Tuesday, 4 October 2016

चित्रशलाका दिनांक 04 ऑक्टोबर 2016

 *साहित्य दर्पण* 
~*आयोजित चित्रशलाका स्पर्धा*~
*.........भाग - तेविसावा.........*
*संकल्पना : मारूती खुडे सर*
*संयोजक : आप्पासाहेब सुरावसे*
*परिक्षक : क्रांती बुद्धेवार सर*
*संकलन : संतोष शेळके*
*ग्राफिक्स : कल्पना जगदाळे*
****************************


स्पर्धे साठी नाही
आक्रोश मनाचा कळेना****
छकुली ला वेदना वळेना*****
तुझ्या--माझ्या आर्ततेला*****
देशप्रेमात मी गोंजरेल ना*******
वृषाली वानखड़े
अमरावती*75*
देशसेवेचे वृत मी घेतले गं आजीवन
कर्तव्य मी बजावीन चोख...
बालकडू दिले देशसेवेचे तुजला
कृतीतुन दिसतेय पितृ नि देशभक्तीचा गं तुझा रोख...
_*❎स्पर्धेसाठीनाही❎﶐~*_
_*कल्पना जगदाळे@8★बीड*_
चित्रशलाका स्पर्धेसाठी...
पिलांसाठी जीव मातेने
झाडाला टांगला ।
करण्या रक्षण मातेचे
पुत्र सिमेवर चालला ।।
नरेंद्र म्हस्के , शिरपूर @ 65
*स्पर्धेसाठी*
चाललो बाळा सीमेवर मी
रोखु नको मजला आता
प्रेम तुझ ईतक पाहुन पिल्या
गहिवरुन येत जाता जाता...
_*चिमणी अन् पिल्लांतील इवलीशी*_
_*चोंच बनली आधार नि विश्वास*_
_*जीवन अन् मृत्यूच्या क्षणार्धाच्या*_
_*खेळात अडकलाय दोंघाचाही श्वास*_
      _*स्पर्धेसाठी~*_
_*कल्पना जगदाळे@8★बीड*_
" सांभाळू आपापल्या मातेला

  निघतो बेटा जप जरा
  स्वर्गसुख मिळो तुजला
  खुशाली धाडीन मज वारा "
............जयश्री पाटील
             वसमतनगर
     स्पर्धेसाठी
नात्यांचे मुख्य भांडवल आहे विश्वास
चोचीत देऊनी चोच,प्रेमाचे दर्शन खास
सैनिक चाललासीमेवर,तोडून सारे पाश
विजयी होऊनी परतेन,बाळा ही मनी आस
****************************
सु.मीना सानप  बीड  @  7
9423715865
स्पर्धेसाठी
बाबा बाबा आमची नका करु चिंता
लवकर जा तुम्ही,रणागंणावर लढण्या
जवळच दिसे चोचीत घाली चारा बाळा जगण्या
सैनिक चालला शत्रुचा तळ उखडण्या
****************************
सौ.मीना सानप बीड @7
9423715865
स्पर्धैसाठी नाही
उरी हल्ल्यातील  सैनिकांचे
व्यर्थ न जाऊ दे  बलिदान
गाजवून या असे शौर्य की
बाबा, वाटावा सर्वांना अभिमान !
पी.नंदकिशोर @43
(स्पर्धेसाठी )
स्पर्धेसाठी..
      १.
काय असते रणांगण
काय घेणे चुमूकलीला...
इवलासा हात धावला
बाबाच्या मदतीला....॥
         २.
जीव टांगणीला लागावा लागतो
तवा कुठं जगण्याचा आनंद कळतो.
जीवा जीवाची कशी आहे धडपड..
जगण्यासाठी सुटू नये ही पकड.....॥
       श्री. हणमंत पडवळ.
             
सैनिक निघता सेवेसााठी,
कन्या बांधते बंध बुटाचे।
माहित आहे कां तिजला,
व्रत पित्याचे देशाचे सेवेचे।
रामराव जाधव.69
7743840604
स्पर्धैसाठी
-------------
विजयी होवूनि यावे बाबा
मोडा आता दुष्मनाची खोड
बांधते मी लेस बुटाची
लागली तुमच्या येण्याची ओढ !!
      -आबासाहेब निर्मळे.
पेठ वडगांव,जि.कोल्हापूर.
9028090266.क्र-३१
स्पर्धेसाठी
इवलीशी कन्या लाडकी,
बांधू लागे बुटाचे धागे .
जा बाबा सीमेवर परि ,
विजयी होऊन येई वेगे
कविता बडवे 70@
बीड
....स्पर्धेसाठी .....

देशासाठी आणीबाणी
बोलावणे आले घाईने.....
सैनिकाची पोर लाडकी
साथ मोलाची तत्परतेने.....
रोहिदास होले ,...७१
गोपाळवाडी ,दौंड ,पुणे.....
०४/१०/२०१६
चिमणी देई पिलांना उमेद
जीवनातील संघर्षातून तरण्याची
चिमुली म्हणे बाबा धमक तुमच्यात
आंतक्यांच्या तळात घुसून मारण्याची
जोगदंड जयश्री
@ jj 62....
चित्रशलाका स्पर्धेसाठी
*चोचित दोन दाने*
*बाळा भरवी सुखाने*
*पिता जातोय देश सेवे*
*पुन्हा तेच वाट पाहणे*
            अमोल अलगुडे
               स क्र 51
जारे बाबा सिमेवरती
देते बुट तुझा मी बांधून
तूच शिकवले धाडस मजला
झाडाला उलटे टांगुन
**********************
स्नेहलता कुलथे
क्र37
✌चिञशलाका स्पर्धेसाठी
आई सांभाळेल पिलांना ही तर
निसर्गाची परंपरा असे अंकीत
बाबा विजयश्री घेऊनच येईल
विश्वासामुळे कन्या नाही शंकीत
@  २१ सुनिल बेंडे
    *नाथसेवक*
           
स्पर्धेसाठी चित्रचारोळी
पक्षी असो की मानव
जीव लेकरावरी समान
बाबा निघती रणांगनी
लेक मदत करिती गुमान
      खेडकर सुभद्रा बीड (२०)
मो नं (९४०३५९३७६४)
चित्रशलाका चारोळी स्पर्धा
_*चिमुकल्या हाताची जादू*_
_*हर्ष आनंद देई बाबांना..!*_
_*जिद्द चिकाटी सुगरणीची*_,
_*अखंड उभारी, देई प्रेरणा..!!*_
  गजानन पाटील पवार *~@81~*
स्पर्धेसाठी चारोळी
देशरक्षण करण्या निघाला पिता
कर्तव्य करी लेक जशी माता
पिलांसाठी पक्षी होई कासावीस
उदरभरण होता देव तुम्हा त्राता
... सौ. शशिकला बनकर, भोसरी @
चित्रशलाका स्पर्धा...


बाबा चालले सीमेवरती,
बंध मजला बांधु द्या।।
तूमच्या देश सेवेत माझा,
वाटा हा खारीचा आसू द्या।।


✒अनिल लांडगे उंडणगाव@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

स्पर्धेसाठी...
देश रक्षणासाठी निघाला
भारत देशाचा विर जवान
पित्यासाठी धावली कन्या
विचार किती चिमुकलीचे महान..
घनश्याम बोह्राडे
समुह क्रमांक 19
*स्पर्धेसाठी चारोळी*
भारतभूच्या रक्षणार्थ
शूरवीर सज्ज झाला
    सोडून पिलापाखरांना
जीव लेकरात गुंतला.
        पुष्पा
    स्पर्धेसाठी नाही.
१)
देशसेवेची इच्छा मनी
बाबा तुम्ही जाता रणांगणी...
आशीर्वाद सर्व भारतीयांचे तुम्हास
होऊन विजयी या परत अंगणी...
२)
तुम्ही जाता रणांगणी
सोडून सर्व घरदार.
साथ तुम्हाला करोडो भारतियांची
तुम्हीच या देशाचे खरे शिल्पकार.
३)चोंचित देऊन चोंच माय
   पिलास भरविति दाणा..
   ही चिमुकलि म्हणे बाबास
   बाबा विजयश्री खेचून आणा..
४)
ईवल्याश्या हाताने बांधते
चिमूकलि धागे बुटांचे...
तिच्या अनमोल स्पर्शाने वाढे
बळ बापाच्या मनगटाचे...
(स्पर्धेसाठी क्रं.४ची चारोळी)
✍श्री सगर पी एच ✍
@८३@धर्माबाद
[10/4, 15:44] ‪+91 82759 38319‬: ✍चित्रशलाका चारोळी✍
            स्पर्धेसाठी
ईवल्याश्या हाताने बांधते
चिमुकलि धागे बुटांचे...
तिच्या अनमोल स्पर्शाने वाढे
बळ बापाच्या मनगटाचे...
✍श्री सगर पी एच ✍
@८३@ धर्माबाद
[10/4, 16:54] ‪+91 90117 42342‬: ✍चित्रशलाका चारोळी✍
            स्पर्धेसाठी
प्राणी,पक्षी वा असो,
जात मानवाची।
प्राण पणास लावून जपते पिलांना,
हीच आदर्श माया आईची।
✍सौ.मीनाक्षी माळकर ✍
    चौसाळा
     बीड
चित्रशलाका स्पर्धेसाठी
**************
दाणा चिमणीची चिंता
पिले भुकेलेली पाहता
किती गुणी माझी बाळ
करी विचार वीर पिता
योगिनी चॅटर्जी #52
*चित्रशलाका चारोळी*
   ........ स्पर्धेसाठी.....
निघता शूर जवान सीमेवर ,
जीव लेकीत, वाटे अडकला..!
जसा मायेने पिल्लांसाठी ,
पाखराने जीव उलटा टांगला..!!
............संतोष शेळके ✍ @24
चित्रचारोळी
***************-****
१-युध्दावर निघाला बाबा
चिमुकली धावत येई
देशभक्ती रक्तात वाही
बांधूनिया बंद बुटाचे देई
प्राची देशपांडे
२- तळहातावर शीर घेतले जवानांनी
नसानसात देशभक्तीचे रक्त वाहते
भय भीती न मनाला शिवते
लेकही बुटाचे बंद बांधते
३-जीवन संग्राम नित्य जगण्याचा
चिमणी चोचीने घास पिलांना भरवते
मानाचा मुजरा भारतीय जवानांना
बूटाचे बंद लेक बांधूनी देते
४-रक्तात ओढ देशप्रेमाची
भारतामातेसाठी शूरपणे लढती जवान
आत्मविश्वास नि कुटुंबाची साथ
लेकही बूटाचे बंद देई बांधून
तुझ्या इवल्याश्या हाताने
अडवू नको माझी वाट
शेवटच्या श्वासापर्यंत रक्षिण मातृभूमीला
सानुल्या फुला ही खूणगाठ
     .......नीता आंधळे
स्पर्धेसाठी
चित्रशलाका स्पर्धेसाठी ::
पिलांचे उदरभरण
परिवाराचेही रक्षण
भोवती संघर्षाचे रण
कर्तव्य जाण क्षण क्षण
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे
@39
५-
वादळी पावसाने घरटे उलटले
भयभीत जाहली पिल्ले
चोचीचा आधार देऊनी
चिमणीने तयांना वाचविले
प्राची देशपांडे
चित्रचारोळी
स्पर्धेसाठी
***************-***
३-जीवन संग्राम नित्य जगण्याचा
चिमणी चोचीने घास पिलांना भरवते
मानाचा मुजरा भारतीय जवानांना
बूटाचे बंद लेक बांधूनी देते
प्राची देशपांडे
समूह क्र १५
बांधुनी बुटाची लेस
सोन्या तु वाढवलीस हिंमत
चुकता करीन हिशोब
पाकला मोजावी लागेल किंमत
     ......नीता आंधळे
लेकरांसाठी मायेनं
दाणा चोचीत आणला
भरवला घास तोंडान
जीव झाडाले टांगला
    ......नीता आंधळे
चिञशलाका चारोळी स्पर्धा भाग २३ वा                                                                                  सत्वर शस्ञानिशी होऊनी तयार       देशसेवेचे व्रत तुला  बंधुराया               भूमातेच्या पाखरा देती संरक्षण                        सैनिकांचे कर्तव्य खरी किमया                                ✒ निता आरसुळे तांबे ,जालना @८९
*  स्पर्धेसाठी  *
लेक म्हणते बाबाला
होऊ नको या समयी विचारी
हिंमत बानू दे मला तुझी
नाही बाण्याचे तुझी कमजोरी
श्रुती खडकीकर
61
समर्पण लेकरांसाठी
फक्त आईच करते
पोटच्या गोळ्यासाठी
तीळ तीळ काळीज तुटते
     .....नीता आंधळे
पिलाला दाणा
मायेनं भरवला
समाधान पाहून लेकराचे
अश्रू एक ओघळला
   .......नीता आंधळे
स्पर्धेसाठी.
  पिलांसाठी एकएक दाणा
   चोचीतून मायेने भरवला
    जाई मायभूमी  रक्षिण्या
 
    जीव मागे लेकरांत राहीला.
              पुष्पा सदाकाळ
                  @ 50.
  पिलांसाठी एकएक दाणा
   चोचीतून मायेने भरवला
    जाई मायभूमी  रक्षिण्या
 
    जीव मागे लेकरांत राहीला.
              पुष्पा सदाकाळ
                  @ 50.
विश्वास जसा पिलांचा
आहे आपल्या आई बाबांवर
विश्वास देशवासीयांना बाबा
फक्त तुमच्याच सैनिकांवर
किशोर झोटे @ 32
औरंगाबाद.
          स्पर्धासाठी
छकुली माझी माझाच वारसा(वसा) घेतलेली,
माझ्या श्वासात ती, मी यशस्वी परतण्याची ती ही भूकेली,
जसे काळजात-काळीज  गुम्फवुन सुगरणीची किमया निराळी,
पिल्लांसाठी जगण्याचा गुंता कल्पकतेने सोडवनारी........✍
✨वृषाली वानखड़े
अमरावती*75*
स्पर्धेसाठी
स्पर्धेसाठी...✍
          चित्रशलाका
*पडणाऱ्या पिल्लास साथ चिमणा चिमणीची*
*तशी लढणाऱ्या पित्यास बळ देते इवली परी*
*देशरक्षणार्थ सीमेवर झिजतो पिता दिन रात*
*नाही भरवसा सैनिकाचा येईल का परतुन घरी*
         ✍प्रणाली काकडे✍
            समूह क्रमांक pk38
चिञशलाका स्पर्धेसाठी चारोळी
भाग २४ वा
निघाला बा देश रक्षिण्या
ओलांडुनी घराची वेस ।
दिर्घायू नि विजयी हो तू
परि बांधिते बुटाची लेस।।
✍✍©:-कवी अनिकेत जयंतराव देशमुख. (अनु)
            रा- गोपालखेड , ता. जि. अकोला.
                    mo-9689634332
@59
कर्तव्य बजवावे चोख
मातृसेवा असो की देशसेवा
चिमुकली असोत वा पिल्ले
त्यांचा विश्वास मनातुन जपावा!(स्पर्धेसाठीची)
संगीता भांडवले
वाशी, उस्मानाबाद
(१६)
माता बजावते कर्तव्य पिलांसाठी
जीव उलटा टांगून
बाबा बजावा कर्तव्य भारतमातेसाठी
देते मी बूट बांधून
          शैलजा ओव्हाळ/चिलवंत
                      @ 73
                स्पर्धेसाठी
स्पर्धेसाठी
***-------****
रणी चाललात बाबा
तुम्हा आवरून देते ।।
चिमणीच्या पिलागत
लेक माया उधळीते  ।।
:- संजय खाडे
७६
1) पिलांसाठी पर्वा न जीवाची
     तिने जीव उल्टा टांगला
     पकड चोचीला पिलाची
     पडता पडता सावरण्याला
2) रक्षण करण्या देशाचे
     सज्ज करते हाताने
     बळ मिळेल विश्वासाचे
     लढा बाबा खंबीरपणे
       लक्ष्मी सरपते
बाबा,देशसेवेचा घेतला तुम्ही वसा
तुम्हीच शिल्पकार खरे भारताचे
बांधुन देते तुमच्या बुटाची दोरी
शत्रुचा खात्मा करताच,देश आनंदाने नाचे!
संगीता भांडवले
वाशी, उस्मानाबाद
(१६)
स्पर्धेसाठीची नाही
सर्व स्पर्धकांनी सहभागी होऊन सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद..
~*साहित्य दर्पण कोअर कमिटी*~

No comments:

Post a Comment