Friday, 28 October 2016

रात्र चारोळी

[10/28, 10:36 PM]
ज्यांच्याकडे पैसा आहे
त्यांना आली कुठली महागाई
जे दिसती ते घेती अन
म्हणती मला आहे फार घाई

नासा
[10/28, 10:38 PM]
महागाई एक कारण आहे
खरेदी न करण्याचा
खिशातले पैसे वाचवून
इतराचे मन वळवण्याचा
नासा @26

[10/28, 10:42 PM]
आली आली दिवाळी बघा
आनंद झाला माझ्या मनाला
वर्षातुन एकदा मिळते संधी
सर्व मित्र एकत्र भेटु चला

नासा@26
[10/28, 10:50 PM

खरेदी म्हटले की
पाकिट लपून बसते
उद्या बघू या म्हटले की
बायको रुसुन बसते

😀😀😀😀😀

नासा
[10/28, 10:57 PM]
बायको जाते माहेरी म्हणून
यांना नसते काही टेंशन

यावरून

सेवानिवृत्त झाल्यावर काम संपते
म्हणून सरकार ही देईना पेंशन

🙏�रात्र चारोळी🙏�

1)
श्रीमंत असो वा गरीब,
कोणी कितीही करो घाई।
कोणत्याही पूजनाचे मुहूर्त
सर्वांसाठी सारखेच राही।

2)

दिवाळी येईल पुन्हा पुन्हा।
पैसाही येणार आणि जाणार।
मनसोक्त लूटा आनंद कारण
एकदा गेलेली वेळ पुन्हा नाही येणार।

3)
आयत्या पिठावर रेघोट्या
कोणालाही ओढ़ता येतात।
शून्यातून विश्व निर्मितीसाठी
पराकोटीचे कर्म केले जातात

4)

खरेदी म्हणजे जिव की
प्राण असतो महिलासाठी।
आणि परिवारासाठी काहीतरी
करण सौभाग्य असत पुरुषांसाठी।

5)
उद्या बघू ,उद्या बघू म्हणता पण
तुमचा उद्या काही उजडत च नाही।
मग काय करणार बायको बिचारी?
रुसल्या फुगल्याशिवाय काही कळतच नाही।
 
मीनाक्षी  माळकर
68
🙏�🙏�🙏�💐💐🙏�🙏�🙏

विषय रात्र चारोळी
***********-*****
दिपावलीची मज्जा खरी
ही खरी बात आहे
आनंद लुटल्यास मात्र किती
जणांचे दिवाळं निघत आहे

कल्पना @8
🖊🖊🖊📖🖊🖊🖊

मलाही जमलीय आता
जीवन जगण्याची कला
सुखदुखांच्या हिंदोळ्यावर
समतोल राखुन झुलवतेय झुला

कल्पना@8

🖊🖊🖊📖🖊🖊🖊

बायका पोरांच्या खरेदीत
तो आपला बिचारा
पिशव्या खरेदीच्या वागवून
किती थकला तो त्यासच विचारा

कल्पना@8

🖊🖊🖊📖🖊🖊🖊

ए टी एम जांताना
असते हो भरलेले
बायकोची खरेदी झाल्यास
आमच्यासाठी पैसेच न उरलेले

कल्पना @8
🖊🖊🖊📖🖊🖊🖊

रूसून बसणे हा बहाणा
असतो मनमानी करण्याचा
मनासारखे व्हावे हा तर खरा
गेम असतो त्यामागे वागण्यांचा

कल्पना जगदाळे@8

🖊🖊🖊📖🖊🖊🖊

रात्रचारोळी
[28/10 10:40 pm]

दिपोत्सवाच्या स्वागताला
सजली दारे,सजली अंगणे
पणत्यांचा झगमगाट अन्
आकाशदिव्याचे दारी चांदणे

संगीता भांडवले
@१६

ज्यांच्याकडं पैसा आहे
त्यांना नाही कुठलीच महागाई
हल्ली नातीच झालीत महाग
सणालाही नको असते बाबा-आई !
संगीता भांडवले
@१६

दुकानाची नांव काय सांगताय
जरा दुकानात जा
वहिनिंच्या साडी खरेदीला
जरा हातभार लावत जा !
संगीता भांडवले
@१६

बायको नसते अजब प्राणी
ती तर असते घराची राणी

संगीता भांडवले

उद्या करा अभ्यंग स्नान
लावुन अंगास सुगंधी उटणे
आमच्या हाती मात्र सदा
पोळपाट अन् लाटणे
संगीता भांडवले
@१६

सालभर चारापाण्यासाठी
खिसा झाला आजच रिता
सणावाराला तरी सांभाळावी
मर्जी म्हणुन .....माझा काय गुन्हा व्हता!

संगीता भांडवले
वाशी,उस्मानाबाद
@१६

रात्रचारोळी...

दीपोत्सवाने उजळली रात्र
मांगल्याचा हा सण भारी
चैतन्य वाटे अाज चोहीकडे
दिपावलीची ही मज्जा खरी
  💫💫💫💫💫
अानंदासाठी दिवाळं निघणं
हा तर खरा शुभसंकेत अाहे
जीवनाचे खरे सौख्य लाभ
समाधानात तर दडले अाहे
💫💫💫💫💫💫
महागाईचा एवढा बाऊ
करुण नाही भागणार
हर्ष उह्लासाचा सण हा
मग अानंद कसा लूटणार
   💫💫💫💫💫💫
शेतकरी अन् नौकरदारात
मित्रा फरक जरी असला
अानंद वाटून घेण्यात राजा
त्यात भेदभाव रे कसला
   💫💫💫💫💫
खुश ठेवण्यातच चालली
अनमोल ही जिंदगानी
समजूनच कोणी घेत नाही
नवरोबाची खरी कहाणी
    
      *मारुती खुडे*
          Mk@18

[28/10 11:11 PM] Ghanshyam Borhade: करुन घ्या खरेदी
नको पैशाची चिंता
खाऊन पिऊन घ्या
का महागाईला भिता

घनश्याम बोह्राडे 19
[28/10 11:11 PM] Ghanshyam Borhade: होत आली दर्पण
बंद करण्याची वेळ
अकरा नंतर चाले तो
रात्र चारोळीचा खेळ .

घनश्याम बोह्राडे 19

[10/28, 11:11 PM] Manisha Wani: स्वकष्टाचे मोल अमुल्य असते
पैशा प्रमाणेच ती नातेही जपते
आयत्या बिळावर बसलेल्या नागोबास
पैशांची किंमत कळत नसते।

मनिषा..
@२
[10/28, 11:11 PM] Manisha Wani: धनत्रयोदशी म्हणजे धन्वंतरीची पूजा
लक्ष्मीची प्रार्थना आशिर्वाद घ्यावा
ज्यास लाभेल आरोग्य उत्तम
त्यानेच लक्ष्मीचा हव्यास धरावा।

मनिषा..
@२
[10/28, 11:11 PM] Manisha Wani: तोच येतो बाजारात स्वत:हून
मनात असते वेगळीच भिती
दिला जर बायकोच्या हाती पैसा
कर्ज करून येईल ती पडते ह्याची धास्ती

मनिषा
@२
[10/28, 11:11 PM] Manisha Wani: जो बायकोला खुश ठेवतो
असा नवरा दुर्मिळच असतो
खरेदीच्या तीव्र इच्छे पुढे
बायकांनाही अजिबात धीर नसतो।

मनिषा..
@२
[10/28, 11:11 PM] Manisha Wani: नवरा बदलेल ह्याची वाट
पाहणं सोडून दिलय बायकोने
पायात चप्पल,हातात पर्स
घेवून
तडक मॉल गाठलय बायकोने...

मनिषा..
@२

दिवाळीने पालटले जनजीवन
आनंदाचा ऋतू मोहरला दारी
लक्ष दिव्यांच्या या प्रकाशाने
एका क्षणात दुःख गेली सारी

निर्मला सोनी 28

No comments:

Post a Comment