*माझा दर्पण प्रवास*
*******************
खरंच, धन्यवाद मानेल त्या वॉट्स अप व फेसबुक सारख्या सोशल मिडियाला.. कारण माझी आज स्वत:ची ओळख मलाच कळली. कारण माझी नाळ दर्पण या वॉट्स अप ग्रुप बरोबर जुळली.
"दर्पण" नावातच दर्पण म्हणजे आपल्या स्वत:ची छबी आपण ओळखू शकलो. अनेक दिग्गज साहित्यिकांशी माझं एक आपुलकीचं नात निर्माण झालेले आहे, नव्हे तर माझा स्वत:चं एक परिवार मला मिळाला आहे. आज जर कोणी बोललं तर या परिवारापासून अलग हो, तर देहातून प्राण काढल्यासारखेच वाटेल. कारण दर्पण म्हणजे जीवन असे.
फेसबुकवर अप्पा सरांचा वॉट्स अप नंबर मिळाला " साहित्य दर्पण " वर अॅड करण्यासाठी.. लिहायची खुप आवड, परंतु त्यासाठी लागणारा प्लॅटफॉर्म नव्हता, मार्गदर्शन नव्हते. विशेष म्हणजे मिळाणारी कौतुकाची थाप ज्याने माझ्यातील कवीत्व उदयाला वाव मिळाला.
साहित्य दर्पणवर अॅड करण्यासाठी अप्पा सरांना मेसेज केला, परंतु समोरून दोन दिवस रिप्लाय आलाच नाही. मग पुन्हा विनंती केली व आधार नंबर व आधार फोटो देऊन, मला माहिती पत्रक भराण्यास सांगण्यात आले, यानुसार माझं परिवारात आगमन झाले आणि ख-या अर्थाने माझ्यासारख्या पामराला किनारा मिळाला. स्वागताने मन तर भारावून गेले व मन हरवुनही. त्यासाठी धन्यवाद मानेल अप्पा सरांचे.. 💐💐💐💐💐
अप्पा सर प्रथम मला खुप कडक वाटले, अगदी सैनिकी पेशातले .. पण हळुहळु त्यांच्यात लपलेलं व्यक्तिमत्त्व मला कळु लागलं. अप्पा म्हणजे " फणस " वरून शिस्तीचे काटेरी आच्छादन व आतुन गोड रसाळ गरे ( गोड स्वभावी ) असा एक मार्गदर्शक मिळाला.
परिवारात सर्वात खेळी - मेळीचे वातावरण ठेवून मन प्रसन्न ठेवतात त्या आपल्या वृषु ताई व कल्पना ताई.. खरच खुप उत्साही व चांगल्या साहित्यिक यांच्या रूपाने मला मिळाले. त्याप्रमाणे एक हक्काचे व्यासपीठ मला लाभले व अनेक अनुभवी व गुरूंचा या साहित्य दर्पण मधुन सहवास मज लाभला..
लिहायलाही शब्द अपुरे पडतात " साहित्य दर्पण " वर लिहायला. म्हणून खुप लिहिणे आहे, परंतु सध्या एवढ्यावर थांबून, सर्वांना खुप खुप धन्यवाद... 💐💐💐💐💐
✍🏻 संतोष शेळके / कर्जत , रायगड
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद संतोष सरजी.....
ReplyDeleteदर्पण हे अापल्या व्यक्तिमत्वाचे खर्या अर्थाने अापल्या दर्पण अाहे.
अापल्या अस्तित्वाची जाणिव करुण देणारे क्रांतीकारी विचारमंच अाहे....तेव्हा अभिव्यक्त व्हा..अापल्यातल्या कल्पकतेला वाट मोकळी करुण द्या...!दर्पण परिवार सदैव अापल्या पाठिशी खंबीरपणे उभा असेल..!
धन्यवाद!!!!!