Monday, 19 September 2016


📚 *साहित्य दर्पण* 📚
                द्वारा आयोजित 

_आकस्मिक चारोळी स्पर्धा_

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
       भाग→ 14 वा 
////////////////////////
दिनांक :- 19सप्टेंबर 2016
वार  :→ →सोमवार
______________________
विषय → *शहीद वीर जवान*
किंवा 
*17 अमर जीवन*
==================
संकल्पना 
*ना सा येवतीकर*
संयोजक 
*मारुती खुडे सर*
मार्गदर्शक 
*वृषालीताई वानखेडे*
आणि 
~_परीक्षक_~
*आप्पासाहेब सुरवसे*


📚 *साहित्य दर्पण* 📚
                द्वारा आयोजित 

_आकस्मिक चारोळी स्पर्धा_

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
       भाग→ 14 वा 
////////////////////////
दिनांक :- 19सप्टेंबर 2016
वार  :→ →सोमवार
______________________
विषय → *शहीद वीर जवान*
किंवा 
*17 अमर जीवन*
==================
संकल्पना 
*ना सा येवतीकर*
संयोजक 
*मारुती खुडे सर*
मार्गदर्शक 
*वृषालीताई वानखेडे*
आणि 
~_परीक्षक_~
*आप्पासाहेब सुरवसे*


~*संकलित चारोळ्या*~

भारत भूमातेस नित्य 
असे अभिमान वीर शहीद जवान...
तुच या देशाचा खरा 
असे आन-बान-शान...


कल्पना जगदाळे@8★बीड


आकस्मिक चारोळी स्पर्धा 

जम्मू उरी मध्ये झाले 
शहीद भारत वीर जवान 
व्यर्थ नाही जाणार हो १७
अमर जवानांचे हे बलीदान .

घनश्याम बोह्राडे 
समुह क्रमांक 19

*स्पर्धेसाठी चारोळी*


आकस्मिक चारोळी स्पर्धेसाठी :
करीत सीमा रक्षण 
शहीद वीर जवान 
श्रद्धांजली अश्रु दोन 
देशभक्ती बलवान 
:बाबू फिलीप डिसोजा 
 निगडी, पुणे ४११०४४ 
@39


आपले देऊनी प्राण 
झाले अमर जवान 
देशरक्षणाचा प्रण 
शत्रूची ती धूळधाण 
:बाबू फिलीप डिसोजा 
@39


 आकस्मित चारोळी स्पर्धेसाठी

मातीच्या रक्षणासाठी
ओवाळीला देशावर प्राण
सुपुत्र माझ्या मातीचे
विर शाहिद जवान

         अमोल अलगुडे
              स क्र 51
           

*स्पर्धेसाठी*

आज आतंकवादी घातपाताची
जम्मु - उरी हद्द पार झाली..|
पुन्हा शहीद १७ वीर जवान
तयां 'शब्दसुमनांची' श्रद्धांजली..||

💐💐💐💐💐💐💐💐

✍🏻 संतोष शेळके / कर्जत @24


आकस्मिक चारोळी स्पर्धा

पाकच्या नापाक कारवाया
काढणार अजून किती कळी
वीर जवानांचे *'शहीद*' नावावर
अजून किती जाणार बळी.?

ज्ञानदेव काशीद🇮🇳

✨✨63✨👈


जम्मू-ऊरीत केला दहशदवाद्यांन नंगा नाच
आता येईल त्याचे सर कलम करा17जवानास न्याय मिळेल खरा हाच....

❎स्पर्धेस नाही❎

कल्पना जगदाळे@8★बीड


आकस्मीक चारोळी स्पर्धेसाठी

बाॅर्डरवरती ढाल छातीची करूनी
अविरत लढती देशाप्रती निष्ठा स्मरूनी
म्हणून आम्ही निद्रा घेतो आज जीवनी
वाहु श्रध्दांजली अनमोल कार्य स्मरूनी
       शशी खंडाळकर 9890816527


आकस्मिक चारोळी स्पर्धा
**********************
सीमेवरती करती रक्षण 
आमचे शूर सैनिक महान
शत्रूंनी भ्याड हल्ला केला
शहिद झाले वीर जवान
 प्राची देशपांडे 
समूह क्र. १५


👣आकस्मिक चारोळी स्पर्धा 👣
   🎯भाग --14 वा🎯

व्यर्थ न जावो त्यांचे बलिदान
१७ अमर वीर जवानांचे रक्त
धडा शिकवावा लागेल पाकला
सर्वांचीच तयारी हवी फक्त

@२१ सुनिल बेंडे
   *नाथसेवक*
              

आकस्मिक चारोळी स्पर्धेसाठी
——————————————

मानवतेच्या शञूंचे
वाढू लागले बळ
शहिद झाले वीरजवान
उद्ध्वस्त लष्करी तळ !!
-    आबासाहेब निर्मळे
पेठ वडगांव,कोल्हापूर
9028090266.


🇮🇳अकस्मिक चारोळी स्पर्धा🇮🇳
     
       🍁भाग 14 वा🍁            

श्रद्धांजली देतो तुम्हा
    शहीद वीर जवान
  भारत भू च्या रक्षणा करिता 
     अर्पिले तुम्ही पंच-प्राण****

 जोगदंड जयश्री,तेलगाव
@jj 62


 🇮🇳आकस्मिक स्पर्धा 🇮🇳

घुसला शत्रू मध्य रात्री
हल्ला केला देशावर 
प्रणाम त्या 17 शाहिदाना 
लढले ते प्राण घेऊन हातावर 

श्रुती खडकीकर 
61


आकस्मिक चारोळी स्पर्धेसाठी भाग१४ वा                     वणवा सर्वच बाजूंनी उरी स्थानात ।                           जवान शहीद ताऱ्यांनी वीर क्षितिजात।।                         अर्पून जीवन फुलवी किर्ती भारतात ।                            विद्रोह छेदत टिकवी शांती मानवात  ।।                               निता आरसुळे,जालना @८९


आकस्मिक चारोळी स्पर्धेसाठी
———————————
भारतीय लश्करावर हल्ला हा
दहशदवाद्यांचा डाव आहे
सतरा जवान शहिद माझे
हा  काळजावरचा घाव आहे!!


-    आबासाहेब निर्मळे
पेठ वडगांव,कोल्हापूर
9028090266


 नापाक इरादे पाकचे उध्वस्त करण्या
लढले भारतवीर सीमेवर.....
देऊन प्राणाची आहुति देशासाठी
हे 17 वीर झाले अजरामर....
💐💐 श्री सगर पी एच💐💐
 @83@ धर्माबाद✍ स्पर्धेसाठी✍


 आकस्मिक स्पर्धेसाठी 
*आतंक दाटले हरामखोर मनात,*
*मानवी अवमूल्यनात होऊन ते बेईमान ..!*
*उधळण्या नपूंसक आतंकी मनसुभे,*
*शहीद वीर जवान त्यांच्या चरणी नमन ..!*
  
                  बंडोपंत कुलकर्णी सोलापूर 
                  समूह क्रमांक १३


[9/19, 2:19 PM] ‪+91 90492 11785‬: शहिद वीर जवाना
नमन तुझ्या शौर्याला
नापाक इरादे उधळले तू
बलिदाने रक्षिले तू मायभूला.

-----सुवर्णविलास (40)
 मनस्वी श्रद्धांजली पर (स्पर्धेसाठी नाही)


 🇮🇳आकस्मिक स्पर्धा🇮🇳

❎स्पर्धेची नाही❎

*आतंकाने बाहुपाशेत *उरी*कशी गिळली,

माझ्या जवान बांधवांच्या श्वासात शौर्यता विरली,

अमरावतीचा जवान पण****आताच घटना कळली ,

माझ्या शहीद बांधवांची *आठवण* काळजात मी कोरली****

🇮🇳वृषाली वानखड़े🇮🇳

🌴अमरावती🌴*75*✍🏻......


 🇮🇳 *आकस्मिक स्पर्धा*🔫

20 शहीद शुर जवान
करतो आम्ही भारतीय वंदन
कारण घरदार सोडुनी 
देशासाठी केले तुम्ही प्राण अर्पण

*आप्पासाहेब सुरवसे*
    _AMKSLWOMIAW_
             *AK47*
    ❎ *स्पर्धेसाठी नाही*❎


आपला जवान शहीद होतो
आतंक्याला धर्मच वाढवतो
"उरी" ऐकूनच उर भरून येतो
कंठ ... कंठ कंठ दाटून येतो 

         वंदे मातरम 


नितिन डोळे गेवराइ जि बीड



"त्रिगिधाडी नापाक संगर

 अमर जाहले सिंह सतरा

 उरी रक्तरंजित दिसे जरी

 कृतार्थ वीरमातांच्या नजरा"🇮🇳
.......
........जयश्री 🖌

 *आकस्मिक स्पर्धा*

लेकासाठी टाहो उर बडवते आई
उरी कश्मीरात गेला तिचा वाघ
दहशतवादी पाकिस्तानी देश हा
ठेचून काढावा सरकारने विषारी नाग


*आप्पासाहेब सुरवसे*
_AKSLWOMIAW_
          *AK47*
❎ *स्पर्धेसाठी नाही* ❎


शहिद वीर जवान
आकस्मीक साठी
%%%%%%%%%%%%%%%
आसवांचे बांध फूटले
बघून शहिद वीर जवान....
हसाडली पाहिजे आता
दहशतवाद्यांची जुबाना....॥
%%%%%%%%%%%%%%
                           श्री. हणमंत पडवळ
                                    क्र : 48


शहिद वीर जवान
==============
१.
आम्ही खुशाल इथं
ना फिकीर ,ना भान
सदैवं झुंज मरणाशी
शहिद झाले वीर जवान...॥
२.
बोथट शब्दांनी
निषेध होईल पुन्हा
शहिद झाले वीर जवान
कांहीच नव्हता त्यांचा गुन्हा...॥
३.
कागाळी पाकड्याची
शहिद झाले वीर जवान
शेपूट कुत्र्याचे वाकडे....
आता आवर आमचे तुफान....॥
४.
आसवांचे बांध फूटले
बघून शहिद वीर जवान....
हसाडली पाहिजे आता
दहशतवाद्यांची जुबाना....॥
५.
शाहिद वीर जवानों
विसरेल कसा देश तुम्हा
सदैवं राहिल तुमचा
अभिमान आम्हा.....॥
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%
                           श्री. हणमंत पडवळ
                                    क्र : 48

तिथे सीमेवर होतात
शहीद वीर जवान
इथे जातीसाठी मोर्चे काढणारे
नेते आम्ही महान

               शैलजा ओव्हाळ/चिलवंत
                           बीड
                            @ 73
                       स्पर्धेसाठी नाही



🇮🇳अकस्मिक चारोळी स्पर्धा🇮🇳
     
       🍁भाग 14 वा🍁            

श्रद्धांजली देतो तुम्हा
    शहीद वीर जवान
  भारत भू च्या रक्षणा करिता 
     अर्पिले तुम्ही पंच-प्राण****

 जोगदंड जयश्री,तेलगाव
@jj 62


🇮🇳वाढतो आहे भारतावर
     पाक चा क्रूर अत्याचार
     बळ नाही समोरा समोर लढण्याचं                           म्हणून  नित्य करतो असा पाठीत वार
                                        
   🇮🇳62 जोगदंड जयश्री 
  🍁 स्पर्धेसाठी नाही🍁


नापाक इरादे ठेऊन मारती असे डल्ले 
बड्या शक्ती देत आहेत सबुरीचे सल्ले 
विर जवान अजूनही  किती होतील शहीद
किती सहन करायचे शत्रूचे छुपे हल्ले ?
पी.नंदकिशोर 
@43 
( आकस्मिक स्पर्धेसाठी )


राखण्या भारतभूची शान
जाहले शहीद वीर जवान
सरकारने ठेवावे याचे भान
न जावो व्यर्थ हे बलिदान 

             शैलजा ओव्हाळ/चिलवंत
                          बीड
                        @ 73
                    स्पर्धेसाठी


आकस्मिक चारोळी स्पर्धा

*का करता भ्याड भाडोत्री हल्ला*
*येवून समोरा समोर एकदा लढाना*
*शत्रूचा मग अखेरचा मुडदा आम्ही*
*अर्पण करू त्या शहीद वीर जवाना*

किशोर झोटे@32
औरंगाबाद.



आतंकवादी हैवानाने
घातला उरीवर घाला
शहिद भारतमातेचे पुत
आसवांनी पदर ओला झाला


         खेडकर सुभद्रा बीड (२०)
मो नं (९४०३५९३७६४)


 🇮🇳*स्पर्धेसाठी*🇮🇳👈

*रणफंदी*, आक्रोशला जसा तू तसा तुझ्या शौर्याचा जोर,

भूमातेच्या छातीवर का खेळतो हा दानवी आतंकी चोर ?

आक्रन्दली माया, माऊलीच्या प्रेमाची साजुक ओल,

शहीद जवानों तुझ्या कांतेच्या भाळी अधुरीच विरली कुंकवाची *कोर*✨

🇮🇳वृषाली वानखड़े🇮🇳

🌴अमरावती🌴*75*✍🏻...............


आकस्मिक स्पर्धेसाठी ....
भावपुर्ण श्रद्धाजंली वीर जवानांना..

नामर्द पाकडी किड ती
सदैव वळवळत रहायची...
भावपुर्ण श्रद्धाजंली वीरांना
वेळ हीच हि किड ठेचायची....

रोहिदास होले .....७१
गोपाळवाडी ,दौंड ,पुणे.... १९/०९/२०१६


🌟अकस्मित स्पर्धा🌟

वीर शहीद जवान
जम्मुत 20 झाले
त्यांच्या आहुतीने
देशाचे ह्रदय हेलावले


☀*👆🏿स्पर्धेसाठी👆🏿*☀

सुनिता मचाले-चौधरी,औ.बाद.



🌹आकस्मिक 🌹
शहीद वीर जवान🇮🇳🇮🇳🇮🇳
स्पर्धेसाठी 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
तुझ्याच साठी भारतमाते
जगु या मरु हीच लालसा
शहीद होवू दे वीर जवान
पाकला पळवून करीन खालसा🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳***
स्नेहलता कुलथे 
मोबा7588055882
क्र.37🌹
***************************
🌹
झेंडा माझ्या हाती देशाचा
न झुकवी त्याचा ताठपणा
न भिऊ शहीद होऊ म्हणुनी 
दाखवु पाकला आमचा राठपणा
***************************
नका बांधू देशाला सरहद्दीत
नका पेटवु मने इरेला
नका करु शहीद जवानाना
मिळु द्या त्याना आनंद वर्षाला
*************************
स्पर्धेसाठी नाही


स्पर्धा साठी
**********
शहीद वीर जवानांना सलाम
असेतुहिमाचल करतो आहे 
सैतानी विचाराच्या पाकला
ऊरीउरातून शाप भरतो आहे.

संजय खाडे , क्र .७६.
औरंगाबाद .
मो. ९४२१४३०९५५


आकस्मिक चारोळी स्पर्धेसाठी


बस झाल्यात चर्चा आता रणगाडेच बोल्ले पाहिजे ।
पाकिस्तानी कोल्ह्यांना नागडं करुन सोललं पाहिजे ।।
भारतभूच्या रक्षणार्थ रोजच शहिद होताहेत विर जवान
निधड्या छातीने लढणा-या अनाम विरांना माझा ञिवार प्रणाम ।।


✍🏻✍©:-कवी अनिकेत जयंतराव देशमुख. (अनु)
            रा- गोपालखेड , ता. जि. अकोला.
                    mo-9689634332
@59


१ ) 
      पाठीत सुरा खुपसता तुम्ही
      अशी कशी तुमची करणी
       मान ताठ ताठच आमची
       भूमी ही शहीद वीर जवानांची

२ )
     भाडयाचे अतिरेकी घेवून 
      रात्रीची घुसखोरी करता
      गाडती त्यांनाही येथेच जवान
      किती वेळा तुम्ही उघडे पडता

३ )
      सगळी कडे गोळी बार
      हात बाँब किती फेकले
      झाले शहीद वीर जवान
      अतिरेक्यांचे पाडले मुडदे

४ )
     आमच्या चांगुलपणाचा
      फायदा किती हो घेता
      यमसदनी धाडतो तुम्हा
      वीर जवान शहीद होता

किशोर झोटे@32
औरंगाबाद.


साहित्य दर्पण 
आयोजित 
आकस्मित चारोळी स्पर्धा 
अरे बंद करा असले भ्याड हल्ले
साहसी आमचे वीर जवान 
प्राणांची आहुती देऊन
फुलवितात भारताचे नंदनवन ...
       - ऋषिकेश देशमुख 
         अनुक्रमांक : ५८




*साहित्य दर्पण*

*अकस्मिक चारोळी स्पर्धा*

🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹

*मर्यादा संपली सहनशीलतेची*

*किती जवान शहीद होणार?*

*आता खरी वेळ आहे*

*होऊ द्या लढाई आरपार*!


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*चौधरी बालाजी सर*

*समुह* *क्र*. *82*

🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹
[9/19, 6:38 PM] ‪+91 94237 15865‬: आकस्मिक चारोळी स्पर्धा
*********************
विषय--- शहीद  वीर जवान
-------------------------------------
भारत भू चे तुम्ही वीर जवान
देशाला असे तुमचा सार्थ अभिमान
बदला घेऊ असा पाकड्यांचा
शहीद झालात जरी व्यर्थ न हो बलिदान
****************************
सौ.मीना सानप बीड @ 7
9423715865
स्पर्धेसाठी👆



 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
स्पर्धेसाठी

आता समरांगणी लढायची हीच खरी वेळ आहे,

रोजच्या शहीद बातमीने काळीज चिर्र चिरत आहे.....

चर्चा तोडगे कारणे बस्स आता निर्णय घेणे आहे..

पाकड्यांना कापायची हीच तर खरी वेळ आहे.....

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
बोला भाssरत माता की जय
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

माळेवाडीकर रोहिणी 36 माजलगाव.



🇮🇳अकस्मित स्पर्धेसाठी🇮🇳

 *🇮🇳अमर शहीद जवान🇮🇳*

~||||||||||||||••••••||||||||||||||~

अमर शहीद जवानांची किंमत *मदत* या शब्दात बांधली जाते
आतंकी हमल्यानंतर मात्र शांतीपाठ चर्चेचे गुऱ्हाळेच चालले जाते

        🇮🇳स्पर्धेसाठी🇮🇳

कल्पना जगदाळे@8★बीड


आकस्मिक स्पर्धेसाठी
——————————
दहशतवादी हल्ला म्हणजे
पाकिस्तानचा विखारी खेळ आहे
सतरा जवान शहिद झाले
हिच ठेचण्याची वेळ आहे !!
    -आबासाहेब निर्मळे
पेठ वडगांव ,कोल्हापूर
9028090266
क्र-३१


*"" आकस्मिक स्पर्धेसाठी ""* 
_________________________
पाकड्यांनी केला रात्रीस भ्याड हल्ला 

*शहीदांच्या रक्ताने भारतभू नहाली*

भिजलेल्या डोळ्यात अंगार का पेटेना

*का मायभू भारता वेळ तुझ्यावर आली ?*
--------------------------------
*अँड. अमोल देशमुख*
क्र. ५७ 


आकस्मिक स्पर्धेसाठी....
अमर हुतात्मे झाले
देऊन प्राणांची आहुती ।
करा अतिरेक्यांवर कारवाई
सज्जड दम देणार तरी किती? ।।
नरेंद्र म्हस्के , शिरपूर @ 65


स्पर्धेसाठी. 

रात्रंदिन सीमेवर पहारा करती
भारत भूचे  सैनिक महान
होती शहीद वीर जवान 
धन्य  ती  माता  महान. 

   पुष्पा सदाकाळ भोसरी


शूरवीरांचा देश आपला 

शौर्य आमुची गाथा आहे 

भ्याड हल्लेखोर पाकड्यांचा 

किती कलंकीत माथा आहे....
...........................................

अँड. अमोल देशमुख
१९ सप्टेंबर २०१६



*जगले क्षणभर वाघासारखे*

*लढले तळहातावर घेऊन प्राण*

*मातृभूमि रक्षणार्थ झुंजले*

*17 शहिदामर विर जवान*


        ✍ प्रणाली काकडे✍
            समूह क्रमांक pk38


आकस्मिक स्पर्धा...

अरे, भेकड हल्ला खोरांनो
नव्हती कधी हिंमत तुमच्यात
म्हणूनच धोक्याने वार करुन
वीरांना पाठविले यमसदनात

निर्मला सोनी.


धन्यवाद......💐💐💐🙏🏻

         ~*संकलन*~
संतोष  एकनाथ शेळके / कर्जत

No comments:

Post a Comment