)

★★★★★★★★★★

*स्पर्धेसाठी*
*~~~~~~~~~~~~~~~~~*

*दृष्ट लागली बाल पणाला म्हणून..*

*विकतोय  उताऱ्याला लिंबू मिरची*

*शिक्षणाचा भार पेलण्या साठी*

*वजनकाटया वर वेळ होतोय खर्ची*

*~~~~~~~~~~~~~~~~~*

*मंजुषा देशमुख@३६*
    *अमरावती*
*९४२२८८४१४०*
★★★★★★★★★★

स्पर्धेसाठी सचित्र चारोळी

बालमजुरी कलंक आहे देशाला
पोट भरण्या काम करतो मग शाळा
शेतकरी मागतो भाव पीकाला
फाटक्या प्रपंच्या मदत मागतो बाळा

          खेडकर सुभद्रा बीड @20
        मो नं 9403593764
★★★★★★★★★★

अंधश्रद्धा तर आहेच म्हणून 
लिंबू,मिरची विकतो आहे
वजन घेऊनी,स्व कष्टावर 
जिद्दीने शाळा शिकतो आहे!
✍ पी.नंदकिशोर 
आकोट @ 43
(चित्रचारोळी स्पर्धेसाठी)
★★★★★★★★★★

सचित्र चारोळी स्पर्धेसाठी...
नको निरक्षरतेचा किनारा
पोहतो शिक्षणाच्या प्रवाहात ।
करुनी मात संकटांवर
लावेल हातभार देशविकासात ।।
नरेंद्र म्हस्के, शिरपूर ( धुळे ) @ 65))
★★★★★★★★★★

सचित्र चारोळी

स्पर्धेसाठी

वजनकाटा , लिंबू मिरची
देतोय आर्थिक आधार...
निवडता शिक्षणाचा पर्याय
जिवनात नाही माघार !!!

55 अश्लेषा मोदी
         सांगोला .
★★★★★★★★★★

स्पर्धा करिता: :
आयुष्याची लढाई
काट्यावर तोलून चालते...
अंधश्रद्धेची लिंबू मिरची
बालपणा पासूनच झणाणते...॥
           श्री. हणमंत पडवळ.
                   क्रः 48.
★★★★★★★★★★

स्पर्धेसाठी चारोळी...

*शाळा सोडून निंबू-मिरची विकतांना*
        *बालक विकतो आहे स्वतःचे आयुष्य...*
*सांगा 'स्ट्रिट-लॅम्प' खाली अभ्यास करून*
        *कसं उजाडेल आपल्या देशाचे भविष्य...*

........ निलेश कवडे @44
★★★★★★★★★★

सचित्र चारोळी स्पर्धेसाठी
**********************
गरीबीने हिरावले आमुचे बालपण
लिंबू मिर्ची, विकुन आईला हातभार
वजनकाटा सांभाळून, अभ्यास करतो
कारण शिक्षण हेच जीवनाचे खरे सार
****************************
मीना सानप  बीड @  7
9423715865
★★★★★★★★★★

सचित्र चारोळी स्पर्धेसाठी ::
गरिबीचा शाप असे मोठा 
श्रमतो अपार इथे छोटा 
खळगी भरण्यास पोटाची 
लिंबू मिर्ची वा वजनकाटा 
:बाबू फिलीप डिसोजा 
निगडी, पुणे 
मो. 9890567468 
@39

★★★★★★★★★★
सचित्र चारोळी स्पर्धेसाठी...

गरीबीची ही कसोटी ,

मेहनतीने पेळतो...|

भविष्याचे स्वप्न सारे,

शिक्षणीने सजवितो..||

---संतोष शेळके ✍ @२४

★★★★★★★★★★
सचिञ दर्पण स्पर्धेसाठी ...

खेळण्या बागडण्याचे वय हे
असावे सोबत धडे शिक्षणाचे....
बालवयातच भोग नशीबी ते
आव्हान हे भुक शमविण्याचे....

रोहिदास होले ...७१
गोपाळवाडी ,दौंड ,पुणे...
८/११/२०१६
★★★★★★★★★★

*सचित्र चारोळी स्पर्धेस*

पोटाची भूक भागविण्या
कामधंदा आम्ही करतो
ज्ञानाची भूक भागविण्या
अभ्यास आम्ही करतो.

*------ *सु*वर्ण *वि* लास *4*
★★★★★★★★★★

*सचित्र चारोळी स्पर्धा*

घरच्यांनी अंगठा मारला माथी,
घेऊनी बसलो दप्तर रस्त्यावर,
तुम्हासारखे आज जर असतो शाळेत,
तर अंधश्रद्धा नसतो विकलो रस्त्यावर.

स्पर्धेसाठी👆🏽

1.क्रांति बुद्धेवार

★★★★★★★★★★
सचित्र चारोळी स्पर्धा

🎯स्पर्धेसाठी🎯
पहा विज्ञानाची प्रगती
मोजते क्षणात वजन उंची
विज्ञानानाच करतोय अभ्यास
पोटासाठी विकुन लिंबु मिरची!

संगीता भांडवले
वाशी, उस्मानाबाद
@१६
★★★★★★★★★★

सचिञ चारोळी स्पर्धेसाठी 
भाग २८

लिंबू - मिर्चि, वजन - काटा
पोटासाठी निवडलेले साधन 
नयनी स्वप्ने, हृदयी आशा....
रस्त्यावर अभ्यासाचे गोंदण ।।

✍🏻✍©:-कवी अनिकेत जयंतराव देशमुख. (अनु)
            रा- गोपालखेड , ता. जि. अकोला.
                    mo-9689634332 
@59
★★★★★★★★★★

स्पर्धेसाठी
धडे गिरवतोय रस्त्यावर
लागली शिक्षणाची आस
विकतो लिंबू-मिरची,वजन काटा
पोटाला मिळवण्या दोन घास
.......नीता आंधळे..२२
★★★★★★★★★★

वजनकाटा,अथवा लिंबू मिर्ची बिब्बा
विकून करतो जगण्यासाठी दिव्य 
फूटपाथच्या लाइटवर अभ्यास करतो
शिक्षणानेच घडेल उज्ज्वल भवितव्य

       शैलजा ओव्हाळ/चिलवंत 
                  @ 73
             स्पर्धेसाठी
★★★★★★★★★★

सचित्र चारोळी स्पर्धेसाठी

का माझी केवीलता 
चित्रातून तुम्हास दिसावी
केविलवाने बोल न बोलता
अभ्यासाची मम जिद्द निरखावी
   भोसले ऊर्मिला वाशी/भूम....२३
★★★★★★★★★★

*****स्पर्धेसाठी******* 
पथ- दिप यांचा संबध आहे जुना,

त्या खाली 'भारतरत्न राज्यघटना' बनली।

विज्ञानात कशी ही देवाअंधश्रद्धा रुजली,

लिंबू नारळागत बालपणीच बाल
मजूरी पूजली।।
----सय्यद जावेद 85---
★★★★★★★★★★

🎓सचित्र दर्पन चारोळी🎓
स्पर्धसाठी

हाती घड्याळ डोळयाला चष्मा
गोणीत दप्तर शेजारी वजनकाटा
गणू बसला विकायला
जादू टोण्याचा साठा.

मीरा खेडकर @(6)बीड
★★★★★★★★★★

साहित्य दर्पण आयोजित...
सचित्र दर्पण चारोळी स्पर्धा...

लोकांच्या मनी अंधश्रद्धा,
करीता लिंबु मिर्ची विकतो।।
परी नव्हेत ही बालमजूरी,
स्वकमाई करुनीया शिकतो।।

✒अनिल लांडगे उंडणगाव@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

👆👆स्पर्धेसाठी...👆👆★★★★★★★★★★

स्पर्धेसाठी..

शिक्षण घेण्याच्या ध्येयाने पछाडले
अक्षरांच्या मोत्यांनी दारिद्रय माझे हेरले
ज्या रस्त्यावर घडतेय भविष्य माझे
त्या रस्त्यावर बालपण माझे खेळले

निर्मला सोनी
★★★★★★★★★★

नजर लागेल म्हणून,
लिम्बु मिरची गाठला जातो,
नजरेपेक्षा जास्त तू,
अंधश्रद्धेने लुटला जातो.

*स्पर्धेसाठी*

__सौ.स्वतेजा बुद्धेवार

(ग्रुप बाहेरील चारोळी)
जमल्यास संकलननात घ्यावी.
★★★★★★★★★★

🙏�स्पर्धेसाठी🙏�

कळते मज विकुन लिम्बू ,मिरची व बिब्बा अंधश्रधेला मी खतपाणी घालतो।
पण गरीबीचे स्वीकारुन आव्हान बदलण्या हा भरकटलेला समाज स्वकमाइनीच  शिकतो।

मीनाक्षी माळकर
68
★★★★★★★★★★

🎯सचित्र चारोळी स्पर्धा🎯

भुकेच्या दाहापोटी
विकतो मी लिंबू मिरची
शिक्षणा पाईच घेईन कष्ट
करेन कसरत तारेवरची

✍जोगदंड जयश्री
     62.....

★★★★★★★★★★

सचित्र दर्पण चारोळी स्पर्धा

लिंबू मिर्ची दृष्ट न लागो तुम्हा
आजच रुजवतोय व्यापारी बाणा
वजन तुमचे समाजातलेही पाहा
शिक्षण घेईन मी तुम्ही बदल आणा

किशोर झोटे@32
औरंगाबाद.
☝ स्पर्धासाठी☝
★★★★★★★★★★
सचित्र चारोळी स्पर्धेसाठी 
***************

अंधश्रद्धेला घाली खतपाणी 
शिक्षित असो वा असो अडाणी 
वाचवणार जणू मिरची लिंबू 
जनता कधी बनेल शहाणी

योगिनी चॅटर्जी #52 
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

★★★★★★★★★★
सचिञ चारोळी स्पर्धा

बालपण गेले रूसून खेद जीवनाचा
राञदिवसा मजूरीच खेळ नियतीचा
दूर करण्या अंधकार मार्ग शिक्षणाचा
प्रयत्न करू साधणार मेरू प्रगतीचा

निता आरसुळे @४५
★★★★★★★★★★



सचित्र चारोळी स्पर्धेत सहभागी स्पर्धक :

१) ना. सा. येवतीकर
२) कल्पना जगदाळे
३) आबासाहेब निर्मळे
४) अमोल अलगुडे
५) अनिल रेड्डी
६) शशिकला बनकर
७) शिक्षणाधिकारी हिंगोणेकर सर
८) घनश्यीम बोह्राडे
९) पुष्पा सदाकाळ
१०) स्नेहलता कुलथे
११) आप्पासाहेब सुरावसे
१२) जयश्री पाटील
१३) सगर पंढरी
१४) मंजुषा देशमुख
१५) सुभद्रा खेडकर
१६) पी. नंदकिशोर
१७) नरेंद्र म्हस्के
१८) आश्लेषा मोदी
१९) हणमंत पडवळ
२०) निलेश कवडे
२१) मीना सानप
२२) बाबू फिलीप
२३) संतोष शेळके
२४) रोहिदास होले
२५) सुवर्ण विलास
२६) क्रांति बुध्देवार
२७) संगीता भांडवले
२८) कवी अनिकेत
२९) नीता आंधळे
३०) शैलजा ओव्हळ
३१) उर्मिला भोसले
३२) सय्यद जावेद
३३) मीरा खेडकर
३४) अनिल लांडगे
३५) निर्मला सोनी
३६) स्वतेजा बुध्देवार
३७) मीनाक्षी माळकर
३८) जयश्री जोगदंड
३९) किशोर झोटे
४०) योगिनी चॅटर्जी 
४१ ) निता अरसुले 

★★★★★★★★★★



2 comments: