Tuesday, 18 October 2016

सचित्र चारोळी स्पर्धा

*साहित्यिकमित्रांनो नमस्कार....*

🌻सचित्र दर्पण चारोळी🌻

*साहित्य दर्पण समुह* तर्फे आयोजीत  *सचित्र दर्पण चारोळी* स्पर्धेत  आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. या आनंदी उपक्रमात सर्वानी उत्साहाने सहभाग नोंदवून पुरेपूर आनंद घ्यावा ही अपेक्षा आहे. ..

💐स्पर्धेचा चारोळी पोस्ट करण्याचा कालावधीः..

    मंगळवार-- दि.18 ऑक्टोबर  2016

सकाळी 10 :00ते  सायंकाळी 7 :00 वाजेपर्यंत असेल.

  यानंतर पडलेली चारोळी स्पर्धेत ग्राह्य धरली जाणार नाही...

💐स्पर्धेचा निकाल - 
बुधवार दि=19 ऑक्टोबर 2016 रोजी  देण्यात येईल.

स्पर्धेचे नियम :-

💐आधी स्पर्धेचे सर्व नियम निट वाचून घ्या मान्य असतील तरच या स्पर्धेत भाग घ्यावा अन्यथा भागच घेऊ नये.
परीक्षक देतील तो निर्णय मान्य करावा लागेल.परीक्षकांच्या निर्णयाला
आव्हान देऊ नये .प्रश्न विचारुन वाद घालू नये.
💐 आम्ही हा उपक्रम केवळ
साहित्य सेवा अणि आनंद यासाठी
केलेला आहे, त्यामुळे सर्वानी आनंदाने सहभाग घेऊन,शोभा वाढवावी.

💐स्पर्धेत चारोळीच म्हणजे 4 च ओळींचीच कविता पोस्ट करावी.

💐दिलेल्या चित्रावर आधारीत
  रचना असावी,चित्राचे सूक्ष्म
  अवलोकन करावे.

💐दुसर्‍या आणि चौथ्या ओळीत यमक यावे. चारोळी सुटसुटीत चार ओळीत टाईप करावी.
💐एडीट चारोळी चालणार नाही.

💐चारोळी दिलेल्या विषयावरच लिहावी. विषय बदल्यास डिलीट करण्यात येईल. एक स्पर्धक केवळ एकच चारोळी पाठवू शकतो.
अनेक रचना पोस्ट केल्यास
स्पर्धेतून बाद करण्यात येईल.

💐फोटो वर टाईप केलेली चारोळी चालणार नाही. ..

💐 इंग्रजी अक्षरात रचना टाइप नसावी.
💐 मराठी शुद्धलेखना कड़े विशेष
      लक्ष द्यावे.
💐 निकालानंतर अभिनंदनाच्या कमेंट शिवाय इतर कोणतीच वादग्रस्त कमेंट करु नये. कमेंट डिलीट केली जाईल.

💐ही स्पर्धा अधिकाधिक चांगली पारदर्शी होण्याकरीता आम्हाला आपल्या चांगल्या सहयोगाची गरज आहे. हा एक आपलाच परिवार आहे खेळीमेळीत स्पर्धा पार पडावी हीच अपेक्षा.

💐एखाद्या वेळेस काही तांत्रिक अडचणींमुळे रिझल्ट देण्यास विलंब झाला तर कृपया आम्हाला सहकार्य करावे ही विनंती. .

💐यशस्वी प्रथम 10 क्रमांक
      घोषित केले जातील

   💐 विजयी रचना आमच्या  ब्लॉग वर पोस्ट केल्या जातील.

💐चला विलंब नका करु उचला लेखणी
   अन् लिहा भरभर.
   सर्वानी सहभागी व्हावे ही विनंती.
      आपले कृपाभिलाषी...

💐💐-💐💐

      *साहित्य दर्पण*
~एडमिन कोअर कमिटी~

🌹🌹💐💐💐💐💐💐

*साहित्य दर्पण द्वारा आयोजित*

_सचित्र दर्पण चारोळी_
★★★★★★★
भाग :---पंचविसावा{25-वा }
दिनांक :--18 -10-२०१६
वार –→मंगळवार
~~~~~~~~~~~~~
_संकल्पना_
*नासा येवतीकर धर्माबाद*

~~~~~~~~~~
*संयोजक*
*श्री. आप्पासाहेब सुरवसे लाखणगांवकर*
=================
परीक्षक
*ऋषीकेश देशमुख देगलूर*
↑^^^^^^^^^^^^^^^^↑^↑^^^
~ग्राफिक्स~
सौ कल्पना जगदाळे
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

(१) सचित्र दर्पण चारोळी स्पर्धेसाठी
तुझ्या मायेची
करु दे भक्ती ।
जगा नारीची
दिसु दे शक्ती ।।
नरेंद्र म्हस्के , शिरपूर ( धुळे )
★★★★★★★★★★★★★★★★★★★
(२)खुडू नका हो कळी
फुलूद्या तिला अंगणी
पोरी विना कुस सुनी
महत्व तिचे असूद्या ध्यानी

घनश्याम बोह्राडे
19
*स्पर्धेसाठी चारोळी*
★★★★★★★★★★★★★★★★★★★
(३)सचित्र दर्पण चारोळी स्पर्धेसाठी :
स्त्रीभ्रुण जपू या प्रीतीने
नकोशी पुरूषी वृत्तीने
अंधश्रध्देशी हो संघर्ष
हत्या सनातनी कृतीने
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे ४११०४४
@39
★★★★★★★★★★★★★★★★★★★★
(४)🎯सचित्र दर्पण चारोळी 🎯

  वैज्ञानिक दृष्टिने करूया
     अंधश्रद्धेवर मात
सोनार यंत्रणा उपकरण हिताचे
   नको त्याने गर्भातच लेकीचा घात

✍ जोगदंड जयश्री
    @jj62......
★★★★★★★★★★★★★★★★★★★★
(५)सचित्र दर्पण चारोळी स्पर्धेसाठी..
तुझ्या मायेची
करु दे भक्ती ।
जगा नारीची
दिसु दे शक्ती ।।
नरेंद्र म्हस्के , शिरपूर ( धुळे ) @ 65
★★★★★★★★★★★★★★★★★★★
(६)📕साहित्य दर्पण व्दारा आयोजित 📕
****************************
सचित्र दर्पण चारोळी स्पर्धा
****************************
    भाग -------पंचविसावा
दिनांक  ------- 18---10---2016
***************************
गर्भातच तोडीती नाळ तुझी माझी
खुडू नका हो अशी तुम्ही कोवळी कळी
अंधश्रध्देवर मारील आसूड विज्ञानाचा
दाभोळकरां सारखी जाणार नाही ती बळी

****************************
मीना सानप बीड @ 7
9423715865
स्पर्धेसाठी👆
****************************
★★★★★★★★★★★★★★★★★★★
(७)💁🏻सचित्र *दर्पण* चारोळी💁🏻

"दाभोळकरांचे बलिदान

न जावो कदापी व्यर्थ

अंधश्रद्धा नी गर्भपाताचा

निषेध ठरवू सार्थ "

........जयश्री पाटील🖌

......स्पर्धेसाठी🏹👆🏻
★★★★★★★★★★★★★★★★★★★★
(८)*साहित्य दर्पण*
          *स्पर्धेसाठी*
~~~~~~~~~~~~~~~~
    *चित्र दर्पण चारोळी*
~~~~~~~~~~~~~~~~

*अंधश्रध्दे चा भष्मासुर*
*असा पसरला सर्व दूर*
*मूलगाच करतो पिंडदानअसे म्हणून*
*नका तोड़ू मुलीची कळी होण्या आधी फुल*

~~~~~~~~~~~~~~~~
*सौ* *मंजुषा देशमुख* *@36*
  *अमरावती*
*9422884140*
★★★★★★★★★★★★★★★★★★★
(९)*📕साहित्य दर्पण समुह आयोजीत* 📕
➖➖➖➖➖➖➖➖➖
  *🎯सचित्र दर्पण चारोळी स्पर्धा*🎯
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
अंधश्रध्देच्या भस्मासुराचा
समुळ नायनाट व्हावा
मुलीला जन्म देवूनी
लेक वारसा टिकवावा

     खेडकर सुभद्रा त्रिंबकराव
      बीड (२०) मो नं (९४०३५९३७६४)
*
★★★★★★★★★★★★★★★★★★★
(१०)*सचित्र चारोळी स्पर्धेसाठी*

वंशाच्या दिव्यासाठी, का खुडती गर्भातच कळी,
स्त्री जन्माच्या स्वागाताने, करू भ्रुणहत्येची होळी.!
अनिष्ट चाली-रीतींनी जाती कित्येक निष्पाप बळी,
दाभोळकरी विचारांनी छाटू अंधश्रद्धेची मुळी.!!

_____ संतोष शेळके ✍🏻 @24
★★★★★★★★★★★★★★★★★★★
(११)सचित्र दर्पण चारोळी स्पर्धा

दाभोळकरांची शिकवण
नको आंधश्रधेचा फास
देवुन पहा जन्म मुलींना
जीवन होईल थोड़ खास

            अमोल अलगुडे
                  स क्र 51
★★★★★★★★★★★★★★★★★★★
(१२)पुरोगामी महाराष्ट्र अंधश्रद्धेचे राजरोस जातात बळी......
कधी दाभोळकर असतात
तर कधी गर्भातील कळी...॥
   *-श्री. हणमंत पडवळ.-*
              क्र : 48.
*सचित्र दर्पण चारोळी स्पर्धासाठी*👆🏾
★★★★★★★★★★★★★★★★★★★★
(१३)पुरोगामी महाराष्ट्र अंधश्रद्धेचे  राजरोस जातात बळी......
कधी दाभोळकर असतात
तर कधी गर्भातील कळी...॥
   *-श्री. हणमंत पडवळ.-*
              क्र : 48.
*सचित्र दर्पण चारोळी स्पर्धासाठी*👆🏾
★★★★★★★★★★★★★★★★★★★★
(१४)।।स्पर्धेसाठी-चित्र चारोळी।।

खुप झाल्या अंधश्रध्देच्या चर्चा
खुप निघाल्या बेटी बचाओच्या पर्च्या
वेळ आता आली आहे बदलायची
मोडून काढू बरबटलेल्या राजकारणी खुर्च्या।

सौ.मनिषा वाणी.
सुरत.१८.१०.२०१६
@२
★★★★★★★★★★★★★★★★★★★
(१५)अंधश्रद्धा निर्मुलन समितीद्वारे दाभोळकरांनी
दिली अनिष्ठ रूढी परंपरांना तिलांजली
गर्भातील कळ्यांचे फुलवून जीवन
वाहू त्यांच्या कार्याला आदरांजली
         
           शैलजा ओव्हाळ/चिलवंत
                     @ 73
                 स्पर्धेसाठी
★★★★★★★★★★★★★★★★★★★★
(१६)🎯चित्र -चारोळी🎯
*****************
स्पर्धसाठी
**********
अंधश्रध्देचा नायनाटासाठी
दाभोळकरांचा गेला बळी
पुरोगामी महाराष्टात आजही
गर्भातच संपविता कोवळी कळी
मीरा खेडकर@(6)बीड
★★★★★★★★★★★★★★★★★★★★
(१७)*सचित्र चारोळी स्पर्धेस*

स्मरण करुनी दाभोळकरांचे
अंधश्रद्धेला दया मुठमाती 
स्वागत करुनी स्त्री जन्माचे
उजळु दया पणती.

*-----सुवर्णविलास (40)*
★★★★★★★★★★★★★★★★★★★
(१८)■.सचित्र चारोळी स्पर्धेसाठी .■

अंधश्रद्धेच उच्चाटन करण्या
दाभोळकरानी झेललि गोळी छातीवर..
स्त्रीभ्रूण हत्येला लावून लगाम
मात करू अंधश्रद्धेवर..
    -श्री सगर पी एच @83@
      धर्माबाद 9405628375
★★★★★★★★★★★★★★★★★★★★
(१९)⏳साहित्य दर्पण समुह आयोजित⏳

🎯सचित्र दर्पण चारोळी 🎯

❎स्पर्धेसाठी नाही❎

अंधश्रद्धेच्या भस्मासुराने
घेरले समाज मनाला
भ्रुण हत्येची करुन होळी
येऊ ग्या मुली जन्माला!

✍🏼संगीता भांडवले✍🏼
     वाशी, उस्मानाबाद
         @१६
★★★★★★★★★★★★★★★★★★★
(२०)⏳साहित्य दर्पण समुह आयोजित⏳

🎯सचित्र दर्पण चारोळी 🎯

❎स्पर्धेसाठी नाही❎

अंधश्रद्धेच्या भस्मासुराने
घेरले समाज मनाला
भ्रुण हत्येची करुन होळी
येऊ द्या मुली जन्माला!

✍🏼संगीता भांडवले✍🏼
     वाशी, उस्मानाबाद
         @१६
★★★★★★★★★★★★★★★★★★
(२१)सचित्र चारोळी स्पर्धेसाठी नाही

अंधश्रद्धेच भूत बसलय
समान्याच्या मानगूटावर...
सनातन्यानि रचून कट
उठले दाभोळकराच्या जीवावर...

किती घेणार तुम्ही बळी
धर्म,देवता अन अंधश्रद्धेच्या नावावर..
थांबवा आता तरी असे दुष्कर्म
दभोळकराचे विचार रुजवा मनावर..

आज एक दाभोळकर मारला
उद्या हजारो दाभोळकर जन्मतील..
सनातन्यांनो आता तरी जागे व्हा
तुमचे विचार कधी सुधारतील..

अंधश्रद्धेच समूळ उच्चाटन करण्या
दाभोळकरानी केल जीवाच रान..
स्त्रीभ्रूण हत्या रोखून आपण
फुलवू मुलीच जीवन महान..
    -श्री सगर पी एच @83@
      (स्पर्धेसाठी नाही)
★★★★★★★★★★★★★★★★★★★
(२२)स्पर्धेसाठी
                  
                  चारोळी.

अंधश्रद्धा आणि स्री भृण हत्या

यांचा निषेध करू  सार्थ

विज्ञानाची  धरून   कास

दाभोळकरांचे बलिदान न जावो व्यर्थ. ...

          पुष्पा सदाकाळ भोसरी
             @ 50.9011659747.
★★★★★★★★★★★★★★★★★★★★
(२३)स्री जन्माचे करुनी स्वागत
अंधश्रध्देवर करुया प्रहार
दाभोळकरांचे विचार रुजण्या
अनिष्ठ रुढींचा करुया संहार

मीना सानप  बीड @ 7
9423715865
स्पर्धेसाठी नाही
**********************-***
★★★★★★★★★★★★★★★★★★★
(२४)वंशाच्या दिव्यापायी पणतीची
गर्भातच खुडली जाते अशी कळी
अंधश्रद्धा विरोधात जीवन खर्चिले
पण घेतला सत्याचा शेवटी बळी!
✍ पी.नंदकिशोर @43
(स्पर्धेसाठी )
★★★★★★★★★★★★★★★★★★★
(२५)साहित्य  दर्पण व्दारा आयोजित
  सचित्र दर्पण चारोळी स्पर्धा
***************************

पुरोगामी महाराष्ट्र म्हणता तुम्ही
अंधश्रध्देला का बरे घालता खतपाणी ?
गर्भातच खुडीता कोवळ्या कळ्या
कोण म्हणेल हो तुम्हाला ज्ञानी ?
***************************
कविता बडवे  बीड  @70
8275942282
****************************
★★★★★★★★★★★★★★★★★★★
(२६)..सचिञ चारोळी स्पर्धेसाठी..
------------------------------------
पाहु द्या हे जग कोमल
जगाची विचार सरणी....
खुडता कळ्या गोंडस
जन्मांस अघोरी करणी....

रोहिदास होले ....
गोपाळवाडी ,दौंड ,पुणे...
१८/१०/२०१६
★★★★★★★★★★★★★★★★★
(२७)साहित्य दर्पण आयोजित...
चित्र दर्पण चारोळी स्पर्धा...

वंशाच्या दिव्यासाठी,
मुलीचा गर्भपात आहे।।
मायबापचा म्हातारपणीचा,
आजच आत्मघात आहे।।

✒अनिल लांडगे उंडणगाव@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

👆👆स्पर्धेसाठी...👆👆
★★★★★★★★★★★★★★★★★
(२८)🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
सचित्र चारोळी स्पर्धेसाठी
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
द्या मज आधार मी जगाचा आधार,
नुसतेच खुडले जाते मज उमलण्यापूर्वी ..!
अंधश्रद्धा इतकी भ्रांतीत वंश दिसते,
मला नाकारता माझे कर्तृत्व पाहण्यापूर्वी ..!
         
                    बंडोपंत कुलकर्णी सोलापूर
                     समूह क्रमांक १३
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
★★★★★★★★★★★★★★★★★★★
(२९)सचित्र चारोळी स्पर्धेसाठी
🙏🏻🙏🏻🙏🏻
जपा अंश तुमचाच गर्भातला
तो कन्या असो वा सुत
दाभोळकरांच्या विज्ञान मंत्राने
संपवा अंधश्रध्देचं भूत
-आत्तम गेंदे @86
पालम जि.परभणी
★★★★★★★★★★★★★★★★★★★
(३०)स्पर्धेसाठी...

दाभोळकरांच्या विचारांना चालना देवू या
अंधश्रद्धेला समाजातून चला हटवू या
सदा लढते जी आपल्या अस्तित्वासाठी
चला त्या स्त्री जन्माचा आपण आदर करु या..

निर्मला सोनी(28)
★★★★★★★★★★★★★★★★★★
(३१)🎯सचित्र दर्पण चारोळी🎯

करा अंधश्रद्धेवर मात,वापरुन विज्ञानाचे शस्त्र
याचसाठी स्थापिली ,अंधश्रद्धा निर्मुलन समिती
स्त्री जन्माचे करु स्वागत, अंधश्रद्धेला देऊ मुठमाती
तेंव्हाच लाभेल दाभोळकरांच्या आत्म्यास शांती! (स्पर्धेसाठी)

संगीता भांडवले
वाशी,उस्मानाबाद
@१६
★★★★★★★★★★★★★★★★★★★
(३२)* चिञचारोळी स्पर्धा *

स्ञीभ्रूण हत्या म्हणजे
आपल्याच आपल्यावर डाग
कारण स्रीभ्रूण सुद्धा असतो
आपल्याच काळजाचा भाग !!

-  आबासाहेब निर्मळे.
पेठ वडगांव कोल्हापूर.
9028090266.

(चिञचारोळी स्पर्धेसाठी क्र-३१)
★★★★★★★★★★★★★★★★★★★
(३३)सचिञ चारोळी स्पर्धा  ३१       
                                                         असते  बेटी धनाची पेटी                                             थांबवा स्ञीभ्रूणहत्या या देशा                                              भूतखेत,भोंदुगिरी खोटी                                               घ्यावा  दाभोळकरांचा वसा
✍🏼                                                निता आरसुळे, जालना @४५
★★★★★★★★★★★★★★★★★★★★
(३४)साहित्य दर्पण समुह आयोजित

सचित्र दर्पण चारोळी

अंधश्रद्धेच्या भस्मासुराने
घेरले समाज मनाला
भ्रुण हत्येची करुन होळी
येऊ द्या  मुली जन्माला!

मुलगा वंशाचा  दिवा
मुलगी असते पणती
सद्य स्थितीत मात्र
तिच जपतेय खरी नाती !

ठेवा वैज्ञानिक दृष्टिकोन
नका अंधश्रद्धा पाळू
घेऊ द्या जन्म तिला
लिंगनिदान करणेच टाळु!

करा अंधश्रद्धेवर मात,वापरुन विज्ञानाचे शस्त्र
याचसाठी स्थापिली ,अंधश्रद्धा निर्मुलन समिती
स्त्री जन्माचे करु स्वागत, अंधश्रद्धेला देऊ मुठमाती
तेंव्हाच लाभेल दाभोळकरांच्या आत्म्यास शांती!(स्पर्धेसाठी)

खुडता गर्भातील कळ्या
वापरुन विज्ञानाचे शस्त्र
मानवा!वर्तन तुझे बनले
पशुवानीच हिंस्त्र?

✍🏼संगीता भांडवले✍🏼
      वाशी,उस्मानाबाद
           @१६
★★★★★★★★★★★★★★★★★★★★
(३५)(१)अंधश्रध्दा निर्मूलनाचा ध्यास
मनी
आयुष्य झिजवले समाजासाठी दाभोळकरांनी
मुलगा म्हणजे वंशाचा दिवा
मुलगी म्हणजे लक्ष्मी, पणती उजळावी घराघरातूनी
प्राची देशपांडे
(२) अंधश्रध्देवर घातला घाला
समाजमन जागृत केले
डाँ दाभोळकरांना वंदन
विचार त्यांचे अमर जाहले
प्राची देशपांडे
स्पर्धेसाठी
३-जन्माला येऊ दे मला
विनविते गर्भातली कळी
मुलगा वंशाचा दिवा
होऊ द्या  अंधश्रध्देची होळी
प्राची देशपांडे
समूह क्र. १५
(४)गर्भातच कोवळ्या कळ्या खुडल्या जाती
मुलगाच हवा विचाराला द्या मूठमाती
अंधश्रध्देवर आसूड मारा आता
मुलीच दोन्ही कुळे उध्दरती
प्राची देशपांडे
५-काय गुन्हा माझा हा जाहला
का खुडले गर्भातच मजला
आई गं उत्तर दे तू मला
कोवळा जीव  अंधश्रध्देचा बळी ठरला
प्राची देशपांडे
★★★★★★★★★★★★★★★★★★★
(३६)सचित्र चारोळी स्पर्धा साठी

वंशा दिवा अंधश्रध्दा त्यातून
स्त्रीभ्रूणहत्या राजरोस घडे
निर्मुलन करणारे सज्जन लोक
गोळ्या खाऊन शहीद ते पडे

किशोर झोटे@32
औरंगाबाद.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
(३७).... *सचित्र चारोळी* .....

लोकांतील श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या
एकच नाण्याच्या आहेत दोन बाजू
श्रध्देत फायदा होतो संधी साधुचा तर
अंधश्रध्देत पुरता पिळला जातो गरजू

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
nasayeotikar.blogspot.com
★★★★★★★★★★★★★★★★★★★★
(३८)चित्राचारोळी स्पर्धा

वंशाचा दिवा नव्हे होईल मी पणती
अंधश्रद्धेचा दूर करून अंधार
नकोशी मी होईल हवीहवीशी
आता नाही घेणार माघार
श्रुती 61
नवी मुंबई
★★★★★★★★★★★★★★★★★★★
(३९)🌹चारोळी स्पर्धा 🌹
🌹स्पर्धेसाठी 🌹
उजळु द्या पणती
नका खुडू कळी तुमी
पसरु द्या विचार
नरेंद्रजी पुरोगामी
*******************
स्नेहलता कुलथे
मोबा 7588055882
क्र37🌹
★★★★★★★★★★★★★★★★★★★★
(४०)*चित्र दर्पण स्पर्धेसाठी*
          🙏👧🙏

*कशाला हवा वंशाला दिवा*

*अन् अनिष्ट रुढी परंपरा*

*मी बलिदान दिले ज्यासाठी*

*त्या परिवर्तनाची कास धरा*

      *समूह क्र .78*
      *आशा तेलंगे ठाणे*
★★★★★★★★★★★★★★★★★★★
(४१)_*💥सचित्र दर्पण चारोळी💥*

तुझं नि माझं नातं त्या गर्भनाळेपुरतंच का राहिलं
नकुशी म्हणून तूच का गं नाळेचा गळफास देवूनी गर्भातच मारलं

*↑→↑→↑→↑→↑→↑→↑*
👆🏿                            👆🏿
      _*स्पर्धेसाठी~*_
↑↑↑↑↑→↑↑↑↑→↑↑↑↑↑

_*कल्पना जगदाळे@8★बीड*_🖊

~||||||||||||||••••••••||||||||||||~
★★★★★★★★★★★★★★★★★★★
(४२)*स्पर्धेसाठी*
*का कुस्करता माझ्या अधुरया कळीला*

*धुंडाळते मी आक्रोशित गर्भगळीत छकुलीला*

*अंधश्रद्धेच्या सावटात  भिजला शक्तीचा झुलारा*

*देशाचा तर्कवादी ना उरला आता सावलीला*

वृषाली वानखड़े✍🏻

🌴अमरावती***75*****
************************
★★★★★★★★★★★★★★★★★★★
(४३)🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
सचित्र दर्पण चारोळी
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
स्पर्धेसाठी
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*त्यांचीच अवहेलना होते*

*जे जगतात इतरासाठी*

*अमर होतात दाभोळकरासारखे*

*फक्त तुमच्या आमच्यासाठी*

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
चौधरी बालाजी सर लातूर
82

★★★★★★★★★★★★★★★★★★★★

सचित्र चारोळी स्पर्धेसाठी

दाभोळकरांनी शेवटच्या श्वासापर्यन्त,

सुरु ठेवली अंधश्रधा निर्मूलन चळवळ।

स्त्रीभ्रूण ह्त्या रोखण्या करू प्रयत्न,

होईल कमी त्यांच्या आत्म्याची तळमळ।

मीनाक्षी माळकर

68

★★★★★★★★★★★★★★★★★★★
(४४)स्पर्धेसाठी...✍�

*स्त्रीभ्रूण वाचवन्या धजताहेत शेकडो हात*

*बदलते आहे समाजाची मुलींप्रती दृष्टी*

*दाभोळकर लढले अंधश्रद्धा निर्मूलनासाठी*

*तरी अंधाऱ्या गर्तेत कोसळते आहे सम्पूर्ण सृष्टि*

           ✍�प्रणाली काकडे✍�
            समूह क्रमांक pk38
★★★★★★★★★★★★★★★★★★★★
(४५)सचित्र दर्पण चारोळी स्पर्धेसाठी
📸📸📸📸📸📸📸

दिवा किंवा पणतीत
फरक का करता
अंधश्रद्धा रोग
रुढीस का धरता

योगिनी चॅटर्जी #52
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
★★★★★★★★★★★★★★★★★★★

No comments:

Post a Comment