Sunday, 30 October 2016

आप्पासाहेब काशीनाथ सुरवसे

आप्पासाहेब काशीनाथ सुरवसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्याचा माझा संबंध ह्या whatsapp ग्रुप ने खुप घट्ट केले आहे. पण त्यापूर्वी आमची मैत्री ही पत्र व्यवहार मधून निर्माण झाली. दैनिक लोकमत मधील माझ्या प्रकाशित झालेल्या एका लेखावर आप्पानी मला पत्र लिहिले आणि आमचा मैत्री पर्व सुरु झाला. योगायोगाने आप्पा धर्माबादला प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले आणि आमची मैत्री अधिक दाट झाली. इथपर्यंत आप्पा कधी ही लेखनी चालू केली नाही. पण जिल्हा बदली होऊन ते आपल्या गावाकडे गेले आणि आपल्या लेखनी ला बाहेर काढले. त्यांच्यात लेखन करण्याची क्षमता आहे आणि प्रचंड ऊर्जा सुध्दा. म्हणून तर ते साहित्य विश्वात माझ्या सोबत सदैव जोडून राहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोंत्तर रौप्य महोत्सव जयंती च्या दिवशी अपघाताने *साहित्य दर्पण* नावाचा ग्रुप तयार झाला. फक्त मित्राला म्हणजे मला आधार देण्यासाठी त्यांनी ग्रुप तयार केला. सुरुवातीचे काही दिवस मी अगदी तटस्थ होतो. कुठे ही मन लागत नव्हते. पण अशा संकट काळात फक्त आप्पाने मला आधार दिला म्हणून आज मी या स्थानी स्थिर आहे. खरोखरच आप्पा मित्रासाठी जीव लावतो याची प्रचिती त्या दिवशी आली. रोखठोक वागण्यामुळे काही जनाचे मन दुखतील मात्र ते ग्रुप साठी आवश्यक असते हे नेहमी सांगत. सार्वजनिक निर्णय घेताना कुणाचे मन कधी कधी दुखावल्या जाते, त्यांची सुध्दा काळजी घेत आप्पानी गेले सहा महिने अविरत कार्य करीत आहेत. काही साहित्यिक मंडळी या ग्रुपच्या बाहेर पडली पण ग्रुप ला अजिबात काही होऊ दिले नाही ही आप्पाची खासियत खरोखरच नोंद घेण्यासारखी आहे. आपला पूर्ण वेळ ते साहित्य दर्पण ला दिले म्हणून आज साहित्य दर्पण संपूर्ण राज्यात पसरला आहे. येथील साहित्यिकांचे लेख दैनिक, साप्ताहिक आणि मासिकातुन झळकत आहेत. प्रत्येक साप्ताहिक कार्यक्रमाचे सुरेख नियोजन आणि त्याची अंमलबजावणी केल्यामुळे आज सर्वाना एक चांगली सवय लागली. कडक मुख्यध्यापक असल्या शिवाय शाळेत सुधारणा होत नाही तसे ग्रुपचा एडमिन कडक असल्याशिवाय ग्रुपवरील नियमाचे पालन होत नाही. आप्पाच्या कडक शिस्ती मुळे आज साहित्य दर्पण whatsapp च्या जगात एक वेगळी जागा निर्माण केली आहे

आज आप्पासाहेब सुरवसे यांचा प्रकट दिन अर्थात जन्म दिवस आहे त्यानिमित्त त्यांना 

साहित्य दर्पण परिवाराकडून 

*वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*शब्दांकन :- नासा येवतीकर*

1 comment:

  1. ॥भवतु सब्ब मंगलम॥
    आप्पासाहेब सुरवसे सर,
    वाढदिवसाच्या मंगलमय कामना
    किशोर & मीना झोटे,
    औरंगाबाद.

    ReplyDelete