Friday, 14 October 2016

नाद चारोळी स्पर्धा भाग 26

📚 साहित्य दर्पण 📚

          आयोजित
*नाद चारोळी स्पर्धा - भाग २६ वा*

*विषय :- धर्म आणि राजकारण*

संकल्पना : सौ. वृषाली वानखडे
संयोजक : आप्पासाहेब सुरावसे
परिक्षक : जयश्री पाटील
संकलन : ना. सा. सर /संतोष शेळके
ग्राफीक्स : अनिल लांडगे
***************************
*संकलित चारोळ्या :-*

*राजकारणी चिंधड़या सोज्वळ धर्मात का गुम्फता ?*

*पुढारी वक्तव्याची संपवा कीड़ी नग्न पाशता*

*फक्त हवे सत्कर्म देशप्रेमात खरी धन्यता*

*सर्व धर्म समभाव, हवी आता सृजन मनी निर्मळता*

✍🏻..वृषाली वानखड़े🇮🇳
🌴अमरावती🌴**75**
***👆🏻स्पर्धेसाठी 👆🏻***

*राजकारणात धर्माच्या नावावर*
*सर्रास खेळ खेळले जातात*
*एकाच रिंगणात* _*धर्म आणि राजकारण*_
*गुण्यागोविंदाने नांदतात*

        *👆🏿स्पर्धेसाठी👆🏿*

_कल्पना जगदाळे@8★बीड._

धर्म आणि राजकारण
यामध्ये फरक असतो
धर्म जगणे शिकवतो तर
राजकारणाला धर्म नसतो .

घनश्याम बोह्राडे
समुह क्र 19
*स्पर्धेसाठी चारोळी*

नाद चारोळी स्पर्धेसाठी ::
धर्माचा घेऊनी आधार
राजकारणाचा प्रचार
कुरघोडीचे यत्न तिथे
अंधानुकरणी प्रसार
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे
@39

देती मंडलला कमंडलुचा शह
राममंदिराची बाबरीवर मात
भरकटले राजकारण धर्माने
असहिष्णुतेने सांस्कृतिक घात
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे
@39

धर्म आणि राजकारणाची सरमिसळ
नैतिकता लोपता ती अशुध्दीची भेसळ
मतलब साध्य कराया मनांची घुसळ
धर्माचे अवडंबर माजवी सळसळ
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे
@39



राजकारणात धर्म की,
धर्मात आहे राजकारण।।
कळेना मजला काही,
खरुज आहे की गजकरण।।


✒अनिल लांडगे उंडणगाव@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

👆👆स्पर्धेसाठी...👆👆

ओळखून घ्यावेत पवित्रे
धर्म आणि राजकारणाचे
खुलेआम ती हिंसेची सत्रे
भय मानवता मरणाचे
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे
@39

धर्म ही झाला सनातन
राजकारण वरताण
संकुचित झाली प्रवृत्ती
मानवतेवर ये ताण
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे
@39

नाद चारोळी स्पर्धा

राजकारणात सुधर्म असावा
धर्मकारणात सत्कर्म व्हावा
सत्य अहिंसेचा मर्म जाणावा
खरा तो एकची धर्म असावा।

सौ.मनिषा वाणी.
सुरत.१३.१०.२०१६.
०९४२६८१०१०९
@२


मूळात *राजकारण अाणि धर्म* हे विषय

समाजात वावरताना असावेत स्वतंत्र

सत्तेवर येण्यासाठी सध्या माञ वापरला

जातो हाच एकमेव घातक असा मंञ

@ २१ सुनिल बेंडे
    *नाथसेवक*
             

स्पर्धेसाठी चारोळी

राजकारणात धर्म आहे की
धर्मात राजकारण कळत नाही
धर्माशिवाय राजकारणाचं घोडं
कधीच पुढे पळत नाही
... सौ शशिकला बनकर @35

१-धर्म आणि राजकारण
एकाच नाण्याच्या बाजू दोन
अक्कल हुशारीने वापर करुन
मुरब्बी पुढारी येतात निवडून

   स्पर्धेसाठी
नादचारोळी
*****************
२-धर्माच्या नावाखाली
केले जाते राजकारण
सामान्य जनतेत फूट पडते
होतात दंगली पेटते रण

३-धर्म असावा माणूसकीचा
असीम निष्ठा देशावर असावी
राजकारण्यांची चाल ओळखा
काळाची पावले ओळखावी

४-धर्माच्या नावाखाली
पेटते रणधुमाळी
पुढारी भाजून घेतात
त्यावर आपली पोळी

५-महाराष्ट्र धर्म वाढवावा
राजकारणाला थारा नसावा
देशात एकोपा असावा
भारत एकसंध व्हावा
प्राची देशपांडे

स्पर्धेसाठी
नादचारोळी
*****************
२-धर्माच्या नावाखाली
केले जाते राजकारण
सामान्य जनतेत फूट पडते
होतात दंगली पेटते रण
*******************
प्राची देशपांडे
समूहक्र. १५

स्पर्धेसाठी नाही ❌
राजकारण करताना
घेतात धर्माचा आधार
वाटतंय यांना झालाय
अंधश्रध्देचा आजार
..... सौ. शशिकला बनकर @35

*स्पर्धेसाठी*

*नादचारोळी*

*धर्माशिवाय आजचे राजकारण*

*चालूच शकत नाही*

*जनतेची सेवा हे व्रत*

*राजकारणी पाळूच शकत नाही*

*चौधरी बालाजी सर*
*लातूर*    स.क्र. *82*

🙏�स्पर्धेसाठी🙏�

समाजाला लागलेली किड
म्हणजे धर्म आणि राजकारण।
व्यक्ति आणि समाजहित टाळून,
पुढारी करतात स्वहिताचे अर्थकारण।

मीनाक्षी माळकर
68

🙏�स्पर्धेसाठी नाही🙏�

धर्मात राजकारण,
की राजकारणात धर्म।
अलिप्त ठेवले दोन्ही
तरच होईल आदर्श कर्म।

मीनाक्षी माळकर
68

  
*धर्म आणि राजकारण*   
_एकप्रकारच जातंच आहे_
_दोघांच्या संघनमताने_ _जनतेस मात्र इथे भरडवल_ _जात आहे_

❎स्पर्धेसाठी नाही❎

*_कल्पना जगदाळे@8★बीड._*

स्पर्धेसाठी

*धर्म* आणि *राजकारण*

राजाश्रयाने धर्म वाढला
जाता आश्रय झाला -हास
राजकारण अन् धर्माचे अतूट नाते
वाचून पहा इतिहास

- आत्तम गेंदे @8

✍नादचारोळी स्पर्धेसाठी✍

राजकारण म्हणजे समाजकारण
विसर पडला समाजसेवेचा..
धर्माचे करुन भांडवल अनेकांनी
स्वार्थ साधला सत्तेचा...

🙏श्री सगर पी एच🙏
@83@ धर्माबाद
          9405628375



भारतीय लोकशाही मध्ये,
धर्म आणि राजकारण आहे।।
या दोहोंच्या मध्ये बिचाऱ्या,
सामान्य जनतेचे मरण आहे।।


✒अनिल लांडगे उंडणगाव@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

✖स्पर्धेसाठी नाही...✖

स्पर्धेसाठी

अधर्माचा पोरखेळ
धर्मावरूनच चालतो...
राजकारण करत करत
पुढारी साळसुद बोलतो...॥

         श्री.हणमंत पडवळ
     मु.पो. उपळे(मा.) ता. जि. उस्मानाबाद.
                क्रः 48.

🎯 स्पर्धेसाठी🎯
भोळ्या भाबड्या जनतेला देऊन
आश्वासनं करतात सत्ताधारण
स्वतःला धर्माचे ठेकेदार मानून
जाती भेदांचे करतात राजकारण

  ✍जोगदंड जयश्री
@jj62......

धर्म आणि राजकारण
१.
उठसूट साऱ्यांनाच
धर्माचा पुळका येतो..
या पुळ्क्यामागे खरं तर
राजकारणाचा खेळ चालतो... ॥
२.
राजकारणातून धर्म
सुटला नाही पाहिजे
पुढारी म्हणतो,आपला
धंदा चालला पाहिजे....॥
३.
राजकारणाच्या बाजारात
धर्म  विकला जातो....
खेळ पुढाऱ्यांचा होतो
पण सामान्यच ठोकला जातो...॥
४.
ज्याला त्याला धर्माआधी
राजकारण कळते.....
घराघरातून आता त्याचे
बाळकडू मिळते....॥

         श्री.हणमंत पडवळ
     मु.पो. उपळे(मा.) ता. जि. उस्मानाबाद.
                क्रः 48.

✍नादचारोळी स्पर्धेसाठी नाही✍

राजकारणी लोकांचा  नसतो धर्म
धर्माच्या नावाखाली घडतात कूकर्म..
सामान्य पिडितांचे कोण जानितो मर्म
राजकारणाने बनला धर्माचा अधर्म...


धर्माच्या नावाखाली फूट पाडून
राजकारणी खेळतात भावनेची खेळी..
कांहीचे फावले साजरी झाली दिवाळी
अनेकांच्या आयुष्याची झाली राखरांगोळी...

श्री सगर पी एच @83@
धर्माबाद -8275938319

स्पर्धेसाठी चारोळी

राजकारणात नेतेमंडळी
बेतालपणे बोलत असतात
मताच्या तराजूत माञ
धर्माला तोलत असतात !!!
     
     -आबासाहेब निर्मळे.
पेठ वडगांव,कोल्हापूर.
9028090266.
क्र-३१



ज्याला हवे असेल तसे,
तो राजकारण करतो।।
धर्माच्या कुबड्या घेऊन,
मतलबाच्या उड्या मारतो।।


✒अनिल लांडगे उंडणगाव@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

✖स्पर्धेसाठी नाही...✖

राजकारण हे राजकारणचं
असत
पत्ते अन् ते सेमच असत
चांगली माणसे सत्तेवर भेटणे
आपल्या हातात नसतं

कविता शिंदे ....६७

राजकारणात नसेल मुरलेले
तरी डोक्याने काम पाहिजे
जात-धर्म काय किंवा वाद
लढताना खरा खुरा धडाकेबाज
पाहिजे

कविता शिंदे..... ६७

*धर्म आणि राजकारणात*
_समाजभावना पेटवल्या_ _जातात_
_दोघांच्या भांडणात तिसरेच_
_लाभ घेवून जातात_

❎स्पर्धेस नाही❎

*कल्पना जगदाळे@8★बीड*🖊
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
       

****************************
धर्म आणि राजकारण नातं तस जवळचं
धर्माच्या नावावर राजकारणी हात जोडतो
राजकारणात पैशाचा जम बसला की,
मात्र धर्माला विसरुन स्वार्थात बुडतो
***************************
मीना सानप बीड @ 7
9423715865
स्पर्धेसाठी👆
****************************

स्पर्धैसाठी🌺

धर्म करीत नाही भेद कशात,
कारण धर्मात कर्तव्यदक्ष दडलेले असते..!
राजकारणात असून विसरे धर्म,
कारण सत्ता हव्यास त्यास कृतघ्न बनविते..!

          बंडोपंत कुलकर्णी सोलापूर @ १३



धर्माच्या नावावर कार्यकर्ते,
आपसात भांडत असतात।।
राजकारणात नेते मतलबाचा,
सारीपाठ मांडत असतात।।


✒अनिल लांडगे उंडणगाव@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

✖स्पर्धेसाठी नाही...✖

साहित्य दर्पण व्दारा
नाद चारोळी स्पर्धा
*********************
धर्म आणि राजकारण म्हणजे वर्तुळ
वर्तुळाचा व्यास म्हणजे धर्म असते
तर राजकारण म्हणजे त्रिज्या असते
व्यासाशिवाय त्रिज्या अधुरीच असते
****************************
मीना सानप बीड @ 7
9423715865
स्पर्धेसाठी नाही

धर्म आणि राजकारण
एकाच नाण्याच्या दोन
बाजु आहेत
एक समाजाला खातो आहे
तर
दुसरे देशाला खात आहे.

- नासा येवतीकर, धर्माबाद

स्पर्धेसाठी ग्राह्य

                      नाद चारोळी स्पर्धेसाठी                          🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸                                                                                         भारत देशा विविधरुपी एकता                         समान सारे धर्म एकञ नांदती                     राजकारण करण्या डाव धर्माचा                करुनी दंगल घेती निर्दोषाचे बळी           🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸                                                    निता आरसुळे  जालना @८९

स्पर्धेसाठी.

धर्म जोपासावा  माणुसकीचा

राजकारणात झेंडा कर्तव्याचा

निर्धार  एकसंघ  भारताचा

उरी  अभिमान  मायभूमीचा.

       पुष्पा सदाकाळ भोसरी
    @ 50.9011659747..

धर्म आणि राजकारणाने
रोखली देशाची प्रगती
आपलाच स्वार्थ साधण्याने
फोफावली आहे विकृती

          शैलजा ओव्हाळ/चिलवंत
                       @ 73
                 स्पर्धेसाठी

धर्म आणि राजकारण
"राजकारणाला लेबल लावून धर्माचे
वणवे पेटविले यांनी मानवद्वेषाचे,
माणसामाणसात बांधल्या भिंती
करुन चिखल मानवी रक्ताचे."
*संगीता देशमुख@१४*
स्पर्धेसाठी

राजकारणात आता येथे
रोज नवीन थाट असतो..!
धर्माच्या नावावर राजकारणी
बघता पोळीचा पाट करतो..!!
       गजानन पाटील पवार @81

    स्पर्धेसाठी
राजकारणामध्ये वरवर
दिसते जरी सादगी
धर्माच्या नावाखाली
बांधली माणुसकी ची थडगी
   🍂नीता आंधळे🍂
       अहमदनगर
        @22

धर्माच्या बोटांना धरून
राजकारण काढते धावा..!
कोणी झाला बाद येथे,
कोणाचा वाटतो हेवा..!!
           जी.पी 81
*स्पर्धेसाठी नाही*

1) राजकारणात धर्म करा
     किंवा धर्मात राजकारण
     पैसा मात्र स्वीस बॅंकेत भरा
     असे आमचे अर्थकारण
2) धर्म आणि राजकारणाचे
     अजब आहे तंत्र
     फोडा आणि राज्य करा
     हा त्याचा मूलमंत्र

             शैलजा ओव्हाळ/चिलवंत
                         @ 73
                   स्पर्धेसाठी नाही

*🎯स्पर्धेसाठी नादचारोळी*🎯

राजकारण असावे फुलासारखे
मुलायम अन् चौफेर विकासाचे
धर्मचा पसरावा सुवास सगळीकडे
दोघांच्या समन्वयाने भले होईल समाजाचे

       खेडकर सुभद्रा बीड (२०)
मो नं ९४०३५९३७६४)



राजकारणाला आता,
धर्मा-धर्माचा रंग आहे।।
जो-तो मतलबाची पोळी,
भाजून घेण्यात दंग आहे।।


✒अनिल लांडगे उंडणगाव@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

✖स्पर्धेसाठी नाही...✖

विश्वास नसतो ठेवायचा
राजकारणात फक्त थाप..!
दिसे सुंदर वरून धर्म ,
अंतरंगात दुसरे टोप..!!
       जी.पी 81
*स्पर्धेसाठी नाही*

नाद चारोळी
विश्वास नसतो ठेवायचा
राजकारणात फक्त थाप..!
दिसे सुंदर वरून धर्म ,
अंतरंगात दुसरे माप..!!
       जी.पी 81
*स्पर्धेसाठी नाही*

🌲नादचारोळी🌲
राजकारणात कोणी
खातो पैसा, कोणी कडबाचारा
चालते येथे अर्थकारण
नाही माणूसकीला थारा.
.....................
धर्माच्या नावाखाली
राजकारणाच धुड
सत्ताधारी धेंडाच
टोपीखालच गुढ
.......................
कलंकीत नका करू
हिदुत्वाचा धर्म
अस करा राजकारण
जपा समाजाचे मर्म
.......................
सत्तेसाठी धर्माची
करू नका पायमल्ली
राजकारणातून करा नामशेष
स्वार्थांधाची विषवल्ली
   🌹नीता आंधळे🌹
       अहमदनगर
         🌟22🌟

धर्माशिवाय सामान्य माणूस
जीवन जगूच शकत नाही
धर्मकारण केल्या शिवाय
राजकारणी राहूच शकत नाही

*किशोर झोटे@32*
*औरंगाबाद*
*👆 स्पर्धासाठी👆*

स्पर्धसाठी
***********
धर्म आसो कोणताही
राजकारण असावे छान
जनतेची भूल न होऊ द्यावी
त्याच पुढाराला जगात आहे मान.

मीरा खेडकर @(6) बीड.

धर्मासाठी आहेत मंदिर नि गड
राजकारण्यांचा तो बुरुजी वाडा
महंत-लोकनेत्यांच्या चिथावणीने
कार्यकर्ते करती राडा राडा

✍🏼🖊🖋🎯🖋🖊
श्री आप्पासाहेब सुरवसे
_AMKSLWOMIAW_
         *AK47*

☑ *_स्पर्धेसाठी_* ✅

राजकारण असे असावे
ज्यात नसावे धर्माचे कारण
विकासाचा असा मंत्र ठरावा
ज्यातून घडावे समाजकारण

*मंजुषा देशमुख@36*
*अमरावती*
🌹 *स्पर्धेसाठी*

जाती *धर्मात* रोजच घडवती दंगे ,
लेवून समाजकारणाचे बेगडी मुखवटे..!
सत्तेसाठी खेळताना क्रुर *राजकारण* ,
नसे तयांना कदापी कशाचे भय वाटे..!!

______संतोष शेळके ✍🏻 @24

👆🏻👆🏻__ स्पर्धेसाठी__👆🏻👆🏻

धर्म आणि राजकारण
आहेत हे सख्खे भाऊ-भाऊ
म्हणती दोघेंही या माणसाला
विकून मलीदा आपण खाऊ

✍🏼🖊🖋🎯🖋🖊
श्री आप्पासाहेब सुरवसे
_AMKALWOMIAW_
        *AK 47*
❎ ~स्पर्धेसाठी नाही~❎

धर्म असावा नभाप्रमाणे
मंडपी सगळे झाकून
राजकारण करा मधाप्रमाणे
गोडी जिभेला चाखून
**********************
स्नेहलता कुलथे
मोबा 7588055882
क्र.37🌹

धर्मात किंमती महत नि साधू
राजकारणात नेता करतो जादू
गरीबीची थट्टा करते यंत्रणा
कायदा नि कर्मकांड हे तकलादू
✍🏼🖊🖋🎯🖋🖊
श्री आप्पासाहेब सुरवसे
_AMKSLWOMIAW_
           ए के ४७
❎ ~स्पर्धेसाठी नाही~❎

राजकारण्याऱ्याची भारण्या पोट
धर्माच्या नावाने बोलत राहतात खोट
धर्माचे  राजकारण करून मोठं
घर दारी भारतात नोट
श्रुती खडकीकर
61
नवी मुंबई

नादचारोळी स्पर्धेसाठी ...

जातीच्या अंतरंगात अडकवतात
राजकारणाचे विषारी कंलक कर्म
माणसां माणसांत तेढ निर्माण
करुन नासवतात माणुसकी धर्म

रोहिदास होले ...७१
गोपाळवाडी ,दौंड ,पुणे...

    स्पर्धेसाठी
☘☘☘☘☘☘
धर्म आणि राजकारण
ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू
धर्माचे करून राजकारण
नका इतके आता माजू
👺👻👺👺👺👺👻

श्रुती खडकीकर
61

वाढवून धर्मांधता
माजवत आहेत अराजकता
यांच्या स्वार्थी राजकारणात
आक्रंदते आहे मानवता .
      - ऋषिकेश देशमुख
         अनुक्रमांक : ५८.

१ )
    धर्म आणि राजकारण
     एकाच नाण्याच्या बाजू दोन
     राजकारणी जगतो त्यावर
     नाहीतर त्यांना विचारतो कोण?

२)
   धर्म असावा धर्माच्या जागी
   राजकारण असो त्याच्या जागी
   म्हटले कितीही तुम्ही आम्ही
   धर्म ही तरी राजाश्रयच मागी

३)
   राजकारणी पाळतो धर्म
   धर्माचे राजकारण होयी
    तुम्ही आम्ही सामान्य जण
    जात्यात भरडले जायी

४) धर्म सांगतो राजकारण्यांना
    धर्मा प्रमाणे तुम्ही वागा
   राजकारणी सत्तेच्या नशेत
    धर्माचा वाजवती मग बाजा

किशोर झोटे @32
औरंगाबाद.

नाद चारोळी स्पर्धेसाठी चारोळी
भाग - २६ वा
                  
माणुसपण शिकवितो तोच खरा धर्म
त्याला हवे कशाला रंग वा झेंड्याचे तोरण ।
निर्लज्य मतदार स्वतःच रचती आपले सरण
वेश्येपरी रंग बदलते सदा भ्रष्ट राजकारण ।।

         
✍🏻✍©:-कवी अनिकेत जयंतराव देशमुख. (अनु)
            रा- गोपालखेड , ता. जि. अकोला.
                    mo-9689634332
@  59

*नाद चारोळी स्पर्धा*

राजकारणात नाही उरले
आता समाजकारण आहे
जाती धर्माचा करुन वापर
करतो माणुसकी घान आहे

          अमोल अलगुडे
               स क्र 51

*नाद चारोळी स्पर्धेस*

राजकारणात हवी सत्ता
म्हणून धर्म तुम्ही वापरता
अजाण नाही आता ही जनता
जसे तुम्ही  समजता.

------सुवर्णविलास(40)

*धर्मकारण आणि राजकारण*
*यांच सेम कारण आहे*
*भोळ्याभाबड्या जनतेच*
*यात रचल जात सरण आहे*

❎स्पर्धेस नाही❎

*कल्पना जगदाळे@8★बीड*🖊
🔹🔹🔹🔹

✳ स्पर्धेसाठी ✳

एकाच समाजाचे अंग
धर्म आणि राजकारण
मिसळले एकत्र केले
स्वार्थाचे पुढे कारण

योगिनी चॅटर्जी #52

धर्माचे कितीही केले राजकारण
जनता एवढी नाही दुधखुळी
ढोंगी पुढाऱ्यांना  देईल चपराक
कदापी भाजू देणार नाही त्यांची पोळी
****************************-
मीना सानप बीड @7
9423725865
स्पर्धेसाठी नाही👆

स्पर्धेसाठी....
राजकारण्यांसाठी पैसा, राम व रहीम
निवडणुकीत वाटतात नोटांचे बंडल।
करतात राजकारणाचे गुन्हेगारीकरण
घडवुन धर्माधर्मात स्वार्थासाठी दंगल।
नरेंद्र म्हस्के , शिरपूर @ 65

2 comments: