मी महात्मा गांधी बोलतोय ...
नमस्कार , अहो असे आश्चर्याने काय पाहताय ? नमस्कार तरी करा . मी आपल्या सर्वांचा बापू म्हणजे 'मोहनदास करमचंद गांधी ' बोलतोय . आत्ता पटली ना ओळख ? असे भांबावून जाऊ नका मला आपल्याशी संवाद साधायचा आहे . रोज बोलावं म्हणतोय पण तुम्हाला वेळ नसतो सारी चढाओढ माझ्याफोटोमागे धावण्यात तिला मिळवण्यात लागलेली नाही का ? मला वाटतं जेवढं प्रेम तुम्ही माझ्या हासणाऱ्या फोटोवर करता तेवढंच माझ्यावर करता का ? बघा बरं जरा चिंतन करून . म्हणजे उत्तर सापडेल .
माझा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर या गावी झाला . माझ्या वडिलांचे नाव करमचंद गांधी आहे व आईचे पुतळाबाई . माझे वडील व आई खूप धार्मिक वृत्तीचे त्यामुळे लहानपणी माझ्यावर देवधर्माचे संस्कार झाले . मी लहानपणी खूप भित्रा होतो . अंधाराची मला भीती वाटायची तेव्हा रामनाम घे असं मला आई म्हणाली .याचा असा परिणाम झाला की मी हळूहळू धीट बनलो . राजा हरिश्चंद्र हा सिनेमा मी लहानपणी पहिला आणि त्याचा परिणाम असा झाला की पुढे कित्येक रात्री मला तीच स्वप्ने पडू लागली . मी लहान असतानाच माझा विवाह कस्तुरबा सोबत करण्यात आला . शाळेतल्या काही वाईट मुलांच्या संगतीत राहून मलाही विड्या ओढण्याची सवय लागली होती . पुढे तर मी माझ्या चैनीसाठी सोन्याचं कडं विकला होता मात्र वेळीच मला माझ्या चुकीची जाणीव झाली . ते सारं वडिलांना सांगून मन मोकळं करायच होत पण धीर होत नव्हतं म्हणून मी त्यांना पत्रं लिहिलं आणि त्यांना दिलं .ते वाचून ढसाढसा रडले आणि मला गळ्याला लावून एवढंच म्हणाले,"पुढे कधीही असा वागू नकोस .तुला माझी शपथ आहे". आणि मी त्या दिवसापासून कधीही वाईट संगतीत किंवा व्यसनात अडकलो नाही . आजची तुम्ही पालक मंडळीही असच वागता का आपल्या मुलांशी ?
शाळेत मी जेमतेमच हुशार होतो . कसाबसा दहावी उत्तीर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी विलायतेला गेलो . तिथेही शाकाहारी राहण्यासाठी कित्येक दिवस कडकडीत उपवास सहन केले पण मांसाहार केला नाही . वकिलाची पदवी मिळाल्यानंतर कोर्टात जाऊन केस लढण्याचा प्रयत्न केला पण त्यातही यश आले नाही . मग मी दक्षिण आफ्रिका या देशात गेलो तेथील वर्णद्वेषाची लढाई लढलो . का आपण सारी एकाच ईश्वराची लेकरे असताना जाती, वर्ण , धर्म आणि पंथाच्या वादात एकमेकांना कायम पाण्यात पाहत असतो तेच कळत नाही . तिथेच मला सत्याग्रहाचा शोध लागला . सत्याग्रहाचा मार्गाने आपल्या विधायक मागण्या मागण्याचा अधिकार सर्वाना मिळाला आणि तेथील वर्णद्वेष कमी झाला .
पुढे मी भारतात आलो आणि गोपालकृष्ण गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी कार्य करू लागलो . भारतीय समाजाचा अभ्यास करण्यासाठी मी संपूर्ण भारत फिरलो तेव्हा भुकेने व्याकुळ झालेली माणसं , कुपोषणाने ग्रस्त लहान मुले पाहून मला माझ्या राहणीमानाचा भयंकर राग आला आणि मी ठरवलं की आपणही साधं राहील पाहिजे आणि एक खादीचा पंचा व धोतर हा माझा पोशाख बनला . तोही स्वतः चरका चालवून कातलेल्या खादीचा .
चंपारण्यातील शेतकऱ्यांना सरकार सक्तीने नीळ लावायला लावत त्या विरोधात मी आवाज उठवला आणि त्यांना शेतसाऱ्यात व सक्तीने पिकवाव्या लागणाऱ्या उत्पन्नातून मुक्ती मिळाली . लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय सभेची सारी सूत्रे माझ्या हाती आली .हाती आली म्हणण्यापेक्षा लोकांनी ती जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि भारतीय राजकारणात एका नव्या युगाची सुरुवात झाली असं सारे म्हणू लागले . "गांधीयुग" असं या युगाच नाव .
मग भारतीय स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागली . सरकार चालढकल करत होत . मी असहकार चळवळ उभारली . शांततेत व सनदशीर मार्गाने लढा द्यायला लावला मला तुरुंगात टाकण्यात आलं . तरुणांना क्रांती घडवून आणावी वाटत होत पण अहिंसा हेच आपले परम कर्तव्य आहे असं मला वाटायच .आपला देश जगाला शांती शिकवणाऱ्या गौतम बुद्धांचा आहे . रक्तपात नको म्हणून मी सनदशीर मागणी लावून धरली मग कुणी मला काही म्हणो . १९३० ला पूर्ण स्वातंत्र्याची मागणी मांडली गेली ती यशस्वी झाली नाही .
१९४२ ला 'चले जाव' असं मी इंग्रजांना निक्षून सांगितलं आणि भारतीय स्वातंत्र्य दृष्टीपथात आलं . पण सरकार जाताजाता फाळणीचे विषवृक्ष लावू पाहत होतं .
शेवटी १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला पण पाकिस्थान ला वेगळं देऊन . मी म्हणालो," ज्यांना पाकिस्थनात जायचे त्यांनी जावं पण भारतात राहू इच्छिणार्यांना भारतात वास्तव्य करता येईल ". हीच गोष्ट काहींना आवडली नाही आणि त्यांनी मला त्यांच्या गोळ्यांनी ठार मारले .
मला मारले पण माझ्या विचारांना ते मारू शकले का ? विचारांना कधी मारू शकतील का ? तर निश्चितच नाही उलट एक गांधी मारल्याने लाखो गांधी निर्माण होतील . अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मी गांधीजींचा पूजक आहे असं सांगितलं . अनेक राष्ट्र त्याचे प्रमुख गांधीजींना आदर्श मानतात . गांधीवादी विचारसरणी श्रेष्ठ आहे , होती आणि जगाच्या अंतापर्यंत ती श्रेष्ठच राहील यात वाद नाही .
गांधीवाद वेगळ्यादृष्टीने समजावून सांगण्यासाठी 'लगे राहो मुनाभाई' सारखे चित्रपट आले त्यांनी गांधीगिरी दाखवली . वाईट बोलू नका , वाईट ऐकू नका व वाईट पाहू नका ही माझी त्रिसूत्री कायम लक्षात ठेवा . मी राष्ट्रपिता आहे मला अभिमान वाटेल असच वागा .
मी तुमच्या चलनावर विराजमान झालो आहे . माझा हसरा चेहरा असलेला फोटो चलनावर आहे . जेव्हा कष्टकरी कष्ट करून पैसा कमावतात तेव्हा मला कृतार्थ झाल्यासारखं वाटत .शेतकरी उत्पन्नातून अर्थार्जन करतात तेव्हा सुजलाम , सुफलाम वाटत . पण जेव्हा कुणी भ्रष्टाचार करून , लोकांना फसवून पैसा कमावतो तेव्हा मी खूप म्हणजे खूप आक्रोश करत असतो .फक्त तो आक्रोश कुणी पाहत नसतं .
तेव्हा तुम्ही सारे चांगले वागा . मला अभिमान वाटेल .'अहिंसा परमो धर्म' हा मंत्र जपा . भेदाभेदाच्या भिंती भेदून टाका . महापुरुषांचे पुतळे उभारण्यापेक्षा त्यांच्या विचारांचे जागर सदोदित होत राहतील याची खबरदारी घ्या . महापुरुष डोक्यावर मिरवण्यापेक्षा डोक्यात मिरवा. हीच खरी त्यांना वाहिलेली पावन आदरांजली ठरेल यात वाद नाही .
आज माझ्या जन्मदिनाचे औचित्य साधून मी आपल्याशी मनमोकळा संवाद साधला तुम्ही वेळ दिलात धन्यवाद .आणि हो श्रेष्ठ कविवर्य कुसुमाग्रजांची 'अखेर कमाई' ही कविता कायम आठवत राहा म्हणजे तुम्हला माझी आठवण येत राहील . ....
अखेर कमाई
मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले .
ज्योतिबा म्हणाले ,
शेवटी मी झालो
फक्त माळ्यांचा .
शिवाजीराजे म्हणाले ,
मी फक्त मराठ्यांचा .
आंबेडकर म्हणाले ,
मी फक्त बौध्दांचा .
टिळक उद्गारले ,
मी तर फक्त
चित्पावन ब्राह्मणांचा .
गांधींनी गळ्यातला गहिँवर आवरला
आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान .
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे .
माझ्या पाठीशी मात्र
फक्त सरकारी कचेऱ्यांतील भिँती !
- कुसुमाग्रज
- ऋषिकेश गंगाधरराव देशमुख
मु.पो : शिळवणी ता : देगलूर
जि: नांदेड पिनकोड : ४३१७४१
संपर्क :९९२३०४५५५०
अनुक्रमांक : ५८
=====================================
*मी महात्मा गांधीजी बोलतोय........*
भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले,अश्या थोर नेत्यामध्ये महात्मा गांधीजींचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. इंग्रजाना विरोध करण्यासाठी बहुतांश लोकांनी शस्त्र किंवा हिंसा यांचा वापर केला. पण महात्मा गांधींजीनी असहकार आंदोलन करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. त्यासाठी त्यांनी लोकांना जागे करण्याचे काम केले. प्रत्येक कामाची सुरुवात ते स्वतः पासून करीत असत. त्यामुळे लोक त्यांच्या पाठी मागे उभे राहिले नाही तर गांधीजी जे म्हणतील ते करण्यास एका पायावर तयार राहत असत. हे त्यांच्या रोजच्या चालण्या आणि बोलण्यातुन स्पष्टपणे दिसून येते.
महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. यांचा जन्म २ ऑक्टोबर१८६९ रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झाला. त्यांनी वकीलीचे शिक्षण घेतले. वकीलीचा व्यवसाय करण्यासाठी ते दक्षिण अफ्रिकेला निघाले. त्याठिकाणी त्यांना खुप वाइट अनुभव आले. दक्षिण अफ्रिकेला जाताना रेल्वेत ही वर्ण भेदा चा वाइट अनुभव आला त्यामुळे त्यांनी याविरुद्ध लढा देण्याचे ठरविले. याच ठिकाणी त्यांच्या लढा चालू झाला. कदाचित ते दक्षिण अफ्रिकेला गेले नसते आणि त्यांना वर्ण द्वेषा चा अनुभव आला नसता तर कदाचित भारताला महात्मा गांधी सारखे व्यक्ती लाभले नसते. दक्षिण आफ्रीकेतून परत येतांना त्यांनी अन्याय आणि विषमता नष्ट करण्यासाठी झगडण्याचा निश्चय केला होता.
सन 1920 पर्यंत भारतीय स्वातंत्र्यलढाचे नेतृत्व लोकमान्य टिळक यांच्याकडे होते. मात्र 01 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि देशाचे नेतृत्व महात्मा गांधीजी यांच्या कडे आले. गांधीजी भारतात आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण करून सर्व परिस्थितिचा आढावा घेतला. माणसाने माणसांना माणुसकीनेच वागवावे हेच सूत्र सर्वांना समजावणे आवश्यकआहे असे त्यांचे मत बनले. समाजात असलेली गरीब श्रीमंत साक्षर निरक्षर मालक मजूर, स्त्री पुरुष यांच्या मधली दरी कमी करण्याचे काम प्रथम करण्याचे ठरविले. त्याचबरोबर इंग्रजांच्या जुलमी धोरणांना विरोध करण्यासाठी अहिंसा, सत्याग्रह आणि असहकार यांचा वापर करण्याचा त्यांनी निश्चय केला.
जोपर्यंत देशातील प्रत्येक जनतेला अंगभर कपडा मिळणार नाही तोपर्यंत एक पंचा,एक उपरणे,साध्या चपला अशा वेशात राहण्याचा त्यांनी संकल्प केला आणि त्याचा अवलंब ही केला. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या उक्तिनुसार त्यांचे वागणे होते त्यामुळे गांधीजी जनतेला आपला आदर्श नेता वाटू लागला. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले गांधीजी लोकांच्या भल्या साठी साधे पंचा नसून राहू लागले. इंग्रज सरकार आपल्या मालाची विक्री व्हावी म्हणून भारतीयांना त्यांनी विदेशी मालाचे प्रलोभन दाखवून लुबाडत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. स्वदेशी मालाचा वापर करण्यात यावा म्हणून त्यांनी स्वदेशीचा वापर करण्याविषयी त्यांनी आवाहन केले तेंव्हा देशात लोकांनी विदेशी वस्तूची होळी केली. बाबू गेनू नावाच्या क्रांतीकारकानी परदेशी वस्तु वाहून नेणाऱ्या ट्रक समोर स्वतः च्या जीवाचे बलिदान दिले.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी देशातील सर्व लोकांना एकत्र आणण्याचे काम केले. हिंदू मुस्लिम यांना एकत्र आणल्यास एकजूट राहिल हे ते ओळखून होते, त्या दिशेने ते कार्य केले. अनेक वेळा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. त्यांनी आपल्या भाषण, लेखन आणि प्रार्थना सभा मधून लोकांना जागे करण्याचे काम केले. देशातील लोक त्यांच्या हाकेला ओ देत इंग्रज सरकारच्या विरोधात उभे राहिले. त्यांच्या बोलण्यात एक शक्ती होती हे जेंव्हा इंग्रजाना कळले त्यावेळी ते गांधीजीना देशातील महत्वाचे व्यक्ती ठरविले. इंग्रज सरकारला कसल्याच प्रकारचे सहकार्य करायचे नाही असे त्यांनी जाहिर केले अन पाहता पाहता देशभर असहकार आंदोलन चळवळ जोर धरु लागली. इंग्रजांच्या अनेक कामाला त्यांचा विरोध होता. जसे की, भारतातल्या मिठावर लादलेल्या कराविरुद्ध, १९३० ची दांडीयात्रा असो चंपारण्यातील शेतकऱ्याच्या अन्याया विरुद्धचा लढा. अलाहाबादच्या गिरणी कामगारांसाठी केलेले उपोषण असो हिंदू आणि मुस्लिम यांच्या ऐक्यासाठी केलेले २१ दिवसांचे उपोषण, इ. उदाहरणातुन त्यांचे कार्य ठळकपणे जाणवते.आत्ता इंग्रजाना भारतात रहाणे अवघड व मुश्किल आहे असे कळल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देशाला स्वतंत्र करण्यात येईल असे ठरविण्यात आले. त्यानुसार आपला भारत देश स्वतंत्र झाला. भारताच्या स्वातंत्र्यलढा मध्ये महात्मा गांधीजी चे योगदान अत्यंत महत्वाचे आहे.
आज त्यांची जयंती त्यानिमित्त त्यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन.
- नासा येवतीकर
====================================
मी महात्मा गांधी बोलतोय.......
दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल
साबरमती के संत तूने कर दिया कमाल
या भजनात मी म्हणजे साबरमतीचा संत महात्मा गांधीनी तलवार व ढाल न वापरता भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. माझा जीवनप्रवास २ ऑक्टोबर १८६९ रोजी सुरु झाला. माझा जन्म गुजरातमधील पोरबंदर या शहरात झाला. माझे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. माझ्या वडिलांचे नाव करमचंद तर आईचे नाव पुतळाबाई होते. माझ्या घरात अत्यंत धार्मिक वातावरण असल्याने बालमनावर विशेषतः अहिंसा, शाकाहार, सहिष्णुता , इतरांबद्दल करूणा य तत्त्वाचे बीज याच काळात रुजले. श्रावणबाळ व हरिश्चंद्र य दोन कथाचा माझ्या मनावर प्रभाव झाला होता. मी लहानपणी अनेकवेळा माझ्याशीच हरिश्चंद्रसारख वागलो होतो. इ.स.१८८३
मध्ये माझा विवाह कस्तुरबा यांच्याशी झाला. त्यावेळी आम्हाला लग्न म्हणजे नवी कपडे ,गोड खाऊ आणि नातेवाईकाबरोबर खेळणे,हेच होते.आम्हाला नंतर हरीलाल ,मणिलाल, रामदास व देवदास अशी चार मुले झाली. माझ्या शालेय शिक्षणात साधारण विद्यार्थी होतो. शालेय शिक्षण संपवून वयाच्या एकोणिसाव्या वर्षी मी लंडनला वकिलीचे शिक्षण घेतले तिथेही मी शाकाहार जेवण व धार्मिक गोष्टीत सहभाग घेतला. लंडनहून मी बरीस्टरची पदवी घेवून भारत परत आलो तेव्हा कळले कि माझ्या आई पुताळाबाईचा देहांत झाला माझ्यापासून हि बातमी लपवून ठेवली. माझ्या लाजाळू स्वभावामुळे मुंबईत प्रक्टिस करण्याची योजना असफल झाली नंतर एका वर्षाच्या करारावर मी दक्षिण आफ्रिकेतील भारतीय कंपनीत कामासाठी गेलो .
दक्षिण आफ्रिकेत माझ्या आयुष्याची २१ वर्षे घालवली.येथेच मी राजकीय दृष्टीकोन, नैतिक व राजकीय नेतृत्व ही कौशल्य विकसित केली. मी मुख्यत्वे धर्माच्या बाबतीत ऐतिहासिक विविधता सांधू शकेन हाच विश्वास भारतात आल्यावर ठेवला. भारतीयाबद्दल वंशभेद ,असमानता यांना मी सामोरे गेल्यावर अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यास सुरुवात केली. अनेक भारतीयाविरुद्ध अन्यायकारक कायदे याकडे लक्ष वेधले. मी भारतात इ.स.१९१५ साली कायमसाठी परत आलो. मी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस च्या अधिवेशनात सहभागी झालो .माझे राजकीय गुरु ना.गोपाल कृष्ण गोखले यांनी खऱ्या अर्थी भारताचे राजकारण व समस्या याची ओळख करून दिली. मी इ.स. १९२० मध्ये लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाल्यावर राष्ट्रीय सभेचे प्रमुख नेता बनलो.
चंपारण्य व खेडा येथे निळीचे उत्पादन घेण्याविरुद्ध सत्याग्रह करून कार रद्द करण्यात आला. खेडा सत्याग्रहापासून पासून सरदार वल्लभ भाई पटेलांनी कणखर भूमिका घेत कर रद्द करण्याच्या वाटाघाटी इंग्रजासोबत केल्या. जालियानवाला बाग हत्याकांड इंग्रजानी घडून आणल्यानंतर हिंसक वळण लागल्याने असहकार व स्वदेशी ,स्वराज्य चळवळ केली. या आंदोलनात कॉग्रेस पक्षाची पुनर्बंदानी करून सर्व सामान्य जनतेला सभासदत्व दिले . ४ फेब्रु १९२२ मध्ये उत्तर प्रदेशातील चौरीचौरा येथील हिंसक वळण घेतल्यानंतर असहकार चळवळ थांबवली. १० मार्च १९२२ रोजी मला राजद्रोहाखाली इंग्रजानी अटक केली. नन्तर २ वर्षांनी माझी सुटका झाली. १९२० दशकाचा काळ मी प्रत्यक्ष राजकारणापासून दूर राहिलो स्वराज्य पक्ष आणि भारतीय कॉंग्रेस मधील मतभेद दूर करण्यास घालविले. पंडित नेहरू आदी नेते राजकीय सल्ला व चर्चा करण्यासाठी मला साबरमती आश्रमात भेटण्यासाठी नेहमी येत असे. नेते जरी तात्काळ स्वराज्य मागत असले तरी आपल्या लोकांना राजकारणाची पूर्ण हातोटी अवगत नव्ह्ती, शिवाय आपला समाज अनेक समस्यानी ग्रासलेला होता. मी शिक्षणासाठी बुनियादी शिक्षण, हरिजनांना समान वागणूक देवून अस्पृश्यता निवारण, दारूबंदी,गरिबी कमी करण्यासाठी प्रयत्न चालू ठेवले. इ.स. १९३० मिठाचा सत्याग्रह केला आणि त्याची परिणती दांडी सत्याग्रहात झाली व रोजच्या जीवना आवश्यक वस्तूवरील कर रद्द केल. या यात्रेतील ६०००हून अधिक लोकांना इंग्रजानी तुरुंगात डांबले. मी व आयर्विन यांच्या गांधी–आयर्विन करारनुसार ह्या सर्व कैद्यांना मुक्त केले. तसेच मला इंग्रजानी मला गोलमेज परिषदेस कॉंग्रेसचा एकमेव प्रतिनिधी म्हून बोलावले परंतु हाती निराशाच आली. राष्ट्रावाद्याची चळवळ नरम पडण्यासाठी मला अनेक वेळा अटक केली परंतु ते इंग्रजाना शक्य झाले नाही.
इ.स.१९३९ साली दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. मी ‘भारत युद्धाचा भाग होणार नाही’, अशी घोषणा केली व आम्ही स्वातंत्र्याची मागणी तीव्र करत १९४२ साली छोडो भारत आंदोलन ला सुरुवात केली. करो य मरो हा मंत्र देत एखाद-दुसऱ्या हिंसेमुळे या वेळेस छोडो भारत आंदोलन मागे घेणार नाही . इंग्रजाना आता त्यांना राज्यकारभार टिकेल याची शाश्वती नव्हती ,म्हणून हिंदू मुस्लीम फुट कायमची निर्माण होईल अशी फाळणीची योजना काबीनेट मिशन च्या शिफारशीत केली. इंग्रजाची वागणूक नेहमी हिंदू व मुस्लीम मध्ये फुट पाडण्याची होती ,परंतु मागण्या मान्य केल्या नसत्या तर नेतृत्व मुस्लीम लीग कडे गेल्यास बरेच जीवित हानी ला सामोरे जावे लागेल. म्हणून पाकिस्तान राष्ट्र म्हणून मान्य करत त्यांना ५५ कोटी रुपये भरपाई रक्कम दिली. नवराष्ट्र निर्मिती होताना लोकांनी हिंसाचार होऊ नये व शांतता ठेवावी याचे वचन घेतल्यानंतर मी उपोषण सोडले. ३० जानेवारी १९४८ ला दिल्ली बिर्ला भवनाच्या बागेतून लोकासोबत हिंडताना माथेफिरू नथूराम गोडसे याने गोळी घालून माझी हत्या केली . माझी समाधी दिल्ली राजघाट येथे आहे माझ्या समाधी वर मी मरताना उच्चारलेले ‘हे राम’ शब्द आहे.
मला लोक आवडीने बापू म्हणत आणि स्वातंत्र्याच्या चळवळीत कामगिरी पाहून महात्मा आणि राष्ट्रपिता उपाधी दिली. आजही भारताकडे पाहिल्यास आणखी वेगळ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. अंतर्गत समस्या भष्ट्राचार यावर अहिंसा आणि सत्याग्रहाने उत्तर दिल्यास समस्या सुटतील. माझे सत्याग्रहाचे तत्वज्ञान सामान्य व्यक्ती हि राबवू शकतात याचे उत्तम उदाहरण स्वातंत्र्य आंदोलनात स्त्रिया, मुले सहभागी झाले व यश मिळविले. माझे आचार, विचार, सर्वाना माहित आहे तसेच आचरण ठेवावे आणि संयम ,शांतता ठेवावी. पाकिस्तानची भूमिका स्वातंत्र्य मिळल्यापासून दहशतवादी भूमिका अजून बदलेली नाही, तर यावर उरी हल्ल्याचे प्रत्युत्तर सर्जिकल स्टराइक प्रमाणे कठोर भूमिका घेत उग्रवाद्याना निपचित करावे. अनेक क्रांतीकारक आणि स्वतंत्र चळवळीतील नेते , बंधू भगीनीचे बलिदान ध्यानात ठेवून स्वातंत्र्य अबाधित ठेवावे हा विश्वास आहे ! प्रत्येक क्षेत्रात शेती, संरक्षण, उद्योग स्वयंपूर्ण होत आहे. भारत एक महासत्ता दिशेने वाटचाल होत असताना स्त्रीयावरील अत्याचार, फसवणूक ,बेरोजगारी ,स्त्रिया- मुलावरील अत्याचार, प्रशासनाचा नाकर्तेपणा ह्या समस्याही दूर कराव्यात तर समाज सुखी आणि सुसंस्कृत होईल !
वंदे मातरम्!
निता आरसुळे जालना @८९
=====================================
[10/2, 6:41 PM]
+91 86980 67566
"मी महात्मा गांधी बोलतोय"
मित्रांनो नमस्कार म्हणू, जय महाराष्ट्र म्हणू, जय भीम म्हणू, सलाम आलेकूम म्हणू की आणखी काय म्हणू....... कांहीच सूचत नाही मला. शिवाय माझी आणि आपली ओळख गर्द होती तशीच पुढं राहिल वाटत नाही. पण पिढयानं पिढया आपण मला ओळखलंच पाहिजे असंही नाही आणि त्यासाठी मी काम केलेही नाही. मी माझं कर्तव्य केलं आहे. मित्रांनो खरंच भारत खूप खूप बदललाय.आचारानं,विचारानं, कर्तृत्वानं आणि
एकमेकांच्या विद्वत्तेनं. आणि बरं झालं तुमच्या या
बदलात मी सापडलो नाही. कारण माझ्या सारख्या हळव्या माणसाला हे आणि असं बदलनं कदाचीत जमलंही नसतं. राजकारणातील थोर विभूती पाहून नवल वाटतं मला... उच्च शिक्षण घेऊन बॅरिस्टर होऊन आपण राजकारण करू शकलो नाही यांची खंत आजचे राजकारण पाहून वाटते.. वर वर जाताना आड येणाऱ्याला आडवं करणं आणि त्याला तुडवून खूर्ची संभाळणं तसं सोप मुळीच नाही... राजकारणात किती कौशल्य आणि कसब लागतो हे मला आता कळून चुकले.
ज्या गरिबांकडे बघून माझी घालमेल व्हायची ते गरिब आज मला कुठं दिसत नाहित,ते तेच आहेत
यावर माझा विश्वासच बसत नाही.सारं सारं बदललय मित्रानों.शहरा शहरातून आणि कचेऱ्यातून स्वच्छपणा बघून माझे स्वच्छतेचे तेव्हाचे विचारच बोथट होते असं वाटतय, पान तंबाखू आणि आता नवीनच तो काय म्हणे *गुटखा*आला आहे. त्यामुळे कचऱ्याचे ढीग आणि इमारतीचे कोपरे रंगलेले दिसतात. अजून कहर म्हणावा की जीवन शैलीचा भाग हेच कळत नाही. प्रत्येक कार्यालयात माझी तसबीर असते आणि ती जणू तिथल्या कारभाराची साक्षीदारच असते. राजरोस होणारा भ्रष्टाचार माझ्या सत्य सदाचार या विचारसरणीला छेद देणारी घटना आहे. पण हाच भ्रष्टाचार शिष्टाचार म्हणून स्विकारलेल्या लोकांना बघून माझ्याच त्या विचारावर विचार करावासा वाटतो. अहिंसा हे तत्व स्विकारून आयुष्यात मी जीवाची किती आणि का घालमेल करुन घेतली असेल असंच वाटतय. कारण पशुनां तर माणूस तेव्हाही कापत होताच, आणि आताही कापतो आहेच पण नातीगोती विसरून जातीधर्म यात गुरफटून माणूस माणसंच कापत सुटलेला बघून मला माझाच देश आहे का याबाबत शंका येते. स्वातंत्र्यपूर्व काळातील कांही स्मृती जागवल्या तर पुन्हा खूप वेदना होतात. ज्या हेतूने स्वातंत्र्याचा यज्ञकुंड पेटला होता. त्याचं फलीत काय..?
डॉ. बाबासाहेबांनी त्यांच्या समाजासाठी व एकूणच देशासाठी घेतलेले कष्ट असो वा अनेक हिरे या स्वातंत्र्यासाठी आपल्या देशाने घालवले आहेत. त्यांच्या कल्पना व स्वतंत्र भारताचे आगळे स्वप्न विरल्यागत वाटते आहे. पण आता आम्ही कोणी कांही करू शकत नाही.. कोणत्या भावनेने आणि विचाराने पाकिस्थानला करोडोची मदत करुन मोठ्या भावाचं कर्तव्य बजावलं होतं. पण कृतघ्न निघाला तो.... आज वाम मार्गावर त्याचे क्रमण चालू आहे. त्याचीही काळजी वाटतेय मला. शेवटी आपल्याच घरातून वेगळं राहिला आहे नं तो, आपला बंधूच तो.. ! काळजी फक्त
करू शकतो मी. दुसरं काय करणार..?शेवटी त्याचं कर्म त्याला घेऊन जाईल त्याला योग्य ठिकाणी... भरकट चाललाय तो यवढं मात्र खरं आहे....!आल्लाह त्याला सद्बुद्धी देवो... !माणसा माणसातील क्रुरता आणि रक्तपात बघून असाह्य वेदना होतात.२ ऑक्टोबर शिवाय माझं स्मरण बहुतेकांना होत नाही... नाही झालं तरी चालेल पण मला अनेक जण अनेक अर्थानं दुषणं देतात. एक तर ते अज्ञानी आहेत किंवा अपुऱ्या ज्ञानावर बोलतात.... पण मी माझे आचरण सदैवं राष्ट्रहिताचे आणि प्रांजळ असेच ठेवले आहे... जगाने माझ्या विचाराचा स्विकार करावा आणि माझ्याच देशात मी परका व्हावा हे थोडं विचित्र वाटतं मला... स्वातंत्र म्हणजे स्वैराचार नव्हे तरीही
विचारानं दिवाळखोरीत निघालेली माणसं कमी होण्याऐवजी वाढतच गेली. त्यांचा मुजोरपणाचं उदाहरण म्हणजे ' मटण ' मार्केटला माझं नाव असणं.... काय म्हणावं यांच्या वागण्याला.? आज मी असतो तर उपोषण करून आणि असेच अन्य सनदशीर मार्गानं या प्रवृत्या मोडीस काढल्या असत्या. मला आज येशूची आठवण होतेय, 'ईश्वरा माफ कर या लोकांना, यांना आपण काय करतोय हेच कळत नाही... ! 'असो बदल हा
सृष्टीचा नियम आहे.. बदल घडेल यातूनही चांगल्या प्रवृत्ती निपजतील मला विश्वास आहे. कारण भारतीय संस्कृती आणि इथली माती यावर माझा अपार विश्वास आहे... ! बोलण्यासारख्या
आणि अंतकरणात कल्लोळ करण्याऱ्या खूप गोष्टी आहेत पण नाही, आताच सारं नाही मोकळं होणार मी. कारण आपेक्षानं वाट बघणं माझं कर्तव्य समजतोय मी... तरीही मी खूप कांही मन दुखवण्यासारखं तर बोललो नाही ना..?हा थोडं उपहासानं कांही बोललो आहे ,पण हेतू चांगलाच ठेवून बोललो आहे... !बरे थांबतो आता बघू कांही अपेक्षीत बदल घडतो का ते.. आणि भेटू परत पुढील दोन ऑक्टोबरला ,तो पर्यंत जय हिंद... !!
जय हिंद या घोषणेनं मी भानावर आलो.
शाळेत विद्यार्थ्याचे भाषण सुरू होते पण मी एका विचित्र विश्वात होतो. महात्मा माझ्याशी बोलत होता. मी समाधी लागल्यागत फक्त त्यालाच ऐकत होतो... खरंच वेदना बोलून दाखवल्या त्यानं आज मला. आणि मी व्यतीत झालो... महात्म्याच्या विचाराची री ओढत मलाही इथलं वास्तव खोलात जाऊन त्याच्या पुढं मांडावं असं वाटतय... ज्याअर्थी महात्मा मला बोलला त्यअर्थी
माझेही तो ऐकलच......
*बापू तूमच्या देशात*
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
गांधी तूम्ही जरी महात्मा
ओळखला नाही तुमचा आत्मा
तुम्हाला नोटांवर बसवले
अन बघता बघता फसवले...॥
सत्य आहिंसेशी नाते तूमचे
तेवढे सोडून वागणे अमुचे
राजरोस इथे भ्रष्ट व्यवहार
त्यातही तूम्ही साक्षीदार...॥
चौका चौकात आहात तूम्ही बापू
पण उभेच केले आहे तुम्हाला
चरण स्पर्शिले जातात तुमचे
सुरा ठेऊन कमरेला.....॥
बरं झालं तुम्ही पुतळा आहात
नसता तुम्हालाही पुळका
अणावर झाला असता.....
हिंसेच्या तांडवात सापडलेल्याचा..॥
बापू असं तांडव नवं नाही इथं
रस्त्यांनी ओलांडून चालतो प्रेतं
संवेदनाची आमची भेटगाठच नाही
माणूसकी डोक्यात उरलीच नाही...॥
पुढारपणाचा सोस घराघरात आहे
दांभिकतेचे ओझे गर्दभ वाहे...
गळ्याला फास राबत्याच्या अन
लुटारूच्या डोईवर मुकुट आहे...॥
बापू तुमच्या देशात असं
कांही बाही होईलच होईल
पण नवल याचंच आहे, की
मारेकऱ्यानाच पुजलं जाईल...॥
..............................,,,,,,,,,,,,,,,,....................
बापू बघा, तुमच्या वेदना आणि माझ्या संवेदना कुठं जुळतात का..... मी पण थोडा मोठा घास घेऊन आपणापुढं गऱ्हाणं मांडलय सदयस्थितीचं
आपल्या म्हणण्याप्रमाणे मी पण आशावादी आहे... भविष्याबाबत, उज्वल भविष्याबाबत.. !
!! जय हिंद !!
श्री. हणमंत पडवळ
मु.पो. उपळे ( मा.)ता. जि. उस्मानाबाद.
8698067566/क्र:48.
=====================================
[10/2, 6:42
*गांधीजी तुम्ही असते तर.....*
गांधीजी तुम्ही असते तर
नक्कीच आज रडले असते
अस्वच्छ परिसर पाहून हातात
झाडू घेतले असते अन
संपूर्ण परिसर स्वच्छ केला असता
तुमच्या मागे मग हजारो लोक झाडू
घेऊन स्वच्छता अभियान केले असते
आज ही तेच तर चालू आहे
फक्त तेथे गांधीजी ऐवजी त्यांचा फोटो आहे.
गांधीजी तुम्ही असते तर
नक्कीच आज हसले असते की
काय ही भोळी भाबडी जनता
आपण कोणाला निवडून देत आहोत
याचे जरा देखील भान नाही
मतदान करण्याचा अधिकार यांनी
काही पैश्यच्या लालसेत विकून टाकल्या
अन पाच वर्षे त्यांच्या नावाने शिमगा करीत राहिल्या
गांधीजी तुम्ही असते तर
नक्कीच आज म्हणाले असते की
या लोकांना स्वातंत्र्यतेचे महत्त्वच
अजून कळले नाही कारण
रविवार असेल जरी
निदान आजच्या दिवशी तरी
त्या मद्य आणि मांस पासून दूर
राहू शकले नाही
कोरडा दिवस असून ही आणि
बापू ची जयंती सुद्धा त्यांना
काही घेणे देणे नाही
अश्याना सर्व दिवस सारखेच असते.
म्हणूनच म्हणावेसे वाटते
गांधीजी तुम्ही असते तर नव्हे
नसलेलेच खूप बरे झाले.
*- नासा येवतीकर, धर्माबाद*
=====================================
[10/2, 7:14 PM] +91 90116 59747
स्पर्धेसाठी.
महिमा दुर्गेच्या नवरात्रीचा.
आपला भारत देश हा रूढी व परंपरा जपणारा देश आहे. त्यात सणवार अतिशय काटेकोर व संस्कारांनी पार पाडले जातात. अशाच अनेक सणांमधे येणारा सण म्हणजे नवरात्रोत्सव.हा मोठ्या प्रसन्न वातावरणात व आनंदात पार पाडला जातो.नऊ दिवसांच्या उत्सवात स्री व पुरूष
दोघे ही अंबेचा उपवास करतात. महाकाली ,महासरस्वती व महालक्ष्मी ही आदिशक्तीची रूपे आहेत. हा नवरात्रोत्सव म्हणजे मांगल्याचे ,स्फूर्तीने व तेजाचे प्रतिक मानले जाते.असे सण नवचैतन्य तर घेऊन येतातच शिवाय पुढच्या पिढीला ज्ञानाची व सद्गुणांची, संस्काराची चांगलीच शिकवण देवून जातात.
स्री ही अगाध सामर्थ्यशाली कर्तुत्वात कुठेच कमी नसणारी अलौकिक स्री शक्तीची परमेश्वराने दिलेली देण आहे. ती त्यागाची मूर्ती असून मायेचा अगाध सागर आहे. तशी ती कडक दुर्गा ही आहे. एकटी स्री महिषासुरासारख्या राक्षसाला मोठ्या धैर्यानं व शिताफीने ठार मारते.नऊ दिवस कठोर परिश्रम करून युद्धला सामोरी जाते. देव ही चिंतीत होतात. परिस्थिती भयावह होते पण दुर्गा यत्किंचितही डगमगली नाही. कारण ती सत्याच्या मार्गाने व स्वबळाच्या आत्मविश्वासाने लढली .अधर्माचा नाश करण्यासाठीच दुर्गा मातेने अवतार घेतला होता.
आदिशक्तीची उपासना अनादी काळापासून प्रचलित आहे. शिवाजी राजे ही आई तुळजा भवानीचा आशिर्वाद घेतल्याशिवाय मोहिमेवर जात नसत.जिजाऊ माता ही त्यांची प्रेरणा होती. आजही जिजाऊंसारखी स्री होणे नाही. केवढे सामर्थ्य व हुशारी होती हे सांगणे नकोच.
आदिशक्तीची तशी ऐकावन्न पीठे आहेत. ही खुप लांब लांब आहेत. साडे तीन पीठं म्हणजे आई तुळजाभवानी ,कोल्हापूरची करवीर निवासिनी,माहूरची रेणुका माता व स्प्तशृंगी वणी.ही होत.
ही आपली कुलदैवत ही आहेत.
या नवरात्रोत्सवात वातावरण मंगलमय असते.स्री शक्ती चा जागर असतो.नऊ दिवस निरनिराळे कार्यक्रम होतात. त्यात रास गरबा ,भोंडला ,देवीचा गोंधळ व जागर करीत महिला आनंदाने एकत्र जमतात.तसेच सवाष्ण भोजन व कुमारीका भोजन घातले जाते.आष्टमीला तर जागर करीत
देवीची गाणी म्हणत मनमुराद स्रिया या सणाचा आनंद मोठ्या भक्ती भावाने लुटतात.नवचैतन्याचे व आनंदाचे वातावरण असते.जरी नऊ दिवसांचे उपवास असले तरी एक वेगळी च शक्ती व समाधान असते.ही देवीवरील अढळ श्रद्धा. कारण आपल्या भारतात स्री शक्तीला फार महत्त्व आहे.
या नवरात्रोत्सवात घरोघरी आदिशक्तीची घटस्थापना केली जाते.रोज घटाला पिवळ्याधमक खुरासण्यांच्या फुलांची माळ घातली जाते. तसेच शप्तशतीचे पाठ, स्री सुक्त यांचे पारायणे केली जातात. सुवासिणी हळदीकुंकवाचे कार्यक्रम करतात. आष्टमीला देवीचा जागर करून रात्र गाणी म्हणत जागतात.त्या दिवशी देवीला कडाकण्यांची माळ घातली जाते. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगाच्या सांड्या नेसून देवीची नऊ रूपे मानली जातात. या उत्सवाची सांगताही विजया दशमीच्या दिमाखदार सणाने होते. हा सण साडे तीन मुहूर्तापैकी एक उत्तम मुहूर्त आहे. राम वनवासाहून आले व रावणाचा वध केला .आणि देवीनेही महिषासुरासारख्या वाईट शक्ती चा राक्षसाचा वध केला .म्हणून हा आनंदोत्सव म्हणजे दसरा. या दिवशी सोने म्हणून आपट्यांची पाने देवून एकमेकांच्या प्रेम भावना जपतात.
अशा आदिशक्तीच्या स्री सामर्थ्याचं रूप विराट आहे. ही नारायणी मंगलमय व सौख्य दायक आहे. ही अन्यायाला ठेचणारी तर नवचैतन्याचं तेज झळकणारी रणचंडिका आदिशक्ती महान आहे. हिच्या कृपेचा वरद हस्त सदैव आपल्या मस्तकी असू दे.हिचा निवास आपल्या घरात व मनमंदिरी नित राहो.हीच आदिशक्ती आंबेला आमची प्रार्थना आहे.
आई मागेन मी सत्कर्माचा जोगवा
मुखी गाईन तव सामर्थ्य्याचा गोडवा..
आई ऊदे गं अंबाबाई
ऊदे ऊदे गं अंबाबाई.
पुष्पा सदाकाळ भोसरी
@ 50.9011659747.
=====================================
[10/2, 7:26 PM] +91 99752 32602
*मी महात्मा गांधी बोलतोय*
हो मि महात्मा गांधी बोलतोय मि तुमच्याशी बरेच बोलणार आहे पण माझ्या विषयी थोड़ जाणून घेऊ आगोदर कारण आता पुस्तकात माझा जीव घुटमरतोय तुमच्या आचरणात मला थोड़ी जागा द्या.
माझा जन्म 2 ओक्टम्बर 1869 ला पोतबंदरला करमचंद व पुतळीबाईच्या पोटी झाला. माझ्या वडिलांना चार बायका होत्या त्यात माझी आई शेवटची. माझ्या आईला एक मुलगी व तीन मूल त्यात मि शेवटचा.
माझे वडिल सत्यप्रिय, धिट, उदार, अहिंसक होते माझ्यावर लहानपणी या बाबिंच संस्कार झाले.
वडिलांना कबा गांधी सुध्दा म्हणत. आई खुप साध्वी होती भाविक होती. पूजा पाठ नीत्यचा त्यात खण्ड नसे ति आजारीही असताना सुद्धा. ति व्यवहार कुशल होती.
मि वयाचा तेरा वर्षाचा असताना कस्तूरबा सोबत माझ लग्न झाल. 1887 ला मैट्रिक झाली. त्यानंतर मि कॉलेज साठी भावनगर ला आलो. नंतर मि विलायतेत जाऊन बैरिस्टर झालो. पीटर मारीतझबर्गला मला अपमानागस्त वागणूक मिळाली मला चालत्या ट्रेन माधुन बाहेर काडल गेल कारण मि कृष्ण वर्णीय श्वेतवर्णीय डब्यातुन का प्रवास करतोय आणि मला या गोष्टिचा खुप क्रोध आला पन मि अहिंसक आंदोलन करून तो हक्क मिळवला.1893 ते 1913 दरम्यान मि आफ्रीकेत होतो.
नंतर मि भारतात परतलो भारतात गरीबी, भुखमारी , परातंत्र आश्या समस्यात होता. मि प्रथम लोकमान्य टिळक व नंतर गोखलेंचि भेट घेतली. एक दोन वर्ष पूर्ण भारत भ्रमण केलो. कोलकत्याच्या महासभेत सामिल झालो.प्रथम खेड व चम्पारण्यच सत्याग्रह केलो. तिथील शेतकऱ्यांना शोषण मुक्त करण्यात भारतीय बांधवानि मदत केलि.
जालियनवाला बाग हत्याकांडा नंतर 1920 ला असहयोग आंदोलन, 1930 ला दांडी यात्रा, 1942 भारत छोडो आंदोलनात देश बांधवांनि महत्वपूर्ण योगदान दिल. हिन्दू मुस्लिम समाजात एक्य साधन्याचा प्रयत्न केला. 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र मिळाल जे माझ्या जिवनाच मुख्य उद्देश् होता. या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिल. लहान, तरुण, प्रत्येकांनीच जीव ओतला.
सत्य, अहिंसा, प्रेम हे माझे मूळ मंत्र होते.
पण आताच्या माझ्या भारतात या गोष्टिची खुप कमतरता दिसते. अजूनही खुप हिंसा, गरीबी, जातीयवाद, भ्रष्टाचार आहे तुमच्यातला गांधी जागृत झाला पाहिजे. पुस्तकातुन आचरणात आलो पाहिजे. मोफत भेटलल स्वतंत्र नाही हे. तुमच्या प्रत्येक चांगल्या निर्णयाला माझा पाठिंबा असेल पन ति गोष्ट चांगुलपणा तुमच्या पासून सुरुवात करा लोक आपोआप जोडत जातील. माझे विचार जगले. धर्मिक एक्य ठेवा तुमच्या शक्तिचा दुरुपयोग होवु देवु नका. मि खेडयाकड चला म्हणालो पण आता खेडयांची आता खुप दुर्दशा झाली आहे, विकास तिथ पोहचला पाहिजे. गरीब श्रीमंत दरी मिटलि पाहिजे. स्वच्छेतेलाही प्रधान्य दिल पाहिजे.
30 जानेवारी 1948 ला तुमच्या बापूची माझी हत्या करण्यात आली दुःख याच होत की त्याच्या नावात *राम* होता आचरणात नव्हता.
अमोल अलगुडे
स क्र 51
=====================================
[10/2, 7:27 PM]
+91 75888 76539
🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀
*साहित्य दरबार वैचारिकलेख माला*
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*मी महात्मा गांधी बोलतोय*
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
नमस्कार .मी महात्मा गांधी .मी 2 आॕक्टोबर 1869 ला पोरबंदर येथे जन्मलो.
तसं पाहीलं तर माझं दीर्घ आयुष्य द.अफ्रिकेत गेलं जिथं माझी वैचारिक व सामाजिक बैठक बसली.
माझे लग्न कस्तुरबाशी झाले.तिने मात्र मला मोलाची साथ दिली.अहिंसा हा माझा मुळापासूनचा विचार.इनर टेंपलला इंग्लंडमध्ये राहून बँरीस्टर बनलो.भारतात येऊन चंपारण्यातील शेतकऱ्यांना एकजूट केले.लढा अहिंसकतेने कसा द्यावा हे त्याना शिकवले.कोणताही लढा मला हिंसा न करता शांततेच्या मार्गाने करावे असे वाटायचे.तसेच करत गेलो.माझ्या भारतातील जनतेला जोपर्यंत अंगभर वस्र मिळणार नाही तोपर्यंत मी ही अःगभर कपडे घालणार नाही असा वसाच घेतला तो हयातभर पाळला.
सर्व आयुष्य सत्याच्या शोधासाठी वेचले.माझ्या दृष्टीने सत्य हाच परमेश्वर .अनेक ध्ये मी अशी उराशी बाळगली ज्यासाठी मी जीव द्यायला तयार आसायचो.पण असं एकही ध्येय नाही ठेवलंज्यासाठी इतरांचा जीव धोक्यात पडेल.सत्याग्रह केले .दांडी यात्रा काढून मीठाचा कायदा मोडला.
आयुष्यभर स्वतःची कामे स्वतःकरत आलो.माणसाने आपल्या तत्वाशी प्रामाणिक राहावे असा माझा अट्टहास असायचा.माझ्या या अशा चांगल्या आचरणामुळे की काय रविंद्रनाथानी मला *महात्मा* आसे संबोधून जणू माझ्यावर आदर्शवत वागावे असा नैतिक भार माझ्यावर टाकला.यामुळेच मला नेताजी सुभाषचंद्र बोसानी मला राष्ट्रपिता संबोधले.मी त्या सर्व महान व्यक्तिनी टाकलेल्या जबाबदाऱ्या अंतःकरणापासून पार पाडत गेलो.गरिबी निर्मुलन , अर्थिक स्वावलंबन ,सर्वधर्म समभाव ,अस्पृश्यता या बाबींच्या निवारणासाठी लढत राहिलो .काय कोणास ठाऊक एका माथेफिरुने मला ठार मारले.देहआनंदाने त्यागला .विशेष म्हणजे देह ठेवताना तोंडून भगवंताचेच नाव आले .स्वातंत्र्यानंतर तरी तुम्ही सर्व आनंदाने राहाल असे वाटले.पण तसे दिसत नाही.अमर्याद त्याग, पक्ष सांभाळणे खूप खूप केले पण त्यांचे चांगले परिणाम दिसत नाहीत.
सगळीकडे भ्रष्टाचार बोकाळलाय.राजकीय पक्ष नैतिकता सोडून कीतीही खालच्या थराचे राजकारण करत आहेत .स्त्री ला कीती मानाचे स्थान पण तिला लंकेची पार्वती करणे पिहून डोळ्यात पाणी येत आहे.सामाजिक विषमता पाहून मन विषण्ण होत आहे .काय स्वातंत्र्याची कींमत केली बाबा !पांडुरंगा क्षमा कर बाबा ह्या माझ्या अज्ञानी लोकांना .धर्मांध झालेत भ्रष्ट समाज हे पाहून अत्यंत वाईट वाटतय.
जिकडे तिकडे स्वार्थ बोकाळला.खरच मनाला समाधान वाटतय मी आज तूमच्या या अपराधात!अरे स्वातंत्र्याची कीमत ठेवा रे बाबानो.अरे त्यासाठी आम्ही आमचा सांसार सोडला .सुख त्यागले .आपल्या मुळ कर्तव्यापासून पाठ फीरवू नका.भारतमातेला सांभाळा .तिचा मान राखा.फार कष्टाने ती स्वतंत्र झालीय. बंधूभावाने राहा.स्त्रीयांचा मान ठेवा .प्रत्येकाविषयी आदर बाळगा !.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
चौधरी बालाजी सर लातूर
स. क्र. 82
=====================================
🙏🏻महिमा दुर्गेचा🙏🏻
*नवरात्र विशेष*✍🏻.....
*महर्षि अंभृणाची वाक् कन्या ज्ञानवंत जे |
देवी स्वरुप ती झाली तीचे उद्गार सूक्त हे ||*
आपल्या जीवनात कुलदेवतेचे स्थान हे सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे.
आजच्या धावपळीच्या युगात स्थलांतरमुळे नोकरी, व्यवसाय निमित्याने अनेक कुटुंबमधे आपल्या कुलदेवतेची माहिती नसते, तीची सेवा ती वेळीच आपल्या कडून करवून घेते,
तीच अनेक रुपे घेऊन आपले विघ्न दूर करते.
तीच दुर्गा शक्ती प्रसंगी कशी धाऊन येते??
जगात तामसी व क्रूर लोकांची संख्या वाढली की सज्जन लोकांना त्रास देऊ लागतात त्यावेळी दुर्गेला धरतीवर कोणत्याही रूपाने अवतीर्ण व्हावे लागते.
दुष्टांच्या निर्दालनासाठी देवीने अनेक अवतार घेतलेले दिसू न येते.....
तिच्या या कर्तुत्वबद्दल तीचे स्तवन व स्मरण करण्यासाठी नऊरात्र साजरे केले जाते.....सप्तशती मधे देवीचे उद्गार ऐकायला मिळते....... "मी तुमच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर राहीन, संकटकालीन मी अनन्यभावाने जो मला शरण येतो त्यास दुःख मुक्त करेलच***"
तीचे प्रत्येक रात्रीचे रुपे***1) शैलपुत्री* 2) ब्रह्मचारिणी* 3) चंद्रघंटा* 4) कुष्मांदा* 5) स्कन्दमाता* 6) कात्यायनी* 7) कालरात्री* 8) चामुंडा* 9) सिद्धीदात्री*** .
अशी ही दुर्गेची ओळख**.
यावरून सिद्ध होते की, कोणीही आजच्या युगातील स्त्री शक्तीला दुर्गेसमान जाणावे, तीचा महिमा अपरंपार आहे, ती कोणत्याही स्त्री मधे कुठल्याही रुपात अवतरण घेऊ शकते.**कारण ती सर्व रुपिणी आहे, परमेश्वरी रूपाने ती दैत्याचा आज खरा नाश करीत आहे.
*अर्नवी स्त्रियांमधे सृष्टीरुपे निरंतर*
सौम्य--सौम्यतरामाजी तू सौम्य अती सुंदर |
सत्या--सत्यात जी शक्ती ती तूच सर्वरूपिणी ||
*दुर्गाई* तुझी शक्ति या सृष्टित अशीच निरंतर राहो.
*तू स्वाहा, तू स्वधा देवी वषट्कार स्वरात्मिका
सुधा तू अक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता |
★★★★★
✨वृषाली वानखड़े✍🏻....
🌴अमरावती✨75✨
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🏻
=====================================
[10/2, 8:08 PM] +91 98603 14260
स्पर्धेसाठी
******
आश्विन शुध्द प्रतिपदा ते आश्विन शुध्द दशमीपर्यंतचा काळ म्हणजे नवरात्र.
आदिमाया ,आदिमाता, भगवती ,कालीमाता ,सरस्वती महालक्ष्मी, दुर्गा, ,शैलपुत्री सिध्दादात्री अशा विविधा नावांनी हिचे पूजन होते.
दक्ष कन्या सती हिला नि शंकराला यज्ञासाठी पित्याने आमंत्रित केले नाही.शंकरांनी जाऊ नये असे सांगूनही हट्टाने सती माहेरी गेली तिथे तिचा अपमान झाला म्हणून तिने यज्ञात उडी घेतली शंकरांना हे समजताच घनघोर युध्द झाले .सतीचे शरीर आकाशमार्गे शंकर घेऊन जात असता तिचे शिर पद असे अवयव जिथे जिथे पडले ती ५१ शक्तीपीठे म्हणून ओळखली जातात
पुढे ती शैलपुत्री म्हाणून पार्वती म्हणून जन्माला आली त्या त्या जन्मात तिने शंकरालाच वरले.
शिव आणि शक्ती यांचे मिलन झाले. शिवाविना शक्ती, शक्तीविना शिव अधुरे आहेत
ज्या ज्या वेळी अनाचार माजला त्या त्या वेळी देवीने जन्म घेऊन असूरांचे पारिपत्य केले.
महिषासूर शुंभ निशुंभ रक्तबीज आदि असूरांचे निर्दालन केले महालक्ष्मी सरस्वती काली दुर्गावातार धारण करुन तिने भक्तरक्षण केले.
देवीची साडेतीनपीठे महाराष्ट्रात आहेत कोल्हापूरची करवीरवासिनी महालक्ष्मी , तुळजापूरची भवानी माहूरची रेणूकामाता आणि वणीची सप्तशृंगी ही ती होत.
देवीचे पूजन करुन तिला नऊ दिवस रोज माळ अखंड दिवा असे भक्तजन करत असतात तिचे दर्दशन कुमारिकापूजन उपवास करतात दस-याला देवी सिमोल्लंघनाला निघते
रात्री जागरण केले जाते गरबा भोंडला अशा स्वरुपातही तिची भक्ती केली जाते श्रीसूक्त देवीभागवत सप्तशती होमहवन करुन दस-याला सीमोल्लंघन करतात
असा हा कुलदेवतेचा कुळाचार घरोघरी आसतो अलीकडे हा उत्सव सार्वजनिकही झालाय,
प्राची देशपांडे
समूहक्र१५
=====================================
[10/2, 8:11 PM] +91 94231 53509
मी महात्मा गांधी बोलतोय....
मी, गांधी...कोणी महात्मा म्हणतं... कोणी बापु......
मिस्टर गांधी म्हटलेलं मला जास्त आवडायचं कारण हे संबोधन दिले होते ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी.
मला वाटायचं मी राष्ट्रपिता, मी बापु पण.....
अस्पृश्यांचा खरा बाप होता तो बाबा साहेब.... याची प्रचिती मला आली ती १९३२ ला. याच वर्षी माझा पुनर्जन्म झाला असे मला वाटते.
माझे उपोषण शस्त्र मी आंबेडकरांवर पुणे करारा साठी वापरले मात्र ते माझा अखेर करणार की काय असे वाटत होते. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी करारावर स्वाक्षरी केली आणि मी स्वातंत्र्य पाहण्यासाठी जीवंत राहीलो.
भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी प्राथमिक हालचाल म्हणून गोलमेज परिषदा लंडनला होत होत्या. दुसरी गोलमेज परिषद आटोपली आंबेडकरांनी आस्पृश्य समाजासाठी विधिव मागण्या मांडल्या मतदानाचा अधिकार मागीतला. मला वाटलं मी या समाजाला हरिजन नाव दिल्याने समस्या सुटतील मात्र खरी जाणीव होती ती आंबेडकरांना.
अस्पृश्यांचा बाप आमचा बाप आमच्या साठी काही घेवून आला म्हणून २९ जाने. १९३२ ला मुंबई बंदरात देशवासीयांनी काय गर्दी केली होती. लंडन पर्यंत ही राजकीय बाब गेली अन निवाडा साठी लंडहुन लॉर्ड लोथियन आले. लोथियन समितीने देशभर दौरा केला अन बाबासाहेब त्याच वेळस देशाचे बाबा झाले. प्रत्येक ठिकाणी त्यांचा जयजयकार होत होता.
त्यांच्या महत्वाच्या मागण्या होत्या अस्पृश्यांना दुहेरी मतदान अधिकार आणि स्वतंत्र मतदार संघ. जर त्या समितीने या मागण्या मान्य केल्या तर.....
राजकिय वातावरण तापले, पुढे मला केले अन् १९ सप्टेंबर १९३२ ला पुण्यात उपोषण सुरु करण्या आधी आंबेडकरांना या मागण्या मागे घेण्याची विनंती केली, करारी आंबेडकर समाजापुढे व देशापुढे कोणाचाच विचार करणार नव्हते. २० सप्टेंबर ला मी उपोषण सुरू केले वया मुळे प्रकृती ढासाळली वातावरण तापले. तीनच दिवसात अस्पृश्य समाजावरही हल्ले होवू लागले. अखेर समाजच राहीला नाही तर.....
बाबासाहेबांना २४ सप्टेंबरला शनिवारी पुणे करारावर स्वाक्षरी करावी लागली. १४८ जागा राखीव व आणखी १०% जागा निश्चित झाल्या. निघताना आंबेडकर मला "या वयात शरीराला त्रास देवू नका ," म्हणाले. मी हारलो होतो का? माझी ही एवढी काळजी? राष्ट्रभक्त हेच तर होते अन् माझी काळजी घेवून माझेही ते बाबा झाले.
काळाच्या ओघात स्वातंत्र मिळून माझा खून झाला तेंव्हा सर्वाधिक दुःख याच बाबाला झाले होते. असो....
माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले राजकीय दबावात निर्णय घेताना खरंच मी चुकलो का मात्र आज वाटतं काळ बदलता आला असता तर ....
त्या मागण्या मी मान्य केल्या असत्या तर...... त्या त्या वेळचे तसे निर्णय घ्यावे लागतात.....
आज तुम्हीं माझा जन्म दिन साजरा करताय , त्या गडबडीत मला नव्या जन्माची देणगी देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ही आपण आठवण ठेवावी म्हणून मन मोकळं केलं, आता बरं वाटतयं.....
किशोर झोटे @32
औरंगाबाद.
=====================================
.................. धन्यवाद ................
No comments:
Post a Comment