Monday, 10 October 2016

साहित्य दरबार - सहल

*साहित्य दर्पण ग्रुप प्रस्तुत वैचारीक लेखमाला*
➖➖➖➖➖➖➖➖➖
दि ०९.१० .२०१६ वार रविवार
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

         🎯  *विषय: सहल*🎯

आज स्पर्धेचा विषय सहल हा आहे यामध्ये स्वत च्या सहली ऐवजी मी शाळेची सहल घेवून गेले होते ते अनुभव सांगणार आहे
      मुलांना शाळेची गोडी लागावी व उपस्थिती वाढावी ती टीकावी यासाठी शाळेत अनेक उपक्रम राबवले जातात त्यातील एक उपक्रम आहे शैक्षणीक सहल 
       एक दिवस आँफिसमध्ये परिपाठानंतर माझी व माझ्या स्टाफची चर्चा झाली व सहलीचे आयोजन करण्याचे ठरले मुलांना तर खुप आनंद झाला .सहल  घेवून जायचे आणी ते ही लहान मुलांची फार जबाबदारी असते पण  मुलांची शिक्षकांची प्रचंड उत्सुकता त्यामुळे ठरले सहल घेवून जायची.
       अगोदर सहलीचा मार्ग निश्चित केला नंतर एस टी महामंडळाकडे जावून त्या मार्गाचा अंदाचे खर्च किती असेल ही माहिती घेतली मार्ग ठरला खापरपांगरी_ बीड_ म्हैसमाळ _वेरुळ_ घृष्णेश्वर_ शेगाव_ लोणार_सिंदखेडराजा_ अजिंठा_औंरंगाबाद_बीड_खापरपांगरी  एकदा मार्ग निश्चित झाल्यानंतर मग कामाला वेग आला दिवस निश्चित झाला सहल एका मुक्कामाची असल्याने सोबत काय काय घ्यायचे याची विद्यार्थ्यांना दिली या शाळेची सहल यापुर्वी कधीच गेली नसल्याने एक वेगळाच अनुभव होता मुलांची लगबग पालकांचा उत्साह  पाहुन तर मन भरुन येत होते मुलांना नव्या कपड्यांपासुन पालकांची तयारी होती अहो शहरातील किंवा सुशिक्षित कुटुंबातील मुलांना याचं काहीच अप्रुप  नसते पण ग्रामिण भागातील मुलांना हे फार वेगळे वाटते
      मुख्याध्यापक या नात्याने मी  मुलांचे (दहा मुलांचे) गट केले एका गटाचा जिम्मेदारी एका शिक्षकाकडे दिली मुलांनाही कल्पना दिली व सहलीचा जाण्याचा दिवस उजाडला पहाटे दोन वाजता निघण्याची वेळ होती बस शाळेसमोर येवुन थांबली पूर्ण गाव सरपंचासहित आम्हाला व मुलांना वाटे लावण्यासाठी आलेला होता कधीही एकटी दुकटी मुल कुठेही जात नाहीत आणी ते माता पालक मोठ्या विश्वासाने आमच्यासोबत आपल्या काळजाच्या तुकड्याला पाठवायला तयार होते केव्हडा आत्मविश्वास!
      निघाली एकदाची सहल बीडवरुन औरंगाबाद मार्गे पहिल्यांदा म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकान पाहिले नंतर वेरुळची जगप्रसिध्द लेणी तेथील अप्रतिम कोरीव काम पाहुन मुलांना खुप आनंद झाला कैलास लेणी पाहुन तर मुले हरखुन गेली परदेशी पाहुण्यांशी हस्तादोलन करतांना मुलांना गंमत वाटत होती . पुढे बारा ज्योतिर्लिगापैकी एक असलेले घृष्णेश्वराचे दर्शन घेतलेव आम्ही शेगाव येथे पोहचलोत शेगाव येथील खुप मोठी बाग आम्ही पाहिली तेथील बाग ही रेलगाडीत बसुन पहाण्यातला आनंद काही औरच होता आनंदाला उधान आले होते ध्यान मंदिर तेथील स्वच्छता शिस्त मुलांना खुप काही सांगुन गेली गजानन महाराजांचे दर्शन घेवून तेथूल बगीचा पाहिला संगीताच्या तालावर नाचनारी कारंजे मुलांसाठी फार वेगळे होते त्यानंतर मुक्काम दोन व्हॉल केले होते मुलांना वेगळा मुलींना वेगळा पहाटे लवकर उठुन आंघोळी वगैरे आटपुन आम्ही सुर्य उगवण्यापुर्वी मॉ जीजाऊंचे माहेर सिंदखेडराजा येथे येवून पोहचलोत मुलांना तेथील गार्डने सगळी माहीती सांगीतली मुलांना पण खुप आनंद झाला पुढे आम्ही जगप्रसिध्द लोणार सरोवर येथे पोहचलोत लोणार सरोवर हे नैसर्गिकरीत्या उल्का पडुन तयार झालेले गरम पाण्याचे सरोवर आहे हे मुलानी पुस्तकात शिकले होते पण प्रत्यक्ष ते सरोवर आपण पहातोय हे पाहुन त्यांना जग जिंकल्याचा आनंद मिळत होता मुल दिलेल्या सुचनांचे पालन करत होते बाहेर गेल्यानंतर मुलं शिस्त पाळतील का? ही आमचीशंका शंकाच राहिली लोणारवरुन आम्ही सखाराम महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले व आम्ही अजिंठा लेणी पाहण्यासाठी पोहचलोत वेरुळपेक्षा अजिंठा लेणी लहान मुलांना दाखवण्याच्या दृष्टीने जरा अवघड आहे कारण ही लेणी डोंगराच्या कपारीने आहेत खुप सुंदर अशा नैसर्गिक रंगात रंगीत लेण्या पाहुन मुले प्रफुल्लीत झाली  पुढे आम्ही औरंगाबादला बीबीचा मकबरापाहिला औरंगजेबाने पत्नीची समाधी म्हणुन हि वास्तु बांधलेली आहे नंतर पानचक्की पाहिली पुढेआम्ही सिध्दार्थ बागेत पोहचलोत त्या ठिकानचे वेगवेगळे प्राणी वाघ ,सिंह,हरण,मगर,ससा,गेंडा हत्ती कोल्हा व शेवटी सर्पउद्यानातील वेगवेगळ्या जातीची साप पाहिली व आम्ही परतीच्या प्रवासाला निघालोत
         खरच किती आनंद असतो या सहलीचा त्या चिमुकल्या मुलांच्या चेहर्यावरील तो आनंद वर्णन करण्यापलीकडचा होता आपण शिक्षक जबाबदारी घ्यायला तयार होत नाहीत काही झालं तर या शंकेन किंवा भितीन शक्यतो सहलीच्या भानगडीत प्राथमिक शाळेतील शिक्षक पडत नाहीत पण मी आपल्याला आव्हान करते काढा सहल फक्त नियोजन चांगल करा काहीही होत नाही.
*मग काढणार ना यंदा सहल सुभेच्छा तुम्हाला*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
     खेडकर सुभद्रा बीड मुख्याध्यापक जि प प्रा शा किट्टीआडगाव ता़ माजलगाव जि बीड (२०) मो नं(९४०३५९३७६४)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

+91 94231 53509‬

*सहल*

      सहल नुसता शब्द उच्चारला तरी मन प्रसन्न होते. प्रशिक्षण व इतर सामाजिक संघटन कामामुळे बऱ्याच भागाचा दौरा करता आला. सहल म्हणून त्याचा आनंद घेतल्याने त्रास जाणवला नाही.
       सहल म्हटली की आठवते शाळा, सहलीला सुरवातच मुळी शाळेत होते. शाळेत तशी सूचना आली की आनंदाला उधान येत असे. ठाण्यासारख्या शहरी भागात शालेय जीवन गेल्याने १ दिवसची सहल आयोजीत होत असे.
        आर्थीक स्थीती बेताची त्यामुळे घरी रडरड करावी लागली. तर कधी वर्गशिक्षकांनी फी भरली. मात्र सहलीचा आनंद दरवर्षी घेतला. सहलीचा दिवस म्हणजे रात्रीची झोपच नाही. सकाळीच तयारी करून आईच्या हातची पुरी व बटाटा भाजी म्हणजे जणू अमृतच. मजा मस्ती करून रात्रौ उशीर झाला तरी आई शाळेजवळ वाट बघत असायची. घरी येईपर्यंत वाटेने सर्व गमती जमती सांगीतल्या जायच्या.
        कोणी उलट्या केल्या, कोणी खोडी काढल्या ,कोणी गाणी म्हटली, कोणी मदत केली इ.इ. रात्री झोपत ही पुन्हा एकदा ती सहल घडत असे, स्वप्नातही तोच आनंद पुन्हा एकदा घेता येत असे.
         कॉलेजला औरंगाबादला आलो येथे ज्युनिअर ची कोणी सहलच काढत नसे, मन मानेना १२ वी ला असताना सरांशी बऱ्याच वेळा संवाद साधुन सहल काढली आणि ती प्रथा आजही सुरू आहे. डि.एड. ला ही आमच्या ग्रुपची जबाबदारी घेवून त्यांची ही सहल घडवली. नोकरी मधे शाळेत सहली जबाबदारीने पाड पाडल्या.
        लोकचेतना अभियान,7 हॅबीट, राज्य विज्ञान संस्था नागपूर इ. ठिकाणी ही सहल घेतल्या. सहलीमुळे बराच अनुभव व पर्यटन ही झाले आहे.
      मात्र आता वैयक्तिक फिरणे कमी झाले आहे. प्रशिक्षणही कमी झाल्याने इतर जिल्हे पाहणे कमी झाले आहे. खरंच सहल ही असावी, तुमच्या आमच्या सर्वांच्या आनंदासाठी.
      लहान मोठ्यांना हा एकमेव आवडणारा व आनंदी करणारा प्रकार आहे, त्यामुळे फॅमिली सहल काढण्यास ही काही हरकत नसावी, होय ना...!

*किशोर झोटे@ 32*
*औरंगाबाद.*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

सहल...
----------------------------------
जिथे जिथे जाते सहल....
तिथे तिथे असते नवल...
      
           सहल म्हटले कि आनंद गगनात मावेनासा होतो.तो क्षण किती उत्साहाने आपलासा होतो .सहल हि एक नियोजित बद्ध असावी.सहलीला कुठे जायचे, कसे जायचे ,किती सदस्य हवेत,वाहन ठरविणे या सर्व बारीकसारीक गोष्टी कडे लक्ष दिले पाहिजे .विशेष म्हणजे सहलीला जाताना खासकरुन आपली जवळचे लोक मिञ मंडळी यांचा विचार केला जातो.म्हणजे सहलीला रंगतसंगत छान लाभते. सहलीला जाताना आपली सर्वाची सुरक्षितता तितकीच महत्त्वाची असते. याकडे आपण आपली जबाबदारी समजून योग्य नियोजन करावे लागते .तरच सहलीची मजा द्विगुणीत होते .बाहेर गेले की प्रत्येक व्यक्ती बिनधास्त होते .त्याला कसलाच दबाव राहत नाही .मग उत्साहाच्या आहारी गेला कि सगळं काहि भान हरपून बसतो. त्याला जाणीव रहात नाही कुठल्याच गोष्टींची .बाहेरचे जग हे  चांगले तितकेच वाईट हि आसते.याचे हि भान असायला हवे .सहलीला गेल्यावर मौजमजा ही झालीच पाहिजे .पण त्या हि आपल्या मर्यादा राखून. काही जणांना सवय असते महिलांची छेडछाड करणे ,इतरांशी तुच्छतेने वागणे.कधी आशा गोष्टींचा  एक व्यक्ती मुळे सर्व टिमला नाहक ञास सहन करावा लागतो.याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे .आपल्या मुळे कुणाला ञास ही झाला पाहिजे .आणी कुणाचा ञास ही नको व्हायला. सहलीचा प्रवास हा कसा होतो ? हे आधी कोणालाच माहिती नसते .गाडी चालवाताना योग्य ती काळजी हवी.सिट बेल्ट नेहमी असावा..कधी कधी वाहनांना ओव्हर टेक करण्याचा मोह हि काही ना आवरता येत नाही .नंतर काय फजिती होईल याची पुसटशी कल्पना ही न केलेली बरी.ड्राईव्हिंग करताना चालक नेहमी निर्व्यसनी असावा.जाण असावी आपल्या जबाबदारीची.
जशी इतरांची वाट पहात असतील कोणीतरी .तसीच आपली ही पहाणारे असतात ना.
लहान मुलांची सहल हि तितकिच महत्त्वाची .त्यांची तर जास्त काळजी घ्यावी लागते.त्यांची सहल निघण्यापासुन ते परत येईपर्यंत त्यांना सांभाळावे लागते.शाळेची जबाबदारी राहते प्रत्येकाला सुरक्षितता देण्याची.जे कोण शिक्षक सहलीसाठी पुढे असतात.त्यांनीच हे नियोजन योग्य पद्धतीने करावे लागते. त्यांची फी ,मुलांची संख्या ,इथूनच खरी गमंत सहलमय होऊन जाते.नंतर जिथे जिथे जाणार तिथे तिथे आनंदाचा पुर नक्कीच लहानश्या चेहऱ्यावर मस्तवाल दिसू लागतो. गाडीमध्ये मुलांचा किलबिलाट ,यावेळी बहुदा शिक्षक ही सहन करतात.वर्गातले वातावरण नक्कीच विसरत असतील ..गार हवेची झुळूकीने खिडकीतून डोकावले की तो क्षण नक्कीच लक्षात रहातो.मग सारे वातावरण प्रत्येकाला निसर्गात रमण्यासाठी साद घालतं .हिरवाई मखमली वस्ञ,समुद्राचा क्षितिजा पलीकडं हि असणारा पहारा...मनाला स्पर्श केल्याशिवाय रहात नाही .... खरी मजा लुटण्याचा बेभान मनाचा वारु आनंदाच्या लहरीबरोबर निसर्गाच्या सानिध्यात आपलंसं करतो. कायम लक्षात रहावं इतपत तो पर्यटकांना खुश करतो.
सहलीचा खरा आनंद लुटतो .तो खरा भाग्यवान आसतो....जो भाग्यवान असतो ....ती सहल सदैव मनाच्या गुपीत शितलतेचा बहर आणुन पुढच्या दिवसांनां ,
क्षणांना ताजे तवाने करत असते .
हिच खरी सहल अनुभवावी..
प्रत्येकाने अगदी मनसोक्त आनंदाच्या सरीत ....फक्त आपली जबाबदारी ,नियम ,मर्यादा ,मर्जी .माणुसकी सांभाळून ....हेच खरं सहलीचं गणित......

रोहिदास होले ...७१
गोपाळवाडी ,दौंड ,पुणे...
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

साहित्य दर्पण व्दारा आयोजित 📗
           वैचारिक लेख माला
****************************
विषय------*सहल*
-------------------------------------------------
दिनांक ----- 9-10--2016
****************************
सहल हा तीन अक्षरी शब्द पण केवढी मजा आहे या शब्दात, हे शिक्षक असल्याशिवाय कळणार नाही कारण उद्या आपली सहल जाणार आहे असे म्हटल्याबरोबर त्या चिमुकल्या जीवाना होणारा आनंद वर्णन करणे शब्दातीत आहे.
विद्यार्थ्यांच्या सार्वांगिण विकासामध्ये शालेय अभ्यासाबरोबर पुरक उपक्रमाची जोड द्द्यावी लागते त्या दृष्टीने  शेक्षणिक सहल, वनभोजन आपण आयोजन करीत असतो.म्हणजेच शालेय जीवनात पुरक उपक्रम म्हणुण सहलीचे अनन्यसाधारण महत्व आहे.
मेंदु हा माणसाचा शिकण्याचा अवयव असतो.आणिअनुभव हे त्याचे खाद्य असते.अनुभव जेवढे जास्त तेवढे शिकणे जास्त, अनुभव घेण्यासाठी निरीक्षण महत्त्वाचे , आणि निरीक्षण म्हणजे काळजी पुर्वक बारकाईने  पाहणे.डोळ्यांनी आपण 83% ज्ञान मिळवतो.आणि ते चिरकाल स्मरणात राहते. म्हणुण सहलीचे आयोजन करणे गरजेचे आहे.
माझी शाळा जि.प.प्रा.शा. मुर्शदपुर ता.जि.बीड .छोटेसे गाव इ.1ते7 वर्ग
जमीनदारांची(पाटलांची)मुले बीडच्या शाळेत कारण बीड फक्त 12कि .मी. वर आहे. म्हणुण फक्त गरीबांची मुले गावातल्या शाळेत .माझ्या डोक्यात खुप दिवसापासुन सहल न्यायची हे होते .परंतु पालकांची साथ नाही.आर्थिक परिस्थिती नाजुक.
मग मी ठरवले दरवर्षी श्रावण माहिन्यात जवळपास कुठेतरी सहल न्यायची.
माझ्या शिक्षिका व मी चर्चा करुन ठरवले कि,जवळच असलेल्या शिवदरा या निसर्ग रम्य ठिकाणी जाऊ या ! ठरले मुलांना सुचना दिली. उद्या आपली सहल जाणार आहे. काय तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडत होता  , वर्णन करणे शक्य नाही. नकळत माझे मन भूतकाळात  कधी गेले समजलेच नाही. माझी आई पहाटेच उठून माझा डबा करुन देते आहे हे मी समक्ष पाहिल्याचा भास मला झाला( आई या जगात नाही) तिची सर्व धांदल मला दिसली. असो.
विद्यार्थ्यांना नेण्यासाठी टेम्पोची व्यवस्था केली .काही मुले रडत होती पैसे नाहीत मँडम माझ्या  आईकडे .त्यांना सांगितले  फक्त पैसे नसु द्या फक्त आईला माझ्या कडे घेऊन या.सर्व शिक्षकाकडे मुलांच्या याद्या करुन दिल्या.मुलांना सुचना दिल्या.आणि आमची सहल नियोजित स्थळी मार्गस्थ झाली.एक तासात आम्ही सहलीच्या ठिकाणी पोहचलो.
महादेवाचे सुंदर मंदिर आहे .दर्शन वगैरे झाले.मुलांना डोंगरावर चढायला आवडते म्हणुण त्यांच्याकडे लक्ष ठेऊन त्यांना मुक्तपणे खेळु दिले त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मोबाईल मध्ये टिपला. कोणी सुरपारंब्या,लंगडी , लपाछपी , झोके,घसरगुंडी इ. खेळ मुले खेळली. काही लबाड मुले पाणी पितो म्हणुण गुपचुप डोंगरावर गेली तिकडे दोन तीन हरीण दिसले म्हणुण त्यांच्या मागे मागे गेली.अंगत-पंगत बसली तर इ. 7 वी तील तीन मुले नाहीत हे लक्षात आले.माझी अवस्था विचारुच नका "वैरी न चिंती ते मन चिंती"
आता काय करावे वरच्या बाजुलाच छोटासा तलाव, दाट झाडी अरे बाप रे  मी तर खाली बसले काही सुचेना.
    तेवढ्यात ती मुले दिसली .काळजी दुर झाली,पण काळजाचा ठोका चुकला होता.सगळे जेवायला बसलो .
वदनी कवल घेता झाले . जेवण आटोपले नंतर मुलांचे कवितापाठांतर गाणे, डान्स, गाण्याच्या भेंड्या,नकला   इ. कार्यक्रम झाले .परतीची वेळझाली सर्वाना मोजुन टेम्पोत बसवले.शाळेत पोहचलो.सर्वाना आई वडीलाकडे सुपुर्द केले. अशाप्रकारे  सहल संपन्न झाली.सहल म्हटले कि मुलांना खुप जबाबादारीने सांभाळावे लागते. पण  आनंदाचे मोजमाप करता येत नाही इतका तो असीम आनंद असतो.पुन्हा अभ्यासासाठी मन ताजेतवाने होते. म्हणुण सहल ही शाळेतील असो कुटुंबाची असो वर्षातुन एकदा तरी काढावी.
****************************
मीना सानप  बीड @ 7
9424715865
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
+91 86980 67566‬

"सहल"
खरं खरं बोलावं माणसांनी. त्यातल्या त्यात मोठं झालेल्या माणसांनी, कारण सहल ही शालेय जीवनात आणि आता कौटुंबिक जीवनातही जात असते.पण खराआनंद तेव्हाचा होता की आताचा.
हे खरं सांगताना बहुतेकांचे म्हणणे नक्कीच... तेव्हाचा म्हणजे शालेय जीवनाचाच खरा सहल अनुभव आनंद देणारा होता. हे असणार आहे. मी तर अगदी ठामपणे हे सांगेन की शालेय जीवनातील सहल अनुभव निव्वळ आनंद देणाराच नव्हे तर अविस्मरणीय असाच असतो. कारण सहलीनिमित्त आपणास हिरो बनता येते, तर मोकळं मोकळं वावरताना कोणाच्या बंधनाशिवाय हवं तसं वागायला मिळतं.सरांचा धाक असतो पण भिती नसते. पण ज्यांची धास्ती, धाक, भिती  बंधनं असतात ते आई बाबा आपणास बंधनं घालण्यासाठी नसतात. हा वेगळा आनंद असतो.. शिवाय नजरेचे तीर जुळत असताना, आपलं कोणी सहलीत तीर मारणारं नि तीर झेलणारं असेल तर आनंदाला उधान येतं... सागर किनारी सहल असेल तर हे उधान सागर लाटांनाच जणू आव्हान देतं. ही तर अंदर की बात झाली. पण सहल म्हणजे केवळ मौजमजेसाठीच नाही तर ज्ञान वृंदिगत होण्यासाठी पण असते. खूप दिवसापूर्वी म्हणजे साधारण तीस वर्षापूर्वी आमची सहल दक्षिण भारतात गेली होती.आम्ही जवळपास पंचेवीस तीस विद्यार्थी होतो... फक्त मुलेच होतो. त्यामुळे स्वछंद पणाला खूपच वाव होता.. सोबत फक्त आवड असणारे म्हणजे हौसे सर होते. समुद्रकिनारी मनमोकळे आणि स्वच्छंदपणे वावरताना फॉरेनर हे खास आकर्षण असायचं. आम्हाला वा आमच्या सरांना कोणालाच अस्खलित इंग्रजी धड बोलता येत नव्हते. फक्त कामापुरतेच येत होते. फॉरेनर बरोबर फोटो काढण्याची आमची धडपड असायची पण संवाद कसा साधावा हेच कळत नव्हते दक्षिण भारत हिंदी नाकारणारा आणि इंग्रजी स्विकारणारा भाग. तिथंही मोडकं इंग्रजी बोलून आम्ही खूप हसायचो. खरं तर तेव्हा हसायला जास्त यायचं, जेव्हा आमच्या सरांनाच
बोलताना इंग्रजीचा अडथळा यायचा. आंध्र प्रदेशातील श्री.बालाजी दर्शनाला आम्ही सर्वजन गेलो आणि सरांसह आम्ही सर्वच विदयार्थ्यानी
केशवपन केले.. आम्हाला कोणीही ओळखणारे नाही हे ओळखून आम्ही.. म्हैसूरकडे जाताना अंगात टी शर्ट आणि फक्त लुंगी नेसून हातात सुटकेस घेऊन प्रवास करत होतो. लोक नवलाईनं आमच्याकडं पाहत होते, सुरवातीला आम्हालाही नवलच वाटले की इकडे सारे लुंगीवालेच असूनही आमच्याकडे असे नवलाईने का बघतात ? पण नंतर कळले की आम्ही पंचेवीस तीस केशवपन केलेले टकले एकत्र होतो..
नऊ दहा दिवसाच्या या सहल प्रवासातून अनेक
नवे आणि अविस्मरणीय अनुभव सोबत घेऊन आम्ही परतलो.. आजही स्मरणात आहे ती ट्रिप,
ते अनुभव आणि ती मज्जा. उसळत्या लाटाच्या सानिध्यात काढलेले फोटो, म्हैसूरचा राजवाडा, वृंदावन गार्डनमधील नाचणारी कारंजी, मनात तशीच नाचतात.विवेकानंदाच स्मरण देणारी कन्याकुमारी आणि तिथला सनराईज आणि सनसेट पारणे फेडून जातो.रामेश्वरमचे भव्य मंदिर
शिल्पकलेचा उकृष्ट नमूना, सारं सारं मनात जपलय. आणि फोटो रुपानं पेटीतही जपून ठेवलय. अथांग सागर आणि तसाच विस्तारलेला माझा भारत याचा आणि मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. मी सहलीतून दाक्षिण भारत फिरलो तर माझी सौ. उत्तर भारत फिरली आहे.तिचे वडील आर्मीत होते, त्यांच्या ड्यूटीमूळे
त्यांना उत्तरेकडे फिरता आले. आम्हा दोघा उभयताने भारत भ्रमण पूर्ण केले आहे.

                 श्री. हणमंत पडवळ.
      मु.पो. उपळे(मा.)ता. जि. उस्मानाबाद.
          8698067566.
                  क्रः 48
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

‪+91 99752 32602‬
साहित्य दर्पण आयोजित वैचारिक लेखमाला
     **** *सहल* ***

सहली विषयी माझे काही अनुभव जास्त नाहीत कारण ही तसच आहे लहान पणापासुनच घरची परिस्थिति माझ्यापासून लपुन नव्हती. शाळेत सहल निघाली तरीही मि घरी सांगायचो नाही. वडील नको मनत ही नसत पण माझ्या सहली मुळे त्यांनी भरत आनलेलि पोकळी आजून जास्त होईल म्हणून मि सहलिला न जायचा निर्णय घ्यायचो.  नंतर सहल गेल्यावर त्यांना कळाल की मला मनायचे बाळा मला एक वेळेस सांगायच तर.

पण नंतर B.sc ला मि प्रथम वर्षात होतो तेंव्हा एक सहल गेलि व मलाही जाव लागल कारण सरांचि धमकीच तसी होती की internal नापास करेन. एक दिवसाची लहान सहल होती.
नंतर मि द्वितीय वर्षात असताना चार पाच दिवसाची एक सहल निघाली पण मि गेलो नाही व घरीही सांगीतलो नाही की कॉलेजची सहल गेलीय म्हणून ते चार दिवस आमचे लेक्चर्स नसायचे तरीही मि कॉलेजला जाऊन येई नाहीतर मग घरी बसल्यास कारण तरी काय सांगणार.
पण मि तृतीय वर्षात असताना 2015 ला रसायनशास्त्र प्रकल्पांतर्गत हैदराबादला सहल निघाली. तीन चार दिवसाची सहल मि प्रथमच मोठ्या सहलिला जात होतो.  आमचा मुख्य उद्देश Indian institute of chemical technology ला जाण होत.

शनिवार 17 जानेवारी 2015 ला रात्री 10 च्या दरम्यान आमची गाडी कॅम्पसच्या बाहेर पडली. पोरंचा रात्र भर धींगाणा चालू होता अंताक्षरयांचा जमाना नाही हा पोर चालत्या गाडित खुप नाचली रात्र भर मला हे पसंद  नव्हत मि रात्र भर एक प्रेक्षकाची भूमिका घेतली.
दुसऱ्या दिवशी सकाळी चिल्कुरच्या देवाच दर्शन घेतलो.( तर काहींनी देविच) तिथून आम्ही गोलकुंडा किल्ला पाहिलो. ककाटीया साम्राज्यात त्याच निर्माण झाल आहे हा किल्ला खुप विशाल आहे 11 किमी च्या आवारात पसरला आहे. एका दिवसात किल्ला पाहण अशक्य, किल्यात मंदिर मज्जिदि आहेत.  याच किल्यात कोहिनूर हिरा सापडला होता.
नंतर आम्ही सालारजंग वस्तुसंग्रालयात गेलो तिथ हजारो वर्षापूर्वीच्या वास्तु संग्रहित आहेत  विविध शिल्पे, फर्नीचर, मूर्ति, पेंटिंग्स, पांडुलिपि,  टेक्सटाइल, आश्या लाखो वस्तुच दालन आहे या वस्तु फ्रांस, नेपाल, जपान, यूरोप, उत्तर अमेरिका, चीन,  भारताच्या विविध भागातुन संग्रहित करण्यात आले आहेत. सालारजंग हे भारताच्या प्रमुख तीन वस्तुसंग्रालयापैकी एक आहे. हे वस्तुसंग्रालय नवाब मीर यूसुफ अली खान सालार जंग तृतिय यांनी उभारल.

त्यानंतर आम्ही फलकनुमा महल ( नवाब पॅलेस ) पाहायला गेलो. अप्रतिम कलाकृति, सोन्या चांदीचे बरेच वस्तु आहेत. त्यांच्या गाड्या, हथियार व सुंदर बगीच्या एकूणच महल पाहन्याजोग आहे. निज़ामी थाट काही वेगळाच होता. नंतर काचीगुड़ा रेलवे  स्थानकाजवळ एका धर्मशाळेत मुक्काम केला.
दुसऱ्या दिवशी सोमवारी आम्ही IICT (  Indian institute of chemical technology ) ला भेट दिलो. तिथ अनेक विषयावर संशोधन चालू होत. अनेक उपकरण पाहिलो कोटिच्या कोटि कीमतींचे. तिथ गेल्यावर अभ्यास करण्याची नवी जिद्द मिळाली. अनेक मोठ्या संशोधकांच्या भेटी घेतल्या. नंतर प्लांटोरीयम पाहिलो अद्भुत अनुभव होता पूर्ण आकाश कव्यात आल्यागत झाल. मग बिर्ला टेम्पल व बिर्ला वस्तुसंग्रालय पाहिलो.

आज हैदराबादेतिल तीसरा व शेवटचा दिवस होता स्नो वर्ल्ड का भेट दिलो, कश्मीरात गेल्यागत वाटल एक घंटा पूर्ण बर्फात खेळलो. काश्मीर वारीच झाली. मग बनावट जंगल सफारी झाली अंधारात खुप मजा आली अनेक जण तर भीतिन थरथरत होती. विविध प्रकारचे भीतिदायक आवाज, रक्ताने माकलेले मृतदेहे, विविध बनावटी पन हुबेहुब जंगली जीव.  त्यानंतर मज्जिद व चारमीनार पाहिलो. थोड़ी फार खरेदी करून कोटी मार्केटकड निघालो. तिथही थोड़ी फार खरेदी केलि व निलंग्याला निघालो.

                  अमोल अलगुडे
                      स क्र 51
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
‪+91 75880 55882‬

🌹साहित्य दरबार🌹
🌹  सहल         🌹
   दररोज नियमीत शाळेत येणारा विद्यार्थी मानसिक दृष्ट्या कशात रममाण होत असेल त मैदानावर.
मैदानावर खेळायला जायचे म्हटले की,एवढा आनंद होतो म्हणून...सांगता येत नाही परंतु शरीराच्या हालचालीतून आनंद व्यक्त होतो आणि खेळता खेळता  एखादा स्वर निघतो मॅडम आपली कुठेतरी सहल काढा ना.रोजच्या दिनचर्येचा सर्वांना कुठेतरी कंटाळा  आलेला असतो.एक विरंगुळा म्हणून का होईना,आपल्याला देखील काही नाविन्याचे,विश्रांतीचे,मौजमजेचे,अभूतपूर्व, संस्मरणीय क्षण जगण्याची लालसा मनात निर्माण होते वआपण देखील हौसेने, न थकता सहलीच्या नियोजनाला लागतो.
       मी सातवीला असताना 1977 ला जि.प. कन्या शाळा जिंतूर या ठिकाणाहून आमची सहल निघाली होती.सर्व मुली होतो आम्ही.औरंगाबाद, दौलताबाद, वेरूळ,अजिंठा या ठिकाणी तीन दिवसाची सहल होती.अतिशय रंजक व संस्मरणीय अशी ही सहल .मला अजूनही आठवते दौलताबादच्या किल्यावर आम्हाला पैसे देऊन पाणी घ्यावे लागले होते.चढताना व उतरताना आमची जी दमछाक झाली होती ती अजूनही आठवते.परंतु अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रम होता तो.आमचे मोरेसर मुख्याध्यापक त्यांचा पाय किल्ल्यावरुन थोडा घसरला होता व आम्ही चार पाच मुलींनी पटकन सावरले होते.व सगळे अवाक झाले होते.
    औरंगाबादला आल्यावर बिबीका मकबरा पाहिला व पाणचक्कीच्या त्या सुनह-या बगीच्यात आम्ही मनसोक्त फुलांच्या रंगाना डोळयात टिपले.पाण्यातील माश्याना खायला लाडु टाकले .किती गंमत आली म्हणून सांगु आज मला लहान असल्याचा भास होतो आहे.वेरूळ ची लेणी पाहिली अजिंठाची गुफा पाहिली सराशी देखील तेथील ऐतिहासिक माहिती सांगितली.गौतमबुद्धाची एक मूर्ती आहे तिथे तीन बाजुनी दाखवली तिच्या चेह-यावर वेगवेगळे भाव दिसतात .काय सुंदर रेखीव मूर्ती व रंगकाम आहे .किल्यावर गेंडा तोफ सरानी सर्व माहितीदिली.
     एका मोठ्या विश्रामगृहात आमचा मुक्काम सर्वांची स्नानाला गर्दी ,काय मज्जा आली ..जेवण हाॅटेल मध्ये..अतिशय नियोजनबध्द अशी आमची सहल ऐतिहासिक वारसा स्मरणात ठेवून पार पडली.
   मी आठवीला गेले मोठी शाळा जि.प.प्रशाला जिंतूर दहावी पर्यंत शाळा सगळेच नवे.आमच्या वर्ग शिक्षीका सौ.गंगुबाई होत्या नऊवारी पातळ घालायच्या .त्यानी आम्हाला "माझी सहल"याविषयी निबंध लिहायला सांगितले.मी 8वीला बेलबाॅटम व शर्ट घालायची त्या मला नेहमी रागवायच्या व वर्गात उभे करायच्या .मी राहायची  उभी त्याना काही म्हणत नसे कारण उलट बोलायची सवय नव्हती  त्या म्हणायच्या," मुलींनी पॅन्ट घालुन नये ".मी एक दिवस तुझी पॅन्ट काञीनी कापीन.मी काहीच बोलले नाही.आणि त्याच गंगुबाई मॅमनी 'माझी सहल 'हा निबंध लिहायला सांगितला आहे.राञीचे नऊ वाजले होते माझा अभ्यास झालेला होता विमला एकदम आठवले ..म्हटले बापरे ...आता उद्या काही खरे नाही.आणि मी उठले नाहीच ..पालथे झोपूनच जागेवरच निबंध लिहीला माझी सहल..ती वही होती माझी रफ रफवहीवर निबंध लिहीला शेवट झाला व तशीच पालथीच झोपी गेले.
    सकाळी शाळेत गेले सर्वांना मॅमनी वह्या मागितल्या मी पण दिली .मॅमनी वह्या हातात घ्यायला सुरुवात केली निबंध वाचत होत्या मॅडम...एक..दोन ..तीन..चार..माझा नंबर आला...निबंध वाचला..स्नेहलता इकडे ये..
मॅडम म्हणाल्या मी घाबरले ..म्हटलं. .आता काही खरे नाही..आणि मॅडम जवळ गेले..मॅडम म्हणाल्या,"निबंध तू वाचून दाखव सर्वांना ,किती छान लिहीलास गं"आणि ही तुझी रफवहीवर ..एवढी व्यवस्थित किती छान.मला तर आश्चर्याचा धक्काच बसला आणि जगातले आठवे आश्चर्य. .गंगुबाई मॅडमला मी त्या दिवसापासून एवढी आवडायला लागले की,स्नेहलता वर्गाची माॅनीटर झाली.मॅडमची आवडती झाली वर्गातील मुली आश्चर्यचकित झाल्या.निबंधात मी वेगळे काही लिहीले नव्हते जे घडले ते व सहलीत आलेले अनुभव थोड्या गमती-जमती
एवढा बदल सहलीने केला.
     विद्यार्थ्यांच्या विचाराला चालना देणारा विषय आहे सहल.भावविश्वात रममाणकरणारा सहलीचा अनुभव प्रत्येकाला आवडतो .जगण्यात नाविन्य येते वेगवेगळ्या ठिकाणची ऐतिहासिक स्थळाची माहिती मिळते व ती स्मृती पटलावर कोरली जाते ती अमीट असते.हा संस्कार विद्यार्थी दशेत  झालाच पाहिजे. विद्यार्थी व शिक्षक असा भेद त्यात राहत नाही सगळे एकमेकाचे मित्र बनतात.
      जि.प.कन्या प्रश्नाला माजलगाव येथे असताना मी पण मुलीन सोबत सहलीला गेले होते.अतिशय गटाप्रमाणे नियोजन करुन अतिशय शिस्तीत आमची सहल झाली.मुली आपल्यात मिसळतात ते सांगते ...एक मुलगी माझ्याजवळ बसायची माझा हात हातात घ्यायची व गाणे म्हणायची..तेरे चेहरेसे नजर नही हटती....आश्चर्य वाटले..मनमोकळे करण्याचा मार्ग. एकमेकांन बद्ल मनमोकळेपणाने व्यक्त होण्याचे ठिकाण.विचार समजून घेण्याचे ठिकाण.सर्वांनी याचा अनुभव घेतला पाहिजे.
   "चला चलारे चला चला
     उडु बागडु फुलपाखरासम
      रंगबिरंगे फुलानवरुन
       होवु व्यक्त मनोमनी
        सर्वांच्या मनातुनी
***********************
स्नेहलता कुलथे
मोबा 7588055882
क्र 37🌹
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

‪+91 90116 59747‬: स्पर्धेसाठी.

     🌹सहल🌹.

सहल!  ऐकताच  कसे  छान वाटते. किती सुरेख कल्पना आहे. अगदी लहानांन पासून तर मोठ्यांपर्यंत आवडीचा विषय आहे. सहल म्हणजे आनंदाचं उत्साहाचे वातावरण मनमुराद आनंद लुटण्याची ही छान सी चालून आलेली संधीच. त्यात जर समवयस्क असतील तर  दुधात साखर. मी तर म्हणेन हा सहलीचा  आनंद सर्वांनी लुटावा.कारण सहली सारख आरोग्याचं दुसर टाॅनिक नाही. सर्व चिंता ,आरोग्याच्या तक्रारी कामाचे  व्याप निदान काही दिवस तरी आपण विसरून जातो.आणि अशा सहली ही लाभदायक ठरतात.म्हणून प्रत्येकाने सहलीला वर्षातून एकदा तरी जावे.
          मुलांना आपण आवर्जून सहलीला पाठवावे. निसर्ग, पाण्याचे धबधबे सर्व मित्रच  असल्याने खोड्या, थोडा धिंगाणा, मनाजोगते खेळ मस्करी यात भरभरून हसणारी ती बालमनं खुप आनंदून जातात. मोकळ्या वातावरणात ती मनमुराद नाचतात,खेळ खेळतात, गाणी,नाच अशा सहलीच्या आनंदात ते छान रमून जातात.नेहमी पेक्षा वेगळे वातावरण मनाला मोहून टाकते.तेच ते घर, शाळा यातून वेगळे बघायला मिळते. मुले अशा सहलीत छान मौज लुटतात.ती बालमनं आनंदाने फुलून जातात.
         मोठ्यांनी सुद्धा अशा सहलींचा आनंद घ्यावा. यातून आपण स्वतःसाठी वेळ देऊ शकतो. घर प्रपंचापासून सुटका मिळून थोडे वेगळे वेळापत्रक बनते. मग नाही कोणती कामे सर्व आयतेच. फक्त फिरणे गप्पा गोष्टी त रमून जाणे.आवडी निवडी जोपासने,आवडती ठिकाणे पाहणे याने  मन प्रफुल्लीत होते. कामाचा व चिंतेचा विसर पडून माणूस त्या ठिकाणी रमून जातो.समवयस्क असल्याने गप्पा गोष्टींना दिलेला भरपूर वेळ, एकत्र सहभोजन ,शाॅपिंग.वा!किती छान ना..आनंद व समाधान हेच मनाचं उत्तम टाॅनिक आहे. असच मी म्हणेन.संसारात माणुस पैसा असूनही टेन्शन मधे जगतो.व्याधींना सामोरा जातो. पण आपण जर एखादे ठिकाण पाहून आलो की बघा किती छान वाटते. पुन्हा नवा उत्साह जोश व हुशारी वाटते. त्या आठवणींनी मनी सुखावून जातो.
            याचच उत्तम उदाहरण म्हणजे मी स्वत नैनिताल ला गेले होते.आमचा 35 जणांचा ग्रुप होता. मुक्काम करतच पुढे जात होतो.पण गाडीत कधी कधी 10 ते 12 तास सतत प्रवास करावा लागे.पण लोक मनमिळावू व रसिक हौशी असल्याने आम्ही खुप मजा करीत. होतो.मग कधी गाण्यांच्या भेंड्या तर कधी काॅमेडी करायची तर संगीत गाणी म्हणून खुप हशा पिकायचा.वेळ कसा जायचा कळायचे ही नाही. या लोकांची इतकी सवय होवून गेली की घरी आलो तरी तिथल्या च आठवणी येत होत्या. मग एकमेकांना फोन वरून गंमतीने बोलायचे.आमच्या त नाशिकचे 72 वर्षाचे एक आजोबा होते.घरी आल्यावर 2-3 दिवसांनी त्यांचा फोन  आला .पुष्पा तुमची सर्वांची खुप आठवण येते.माझ्या इतक्यात आयुष्यात मी एवढा कधीच हसलो नव्हतो.माझ्या व्याधींची तर मला आठवण ही  आली नाही. कारण तुम्ही लोक मनमिळावू असून  गंमतीदार होतात. शिवाय एकमेकांत  आपुलकी ही जाणवत होती. योग आला तर तुमच्या सोबत नक्की च  येण्याचा मानस आहे. आमरनाथ यात्रेतही खुप  छान  अनुभव आले. मला सहलींना जायला तसे सर्वांनाच आवडते फक्त शरीराची मजबूत साथ हवी.
          म्हणून प्रत्येकाने अशा छान छान सहलींना  जावे.मन ताजेतवाने होवून मनाला प्रसन्न वाटते. नयनरम्य परिसर पाहून मन उल्हसित होते.आजारी माणसाला सुद्धा हवा पाण्यासाठी वेगळ्या ठिकाणी  पाठवतात.म्हणून वर्षातून एकदा तरी फिरायला सहलीला नक्कीच जावे.
.       जीवन खुप सुंदर आहे. आणि भरपूर आनंद ही आहे. फक्त तो कसा उपभोगायचा हे स्वतःच ठरवायचे असते. त्यात निसर्ग हा नवचैतन्याचा व आनंदाचा खजिना आहे. तो प्रत्येकाने भरभरून लुटावा.
     शेवटी  आपलं आरोग्य हीच खरी संपत्ती आहे नाही का.

          पुष्पा सदाकाळ भोसरी
             @ 50 .
           9011659747.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🚌....🚎.... *सहल* ...🚙....🚕

सहल म्हटले की ते शाळेतील दिवस अजुन ही आठवतात. सर वर्गात सहलीची सूचना देतात की अमुक तारखेला सकाळी सकाळी आपणास सहलीला जायचे आहे. ज्याना कुणाला यायचे आहे त्यांनी अमुक तारखेपर्यंत नांव कळवा. ही सूचना ऐकून घरी जायचो आणि आई बाबांच्या परवानगीची वाट पहायची. परवानगी मिळाली की काय आनंद व्हायचा की फक्त उडी मारणे तेवढे बाकी राहायचे. सहलीला जाण्यासाठीच्या यादीत एकदाचे नाव समाविष्ट करायचो आणि सहलीला जायची तयारी करायचो. सहलीचा दिवस जवळ येईपर्यंत मनाचा उत्साह भरभरून असायचे. सहलीला जाण्यासाठी काय काय सामान घ्यावे याची यादी करून मग आपली बैग तयार ठेवायची. अखेर सहलीचा दिवस उजडायाचा आणि एकदाचे
सहल आनंदात संपन्न व्हायची.

पण आज ही सहल म्हटले की ह्या तीन प्रश्नाची उत्तरे शोधत रहावी लागतात आणि त्याचे उत्तर जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत सहलीचे महत्व वाटत नाही.

*सहल का काढावी ?*

बऱ्याच वेळा सहल म्हटले की आगाऊचा खर्च वाटतो आणि शारीरिक त्रास सुद्धा किती होतो ? याचे हिशेब जुळवत बसलो तर सहल नकोसे वाटते. सहलीमध्ये वेळेवर खायला मिळत नाही ना झोपायला. त्यापेक्षा आपले घरी रहाणे बरे असे विचार करणारे सुध्दा भरपूर जन असतात. त्यांना सहल नावाची प्रक्रिया क्षुल्लक आणि वेळखाऊ वाटते. पण तसे काही नाही हे समजून घेणे आवश्यक आहे.
कारण सहलीमुळे घरातल्यापेक्षा वेगवेगळे अनुभव मिळतात ज्याचा उपयोग पुढील जीवनात होतो.
सहकार्याची भावना वाढीस लागते. सहलीत कोणी जवळ नसताना मित्रच मित्राला कश्याप्रकारे मदत करतात याचे अनुभव मिळतात त्याचे संस्कार त्यांच्यावर होतात. सकाळपासून सायंकाळ पर्यंत सोबत राहिल्यामुळे एकमेकाची आवड निवड कळते. एकमेकातील मैत्री वृधिंगत होण्यास मदत मिळते. ज्या भागात सहल जाणार आहे याची प्राथमिक माहिती सुरुवाती ला गोळा केल्या जाते तर सहलीनंतर त्या स्थळाची माहिती परिपूर्ण होते. कधीही विसरणार नाही अशी माहिती या सहलीमुळे मिळते त्यामुळे प्रत्येकांच्या जीवनात सहल आवश्यक आहे.

*सहलीचे नियोजन -*

सहली चे नियोजन करताना तेथील परिस्थिती आणि वातावरण लक्षात घ्यावे. उन्हाळ्याच्या दिवसात थंड हवेच्या ठिकाणी सहल काढणे योग्य राहते तर पावसाळ्याच्या दिवसात शक्यतो सहल काढणे उचित ठरणार नाही. पावसात सहल काढताना निसर्ग रम्य ठिकाणी किंवा जेथे उंचावरुन पाणी खोल दरीत पडते. अशा ठिकाणी सहल काढणे उचित ठरते. सहसा डिसेंबर, जानेवारी, आणि फेब्रुवारी महिन्यात निसर्ग सहल फायदेशीर राहते. त्यानंतर उन्हाची तीव्रता वाढते अश्या वेळी थंड हवेच्या ठिकाणी जाने चांगले राहिल. शाळेतील मुलांची सहल आयोजित करताना त्यांच्या वयोगटा नुसार स्थळ नियोजित करावे. शक्यतो दहा बारा वर्षाच्या मुलांची सहल एका दिवसाची तर बारा ते सोळा वर्षाच्या मुलाची तीन ते चार दिवसाची सहल नियोजित करावी. मोठ्या मुलाची आणि मुलीची वेगळी व्यवस्था केले तर योग्य राहिल. मुलींसोबत शक्यतो महिला शिक्षिका असणे पालकाना आणि मुलींना सुरक्षित वाटते. सहलीत सुरक्षेची काळजी घेणे हे ही महत्वाचे आहे.

*सहलीची तयारी -*

सहलीला जायचे म्हटले की अनेक गोष्टीची तयारी करावी लागते. आपणास सकाळपासून सायंकाळपर्यंत लागणाऱ्या सर्व वस्तू सोबत घ्यावे लागते त्याच सोबत एखादा ड्रेस ही ठेवावे लागते. बॅटरी एक आवश्यक बाब आहे जे की सहलीत खूप कामाला पडते त्यामुळे ते पण सोबत घ्यावे. सहलीत खाण्याचे खुप हाल होतात म्हणून थोडा फराळ सोबत असू द्यावे म्हणजे भूकमार होणार नाही. काही औषधी गोळ्या ही असावेत. या सर्व गोष्टीची काळजी घेऊन सहलीला निघाल्यास त्रास कमी होईल आणि सहलीचा आनंद स्वतः सोबत इतराना ही देता येईल.

चला तर मग झाली की सहलीची नियोजन आणि तयारी. जाऊ या सहलीला, आनंद लुटायला

- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
  09423625769

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 सहल संपली 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

4 comments: