Thursday, 8 September 2016




📚 *साहित्य दर्पण* 📚

           *आयोजित*
🌷 *नाद चारोळी स्पर्धा* 🌷

💞 *पहिली भेट तुझी माझी* 💞
****************************

*संकल्पना :- वृषाली वानखडे*
*संयोजक :- अप्पासाहेब सुरवसे*
*परिक्षक :- पी. नंदकिशोर*
*संकलन :- संतोष शेळके*
*ग्राफिक्स : अनिल लांडगे*
~~~~~~~~~~~~~~~~~~

 💕स्पर्धेसाठी💕

*पहिलीच तुझी--माझी भेट ऐतिहासिक ती वसली,

मधुरात धुंद रसीली यौवनी सांज ती सजली,

सख्या, तुझी जादुगिरी गुलजार छबी काळजात ती ठसली,

वृषाली-कर्ण नजरेत गुंतावे जशी गंगा तटी प्रीत रंगली...******

✍🏻वृषाली वानखड़े👈

🌴अमरावती**75**


*🌹नाद चारोळी🌹*

*💥पहिली भेट तुझी माझी💥*


पहिली भेट तुझी माझी
मी ह्रदयात साठवलीय
स्पंदनाची धडधड नि नजरेची चोरी तेव्हाच मी अनुभवलीय


कल्पना जगदाळे@8★बीड 


नाद चारोळी स्पर्धेसाठी ::
पहिली भेट तुझी माझी 
हृदय मंजुषी जपली 
कोषी सुवर्ण ठेव माझी 
सुखदा स्मरण शिंपली 
:बाबू फिलीप डिसोजा 
निगडी, पुणे ४११०४४ 
@39


विसरेन कशी सजणी 
पहिली भेट तुझी माझी 
आयुष्याला ती कलाटणी 
पाहिलेली परिक्षा माझी 
:बाबू फिलीप डिसोजा 
@39


पहिल्या भेटीचा गोडवा 
अजून जपलाय मनाने..!
सहवास लाभला दुर्मिळ हा, 
विसरला नाही अंतःकरणाने..!!
   :- गजानन पवार पाटील @81


❌ स्पर्धेसाठी नाही ❌

रात्र सरली, स्वप्न भंगली
भंगलेल्या त्या स्वप्नातूनी..
पहिली भेट तुझी माझी
विरहात बेचैन आठवनीतूनी...

✍🏻 संतोष शेळके / कर्जत , रायगड
          @24


आयुष्याला स्वप्न वेढणी 
आकांक्षा परिपूर्ती माझी 
अवीट सुखांची मांडणी 
पहिली भेट तुझी माझी 
:बाबू फिलीप डिसोजा 
@39


न वर्णवे अवस्था माझी 
गंधास्तव भ्रमर रूंजी 
पहिली भेट तुझी माझी 
अंतरी नाम नाद गुंजी 
:बाबू फिलीप डिसोजा 
@39


🌈 नाद चारोळी 🌈

"भातुकलीच्या बोळक्यात अडकलीय

तुझी नी माझी पहिली भेट

या संसारी रहाटगाडग्यात

नित्य स्पंदते ह्रदयात थेट"

......स्पर्धेसाठी☝🏻🌹
जयश्री पाटील(मर्मभेदकार)🖌
वसमतनगर.9421387623



****************************
भेट तुझी माझी पहिली स्मरते आज
टिपुर चांदण्यातली अजुन त्या दिसाची
जीवनाच्या हिंदोळ्यावर झुलताना सख्या
जाणीव देतो स्पर्श तुझा मयुर पिसांची
****************************
सौ.मीना सानप बीड  @ 7
9423715865
स्पर्धेसाठी👆


पहिली भेट तुझी माझी 
फक्त ह्दयालाच कळते
किती सोसु ह्दय यातना
सय तुझी सख्या रे आजही छळते
****************************
सौ.मीना सानप बीड @ 7 
9423715865 स्पर्धेसाठी नाही


 भेट तुझी माझी स्मरते समुद्र किनारीची
भरतीच्या लाटा अन पुनवेचा चांदवा
हात तुझा हाती अन नयनातला गोडवा
किती किती म्हणून घ्यावा आठवांचा आढावा
 शशी खंडाळकर पुणे 9890816527


*पहिलीच भेट तुझी माझी* होती

पण अावडला खूप तुझा सहवास

तोच दुर्मिळ झाला या आयुष्यात

जणू भोगला हा पूर्ण कारावास

@२१ सुनिल बेंडे
      *नाथसेवक*
             

*नाद चारोळी स्पर्धा*
≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈
पहिली भेट तुझी माझी गं सखे
योगायोगाने ती रेल्वे स्टेशनवर 
हात दिला प्लॉटफॉर्म चढण्यावर
कायमची साथ ती आयुष्यभर
✍🏼🖊🖋🎯🖋🖊✍🏼
*श्री .आप्पासाहेब  सुरवसे*
          *AMKS 47*

❎ ~स्पर्धेसाठी नाही~ ❎
    🌹नाद चारोळी🌹*

*💥पहिली भेट तुझी माझी💥*


तुझी माझी पहिली भेट जरी काळाच्या पडद्याआड गेली
जिव्हारी परि तीच आठवण 
आयुष्यभरी मी कोरली


कल्पना जगदाळे@8★बीड.



 नाद चारोळी स्पर्धेसाठी 
-----------------------------

भेट तुझी माझी बहरावी

निस्वार्थ चंचल मानिनी.......

सुटावा मेघातून थेंब तो

यावे मिलनां प्रीत धरणी.....
                                    रोहिदास होले ...... ७१ गोपाळवाडी ,दौंड ,पुणे.....


 भेट तुझी माझी पहिली
नेत्र पल्लवीने खुलली
श्वास माझा प्राण सख्या तु
विश्वासावर जीवन वेल फुलली
*************************
स्पर्धेसाठी नाही 
सौ.मीना सानप बीड @ 7


भेट तुझी माझी पहिली स्मरता
आज ही मी एकांती मनात हसते
सख्या रे हे गुपीत कुणाला सांगु कसे
बेभान तुझी छबी डोळ्यापुढे दिसते
****************************
सौ.मीना सानप बीड @ 7
9423715865


पहिली भेट तुझी माझी 

पर्जन्यात पहिल्यांदा पाहिले तुला
पाहता क्षणी चिरलेस तू मम ह्द्याला
तुझा निरागस चेहऱ्याचा झंझावात
बरच काही सांगून गेला तुझा मला
अन् माझा तुला

कविता शिंदे


*नाद चारोळी स्पर्धेसाठी*

पहिल्या भेटितील तुझ्या - माझ्याक,
क्षण आठवणींचे ते मयुर पंखी...!
जपूनी ठेविले मी ह्रदय पुस्तकी,
हळुवार स्मरता खुलते हर्ष मुखी...!

✍🏻 संतोष शेळके / कर्जत , रायगड
       दर्पण समुह क्रमांक : @२४



नाद चारोळी स्पर्धा साठी

उघडलेस तू दार अन्
पाहिली भेट तुझी माझी
उंडा मळलेल्या हाताने
सावरत होतीस बट केसांची

किशोर झोटे@32
औरंगाबाद.


स्पर्धेसाठी नादचारोळी

आठवतो तो क्षण अजुनही
पहिली भेट सख्या तुझी माझी
वरीले मी त्या क्षणी विश्वास ठेवूनी
आयुष्याच्या ऊनसावलीत साथ मिळो तुझी

       खेडकर सुभद्रा बीड (२०)
      मो नं (९४०३५९३७६४)


नाद चारोळी साहित्यदर्पण २१वा भाग
विषय पहिली भेट तुझी माझी खास
युगे विटेवरी २१ उभा सखा पांडुरंग
जशी भक्ताला लागते दर्शनाची आस

✍🏼🖊🖋🎯🖋🖊✍🏼

*श्री .आप्पासाहेब सुरवसे*
          _AMKS 47_

❎ ~स्पर्धेसाठी नाही~ ❎



परदेशी गं माय लेकरू तुझे
होई व्याकुळ तुझ्या मायेला..
*पहिले गळाभेट* घेईन मी *तुझी*
येईन जेव्हा *माझ्या* मायदेशाला..

✍🏻 संतोष शेळके / कर्जत @24 

स्पर्धेसाठी नाही


 🙏🏻स्पर्धेसाठी नाही❎

पहिलीच भेट तुझी--माझी अधुरिच रे रंगली,

कान्हा तुझ्या चरणी मी पुरती भक्तीत रे दंगली,

धुंद मदमस्तमग्न मी तुझ्या पाव्यात रे विरली,

नाद मंदिरी घुमला तो स्वप्नात मी रे जाहली.

✨वृषाली वानखड़े✍🏻

🌴 *अमरावती 75* 🍃


नादचारोळी स्पर्धेसाठी 

पहिली भेट तुझी अन् माझी,
घेऊन आली प्रेम ह्रदयीच्य प्रीत प्रवाही..!
दोघे समरस विसरून स्वतःला,
तिथे माझे तुझे असे काही राहिले नाही..!

                बंडोपंत कुलकर्णी सोलापूर 
                समूह क्रमांक १३


स्पर्धेसाठी

स्वर दिले पक्षांनी
गीत गाइले वृक्षांनी
भेटीत पाहिल्या तुझ्या माझ्या
बरसात केली चांदण्यांनी......॥
+++++++++++++++++++++++++
                             श्री. हणमंत पडवळ.
                                  क्र : 48.
 १.
मनात होते भय पण 
छाती फूगवून आलो होतो थेट
अजूनही आठवते मला
तूझी नि माझी पहिली भेट.... ॥
+++++++++++++++++++++++
२.
बेमोसमी फूलांनाही बहर
नि चांदण्याची बरसात जहाली
जेव्हा तुझी माझी सखे
पहिली भेट जहाली....॥
+++++++++++++++!++++++++
3.
पहिली भेट तुझी माझी
आठवते सखे अजूनही...
मोरपिसी स्पर्शाने त्या
धुंद मी आज अजूनही......॥
+++++++++++++++++++++++
४.
बापाचा दरारा तुझ्या
भंबेरी उडाली माझी
याद राहिली पक्की मला
पहिली भेट तुझी माझी.....॥
++++++++++++++++++++++++
५.
स्वर दिले पक्षांनी
गीत गाइले वृक्षांनी
भेटीत पाहिल्या तुझ्या माझ्या
बरसात केली चांदण्यांनी......॥
+++++++++++++++++++++++++
                             श्री. हणमंत पडवळ.
                                  क्र : 48.


स्पर्धेसाठी

पहिली भेट तुझी माझी
शब्द फुटेना कुणा ओठी
घेतली शपथ सांज वेळी
आयुष्य वाहिन तुझ्यासाठी 

              अमोल अलगुडे
              समूह क्रमांक 51


भेट तुझी माझी पहिली,
झाली झाडाखाली चोरुन।।
आठवणीच्या खोडावर बघ,
बदाम ठेवलाय कोरुन।।

💘💓💘

✒अनिल लांडगे उंडणगाव@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050

👆👆स्पर्धेसाठी...👆👆



*नाद चारोळी स्पर्धा* 🌿 
  💘भाग -- 21 वा💘


👳 *पहिलीच भेट तुझी  माझी*🙎

*होता पहिलीच भेट तुझी नी माझी*

*प्रीतीची ती नांदी असे  जगावेगळी*

*मी तुझाच आहे अन् राहीन अंतापरी*

*हा शब्द नसे हे वचन असे जन्मजन्मांतरी*

 👨‍❤️‍👨78आशा तेलंगे ठाणे 


नाद चारोळी. 
  
स्पर्धेसाठी. 


   पहिलीच भेट तुझी  माझी

   सात जन्माची  सोबत ठरली

  चालून सप्तपदी   तुझ्यामागे 

  संसाराची झोळी सुखाने भरली.


        पुष्पा सदाकाळ भोसरी 
          @50.


१-पहिली भेट तुझी माझी
अचानक अशी झाली
झुकली पापणी माझी
अन् हसू आले गाली

२- पहिली भेट तुझी माझी
आठवणीत राहिली चांगली
रातराणीच्या मंद सुवासाने
निशा होती भारलेली

३- पहिली भेट तुझी माझी  झाली सागरकिनारी
 वेळ भरतीची होती
मनात धुंद लहरी

४- पहिली भेट तुझी माझी
आठवणीत मी जपली
बकुळीच्या झाडाखाली
मंद सुवासाने दरवळलेली


नादचारोळी
स्पर्धेसाठी
५-पहिली भेट तुझी माझी
हृदयाच्या  कुपीत जपलेली
स्वप्नफुलांची पखरण झाली
विवाहबंधनात परिणती झाली
 प्राची देशपांडे



नादचारोळी
स्पर्धेसाठी
५-पहिली भेट तुझी माझी
हृदयाच्या  कुपीत जपलेली
स्वप्नफुलांची पखरण झाली
विवाहबंधनात परिणती झाली
 प्राची देशपांडे


 💕*स्पर्धेसाठी नाही*💕


 पहिलीच भेट जलात तुझी माझी....*****

मी पंकज वसले तु भ्रमर नियती....****

निसर्गाची किमयागार सौदर्य कलाकृती....****

पुष्प फुलण्याआधी तु अधुराच गंधिती....****

✍🏻वृषाली वानखड़े👈

🌴अमरावती**75**


नाद चारोळी स्पर्धेस

*पहिली भेट तुझी माझी*


पहिली भेट तुझी माझी
पाहे वाट जसा पावसाची चातक 
मनी हर्ष असा दाटला
अबोल झाला शब्द प्रत्येक.

----*सुवर्णविलास*(40)


💕 *स्पर्धेसाठी नाही* 💕


*बाळा पहिली भेट तुझी माझी*
*जन्म दिल्यानंतर न्याहळण्याची*
*आतुरता वाढली तुला जशी स्पर्शन्याची*
*अखंड पर्वणी हिच खरी मातृत्वाची*

✍🏻 *वृषाली वानखड़े*👈

🌴अमरावती _75_


*‘पहिली भेट तुझी माझी’*


भेट तुझी माझी पहिली,
का अशी घडून गेली।।
देवून मजला गोड स्वप्न,
झोप कायमची मोडून गेली।।


✒अनिल लांडगे उंडणगाव@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050

✖स्पर्धेसाठी नाही...✖




चारोळी स्पर्धा
🌹🌹🌹🌹🌹🌹
मधुचंद्राच्या बेधुंद रात्री
*पहिली भेट तुझी माझी*
लाजाळू नजरेत प्रित,परि
स्पर्शालाही नव्हती राजी ...

*प्रा. सौ.संगिता भालसिंग*
अहमदनगर
दि.०८/०९/१६




स्पर्धेसाठी 

पहिली भेट तुझी माझी,
काळजात घर करून राहिली।
माझ संपूर्ण जीवनच,
तुझ्या नावे करून गेली।

मिनाक्षी माळकर
चौसाळा ,बीड.
समूह क्रमांक 68


पहिली भेट तुझी माझी
घडली जेव्हा अवनीवरती,
गीतानाही शब्द लाभले
संगीत उमटले वेणूवरती!"
-*संगीता देशमुख*@१४



*‘पहिली भेट तुझी माझी’*


भेट तुझी माझी पहिली,
घडून आली ज्या दिवशी।।
त्या दिवसाला आजही,
जपून ठेवले हृदयापाशी।।


✒अनिल लांडगे उंडणगाव@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050

✖स्पर्धेसाठी नाही.  


स्पर्धेसाठी

तुझ्या माझ्या पहिल्या भेटीचे ते चित्र
कोरले आहे ह्रदयात माझ्या सचित्र
काळाने घात केला नशीब बनले विचित्र
सुंदर कल्पना स्वप्नातल्या विखुरल्या अशा ह्या सर्वत्र

सगर पी.एच.@83@
धर्माबाद



स्पर्धेसाठी...

पहिली भेट तुझी नि माझी कधी ना विसरले
तुझ्या नजरेत सख्या सौख्य मला गवसले
जावू नको सोडून तू कधी मला एकटीला
तुझ्या प्रीतीने मला अवघे आयुष्य समजले

निर्मला सोनी.


 *नाद चारोळी स्पर्धा*

आतुरता पहिल्या भेटीची तुझी --माझी
लग्न मंडपी तुझ्या चाहुलीची,
मनी आस ती तुला बघण्याची
शुभ-घटीका होती ती मन मीलनाची.

✍🏻वृषाली वानखड़े

🌴 *अमरावती 75*🌴


पहिली भेट तुझी माझी स्मरता
हृदयाचे वाढते स्पंधन
त्या एका नजरेच्या साक्षीने 
जुळले साथ जन्माचे बंधन 
              
              शैलजा ओव्हाळ/चिलवंत
                            बीड 
                             @ 73
                         स्पर्धेसाठी


🌹स्पर्धेसाठी 🌹
भेट तुझी माझी पहिली 
झाली मुरलीच्या स्वरांनी
किती मंजुळ फुंकर तुझी
नथनी घालते कानात करांनी
*****************👆***
स्नेहलता कुलथे 
मोबा7588055882
क्र.37
*****************🌹
पहिली भेट तुझी नी माझी
झाली समुद्राच्या खा-या पाण्यात
तेव्हा पासून सख्या सजना
प्रेम ओसंडते मनाच्या झ-यात
************************
तूच राधा आणि मीरा
म्हणुनी वदतोस मला
भेट तुझी माझी पहिली
आठवणीत तुझ्या कला
*********************


तुझी माझी भेट पहिली, सांजवेळी 
हृदयाची वाढली स्पंदने त्यावेळी 
झाली चूर लाजेने, स्मीतही मंद 
सातची बस मग आली ऐनवेळी !
✍पी.नंदकिशोर 
(अर्थातच स्पर्धेसाठी नाही)

भेट पहिली तुझी माझी 
दोघांनाही सुखावून गेली
जन्मभराची साथ न देता
काळजाला दुखावून गेली!
✍ पी.नंदकिशोर 
( अर्थातच स्पर्धेसाठी नाही)



1) पहिल्या भेटीत तुझ्या सखया
      पुरती विरून गेले
      बोलायला शब्द सुचेना
      हरवून भान गेले

2) ती आपली पहिलीच भेट होती
     तू शांत, मई अबोल
     नजरेचा तो खेळ आगळा
     आजही होते मनाची घालमेल 

                शैलजा ओव्हाळ/चिलवंत
                            बीड
                         @ 73


ओळख नसतांना  भेट घडली! 
तुझी माझी स्थिती बावरलेली!!
नव्हते मनात तेंव्हा जरी काही!
तरी अंतर्गत तुछी छबी कोरली!!

रामराव जाधव 69
तिसगांव



*नाद चारोळी स्पर्धेकरता*

पहिली भेट तुझी अन माझी लेका गर्भारात
जगविल तुला रक्तावर भुषविल मातृत्व जगतात
पण आता लेकरवाळी मी वांझ माऊली अनाथ
शेवटच्या घटिकेत शेवटची भेट घडो लेका वृध्दाश्रमात

*प्रवीण रसाळ*
*३०, कल्याण*


ओळख नसतांना  भेट घडली! 
तुझी माझी स्थिती बावरलेली!!
नव्हते मनात तेंव्हा जरी काही!
तरी अंतरंगी तुछी छबी कोरली!!

रामराव जाधव 69
तिसगांव
7743840604


नाद चारोळी 

ती पहिली भेट तुझी माझी 
भाषा नयनांची नयनांना कळाली
साथ तुझी लाभली अशी
जणू या देहाला सावली मिळाली

- आत्तम गेंदे @86
९९२१०५८४१४
पालम जि.परभणी

*स्पर्धेसाठी*


स्पर्धेसाठी नाही

पहिली भेट तुझी माझी 
अशांत समुद्राकाठी
अजूनही आठवते ति
पोलिस दादाची लाठी

         अमोल अलगुडे
             स क्र 51                              

स्पर्धेसाठी 

पहिली भेट तुझी - माझी....
असीम सुखाची अनुभूती होती
तो  कटाक्ष  नजरेचा  जणू
आयुष्यभरासाठीची अनुमती होती

✍🏻जयश्री हातागळे 
कोंढवा पुणे 48
@66


साहित्य दर्पण 
नाद चारोळी स्पर्धा 
मीही असते उत्सुक पहिल्या भेटीसाठी
तुझ्या कुशीत जन्मून मातृत्वाचा वसा पेलण्यासाठी
का करतेस गर्भलींग निदान ?
अशाने स्त्रीजन्मदराचे चित्र होतेय भयाण ...
                     - ऋषिकेश देशमुख 
                         


🌹नाद चारोळी स्पर्धेसाठी 🌹*

 *भेट तुझी माझी  स्मरते  ग्रंथा*
*मी बसलो होतो,तो वर्ग पहिली*
*तुझा हात धरुनी  आजवर  मी*
*ज्ञान  समिधा  जगी  वाहिली.*

          --- विनोद गादेकर .
   बार्शी (मो.9420701857)


नाद चारोळी स्पर्धा... 
पहिल्या भेटीचाच
होतो मज भास ।
ह्रदयातील स्पंदन तुच
सखे तुच माझा श्वास ।।
नरेंद्र म्हस्के , शिरपूर @ 65


प्रथम भेट तुझी अन् माझी,
राहिली गं आपल्या स्मराणात..!
त्या भेटीमुळे आपले मिलन,
घेऊन शपथ देणे सात जन्म साथ..!
           बंडोपंत कुलकर्णी सोलापूर 


🏀स्पर्धेसाठी🏀      
पहिली भेट तुझी अन् माझी 
माझ्या हृदयात घर करुन राहिली
पावलोपावली तुझी आठवण
डोळ्यात पाणी थरथरुन गेली.

श्री .दिलीपराव चौधरी @७९@
९४२२११८६०४


स्पर्धेसाठी चारोळी 

कशी विसरू सांग बरे 
तुझी माझी पहिली भेट 
माझ्या काळजावर कोरले
नजरेने तू आपले नाव थेट

 सौ.शशिकला बनकर
@35


[9/8, 6:53 PM] ‪+91 99219 67 *🌹नाद चारोळी🌹*

*💥पहिली भेट तुझी माझी💥*

तुझी माझी पहिली भेट 
मजला अजूनही का स्मरते...
तुझ्या माझ्या त्या भेटीत 
मी आजही का झुरते.....



🖊🖊🖊📖🖊🖊🖊

कल्पना जगदाळे@8★बीड.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


*स्पर्धेसाठी*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*तलावात कमळ फुलतं असतीलं*
*जेव्हा तुझी माझी पहिलीचं भेट झाली,*
*सोबत चालत असताना* 
*उगाचचं दुराव्याची रात्र आली...!*
              ✍🏻 *भाग्यश्री चलाख*
                   41


🍁स्पर्धेसाठी चारोळी🍁


*स्मरते ती प्रथम भेट तुझी मला*
*थेट नयनातून हृदयात उतरलेला*
*आज ही तू तिथेच आहेस व्यापलेला*
*दोन्ही बाहू पसरुन मजसाठी थांबलेला*


सौ कल्पना महाडिक
@4


 *नाद चारोळी स्पर्धा*

भेट तुझी माझी होता 
खूप काही होते बोलायचे 
भेट तुझी माझी झाली 
विसरले मनातील सांगायचे

- नासा @ 26


पहिली भेट तुझी माझी 
शेवटची ना ठरावी
आठवणीत राहील सदा 
प्रित आपली फुलावी. 

घनश्याम बोह्राडे 
समुह क्रमांक 19
*स्पर्धेसाठी*



नादचारोळी स्पर्धेसाठी 

झाली नजरा नजर 
सख्या मी बावरले 
पहिली भेट तुजसी होता
मन तुजसंगे हरवले 

योगिनी चॅटर्जी#52


 *🌹नाद चारोळी🌹*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*💥पहिली भेट तुझी माझी💥*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*अवघ्या जीवसृष्टीची तृष्णा शमवी*
*पहिली भेट तुझी माझी*.....
*तु पाऊस मी धरणी, दोघांच्या* *मिलनाने काया सजली रे माझी*..


🖊🖊🖊📖🖊🖊🖊

कल्पना जगदाळे@8★बीड.

 *👆🏿स्पर्धेसाठी👆🏿*
👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿

 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
चावट चारोळी 

*पहिली भेट तुझी माझी,*
*तूच आता सांग कसा विसरू..!*
*घेतले खांद्यावर घाईने,*
*सुचेना मज आता कसे निस्तारू*
          बंडोपंत कुलकर्णी सोलापूर 
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹



*🌹नाद चारोळी स्पर्धेसाठी नाही 🌹*

*भेट तुझी माझी  स्मरते  वेडे* 
*आजही मी पाहतो तो 'वाटर टँक'*
*हास्य तुझे मज देऊन गेले*
*'लाईफ टाइम' ची 'पावर बँक '.*

          --- विनोद गादेकर .
   बार्शी (मो.9420701857) @87

No comments:

Post a Comment