Friday, 28 October 2016

मनमोहनी गालावरची खळी

📕 *साहित्य दर्पण व्दारा आयोजित* 📕
  ****************************
            *नाद चारोळी स्पर्धा*
*विषय : - मनमोहिनी  गालावरची खळी*
****************************
  

*नाद चारोळी स्पर्धा*
🌸🌸🌸🌸🌸
तुझ्या भावस्पर्शाने
मनाची वाढते काहिली..!
गोड हसता पडते खळी ,
गालावरती दिसते लाली..!!
       गजानन पवार @81

नाद चारोळी स्पर्धेसाठी ::
मनमोहिनी गालावरची खळी
मनोमन प्रीतीची खुलवी कळी
सौंदर्य वर्धिनी स्मितचिन्हे चळी
शरण लक्षणे वेगळी न कळी
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे
मो. 9890567468
@39

।।स्पर्धेसाठी।।

सखे तू मनमोहीनी मनभाविनी
मज खुणावते तव गालावरची खळी
कसा आवरू गं मी मन पाखरू माझे
चांदण्यांनी शिंपडला सडा जणू प्रात:काळी।

सौ.मनिषा वाणी.
सुरत.२७.१०.२०१६.
०९४२६८१०१०९.

नादचारोळी स्पर्धा

मनमोहिनी गालावरची खळी
आठवण करुन जाते प्रत्येकवेळी
लडीवाळ बोलणे ,नी काया बोलकी
लाख नखरे ,तुझी अदाच निराळी.

घनश्याम बोह्राडे बुलडाना
समुह क्रमांक 19

*स्पर्धेसाठी चारोळी*

🌹🌹 *स्पर्धेसाठी*🌹🌹

~~~~~~~~~~~~~~~~
  रणरागिणी जशी तू  घायाळ करीसी मजला
कसे सांगू कुणा ? केला तू काय गुन्हा,
हसते तेव्हा काळजाचा चुकतो ठोका
मनमोहिनी कोपरखळी  गालावरी मज खुणविते पुन्हा पुन्हा .

~~~~~~~~~~~~~~~~~
*मंजुषा देशमुख*  *@36*
*९४२२८८४१४०*
*अमरावती*

नाद चारोळी स्पर्धा

मन पाखरू होवून ग सखे
पहा कसे भीर भीर भीरभीरले
मनमोहिनी गालावरची खळी तुझ्या
तेथेच ग ते स्थीर स्थीर स्थीरावले

किशोर झोटे@32
औरंगाबाद.
☝ स्पर्धासाठी☝

*नादचारोळी स्पर्धेसाठी*

तुझ्या जन्माने मन माझे सुखावले
मनमोहिनी तू जीवन माझे फुलविले
पाहता गालावरची खळी तुझ्या
हास्य माझ्या मुखावर अलगद विसावले.

✍ *सुवर्णविलास (40)

••••••••••••••••••••••••••••••
*मनमोहीनी गालावरची खळी*
•••••••••••••••••••••••••••••••

*तुझ्या गालावरच्या खळीवर* *मनमोहीनी जीव माझा झुरतो गं*
*मनमोहक तुझे हास्य जणु* *गुलाबपुष्प पाकळ्यासम* *भासते गं*

*❎स्पर्धेस नाही❎*

*कल्पना जगदाळे घिगे@8★बीड

गालावरची खळी
करते मने खुळी
भले लागती गळी
आमिषे गात्रे लुळी
:बाबू डिसोजा
निगडी, पुणे
@39

मनमोहिनी खळी
तुझ्या गालावरची
सौंदर्य लुब्धा कळी
संभावित घरची
:बाबू डिसोजा
निगडी, पुणे
@39

ग, हंसरी मोकळी
खुळावते या जीवा
गालावरची खळी
उजळी प्रीत दिवा
:बाबू डिसोजा
निगडी, पुणे
@39

*अलगद सावरायची तु सखे*
*तुझ्यागालावरची ती खळी*
*मनमोहिनी रूपाने तुझ्या*
*मनाचा झाला असा बळी*

*अनिल रेड्डी* ( *लातूर*)
✍🏻✍🏻✍🏻✍🏻@ 56

*तुझ्या गालावरची खळी*

*मनमोहीनी घायाळ करते मला*

*पुन्हा पुन्हा हसवून*

*किती छळतेस गं मला*

*❎स्पर्धेस नाही❎*

*कल्पना जगदाळे घिगे@8★बीड*

सौंदर्याचा मानबिंदू ती
मनमोहक गालावरची खळी
अबोध निष्पाप मानिनी तू
असेल का माझ्या भाळी
........नीता आंधळे..२२

🎯नाद चारोळी स्पर्धा🎯

सुवर्णकमले तुझी लागली अंगणी
आभाळभर सुख असू दे तुझ्या भाळी
  निरागस हास्य पाहता तुझे सानुले
मनमोहुन घेते तुझ्या गालावरची खळी

जोगदंड जयश्री
62....

🌿नाद चारोळी स्पर्धा 🌿

🌺भाग --- 28 वा

रूपसुंदरी लावण्यवती तू

दिसतेस जशी की ऊर्वशी

*गालावरची खळी* बनवी तुला

*मनमोहिनी* अप्सराच जशी

@  २१. सुनिल बेंडे
    *नाथसेवक*
  

ईश्वराच वरदान खळी
मनमोहक गालावरती
नजर माझी बांधून ठेवते
हस-या तुझ्या मुखड्यावरती
........नीता आंधळे..२२

स्पर्धेसाठी
मनमोहिनी तू मनरमणी
गालावरची कळी पाहूनी
नजर हटेना तुझ्यावरुनी
पहात राहिलो भान हरपूनी
प्राची देशपांडे
समूह क्र. १५

🌹नाद चारोळी स्पर्धा 🌹

मनमोहक तुझी अदा
त्यावर साज ही गालावरची खळी..
सौंदर्यावर तुझ्या झालो मी फिदा
झकास होणार आता आपली दिवाळी..
   -श्री सगर पंढरी@83@
     धर्माबाद (स्पर्धेसाठी)

स्पर्धेसाठी

मन मोहिनी खळी
सागराहुनी खोल....
पाहुनी तुझी खळी
माझा जातोय तोल....

.....निलेश कवडे @44

[10/27, 13:18] ‪+91 97636 67401‬: स्पर्धेसाठी चारोळी
~~~~~~~~~~~
चोरते काळजाला भरदिवसा
गालावरची खळी मनमोहिनी
हस्यात चांदणे भरून आली
झालीस काळजाची स्वामिनी
~~~~~~~~~~~
..... सौ. शशिकला बनकर
@35

हास्य तिचे वेड लावते जीवाला
गालावरची खळी  खुणविते मला
रूप देखणे कामिनी, मनमोहीनी
पाहताच कुणीही विसरे स्वतःला !
✍ पी.नंदकिशोर  आकोट  @43
नादचारोळी स्पर्धेसाठी

स्पर्धेसाठी
**********

मी प्रेम बगीच्याचा माळी
तू सुंदर गुलाबाची कळी...
झालो गं मी प्रेमदिवाणा पाहून
मनमोहिनी तव गालावरची खळी...

**********

55,अश्लेषा मोदी
     सांगोला
 

*साहित़्य दर्पण नाद चारोळी स्पर्धा*

*मनमोहिनी*रुप तुझे
लावी वेड जीवाला
*गालावरची खळी*कशी
शोभुनी दिसते तुजला

       खेडकर सुभद्रा बीड २०
मो नं ९४०३५९३७६४

नादचारोळी स्पर्धा
-----------------------

मनमोहिनी रुप तुझे गं
मन माझे नसे तालावर
वेड लावते जीवास माझ्या
खळी उमटते तुझ्या गालावर !!

       -आबासाहेब निर्मळे.
पेठ वडगांव,कोल्हापुर.
9028090266.
क्र-३१

गालावरच्या खळीला
दृष्ट न लागो कोणाची
मनमोहक हसे तु
रास पडे मोत्यांची
......नीता आंधळे..२२

नादचारोळी स्पर्धेसाठी

मनमोहीनी गाली उगवता
हास्यमोहीत मंजूळ खळी...
चिरतरुन मन प्रसन्न होता
सारी दुनिया भासे आगळी....

रोहिदास होले .....७१
२७/१०/२०१६



*‘मनमोहिनी गालावरची खळी’*


तुझी ही मनमोहिनी,
गालावरची गं खळी।।
दिवसा तर दिवसा,
स्वप्नातही जीव जाळी।।


✒अनिल लांडगे उंडणगाव@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

👆👆स्पर्धेसाठी...👆👆

*नादचारोळी स्पर्धा*
मनमोहिनी गालावरची खळी

"गालावरच्या तुझ्या खळीला
साथ लाभता तारुण्याची,
मुग्ध कळी खुलली
बावन्नकशी लावण्याची"
*संगीता देशमुख@१४*
स्पर्धेसाठी

सानप मीनाई: 📕साहित्य दर्पण व्दारा आयोजित 📕
  ****************************
            नाद चारोळी स्पर्धा
विषय ---- मनमोहिनी  गालावरची खळी
****************************
    भाग ---------अठ्ठाविसावा
    दिनांक ----- 27-- 10---- 2016
***********************
गालावरची तुझी गोड खळी
भासते मज अमृताची वाटी
मनमोहिनी तु प्राणसखी
फिरुनी जन्मेन तुझियासाठी
**************************
मीना सानप  बीड  @ 7
9423715865
स्पर्धेसाठी👆
****************************

*नाद चारोळी*🔺
साहित्य दर्पणचे विषय ख़ास
त्यात स्पर्धा ती नाद चारोळी
पुरुष असो वा स्त्रीला शोभते
मनमोहिनी गालावरची खळी
✍🏼🖊🖋🎯🖋🖊
*श्री .आप्पासाहेब सुरवसे*
_AMKSLWOMIAW_
           *AK47*
❎ _~स्पर्धेसाठी नाही~_❎

☘ नाद चारोळी स्पर्धा ☘
-–----------------------
विषय: मनमोहिनी गालावरची खळी
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
भाग: 28 वा
दिनांक :27/10/2016
*******************
मनमोहिनी सुंदर ती शालिनी,
मनी-स्वप्नी मला तिची आस।।

गालावरच्या खळीने घातली किती मोहिनी,
की, विसरलो मी घेण्यास माझा श्वास।।
********************
सय्यद जावेद, श्रीगोंदा@85
9405404415
☘स्पर्धेसाठी☘
----------------------------

स्पर्धा करीता

मनमोहिनी तू रुपवती
नाजूक तू पुष्पकळी....
तीट लाविले देवाने
तुझ्या गालावरची खळी...॥
:::::::::::::::   💐  ::::::::::::::::
      श्री. हणमंत पडवळ.
     मु.पो. उपळे ( मा.)ता. जि. उस्मानाबाद.
             8698067566. क्र:48.

               १.
मनमोहिनी तू रुपवती
नाजूक तू पुष्पकळी....
तीट लाविले देवाने
तुझ्या गालावरची खळी...॥
                २.
खळी खुलूनी दिसे
गोऱ्या गोऱ्या गालावरची
मनमोहिनी तू गं राणी
सांग कोण्या राजाची...॥
                ३.
मनमोहीनी झाकूनी चाल,
चेहरा तुझा जरासा....
चर्चेचा विषय झाला तूझ्या
गालावरच्या खळीचा...॥
                 ४.
तूझ्या नजरेच्या तिराने
उठल्या काळीज कळा....
मनमोहीनी गालावरच्या
खळीत जीव होई गोळा...॥
                  ५.
मनमोहिनी तू रुपवान
जसे तुझे रुप दिसे छान
गालावरची खळी तुझ्या
जीवा करी बेभान....॥
:::::::::::::::::::::::    :::::::::::::::::::::::::::
          श्री. हणमंत पडवळ.
     मु.पो. उपळे ( मा.)ता. जि. उस्मानाबाद.
             8698067566. क्र:48.

.
🎯नाद-चारोळी🎯
.****************
स्पर्धसाठी
**********
लावण्यवती रूपसुंदरी
सौख्य नांदते तुझ्या भाळी
नभात जशी चांदणी हसे
मनमोहनी गाली पडती  खळी.

मीरा खेडकर @६

🗿 *_नाद चारोळी_*🗿

तुझ्या खळीची ही अदा
मज चढवते प्रेमी धुंदी
माझा मी न राहतो
होतो सैरभैर नि स्वच्छंदी
✍🏼🖊🖋🎯🖋🖊
*श्री आप्पासाहेब सुरवसे*
_AMKSLWOMIAW_
         *AK47*
❎ ~स्पर्धेसाठी नाही~ ❎

नाद चारोळी स्पर्धेसाठी...

हास्यभरी तुज गालावरी,
मादक खळी छान खुलते...!
तुझी हि मनमोहिनी अदा,
ह्रदया माझ्या घायाळ करते...!!

संतोष शेळके ✍🏻 @२४

स्पर्धेसाठी.

मनमोहिनी रूपाची तू खाण

तुझ्या गालावर खळी सुंदर

तव हास्याच मधुर शिंपीन

स्वर्गसुखाचे नंदनवन भूतलावावर .

      पुष्पा सदाकाळ. भोसरी
    @ 50.9011659747.

📕 *साहित्य दर्पण व्दारा आयोजित* 📕
  ****************************
            *नाद चारोळी स्पर्धा*
*विषय : - मनमोहिनी  गालावरची खळी*
****************************
    भाग ---------अठ्ठाविसावा
    दिनांक ----- 27-- 10---- 2016
***********************
*पहीला दिवा आज लागला दारी,*
*सुखाची किरणे येई तव घरी,*
*मनमोहिनीच्या गालावरती*
*खुलता खळी दिसे ती साजरी*
**************************
*अनिल रेड्डी* ( *लातूर*)
*9552482369*@ *56*
****************************

शिलवान तू सुंदर मनमोहिनी,
नजरेतील भाव बदलण्याची का ग आली पाळी।।
तुझ्या ग नादखुळीच्या गालावरच्या खळीने,
चंद्रावर तयार झाली ग सौंदर्याची तळी।।
सय्यद जावेद @85

स्पर्धेसाठी....
नयन तुझे मृगासमान
ओठ जणू गुलाब कळी।
घायाळ होतात किती ?
पाहुन गालावरची खळी।।
नरेंद्र म्हस्के , शिरपूर ( धुळे ) 65

स्पर्धेसाठी...✍�

*दिव्यांचा सडा दिसतसे दारा*

*घरा आली मनमोहिनी दिवाळी*

*नवी साडी चोळी घेता गृहलक्ष्मीला*

*खुलते तिच्या गालावरची खळी*

          ✍�प्रणाली काकडे✍�
           समूह क्रमांक pk38

*साहित्य दर्पण प्रस्तुत नाद चारोळी*
➖➖➖➖➖➖➖➖➖
मनमोहिनी रुपसुंदरी
करमेना मज तुझ्यावीना
हट्ट सोड करतो विनवनी
तरी खुलता कळी खुलेना
  
    खेडकर सुभद्रा बीड २०
मो नं ९४०३५९३७६४
स्पर्धेसाठी नाही

****************************
            *नाद चारोळी स्पर्धा*
*विषय : - मनमोहिनी  गालावरची खळी*
****************************
    भाग ---------अठ्ठाविसावा
    दिनांक ----- 27-- 10---- 2016
*************************

*मोहकता तव वदनावरी*
*पाहूनी गोड खळी गालावरी*
*येता राजलक्ष्मी तुझ्या दारी*
*पाहता रूप तेजस्वी होय विचारी*

**************************
*कल्पना महाडिक* ( *पुणे*)
*9561719195*@ 4
*************************

🌹नाद चारोळी 🌹
🌹स्पर्धेसाठी 🌹
संहार करण्या असूराचा
रुप घेतले मनमोहिनीचे
पायी हरीच्या नाद नुपूराचा
भुलवी रूप गाली खळीचे
*********************
स्नेहलता कुलथे
क्र. 37🌹

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
नाद चारोळी स्पर्धेसाठी

घेते गं प्राण हिरावून माझा,
तुझ्या गालावरची खळी जी मनमोहिनी ..!
मन राहते कुठे आपल्या स्थानी,
भटकते सर्वत्र तुझ्या प्रतिक्षेत वेडा होऊनी..!

                   बंडोपंत कुलकर्णी सोलापूर
                   समूह क्रमांक १३
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

सानप मीनाई: गालावरची खळी पाहुन तुझी
हरखुन गेलो,विसरुन गेलो मला
मनमोहिनी तु ह्दयसम्राज्ञी तु
वेड लागले कसे सांगु तुला
*********-*******************
मीना सानप बीड @ 7
9424716865
स्पर्धेसाठी नाही
----------------------------------------------

🙏🏻
* *स्पर्धेसाठी**🙏🏻

*मनमोहिनी गालावरी खड़ी*🇮🇳✨✨

*गहीवरला साज माझा तुझ्या श्वासात मी अनुरागिनी*

*तू सिमेवरी देशरक्षणा, मी तुझी खरी शुर कामिनी*

*दारी दिप व्याकुळला तुझ्या प्रतीक्षेत विराणी*

*गाली खळी ही कोमेजली विरहात तुझी  उभी मनमोहिनी*

✍🏻वृषाली वानखड़े👈�
🌴अमरावती🌴
★★★★★🇮🇳75🇮🇳★★★★★
***********************

घाबरु नकोस बहिणा मनमोहिनी,
लवकरच येईल घरी धनी।।
गालावर असू दे अशीच खळी,
जी असे त्याच्या मनी।।
@85

मी मनमोहिनी रूपसुंदरी
पण खळी तुझ्या गालावर
माझा राग लगेच जातो
तू नुसतं हसल्यावर

         शैलजा ओव्हाळ/चिलवंत
                  @ 73
              स्पर्धेसाठी

गालावरची खळी
आनंदाची उकळी
प्रसन्न सायंकाळी
येई साजनाची हाळी

... सौ. शशिकला बनकर @35, स्पर्धेसाठी ✖नाही

किती प्रसन्न खुलते खळी
तुझ्या गुलाबी गालावर
मी हरवून जातो स्वतःला
तू खळखळून हसल्यावर ...
     -ऋषिकेश देशमुख
       अनुक्रमांक : ५८

माझ्या गालावरची खळी,
पाहून आला तुझा होकार
सात जन्माची करण्या सफर
स्वीकारले तुज खरोखर

... सौ. शशिकला बनकर
@35
स्पर्धेत नाही

चारोळी स्पर्धा

बेभान झालो पाहुन तुझ्या
मनमोहन गालावरची खळी
कळले आले असता भान होती
वेडयात निघन्याची माझी पाळी
     
                  अमोल अलगुडे
                       स क्र 51

🎼नादचारोळी🎼
चिवडा झाला,चकली झाली
झाले मोतीचुर अन् बुंदीकळी
सजनाच्या हाती पैठणी पाहुन
खुलली गालावरची खळी!(स्पर्धेसाठी)

संगीता भांडवले
वाशी, उस्मानाबाद
@१६

*💥नाद चारोळी💥*
••••••••••••••••••••••••••••••
*मनमोहीनी गालावरची खळी*
•••••••••••••••••••••••••••••••

*मनमोहीनी गालावरच्या खळीस*
*इंग्रजीत म्हणतात गं डिंपल*
*तूच माझी दिपीका,प्रिती झिंटा*
*असेल तू कितीही सिंम्पल*

         *👆🏿स्पर्धेस👆🏿*

*कल्पना जगदाळे घिगे@8★बीड*

📕 *साहित्य दर्पण व्दारा आयोजित* 📕
  ****************************
            *नाद चारोळी स्पर्धा*
*विषय : - मनमोहिनी  गालावरची खळी*
****************************
    भाग ---------अठ्ठाविसावा
    दिनांक ----- 27-- 10---- 2016
***********************
*गाली खुलता तुझ्या खळी*
*वादळ उठते माझ्या मनी*
*दिसते मनमोहीनी लाखात*
*एक जशी इंद्राची पटराणी*
**************************
*अनिल रेड्डी* ( *लातूर*)
*9552482369*@ *56*
**********************

नादचारोळी स्पर्धेसाठी
🌠🌠🌠🌠🌠🌠

मनमोहिनी तुझी
गालावरची खळीj
बावरलेय मन आज
पहिल्याच वेळी

योगिनी चॅटर्जी #52
🎆🎆🎆🎆🎆🎆🎆

सर्व सहभागी स्पर्धकांचे आभार 💐💐🙏🏻

धन्यवाद..

No comments:

Post a Comment