Sunday, 18 September 2016

कृतार्थ पालक

[9/18, 3:34 PM] Surwase Bsnl: 📚 *साहित्य दर्पण* 📚

         द्वारा आयोजित

 👩‍👩‍👧 *साहित्य दरबार* 👨‍👨‍👧‍👧

*विषय →कृतार्थ पालक*
==================

             संघर्षमय जीवनप्रवासाची यशस्वी  जीवन गाथा म्हणजेच कृतार्थ पालक म्हणून
मी सुभद्राताई खेडकर यांची आज निवड करतो आहे . त्यांना मी फक्त मागच्या फक्त आणि फक्त चार माहिन्यापासून ओळखत  आहे .
त्यांची जन्मतारीख रेकॉर्डप्रमाने  (१ .६.१९६४)खरी काय असेल देव जाणो असे त्या म्हणतात. कारण त्यांचे  आई वडील हे अशिक्षित होते म्हणून नक्की जन्म तारीख काय ही माहिती नाही .त्यांची आज मुले ही   मुल आपापल्या ठिकाणी   उच्चपदस्थ आहेत मोठा मुलगा सांख्यकी मध्ये अधिकारी आहे सुनबाई दोघेही नोकरीला  दुसरा मुलगा डॉक्टर नेत्रशल्य चिकित्सक
मुलगी औरंगाबाद येथे स्त्रीरोग चिकित्सक आहे जावई बालरोग चिकित्सक आहेत त्यांना बोलताना  मन अगदी भरून येते कारण डोळ्यांना पाणी आल्याशिवाय राहत नाही .
      त्या नववीत असताना त्यांचा विवाह झाला . त्याकाळी खेड्यात मुलगी थोडी मोठी झाली की आईवडीलांच़्या जीवाला घोर लागायचा एकदा लेकीचं लग्न झालं म्हणजे सुटलो एकदाच असच काहीशी लोकांची मानसिकता होती नव्हे आज ही खेड्यात तीच मानसिकता आहे मला तरी बदल झालेला वाटत नाही .मुळात गरज आहे मानसिकता बदलण्याची..!!!
     सासर हे खुप छोटसं खेडेगाव  .त्यांचे यजमान शिक्षक होते पण सर्व कुटूंबाची जबाबदारी एकट्यावर घरची परिस्थीती बेताचीच अशा परिस्थीतीत त्या  माहेरी एकत्र कुटुबाच्या प्रभावात वाढलेल्या असल्याने नवऱ्याच्या कामात कधी अडथळा बनल्या  नाहीत कारण त्यांना त्यांच्या अडाणी आई वडिलांनी बाळकडू  दिलेले होते म्हणून  निस्वार्थीपणे सगळ त्यांनी सर्व काही चालवलं  होतं. ते अगदी रडत पड़त नाही तर अगदी मनातून...!!!
   लग्न झाल्यावर  त्यांना सरांनी शिक्षणासाठी  प्रोत्साहीत केले .  सरच वर्गशिक्षक होते आणि बायको ही विद्यार्थी या दोन्ही महत्वपूर्ण  भूमिका  पार पाडल्या . त्यांनी दहावी नंतर डी एड केले  व शिक्षिका झाल्या.
     दिवस मागून दिवस जात होते  . सानप सरांचे दोन भाऊ मोठ होते .ते  शेती करत छोटे नोकरीला लागले . एकत्र कुटुबात सानप सर कधीही स्वार्थ म्हणुन वागले नाहीत .
शेती घर काहीही घेतले की ते वडीलांच्या किवा भावाच्या नावावर करायचे . म्हणायचे सूर्य चंद्र आपल्या जागा बदलतील पण माझे भाऊ कधीच बदलनार नाहीत . हे डोळ्यांच्या  कडा ओल्या करणारे वाक्य मला या ठिकाणी नमूद करावेसे वाटते .सुभद्रताई  यांना काही गोष्टी घरात दिसायच्या पण त्या केंव्हाच त्याविषयी एक ही शब्द  बोलु शकत नव्हत्या सर्व काही सोशत  होत्या कारण बाळकडु पिलेल्या होत्या.

आणी  काही प्रापंचिक अडचणीतुन खुप मोठे संकट त्यांच्या  कुटुंबावर आले त्यांचे दोन्ही दीर  यांनी खुप त्यांना अखेर शेवटी पाठीत खंजीर खुपसित  मोठा धोका दिला .इस्टेट  कमवुन घेतली
व सगळ कर्ज सानप सरांवर ते जिम्मेदारी झटकुन मोकळे झाले. त्यांचा
 मोठा मुलगा म्हणजेच प्रवीण हा  नुकताच इंजिनीयरींगला लागला होता .
    दुसऱ्याने दिलेला धोका माणुस सहन करु शकतो पण आपल्याच माणसांनी हे कराव हे सहन करण्यापलीकडचे होते .याची जाणीव त्यांना सुभद्रा ताई यांना होती  पण अशा वेळी एकाकी पडलेल्या नवर्याला साथ देते तीच  खरी अर्धागिणी म्हणजेच बायको ..!  त्यांना त्याचा खुप त्रास होत होता पण इलाज  ही नव्हता. एवढी बिकट  परिस्थीती झाली , एका दिवशी सानप सर हारले आणि आपल्या सखीला म्हणाले , " मी हे सहन करु शकत नाही मला जगायची इच्छा नाही तु मुलांना साभाळ"  त्याच क्षणी या *आजच्या आधुनिक सावित्रीचे*अर्थातच _सुभद्राताई_ याचं
काळीज फाटलं आणी त्याच क्षणी  सुभद्रा ताईनी निर्णय घेतला काहीही नसल तरी चालेल फक्त  यांची काळजी घ्यायची . त्यांच्यातील एक शिक्षिका जागी झाली . माणस आत्महत्या का करतात ? मरण कुणालाच नको असत ! परिस्थिती त्याला  तसं बनवते.  ज्यावेळी कुणाचाच आधार राहत नाही .त्याचवेळी माणूस एव्हड्या टोकाची भूमिका घतो आणि त्याच्या मानसिक क्षमतेचे खच्चीकरण होते .तो मानसिक दृष्टया विकलांग होतो आहे. त्याच क्षणाला सुभद्राताईनी ठरवलं एक वेळ उपाशी राहीन . सगळ्या इच्छा त्याच वेळी त्यांनी  गाडुन पुरून टाकल्या.आहे त्या परिस्थीत कस जगायच हे याचा आदर्श वस्तुपाठ अनुभवातुन शिकवायला त्यानी  मुलांनाही तसच घडवलं . फक्त ध्येय एकच मुल शिकली पाहीजेत.हेच ध्येय त्यांनी ठेवले पण त्यातून ही मनाची नाराजी आणि उदासिनता येते . कधी कधी  सुध्दा जीवनाला कंटाळायच्या कारण चुक नसताना शिक्षा भोगत होत्या .पड़त्या काळात जवळच्या नातेवाइकांनी  पासंगाला ही उभे राहु दिले नाही , पण सख्ख्या बहिणीला वातावरण  माहीत  असताना तिने ही हात वर केले तेंव्हा या त्या बहीनीला एक भावनिक साद हाक मारली  त्या  त्यांना म्हणाल्या की , "मी थकले गं ,हारले गं, आता तु मला एक वचन दे की मी नसतांना तु माझ्या मुलीला सांभाळशील का ?".
त्या वेळी हीच बहीण   पण ती काहीच बोलली नाही  .त्याच क्षणी सुभद्रा ताई यांनी निर्णय घेतला.  काहीही झालं तरी असे विचारही मनातही आणायचे नाहीत.
  एका मागून एक दिवस जात होते . त्यांचा दोन नंबरचा मुलगा एम बी बी एस  ला लागला. हळुहळु टेन्शनही कमी होवु लागल. मुलगी पण एम बी बी एस ला लागली.
खरतर मुलांमुळे त्यांना  पुर्नजन्म मिळाला असे म्हटले तरी वावगे  ठरनार नाही. कारण अशा कठीण परिस्थीत त्यांनी या आधुनिक सावित्रीबाई सुभद्राताई   यांचे स्वप्न पूर्ण केल
      आजच्या या कृतार्थ पालक लेख लिहिण्याच्या प्रसंगी सांगण्याचा उद्येश हाच की कितीही संकट येवूदे आपण आपला आत्मविश्वास सौ सुभद्रा ताई खेडकर मॅडम यांच्याप्रमाणे जागृत ठेवावा .
      आज सगळ कस मस्त त्यांचे चालले  आहे .पण ते त्यांना आज ही  दिवस आठवले  त्यांच्याच नव्हे तर हे वाचणाऱ्या  तरी अंगावर काटा येतो ,शहरा उभा राहतो. मुले जाणीव ठेवून आहेत .सगळे खुप मन सांभाळुन रहातात .पण त्या  काळातील एखादा भावनेच्या भरातील चुकीचा निर्णयाचे परिणाम काय झाले असते हे आता विचार करवत नाही म्हणून नियतीला हे सर्व मान्य असावे असे वाटते. त्यांचे यजमान म्हणजेच सानप सर हे आज रिटायर्ड आहेत.  सुभद्रताई ह्या आज कर्तव्यदक्ष आणि मनमिळावु आणि लोकप्रिय  मुख्याध्यापक आहेत. जवळकुणी दुखी कष्टी असेल तर पाहवत नाही . आपल्या परीने मदत करावीसी वाटते त्यांना वाटत राहते म्हणून त्या आपला संपत्ती सहयोग नेहमी सामाजिक कार्यक्रमात हिरिरिने पुढाकारी वृतीने सहभागी होतात. त्यांना
शाळेतला उपाशी चेहरा कळतो  .म्हणून मुलाच्या खुप जवळ जायला त्यांना जमते. आणी याच स्वभावामुळे त्यांना ही  वयाच भान न राहता आज ही सलग 170 किलोमीटर ये जा  करतात.

             एके दिवशी  मी बीड शहरात  दिवसभर होतो .त्यात मी खुप घाई गर्दीत आपल्या ग्रुप च्या
*सौ* *शुभद्राताई खेडकर मॅडम* यांच्या घरी सपत्नीक सदिच्छा  भेट दिली तर मला एक वेगळा अनुभव आला
कारण मी जेंव्हा नांदेडहुन घरी सणावारानिमित्त यायचो  तेंव्हा माझी आई माझी वाट पाहत रस्त्याकडे डोळे लावून उभा रहायची
आगदी  →अगदी त्याचप्रमाणे ही आई बालेपीर भागात मॅडम चे घर आणि मी दुपारी फोन केला तेंव्हा
 सौ शुभद्राताई खेडकर  मॅडम ह्या त्यांच्या आईला भेटण्यासाठी शिरूर येथे गेलेल्या होत्या पण त्या आपल्या आजारी आईला  भेटल्या पण मी येतो आहे म्हटलो म्हणून त्यांचा अर्धवट आईकडील माहेर दौरा आटोपता  घेत त्यांनी घेतला आणि नंतर त्यांनी फोन करत कुठे आहात या

आलात का
लवकर या

*आणि अक्षरशः हीच *आई* *मी जास्त वेळ घर शोधु नये म्हणून सलग 40 मिनिट रोड वर आमची वाट पाहत उभ्या होत्या*

पाहताच इतका आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता की माझे शब्द अपुरे आहेत मी निःशब्द आहे या ठिकाणी

नंतर घरात गेल्यावर त्यांच्या सरांशी अगदी मनमोकळे *आप्पा विइथ टी गप्पा* मनमुराद बोललो विचारांची एक वेगळी देवाण घेवाण झाली.

आणि मग श्री सानप सर एक वाक्य बोलले की , *साहित्य दर्पण सोडून चर्चा करुया त्या तर दररोज असतात की तुमच्या गप्पा* मग एकच हशा फिकला आणि मग घरगुती वातावरण चर्चा झाली
आमच्या दोघांचा ही त्यांनी यथोचित सत्कार केला आणि तिला  (धुरुला )तर मॅडम नी साडी आहेर दिला खुप मन भरून आले
आपल्या या आदरातिथ्याने आम्ही दोघे ही भारावुन गेलो
 शेवटी मनात नसताना ही निरोप घेतला
आणि त्यांचा बरोबर एक तासाने  पोहचलात की घरी म्हणून फोन आला
ही काळजी आणि प्रेम
केवळ आणि केवळ
फक्त आणि फक्त

*साद*

खुप लिहावेसे वाटते आहे पण शब्द अपूरे पड़त आहेत
म्हणून थांबतो
एक अनोळखी पालक पण ऑनलाइन ओळखीच्या कृतार्थ पालक म्हणून मी अगदी अभिमानाने नाव सांगेन ते म्हणजे
*सौ सुभद्राताई खेडकर*
   
✍🏼🖊🖋🎯🖋🖊✍🏼
*श्री .आप्पासाहेब सुरवसे
   _AMKSLWOMIAW_
             *AK 47*
9403725973
================================

 *साहित्य दरबार* ( स्पर्धासाठी )

        *कृतार्थ पालक*

              *डॅडी*

     आम्ही सर्वच त्यांना डॅडी म्हणतो, अगदी आमची मुलं अर्थात त्यांची नातवंडे देखील. डॅडी हे नावाच कृतार्थ पालक म्हणून घेता येईल. वय वर्ष फक्त ७३ वर्षे. आजही उत्साहात मुलाने दुसऱ्या मजल्याचे काम काढलय ते देखरेख करताहेत व समाज कार्यही सुरू आहे.
     डॅडी अर्थात आयु.दौलतराव पांडूरंग अवचार मुळ गाव बुलढाणा शेजारी राजूर नजीक ढाबा या गावचे. घरची बिकट परीस्थितीमुळे बुलढाणा मिलींदनगर येथे स्थायीक , मात्र शिक्षणात खंड पडू दिला नाही. त्या काळी शिक्षण घेणे अवघड ( जातीयतेचे चटके सोसत ) अशा वेळस ते B.A. झाले.
      शिक्षण जोरावर मंत्रालयात क्लरीकल जॉब मिळाला. पाच भाऊ दोन बहिणी यांना शिकवले कारण घरात तेच मोठे , शिकवून नोकरी व संसार ही थाटुन दिले. काही वर्षांनी औरंगाबादला बदली , पुन्हा काही वर्षांनी मुंबई शेशन कोर्टात नोकरी. याच दरम्यान चार मुलांचे संगोपन अन् शिक्षण सुरू झाले होते. सासर चे मंडळी पत्निचे भाऊ व इतर यांना नोकरी व पुढे सांसारीक बाबींना हातभार लावला.आनंदनगर ठाणे येथे राहुन नोकरी सुरू होती.
       याच वेळस या कुटुंबाशी आमचा संबंध आला , आम्ही ही तेथेच राहत होतो.घरात त्यांना सर्व डॅडी म्हणत असल्याने मी ही त्यांना डॅडी कधी म्हणायला लागलो तेही कळले नाही.एवढी आमच्या दोन घरांत जवळीक निर्माण झाली होती.पुन्हा काही दिवसांनी औरंगाबाद येथे उच्च न्यायालयाची स्थापना झाली अन् त्यांची बदली तेथे झाली.
       १९९२ ला माझी १०वी झाली अन् काही कारणांनी मला पुढील शिक्षणासाठी औरंगाबादला यावे लागले. पुन्हा एकदा माझा या कुटुंबासमवेत संपर्क आला. ते कोटला कॉनली आनंदनगर येथील शासकीय निवासस्थानी राहत होते, तर मी भीमनगर , भावसिंगपूरा येथे रुम भाड्याने घेतली होती. दोन्ही ठिकाणात अंतर असले तरी मनं जुळली होती. भेटी गाठी सुरूच होत्या.
        मुलगा सतिष सर्वात मोठा माझ्या वयाचा, शितल, त्यानंतर स्वाती व सीमा या मुली. वर्षामागुन वर्ष लोटत होती माझे D.ed. पुर्ण झाले, नोकरी निवड मंडळ कडून होणार असल्याने जुलैच्या भर पावसात ते १९९७ ला माझ्या सोबत होते. प्रत्येक सुख दुःखात माझ्या साठी ते स्वतः आणि संपूर्ण कुटुंब एक अधार होते कारण मी एकटाच राहत होतो.
        काळ पुढे सरकत होता . याच कालावधीत मोठया मुलीचे M.A. होवून लग्न झाले, सतिष चे L.L.B. पूर्ण होवून तो आता HDFC Ergo मधे लिगल अडवायझर आहे , स्वाती B.H.M.S. झाली व आता डोंबिवली येथे सासरी प्रॅक्टीस करते आहे, सीमा इंजिनिअर असून पुण्यात पती - पत्नी खाजगी कंपनीत नोकरीला आहे.
      त्यांच्या कार्यालयीन अधिक्षक या पदावरून सेवानिवृत्ती नंतर त्यांनी ही माझ्या भागाकडेच प्लॉट घेवून बांधला होता. येथे त्रिरत्न बौद्ध महासंघ सोबत कार्य करून धम्म मित्र झाले आहेत. बाबासाहेब यांचे विचार व बुद्धांचा संदेश यांना अनुसरून जिवनभर कार्यरत राहील्याने आजही आनंदी व सुखी आहेत. स्वतः घेतलेले शिक्षण व भाऊ बहिण त्यांची मुले व स्वतःच्या मुलांनाही दिलेले शिक्षण यामुळे त्यांचा आनंद हा चिरकाल टिकणारा आहे.
       मीही आता येथे स्थायीक झाल्याने घरचे सर्व इकडे आले आहेत. डॅडींचे संस्कार, आचरण यामुळे आजही आमचे संबंध पूर्वी इतकेच दृढ आहेत.
        स्वतःच्या मुलांचेच नव्हे तर माझ्या सारख्यांना मदत करुन नकळत अनेकांचे पालकत्व ही त्यांनी स्विकारले. त्यामुळे आमचे डॅडी हे खऱ्या अर्थाने कृतार्थ पालक आहेत असे मला वाटते.

किशोर झोटे @ 32
औरंगाबाद.
94231 53509‬
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
===============================



*साहित्य दरबार*


         🏀 *स्पर्धेसाठी*🏀

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*कृतार्थ पालक*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

पालक म्हणजे जे काय ? हे समजल्याशिवाय कृतार्थता काय असते हे लक्षात येईल.आजची पिढी संगणक टँब ,मोबाइल च्या आधीन झाल्याने खरच पालकाची जबाबदारी चिंतनीय झालीय.
*जो स्वतःच्या मुलाला त्याच्यातील दोष घालवून त्याच्यात सद्गुण उतरवण्यासाठी सतत जागरुक असतो त्याला कृतार्थ पालक म्हणावे*.
पाल्यावर अधिकार गाजवण्यापेक्षा त्याच्याशी मैत्री करावी.कारण मुलाना आपण  जितके प्रेमाने सांगू तितके ते अधिक सकारात्मक प्रतिसाद देतात.खरं म्हणजे लहान मुले अनुकरणप्रिय असतात.त्यामुळे त्यांच्यासमोर होणारी आपली कृती अतिशय चांगली असावी लागते.मी तर असं म्हणेन मुलाना अधिकारवाणी अजिबात रुचत नाही.
त्यासाठी पालक तणावरहित राहणे अवश्यक आहे.आनंदी  पालकच उच्च दर्जाची पिढी घडवू शकतील यात शंका नाही.पालकाने आपण कोणत्याही पदावर असा पण पाल्यासाठी तुमच्या या भौतिक बाबींचा काहीही संबध येत नाही.त्यासाठी त्यांच्याशी प्रेमानेच वागावे.पालकाने विधायक अशा उचित बाबींचे पालन करुन पाल्यावर कृती स्वतःहून प्रेरीत कराव्या.पालक हा पाल्याच्या जीवनातील पहिला मित्र असतो.हल्लीच्या या झगमगीच्या काळात संस्कार करणे अतिशय अव्हानात्मक बाब झालीय.मुलाना शिकवणीला पाठवणे.शाळेवर जबाबदारी सोडून खुशाल राहणे फार धोक्याचे झाले आहे.
🌹उदा....
माझे एक मित्र आहेत आदरणीय महानूरे सर म्हणून.त्याना दोन मुले व एक मुलगी आहे.त्या मुलांचे प्राथमिक शिक्षण देताना लहानापणापासूनच सरानी प्रत्येक बाब विचारपूर्वक मुलाना शिकवली.बाहेर उघड्यावरचे खायचे नाही,मैद्याचे पदार्थ वर्ज्य ,पौष्टीक आहारच ते मुलाना द्यायचे.शालेय जीवनात साहित्याचा वापर काळजीने करायचे .योगासने प्राणायामाच्या सवयी लावल्या.आज त्यांची मुले दोन्ही मुले इंजिनियर झाली .मुलगी नागपूरला मेडीकलला लागली .सरानी मुलांसाठी टी.व्हि.चा वापर बंद ठेवला.स्वतःच्या आशा आकांक्षा वर पाणी सोडून मुलाना स्वतःचे जीवनकर्तव्य समजून घडविले.
🌹दुसरे उदाहरण माझे वडील माधव पांडुरंग चौधरी अण्णानी आम्हा चार भावंडासाठी दिवसरात्र मेहनत घेतली . एक प्राथमिक  शिक्षक असताना सुद्धा योगा प्राणायामाच्या सवयी लहानपणीच आम्हाला लावल्या.लहानथोरांना लीनतेने बोलणे,आईवडीलांचा नितांत आदर ठेवणे यावर खुप त्यांचे लक्ष असायचे.
शारीरिक ,बौद्धिक ,अध्यात्मिक  खरे संस्कार वडीलानी आमच्यावर केले.त्यांचेच उपकार आज आम्ही चांगले नागरीक ,एक चांगला प्राथमिक शिक्षक म्हणून उत्तम जीवन व्यतीत करतो आहोत.

🔹मुलाना अतिताण देवु नये.
🔹आपला जास्तीत जास्त वेळ मुलाना द्यावा .
🔹घरी आलेल्या पाहूण्यापुढे मुलांच्या चांगल्या बाबींचा उल्लेख करत जावे.
🔹फक्त गुण नंबर अशा बाबीकडे जास्त लक्ष देवू नये.
🔹मुलांची आवहेलना कधीच करु नये.
🔹आपणच सर्व करतो अशी भावना न ठेवता भगवंत खरा पालनकर्ता असतो .
🔹नित्य सवयीच्या बाबी ,या चांगल्या असाव्यात.

जगात काय चाललय यापेक्षा मी काय करतोय हे पालकासाठी फार महत्त्वाचे आहे.पालकाने आत्मचिंतन करूनच कृती करत जावे.मुलाना थोरामोठ्यांच्या आदर्श कथा सांगाव्या .चांगल्या कृतींचे दर्शन त्याना करत जावे.अशा बाबी घडल्या तर आजही भक्त पुंडलिकासारखे , श्रावण बाळासारखे पाल्य बनल्याशिवाय राहणार नाहीत.
मुलाना केवळ मोठ्या शाळेत घालून किंवा मोठ्या शिकवण्या लावल्या म्हणजे पालकाचे काम झाले असे अजिबात नाही .आपला पाल्य शाळेत व्यवस्थित जातोय का? शिकवणी काळजीने करतो का? त्याचे मित्र  कसे आहेत? तो बाहेर कसे वागतो ,कसा राहतो या सर्व बाबीवर लक्ष असणे गरजेचे आहे.
आज पालकानी पण मोबाइल टी.व्हि चा वापर मर्यादित करणे करणे अत्यंत गरजेचे आहे.
शेवटी आदर्श पालकत्वाचा हेतूच एक सुजाण ,विनम्र ,कर्तृत्ववान ,संस्कारीत नागरीक बनावा आईवडीलांना सांभाळून या देशाची उत्तम सेवा करणारा देशभक्त निर्माण व्हावा एवढी असावी.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*चौधरी बालाजी
75888 76539
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
===============================


आजचे पालकत्व

काही दिवसापूर्वी जवळच्याच शहरामध्ये एका  सुशिक्षित कुटुंबातील मुलाने आपल्याच आईच्या हत्येची सुपारी मित्राना देऊन हत्या घडवून आणली होती. अशा एक नाही अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. अशा असंवेदनशील घटना दररोज वर्तमानपत्रात वाचून वाचून आपली मनेही आता बोथट होऊ लागली आहेत. अशा घटना घडण्यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला की,लक्षात येते आजच्या पालकांची बदलत गेलेली भूमिका!
       आजच्या चौकोनी कुटुंबात आईवडील हे दोघेही अर्थाजर्नासाठी बाहेर पडतात. या बाहेर पडण्यामुळे  आईवडील व लेकरांचा संबंध हा फार कमी होत आहे. आईच्या पदराखाली लेकरू सुरक्षित असते,ही भावना कालबाह्य होऊन आईवडिलांजवळ लेकराना धाकच रहात नाही,अशी भावना प्रबळ होऊ लागली आहे. पण आजच्या पालकाना हेच कळत नाही,प्रेमात लेकरांची वाढ ही सकस आणि निकोप होत असते. आणि म्हणूनच आजचे पालक त्यांच्या  मुलाना त्यांच्यापासून जेवढे दूर व जेवढे व्यस्त ठेवता येईल तेवढे व्यस्त  ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. वयाच्या अडीच वर्षापासून मुले नर्सरी,प्ले गृपसारख्या शाळेत आईवडिलांनी दाखल केलेले असतात. आणि याहीपेक्षा पुढचे पाऊल म्हणजे याच वयापासून मुलाना खाजगी शिकवण्याही लावल्या जातात. आजच्या बदललेल्या कुटुंबपद्धतीतून आजी-आजोबा नावाचे विद्यापीठ हद्दपार झालेच आहे पण मुलांच्या जीवनातील पहिली अनौपचारिक शाळा म्हणून  आईवडील यांचा उल्लेख केल्या जात असेल. अशा अनौपचारिक शाळा हळूहळू बंद पडून प्ले गृप,नर्सरी,पाळणाघर,खाजगी शिकवण्या या कृत्रिम शाळांचे भरघोस पीक आलेले आहे. संस्कारक्षम वयात आईवडिलांच्या सहवासात मुलाना घरातून ज्या अनौपचारिक संस्काराची रुजवण व्हायची त्यातून त्यांचे एक सक्षम,प्रेमळ,संवेदनशील व्यक्तिमत्त्व विकसित व्हायचे.प्रेमासोबतच,घरात मुलांवर धाक  असायचा. छोट्या मोठ्या चुकांची त्यानुसार शिक्षाही तिथेच भेटायची. त्यामुळे काय बरोबर अन् काय चूक हे तिथेच मुलानाही कळायचे. अशी ऊनसावलीत लेकरांची निकोप जडणघडण व्हायची.  ज्या वयात मुलावर आईवडिलांच्या प्रेमाची शिंपण व्हावी,चुकांची जाणीव आपल्याच माणसाकडून प्रेमाने व्हावी, त्या वयात मुले जर बाहेरच्या व्यवहारी   जगात आपण सोडत असू तर मुलामध्ये कुटुंबाप्रती प्रेम,सद्भावना,सहानुभूती,संवेदनशीलता या गुणांची रुजवण कुठून होईल? आणि आजकाल बरेचजण असेही म्हणतात की,पालकांनी मुलांचे मित्र बना.पण तुलनात्मकदृष्ट्या पाहिले तर हे लक्षात येईल की,जेव्हा पाल्याना शाळेत आणि घरीही ज्या सौम्य शिक्षा व्हायच्या तेव्हाच लेकराना मोठया व्यक्तिसोबत कसं रहावं,त्यांच्याशी अदबीने रहावं आणि त्यासोबतच नकार पचवायची शक्तीही त्यातूनच मिळायची. आज पालकानी पाल्याशी मित्रत्वाची घेतल्याने खरच पालक आणि पाल्य यांचे संबंध सुधारलेत का?याउलट माझे  तर निरीक्षण असे दाखवते की, पालकांनी मुलांवरचा धाक कमी केला आणि मुले हेकट,दुराग्रही झालीत.कोणत्याही परिस्थितीत आपलेच म्हणणे खरे करून घेणारे झालीत. याचे पर्यावसान म्हणजे मग आपल्या आर्थिक गरजा पूर्ण होत नाहीत म्हटल्यावर आईच्या हत्येची सुपारी देण्यापर्यंत मुलांची मजल जाते.
       मध्यमवर्गीय  पालकांजवळ आज पूर्वीपेक्षा पैसा जास्त खुळखुळू लागला. त्यात अपत्ये एक किंवा दोनच! म्हणून आजचा पालकही आपल्या पाल्यावरचे प्रेम हे संस्कारापेक्षा पैशातच अधिक तोलत आहेत.त्याबदल्यात आजची पाल्यही आईवडिलांकडून मिळणारे हे प्रेम पैशातच मोजत आहेत. आपल्या घराजवळ मिळणाऱ्या शिक्षणाची त्याना किंमत उरली नाही. आजूबाजूला छोटेमोठे पण भरमसाठ शुल्क आकारणारे वस्तिगृहांचेही पेव मोठ्या प्रमाणात आले आहे. मग पालक पहिलीपासूनच आपल्या पाल्याना ग्रामीण भागातील पालक जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी,तालुक्याचे पालक जिल्ह्याच्या ठिकाणी,तर छोट्या जिल्ह्याचे पालक अजून मोठ्या शहरात आपल्या पाल्याना वसतिगृहात ठेवून शिक्षण देत आहेत.ही मुले कुटुंबापासून दूर गेल्याने यांची नाळ  कुटुंबाशी जुळतच नाही. अशा वसतिगृहात कुटुंबातील आपलेपणाचे  संस्कार या पाल्यावर होतील का? कुटुंबात होणारे अनौपचारिक संस्कार सोडून,पैसे देऊन अशा बंदिस्त वातावरणात ठेऊन त्यांच्या भावना बंदिस्त करत आहोत,बालवयातच गुलामीचे जीवन त्यांच्या वाट्याला देत आहोत,पाल्यांच्या प्रेमळ  जडणघडणीची जबाबदारी सोडून,पैसा देऊन जबाबदारी टाळत आहोत,असे आजच्या सुज्ञ  पालकाना वाटत नाही का?यात आपले सुजाण पालकत्व कमी पडते, असे पालकांना वाटत नाही का?अशा मुलामुलींकडून कुटुंबावर प्रेम करण्याची अपेक्षा हेच पालक कसे ठेवू शकतात? पाल्यांच्या किमान जडणघडणीच्या काळात म्हणजेच त्यांच्या वयाच्या १४वर्षापर्यंत तरी तो कुटुंबातच असावा! आज सर्वच खेडोपाडी सुध्दा  ७वी पर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध आहे.फक्त गरज आहे सूज्ञ पालकानी डोळसपणे विचार करण्याची!

संगीता देशमुख
09975704311
===============================


✍🏻...साहित्य दर्पण

द्वारा आयोजित✍🏻...

*कृतार्थ पालक*🙏🏻

*कहानी माझ्या आईची*

संघर्ष जिथे नाही तिथे जीवन वसत नाही,

माझ्या बाबांनी सांगितलेली *सत्य कहानी*

अगदी बेताची परिस्थिति असलेले माझे बाबांचे कुटुंब त्यांच्या लहानपणीचे...

बाबांची आई सतत श्वासा ने आजारी, लहान भाऊ शिक्षण चालु , बाबांचे वय तेंव्हा  14 वर्ष.

7 वा वर्ग झाले नी नोकरी मिळाली असे तेव्हाचे....नंतर बाकी शिक्षण करने चालु****

पगार 60 रु. त्यातच त्यांच्या आईचे औषध--लहान भावाचे शिक्षण, वडील बाबा लहान असतांनाच गेलेले.*
त्यामुळे जबाबदारी कमी वयात सांभाळावी लागली, ते ज्या शाळेत शिक्षक होते त्या बाकी सहकऱ्यांची त्यांना खुपच मदत झाली असे बाबा सांगायचे.

अश्याच वेळी त्यांच्या भावाने नोकरी करुन हातभार लावायचे ठरविले, म्हणजे माझे काका.

तोवर बाबांचे वय 27 वर्ष झालेले....आई आजारी, जवळ शेती नाही, स्वतः चे घर नाही, म्हणून बाबा लग्न करीत नव्हते त्यातच भावाच्या आजाराचे कळले, त्यांना तपासणी ला नागपुर येणे जाने, मन अस्वस्थ........
अश्यातच बाबांच्या H. M. ने बाबाला लग्नविषय काढला, बळजबरी ने मुलगी बघायला नेले.......

बाबा माझ्या आईलाबघायला गेले तेव्हा आई 15 वर्षाची 10 वी ला****बाबा 27.
बाबा म्हणाले माझ्या जवळ काहीच नाही,
माझी आई आजारी आहे, भाऊ आजारी, घर नाही, शेती नाही फ़क्त गावकरी माझ्यावर चांगला शिक्षक म्हणून प्रेम करतात, झाले तेव्हाचे काय???मुलीला विचारायचे नाही, पालक जो निर्णय घेईल तोच.माझ्या आईचे बाबा तेव्हा कोर्टात लेखापाल* होते*****
पण मुकपणे आई लग्नाला होकार देऊन चुकली, नवरा---नवरी अंतर 13 वर्ष....
आई ने लग्न होऊन आल्यावर बाबांचे कुटुंब सांभाळून D ed पूर्ण केले, त्या वेळी माझ्या बाबांच्या आईने आईचा भयंकर छळ केला, असे बाबा सांगायचे, तरीही शिक्षण पुर्ण करुन आई बाबांच्या शाळे वर शिक्षिका लागली...

बाबांच्या प्रत्येक पाऊल वर पाऊल ठेवणारी आई गांवाची लाडकी होउन गेली, तेहि खरेच.....
माझ्या लहान काकांचे आजारपण , अगदी भावा प्रमाणे सेवा चालु... त्यात माझ्या आजीची वटवट......
आईचे वाचन भरपूर त्यामुळे तीचे लिखाण सुंदर, त्यात बाबांची साथ.

दोघांचे पगार असल्या मुळे परिस्थिति बदलली, घर झाले पण काका कायमच गेले, त्यांना आईचे खुपच कौतुक, आई-बाबा सावरत नाहीआजी पण...... तोवर आईला माझ्या दादा--ताई ची साथ पण मिळत होती,

संघर्ष करुन जीवन अर्धे झाले, परिस्थिति भोगल्या मुळे गरीबांची मदत करने हा त्यांचा गुणधर्म.....
माझे दादाइंजीनियर, मोठी ताई शाळेवर H.M. &मी ......

सर्वांची लग्ने उरकली 18 वर्ष आधी.....
सर्वच त्याग करुन आईचा संसार आठवतो, बाबाला साथ अखंड , पुन्हा बाबाला  माझा संसारी त्रास, मी सर्वात लहान कुटुंबमधे, माझे लग्न झाल्यावर माझ्या वेदना त्रास त्यांना, त्यातच बाबाला अटॅक**......मी पुर्ण सावरले नाही तर लगेच माझ्या मिस्टर ला******दोघेही एका वर्ष्यात, पुन्हा मी तर सावरले, आई मुळे. पण त्या धक्का मधुन आई बाहेर येऊ शकली नाहीच तर नाही.

आदर्श *शिक्षक पुरष्कार*मिळालेले माझे *आई --बाबा*🙏🏻

वेदना**बोलणे बंद करते, आई च्या प्रेमातून कळले....

10 महीने पुर्वी आई पण संपली*****

आई--बाबांच्या आठवणीत दादाने.......

प्रशस्त, रमणीय 4 एकर *स्मशान भूमि*

गावाला दान* दिली🙏🏻

ज्या गांवकार्यांनी आई--बाबा वर अतिशय माया केली🙏🏻🙏🏻🙏🏻

यातना मात्र कायमच****

✍🏻......वृषाली वानखड़े✨👈
🌴अमरावती🌴75🙏🏻
09921424125
===============================


साहित्य दर्पण आयोजित
साहित्य दरबार
*************
विषय - कृतार्थ पालक
*******************
संघर्षातून जीवन फुलवले
शून्यातून विश्व निर्माण केले
सुसंस्कारांनी मुलांना घडवले
 तेच आदर्श पालक  ठरले
 मी आज आपणाला एका आदर्श पालकाची कला सांगणार आहे
 आपले आपण कौतुक करु नये पण आदर्श पालक म्हणून मला माझे मिस्टर श्री प्रकाश शांतराम देशपांडे यांची मी आपणाला ओळख करुन देणार आहे. दुर्दैवाने ते आता आपल्यात नाहीत पण त्यांनी दिलेले आदर्श, त्यांनी आपल्या आचरणातून मुलांवर केलेले संस्कार यामुळे आज आमची मुले सुसंस्कारी आहेत हे मी आवर्जून सांगू इच्छिते.
 स्वतः कष्ट सोसून मुलांना घडवले त्यांचे सर्व लाड पुरवले ,मुलेही समजूतदार भलते हट्ट नाही केले
   श्री प्रकाश यांचा जन्म खेडेगावातला.गगावी थोडीफार शेती होती पण कुळाला कसायला दिलेली.
माझे सासरे मुंबईला भिक्षुकी करतमहिन्या दोन महिन्यांनी गावाकडे येत नि घरी काय हवे नको ते पहात.सासूबाई एकट्याच मुलांना घेऊन रृहात खेडेगावी वडिलोपार्जित घर होते पण शाळा नव्हती म्हणून दोन्ही मुलांना नातेवाईकांकडे ठेवले दीर परतले पुनः गावाकडे  पण यांनी अतिशय कष्टाने शिक्षण पूर्ण केले अक्षरशः वार लावून जेवले.स्वतः पडेल ते काम करुन  शाळेत जात बुध्दी तल्लख स्वभाव शांत मनमिळाऊ, कुणालाही उलटून न बोलणे हे अंगी गुण.ते दहावीला असताना त्यांचे वडील वारले अजून एक धक्का पण मिनतवारीने शिक्षण चालू ठेवले खूप त्रास झाला पैशाअभावी शिक्षण सोडावे लागते का? अशी परिस्थिती निर्माण झाली अनाथ विद्यार्थी गृहात राहिले पुढे एका नातेवाईकांकडे त्यांना रहाण्यास जागा मिळाली. त्यांच्या दूरच्या आत्याबाई पण त्या बाईंनाही पँरँलिसिसचा अँटँक आला त्या अंथरुणाला खिळल्या तेव्हा त्यांचे सर्व करुन ते काँलेजला जात चितळे यांच्या दुकानात पार्ट टाईम काम करत मग अभ्यास.फी भरायलाही त्यांच्याकडे पैसे नव्हते नादारीवर शिकले नीनि चांगल्या मार्कांनी पदवीधर झाले नि  लाँ कालेजही केले पण ते सोडावे लागले त्या आत्याबाई वारल्या यांचे ते  घर सुटले
पुढे निमसरकारी  नोकरी लागली  त्यांच्या आईला फार
आनंद झाला,पगार कमी होता पण ते समाधानी होते भाड्याचे घर  घेतले नोकरी लागताच आईला आणले.मग आमचे लग्न झाले मी ही रेल्वेत नोकरीला होते पण माझे सर्व सणवार यांनी हौसेने केले पुढे पहिली मुलगी झाली सासूबाईंनी नाक मुरडले त्या मोठ्या मुलाकडे निघून गेल्या मुलगी लहान तिला सांभाळायला कोणी नाही म्हणून मला नोकरी सोडावी लागली याचे आम्हाला फार वाईट वाटले त्यातूनही काटकसर करुन आम्ही संसारात आनंद फुलवला.एक मुलगा एक मुलगी मीही मुलांच्या शिकवण्या घेऊ लागले थोडीफार परिस्थिती सुधारली.मग मुले मोठी झाल्यावर मी लायब्ररीत नोकरी धरली ,माझ्या माहेरच्या लोकांना यांचा फार आधार होता मी सर्वात मोठी यांनी माझ्या बहिणीचे  भावाचे शिक्षणापासून लग्नापर्यंत सगळे केले अगदी माझ्या बहिणीचे बाळंतपणही आमच्याचकडे झाले.
 माझ्या आईवडिलांना शेवटपर्यंत आधार दिला मित्रांचेही खूप केले अडल्यापडल्याला मदत केली पुढे आमचे स्वतःचे घर बांधले मुलांना सुसंस्कृत  आणि सुशिक्षित  केले आज माझी मुलागी इंजिनिआर असून परदेशात आहे पण आपली संस्कृती  जपत आहे तिला गाण्याची आवड म्हणून संगीताचा क्लास लावला खूप खस्ता खाऊन त्यांनी सर्वांना मार्गाला लावले
  स्वतःला शिक्षणाची आवड असल्याने शिक्षणासाठी वा कोणत्याही कारणासाठी ते इतरांना मदत करत.नोकरीतही
अगदी नविन तंत्रज्ञानही आत्मसात करुन त्या परिक्षेत ते पहिले आले
  पण हे नियतीला पाहवले नाही गेल्या वर्षी आजाराचे निमित्त होऊन ते गेले माझ्या मुलाने नी मुलीने खूप केले मुलाने त्यासाठी स्वतःच्या करिअरवर पाणी सोडले पण बाबांचे खूप केले मुलगीही परदेशातून येऊन राहिली होती हे रिटायर्ड झाल्यावर आम्हाला ती अमेरिका दाखवणार होती पण नियतीला हे मंजूर नव्हते मुले नि मी अजूनही सावरलो नाही पण ........आज या निमित्ताने मला त्यांच्याबद्दल लिहून माझ्या भावना व्यक्त करता आल्या ,याबद्दल साहित्य दर्पणचे मनस्वी आभार
जास्त काय लिहू ?
इति लेखनसीमा
 प्राची देशपांडे
98603 14260‬
===============================

"कृतार्थ पालक"
शहराजवळच असणारे माझे गाव शहरीपणाचा तोरा स्वतःत भरुन वावरणारं. शहरातील राहणीमानाची छाप मनावर बिंबवून सदैवं आपणही प्रगत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करणारे माझे गाव. पण खरंच येवढी धडपड करूनही खेडेपणाचा बाज पूर्णतः कुठं बुजत असतो लगेच. पण नवी स्वप्न उराशी बाळगून आणि गावाला सुसंस्कृतपणाचा आणि सुशिक्षितपणाचा वारसा लाभलेला आहे. याचे भान ठेऊन जगण्याचा अनेक कुटुंबे प्रयत्नशील असतात. घरच्या गरिब परिस्थितीमुळं आपणास जे चांगले दिवस बघता आले नाहित, वा आपल्या वाट्याला आलेले हे आजचे दिवस भविष्यात आपल्या मुलां बाळांना दिसू नयेत या विचारात वावरणारे अनेक  पालक गावात आहेत. असाच
विचार मनात बांधून आपल्या पाल्यांना घडविण्याचा चंगही त्यांनी बांधलेला दिसतो.. असे पालक माझ्या गावात आहेत.... देविदास नाव त्यांच. पानाची टपरी चालवत होते ते. गावात जूनी आणि एकमेव टपरी होती त्यांची. सर्वांशी मैत्री आणि मनमिळावू स्वभाव यामूळे नात्याचा गोतावळा फार मोठा.पत्र्याचे साधेच घर आणि पानटपरीवर चालणारा संसार... घरात चार पाच सदस्य संख्या.परपंचाचं ओझं वाहत निघालेले देविदास मुलांना शिक्षण देण्यासाठी आग्रही होते. पण खर्चाचं ओझं पेलवत नाही असं वाटतानाच पत्नीने भाजीपाला विकून आपल्या नवऱ्याला व संसाराला थोडा हातभार लावला. पण घरात सर्वचजन कर्तृत्ववान निघतील असं नाही. तरी आपापल्या परीने ज्याने त्याने आपापले इप्सीत साध्य करण्याचा प्रयत्न नक्कीच केला. दिवसभर कष्टात मरणाऱ्या बापाला पानटपरीवर मदत करण्यासाठी युवराज वेळ देऊ लागला. वडीलांना
म्हणजे देविदास यांना थोडी उसंत मिळू लागली. याचाही त्यांनी फायदा उचलण्याचा विचार केला. आणि कांही शेळ्या पालन करुन रानोमाळ हिंडू लागले. दोन्ही भावंडे कधी मोठा तर कधी छोटा पानटपरी सांभाळू लागले. पण शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता हे काम चालू होते. बाप आणि आई दिवसभर कष्टत होते. डोळ्यात स्वप्न सजवत होती उदयाची. आणि इकडं युवराज गरिबीची जाणीव ठेऊन जिद्द आणि चिकाटीची कास धरून रगडून प्रयास करत होता. पालकांच्या गरिबीला गाडून सौख्याची हिरवळ आयुष्यात आणण्यासाठी मनात खूनगाठ बांधली होती त्याने. आई बापाचे पालक म्हणून झिजने चालू होतेच. उगाळत गेले तरी चंदणाचा गंध कमी नाही होत. अगदी तसंच देविदास आणि त्यांची पत्नी आपल्या कष्टानं झिजत होते पण सौख्य गंधासाठी अर्थात पाल्याच्या आयुष्याला बहर आणण्यासाठी हे झिजणे चालू होते. आणि कांही दिवसात हा बहर आलाच....... युवराज वकील झाला.. आज नामांकित वकिल म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते.
मातीत मळणाऱ्या पालकांनी ज्या धैर्यानं या मातीत उभं केला तो युवराज खऱ्या अर्थानं त्यांचा युवराजच होता. आणि आम्हाला त्यांच्या कष्टाला मिळालेल्या फळाचा अभिमान होता. धैर्य , जिद्द , आणि चिकाटीला कोणी आडवू शकत नाही. हेच
शेवटी खरं आहे. कृतार्थ पालकाच्या पोटी यशस्वी पाल्य हे सूत्र सर्वत्र पाहिला मिळाले तर चोहिकडे आनंदी आनंदच दिसेल. यात शंका नाही.

                               श्री. हणमंत पडवळ
            मु.पो. उपळे ( मा.)ता. उस्मानाबाद.
                   86980 67566
================================

 💎कृतार्थ पालक 💎
      भावी पिढी अर्थात आत्ताची मुले हे उद्याचे नागरिक. हेच भारताचा सुजाण मजबूत समाज साकारणार आहेत. म्हणून मुलांची जबाबदारी सांभाळणारे पालक मुख्य आहे. पालक होणे म्हणजे मुलांचा सांभाळ करणे इतकाच अर्थ न रहाता मुलांच्या गरजा, मन, बौद्धिक क्षमता समजून त्यांच्या जीवनात योग्य वातावरण निर्माण करणे तसेच मुलांचे ध्येय गाठण्यास महत्त्वाची भूमिका बाजाविणे तरच पालक ‘कृतार्थ पालक’ असतो.
    मानवाच्या मुलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा व आरोग्य, शिक्षण, आत्मसम्मान याही गरजा आहेत . य सर्व गरजा पालकच मुलांच्या पूर्ण करतात. महत्त्वाचे प्रेम ,आपुलकी, मोकळीकता, य भावनाच्या गरजा पूर्ण सहजपणे करतात. परंतु कधीकधी व्यावहरीक जीवनातील परीस्थितीची चीड ,अपयश, वेळेचा अभाव, राग मुलावर काढतात, हे टाळणे पाल्यासाठी आणि पालकासाठी अत्तिउत्तम ! एकूणच मुलाच्या भावी आयुष्याला सुरेख कलाटणी मिळेल.
     पालकाची भूमिका आई, वडील, आजी, आजोबा, मामा ,मावशी  इतर नातेवाईक निभावत असतात. सर्वप्रथम पालक आई असते नंतर वडील व नातेवाईक, शिक्षक असतात.असेच विश्वासाचे, आपुलकीचे, सहकार्याचे नाते असणारे कृतार्थ पालक समजूया.
     भारतीय संस्कृतीत अगदी पूर्वापार काळापासून पालकाकडून आपल्या पाल्यामध्ये संस्काराची रुजवणुक करत असे. जिजाबाई यांनी शिवाजी महाराजांवर बालपणात कथाद्वारे संस्कार दिले.शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा राज्यकारभार सांभाळताना संस्कारातून स्त्रियांचा सन्मान, दुष्टाचा नाश, अन्यायाची चीड,बंधुभाव, सर्वधर्मसमान यांचे पालन केले.त्यामुळे आदर्श राजा :शिवाजी राजा असे गुणगान गातो .म्हणूनच जिजाबाई भोसले ‘कृतार्थ पालक’ होत.
‘श्यामची आई’ पुस्तकाचे लेखक साने गुरुजी यांच्यावर तांच्या आईणे उत्तम संस्कार केले, म्हणूनच साने गुरुजी परोपकारी, दया, देशभक्ती,सहिष्णूता गुणाचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. याच गुणांचा विकास होत साने गुरुजी यांनी लेखणीतून कथा,कांदबरी कविता साकारल्या.आजही सर्व समाजाला साने गुरुजी आदर्श आहेत.साने गुरुजी यांच्या आई यशोदाबाई साने ‘कृतार्थ पालक’ आहेत
   थामोस अल्वा एडिसन यांना शाळेतून काढून टाकल्यानंतर त्यांच्याजवळ आईसाठी एक चिट्ठी शिक्षकांनी दिली होती. त्यात काय लिहिले आहे असे आईला चिट्ठी देत विचारले .आई म्हणाली कि तुमचा मुलगा खूप हुशार आहे.आही त्याला आमच्या शालेत शिकवू शकत नाही तुम्ही त्याला घरी शिकवा .याच सकारात्मक भूमिकेतून एडिसन शास्त्रज्ञ झाले.सर्व जगाला प्रकाश देत ! औद्योगिक क्रांतीमध्ये मोठे योगदान दिले ! एडिसन यांच्या आई न्यानसी एलियात ‘कृतार्थ पालक’ आहेत.
 आजच्या एकविसाव्या शतकात मुलगाच हवा असा हट्ट असताना मुलीना सामजिक,आर्थिक करणे देवून प्रगतीपासून जाणीवपूर्वक दूर ठेवतात. याला अपवाद आमच्या मडम स्नेहल आयरे मँडम आहेत .त्यांना दोन मुली आहेत पहिली सायली तर दुसरी किमया .या दोघीही हुशार आणि शांत वृत्तीच्या आहेत. त्यांना बाईनी कधी कारण न देता शिक्षण व  उपक्रमात अव्वल ठेवले आहे .सायली आता डेनटीस्ट डॉक्टर आहे. बाई मलाही मुलीप्रमाणे कधी भेटून फोनवर मार्गदर्शन करतात .आमचे नाते मैत्रीचे आहे. आयरे बाई प्रोत्साहनात्मक भूमिका यामुळे ‘कृतार्थ पालक’ आहेत.
 इंदिरा गांधी यांचे पालक पंडित नेहरू, दीपिका पदुकोन यांचे पालक प्रकाश पदुकोन कृतार्थ पालक ई.उदाहरणे आहेत . अशा प्रकारे संस्कार .विश्वास, सकारात्मकता, प्रोत्साहन भूमिका कृतार्थ पालकच्या आहेत .                            

 निता आरसुळे,
जालना
86524 50032‬
===============================

No comments:

Post a Comment