Saturday, 3 September 2016

गणेशोत्सव



📚 साहित्य  दर्पण Whatsapp ग्रुप  📰🖊

     द्वारा आयोजित

🗽    साहित्य दरबार    🗽

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

🚩भाग :- ( 20 वा)- विसावा 🚩
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
📆 दिनांक - _04/09/2016_
🛢 वार - रविवार
~~~~~~~~~~~~~~~~
🕰 वेळ - सकाळी 10:00 ते 7:00
★★★★★★★

††††††††††††††††††

*विषय :- सार्वजनिक गणेशोत्सव काल आणि आज*

==================

💥 संकल्पना :--↓↓

श्री.ना सा येवतीकर सर
**************************
💥 संयोजक --↓↓
श्री आप्पासाहेब सुरवसे
************************
💥 परीक्षक - 
""''''''''''""""''''''''''''''''''''''''''"'''''''''''''''''""""
💥संकलन --
 जी पी पवार पाटिल सर
~~~~~~~~~~~~~~~
💥 ग्राफिक्स :--श्री बी क्रांति सर
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"'
🔦 स्पर्धेचे नियम -

💥ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे....

💥 आपला लेख किमान 100 आणि कमाल 500 - 700 शब्दांच्या मर्यादेत असावे.

💥 लेखाखाली आपले पूर्ण  नाव, गाव आणि मोबाईल नंबर अवश्य लिहावे.

💥स्पर्धेतील निवडक लेख संयोजक वृत्तमानपत्रातून प्रकाशित करतील याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी ..

💥 या  स्पर्धेचा निकाल ग्राफिक्स सह खालील blog वर  आणि साहित्य दर्पण वर पाहण्यास दिनांक _05 सप्टेंबर 2016_ रोजी सायंकाळी 9:00 Pm वाजता मिळेल.  त्यासाठी वारंवार चौकशी करु नये.

http://sahitydaarpan.blogspot.com/2016/09/ganapati-bappa-morya.html

💥साहित्य दर्पण ग्रूपच्या बाहेरील लेखक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात...

📩 त्यासाठी .

🎾 खालील पैकी कोणत्याही एका मोबाईल नंबरवर किंवा फ़ेसबुक वर आपले लेख पोस्ट करावे ....

👤 आप्पासाहेब सुरवसे,लाखणगांवकर
📱 09403725973

👤 नासा येवतीकर, धर्माबाद
📱 09423625769

👤 श्री मारुती खुडे सर माहुर
📱09823922702


साहित्य दरबार साठी

*सार्वजनिक गणेशोत्सवाचे बदलते स्वरुप*

सुमारे दीडशे वर्षे भारत देशावर इंग्रज लोकांनी राज्य केले आणि त्यांनी लोकांचा अतोनात छळ करू लागले. त्यांच्या त्रासाला सर्व जनता पुरती कंटाळून गेली होती. त्या अन्यायाला तोंड देण्यासाठी 1900 च्या दशकात एका युगपुरुषाने पुढाकार घेतला त्याचे नाव म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. समाजात जागृती निर्माण होण्यासाठी त्यांनी मराठा व केसरी यासारखे वृत्तपत्र चालू केले आणि त्यातून इंग्रज सरकारवर सडेतोड लेख लिहून प्रहार करू लागले. सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे काय ? अश्या अग्रलेखामुळे इंग्रज सरकार हादरुन गेले होते. स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळावणारच अशी सिंहगर्जना केली. लोकांना सुद्धा लोकमान्य यांच्या प्रसार माध्यमामुळे बरीच माहिती मिळत होती आणि लोक जागृत होत होते. फोडा आणि राज्य करा अशी नीतिमत्ता असलेले इंग्रज सरकार लोकांत एकीची भावना निर्माण होऊ नये आणि जनता एकत्र येवू नये यासाठी लोकावर वेगवेगळी बंधने टाकत असे. कोणत्याही व्यक्तीला ते एकत्र येऊ देत नव्हते याचसाठी लोकमान्य टिळकानी यावर उपाय योजण्याचे ठरविले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून घरोघरी भाद्रपद चतुर्थीला श्रीगणेशाची स्थापना केल्या जात असल्याची नोंद इतिहासामध्ये दिसून येते. याच बाबीचा विचार करून सन 1896 मध्ये लोकमान्य टिळकानी घरोघरी बसणाऱ्या या  गणपतीला सार्वजनिक उत्सवाचे स्वरुप दिले. त्यास आज 120 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांनी ज्या उद्देशाने हा उत्सव चालू केला होता त्या काळात ते अत्यंत गरजेचे आणि आवश्यक होते. इंग्रज सरकार लोकांना एकत्र येऊ देत नसताना लोकमान्य टिळकानी लोकांना एकत्र येऊन चर्चा करावी यासाठी ही युक्ती केली आणि त्यात ते  यशस्वीही झाले. पण आज समाजात सार्वजनिक गणेशोत्सव कोणत्या प्रकारे साजरी होत आहे याचा जर विचार केला तर, नको हे गणेशोत्सव असे म्हणण्याची आपल्या वर वेळ आली आहे असे वाटते.
खरोखरच आज लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातील सार्वजनिक गणेशोत्सव आहे का ? त्याचे उत्तर नाही असेच येते कारण आज हा उत्सव वेगळ्या स्वरुपात दिसत आहे यावर थोडे चिंतन करने आवश्यक आहे, असे वाटते.
गणेशोत्सवाच्या नावाखाली अकरा दिवस मंडळातील लोकांची खूप होते. रात्रीच्या वेळी जागरणाच्या नावाखाली वेगवेगळे उदयोगधंदे केले जातात. मंडळाकडून समाजोपयोगी कार्य करायचे तर दुरच, समाजाला त्रास देण्याचे काम केले जाते असे चित्र प्रत्येक ठिकाणी दिसून येते. गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्ते वर्गणी गोळा करीत आहेत की खंडणी मागत आहेत तेच कळायला मार्ग नसतो. मुले आपल्या माघरी काय करीत आहेत याची जराही कल्पना आई बाबाला लागू देत नाहीत. आपल्या मनाप्रमाणे वागण्याची ही एक सुवर्ण संधी असते या मंडळातील युवकांना. अकरा दिवसानंतर अनंत चतुर्दशी म्हणजे विसर्जनच्या दिवशी तर युवकांचा गोंधळ पाहूच नये असे वाटते. कान बधिर होतील एवढ्या मोठ्या आवजात गाणे लावणे बेधुंद होऊन नाचणे यामुळे या उत्सवाला एक वेगळे स्वरूप मिळाले आहे. समाजाशी आमचे काही देणे घेणे नाही अश्या विचाराने वागणारी ही मंडळी वर्गणी मागत असताना फारच कणवाळु होतात. अमुक एवढे दिलेच पाहिजे असा हट्ट धरतात. असे करून मंडळाकडे भरपूर प्रमाणात पैसा जमा होतो. वास्तविक पाहता जी काही वर्गणी जमा केल्या जातो तो पूर्ण खर्च करायचा असतोच असे मंडळातील प्रत्येकजण विचार करतो. पण यातील रक्कम वाचवून आपण समाजासाठी काही विधयाक कार्य करू असा विचार करणारी गणेश मंडळ फार कमी प्रमाणात आढळून येतात. खरोखरच वर्गणी म्हणून जमा झालेल्या रक्कमेचे काय करायचे यावर एकदा तरी मंडळाने विचार केला आहे का ? जी गणेश मंडळी याचा विचार केले असतील त्यांचे त्रिवार अभिनंदन आणि ज्यानी काहीच विचार केला नाही त्यांनी विचार करायला सुरु करुन याच वर्षी त्याची अंमलबजावणी केल्यास पुढील वर्षी याचा  आपणास अजुन चांगला फायदा होतो आणि वर्गणीमध्ये भरपूर रक्कम पुढे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबीचा विचार न करता आपण ती जमा झालेली पूर्ण रक्कम उड़वतो म्हणजे अजिबात काटकसर न करता खर्च करतो. दरवर्षी या गणेशोत्सवावर साधारणपणे 1200 कोटी रुपये खर्च केल्या जातो असा एक प्राथमिक अंदाज आहे. यावर आपण कधीतरी गांभीर्याने विचार केला आहे काय ? कधीही विचार करण्यात आला नाही हेच सर्वांचे उत्तर असेल त्यामुळे यापुढे या सार्वजनिक उत्सवातुन सामाजिक उपक्रम कसे राबविता येईल याचा विचार सर्वानी मिळून करू या.
रोजचे वृत्तपत्र म्हणजे पेपर हे सर्वाचे आवडती बाब आहे. आज ही ग्रामीण भागात कोणाच्या हातात पेपर दिसले की त्याला पेपर मागण्याचा मोह आवरता आवरत नाही .याच गोष्टीचा विचार करुन गावातील लोकांची वाचनाची भूक या निमित्ताने शमविण्यासाठी रोज एक पेपर गणेश मंडळीकडून मागविण्यात आले तर किती छान राहिल ! साधारणपणे एका पेपरसाठी महीनाकाठी 150 रु या हिशेबाने एका वर्षात 1800 रु होतील पहिल्या वर्षी हा प्रयोग करून पाहण्यास काही हरकत नसावी. मग यातून अनेक मार्ग पुढे मिळत राहतात. याच माध्यमातून गावातील लोक, युवक हे सर्व एकत्र येतील. काही गोष्टीवर चर्चा होईल आणि मग माणसा-माणसातील आपुलकीमध्ये वाढ होईल .याचा फायदा एक होऊ शकेल की पुढील वर्षी न मागता ही तुमच्या गणेश मंडळाला मोठ्या स्वरुपात देणगी मिळेल. गावातील काही गरीब आणि होतकरु मुलांसाठी 2 - 3 हजार रूपयांची स्पर्धा पुस्तके आणुन दिल्यास, त्याचा ते त्यांचा अभ्यास करीत राहिल्यास नोकरी मिळण्यासाठी एक संधी मिळू शकते. दरवर्षी असे पुस्तक जमा करण्याची परंपरा कायम केल्यास पुढील पिढी याच पावलावर पाऊल ठेवून वाटचाल केल्यास गावात किती पुस्तके जमा होतील ? याचा कधीच आपण गंभीरतेने विचार केलेला नाही. झाले गेले विसरून जाऊन यावर्षी तरी या उपक्रमास आपण सुरुवात केली तर त्यांचा फायदा भविष्यात नक्कीच पहायाला मिळेल.
श्रीची मिरवणूक किंवा विसर्जन मोठ्या आनंदाच्या भरात करावी याबाबत माझे दुमत नाही. मात्र वायफळ खर्चाला फाटा देऊन शिल्लक रक्कमेमधून असे काम केल्यास कोणी वाईट म्हणणार आहे का ? नक्कीच नाही. पण आपण असा विचार करीतच नाही, हीच आजपर्यंत आपली झालेली फार मोठी चूक म्हणण्यास हरकत नाही. वाईट काम करताना लोक काय म्हणातील याचा विचार करावा, चांगले काम करताना कोणी काही म्हणत नाहीत, उलट प्रोत्साहन देतात 
गणेश उत्सवाच्या अकरा दिवसाच्या काळात फक्त D J चे गाणे लावून नाचगाणे करण्यापेक्षा काही तरी उदबोधक आणि मनोरंजक गोष्टी केल्यास गावातील आणि गल्लीतील सर्वाना हे अकरा दिवस हवेहवेसे वाटतील. रांगोळी, निबंध, वक्तृत्व, चित्रकला, गायन, एकांकिका नाटक, दोरी वरील उडी यासारख्या विविध स्पर्धा या निमित्ताने आयोजित करून लोकांना आवडेल असे केल्यास या उत्सवाचा उद्देश्य सफल झाल्या सारखे होईल. एखाद्या भागवत सप्ताह मध्ये ज्या पध्दतीने लोकांच्या जनजागृतीसाठी भजन किंवा कीर्तन केल्या जाते अगदी त्याच प्रकारे या उत्सवाच्या काळात रोज एका साहित्यिक किंवा समाज सुधारक व्यक्तीचे व्याख्यानाचे आयोजन करून त्याची अंमलबजावणी केल्यास साहित्याला प्रोत्साहन मिळेल आणि नवनवीन साहित्यिक मंडळी तयार होतील. गेल्या वर्षी असे एक मंडळ वाचण्यात आले होते ज्यानी अश्या पध्दतीने नियोजन तयार केले होते. गावातील बाल-गोपाळ, युवक तसेच वृद्ध लोकांना सुध्दा याचा फायदा झाला असे तेथील लोक आपल्या अनुभव सांगताना बोलत होते.
काही दिवसापूर्वी सोशल मीडिया मध्ये वाचाण्यात आले होते की यावर्षी गणेश उत्सवाला प्रत्येक जण श्रीगणेशाला एक वही दान द्यायचा असा विचार जर प्रत्येकानी केला तर एका गणेश मंडळाजवळ साधारणपणे 100 - 200 वह्या जमा होटिल. त्या सर्व वह्या श्रीगणेश विसर्जन होण्यापूर्वी एखाद्या शाळेत जाऊन गरीब विद्यार्थ्यांना वाटप केल्यास मंडळाच्या प्रत्येक व्यक्तीला भरपूर आत्मिक समाधान लाभेल. अजून काही भन्नाट कल्पना आपल्या जवळ असतील नक्कीच त्याचा वापर आपल्या कल्पकतेने करून लोकांचे हित केल्यास या उत्सवाची प्रतीक्षा सर्वाना राहील.
तेंव्हा या वर्षीचा आपला सार्वजनिक गणेशोत्सव अगदी निराळा करून पुढच्या वर्षी लवकर या असे प्रत्येकाच्या तोंडून निघावे असे कार्य करु या

गणपती बाप्पा मोरया ...............

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद 
  09423625769


गणेशोत्सव एक चैतन्याचा उत्सव,  
पुर्वी मेळे, कलापथके, लेछीम किंवा 
झांज पथके यातुन कलागुणांना वाव
व सामाजिक प्रबोधन होत असे.
समाजोन्नती व लोकजागृती करणे
हा आणि धार्मिक भावना वृध्दिंगत
व्हावी म्हणून याचा उपयोग निश्चित 
झाला.
आजकाल सार्वजनिक गणेशोत्सव
मोठ्या थाटामाटात साजरा केला 
जात असतांना भरमसाठ खर्चाची 
व्यवस्था केली जाते ते करतांना जी
लोकवर्गणी जमा केली जाते त्याचा
आणि जबरदस्तीचा समाजाला मोठा
जांच वाटतो.
लोकरंजनाचे कार्यक्रम घेतांना जास्त 
करुन आर्केष्ट्रा, उत्तान नृत्याविष्काराचा
समावेश असतो. शिवाय कर्णकर्कश 
आवाजाची गाणी व हिडीस नृत्यप्रकार
याची रेलचेल असते.
शिवाय मंडपामुळे होणारा वाहातुकीला
अडसर व ध्वनीप्रदुशन हे अत्यंत
संवेदनशील मुद्दे आहेतच.
एकंदरीत उत्सवातील काही अपवाद
वगळता काही मंडळा कडुन
समाजोपयोगी कार्यक्रम उदा- रक्तदान,
वृक्षारोपण, काही स्पर्धात्मक कार्यक्रम
राबविले जातात हे निश्चितच चांगले व
गौरवास्पद होय.
कालौघात काही बदल अपेक्षित
असतातच. त्याचा स्विकार करणे
क्रमप्राप्त आहेच.

 रामराव जाधव 69
  7743840604




साहित्य दर्पण स्पर्धा

गणेश उत्सव काळ आणि आज 
     उद्या आपल्या सर्वांचे लाडके बाप्पा येणार . त्यांच्या स्वागताची तयारी जोरदार सुरु आहे . गेली आठ पंधरा दिवस वर्गणी गोळा करण्याची , परवाने काढण्याची धूम उठली आहे . बच्चे कंपनीच्या उत्साहाला उधाण आले आहे . आणि का येऊ नये ? कारण सर्वांचे लाडके दैवत पाहूनचारासाठी येतो आहे .
     गणेश उत्सव पूर्वी घरा पुरता मर्यादितच होता . पण लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढ्यासाठी त्याला सार्वजनिक स्वरूप प्राप्त करून दिले . या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देऊन तरुणांना संघटित करणे , देशप्रेमाची ज्योत पेटवणे व स्वातंत्र्याची आराधना करणारी तरुणांची एक फळी निर्माण करणे ही त्यामागची उद्दिष्ट्ये होती . ती यशस्वी झालीही . लोक संघटित झाली देशप्रेमानी भारली जाऊन स्वातंत्र्य लढ्याला गती मिळाली आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचा सोहळा मोठया दिमाखदारपणे व जल्लोषाने साजरा होऊ लागला .
      तीच परंपरा पुढे आपल्यापर्यंत आली .आज आपणही तेवढ्याच उत्साहाने साजरा करत आहोत .पण ज्या मूळ संकल्पनेतून हा उत्सव निर्माण झाला त्याला आपण पूर्णतः विसरलो आहोत .वर्गणी खंडणीचे स्वरूप धारण करू पाहत आहे . डीजे वाजवून ध्वनिप्रदूषण केले जात आहे . मानाचा गणपती , नवसाचा गणपती , श्रीमंत गणपती व दुधपिणारा गणपती असे गणपतीचे वेगवेगळे प्रकार निर्मिले गेले . गणेश मंडळानंमध्ये स्पर्धा वाढीस लागल्या . यातून भांडण तंटे उदयाला आली . मग या उत्सवाला पोलीस संरक्षण देणे गरज भासू लागली .
     श्रद्धा असावी तिच्यात खूप बळ असते . श्रद्धा माणसाला देवत्व प्राप्त करून देते पण ती डोळस असावी लागते . याउलट अंधश्रद्धा माणसाला पंगू बनवते , भित्री बनवते .  आज जिकडे पाहा तिकडे लोक सुशिक्षित दिसताहेत पण त्याच्यातली अंधश्रद्धा काही कमी झालेली नाही . श्रद्धेची जागा कधी अंधश्रद्धेने घेतली यांना कळलेच नाही . 
     हे म्हणायची वेळ का आली ? किंवा मला वेड लागले आहे म्हणून मी असा बडबडतोय असे वाटेल मात्र देवाच्या तिजोऱ्या एकीकडे शिगोशिग भरल्या जात आहेत .कुणी सोन्याचा मुकुट , कुणी हिऱ्याचे दागिने तर कुणी लाखो रुपयांचे दान दानपेटीत अर्पण करत आहेत . देव श्रीमंत होत आहेत तर सामान्य माणूस दिवसेंदिवस गरीब होत चालली आहेत . 
       आजही काही मुलांना शाळेत शिकत असताना लागणाऱ्या शैक्षणिक साहित्यासाठी संघर्ष करावा लागतोय . शेतकऱ्याची परिस्थिती चिंताजनक आहे . अनाथ मुलांची , दिन-दुबळ्यांची अवस्था बिकट आहे . वृधश्रमांची संख्या अफाट वाढते आहे .
        खरतर या मंडळानंमध्ये जमणाऱ्या आर्थिक सम्पन्नतेतून लोकोपयोगी काम केली जावीत . आर्थिकदृष्टया मदत केली जावी . श्रद्धेची जोपासना करत असतानाच अंधश्रद्धेपासून परावृत्त करणारी देखावे निर्माण करावे . 
         पैश्याची उधळण रोखून उत्सव साध्या पद्धतीने साजरे करावेत . गरजू विध्यार्थ्यांना , दिव्यांगांना मदत करावी . सांस्कृतिक कार्यक्रमांमधून जन जागृती करावी . शेतकऱ्यांना मदत करावी . आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना धीर दिला जावा .
          खरतर अनेक समस्या आहेत . त्या साऱ्याच काही गणपती मंडळांच्या वर्गणीतून सुटणार नाहीत याची पूर्ण जाणीव मला आहे . मात्र कुठेतरी याची सुरुवात होणे अपेक्षित आहे . आणि साऱ्याच उत्सवांना हे लागू होते . ऋण काढून सण साजरी करण्यापेक्षा  साधी व सर्वाना हितकारी सण साजरी व्हावीत . गणेशोत्सव असो की नवरात्रोत्सव या साऱ्या उत्सवांमधून सामाजिक ऐक्य साधले जावे .
         आपण पुरोगामी विचारांचे आहोत .पुरोगामी विचारांचे संगोपन करावे . असं  करण्याने आपले बाप्पा खऱ्या अर्थाने खुश होतील . माणसांमध्ये वसलेले बाप्पा खरा आशीर्वाद देतील .
          नवस वगैरे प्रकाराला किंवा जागृत गणेश म्हणणे किती योग्य आहे ? याचा विचार ज्यानेत्याने करावा . कारण "पिंडी तेच ब्रम्हांडी" ही शिकवण देणारी आपली भारतीय संस्कृती आहे .
         गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ...
|| गणपती बाप्पा मोरया || 
                              - ऋषिकेश गंगाधरराव देशमुख 
                                अनुक्रमांक ५८


सार्वजनिक गणेशोत्सव काल आणि आज......
     लोकमान्य टिळकांनी इंग्रज राजवटीत सुरु केलेला गणेशोत्सव एका ऊदात्त हेतुने प्रेरीत होऊन गणेशोत्सवानिमित्त सर्वांनी एकत्रित येऊन इंग्रजांविरुद्ध करावयाच्या कारवाईची दिशा ठरविणे कारण की इंग्रजांच्या हुकुमशाहीमुळे लोकांना एकत्रित होणे म्हणजे इंग्रजांविरुद्ध कट रचणे , मोठा गुन्हा करण्यासारखे होते व त्यांची दहशत व दडपशाही वाढत असल्याने लोकांनीऐकत्रित यावे , देशात काय घडत आहे हे कळावे , सर्वांमध्ये देशभक्तीची व देशप्रेमाची लाट उसळावी , देशाला गुलामगिरीच्या जोखडातुन सोडवावे ,इंग्रजांविरुद्धचा लढा अधिक तिव्र व्हावा , लोकांमध्ये एकात्मतेची भावना जागृत व्हावी हा त्यामागचा हेतु होता परंतु हळुहळु त्यात बदल व्हायला सुरुवात झाली.
    गणेशोत्सवाला सण किंवा ऊत्सव म्हणुन अधिकच साजरा करण्याची स्पर्धा सुरु झाली , आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी धडपड सुरु होऊन विविध गणेश मंडळांची स्थापनेला सुरुवात झाली त्या नंतर त्यातील सहभाग वाढुन गल्लोगली गणेशाची स्थापना व्हायला सुरुवात होऊन आधुनिकतेकडे वाटचाल सुरु होऊन रेडीओ , टेपरेकार्डची जागा डिजेने घेतली .
       आता काही गणेश मंडळाकडुन जबरदस्तीने वर्गण्या घेण्यात येतात त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त होत आहेत , आजारी लोकांची ,अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांची पर्वा न करणे , ध्वनी प्रदुषणाला आमंत्रण देणारी गाणी, रात्रभर चालणारे जुगाराचे डाव ,सजावटीसाठी होणारा खर्च एकमेकांत होणारी भांडणं यामुळे गणेशोत्सवाला वेगळे रुप प्राप्त झाले आहे.
    परंतु काही गणेश मंडळाद्वारे चांगले कार्यसुद्धा होतांना दिसतात त्यामध्ये साधी सजावट करुन जनजागृती होईल असे देखावे लावले जातात किंवा केले जातात , गरीब व रुग्णांसाठी मदत दिली जाते , एडस , कॅन्सर याविषयी जनजागृती , लोकशिक्षण ,राष्ट्रिय एकात्मता जपली जाते , प्रदुषणाचे परिणाम दाखविले जातात.
     बदल होत असतांना 'गणेशोत्सवाचा मूळ हेतू प्रत्येकाने जाणला पाहीजे , राष्ट्रिय एकात्मता व बंधुता तसेच जनजागृतीला , प्रबोधनाला यातुन चालना मिळावी .
नरेंद्र म्हस्के , शिरपूर @ 65


*"सार्वजनिक गणेशोत्सव काल आणि आज "*
मी साधारण तिसरी वर्गात शिकत असेन, ते दिवस आजही आठवतात. गावाशेजारी एक नदी वाहत होती. या दिवसात नदीला चांगलेच पाणी वाहत असायचे. गल्लीतील पाच सहा जनांचं आमचं गणेशमंडळ असायचं, मोठ्या गणेश मंडळाचं अनुकरण करत आम्ही आमच्या घरातील रिकाम्या एका खोलीत गणपती प्रतिष्ठापणा करत. पण यासाठी पाच सहा रुपये ही फारच मोठी रक्कम आमच्याकडे जमा व्हायची. गावाशेजारी वाहणाऱ्या नदीला शाडू असल्याने त्या शाडूचा आमच्या नाजूक हाताने आकर्षक गणपती बनवून
त्याचीच प्रतिष्ठापणा आम्ही करत होतो. घरातील मोठ्यांच्या मदतीने मोठा बल्ब लावून घेऊन नियमित आरती करुन चिरमुरेचा प्रसाद दोन वेळच्या आरतीनंतर सर्वांना दहा दिवस पुरवत होतो. खरं तर हा परवाचा गणपती उत्सव म्हणू आपण. कालचा आणि आजचा सार्वजनिक गणेशोत्सव याबाबतही फारच गमंती आणि गोष्टी आहेत शिवाय बदलत्या काळानुसार लोकमान्य टिळकांचा मूळ हेतू आणि उद्देश बाजूला पडून नविनच धारणा आणि परंपरा उत्सवातून निर्माण होत आहे. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अशा सार्वजनिक उत्सवातून एकत्रीत येऊन विचारांची देवान घेवान व्हावी हा विचार जरी त्या काळी असला तरी आज या उत्सवाने फारच मोठे रुप धारण केलेले आहे. शहर आणि गाव यामध्येही या उत्सवाचे वेगवेगळे रूप पाहायला मिळते. मी गावात जन्मलो, वाढलो, मोठा झालो. गावातील कालचा आणि आजचा सार्वजनिक गणेशउत्सव पाहिला तर बऱ्याच गोष्टीत बदल झालेला लक्षात येतो. पूर्वी गावात दोन तीन वा चार मोठी मंडळं असायची आणि आमच्या सारख्या दहा बारा वयोगटातील मुलांची गल्लोगल्ली लहान लहान मंडळ असायची.गणपती बसल्यानंतर दोन तीन दिवसानी गणपतीमोरं संगीत मेळे व्हायचे किंवा नाटक तरी व्हायचे.जे मंडळ दोन तीन कार्यक्रम करत ते मंडळ भाव खाऊन जायचे. अभिनयाचं अंग असल्यानं मी व माझे मित्र मिळून अभ्यासक्रमातील वा पाठ्यपुस्तकातील नाटय पाठाचे नाटक गल्लोगल्ली आम्ही करत, वडिलांचे धोतर पडदा म्हणून तर त्या त्या मंडळाचा कॅाट स्टेज म्हणून असायचा. हौसेखातर आमचे कार्यक्रम गावात कधी या गल्लीत तर कधी त्या गल्लीत होत. आम्हाला आनंद होत होता. संगीत मेळ्यात काम करण्याची आम्हाला ऑफरआली. दोन वर्षे संगीत मेळ्यातही काम केले. पुढे नाटक मंडळ स्थापन करून गावोगावी नाटकं सादर केली. आणि गणेशोत्सवाचा आनंद घेतला. कोणत्याही अंगाने पाहिलं तर स्त्री वाटणार नाही अशा मित्रालाआम्ही नाटकात स्त्री बनवलं होतं आमची ती गरज होती.कारण त्याच्या शिवाय कोणीच स्त्री होण्यास तयार नाव्हते.सराव रंगात आला की या स्त्रीच्या अंगात लहर यायची आणि रुसून निघून जायची, आमच्या विनवण्या आणि तिच्या अटी मान्य झाल्यावर पुन्हा सराव सुरु व्हायचा. असे अनेक वेळा होत होते. एकदा तर कहरच झाला, स्टेजवर नाटक चालू असताना " त्या " स्त्रीचा डायलॉग विसरला म्हणून शेजारच्या पात्राने हळूच चिमटा काढून बोलण्याची सूचना केली. त्याचा या महाशय स्त्रीला राग आला आणि दुसरी इंट्री करण्यास स्त्री पात्र तयार होईना, पडदयामागे गोंधळ होऊ लागला. खूप खूप विनवण्या झाल्यानंतर तो कार्यक्रम सुरुळीत पार पडला.असे कांही किस्से होताना आणि पाहताना मजा यायची पूर्वीच्या गणेश उत्सवात. शहरातही एखाद्या मंडळाचा आर्केस्ट्रा असायचा त्यासाठी रात्री सायकलवरून तो कार्यक्रम पाहण्यासाठी जायचोआम्ही.आवडलेल्या गाण्यांना शिट्टया वाजून दाद दयायची. सारं सारं आगळं आणि वेगळं होतं तेव्हा. लेझीम, झांज पथक टिपऱ्या, व आराधी गीते असे नाविन्यपूर्ण कार्यक्रम होते तेव्हा. आता बदल होत गेला. एक गाव एक गणपती पद्धत रूढ होताना दिसतेआहे. गणपतीपुढे फक्त वेगवेगळे विषय घेऊन देखावे उभं करण्याची पद्धती आली. घराघरात टीव्ही आणि त्यावर अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम असल्याने कोणीही घराबाहेर पडून कार्यक्रम पाहयला येईना. संगीत मेळा हा काय प्रकार असतो हेच आज माहित होईना. गणपतीपुढे रातभर जागून सोंगट्याचा चालणारा खेळ आज दिसत नाही. लाईटचा प्रखर प्रकाश आणि संगिताचा कर्कश आवाज हे प्रकर्षाने जाणवणारे बदल आहेत. भव्य गणेशमूर्त्या हे देखील आज आकर्षण ठरतआहे.पूर्वी इकोफ्रेंडली ही कल्पना अपसूक साकारली जायची.आता त्यासाठी प्रचार आणि प्रसार करावा लागत आहे. गणपती बाप्पा मोरया म्हणत आणि पुढल्या वर्षाचं आमंत्रण देऊन गुलालात न्हाहून रात्र रात्र जागरण व्हायचे तेव्हा, आणि आता हिडिस फिडिस गाण्यावर तसाच नाच करण्यात तरुणाई दंग असते.पूर्वी भाव आणि भक्तीचा पूर होता, आता थाट आणि माटाचा नूर आहे.पूर्वी पैसा कमी लागत होता आणि मनातच बाप्पाची ठेवण होती.आता झगमगाट आणि पैशाची उधळण जास्त दिसते आहे. वर्गणीचे स्वरूपही बदलले आहे,घेण्याचे आणि देण्याचेही. कांहीना वर्गणी जास्त देण्यात मोठेपणा वाटतो तर कांहीना सक्तीने वर्गणी घेण्यात मोठेपणा वाटतो. पण कांही असो काल आणि आजही गणपती बाप्पाची ओढ होती तशीच आहे. आपण आतुरतेने त्याची दरवर्षी वाट पाहत असतो. दहा दिवसाचा हा आनंदसोहळा सर्वांनाच आनंदी आनंद देऊन जातो. कोणी फक्त गणपती बाप्पा म्हंटल की आपल्या तोंडून अपसूक शब्द बाहेर पडतात मोरया..... तर मग चला एकदा म्हणूया..... गणपती बाप्पा..... मोरया.......!!!
  
                        श्री. हणमंत पडवळ
                मु.पो. उपळे ( मा. ) ता. उस्मानाबाद.
                        8698067566.    
                                क्रः48.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*रविवार साहित्य दरबार*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*विषय*--

*गणेशोत्सव काल आणि आज*

     *स्पर्धेसाठी*

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

गणेशोत्सवाची सुरुवात तसं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून झालेले दाखले मिळतात.
अफजलखान खुप मोठी फौज घेऊन राज्यावर आला .त्यापासून राज्याचे रक्षण व्हावे या उदात्त हेतूने समर्थ रामदासानी गणेशोत्सव जवळ जवळ पाच महिने केला.त्यासाठी महाराजांनी शेकडो खंडी धान्य दिले.असा उल्लेख आढळतो."समर्थ सुंदरमठी गणपती केला/दोनी पूरुष सिंदूर वर्ण आर्चिला.असे वर्णन दासबोधामध्ये आढळते.            
त्यानतर स्वातंत्र्यपूर्व काळात लोकाना एकत्रित आणण्याच्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी १८५३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना केसरी या वर्तमानपत्रातून मांडली.भाद्रपद महिन्यातील चतूर्थीला स्थापना व तिथून दहा दिवस हा उत्सव साजरा केला जायचा .दहाव्या दिवशी विसर्जन केले जायचे.१८९४ साली पुण्यातील केसरीवाडा येथे टिळकांनी अशी सुरुवात गणेशोत्सवाची केली.
आज तर सबंध भारतभर हा उत्सव साजरा होतोच पण भारताबाहेर सुद्धा 
अमेरीका, कॕनडा, माॕरीशस, इंडोनेशिया, त्रिनिदाद इ.ठिकाणी जगभरात हा गणेशोत्सव मोठ्या स्वरुपात साजरा केला जातो.
         पुढे लोकांच्या एकत्रीकरणाच्या 
उद्देशाने एक गाव एक गणपती असेही उत्सव सूरु झाले.
सिनेकलाकारांना आणणे ,देखावे करणे अशा बाबींचा समावेश सुरु झाला .शाडूच्या मुर्त्या जावून प्लॕस्टर आॕफ पॕरीस च्या मुर्त्या आल्या.उत्सवात भरपूर पैशांची उलाढाल सुरु झाली.वर्गणी जमा करण्याची विनम्रता जावून धमकाधमकी सुरु झाली.व्यापारी लोकांना तर ओरबडणेच सुरु झाले.
गणपतीसमोर प्रचंड आवाजाचे साउंड लावून ध्वनीप्रदूषण सुरु झाले.विजेचा अमर्याद वापर सुरु झाला.मिरवणूक वेळ आमर्याद झाली.समाजप्रबोधनासाठी ,सामाजिक एकोप्यासाठी सुरु झालेल्या उत्सवाचे स्वरुप विकृत बनत गेले.
खरच आपण आताच्या या उत्सवातून 
काय मिळवतो ?चिःतनाचा प्रश्न झालाय.आजचे हे विघातक स्वरुप पाहून भविष्यातील या उत्सवाच्या स्वरुपाविषयी अंतःकरणापासून चिंता वाटते.
शेवटी आजच्या विकृत रुपाला एका शिस्तीत बांधण्याची गरज आहे असे वाटते.
🔹वर्गणी यथाशक्ति स्विकारली जावी.
🔹ध्वनीप्रक्षेपणावर कमी आवाजाची बंधने असावी.
🔹विजेचा वापर मार्यादित व्हावा.
🔹आपल्या संस्कृतीचे रक्षणा
🔹अल्प खर्चामध्ये गणेशोत्सव साजरे व्हावेत.
🔹शिल्लक पैशातून समाजोपयोगी कामे व्हावी .
उदा.आरोग्य शिबीरे, शेतकऱ्यांना मदत, गोरगरीबांच्या मुलाना शैक्षणिक साहित्य वाटप करणे.
🔹शालेय स्पर्धा व्हाव्यात.रक्तदान शिबीरे घ्यावी .गावस्वच्छता अभियान व्हावे .परिसर स्वच्छता अभियान अशा प्रकारची समाजोपयोगी कामे व्हावी .

 दुसऱ्याला आदर्श वाटावे असे  उत्सव साजरे व्हावेत.
गणेशोत्सवाचे पुर्वीचेच दिवस परत यावेत असे वाटते.आजच्या या संगणकीय काळातील पिढीसमोर उत्सवाची सुसंस्कृत अशी आदर्श असावी असे वाटते.
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*चौधरी बालाजी सर* *लातूर*

   *समुह क्र*-- *82*

📕स्पर्धेसाठी 📕
🌹 गणेशोत्सव काल आणी आज🌹
स्वातंत्र्यपूर्वकाळी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरवात केली त्यांचा उद्येश होता की या निमित्ताने लोक एकत्र येतील संवाद  साधतील व त्याचा फायदा स्वातंत्र्यलढ्यासाठी होईल हा उत्सव भाद्रपद चतुर्थी पासुन दहा दिवस  असतो विविध धार्मिक कार्यक्रम या काळात होतात पुर्वी गणेशोत्सव कमी खर्चीक असायची  शांततेत कार्यक्रम व्हायचे परंतु अलिकडे जर आपण हे उत्सवपाहिले तर भरमसाठ खर्च आणी खुप बदललेले स्वरुप आपणास पहावयास मिळते
    श्रध्दा असावी पण अंधश्रध्दा नसावी या मताची मी आहे काल काय झाले हे पहाण्यापेक्षा आता आपण काय करावे याचा विचार करावा कारण आपण वर्तमान काळात जगत असतांना जे पहातो त्यावर प्रकाश टाकावा  आजकाल गणेशोत्सवाचे एक विकृत दर्शन आपण पहातो गणपती समोरील देखावे हा एक महत्वाचा भाग आहे देखावे हे मार्मिक बोध मिळनारे असावेत काल तर टि व्ही वर बातमी पाहिली आर्ची अन् परशाचा देखावा गणपती समोर काय बोध घ्यावा यातून 
       गणपतीची विद्युत रोशनाई जरा मर्यादित असावी जेनेकरुन विज बचत होईल तसे गणपती समोर जी गाणी बाजवली जातात ते ऐकून खरतर बाप्पालाही लाज वाटत असेल दारु पिवून किंवा इतर व्यसन करुन गणपती समोर येऊ नये नव्हे नव्हे व्यसनापासून दूर रहावे नेहमीकरता
    खरतर एक गाव एक गणपती हि संकल्पना अंमलात आनली पाहिजे इच्छा असेल तरच वर्गनी घेतली पाहिजे परंतु जबरदस्तीने वर्गनी मागीतली जाते हे चुकिचे आहे
     प्रत्येक धर्माचे सण उत्सव व्हायलाच पाहिजेत परंतु व्यवस्थित शिस्तबध्द पध्दतीने हे कार्यक्रम व्हावेत यातुन काही जनकल्यानाची कामे व्हावीत व उत्सवाचा नावलौकिक व्हावा हिच या प्रसंगी इच्छा  श्रीगणेशाच्या कृपेने सर्वाची दुख दुर व्हावीत हिच सदिच्छा🙏🙏🙏🙏
       खेडकर सुभद्रा बीड (२०)
मो नं (९४०३५९३७६४)


स्पर्धेसाठी...✍

   *सार्वजनिकगणेशोत्सव काल आणि आज*🌺🌺

                        लोकजीवनात चैतन्य फुलवणारा लोकोत्सव म्हणजे गणेशोत्सव.महाकवी कालिदासांनी म्हटल्याप्रमाणे *_उत्सवप्रिय खलु मनुष्य:_*
म्हणजेच मनुष्य हा पूर्वीपासूनच उत्सवप्रिय आहे.उत्सवाच्या माध्यमातून मनुष्याला प्राप्त होणारी उर्मी तसेच त्यातून मनामनात रुजलेली भारतीय संस्कृती या सर्वांना साधक म्हणून त्यातून एकता साधन्याचा मूलमंत्र लोकमान्य टिळकांनी जगाला दिला.शिवजयंती व गणेशोत्सव यांसारख्या उत्सवांना व्यापक रूप आज लोकमान्य टिळकांमुळेच प्राप्त झालेले आहे.फरक फक्त इतकाच की या उत्सवातील 'प्रेय' आणि 'श्रेय' या भागात झालेला आमुलाग्र बदल.प्रत्येक उत्सवाला नाण्यासारख्या दोन बाजू असतात.एक बाजू प्रेय तर दूसरी बाजू श्रेय.उत्सवातील मिरवणूक,सजावट, कलाप्रदर्शन,आरास ही प्रेय बाजू तर त्यातील जीवनदर्शन आणि मूल्य रुजवणुक ही श्रेय बाजू म्हणावी.लोकमान्य टिळकांनी उत्सवाचा श्रेय भाग लक्षात घेता या उत्सवाचे महत्व जनमाणसात रुजवले.देशाची स्थिति बघता एकजुट,समता आणि एकात्मता या बाजू तळागाळात लपलेल्या होत्या.सार्वजनिक गणेशोत्सवातुन जनमानसात मुल्यांची रुजवणुक व जीवनदर्शन घडवणे हा सुप्त हेतु त्या मागे असायचा.मंडळ स्थापन करुण त्यातून लोकसंवाद,संघटन,प्रबोधन,जागृती,
अस्मिता या साऱ्या भुमिकेतुन सम्पन्न होणारा असा हा सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी त्यावेळी साकारला.कारकर्ते निर्माण करणारं अस हे लोकव्यासपीठ आता मात्र विकृतिकडे वाटचाल करतांनाच चित्र दिसू लागल आहे.राजाधिराज गणराज हे विद्देच,ज्ञानाच आणि कलेच दैवत.गणेशोत्सव हा धार्मिक,सामाजिक व सांस्कृतिक परंपरेचा महोत्सव आणि उत्सव म्हणजे जीवनाचा आत्मा.आज मात्र हा आत्मा भंग पावतांना दिसु लाग्ला आहे.आजचा गणेशोत्सव म्हणजे फक्त तरुण पिढ़ीचा जोश,नाचने गाने आणि रोशनाई एवढ़यावर हा गणेशोत्सव बंदिस्त झालेला दिसून येतो.गणेशोत्सवाच्या माध्यमातून धर्माचा आणि श्रद्धेचा अवडंबर पाहावयास मिळतो.ढोलताशे आणि असह्य असे संगीताच्या गजरात गणरायाचे स्वागत म्हणजे आजच्या बदलत चाललेल्या संकृतिचे दर्शन घडवून देत आहे.विसर्जनाच्या मंडळात होणारे वाद, क्लेश आणि पोहचलेले दंगे हे आज  एकात्मतेला आव्हान म्हणून उभे ठाकले आहे.लोकमान्यांनी स्वराज्याची जागृती करण्यासाठी गाभारातल्या गणपतीला रस्त्यावर आणले ते फक्त लोकमानसात राष्ट्रभक्तिला प्रेरणा देण्यासाठी आणि आजही काही ठिकाणी हा सार्वजनिक गणेशोत्सव अखंड श्रद्धेने व समतेने असाच सुरु आहे.या उत्सवातुन मिळणारी नवचैतन्याची दिशा व ऊर्जा विधायक कामाकडे लावली आणि याच्या श्रेय बाजू लक्षात घेवून त्या दिशेने वाटचाल केली तर खरच हा गणेशोत्सव समाजोद्धारासाठी मारक नसून प्रेरक ठरेल...🌺🌺🌺🌺🌺🌺

            ✍प्रणाली काकडे✍
                 समूह क्रमांक ३८

"प्रथम तुला वंदितो कृपाळा
गजानना गणराया"
     अखिल विश्वाला या बुद्धिच्या देवतेचे वेड लावले ते टिळकांनी.भलेही हे ध्यान अष्टावक्री असलं तरी भक्तांना ते पार्वती मातेसमान सुंदरच वाटतं.त्या काळी टिळकांचा हेतू अगदी स्तुत्यत होता.जशी रामदासांनी बलोपासनेसाठी हनुमानाची मंदिरे उभारली तशी जनएैक्यासाठी टिळकांनी गणेशोत्सव सुरू केले.त्या निमित्ताने लोक एकत्र येवू लागले.विचारांची देवानघेवान होवू लागली व पर्यायाने देशाच्या स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले.
      तेव्हाचे लोक सनातनी व कर्मठ होते पण याबाबतीत एकमत झाले.फरक एवढाच की कुणी दीड दिवस,पाच दिवस,सात दिवस किंवा दहा दिवस गणेशाचे पुजन करू लागले.कोकणात तर हा सर्वात मोठा उत्सव.आजही सर्व चाकरमानी दहा दिवस गावी येतात.
      पुर्वी मुर्ती शाडूची असायची.सहज पाण्यात विरघळायची.पाण्याचे,निसर्गाचे, ध्वनीचे प्रदूषण होत नसे.नदीला भाद्रपदात मुबलक पाणी असायचं,  विसर्जनही छान व्हायचं.त्या दहा दिवसाची तयारी मंडळातील बालगोपाल स्वतः करायचे.खळ करणं,पताका बनवणं, सजावट व मखर मन लावून करायचे.शिवाय विविध स्पर्धा,नाटकं व्हायच्या.स्वेच्छेने दिलेली वर्गणी व सर्वांची अंगमेहनत त्यामुळे बाप्पा सर्वांना आपला वाटायचा.पारंपारीक वाद्ये, उकडीचे मोदक,गुलाल उधळणे हे साग्रसंगित व्हायचे.  
      जसंजसं आपण एकविसाव्या शतकात पदार्पण केलं सगळचं बदललं मग हा उत्सव तरी कसा अपवाद राहील.हळूहळू या उत्सवाचं प्रस्थ झालं.मंडळातील आपुलकी कमी होवून चढाओढ सुरू झाली.टिळकांची एकता अटीतटीची स्पर्धा बनली.मंडळं हे ट्रस्ट बनले.वर्गणी धमकीवजा वसुली ठरली.काल परवाच आपण टी.व्ही.वर आपण पुण्याची बातमी पाहीली की वर्गणी देण्यास नकार दिल्यामुळे चक्क उठाबशा काढण्याची शिक्षा दिली गेली.या उत्सवास "काय होतास तू , काय झालास तू" असं म्हणायची वेळ आलीय.  बाप्पाच्या मुर्तीची उंची वाढली पण श्रद्धा कमी झाली.आजही बरेच समाजसेवक" एक गाव एक गणपती"असावा म्हणून प्रयत्न करतात पण कुणी एेकायला तयार नसतं.उलट गल्लोगल्ली मंडळं तयार झाली.कुणी भाई त्याचा अध्यक्ष बनू लागला.बळजबरी वर्गणी वसूल होवू लागलीय.काही मंडळं अपवाद आहेतच.पण सरासरी चित्र फार बदललयं.डिजे चा वापर तर फारच वाईट.बाप्पासमोर उघडउघड पत्त्यांचे डाव रंगतात, सिनेमाची नको ती गाणी कर्कशपणे वाजत असतात.कुणीतरी पैसे देवून आणलेला कलाकार हिडीस कलेचं प्रदर्शन करतं असणं ....हे सगळं किळसवाणं वाटतं.बाप्पाही वैतागला असेन व टिळक तर पश्चाताप करीत असतील. 
       याची तिसरी बाजू म्हणजे गेले 2/3 वर्षे दुष्काळ,शेतकरी आत्महत्या व बेकारी यामुळे लोक आत्मचिंतन करू लागले.व त्याचे फलित दिसायला सुरूवात झालीय.पुढील येणारया काळात सकारात्मक बदल दिसेल.या वर्षी या दहा दिवसात काही मंडळांनी अभिमानास्पद प्रतिज्ञा घेतलीय.वृक्षारोपन,रक्तदान शिबीर,ग्राम स्वच्छता इ.उपक्रम राबविले जाणार आहेत.विशेष म्हणजे बाप्पासमोर पैसे अगर फूलं न वाहता पेन व वही अर्पण करण्याची अभिनव कल्पना समोर येतेय.हळूहळू पाऊल आदर्शाकडे वळतयं हे ही नसे थोडके.मी स्वतःपासून एक बदल करतेय...निसर्गपुरक मुर्ती मिळत नसल्यामुळे मी कायमस्वरूपी धातूची मुर्ती घेण्याचा विचार करतेय.जेणेकरून प्लास्टर ऑफ पॅरीसनं बाप्पाचे हाल बघणंही नको. आमच्या कॉलनीतील मुलं मागील वर्षापासून दहा दिवस दररोज कॉलनिची स्वच्छता करताय.या वर्षी अजून भरीव योगदान असणार आहे.विना मानधनावर येणारे व्याख्याते बोलवून प्रबोधन करणार आहेत.मी स्वतः बालगोपालांच्या स्वरचित कवितांचे वाचन घेणार आहे.
       बदल आवश्यक आहे.आपणही सर्वजण आपला खारीचा वाटा देवूया व टिळकांना पुन्हा अभिमान वाटेल असं वागुया.केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.शाळेतही एक डॉक्टर लैंगिक शिक्षणावर व्याख्याण देण्यासाठी आम्ही बोलवित आहोत.
   "गर्व आहे मला मी एक सकारात्मक, संवेदनशिल बाप्पाप्रेमी असल्याचा"
.......जयश्री पाटील वसमत



सार्वजनिक गणेशोत्सव : काल आणि आज.
********************
श्रीगणेश ही आद्य देवता आहे.कोणत्याही कार्यांत गणेश पूजन प्रथम केलै जाते. तो आदिदेव आहे, विघ्नहर्ता, सुखकर्ता ,दुःखहर्ता आहे.
फार पूर्वीपासून गणेशपूजन केले जाते शिवपार्वतीच्या विवाह समयी गणेशाचेच पूजन केले होते.हाच गणेश घराघरात देवालायात मूर्ती स्वरुपात स्थित आहे सुपारीच्या रुपातही याला पूजले जाते.
 लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात या उत्सवाला सार्वजनिक स्वरुप दिले आहे त्यात त्यांचा उद्देश ब्रिटीश राजवटीत होणारे अन्याय अत्याचार याविरुध्द आवाज उठविण्यासाठी जनमानसात जागृती करणे हा होता.
भाषण ,मेळे ,पोवाडा ,कवन गायन यातून ब्रिटीश राजवटीला उलथून पाडण्यासाठी विचारक्रांती घडविणे हा मुख्य उद्देश होता ,
स्वातंत्र्यानंतर मेळे गायन यातून कलेला प्राधान्य मिळू लागले.
लोक आवडीने आपल्या मुलांना या मेळ्यासाठी पाठवित असत, कलेचा विकास होणे .सामाजिक विषमता नाहीशी करणे या मुख्य बाबी या उत्सवातून दिसत असत,पाच मानाचे गणपती सुरुवातीला होते
कसबा गणपती हा पहिला मानाचा गणपती,त्यानंतर गुरुजी तालीम ,तांबडी जोगेश्वरी ,दगडूशेट हलवाई गणपती इ.
या सार्वजनिक गणेशोत्सवाचे रुप पुढे बदल गेले .विविध ठिकाणी गल्लीगल्लीत पेठा पेठांत सार्वजनिक गणेशोत्सव सुरु झाले. विविध गणेशमंडळे, विविध देखावे उभारू लागले यातून लाखो रुपयाची उलाढाल होऊ लागली आले.काही मंडळांनी समाजोपयोगी कार्य सुरु ठेवले पण आता या गणेशोत्सवाला बाजारु स्वरुप आलेय असे वाटते जबरदस्तीने वर्गणी गोळा करणे. वर्गरणी न देणा-याला दमदाटी मारहाण करणे असे प्रकार दिसून येतात स्त्यारस्त्यांवर खड्डे खणून मांडव देखावे उभारणे
 कधी देखावे पहाण्यासाठी तिकिट ठेवले जाऊ लागले,नवसाला पावणारे गणपती  असा  काही मंडळांच्या गणपतीचा बोलबाला होऊ लागला.दर्शनाच्या  लांबच लांब रांगा लागू लागल्या.मग वादावादी छेडाछेडी हे प्रकार होऊ लागले, लागला चोरी पाकिटमारी दागिने खेचणे हे ही प्रकार होऊ लागले, पोलिस यंत्रणेवरील बदोबस्तासाठी ताण वाढू लागला आहे,
रोज गणपतीपुढे कर्णकर्कश्य आवाजात निरर्थक गाणी डीजे लावून त्यावर नृत्य करणे
पत्ते खेळणे नशापाणी करुन मिरवणूकीत वेडेवाकडे नाचणे असे हिडिस प्रकार होऊ लागलेत नि संस्कृतीचा -हास होऊ लागला. 
सार्वजनिक गणेशोत्सवाचे हे बदललेले रुप निश्चितच काळजीत पाडणारे आहे.
 विसर्जनासाठी मोठ्या रांगा त्या मिरवणूकीतही डीजे नाचणे हे प्रकार होतात आजारी वृध्दांना याचा खूप त्रास होतो.. गणपतीचे विसर्जन योग्य वेळेत होत नाही ,सर्वच यंत्रणांवर ताण पडतो .
गणेश मूर्ती शाडूच्या वा इकोफ्रेंडली असाव्यात त्या फार अवाढव्य नसाव्यात मूर्ती विसर्जन नदीत केल्यामुळे प्रदूषण होते हे टाळले पाहिजे हौदात बादलीत विसर्जन करावे असे नवविचार अंगिकारले तर विसर्नानंतर मूर्तींची होणारी विटंबना थांबेल यासाठी प्रत्येकाने विचार रण्याची गरज आहे निर्माल्यही नदीत न टाकता निर्माल्यकुंडात टाकावे मूर्तीदान ही संकल्पना राबवावी,अशा नवविचारांची आज गरजेचे आहे..
 अजूनही काही मंडळे समाजोपयोगी कामे करतात किंवा नविन पिढीत काही बोटावर मोजता येणारी मंडळे जागृत होऊ लागली आहे अनाथ मुले ,वृध्दाश्रम इ, साठी काही मंडळे मदत करतात.
 आजच्या काळात शेतकरी आत्महत्या ,बेकारी बेरोजगारी,महागाई  हे प्रश्न समाजाला भेडसावतात.यावर विचार होऊन अशा लोकांना मदत करणे त्यांचे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे असा विचार आता रुजणे गरजेचे आहे आत्मचिंतन प्रत्येकाने करुन आता या सार्वजनिक उत्सवाचे स्वरुप बदलणे गरजेचे आहे
पर्यावरणाचे महत्व जाणून घेऊन वृक्षारोपण वृक्षसंवर्धन  करणे गरजेचे आहे,
नेत्रदान  रक्तदान  अवयव दान यांचे महत्व सामान्य,जनांना पटवून देणे गरजेचे आहे काही मंडळे असे उपक्रम राबवत आहेत सर्वांनीच त्यांचे अनुकरण करायला हवे .
प्राची देशपांडे 
समूह क्रमांक -१५


ग्रुप बाहेरील लेख                                                
"सार्वजनिक गणेशोत्सव काल आणि आज"
       मुळात गणेशोत्सव साजरा करावा ही कल्पना लोकमान्य टिळकांची, पण जो उद्देश लोकमान्य टिळकांना अभिप्रेत होता तो साध्य होताना दिसत नाही. त्यावेळी आपल्या देशावर परकीय  सत्ता होती, आणि यांच्या जाचातून देश सोडवणं हे काय एकट्या माणसाचं काम नव्हतं. म्हणून त्यांनी लोकांना एकत्रित आणण्यासाठी ही गणेशोत्सवाची प्रथा लोकांमध्ये रुजविण्याचे केले. जेणेकरून लोक एकत्र येतील, अन विचाराची देवाण-घेवाण होईल, आणि लोकांना काही संदेश देत येतील. म्हणून एक गाव एक गणपती. म्हणजे सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन सर्व सामाजिक, शैक्षणिक, राजकीय लोकांनी एकत्र येऊन सर्वधर्मसमभाव हा उद्देश समोर ठेवून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होणे अपेक्षित होते. ज्यामुळे जातिधर्मातील तेढ कमी होण्यास मदत होईल, पण तसं होताना दिसत नाही. असं म्हणण्यापेक्षा सर्व समाजाने एकत्र येऊन सलोख्याने राहावे असं लोकांना वाटत नाही. असच चित्र अनेक वेळा दिसतं.
        प्रत्येक गल्लीत एक नवीन गणेशोत्सव मंडळ तयार झालेले आपल्याला पाहायला मिळते, आणि प्रत्येक मंडळाची मूर्ती वेगळी सभा मंडप वेगळा, त्यांचे पुजारी, डेकोरेशन करणारे, लाईट व्यवस्था वेगवेगळी. दोन मंडळ शेजारी असतील तर मग ते कर्ण कर्कश आवाज. त्यात गणपती येताना आणि जाताना ते ढोल ताशे, मग नाका तोंडात जाईल एवढा गुलाल, फटाकड्यांची अतिष बाजी, कागदाच्या तुकड्यांचे किंवा धुक्यासारखे फेसलेले दुधारी तुषार आणि मग मुन्नी बदनाम हुई, पोरी जरा जपून दांडा धर, शांताबाई किंवा तुझी घागर नळाला लाव पाणी सुटाया लागलं. अशी अंग विक्षेप करणारी गाणी, आणि त्यावर तो नाच. 
       हे तर गणेश येण्या जाण्याचं झालं.  आता राहिले बाप्पाच्या स्थापनेपासून ते विसर्जनाच्या दिवसापर्यंत डीजे आणि रेकार्डचे आवाज ते ही एकमेकांकडे कर्णे करून, ते जेवढ्या जोरात आवाज करून समोरच्या मंडळाला त्रास होईल तेवढा आनंद जास्त. मग मंडळात चाललेला कार्यक्रम मग तो सनई चौघडा लावून का चाललेला असेना त्यांचा पार गोंधळ कसा उडेल याची पुरेपूर दखल घेतलेली असते. शेजारी कोणी आजारी आहे की, दवाखाना आहे याचे भान कुणालाही नसते. उलट गणेशाची अवाढव्य मूर्ती बनवून आमची मुर्ती तुमच्यापेक्षा मोठी कशी यावरच चर्चा जास्त यातून आपण कोणतं देवाचं पावित्र्य जतन करतो बरं.     
       काही दिवसांपूर्वी पुण्यात विजेच्या रोषणाईने जरा बरी रंगत आणली होती. नवनवीन कलात्मक मूर्ती चांगले देखावे आता ही आहेत. आता हे नाही असं नाही, पण त्या बरोबर जो गोंधळ आणि पैशाची उधळपटी तर विचारू नका. 
आता काळाच्या ओघात देवाचं देवपण आणि संस्कृती लोप पावत चालली आहे. मोठा गोंगाट आणि आचरटपणा केल्याशिवाय देव सार्वजनिक मंडळाला पावत नाही की, देवता आरडाओरडा केल्याशिवाय प्रसन्न होत नाही. काही कळत नाही ब्र एकां केलं की, दुसरा म्हणतो त्यांन केलं ते चाललं आणि मी केलं तर लगेच चौकशी आयोग मग त्यात हिंदू मुस्लिमवाद, जातीय रंग, राजकारण्यांचे वेग वेगळ्या पार्ट्यांचे वेगवेगळे गणपती, आणि घरो घरी बसविले जातात ते तर वेगळेच या साऱ्या गोंधळात ते बिचारे कुठे असतात हे त्यांचे त्यांनाच माहित. 
      आता हे सारे कुणाला समजून सांगण्याच्या पलीकडे गेले आहे. जो कोणी काही सांगायला जाईल तर तो देव न मानणारा एक तर नास्तिक नाही तर याला धर्मबदल आपुलकी नाही. यांना संस्कृती नाही. ते गद्दार आहेत. याना इतिहास माहित नाही, चांगलं यांना पाहवत नाही . एक ना अनेक दूषणं लावली जातात म्हणून माणसं मुकाट्यानं सारं सहन करतात. 
      हे सर्व करीत असताना किती पोलीस कर्मचारी रात्रंदिवस आपलं घरदार सोडून माणसांना सांभाळण्याचे काम करीत असतात.  सर्व सण समारंभ जणू काय पोलीस लोकांसाठी नाहीतच असे वाटते. यामध्ये किती पैसे खर्च होतो काही अंदाज आहे काय? नाही!!!
      नाहीच येणार या पैशातून किती मोठे प्रकल्प या देशात उभे राहिले असते बरं. आपण फटाके वाजवतो म्हणजे एक प्रकारे चलनी नोटाच जाळतो की, फटाका म्हणजे चलनी नोटा एकत्र करून बांधलेलं बंडल नाही का?  
      आता कोणी म्हणतील यात मनोरंजन होतं. आपल्या सणाच पावित्र्य आपण जपलं पाहिजे. ही पावित्र्य जपण्याची कोणती पद्धत आहे. पूर्वी लोक सण, उत्सव करीत नव्हते काय?  मग त्यात आताच्यासारखं वावगं काही दिसलं काय? त्यांनी ही संस्कृती जपली म्हणून तर आपल्याला पुढे चालवता आली ना!!! नाही तर आज आपले एवढे सण, उत्सव होते, त्यांनी त्यांचे पावित्र्य जपले म्हणून हे कळले तरी. 
     थोडक्यात काय आपणच आपल्या सुदंर अशा प्रथा, चालीरीती, सण, उत्सव यांची नवी आधुनिक तंत्रज्ञानामुळं आणि पाश्चात्य लोकांच्या अंधः अनुकरणामुळं आपलं स्वत्व गमावत चाललो आहोत आणि नवनवीन शोधांच्या नादात आपण एक दिवस माणुसकीच गमावून बसणार आहोत. 
      गणपती येतात तेंव्हा घर घरात मंगलमय वातावरण असत हे अगदी खरं आहे. मग प्रत्येक वाडीत, गावात, शहरात, नगरात एकाच गणेशाची मूर्ती आणून त्याचीच विधिवत पूजा अर्चा केली तर देवतेचे पावित्र्य नष्ट होईल का? की, देव-धर्म आणि सण उत्सवाच्या नावाखाली राजकारण करणारांना आपापल्या मतपेट्यांची दुकान बंद पडतील असं वाटत. याचा विचार करण्याची वेळ आता लोकांची आहे. लोकच या वरकरणी भूलभुलैयाला भुलतात आणि आपली सारी सुख दुःख तारणारा कोणी देव नसून देवाचा जागर करणारेच खरे आपले तारणहार आहेत असं वाटतं, आणि या साऱ्या गोंधळात सामील होतात. आता घरोघरी पूजन तर सुरु असते ना मग हे सर्व वाडीचा, गावाचा एक गणेशोत्सव का नसावा. का गल्ली बोळात रस्तो रस्ती खडे खणून लाखो करोडो रुपयाचे मंडप घालून वारेमाप खर्च करतात, आणि हा सर्व पैसे कोणाचा असतो बरं जनतेचंच ना मग का नाही आपल्याच गल्लीतील रस्ता किंवा नदी नाल्यावर तलाव, बंधारे होत का सरकारी यंत्रणेची वाट पाहत असतात. हे काय आपले कर्तव्य नाही का? 
      खरं म्हणजे या सार्वजनिक पैस्याचा असा उपयोग होताना दिसत नाही , काही मंडळी करीत असतील त्यांना माझा सलाम आहे. मला तर वाटत सार्वजनिक गणेशोत्सवाचा हाच उद्देश असावा जेणेकरून लोक एकत्र येतील सलोखा वाढेल, भेदभाव संपेल, आणि माणसातील माणुसकी जपली जाईल. पण झालं वेगळंच कोणाचा गणपती किती मोठा. कोणी किती मोठा सेलिबर्टी आणला. कोणाचा देखावा मोठा. म्हणजे ही एक स्पर्धाच झाली. आणि आपण सर्व हे भक्ती आणि सण संस्काराच्या नावाखाली सहन करतो आहोत. हे सारं पाहून स्वर्गादी देवतांना सुद्धा लाज वाटत असेल. अजूनही वेळ गेली नाही. देव देवतांच्या नावाखाली चाललेला वारेमाप खर्च आणि अवडंबर थांबवण्याची वेळ आली आहे. की हे सुद्धा कोर्टानं आदेश काढू सांगायला हवं. आपलं हीत आपल्याला कळत नसेल तर मग काय? सर्व काही आनंद आहे असं म्हणावं लागेल दुसरं काय?

 कवी - राजेश साबळे, 
ए/१०३, मुक्ती को. आप. हौसिग सोसायटी, 
मराठा सेक्शन ३२, उल्हासनगर, ४२१००४ (ठाणे)                   
                   मोबा-९००४६७४२६३                                           इमेल-rajeshsabaleart@gmail.com
















No comments:

Post a Comment