Monday, 17 October 2016

साहित्य दरबार उर्वरित लेख

[10/16, 6:29 PM] 6 Kalpna Jagadale: 🔵साहित्य दर्पणव्दारा आयोजित🔵

🔴वैचारिक लेखमाला🔴

  *💥स्वच्छतेचे महत्व💥*

###############
    *Health is wealth*
    *आरोग्य धनसंपदा*
*निरोगी शरिरात निरोगी मन वास करते*
हि व अशी वाक्य आपण नेहमी ऐकतो आणि म्हणूनच हे आपले मौल्यवान जीवन जर आपणास आनंदाने जगायचे असेल तर आपले शरीर निरोगी असले पाहिजे.आणि निरोगी जीवनासाठी स्वच्छता हि  जिवनात अत्यंत आवश्‍यक बाब ठरत आहे. अस्वच्छतेमुळे अनेक रोगांचा प्रसार होतो.
आपल्या जीवनात स्वच्छतेची सवय हि आपण एखाद्या व्यसनासारखी लावून घ्यायला हवी कारण अशुद्ध पाणी, अस्वच्छ परिसर व
वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव
यामुळे साथीच्या रोगांना बळी पडावे लागते.  तसेच स्वच्छतेचे पालन केले तर अनेक रोगांवर मात करता येवू शकते.त्यामुळे प्रथमत:
स्वच्छता म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे.

स्वच्छता म्हणजे आपण ढोबळ मानाने खालील मुद्दयावरून व्याख्या करू शकतो.वैयक्तिक स्वच्छता,परिसराची स्वच्छता,अन्नाची स्वच्छता,पिण्याच्या पाण्याची हाताळणी,सांडपाणी व्यवस्थापन 
यास आपण स्वच्छता असे म्हणता येईल.

यामधील अत्यंत महत्वाचे म्हणजे वैयक्तिक स्वच्छता आहे. दररोज अंघोळ करणे, नियमित नखे कापणे, हात स्वच्छ धुणे,चप्पलचा वापर करणे,नियमित केस विंचरणे,स्वच्छ व धुतलेले कपडे घालणे.
वैयक्तिक स्वच्छतेचे पालन झाले तर 50 टक्के आजार कमी होतात. आजही अनेक लोक शौचालयातून आल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धूत नाहीत. त्यामुळे रोगजंतूंच्या प्रसाराचे प्रमाण वाढते आहे. साबणाने हात स्वच्छ धुतल्यावर रोगजंतू मरतात, त्यामुळे रोग प्रसाराचे प्रमाणही घटते.
वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच परिसर स्वच्छताही महत्त्वाची असते. स्वच्छतेच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊन स्वच्छतेच्या कामात लोकांचा सहभाग वाढण्यासाठी 2 ऑक्‍टोबर 2000 पासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे.तसेच स्वच्छतेचे सातत्य टिकविणे आणि अभियानाच्या माध्यमातून वैयक्तिक स्वच्छतेचा प्रचार- प्रसार व्हावा यासाठी शाळा व शिक्षण हे माध्यम मुलांना नि गावकऱ्यांना  महत्त्व पटवून देण्याचे आदर्श माध्यम बनेल असे मला वाटते.

म्हणुनच आता स्वच्छतेचा घेतलेला वसा हा न उतता न मातता पुढे चालू ठेव‌ण्याची शपथ घेवूया नि जनजागृती करणे हे आपले आद्य कर्तव्य मानूया व स्वच्छतेचे महत्व जनसामान्यास पटवून देवूयात.

कल्पना जगदाळे-घिगे@8★बीड
[10/16, 6:56 PM] ‪+91 94231 53509‬: साहित्य दरबार वैचारिक लेखमाला

*विषय :- स्वच्छतेचे महत्व*

      विदया बालनची सरकारी जाहिरात असो की हँडवॉश कंपनी ची जाहिरात प्रत्येका मधुन स्वच्छतेचा संदेश दिला जातो. उत्तम आरोग्यासाठी स्वच्छता ही आवश्यक बाब आहे. निरोगी शरीरात निरोगी मन वास करते असे म्हणतात. निरोगी शरीरासाठी निरोगी परिसर हवा व त्यासाठी वैयक्तिक व परिसर स्वच्छता असावी लागते. तसेच निरोगी समाजासाठी स्वच्छ परिसर आवश्यक असतो.
     अशा निकोप समाज रचने साठी सर्व प्रथम प्रयत्न केला तो राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी. दिवसभर गावातली घाण साफ करत आणि रात्री लोकांच्या डोक्यातील घाण काढत. स्वच्छतेकडून समृध्दीकडे जाण्याचे मार्ग गाडगेबाबा यांनी दाखवले.
      तोच धागा पकडून महाराष्ट्र शासन यांनी सन 2000-2001 मधे "संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान " सुरू केले. तीच योजना केंद्र सरकारने 2014 ऑक्टोबर 2 ला गांधी जयंती ला उचलली व "स्वच्छ भारत अभियान " सुरू केले आहे. महाराष्ट्राने केंद्राला दिलेला हा एक चांगला उपक्रम म्हणता येईल. अतिशय चांगल्या पध्दतीने हा उपक्रम आजही प्रधानमंत्र्यांच्या उत्सफुर्त सहभागाने चालू आहे.
      शालेय पातळीवर शा.शि. या विषयात "आरोग्य शिक्षण " या घटकाचा समावेश केला आहे. मात्र बऱ्याच प्रमाणात त्या घटकाकडे दुर्लक्ष केल्या जाते.त्याकडे लक्ष देवून जर वैयक्तिक स्वच्छता याकडे लक्ष दिले तर नक्कीच एक निरोगी पिढी घडेल. अंघोळ,नखे व केस कापने, कपडे स्वच्छता, कान व नाक स्वच्छता इ. बारीक सारीक गोष्टी लहानपना पासुन शिकवल्या तर पुढे आपोआप स्वच्छतेच्या सवयी लागतील. लहान पनी केलेले संस्कार हे चिरकाल टिकणारे असतात. वैयक्तिक स्वच्छता हा सुद्धा एक  संस्काराचा भाग होणे गरजेचे आहे.( ग्रामिण भागात याकडे आजही लक्ष दिले जात नाही.)
     वैयक्तिक स्वच्छता आवड निर्माण झाली की समाजात वावरताना ती व्यक्ती स्वच्छतेचे नियम पाळते. आपले घर जसे आपण स्वच्छ ठेवतो तसेच परिसर सफाई हेही आपले कर्तव्य आहे , याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. फक्त वैयक्तिक स्वच्छता किंवा घरातील स्वच्छता महत्त्वाची नसून जेंव्हा पुर्ण वस्ती शहर स्वच्छ होईल त्याच वेळस निरोगी पिढी तयार होईल.
     आज जे साथीचे आजार आपण पाहतो ते बऱ्याच वेळस या अस्वच्छतेमुळेच होतात. त्यामुळे स्वच्छता ही महत्वाची आहे. मात्र फक्त मी व माझे घर स्वच्छ नको तर सर्व गाव शहर स्वच्छ हवे. कालच १५ ऑक्टोबर "जागतिक हात धुवा " दिन आपण साजरा केला आहे.
        हात धुणे हे खूप महत्वाचे आहे. अगदी शौचास जावून आल्यावर , जेवना आधी हात धुणे महत्वाचे आहे. शौचास जाणे हे नैसर्गिक असले तरी शौचालयाचा वापर करावा हे सुध्दा सांगणे गरजेचे आहे. हाथ अगदी राख किंवा मातीने जरी धुतले तरी योग्य होय. उपलब्ध साधनांचा ही वापर कसा  करावा ते समजावून दयावा लागेल.
      तीसरीला ओला व कोरडा कचरा असे शिकवले आहे. त्याचा वापर केल्यास कचरा कसा संकलन करावा तेही कळेल. कचरा कसा होतो कचरा कमी कसा करता येईल या बाबतीत मागदर्शन ही करता येईल.
       हे घडत असतांना स्वच्छतेने उत्पन्न होणारा कचरा त्याची विल्हेवाट कशी लावावी ही देखील समस्या निर्माण होत आहे. शहर व गाव दोन्ही कडे असे कचरा पासून मुक्ती देणारे प्रकल्प निर्माण करून ही समस्या सोडवावी लागेच. नाहीतर डंपींग ग्राउंड वरुन बरेच वाद घडताना दिसत आहेत. काही शहरात कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते, मात्र बऱ्याच ठिकाणी उघड्यावरच फेकला किंवा साठवला जातो. त्यातुन आरोग्याच्या वेगळ्या समस्या निर्माण होत आहेत.
      त्याच बरोबर कचरा गोळा करणारे लोक व त्यांच्या आरोग्याच्या समस्या याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. केवळ फोटो काढण्यापुरते हातात झाडू घेणारे यांना आपण प्रसिद्धी देतो, त्याचप्रमाणे दररोज हे काम करणारे लोक यांनाही कुठेतरी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्या सफाई कामगार वर्गाची देखील आपणास जाण ठेवावी लागेल. उपेक्षीत घटक म्हणून न बघता त्यांनाही समाजात योग्य स्थान व मान मिळाला पाहिजे. सामाजीक आरोग्यासाठी सतत कार्यरत असणारा तो देखील एक महत्वाचा घटक होय.
    स्वच्छता ही जशी शरीराची तशीच मनाची ही ठेवावी लागेल, नाहीतर म्हणावे लागेल, " नाही निर्मळ मन, काय करील साबण. "

किशोर भीमराव झोटे @ 32
जि.प.प्रा. शाळा ढोरकीन तांडा कें. ढोरकीन ता. पैठण जि. औरंगाबाद.
9423153509
Samyakharshali@gmail.com
[10/16, 7:33 PM] Sunil Vilas: स्पर्धेस         

  स्वच्छतेचे महत्त्व

मध्यंतरी माझ्या पाहण्यात एक चित्र आले. विशिष्ट ठिकाणी कोणाची उपस्थिती होती हे दर्शवणा-या या चित्रात एका बाजुला प्राण्यांच्या पावलांचे ठसे तर दुस-या बाजुला भरपूर कचरा होता.जेथे कचरा होता त्या चित्राखाली माणूस असा उल्लेख केला होता. मानवी मनोवृत्तीचे दर्शन घडवणारे हे चित्र स्वच्छतेबद्दल आपण किती जागरूक आहोत हे स्पष्ट करत होते.स्वछता ही जशी वैयक्तिक आचरणाची बाब आहे तशीच ती सार्वजनिक ही आहे. आंतरिक मनाची नि बाह्य अंगाची तसेच समाजजीवन शुद्ध करणारी स्वच्छता असे तिचे अनेकविध प्रकार पडतात.
         मूलत: निसर्गनिर्मित या भूतलावावरील कोणतीही गोष्ट नितांत सुंदर आहे.पण जिथे-जिथे माणूस पोहचला तिथे -तिथे त्याने आपल्या आचरणाने या सौंदर्याला बाधा पोहचवल्याचे आपणांस दिसून येते.झ-याच्या रूपाने निर्माण होऊन वाटेतील असंख्य जीवांची जीवनदायी असणारी  खळखळ वाहत  सागराकडे धावणा-या सरितेला आपल्या स्वार्थाने अशुद्ध करणारा माणूस सामाजिक जीवनाला,आरोग्याला  सातत्याने बाधा पोहचवत आहे. आपल्या वर्तमान भौतिक सुखासाठी मनुष्यप्राणी भू,जल,वायू या निसर्गाच्या सर्वांगाला अस्वच्छतेचा विळखा घालून स्वतःचाच -हास  नि भविष्याचा विनाश घडवत आहे.
                 वातावणातील या अस्वच्छतेचा परिणाम मानवाच्या शरीराप्रमाणेच त्याच्या मनावरही होत आहे.प्रदूषित जल,वायू मनुष्यात शारीरिक विकार निर्माण करण्यास कारणीभुत ठरत आहेतच पण त्याचबरोबर मानसिक आजारासही कारणीभुत ठरत आहेत हे विज्ञानाने सिद्ध केले आहे.मानसिक निराशा हे एक त्याचे प्रातनिधिक उदाहरण देता येते. या सर्व गोष्टिंपासून मुक्ति मिळवून प्रसन्न आयुष्य जगायचे असेल तर स्वच्छतेचे आचरण हाच त्यावरील एकमात्र उपाय आहे.
---सुवर्णविलास(40)

No comments:

Post a Comment