साहित्य दर्पण Whatsapp ग्रुप
द्वारा आयोजित
~नाद चारोळी स्पर्धा~
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
भाग :- *25 वा-पंचविसावा*
^^^^^^^^^^^^^^^^^
दिनांक - _06 ऑक्टोबर 2016_
वार - गुरूवार
~~~~~~~~~~~~~~~~
वेळ - सकाळी 09:00 am ते सायंकाळी 7:00pm
==================
*विषय* :-: ↓↓↓↓
^^^^^^^^^^^^^^^^^
दिनांक - _06 ऑक्टोबर 2016_
वार - गुरूवार
~~~~~~~~~~~~~~~~
वेळ - सकाळी 09:00 am ते सायंकाळी 7:00pm
==================
*विषय* :-: ↓↓↓↓
*सहवास तुझा माझा*
किंवा
*तू तिथं मी*
==================
संकल्पना :→प्रा संगीता भालसिंग अहमदनगर
*********************
संयोजक--:-
आप्पासाहेब सुरवसे बीड -उस्मानाबाद
*********************
*वृषाली वानखडे अमरावती*
""''''''''''""""'''''''''''''''''''''''''
संकलक -→संतोष शेळके मुंबई
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
ग्राफिक्स -अनिल लांडगे सर औरंगाबाद
''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
स्पर्धेचे नियम -
*ग्रुप मधील व्यक्तींनी पुन्हा व्ययक्तिक एडमिन यांना चारोळी पाठवू नये.*
किंवा
*तू तिथं मी*
==================
संकल्पना :→प्रा संगीता भालसिंग अहमदनगर
*********************
संयोजक--:-
आप्पासाहेब सुरवसे बीड -उस्मानाबाद
*********************
*वृषाली वानखडे अमरावती*
""''''''''''""""'''''''''''''''''''''''''
संकलक -→संतोष शेळके मुंबई
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
ग्राफिक्स -अनिल लांडगे सर औरंगाबाद
''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
स्पर्धेचे नियम -
*ग्रुप मधील व्यक्तींनी पुन्हा व्ययक्तिक एडमिन यांना चारोळी पाठवू नये.*
ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे....
जास्तीत जास्त फक्त पाच चारोळी पोस्ट करण्याची मुभा आहे .
जास्तीत जास्त फक्त पाच चारोळी पोस्ट करण्याची मुभा आहे .
पाच पैकी फक्त एकाच चारोळी खाली "स्पर्धेसाठी" असा उल्लेख करणे आवश्यक आहे.
चारोळीखाली आपले पूर्ण नाव, गाव आणि मोबाईल नंबर अवश्य लिहावे.
चारोळी मध्ये विषयातील शब्द असावेत.
चारोळीत दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत यमक असावे.
या स्पर्धेचा निकाल ग्राफिक्स सह खालील blog वर आणि साहित्य दर्पण वर पाहण्यास दिनांक *_07 ऑक्टोबर2016_* रोजी रात्री ठीक _9:00 Pm_ वाजता मिळेल. त्यासाठी वारंवार चौकशी करु नये.
साहित्य दर्पण ग्रूपच्या बाहेरील कवी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात...
त्यासाठी .
खालील पैकी कोणत्याही एका मोबाईल नंबरवर किंवा फ़ेसबुक वर आपली चारोळी पोस्ट करावी
*नासा येवतीकर, धर्माबाद*
09423625769
09423625769
*मारुती खुडे सर ,माहुर*
9823922702
श्री. आप्पासाहेब सुरवसे
9403725973
9403725973
[10/6, 19:31] santosh shelke: 📚 *साहित्य दर्पण* 📚
~आयोजित नाद चारोळी स्पर्धा~
भाग - २५ वा
🌷 सहवास तुझा माझा 🌷
किंवा
~~~~~~~~~~~~~~~
सहवास तुझा माझा
रूपेरी बंध बांधून गेला...
त्या क्षणास जीवनाला
नव्या नात्याचे नाव देवून गेला.....
*_कल्पना जगदाळे@8★बीड_*
❎स्पर्धेसाठी नाही❎
🙏स्पर्धेसाठी नाही 🙏
तुझ्या स्वप्नात मी **
तुझ्या स्पंधनात मी **
तुझ्या रोमारोमात मी **
म्हणूनच तू तिथे मी **
मीनाक्षी माळकर
" सोबत तुझी-माझी सखे
दोन नयन, एक नजर
'तू तिथं मी' न दिसल्यास
नवरात्री महोत्सवात आपल्या नावाचा गजर"
.........जयश्री पाटील🖌
वसमतनगर
........स्पर्धेसाठी👆🏻
नाद चारोळी स्पर्धा...
देतो सखी तुजला
सुखाची हमी ।
जीवनाची फुलविण्या बाग
तु तिथं मी ।।
नरेंद्र म्हस्के , शिरपूर @ 65
खात्री आहे मला
तु तिथं मी असेन.
सावलीसारखा नाही
अंतरंगी मात्र मीच दिसेन..
घनश्याम बोह्राडे
*स्पर्धेसाठी*
हा *सहवास तुझा माझा* आहे
त्यात गोडी अविरत अविट
पण मधुमेह दुश्मन झाला आहे
त्याची काळजी घ्यावी लागे निट
@ २१ सुनिल बेंडे
*नाथसेवक*
नाद चारोळी स्पर्धेसाठी
थोडा होता जरी
सहवास तुझा माझा
आठवण येता आता
कंठ दाटतो माझा
अमोल अलगुडे
स क्र 51
स्पर्धेसाठी नाही
रंगात रंगला होता
सहवास तुझा माझा
लागली दृष्ट अशी
संपला प्रवास तुझा माझा
अमोल अलगुडे
स क्र 51
तू तिथं मी,ऑनलाइन सहवास तुझा हवाहवासा
हा होतो भास मला सदान कदा
विसरू नको तुझ्याच शब्दांना
कारण अखंड *मितवा*चा केलास वादा
*श्री . आप्पासाहेब सुरवसे*
_AMKSLWOMIAW_
*@47*
❎ ~स्पर्धेसाठी नाही~ ❎
स्पर्धेसाठी...
आयुष्यास आहे विश्वास तुझा माझा
किती सुखद आहे प्रवास तुझा माझा
वाटे संपूच नये ही घटिका जीवनाची
श्वासाची स्पंदने सहवास तुझा माझा..
निर्मला सोनी.
(28)
अतूट सहवास तुझा माझा
जन्मोंजन्मीचाच आहे
तू तिथं मी असा एक फेरा
सप्तपदीचा घेतला आहे ...
💐💐💐💐💐💐💐💐
प्रा. सौ.संगिता भालसिंग
दि.०६/१०/१६
अहमदनगर
spsfun.com
स्पर्धेत सहभागी नाही
*नाद चारोळी स्पर्धेस*
*सहवास तुझा माझा*
आचंद्र-सूर्य तारे राहील
आयुष्याची सोबत आपली
जन्म-जन्मातरी अशीच राहील
------सुवर्णविलास 60
*स्पर्धेसाठी घ्यावी*
***********************
*तु मनात होतेस कष्टी*
*एकांती मी कुढत झिजतो*
*तिथे तु पावसात उभी अन्*
*मी इथे मनात भिजतो*
- *विनोद गादेकर.* @87
(वाशी.उस्मानाबाद)
......स्पर्धेसाठी ........
सहवास गंध तुझा नी माझा
तेव्हा कुणीच नव्हते दोघांत....
तु तिथे मी वास्तव कल्पना
वावरत होती खुल्याने जगात....
रोहिदास होले ..७१
गोपाळवाडी ,दौंड ,पुणे.
६/१०/२०१६
*नादचारोळी* स्पर्धेसाठी
*तू तिथं मी याने एकात्म,*
*असा तुझा माझा सहवास ..!*
*कितीही संकट भयंकर,*
*तरी स्थिर प्रीतीतील कस ..!*
बंडोपंत कुलकर्णी सोलापूर
समूह क्रमांक १३
१)
तु आलीस माझ्या आयुष्यात
फुलल माझ जीवन...
सहवास तुझा लाभो आयुष्यभर
हेच इश्वराला वंदन...
२)
सहवास तुझा लाभला
विसरून गेलो भान..
फुललि प्रेमकळी जीवनवेलिवर
प्रेमाला आल उधाण..
३)
सहवास तुझा माझा
होता क्षणभंगूर...
ह्रदये गुंतली हृदयात
पण का झालो आपण दूर..
✍श्री सगर पी एच✍
@८३@धर्माबाद(स्पर्धेसाठी नाही)
स्वछंद स्वैरते होऊन मन फुलपाखरू
सुटला ताबा मजवरचा माझा
आठवते रोज मोहरल्या त्या क्षणाला
जिथे लाभला गोड तो सहवास तुझा
जोगदंड जयश्री
@jj62
संसार रूपी सागरात
संसार केला छान
असच घडू दे सत्कार्य
तुझा माझा इतिहास महान.
******************
मीरा खेडकर@(6)बीड
स्पर्धेसाठी
नादचारोळी
***************
१-तुझा माझा सहवास
जन्मोजन्मीचा असावा
तू तिथे मी हाच भाव
दोघांचे मनी ठसावा
प्राची देशपांडे
समूह क्र. १५
*****************************
सख्या तु , तिथे मी, म्हणजे
आनंदाचे प्रेमळ, गोड हास्य
तुझ्या माझ्या सहवासाचे आहे
तेच तर खरेखुरे अगम्य रहस्य
****************************
सौ.मीना सानप बीड @ 7
*‘तु तिथ मी’*
मी जातो जेथे,
तेथे तु नसते।।
करीता बंद नयन,
तु असल्याचे भासते।।
✒अनिल लांडगे उंडणगाव@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050
✖स्पर्धेसाठी नाही...✖
उन्ह -सावलीच्या या खेळात
आयुष्य जगतो झुरून...
तुझ्या माझ्या सहवासाचे क्षण आठवता
डोळे येतात आसवाने भरून..
✍श्री सगर पी एच✍
@८३@धर्माबाद (स्पर्धेसाठी आहे)
[10/6, 20:21] santosh shelke: २- तुझा माझा सहवास
समरस होऊन जगण्याचा
मूर्त रुप यावे नात्याला
आशिर्वाद लाभावा ज्येष्ठांचा
३-तुझा माझा सहवास
असाच राहो निरंतर
कधी न यावे दोघांत
विचारांचे अंतर
४- तुझा माझा सहवास
प्रीतीचा मांगल्याचा
मूर्त रुप आले स्वप्नांना
आशिर्वाद मातापित्यांचा
५-तू तिथे मी ,मी तिथे तू
असा तुझा माझा सहवास
एका क्षणाचाही नको दुरावा
आस हीच माझ्या मनास
प्राची देशपांडे
स्पर्धेसाठी चारोळी
सहवास तुझा माझा नव्हता फार दिवसांचा
गेलास सोडून दूरदेशी कायमचा
रडते घर, रडतात भीती, अन् कोपरे
दिलास ठेवा फक्त मज गोड आठवणींचा
.... सौ. शशिकला बनकर, भोसरी
मंद झुळुक वाऱ्याची
मज सांगून आताच गेली
तूझ्या सहवासाची प्रिये
दिवाळी जवळ आली....॥
श्री. हणमंत पडवळ
48.
स्पधेसाठी
श्वासाची सुरुवात तू
शेवटचा ह्रदयाचा ठोका तू
करीन शिकस्त अखेर पर्यत
असेच सोबत राहू तू तिथे मी
कविता शिंदे
स्पर्धेसाठी.
सहवास तुझा माझा सख्या
अतूट मैत्रीचे घट्ट नाते
महाभारतात देवून तुला साथ
अर्जुना,तुझ्याच साठी गीता जन्म घेते...
पुष्पा सदाकाळ भोसरी
@ 50.9011659747.
सुख विचितेस तू तिथे
हरघडीओंजळीने....
आठवात तुझ्या मी इथे
नशिबी फक्त तळमळणे..॥
श्री. हणमंत पडवळ
स्पर्धेसाठी
सहवास तुझा माझा
आहे जन्मजन्मांतरीचा
झालो जरी शहीद मी
फिरुनी जन्म सैनिकाचा
*******************
स्नेहलता कुलथे
क्र 37
मोबा 7588055882
🙏स्पर्धेसाठी 🙏
सख्या तुझा माझा सहवास,
जसा फूल आणि सुगंध।
आजन्म राहून तू तिथे मी,
फुलवू आपल्या प्रितिचा निशिगंध।
मीनाक्षी माळकर
68
*‘सहवास तुझा-माझा’*
सहवास तुझा-माझा,
खरे सांगू आहे कसा।।
कसे जगावे तूजविना,
माझा श्वास तु जसा।।
✒अनिल लांडगे उंडणगाव@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050
👆👆स्पर्धेसाठी...👆👆
स्पर्धेसाठी
संसार रूपी सागरात
संसार केला छान
असच घडू दे सत्कार्य
तुझा माझा सहवास महान.
मीरा खेडकर@(6)बीड
*नाद चारोळी*
*तू तिथे मी*
"तू तिथे मी असताना
जगणे हे सार्थ आहे,
प्रसवत नसेल संवेदना
तर सहवास हा व्यर्थ आहे"
*संगीता देशमुख@१४*
स्पर्धेसाठी
भासते जीवन हे सुंदर
लाभता तुझा सहवास
मज नेहमी वाटते मनी
तु माझ्या जवळ हवास!
✍पी.नंदकिशोर @43
(स्पर्धेसाठी )
*नादचारोळी स्पर्धा*
सहवास सखीचा
सदा वाटे हवाहवा
जीवनाचा प्रवास
रोज असेल नवानवा
खेडकर सुभद्रा बीड( २०)
मो नं ९४०३५९३७६४
सहवास तुझा माझा, प्रिया!
नात्यांची विण घट्ट विणत गेला
त्या अनमोल क्षणाची खुण
माझ्या काळजात ठेवुन गेला!!(स्पर्धेसाठीची)
संगीता भांडवले
वाशी, उस्मानाबाद
(१६)
मारूती खुडे: सहवास सखे तुझा माझा
बहरत गेला ग क्षणोक्षणी
बंध प्रितीचे घट्ट जुळले
नको दुरावा अाता सजणी
मारुती खुडे
mk@18
🍄 स्पर्धेसाठी 🍄
सुगंध सोबतीचा सख्या
रोज हवाहवासा खास
बहरली जिवनाची बाग
होता तुझा माझा सहवास
योगिनी चॅटर्जी #52
*❎स्पर्धेची नाही❎
*अखंड पर्वणी आहे मातृत्वाची****
*आतुरता वाढली तुला स्पर्शण्याची*****
*जन्म झाल्याच अलगद तुला न्याहळण्याची******
*सहवास अनमोल तुझा---माझा द्रिष्ट नको आता नियतीची****
✍🏻वृषाली वानखड़े🎼
🌴अमरावती🌴*75***
स्पर्धेसाठी...✍
🌹नादचारोळी🌹
*तुझ्या माझ्या अखंड सहवासाला*
*नजर न लागो कुणाची*
*जीवन क्षणभंगुर बुडबुडा पाण्याचा*
*मज्जा वेगळीच तुझ्यासवे जगण्याची*
✍प्रणाली काकडे✍
समूह क्रमांक pk38
नाद चारोळी स्पर्धेसाठी ::
सहवास तुझा माझा
स्वप्न सार्थ झाले वाटे
जरी दिव्य पथ माझा
फुलासम भांसे काटे
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे
39
स्पर्धेसाठी नाही❎❎❎❎❎
जिथं तु तिथं मी
असा जणू ठराव झाला आहे
आपल्याला सोबत पाहण्याचा
इतरांना सराव झाला आहे
✍प्रणाली काकडे✍
समूह क्रमांक pk38
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*नाद चारोळी*
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*स्पर्धेसाठी*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*सहवास असावा तुझा माझा*
*सत्यवान सावित्री सारखा*
*जिव्हाळा त्यात असावा*
*कृष्ण राधेसारखा*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*चौधरी बालाजी सर*
*लातूर* *स*. *क्र*. *82*
तू तिथं मी, मी तिथं तू
एका नाण्याच्या दो बाजू
अलग करिती किंतू
प्रीतीची दे किर्ती गाजू
:बाबू फिलीप डिसोजा
@39
स्पर्धेसाठी .
--------------------
चारोळी स्पर्धा
-----------------
अस्तित्वाने तुझ्या गं
क्षण क्षण होई ताजा
कधीच संपू नये हा
सहवास तुझा माझा !!
आबासाहेब निर्मळे
पेठ वडगांव,कोल्हापूर
9028090266.
क्र-२९.
नाद चारोळी स्पर्धेसाठी चारोळी
भाग - २५ वा
सहवास तुझा नि माझा
जणू जन्मोजन्मीचे नाते ।
जखमांनाही सुगंधी करुनी
आयुष्य जिवनगीत गाते ।।
✍🏻✍©:-कवी अनिकेत जयंतराव देशमुख. (अनु)
रा- गोपालखेड , ता. जि. अकोला.
mo-9689634332
@59
🌹स्पर्धेसाठी🌹
सहवास तुझा माझा
प्रीत आपली सांगून गेला
कळीमध्ये भ्रमर जसा
आजन्म कैद झाला.
🌷नीता आंधळे
स्पर्धेसाठी चारोळी...
सप्तपदीच्या वाटेवर, संसार बहरला
त्यात मिळाला अमुल्य सहवास तुझा..!
अशीच प्रित बहरू दे, कायम आपली
अखंड घडताना जगी , संसार तुझा माझा..!!
_________संतोष शेळके ✍🏻 @24
सख्या तुझ्या सहवासात
कंटक भासते लोणी
सदैव बहरत राहो
प्रेम आपले या जीवनी
श्रुती खडकीकर 61
नाद चारोळी स्पर्धा
हृदयात माझ्या प्रेम तुझे मग,
तू तिथं मी असणारच ना?
लटकेच तूही का रागावतेस?
तुझ्याशिवाय कोण मला सांग ना?
किशोर झोटे@32
औरंगाबाद.
👆स्पर्धासाठी👆
🌷🌷 *चारोळी*🌷🌷
*साहित्य दर्पण*
*स्पर्धेसाठी*
*6/10/2016*
~~~~~~~~~~~~~~~~~
*गंध तो तुझा मला भुलवी*
*देतो जीवनी या स्फुर्ती*
*आजहि निशिगंधा सम दरवळे*
*तुझ्या नी माझ्या सहवासाची हि उर्मी*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*सौ* *मंजुषा देशमुख*
*अमरावती*
*9422884140*
लग्न असे बंधन आहे जेथे
साथ देण्याची मिळते हमी
म्हणूनच सुख असो वा दुःख
आयुष्यभर तू तिथं मी
- नासा 🌹
झळ तुला लागता
हद्यात ऊठते कळ जी
दर्पणात दिसे प्रतिबिंब
भासे तु तिथ मी
🌹नीता आंधळे🌹
......... *नादचारोळी* ...........
तुझ्या सहवासने जीवन माझे
स्वर्गा सारखे सुंदर झाले
पण *विनोदात* का बरे असे
पती-पत्नी चे मिळतात दाखले
- नासा📝
स्पर्धेसाठी ग्राह्य
*नादचारोळी स्पर्धेसाठी*
💑 💑
*संसाररुपी रथाची*
*दोन चाके तू आणि मी*
*करू प्रवास जीवनाचा*
*सदैव राहूनी तू तिथे मी*
78 आशा तेलंगे ठाणे
*तु तिथं मी जणु*
*देह अन् श्वास असे*
*एकमेंकाच्या वियोगाने*
*जीवनाचे अस्तिव नसे*
👆🏿 *स्पर्धेसाठी* 👆🏿
_कल्पना जगदाळे@8★बीड._
संसार रूपी रथाचे
पती-पत्नी दोन चाक आहे
वाद भांडण जर झालं की
तू *तिथे* अन मी इथे आहे
नासा
सर्व सहभागी स्पर्धकांचे आभार......💐💐
No comments:
Post a Comment