Sunday, 4 September 2016

गणेशोत्सव

[9/4, 10:40 AM] 14 Vrishali Wankhede: 📚 साहित्य  दर्पण Whatsapp ग्रुप  📰🖊

     द्वारा आयोजित

🗽    साहित्य दरबार    🗽

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

🚩भाग :- ( 20 वा)- विसावा 🚩
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
📆 दिनांक - _04/09/2016_
🛢 वार - रविवार
~~~~~~~~~~~~~~~~
🕰 वेळ - सकाळी 10:00 ते 7:00
★★★★★★★

††††††††††††††††††

*विषय :- सार्वजनिक गणेशोत्सव काल आणि आज*

==================

💥 संकल्पना :--↓↓

श्री.ना सा येवतीकर सर
**************************
💥 संयोजक --↓↓
श्री आप्पासाहेब सुरवसे
************************
💥 परीक्षक - ज्ञानदेव काशिद
""''''''''''""""''''''''''''''''''''''''''"'''''''''''''''''""""
💥संकलन --
 जी पी पवार पाटिल सर
~~~~~~~~~~~~~~~
💥 ग्राफिक्स :--श्री बी क्रांति सर
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"'
🔦 स्पर्धेचे नियम -

💥ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे....

💥 आपला लेख किमान 100 आणि कमाल 500 - 700 शब्दांच्या मर्यादेत असावे.

💥 लेखाखाली आपले पूर्ण  नाव, गाव आणि मोबाईल नंबर अवश्य लिहावे.

💥स्पर्धेतील निवडक लेख संयोजक वृत्तमानपत्रातून प्रकाशित करतील याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी ..

💥 या  स्पर्धेचा निकाल ग्राफिक्स सह खालील blog वर  आणि साहित्य दर्पण वर पाहण्यास दिनांक _05 सप्टेंबर 2016_ रोजी सायंकाळी 9:00 Pm वाजता मिळेल.  त्यासाठी वारंवार चौकशी करु नये.

http://sahitydaarpan.blogspot.com/2016/09/ganapati-bappa-morya.html

💥साहित्य दर्पण ग्रूपच्या बाहेरील लेखक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात...

📩 त्यासाठी .

🎾 खालील पैकी कोणत्याही एका मोबाईल नंबरवर किंवा फ़ेसबुक वर आपले लेख पोस्ट करावे ....

👤 आप्पासाहेब सुरवसे,लाखणगांवकर
📱 09403725973

👤 नासा येवतीकर, धर्माबाद
📱 09423625769

👤 श्री मारुती खुडे सर माहुर
📱09823922702
[9/4, 12:37 PM] Ramrav Kaka: गणेशोत्सव एक चैतन्याचा उत्सव,  
पुर्वी मेळे, कलापथके, लेछीम किंवा 
झांज पथके यातुन कलागुणांना वाव
व सामाजिक प्रबोधन होत असे.
समाजोन्नती व लोकजागृती करणे
हा आणि धार्मिक भावना वृध्दिंगत
व्हावी म्हणून याचा उपयोग निश्चित 
झाला.
आजकाल सार्वजनिक गणेशोत्सव
मोठ्या थाटामाटात साजरा केला 
जात असतांना भरमसाठ खर्चाची 
व्यवस्था केली जाते ते करतांना जी
लोकवर्गणी जमा केली जाते त्याचा
आणि जबरदस्तीचा समाजाला मोठा
जांच वाटतो.
लोकरंजनाचे कार्यक्रम घेतांना जास्त 
करुन आर्केष्ट्रा, उत्तान नृत्याविष्काराचा
समावेश असतो. शिवाय कर्णकर्कश 
आवाजाची गाणी व हिडीस नृत्यप्रकार
याची रेलचेल असते.
शिवाय मंडपामुळे होणारा वाहातुकीला
अडसर व ध्वनीप्रदुशन हे अत्यंत
संवेदनशील मुद्दे आहेतच.
एकंदरीत उत्सवातील काही अपवाद
वगळता काही मंडळा कडुन
समाजोपयोगी कार्यक्रम उदा- रक्तदान,
वृक्षारोपण, काही स्पर्धात्मक कार्यक्रम
राबविले जातात हे निश्चितच चांगले व
गौरवास्पद होय.
कालौघात काही बदल अपेक्षित
असतातच. त्याचा स्विकार करणे
क्रमप्राप्त आहेच.

 रामराव जाधव 69
  7743840604
[9/4, 1:02 PM] ‪+91 99230 45550‬:  

साहित्य दर्पण स्पर्धा

गणेश उत्सव काळ आणि आज 
     उद्या आपल्या सर्वांचे लाडके बाप्पा येणार . त्यांच्या स्वागताची तयारी जोरदार सुरु आहे . गेली आठ पंधरा दिवस वर्गणी गोळा करण्याची , परवाने काढण्याची धूम उठली आहे . बच्चे कंपनीच्या उत्साहाला उधाण आले आहे . आणि का येऊ नये ? कारण सर्वांचे लाडके दैवत पाहूनचारासाठी येतो आहे .
     गणेश उत्सव पूर्वी घरा पुरता मर्यादितच होता . पण लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढ्यासाठी त्याला सार्वजनिक स्वरूप प्राप्त करून दिले . या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देऊन तरुणांना संघटित करणे , देशप्रेमाची ज्योत पेटवणे व स्वातंत्र्याची आराधना करणारी तरुणांची एक फळी निर्माण करणे ही त्यामागची उद्दिष्ट्ये होती . ती यशस्वी झालीही . लोक संघटित झाली देशप्रेमानी भारली जाऊन स्वातंत्र्य लढ्याला गती मिळाली आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचा सोहळा मोठया दिमाखदारपणे व जल्लोषाने साजरा होऊ लागला .
      तीच परंपरा पुढे आपल्यापर्यंत आली .आज आपणही तेवढ्याच उत्साहाने साजरा करत आहोत .पण ज्या मूळ संकल्पनेतून हा उत्सव निर्माण झाला त्याला आपण पूर्णतः विसरलो आहोत .वर्गणी खंडणीचे स्वरूप धारण करू पाहत आहे . डीजे वाजवून ध्वनिप्रदूषण केले जात आहे . मानाचा गणपती , नवसाचा गणपती , श्रीमंत गणपती व दुधपिणारा गणपती असे गणपतीचे वेगवेगळे प्रकार निर्मिले गेले . गणेश मंडळानंमध्ये स्पर्धा वाढीस लागल्या . यातून भांडण तंटे उदयाला आली . मग या उत्सवाला पोलीस संरक्षण देणे गरज भासू लागली .
     श्रद्धा असावी तिच्यात खूप बळ असते . श्रद्धा माणसाला देवत्व प्राप्त करून देते पण ती डोळस असावी लागते . याउलट अंधश्रद्धा माणसाला पंगू बनवते , भित्री बनवते .  आज जिकडे पाहा तिकडे लोक सुशिक्षित दिसताहेत पण त्याच्यातली अंधश्रद्धा काही कमी झालेली नाही . श्रद्धेची जागा कधी अंधश्रद्धेने घेतली यांना कळलेच नाही . 
     हे म्हणायची वेळ का आली ? किंवा मला वेड लागले आहे म्हणून मी असा बडबडतोय असे वाटेल मात्र देवाच्या तिजोऱ्या एकीकडे शिगोशिग भरल्या जात आहेत .कुणी सोन्याचा मुकुट , कुणी हिऱ्याचे दागिने तर कुणी लाखो रुपयांचे दान दानपेटीत अर्पण करत आहेत . देव श्रीमंत होत आहेत तर सामान्य माणूस दिवसेंदिवस गरीब होत चालली आहेत . 
       आजही काही मुलांना शाळेत शिकत असताना लागणाऱ्या शैक्षणिक साहित्यासाठी संघर्ष करावा लागतोय . शेतकऱ्याची परिस्थिती चिंताजनक आहे . अनाथ मुलांची , दिन-दुबळ्यांची अवस्था बिकट आहे . वृधश्रमांची संख्या अफाट वाढते आहे .
        खरतर या मंडळानंमध्ये जमणाऱ्या आर्थिक सम्पन्नतेतून लोकोपयोगी काम केली जावीत . आर्थिकदृष्टया मदत केली जावी . श्रद्धेची जोपासना करत असतानाच अंधश्रद्धेपासून परावृत्त करणारी देखावे निर्माण करावे . 
         पैश्याची उधळण रोखून उत्सव साध्या पद्धतीने साजरे करावेत . गरजू विध्यार्थ्यांना , दिव्यांगांना मदत करावी . सांस्कृतिक कार्यक्रमांमधून जन जागृती करावी . शेतकऱ्यांना मदत करावी . आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना धीर दिला जावा .
          खरतर अनेक समस्या आहेत . त्या साऱ्याच काही गणपती मंडळांच्या वर्गणीतून सुटणार नाहीत याची पूर्ण जाणीव मला आहे . मात्र कुठेतरी याची सुरुवात होणे अपेक्षित आहे . आणि साऱ्याच उत्सवांना हे लागू होते . ऋण काढून सण साजरी करण्यापेक्षा  साधी व सर्वाना हितकारी सण साजरी व्हावीत . गणेशोत्सव असो की नवरात्रोत्सव या साऱ्या उत्सवांमधून सामाजिक ऐक्य साधले जावे .
         आपण पुरोगामी विचारांचे आहोत .पुरोगामी विचारांचे संगोपन करावे . असं  करण्याने आपले बाप्पा खऱ्या अर्थाने खुश होतील . माणसांमध्ये वसलेले बाप्पा खरा आशीर्वाद देतील .
          नवस वगैरे प्रकाराला किंवा जागृत गणेश म्हणणे किती योग्य आहे ? याचा विचार ज्यानेत्याने करावा . कारण "पिंडी तेच ब्रम्हांडी" ही शिकवण देणारी आपली भारतीय संस्कृती आहे .
         गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ...
|| गणपती बाप्पा मोरया || 
                              - ऋषिकेश गंगाधरराव देशमुख 
                                अनुक्रमांक ५८
[9/4, 1:22 PM] ‪+91 95529 80089‬: सार्वजनिक गणेशोत्सव काल आणि आज......
     लोकमान्य टिळकांनी इंग्रज राजवटीत सुरु केलेला गणेशोत्सव एका ऊदात्त हेतुने प्रेरीत होऊन गणेशोत्सवानिमित्त सर्वांनी एकत्रित येऊन इंग्रजांविरुद्ध करावयाच्या कारवाईची दिशा ठरविणे कारण की इंग्रजांच्या हुकुमशाहीमुळे लोकांना एकत्रित होणे म्हणजे इंग्रजांविरुद्ध कट रचणे , मोठा गुन्हा करण्यासारखे होते व त्यांची दहशत व दडपशाही वाढत असल्याने लोकांनीऐकत्रित यावे , देशात काय घडत आहे हे कळावे , सर्वांमध्ये देशभक्तीची व देशप्रेमाची लाट उसळावी , देशाला गुलामगिरीच्या जोखडातुन सोडवावे ,इंग्रजांविरुद्धचा लढा अधिक तिव्र व्हावा , लोकांमध्ये एकात्मतेची भावना जागृत व्हावी हा त्यामागचा हेतु होता परंतु हळुहळु त्यात बदल व्हायला सुरुवात झाली.
    गणेशोत्सवाला सण किंवा ऊत्सव म्हणुन अधिकच साजरा करण्याची स्पर्धा सुरु झाली , आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी धडपड सुरु होऊन विविध गणेश मंडळांची स्थापनेला सुरुवात झाली त्या नंतर त्यातील सहभाग वाढुन गल्लोगली गणेशाची स्थापना व्हायला सुरुवात होऊन आधुनिकतेकडे वाटचाल सुरु होऊन रेडीओ , टेपरेकार्डची जागा डिजेने घेतली .
       आता काही गणेश मंडळाकडुन जबरदस्तीने वर्गण्या घेण्यात येतात त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त होत आहेत , आजारी लोकांची ,अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांची पर्वा न करणे , ध्वनी प्रदुषणाला आमंत्रण देणारी गाणी, रात्रभर चालणारे जुगाराचे डाव ,सजावटीसाठी होणारा खर्च एकमेकांत होणारी भांडणं यामुळे गणेशोत्सवाला वेगळे रुप प्राप्त झाले आहे.
    परंतु काही गणेश मंडळाद्वारे चांगले कार्यसुद्धा होतांना दिसतात त्यामध्ये साधी सजावट करुन जनजागृती होईल असे देखावे लावले जातात किंवा केले जातात , गरीब व रुग्णांसाठी मदत दिली जाते , एडस , कॅन्सर याविषयी जनजागृती , लोकशिक्षण ,राष्ट्रिय एकात्मता जपली जाते , प्रदुषणाचे परिणाम दाखविले जातात.
     बदल होत असतांना 'गणेशोत्सवाचा मूळ हेतू प्रत्येकाने जाणला पाहीजे , राष्ट्रिय एकात्मता व बंधुता तसेच जनजागृतीला , प्रबोधनाला यातुन चालना मिळावी .
नरेंद्र म्हस्के , शिरपूर @ 65
[9/4, 1:55 PM] ‪+91 86980 67566‬: *"सार्वजनिक गणेशोत्सव काल आणि आज "*
मी साधारण तिसरी वर्गात शिकत असेन, ते दिवस आजही आठवतात. गावाशेजारी एक नदी वाहत होती. या दिवसात नदीला चांगलेच पाणी वाहत असायचे. गल्लीतील पाच सहा जनांचं आमचं गणेशमंडळ असायचं, मोठ्या गणेश मंडळाचं अनुकरण करत आम्ही आमच्या घरातील रिकाम्या एका खोलीत गणपती प्रतिष्ठापणा करत. पण यासाठी पाच सहा रुपये ही फारच मोठी रक्कम आमच्याकडे जमा व्हायची. गावाशेजारी वाहणाऱ्या नदीला शाडू असल्याने त्या शाडूचा आमच्या नाजूक हाताने आकर्षक गणपती बनवून
त्याचीच प्रतिष्ठापणा आम्ही करत होतो. घरातील मोठ्यांच्या मदतीने मोठा बल्ब लावून घेऊन नियमित आरती करुन चिरमुरेचा प्रसाद दोन वेळच्या आरतीनंतर सर्वांना दहा दिवस पुरवत होतो. खरं तर हा परवाचा गणपती उत्सव म्हणू आपण. कालचा आणि आजचा सार्वजनिक गणेशोत्सव याबाबतही फारच गमंती आणि गोष्टी आहेत शिवाय बदलत्या काळानुसार लोकमान्य टिळकांचा मूळ हेतू आणि उद्देश बाजूला पडून नविनच धारणा आणि परंपरा उत्सवातून निर्माण होत आहे. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अशा सार्वजनिक उत्सवातून एकत्रीत येऊन विचारांची देवान घेवान व्हावी हा विचार जरी त्या काळी असला तरी आज या उत्सवाने फारच मोठे रुप धारण केलेले आहे. शहर आणि गाव यामध्येही या उत्सवाचे वेगवेगळे रूप पाहायला मिळते. मी गावात जन्मलो, वाढलो, मोठा झालो. गावातील कालचा आणि आजचा सार्वजनिक गणेशउत्सव पाहिला तर बऱ्याच गोष्टीत बदल झालेला लक्षात येतो. पूर्वी गावात दोन तीन वा चार मोठी मंडळं असायची आणि आमच्या सारख्या दहा बारा वयोगटातील मुलांची गल्लोगल्ली लहान लहान मंडळ असायची.गणपती बसल्यानंतर दोन तीन दिवसानी गणपतीमोरं संगीत मेळे व्हायचे किंवा नाटक तरी व्हायचे.जे मंडळ दोन तीन कार्यक्रम करत ते मंडळ भाव खाऊन जायचे. अभिनयाचं अंग असल्यानं मी व माझे मित्र मिळून अभ्यासक्रमातील वा पाठ्यपुस्तकातील नाटय पाठाचे नाटक गल्लोगल्ली आम्ही करत, वडिलांचे धोतर पडदा म्हणून तर त्या त्या मंडळाचा कॅाट स्टेज म्हणून असायचा. हौसेखातर आमचे कार्यक्रम गावात कधी या गल्लीत तर कधी त्या गल्लीत होत. आम्हाला आनंद होत होता. संगीत मेळ्यात काम करण्याची आम्हाला ऑफरआली. दोन वर्षे संगीत मेळ्यातही काम केले. पुढे नाटक मंडळ स्थापन करून गावोगावी नाटकं सादर केली. आणि गणेशोत्सवाचा आनंद घेतला. कोणत्याही अंगाने पाहिलं तर स्त्री वाटणार नाही अशा मित्रालाआम्ही नाटकात स्त्री बनवलं होतं आमची ती गरज होती.कारण त्याच्या शिवाय कोणीच स्त्री होण्यास तयार नाव्हते.सराव रंगात आला की या स्त्रीच्या अंगात लहर यायची आणि रुसून निघून जायची, आमच्या विनवण्या आणि तिच्या अटी मान्य झाल्यावर पुन्हा सराव सुरु व्हायचा. असे अनेक वेळा होत होते. एकदा तर कहरच झाला, स्टेजवर नाटक चालू असताना " त्या " स्त्रीचा डायलॉग विसरला म्हणून शेजारच्या पात्राने हळूच चिमटा काढून बोलण्याची सूचना केली. त्याचा या महाशय स्त्रीला राग आला आणि दुसरी इंट्री करण्यास स्त्री पात्र तयार होईना, पडदयामागे गोंधळ होऊ लागला. खूप खूप विनवण्या झाल्यानंतर तो कार्यक्रम सुरुळीत पार पडला.असे कांही किस्से होताना आणि पाहताना मजा यायची पूर्वीच्या गणेश उत्सवात. शहरातही एखाद्या मंडळाचा आर्केस्ट्रा असायचा त्यासाठी रात्री सायकलवरून तो कार्यक्रम पाहण्यासाठी जायचोआम्ही.आवडलेल्या गाण्यांना शिट्टया वाजून दाद दयायची. सारं सारं आगळं आणि वेगळं होतं तेव्हा. लेझीम, झांज पथक टिपऱ्या, व आराधी गीते असे नाविन्यपूर्ण कार्यक्रम होते तेव्हा. आता बदल होत गेला. एक गाव एक गणपती पद्धत रूढ होताना दिसतेआहे. गणपतीपुढे फक्त वेगवेगळे विषय घेऊन देखावे उभं करण्याची पद्धती आली. घराघरात टीव्ही आणि त्यावर अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम असल्याने कोणीही घराबाहेर पडून कार्यक्रम पाहयला येईना. संगीत मेळा हा काय प्रकार असतो हेच आज माहित होईना. गणपतीपुढे रातभर जागून सोंगट्याचा चालणारा खेळ आज दिसत नाही. लाईटचा प्रखर प्रकाश आणि संगिताचा कर्कश आवाज हे प्रकर्षाने जाणवणारे बदल आहेत. भव्य गणेशमूर्त्या हे देखील आज आकर्षण ठरतआहे.पूर्वी इकोफ्रेंडली ही कल्पना अपसूक साकारली जायची.आता त्यासाठी प्रचार आणि प्रसार करावा लागत आहे. गणपती बाप्पा मोरया म्हणत आणि पुढल्या वर्षाचं आमंत्रण देऊन गुलालात न्हाहून रात्र रात्र जागरण व्हायचे तेव्हा, आणि आता हिडिस फिडिस गाण्यावर तसाच नाच करण्यात तरुणाई दंग असते.पूर्वी भाव आणि भक्तीचा पूर होता, आता थाट आणि माटाचा नूर आहे.पूर्वी पैसा कमी लागत होता आणि मनातच बाप्पाची ठेवण होती.आता झगमगाट आणि पैशाची उधळण जास्त दिसते आहे. वर्गणीचे स्वरूपही बदलले आहे,घेण्याचे आणि देण्याचेही. कांहीना वर्गणी जास्त देण्यात मोठेपणा वाटतो तर कांहीना सक्तीने वर्गणी घेण्यात मोठेपणा वाटतो. पण कांही असो काल आणि आजही गणपती बाप्पाची ओढ होती तशीच आहे. आपण आतुरतेने त्याची दरवर्षी वाट पाहत असतो. दहा दिवसाचा हा आनंदसोहळा सर्वांनाच आनंदी आनंद देऊन जातो. कोणी फक्त गणपती बाप्पा म्हंटल की आपल्या तोंडून अपसूक शब्द बाहेर पडतात मोरया..... तर मग चला एकदा म्हणूया..... गणपती बाप्पा..... मोरया.......!!!
  
                        श्री. हणमंत पडवळ
                मु.पो. उपळे ( मा. ) ता. उस्मानाबाद.
                        8698067566.    
                                क्रः48.
[9/4, 2:07 PM] ‪+91 75888 76539‬: 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*रविवार साहित्य दरबार*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*विषय*--

*गणेशोत्सव काल आणि आज*

     *स्पर्धेसाठी*

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

गणेशोत्सवाची सुरुवात तसं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून झालेले दाखले मिळतात.
अफजलखान खुप मोठी फौज घेऊन राज्यावर आला .त्यापासून राज्याचे रक्षण व्हावे या उदात्त हेतूने समर्थ रामदासानी गणेशोत्सव जवळ जवळ पाच महिने केला.त्यासाठी महाराजांनी शेकडो खंडी धान्य दिले.असा उल्लेख आढळतो."समर्थ सुंदरमठी गणपती केला/दोनी पूरुष सिंदूर वर्ण आर्चिला.असे वर्णन दासबोधामध्ये आढळते.            
त्यानतर स्वातंत्र्यपूर्व काळात लोकाना एकत्रित आणण्याच्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी १८५३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना केसरी या वर्तमानपत्रातून मांडली.भाद्रपद महिन्यातील चतूर्थीला स्थापना व तिथून दहा दिवस हा उत्सव साजरा केला जायचा .दहाव्या दिवशी विसर्जन केले जायचे.१८९४ साली पुण्यातील केसरीवाडा येथे टिळकांनी अशी सुरुवात गणेशोत्सवाची केली.
आज तर सबंध भारतभर हा उत्सव साजरा होतोच पण भारताबाहेर सुद्धा 
अमेरीका, कॕनडा, माॕरीशस, इंडोनेशिया, त्रिनिदाद इ.ठिकाणी जगभरात हा गणेशोत्सव मोठ्या स्वरुपात साजरा केला जातो.
         पुढे लोकांच्या एकत्रीकरणाच्या 
उद्देशाने एक गाव एक गणपती असेही उत्सव सूरु झाले.
सिनेकलाकारांना आणणे ,देखावे करणे अशा बाबींचा समावेश सुरु झाला .शाडूच्या मुर्त्या जावून प्लॕस्टर आॕफ पॕरीस च्या मुर्त्या आल्या.उत्सवात भरपूर पैशांची उलाढाल सुरु झाली.वर्गणी जमा करण्याची विनम्रता जावून धमकाधमकी सुरु झाली.व्यापारी लोकांना तर ओरबडणेच सुरु झाले.
गणपतीसमोर प्रचंड आवाजाचे साउंड लावून ध्वनीप्रदूषण सुरु झाले.विजेचा अमर्याद वापर सुरु झाला.मिरवणूक वेळ आमर्याद झाली.समाजप्रबोधनासाठी ,सामाजिक एकोप्यासाठी सुरु झालेल्या उत्सवाचे स्वरुप विकृत बनत गेले.
खरच आपण आताच्या या उत्सवातून 
काय मिळवतो ?चिःतनाचा प्रश्न झालाय.आजचे हे विघातक स्वरुप पाहून भविष्यातील या उत्सवाच्या स्वरुपाविषयी अंतःकरणापासून चिंता वाटते.
शेवटी आजच्या विकृत रुपाला एका शिस्तीत बांधण्याची गरज आहे असे वाटते.
🔹वर्गणी यथाशक्ति स्विकारली जावी.
🔹ध्वनीप्रक्षेपणावर कमी आवाजाची बंधने असावी.
🔹विजेचा वापर मार्यादित व्हावा.
🔹आपल्या संस्कृतीचे रक्षणा
🔹अल्प खर्चामध्ये गणेशोत्सव साजरे व्हावेत.
🔹शिल्लक पैशातून समाजोपयोगी कामे व्हावी .
उदा.आरोग्य शिबीरे, शेतकऱ्यांना मदत, गोरगरीबांच्या मुलाना शैक्षणिक साहित्य वाटप करणे.
🔹शालेय स्पर्धा व्हाव्यात.रक्तदान शिबीरे घ्यावी .गावस्वच्छता अभियान व्हावे .परिसर स्वच्छता अभियान अशा प्रकारची समाजोपयोगी कामे व्हावी .

 दुसऱ्याला आदर्श वाटावे असे  उत्सव साजरे व्हावेत.
गणेशोत्सवाचे पुर्वीचेच दिवस परत यावेत असे वाटते.आजच्या या संगणकीय काळातील पिढीसमोर उत्सवाची सुसंस्कृत अशी आदर्श असावी असे वाटते.
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*चौधरी बालाजी सर* *लातूर*

   *समुह क्र*-- *82*

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
[9/4, 2:35 PM] nagorao26: साहित्य दरबार साठी

*सार्वजनिक गणेशोत्सवाचे बदलते स्वरुप*

सुमारे दीडशे वर्षे भारत देशावर इंग्रज लोकांनी राज्य केले आणि त्यांनी लोकांचा अतोनात छळ करू लागले. त्यांच्या त्रासाला सर्व जनता पुरती कंटाळून गेली होती. त्या अन्यायाला तोंड देण्यासाठी 1900 च्या दशकात एका युगपुरुषाने पुढाकार घेतला त्याचे नाव म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. समाजात जागृती निर्माण होण्यासाठी त्यांनी मराठा व केसरी यासारखे वृत्तपत्र चालू केले आणि त्यातून इंग्रज सरकारवर सडेतोड लेख लिहून प्रहार करू लागले. सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे काय ? अश्या अग्रलेखामुळे इंग्रज सरकार हादरुन गेले होते. स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळावणारच अशी सिंहगर्जना केली. लोकांना सुद्धा लोकमान्य यांच्या प्रसार माध्यमामुळे बरीच माहिती मिळत होती आणि लोक जागृत होत होते. फोडा आणि राज्य करा अशी नीतिमत्ता असलेले इंग्रज सरकार लोकांत एकीची भावना निर्माण होऊ नये आणि जनता एकत्र येवू नये यासाठी लोकावर वेगवेगळी बंधने टाकत असे. कोणत्याही व्यक्तीला ते एकत्र येऊ देत नव्हते याचसाठी लोकमान्य टिळकानी यावर उपाय योजण्याचे ठरविले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून घरोघरी भाद्रपद चतुर्थीला श्रीगणेशाची स्थापना केल्या जात असल्याची नोंद इतिहासामध्ये दिसून येते. याच बाबीचा विचार करून सन 1896 मध्ये लोकमान्य टिळकानी घरोघरी बसणाऱ्या या  गणपतीला सार्वजनिक उत्सवाचे स्वरुप दिले. त्यास आज 120 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांनी ज्या उद्देशाने हा उत्सव चालू केला होता त्या काळात ते अत्यंत गरजेचे आणि आवश्यक होते. इंग्रज सरकार लोकांना एकत्र येऊ देत नसताना लोकमान्य टिळकानी लोकांना एकत्र येऊन चर्चा करावी यासाठी ही युक्ती केली आणि त्यात ते  यशस्वीही झाले. पण आज समाजात सार्वजनिक गणेशोत्सव कोणत्या प्रकारे साजरी होत आहे याचा जर विचार केला तर, नको हे गणेशोत्सव असे म्हणण्याची आपल्या वर वेळ आली आहे असे वाटते.
खरोखरच आज लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातील सार्वजनिक गणेशोत्सव आहे का ? त्याचे उत्तर नाही असेच येते कारण आज हा उत्सव वेगळ्या स्वरुपात दिसत आहे यावर थोडे चिंतन करने आवश्यक आहे, असे वाटते.
गणेशोत्सवाच्या नावाखाली अकरा दिवस मंडळातील लोकांची खूप होते. रात्रीच्या वेळी जागरणाच्या नावाखाली वेगवेगळे उदयोगधंदे केले जातात. मंडळाकडून समाजोपयोगी कार्य करायचे तर दुरच, समाजाला त्रास देण्याचे काम केले जाते असे चित्र प्रत्येक ठिकाणी दिसून येते. गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्ते वर्गणी गोळा करीत आहेत की खंडणी मागत आहेत तेच कळायला मार्ग नसतो. मुले आपल्या माघरी काय करीत आहेत याची जराही कल्पना आई बाबाला लागू देत नाहीत. आपल्या मनाप्रमाणे वागण्याची ही एक सुवर्ण संधी असते या मंडळातील युवकांना. अकरा दिवसानंतर अनंत चतुर्दशी म्हणजे विसर्जनच्या दिवशी तर युवकांचा गोंधळ पाहूच नये असे वाटते. कान बधिर होतील एवढ्या मोठ्या आवजात गाणे लावणे बेधुंद होऊन नाचणे यामुळे या उत्सवाला एक वेगळे स्वरूप मिळाले आहे. समाजाशी आमचे काही देणे घेणे नाही अश्या विचाराने वागणारी ही मंडळी वर्गणी मागत असताना फारच कणवाळु होतात. अमुक एवढे दिलेच पाहिजे असा हट्ट धरतात. असे करून मंडळाकडे भरपूर प्रमाणात पैसा जमा होतो. वास्तविक पाहता जी काही वर्गणी जमा केल्या जातो तो पूर्ण खर्च करायचा असतोच असे मंडळातील प्रत्येकजण विचार करतो. पण यातील रक्कम वाचवून आपण समाजासाठी काही विधयाक कार्य करू असा विचार करणारी गणेश मंडळ फार कमी प्रमाणात आढळून येतात. खरोखरच वर्गणी म्हणून जमा झालेल्या रक्कमेचे काय करायचे यावर एकदा तरी मंडळाने विचार केला आहे का ? जी गणेश मंडळी याचा विचार केले असतील त्यांचे त्रिवार अभिनंदन आणि ज्यानी काहीच विचार केला नाही त्यांनी विचार करायला सुरु करुन याच वर्षी त्याची अंमलबजावणी केल्यास पुढील वर्षी याचा  आपणास अजुन चांगला फायदा होतो आणि वर्गणीमध्ये भरपूर रक्कम पुढे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबीचा विचार न करता आपण ती जमा झालेली पूर्ण रक्कम उड़वतो म्हणजे अजिबात काटकसर न करता खर्च करतो. दरवर्षी या गणेशोत्सवावर साधारणपणे 1200 कोटी रुपये खर्च केल्या जातो असा एक प्राथमिक अंदाज आहे. यावर आपण कधीतरी गांभीर्याने विचार केला आहे काय ? कधीही विचार करण्यात आला नाही हेच सर्वांचे उत्तर असेल त्यामुळे यापुढे या सार्वजनिक उत्सवातुन सामाजिक उपक्रम कसे राबविता येईल याचा विचार सर्वानी मिळून करू या.
रोजचे वृत्तपत्र म्हणजे पेपर हे सर्वाचे आवडती बाब आहे. आज ही ग्रामीण भागात कोणाच्या हातात पेपर दिसले की त्याला पेपर मागण्याचा मोह आवरता आवरत नाही .याच गोष्टीचा विचार करुन गावातील लोकांची वाचनाची भूक या निमित्ताने शमविण्यासाठी रोज एक पेपर गणेश मंडळीकडून मागविण्यात आले तर किती छान राहिल ! साधारणपणे एका पेपरसाठी महीनाकाठी 150 रु या हिशेबाने एका वर्षात 1800 रु होतील पहिल्या वर्षी हा प्रयोग करून पाहण्यास काही हरकत नसावी. मग यातून अनेक मार्ग पुढे मिळत राहतात. याच माध्यमातून गावातील लोक, युवक हे सर्व एकत्र येतील. काही गोष्टीवर चर्चा होईल आणि मग माणसा-माणसातील आपुलकीमध्ये वाढ होईल .याचा फायदा एक होऊ शकेल की पुढील वर्षी न मागता ही तुमच्या गणेश मंडळाला मोठ्या स्वरुपात देणगी मिळेल. गावातील काही गरीब आणि होतकरु मुलांसाठी 2 - 3 हजार रूपयांची स्पर्धा पुस्तके आणुन दिल्यास, त्याचा ते त्यांचा अभ्यास करीत राहिल्यास नोकरी मिळण्यासाठी एक संधी मिळू शकते. दरवर्षी असे पुस्तक जमा करण्याची परंपरा कायम केल्यास पुढील पिढी याच पावलावर पाऊल ठेवून वाटचाल केल्यास गावात किती पुस्तके जमा होतील ? याचा कधीच आपण गंभीरतेने विचार केलेला नाही. झाले गेले विसरून जाऊन यावर्षी तरी या उपक्रमास आपण सुरुवात केली तर त्यांचा फायदा भविष्यात नक्कीच पहायाला मिळेल.
श्रीची मिरवणूक किंवा विसर्जन मोठ्या आनंदाच्या भरात करावी याबाबत माझे दुमत नाही. मात्र वायफळ खर्चाला फाटा देऊन शिल्लक रक्कमेमधून असे काम केल्यास कोणी वाईट म्हणणार आहे का ? नक्कीच नाही. पण आपण असा विचार करीतच नाही, हीच आजपर्यंत आपली झालेली फार मोठी चूक म्हणण्यास हरकत नाही. वाईट काम करताना लोक काय म्हणातील याचा विचार करावा, चांगले काम करताना कोणी काही म्हणत नाहीत, उलट प्रोत्साहन देतात 
गणेश उत्सवाच्या अकरा दिवसाच्या काळात फक्त D J चे गाणे लावून नाचगाणे करण्यापेक्षा काही तरी उदबोधक आणि मनोरंजक गोष्टी केल्यास गावातील आणि गल्लीतील सर्वाना हे अकरा दिवस हवेहवेसे वाटतील. रांगोळी, निबंध, वक्तृत्व, चित्रकला, गायन, एकांकिका नाटक, दोरी वरील उडी यासारख्या विविध स्पर्धा या निमित्ताने आयोजित करून लोकांना आवडेल असे केल्यास या उत्सवाचा उद्देश्य सफल झाल्या सारखे होईल. एखाद्या भागवत सप्ताह मध्ये ज्या पध्दतीने लोकांच्या जनजागृतीसाठी भजन किंवा कीर्तन केल्या जाते अगदी त्याच प्रकारे या उत्सवाच्या काळात रोज एका साहित्यिक किंवा समाज सुधारक व्यक्तीचे व्याख्यानाचे आयोजन करून त्याची अंमलबजावणी केल्यास साहित्याला प्रोत्साहन मिळेल आणि नवनवीन साहित्यिक मंडळी तयार होतील. गेल्या वर्षी असे एक मंडळ वाचण्यात आले होते ज्यानी अश्या पध्दतीने नियोजन तयार केले होते. गावातील बाल-गोपाळ, युवक तसेच वृद्ध लोकांना सुध्दा याचा फायदा झाला असे तेथील लोक आपल्या अनुभव सांगताना बोलत होते.
काही दिवसापूर्वी सोशल मीडिया मध्ये वाचाण्यात आले होते की यावर्षी गणेश उत्सवाला प्रत्येक जण श्रीगणेशाला एक वही दान द्यायचा असा विचार जर प्रत्येकानी केला तर एका गणेश मंडळाजवळ साधारणपणे 100 - 200 वह्या जमा होटिल. त्या सर्व वह्या श्रीगणेश विसर्जन होण्यापूर्वी एखाद्या शाळेत जाऊन गरीब विद्यार्थ्यांना वाटप केल्यास मंडळाच्या प्रत्येक व्यक्तीला भरपूर आत्मिक समाधान लाभेल. अजून काही भन्नाट कल्पना आपल्या जवळ असतील नक्कीच त्याचा वापर आपल्या कल्पकतेने करून लोकांचे हित केल्यास या उत्सवाची प्रतीक्षा सर्वाना राहील.
तेंव्हा या वर्षीचा आपला सार्वजनिक गणेशोत्सव अगदी निराळा करून पुढच्या वर्षी लवकर या असे प्रत्येकाच्या तोंडून निघावे असे कार्य करु या

गणपती बाप्पा मोरया ...............

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद 
  09423625769
[9/4, 2:40 PM] 9 Subhadra Sanap: 📕स्पर्धेसाठी 📕
🌹 गणेशोत्सव काल आणी आज🌹
स्वातंत्र्यपूर्वकाळी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरवात केली त्यांचा उद्येश होता की या निमित्ताने लोक एकत्र येतील संवाद  साधतील व त्याचा फायदा स्वातंत्र्यलढ्यासाठी होईल हा उत्सव भाद्रपद चतुर्थी पासुन दहा दिवस  असतो विविध धार्मिक कार्यक्रम या काळात होतात पुर्वी गणेशोत्सव कमी खर्चीक असायची  शांततेत कार्यक्रम व्हायचे परंतु अलिकडे जर आपण हे उत्सवपाहिले तर भरमसाठ खर्च आणी खुप बदललेले स्वरुप आपणास पहावयास मिळते
    श्रध्दा असावी पण अंधश्रध्दा नसावी या मताची मी आहे काल काय झाले हे पहाण्यापेक्षा आता आपण काय करावे याचा विचार करावा कारण आपण वर्तमान काळात जगत असतांना जे पहातो त्यावर प्रकाश टाकावा  आजकाल गणेशोत्सवाचे एक विकृत दर्शन आपण पहातो गणपती समोरील देखावे हा एक महत्वाचा भाग आहे देखावे हे मार्मिक बोध मिळनारे असावेत काल तर टि व्ही वर बातमी पाहिली आर्ची अन् परशाचा देखावा गणपती समोर काय बोध घ्यावा यातून 
       गणपतीची विद्युत रोशनाई जरा मर्यादित असावी जेनेकरुन विज बचत होईल तसे गणपती समोर जी गाणी बाजवली जातात ते ऐकून खरतर बाप्पालाही लाज वाटत असेल दारु पिवून किंवा इतर व्यसन करुन गणपती समोर येऊ नये नव्हे नव्हे व्यसनापासून दूर रहावे नेहमीकरता
    खरतर एक गाव एक गणपती हि संकल्पना अंमलात आनली पाहिजे इच्छा असेल तरच वर्गनी घेतली पाहिजे परंतु जबरदस्तीने वर्गनी मागीतली जाते हे चुकिचे आहे
     प्रत्येक धर्माचे सण उत्सव व्हायलाच पाहिजेत परंतु व्यवस्थित शिस्तबध्द पध्दतीने हे कार्यक्रम व्हावेत यातुन काही जनकल्यानाची कामे व्हावीत व उत्सवाचा नावलौकिक व्हावा हिच या प्रसंगी इच्छा  श्रीगणेशाच्या कृपेने सर्वाची दुख दुर व्हावीत हिच सदिच्छा🙏🙏🙏🙏
       खेडकर सुभद्रा बीड (२०)
मो नं (९४०३५९३७६४)
[9/4, 2:47 PM] ‪+91 97306 89583‬: स्पर्धेसाठी...✍

   *सार्वजनिकगणेशोत्सव काल आणि आज*🌺🌺

                        लोकजीवनात चैतन्य फुलवणारा लोकोत्सव म्हणजे गणेशोत्सव.महाकवी कालिदासांनी म्हटल्याप्रमाणे *_उत्सवप्रिय खलु मनुष्य:_*
म्हणजेच मनुष्य हा पूर्वीपासूनच उत्सवप्रिय आहे.उत्सवाच्या माध्यमातून मनुष्याला प्राप्त होणारी उर्मी तसेच त्यातून मनामनात रुजलेली भारतीय संस्कृती या सर्वांना साधक म्हणून त्यातून एकता साधन्याचा मूलमंत्र लोकमान्य टिळकांनी जगाला दिला.शिवजयंती व गणेशोत्सव यांसारख्या उत्सवांना व्यापक रूप आज लोकमान्य टिळकांमुळेच प्राप्त झालेले आहे.फरक फक्त इतकाच की या उत्सवातील 'प्रेय' आणि 'श्रेय' या भागात झालेला आमुलाग्र बदल.प्रत्येक उत्सवाला नाण्यासारख्या दोन बाजू असतात.एक बाजू प्रेय तर दूसरी बाजू श्रेय.उत्सवातील मिरवणूक,सजावट, कलाप्रदर्शन,आरास ही प्रेय बाजू तर त्यातील जीवनदर्शन आणि मूल्य रुजवणुक ही श्रेय बाजू म्हणावी.लोकमान्य टिळकांनी उत्सवाचा श्रेय भाग लक्षात घेता या उत्सवाचे महत्व जनमाणसात रुजवले.देशाची स्थिति बघता एकजुट,समता आणि एकात्मता या बाजू तळागाळात लपलेल्या होत्या.सार्वजनिक गणेशोत्सवातुन जनमानसात मुल्यांची रुजवणुक व जीवनदर्शन घडवणे हा सुप्त हेतु त्या मागे असायचा.मंडळ स्थापन करुण त्यातून लोकसंवाद,संघटन,प्रबोधन,जागृती,
अस्मिता या साऱ्या भुमिकेतुन सम्पन्न होणारा असा हा सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी त्यावेळी साकारला.कारकर्ते निर्माण करणारं अस हे लोकव्यासपीठ आता मात्र विकृतिकडे वाटचाल करतांनाच चित्र दिसू लागल आहे.राजाधिराज गणराज हे विद्देच,ज्ञानाच आणि कलेच दैवत.गणेशोत्सव हा धार्मिक,सामाजिक व सांस्कृतिक परंपरेचा महोत्सव आणि उत्सव म्हणजे जीवनाचा आत्मा.आज मात्र हा आत्मा भंग पावतांना दिसु लाग्ला आहे.आजचा गणेशोत्सव म्हणजे फक्त तरुण पिढ़ीचा जोश,नाचने गाने आणि रोशनाई एवढ़यावर हा गणेशोत्सव बंदिस्त झालेला दिसून येतो.गणेशोत्सवाच्या माध्यमातून धर्माचा आणि श्रद्धेचा अवडंबर पाहावयास मिळतो.ढोलताशे आणि असह्य असे संगीताच्या गजरात गणरायाचे स्वागत म्हणजे आजच्या बदलत चाललेल्या संकृतिचे दर्शन घडवून देत आहे.विसर्जनाच्या मंडळात होणारे वाद, क्लेश आणि पोहचलेले दंगे हे आज  एकात्मतेला आव्हान म्हणून उभे ठाकले आहे.लोकमान्यांनी स्वराज्याची जागृती करण्यासाठी गाभारातल्या गणपतीला रस्त्यावर आणले ते फक्त लोकमानसात राष्ट्रभक्तिला प्रेरणा देण्यासाठी आणि आजही काही ठिकाणी हा सार्वजनिक गणेशोत्सव अखंड श्रद्धेने व समतेने असाच सुरु आहे.या उत्सवातुन मिळणारी नवचैतन्याची दिशा व ऊर्जा विधायक कामाकडे लावली आणि याच्या श्रेय बाजू लक्षात घेवून त्या दिशेने वाटचाल केली तर खरच हा गणेशोत्सव समाजोद्धारासाठी मारक नसून प्रेरक ठरेल...🌺🌺🌺🌺🌺🌺

            ✍प्रणाली काकडे✍
                 समूह क्रमांक ३८
[9/4, 3:18 PM] जयश्री पाटील: "प्रथम तुला वंदितो कृपाळा
गजानना गणराया"
     अखिल विश्वाला या बुद्धिच्या देवतेचे वेड लावले ते टिळकांनी.भलेही हे ध्यान अष्टावक्री असलं तरी भक्तांना ते पार्वती मातेसमान सुंदरच वाटतं.त्या काळी टिळकांचा हेतू अगदी स्तुत्यत होता.जशी रामदासांनी बलोपासनेसाठी हनुमानाची मंदिरे उभारली तशी जनएैक्यासाठी टिळकांनी गणेशोत्सव सुरू केले.त्या निमित्ताने लोक एकत्र येवू लागले.विचारांची देवानघेवान होवू लागली व पर्यायाने देशाच्या स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले.
      तेव्हाचे लोक सनातनी व कर्मठ होते पण याबाबतीत एकमत झाले.फरक एवढाच की कुणी दीड दिवस,पाच दिवस,सात दिवस किंवा दहा दिवस गणेशाचे पुजन करू लागले.कोकणात तर हा सर्वात मोठा उत्सव.आजही सर्व चाकरमानी दहा दिवस गावी येतात.
      पुर्वी मुर्ती शाडूची असायची.सहज पाण्यात विरघळायची.पाण्याचे,निसर्गाचे, ध्वनीचे प्रदूषण होत नसे.नदीला भाद्रपदात मुबलक पाणी असायचं,  विसर्जनही छान व्हायचं.त्या दहा दिवसाची तयारी मंडळातील बालगोपाल स्वतः करायचे.खळ करणं,पताका बनवणं, सजावट व मखर मन लावून करायचे.शिवाय विविध स्पर्धा,नाटकं व्हायच्या.स्वेच्छेने दिलेली वर्गणी व सर्वांची अंगमेहनत त्यामुळे बाप्पा सर्वांना आपला वाटायचा.पारंपारीक वाद्ये, उकडीचे मोदक,गुलाल उधळणे हे साग्रसंगित व्हायचे.  
      जसंजसं आपण एकविसाव्या शतकात पदार्पण केलं सगळचं बदललं मग हा उत्सव तरी कसा अपवाद राहील.हळूहळू या उत्सवाचं प्रस्थ झालं.मंडळातील आपुलकी कमी होवून चढाओढ सुरू झाली.टिळकांची एकता अटीतटीची स्पर्धा बनली.मंडळं हे ट्रस्ट बनले.वर्गणी धमकीवजा वसुली ठरली.काल परवाच आपण टी.व्ही.वर आपण पुण्याची बातमी पाहीली की वर्गणी देण्यास नकार दिल्यामुळे चक्क उठाबशा काढण्याची शिक्षा दिली गेली.या उत्सवास "काय होतास तू , काय झालास तू" असं म्हणायची वेळ आलीय.  बाप्पाच्या मुर्तीची उंची वाढली पण श्रद्धा कमी झाली.आजही बरेच समाजसेवक" एक गाव एक गणपती"असावा म्हणून प्रयत्न करतात पण कुणी एेकायला तयार नसतं.उलट गल्लोगल्ली मंडळं तयार झाली.कुणी भाई त्याचा अध्यक्ष बनू लागला.बळजबरी वर्गणी वसूल होवू लागलीय.काही मंडळं अपवाद आहेतच.पण सरासरी चित्र फार बदललयं.डिजे चा वापर तर फारच वाईट.बाप्पासमोर उघडउघड पत्त्यांचे डाव रंगतात, सिनेमाची नको ती गाणी कर्कशपणे वाजत असतात.कुणीतरी पैसे देवून आणलेला कलाकार हिडीस कलेचं प्रदर्शन करतं असणं ....हे सगळं किळसवाणं वाटतं.बाप्पाही वैतागला असेन व टिळक तर पश्चाताप करीत असतील. 
       याची तिसरी बाजू म्हणजे गेले 2/3 वर्षे दुष्काळ,शेतकरी आत्महत्या व बेकारी यामुळे लोक आत्मचिंतन करू लागले.व त्याचे फलित दिसायला सुरूवात झालीय.पुढील येणारया काळात सकारात्मक बदल दिसेल.या वर्षी या दहा दिवसात काही मंडळांनी अभिमानास्पद प्रतिज्ञा घेतलीय.वृक्षारोपन,रक्तदान शिबीर,ग्राम स्वच्छता इ.उपक्रम राबविले जाणार आहेत.विशेष म्हणजे बाप्पासमोर पैसे अगर फूलं न वाहता पेन व वही अर्पण करण्याची अभिनव कल्पना समोर येतेय.हळूहळू पाऊल आदर्शाकडे वळतयं हे ही नसे थोडके.मी स्वतःपासून एक बदल करतेय...निसर्गपुरक मुर्ती मिळत नसल्यामुळे मी कायमस्वरूपी धातूची मुर्ती घेण्याचा विचार करतेय.जेणेकरून प्लास्टर ऑफ पॅरीसनं बाप्पाचे हाल बघणंही नको. आमच्या कॉलनीतील मुलं मागील वर्षापासून दहा दिवस दररोज कॉलनिची स्वच्छता करताय.या वर्षी अजून भरीव योगदान असणार आहे.विना मानधनावर येणारे व्याख्याते बोलवून प्रबोधन करणार आहेत.मी स्वतः बालगोपालांच्या स्वरचित कवितांचे वाचन घेणार आहे.
       बदल आवश्यक आहे.आपणही सर्वजण आपला खारीचा वाटा देवूया व टिळकांना पुन्हा अभिमान वाटेल असं वागुया.केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.शाळेतही एक डॉक्टर लैंगिक शिक्षणावर व्याख्याण देण्यासाठी आम्ही बोलवित आहोत.
   "गर्व आहे मला मी एक सकारात्मक, संवेदनशिल बाप्पाप्रेमी असल्याचा"
.......जयश्री पाटील
[9/4, 4:06 PM] ‪+91 98603 14260‬: सार्वजनिक गणेशोत्सवःकाल आणि आज.
********************
श्रीगणेश ही आद्य देवता आहे.कोणत्याही कार्यांत गणेश पूजन प्रथम केलै जाते. तो आदिदेव आहे, विघ्नहर्ता, सुखकर्ता ,दुःखहर्ता आहे.
फार पूर्वीपासून गणेशपूजन केले जाते शिवपार्वतीच्या विवाह समयी गणेशाचेच पूजन केले होते.हाच गणेश घराघरात देवालायात मूर्ती स्वरुपात स्थित आहे सुपारीच्या रुपातही याला पूजले जाते.
 लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात या उत्सवाला सार्वजनिक स्वरुप दिले आहे त्यात त्यांचा उद्देश ब्रिटीश राजवटीत होणारे अन्याय अत्याचार याविरुध्द आवाज उठविण्यासाठी जनमानसात जागृती करणे हा होता.
भाषण ,मेळे ,पोवाडा ,कवन गायन यातून ब्रिटीश राजवटीला उलथून पाडण्यासाठी विचारक्रांती घडविणे हा मुख्य उद्देश होता ,
स्वातंत्र्यानंतर मेळे गायन यातून कलेला प्राधान्य मिळू लागले.
लोक आवडीने आपल्या मुलांना या मेळ्यासाठी पाठवित असत, कलेचा विकास होणे .सामाजिक विषमता नाहीशी करणे या मुख्य बाबी या उत्सवातून दिसत असत,पाच मानाचे गणपती सुरुवातीला होते
कसबा गणपती हा पहिला मानाचा गणपती,त्यानंतर गुरुजी तालीम ,तांबडी जोगेश्वरी ,दगडूशेट हलवाई गणपती इ.
या सार्वजनिक गणेशोत्सवाचे रुप पुढे बदल गेले .विविध ठिकाणी गल्लीगल्लीत पेठा पेठांत सार्वजनिक गणेशोत्सव सुरु झाले. विविध गणेशमंडळे, विविध देखावे उभारू लागले यातून लाखो रुपयाची उलाढाल होऊ लागली आले.काही मंडळांनी समाजोपयोगी कार्य सुरु ठेवले पण आता या गणेशोत्सवाला बाजारु स्वरुप आलेय असे वाटते जबरदस्तीने वर्गणी गोळा करणे. वर्गरणी न देणा-याला दमदाटी मारहाण करणे असे प्रकार दिसून येतात स्त्यारस्त्यांवर खड्डे खणून मांडव देखावे उभारणे
 कधी देखावे पहाण्यासाठी तिकिट ठेवले जाऊ लागले,नवसाला पावणारे गणपती  असा  काही मंडळांच्या गणपतीचा बोलबाला होऊ लागला.दर्शनाच्या  लांबच लांब रांगा लागू लागल्या.मग वादावादी छेडाछेडी हे प्रकार होऊ लागले, लागला चोरी पाकिटमारी दागिने खेचणे हे ही प्रकार होऊ लागले, पोलिस यंत्रणेवरील बदोबस्तासाठी ताण वाढू लागला आहे,
रोज गणपतीपुढे कर्णकर्कश्य आवाजात निरर्थक गाणी डीजे लावून त्यावर नृत्य करणे
पत्ते खेळणे नशापाणी करुन मिरवणूकीत वेडेवाकडे नाचणे असे हिडिस प्रकार होऊ लागलेत नि संस्कृतीचा -हास होऊ लागला. 
सार्वजनिक गणेशोत्सवाचे हे बदललेले रुप निश्चितच काळजीत पाडणारे आहे.
 विसर्जनासाठी मोठ्या रांगा त्या मिरवणूकीतही डीजे नाचणे हे प्रकार होतात आजारी वृध्दांना याचा खूप त्रास होतो.. गणपतीचे विसर्जन योग्य वेळेत होत नाही ,सर्वच यंत्रणांवर ताण पडतो .
गणेश मूर्ती शाडूच्या वा इकोफ्रेंडली असाव्यात त्या फार अवाढव्य नसाव्यात मूर्ती विसर्जन नदीत केल्यामुळे प्रदूषण होते हे टाळले पाहिजे हौदात बादलीत विसर्जन करावे असे नवविचार अंगिकारले तर विसर्नानंतर मूर्तींची होणारी विटंबना थांबेल यासाठी प्रत्येकाने विचार रण्याची गरज आहे निर्माल्यही नदीत न टाकता निर्माल्यकुंडात टाकावे मूर्तीदान ही संकल्पना राबवावी,अशा नवविचारांची आज गरजेचे आहे..
 अजूनही काही मंडळे समाजोपयोगी कामे करतात किंवा नविन पिढीत काही बोटावर मोजता येणारी मंडळे जागृत होऊ लागली आहे अनाथ मुले ,वृध्दाश्रम इ, साठी काही मंडळे मदत करतात.
 आजच्या काळात शेतकरी आत्महत्या ,बेकारी बेरोजगारी,महागाई  हे प्रश्न समाजाला भेडसावतात.यावर विचार होऊन अशा लोकांना मदत करणे त्यांचे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे असा विचार आता रुजणे गरजेचे आहे आत्मचिंतन प्रत्येकाने करुन आता या सार्वजनिक उत्सवाचे स्वरुप बदलणे गरजेचे आहे
पर्यावरणाचे महत्व जाणून घेऊन वृक्षारोपण वृक्षसंवर्धन  करणे गरजेचे आहे,
नेत्रदान  रक्तदान  अवयव दान यांचे महत्व सामान्य,जनांना पटवून देणे गरजेचे आहे काही मंडळे असे उपक्रम राबवत आहेत सर्वांनीच त्यांचे अनुकरण करायला हवे .
प्राची देशपांडे 
समूह क्रमांक -१५
[9/4, 4:08 PM] nagorao26: प्रति,                                                     मान. ना. सा. येवतीकर,                      आयोजक, साहित्य दरबार वैचारिक मंच
महोदय,                                                                          मी, राजेश साबळे आपल्या 'सार्वजनिक गणेशोत्सव काल आणि आज' या विषयावर आयोजित केलेल्या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छितो. माझा लेख पुढील प्रमाणे.......
"सार्वजनिक गणेशोत्सव काल आणि आज"
       मुळात गणेशोत्सव साजरा करावा ही कल्पना लोकमान्य टिळकांची, पण जो उद्देश लोकमान्य टिळकांना अभिप्रेत होता तो साध्य होताना दिसत नाही. त्यावेळी आपल्या देशावर परकीय  सत्ता होती, आणि यांच्या जाचातून देश सोडवणं हे काय एकट्या माणसाचं काम नव्हतं. म्हणून त्यांनी लोकांना एकत्रित आणण्यासाठी ही गणेशोत्सवाची प्रथा लोकांमध्ये रुजविण्याचे केले. जेणेकरून लोक एकत्र येतील, अन विचाराची देवाण-घेवाण होईल, आणि लोकांना काही संदेश देत येतील. म्हणून एक गाव एक गणपती. म्हणजे सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन सर्व सामाजिक, शैक्षणिक, राजकीय लोकांनी एकत्र येऊन सर्वधर्मसमभाव हा उद्देश समोर ठेवून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होणे अपेक्षित होते. ज्यामुळे जातिधर्मातील तेढ कमी होण्यास मदत होईल, पण तसं होताना दिसत नाही. असं म्हणण्यापेक्षा सर्व समाजाने एकत्र येऊन सलोख्याने राहावे असं लोकांना वाटत नाही. असच चित्र अनेक वेळा दिसतं.
        प्रत्येक गल्लीत एक नवीन गणेशोत्सव मंडळ तयार झालेले आपल्याला पाहायला मिळते, आणि प्रत्येक मंडळाची मूर्ती वेगळी सभा मंडप वेगळा, त्यांचे पुजारी, डेकोरेशन करणारे, लाईट व्यवस्था वेगवेगळी. दोन मंडळ शेजारी असतील तर मग ते कर्ण कर्कश आवाज. त्यात गणपती येताना आणि जाताना ते ढोल ताशे, मग नाका तोंडात जाईल एवढा गुलाल, फटाकड्यांची अतिष बाजी, कागदाच्या तुकड्यांचे किंवा धुक्यासारखे फेसलेले दुधारी तुषार आणि मग मुन्नी बदनाम हुई, पोरी जरा जपून दांडा धर, शांताबाई किंवा तुझी घागर नळाला लाव पाणी सुटाया लागलं. अशी अंग विक्षेप करणारी गाणी, आणि त्यावर तो नाच. 
       हे तर गणेश येण्या जाण्याचं झालं.  आता राहिले बाप्पाच्या स्थापनेपासून ते विसर्जनाच्या दिवसापर्यंत डीजे आणि रेकार्डचे आवाज ते ही एकमेकांकडे कर्णे करून, ते जेवढ्या जोरात आवाज करून समोरच्या मंडळाला त्रास होईल तेवढा आनंद जास्त. मग मंडळात चाललेला कार्यक्रम मग तो सनई चौघडा लावून का चाललेला असेना त्यांचा पार गोंधळ कसा उडेल याची पुरेपूर दखल घेतलेली असते. शेजारी कोणी आजारी आहे की, दवाखाना आहे याचे भान कुणालाही नसते. उलट गणेशाची अवाढव्य मूर्ती बनवून आमची मुर्ती तुमच्यापेक्षा मोठी कशी यावरच चर्चा जास्त यातून आपण कोणतं देवाचं पावित्र्य जतन करतो बरं.     
       काही दिवसांपूर्वी पुण्यात विजेच्या रोषणाईने जरा बरी रंगत आणली होती. नवनवीन कलात्मक मूर्ती चांगले देखावे आता ही आहेत. आता हे नाही असं नाही, पण त्या बरोबर जो गोंधळ आणि पैशाची उधळपटी तर विचारू नका. 
आता काळाच्या ओघात देवाचं देवपण आणि संस्कृती लोप पावत चालली आहे. मोठा गोंगाट आणि आचरटपणा केल्याशिवाय देव सार्वजनिक मंडळाला पावत नाही की, देवता आरडाओरडा केल्याशिवाय प्रसन्न होत नाही. काही कळत नाही ब्र एकां केलं की, दुसरा म्हणतो त्यांन केलं ते चाललं आणि मी केलं तर लगेच चौकशी आयोग मग त्यात हिंदू मुस्लिमवाद, जातीय रंग, राजकारण्यांचे वेग वेगळ्या पार्ट्यांचे वेगवेगळे गणपती, आणि घरो घरी बसविले जातात ते तर वेगळेच या साऱ्या गोंधळात ते बिचारे कुठे असतात हे त्यांचे त्यांनाच माहित. 
      आता हे सारे कुणाला समजून सांगण्याच्या पलीकडे गेले आहे. जो कोणी काही सांगायला जाईल तर तो देव न मानणारा एक तर नास्तिक नाही तर याला धर्मबदल आपुलकी नाही. यांना संस्कृती नाही. ते गद्दार आहेत. याना इतिहास माहित नाही, चांगलं यांना पाहवत नाही . एक ना अनेक दूषणं लावली जातात म्हणून माणसं मुकाट्यानं सारं सहन करतात. 
      हे सर्व करीत असताना किती पोलीस कर्मचारी रात्रंदिवस आपलं घरदार सोडून माणसांना सांभाळण्याचे काम करीत असतात.  सर्व सण समारंभ जणू काय पोलीस लोकांसाठी नाहीतच असे वाटते. यामध्ये किती पैसे खर्च होतो काही अंदाज आहे काय? नाही!!!
      नाहीच येणार या पैशातून किती मोठे प्रकल्प या देशात उभे राहिले असते बरं. आपण फटाके वाजवतो म्हणजे एक प्रकारे चलनी नोटाच जाळतो की, फटाका म्हणजे चलनी नोटा एकत्र करून बांधलेलं बंडल नाही का?  
      आता कोणी म्हणतील यात मनोरंजन होतं. आपल्या सणाच पावित्र्य आपण जपलं पाहिजे. ही पावित्र्य जपण्याची कोणती पद्धत आहे. पूर्वी लोक सण, उत्सव करीत नव्हते काय?  मग त्यात आताच्यासारखं वावगं काही दिसलं काय? त्यांनी ही संस्कृती जपली म्हणून तर आपल्याला पुढे चालवता आली ना!!! नाही तर आज आपले एवढे सण, उत्सव होते, त्यांनी त्यांचे पावित्र्य जपले म्हणून हे कळले तरी. 
     थोडक्यात काय आपणच आपल्या सुदंर अशा प्रथा, चालीरीती, सण, उत्सव यांची नवी आधुनिक तंत्रज्ञानामुळं आणि पाश्चात्य लोकांच्या अंधः अनुकरणामुळं आपलं स्वत्व गमावत चाललो आहोत आणि नवनवीन शोधांच्या नादात आपण एक दिवस माणुसकीच गमावून बसणार आहोत. 
      गणपती येतात तेंव्हा घर घरात मंगलमय वातावरण असत हे अगदी खरं आहे. मग प्रत्येक वाडीत, गावात, शहरात, नगरात एकाच गणेशाची मूर्ती आणून त्याचीच विधिवत पूजा अर्चा केली तर देवतेचे पावित्र्य नष्ट होईल का? की, देव-धर्म आणि सण उत्सवाच्या नावाखाली राजकारण करणारांना आपापल्या मतपेट्यांची दुकान बंद पडतील असं वाटत. याचा विचार करण्याची वेळ आता लोकांची आहे. लोकच या वरकरणी भूलभुलैयाला भुलतात आणि आपली सारी सुख दुःख तारणारा कोणी देव नसून देवाचा जागर करणारेच खरे आपले तारणहार आहेत असं वाटतं, आणि या साऱ्या गोंधळात सामील होतात. आता घरोघरी पूजन तर सुरु असते ना मग हे सर्व वाडीचा, गावाचा एक गणेशोत्सव का नसावा. का गल्ली बोळात रस्तो रस्ती खडे खणून लाखो करोडो रुपयाचे मंडप घालून वारेमाप खर्च करतात, आणि हा सर्व पैसे कोणाचा असतो बरं जनतेचंच ना मग का नाही आपल्याच गल्लीतील रस्ता किंवा नदी नाल्यावर तलाव, बंधारे होत का सरकारी यंत्रणेची वाट पाहत असतात. हे काय आपले कर्तव्य नाही का? 
      खरं म्हणजे या सार्वजनिक पैस्याचा असा उपयोग होताना दिसत नाही , काही मंडळी करीत असतील त्यांना माझा सलाम आहे. मला तर वाटत सार्वजनिक गणेशोत्सवाचा हाच उद्देश असावा जेणेकरून लोक एकत्र येतील सलोखा वाढेल, भेदभाव संपेल, आणि माणसातील माणुसकी जपली जाईल. पण झालं वेगळंच कोणाचा गणपती किती मोठा. कोणी किती मोठा सेलिबर्टी आणला. कोणाचा देखावा मोठा. म्हणजे ही एक स्पर्धाच झाली. आणि आपण सर्व हे भक्ती आणि सण संस्काराच्या नावाखाली सहन करतो आहोत. हे सारं पाहून स्वर्गादी देवतांना सुद्धा लाज वाटत असेल. अजूनही वेळ गेली नाही. देव देवतांच्या नावाखाली चाललेला वारेमाप खर्च आणि अवडंबर थांबवण्याची वेळ आली आहे. की हे सुद्धा कोर्टानं आदेश काढू सांगायला हवं. आपलं हीत आपल्याला कळत नसेल तर मग काय? सर्व काही आनंद आहे असं म्हणावं लागेल दुसरं काय?

 कवी - राजेश साबळे, 
ए/१०३, मुक्ती को. आप. हौसिग सोसायटी, 
मराठा सेक्शन ३२, उल्हासनगर, ४२१००४ (ठाणे)                   मोबा-९००४६७४२६३                                           इमेल-rajeshsabaleart@gmail.com
[9/4, 4:48 PM] ‪+91 98908 16527‬: सार्वजनिक गणेशोत्सव काल आणी  आज-----🌹🌹🌹

सदबुध्दीचा दाता भक्तांचा त्राता गणराया
अशा गणेशाला वंदन
इंग्रजांच राज्य व आपल सुराज्य !!कशासाठी सार्वजनिक गणेश उत्सव करण्याची टिळकांना गरज भासली तर जनजागृतीसाठी ,यासाठी सभा घेणे सोपे गेले.
स्वातंत्र्यानंतर गणपती उत्सवात विविध उपक्रम राबविले गेले. मनुष्य समाजशील प्राणी आहे सर्व उपक्रमाचे त्याने सोन केल. हळूहळू माणसानेच या उपक्रमाला विकृत रूप दिले.उदा.ध्वनीप्रदुषण वगैरे वगैरे . मनुष्याने काळाबरोबर पावल उचलली पाहिजे .दोषविरहीत उपक्रम राबवले पाहिजे 
कालचा गणेश उत्सव 
गुण
1) लोकांनी एकत्र येणे ही गरज होती
2) स्वातंत्र्य मिळविणे ही गरज होती
3) शिक्षणाचा प्रचार व जागृती व महत्व 
4) ध्येय व कार्य यात एकसुत्रता आणणे हाही एक हेतू होता
5) यातूनच टिळकांनी स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहिले 
आणी ते यशस्वीही झाले 
दोष 
1) तरीही समाजात फुट पडली
2) वैचारिक मतभेद निर्माण झाले 
3) मुळ हेतू दुरावला.

तरीही लोकांनी पुर्वी सार्वजनिक गणपती बसवून आनंद उपभोगला
एकत्र येऊन विचारांचे आदान प्रदान झाले .संस्कृती जपली.
आजचा गणेश उत्सव 
गुण
1) लोकांना एकत्र येण्याची मिळून रहाण्याची सवय लागली 
2)मुलांना मिळुन काम करण्याची संधी मिळाली
3) एकतेचे महत्व कळले 
4) एकत्र मिळुन आनंद घेणे काम करणे संस्कृती जपणे काळाची गरज आहे 
5) अशा बर्याच गोष्टी साध्य झाल्या .

दोष 

1) एकत्र येण्यालाच हिंसक रूप मिळाले 
2) हळूहळू आनंद घेण्याची मक्तेदारी निर्माण झाली.
3) वर्गणीचे दोष निर्माण झाले 
4)लोकांनीच हिंसक रूप दिले 
5)ध्वनीप्रदुषण वाढले
6)मुळ हेतू दुरावला

आशा करूया यातही चांगले बदल हळूहळू होतील. नवनिर्मीतीची मानवाला आवड आहे . शिक्षणाने व सुशिक्षित सुसंस्कृतपणा वाढल्यास बदल घडून येईल .
    आजच्या घडीला आपली गरज आपल्या राष्ट्राचे हित लक्षात घेउन आपण सर्वांनी पाऊल उचलणे गरजेचे आहे . जय गणेश.
शशी खंडाळकर पुणे. 9890816527
[9/4, 5:20 PM] Gajanan patil: बुद्धीची देवता असलेली गणेश देवता आणि गणेश उत्सवातील बदलते स्वरूप पुर्वी श्री गजाननाची होणारी स्थापना म्हणजे दहा दिवस स्वर्गसुखाची अनुभूती लहान थोर सर्वांना आनंदाची मांदियाळी असे पण जसाजसा काळ बदलत गेला आणि कुठं तरी त्या आनंदाच्या क्षणावर विरजण पडू लागले सर्वत्रच धावपळ पैशाने देव मिळवता येईल कदाचित परंतु जे आत्मियता पुर्वक प्रेम मिळायला पाहिजे ते मिळत नाही '' जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव '' मनापासून केलेली अराधना ही भगवंताच्या परमोच्च आनंद बिंदूची परिसीमा बनते परंतु आज फक्त सर्व देखावा झाला आहे मुख्य उद्देश्य बाजूला ठेवून आज बरेच मंडळ दुरुपयोग घेताना दिसतात कुठं बळजबरीने वर्गणी गोळा करून तर कुठे अरे रावीची भाषा वापरली जाते या उपक्रमाला काय म्हणायचं.
पुर्वी गावातील लोकांना गणपती बाप्पा आले म्हणले की सामाजीक बांधिलकी जोपासली जावी समाज प्रबोधना वरिल मनोहरी नाटिका व्हायच्या कुठे कीर्तन होई,भारूड,भजने व्हायची पण आता मंदिरात पिक्चर्सची गाणी वाजताना दिसतात हे यापासून कुठला बोध घ्यावा हेच आता कळत नाही आणि शेवटी माकडाचे हाती कोलीत दिल्या प्रमाणे गणपती बाप्पा म्हणायचे आणि पाठीमागून पत्यांचा डाव थाटला जातो हे दुर्दैवाने सांगायला भाग पडते.
माझ्या जीवनातील अनुभव याठिकाणी  आवर्जून सांगण्याचा प्रयत्न करणे मला सर्वात प्रिय देवता म्हणजे माझा ''बाप्पा''गावाकडे मी मुक्त कलाछंदी गणपती आले म्हणले की एका महिन्या पासून लगबग सुरू व्हायची सामाजिक नाटिका बसवणे डेकोरेशनची आरास करणे कधी वेळ जायचा कळायचे नाही आणि सर्व काही मनोभावे करायचे आणि दहा दिवस बाप्पा पासून कुठेही जायचो नाही एकदिवस रात्रीची घटना सर्व मंडळ गणपती समोर झोपले होते त्यात मी सुद्धा दोन दिवसाची झोप असल्याने झोपी गेलो पण अचानक स्वप्न भास झाला गणपती बाप्पा जणूकाही हालवून जागे करत आहेत आणि मला सांगत होते उठ ही मांजर सर्व भस्मसात करेल आणि शरीरात 11 हजार विजेचा करंट बसवा समोर बघतो तर ती मांजर नेमकी नंदादीप जवळ सर्व अनर्थ टळला होता आणि तेव्हा पासुन भगवंता वरील विश्वास अधिक वाढत गेला...
" मंगल मुर्ती मोरया ''
                गजानन पवार @81
[9/4, 5:28 PM] 10 Meena Sanap: साहित्य दर्पण व्दारा आयोजित 
*************************
📕 साहित्य दरबार📗
वैचारिक लेखमाला स्पर्धा
***********************
विषय--- सार्वजनिक गणेशोत्सव-----काल आणि आज
****************************
भाग----------------विसावा
दिनांक -----------4-9-2016

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
श्रावण  महिना म्हणजे सणांची सुरवात.
           श्रावण लोळे गवतावरती
            भाद्रपद गातो गणेश महती
खरं तर गणरायाचे वेध श्रावणातच लागतात. कारण उत्सव म्हटलं कि आनंदाची लयलुट असते. गणरायाचेआगमन म्हणजे आनंदाला उधान आलेले असते.गणेशोत्सव म्हणजे दहा दिवस आनंदाची पर्वणीच आसते लेकीबाळी माहेराला येतात. अशा प्रकारे सर्वत्र आनंद ओसंडून वाहत असतो.फार पुर्वी पासुन म्हणजे स्वातंत्र्य पूर्व काळात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला.गणपतीला आपण विद्येची देवता मानतो, कोणत्याही कार्यांरंभी आपण गणरायाचे पुजन करतो. गणपती हा महाराष्ट्रातील लोकांचे  आवडते दैवत आहे. यासर्व गोष्टीचा  उपयोग आपल्याला स्वराज्य  जागृतीसाठी करुन घेता येईल म्हणुण लोकमान्यानी गणेश उत्सव सुरु केला.
उत्सव हा लोकांना एकत्र आणतो , त्या मधुन संवाद साधला जातो. विचारांची देवाण-घेवाण होते.थोर विचारवंत आपल्या विचारामधुन लोकाना एकत्र बांधुन ठेवण्याचे महान कार्य करीत असतात त्यामधुन समाजाला दिशा मिळते.आणि म्हणुण गणेशउत्सवाच्या माध्यमातुन खरा लोक संवाद साधुन राष्ट्र भक्तीच्या कार्याला त्याचा उपयोग करुन घेतला. अशाप्रकारे गणेशोत्सवाची सुरुवात झाली.स्वातंत्र्य मिळेपर्यंत फक्त  वैचारिक मंथन असायचं. कालपरत्वे त्यात बदल होत गेले आणि लोक कलावंत आपल्या कलेत अगोदर गण सादर करुन विघ्नहर्त्याला संतुष्ट करतात.म्हणुण संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहताना अगोदर गणपतीची  आराधना केली आहे. म्हणजेच शुध्द भावना यामागे आहे. पुर्वीच्या काळी  गणेश उत्सवामधुन मिळणारी उर्जा आणि चैतन्य हे विधायक कार्याकडे लावले जायचे . 
               आमच्या लहाणपणी 1965-70ला गणेश उत्सव म्हणजे आम्हा लहान मुलांना  गाणे,नाटक नकला, खेळांच्या स्पर्धा,यामध्ये दहा दिवस कसे निघुन जात ते कळत नसत. सकाळीच उठायचे शेण गोळा करुन गावातील गणपती पुढे सडा , रागोंळी हे नित्यक्रमाने असायचे, आरती ,प्रसाद न चुकता मिळावा म्हणुण लवकर उठणे हि चांगली सवय लागत असे .खेडेगावातील मुलांच्या अंगभूत गुणांना वाव मिळत असे, तसेच त्या काळात शासना मार्फत कलापथकाव्दारे मनोरंजन वअनिष्ठ रुढीवर आघात करुन जनजागृती केली जायची.लोकांना त्याचे फार अप्रुप वाटायचे.कोणी ही न सांगता गावात एकच गणपती असायचा, त्या मुळे आपल्या घरचेच कार्य आहे म्हणुण सर्वजण हिरिरीने भाग घेत.
आज गणरायाच्या स्वागतापासुनच स्पर्धेची सुरुवात होते.कोणाचा गणपती मोठा ,अमाप पैसा खर्च करतात,लोकाकडून जबरदस्तीने वर्गणी गोळा करतात, एकाच गल्लीत दोन दोन गणेशमंडळे असतात त्यांचा कर्णकर्कश आवाज रात्रभर गोंधळ
दारु पिऊन अश्लिल गाण्यावर नाच करणे,पत्ते खेळणे असे घाणेरडे प्रकार पाहिल्यावर मनात विचार येतो कि लोकमान्य टिळकांना गणेश उत्सवाचा हा अर्थ अभिप्रेत होता कि काय ?माझ्या देशातील लोकांचे डोके ठिकाणावर आहे का?असाच प्रश्न त्यानी विचारला असता.
परंतु काही गणेश मंडळाना सामाजिकतेची जाण आहे , कारण ते सुंदर देखावे तयार करुन सामाजीक प्रश्नांना वाचा फोडतात व जनजागृती करतात त्याबदूदल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. काही गणेश मंडळे तर रक्तदाना सारेखे उपयुक्त उपक्रम घेतात,भजन स्पर्धा ठेवतात,गरीब विद्यार्थ्यांना  शैक्षणिकसाहित्य वाटप करतात . खरच स्तुत्य उपक्रम आहेत हे , म्हणजेच त्यांच्या कडुन हे गुण घेण्यासारखै आहेत .परंतु काही मंडळाची किव करावी वाटते आर्ची आणि परशा गणरायाच्या स्थापनेला येणार , काय आदर्श घ्यावा ? कुठे चाललेत माझ्या  देशातील तरुण?  
तरुण पिढी ने अस वागुन कस चालेल पुढच्या पिढीवर तुम्ही काय संस्कार करणार ? म्हणुण समाजाती दानशुर व्यक्तींनी एकत्र येऊन विधायक कामासाठी दान करावे ,पोलीस यंत्रणेने परवानगी देताना नियंमाची अमलबजावणी होते कि नाही ते पहावे,अश्लिलतेला थारा देऊ नये सात्विकतेला स्थान असावं.जलप्रदुषण, ध्वनीप्रदुषण होणार नाही याची काळजी घ्यावी
अंधश्रद्धेला खतपाणी घालता कामा नये, एवढे जरी लक्षात ठेवले तरी लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने गणेश उत्सव सुरु केला तो उद्देश  सफल झाल्याचे श्रेय मिळेल.
गणेशउत्सवाला कोठेही गालबोट लागणार नाही याची काळजी आपण घेऊन गणरायाच्या स्वागताला सज्ज होऊ या !! सर्वांना गणेशोत्सवाच्या आनंदमय शुभेच्छा !!!
गणपती बाप्पा मोरया 
पुढच्या वर्षी लवकर या !!
धन्यवाद !!!
****************************सौ.मीना सानप बीड @ 7
9424715865
स्पर्धेसाठी
[9/4, 5:52 PM] ‪+91 81499 99678‬: साहित्य दर्पण आयोजित लेखमाला स्पर्धेसाठी.....


सार्वजनिक गणेशोत्सव काल आणि आज

             इंग्रजांच्या पारतंत्र्यात असलेल्या भारतात लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी होती. विविध प्रबोधिनीक संघटनांवर बंदी होती. भारतमातेला पारतंत्र्याच्या बेड्यातून मुक्त करण्याच्या विचारांनी लोकमान्य टिळक झपाटलेले होते. परंतु त्या विचारवंताला," स्वातंत्र्य हे कुण्या एकट्याने मिळवता येण्याची गोष्ट नसून त्यासाठी मोठी जनशक्ती , जनसमूदायाची आवश्यकता असते ," हे समजण्यास थोडाही उशीर लागला नाही. लोकमान्यांना फक्त लोकांना एकत्र आणता येईल यासाठी कारण हवे होते आणि ते कारण त्यांना भारतीय संस्कृतीत असलेल्या धार्मिक व श्रद्धाळू वृत्तीत गवसले. त्यांना कळून चुकले की भारतीय लोक धार्मिक कार्यासाठी आपापसातील वैर विसरूनही एका छताखाली येतात , तसेच धार्मिक कार्यासाठी एकत्र येण्यास इंग्रज सरकारही विरोध करू शकणार नाही हे ते पुरेपुर जाणून होते. ही सर्व कारणे लक्षात घेऊन टिळकांनी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश स्थापना करून विविध जाती धर्मातील लोकांना एकत्र आणले , एका छताखाली आणले, तसेच अनंत चतुर्दशीला मिरवणूकीद्वारे गणेश मुर्तिचे विसर्जन करून लोकांना स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजावून त्यांच्या मनात राष्ट्राभिमान, समता व एकता याची बी लावली.
                आपल्याला इतिहासात आणखी एक नाव गणेशोत्सवाशी टिळकांच्या आधीही जुळलेले दिसेल ते म्हणजे भाऊसाहेब लक्ष्मण जावळे. भाऊसाहेबांनी टिळकांच्या आधीच म्हणजे १८९२ सालीच " भाऊसाहेब रंगारी गणपती " , बुधवार पेठ या नावाने गणेश मुर्तिची स्थापना करून सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली, यावरून असे दिसते की लोकमान्यांनी भाऊसाहेबांचा हा उपक्रम बघून १८९3 साली केसरी या आपल्या वृत्तपत्रातून सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना मांडली असावी, व स्वतःही १८९४ मध्ये केशरी वाड्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करून भाऊसाहेबांच्या देशहितात असलेल्या एकतेच्या कार्याला दुजोरा दिला. असो , तो विषय आपला नाही. आपण फक्त मत मांडू शकतो. भाऊसाहेबांच्या राहत्या घरी म्हणजेच " भाऊ रंगारी भवनात " घेतलेल्या निर्नयाचे टिळकांसह प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या सर्वांनीच स्वागत केले, हे आपणास दिसून येते. तसे पाहता गणेशोत्सवाची प्रथा ही शिवाजी महाराजांच्या काळापासुन ते पेशवाईच्या पतनापर्यंत चालत आलेली होतीच, पुढे मात्र ती नामशेष होत गेली किंवा उंबरठ्याच्या आतच जिवंत होती, असे म्हणायला काही हरकत नाही. लोकमान्य असोत की भाऊसाहेब यांचा उद्देश सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणणे, प्रबोधन करणे तसेच राष्ट्रस्वातंत्र्याची मोहिम धार्मिक चळवळीच्या माध्यमातून चालविने हाच होता , हे आजच्या पिढीने लक्षात घेणे अगत्याचे आहे.
                 आज मात्र गणेशोत्सवाचे स्वरूप खूपच बिभस्त जाणवायला लागले आहे. ज्या गणेशोत्सवाचा हेतू जनएकत्रीकरण हा होता तो आता तसा न रहाता विरूद्ध हेतू समोर येतोय. गणेशोत्सवामुळे लोक मंडळा मंडळात विभागले गेले आहेत. एक मंडळ दुसऱ्या मंडळाशी स्पर्धा करू पाहतय-- कुणाचे डि.जे. थर मोठे आहेत? कुण्या मंडळाचा डि. जे. व ढोल ताशांचा आवाज मोठा आहे ? डेकोरेशन सजावट कुणाची चांगली आहे ? तसेच महागडी मुर्ति कोण्या मंडळाची आहे? हि स्पर्धा गणपती स्थापन असे पर्यंत. गणपती उठल्यावरही मिरवणूकीत स्पर्धा , कुणाचा गणपती मिरवणूकीत आधी लागेल इथपासुन तर गणपती विसर्जनास आम्ही किती मोठ्या नदी धरनाणावर , किती दुर गेलो ? इथपर्यंत. एवढेच नाही तर कोणते मंडळ श्रीमंत कोणते गरीब अशीही स्पर्धा केली जाते. या सर्वांत त्यांना मदत करणारे , फुटीरवादाला दुजोरा देणारे त्या त्या भागातील , विविध पक्षातील नेते मंडळी असतात जी स्वतःची जाहिरात मोठ मोठाले फोटो लावून करतात. ते मंडळांचा स्पाँसर्स असतात.
                गणेशोत्सवाच्या
नावाखाली बाप्पांच्या देणगीच्या नावाखाली सामान्य जनतेकडून खूप मोठा पैसा उखळला  जातो . काही मंडळे तर देणगीच्या नावाखाली बळजबरीने लुट करतात. त्याच पैशातून दारूच्या दहा दिवस पार्ट्या चालतात, रात्रीला ५२ पत्ते ज्याला जुव्वा म्हणतात तो सर्रास खेळला जातो. तेही विद्येच्या देवतेच्या साक्षीने, मंडपात. गर्दीचा फायदा घेवून गुन्ह्याचे प्रमाण वाढत चाललय, शिवाय मोठ्या प्रमाणावर मद्यपान करून अभद्र  भाषेचा प्रयोग हिच मंडळी करतात व त्यातून धार्मिक तेढ निर्माण होऊन दंग्यांना कारणीभूत ठरतात. एवढेच आज गणेशोत्सवातून हाती लागतय.
                  डोळ्यांमधून अश्रू येतात अक्षरशः जेव्हा विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी जलाशयाच्या काठी , न बुडताच काठावर मोडक्या तोडक्या अवस्थेतील  मुर्ति बघतो. प्लास्टर च्या असल्या कारणाने  त्या लवकर विरघळ किंवा मुरत नाहीत. ह्या मुर्ति तयार करताना लावलेल्या मोठ्या प्रमाणातील केमिकल्सच्या रंगांमुळे जलाशये दुषीत होतात याचे खूप मोठे परिणाम माणवाला व प्राण्यांना भोगावे लागतात. शिवाय येवढ्या महागड्या मुर्ति आणून जलाशयांत विसर्जीत करणे कितपत योग्य आहे हे त्या त्या मंडळांनी लक्षात घ्यावे. एवढेच नाही तर मिरवणूकीत मोठ्या प्रमाणात वापरले जाणाऱ्या डि. जे. च्या थरांमुळे खूप ध्वनी प्रदूषणही होते. डि.जे. वर चालू असलेल्या बिभस्त गाण्यावर आपली मुले मुली अंगविक्षेप करत रस्त्यावर नाचताना बघून आई वडील जेव्हा त्यांची स्तुती करतात , तेव्हा खरच भारतीय संस्कृतीची चाललेली विटंबना डोळे लावण्यास भाग पाडते. खरच त्या आई वडीलांची किव करवीशी वाटते.
                 आता मात्र "एक गाव एक गणपती" ही संकल्पना जाऊन "गल्लो गल्लीत गणपती" ही संकल्पना मुळं रोवून उभी आहे. मंडळा मंडळाचा विभाजन झाले , राज्यकर्त्यांनी त्यांना वाटून घेतले. एकत्रीकरणाच्या उद्देशाचे फुटीरवादात रूपांतर झाले. जनमाणसांत आता याच उत्सवामुळे फूट पडली. काही एक दोन मंडळे सोडली तर सर्वच मंडळाची हिच अवस्था झालेली आहे . दरवर्षी बाप्पाचे रूप बदलते मात्र पद्धत तीच असते , स्पर्धात्मक , फुटीरवादी. सर्वच मंडळे तशी नाहित . खरेच काही मंडळे चांगल्या पध्दतीने समाजहिताला जोपासून गणेशोत्सव साजरा करतात. खरेच अशी मंडळे स्तुतीस पात्र आहेत. अशा मंडळांना शासनाने एक ईकोफ्रेंडली गणेशोत्सवाचा पुरस्कार दरवर्षी त्या त्या विशिष्ट भागातील मंडळांना जाहिर करायला हवा. जेनेकरून मंडळे वाममार्गाला न लागता देश हिताच्या कार्यात सहभागी होतील. 
             वेळ कधीही संपत नसते , अजूनही मंडळांनी लोकमान्यांच्या तसेच भाऊसाहेबांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या उद्देशाची जाण ठेऊन महागड्या व केमिकल्सयुक्त रंग वापृरलेल्या प्लँस्टरच्या  मोठाल्या मुर्त्यांवर अवाढव्य खर्च न करता मातीच्या मुर्ति वापरून समाज हितास तसेच देश कार्यास त्याच पैशाचा सद्उपयोग करावा. विद्येची देवता प्रत्येक मंडळाला सद्बुध्दी देवो. व येणारे वर्षे तरूणांना भारतीय प्रगतीच्या कार्यात वाहायला लावणारे ठरो. हिच सदिच्छा. 


✍🏼 सुधीर त्र्यें. पाटील 
      ता. कारंजा ( लाड )
      जि. वाशिम
      मो. ८१४९९९९६७८
      साहित्य दर्पण                             समूहक्रमांक ७४
[9/4, 5:52 PM] sagar pandhari: 🌷🌷गणेशोत्सव काल आणि आज🌷🌷

भारताची भूमि ही पवित्र मानली जाते.ही भूमि अनेक संत,महात्मे व थोर विचारांच्या पुरुषाची खाण आहे.वर्षातले निम्मे दिवस आपण सण-उत्सवामध्ये घलावतो.कांही सण उत्सव हे फक्त एका विशिष्ट भाग व राज्यापुरते सिमीत आहेत पण "गणेशोत्सव" हा संपूर्ण भारतभर व विदेशातही मोठ्या प्रमाणात साजरा होतो.
एकोणिसाव्या शतकात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्याची प्रथा पाडली.त्यामागे त्यांचा उदात्त हेतू होता.लोकामध्ये एकता निर्माण करणे, विचारांची आदानप्रदान करणे, देशभक्ति जागृत करणे, इंग्रज सरकारविरुद्ध चळवळ उभी करणे आणि या कार्यक्रमातून ही उद्धिष्टये साध्य झालीसुद्धा.
लोक एकत्र जमू लागली,लोकांची मनेही साफ होती.8 ते 10 दिवस गणरायाच्या आराधनेसोबत चर्चा,नाटके, मनोरंजन या माध्यमातून आध्यात्मासोबत समाजप्रबोधनहि होऊ लागले.सुरुवातीला पुण्यामधे टिळकांच्या प्रेरणेने गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होऊ लागला, दरवर्षी लोकांमधे उत्सुकता वाढू लागली, देहभान विसरून गणरायाच्या भक्तिमधे लीन होऊ लागले.त्यावेळी गणपतीच्या मुर्त्या शाडूच्या होत्या,पाण्यात सहज विरघळायच्या त्यात हानिकारक रसायने नव्हती.कालांतराने मूर्तीच्या आकरामध्येही बराच बदल झाला आणि गणेशोत्सव साजरा करण्याचा हेतूही बदलला,आज समाजप्रबोधनाचा विषयहि राहिला बाजूला,उरले फक्त मनोरंजन.
आज आपल्याकडे अनेक समस्या आहेत,महाराष्ट्रात तर बऱ्याच ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे,अनेकांना नाना समस्याना तोंड ध्यावे लागत आहे.एकट्या महाराष्ट्रातला गणपतीचा उद्योग अब्जावधि रुपयांच्या वर आहे.पैशांचा अपव्यय तर होतोच पण आज गणपतीच्या नावाखाली अनेकजण धमकावून पैसा उखळत आहेत.मूर्तीसमोर पूजा केली जाते अन् त्याच मूर्तिमागे नको ते उद्योग चालताना आपण पाहतोच,अनेक कार्यकर्त्यासाठी तर ही हौसेचि पर्वणीच असते ,जसे पत्ते खेळणे, व्यसन करणे, रात्री बेरात्रीपर्यंत डीजेच्या तालावर नाचने हे नित्याचेच झाले आहे.आत्ता जर टिळक अवतरले तर त्यांनासुधा लाज वाटेल की हे काय चालू आहे.
खरच आपण गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला पाहिजे, या उत्सवात समाजप्रबोधन् करू शकतो.व्यसनमुक्ती, भ्रष्टाचार,स्त्रीभ्रूण-हत्या,शेतकऱ्यांच्या आत्महत्या, एडस नियंत्रण अश्या नाना विषयावर व्याख्याने, नाटके,अभिनय यांच्या माध्यमातून जनतेमध्ये खरी देवभक्ति जागृत करू शकतो व जमा झालेला निधी आत्महत्याग्रस्त कुटुंबास मदत म्हणून देऊ शकतो .डीजे,भव्य देखावे, खुप मोठ्या मुर्त्या या ऐवजी "एक गाव एक गणपति" हा उद्देश् ठेऊन गणेशोत्सव साजरा केल्यास लोकमान्य टिळकांचे स्वप्न नक्की साकार होईल व गणपती बाप्पा ही आपल्याला पावेल.🌷 जय गणेश🌷

श्री सगर पी एच @83@
[9/4, 6:02 PM] ‪+91 90117 42342‬: साहित्य दर्पण स्पर्धेसाठी

विषय= गणेशोत्सव काल आणि आज

    गणेशोत्सव हां हिन्दू धर्मियांचा एक सार्वजनीक उत्सव आहे.हिन्दू धर्मियांचे आराध्य दैवत समजल्या जाणाऱ्या विग्नहर्त्या ,सुखकर्त्या गणरायाचे आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीस होते. हा उत्सव कोणी दहा दिवस तर कोणी अडीच दिवस गणपती बसवून साजरा करतात.पण हा उत्सव कोणी ?आणि का ?सुरु केला ?याची मुळे भारतीय इतिहासात सपडतील.
          जवळ जवळ दीडशे वर्ष इंग्रजांनी भारतावर राज्य केले.इंग्रज लोक भारतीयांची खुप पिळवणूक करत.सोन्याच्या धुर निघत असलेल्या आपल्याच देशात भारतीयांची किंमत इंग्रजांनी कवडीमोल करुन ठेवली.भारतीय संस्कृती लयास जात होती.हे कुठेतरी थांबलेच पाहिजे यासाठी अनेकांनी इंग्रजाविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला.त्यातील निर्भीड व् तडपदार व्यक्तिमत्व असलेले लोकमान्य टिळक  यानी 'केसरी','मराठा' यासारखी वृत्तपत्रे सुरु करुन त्यातुन इंग्रजांवर कडक टिका केली.या माध्यमातून टिळकानी लोकजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला.स्वातंत्र्य तर मिळाले पाहिजे ,त्यासाठी सर्व भारतीय जनतेने एकत्र येणे गरजेचे होते.परंतू इंग्रज भारतीयांना कामाला जुंपत त्यांना अजिबात एकत्र येऊ देत नव्हते.टिळकांना वाटे कि, स्वातंत्र्यासाठी लोकांनी एकत्र यायला हवे त्यासाठी गणेशोत्सव हा सार्वजनीक उत्सव अठराव्या शतकात सुरु केला. राष्ट्राभिमान ,एकता व     स्वातंत्र्य या उदात्त हेतुने हा उत्सव सुरु केला खरा पण पुढे हा उत्सवाचे स्वरूप् बदलत गेले.'एक गाव एक गणपती' ही संकल्पना रूजली.या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येवू लागले.

प्रथा होती आदर्श ती,
एक गाव एक गणपतीची।
विसरले सर्व जाती धर्म,
प्रचिती येई एकतेची।

 पण आजचे उत्सवाचे स्वरुप पाहिले की, वाटते बाजार मांडलाय बाजार सगळया उत्सवाचा !

प्रथा बदलली एका गावात ,
अनेक गणपती आले।
जाती धर्माचे गट पडून,
गणेशोत्सवाचेही राजकारण झाले।

प्रत्येक गावोगावी, गल्लोगल्ली, रस्तोरस्ती, चौका चौकात गणेश मंडळाची स्थापना झाली.माझा गणपती श्रेष्ट की तुझा? माझ्या गणपती चा देखावा चांगला की तुझ्या अशा एक न अनेक कारणांवरून वादविवाद ,मारामारी असे भयानक स्वरुप आले.
           गणेशोत्सवाच्या नावाखाली भरमसाठ वर्गनी गोळा करत व त्याचा विधायक कामासाठी उपयोगही करत नाही. कर्ण कर्कश आवाजात रात्र रात्र हिंदी गाणी, नाचगाणे, जणू काही तमाशाच चालू आहे.काही काही ठिकाणी तर गणपती समोर दारु पिणे,पत्ते खेळणे असेही पराक्रम केले जातात .हे पाहिले की वाटते कुठे गेला  लोकमान्यांच्या स्वप्नातला गणेशोत्सव?
           सर्वच गणेश मंडळे वाईट असतात असे नाही .काही ठिकाणी लहान मुलांसाठी , स्त्रियांसाठी , वृद्धासाठी विविध उपक्रम राबवले जातात.पण दुर्दैव आपले की अशी मंडळे खुप कमी आहेत. खरच एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली तर सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतील ,एकमेकाशी संवाद घडेल. समस्या कळतील व  जमा झालेल्या देणगीतून गावातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वाह्या, पुस्तके वाटली , तसेच काही लोक हिताची सार्वजनीक कामे केली तर टिळकांचा लोकांना एकत्र आणण्याचा उद्देश सफल झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक गाव एक सुखी समृद्ध गाव म्हणूण गाजला जाईल.
शेवटी म्हणता येईल 

'विसरून सारे जाती धर्म 
एकत्र येवून करू संकल्प,
टिळकांच्या स्वप्नातील
एक गाव एक गणपतीचा राबवू प्रकल्प'.


मीनाक्षी माळकर
चौसाळा जि.बीड
समूह क्रमांक 68
[9/4, 6:21 PM] ‪+91 96574 35292‬: सार्वजनिक गणेशोत्सव काल आणि आज 
       
       "श्री गणेश " हे महाराष्ट्राच लाडक दैवत. विद्येची, कलेची ज्ञानाची देवता म्हणजे श्री गणेश. त्याच लोकमानसातल स्थान लक्षात घेऊन लोकमान्य टिळकांनी स्वराज्याची जागृती करण्यासाठी करण्यासाठी देवघरातल्या गणपतीला रस्त्यावर आणल. उत्सव हा लोकमताचा संवादक आणि राष्ट्रभक्तीचा प्रेरक असू शकतो हे लक्षात घेऊन गणेशोत्सवाच्या माध्यमातून खरा लोकसंवाद साधला. गणेशोत्सव हा केवळ उत्सव न ठेवता त्याला लोकचळवळीच रूप दिल.याला आता 125 वर्षे होत आहेत. 
               लोकसंवाद, संघटन, प्रबोधन या सा-या भूमिकेतून संपन्न होणारा सार्वजनिक गणेशोत्सव शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वाटचाल करत आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये नको त्या गोष्टींनी प्रवेश केला आणि या उत्सवामागचा मूळ उद्देश बाजूला राहून हा उत्सव विघतक वृत्तीकडे झुकतो की काय अशी भिती वाटू लागली.  जस की सक्तीने वर्गणी गोळा करणे,डिजे चा अतिरेकी वापर,वीजेचा अपव्यय,मिरवणुकीवर वारेमाप खर्च, मिरवणुकीतील गैर वर्तन,पैश्याचा अपव्यय,रात्रीच्यावेळी जागरणाच्या नावाखाली चालणारे धंदे, ई. याची यादी लांबतच जाईल. 
            मग प्रश्न पडतो की लोकमान्य टिळकांच्या कल्पनेतील सार्वजनिक गणेशोत्सव हाच आहे का? आपण सर्वांनी यावर आत्मचिंतन केल पाहिजे. सार्वजनिक गणेशोत्सव विघातक न होता तो विधायक करण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. जसे की ऐच्छिक वर्गणी, डिजे चा कमी वापर,वीजेची बचत,समाज उदबोधक देखावे तयार करणे,जमवलेल्या वर्गणीतून गरीब व गरजूंना मदत,व्याख्यानांचे आयोजन, विविध कला,क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन, "एक गाव एक गणपती"  राबवून स्थानिक शाळेला मदत करणे, गावात सामाजिक सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणे, ईत्यादी 
            गणेशोत्सव हा कार्यकर्ता निर्माण करणार एक लोकविद्यापिठ आहे. या उत्सवातून मिळणारी चेतना, ऊर्जा,समाज संपर्क आणि युवा शक्ती जर विधायकतेकडे लावली तर गणेशोत्सवामधून सामाजिक, सांस्कृतिक कार्य मोठ्याप्रमाणात घडेल आणि सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यामागचा टिळकांचा हेतू ख-या अर्थाने साध्य होईल.हेच आपले  सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वाटचालीस योगदान ठरेल.
           गणपती बप्पा मोरया! 
                      
               शैलजा ओव्हाळ/ चिलवंत
                             बीड
                         @ 73 
                      स्पर्धेसाठी
[9/4, 6:31 PM] 11 Kavita Deshmukh: सार्वजनिक गणेशोत्सव .-काल आणि आज ..

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली. तेव्हापासून आजतागायत जवळ जवळ 120वर्षापासून हा उत्सव अविरत सुरु आहे .पण त्याचे स्वरूप मात्र खूप बदलत गेले .टिळकांनी समाजातील  अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ,
लोकाना एकत्र करण्यासाठी हा उत्सव सुरु केला .त्यातून समाज जागृती करणे हा उद्देश होता .आज समाज जागृती साठी टीव्ही ,मोबाईल ,इंटरनेट, इ .माध्यमे उपलब्ध आहेत .पण माणसे एकत्र येणॆ अशक्य झाले आहे . (जेवण सोडून )सर्व गोष्टी प्रत्यक्ष समोर न येता परस्पर फोन द्वारे आपण करत आहोत .त्या द्रुष्टीने गणेशोत्सव हे  माध्यम आज हि खूप उपयुक्त आहे .पण आजच्या काळात या उत्सवाचा उपयोग विधायक न होता विघातक होत असताना आपणास दिसते .गणेशोत्सवा साठी लोकांकडून अफाट देणगी वसूल केली जाते ,त्याचा हिशोब न ठेवता तो पैसा अनाठायी खर्च केला जातो  .सुदैवाने आज आपण स्वतंत्र देशात राहतो त्यामुळे आपणास सर्व चांगल्या ,समजोपयोगी कामे करण्याचे स्वातंत्र्य आहे .तेव्हा सर्व तरुण युवकांनी एकत्र येऊन व्रुक्शारोपण ,व्यसनमुक्ती ,स्वच्छ भारत ,बेटी बचाव ,ही कामे केली पाहिजेत . गणेशाची स्थापना अगदी रस्त्यात केली जाते त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. तेव्हा प्रत्येक वार्डमध्ये एकच गणपती मोकळ्या जागेत स्थापन केल्यास वाहतूक कोंडी होणार नाही .माझ्या लहानपणी बार्शीला गणपती पाहण्यासाठी 3-4दिवस लागायचे .रात्री आरास,देखावे  आणि पथके बघण्यात खूप मजा येत असे .आता देखाव्या चे प्रमाण कमी झाल्याचे दिसते .पूर्वी प्रत्येक देखाव्यातून काहीतरी एक नवा संदेश मिळे .त्यामुळे आम्ही सह्कुटुम्ब देखावे पाहण्यासाठी उत्सुक असायचो . या उत्सवात अनेक गुण वाढीस लागतात .कला कौशल्यास वाव मिळतो ,संघटन चातुर्य वाढते ,त्यामुळे असे उत्सव साजरे करणे आवश्यक आहे .पण त्यातून समाजाला त्रास होणार नाही याची काळजी घेणे ज़रूरी आहे .बरीच मंडळे खूप छान कार्य करतात पण बोटावर मोजण्याइतकीच .
 पूर्वी पाऊस काळ खूप असायचा त्यामुळे गणपती विसर्जन करणे सोपे होते .आज पाऊस कमी आणि अफाट लोकसंख्येमुळे मंडळे जास्त .त्यामुळे विसर्जनाचा प्रश्न निर्माण होतो .जेवढा गणपती मोठा तेवढे मंडळ मोठे .अशा खुळ्या समजेमुळे मूर्ती पाण्यात लवकर विरघळत नाही ,पाणी दूषित होते .त्यामुळे आता इकोफ्रेंडली गणपती बसवण्यात यावेत.तसेच नीर्माल्या चा  खत म्हणून उपयोग करता येऊ शकतो .सेंद्रीय खत निर्माण केल्यास आपल्या शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो .
 एकंदर आजच्या तरुण पिढीच्या अत्याधुनिक द्न्यानाचा ,प्रगत तंत्रचा उपयोग या उत्सवात केल्यास, अनेक बुध्दी मान तरुण एकत्र आल्यास गणेशोत्सव नक्कीच लाभ दायक ठरेल .

गणपती बाप्पा मोरया!

 कविता बडवे 
बीड 70@
8275942282
[9/4, 6:54 PM] 59 Sangita deshamukh Vasmat: *सार्वजनिक गणेशोत्सव कालचा आणि आजचा*
    आपण  भारतीय लोक उत्सवप्रीय,संस्कृतीप्रीय आहोत. उद्या उभ्या महाराष्ट्राचे लाडके  दैवत गणपती बाप्पाच्या नावाने दहा दिवस भक्तीचा मळा सर्वत्र फुललेला दिसेल. आणि मग आपले मन पुन्हा भूतकाळात शिरेल,गणपती बाप्पाच्या या दहा दिवस होणाऱ्या उत्सवाचे मूळ शोधण्यात! मग आपल्या डोळ्यासमोर उभा रहातो पुस्तकातून वाचलेला लोकमान्यांचा सार्वजनिक गणेशोत्सव,आपल्या बालपणीचा सार्वजनिक गणेशोत्सव आणि आजचा गणेशोत्सव!
          एका शतकापासून इंग्रजांच्या अन्यायाखाली पिचून गेलेल्या जनतेला त्यांचा गेलेला आत्मविश्वास आणणे आणि त्यांच्यात एकीची भावना निर्माण करणे,हे  देशप्रेमींच्या,क्रांतिकारकांच्या मनातील एकमेव उद्दिष्ट होते.त्याच काळात लोकमान्य टिळकांनी ग्रीक संस्कृतीचा अभ्यास केला होता. त्या अभ्यासातून त्याना जाणवले की,हे लोक सर्व ग्रीक राज्याना एकत्र आणण्यासाठी त्यांच्या ज्युपिटर या देवतेच्या नावाने ऑलिंपिकचे सामने घेतात. त्यातून त्यांचा हेतू सफल होताना पाहून,आपणही आपल्या धर्माचा आधार घेऊन भारतीयांना एकत्र आणण्याची कल्पना लोकमान्य टिळकांना सुचली. भारतीय जनता इंग्रजांचे अंधानुकरण करतेय याची लोकमान्यांना अत्यंत चीड होती.जोपर्यंत लोकांचा धर्म,संस्कृती आणि इतिहासाबद्दलचा आदर परत वृद्धिंगत होत नाही तोवर राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या गप्पा मारणे व्यर्थ आहे,याची जाणीव लोकमान्यांना झाली होती.याच उदात्त हेतूने त्यांनी १८९३मध्ये प्रस्थापित गणेशोत्सवाला पुनर्जीवन देऊन सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. तसा  पूर्वी हिंदूंच्या घराघरात गणेशोत्सव साजरा होत असे.३सप्टेंबर १८९५च्या केसरीच्या अग्रलेखातून त्यांनी अशा गणेशोत्सवाचे महत्व जनतेला वारंवार पटवून दिले. या गणेशोत्सवात क्रांतिकारकांची भाषणे ही जनसामान्यांच्या मनात देशप्रेमाची आणि त्यासाठी एकत्र येण्याची ज्योत प्रज्वलित करीत होती. म्हणूनच असे सार्वजनिक उत्सव हे त्याकाळी आवश्यक होते,तशी त्याची गरज आजही तेवढीच आहे. 
    पण आज आपण भारतीयांनी सर्व उत्सवाना,जयंती-पुण्यतिथ्याना त्यांच्या मूळ उद्देशापासून फार दूर नेऊन अतिशय ओंगळवाणे रूप बहाल केले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी समाजात वैचारिक प्रबोधनाची नितांत गरज होती. माझ्या बालपणीचा गणेशोत्सव म्हणजे समाजप्रबोधनाचे एक प्रभावी माध्यम होते. कलाकारांच्या कलेला वाव व व्यासपीठ देणारे माध्यम होते. थोरामोठ्यांची व्याख्याने,प्रबोधनपर चित्रपट आणि कलेचे अभिजात सादरीकरण यांचा मिलाफ त्यात असायचा. परंतु त्यानंतरचा काळ हा सार्वजनिक गणेशोत्सवाला फार मोठी  कलाटणी देणारा ठरला. सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे वर्गणीच्या रुपातून खंडणी मागण्याचा जणू गणेश मंडळाना परवानाच मिळाला होता. अगदी कर्णकर्कश आवाजात वाजणारे,त्यातून आजाऱ्याना,वृध्दाना,विद्यार्थ्याना  होणारा त्रास,गणपती बाप्पाच्या पूजेच्या  निर्माल्यामुळे होणारे पाणीसाठ्याचे प्रचंड प्रदूषण आणि गणपती बाप्पापुढे वाजणाऱ्या अश्लील गाण्यातून ओंगळवाण्या संस्कृतीचे प्रदर्शन! कदाचित हे पाहून गणपती बाप्पा सुध्दा पुढच्या वर्षी यायचे की नाही,याचा दहादा विचार करत असेल!
       पण कोणताही काळ फारसा टिकत नाही तसे  आजकाल हे ओंगळवाणे रूप हळूहळू बदलते आहे. बुध्दीच्या देवतेचे बुध्दिप्रामाण्यवादी गणेश मंडळे आजकाल अनेक समाजोपयोगी कार्याना प्राधान्य देत आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्याऐवजी शाडूच्या,मातीच्या मूर्त्या वापरणे,प्रसाद,दक्षिणाऐवजी वहीपेन वहाणे,निर्माल्यापासून खतनिर्मिती करणे,रक्तदान करणे,बेटी बचाव सारखे अभियान राबविणे,अशा डोळस वृतीतून साजरा केलेला गणेशोत्सव नक्कीच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला आवडेल. मी स्वत:घरचा गणपती मातीचा तयार करुन त्याचे विसर्जन बादलीत करुन घरच्या बागेतील झाडाना टाकतो आणि सजावट ही पूर्णतः पर्यावरणपूरक असते. गणेशोत्सवाच्या सर्वाना शुभेच्छा!
*संगीता देशमुख@१४*
स्पर्धेसाठी
[9/4, 6:58 PM] ‪+91 94207 84086‬: साहित्य दरबार साठी

वक्रतुण्ड महाकाय,
सूर्यकोटी समप्रभ॥
निर्विघ्नं कुरूमे देव,
सर्व कार्येषु सर्वदा॥
🙏🙏🙏🙏🙏

खरंच सार्वजनिक गणेशोत्सव काल आणि आज हा विषयच चिंतनाचा बनला आहे.मुळात गणेशोत्सव हे फार पुर्वीपासून साजरे होत असत.ह्याचा पुरावा म्हणजे माजलगाव येथील श्री टेंबे गणेश म्हणजे श्री.ढुंढीराज गणेश.एकशे वीस वर्षाची परंपरा असलेला हा गणपती एकादशीला बसतो आणि पौर्णिमेला विसर्जित होतो.विशेष म्हणजे हा गणपती गणेशभक्त हाताने मातीपासून मूर्ती बनवतात.आणि निजामाच्या काळात गणपती  बसवण्याची परवानगी आणण्यासाठी गणेशभक्त दिवसरात्र एक करत टेंभे हातात घेऊन परवानगी आणली त्याला पाच दिवस लागले म्हणून गणपती पाचव्या दिवशी बसवतात.ह्यावरून लक्षात येते कि गणपती बसवत असायचे परंतु त्याला सार्वजनिक स्वरूप हे लोकमान्य टिळकांनी दिले स्वातंत्र्य पूर्वकाळात ब्रिटिशांना हाकलायचे तर एकजूट महत्त्वाची होती हे लक्षात घेवून सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे उत्सव सुरू केले.
       दहा दिवसाच्या आपल्या लाडक्या बाप्पाचं पृथ्वीतलावर आगमन,ही कल्पनाच सुखावह असते.या दहा दिवसात माझा देवच माझ्यासोबत आहे मग मला कशाचीच पर्वा नाही असेच जणू भक्तांना वाटते आणि आनंदाला  उधान येते.
          पूर्वी हा उत्सव साजरा करताना समाजप्रबोधन हा हेतू असायचा.मनोरंजनासाठी नाटकं, मेळे,गाण्यांच्या कार्यक्रमाची खैरात असायची.ज्येष्ठ मंडळीचा सल्ला विचारला जायचा आणि गुलाल फुलांची उधळण करीत बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप दिला जायचा.
          पण आता चित्र पालटलंय...बाप्पाच्या आगमनाची लोकांना धास्ती वाटू लागलीय कारण अव्वाच्यासव्वा देणगी.अरेरावी आणि दमदाटीलाही मागे नाहीत.बाप्पाच्या आगमनासाठी मोठमोठे बाजा पथक कर्णकर्कश्य आवाज हे नकोसे वाटतात.अजबगजब विद्युत रोषणाई,बाप्पाला राखण म्हणून पडद्याआड पत्ते कुटत बसणं किंवा टिंगलटवाळी करणं असह्य झालंय.काही गणेशमंडळं अपवाद असतीलही पण बहुतांश चित्र औरच आहे.विसर्जनाच्या दिवशीची मंडळामधली चुरस जीवघेणी ठरत आहे.लेझीम सराव करताना तरूण मंडळी व्यसनाच्या आहारी जाताना दिसतेय.ह्रदयाचा ठोका चुकवणारे डीजे समुद्रात नेवून बुडवावे वाटतात.रात्ररात्र धांगडधिंगा करताना तरूणाई दिसते तेव्हा मन हेलावल्याशिवाय रहात नाही. आणि नकळत मनात विचार येतो की बाबांनो लोकमान्यांनी गणेशोत्सव का सुरू केला ते आठवा रे.... असे नका वागू....

हे बदलायचे असेल तर पुन्हा एकदा टिळकांना जन्म घ्यावा लागेल.
      तुम्ही एकत्र या अन्यायासाठी लढायला.
       तुम्ही एकत्र या स्री ची अब्रू वाचवायला 
         तुम्ही एकत्र या दहशतवाद्यांना धडा शिकवायला
           तुम्ही एकत्र या देशाच्या उन्नतीला हातभार लावायला...
     तरंच बाप्पा खुश होईल.आणि टिळकांच्या आत्म्याला शांती मिळेल.



श्रीमती माळेवाडीकर रोहिणी 36माजलगाव.





No comments:

Post a Comment