Saturday, 10 September 2016

मुक्त कविता



मुक्त कविता स्पर्धा
[10:48am, 10/09/2016] ‪+91 94044 00004‬: चेहरा का पडलाय त्याचा ?
नभी फिका मेघ सावळा...
कैक चमकून उठले काजवे
दऱ्यात प्रकाश किर्रर्र काळा...

दिले सोडूनी हात सावल्यांनी
झाडांत दिवे हजारो पेटलेले
बहुचर्चित शिल्पापेक्षा आता
वाटेवरी दगड,जवळचे वाटलेले...

अंधार असा,जसा तुझा माझा
रक्तचंदनी सुगंधाने माखलेला
लक्ष देऊन पहा साजणी,चंद्र
चोरुनी तुझ्यासाठी आणलेला...

प्रकाश अंगणी नसला म्हणून
नकोस गाऊ वियोगाची गाणी
लक्ष देऊन पहा साजणी,आता
वाटेवर तव देखणी चांदणी...

@आदित्य अ. जाधव,उमरगा;
०९४०४४००००४;
दि,०८-०९-२०१६,सोलापूर;
वेळ-०३:४०मि,रा;
[1:00pm, 10/09/2016] Subhadra Khedakar: 📕  स्पर्धेसाठी मुक्त कविता📕
➖➖➖➖➖➖➖➖➖
            🌹शिक्षणाचे सार🌹

शिक्षकाचे महत्व आता घे जानूनी सत्वर।
जैसे करशील कर्म तैसे फळ देतो ईश्वर।।धृ।।
थोड्याशा त्या लोभापाई करतो बरबाद पेशाला।
ठेव आदर्श मनी सदा तू सावित्री आणी त्या ज्योतीला।।
देह झिजविला चंदनापरी नाव राहिले निरंतर ।।१ ।। जैसे
विडी सिगारेट दारू व्यसनासी त्या दूर करू।
मुलांमध्ये रमून जावू रचवादाची कास धरू ।।
 सोड आता व्यर्थ ती कामे आहे पेशा हा सुंदर ।।२ ।। जैसे
गुरु परंपरा पुराणी गुरु असावा अंतर्यामी ।
जे जे आपणासी ठावे ते शिष्या यावे कामी।।
ठेवू नको मनात काही करा एकच निर्धार।।३ ।। जैसे
झाले गेले विसरूनी जावे पुन्हा जोमाने कार्य करावे।
हसत खेळत ज्ञानरचवादी मुलांमध्ये रमून जावे।।
ध्येय गाठ एकच आता प्रगत महाराष्ट्र करणार ।।४ ।।
जैसे ज्याचे 
      खेडकर सुभद्रा बीड (२०) 
      मो नं ९४०३५९३७६४
[1:09pm, 10/09/2016] Pushpa Sadakal: स्पर्धेसाठी. 

     तुझ्या धुंद नशेची खेळी
     करी संसाराची राखरांगोळी 
     नवतरुण तु असे देशाचा
     ठरलास कसा बेभरवशाचा.

    तुझ्या तारूण्याचा  बहर
    नशेने  केलाय कहर
    मायबाप झुरती  मनी
    तुझी अशीअघटीत करणी.

    नयनांच्या जागवून  ज्योती
    अपार कष्ट सोसले तुजसाठी 
    उद्याची आशा घेऊन जगती
   म्हातारपणीची   तु   काठी

    दोन  दिवसांची ही जवानी
    काय करील औषधपाणी
    बेताल वागण्याची मजा
    स्वतःलाच करशील सजा.

   राजकुमारासारखा सुस्वरूप
    आता  दिसशी तु कुरूप
    नशेची  होळी नित खेळी 
   मायबाप  जिवंतपणीच जाळी.

   हो सावध आता लेकरा
   कर्तव्याचा भोवती पसारा
   झुगारून नशेच्या कुकर्माला
  व्यसनमुक्तीचा वाजव नारा.

  मायबापाचा एकुलता लेक
 निभाऊन ने जीवन नेक
 भूलोकीच्या या स्वर्गसुखात
 चालव संसारनौका झोकात.

       पुष्पा सदाकाळ भोसरी 
      @50.     9011659747.
[1:51pm, 10/09/2016] Meena Sanap: 📚 साहित्य दर्पण व्दारा आयोजित📚
**********-************
          कविता स्पर्धा
***********************
विषय------मुक्त कविता
दिनांक ----- 10-9-2016

***********************

        ओढ पंढरीची
***********************
पंढरी पंढरी
इथुन दिसते हिरवीगार
सावळ्याच्या दारापुढ
तुळशीनं केला  बहार

पंढरपुरामध्ये
गल्लोगल्लीला मो-या
विठ्ठलाच्या अंघोळीच
पाणी जातं गोपाळपु-या

पंढरपुरा मध्ये
ढवळी गाय पिवळी शेणं
विठ्ठलाची रखुमाई
सारविती इंद्रावन

पंढरपुरा मध्ये
काय वाजत गाजत
सावळ्या विठ्ठलाच
लगीन देवाच लागत

पंढरपुरा मध्ये
कशाचा गलबला
रखुमाईच्या चोळीसाठी
नामदेव शिंपी झाला

रखुमाई धुणे धुती
विठ्ठल डगरीला उभा
दोघांच्या प्रितीला
हसली चंद्रभागा

पंढरीला जाया
औंदा नव्हतं माझ मन
जीवीचा पांडुरंग
निरोप धाडिला बांधवानं

पंढरीच्या वाटेनं
जाई मोगरा दाटला
भक्ताच्या गर्दीत रखुमाईचा
पदर शालुचा फाटला
********************
सौ.मीना सानप  बीड @ 7
9423715865
स्पर्धेसाठी
***********************
[1:52pm, 10/09/2016] Kulkarni Sir: 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 मुक्त कविता स्पर्धेसाठी 

       *प्रकाशज्योत*

उजळून प्रज्वलीत होतो मी दररोज..!
प्रकाश देण्यासाठी जळतो मी दररोज..!

लक्ष दिव्याकडे सर्वांचे जिथे मी जळतो..!
संपवताना स्वतःला दुर्लक्षित मी राहातो..!

कर्तव्यात जळणे हीच रीत मी जाणतो..!
जळणे धर्म जाणून ते मोकाट मी सोसतो..!

जळताना होणाऱ्या वेदनेने मी विव्हळतो..!
फुललेले चेहरे पाहून आतून मी सुखावतो..!

जळतानाही घेतो काळजी मी स्वतःची..!
माझे जीवन त्यांच्यासाठी हे मी ओळखतो..!

कुठला गर्व माझ्यात उदास मी असतो..!
माझे तुझे फेकून दूर सर्वांना कवेत मी घेतो..!

सर्वांसाठी मी, सर्वजण माझे हे मी जाणतो..!
कार्य पार संपता दुर्लक्षित प्राणी मी असतो..!

पाहून हा निर्लज्ज होताना तिथे मी शरमतो..!
जगणे अनर्थ ओळखून काळोखी मी संपतो..!

               बंडोपंत कुलकर्णी सोलापूर 
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 ?🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
[1:57pm, 10/09/2016] ‪+91 95529 80089‬: मुक्त कविता स्पर्धा
         ।।। आठवण ।।।
संपलं आता सारं काही
आठवणीत तुला शोधतो मी ।।
काय केला होता मी गुन्हा
मलाच आता कोसतो मी ।।
नियतीचा हा खेळ सारा
ह्रदयातील दुःख सोसतो मी ।।
भडकल्या जरी मनातील वेदना
आठवणींचा निखारा फुंकतो मी ।।
गेला आत्मा सोडुनी देहाला
देह ही आता त्यागतो मी ।।
नरेंद्र म्हस्के , शिरपूर @ 65
[1:59pm, 10/09/2016] ‪+91 99752 32602‬: स्पर्धेसाठी  
विषय- मुक्त कविता 

दृष्टी असुनी अंध आम्ही
भुकेल्याला देत नाही अन्न
दावतो नेवैद्य आम्ही
अंधार झोपडीत लावतो
दिप मंदिरात आम्ही
दृष्टी असुनी अंध आम्ही

दृष्टी असुनी अंध आम्ही
दुधाविना रडत बाळ पाहतो आम्ही
तरी पिंडिवर दूध वाहतो आम्ही
अजब छंद जोपसतो आम्ही
गरज नसता दान देतो आम्ही
दृष्टी असुनी अंध आम्ही

दृष्टी असुनी अंध आम्ही
दगडरूपी देव मानतो आम्ही
तो देव म्हणतो अरे मनुष्या
तुझ्याच माणसात वसतो आम्ही
दृष्टी असुनी अंध आम्ही

दृष्टी असुनी अंध आम्ही
तो दगडरूपी देव कंटाळतोय आता
सर्व पाप त्याच्यावर लादतो आम्ही 
दृष्टी असुनी अंध आम्ही

                 अमोल अलगुडे
                    समूह क्र. 51
[2:06pm, 10/09/2016] ‪+91 80973 18985‬: *साहित्य दर्पण* आयोजित
*मुक्त कविता स्पर्धेकरता*

*रसिका मनमोहना*
--------------------------------

रसिका मनमोहना
सांगु कशी रे यातना

काळजातील दुःख रे
नयनीचे अश्रु रे
तु तिथे अन् मी इथे
सांग दाखवु कशी रे
रसिका मनमोहना.....

तु असा मद्यधुंद रे
मी कोमलांग पुष्प रे
घायाळ पाकळी अन् पाकळी
सांग दाखवु कशी रे
रसिका मनमोहना.....

जग देत असे मज दुषणे रे
म्हणे रखेल अन् नाची रे
पावित्र्य जरी माझे एक रातीचे
सांग दाखवु कशी रे
रसिका मनमोहना.....

घन बरसले आठवणींचे
कथा, व्यथा अन् दुःख रे
अश्रुच अश्रु मम नयनी
सांग दाखवु कशी रे
रसिका मनमोहना.....

- प्रवीण रसाळ
[2:55pm, 10/09/2016] ‪+91 90280 90266‬: बाप्पा माझा

ऊजाळले मन
तेज आले ऊरी
आला आज घरी
     बाप्पा माझा !
करू मनोभावे
गणेशाची आरती
तोच असे सारथी
    जीवनाचा !
डाॅल्बीचा आता
नको अग्रह
करू हा निग्रह
    मिळूनि सारे !
जल आणि वायू
नको प्रदूषण
हेच खरे भूषण
      असे आपुले !
करूया स्वच्छता
घालुनिया सडा
नवा हा धडा
    शिकू आता !
नको करावया
पर्यावरण दूषित
मग,हसेल खुशित
     बाप्पा माझा !
   -आबासाहेब निर्मळे
पेठ वडगांव कोल्हापूर
9028090266.

(मुक्त कविता स्पर्धेसाठी)
[3:01pm, 10/09/2016] Rohini Malwadikar: स्पर्धेसाठी

अहंकार 

फाशीची शिक्षा दिली तरी
संपेल का हे क्रौर्य....
विझणार्या अनेक ज्योतींना
मिळेल का धैर्य 

समाजात निर्भयपणे
बागडेल का अबला नारी?..

 क्रौर्याची परिसीमा गाठत,
आपला पुरूषी अहंकार कुरवाळत बसणारे हात
आता तरी थांबतील का?

खरं तर फाशीमुळे...
शरीर मरते पण अहंकाराचं काय?
तो पुरूषी अहंकारच लटकवला पाहिजे फासावर....
मग कदाचित उजाडेल....
अन् होईल स्त्री स्वातंत्र्याची पहाट....

---माळेवाडीकर रोहिणी 36 माजलगाव.
[3:09pm, 10/09/2016] ‪+91 83084 32625‬: कविता - खंत-(स्पर्धेसाठी )


नित्यनेमे रडणे आमचे 
इथे रोजच नवा भ्रष्टाचार 
टिचभर पोटासाठी 
बनलो आम्ही लाचार.

रोजच मरतो आम्ही येथे 
सरणास न आमच्या वाली
जळण्यास तत्पर आम्ही 
पण स्मशान नाही खाली ..

माणूसकीच्या बाजारात 
होतो रोज आमचा लिलाव 
साधी काम करण्यासाठी 
म्हणे वशीला तू लाव..

कवडीमोल जीवन आमचं 
मरणेही ना आमच्या हाती 
जगता-जगता मृत्यु येतो 
खंत एवढीच उरते बाकी ...

घनश्याम बोह्राडे 
समुह क्रमांक 19
[4:32pm, 10/09/2016] ‪+91 98905 67468‬: मुक्त कविता स्पर्धेसाठी :
-बीजरोपण - 
संस्कारांनी 
शिकविली होती श्रद्धा 
कर्मकांडात अडकून 
श्रद्धा 
कधी झाली अंधश्रद्धा 
कळलेच नाही मनाला 
विज्ञान 
शिकूनही आयुष्यभर 
वैज्ञानिक सिध्दांतांच्या 
कसोटीवर 
न तपासता 
आंधळेपणाने 
मानत राहिलो चमत्कार 
निर्मूलन समितीचा 
दुराग्रहही टोकाचा 
अधिक कर्मठ करीत गेला 
अनुत्तरीत प्रश्नांच्या 
भेंडोळ्यात 
विचारांच्या चक्रव्यूहात 
अडकलेला भोळा जीव 
ब्र शब्द न काढताही 
बेगड्या चालीरीती 
परंपरा म्हणून पाळतो 
अन 
आपल्या मुलांमध्येही 
रूजवितो नकळत 
अंधश्रध्देची बीजे. 
:बाबू फिलीप डिसोजा 
निगडी, पुणे ४११०४४ 
@39
[4:50pm, 10/09/2016] Pro Bhalsing Mam: *साहित्य दर्पण*

🌹 काव्य स्पर्धा 🌹

🌻 नटखट रसना 🌻


नटखट रसना
सर्व आजाराचे 
महाद्वार आहे ...
नसेल लगाम
तर जीवनाची
महा हार आहे ...

बत्तीस रक्षकात
राणी मुख राजाची
 किती गचाळ आहे ...
बाहेर पडली तर
वाणी वाचाळ आहे ...

लक्षात ठेव मानवा
तलवारी पेक्षाही
तीला धार आहे ....
एक एक शब्द
कोमल काळजावर
मोठा वार आहे ...

एक घाव दोन तुकडे
करणारी नार आहे ...
पण षडरस तिच्यात
विविधता फार आहे ...

माणूस तोडण्याची
अणि जोडण्याची
मजबूत तार आहे ...
तिच्या शांतीत
मानव्याचे सार आहे ...

संयम मनाचा
उपाय मानवा
फार जरूर आहे ...
दृढ़ निश्चय केला
तर, तिच्यातून
अमृत झरा वाहे....

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
दि.१०/०९/१६
spsfun.com
[4:50pm, 10/09/2016] ‪+91 98908 16527‬: 28July 2015

बा  विठ्ठला !

बा विठ्ठला भक्तांसाठी तू उभा विटेवरी!
भक्तांचा हा मेळा फुलला तुझ्या सभोवरी!
आम्ही पामर दुःखी किती असलो जरी!
देशी दान तूच आम्हा सर्वांच्या करी!

किती युगे गेली किती काळ वरीस जरी!
तूच आमचा दाता असशी रे भारी!
आम्ही पामर सर्व हावरट असलो भारी!
देतो दान योग्य जयाचया त्याच्या करी!

ऐकदशीचा हा सोहळा मोठा झाला !
सुखावून गेला सगळा भक्तांचा मेळा!
या भक्तगणं गदीॅत थकलास बाप्पा !
पाय किती तुझे दुखावले बापा!

उन उन पाणी तुझ्या पायावर घालीते!
पाउले तुझी माझ्या कराने बाबा दाबीते!
देते आज तुजला मी तूप अन खिचडी !
सोबत आहे लाडू कंरजीची रे जोडी !

जाऊ दे बा आज थकवा सारा तुझा!
दद॑भरया नयनांनी जोडीते कर माझा !
उभा राहशी आम्हासाठी पुन्हा पुन्हा देवा !
तरी भक्तगणांचा का असतो रे कावा!!!ं
[4:55pm, 10/09/2016] Padawal Sir: "आठवणीचे पांघरुन"

माझ्यात खोल खोल रुतून
मलाच शोधताना
कांही सापडलेत
विखुरलेल्या आठवणीचे अवशेष.....

पुन्हा रचाव्यात त्या आठवणी
आणि बनवावं सुंदर घर....
बंदिस्त करुन घ्यावं
आपणच आपल्याला....

भिंती आठवणीच्या
भुई आठवणीची
छत आठवणीचे
दारं,खिडक्या सारं आठवणीचं......

का छळेल आता वर्तमान
पोटचेही झाले जरी बेईमान
आठवणीचे करत रवंथ
मी जगतोय खुशाल आणि निवांत.....

                       श्री.हणमंत पडवळ
        मु.पो.उपळे (मा.)ता.जि.उस्मानाबाद
                   8698067566.
                  क्र : 48.
[5:04pm, 10/09/2016] Nilesh Kawade: मुक्त कविता स्पर्धेसाठी 

*आग...*

गजबजलेल्या वस्तीमध्ये
एकमेकांच्या शेजारी होत्या
बँक आणि ग्रंथालय
नावाच्या दोन इमारती...

अचानक एका रात्री 
शाॅटसर्किट झाला अन् 
दोन्ही इमारतींना आग लागल्यामुळे 
जागे झालेले लोकं धावत सुटले...

बघता बघता 
बँकेभोवती गर्दी झाली 
आग विझवण्या-यांची...
कारण...  बँकेत जळत होता पैसा...
ग्रंथालय मात्र 
जळत होते एकटेच...
कारण 
ग्रंथालयात जळत होती 
केवळ पुस्तकं...

तेवढ्यात पाचारण केलं
अग्नीशामक दलाने
त्यांनी जळण्यापासून वाचविला 
पैसा आणि पुस्तकं सुद्धा...

आत्ता आग विझली होती 
परंतु या आगीतही 
एक गोष्ट चांगली झाली...
बँक आणि ग्रंथालय जळत असतांना 
सभोवती नव्हते 
एकही लहान मुलं...
नाहीतर त्यांचा मनात 
बिंबवल्या गेलं असतं
समाजाला विचारांची नव्हे
तर पैशाची गरज आहे...

________ निलेश कवडे अकोला  @44
[5:13pm, 10/09/2016] Na Sa Yotikar Sir: 🏚🏡 

घर कहाणी 🏡🏚

ही माझी आई 
तिला कामाची घाई 
कामाला ठेवली बाई 
ती वेळेवर न येई 

हा आमचा साई 
झोप आवडे लई 
अभ्यास तसाच राही 
शाळेत मार खाई 

ही आमची  ताई 
खोड्या करते लई 
शाळेत मात्र कशी 
गुमान बसून राही

बाबा करतो कमाई 
घर सांभाळते आई
आमच्या कुटुंबाची 
आहे अशी कहाणी 

✏ नासा
[5:16pm, 10/09/2016] kalpanaghige-jagdale: 🌴*भ्रमणतारा*🌴
******************

*कन्या दिव्यरत्न
आहे विश्वरंग
तरी होई भंग
काळजाचा*******

वाचवा हो लेक
देशोदेशी नारा
तरी पोटी मारा
सोसवेना********

होऊ दया रे जन्म
तीचाच संकल्प
कशी सांगू अल्प?
शब्दात या********

खोटी समजूत
बदलेना मानव
अधुरा दानव
दिसलासी********

आईचा आक्रन्द
मनाला यातना
अश्रु या लोचना
बघवेना********✍🏻

🇮🇳वृषाली वानखड़े🖋

🌴अमरावती🌴🖊

🇮🇳◯‍◯‍◯‍◯‍◯◯‍◯‍◯‍◯‍◯◯‍◯‍◯‍◯
       ~ °स्पर्धेसाठी°~
‍◯◯‍◯‍◯‍◯‍◯◯‍◯‍◯‍◯‍◯🇮🇳
[5:26pm, 10/09/2016] kalpanaghige-jagdale: ⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕

गुरूजीची करूण कहाणी
*********************

खडू अन् फळा सुटला , ज्ञान
रचनावादी फरशी हाती आली
*गुरूजी* नावाची एक नवी पण
करुण कहाणी जणू सुरू झाली

*ISO सिद्धि* साठी जणू नित्य
नवनवा अट्टाहास रोजच चाले
गुरूजी आमचा मात्र मायबाप
सरकाराचे दास की हो झाले

जणगणना, निवणूका, BLO
होतेच आमच्या जणू पाचवीला
आता आँनलाईन रोजच व्हावे 
म्हणून साथी कम्प्यूटर बनविला 

100 टक्के पोरं तुमची शिक्षित
प्रगत झालीच ती पाहिजेत
भंगी बनून संडास पण
तुम्हीच स्वच्छ केली पाहिजेत

प्रगत महाराष्ट्र करत करत सर स्वत:च्या घरी नापास होतोय
गुऱ्हाळातून ऊस गाळावा तसा 
त्याचा चिपाड चोथा होतोय

सुटी दिवशी जंयती पुण्यतिथी
उद्बोधन,प्रबोधनही तुम्हीच करा
पगार मात्र वेळेवर नसल्यामुळे 
सावकाराची कर्जही तुम्ही भरा

शालेय पोषण आहार स्किमचा
धसका रोजच मनी वसे
सोयीची बदली मागितली तर
सरकारी ओवाळणी मात्र दिसे

जलसाक्षरता, सर्वेक्षण, बेटी बचाओ चा तुम्हीच दया नारा
20पेक्षा कमी पट दिसला कि म्हणे शाळा त्या बंद करा

गुरूजी रक्त आटेपर्यत नवेनवे शिकवणीचे धड़े देतो आहे 
पेन्शनच्या नावाखाली अंशदायी
पेन्शन गोंडस नाव लावलं आहे

आमचा गुरूजी पेंटर,आचारी,
टेलर,गंवडी सुद्धा हो झालाय
म्हणूनच *गुरूजी* नावाच्या
प्राण्याचा भित्रा ससा केलाय


🖊🖊🖊📖🖊🖊🖊

*कल्पना जगदाळे@8★बीड*

       👆🏿💥स्पर्धेसाठी💥👆🏿

⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
[5:28pm, 10/09/2016] ‪+91 95273 02345‬: *आई*


लागली चाहूल हळुवार
माझ्या मनी या बाळाची
गोडी जशी अवीट
रसाळ या फळांची

असेल रंग तुझा साजिरा
रूप तुझे गोजिरे
चिमुकल्या तुझ्या पाऊलांचे
स्वागत आज माझ्या अंगणी रे


होणार मी आई रे
मन आज हर्षाने गाई रे
जरी सहन केल्या असहाय्य यातना, 
तुझ्याच पाई रे


तुझ्या एका निरागस हास्याने
दुःख माझे विरून जाई रे
तुझे रूप पाहता जग विसरते
होणार मी तुझी  आई रे
✍🏼🖊🖋
*सौ .जयश्री जोगदंड तेलगाव*
_@JJ62_

👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾
~*साहित्य सेवा मुक्त खुली कविता स्पर्धेसाठी*~
[5:42pm, 10/09/2016] Pranali Kakde: स्पर्धेसाठी...✍

   🎥 *मराठी सिनेमा*🎥


मनामनात रुजलेला
काळानुरुप बहरलेला
घराघरात पोहचलेला
 ----------मराठी सिनेमा

माणुसकी जपलेला
संस्कृतीने नटलेला
माणसं जोडलेला
----------मराठी सिनेमा

*श्वासा*त वसणारा
*दुनियादारी* शिकवणारा
शब्दांचे डाव खेळणारा
-----------मराठी सिनेमा

कलाकृतिने *झपाटलेला*
श्रृंगाररस प्यालेला
भाषासौंदर्य ल्यालेला
-----------मराठी सिनेमा

विनोद घडवणारा
खदखदुन हसविणारा
क्षणात रडविणारा
----------मराठी सिनेमा

      ✍प्रणाली काकडे✍
        समूह क्रमांक pk38
[5:56pm, 10/09/2016] Prachi Deshapande: मुक्तकविता
 स्पर्धेसाठी
******************
काळ कोणताही असो
आई ही आईच असते
बाळाच्या भेटीसाटी
कोणतेही दिव्य करते
हिरकणी बाळासाठी 
जीवावार उदार झाली
अंधारात गड उतरुन गेली
खरचटले लागले पडली
तरी तमा नाही केली
शिवरायांनी जाणले मातेचे मन
सन्मान करुन पाठवणी केली
गडावर बुरुज बांधून
हिरकणी बुरुज केले नामकरण
साक्ष इतिहासाची
 याद देते प्रसंगाची
या काळातही आई बाळासाठी दिव्य करते
नोकरी नि घर यांत सांगड घालते
गृहलक्ष्मी घराची अष्टभुजा होते
संसारासाठी कसरत करते
कधी दुर्गावतार धारण करते
अन्यायाला वाचा फोडते
ही  मुलगी पत्नी स्नुषा आई सारी नाती निभावते
 क्षणाची पत्नी ,अनंतकाळची माता ठरते
आधुनिक काळातही बाळासाठी कोणतेही दिव्य करते

 प्राची देशपांडे
समूह क्र १५
[5:59pm, 10/09/2016] ‪+91 98908 16527‬: मुक्त कविता स्पर्धेसाठी

सोहळा

एकदा मी लेकीसुनांच्या सोहळ्यात रमलेली असताना ,
दुःख करूणा अन वेदना मला भेटायला आल्या 
मी हासून विचारलं काय ग बयानों
आज तुम्हाला बरी आठवण झाली ?
तेंव्हा त्याही हासून म्हणाल्या ,
तुम्हाला सोडून कुठ जायच बाय
तुमच्याशिवाय आमच कस व्हायचे बाय
दुसरीकड कुठ निभाव लागायचा नाय
निदान तुम्ही आसवांनी न्हाऊ तरी घालता
आंजारून गोंजारून आम्हांला कुशीत तरी घेता
कृष्णांसारखी तुम्हीच पाठराखण तरी करता
गर्व, मीपणा, अंहकाराच्या डबक्यात कुठे डुबायचे?
समजून, उमजून घेणार्यांच्या कुशीतच शिरायचे.
    शशी खंडाळकर पुणे 10।09।2016
[6:01pm, 10/09/2016] Snehlata Kulthe: 🌹मुक्त कविता🌹
🌹स्पर्धेसाठी 🌹
तुच म्हणालास..

जीवनाच्या अंधा-या रात्री 
तुच दिलीस साथ मला
वदलास मला तूच ज्योती
का भितीस अंधाराला
    नेतृत्व तुझ्यात इंदिरेचे
    चपलता तुझी हरिणीची
    धमक डोळ्यात तुझ्या
    पाषाणाला पाझर फोडण्याची
कर्तृत्व नसात सावित्रीचे
विचार ते सहनशिलतेचे
घेतलेस वाण ज्योतीबाचे
स्त्रीत्वाला पुरस्कृत करण्याचे
    नर नव्हे ग नारी तू
    का आलीस जन्माला तू
    न कळले कदापि तुला
    पिढ्या पासुन वंचित तू
नको रडु आकांताने
मनुष्य जन्म एकदाचं
चिमणी उडते आकाशी
घेऊन प्राण पंखातचं
   तू मुळीच नाहीस चिमणी
   तू मुळीच नाहीस कावळा
   झेप घेणारी तू आहेस
   गरूड भन्नाट मावळा
तुच आहेस उपेक्षितांची
पराभुतांची थोडी हिंमत
दाखवुन दे रणरागिणी तू
कळेल जगाला तुझी किंमत 
***********************
स्नेहलता कुलथे 
मोबा 7588055882
क्र.37🌹
[6:07pm, 10/09/2016] Jayshree Hatagale: स्पर्धेसाठी ....मुक्तकविता

*आयुष्याच्या वेलीवर*........

आयुष्याच्या वेलीवर......
सुख-दुःखाचे क्षण बहरले
कधी आनंदाने तर कधी दुःखाने
मन अनेकदा गहिवरले....

आयुष्याच्या सारिपाटात
कधी हार तर कधी जीत होती
कधी वाट्याला विरह आला
तर कधी सोबत प्रीत होती.....

जगताना खचले मन कधी
तर कधी नवी उमेद मिळाली
सोडविताना आयुष्याची कोडी
प्रत्येकवेळी नवीन चाल कळाली..

आयुष्याच्या *रंगमंचावर*
अनेक भूमिका वठवताना
अश्रू अनावर झाले कधी-कधी 
जून्या आठवणींना साठवताना...

आयुष्य नेहमीच एक
संघर्ष ठरलं होतं......
पण, प्रत्येकवेळी आयुष्य 
एका नव्या उमेदीनं भरलं होतं....

✍🏻 *जयश्री हातागळे*
कोंढवा पुणे 48
[7:04pm, 10/09/2016] Aasha Telang: मुक्त कवितास्पर्धेसाठी📝

*आई मला जगायचं होतं गं*
*सारं जग पहायचं होतं गं*
        👴👴👴👴👴

*माझा जन्म झाला तू आनंदलीस*
*पण साऱ्याना मात्र दुःख झालं*
*अन् सगळ्यांच्या दुषणाना वैतागून मला तर तू चुलीतच घातलंस*
*किती मरण यातना भोगाव्या लागल्या या जिवाला*
*अभागी ,करंटी म्हणुन दोष दिला मी  माझ्या नशिबाला* 
*माझा अपराध काय हे समजून घ्यायचं होतं गं*
*आईं मला जगायचं होतं गं        सारं जग पहायचं होतं गं* 

*वात्सल्य, प्रेमाचा सागर आई तू जगी* 
*कसा पाझर फुटला नाही तुझ्या हृदयी* 
*कुठे गेली गं माणुसकी सारी* 
*आईची ममताही आटून गेली सगळी* 
*कधी गटारात कधी उकिरड्यावर फेकलं जातंय* *मला* 
*एवढी का मी कचऱ्यासमान झाले या जगाला*
*मी कुठेच कमी पडणार नाही हे जगाला दाखवायचं होतं गं* *आईं मला जगायचं होतं गं सारं जग पहायचं होतं गं*

*नसते गेले लग्न झाल्यावर*
 *तुम्हाला सोडून*
*घेतलं असतं तुमच्या सोबत  सासरच्यानाही सांभाळून*
*नसते शोधले वृद्धाश्रम कधी  तुमच्या साठी* 
*बनून राहिले असते तुमची म्हातारपणाची काठी*
*या सुरकुतल्या हातांचा आशीर्वाद मरेपर्यँत जपून ठेवायचा होता गं* 
*आईं मला जगायचं होतं गं*  
😦😦😦😦😦😦😦  *सारं जग पहायचं होतं गं* 

78 आशा तेलंगे
[7:12pm, 10/09/2016] ‪+91 82373 29804‬: *मुक्त कविता स्पर्धेसाठी*

          *बाबा*
         *********

थेंब - थेंब घामाने
शिंपली त्यांनी माया ..
स्वप्नांसाठीच आमुच्या
झिजली नित्य तव काया..

शिदोरीची सोय आमुच्या
जीवनभर त्यांनी केली..
स्वत: उपाशी राहूनी
व्यथा कधी न मांडली .. 

संस्कारांनी घडलो आम्ही
शिस्तीचे पाढे तयांचे ..
घडताना कधीच न चुकलो
मार्गस्थ ते खरे आमुचे..

आयुष्याच्या संघर्षात त्यांनी
कधी न मानली हार ..
धैर्याची ती झुंज तयांची
अनेक संकटे केली पार ..

आई तुझ्या मातृत्वाची
नेहमी गातो गोडवी ..
 बाबा आमच्या पाठी
कृपेची सावली असावी..

उपकारांचे ओझे तयांच्या
आयुष्यात न फेड व्हावी ..
ऋणानुबंधच्या जीवन वाटेवरती
बाबा सतत तुमची साथ असावी..

✍🏻 संतोष शेळके / कर्जत @24




No comments:

Post a Comment