Saturday, 24 September 2016

kavita

📕📗साहित्य दर्पण 📝🔏

💈💈द्वारा आयोजित 📺📻

📑📃साहित्य सेवा 🖊✏

भाग ::--- *19वा (एकोणविसावा)*

खास कविता स्पर्धा
★★★★★★★★
 _24सप्टेंबर 2016_
वार :::- _शनिवार_
~~~~~~~~~~~~~~~
विषय :---मुक्त कविता
पण 👇🏾👇🏾👇🏾
*हास्य कविता*  किंवा
*पाऊस पाणी कविता*
~~~~~~~~~~~~~~~
संयोजक:--आप्पासाहेब सुरवसे,लाखणगांवकर
____________________
संकल्पना:-- मारुती खुडे सर, माहुर
____________________
परीक्षक --
*निर्मला सोनी अमरावती*
_____________________
ग्राफिक्स --

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯


[9/24, 11:10 AM] ‪+91 95273 02345‬:
🎯 मुक्त कविता स्पर्धा🎯
      भाग 19 वा


☔ पाऊस ☔

रोज रोज शिव्या खाऊन
  दमला होता पाऊस
दोनच दिवस बरसला असा
फिटली सर्वांची हाऊस



केला होता सर्वांनीच
पाण्यासाठी खूप संघर्ष
दोनच दिवस बरसला असा
झाला सर्वांच्या मनी हर्ष


खूप ऐकले तुझे माणसा
आता पुरवली तुझी हाऊस
पाणीच पाणी चौहुंकडे
पाहून त्याला पळून नको जाऊस


शेतकऱ्यांच्या आत्महत्येला
जबाबदार होता पाऊस
नासाडी झाली पिकांची म्हणून
आता दोष नको देऊस.......
जोगदंड जयश्री, तेलगाव
@jj 62


[9/24, 11:41 AM] ‪+91 95273 02345‬:
 😀हास्य कविता😀

☔ पाऊस☔

आता अधिर झालाया
   मग बधिर झालाया
अरे माणसा माणसा तुझ्याचसाठी
पाऊस धावून आलाया.....


पडतोय  बुंगाट, झालाय झिंगाट
        आता पळ तू चिंगाट....
नदी नाल्यांना मोठा पूर आलाया
अरे माणसा माणसा तुझ्याचसाठी
पाऊस धावून आलाया....


रोज रोज सुट्टी आत्ता
घेशील तरी किती
जुनाट तुझा तो पूल
पडायला झालाया......

खळ खळ वहातय पाणी
गातया गाणी आता रंगात आलाया
अरे माणसा माणसा तुझ्याचसाठी
पाऊस धावून आलाया.....

अवखळ पोरावानी
नाचतोय मोरावानी
पाऊसाच पाणी आता
घरात शिरलया......

अरे माणसा माणसा तुझ्याचसाठी
पाऊस धावून आलाया .......

जोगदंड जयश्री,
@ jj 62


[9/24, 11:45 AM] ghanashyam borade:
 कविता -पाऊस

केलती म्या विनंती भौ
म्हणून बरसला पाऊस
फिटली आता माहिबी
पाण्यात भिजायची हौस..

बरेच दिवसा पासून
बिचारा रूसला होता
ढगांच्या गड गडाटांनी
पाऊस बरसला आता ...

लहान पोरा सारख्या म्या
पाण्यात मारल्या उड्या
फेकूण अंगावर पाणी म्या
काढल्या दोस्तायच्या खोड्या ..

बर वाटत नाही या वयात
तरी मनसोक्त पावसात भिजलो
अन् कालच्या पावसात राजेहो
खरोखर बालपण अनुभवलो.

घनश्याम बोह्राडे
समुह क्रमांक 19

*स्पर्धेसाठी कविता*


[9/24, 12:23 PM] 10 Meena Sanap:
📗साहित्य दर्पण व्दारा आयोजित 📕
            साहित्य सेवा
****************************
खास कविता स्पर्धा
-------------------------------------------------
भाग----19 वा (एकोणविसावा )
दिनांक -----24-- 9-- 2016
~~~~~~~~~~~~~~~~~~~
विषय------मुक्त कविता
हास्य कविता /  पाऊस पाणी कविता
☔☔☔☔☔☔☔☔☔
              पाऊस वर्णन
-------------------------------------------------
☘ दुष्काळात  झाली
            तप्त ही  धरती
     वाट  ती  पाहती
                पावसाची

☘ काळे  काळे  मेघ
              जमले  नभात
       आनंदे  मनात
                 बळीराजा

☘ घेई  हात  हाती
              मेघ  आणि  वारा
       न्हाऊ  घाली  धरा
              वर्षावाने

☘ पुलकित  झाली
                वसुंधरा  सारी
       नटली  गोजिरी
                   राघु  रंगी

☘ सप्तरंगी  गोफ
                 नभाच्या  गळ्यात
       प्रकाश  खळ्यात
                 भास्कराच्या

☘ खळाळे  निर्झर
                अवती  भोवती
      धुंद  ही  धरती
                   स्वागताला

☘ धुवांधार  असा
                पाऊस  हा झाला
       सुगंध  ही  ओला
                  मातीला  या

☘ आनंदाने  डोले
                  पशू  पाखरे  ही
        पिलांना  जोजवी
                    घरट्यात

☘ दैना  फार  झाली
              बेघर  वाल्यांची
       चिंता  निवा-याची
                     अजुनही

☘ नदीच्या   किनारी
                 छोटेसे  झोपडे
       गरीब  बापुडे
                     काळजीत

☘ असा  हा  पाऊस
               भारी  अवखळ
        करी   पळापळ
                     मानवाची

****************************
मीना सानप  बीड  @ 7
9423715865
स्पर्धेसाठी
****************************


[9/24, 12:50 PM] minakshi:
*स्पर्धेसाठी कविता*
         ☔     पाऊस।    ☔

अस्सा एक पाऊस,
सैराट होवून आला|
दुष्काळ ग्रस्त मराठवाड्याला,
चिंब भीजवून गेला|

बऱ्याच दिवसापासून ,
रुसला तो होता।
माझा बळीराजा,
त्याच्याच प्रतिक्षेत होता।

खुप हिनवल ओ लोकांनी,
म्हणून दुष्काळाची आग।
पण त्यांना काय माहीत?
बदलतो कधीतरी नाशिबाचा भाग।

झाड़ लावून जगवनार,
निसर्ग हाच देव समजनार।
तू आम्हाला सुखावलस ,
आम्ही तुला सुखावनार।

म्हणतोय विश्वास माझा पाऊस
वर्षोंवर्षी असाच पडणार।
कोकनासम इथेही ,
नारळी बागा बहारणार।

दुःखामागे सुख येतसे,
रित हि जगाची।
दुष्काळा मागे सुकाळ,
किमया निसर्गाची।

अस्सा एक पाऊस ,
सैराट होऊन आला।
मराठवाड्यातील दुष्काळावर,
मात करुन गेला।


मीनाक्षी माळकर
चौसाळा, बीड
68


[9/24, 1:11 PM] Subhadra Sanap:
🎯  *मुक्त कविता स्पर्धा*🎯

    🌧 *पाऊस कविता*⛈
🌧🌧🌧🌧🌧🌧🌧🌧🌧

           🌹*पाऊस*🌹
रिमझिम पाऊस पडे सारखा बिंदुसरेला पूर चढे।
पाणीच पाणी चोहिकडे रे देवा  जावू कशी मी शाळेकडे।।
रस्ते सारे जलमय झाले
ओढे नाले तुडुंब भरले।
पाणीच पाणी चोहिकडे रे देवा जावू कशी मी शाळेकडे।।
गळके वर्ग मोडकी दारे
फुगल्या भिंती गळती छत रे
पावसाने माझी तारांबळउडे रे देवा जावू कशी मी शाळेकडे।।
शाळेला दिली मग आम्ही सुटी
आनंदुन गेली मुले मुली मोठी
असाच पाऊस रोज येवू गडे रे देवा जावू कशी मी शाळेकडे।।
 
              खेडकर सुभद्रा बीड (२०)
           मो नं (९४०३५९३७६४)
( काल बीडमध्ये तुफान पाऊस पडत असतांना सगळे रस्ते जलमय मी शाळेत जात असतांना आलेले विचार)


[9/24, 1:22 PM] ‪+91 94231 53509‬:
प्रकारानुसार काव्य स्पर्धा साठी

             हास्य कविता

               *घोळ*

कॉलेजमधे आज ती दिसली
पाहुण मजकडे ती हसली
हसली मुलगी ती फसली
म्हणून लिहली तीला चिठ्ठी

वाचून ती ही खूप खुष झाली
एल आर रुम मधे कुजबुज ही
मन वाऱ्यावर क्षितीज तीरी
स्वर्ग राहीला जणू चार बोटावरी

मात्र त्यानंतर मला न भेटली
काहीच कसे का न बोलली?
कॉलेजात नित्य ती येत होती
पण दुसऱ्या सोबतच फिरत होती

मला असे कळले होते
तीचे त्यावर मन जडलेले
त्याची च ती वाट पाहत होती
मग चिठ्ठी माझी का स्वीकारली?

पण झालेला *घोळ* मित्रांनो
आता कुठे मला कळला होता
मी ज्या *नावाचा* होतो...........
......................................
*तोही त्याच नावाचा होता*
*तोही त्याच नावाचा होता*

किशोर झोटे@32
औरंगाबाद.


[9/24, 1:32 PM] ‪+91 95529 80089‬:
 मुक्त कविता स्पर्धा
हास्य कविता....महागाईचा फटका
वाहनाची आम्हा भारी आवड
इंधनाची ना पर्वा,ना चालण्याची सवड
तब्येतीशी त्यामुळे उडतो नेहमी खटका
म्हणे महागाईचा आम्हालाच बसतो फटका ।।
टि.व्ही. चाले रात्रंदिनी त्याविना ना चैन
मालिका, चित्रपट वा असो त्यावर क्रिकेटचा गेम
वीजबील बघुन बसतो जोराचा झटका
म्हणे महागाईचा आम्हाला बसतो फटका ।।
साधे नको कपडे हवे जीन्सचे
फॅशन नित्य बदलवितो, नखरे प्रिन्सचे
त्यामुळे झाली स्थिती आमची घर का न घाटका
म्हणे महागाईचा आम्हाला बसतो फटका ।।
रांग लागली मुलांची 'लोकसंख्येत' केली वाढ
खायला नाही घरात, मुलं करतात रडारड
'कुटुंब-कल्याण'मोजतो शेवटचा घटका
म्हणे महागाईचा आम्हालाच बसतो फटका ।।

नरेंद्र म्हस्के , शिरपूर @65


[9/24, 2:02 PM] ‪+91 98506 81198‬:
 🌧 *पावसा...ऐक !*🙏🏻
धो  धो लागला बरसू
धरेवरेती     पाऊस !
नुकसान.... कोणतेही
नको  करून जाऊस! ॥

चातकासम   प्रतिक्षा
केली आहे तुझी राजा
आला  हाकेला धावून
सुखी  वाटे  बळीराजा
काळजी    पेयजलाची
मिटविली जाता  जाता
होता दुष्काळी जो भाग
केला  ओलाचिंब आता
घाल   आवर    जरासा
नको   रागाने   पाहूस !
नुकसान .... कोणतेही
नको करून जाऊस ॥१॥

 तुझ्या करूणेची कृपा
अशी  सजली   अवनी
दिसे  पोशिंदा  सुखात
भासे   आनंद  जिवनी
त्याने पाहीलेले स्वप्न
होत  आहे  रे   साकार
त्याच्या घरादारालाही
थोडा  मिळू  दे आकार
तुझ्या  प्रतिचा   आदर
नको   आज  गमावूस !
नुकसान......कोणतेही
नको करून जाऊस॥२॥

दिस सुखाचे दिसता
बळीराजाच्या पदरी
शेतमाऊली    खुशीत
पीक  डोलते    उदरी
घास  पडावा  पोटात
जगावया     कष्टकरी
पोटभर  ती   मिळू  दे
अन्नदात्याला भाकरी
तुच   दिलेले  हे   दान
नको घेऊन   जाऊस!
नुकसान ....कोणतेही
नको करून जाऊस॥३॥

झाली  धरणे   भरून
पाणी नदीत    मावेना
काठावरल्या जीवांची
पाहवत   नाही  दैना
*"पीक होते जेव्हा खूप*
*तेव्हा  राजानं  मारलं*
*राहीली  कसर बाकी*
*पावसानं    झोडपलं!"*
 येजो पुढच्या सालात
नको भाव तू खाऊस!
नुकसान ....कोणतेही
नको करून जाऊस॥४॥
✍ *पी.नंदकिशोर*
 आकोट जि.आकोला
📞9850681198
24-09-2016(1-50)p.m.
(स्पर्धेसाठी )

[9/24, 2:39 PM] जयश्री पाटील
☔पाऊस अन मी☔

पावसाचे नी माझे
नाते फार भन्नाट
एकमेकाशिवाय
होतो आम्ही सैराट

ग्रिष्माची काहीली
पळते याला पाहून
अख्खी धरती घेते
मनसोक्त न्हावून

माझी होते भटकंती
रिमझिम धारांसोबत
धुक्याची चादर येते
घेवून सर्दीची नौबत

खरं सांगते पावसात
मनमोर नाचतो झिंगाट
खुलवून रंगित पिसारा
बालपणात धावतो सुसाट

तहान-भूक विरते
धावून सख्यामागे
दमून उरती हाती
आठवणीचे धागे

......जयश्री पाटील@11🖌
         *वसमतनगर*


[9/24, 2:54 PM] sagar pandhari
⛈पाऊस.......सुखावणारा⛈

नदी नाले तुडूंब भरले
शिवार गातय गाणी...
आज जिकडे पहावे तिकडे
मज दिसतेय पाणीच पाणी...

तु बरसावा नियमाने
होती सर्वांची हाउस...
तु बरसला असा जोमाने
सर्वजण म्हणू लागले पुरे आता पाऊस....

तुझ्या आगमणाने
तृप्त झाली धरती अन्
सुखावला बळीराजा....
जलमय झाली धरती अन्
सर्वत्र आहे तुझाच गाजावाजा...

बस झाले आता तुझे येणे
हिरावू नको शेतकऱ्यांचा घास...
कसे सांगू तुला आता
शेतातच अडकलाय शेतकऱ्यांचा श्वास...

घे थोडी विश्रांती अन्
बरस पुन्हा जोमाने...
तरच सुखावेल बळीराजा
अन् जगेल अभिमाणाने...

@श्री सगर पी. एच.@
   धर्माबाद @८३@
       (स्पर्धेसाठी)


[9/24, 3:26 PM]  Anil Landge
(काव्यप्रकार :- अष्टाक्षरी)

*‘पाऊस’*

अरे पावसा पावसा,
जरा असा रे बरस।।
रान होऊ देना चिंब,
किती देशील तरास।।१।।

रान झाल सैरभर,
कसं तुझ्या रे वाचून।।
किती करु विनवनी,
बाप गेला रे खचून।।२।।

कष्ट ओतीले मातीत,
नाही पाहवत रानी।।
पाहता बापाच्या मुखी,
नको ते विचार मनी।।३।।

येतांना आला पाऊस,
रान गेलं शहारुन।।
पाही हिरव सपान,
बाप गेला मोहरुन।।४।।

जातांना तू असा कसा,
गेला तांडव नाचून।।
पाहिला बाप रडता,
थेंब पापणी अडून।।५।।


✒अनिल लांडगे उंडणगाव@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050



👆👆स्पर्धेसाठी...👆👆
[9/24, 3:29 PM]  Kavita Deshmukh
मुक्त कविता
☔पाऊस ☔
धो धो धो धो पावसाची त्रेधा तिरपीट सर्वांची .
रस्त्यावर मोटार गाड्यांची .🚗🚕🚌
शर्यत चा ललीय  पोहायची .
आईला शाळेची घाई फार ,
पावसाने  झाली ती बेजार ,
चिंता पडलीय शाळेची.  त्रेधा तिरपीट सर्वांची .
🌧⛈☁🌧⛈
नदीला आलाय मोठा पूर .
शाळा माझी आहे दूर .
मनी विचारांचे काहूर. पण शाळेला सुट्टी कशी द्यायची ?
त्रेधा तिरपीट पावसाची 🌧⛈🌩🌧🌧
बीडच्या  रिक्षा आल्याच नाय ,
शाळेला  जाण्याची सोय काय ?
मग मजा लुटली भिजण्याची .
धो धो धो धो पावसाची . ⛈⛈🌧☁🌧
पाऊस होता मुसळधार फोन करून सारे बेजार  ,
घाई व्हाटसॅप
बघण्याची .😜
धो धो धो धो पावसाची 🌧🌧🌧🌩🌩
पाण्याचा आता प्रश्न सुटला .
दुष्काळाचा ताण मिटला ,
आनंदाचा झरा फुटला ,
चंगळ आहे बळीराजाची ,
धो धो धो धो पावसाची
कविता बडवे 70@
बीड


[9/24, 3:54 PM] 13 Babu Disuza:
खास कविता स्पर्धेसाठी :
-आशाळभूत-
पुन्हा पुन्हा भरून येते आभाळ
पावसाने हो दैना, जीवा सांभाळ
कृष्णमेघे काळोखला आसमंत
पावसाला ती जराही नाही उसंत
रौद्र रूप भरवी मनी धडकी
नजरांना दिपवी वीज कडकी
होई निष्ठूर कां देव दयावंत
लीला ही अगाध, अपार, अनंत
पुन्हा पुन्हा दारूण स्थिती आबाळ
अकाळी, अवकाळी सोडता ताळ
पाऊस पाणी वेळी ये आबादानी
हो जीवनी कृषीवल समाधानी
पिकतील मोती, धनधान्य राशी
समृद्धीची जागली स्वप्ने उराशी
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे
@39


[9/24, 4:01 PM] ‪+91 96574 35292‬
माझ आणि पावसाच
नात जरा आगळ
मला भेटलेल्या पावसाच
रूप जरा वेगळ
            पड, पड म्हणाव तेव्हा
             हा रूसून बसलेला
            आता पुरे म्हणाव तेव्हा
              याचा जोर वाढलेला
माझ्या जवळ छत्रीअसली
तर हा येणार रात्री
नाही आणली छत्री तर
भिजवून मला म्हणतो शुभरात्री
               ऐकायच कस याला
               मुळी माहितच नाही
                सांगाव कस याला
                मला काही कळत नाही
त्याचा हा खोडकरपणा
मला काही पटत नाही
तो जर बरसला नाही
तर थोडसुद्धा करमत नाही
                अस आमच नात
                 आम्हालाच कळेना
                  तुझ माझ पटेना
                 अन् तुझ्यावाचून करमेना

          शैलजा ओव्हाळ/चिलवंत
                     @ 73


[9/24, 4:03 PM]  Kavi Aniket
 स्पर्धेसाठी


।।~ विज्ञानवादी होऊ चला ~।।


एक मुखाने एक दिलाने विज्ञानगीत गाऊ चला।
अंधश्रध्देला दूर सारुनी विज्ञानवादी होवू चला।।
।।धृ।।

विज्ञानाचे युग हे आहे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगुया ।
जादू-टोणा, जंतर-मंतर लुबाडणूक ही थांबवूया।
विज्ञानाचा प्रसार करुनी, जनकल्यान घडवू चला ।।
एक मुखाने एक दिलाने......... ।।१।।

राहू-केतू ,शनिचा फेरा, मंगळ-अमंगळ थोथांड असे ।
दिव्य-दृष्टी लाभते त्याला ज्याच्या मनी विज्ञान वसे ।
चिकित्सक बुद्धीने विवेक अपुला, प्रज्वलीत करु चला ।।
अंधश्रध्देला दूर सारुनी........    ।।२।।

भूत-पिशाच्य, भानामती हे मांञिकांचे दुकान असे ।
ढोंगी-साधू ,फसवे-बडवे ,दगडांमध्ये देव नसे ।
विज्ञानाची कास धरुनी, 'मानवतावादी' होवू चला।।
एक मुखाने एक दिलाने.......... ।।३।।

चंद्रावरती पाय ठेवूनी मंगळालाही तपासले ।
तरली ना पृथ्वी शेषाच्यावरती हे विज्ञानानेच दाखविले ।
विज्ञानवादी चरिञे वाचूनी, 'दाभोळकरांना' स्मरु चला ।।
अंधश्रध्देला दूर सारुनी.......... ।।४।।

सक्षम आणि सुजान भारत विज्ञानासंगे घडवू चला ।
आयुष्याशी सांगड घालूनी समृद्ध करु जीवन सकलां ।
अंधकाराची करुनी होळी प्रकाशीत सारे होवू चला ।।
एक मुखाने एक दिलाने विज्ञानगीत गाऊ चला ।।५।।

✍🏻✍©:-कवी अनिकेत जयंतराव देशमुख (अनु)
           रा- गोपालखेड , पो- गांधीग्राम ,
                ता. जि. अकोला
                 Mo-9689634332
©Copyright - Aniket J. Deshmukh

@59


[9/24, 4:05 PM] Dr. Sunil Bende Vasmat:
🍀खास कविता स्पर्धा 🍀
   🎯भाग -- 19 वा🎯
😜हास्य कविता😜

  *दुसरा हनिमून*

लग्नानंतर पाच सहा वर्षांनी
आली आम्हाला वेगळीच लहर
दुसरा हनिमून करावा म्हणले
तर झाला अनपेक्षित कहर

मिञाकडे दिला महिन्याचा
अर्जित रजेचा लिहून अर्ज
पैसे नव्हते म्हणून काढले
अोळखीने व्याजाने थोडे कर्ज

स्कूटर काढली म्हणले जावे
शेजारच्या पर्यटन स्थळी
गर्दी असेल केवढी नव्हती
ही जाणीव मला त्या वेळी

सापडेना एकही लॅाज रिकामे
कोठेही मिळत नव्हते ठिकाण
धर्मशाळाही भरलेल्या सर्व
निवारा मिळेना समस्या महान

तशातच फिरताना स्कूटर
पडू लागली मधे मधे बंद
वरूण राजाही आला स्वागताला
पाऊस सुरू झाला थोडा मंद

ढकलून स्कूटर अर्धांगी झाली
रागाने लाल, मी झालो परेशान
मिञाकडे थांबावे म्हणून गेलो
तर घराला होते कुलूप छान

स्कूटर लावली एका झाडाखाली
काय करावे विचार केला चालू
लक्षात आले आता परतावे घरी
गावाच्या दिशेने लागलो पाई चालू

येताना मिळाली घरापर्यंत लिफ्ट
भल्या व्यक्तीची एक जुनी कार
झालो थकून भागून अाडवे तेव्हा
वाजले होतेे तब्बल दुपारचे चार

*दुस-या हनिमूनची आठवण येता*
*आम्ही दोघेही थोडेसे घाबरतो आता*

@ २१ सुनिल बेंडे
   *नाथसेवक*
               😎😎😎


[9/24, 4:21 PM] ‪+91 90280 90266‬
हास्य कविता स्पर्धा
—————————
तुला पाहताना
———————
चोरून तुला पाहताना
भिंतीआड दडलो होतो
हात सुटला होता माझा
घसरून पडलो होतो  !
पडताना खाली मी
डोळेच झाकले होते
अंग माझे सारे
चिखलाने माखले होते !
अंग खरचटले सगळे
हुंदका दाटला होता
नवा करकरीत सदरा
समदाच फाटला होता !
अंणातल्या कुञ्याने तुमच्या
मज खुप छळवले होते
चपला सोडून तिथेच
मजला  पळवले होते !
बापाच्या तावडीतून तुझ्या
पुरता वाचलो होतो
वाचलो म्हणून आनंदाने
एकटाच नाचलो होतो !
तो दिवस आठवला की
मज अजून कापरे भरते
पण,तुझी गोंडस मूर्ती
माझ्या नयना पुढती स्मरते!
   - आबासाहेब निर्मळे.
पेठ वडगांव,कोल्हापूर
9028090266.


[9/24, 4:23 PM] ‪+91 75880 55882‬
 🌹मुक्त कविता 🌹
आरक्षणाचा पाऊस....🌹
समानता म्हणजे नेमके काय?
विचार करुन समजले नाय
तुम्हीच सांगा बाबा,जिजाऊ
भाकरीन येतं ना बळ माय...
असून बुद्धी सारखी
झाला न काही फायदा
समानतेच्या हक्कासाठी
लढतो आहे कायदा.....
ऐक्य असावे एकतेचे
नसावा भेदाभेद विचारांचा
का होतो?भेद एकमेकांत
केला का? विचार स्वराज्याचा....
आरक्षण नसावे जातीपातीचे
नसावा लहान मोठेपणा
ज्योती असावी सावित्री
विनम्र अभिवादन फुले बाबांना...
आजवर रडलो पावसासाठी
वाट आरक्षणाच्या पावसाची
वाटत बसलो भारतमातेला
भाऊबंदकीच्या विचारांशी. ....
केला का विचार तिच्या मनाचा
केवढ्या जखमा सहनशिलतेला
आईचे मन निघाले आक्रंदुन
सोडवाना तिच्या या यातनेला....
आरक्षणाच्या पावसाची वाट
डोळे लावून बघताहेत लोक
समान भुखंडावर मरणार तुम्ही
घेना आनंदपावसाचा हा,मृत्युलोक
***************************
🌹स्नेहलता कुलथे
      माजलगाव
      क्र37🌹


[9/24, 4:29 PM] ‪+91 94221 18604‬
 हास्य कविता स्पर्धा
—————————
तुला पाहताना
———————
चोरून तुला पाहताना
भिंतीआड दडलो होतो
हात सुटला होता माझा
घसरून पडलो होतो  !
पडताना खाली मी
डोळेच झाकले होते
अंग माझे सारे
चिखलाने माखले होते !
अंग खरचटले सगळे
हुंदका दाटला होता
नवा करकरीत सदरा
समदाच फाटला होता !
अंणातल्या कुञ्याने तुमच्या
मज खुप छळवले होते
चपला सोडून तिथेच
मजला  पळवले होते !
बापाच्या तावडीतून तुझ्या
पुरता वाचलो होतो
वाचलो म्हणून आनंदाने
एकटाच नाचलो होतो !
तो दिवस आठवला की
मज अजून कापरे भरते
पण,तुझी गोंडस मूर्ती
माझ्या नयना पुढती स्मरते!
   - आबासाहेब निर्मळे.
पेठ वडगांव,कोल्हापूर
9028090266.


[9/24, 4:56 PM] sagar pandhari
🙏🙏मुक्त कविता 🙏🙏


रोजच दाटतात ढग काळे
आभाळाकडे पाहून पाणावले डोळे...
बऱ्याच दिसाने धारण केले
पावसाने रौद्ररूप हे निराळे...

शेतकऱ्यांचे जीवन असे हातावर
सतत राबतो ,कष्ट करीतो अनवाणी....
कधी उपाशी तर कधी अर्धपोटी
जगतो असा चिंतामग्न क्षणोक्षणी..

मागच्या साली दगा दिला तू
केली मशागत वेळेवर..
गाळूनी घाम,जोडूनि पै पै
अर्पण केले सर्व शेतावर..
तु खेळलास लपंडाव शेतकार्यासवे
अनावर होऊनी दुःख, शेतकरी उठला जीवावर..

मज सांगणे तुज,तू स्वतःला आवर...
सर्वाना समजली आज तुझी पावर...
तुच फुलविसी, तुच उजाडीशी जीवन..
अवलंबून आम्ही सर्वजण तुझ्यावर....

🙏🙏श्री सगर पी एच🙏🙏
 @८३@ धर्माबाद @
        (स्पर्धेसाठी नाही)


[9/24, 4:56 PM]  Rohidas hole
मुक्तकविता स्पर्धेसाठी हास्य कविता
-----------------------------------------
@ मुक्यावरती अन्याय केलास @

       देवा तु सुंदर एकटाच झालास
       अन कावळयाला काळा केलास !!धृ!!

तो असता गोरा तर
सुंदर तो दिसला असता
कोलगेटच्या या जमान्यात दात
दाखवून खदा खदा हसला असता
        देवा तु सुंदर एकटाच झालास
       अन मुक्यावरती अन्याय केलास !!१!!

अंघोळीला गरम पाणी
सोबतीला लाइफबॉय ची जवानी
कदाचित त्याला ही आठवली असती
काचेत रम अन बागेत रमणी
       देवा तु सुंदर एकटाच झालास
      अन मुक्यावरती अन्याय केलास !!२!!

कॉलेजात हिरो तो झाला असता
तरूणीना प्रपोज बिनधास्त केला असता
राजकारणीचा धडा गिरवुन
गल्लीत गोंधळ अन दिल्लीत मुजरा झाला असता
       देवा तु सुंदर एकटाच झालास
       अन मुक्यावरती तु अन्याय केलास !!३!!

तो ही गेला असता परगावी
सुंदर सुंदर मुली बघायला
गुडग्याला बाशिंग बांधून
वरातीत घोडे नाचवायला
        देवा सुंदर एकटाच झालास
       अन मुक्यावरती अन्याय केलास !!४!!

      रोहिदास होले   [ ७१ ]
      गोपाळवाडी,दौड़,पुणे.

हि कविता मी २०१० साली लिहलेलेली आहे ..
आज ती स्पर्धेसाठी पोस्ट करतोय...


[9/24, 5:01 PM] ‪+91 75882 07368‬
🌨🌨स्पर्धेसाठी🌨🌨
**************************

वाट पाहुंन थकले ड़ोळे
बलिराजा म्हणे पावसाला
अजूनही आला नाहीस
तुला कशी नाही दया

  प्रत्येकाच्या तोंड़ी
  यावर्षी पाउस नाही
  कसे मिळणार पाणी प्यायला
  तरीही तुला येत नाही दया

धरणीमाता अासुसली तहानेने
नद्या नाले कोरड़े झाले
जनावरे तहांनेने व्याकुळले
तरीही तुला येत नाही दया

  आता मात्र पावसाचे
  सरकले डोके
  आलो म्हणून केली गर्जना
  मानवा तुझा हाकेला धावलो
  मुसळधार पडायला लागला
  बलिराजाचा आंनदाला उधान आले
  जनावरेही झाली तृप्त
  धरनींमाता न्हाऊन निघाली

नद्या नाले धरणे भरली
चोहिकडे पाणीच पाणी
पाऊस म्हणे मानवाला
असेच लावा झाड़े भरपूर
म्हणजे मुसळधार कोसळेल मी

49नलिनी वागीकर(सायली)

☔☔☔☔☔☔☔☔☔☔
[9/24, 5:06 PM] Sunil Vilas
*स्पर्धेसाठी कविता*

विषय -- पाऊस

भेट घेण्या अवनीची
आसुसलास तू वरुण
अलगद येऊन बिलगलास
ऊर अवनीचा आला भरून.

कोसळल्या जलधारा बेभान
शहारली बघ ती धरा
नखशिखांत भिजली मनमुराद
तृषार्थ जीव सुखावला सारा


कोसळल्या सरीवर सरी
जलमय झाली सृष्टि सारी
नटली -सजली वसुंधरा
दिसती जणू नववधू ती साजिरी.

आगमनाने सर्वदूर तुझ्या
चिंब झाले जनही सारे
चिंता सरली मनीची
हर्ष बहुत सर्वत्र पसरे.

हर्ष तो असाच राहु दे
चिंता पुन्हा आता लावू नको
अवनिच्या प्रीतीखातर
बेभान आता बरसू नको.

-----सुवर्णविलास(40)


[9/24, 5:31 PM] Gajanan patil: गुपित
पावसाच्या मनात गुपित
दडले तरी काय आहे...!
जिकडे तिकडे सुसाट
वारा झुंजार वाहतो आहे...!!

छोट्या छोट्या ढगांचा
मागोवा आता लागत नाही..!
क्षणभर विश्रांती घेऊन
टिप टिप बरसत राही..!!

हिरव्या हिरव्या रंगाच्या
रांगोळी सजून बसती..!
सोनपिवळे पर्णपातेही,
धान्य सहित पक्व होती...!!

किर्र किंकाळी मध्यान्ह राति
बेडकाचे आवाज सजली..!
गोदा गंगा तरोवर वाहत
सागराचे भेटी धावली...!!

कुणा पावसाचा वाटे हेवा
कोण्या जिवाशी छेडणारा..!
मनोमन सांभाळत रहावे,
संत शितल पाऊस धारा..!!
 
       गजानन पाटील पवार
[9/24, 5:51 PM] ‪+91 99234 45306‬: 🎯मुक्तकविता🎯(स्पर्धेसाठी)
⛈⛈🌧🌧🌧⛈⛈🌧🌧🌧⛈🌧⛈🌧⛈🌧
       !!पाऊस!!
💧💦☔💧💦☔💧💦☔💧💦☔💧💦☔
अरे पावसा ,पावसा
असा रे कसा तु उनाड
कधी देतोस ओढ तर
कधी पडतोस मुसळधार  ।।१।।

पावसाची येता सर
सान थोरांना आनंद
शेतीच्या कामात
माझा बळीराजा गुंग ।।२।।

पावसाची संततधार
तृप्त धरणीमाय झाली
रानपाखरासह सारी
गाती आनंदाची गाणी  ।।३।।

पडता पाऊस मुसळधार
नदी-नाल्या आला पुर
धारण केले रौद्ररुप
तुडुंब भरली धरणं ।।४।।

असा पावसाचा जोर
पाऊस पडतोय धों-धों
देऊ नको रे तु धोका
चुकेल मज काळजाचा ठोका ।।५।।

माझ्या माहेराचा कसा
जुना चिरेबंदी वाडा
दुधावरली जपत साय
चिंता करी माझी माय| ।।६।।

धिराचा देऊन शब्द
मनाची होते घालमेल
माहेराच्या काळजीने
मन नाही था-यावर ।।७।।

आता विनंती करते तुला
फिर माघारी रे पावसा
माझ्या बंधुच्या घराला
नको मारु तु वळसा ।।८।।
💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧
  संगीता भांडवले
  वाशी, उस्मानाबाद
 (१६)
[9/24, 5:54 PM] nagorao yeotikar: *आला पाऊस*

आला आला आला हो पाऊस आला
चला चला लवकर घरी चला

काळे ढग नभात जमती
वेगात पाणी भू वरी येती
लहान मुले नाच गाणी करती
आपण जाऊ या सारे नाचायला हो
चला चला लवकर घरी चला

तापुन गेली काळी जमीन
थंडगार केलं या पावसाने
बळीराजा सुखी झाला मनाने
खुशीने तो नाचू लागला हो
चला चला लवकर घरी चला

गुरूजी म्हणती ढग बघुनी
पोरानो काढा जा तुमची धूनी
गुरूजी जाती कुलुप लावुनी
पोर लागली नाचायला हो
चला चला लवकर घरी चला

पाऊस आले की छत्री आठवती
चिखल माखले की बुट दिसती
आयुष्यभर असेच विसरती
पावसात जाऊ भिजायला हो
चला चला लवकर घरी चला

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
( स्पर्धेसाठी )
[9/24, 5:58 PM] ‪+91 99752 32602‬: *पाऊस कविता*


तुझ्या जान्यानही गेल
तुझ्या येन्यानही गेल
पिक शेतातल उभ
जस  सोन वाहून गेल

 
कस जगल र पावसा
जगाचा पोशिंदा
किती बार फिरवचिल
त्याच्या कष्टावर रंदा


नको होवु इतका कठोर
नको करु इतके वार
त्याला सोसत नाही
आता दुखांचा भार


यंदाही त्याच लेकरु बाळ
झोपवशिल का उपाशी
मग  सांग का रे देवा तु
अनेकांना खेळवी तुपाषी


            अमोल अलगुडे
                 स क्र 51
[9/24, 6:22 PM] ‪+91 97306 89583‬: हास्य कविता...स्पर्धेसाठी✍

  😀 *लाडके एडमिन*😀

एकदा आमच्या एडमिन ला
राग आला खुप
रागा रागानं म्हणले आता
delet करतो ग्रुप

काय सांगाव कळेना कुणा
का वाढला यांचा पारा
प्रत्येक ग्रुप मेंबर वर कराया
लागले शब्दांचा मारा

आया बहिनी साऱ्या मग
समजावून थकल्या
साहेबाचा रुसवा मात्र
हट्ट धरून बसला

हट्टी साहेबाला आता
समजवनार कोण??
सार्यांनी मिळून लावला
त्यांच्या आर्ची ला फोन

वाहिनी साहेब वाहिनी साहेब
परश्या कसा रुसला??
वहिनिंचे बोलने ऐकून
हशा एकच पिकला

एडमिन तुमचे दिवस भर
समाजसेवा करतात
रात्री घरी आले की
मोबाईलशी चिकटतात

आर्ची झाली परकी
निघुन गेली माहेरा
जेव्हा पासून व्हाट्सअप नावाची
सवत आणली घरा

तेव्हा एडमिन साहेबाना
चुक त्यांची कळली
आर्ची शिवाय नाही घर
ही बात पक्की वळली

रुसवे फुगवे विसरून
आर्ची आली घरा
आनंदला सुखावला
दर्पण आमचा सारा

                 
          ✍प्रणाली काकडे✍
            समूह क्रमांक pk38
[9/24, 6:48 PM] 10 Meena Sanap: सहभागी स्पर्धकाची यादी
1) जोगदंड जयश्री
2) घनश्याम बो-हाडे
3) मिनाक्षी माळकर
4) मीना सानप
5) सुभद्रा खेडकर
6) किशोर झोटे
7) नरेंद्र मस्के
8) पी. नंदकिशोर
9) जयश्री पाटील
10) सगर पंढरी
11) अनिल लांडगे
12) कविता देशमुख
13) बाबु डिसोजा
14) शैलजा ओव्हाळ
15) अनिकेत देशमुख
16) सुनिल बेंडे
17) स्नेहलता कुलथे
18) आबासाहेब निर्मळे
19) रोहिदास होले
20) सायली बेंडे
21) सुनील अस्वले
22) गजानन पवार
23) संगीता भांडवले
24) ना.सा सर
25) अमोल अलगुडे
26) प्रणाली काकडे
[9/24, 6:51 PM] ‪+91 86980 67566‬: स्पर्धेसाठी

*अरे रे संसार संसार*
ओठावरचे हास्य विरले
जेव्हा संसाराचे दास्य स्विकारले
भाजी आणा संपला किराणा
दिसामाजी फर्माईश असते आगळी
आणूनी दिले सारे आता,
विसावू आता जीव झाला कोता
हुश्श करूनी घ्यावा मोकळा श्वास
तेवढ्यात आरोळी येते,'संपला गँस'
मी असा तू कसा म्हणून न्हाळतो सर्वांना
हातात पिशवी डोक्यात ओझं
मिळवुन सारं संपता संपेना माझं नि माझं
दमछाक जीवाची चेहरा घामेघुम
आता उमगलं रामदासाने का ठोकली धूम
आणा आणि आणिच्या उठाबशीत
अर्धे आयुष्य संपले,
जेव्हा संसाराचे दास्य स्विकारले...!!

                   श्री.हणमंत पडवळ
                    मु.पो.उपळे (मा.)ता.उस्मानाबाद.
                          क्रः 48 .
[9/24, 7:00 PM] ‪+91 98603 14260‬: मुक्त कविता स्पर्धेसाठी
**************
आला पाऊस पाऊस
गेला भिजवूनी भूई
रानं झालं चिंब चिंब
नाचे मोर थुईथुई

  उंच डोंगरावरुन
पाणी वाहे झरझरा
धबधबे कोसळती
मनी आनंद भरारा

शेततळी नदीनाले
भरुनी पहा वाहती
सागराला आली भरती
लाटांवर लाटा येती

शहरात साचली तळी
वाहतूक खोळंबली
चाकरमान्यांना काळजी
वाट पाहते माऊली

बळीराजा सुखावला
पेरणी करु लागला
भलरी गीत गाऊनी
 वंदितो देवरायाला
 प्राची देशपांडे
 समूह क्र १५
[9/24, 7:03 PM] ‪+91 87934 48274‬: नाद चारोळी स्पर्धा भाग 19
स्पर्धेसाठी माझी कविता 🙏

जिकडे तिकडे पाऊस 🌧🌧

जिकडे तिकडे नाचतोय पाऊस
इवल्या  इवल्या थेंबांनी...
नदी-नाल्यांनी पळतोय पाऊस
लहान -मोठ्या लाटांनी...!!

आनंदमय झालाय निसर्ग
वरूणराजाच्या आगमनानी...
जलमय झालयं रान सारं
नटलयं कसं नवरीवानी...!!

पाने, फुले, पक्षी सारी
गात आहेत  एकच गाणी. .
एकाच तालात एकाच सुरात
सांगताहेत धन्यतेची कहाणी. .!!

बळीराजाचं दुखणं पळालं
आनंदलाय तोही मनोमनी..
देवानं ऐकलय मनातलं
संपलीत आता सगळीच गार्‍हाणी. ..!!

मिनाकुमारी सूर्यवंशी
लातूर @93
[9/24, 7:04 PM] ‪+91 90116 59747‬: स्पर्धेसाठी

आवड आंब्याची
चोखता चोखता
गोडी मधाची
मनसोक्त खायची.

हिरवीगार कैरी
आंबट चाखली
ना आवडे वैरी
चट्कन फेकली.

घातली पिकत
झाली पिवळी धमकी
घेता विकत
किंमतीत माफक.

चाखता रसाळगोडी
वाटला वानवळा
नित घडोघडी
स्तुती पात्र झाला.

लईच भारी
तावातावाने फुरके
घासाघासाला मारी
संपताच गुरके.

व्याह्यांना पाहुनचार
द्यावा आमरस पुरी
मनी विचार
समाधान उरी.

आवडी आवडीने खाती
एकेक कितीतरी
चपाचप चपाती
अरे वा अरे वा म्हणती

रसगुणाची किमया
मोहित जान
खाता लिलया
ढेकर तृप्ती मना.

अविट गोडी
खाता वेळोवेळी
सर्वांस आवडी
घरात दिवाळी.


 पुष्पा सदाकाळ भोसरी
  @ 50
[9/24, 7:16 PM] ‪+91 86524 50032‬: 🍂🍂मुक्त कविता स्पर्धेसाठी🍂🍂                                        धो धो पावसाचे रूप । थांबत नाही आज।। ध्रु।। पावसाने दिले जीवदान। उगले शेतीत अंकुर।।                आशेने बळीराजा खूष।शेतात पीक भरपूर।। १।।             पावसाने दिले जीवदान । चढले सागरात प्राण।। आशेने दर्याराजा खूष।   सागरात अमाप खाण ।।२।। पावसाने दिले सौंदर्य।पालटले निसर्गाचे रूप। आशेने कवीराजा खूष । कवितेत नाविन्य खूप ।। पावसाने द्यावे प्रमाण  । नको ओला सुका दुष्काळ ।। आशेने प्राणीमाञ जीवन ।  समतेलात आज सुकाळ ।।                                निता आरसुळे  जालना @८९
[9/24, 7:22 PM] ‪+91 87934 48274‬: पाऊस कविता स्पर्धा भाग 19
स्पर्धेसाठी माझी कविता 🙏

जिकडे तिकडे पाऊस 🌧🌧

जिकडे तिकडे नाचतोय पाऊस
इवल्या  इवल्या थेंबांनी...
नदी-नाल्यांनी पळतोय पाऊस
लहान -मोठ्या लाटांनी...!!

आनंदमय झालाय निसर्ग
वरूणराजाच्या आगमनानी...
जलमय झालयं रान सारं
नटलयं कसं नवरीवानी...!!

पाने, फुले, पक्षी सारी
गात आहेत  एकच गाणी. .
एकाच तालात एकाच सुरात
सांगताहेत धन्यतेची कहाणी. .!!

बळीराजाचं दुखणं पळालं
आनंदलाय तोही मनोमनी..
देवानं ऐकलय मनातलं
संपलीत आता सगळीच गार्‍हाणी. ..!!

मिनाकुमारी सूर्यवंशी
लातूर @93
[9/24, 7:26 PM] ‪+91 94045 11015‬: नियमात बसत असेल तर स्पर्धेत घ्या (net probmule)      अन्यथा मस्त वाचण्याचा आनंद  घ्या   ✍✅           ----- कविता----

       *नविन माझे नाव आहे*

साधुत्वाच्या 'पाटी'वाला,ढोंगी लबाड गाव आहे
बांधले मंदिर समतेचे,पायाच भेदभाव आहे

विकले इमान ज्यांनी ,धूर्त मानुनी स्वतःला
नोकरी खुर्चीत त्यांना,आज मोठा भाव आहे

बांधले कित्येक बंगले ,दिमतीला फौज-फाटा
चोर जे,त्यांच्या घरी हे,शिष्य त्यांचा साव आहे

मी कळीला का विचारू,ती अवेळी गंधताना
गुप्त छातीवर भुंग्याचे,कोरलेले नाव आहे

सत्य मीरवत मी पळालो,दोष तयांच्या अंतरी
पाप नटले पूण्य बांधुन,ठणकता तो घाव आहे

बिघडले,भुललेच सगळे,कोण तारी कृष्ण आता
चोरांच्या यादीत मिसळले,नविन माझे नाव आहे

-------विनोद  गादेकर ,
कुसळंब (ता.बार्शी ),जि.सोलापूर
मोबा .9420701857
[9/24, 7:40 PM] minakshi: केरळ मधे कोझिकोड मधे मोदीजिनच्या झालेल्या भाषणावर आधारित कविता


केरळ के कोझिकोड में,
आये प्रधानमंत्री मोदीजी।

लाखो जनता कानों में प्राण लेकर,
सुन रहे थे ,क्या कहेंगे मोदीजी?

मोदीजिने ललकारा पाकीस्तान को,
खुले आम स्वीकार की पाक की चुनौती।

उरी में शहीद जवानों का बलिदान
बेकार नहीं जाएगा, अब तू खून के आसु रोयेगा।

हम भी किसी से कम नहीं सुन रे पाकिस्तान
अब भूचाल जरूर आएगा।

भारत मेरा महान था ,है,हमेशा रहेगा
पाकिस्तान को नेस्तनाबूत कर के रहेगा।

हमारे शहीद जवानो का बलिदान
बेकार नहीं जाएगा,बेकार नहीं जाएगा।

मीनाक्षी माळकर
चौसाळा,बीड
68
[9/24, 7:50 PM] ‪+91 86524 50032‬: 🍂मुक्त कविता स्पर्धेसाठी🍂                                                                                                                               धो धो पावसाचे रूप ।.                                                                                                                                    थांबत नाही आज।। ध्रु।।                                                                                                                                    
पावसाने दिले जीवदान।                                                                                                                                                    उगले शेतीत अंकुर।।                                                                                                                                             आशेने बळीराजा खूष ।                                                                                                                                 शेतात पीक भरपूर।। १।।                                                                                                                                                    
पावसाने दिले जीवदान ।                                                                                                                                      चढले सागरात प्राण।।                                                                                                                                           आशेने दर्याराजा खूष।                                                                                                                                  सागरात अमाप खाण ।।२।।                                                                                                                      
पावसाने दिले सौंदर्य।.                                                                                                                                 पालटले निसर्गाचे रूप।.                                                                                                                               आशेने कवीराजा खूष ।                                                                                                                             कवितेत नाविन्य खूप ।।
पावसाने द्यावे प्रमाण  ।                                                                                                                                      नको ओला सुका दुष्काळ ।।                                                                                                                        आशेने प्राणीमाञ जीवन ।                                                                                                                      समतोलात आज सुकाळ ।।                            
  निता आरसुळे  जालना @८९






No comments:

Post a Comment