स्वच्छेतेचे महत्व.....
आरोग्य हीच खरी संपती.....हे आपण अनेकदा ऐकतो बोलतो परंतु हि संपत्ती टिकवायची असेलतर एकच पर्याय असतो तो म्हणजे स्वच्छता... थोडक्यात आरोग्याची गुरुकिल्लीच म्हणायला हवे फार पूर्वीच्या काळात शिक्षित नसणारे परंतु स्वच्छेतेचे महत्व आपल्या कीर्तनातून व स्वतःच्या हाती झाडू घेऊन अनेक गावांना स्वच्छ करण्याचे काम संत गाडगे महाराजांनी केले त्या काळातही त्यांना स्वछतेचे महत्व पटले होते व त्यांनी गावातील अस्वच्छता दूर करण्यासाठी जण जागृती करण्यासाठी किर्तनाचे मध्यम निवडले .... तसेच घर आणि परिसर स्वच्छेते सोबतच आपण आपली वैयक्तिक शारिरीक स्वच्छता हि ठेवणे फार महत्वाचे असते कारण हवेत अनेक प्रकारचे रोगजंतू असतात जे आपण सहजा सहजी डोळ्यांनी पाहू शकत नाहीत त्यांना 'सूक्ष्मजीव'असे म्हणतात मग हे सूक्ष्मजीव अनेक रुपाने हवेत मिसळतात उदा: रोगी व्यक्तीच्या नाका तोंडातून, त्यांच्या विष्ठेतून, मृत सजीवांच्या शरीरातून,ईत्यादीं पासून म्हणून आपण स्वच्छता राखणे व त्याच बरोबर स्वच्छतेचे महत्व आपल्या मुलांनाही समजावून सांगणे हि काळाची गरज आहे कारण लहान मुले सर्वत्र खेळत बागडत असतात त्यावेळी त्यांच्या कपड्यांवर हतांला किटाणू चिटकतात व त्याच हातांनी जेवतात व हे किटाणू शरिरात प्रवेश करतात आणि अनेक प्रकारच्या रोगांना बळी पडतात त्यामुळे बाजारात उपलब्ध असणाऱ्या जंतुनाशक साबण,लिक्विड्स चा वापर करून आपण रोग जंतूंपासून स्वतःचा बचाव करू शकतो काही रोगजंतू एका वेळी अनेकांना बळी पाडू शकतात म्हणून सार्वजनिक ठिकाणी जाताना स्वच्छ रुमाल नाकातोंडावर बांधून बाहेर जावे,सार्वजनिक ठिकाणी आपणही थुंकू नये तसेच इतरांनाही या गोष्टी समजावण्याचा प्रयत्न करावा कारण कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात हि स्वतः पासून करायला हवी स्वच्छतेच्या बाबतीत सतर्क राहणे म्हणजे औषधा विना आजार घालवणे म्हणता येईल जसे आजार झाल्यावर दवाखान्यात जाणे आवश्यक असते अगदी तसेच आजार होऊच नये म्हणून काळजी घेणे तितकेच गरजेचे असते म्हणून या सर्वांची सुरुवात प्रथम वैयक्तिक स्वच्छता तसेच घरातील स्वच्छता व परिसर स्वच्छता या पासून करायला हवी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा अभ्यासक्रमातील एक पाठ खूप काही शिकवण देतो ते म्हणतात कि देशासाठी तुमच्याकडे दोन मिनिट आहेत का?स्वछतेचे महत्व अगोदर स्वतः जाणून घेऊन आचरणात आणावे नंतर इतरांना उपदेश करावेत इतर देशात पाहिलेतर स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्व आहे आणि ते महत्व टिकवण्यासाठी कडक शिस्त पाळली जाते ती या अशी कि आपण काही प्राणी घरात पाळतोे मग ते कोणत्याही करणासत्व असेल परंतु त्याची देख भाल करत असताना त्याची घाण मात्र आपण साफ करण्यास कानकुसर करतो तसे परदेशात चालत नाही शिस्तीचे उल्लंघन करणाऱ्यास योग्य ती कार्यवाही करून विशिष्ट् दंड करण्यात येतो म्हणून शिस्तीचे पालनही होते त्याचबरोबर स्वच्छता हि राखली जाते पण आपल्याकडची परस्थिती आजही फार वाईट आहे आजही ग्रामीण भागात स्त्रिया उघड्यावर शौच्याला जातात त्यामुळे त्यांना अनेक गंभीर स्वरूपाचे आजार होतात जसे कि गर्भाश्याचा कॅन्सर..
बीड जिल्ह्यात 70%महिलांना हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे याचे कारण स्वछतेचे महत्व माहित नसणे शरिराची योग्य काळजी न घेणे आज आपण आधुनिक युगात वावरत आहोत अनेक उपचार सुविधा अशा आहेत ज्या ग्रामीण भागात पोहोचल्या नाहीत ग्रामीणआरोग्यकेंद्रे कायम बंद तरी असतात किंवा तिथे तज्ञ डॉ. वेळेला उपलब्ध नसतात अशा अवस्थेत ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना काही वेळाआपले अधिकार व नियम माहित असूनही उपयोग होत नाही आणि पर्यायी व्यवस्था म्हणून रुग्णांना आहे त्या स्थितीत जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते या सर्व गोष्टीतून एकच निष्कर्ष निघतो कि आपण स्वछतेचे महत्व जाणून घेतले पाहिजे इतरांनाही ते पटवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच आपण दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगू शकतो बाजरात जाताना कापडी पशिवी घेऊन जावे तसेच पॉलिथिनच्या पिशव्याचा वापर कटाक्षाने टाळायला हवा कारण या पिशव्याचं विघटन होत नाही त्या सर्वत्र पसरून परिसर अस्वच्छ करतात किटाणू त्यात बराच काळ जिवंत राहू शकतात तसेच याच पिशव्या प्रदूषणासही कारणीभूत ठरतात थोडक्यात आपणच आपले आरोग्य धोक्यात आणतो नंतर उपचारासाठी पळापळ करतो त्यापेक्षा स्वच्छतेचे महत्व जाणून घेणे आवश्यक आहे आपल्या भारताचे पंप्रधान मा. नरेंद्र मोदीही स्वच्छतेची मोहीम राबवत आहेत चलातर मग आपणही अपल्यापासूनच सुरुवात करू स्वच्छ भारताचे स्वप्न साकारू....
[10/16, 2:25 PM] +91 99230 45550: स्वच्छतेचे महत्व
संत गाडगेबाबा यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य खर्ची घालून लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला . नुसते कीर्तन करून , तोंडी सांगून नाही तर दिवसभर ते हातात झाडू घेऊन गावच्या गाव स्वच्छ करायचे . 'आधी केले मग सांगितले' या उक्तीप्रमाणे त्यांनी आपल्या वर्तनातून लोकांना प्रबोधित करण्याचा प्रयत्न केला . दिवसा हातातल्या झाडूने गाव स्वच्छ करायची व रात्री किर्तनाने मने स्वच्छ करायची असा त्यांचा कार्यक्रम असायचा . त्यांनी गोरगरिबांना , अडाणी लोकांना शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी समर्पक व तंतोतंत अशी उदाहरणे देत . अंधश्रद्धेवर आसूड ओढत . त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातल्यावर आत्ता कुठे आपल्याला स्वच्छतेचे सर्वांचे महत्व पटू लागले आहे .
खरंच आता तरी आपल्याला स्वच्छतेचे महत्व पटू लागले आहे का? स्वच्छता म्हणजे पावित्र्य , मंगल वातावरण , प्रसन्नता या गोष्टी . आपले घर , परिसर , गाव , शहर , तालुका , जिल्हा , विभाग , राज्य आणि देश स्वच्छ झाला पाहिजे .त्यासाठी आवश्यक आहे ती जनजागृती . जनजागृती करून स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेतला पाहिजे . नव्हे या स्वच्छतेची सुरुवातच आपल्या स्वतःपासून केली पाहिजे . आपल्या वयक्तिक पुढाकाराने आपण स्वतः या कार्याला वाहून घेतलं पाहिजे .
मन करा रे प्रसन्न
सर्व सिद्धीचे कारण
असं संत तुकाराम महाराज यांनी सांगितले आहे . मन प्रसन्न केले असता कुठलीही गोष्ट अशक्य नाही . आपल्या मनाचा निर्धार ठाम असावा .त्याने सगळ्या सिद्धी आपल्याला प्राप्त होतात असे ते म्हणतात . मग हे मन प्रसन्न राहण्यासाठी आपलं घर , आपला परिसर प्रसन्न असावा लागतो . त्याला प्रसन्न ठेवण्यासाठी स्वच्छता असायला हवी .
घाणीच्या साम्राज्यात आपणं दोन क्षण ही थांबू शकत नाही . मात्र ही सारी साम्राज्य आपणच उभी करत असतो . रस्त्यावर पान-तंबाखू खाऊन थुंकत असतो . घरातली घाण , सडलेले कुजलेले पदार्थ , ओला कचरा तर कधी वेगवेगळ्या प्रकारचे टाकाऊ पदार्थ टाकतं असतो . त्यातून कचऱ्याची उकिरडे निर्माण होतात . आणि येथून मग आपली गावं , शहरं रोगांचे माहेरघर व्हायला लागतात . साथीचे आजार पसरतात . गावच्या गाव या रोगाने त्रस्त होतात तेव्हा कुठे आपल्याला कळतं की , हे सारं घाणीच्या सहवासातून उदयाला आलं आहे .
आज आपण परिसर स्वच्छतेविषयी , वयक्तिक स्वच्छतेविषयी जागरूक होत आहोत ही निश्चितच आनंदाची बाब आहे . मात्र आता याबरोबरच खरी गरज आहे ती मनाच्या स्वच्छतेची .
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात , "नाही मन निर्मळ । काय करील साबण ।।" आज आपण उध्वस्त कुटुंबव्यवस्थेचे वाटाडे बनत चाललोय . समाजात वृद्धाश्रमांची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रेम , जिव्हाळा ही फक्त सुंदर अर्थपूर्ण शब्द उरली आहेत . एकमेकांबद्दल कमालीची असूया , द्वेष उत्पन्न होत आहेत . आपला संपूर्ण वेळ कामात जातोय . आईवडील वृद्धाश्रमात ठेवली आहेत पण आपली मुलं एकलकोंडी बनत आहेत . त्यांची भावनिक कूचंबना होते आहे . ती संस्काराच्या अमूल्य ठेव्याला पारखी होत आहेत . आपली संकोचित वृत्ती मुलांच्या भविष्याला घातक ठरू लागली आहे . आज आपण एका बोटावर जगाशी बोलत आहोत . आपले विचार व्यक्त करत आहोत पण जेवढे जगाशी जुडलो तेवढेच आपल्या माणसांशी जुडलो आहोत का ?
आपल्या माणसांच्या सुखदुःखशी समरस होत आहोत का ? पूर्वी लोक कमी शिकलेली असतं पण शहाणी असतं आता लोक खूप शिकली पण फक्त हुशार झाली ते शहाणपण कुठेतरी हरवत चालल्याची खंत सतावते आहे . प्रेम , जिव्हाळा असणारी ही माणसं साध्या कापड्यातही आपली वाटायची . आता सुटाबुटात ते आपलेपण उरलं नाही . उरलं नाही म्हणण्यापेक्षा आपण मोठे होत आहोत संपत्तीने , सत्तेने व किर्तीने पण मन बारकी होऊ लागली आहेत . आजीच्या जात्यावरील गाणी ऐकत बसण्याची मजा कुठल्याही डिजेला येणार नाही .
स्वच्छतेचे महत्व अनन्य साधारण आहे . पण नुसती भौतीक स्वच्छता नको तर तन-मन-धन स्वच्छता राबूया . एकमेकांशी प्रेम , जिव्हाळ्याने वागू या ...
- ऋषिकेश गंगाधरराव देशमुख
मु पो : शिळवणी ता : देगलूर जि: नांदेड
संपर्क : ९९२३०४५५५०
ईमेल : rushigdeshmukh@gmail.com
[10/16, 3:24 PM] +91 94268 10109: ।।स्पर्धेसाठी।।
।।स्वच्छतेचे महत्व।।
"ए आई,हे काय करतेस? गाडीतून कुणी कचरा बाहेर टाकतं का?जमा कर एका पिशवीत,आपण नंतर उतरू तेव्हा कचऱ्याच्या डब्यात टाकू...."
माझी दहा वर्षांची लेक मला दम देत बोलू लागली.
सुरूवातीला मला ही गोष्ट खुपच खटकली,परंतू नंतर विचार केला,काय वाईट होतं हो तिचं बोलणं?
अगदी माझी आई असल्या सारखी हक्काने मला माझी लेक सांगत होती.त्याच वेळेला मला खात्री पटली,भारताचं भविष्य खुपच उज्वल आहे.आज प्रत्येक शाळेत स्वच्छते बाबत,पाणी वाचवण्याबद्दल व प्रदूषणा पासून बचाव करण्या बद्दल खुपच सुचना दिल्या जातात.अगदी तीन ते चार वर्षांची मुलं सुद्धा खुपच जागरूक झाली आहेत.स्वच्छता काय आहे व ती कशी ठेवायची ही आजच्या बालकांना पालकांनी सांगायची गरजच नाही.उलट त्या बाबतीत तेच आपले गुरू आहेत.
ही मानसिकता बदलण्या मागचं काय कारण असावं?हाच विचार,हीच जागरूकता आमच्या वयाच्या व त्या आधीच्या पिढीत का नव्हती?आजची पिढी किती आत्मविश्वासू बनत चाललीय.गाडीत बसल्या बसल्या माझं मन एक वेगळाच विचार करू लागले.
आपण नेहमी आपल्या मुलांना बोलतो,आमच्या वेळेला असं नव्हतं,आम्ही हेच करायचो,तेच बोलायचो पण खरच का आपण ह्या मुलांपेक्षाही सुधारलेलो आहोत का?त्यांची ह्या वयातली मानसिकता व आपली त्याच वयातली मानसिकता ह्यात जमीन आसमानचा फरक आहे.आपण लहान असतांना दिवसभर बाहेरच हुंदडायचो.घरी फक्त जेवण व झोप ह्यासाठीच यायचो.बाहेरचं जग हेच आपलं विश्व होतं.मातीत खेळणे,बागेत हुंदडणे,तऱ्हतऱ्हेचे मैदानी खेळ आपण खेळत होतो.किती निरागस होतो तेव्हा आपण.त्या वेळी आपण कुठेही थुंकायचो,शु-शी करायला खेळ सोडून घरी कोण जाईल म्हणून आजूबाजूलाच आडोसा शोधायचो,बागेतल्या फुलांना नाजूकपणे हाताळायचं असतं हे सुद्धा आपणास ठाऊक नव्हतं.तसं पाहिलं तर आपण निसर्गाच्या सोबतच जास्त वेळ राहात होतो.परंतू त्या वेळी आपल्या मनास हा प्रश्न कधीच पडला नाही,ह्या निसर्गाची आम्ही काळजी घेतली पाहिजे.कचरा रस्त्यात फेकणं गैर आहे हे सुद्धा त्या बालमनास कळत नव्हतं.शाळेत आम्हाला ह्या बाबतीत वारंवार सुचना देखील दिल्या जात होत्या परंतू आमचं मन ते अंमलात आणत नव्हतं.असं समजा ते करायची आमची मानसिकताच नव्हती.
बोरं,चिंचा,कैरी व शेंगा खावून झाल्यावर त्या टरफलांचा व बियांचा उपयोग फक्त आणी फक्त मित्र मैत्रिणींना मारण्या साठीच असतो एवढच आपणास माहित होतं.आजकालची मुलं तर प्रत्येक फळांच्या बिया जपून ठेवतात व पावसाऴ्यात मोकळ्या जागी पेरतात.
हा बदल खरच किती अनपेक्षित आहे.मुलां कडून आपणास ह्या गोष्टींचे ज्ञान मिळते तेव्हा वाटून जातं,त्याच वेळी आमच्या व आधीच्या पिढ्यांनी स्वच्छते बाबत अशीच काळजी घेतली असती तर आज कदाचित आपल्या देशात घाणीचे साम्राज्य कमी दिसले असते,प्रदूषणाचा जन्मच झाला नसता व निसर्गाचा ऱ्हासही झाला नसता.
खरच हा निसर्ग आपणांस अनादी काला पासून इतकं काही देत आहे परंतू आपण निसर्गाची परतफेड करण्यात अपयशी ठरलो.आज ह्या नैसर्गिक आपत्ती जशा की,पूर,भुकंप व दुष्काळ हे जे होत आहेत त्यास आपलीच मानसिकता कारणीभूत आहे.खरच स्वच्छतेची सुरूवात जर करायची असेल तर सर्व प्रथम आपणास आपल्या डोक्यातला जुनाट कचरा काढून फेकावा लागेल.पुर्वीच्या चुकांची शिक्षा भोगायची तयारी असेल तर कमीत कमी प्रत्येक व्यक्तीने एका वर्षात शंभर तरी रोपं लावली पाहिजेत व कचरा हा कचरा पेटीतच टाकण्याची शपथ घेतली पाहिजे.जर रस्त्यावरती कुणी थुंकत असेल तर लगेच त्या व्यक्तीला एक नागरीकाचे काय कर्तव्य आहे ह्याची जाणीव करून द्यायला पाहिजे.
"आई,ए आई....अगं हे काय,तू गाडीत बसली आहेस विसरलीस का? आई,तू हातात झाडू असल्या सारखी काय गाडी पुसते आहेस?पप्पा आईची तब्येत बरी नाही वाटतं"माझी लेक चिंताग्रस्त सूरात बोलली.
मी पटकन पुढे होवून माझ्या लेकिचे चरणस्पर्श केले व तिला धन्यवाद देत बोलले,"आज पासून मी स्वच्छता मोहिम स्विकारली व सुरूवात माझ्या डोक्या पासूनच केली".
माझ्यातला बदल पाहून लेक खुपच सुखावली व पतीराजांना आश्चर्य वाटले कारण रेडियो वर लता मंगेशकरांनी स्वातंत्र्य मिळाल्यावर गायलेलं गाणं चालू होतं,
"ए मेरे वतन के लोंगो,जरा आंख में भरलो पानी
जो शहिद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी...."
खरच आज त्यांची पत्नी, लाडक्या कन्ये समोर नतमस्तक झाली होती व दोन्ही पिढ्या मिळून नवीन व स्वच्छ भारताचं स्वप्नं साकारणार होती.चला तर मग आज सर्व मिळून एक शपथ घेवू,स्वच्छ भारत साकारण्याची प्रतिज्ञा घेवू.
।।।जयहिंद,जय भारत।।।
सौ.मनिषा वाणी.@2
सुरत.१६.१०.२०१६.
०९४२६८१०१०९.
mail id-maw7097@gmail.com
[10/16, 4:05 PM] 9 Subhadra Sanap: *साहित्य दर्पन प्रस्तुत वैचारीक लेखमाला*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*विषय स्वच्छतेचे महत्व*
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आले आणी स्वच्छतेबद्दल जास्त जागरुकता झाली असे म्हटले तरी वावगे ठरु नये. वास्तविक स्वच्छता हा प्रश्न मानवी जीवनाशी फार निगडीत आहे.
स्वच्छता नेमकी कुठे असावी ?आणी ती कुणी करावी ?हा एक गहण प्रश्न आहे .स्वच्छतेची सुरवात अगोदर स्वत:पासुन व आपल्या घरापासुन करायला पाहिजे .आपले घर व घराचा परिसर हा स्वच्छ असावा आपल्या घरातील कचरा विल्हेवाट करण्याचे नियोजन असावे घरोघर शौंचालय असावे व त्याचा वापर करावा .स्वच्छ व सुंदर घर म्हणजे खुप मोठा बंगला असा समज चुकीचा आहे. आपल घर कितीही छोटे किंवा मोठे असो ते किती टापटिप व स्वच्छ आहे याला जास्त महत्व आहे .घरातील सांडपाण्याची सोय असावी .त्यामुळे डास होनार नाहीत डासामुळे अनेक विकाराला सामोरे जावे लागते हे लक्षात घेवून उपाययोजना कराव्यात. *स्वच्छता व टापटिप हे आरोग्याचे मुळ आहे*.
आपले घर व परिसर जसा स्वच्छ असावा तसेच आपले गाव व गावातील सार्वजनीक ठिकाणं याची स्वच्छता ठेवण्याची जिम्मेदारी मी एक नागरिक म्हणुन माझीच आहे ही भावना प्रत्येकाच्या मनात असावी. अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार गाव असो किंवा राळेगण सिध्दी हे गाव असो त्या गावाचा विकास हा स्वच्छतेपासुनच झालेला आहे .आपले गाव समृध्द व आदर्श असावे असे वाटत असेल तर ,झपाटुन कामाला लागा स्वच्छता खुप महत्वाची आहे अस्वच्छतेमुळे अनेक रोग होतात .
राष्ट्रसंत गाडगेबाबा ज्या गावात किर्तनाला जात तिथे स्वत खराटा घे वून रस्ते झाडत व स्वतच्या कृतीतुन लोकांना संदेश देत असत म्हनुन आपनही न लाजता या अभियानाकडे डोळसपणे पाहिले पाहिजे .
शालेय स्तरावर मुलांना स्वच्छतेचे महत्व पटवुन दिले पाहिजे . स्वच्छता म्हणजे फक्त घर व परिसर हेच नाही इतरही कारनामुळे अस्वच्छता वाढते जसे पाणी अस्वच्छ पाणी पिल्यामुळे कॉलरा काविळ यासारखे आजार होतात.
महत्वाचे म्हणजे गावागावातून हागणदारी मुक्ती झालीच पाहिजे तरच *स्वच्छ भारताचे* स्वप्न पूर्ण होनार आहे .
खेडकर सुभद्रा त्रिंबकराव बीड(२० ) मो नं९४०३५९३७६४
[10/16, 4:53 PM] +91 86980 67566: "स्वच्छतेचे महत्व"
एक पाऊल स्वच्छतेकडे म्हणत संपूर्ण भारत आता हातात झाडू घेऊन स्वच्छ होण्यासाठी तत्पर झाला आहे, असे आपणास वाटते आहे. पण उघडा डोळे बघा नीट म्हणण्याची वेळ आली आहे.. दोन ऑक्टोबर गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छतेचा गवगवा केला जातो.कचरा नसतो तेथे कचरा करुन झाडलोट करतानाचे फोटोसेशन होते आणि ( जाणीवपूर्वक )केलेला कचरा साफ होतो. पण अंतःकरणातील गहाण तशीच राहते.तद्वतच आसपास असणारी गहाणही तशीच राहून जाते. गाव असो शहर असो वा मेट्रो शहर सर्वत्रच या समस्या म्हणजे गहाणीच्या समस्या आपणास दिसून येतात. आपण काय नि किती गहाण करतो आहोत याचे भान आपणास राहिले नाही.आपले अंगण स्वच्छ करताना शेजाऱ्याचे अंगण घाण करून टाकतो. स्वच्छतेचं महत्व जाणून घेताना संत गाडगेबाबा तसेच महात्मा गांधी यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. संत गाडगेबाबांचा स्वच्छतेचा संदेश आणि आदर्श, स्वच्छाता अभियानाला पुढे घेऊन
जाणारा असाच आहे.कोणतीही शासकीय योजना, शासन आणि जनता यांच्या एकमेकांच्या सहकार्यावर सवलंबून असल्याने शासन करत असलेल्या प्रयत्नांना जनतेची साथ मिळणे गरजेचे असते. प्रतिवर्षी निसर्ग नियमाप्रमाणे ऋतु ..मध्ये बदल होत आसतात.बदलत्या ऋतुत वेगवेगळे आजार पसरत असतात. पण हे आजार पाणी आणि स्वच्छतेसंबंधीत आहेत. आपण राहत असलेला परिसर आणि वैयक्तिक स्वच्छता याबाबत जागृती निर्माण केली तर अनेक जीवघेण्या आजारापासून आपणास मुक्ती मिळेल.
पण सामाजिक भान नसणाऱ्या माणसाला परिसरातील घाण सोडाच पण वैयक्तीक स्वच्छता तरी ठेवता येते का...? पान तंबाखू गुटखा खाऊन मौखीक आरोग्य धोक्यात असणाराही आणि कांहीही अशा प्रकारचे व्यसन न करणारी दोन्हीही
दात स्वच्छ ठेवून मौखिक स्वच्छता ठेवत नाही. म्हणजेच स्वच्छतेचे भान या लोकांना नाही, असेच म्हणावे लागेल. रोज नियमित आंघोळ करुनशरीर स्वच्छता ठेवणे हे देखील उत्तम आरोग्यासाठी आवश्यक आहे.पण कोणतीही बाब जी आरोग्याशी निगडीत आहे ती स्वच्छतेच्याच रस्त्यांनी जाते हे माणसानी लक्षात ठेवावे..... व्यक्तीगत स्वच्छता नंतर आपोआप येणारा क्रम म्हणजे परिसर स्वच्छता. अनेक रोगराईचा जन्म आपल्या बेजबाबादार वागण्याने होते. वाढलेल्या लोकसंख्येमुळे दाटी निर्माण होऊन अनाहुत गरजा व बेजाबदारी यातून अस्वच्छता सहज जन्माला येऊ शकते.आणि नेमके परिसरात तेच आज घडत आहे. बाजारात शिल्लक टाकावू भाज्यांचा ढिग, त्यावर तुटून पडणारी मोकाटजनावरे आणि त्यानी केलेली घाण याकडे 'मला काय त्याचे' या वृत्तीने कोणी लक्ष देत नाही.. पाळीव प्राणी हे मालक नसल्याने बेवारस अवस्थेत सर्वत्र वावरत असतात. त्यांच्यामुळे ही अनेक ठिकाणी अस्वच्छता दिसून येते. कितीही आणि कळकळीने आवाहन करुन वा कायदा करून प्लास्टीक पिशव्यांचा वापर बंद होत नाही. याचा वापर सर्वत्र सर्रास होत असतो, परिसर अस्वच्छ करण्यास या पिशव्या चांगलीच भूमिका बजावतात. माणसांबरोबर जनावरांच्या आरोग्यावर याचा सरळ परिणाम होतात, पिशवीत राहिलेले पदार्थ किंवा त्या पदार्थाचा वासाने जनावरे प्लास्टीक पिशवी खातात आणि त्यांचे आरोग्य व कधी जीवही धोक्यात येतो. म्हणून जाडीदारच पिशव्यांचा वापर आणि योग्य विल्हेवाट हे स्वच्छतेच्या व आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. उघडयावर शौचास जाणे म्हणजे स्वतः बरोबर इतरांचेही आरोग्य धोक्यात आणने होय. महाप्रयासानं आणि निकराचा लढा देऊन पोलीओ मुक्त भारत केला आहे.. पोलिओ ही उघड्यावर शौचचीच देणगी होती. त्यामुळे पंतप्रधानानी वा अन्य कोणी स्वच्छतेचे आवाहन करण्याची आणि मग आम्ही स्वच्छता करण्याची परिस्थिती वाट पाहत नसते. त्यासाठी स्वतः स्वच्छतेचे महत्त्व जाणा आणि शहाणे बना. अनेक रोगांना स्वतः हून आमंत्रण देऊ नका. वैयक्तीक स्वच्छतेबरोबरच घर, अंगण, परिसर, गल्ली, गाव कसे स्वच्छ राहिल याकडे लक्ष देण्याची हरेकाची जबाबदारी आहे. स्वच्छतेबरोबर प्रसन्नता येते. प्रसन्नता संपन्नता आणते, आणि आपण ज्या सुखाच्या शोधात आहोत ते सुख या संपन्नेत लाभते.
श्री. हणमंत पडवळ.
मु.पो. उपळे(मा.)ता. जि. उस्मानाबाद.
8698067566.
hanamantpadwal8956@gmail
[10/16, 5:03 PM] +91 96574 35292: *स्वच्छतेचे महत्व*
*Cleanliness* *Is* *Next* *To* *Godliness*
मानवी जीवनात स्वच्छतेला अनन्य साधारण महत्व आहे. A Sound Mind In A Sound Body. मानवी शरीर हे एक देवालय आहे. मन/आत्मा हा त्यातील देव आहे. शरीर निरोगी असेल तरच मन निरोगी राहील,आणि जर शरीर निरोगी ठेवायचे असेल तर स्वच्छतेचा अवलंब केला पाहिजे.
स्वच्छतेमध्ये दोन गोष्टींचा विचार करायला पाहिजे.
1) वैयक्तिक स्वच्छता
2) सार्वजनिक स्वच्छता
*वैयक्तिक* *स्वच्छता*
वैयक्तिक स्वच्छतेमध्ये शारीरिक स्वच्छता, खाण्या-पिण्याच्या सवयी, घर व परिसर स्वच्छता यांचा अंर्तभाव होतो.दररोज अंघोळ करणे,सकाळी व संध्याकाळी दात घासणे, नियमित नखे कापणे,जेवणापूर्वी व शौचावरून आल्यावर हात धुणे,कचरा रस्त्यावर इतरत्र न फेकणे,उघड्यावर शौचास न जाणे,खोकताना शिंकताना तोंडावर रूमाल धरणे इत्यादि गोष्टीतून आपण वैयक्तिक स्वच्छता साधू शकतो.
"वैयक्तिक स्वच्छतेची महती।
रोगापासून मिळे मुक्ती।"
शारीरिक स्वच्छते बरोबरच मनही स्वच्छ असले पाहिजे."नाही निर्मळ मन,काय करील साबण" मनाच्या स्वच्छतेसाठी चांगल्या पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. चांगले विचार, चांगल्या माणसांच्या सहवासात राहिले पाहिजे. सतत कार्यमग्न असावे.
*सार्वजनिक* *स्वच्छता*
"आरोग्य संपन्न किंवा निरोगी पर्यावरणीय परिस्थिती निर्माण करण्याची वृत्ती किंवा प्रक्रिया सार्वजनिक स्वच्छता."
सार्वजनिक स्वच्छतेमध्ये,
1) पाणी व्यवस्थापन ( पिण्याचे पाणी)
2) सांडपाणी व्यवस्थापन
3) कच-याची योग्य विल्हेवाट
4) शौचालयाचा वापर व स्वच्छता
5) शाळा व गाव परिसर स्वच्छता
इत्यादि गोष्टींचा समावेश होतो.
*पिण्याचे* *पाणी* स्वच्छ असावे. पाणीपुरवठा योजनेची पाईप लाईन ते पाण्याचे शुद्धीकरण याची योग्य काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे साथीचे रोग पसरणार नाहित.
*सांडपाण्याचे* *व्यवस्थापन* योग्य रीतीने केले पाहिजे.त्यासाठी शोष खड्ड्याचा वापर केला पाहिजे. म्हणजे दुर्गंध पसरणार नाही व परिसर स्वच्छ राहिल.
*कच-याचे* *व्यवस्थापन* खेले पाहिजे. ओला व सुका कचरा वेगळा केला पाहिजे. गांडूळ खत, गोबर गॅस सारखे प्रकल्प राबविले पाहिजे.
*शौचालयाचा* वापर केला पाहिजे.
"जो शौचालयाचा आग्रह धरी
तो कुटुंबाचे आरोग्य उद्धरी"
उघड्यावर शौचास जाण्यामुळे दुर्गंध व रोगराई पसरते. प्रत्येकाने शौचालयाचा वापर केला पाहिजे व त्याची स्वच्छता राखली पाहिजे.
*शाळा* व *गावपरिसर* स्वच्छ ठेवला पाहिजे. त्यायोगे संपूर्ण गावाची स्वच्छता राखली जाईल.
*स्वच्छता* व *समृद्धी* या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्वच्छतेतूनच आपण समृद्धी कडे वाटचाल करू शकतो. देशाचे हित साधायचे असेल सक्षम पिढी घडवायची असेल तर स्वच्छतेला पर्याय नाही.
चला तर मग आपण स्वतः, आपले घर, आपला परिसर, व आपला भारत स्वच्छ राखूया.
शैलजा ओव्हाळ/चिलवंत
बीड
@ 73
📱 9657435292
shailajaovhal1980@gmai.com
स्पर्धेसाठी
[10/16, 5:19 PM] +91 99219 97026: 🌹स्पर्धेसाठी🌹
🌟स्वच्छतेचे महत्व🌟
"उगवला नारायण
प्रभा आलीया दारात
स्वच्छ करा दार आंगण
लक्ष्मी येईल घरात."
या जात्यावरच्या ओवीने एकच गोष्ट लक्षात येते की पुर्वी पासूनच स्वच्छतेबाबतचा संदेश कळतनकळत दिला जायचा.लहान असताना पाहीलय की सकाळी सकाळी प्रत्येक बाईच्या हाती झाडू असायचा.आणि अंगण स्वच्छ करून सडारांगोळी घातलेली असायची.खुप प्रसन्न वाटायच.हळुहळु परिस्थिती बदलत गेली, घाणीचे साम्राज्य वाढू लागले, रोगराई वाढल्या, प्रदुषण वाढले.आणि स्वच्छतेबाबतची जागरूकता वाढवण्याची गरज भासू लागली.तसे गाडगेबाबासारखे स्वच्छतेचे दूत आपल्यापरीने लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देत गावेच्या गावे स्वच्छ करीत होते.आपले दार स्वच्छ करून दुस-याच्या दारात कचरा टाकणे म्हणजे स्वच्छता का? हा प्रश्न पडतो.यासाठी इतर स्वच्छतेबरोबर मनाची स्वच्छता करणेही गरजेचे आहे. काय चांगले काय वाईट याचे संस्कार होणे गरजेचे आहे.
माझ्या शाळेत प्रसाधनगृहात मुले मुली बाहेरच घाण करायचे.त्यांना सांगितले तुम्ही घरात नैसर्गिक विधी घराच्या दारात, घरात करता का? नाही ना.मग शाळा आपले सर्वाच घर आहे. त्याची स्वच्छता ठेवली पाहीजे. कचरा कचराकुंडीतच टाकायचा.मुलांवर या गोष्टीचा खुप चांगला परिणाम दिसून आला.स्वच्छतेबाबत सुधारणा झाली.
भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजींनी स्वच्छता अभियानासाठी जनतेला हाक दिली.आणि सर्व देश हातात झाडू घेऊन सज्ज झाला.स्वच्छतेचे महत्त्व सा-यांना पटले.प्रत्येकजन स्वच्छता अभियानात आपला खारीचा वाटा ऊचलू लागला.हळुहळु भारत देश स्वच्छ होऊ लागलाय.पण इतर स्वच्छतेबरोबर मनाची स्वच्छता झाली तर खुन, दरोडे, बलात्कार, मारामारी , दहशतवाद, आतंकवाद, जातीयवाद, धर्माधता यासारखे महारोग कायमचे हद्दपार होतील असे वाटते.तरच स्वच्छता अभियान पुर्ण होऊन देश सुजलाम् सुफलाम् होईल...जयहिंद!
🌹सौ.नीता आंधळे🌹
अहमदनगर
9921997026
🌟22🌟
[10/16, 5:32 PM] +91 75888 76539: 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*साहित्य दरबार*
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*स्वच्छतेचे महत्त्व*
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
🌹 *स्पर्धेसाठी* 🌹
मानवी जीवनात खरा सुखाचा पाया कशावर उभा असेल तर तो स्वच्छतेवर.जीवनात स्वच्छतेचे अतिशय महत्त्व आहे.आनंदमय जीवन व्यतीत करायचे असेल तर स्वच्छता पाहिजेच.
*गाव व्हावया निरोगी सुंदर*
*सुधारावे लागेल एकेक घर*
*आणि त्यातुनही घराघरात राहणार*
*करावा लागेल आदर्श*
या संत तुकडोजी महाराजांच्या उक्तिनुसार स्वच्छतेची सुरुवात अगोदर स्वतःपासूनच करावी लागते.
तशी स्वच्छता दोन प्रकारची
*वैयक्तिक स्वच्छता*
*सामुहिक स्वच्छता*
वैयक्तिक स्वच्छतेमध्ये --
दात स्वच्छ ठेवणे , अंघोळ दररोज करणे, नखे वेळेवर कापणे , घरातील सर्व बाबी वेळेतच सातत्याने स्वच्छ करणे दैनंदिन सर्व बाबी नित्य काळजीपूर्वक पार पाडणे.वरील प्रत्येक बाब दातांचं घ्या व्यवस्थित स्वच्छ नाही केले तर ज्याच्यामुळे आपण अन्न सेवन करतो तो अवयव लवकर निकामी होणार .लाखो करोडो रुपये मोलाचा प्रत्येक शरीराचा भाग आहे .त्यामुळे शरीराच्या प्रत्येक भाग नित्य स्वच्छ राहिल याची काळजी घेतलीच पाहिजे.
आता आपण सामुहिक स्वच्छता पाहू.
सामुहिक स्वच्छतेत शुद्ध हवा, स्वच्छ पाणी, मलमुत्राची ,सांडपाण्याची योग्य विल्हेवाट झाली पाहिजे .प्राण्यांची योग्य पद्धतीने देखभाल झाली पाहिजे .कचरा विल्हेवाट झाली पाहिजे .
वरील बाबींचे योग्य व्यवस्थापन नाही झाले की मनाला उदासीनता येते.मन उदासीन झाले म्हणजे त्याचा शरीरावर परिणाम ठरलेलाच असतो.
*निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते व मन निरोगी असेल तर शरीर निरोगी ह्या परस्परपूरक बाबी आहेत*.
सामुदायिक ठीकाणे तर आपल्या देशात आरोग्यासाठी अतिशय धोकादायक झालेली आहेत.सिनेमागृह ,बसस्थानक, रेल्वेस्टेशन ,महाविद्यालये ही ठीकाणे आत्यंत घाणीचे साम्राज्य बनली आहेत.संत तुकडोजी महाराज म्हणतात....
" *गावच जरी उत्तम नसले*
*तरी देशाचे भविष्य ढासळले*
*ऐसे मानावे ज्याने त्याने भले*
*हृदया माजी*
या उक्तिप्रमाणे प्रत्येकाने असे ठरवले पाहिजे की मी कुठेही घाण करणार नाही .जर एखादे ठीकाण आपण अतिशय स्वच्छ ठेवले .तिथे एखादा पानसुपारी खाणारा असला तर त्यालाही तिथे घाण करावी वाटणार नाही.अशा रीतीने स्वच्छतेच्या नैतिकतेने अस्वच्छतेचा नायनाट करावा लागेल.
आज शहरी भागात तर डासांचा प्रचंड प्रमाणात उत्पात होतोय डेंगू ,मलेरीयासारखे आजार जीवघेण्याइतपत होताहेत ह्याला कोण जबाबदार? आपणच!
थोडी थोडी करुन आपणच वाढवलेले
हे घाणीचे साम्राज्य .पण कोणी मान्य करायला तयारच नाहीत.प्रत्येकाला त्याग , आदर्शवाद दुसऱ्यानीच पाळावा असे वाटत आहे.पण यामुळे आपण सर्वजण आपल्याच हाताने आपला घात करुन घेत आहोत.
*मन करा रे प्रसन्न*
*सर्व सिद्धीचे कारण*
मन तेव्हाच प्रसन्न होईल जेव्हा सगळीकडे स्वच्छता दिसेल.
ही स्वच्छता मानवी मनावर प्रभावी पणे राबवण्यासाठी लोककलांचा वापर केला जावा असे वाटते.ग्रामीण भागात भारुड , गवळण अशा कलामधून तर शहरात मोठमोठया कलाकाराना नाट्याभिनयाद्वारे सातत्याने ह्यांचे प्रयोग झाले पाहिजेत.शौचालयाचा वापर शतप्रतिशत झालाच पाहिजे .लोकांना
उघड्यावर शौचाला बसण्याचे दुष्परीणाम चित्ररुपाने दाखवून जागृत केले पाहिजे .
*अस्वच्छता म्हणजे मानसिक हिंसाच होय*.
सार्वजनिक ठीकाणे पाहुन मनाला घृणा वाटते त्या मुतारी , शौचालयाची अवस्था पाहून तिथे जाऊच नये इतकी घाण असते. तसे यामध्ये प्रशासनाच्या पण तेवढ्याच चुका असतात.प्रशासनाने पण दक्ष राहिले पाहिजे .
शाळा ,महाविद्यालये ,बसस्थानके ,सर्व सार्वजनिक ठीकाणे स्वच्छ असणे अतिशय आवश्यक आहे.या ठीकाणी कडक नियमावलीची गरज आहे.आपण संत गाडगे महाराजांचे गुणगान गातो पण कृतीत मात्र शुन्य आहोत.महाराजांची कृती प्रत्येकाने आचरणात नाही आणली तर सर्वांचे आरोग्य धोक्यात जाणार. रोगराई मान वर काढल्याशिवाय राहणार नाही.
आज नद्या प्रदुषित झाल्या आहेत कारखाने गटाराचे पाणी सर्रास नद्यामध्ये सोडले जात आहेत.पाणी प्रदुषणामुळे शेती प्रदुषित होत आहे.शेतीत डी.ए.पी.,युरीया अशी घातक खते व रसायने फवारुन ते प्रदुषित अन्न सेवन होत आहे शेतीसुद्धा स्वच्छ असणे गरजेचे आहे.
सेंद्रिय तत्त्वावर शेती झाली पाहिजे.
शेवटी स्वच्छता प्रत्येक माणूस, गाव ,शहर ,राज्य , एक प्रकारे देशाचे आरोग्यच म्हटले तर वावगे ठरणार नाही .म्हणून प्रत्येकाने आपापली जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे .माजी राष्ट्रपती आदरणीय ए.पी.जे.कलाम साहेब म्हणतात.आपण म्हणतो रेल्वेत शौचालय घाण आहे .रस्ते घाण आहेत, बसस्थानके घाण झालीत.पण देशाला देण्यासाठी दहा मिनीटे वेळ आहे का? प्रत्येकाने स्वच्छतेचा मंत्र आपण स्वतः आपल्या मुलाना लावून घेतलाच पाहिजे.
*यापुढे जाऊन स्वच्छता ही अंतर्बाह्य असावी असे वाटते*.अंतरीक स्वच्छतेसाठी योगा प्राणायामाच्या सवयी आपण थोरामोठ्यानी लावुन घेऊन लहानाना लावणे आवश्यक आहे.अंतःकरण पण स्वच्छ असलेच पाहिजे ,तेव्हाच बाह्य स्वच्छता होत राहणार.माझा भारत स्वच्छ राहिला तरच आपण शक्तिशाली राहू निरोगी राहू.
शेवटी असं अंतःकरणपुर्वक काही बाबी उद्घोषित कराव्या वाटतात.
🔹 *स्वच्छतेविषयी प्रत्येक कृती*
*देई आरोग्याला गती*
🔹 *घ्या महत्त्व स्वच्छतेचे ध्यानी*
*व्हा निरोगी जीवनाचे धनी*
🔹 *वैयक्तिक स्वच्छतेची महती*
*रोगापासून मिळेल मुक्ती*
🔹 *ज्याचे घरी नित्य स्वच्छता*
*नांदेल तेथे कायम सुबत्ता*
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*चौधरी बालाजी सर*
*स.क्र.* *82*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
[10/16, 5:38 PM] Gajanan patil: *।।स्वच्छतेचे महत्त्व।।*
"हात फिरे तेथे लक्ष्मी" आज या दगदगीच्या, धकाधकीच्या जीवनात वावरताना नकळतपणे आपल्याकडून स्वच्छता तर सोडाच पण घाण मात्र वाढत असते गाडीतून जाताना किंवा रस्त्यावरून जाताना पण आपले तोंड मुके नाही रहात कोठे गाडा दिसला तर सहजपणे डोळ्याना दिसतात ती पिकलेली केळी,शहाळे किंवा टाईमपास खुसखुशीत खरमुरे नाही तर भयमुग शेंगा,नव्हे मक्काचे कणीस आणि नकळतपणे आपल्या हातातून रस्त्यावर घाण साचण्याची सुरूवात होते त्याकडे आपले लक्ष कधीच जात नाही हळूहळू हा अस्वच्छतेचा राक्षस वाढत जावून पर्वताचे रूप धारण करायला सुरुवात होते तेव्हा आपणच केलेल्या घाणेरड्या वर्तणूकीमुळे सर्वांचे आरोग्य धोक्यात येण्यास प्रारंभ गणला जातो आणि तोच रोष ओढवून आपणच शासनाला दोष देत फिरत असतो पण याला आळा घालायचा असेल तर स्वतःपासून सुरूवात करायला हवी सर्व सिध्दीचे मुळ म्हणजे स्वय मनावर घेऊन केल्यास आपला गावच नाही तर आपला तालुका,जिल्हा, राज्य,सर्व देश समृद्ध होण्यास विलंब लागणार नाही पण आता फक्त स्वच्छता मोहीम ह्याकडे सर्व 'राजकारण' यादृष्टीनेच बघितले जात आहे 'संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान' सारखा सुंदर उपक्रम माननीय स्व. आर आर पाटील यांनी अमलात आणला होता पण त्यातही नंतर राजकारण सुरूवात झाली आणि बेगडी स्वरूप प्राप्त झाल्याने त्याचाही फारसा उपयोग झाला नाही ज्या गावांमध्ये अभियान राबविण्यात आले आणि तनमन धनानि ज्या खेड्यात एकोप्याने सर्व एकत्र येऊन छान कार्य केले त्याच बर्यापैकी गावांना जे बघण्यासाठी नेमलेल्या समिती होत्या त्यांनीच राजकारण सुरू केले याचा परिणाम म्हणून चांगल्या कार्याची पोचपावती मिळाली नाही म्हणुन परत तेच गावे परत घाण आणि दुर्गंधीच्या विळख्यात सापडले...
संत गाडगेबाबानी स्वहस्ते गावेच्या गावे स्वच्छ करण्याचा वसा घेतला होता रोज बंदीच्या पंगती बाबा उठवायचे पण त्या बुंदीचा एक कण सुद्धा बाबा आपल्या मुखात टाकत नव्हते सर्व जीवन समाजाच्या भल्यासाठी आणि स्वच्छतेसाठी वाहिले होते दिवसा गावे स्वच्छ करावीत आणि रात्री आपल्या कीर्तनातून या समाजाचे मने स्वच्छ करावीत हाच निशिदिनी धंदा चालत असे....आशा थोर महान राष्ट्रसंताला कोटी कोटी प्रणाम.....
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂
युगपुरुष जन्मा आले
हाती झाडू खराटा जडला.....!
केली स्वच्छता गावोगावी
मनोमनी हृदयी बसला.....!!
धन्य दिले तुम्ही धडे विश्वाला
म्हणून सत्यार्थ तुमचा आवडतो......!
तुमच्या मार्गी चालनारा जीव,
जगामध्ये स्वंयप्रकाश घडवतो......!!
तनामनाची काढून घाण
सफाई केली जाती बंधाची......!
जगासी कर्तव्यबोध देते झाला
साथ संत कीर्तन लाखमोलाची.......!!
धन्य जगती महान थोर संत
गाडगेबाबा,तुकडोजी अविरत .....!
चालविला अवडंबर उभारथ
वाहीले जीवन परमार्थ सेवेत.....!!
अर्पित केले प्रेम जगती
ग्रामगीता ग्रंथ हृदयी धरा......!
निर्धार कल्पित तुम्ही करा
स्वच्छता महतीचा ध्यास धरा......!!
🌷 गजानन पाटील पवार 🌷
@81
[10/16, 5:43 PM] +91 82373 29804: *साहित्य दरबार स्पर्धा - स्वच्छतेचे महत्त्व*
*स्वच्छतेने होते मनही स्वच्छ*
*स्वच्छतेने होते आरोग्य निरोगी..!*
*स्वच्छतेचे महत्त्व जाणू या*
*करू देशाचा विकास सर्वांगी..!*
" स्वच्छ भारत , सुंदर भारत " चा नारा आपण मोठ्या अभिमानाने म्हणतो, पण कधी विचार केला आहे का..? खरंच सर्वत्र स्वच्छता आढळते का..? तर नाही, मग आपण तरी काही कार्ये केलेली आहेत का..? स्वच्छतेसाठी, तर नाही.. खरंच.! वाढत्या लोकसंख्येबरोबर देशाला भेडसावणारा प्रश्न असेल, तर तो "प्रदुषण म्हणजेच अस्वच्छतेचा.." ज्या वेगात लोकसंख्या वाढते, अगदी तेवढ्याच झपाट्यात प्रदुषण, घाण वाढून रोगराई पसरून आरोग्य धोक्यात येत आहे. मग यासाठी कारणीभूत कोण असेल, तर आपणच.. आज चिकनगुनीया, स्वाईन - फ्लू , डेंगू , मलेरिआ यांसारखे कित्येक महारोग घर करून बसले आहेत..आणि त्याचे परिणाम आरोग्यावर घातक ठरत आहेत. अशा अस्वच्छतेतून आपण स्वत:लाच मरणाच्या खाईत लोटत आहोत.. आज देशाला गरज आहे, ती स्वच्छतेचा मंत्र जपून, एक महान भारत घडवण्याची..
" गावचे जरी उत्तम नसले | तरी देशाचे भविष्य ढासळले | ऐसे मानावे जान त्यानं भले | ह्रदयामाजी || "
या अभंगातून , ग्रामागीतेतून, विचारांतून संत तुकोबा महाराज, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज यांसारख्या संतांनी , " केल्याने होत आहे रे..! आधी केलेची पाहीजे..! " या सिद्धांतानुसार नुसते विचार मांडत बसले नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून स्वच्छतेचे महत्त्व लोकांना पटवून दिले व मोठ्या प्रमाणात ग्राम स्वच्छता अभियानाने चालवून देशाची सेवा केली..
आज २१ व्या शतकात तर प्रदूषण , रोगराई यांसारखे महाभयंकर संकट देशाला मोठे आव्हान ठरत आहेत. वाढत्या नागरीकरणाने.. गलिच्छ राहणीमान, रहदारी, औद्योगिकरण , राहण्यासाठी अपुरी जागा या समस्येमुळे प्रदूषण वाढून अनेक रोग उद्भवत आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात तर अजूनही स्वच्छतेचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचले नाहीत. त्यामुळे बरेचसे लोकं शौचालयास उघड्यावर बसणे; गाई - गुरे , कपडे पाण्यात धुणे ; केर - कचरा यांची योग्य विल्हेवाट न लावणे ; अस्वच्छ पाणी, अन्न गचाळ राहणीमान यांच्या वापराने मोठ्या प्रमाणात आजही आजार व रोगराई कमी होत नाही. तसेच शेतीत रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर, भेसळयुक्त अन्न यांमुळेही आरोग्याला धोका निर्माण होत आहे.
स्वच्छताही देश का सौंदर्य.. |
जिसे लाना हैं , हमारा कर्तव्य ||
येत्या काही वर्षापासून महाराष्ट्र शासनाने "संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभिमान " राबवून व मोठ्या प्रमाणात पारितोषिक जाहिर करून आणि २०१५ पासून देशाचे पंतप्रधान मा. मोदीजी यांनी " म. गांधी स्वच्छ भारत अभियान " चालवून अस्वच्छता नियंत्रणात आणण्यासाठी ठोस पावले उचललेली दिसत आहेत.. त्याचप्रमाणे आपणही शाळा - कॉलेजमधून, वॉट्स - अप, फेसबुकच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचवून, नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून लोकजागृती करणे आज गरजेचे आहे. सिनेमे, नाटक, साहित़्याच्या माध्यमातूनही आपण आज स्वच्छतेची जागृती करू शकतो.
चला तर उचला लेखणी अन् झाडू..
स्वच्छतेतून रोगराईला पुर्ण गाडू..||
___ ✍🏻 संतोष ए. शेळके @24
मु. पो. कळंब , ता. कर्जत / रायगड
मो. नं. 8237329804
Email ID : shelke.santosh8@gmail.com
[10/16, 5:55 PM] Nita Arasule: स्वच्छतेचे महत्त्व
‘ जिथे स्वच्छता असे, तिथे लक्ष्मी वसे ‘
पूर्वापार काळापासून हिंदू संस्कृतीत स्वच्छतेला महत्त्व दिले आहे. घरातील स्त्रिया पहाटे उठून घर- अंगण, परसदार झाडून घेत आणि सडा-रांगोळी काढत असे. एकूणच स्वच्छता केल्याने वातावरण आनंदी व प्रसन्न वाटत असे त्यामुळे कामात यश आणि लक्ष्मी म्हणजे समृद्धी संपदा प्राप्त होते ! परिसर स्वच्छता बरोबर वैयक्तिक स्वच्छता अतिमहत्त्वाची आहे , कारण परिसर स्वच्छ आहे आणि तुम्ही शारीरिक अस्वच्छ असले तर त्याचा त्रास इतरांना होतो. दुर्गंधी, संसर्गजन्य आजार होतात. तुम्ही रस्त्याने एखादी व्यक्ती वेड्यासारखी मळके कपडे, आजाराने ग्रस्त पहिली असेल आपणाला त्या व्यक्तिकडे पाहावेसे वाटत नाही तर खूप किळस येते. म्हणून स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून करायला हवी, कारण स्वच्छता आणि आरोग्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आरोग्य हवे असेल तर स्वच्छता ठेवावी मग हि शारीरिक असो कि परिसरातील असो.
वैयक्तिक स्वच्छतेची सुरुवात हि सवयी अंगीकारण्यापासून होते. दररोज अंघोळ करणे, नखे दर आठवड्याला कापणे, केस दर महिन्याला कापणे इ. शालेय जीवनात या सवयी रुजतात. प्रत्येक शाळेत कटाक्षाने या सवयी रुजविण्याकडे लक्ष पुरविले जाते. शालेय गणवेश स्वच्छ असणे, केस नीट तेल लावून विंचरलेले असावे, दात घासलेले असावे, नाक कान स्वच्छ असावे. परीपाठाच्या वेळेत स्वच्छतेविषयक तपासणी केली जाते. चेहरा आनंदी असवा याची चाचपाणी विद्यार्थ्यांनी करावी म्हणून प्रत्येक वर्गात आरसा, पावडर, हातरुमाल ठेवलेला असतो. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे घोषवाक्य, गाणी, गोष्टी शिकविल्या जातात. ताप, सर्दी, खोकला असे संसर्गजन्य आजार हाताच्या स्पर्शाने होतात. आपले हात स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे कारण जेवणाअगोदर हात न साबणे न धुतल्यास हातावरील जंतू पोटात जातात. तसेच शौचास जाऊन आल्यानंतर हात धुण्याची सवय असावी याचे महत्त्व जाणून १६ ऑक्टोबर ‘जागतिक हात धुवा दिन’ म्हणून राबविला जातो. या दिनी हात धुण्याचे प्रात्यक्षिक दिग्दर्शनासह करवून घेतात.यासाठी शासनाने खास निधी उपलब्ध करून प्रत्येक शाळेत हान्दवाश स्टेशन तयार क्ले आहेत. जसे हाताचे तळवा इन्फेक्शन होण्यास कारणीभूत आहे तसा पायाचे तळवे स्वच्छ ठेवण्यासाठी चप्पल वापरणे उपयुक्त ! नाहीतर पायाला नारू गळू हत्तीरोग असे आजार होतात. म्हणूनच कि काय गांधीजीनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वच्छतेला महत्त्व दिले आहे. त्यांच्या आश्रमात प्रवेश मिळविण्यासाठी आश्रम स्वतः स्वच्छ करण्याची अट पाळावी लागत असे. जपानमध्ये शाळेत मुले स्वतः शाळा स्वच्छ करण्याचा उपक्रम राबवितात. आपल्या शाळामध्ये हि मुले स्वच्छ शाळा करण्यास उत्सुक असतात,
“एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ”
म्हणत शाळेचा परिसर लख्ख करतात ! भारत शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत स्वच्छ शाळा पुरस्कार योजना २०१६ वर्षापासून सुरु केली आहे. या योजनेतून ‘स्वच्छ शाळा सुंदर शाळा’ करण्याचा सर्वांचा जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
शारीरिक स्वच्छतेबरोबर मनाची स्वच्छता म्हणजे शुद्धता हवी. तुकाराम महाराज म्हणतात
“नाही निर्मळ जीवन | काय करील साबण ||
तैसे चित्त शुद्ध नाही | तेथे बोध करील काई ||
मन शुद्ध नसेल तर साबण काहीच करू शकत नाही, मन योग्य ध्येयाच्या दिशेने असेल तर सर्व सिद्धी यश प्राप्त होते. वाचन, चंद असल्यास वाईट विचार येत नाहीत, यशस्वी जीवनाचा अनुभव येतो. संत गाडगे बाबांनी हातात झाडू घेवून स्वच्छता दिवसभर करत मग संध्याकाळी कीर्तनातून मन पवित्र शुद्ध करत म्हणजे बाह्य व आंतरिक स्वच्छता प्रत्येकास गरजेची आहे.
वैयक्तिक स्वच्छता ते शाळा स्वच्छता नंतर गाव, शहर स्वच्छता होण्यासाठी शासनाने निर्मल ग्राम पुरस्कार २०१२ पासून त्याअगोदर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २००० सालापासून राबवीत आहे. यात आतापर्यंत अनेक गाव शहरांनी सहभाग घेत स्वच्छतेचा आदर्श ठेवला आहे. आन्ना हजारे यांचे राळेगणसिद्धी आणि हिवराबाजार स्वच्छ ग्रामचे उदाहरण आहे. या योजनेत प्रत्येक गावातील घर, रस्ता, पाण्याची व्यवस्था, शौचालय वापर, सांडपाण्याची व्यवस्था, कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे असावी लागते. एकोणीसाव्या शतकात प्लेगची साथ पसरली तेव्हा उंदराचा सुळसुळाट झाला होता कारण घरातील अस्वच्छता ! घरातील स्वच्छता दर आठवड्याला करावी तर जाळे जळमटे, भांडे कपड्याची स्वच्छता करावी. गेल्या १-२ दशकात उवा पिसवे ढेकुण झुरळ चे प्रमाण जास्त होते. त्यामुळे घरातील व्यक्ती सतत आजारी पडत असत. याकरिता पेस्टीसाईड कॅन्ट्रोल शहरात दर ३-६ महिन्याला करवून घेतात. मेडीकल स्टोरमध्ये झुरळ माश्या मारण्याची औषध मिळतात. यामुळे घरात स्वच्छता राहील. आरोग्य विभागामार्फत स्वच्छ अन्न , स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा प्रत्येक व्यक्तीला मिळावी हा प्रयत्न असतो. याकरिता कर्मचारी व अधिकारी वर्ग लोकांना मार्गदर्शन करतात. पाण्याची शुद्धता तपासून सांगतात कि कोणत्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी व स्वच्छतेसाठी करावा. झाकलेले अन्न खावून संसर्गजन्य आजार टाळावे. कचऱ्याचे व्यवस्थापन स्थानिक शासन संस्था जसे महानगरपालिका घंटागाडी द्वारे करते. सांडपाणी जाण्यासाठी झाकलेली गटारे असावीत. उघड्यावर सांडपाणी असल्यास मच्छर होऊन डेंग्यू,मलेरिया आजार पसरतात. आरोग्य विभाग प्रादुर्भाव होऊ नये म्हणून असह ठिकाणी फवारणी करतात. तसेच स्वच्छ हवा महत्त्वाची कारण गाड्याच्या वापराने हवा प्रदूषित होऊन श्वसनाचे विकार होतात. झाडे हवा शुद्ध करतात म्हणून पर्यावरणप्रेमी संस्था, शासकीय विभागामार्फत वृक्षारोपण केले जाते. दिल्ली शहरात हवेची शुध्दता वाढविण्यासाठी गेल्या वर्षी सम ऑड नंबर गाड्यांचे वाहतुक करण्याचा प्रयोगशील प्रयत्न केला आहे.
“आम्ही सांगू परोपरी ,शौचालय बांधा घरोघरी”
सनीटेशनमध्ये शौचालय व्यवस्था विचारात घेतली जाते. आपण आजही भारतात पाहतो कि प्रत्येकाजवळ मोबाईल आहे पण घरी शौचालय नाही ! भारत शासनाच्या निर्मल ग्राम योजनेतून एका कुटुंबामागे एक शौचालय गृह बांधण्यास निधी उपलब्ध करून देत आहे. ग्रामीण शहरी भागात प्रातर्विधी करण्यासाठी उघड्यावर जातात. त्यामुळे आजारांना निमंत्रण दिले जाते ! आपल्या संस्कृतीला न शोभणारी पुरुष स्त्रिया यांना हि लज्जास्पद बाब आहे. अनेक कामाच्या ठिकाणी बाथरूम नसल्याने स्त्रीया नैसर्गिक विधीच्या विरुद्ध जातात व किडनीच्या आजारांना बळी पडतात, कारण शरीर स्वच्छतेचे कार्य किडनीकडे असते. शरीरासाठी बाथरूमला जाणे आवश्क्या आहे . आता सार्वजनिक ठिकाणी स्त्री-पुरुष वेगळे शौचालय आहेत. परंतु पाण्याचा वापर करून शौचालय गृह स्वच्छ ठेवणे तितकेच गरजेचे आहे.
स्वच्छ भारत मिशन मध्ये स्वच्छ शहरे (स्मार्ट सिटी) योजना आहे. निवड केलेल्या शहराना सुव्यस्थित रस्ते, रचना करण्यासाठी निधी दिला आहे. कारखानदारीला सुरुवात झाली तेव्हा गलिच्छ वस्त्या, झोपडपट्ट्याचे प्रमाण वाढले या अस्वच्छतेतून राहणीमान दर्जा खालावला. मुंबईसारख्या शहराच्या ठिकाणी धारावी झोपडपट्टी आहेत त्या ठिकाणी आता पुनरचना करताना इमारती होणार आहेत. शासनाने कितीहि योजना दिल्या तरी आपल्या सवयी महत्त्वाच्या आहेत. शहरात कुत्रे असे पाळीव प्राणी घरी पाळतात पण ते प्राणी रस्त्याने घाण करू नये याची काळजी घ्यावी. नद्यांचे प्रवाह स्वच्छ ठेवण्यासाठी सांडपाणी नदीत सोडू नये. केंद्र शासनाने ‘गंगा नदी शुद्धी प्रकल्प’ यशस्वी केला आहे.
‘स्वच्छ भारत का इरादा कार लिया हमने ,ये वाद कार लिया हमने’
‘अतुल्य भारत‘ हि आपली पर्यटनाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे, परंतु नागरिकांच्या सवयी स्वच्छतेच्या नसल्याने रस्त्यावर कचरा फेकणे, थुंकणे,सार्वजनिक ठिकाणी नासधूस करणे हानिकारक आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या प्रेरणेने स्वच्छ भारत करताना एका कुणाची जबाबदारी नसून सर्वांच्या सवयी स्वच्छतेला पूरक असाव्यात. बऱ्याच ठिकाणी मोठ्या मंडळी झाडू हातात घेऊन फोटो काढेपर्यंत मिशन असते नंतर काहीच स्वच्छता नसते असा विरोधाभास आपण पाहतो तरी काहीजण प्रत्यक्ष हरघडी योजनेचा पाठपुरावा करतात. सर्वांनी खारीचा वाटा उचलत आपल्या परिसर स्वच्छ ठेवल्यास आपला भारत जगात अतुल्य नक्कीच होईल ! निता आरसुळे -तांबे जालना मो. नं ८६५२४५००३२ email Id :- neetaarsule@gmail.com
[10/16, 6:06 PM] +91 98603 14260: [16/10 5:56 PM] prachi: स्वच्छतेचे महत्व
********************
स्वच्छता ही माणसाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे .बाळ जन्माला आले की शीशू केली की लगेच रडते म्हणजे आईला समजते की याचे दुपटे झबले बदलायला हवे.शिशू असतानाच ही स्वच्छतेची जाणिव प्रत्येकाला होते.स्वच्छता आरोग्याशी निगडीत आहे.
जेवणाच्या आधी हात स्वच्छ धुणे हा ही स्वच्छतेचाच भाग.
सकाळी उठल्यापासून स्वच्छतेचे धडे मोठ्यांकडून मुलांना आपोआप मिळत जातात नि शिस्तीने मुले त्याचे पालन करतात
सकाळी उठल्याउठाल्या दात घासणे तोंड धुणे. शौचमुखमार्जन झाल्यावर हात पाय स्वच्छ धुणे काहीही खाण्याच्या आधी नि जेवणापूर्वी हात स्वच्छ धुणे नि खाल्यांनंतर जेवणानंतर तसेच रात्री झोपताना दात घासून झोपृणे असे बाळकडू आईकडून आजीकडून मुलांना मिळते.नि त्याचे पालनही मुले करतात.
सकाळी घर झाडणे अंगण झाडणे ते रात्रीपर्यंत आईचे हात सतत स्वच्छता करत असतात.त्यामुळे घर स्वच्छ रहाते
घराबरोबरच मनाची स्वच्छता ही महात्वाची.जागरुक आई ते काम करत आसते छोटे छोटे श्लोक मनाचे श्लोक वदवून पाठ करुन घेत असते, त्याला गोष्टीरुपे स्वच्छतेचे माहत्व पटवून देत असते.
कचरा करु नये ,खेळणी जाग्यावर ठेवावी स्वच्छ कपडे घालावे.असे आई घरातील मोठी माणसे सांगत शिकवत असतात.अनुकरणातूनच मुले शिकतात अंगिकारतात.
सार्वजनिक ठिकाणी कचरा करु नये .सहलीला वा फिरायला जाताना कचरा करतात लोक लँस्टिकच्या पिशव्या रस्त्यावर पिकनिक स्पाँटवर तसेच टाकून देतात हे चुकीचे आहे हे मुलांना सांगणे नविन पिढीला स्वच्छतेबाबत जागृत करणे महत्वाचे आहे
स्वच्छतेचा धडा गांधींनी घालून दिला ते स्वतः हातात झाडू घेऊन झाडत कस्तुरबांचीही त्यांना साथ असे .
संत गाडगेबाबा खेड्यात जन्मले पण स्वच्छतेच्या बाबतीत ते अग्रेसर होते.अंगण आवर रस्ते झाडून सार्वजनिक स्वच्छतेबरोबरच कीर्तन भजनाद्वारे डेबूजी म्हाणजेच संत गाडगेबाबा लोकांमध्ये जागृती करत त्यांची मनेही साफ करत.लोकमानसातील अंधश्रध्देची जळमटे काढून टाकत.म्हणूनच महाराष्ट्र सरकारने त्यांच्या नावे संत गाडगेबाबा अभियान काढून
त्याद्वारे स्वच्छ गावाला(ग्राम) पुरस्कार दिला जातो.
स्वच्छतेमुळे रोगराई होत नाही परिसर स्वच्छ रहातो
आरोग्य चांगले रहाते
अस्वच्छतेमुळे डास माशा कीडे उंदिर यांचा प्रादुर्भाव होऊन रोगराई होते माणसे साथीच्या रोगाला बळी पडतात अजूनही साथीच्या तापाचे थैमान काही शहरात गावात सुरु आहेच याला कारण स्वच्छतेचा अभाव हेच आहे.
मोठ्या शहरात सर्व सोयी आसतात पण लोकसःख्येच्या दृष्टीने त्या कमी भासतात
आर्थिक विषमता हे ही अस्वच्छता फैलावण्यास कारण आहे लोकांतील अज्ञान अंधश्रध्दा यामुळेही अस्वच्छता फैलावते.याबाबत जागृती होणे गरजेचे आहे
गडकिल्यावर लोक सहल काढतात पण तिथे रिकाम्या बाटल्या प्लँस्टिकच्या पिशव्या टाकून येतात आसे होऊ नये काही संस्थांनी याबाबत जागृतीचे काम हाती घेतलले आहे पण ते वैयक्तिकरित्याही पाळले गेले पाहिजे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्याचे काम प्रत्येकाचे आहे.
गणपती गौरी नवरात्र, यात्रा दिवाळी या काळात जल प्रदूषण वायूप्रदूषण हवेचे प्रदूषण होते त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. मूर्तीदान केले पाहिजे वा घरच्याघरी मूर्ती विसर्जित करुन ते पाणी झाडाला घातले पाहिजे
निर्माल्यकुंडात निर्माल्य विसर्जन झाले पाहिजे. या गोष्टींकडे सजग होऊन पाहिले पाहिजे कचरा कचरापेटीतच टाकला गेला पाहिजे हेच वळण पुढच्या पिढीलाही लावले पाहिजे तरच आरोग्य अबाधित राहिल.
स्वच्छतेची मोहिम राबवून आपले घर आवार परिसर अंगण स्वच्छ ठेवले पाहिजे.
तरच मेरा भारत महान हे चित्र दिसून येईल आरोग्य रक्षण होईल
प्राची देशपांडे
समूह क्र. १५
निगडी प्राधिकरण
[10/16, 6:15 PM] 10 Meena Sanap: 📕साहित्य दरबार व्दारा📗
वैचारिक लेखमाला
*************************
विषय------- स्वच्छतेचे महत्व
*************************
दिनांक -----16---10----2016
**************************
आज आपल्याला चिंतनासाठी दिलेला विषय खुप महत्वाचा आहे. कारण स्वच्छता म्हणजे आरोग्य रक्षण व रोगाला प्रतिबंध करणारा महत्वाचा घटक होय. आरोग्य वाढा करणारी किंवा रोगाला प्रतिबंध करणारी परिस्थिती म्हणजेच स्वच्छता. आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने
स्वच्छता ही जीवन जगण्याची एक गरज झाली पाहिजे. तो ऐक सःस्कार झाला पाहिजे. मातीने चांगला आकार घेऊन, त्यातुन काही नवे साकारण्यासाठी मातीत ओलावा असतानाच आकार द्यायला हवा.अगदी तसेच आहे संस्काराचे .
स्वच्छता हा स्वभावधर्म , जीवनसंस्कार व्हायचा असेल तर बालपणापासुनच प्रयत्न व्हायला हवेत. कृतीशिल उपक्रमाबरोबर शालेय अभ्यासक्रमातुन हा विचार रुजणे गरजेचे आहे.
वैयक्तिक स्वच्छते बरोबर परिसराची सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखली गेली पाहिजे. शालेय शिक्षणाचा काळ हा प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचा टप्पा असतो.या वयात मनावर झालेले संस्कार कायमास्वरुपी टिकुन राहतात. स्चछतेविषयी जागरुक असलेली व्यक्ती निकोप समाजाचा महत्वाचा घटक असते.स्वच्छ परिसर, सुदृढ शरीर, आणि निकोप मन हे कोणत्याही प्रगत समाजाचे प्राथमिक लक्षण आहे.आपले शरीर मन घाण राहू नये असे प्रत्येकाला वाटत असते तसेच माझा परिसर स्वच्छ असायला पाहिजे ही जाणीव समाजातील प्रत्येक घटकात निर्माण व्हायला पाहिजे.विद्यार्थी हा तर समाजाच्या साखळीतील महत्त्वाचा घटक आहे.
स्वच्छता हे परमेश्वराचे दुसरे रुप आहे हा सुविचार अनेक ठिकाणी वाचायला मिळतो.ईश्वराची जशी आपण मनोभावे साधना करतो तशी स्वच्छतेची का असू नये ?
अस्वच्छता केलीच नाही तर स्वच्छतेची वेळच येणार नाही.
याउलट परिस्थिती परदेशामध्ये आहे
जपान,इंग्लंड ,जर्मनी ,न्यूझीलंड येथे स्वचछतेविषयीचे काटेकोरपणे नियोजन केलेले आहे वाटेल तेथे कचरा फेकल्यास जबरदस्त दंड आकारला जातो.या देशात कचरा कुठै टाकायचा याबद्दल मुलांना लहानपणापासून शिक्षण दिले जाते.आसपासची स्वच्छता पाहुन मुले आपोआपच शिकतात.स्वच्छताविषयक जनजागृती मुळे हे शक्य झाले आहे.
अशी परिस्थिती आपल्याकडे ही येऊ शकते पण गरज आहे मानसिकता बदलण्याची.
पुस्तकातील छापलेल्या साहित्याचा मुलावर खोल परिणाम होत असतो म्हणुण पाठ्यपुस्तकात वैयक्तिक स्वच्छता आणि परिसर स्वच्छता या दोन्ही बाबीवर भर देण्यात आलेला आहे.म्हणुण शाळा स्तरावर स्वच्छता समिती नेमण्यात आलेली असते.
अगोदर चालायला हवे मग पायवाट तयार होते. म्हणुण म.गांधी, संत गाडगे बाबा, तुकडोजी महाराज यानी जनजागृती केली नव्हे नव्हे आधी केले मग सांगितले .
"हाती धरुनी झाडू तू मार्ग दाविलासी
स्पर्शे तुझ्या महात्म्या, ये थोरवी श्रमांसी"
वाढत्या शहरीकरणामुळे तर कच-याची समस्या खुपच भीषण झाली आहे.
चांगल्या विचारांना बळ तेव्हाच मिळते, जेव्हा त्याला कृतिशीलतेचाआधार मिळतो.म.गांंधी
या महान व्यक्तीमत्वाचा जीवनादर्श आपण पाहिला तर श्रमातुन स्वच्छता व स्वच्छतेसाठी श्रम असे धडे त्यांनी दिले.आश्रमातील मुलांना गांधीजी स्वतः शिकवत, स्वतः मैदान सफाई करीत.ते म्हणत असत , स्वतःच्या कामाची कसली आली लाज.श्रम हीच खरी प्रतीष्ठा आहे.
खालील बाबी मध्ये स्वच्छता असावी
1) वैयक्तिक स्वच्छता
2) परिसर स्वच्छता
3) घराची स्वच्छता
4) खाण्यापिण्याची स्वच्छता
5) मलमुत्र विसर्जनाचे व्यवस्थापण
6) सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता
अशाप्रकारे स्वच्छता नसेल तर साथीचे आजार थैमान घालतील.
मीना सानप बीड @ 7
9423715865
सुरेख , परंतु माझा लेख नाही दिसत संकलनात.
ReplyDeleteसुरेख , परंतु माझा लेख नाही दिसत संकलनात.
ReplyDelete