Thursday, 29 September 2016

नाद चारोळी दिनांक 29 सप्टेंबर 2016

📚 *साहित्य दर्पण* 📚

अायोजित नाद चारोळी स्पर्धा....
      दि.२९.०९.१६

*धगधगती अाग दहशतवाद*

*परीक्षक-मारुती तु.खुडे*

*संकल्पना - अाप्पासाहेब सुरवसे*

*संयोजक-वृषाली वानखड़े*

*संकलन - संतोष शेळके*

*ग्राफिक्स-अनिल लांडगे सर*

      *संकलित चारोळ्या*

_आपलेच आपल्या पाठीत_
_खंजींर खुपसवत आहेत_....
_*दहशतवादाच्या* या_ _*धगधगत्या आगीत*_ _निष्पाप गतप्राण होत_ _आहेत_...

*~→👆🏿स्पर्धेसाठी👆🏿←~*
*कल्पना जगदाळे@8★बीड*

नाद चारोळी स्पर्धा...
नका करु खाक
फुलु द्या मानवतेची बाग ।
या सार्‍यांनी मिळुन
विझवु दहशतवादाची आग ।।
नरेंद्र म्हस्के , शिरपुर @ 65

दहशतवादाच्या धगधगत्या आगेत
शहीद झाले 18 विर भारतीय जवान  जगाच्या नकाशातून मिटवले पाहिजे
जुलमी शत्रूंचे कायमचे नामोनिषाण.

घनश्याम बोह्राडे
बुलडाना
समुह क्रमांक 19

*स्पर्धेसाठी चारोळी*

*नादचारोळी स्पर्धा*

*छळतोय आतंकवाद्यांचा नापाक इरादा*
*काश्मिरसाठी हा अर्थहीन वाद आहे*
*निष्पाप जीवांचे सांडते रक्त शरिरातूनी*
*ही धगधगती आग दहशतवाद आहे*

*ज्ञानदेव काशिद*
*समुह क्रमांक 63*

नाद चारोळी स्पर्धेसाठी :
धगधगती आग दहशतवाद
होरपळ अवघी वाढता उन्माद
विकास होई स्वाहा, निष्ठांचा प्रवाद
निवाराया विपदा घडावा संवाद
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे
@39

"दहशतवादास पोषक बिभिषण
वसतात इथेच पदोपदी
त्या आगीत होरपळतेय जनता
जशी भर दरबारी द्रोपदी"

.......जयश्री पाटील🖌
       वसमतनगर
    स्पर्धेसाठी👆🏻


दहशतवादाची आग पहा,
कशी आहे धगधगती।।
अतिरेक्यांशी लढून आहे,
जवानांच्या भाळी वीरगती।।


✒अनिल लांडगे उंडणगाव@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

✖स्पर्धेसाठी नाही...✖

नाद चारोळी स्पर्धेसाठी :

26/11मुंबई आणि18सप्टेंबर च्या उरी हल्ल्यात,

दिसून येतो भस्मासुरी दहशतवाद।
 
विझवायची असेल ही धगधगती  आग,

तर घातली पाहिजे माणसानी माणुसकिला साद।

मीनाक्षी माळकर

*दहशतवाद धगधगती आग नव्हे ज्वाला *
आतंकवाद्यानों अमानुष इरादे मिटवूनी टाका
कश्मीरसाठी करु नका बेछूट गोळीबार
ऐकू येत नाही कशा निष्पाप रक्ताच्या  हाका
****************************
मीना सानप  बीड @ 7
9424715865
स्पर्धेसाठी👆

*स्पर्धेसाठी*

*दहशतवाद* न पाहतो कोणाचा धर्म

*आग धगधगती* नसे कोणाची मिञ

नेटाने लढवावी आपली खिंड आपण

बदलेल कधी ना कधी हे भीषण चिञ

@ २१ सुनिल बेंडे
      *नाथसेवक*

             
नाद चारोळी स्पर्धेसाठी

*‘धगधगती आग दहशतवाद’*
प्रेमाचे शिंपण असावे
नको रक्ताचा डाग
दहशतवाद म्हणजे केवळ
धगधगणारी आग !!
-  आबासाहेब निर्मळे.
पेठ वडगांव,कोल्हापूर.
9028090266.
क्र-३१

नाद चारोळी स्पर्धेसाठी

धगधगती आग उरातील आमुच्या
बेचिराख करील हा दहशतवाद
नापाक इरादे उध्वस्त करा एकदाचे
बस्स झाला आता हा संवाद.

------सुवर्णविलास (40)

स्पर्धेसाठी

मोडून टाका त्याचा उन्माद,
येऊ दया आता जाग...
विळखा तो घालतोय
धगधगती आग, दहशतवाद...॥
              श्री. हणमंत पडवळ.
                       क्र : 48.

म्हणून वावरू लागले
यातूनच मग शह काटशह सुरू झाले ..!
या धारणेत विश्वात्मकतेचा विसर
पेटली आग ज्यात दहशतवादी झाले ..!

                बंडोपंत कुलकर्णी सोलापूर
                समूह क्रमांक १३

*नाद चारोळी स्पर्धेसाठी*

माणूसकीला कालिमा फासणारे,
पाक आतंकवादी इरादे असती नापाक |
ही दहशतवादी धगधगती आग शमवण्या ,
भारताने यशस्वी केले " मिशन सर्जिकल स्ट्राईक ||

✍🏻 संतोष शेळके / कर्जत, @24

मानवतेला काळिमा                             धगधगता दहशतवाद                            सद् विवेकबुध्दी जागवा                            संपवा सैतानांचा उच्छाद                                                                                                                                📝📝निता आरसुळे,जालना@८९

दहशतवादाचा राक्षस आ वासून उभा आहे
त्यास ऐकू येत नाही निष्पापांची किंकाळी...
घेऊन शस्त्र हाती धगधगत्या मनाने लढा ऐसे
दहशतवाद कापेल ऐकून भारतियांची डरकाळी...(स्पर्धेसाठी)

✍श्री सगर पी एच✍
@८३@धर्माबाद@

*नाद चारोळी स्पर्धेसाठी*

विझेल ति दहशतवादी
पोकळी धगधती आग
रणांगनात उतरेल जेंव्हा
भारत मातेचा जवान वाघ

              अमोल अलगुडे
                    स क्र 51

*नाद चारोळी***

*माझे जवान आक्रन्दते शेवटच्या श्वासात आज*

*आतंकतेच्या क्रुरतेने आमच्या संसाराचा झाला नाश*

*आक्रोश संपता-संपेना गहिवरला अधुरा साज*

*आम्ही जवान अर्धांगिनीच करू दहशतवाद्यांचा पर्दापाश*****

🇮🇳वृषाली वानखड़े👈�

🌴अमरावती🌴*75*

👆🏻स्पर्धेसाठी 👆🏻

स्पर्धेसाठी...✍�
        🌹नादचारोळी🌹

*भारतात का फोफावतेय ही धगधगती आग*

*कुठे जातिवाद तर कुठे माजतोय नक्षलवाद*

*या वादात फक्त होरपळतेय निष्पाप मानवजात*

*कित्येक कुंकू असेच पुसतील हा दहशतवाद*

         ✍�प्रणाली काकडे✍�
            समूह क्रमांक pk38

✍नाद चारोळी स्पर्धेसाठी नाही✍

दहशतवादाची धगधगती आग
पसरवित आहे विषमतेचा धूर..
एकजूटीने देऊ लढा विसरून सारे भेद
तरच मानवतेचा अखंड वाहेल पूर..

दहशतवादाच्या धगधगत्या आगीने
बेचिराख केली स्वप्ने अनेक...
मिटवून टाकू दहशतवाद एकीने
करू कार्य देशासाठी नेक...

अन्यायाला प्रतिकार करण्या
धरिले शस्त्र हाती....
दहशतवादाच्या धगधगत्या आगीने
माणुस विसरला मानुसकीची नाती....

✍श्री सगर पी एच ✍
@८३@ धर्माबाद

स्पर्धेसाठी चारोळी

फोफावतेय धगधगती आग दहशतवाद
मानवी जीवनाचे अतोनात नुकसान
त्वरित बंद करा छुप्या कारवाया
शिकवतील धडा भारतीय जवान

.... सौ. शशिकला बनकर, भोसरी

नादचारोळी स्पर्धेसाठी
*धगधगती आग*

'कर्तृत्ववान स्त्रियांची कहाणी
धगधगती आग आहे,
स्त्रीउध्दार मंदिराचा
तो जीवघेणा त्याग आहे"
*संगीता देशमुख,@१४*

स्पर्धेसाठी .

उरी हल्ल्याचा घेवून बदला

भारतीय लष्कराकडून सर्जिकल स्ट्राईक.

उत्तर त्याला धगधगता दहशतवाद

यशस्वी मोहिम  गाजवली  नेक.

     पुष्पा सदाकाळ भोसरी
        @ 50.9011659747.

स्पर्धेसाठी .

उरी हल्ल्याचा घेवून बदला

भारतीय लष्कराकडून सर्जिकल स्ट्राईक.

उत्तर त्याला धगधगता दहशतवाद

यशस्वी मोहिम  गाजवली  नेक.

     पुष्पा सदाकाळ भोसरी
        @ 50.9011659747.


धगधगती आग आहे,
असा दहशतवाद आहे।।
देश रक्षणासाठी आमचा,
मृत्यूशी लढणे नाद आहे।।


✒अनिल लांडगे उंडणगाव@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

👆👆स्पर्धेसाठी...👆👆

भरून आला आनंदाने उर
अतिरेक्यांना केलं ठार
धगधगती आग दहशतवाद
पाकवर हल्ला जोरदार

.... सौ शशिकला बनकर, @35

स्पर्धेसाठी.

पाकव्याप्त अतिरेक्यांच्या प्रशिक्षण केंद्राना

भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केले

उरी हल्ल्याचा घेवून बदला

धगधगता दहशतवाद याला सडेतोड उत्तर दिले.

    पुष्पा सदाकाळ भोसरी.
    @ 50.

         हीच घ्यावी. स्पर्धेसाठी

नादचारोळी स्पर्धेसाठी

दहशतवादाची धगधगती आग
सीमेवर  जनजीवन होरपळते
आतंकवाद हा थोपवा आता
भारतमाता आमची कळवळते
प्राची देशपांडे
समूह क्र. १५

१- दहशतवादाची धगधगती आग
पसरत चाललीय जगात
वेळीच रोखली नाही तर
अनेक देश होतील भस्मसात

२-
दहशतवादाची धगधगती आग
देशाला नामशेष करतेय
हकनाक बळी सामान्य जीव
भ्रष्टाचाराची कीड पोखरतेय

३-
दहशतवादाची धगधगती आग
फोफावत चाललीय जगात
निरपराध्यांना होते फाशी
अपराधी पुराव्याअभावी सुटतात

४- दहशतवादाची धगधगती आग
जाळून टाकतेय जगाला
जातीधर्मभेदाची कीड लागली
देश मात्र  जातोय पोखरला
प्राची देशपांडे


🍀 स्पर्धेसाठी 🍀

धगधगली आग दहशतवादा�ची
आम्ही आता अधीर भारतवासी
सर्जिकल स्ट्राईक शत्रुवरी
दिली दहशतवादास मुक फाशी

योगिनी चॅटर्जी #52

नादचारोळी स्पर्धेसाठी ....
------------------------------------------

मिळावा आरती नंतर प्रत्येकाला

दैव भक्तीचा मनोभावे प्रसाद....

काहिसा तसाच फोफावलाय

पाकचा धगधगता दहशतवाद....

रोहिदास होले ....७१
गोपाळवाडी ,दौंड ,जि.पुणे...

धगधगती आग दहशतवाद म्हणून
पाकने रूबाब करायचा नाय
सर्जिकल स्ट्राईकने दिलय उत्तर
भारताचा नाद करायचा नाय

         शैलजा ओव्हाळ/चिलवंत
                      @ 73

वीर माझ्या देशाचे जवानांनी
दहशतवाद्याचा केला खात्मा..!
गर्व आहे 56 इंच छातीवर,
तळपतो देशासाठी वीरांचा आत्मा...!!
        गजानन पाटील पवार @81
              स्पर्धेसाठी

स्पर्धेसाठी.

पाकव्याप्त अतिरेक्यांच्या प्रशिक्षण केंद्रांना

भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केले

उरी हल्ल्याचा घेवून बदला

धगधगता दहशतवाद याला सडेतोड उत्तर दिले.

    पुष्पा सदाकाळ भोसरी.
    @ 50.

         हीच घ्यावी. स्पर्धेसाठी 🙏

स्पर्धेसाठी नादचारोळी

भारत पाक फाळणी झाली
पण द्वेश कायमचाच राहिला
दहशतवादाची धगधगती आग
भारत आता मागे नाही राहिला

    खेडकर सुभद्रा बीड २०
मो नं (९४०३५९३७६४

नाद चारोळी स्पर्धा साठी

हृदयामधे *आग* आमच्या
*धगधगती* प्रतिशोधाची आहे
आमच्या चांगुलपणावर आज
नापाक *दहशतवादी* नजर आहे

किशोर झोटे @32
औरंगाबाद.

🌹नाद चारोळी 🌹
🌹स्पर्धेसाठी 🌹
आर्त स्वराने बाळ सांगे आईला
मीच करीन त्यांच्या कामाची पूर्ती धगधगत्यादहशतवादाच्या आगीत
वचन देआई तूआहेस माझी स्फुर्ती
***************************
स्नेहलता कुलथे
क्र37🌹
**********
चिरून गेली आरपार
बंदुकीची गोळी दिलाला
धगधगत्याआगीत दहशतवादाच्या
एकता मिळेल का स्वराला

*********************
धगधगती आग दहशतवादाची
लागली एवढी सिमेवर
बाबा परतून आलेच नाहीत
बिगुल पडला कानावर

------------------
स्पर्धेसाठी चारोळी
-----------------------
दहशतवाद म्हणजे विश्वामधली
धगधगणारी आग आहे
सुंदर माझ्या धरणीवरती
पाकिस्तान नावाचा डाग आहे !
      -आबासाहेब निर्मळे.
पेठ वडगांव जि.कोल्हापूर
9028090266.
क्र-31
(हीच चारोळी स्पर्धेसाठी स्विकारावी)

१ )
    दहशतवादाला पोसतोय कोण?
    मैत्रीचे हात पुढे करतोय कोण?
    धगधगणारी आग लावतोय कोण?
    सरणावर आज जळतोय कोण?

२ )
   आकरणीय दहशतवाद आज
   भीती समाजमानसात आहे
   धगधगती आग कुठेही कशी
   सारेच कसे अशांतेत आहे

३ )
   दहशतवादाने भरडलेल्या देशात
   शांतीदूत दूर दूर का भासे
   धगधगती आग पेटलेली तरी
   शांतता नांदावी असेच वाटे

४ )
   धगधगती आग आपण सारे
   कधीच नाही का विसरणार?
   तुम्ही आम्ही देशवासी सारे
   दहशतीखालीच का वावरणार?
  
   किशोर झोटे @ 32
   औरंगाबाद.

नाद चारोळी स्पर्धेसाठी चारोळी
भाग - २४ वा
                   
             
'वसुधैव कुटुंबकम्' ही संस्कृती आमची
विष्वबंधुत्वाला सांधन्या ना कधी कुणाचा राग।
क्षणार्धात इतिहास बदलने ताकद आमच्यात परि
शांतीनेच विझवतोय दहशतवादाची धगधगती आग।।

✍🏻✍©:-कवी अनिकेत जयंतराव देशमुख. (अनु)
            रा- गोपालखेड , ता. जि. अकोला.
                    mo-9689634332
@59

*स्पर्धेसाठी*
धुमसते काश्मिर मनी खोल व्रण
घेऊनी भारतीय हळहळतोय
जणू शरीराचा लचका पाक ओरबाडून
दहशतवादाची आग धुमसवतोय
स्नेहल आयरे
      मुंबई
क्रमांक ७७

*दहशतवाद एक धगधगती आग*
निष्पापांचा यात हाकनाक बळी
युद्ध नकोच पाकवर दबाव हवा
कशाला हवी भाषेची पुढे टाळी
*श्री.आप्पासाहेब सुरवसे*
     ~_लाखणगांवकर_~
_AMKSLWOMIAW_
         AK47
❎ _~स्पर्धेसाठी नाही~_ ❎

भाक्रा-नांगल धरणावर पाकचा आहे डोळा
संपवून टाकू पाकड्यांना आम्हालाही येतो राग
दहा-बारा कोटी मृतदेह करावे लागतील गोळा
संपेल खरी धगधगती दहशवतवादाची आग

*श्री.आप्पासाहेब सुरवसे*
     _~लाखनगावकर~_
_AMKSLWOMIAW_
        *AK47*
❎  ~स्पर्धेसाठी नाही~ ❎

धगधगत्या आगीचा वनवा तो *दहशतवाद*
एवढा कसा फुलला त्याचा धर्मांध निखारा
मग *नक्षलवाद* कशाचे द्योतक आहे ❓
सरकारच्या नाकर्तेपणाचा उडतो बोजवारा

*श्री.आप्पासाहेब सुरवसे*
    ~_लाखणगावकर_~
_AMKSLWOMIAW_
         *_AK47_*
   ❎ ~स्पर्धेसाठी नाही~ ❎

दहशतवादाची आग कशामुळे धगधगती
ना पाहती माणुसकी धर्म ना नातीगोती
हॉटेल ताज- ओबेरॉयच्या नव्हे संसदेच्या इमारती
धुरांच्या लोटांत नि रक्तांच्या थारोळ्यांत कश्या धुमसती

*श्री.आप्पासाहेब सुरवसे*
      ~_लाखनगांवकर_~
_AMKSLWOMIAW_
       *AK47*

❎ ~स्पर्धेसाठी नाही~❎

नाद चारोळी स्पर्धेसाठी

*‘धगधगती आग दहशतवाद’*
मानवतेच्या शञूंना
देवा येवू दे जाग
दहशतवाद म्हणजे फक्त
धगधगणारी आग !!
- आबासाहेब निर्मळे.
पेठ वडगांव,कोल्हापूर
9028090266.क्र-31

*नाद चारोळी स्पर्धा*

*दहशतवाद* नावाच्या आगीची धग नि भडका
समूळ नायनाट नि बिमोड व्हावा याचा नेटका
किती होऊ द्यायचे अजुन वीर जवान शहीद
म्हणून पाकिस्तानचा नकाशा करावा फाटका-तुटका

*श्री . आप्पासाहेब सुरवसे*
      ~_लाखणगांवकर_~
_AMKSLWOMIAW_
           *AK47*
❎~*स्पर्धेसाठी नाही*~❎


🎯स्पर्धेसाठी🎯

पेटली सुडाची आग
दहशतवाद धगधगला
भारतीय लष्कराने
पीओकेत चढविला हल्ला !

संगीता भांडवले
वाशी, उस्मानाबाद
(१६)

_*धगधगती आग दहशतवाद*_
~↓↓↓↓→↓↓↓↓→↓↓↓↓~

*दहशदवादाची आग*तुमच्या आमच्यात एक-दोन दिवस *धगधगती* आहे...
सिमेरेषेवरील लोकांच्या मनात मात्र कायम ही ज्वाला पेटलेली आहे





_*~→👆🏿स्पर्धेसाठी👆🏿←~*_
_*कल्पना जगदाळे@8★बीड*_🖊

🌹उरी लागलेला घाव
     लावला धुडकाऊन
     दहशतवादाच्या आगीत
     धगधगणार कावून🌹
स्नेहलता कुलथे
क्र37

दहशदवादाच पाणी आता डोक्यावरून चालल आहे ..
धगधगणारी आग शांत करण्यासाठी फक्त सिंधूला अडवण्याचा विचार का करत आहे?





_*~→👆🏿स्पर्धेसाठी👆🏿←~*_
_*कल्पना जगदाळे* *@8*

हि स्पर्धेस घ्यावी

सहभागी स्पर्धकांचे आभार...
धन्यवाद..💐💐💐🙏

Sunday, 25 September 2016

संतुलित आहार : काळाची गरज

*साहित्य दर्पण whatsapp ग्रुप*
आयोजित
*साहित्य दरबार वैचारिक लेखमाला*
*दिनांक :-* 25 सप्टेंबर 2016 रविवार

*विषय :-* संतुलित आहार : काळाची गरज
यात आपले आरोग्य, आपला व्यायाम, प्राणायाम, जेवणावळी असे अनेक विषयासह लेख सुमारे 700 ते 1000 शब्दात लिहावे.
आपले लेख खालील क्रमांकावर पोस्ट करावेत.
*नासा येवतीकर, संयोजक साहित्य दरबार* - 09423625769
*अप्पासाहेब सुरवसे, मुख्य संयोजक साहित्य दर्पण* - 09403725973
*मारुती खुडे, सह संयोजक साहित्य दर्पण* - 09823922702

[9/25, 10:43 AM]  Subhadra Sanap
*🎯साहित्य दर्पन ग्रुप आयोजीत*🎯
📝📝📝📝📝📝📝📝📝
*साहित्य दरबार वैचारिक लेखमाला*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📝विषय : संतुलित आहार काळाची गरज📝

           आजचा चिंतनाचा विषय म्हणजे मानवी आरोग्यासी संबधित आहे मानसाचे आरोग्य जर निरोगी असेल तर सगळी वाटचाल सुरळीत होवू शकते म्हणुनच मानसाने आरोग्याच्या बाबतीत तडजोड करू नये आरोग्य निकोप राहण्यासाठी काही गोष्टीकडे जानुन बुजुन लक्ष देणे गरजेचे आहे
        आजकालच्या धकाधकीच्या व धावपळीच्या युगात माणुस स्वत कडे लक्ष द्यायलाच विसरलाय वेळ मिळत नाही या सबबीखाली स्वतकडे दुर्लक्ष होतय आणी जेव्हा लक्षात येते तेव्हा वेळ निघुन गेलेली असते या प्रसंगी मी काही मुद्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करते
*आरोग्य* :  माणसाचे आरोग्य हे तीन प्रकारात मोडते  वात प्रकृत्ती,पित्त प्रकृती व आम्ल प्रकृती आपण कोणत्या प्रकृतीत आहोत हे जानुन घेवून आपला आहार निवडावा जीवन हे अमूल्य आहे व जास्तीत जास्त दिवस टिकावे असे वाटत असेल तर आपण जागरूक राहणे गरजेचे आहे
*व्यायाम*: मानवी जीवनात व्यायामाला अन्न्यसाधारन महत्व आहे  यामध्ये व्यायामाचे अनेक प्रकार असतात पण आपल्या वेळेनुसार जे करन शक्य अाहे ते व्यायाम करावेतच उदा सकाळी लवकर उठणे काही ठरावीक अंतर चालने भरभर चालणे हा खुप उपयुक्त व्यायाम प्रकार आहे आजकाल खुप कमी वयात लठ्ठपणा मधुमेह ह्रदयविकार या सारखे आजार वाढले आहेत आणी यावर जर नियंत्रन ठेवायचे असेल तर खुप जागरुक राहणे गरजेचे आहे फिरण्या सोबतच जॉगिंग,कवायत,योगासने,सूर्यनमस्कार यासारख्या व्यायामाने खुप फायदा होतो आजकाल तासन् तास मोबाईल फेसबुक हॉट्सअप याच्याच नादात आपण वेळ घालतो पण व्यायामासाठी वेळ देने खुप गरजेचे आहे कधी कधी आपल्यालाही पटते व्यायाम करावेतच पण ऊद्यापासुन हा ऊद्या कधीच उगवत नाही *कल करे सो आज आज करे सो अब*या उक्तिप्रमाने आपण व्यायामाकडे वळले पाहिजे
*प्राणायाम*: योगगुरु रामदेवबाबा यांनी समस्त मानवजातीला प्राणायाम चे पँकेज देवून वरदान दिलेले आहे त्यामध्ये भस्रिका, अनुलोमविलोम ,कपालभाती, उद् गीद, भ्रामरी हे प्राणायाम जर आपण पाच पाच मिनीट केले तर खुप फायदा होतो हे मी स्वअनुभवावरुन सांगते  रोज सकाळी पाच वाजल्यापासुन आस्था चँनलवर याचे प्रसारन असते त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे
     *आहार*: सर्वात जास्त महत्व आहाराचे आहे ( मी थोडी क्षमा मागुन सांगते) मानवी आहार हा शाकाहार आहे मानसाने सात्विक आहार घ्यावा या मताची मी आहे कारण निसर्गाविरुध्द जावून आहार विहार करु नये आपन पहातो प्राण्यामध्ये मांसाहारी प्राणी व शाकाहारी प्राणी असे आपण शाळेत शिकलो वआताही शिकवतो मग त्यांनी निसर्गनियम मोडलाय का मग मानुस हा एक प्राणी आहे त्यानही शुध्द सात्विक आहार घ्यावा आपल्याला जिभेचे चोचले पुरवायचे असतात आणी त्यामुळे चमचमीत चटकदार खाण्याकडे आपला कल असतो आणी तेच आजाराचं उर्जास्थान आहे हे ही आपनास विसरुन चालनार नाही  आपण ताज्या भाज्या भरपूर मोसमी फळे खाल्ली पाहिजेत जेव्हडा आहार आवश्यक आहे तेव्हडाच घेतला पाहिजे कमी खाल्याने काही अपाय झाल्याचे अजुन ऐकण्यात नाही पण जास्त खाल्याने अपाय होतो हे छातीठोकपणे सांगु शकते
*रहावे असे की न कोणी हसावे प्रमानामध्ये सर्व काही असावे*  याप्रसंगी मी आपणास एव्हडेच सांगेल की  मानवी जीवन हा एक दुर्मिळ आहे सर्व प्राणीमात्रात मानवी जीवन श्रेष्ठ आहे ते जीवन सार्थकी लावा चांगले कार्य करा मरावे परि किर्तीरुपी उरावे आणी चांगले कार्य करायचे असेल तर आरोग्य चांगले असने गरजेच आहे
         शेवटी एकच सांगेल आजच्या फास्टफुड पिझ्झा बर्गरच्या जमाण्यात हॉटेलच्या चमचमीत खाण्यापेक्षा घरची चटणी भाकरी चांगली बाहेरच्या खाण्याला गृहलक्ष्मीचा आशिर्वाद नसतो  आपण आपल्या घरापासुन ही सुरवात करा बाहेरच अन्न खाण्यावर वारेमाप पैसा उधळण्यापेक्षा त्याच पैशात घरी अन्न बनवा आपले सगळे कुटुब जर सोबत असेल तर तो आनंद फार वेगळा असतो हे ही लक्षात घ्या यायोगे दोन फायदे होतील आपली मुलही संस्कारी होतील  घरच्या अन्नाचे महत्व त्यांनाही कळू द्या
*निरोगी रहा निरोगी जगा व इतरांनाही जगू द्या*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

           खेडकर सुभद्रा बीड (२०)
मो नं (९४०३५९३७६४)


[9/25, 11:32 AM]
संतुलित आहार
      - नागोराव सा. येवतीकर

अन्न , वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत. यातील अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी प्रत्येक सजीव धडपडत असतो. अश्मयुगीन काळातील लोक अन्नाच्या भटकंतीत अनेक वर्षे घातली. गरज ही शोधाची जननी आहे या म्हणीनुसार या अन्नाच्या शोधातच त्यांनी अग्निचा शोध लावला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. अश्मयुगीन काळातील माणूस प्राण्याची शिकार करून कच्चे मांस खात असे. याच बरोबर जंगलातील फळे आणि कंदमुळे हे त्यांचे प्रमुख खाद्य होते. अग्निचा शोध लागल्यानंतर हा माणूस शिकार केलेले प्राणी भाजुन खाऊ लागला. त्याला भाजलेल्या अन्नाची चव माहित झाली तसे प्रत्येक अन्न पदार्थ भाजुन खाण्यास सुरुवात केली. पाण्याजवळ वास्तव्य करून राहत असल्यामुळे त्यांनी मग हळू हळू शेती करण्यास सुरुवात केली. शेतातुन आलेल्या अन्नधान्याचा वापर जेवण्यात करता येतो हे कळायला लागल्यावर माणसाच्या जेवण्यात सुधारणा होऊ लागली. त्यानंतर मग माणूस एकत्र राहू लागले. त्यांचा समूह तयार झाला या समुहाचे एका वस्ती मध्ये रूपांतर व्हायला वेळ लागला नाही. पाहता पाहता गाव आणि नगर त्यानंतर महानगर ही तयार झाले. अन्नाच्या शोधात आपण आज या स्तरापर्यन्त येऊन पोहोचलो आहोत आणि आज ही आपण त्याच अन्नाच्या शोधात रोजच फिरत असतो. मात्र याच अन्नाविषयी किंवा आहारा विषयी आपण खरोखर जागरूक आहोत ? याचा एकदा तरी विचार करीत नाही. मानवाला जीवन जगण्यासाठी किंवा शारीरिक वाढीसाठी अन्नाची गरज असते. म्हणून अन्न मिळविण्यासाठी प्रत्येकजण जीवाचे रान करीत असतो. आज आपण जे काही काबाडकष्ट करीत आहोत ते सर्व या अन्नासाठी नव्हे काय ? आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पोटभर खायला मिळावे म्हणून कुटुंबप्रमुख या नात्याने पुरुष आणि स्त्री दिवस रात्र काम करीत असतात. त्याच केलेल्या कामाच्या मोबदल्यात पैसा मिळतो आणि त्या पैश्यावर घरात लागणाऱ्या अन्नाची पूर्तता करीत असतो. अन्न जर नसेल तर आपल्या पोटाचे नीट पोषण होणार नाही. त्यामुळे प्रत्येक मानवाला मग तो गरीब असो वा श्रीमंत त्याला अन्नाची गरज आहे. भारतात एका बाजूला उपासमारी ने मरणारी माणसे दिसतात तर दूसरी कडे जास्त जेवल्यामुळे पोटा च्या विविध आजाराने त्रस्त माणसे दिसतात हे पाहून मन खिन्न होते. अन्नाचे अति सेवन करणे शरीराला जसे घातक आहे तसे कमी जेवण करणे हे ही धोकादायक आहे विशेष करून लहान मुलांना त्यांच्या वाढत्या वयात पोषक आणि संतुलित आहार मिळणे आवश्यक आहे.
शरीर बळकट आणि तंदुरुस्त राहण्यासाठी काजू, बादाम, साजुक तूप यासरखी महागडी पदार्थ खावे लागतात, असा एक गोड गैरसमज जनमाणसात पसरलेले आहे. रोजच्या जेवणात सर्व अन्नघटकाचा समावेश केल्यास सुध्दा आपले शरीर शारीरिक व मानसिकदृष्टया सुदृढ राहू शकते. मेळघाटसारख्या विभागातील कुपोषणाचा प्रश्न जेंव्हा आपल्या समोर येतो तेंव्हा संतुलित आहार घ्यावे अशा प्रकारची सहज प्रतिक्रिया आपण देऊन टाकतो. दररोज एक प्रकारचे जेवण केल्यामुळे आपण कंटाळून जातो त्यामुळेच वेगवेगळ्या पदार्थची चव घेतो, न जाणतेपणाने आपण संतुलित आहार घेत असतो. परंतु यात काही जाणीवपूर्वक बदल करून गृहिणीने आठवड्याचा वेळापत्रक तयार करून तसे खाद्य म्हणजे जेवण आपल्या मुलांना उपलब्ध करून दिल्यास त्याचा फायदा मुलांसोबत आपणाला  सुध्दा होतो.
घरातील लहान मुले जेवण्याच्या बाबतीत नेहमीच हे नको, ते हवे अश्या तक्रारी करीत असतात. आंबट फळे खात नाहीत, फक्त गोड असलेल्या फळाची मागणी करतात. त्यामुळे ते जीवनभर त्या फळापासून दुरच राहण्याची शक्यता नकारता येत नाही. कारले कडू लागतात म्हणून बऱ्याच मुलांना ते घशाखाली उतरत नाही. प्रत्येक भाजी खाण्याबाबत त्यांना आग्रह केल्यास त्यांच्या शरीराला फायदा होईल. आपल्या शरीराला जेवढे पिष्टमय, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थाची गरज आहे तेवढीच क्षार व जीवनसत्वाची सुध्दा आहे. हिरव्या पालेभाज्या आणि फळे यातून क्षार व जीवनसत्व मिळते. शरीरात ए जीवनसत्वाचे प्रमाण कमी झाल्यास रात्रीला अंधुक अंधुक दिसणे म्हणजे रांताधळेपणाचा रोग होतो. त्यासाठी हिरव्या भाज्या आणि फळे आहारात असणे आवश्यक आहे.  बी जीवन सत्वाच्या अभावामुळे जीभ लाल होणे व त्वचा खरखरीत होणे असे रोग होऊ शकतात.  दाताच्या हिरड्या मजबूत राहण्यासाठी सी जीवनसत्वाची गरज असते आणि हे जीवनसत्व सर्व आंबट गोड फळातुन मिळतात. सकाळी कोवळया सूर्यप्रकाशात बसल्यामुळे डी जीवनसत्व मिळते आणि त्यामुळे पायाची हाडे मजबूत होतात व पाठीला बाक येत नाही. कैल्शियम मिळविण्यासाठी मांस व अंडी चा जेवणात वापर करण्याच्या सल्ला वैद्यकीय मंडळी याच साठी देतात. असे काही विकार आपल्या मुलांना होऊ नये यासाठी सर्व मातानी जागरूकपणे आपल्या स्वयंपाकात संतुलित आहाराचा समावेश केल्यास आपला मुलगा अर्थात देशाचा भावी नागरिक बळकट, तंदुरुस्त आणि सुदृढ होईल यात शंकाच नाही.

जेवण करताना घ्यायची काळजी
जेवण्यापूर्वी हात-पाय स्वच्छ धुवावे. जेवणाचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून घ्यावे. अस्वच्छ परिसरात जेवण परिपूर्ण होतच नाही. दिवसातुन दोनच वेळा जेवण करण्याची सवय लावून घ्यावी. भूक लागली की जेवण असे शक्यतो करू नये. सकाळी उठल्यानंतर दात स्वच्छ साफ केल्यानंतर एक ग्लास पाणी प्यावे. त्यानंतर अर्धा तास काही ही सेवन न करता तसेच रहावे. सर्वात महत्वाचे सकाळी शक्यतो चहा टाळावे त्याऐवजी दुधाचा वापर करावा. दूध हे पूर्ण अन्न आहे आणि चहामुळे आपल्या भूकेचा सर्व नाश होतो. त्यामुळे सकाळी चहासोबत बिस्किट किंवा पाव खाऊ नये त्याऐवजी मोड आलेली कडधान्ये किंवा इतर काही अन्नघटकाचा नाष्टा करावा ज्यामुळे आपण दुपारच्या जेवणापर्यन्त थांबु शकतो. दुपारच्या वेळी जर आपण कार्यालयात काम करणारे कर्मचारी असाल तर झोप येणार नाही असे जेवण करावे. शाळेतील मुलांनी सुध्दा दुपारी पोट भरून जेवण करू नये त्यामुळे वर्गात लक्ष राहत नाही. सायंकाळी जेवण शक्यतो रात्री आठ च्या पूर्वी आटोपते घ्यावे. त्याच बरोबर सायंकाळी हलके अन्न घ्यावे त्यामुळे पचन क्रिया व्यवस्थित होते. उशिरा जेवण केल्याने आणि जड अन्न खाल्याने पचन क्रियेवर सुद्धा ताण येतो आणि मग पोटाचे विकार सुरु होतात. सायंकाळी जेवण केल्यानंतर शतपावली करणे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. जेवताना आपण प्रसन्न असावे. उदास किंवा रागावलेल्या परिस्थितीत जेवण करू नये. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून जेवण करावे आणि जेवताना फक्त कौटुंबिक चर्चा करावी. त्यामुळे सर्वांशी संवाद होईल. आज घराघरातील संवाद लोप पावले आहे असे वाटत आहे. ते यामुळे जुळून येतील. प्रत्येकाचे जेवणाच्या वेळा वेगवेगळे आहेत त्यामुळे कोणाचे कोणाच्या जेवणाकडे अजिबात लक्ष नाही. अन्न हे पूर्ण ब्रम्ह आहे असे म्हटले जाते त्यामुळे अन्नाचा नाश न करता त्याचा पूर्ण वापर करावा म्हणूनच पूर्वी चे लोक म्हणतात की फेकून माजण्यापेक्षा खाऊन माजावे. फिरत फिरत किंवा सोप्यावर किंवा पलंगावर बसून जेवण करणे टाळावे कारण जेवताना थोडे फार तरी शीत खाली पडतात आणि त्याच्या शोधात बारीक लाल मुंग्या फिरत असतात. ते शीत जर सोप्यात किंवा पलंगावर पडले तर तिथे लाल मुंग्या येणार. जेव्हा आपण सोप्यावर किंवा पलंगावर बसू तर त्याचा त्रास आपणालाच होणार. जेवणापूर्वी थोडा वेळ तरी शांत बसून मनोमन प्रार्थना म्हणावी.  रेडियो ऐकत, टीव्ही पाहत किंवा पेपर वाचन करीत जेवण करू नये त्यामुळे आपले लक्ष अन्ना वर राहत नाही. घाईघाईने जेवण न करता अगदी स्वस्थपणे जेवण करावे. गाय, बैल किंवा म्हैस या सारख्या प्राण्याना जशी रवंथ करण्याची सोय आहे तशी आपल्या शरीरात नाही याची जाणीव ठेवावी. या सर्व बाबी लक्षात ठेवून जेवण केल्यास आपणास नक्कीच उत्तम आरोग्य लाभेल यात शंकाच नाही.

      - नागोराव सा. येवतीकर @ 26
        मु. येवती ता. धर्माबाद
       09423615769


[9/25, 12:17 PM] ‪+91 95529 80089‬
 संतुलित आहार- काळाची गरज
"आयुष्य हि निसर्गाची देणगी
आरोग्यास जपा ।
रोगांपासुन मुक्त राहण्यासाठी
संतुलित आहार हाच मार्ग सोपा ।।"
'क्या होगा कौनसे पल में कोई जाने ना'आयुष्याची अनिश्चितता दर्शविण्यात आलेले हे गीत आपल्याला बरेच काही सांगुन जाते.जीवनात आपल्या आपल्या आयुष्याची गाडी सुरळीत जातांना एखादे दुःखाचे व कुठलाही आजार असो वळण लागते, त्यावेळी मोठ्ठा धक्का लागतो यासाठी संतुलित आहार हि किळाची गरज आहे .
आज धकाधकीच्या जीवनात , पैसे कमाविण्याच्या नादात मनुष्य घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा करु लागला आहे व आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहे .त्यामुळे आयुष्यभर ना वेळेवर जेवण व ना धड वेळेवर झोपणं यात संतुलित आहाराकडे होणारे दुर्लक्ष आणि नंतर आरोग्य मिळविण्यासाठी केला जाणारा पेश्यांचा खर्च .
 संतुलित आहार हा शरीरासाठी पर्यायाने आरोग्यासाठी आवश्यक आहे कारण पैसा गमाविला तर परत मिळविता येतो परंतु आरोग्य गमाविले तर ते परत मिळविणे फारच कठिण मग ते शारीरीक आरोग्य असो वा मानसिक .संतुलित आहारा सोबत 'चालणे ' हा व्यायामांचा राजा असे म्हटले जाते हा सुद्धा आवश्यक आहे .योगा व आयुर्वेद आपल्या देशाची महान संस्कृती असतांना येथील सण , उत्सव साजरे करतांना किंवा त्यावेळेस बनविले जिणारे मेनू हे शास्रीय दृष्ट्या व संतुलित आहाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मग ते मकरसंक्रातीला असणारे तिळाचे लाडू वा हिवाळ्यातील मेथीचे लाडू , उन्हाळ्यातील लिंबू शरबत .असे असतांना आपण पाश्चात्य संस्कृतीला बळी पडतो व संतुलित आहाराचा विचार न करता विविध विकारांना आमंत्रण देत असतो.
 सकाळी नाश्ता, दुपारचे जेवण ,रात्रीचे जेवण हे वेळेवर तर असावे परंतु संतुलित आहार असावा .जर नसेल तर मधुमेह ,कुपोषण ,पोटासंबधी आजार वयाच्या प्रत्येक गटातील व्यक्तींना दिसुन येतात .
   आहारात आपल्या आवडीच्या पदार्थांसोबत शरीराला आवडणारे अर्थात आवश्यक पदार्थ ज्यापासुन आपल्याला प्रथिने , कर्बोदके , जीवनसत्त्वे योग्य प्रमाणात मिळतील व शारीरीक तसेच मानसिक आरोग्य सुदृढ होण्यास मदत होईल .
यासाठी संतुलित आहार हि काळाची गरज आहे म्हणुन सर्वांनी...
"करा प्रतिज्ञा करुनी
आरोग्य देवतेस नमण ।
संतुलित आहार घेऊन
करु सुदृढ आरोग्याचे रक्षण ।। "
नरेंद्र म्हस्के , शिरपूर @ 65


[9/25, 4:48 PM] ‪+91 90116 59747‬
 स्पर्धेसाठी.

विषय.    संतुलित आहार.
अतिशय सुंदर विषय

Food is medicine.

अगदी बरोबर आहे. अन्न हेच आपले औषध आहे.सुपाच्च आहार हेच जीवनाचे सार आहे.
योग्य आहार व व्यायाम, निद्रा याने आपले जीवन सुखकर होते.

    आपण स्वतःला काही चांगल्या सवयी लावून घ्यायला हव्यात.आपली दिनचर्या कशी असावी हे  आता सर्वांनीच जाणून घेतले आहे.
  प्रथम सकाळी तांब्याच्या भांड्यातले कमीत कमी एक लिटर पाणी तोंड न धुता प्या.
घरातील कुंठीत कोरफड असते तिचा गर काढून कोमट पाण्यातून घ्या.कधी अनोशापोटी कडूलिंबाची चार पाच पाने खावीत.कधी तुळशीची पाच सहा पाने तर कधी  आठवड्यातून चार पाच  वेळा आवळा ज्युस घ्यावा.यामुळे कधी ही अॅसिडीटी होणार नाही. पोट साफ होवून शरीर हलके होते. स्फुर्ती  व उल्हास वाटतो.माॅर्निंग वाॅक हा अतिशय महत्वाचा आहे.मोकळ्या हवेमुळे मन प्रसन्न तर होतेच शिवाय शरीर हलके  व चपलता येते वजन नियंत्रीत राहते.शरीर मजबूत राहते धाप लागते नाही.

 

   आंघोळी नंतर पुन्हा एक ग्लास पाणी आवश्यक आहे. नाष्टा राजा सारखा भरपूर असावा. दुपारच्या जेवनात सॅलड ,उसळी,पोळी ,ताक असा छान आहार घ्यावा.हिरव्या भाज्यांच्या आवर्जून समावेश असावा.वामकुक्षी जरूरी पण फक्त अर्धा तास. ज्यास्त झोपेने वजन  वाढून आळस व निष्क्रिय ता जाणवते.

  योग्य चौरस  आहार घेतला तर सहसा व्याधींना सामोरे जावे लागत नाही. म्हणून च मी म्हणते अन्न हे च औषध आहे. आहाराकडे दुर्लक्ष करू नका.रस्त्यावरचे पदार्थ आवर्जुन टाळावेत.त्यात पिझ्झा, बर्गर,वडा पाव आणि हाॅस्पीटल धाव अशी च गत होती.नसा ब्लाॅक होतात.वजन वाढून पोटाचे विकार  होतात. चव लागते छान अंतरी साठे घाण.हेच खरे. या जीभेच्या चोचल्यांना आवर घाला.मुलांना अशी सवय लावू देवू नका.
      जीवन खुप  सुंदर आहे. आनंदाने जगून त्याचा आस्वाद घ्या.चिंता मुक्त होवून एकत्रित व खाली जमीनीवर मांडी घालून  प्रसन्न चित्ती जेवा.शिळे अन्न टाळा.वातुळ पदार्थ वांगी, बटाटे  ,गवार शक्यतो टाळा.कारण वात वाढीला आमंत्रण मिळते.जेवणानंतर ताक आवश्यक घ्यावे.पचनास मदत होते.ताकाला जेवणात खुप  औषधी समजतात.फक्त ताजे असावे. जेवन शांत   चित्ताने व चावून चावून खावे.जेवताना राग ,चिडचिड नसावी.

   खरे सांगायचे तर जसे खाल तसे आयुष्य उपभोगाल.सकाळी न पाणी पिता चहा नाष्टा घ्या काही ना काही आरोग्याच्या तक्रारी चालू होणार. मग भुक मंदावणे,अॅसिडीटी चिडचिड वाढणे. पोट साफ नसणे.जे लोक अति गरम चहा घेतात त्यांचे दात लवकर पडतात. हलतात.मी कधी च चहा घेत नाही. मला दाताचा ठणक कसा माहित नाही. अजून दातासाठी डाॅक्टरांकडे नाही. वय आहे चौपन्न.वाॅक व व्यायाम यांच्या साथीने माझा दिवस सुरू होतो.वजन फक्त ऐक्कावन.

 चोरस आहार खुप फायदेशिर ठरतो. आपल्या उणीवा भरून काढतो.आता हिवाळा येतोय.हिवाळ्यात डिंक लाडू,कधी मेथीचे लाडू ,उडदाचे पौष्टिक लाडू हमखास खावेत.बदाम काजू बेदाणे हे तर सोने पे सुहागा.
असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अहो औषधांना पैसे घालविण्यापेक्षा सकस व पौष्टिक आहार घ्या.फायदा तुमचा च.आठवड्यातून एकदा लंघन जरूरी आहे. फक्त ज्युस व फलाहार.बघा तुम्ही तन्दुरूस्त व्हाल..
          .निसर्गाने जे दिलंय त्याचा आवश्यक लाभ घ्या. सिझनेनुसार फळे तर नक्की च खावीत. प्रमाण बद्धता मात्र पाळावी.अशा प्रकारे तुम्ही आनंदी आयुष्य तर जगाल  शिवाय त्या आयुष्याचं सार्थक तुमच्या हातून चांगली कामे होवून तुम्ही समाधानी व मनोमनी तृप्ती
उपभोगाल.जी कित्येकांना वंचित ठेवते.कुठल्याच व्याधींना तुम्ही बळी पडणार नाही. आहार, व्यायाम व हृदयी ईश्वरी नाम
  तुमचं काम तमाम.
जीवन समृद्ध होईल यात शंका नाही. मी म्हणेन
 निरामय जीवन हाच जगण्याचा खरा आनंद आहे.
प्रभु नामाशिवाय जगणे
 व्यर्थ आहे.

   पुष्पा सदाकाळ भोसरी
@50.9011659747.


[9/25, 4:53 PM] ‪+91 95273 02345‬
🍲संतुलित आहार काळाची गरज....

आजच्या विज्ञान युगात आपण वावरत आहोत आज काल सर्व काही धकाधकीचे जीवन सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यँत  आपण विविध विधुत उपकरनांचा उपयोग करतो कारण कमी वेळेत कमी श्रमात आपलीअधिक अधिक कामे व्हावीत म्हणून पण याचाही विचार करायलाच हवा या घाई गडबडीत आपण आपले आरोग्य गमावत चालो आहोत ते कसे? ते असे कि या छोट्या मोठ्या कामातून आपल्यया  स्नायूंचा व्यायाम होत असतो जो फार आवश्यक असतो तसे तर व्यायाम हा खऱ्याअर्थाने शिस्तबद्ध पणानेच करायला हवा अन्यथा विपरीत परिणाम होऊ शकतो व्यायामा बरोबरच गरज असते ती सात्विक आहाराची म्हणजेच संतुलित आहाराची यालाच चौरस आहार देखील म्हणतात मग त्यात चारही जीवन सत्व असलेला आहार असतो तसेच क्षार हिरव्या पाले भाज्या यांचाही समावेश असायलाच हवा यांपैकी कोणत्याही एका जरी जीवन सत्वाचा अभाव असलातरी आपल्याला आजार होऊ शकतो तसेतर मुख्यतः आजाराचे तीन प्रकार पडतात 1)आजार 2)विकार3) रोग आजार: आजार हा काही दिवसापर्यंतच असतो उदा:एखादा आठवडा
विकार:विकार हा तात्पूत्या स्वरूपाचा असतो जो फक्त काही मिनिटात किंवा एक अर्ध्या एक तासात बरा होतो
रोग: रोग हा दिर्घ काळ टिकणार व लवकर बरा न होणारा असतो यांचे बरेच प्रकार असतात मग काही वेळा तो अनुवंशिक असतो किंवा तो आपल्या बेपर्वाहीमुळेही होतो किंवा रोग्याच्या संपर्कात आल्याने रोग जंतू ज्यावेळी आपल्या शरीरात प्रवेश करतात त्यावेळी ते प्रथम आपल्या पांढऱ्या पेशींवर हल्ला करतात मग हळू हळू काही लक्षणं दिसायला लागतात तोपर्यंत एखादा आठवडा निघून जातो या कालावधीचा त्या रोगाचा 'अधिशयन' काळ म्हणतात या सर्वच आजारांपासून आपला बचाव करायचा असेलतर तो आपण फक्त 'संतुलित आहाराने'आणि पूरक व्यायामाणेच करू शकतो दिर्घ काळ निरोगी आणि दिर्घ आयुष्य मिळवायचे असेलतर या शिवाय पर्यायच नाही रोज सकळी लवकर उठावे आणि रात्री लवकर झोपावे सकळी लवकर उठून हलका का होईना म्हणजे आप आपल्या प्रकृतिला  झेपेल असा जमेल तसा व्यायाम हा आवश्यक आहे मग शक्यतो सकाळचा आहार हा शक्यतो फळं ,दूध, किंवा मग मोड आलेली कडधान्यापैकी एखादी उसलजरी असलेतरी चालेल त्यामुळे शरीराला आवश्यक तेवडी ऊर्जा मिळते शिवाय आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉला नियंत्रित ठेवण्यास मदत होते,तसेच दुपारच्या जेवणात आहार भरपूर अगदी पोट भरून घेतलातर उत्तमच परंतु जेवण करण्यापूर्वीच थोडे पाणी पिऊन नंतरच जेवावे व जेवण झाल्या नंतर अगदी कमी म्हणजे एक अर्धा ग्लास पाणी पिऊन थांबावे नंतर अर्ध्या एक तासानी पाणी हवेतसे पिले तरी चालेल  रात्रीचे जेवण हे अतिशय हलके फुलके असावे कारण आपण रात्रीच्या वेळी शारीरिक श्रम करत नाहीत म्हणून रात्रीचा आहार हा कमी व हलका असावा म्हणजे व्यवस्थित अन्नपचन होण्यास मदत होते.
       आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण कमेतर खूप करतो पण त्याच बरोबर आपल्या अहराबाबतीतही आपण जागरूक असायलाच पाहिजे आपल्यापैकी बरेच जण हे  बैठे काम करतात व त्यांना  बौद्धिक कष्टही असते पण शारीरिक हालचाल कमी असल्यामुळे जाडी वाढते पोटाचा घेर वाढत जातो व कोलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढत जाऊन मग B.P.किंवा शुगर चा त्रास सुरु होतो हे आजार झाल्यानंतर काळजी घेण्यापेक्षा ते होऊ नयेत म्हणून काळजी घेतलेलीच ऊत्तम आज आपण विज्ञान युगात जगतोय विज्ञानाचा वैज्ञानिक दृष्टीकोन आपण समजून घेतो आहोत प्रत्येक गोष्टीवर विश्वास सहजा सहजी ठेवत नाहीत आणि प्रत्येक गोष्टीची सत्यता पडताळून पहाणे किंवा तर्कनिष्ठपणा आपल्यातील चिकित्सक वृत्तीचा उपयोग करणे आता हि काळाची गरज आहे निरोगी राहण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे वयक्तिक स्वच्छता तसेच घरातील व परिसर स्वच्छता त्याबरोबरच उत्तम संतुलित आहार बऱ्याचशा गोष्टी या आपल्या आहारा विहारा वर अवलंबून असतात म्हणूच निरोगी शरीर हीच आपली संपत्ती आहे जी जपून वापरलीतर दिर्घ काळ टिकते जीभेचे चोचले पुरवणारे पदार्थ जसे कि भेळ,पाणी पुरी,समोसा,कचोरी,पिझ्झा,बर्गर,हे असे पदार्थ कधीतरी बदल म्हणून खाऊ शकतो पण हे तात्पुरती भूक भगवणारे पदार्थ असतात यामुळे शरीराची गरज भागवली जात नाही उलट असे पदार्थ आजाराना आमंत्रण देतात जे अपल्यासाठी त्रास दायक ठरतात ...शेवटी आरोग्य हीच संपत्ती हे लक्षात ठेवा म्हणून संतुलित आहार घ्या आणि निरोगी राहा........


जोगदंड जयश्री,
@jj62



[9/25, 6:04 PM] Meena Sanap
 📕साहित्य दर्पण व्दारा आयोजित 📕
         वैचारिक लेखमाला
****************************
विषय---- संतुलित आहार ----- काळाची गरज
****************************
आज धकाधकीच्या जीवनात आपल्याला स्वतःकडे  पहायला अजिबात वेळ नाही, कारण मानवी जीवन यंत्रवत बनले आहे. बैठे काम , व्यायामाचा अभाव, आणि असंतुलित आहार.यामुळे लहान मुलांपासुन ते मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वाना काही ना काही आजाराने ग्रासले आहे , त्यामुळे आज संतुलित आहार काळाची गरज बनली आहे.
संतुलित आहार म्हणजे ----- शरीराचे योग्य पोषण व्हावे, ते कार्यक्षम आणि निरोगी रहावे, यासाठी कोणकोणते अन्नपदार्थ आहारात असावेत, शरीराला लागणारे सर्व अन्नघटक पुरेसे मिळतील, तसेच व्यक्तीच्या  गरजे नुसार त्यांचे प्रमाण योग्य राहील  असे निरनिराळे अन्नपदार्थ आहारात असायला हवेत, अशा आहाराला संतुलित आहार असे म्हणतात.
संतुलित वजन हे निरोगी आरोग्याचे पहिले लक्षण आहे.अनेक जण वजन संतुलित ठेवण्यासाठी संतुलित आहार घेण्याऐवजी डाएटिंग  करतात त्यामुळे वजन कमी तर होत नाही पण शरीराचे पोषण नीट होत नाही.काही लोक जीम, योग हे करतात पण ते बंद केले तर आणखी वजन वाढते . म्हणजेच त्यातही सातत्य हवे. या सर्व कारणांमुळे संतुलित आहाराला प्राधान्य देणे गरजेचे आहे.त्यासाठी सर्वप्रथम बाहेरचे चमचमित, मसालेदार पदार्थ खाणे बंद केले पाहिजे. आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश केला पाहिजे.
अंड्यामध्ये प्रथिने भरपुर असतात, संत्र्यामध्ये भरपुर कँलरीज् आणि फायबर असते त्यामुळे कोलेस्टैराँलचे प्रमाण प्रमाणात राहुन आपोआप वजन नियंत्रणात राहते ,रोज एक सफरचंद खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते .मोड आलेले कडधान्य, दुध.हिरव्या भाज्या  यामुळे शरीराला सर्व पोषक तत्वे मिळतात.
सर्व व्यक्तींची अन्न गरज एकसारखीच असते असे नाही. कामाच्या स्वरुपावरुन आहाराचे प्रमाण वेगळे असते.कष्टांची कामे करणारांची उर्जा गरज ही बैठेकाम करणा-यांच्या उर्जा गरजे पेक्षा अधिक असते.म्हणुण शारिरीक कष्टाची कामे करणारांची अन्नगरज जास्त असते.
कुपोषण  ------ पोट पुढे आलेली , हातापायाची काड्या झालेली , चेह-यावर तजेला नसलेली आणि पिस्टमय व प्रथिने यांची कमतरता असल्यामुळे शरीरांची वाढ झालेली नसते , रोगाशी सामना करु शकत नाहीत, आसंतुलित आहारामुळे पोषण झालेले नसते, यालाच कुपोषण म्हणतात. तसेच काही त्रुटीजन्य विकार ही लहान बालकात आढळतात या सर्व बाबींचा विचार करुन शासनाने लहान पणीच लसीकरण, व मध्यान्ह भोजन सुरु केले आहे.
व्यायाम -------आपण पाहतो वापर न कैल्यास यंत्रे ही गंजतात ,मानवाच्या शरीराबाबत ही ते खरे आहे.विशिष्ट कामाच्या पध्दती मुळे स्नायु व विशिष्ट अवयव यामध्ये विकृती निर्माण होते
म्हणुण दररोज व्यायाम केला पाहिजे. कारण व्यायाम हा शारीरिक तंदुरुस्तीचा पाया आहे.व्यायामामुळे स्नायु कार्यरत होतात, रक्त व लसिका यांचे अभीसरण सुधारते, ह्दयाचीशक्ती वाढते, शुध्द हवा शरीरात खेळते, भूक वाढते या साठी व्यायामाचे खुप महत्व आहे.जसे -- चालणे ,पोहणे, मैदानी खेळ इ.
योग -----आपल्या आरोग्यावर शरीरातल्या व शरीरा बाहेरच्या अनेक गोष्टी परिणाम करीत असतात. शरीराबाहेरचे घटक म्हणजे वातावरण , आर्थिक स्थिती यामुळे आपले स्वास्थ्य बिघडते.
भारतीय आहार
आपल्या देशात वेगवेगळ्या भागात वेगवेगळे अन्नपदार्थ खाल्ले जातात. दक्षिणेकडे इडली, डोशासारखे पदार्थ लोकांना आवडतात. महाराष्ट्रात झुणका भाकर, वरण भात प्रचलित आहेत. उत्तरेकडे आलू पराठा, छोले भटोरे सर्वांच्या आवडीचे पदार्थ आहेत.
अन्नपदार्थ तयार करण्याच्या आपल्याकडील पद्धती पुर्वापार चालत आलेल्या आहेत. पुर्वापार म्हणजे वर्षानुवर्षे. त्यापैकी काही पद्धतीमुळे अन्नपदार्थाची पौष्टिकता वाढते.
हरभरा, मूग, मटकी अशा कडधान्यांना मोड आणुन केलेल्या उसळी आपण खातो. मोड येताना धान्यांमधील जीवनसत्त्वांचे प्रमाण वाढते. तांदुळ आणि उडीद डाळीचा भरडा आंबवून इडली, डोसा, आंबोळी असे पदार्थ तयार केले जातात. आंबवण्यामुळे अन्नपदार्थातील जीवनसत्त्वात वाढ होते, त्यामुळे त्यांची पौष्टिकता वाढते.
याउलट अन्नपदार्थ खुप वेळ शिजत ठेवणे, शिजलेल्या पदार्थातील पाणी काढून टाकणे, अशामुळे पदार्थाची पौष्टिकता कमी होते. शिजणाऱ्या पदार्थातून पाणी काढले असता या पाण्यात विरघळलेले उपयुक्त घटक पाण्यांबरोबर निघून जातात. अन्नपदार्थ जास्त काळ शिजवल्यास त्यांतील काही उपयुक्त घटक नाश पावतात.
थोडक्यात आरोग्यावर परिणाम करणा-या बहुतेक घटकावर आपले नियंत्रण नसते त्यामुळे आपल्या शारीराची काळजी घेण्यासाठी उत्तम संतुलित आहार, पुरेशी झोप , आणी जोडीला व्यायाम करणे आंतौयत गरजेचे आहे.
जरी विभिन्न आपुले वेष , भाषा  विभिन्न आपुले अन्न परी शारीरिक तंदुरुस्तिसाठी संतुलित आहार एक गरज
****************************
सौ.मीना सानप बीड @7
9423715865


[9/25, 6:30 PM] ‪+91 94231 53509‬
साहित्य दरबार

संतुलित आहार काळाची गरज

     मानवी जीवनात सर्वात जास्त महत्व आरोग्यासच आहे. आरोग्याशिवाय माणूस सुखी राहूच शकणार नाही. आरोग्य संपादन करणे हा प्रत्येक माणसाचा मूलभूत हक्क असल्याचे संयुक्त राष्ट्र संघ व जागतिक आरोग्य संघटना या दोहोंनी मान्य केले आहे.
       आरोग्य ही माणसाची स्वाभाविक स्थीती आहे.आरोग्य म्हणजे आरोग्यदायक निकोप जीवन. ज्याचे शरीर व मन धड तो खरा निरोगी. जागतिक विश्व स्वास्थ संघटनेने स्वास्थाची अशी व्याख्या केली आहे -" आरोग्य म्हणजे केवळ रोग किंवा अशक्तता यांचा अभाव नव्हे तर शारीरिक , मानसिक व सामाजिक सुस्थिती होय. "
     आरोग्य ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. आरोग्य हे दैनंदिन क्रियांतून मिळत असते. त्यासाठी संतुलित आहार , व्यायाम, विश्रांती व मनोरंजन , उत्तम परिसर व उत्तम सवयी यांची आवश्यकता असते.
       आपल्या वैयक्तिक प्रगतीसाठी
व्यक्ती शारीरिकदृष्टया निरोगी असलीच पाहिजे, तरच ती व्यवस्थित काम करू शकेल व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडू शकेल.
        शरीराप्रमाणेच त्याचे मनही निरोगी असावे लागते. रोगी मनाचा माणूस चिडचिडा , निराश व कर्तृत्वहीन होतो व तो इतरांस "भार" ठरतो.
       देशातील व्यक्ती जेवढया अधिक निरोगी तेवढा देश अधिक प्रगतीशील , सुसंपन्न व बलशाली असे समजण्यास हरकत नाही ; कारण देश म्हणजेच देशातील माणसे. आरोग्य हे स्वतःच्या व राष्ट्राच्या उन्नतीचे साधन आहे.
     आरोग्याचा पाया म्हणजे आहार. आहार ही माणसाची प्राथमिक गरज आहे. हवा व पाणी यानंतर आपल्या शरीर पोषणासाठी अन्नाची गरज आहे. अन्नाची व्याख्याच अशी केली जाते की, ' अन्नपदार्थ ते होत की साधारण रूपात ग्रहण करतो व जे शरीरात गेल्यानंतर शरीरास शक्ती प्रदान करते. ' या वरून आपणास असे दिसून येते की अन्नाचे कार्य चार प्रकारचे आहे -
१ ) दैनिक कार्य करण्यासाठी शरीरास शक्ती प्रदान करणे.
२ ) शारीरिक क्रिया सुचारू रुपाने चालवण्यासाठी उर्जा ( उष्णता ) निर्माण करणे.
३ ) शरीरातील पेशींची नवनिर्मिती करुन जुन्या पेशींना नवजीवन देणे
४ ) शरीरातील निरनिराळ्या संस्थांची कार्यक्षमता टिकवून धरणे, ह्या सर्व गोष्टींचा समन्वय साधल्या जातो.
        समतोल आहारात पौष्टिक अन्नाचे महत्व आहे. आपण जे अन्न खातो ते शरीरास पोषक असेल तरच ते आपल्यास आरोग्यदायी होईल.आहारात पौष्टिक तत्व असणारे अन्नच खायला पाहिजेत. आहार पौष्टिक नसला, तर मनुष्य अनेक रोगांनी पीडित होण्याची शक्यता असते.

पौष्टिक भोजनाचे कार्य -
१ ) या भोजनाने पेशीची रचना होते.
२ ) तुटल्या -फुटल्या पेशी ठीक होतात.
३ ) शरीरात रासायनिक पारिवर्तन होते.
४ ) शरीरात उष्णता निर्माण होते.
५ ) शरीरात शक्ती निर्माण होते.

    अन्न खाण्यामागे केवळ पोट भरणे हाच उद्देश नाही. प्रौढ माणसाच्या शरीरातून रोज ६ पौंड पाणी व २ पौंड इतर द्रव्ये बाहेर टाकली जातात. शिवाय ३०० ग्रेन नैट्रोजन व ४७०० ग्रेन कार्बन हा उच्छ्वास , घाम, लघवी या वाटे बाहेर पडतो. याची भरपाई होणे गरजेच आहे. अन्नामुळे शक्ति निर्माण झाली पाहिजे. नवीन पेशी निर्माण झाल्या पाहिजे व शरीरातील निरनिराळ्या संस्थांची कार्यक्षमता टिकून राहिली पाहिजे. यासाठी आपल्या जेवणात पिष्टमय पदार्थ व शर्करा , स्निग्ध पदार्थ , नैट्रोजन युक्त पदार्थ, क्षार ,पाणी व जीवनसत्व हे अन्नाचे ६ घटक योग्य प्रमाणात असावे लागतात. हे घटक ज्या आहारात योग्य प्रमाणात आहेत, त्यालाच संतुलित (समतोल ) किंवा चौरस आहार म्हणतात. हे घटक मिळवण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात गहू, तांदूळ , दाळी, तूप , मोड आलेले धान्य, अंडी, पालेभाज्या, फळे इ. पदार्थाचा समावेश असावा.
संतुलित आहाराची वैशिष्टये :
१ ) यात ऊर्जा देणारे घटक योग्य प्रमाणात असतात.
२ ) यात सुरक्षात्मक पोषक तत्वे आस्तित्वात असतात.
३ ) हा आहार वयानुसार, लिंगानुसार, व्यवसायानुरूप वेगवेगळा असतो.

एका साधारण व्यक्तिस खालिल प्रमाणे अन्न घटकांची आवश्यकता असते.
प्रोटीन - ७३ ग्रॅम
कार्बोज-२०८ ग्रॅम
कॅल्शिअम - २०० ग्रॅम
लोह - ३० मिली ग्रॅम
फॉस्फरस -१५० ग्रॅम
जीवनसत्त्व A-७० मिली ग्रॅम
जीवनसत्त्व B -४९ मिली ग्रॅम
जीवनसत्त्व C - ५० मिली ग्रॅम
वरील विविध अन्न घटक खालील संतुलित आहारातून प्राप्त होवू शकतात.
धान्य - ४०० ग्रॅम
दाळ - ५० ग्रॅम
हिरव्या भाज्या - ७५० ग्रॅम
दूध, दही - २५० ग्रॅम
तेल - २५ ग्रॅम
साखर -४० ग्रॅम
मांस - १५० ग्रॅम
फळ - १०० ग्रॅम
याशिवाय पाणी व जीवनसत्वे हवीत.
      आजच्या फास्ट लाइफ मधे फास्ट फूड व जाहिरात बाजी यामुळे नको ते अन्न सेवन केल्या जात आहे.
आपण स्वतः आणि घरातील मुले देखील. आपण संतुलित आहार घेत आहोत की नाही तेही स्पष्ट करता येईल.
संतुलित आहाराची लक्षणे
१ ) शारीरीक व मानसिक विकास होतोय.
२ ) उंची व वजन योग्य प्रमाणात वाढते आहे.
३ ) मासपेशी कार्यशील आहेत.
४ ) हाडे मजबूत आहेत.
५ ) शारीरीक त्रास होत नाही.
६ ) रोगांचा प्रभाव कमी होतो.
७ ) चांगली झोप लागते.
८ ) आरोग्य चांगले राहते.
९ ) सतत आनंदी व उत्साही राहतात.
       
   या पैकी चे लक्षणे दिसत नसल्यास समजावे आपला आहार नक्कीच बिघडला आहे. ' शरीर धड तर मन धड .' त्यासाठी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. सामाजिक स्वास्थ बिघडण्यास हे ही एक कारण आहे. त्यामुळे संतुलित आहार ही आता काळाची गरज झाली आहे.

किशोर झोटे @32
औरंगाबाद.


[9/25, 6:44 PM] Kalpna Jagadale
••••••••••••••••••••••••••••••

*_संतुलित आहार- काळाची गरज_*

•••••••••••••••••••••••••••••••

    *Health is wealth*

म्हणतात कारण पैसा देवूनही आरोग्य कोणा एका दुकानात विकत मिळत नाही.आणि निरोगी आरोग्य हे सातत्याने सुयोग्य आहार घेवूच मिळवायचे असते. चागल्या सवयी या जाणीवपुर्वक लावाव्या लागतात नि वाईट सवयी मात्र कळतनकळत कधी जडतात तेच कळत नाही तदवतच आपणास अन्न विषयक संतुलित आहार हा जाणिवपुर्वकच अंगीकाराव्या लागतील तर या धकाधकीच्या जीवनात *निरोगी शरिरात निरोगी मन* वास्तव्य करेल.

आजची जीवन पद्धती ही बदलत चालली आहे आधुनिकतेचे भुत प्रत्येकाच्या डोक्यात बसले आहे. त्यामुळे फॅशनच्या नावाखाली पिझ्झा मैदायुक्त पदार्थ सर्रास खाल्ली जातात त्याच्या परिणामाचा विचारच कोणी करत नाही. नि मग मधुमेह,लठ्ठपणा,रक्तदाब,अशा नाना आजारास सामोरे जावे लागते.

सारासार विचार केला तर संतुलित आहार हा कसा असावा तर ज्या आहारात प्रथिने,पिष्टमय ,सिग्ध पदार्थ तसेच क्षार व जीवनसत्वाचा व पालेभाजांचा समावेश असावा. असा अहार जर सर्वानी घेतला तर दवाखाना नि आजार दोन्हीही दूर राहतील.हजारो रूपये देवून औषध खाण्याऐवजी संतुलीत आहार घेतला तर नक्कीच जीवनमान वाढेल.

माझा अनुभव शेवटी सांगते माझी आई नौकरी करणारी असल्यान कळतनकळत मी ही बिस्किट,ब्रेडमध्ये अडकली होती(माझ्या आईवडिलास इथे मी मुळीच दोष देणार नाही) पंरतू नौकरी लागली नि आहाराचे महत्व कळले नि तेव्हपासुन मोड आलेली कडधान्य,पालेभाज्या इ. समावेश आहारात सुरू केला आजतागयात यामुळे माझा मुलागी-मुलगी जेवतांना कच्ची मोड आलेली मटकी-मुग,काकडी,गाजर,पत्ताफ्लावर इत्यादी खातात ती माझ्या सवयीमुळे. आईन स्वत: कंटाळा टाळला तर घरात संतुलित आहार नक्कीच सर्वास मिळेल अस मला वाटते

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
कल्पना जगदाळे@8★बीड
👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿


[9/25, 6:54 PM]  Vrishali Wankhede
🍏संतुलित आहार 🍎काळाची गरज***

✍🏻...वृषाली वानखड़े*

🌴अमरावती🌴*75*

आपले चाकोरी बद्ध नियम असेल तरच आरोग्य उत्तम...
आजच्या युगात काय खावे नी काय खाऊ नये हे सर्वांच्या डोक्यात ठसले तरी वळतात पाऊल रोड वरच्या व्यंजन कड़े,

अंगी आरोग्य प्रदूषित करण्याचे अर्धे कार्य आपणच करत आहे.
आज आपण स्वतः ला आधुनिक व् सुसंस्कृत समजू शकतो पण सुखी मात्र मुळीच नाही. संपत्तिच्या लालसेने आपण पाषाण हृदयी बनत जात आहोत, जीवन मुल्ल्याचा ऱ्हास होऊ लागला आहे, कुटुंब स्थिरता डगमगत आहे, कारण तर सर्वांचे सारखेच.......

आहार योग्य घ्यायला तज्ञ असावे लागत नाही, निरक्षर आई तीच काळजी घेईल जी शिक्षित घेईल. पुर्वी निकोब सकस आहार नैसर्गिक मिळायचा, आता चे पौष्टिकता % वर मोजावी लागत आहे.......

आपले आरोग्य आपल्या हातात*********काय खावे नी काय नव्हे हे सांगू इच्छित नाही, वाचनाने सर्व निकोब झाले आहे, तरीही कुठे कोण चुकत आहे????

आहार तर बनवावाच लागतो पण तोच जर क्यालरिज चा विचार करुन बनवला तर मुलांच्या नी आपल्या हिताचे. आपण जसे वागतो तसे अनुकरण मुले करतात, आपणच नेहमी चटक---मटक तळलेले पदार्थ, बाहेरील खान्याची ओढ़ त्यामुळे मुले तसेच बनून कुटुंबाचे आरोग्य औषधांच्या खाइत ढकलतो.

वेळ नाही**या नावाखाली मानसिक तणाव वाढलेला दिसत आहे, सकस आहार घ्यायला वेळ नाही हे समीकरण अवघडच . रोज सकाळी कामावर (शेतात)जाणारी स्त्री ची धावपळ नी शहरी नोकरी  सांभाळ नारी ची कसरत सारखीच. पण, ग्रामीण सकस***शहरी निकस असा तो आहार.
***सकाळी ब्रश न करता तीन ग्लास पाणी पिने आरोग्याचे नीट लक्षण**सकाळी आवश्यक तेवढे ताजे जेवण, संध्याकाळी 8 च्या आधी हलके जेवण, जेवनाच्या अर्धा तास आधी एक ग्लास पाणी पिने***जेवण झाल्यावर एक तास ने पाणी पिने**जेवनात मधे पाणी पिने घातकच.
आम्ही *तनिष्का* मेळ घाट सर्वेला जेव्हा गेलो तेव्हा डोमा* गावचा एक कुपोषित मुलगा, आई आजाराने ग्रासलेली, तिच्या घरात वरिचे तांदुळ , नाचनी, लाल ज्वारी भरपूर दिसले, काही कंदमुळे पण***
तीला मी म्हटले, इतके पौष्टिक धान्य तुझ्या घरात नी तुझा मुलगा कुपोषित***
तीला समजले , पटले पण, कसे अन्न द्यायचे , गवहांकुर रस तयार करण्याबाबत माहिती दिली, आर्थिक मदत सुद्धा केली****

आपले आरोग्य , आहार तर जपायचच पण त्यांच्याही मदतीला धावने आवश्यक ज्यांना आपली गरज आहे........

नेहमीच शुद्ध शाकाहारी आहार आरोग्य नीट ठेवतो,
मासाहार व्यक्तीला क्रूर  बनवतो**

धावपळीच्या जीवनात आपल्या आरोग्य साठी *योग* आवश्यक तेव्हडा व्यायाम अतीउत्तम..****


बाहरचे पदार्थ  टाळने हितकारक🙏🏻


🍏वृषाली वानखड़े☔

✨✨✨✨75✨✨✨✨✍🏻..........


[9/25, 6:57 PM] ‪+91 99752 32602‬
*साहित्य दरबार वैचारिक लेखमाला*

*दिनांक :-* 25 सप्टेंबर 2016 रविवार

*विषय :-* संतुलित आहार : काळाची गरज


संतुलित आहार म्हणजे शरीरासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या पोषक तत्वांचा विशिष्ट प्रमाणात आहारात समावेश असने याला आपण संतुलित आहार म्हणू शकतो.
या पोषक तत्वात प्रोटीन, कार्बोहाईड्रेट, विविध विटामिन, कैलसियम, सोडियम, सल्फर , जिंक, पोट्यासीयम,  आयरन अशा अनेक तत्वांचा समावेश होतो. हे तत्व आपल्या आहारात कश्याप्रमाणे समावेश करता येतात हे आपण खाली पाहणार आहोत.
नियमित योगासने व व्यायम सुद्धा सदृड शरीरासाठी अत्यावश्यक आहे.

पोषक अन्न न खाल्याने थकावट येने, चिडचिडी येने, इच्छाशक्तिची  कमतरता भासने आदी व्याधि पिडतात. त्यामुळे आजच्या धावपळीच्या जीवनात संतुलित आहार घेन काळाची गरज बनली आहे. तसच जंक फूड खाण टाळल पाहिजे.

आपल्या वयानुसार व शरीर संरचनेनुसार आपल्या वेगवेगळ्या प्रमाणात या तत्वांची गरज असते.
पुरुषाला दररोज जवळ पास 2500 कॅलरी ऊर्जा लागते  तर स्त्रियांना 2000 कॅलरी लागते. तसेच लहान मुलांना 1000 च्या जवळपास कॅलरीची गरज असते.


1) कार्बोहाइड्रेट -
   कार्बोहाइड्रेट  हे जलद ऊर्जा देणार स्त्रोत आहे. हे गहू, तांदूळ, बाजरी, गोड पदार्थातुन मिळत. ग्लूकोज़ हे जलद ऊर्जा देत.


 2) प्रोटीन-
आहारात प्रोटीनची मात्रा खुप पाहिजे कारण प्रोटीन है पेशी बनवन्यास महत्वपूर्ण भूमिका वठवतात.
प्रोटीन आपल्याला  डाळ, दूध, अंडी, मासे,  अनेक फलांपासून मिळते.
गायी च्या 1000 ml दुधात 150- 200 ग्राम प्रोटीन असत तर शेनगदाने, दाळ 1 kg तुन 200 ग्राम प्रोटीन     मिळत.


3) विटामिन-
  वीटामीन (जीवनसत्वे) आपल्या शरीरातील अनेक अवयवांना  चालवायच काम करतात. हे ताजी फळ भाजी , अंडी , तांदूळ, टमाटे लिम्बु, गाजर तसेच सर्व फळातुन उपलब्ध् होतात. विटामिन A, B , C, D, K हे अनेक वितामिनच उदाहरण आहेत.  यांच्या कमतेरतेमुळ अनेक आजार जुडतात.


4) दूसरे मूलतत्व -
 आयरन, कॅलसियम, ज़िंक, सोडियम, पोटयासियम, सल्फर अशी अनेक मूलतत्व शरीरासाठी आवश्यक आहेत.


संतुलित आहारासाठी 50% ऊर्जा कार्बोहाइड्रेटपासून, 25 % ऊर्जा  प्रोटीन पासून तर विटयामिन व अन्य  मुलत्ववातुन 25% ऊर्जा मिळवली पाहिजे.


1)  एक चपातितुन 60  कॅलरी ऊर्जा मिळते.
2) एक वाती भातातुन 70 कॅलरी
3. एक वाटी दाळीतुन 150 कॅलरी
4) 100 ml दूधातुन 30  कॅलरी
5) एक अंडयात 80 कॅलरी
6) एक इडली 100 कॅलरी
7) एक चमच्या तुप 50 कॅलरी
8) एक चमच्या साखर 30 कॅलरी
9) एक बिस्किट 30 कॅलरी
10) एक वाटी पालेभाजी 150 कॅलरी


विविध वेळेच्या आहारात यांच योग्य प्रमाण घेतल्यास नक्की शरीर सदृड रहन्यास मदत होईल.
या धावपळीच्या जीवनात आहार सुद्धा स्मार्ट पाहिजे.
                  अमोल अलगुडे
                         स क्र 51
[9/25, 8:05 PM] ‪+91 75880 55882‬: 🌹साहित्य दरबार🌹
🌹संतुलित आहार🌹
स्पर्धेसाठी
****************
स्नेहलता कुलथे 🌹
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे,सहज हवन होते नाम घेता फुकाचे,जीवन करी जिवीत्तवा अन्न हे पूर्ण ब्रह्म,उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म....
        श्लोक म्हटल्याशिवाय अन्नाला हात लावु देईल तर शपथ आई जेऊ का? जेव रे बाळा ,श्लोक म्हटला म्हणजे कसे आपण 'जेवण' या कार्यासाठी सज्ज होतो.अग आई सज्ज म्हणजे काय ?ती काय लढाई वगैरे आहे का?त्यावर आई म्हणाली ,हो बाळा ती पण एक लढाईचे असते अगदी नियोजनाने ,नियंत्रणाने करायची.
       खरेच ना,रोज नियमीत जेवण करणे ,वेळेला जेवण करणे जेवणातील सर्व पदार्थ भाज्या, उसळी,चटणी,कोशिंबीर, दही, दुध,  ताक ,लोणी तूप,फळभाज्या तंतूमय भाज्या, कडुकारले,पडवळ,काकडी ,भोपळा, अगदी तोंडला देखील आपण एकाच दिवशी खातो का?नाही ना .ठरवलेल असत अगदी सोमवार ते शनिवार वेळापत्रकाप्रमाणे भाज्या खातो.
रोजच्या जेवणात आपण सर्व सत्वानी युक्त असे अन्न खातो दुध गडद हिरव्या भाज्या तृणधान्य डाळी लिंबू. आपल्याला  आवश्यक असणा-या आकाराची बरीच पोषकतत्वे दूधात व हिरव्या भाज्यात असते.म्हणून त आपण दूधाला पूर्ण अन्न म्हणतो.थोडेसे जेवण कमी झाले तर आपण एक
कप दूध घेऊन त्याची कमतरता भरून काढतो.परंतु दूध शक्यतो
सकाळी घ्यावे कारण सूर्यप्रकाशामुळे त्यात काही शरीरासंबंधीचे आवश्यक जीवनसत्वे तयार होतात.पचायला पण सुलभ होते.नसता रात्री दूध पिणे व झोपणे म्हणजे शरीरात नसती चरबी साठवणे होय.आपला आहार जेवढा जीवनसत्व युक्त असेल तेवढी आपल्या शरीराचीवाढ सक्षम असते.प्रकृती नुसती जाडजुडअसूनफायदा नाही तर शरीरयष्टी ही वय आणि उंची नुसार  मापात हवी वजन व्यवस्थित हवे.आवडले नाही म्हणून खायचे नाही व आवडले म्हणुन खूप खायचेअसे नको.आवडीचे खाणे न आवडते खाणे परंतु सर्वच कसे मन लावून खाणे खाताना मन प्रसन्न ठेवणे हात स्वच्छ असणे हे तर अत्यंत आवश्यक आहे.जेवण करताना पाणी न पिणे ह्या सवयी असणे हे देखील तेवढेच क्रमप्राप्त आहे.आहार कुठलाही घ्या शाकाहार मांसाहार परंतु जेवढ्या कॅलरीज आहार आपण सेवन करतो त्यापटीत आपल कार्य पण झाल पाहिजे. नसता जिभेचे  चोचले पुरवण्यासाठी खातो खूप पण पाय मात्र नंतर उचलत नाही.काम करतायेत नाहीघाम येतो श्वास भरतो बापरे..
    सध्या शाळेत शिकणारी मुले खाण्याच्या बाबतीत खूप अनभिज्ञ आहेत.आई माझ्या मित्रांनी डब्यात पिझ्झा आणला होता.मला पण दे डब्यात. .ते माझ्या पोळी भाजीला हसतात..माझी टिंगल करतात आणि आईचा पण स्टेटस जागा होतो..मी तुला बरगर देते डब्यात  ने जा...असा संवाद आपण आजकाल हौसेनी ऐकतो..
मुलांना कसे डब्यात पोळी भाजी हवी ज्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतात.त्याच वाढत वय असत सकाळी चार-पाच बदाम -खारीक खाऊन त्यावर एक ग्लास दूध पाजले की ...डबा भरला की मुल हसत खेळत जातात शाळेत व मदत पण नाहीत.मटकी मोड आलेले धान्य शाळेतून आले की एखादे फळ खायला कशी वाघासारखी लेकर होतील आमची पण सर्व सवयी आईला मात्र लावून घ्याव्या लागतील.प्रत्येक ऋतुमध्ये येणारे
फळ सर्वांना मनसोक्त खाऊ दिले पाहिजे बोर जांब सिताफळ रामफळ कैरी आंबा चिंच जांभळे केळी सफरचंद मोसंबी संत्री आवळा.आपला निसर्गच आपल्या आहाराची एवढी काळजी घेतो.आंबे खाऊन खाऊन शरीरात एवढी साखर झालेली असतेलगेच जांभळे येतात व साखर लगेच कमी.ऋतू प्रमाणे फळ येतात आपण निसर्ग नियमाचा अवलंब करतच नाही .संतुलित असत पण आपण पर्यावरणाशी एकरुप होत नाही.सकाळी स्वच्छ हवेत फिरत नाहीत पण रात्री acमध्ये झोपतो.ऋतू प्रमाणे येणा-या फळ व भाज्या याचा आस्वाद घेतला तर मित्रांनो शरीरात प्रतिकार शक्ती वाढते व पर्यायाने शरीराचा समतोल राखल्या जातो.प्रत्येक वेळी आपण ABCDB1B9B12असे लेबल लावून वस्तू खाणार आहोत का?पर्यावरणाने आपल्या जीवाची आपल्या संतूलित आहाराची काळजी घेतली आहे.
नाहीतरी गरीबांचे लेकरे शालेय पोषण आहारावरच मोठी होतात ना..कारण त्आत कडधान्ये आहेत.अतिसेवनाने त्रास होतो म्हणून आपल्या प्रत्येक जेवणात चतकोर भाकरीची भुक असावी
     मी शाळेत मुलांना एक उपक्रम सांगितला आहे .तुम्ही दररोज सकाळ पासून काय काय खाल्ले याची नोंद ठेवा .जीवनसत्व युक्त होते का?तपासा ...व नंतरपुढे काय कमी आहे ते तपासा म्हणजे तुम्हाला कळेल आपण काय खातो व काय काय खायला पाहिजे.
      संतुलित आहारानी माणसाचे शरीर स्वस्थ राहाते ,निरोगी राहते निरामय राहते निरविचारी राहते संतुलित राहते सुटसुटीत राहते .भाकरी पोळी भाजी भात याशिवाय अन्नात अजून काहीमोठे नाही ते खावे .स्वच्छतेच्या सवयी लावून चांगल्याप्रकारे चावुन खावे.भराभरा जेवु नये .शांत मनाने  व आनंदाने जेवावे आपले शरीर सुदृढ झाल्याशिवाय राहणार नाही.
************************
[9/25, 8:42 PM] ‪+91 86524 50032‬: संतुलित आहार : काळाची गरज
      कोणत्याही   माणसाची धकाधकीच्या  आयुष्यात माफक अपेक्षा असते कि, माझे जीवन सुखी, आनंदी असावे. मग सुखी जीवनासाठी निरोगी शरीर अतिमहत्वाचे ! महात्मा गांधीजीनी म्हटले कि शरिर हे साधन आहे, त्याची काळजी प्रत्येकाने ठेवावी . आपल्या शरीराचे इंधन मंजे अन्न म्हणजे आहार तीही संतुलित . याबाबत भगवद्गीतेत ६व्या अध्यायात १७ व्या श्लोकात सांगितले कि,
            युक्तःराविहारस्य युक्ताचेष्टस्य कर्मसु /
            युक्तास्वनावाबोधास्य  योगो भवती दुखः //
     म्हणजे श्रीकृष्णानी अर्जुनाला असा उपदेश केला कि, ज्याचा आहार संतुलित आणि आचार ,विचार उत्तम आहे वेळेवर झोपणे ,उठणे  क्रिया आहेत.अशा व्यक्ती च्या जीवनात दुखाचा शेवट होतो.  यावरून लक्षात येते कि सत्त्व युगापासून ते कलीयुगापर्यंत संतुलित आहार महत्त्व टिकून आहे .
‘ बदल हा निसर्गाचा नियम आहे ‘
त्याप्रमाणे आहाराच्या पद्धती , सवयी बदलत आहे या बदलाची डोळे झाकून अवलंबन केल्याने शरीराच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. याचे मूळ कारण आधुनिकतेने दिलेले फास्ट फूड व प्रोसेस्ड फूड ! या पदार्थाचे सेवन मोठ्या प्रमाणात सर्वजण  रोज किंवा समारंभाच्या निमित्ताने करतो. यात वडापाव, सामोसा ,पिझ्झा , बर्गर, पाणीपुरी ,ई. पदार्थ येतात. फास्ट फूड व प्रोसेस्ड फूड यामध्ये अधिक प्रमाणात फट ,शुगर असते .हे पदार्थ मैदा,मसाले  यांचे असल्याने पौष्टीकता कमी असते . लहान मुलांना दिले जाणारे मगी ,चोकलेट, बोर्नविटा, व काही बिस्किटात कृत्रिम रंग, अजीनोमोटो, पेस्टीसाईड ,असल्याने खाण्यास हानिकारक  तसेच वजन वाढवतात . यातील शुगरने अमली पदार्थाप्रमाणे मेंदूवर व भुकेवर परिणाम होतो . जंक फूड च्या सोबतीला सोफ्ट ड्रिंक सरसपणे घेतले जाते
य पेयामुळे सहरीरातील असिड कमी होऊन अल्सर होते . शीत पेयाचे अति प्रमाणात सेवन केल्याने मृत्यु झाल्याच्या बातम्या आपण पाहिल्या असतील यावरून शीत पेयाची तीव्रता आपल्या शरीरास योग्य नाही . म्हूणन अश्या जंक फूडचे सेवन १ ते २ महिन्यातून एखादे वेळेस करावे . य पदार्थातून एनर्जी पटकन मिळते पण पोषकतत्व नाही.उलट कान्सेर , अल्सर सारखे दुर्धर आजार होतात. याला सर्वोत्तम उपाय म्हणजे संतुलित आहार होय .
          संतुलित आहारात आपल्या रोजच्या जेवणात किमान पुढील पदार्थ असावेत अगदी गरीबही संतुलित जेवण घेऊ शकतो त्यासाठी श्रीमंतच असावे असे काही नाही .पोळी ,भात, वरण, लोणचे, चटणी ,आमटी  असली कि पदार्थाचे सगळे घटक येतात जसे पिष्टमय, प्रथिन, स्निग्ध, खनिजे व जीवनसत्त्व होय . आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे शरीरातील आजार दूर करण्यासाठी जेवण/ आहार हाच उत्तम औषध आहे. य आहारात तृणधान्ये ,कडधान्ये ,फळे , भाज्या ,दुध व दुधाचे पदार्थ ,मीठ व पाणी  हे  घटक चौरस म्हणजे संतुलित आहार करतात . आहाराचे प्रमाण स्त्री ,पुरुष , मुले याप्रमाणे बदलते तसेच काम करण्याच्या पद्धती वरून कष्टकरी, बसून कामे असल्यास आहार कमी जास्त होतो .वयोमानाप्रमाणे हि आहाराचे प्रमाण ठरते .आहार अति प्रमाणात घेतल्यास आजार होतो. महावीरांनी विवेक दर्शन पुस्तकात म्हटले कि ,जिभेला आवडेल ते न खाता संयम ठेवून जेवल्यास विवेक होतो. तर अविवेकाने न जेवता ,अति प्रमाणत आहार खाऊ नये .तसेच अन्नाचा अपव्यय टाळावा. कारण
‘अन्न हे पूर्ण ब्रम्ह आहे’
        आहार घेण्याआधी स्वयंपाक महत्त्वाचा आहे .कारण या कृतीत अन्नाची पोषकता टिकली तर संतुलित आहार मिळेल . भाज्या शिजविण्यापुर्वी व चिरण्यापुर्वी धुवावे. भाज्या शिजवलेले पाणी फेकू नये तर फोडणी दिल्यावर परत भाजीत टाकावे.फायबरयुक्त ,मिक्स भाज्या कराव्यात. ऋतुमानानुसार  लाल , पिवळ्या ,हिरव्या फळे व भाज्या खाणे अति उत्तम .पालेभाज्या व फळभाज्या आहारात असाव्यात. कच्च्या फळभाज्या जसे गाजर ,कोबी ,काकडी खावी परंतु चिरल्यानंतर अधिक काळ ठेवू नये कारण पोषकता कमी होते.अंकुरित व मोड आलेले कडधान्ये खावे. पोटाचे विकार १ वाटी दही रोज एकदा खाल्यास दूर होतात . आयुर्वेदात शरीराच्या तीन प्रवृत्ती सांगितल्या आहेत. वात, पित्त,कफ हे लक्षात घेवून आहार ठरवावा . जेवणाचे पुढील ३ प्रकार होतात .
1. सत्त्व–  तेलमय ,रसभर ,पौष्टीक
२.राजस- आंबट, खारट, गरम, सुखे ,भाजलेले पदार्थ
३.तामस- वाईट वास येणारे , अर्धवट भाजलेले व शिजलेले ,अशुद्ध, शिळे
  यापैकी सात्त्विक जेवणाचे सेवन करावे. जेवताना मध्ये मध्ये पाणी म्हणजे अमृत ! होय .त्याने शरीराची मल पदार्थ बाहेर टाकण्यास / उत्सर्जित उपयुक्त होते . दोन जेवणाच्या दरम्यान ३ ते ६ तासाचे अंतर असावे. सकाळी जेवण ११ ते १ तर रात्रीचे जेवण ७ ते ९ य दरम्यान घ्यावे. आहारात  पेय म्हणून लस्सी, फळांचे रस (कृत्रिम क्रीम नसलेले), गुनगुना पाणी, कैरीच पन्ह, बदाम शेक,लिंबू पाणी, मध व पाणी साखर व गुळ टाकून घ्यावे. सुका मेवा ,मसाल्याचे पदार्थ याचे योग्य प्रमाण घ्यावे.  त्यासाठी सकाळचे जेवण राजाप्रमाणे पोटभर  तर रात्रीचे जेवण भिकाऱ्याप्रमाणे कमी खावे .
       महाराष्ट्र शासनाने मेळघाटातील आदिवासी भागात सर्वेक्षण केले असता त्यांच्या लक्षात आले कि तेथील लोकांच्या शरीरात लोहाचे प्रमाण कमी आहे म्हणून जेवणात आंबट पदार्थ हवाच जसे कि लिंबू किंवा लोणचे, आमसूल इ. कारण प्रथिने व लोह शरीरातून कमी प्रमाणत रक्तात मिसळून जास्त प्रमाण मूत्रातून भर येते तेच जर सोबतीला सी विटामिन असल्यास लोहाचे प्रमाण वाढते. आयोडीनयुक्त मीठ याचे मार्गदर्शन शासनाने केल्याने माणसाच्या आहार्त मग शरीरात लोह वाढले.
प्रोटीन हा शरीरबांधणीचा महत्त्वाचा घटक आये .शरीर सुडौल दिसावे म्हणून प्रोटीन सप्लीमेंट सेवन करण्याचे प्रमाण वाढत आहे .परंतु प्रोटीन सप्लीमेंट सेवन करण्याचे बंद केल्यास शरीराची दुरवस्था होते.हे आपणाला WWF मधील स्पर्धकांचे खेळ सोडून दिल्यावर पाहिल्यास दिसून येते , जणू शरीर तंदूरूस्त न होता क्षय झालेला दिसतो. प्रोटीन सप्लीमेंट सेवन टाळावे.
        संतुलित आहारासाठी डायट करणे टाळावे. बऱ्याच स्त्रिया, तरुण सुंदर व्यक्तिमत्त्वासाठी कमी आहार घेतात, परंतु फ्रान्स येथे मॉडेल यांचा आरोग्य तपासणी अंती असे लक्षात आले कि त्या सर्व कुपोषित आहेत . शरीराला सर्व अन्न घटक मिळणे गरजेचे आहे. डायट करणे हा योग्य मार्ग नव्हे !
       जैसा खाए अन्न वैसा होय मन
      या उक्तीप्रमाणे लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत खाण्याचा प्रमाण तसेच पोषकतेवरून शरीर मन दिसून येते . जर कुटुंबात कुणी आजारी असेल टर इतरांची शारीरिक ,मानसिक ,आर्थिक हेळसांड होते. आपल्या संस्कृतीत घरात अन्नपूर्णा माताची भूमिका प्रदान केली मतांनी आपल्या पूर्ण कुटुंबाला संतुलित /चौरस आहार मिळेल  याची दक्षता घ्यावी.
     बाहेर ,हॉटेल मध्ये ,विकत मिळणारे पदार्थाची पोषकता तपासणी व्हावी तसेच शुद्ध पाणी व आहार सेवन करतो याची काळजी घ्यावी कारण विषबाधा  होण्याची शक्यता असते . संतुलीत आहाराने सुदृढता मिळतेच व जीवन ध्येय गाठण्यास सहज शक्य होते तरच आपणाला निरोगी शरीर मिळेल व आपले राहणीमान दर्जा उंचावेल,सुखी ,आनंदी जीवन मिळेल .
निता आरसुळे जालना@८९