Thursday, 3 November 2016

नाद चारोळी स्पर्धा दिनांक 03 नोव्हेंबर 2016

*_आठवणींचा खेळ_*
🎯🎯🎯🎯🎯🎯🖋

📚 साहित्य  दर्पण Whatsapp ग्रुप  📰🖊
     द्वारा आयोजित
🗽 ~नाद चारोळी स्पर्धा~ 🗽
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

🚩भाग :- *29वा-एकोणतिसावा*🚩
^^^^^^^^^^^^^^^^^
📆 दिनांक - _3 नोव्हेंबर 2016_
🛢 वार - गुरूवार
~~~~~~~~~~~~~~~~
🕰 वेळ - सकाळी 09:00Am ते सायंकाळी 7:00Pm
==================
📝  *विषय* :-: ↓↓↓↓

*_आठवाणींचा खेळ_*
       किंवा
_आठवांचा लपंडाव_
                     ==================
💥 संकल्पना :→कल्पना जगदाळे ,बीड
*********************
💥 संयोजक--:-
आप्पासाहेब सुरवसे बीड -उस्मानाबाद
*********************
*सौ उर्मिला ताई बांदिवडेकर*
""''''''''''""""'''''''''''''''''''''''''
संकलक -→संतोष शेळके मुंबई
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
💥 ग्राफिक्स -अनिल लांडगे सर औरंगाबाद
''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
🔦 स्पर्धेचे नियम -
💥 *ग्रुप मधील व्यक्तींनी पुन्हा  व्ययक्तिक एडमिन यांना चारोळी पाठवू नये.*

💥ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे....
💥 जास्तीत जास्त फक्त पाच चारोळी पोस्ट करण्याची मुभा आहे .

💥 पाच पैकी  फक्त एकाच चारोळी खाली "स्पर्धेसाठी" असा उल्लेख करणे आवश्यक आहे.

💥 चारोळीखाली आपले पूर्ण  नाव, गाव आणि मोबाईल नंबर अवश्य लिहावे.

💥 चारोळी मध्ये विषयातील शब्द असावेत.

💥चारोळीत दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत यमक असावे.

💥 या  स्पर्धेचा निकाल ग्राफिक्स सह खालील blog वर  आणि साहित्य दर्पण वर पाहण्यास दिनांक *_4 नोव्हेंबर 2016_* रोजी रात्री ठीक _9:00Pm_ वाजता मिळेल.  त्यासाठी वारंवार चौकशी करु नये.
http://nasayeotikar.blogspot.com/2016/06/sahity-darbar-bhag-5-24052016-2-24-2016.html
💥साहित्य दर्पण ग्रूपच्या बाहेरील कवी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात...

📩 त्यासाठी .

🎾 खालील पैकी कोणत्याही एका मोबाईल नंबरवर किंवा फ़ेसबुक वर आपली चारोळी पोस्ट करावी

👤 *नासा येवतीकर, धर्माबाद*
📱 09423625769

👤 *मारुती खुडे सर ,माहुर*

📲📱9823922702

श्री. आप्पासाहेब सुरवसे
📱📲 9403725973

★★★★★★★★★★★★★★★★★★

नाद चारोळी

आठवणींचा तुझ्या सुरू असतो नित्य नवा लंपडाव
आसूहासूच्या खेळात
तोची बनतो पुन्हा साव

कल्पना जगदाळे@8★बीड

❎स्पर्धेस नाही❎

*नाद चारोळी*
तुझा माझा मेळ
जसा आठवणीं चा खेळ
तुझी माझी प्रिती जशी
चटपटित खमंग भेळ

मंजुषा देशमुख@36

तुझ्य आठवणींचा वेल
चढतोच आहे मनावर
आठवणींची फुले तोडा कितीही
फुले फुलतात लाख मुखावर
.......नीता आंधळे..२२
स्पर्धेसाठी नाही

आठवणींच्या खेळात
रंगून होतात चिंब चिंब...
दर्पणात डोकावतात खरे
पण दिसते तिचेच प्रतिबिंब...॥
        श्री. हणमंत पडवळ. 48.
स्पर्धा करिता

तो चेहरा मग त्यातील निरागसता
डोळ्यातील सौंदर्य मज आठवले ।
मजपासून दूर जाताना गहिवरली
डोळ्यातील दवबिंदू मज आठवले ।

            बंडोपंत कुलकर्णी सोलापूर

आठवणींच्या खेळात सारे
रंगून होतात चिंब चिंब...
दर्पणात डोकावतात खरे
पण दिसते तिचेच प्रतिबिंब...॥
        श्री. हणमंत पडवळ. 48.
स्पर्धा करिता

*नाद चारोळी* *स्पर्धेसाठी*

*शेतकऱ्याच्या जीवनाच्या खेळात*
*सुख- दुःखाचा लपंडाव असतो*
*सुख कधी कधी थोडे जानवते*
*दुःखाचा मात्र सदैव घाव असतो*

*अनिल रेड्डी (लातूर )*@ 56

।।स्पर्धेसाठी।।

आठवांचा खेळ मी खेळते आजकाल
उगाच मनाशी मी झुंजते आजकाल
काही स्मृतींनी मन येते गहीवरून
काही स्मृतीत मी हरवते वर्तमान काळ।

सौ.मनिषा वाणी.
सुरत.०३.११.२०१६.
०९४२६८१०१०९.
@२

स्पर्धेसाठी चारोळी -

आठवणींचा खेळ चाले रात्रंदिन
चोरपावलाने येतात या कुठून ?
हळव्या मनावर प्रहार आठवांचे
छळतात मनाला एकटे गाठून
~~~~~~~~~~~
.... सौ. शशिकला बनकर ,भोसरी
@35

स्पर्धेसाठी
तुझ्या आठवणींचा लपंडाव
जेव्हा सुरू होतो मनामध्ये
आसवांचा पूर येतो माते
मम लोचनामध्ये
     ऊर्मिला भोसले.,,,,,@
      २३..वाशी/भूम

स्पर्धेसाठी...
मी लागलो चालायला
नको खेळ आठवणींचा खेळु ।
अंधार मिटविण्या प्रयत्न सारा
नको दिवा वादळात लावु ।।
नरेंद्र म्हस्के ,शिरपूर ( धुळे ) @ 65

🎯चारोळी स्पर्धा🎯
  
तूझ्या आठवणींचा जेव्हा
बसते मांडून पसारा
स्पर्श हवेचाही असाह्य होतो
भयभीत करतो विरहाचा कापरा वारा

✍जोगदंड जयश्री
    @jj62.......

स्पर्धेसाठी.

नाद चारोळी.

  तुझ्या आठवणींनींचा  खेळ
  चाले  निवांत रात्रीची वेळ
  मी मांडलाय माझ्या संसाराचा डाव
त्यात बसत नाही कुठेच तुझा मेळ ..

        पुष्पा सदाकाळ भोसरी
      @ 50. 9011659747.


करिता

सांजसमयी कातरवेळी
लपंडाव आठवांचा
क्षणचिञे सुखदुःखाची
घेतला ठाव मनाचा

निता आरसुळे @४५

स्पर्धसाठी

मिटताच नयने निवांत क्षणाला
सुरु होतो मनी आठवांचा खेळ...
रंगुन जाते मन त्या क्षणांमध्ये
नकळत झरती नयन आठवता ती वेळ ...

✍55 अश्लेषा मोदी
    सांगोला💐💐

_नवरीलेक जाता सासरी नांदाया_
_सख्या-मैत्रिणींच्या आठवणींचा बांध फुटतो_
_भाऊ-बहिण,आई हंबरडा फोडतो_
_कोपऱ्यात बाप मोरावानी अश्रु ढाळतो_

*_श्री . आप्पासाहेब सुरवसे_*
_AMKSLWOMIAW_
        *AK47*

❎ ~*_स्पर्धेसाठी नाही_*~ ❎

तुझ्या आठवांचा खेळ भाबडा
ह्दयाला माझ्या शुध्द हवा देतो
दुरावा तुझा वेड लावी मनाला
नयनी माझ्या आसवांचा पूर येतो

मीना  सानप   बीड  @  7
9423716865
स्पर्धेसाठी

आठवाच्या लपनडावात
हरपून जातो कधी कसा
एका मागे एक येतात त्या
जणू चालवतात वारसा...॥Hp

*स्पर्धेसाठी*
तुझ्या आठवणींचे रेशीम बंध
मन माझे जखडून ठेवतात
तुझ्यासोबत जगलेले सुवर्णक्षण
माझ्याभोवती पिंगा घालतात
.......नीता आंधळे..२२

आठवांच्या लपंडावात
दुर तु लपुन बसलास असा
ऋतू मागुनी गेले ऋतू  परी
अजुन मला सापडेना कसा ?
***************************मीना सानप  बीड @  7
9433715865
स्पर्धेसाठी नाही

आठवणींचा खेळ म्हणजे
थेट ह्दयाशी भिडते भावना
सीमेवर तु लढत असताना
यशश्री व्हावेस हीच एक कामना
****************************
मीना सानप  बीड  @  7
9424725865
स्पर्धेसाठी नाही

आठवांच्या लपंडावात
रात्रभर नाही मी निजली
आई कुरवाळते हा भास
उशी आसवांनी चिंब भिजली
***************************
मीना सानप  बीड @  7
स्पर्धेसाठी नाही

दोन ध्रुवावर आपण दोघे
आठवणींच्या खेळात या
तुझ्या मिलना आतुर सख्या
कधी भेटशील जीवनी या !!
****************************
मीना सानप बीड @  7
9423715865
स्पर्धेसाठी नाही


आठवांचा लपंडाव भारी
चिता मयत प्रेत जाळी
तुझ्या विरहात बुडाले म्हणोनी
चिंता जीवंत मन जाळी

_*श्री आप्पासाहेब सुरवसे_*
_AMKSWOMIAW_
       *AK47*
❎ ~*_स्पर्धेसाठी नाही_*~❎

नाद चारोळी स्पर्धेसाठी

आठवांचा खेळ चाले राञं दिन
तुझ्या सहवासातला एक प्रवास
आज ही भेगाळताना सोडतात
आसवांच्या सरी लोचनी निवास

रोहिदास होले ....७१
गोपाळवाडी ,दौंड ,पुणे..



तुझ्या रे आठवणींचा,
चाले असा लपंडाव।।
किती सोसावे रोजच,
ते काळजावरी घाव।।


✒अनिल लांडगे उंडणगाव@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

👆👆स्पर्धेसाठी...👆👆

नाद चारोळी स्पर्धेसाठी...
"अष्टाक्षरी "

हा खेळ आठवणींचा
या ह्रदयास भावलेला...|
अश्रूंच्या चिंब सरींत
नयनात दाटलेला...||

____संतोष शेळके ✍🏻 24

स्पर्धेसाठी
आठवणींच्या खेळात
मन गेले हरवूनी
रेशीमगाठीचे बंध
गेले वीण उसवूनी
प्राची देशपांडे
समूह क्र.१५

किती ही केला प्रयत्न
तुला विसरून जाण्याचा
दाटून येती आठवणी
त्या प्रेमळ क्षणाचा

-- नागोराव सा. येवतीकर
   मु. येवती ता. धर्माबाद
   @ 26

घरा समोरुन येता जाता
छबी तुझी आठवते
घरात नसून ही तू
असल्यासारखे भासते

-- नागोराव सा. येवतीकर
   मु. येवती ता. धर्माबाद
   @ 26

_कळतय मला तू आठवण_ _माझी ह्रदयी आहेस कोरलेली_
_मला पाहताच तू तुझी_
_नजर आहेस चोरलेली_

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

    _*❎स्पर्धेस नाही❎*_

*_कल्पना जगदाळे@8 बीड

दाटल्या मनी किती वेचल्या मी आठवणी,

आपल्या सहवासाच्या त्या नाजुक क्षणी।

चंद्र झाला ग शीतल कौमुद्या हासल्या गालात,

आज गेला तो झोपी त्या काग नाही दिसल्या विरहाच्या क्षणी ???।।

*सय्यद जावेद *@ 85

नाद चारोळी स्पर्धेसाठी ::
आठवणींचा खेळ सारा
सुखदुःख जीवास भारा
खरा जीवनाचा पसारा
आत्ममग्ना निवांत थारा
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे
मो. 9890567468
@39

आठवणींचा खेळ गड्यांनो
पहा रोजच तो कसा चाले
सुखावर येई डाव कधीतर
दुःख तो डबा एैस पैस करे

किशोर झोटे,@32
औरंगाबाद.
☝ स्पर्धा साठी☝

आठवणीच्या या गुजगोष्टी,
छळतात मला सारे,
प्रितीच्या तय गुजगोष्टी,
कानी सांगून जातात वारे.

       _1.क्रांती बुद्धेवार

*स्पर्धेसाठी*👆🏽

लग्नाआधी आझाद पंछी
लग्नानंतर बंदिस्त होते

आठवून दोन्ही काळ
मन शून्यात जाते...

-- नागोराव सा. येवतीकर
   मु. येवती ता. धर्माबाद
   @ 26

*स्पर्धेसाठी नाही*

*स्पर्धेसाठी* ..........

*आठवांचा मला तु नजराणा असा दिला*

*नाही तुटत नयनां चे तरल तरंग*

*जन्मोजन्मी चे असावे नाते तुझे नी माझे*

*तुझ्याविना जगण्याची स्वप्न  सर्व बेरंग*

*~~~~~~~~~~~~~~~~~*

✍ � *मंजुषा देशमुख* *@36*
       *अमरावती*

■..स्पर्धेसाठी नाही..■

1)
तुझी आठवण येता
मन झाले उदास..
प्रेमाचे क्षण दूर झाले
तुझ्या मिलनाची आहे आस..

२)
आठवणीचा खेळ आहे
जीवन सारा..
तुझ्याशिवाय आयुष्यात
नाही माझ्या थारा..

३)दर्पण आले आयुष्यात
जीवनाला आले मोल..
आठवणीने मन झाले प्रफुल्लित
दर्पणने सांभाळला जीवनाचा तोल..
४)
आठवता ते शाळेचे दिन
नयनात तरळतात अश्रू..
ती निखळ बालपनीची मैत्री
सांगा मी कशी विसरु..

     -श्री सगर पंढरी @83@
         धर्माबाद

स्पर्धेसाठी...

गेले ते सुखाचे दिन
राहिल्या त्या फक्त आठवणी..
मिलनाची आस आहे मनी
पाहुया मिलन होईल कोणत्या क्षणी..
-श्री सगर पी एच @83@
       धर्माबाद

_तुझ्या आठवणींच्या खेळास_
_मांडण्यास हवा असतो मोका_
_तुझे नुसते नाव जरी घेतले तरी_
_चूकतो माझ्या ह्रदयाचा ठोका_

   *❎स्पर्धेस नाही❎*

*कल्पना जगदाळे@8★बीड*

नाद चारोळी स्पर्धेसाठी चारोळी

हृदयात झरा वेदनेचा..
श्वासांचा निशब्द ताळमेळ ।
तुझ्या-माझ्यात उरलाय फक्त
अबोल आठवणिंचा खेळ ।।

   
✍🏻✍©:-कवी अनिकेत जयंतराव देशमुख. (अनु)
            रा- गोपालखेड , ता. जि. अकोला.
                    mo-9689634332
@59

स्पर्धेसाठी...

तुझ्या आठवणीत हसते प्रीत माझी
तुझ्या आठवणीत रडते प्रीत   माझी
ही सारी जादू तुझ्या निरागस  रुपाची
तुला बघूनच सदा जगते प्रीत माझी

निर्मला सोनी. 28

*स्पर्धेकरिता*
माझ्या व तुझ्या
आठवणीचा खेळ,
चारोळीत बसविणे
अशक्य हा मेळ.
*संजयकुमार माचेवार@वसमत*

तुझ्या आठवांचा लपंडाव
घालतो काळजावर घाव
निरोप घेते जगाचा
घेशील ना वृद्धाश्रमात धाव
       
                शैलजा ओव्हाळ/चिलवंत
                               @ 73
                        स्पर्धेसाठी

*स्पर्धेसाठी*

*श्रावणाचा ऊन पाऊस भासे*
*जणू  तुझ्या आठवांचा लपंडाव*
*वरूणा, शेतकर्‍याच्या सुखदुःखाचा*
*नको मांडू असा उघड्यावर डाव*

*स्नेहल आयरे*—७७ 
मुंबई

*स्पर्धेसाठी*

'त्या' स्मृतींची आसवे
पुसण्यात जातो वेळ सारा
ती प्रेमपत्रांची लक्तरे
चालविती आठवांचा खेळ सारा

- आत्तम गेंदे
AG@86

नित्याचाच झाला आहे
हा आठवणींचा खेळ
सरत आली रात्र तरीही
बसत नाही निद्रेचा मेळ

    शैलजा @ 73

नाद चारोळी स्पर्धेसाठी....

*सांजसमयी सागर किनारी*
*दार ठोठावते कातरवेळ.....*
*अलगद डोळे ओले करतो*
*सये तुझ्या आठवणींचा खेळ....*

_________ निलेश कवडे  @44

*स्पर्धेसाठी

"आठवांच्या पाखरांना बजावले
पंख इथे तुमचे नका पसरू,
सखा जरी दूर,परी श्वासात भिनलेला
सांगा या श्वासाला कशी विसरु?"
*संगीता देशमुख@१४*

आठवणी खेळात
भान जाते हरपून
जीवघेणा खेळात
प्राण जातो टांगणीला
लटकून

कविता शिंदे ...६. 

_नाद चारोळी_

आठवणींचा खेळ हा
कस्तुरी सुगंधा परी..!
भेटीच्या ओढीने जीव,
कावराबावरा होय भारी..!!
         गजानन पवार

🙏�स्पर्धेसाठी🙏�

सख्या रात्रंदिनी मी तुझ्या
आठवणीत असते दंग।
कारण तुझ्यापेक्षा तुझ्या
आठवणीच जीवनात भरतात रंग।

मिनाक्षी माळकर
68

हळ्व्या क्षणांच्या आठवणीने
अजूनही मन माझे गहीवरते
शब्द वाचताना ते मंतरलेले
वाचतांना अश्रूंनी वही भरते!
✍ पी.नंदकिशोर
आकोट जि.आकोला
@43 (नाद चारोळी स्पर्धेसाठी )

_*तुझा देह दोन वेळा कपड्यात लपेटून सजीव निर्जीव मजपुढे आला*_
_*जन्ममरणातील या आठवणींच्या खेळात*_
_*मात्र आईचा जीव होरपळून निघाला*_

•••••••••••••••••••••••••••••••
     *👆🏿स्पर्धेसाठी👆🏿*
•••••••••••••••••••••••••••••••
*कल्पना जगदाळे@8★बीड*

नादचारोळी स्पर्धेसाठी

माझं शहर आवडतं किती गुण गाऊ
कुरकुरीत समोसा ती आवडती भेळ
दुर गावी राहते जाण्या मिळेना वेळ
मनी चालु झालाय आठवणींचा खेळ

योगिनी चॅटर्जी #५२

🌗स्पर्धेेसाठी🌓

आठवणीचा खेळाला

वयाच नाहि बंधन

सुख दुखाच भंड़ार

जीवन एक साधन

49 नलिनी वागीकर(सायलि)

धन्यवाद...💐💐💐

No comments:

Post a Comment