Thursday, 29 September 2016

नाद चारोळी दिनांक 29 सप्टेंबर 2016

📚 *साहित्य दर्पण* 📚

अायोजित नाद चारोळी स्पर्धा....
      दि.२९.०९.१६

*धगधगती अाग दहशतवाद*

*परीक्षक-मारुती तु.खुडे*

*संकल्पना - अाप्पासाहेब सुरवसे*

*संयोजक-वृषाली वानखड़े*

*संकलन - संतोष शेळके*

*ग्राफिक्स-अनिल लांडगे सर*

      *संकलित चारोळ्या*

_आपलेच आपल्या पाठीत_
_खंजींर खुपसवत आहेत_....
_*दहशतवादाच्या* या_ _*धगधगत्या आगीत*_ _निष्पाप गतप्राण होत_ _आहेत_...

*~→👆🏿स्पर्धेसाठी👆🏿←~*
*कल्पना जगदाळे@8★बीड*

नाद चारोळी स्पर्धा...
नका करु खाक
फुलु द्या मानवतेची बाग ।
या सार्‍यांनी मिळुन
विझवु दहशतवादाची आग ।।
नरेंद्र म्हस्के , शिरपुर @ 65

दहशतवादाच्या धगधगत्या आगेत
शहीद झाले 18 विर भारतीय जवान  जगाच्या नकाशातून मिटवले पाहिजे
जुलमी शत्रूंचे कायमचे नामोनिषाण.

घनश्याम बोह्राडे
बुलडाना
समुह क्रमांक 19

*स्पर्धेसाठी चारोळी*

*नादचारोळी स्पर्धा*

*छळतोय आतंकवाद्यांचा नापाक इरादा*
*काश्मिरसाठी हा अर्थहीन वाद आहे*
*निष्पाप जीवांचे सांडते रक्त शरिरातूनी*
*ही धगधगती आग दहशतवाद आहे*

*ज्ञानदेव काशिद*
*समुह क्रमांक 63*

नाद चारोळी स्पर्धेसाठी :
धगधगती आग दहशतवाद
होरपळ अवघी वाढता उन्माद
विकास होई स्वाहा, निष्ठांचा प्रवाद
निवाराया विपदा घडावा संवाद
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे
@39

"दहशतवादास पोषक बिभिषण
वसतात इथेच पदोपदी
त्या आगीत होरपळतेय जनता
जशी भर दरबारी द्रोपदी"

.......जयश्री पाटील🖌
       वसमतनगर
    स्पर्धेसाठी👆🏻


दहशतवादाची आग पहा,
कशी आहे धगधगती।।
अतिरेक्यांशी लढून आहे,
जवानांच्या भाळी वीरगती।।


✒अनिल लांडगे उंडणगाव@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

✖स्पर्धेसाठी नाही...✖

नाद चारोळी स्पर्धेसाठी :

26/11मुंबई आणि18सप्टेंबर च्या उरी हल्ल्यात,

दिसून येतो भस्मासुरी दहशतवाद।
 
विझवायची असेल ही धगधगती  आग,

तर घातली पाहिजे माणसानी माणुसकिला साद।

मीनाक्षी माळकर

*दहशतवाद धगधगती आग नव्हे ज्वाला *
आतंकवाद्यानों अमानुष इरादे मिटवूनी टाका
कश्मीरसाठी करु नका बेछूट गोळीबार
ऐकू येत नाही कशा निष्पाप रक्ताच्या  हाका
****************************
मीना सानप  बीड @ 7
9424715865
स्पर्धेसाठी👆

*स्पर्धेसाठी*

*दहशतवाद* न पाहतो कोणाचा धर्म

*आग धगधगती* नसे कोणाची मिञ

नेटाने लढवावी आपली खिंड आपण

बदलेल कधी ना कधी हे भीषण चिञ

@ २१ सुनिल बेंडे
      *नाथसेवक*

             
नाद चारोळी स्पर्धेसाठी

*‘धगधगती आग दहशतवाद’*
प्रेमाचे शिंपण असावे
नको रक्ताचा डाग
दहशतवाद म्हणजे केवळ
धगधगणारी आग !!
-  आबासाहेब निर्मळे.
पेठ वडगांव,कोल्हापूर.
9028090266.
क्र-३१

नाद चारोळी स्पर्धेसाठी

धगधगती आग उरातील आमुच्या
बेचिराख करील हा दहशतवाद
नापाक इरादे उध्वस्त करा एकदाचे
बस्स झाला आता हा संवाद.

------सुवर्णविलास (40)

स्पर्धेसाठी

मोडून टाका त्याचा उन्माद,
येऊ दया आता जाग...
विळखा तो घालतोय
धगधगती आग, दहशतवाद...॥
              श्री. हणमंत पडवळ.
                       क्र : 48.

म्हणून वावरू लागले
यातूनच मग शह काटशह सुरू झाले ..!
या धारणेत विश्वात्मकतेचा विसर
पेटली आग ज्यात दहशतवादी झाले ..!

                बंडोपंत कुलकर्णी सोलापूर
                समूह क्रमांक १३

*नाद चारोळी स्पर्धेसाठी*

माणूसकीला कालिमा फासणारे,
पाक आतंकवादी इरादे असती नापाक |
ही दहशतवादी धगधगती आग शमवण्या ,
भारताने यशस्वी केले " मिशन सर्जिकल स्ट्राईक ||

✍🏻 संतोष शेळके / कर्जत, @24

मानवतेला काळिमा                             धगधगता दहशतवाद                            सद् विवेकबुध्दी जागवा                            संपवा सैतानांचा उच्छाद                                                                                                                                📝📝निता आरसुळे,जालना@८९

दहशतवादाचा राक्षस आ वासून उभा आहे
त्यास ऐकू येत नाही निष्पापांची किंकाळी...
घेऊन शस्त्र हाती धगधगत्या मनाने लढा ऐसे
दहशतवाद कापेल ऐकून भारतियांची डरकाळी...(स्पर्धेसाठी)

✍श्री सगर पी एच✍
@८३@धर्माबाद@

*नाद चारोळी स्पर्धेसाठी*

विझेल ति दहशतवादी
पोकळी धगधती आग
रणांगनात उतरेल जेंव्हा
भारत मातेचा जवान वाघ

              अमोल अलगुडे
                    स क्र 51

*नाद चारोळी***

*माझे जवान आक्रन्दते शेवटच्या श्वासात आज*

*आतंकतेच्या क्रुरतेने आमच्या संसाराचा झाला नाश*

*आक्रोश संपता-संपेना गहिवरला अधुरा साज*

*आम्ही जवान अर्धांगिनीच करू दहशतवाद्यांचा पर्दापाश*****

🇮🇳वृषाली वानखड़े👈�

🌴अमरावती🌴*75*

👆🏻स्पर्धेसाठी 👆🏻

स्पर्धेसाठी...✍�
        🌹नादचारोळी🌹

*भारतात का फोफावतेय ही धगधगती आग*

*कुठे जातिवाद तर कुठे माजतोय नक्षलवाद*

*या वादात फक्त होरपळतेय निष्पाप मानवजात*

*कित्येक कुंकू असेच पुसतील हा दहशतवाद*

         ✍�प्रणाली काकडे✍�
            समूह क्रमांक pk38

✍नाद चारोळी स्पर्धेसाठी नाही✍

दहशतवादाची धगधगती आग
पसरवित आहे विषमतेचा धूर..
एकजूटीने देऊ लढा विसरून सारे भेद
तरच मानवतेचा अखंड वाहेल पूर..

दहशतवादाच्या धगधगत्या आगीने
बेचिराख केली स्वप्ने अनेक...
मिटवून टाकू दहशतवाद एकीने
करू कार्य देशासाठी नेक...

अन्यायाला प्रतिकार करण्या
धरिले शस्त्र हाती....
दहशतवादाच्या धगधगत्या आगीने
माणुस विसरला मानुसकीची नाती....

✍श्री सगर पी एच ✍
@८३@ धर्माबाद

स्पर्धेसाठी चारोळी

फोफावतेय धगधगती आग दहशतवाद
मानवी जीवनाचे अतोनात नुकसान
त्वरित बंद करा छुप्या कारवाया
शिकवतील धडा भारतीय जवान

.... सौ. शशिकला बनकर, भोसरी

नादचारोळी स्पर्धेसाठी
*धगधगती आग*

'कर्तृत्ववान स्त्रियांची कहाणी
धगधगती आग आहे,
स्त्रीउध्दार मंदिराचा
तो जीवघेणा त्याग आहे"
*संगीता देशमुख,@१४*

स्पर्धेसाठी .

उरी हल्ल्याचा घेवून बदला

भारतीय लष्कराकडून सर्जिकल स्ट्राईक.

उत्तर त्याला धगधगता दहशतवाद

यशस्वी मोहिम  गाजवली  नेक.

     पुष्पा सदाकाळ भोसरी
        @ 50.9011659747.

स्पर्धेसाठी .

उरी हल्ल्याचा घेवून बदला

भारतीय लष्कराकडून सर्जिकल स्ट्राईक.

उत्तर त्याला धगधगता दहशतवाद

यशस्वी मोहिम  गाजवली  नेक.

     पुष्पा सदाकाळ भोसरी
        @ 50.9011659747.


धगधगती आग आहे,
असा दहशतवाद आहे।।
देश रक्षणासाठी आमचा,
मृत्यूशी लढणे नाद आहे।।


✒अनिल लांडगे उंडणगाव@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

👆👆स्पर्धेसाठी...👆👆

भरून आला आनंदाने उर
अतिरेक्यांना केलं ठार
धगधगती आग दहशतवाद
पाकवर हल्ला जोरदार

.... सौ शशिकला बनकर, @35

स्पर्धेसाठी.

पाकव्याप्त अतिरेक्यांच्या प्रशिक्षण केंद्राना

भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केले

उरी हल्ल्याचा घेवून बदला

धगधगता दहशतवाद याला सडेतोड उत्तर दिले.

    पुष्पा सदाकाळ भोसरी.
    @ 50.

         हीच घ्यावी. स्पर्धेसाठी

नादचारोळी स्पर्धेसाठी

दहशतवादाची धगधगती आग
सीमेवर  जनजीवन होरपळते
आतंकवाद हा थोपवा आता
भारतमाता आमची कळवळते
प्राची देशपांडे
समूह क्र. १५

१- दहशतवादाची धगधगती आग
पसरत चाललीय जगात
वेळीच रोखली नाही तर
अनेक देश होतील भस्मसात

२-
दहशतवादाची धगधगती आग
देशाला नामशेष करतेय
हकनाक बळी सामान्य जीव
भ्रष्टाचाराची कीड पोखरतेय

३-
दहशतवादाची धगधगती आग
फोफावत चाललीय जगात
निरपराध्यांना होते फाशी
अपराधी पुराव्याअभावी सुटतात

४- दहशतवादाची धगधगती आग
जाळून टाकतेय जगाला
जातीधर्मभेदाची कीड लागली
देश मात्र  जातोय पोखरला
प्राची देशपांडे


🍀 स्पर्धेसाठी 🍀

धगधगली आग दहशतवादा�ची
आम्ही आता अधीर भारतवासी
सर्जिकल स्ट्राईक शत्रुवरी
दिली दहशतवादास मुक फाशी

योगिनी चॅटर्जी #52

नादचारोळी स्पर्धेसाठी ....
------------------------------------------

मिळावा आरती नंतर प्रत्येकाला

दैव भक्तीचा मनोभावे प्रसाद....

काहिसा तसाच फोफावलाय

पाकचा धगधगता दहशतवाद....

रोहिदास होले ....७१
गोपाळवाडी ,दौंड ,जि.पुणे...

धगधगती आग दहशतवाद म्हणून
पाकने रूबाब करायचा नाय
सर्जिकल स्ट्राईकने दिलय उत्तर
भारताचा नाद करायचा नाय

         शैलजा ओव्हाळ/चिलवंत
                      @ 73

वीर माझ्या देशाचे जवानांनी
दहशतवाद्याचा केला खात्मा..!
गर्व आहे 56 इंच छातीवर,
तळपतो देशासाठी वीरांचा आत्मा...!!
        गजानन पाटील पवार @81
              स्पर्धेसाठी

स्पर्धेसाठी.

पाकव्याप्त अतिरेक्यांच्या प्रशिक्षण केंद्रांना

भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केले

उरी हल्ल्याचा घेवून बदला

धगधगता दहशतवाद याला सडेतोड उत्तर दिले.

    पुष्पा सदाकाळ भोसरी.
    @ 50.

         हीच घ्यावी. स्पर्धेसाठी 🙏

स्पर्धेसाठी नादचारोळी

भारत पाक फाळणी झाली
पण द्वेश कायमचाच राहिला
दहशतवादाची धगधगती आग
भारत आता मागे नाही राहिला

    खेडकर सुभद्रा बीड २०
मो नं (९४०३५९३७६४

नाद चारोळी स्पर्धा साठी

हृदयामधे *आग* आमच्या
*धगधगती* प्रतिशोधाची आहे
आमच्या चांगुलपणावर आज
नापाक *दहशतवादी* नजर आहे

किशोर झोटे @32
औरंगाबाद.

🌹नाद चारोळी 🌹
🌹स्पर्धेसाठी 🌹
आर्त स्वराने बाळ सांगे आईला
मीच करीन त्यांच्या कामाची पूर्ती धगधगत्यादहशतवादाच्या आगीत
वचन देआई तूआहेस माझी स्फुर्ती
***************************
स्नेहलता कुलथे
क्र37🌹
**********
चिरून गेली आरपार
बंदुकीची गोळी दिलाला
धगधगत्याआगीत दहशतवादाच्या
एकता मिळेल का स्वराला

*********************
धगधगती आग दहशतवादाची
लागली एवढी सिमेवर
बाबा परतून आलेच नाहीत
बिगुल पडला कानावर

------------------
स्पर्धेसाठी चारोळी
-----------------------
दहशतवाद म्हणजे विश्वामधली
धगधगणारी आग आहे
सुंदर माझ्या धरणीवरती
पाकिस्तान नावाचा डाग आहे !
      -आबासाहेब निर्मळे.
पेठ वडगांव जि.कोल्हापूर
9028090266.
क्र-31
(हीच चारोळी स्पर्धेसाठी स्विकारावी)

१ )
    दहशतवादाला पोसतोय कोण?
    मैत्रीचे हात पुढे करतोय कोण?
    धगधगणारी आग लावतोय कोण?
    सरणावर आज जळतोय कोण?

२ )
   आकरणीय दहशतवाद आज
   भीती समाजमानसात आहे
   धगधगती आग कुठेही कशी
   सारेच कसे अशांतेत आहे

३ )
   दहशतवादाने भरडलेल्या देशात
   शांतीदूत दूर दूर का भासे
   धगधगती आग पेटलेली तरी
   शांतता नांदावी असेच वाटे

४ )
   धगधगती आग आपण सारे
   कधीच नाही का विसरणार?
   तुम्ही आम्ही देशवासी सारे
   दहशतीखालीच का वावरणार?
  
   किशोर झोटे @ 32
   औरंगाबाद.

नाद चारोळी स्पर्धेसाठी चारोळी
भाग - २४ वा
                   
             
'वसुधैव कुटुंबकम्' ही संस्कृती आमची
विष्वबंधुत्वाला सांधन्या ना कधी कुणाचा राग।
क्षणार्धात इतिहास बदलने ताकद आमच्यात परि
शांतीनेच विझवतोय दहशतवादाची धगधगती आग।।

✍🏻✍©:-कवी अनिकेत जयंतराव देशमुख. (अनु)
            रा- गोपालखेड , ता. जि. अकोला.
                    mo-9689634332
@59

*स्पर्धेसाठी*
धुमसते काश्मिर मनी खोल व्रण
घेऊनी भारतीय हळहळतोय
जणू शरीराचा लचका पाक ओरबाडून
दहशतवादाची आग धुमसवतोय
स्नेहल आयरे
      मुंबई
क्रमांक ७७

*दहशतवाद एक धगधगती आग*
निष्पापांचा यात हाकनाक बळी
युद्ध नकोच पाकवर दबाव हवा
कशाला हवी भाषेची पुढे टाळी
*श्री.आप्पासाहेब सुरवसे*
     ~_लाखणगांवकर_~
_AMKSLWOMIAW_
         AK47
❎ _~स्पर्धेसाठी नाही~_ ❎

भाक्रा-नांगल धरणावर पाकचा आहे डोळा
संपवून टाकू पाकड्यांना आम्हालाही येतो राग
दहा-बारा कोटी मृतदेह करावे लागतील गोळा
संपेल खरी धगधगती दहशवतवादाची आग

*श्री.आप्पासाहेब सुरवसे*
     _~लाखनगावकर~_
_AMKSLWOMIAW_
        *AK47*
❎  ~स्पर्धेसाठी नाही~ ❎

धगधगत्या आगीचा वनवा तो *दहशतवाद*
एवढा कसा फुलला त्याचा धर्मांध निखारा
मग *नक्षलवाद* कशाचे द्योतक आहे ❓
सरकारच्या नाकर्तेपणाचा उडतो बोजवारा

*श्री.आप्पासाहेब सुरवसे*
    ~_लाखणगावकर_~
_AMKSLWOMIAW_
         *_AK47_*
   ❎ ~स्पर्धेसाठी नाही~ ❎

दहशतवादाची आग कशामुळे धगधगती
ना पाहती माणुसकी धर्म ना नातीगोती
हॉटेल ताज- ओबेरॉयच्या नव्हे संसदेच्या इमारती
धुरांच्या लोटांत नि रक्तांच्या थारोळ्यांत कश्या धुमसती

*श्री.आप्पासाहेब सुरवसे*
      ~_लाखनगांवकर_~
_AMKSLWOMIAW_
       *AK47*

❎ ~स्पर्धेसाठी नाही~❎

नाद चारोळी स्पर्धेसाठी

*‘धगधगती आग दहशतवाद’*
मानवतेच्या शञूंना
देवा येवू दे जाग
दहशतवाद म्हणजे फक्त
धगधगणारी आग !!
- आबासाहेब निर्मळे.
पेठ वडगांव,कोल्हापूर
9028090266.क्र-31

*नाद चारोळी स्पर्धा*

*दहशतवाद* नावाच्या आगीची धग नि भडका
समूळ नायनाट नि बिमोड व्हावा याचा नेटका
किती होऊ द्यायचे अजुन वीर जवान शहीद
म्हणून पाकिस्तानचा नकाशा करावा फाटका-तुटका

*श्री . आप्पासाहेब सुरवसे*
      ~_लाखणगांवकर_~
_AMKSLWOMIAW_
           *AK47*
❎~*स्पर्धेसाठी नाही*~❎


🎯स्पर्धेसाठी🎯

पेटली सुडाची आग
दहशतवाद धगधगला
भारतीय लष्कराने
पीओकेत चढविला हल्ला !

संगीता भांडवले
वाशी, उस्मानाबाद
(१६)

_*धगधगती आग दहशतवाद*_
~↓↓↓↓→↓↓↓↓→↓↓↓↓~

*दहशदवादाची आग*तुमच्या आमच्यात एक-दोन दिवस *धगधगती* आहे...
सिमेरेषेवरील लोकांच्या मनात मात्र कायम ही ज्वाला पेटलेली आहे





_*~→👆🏿स्पर्धेसाठी👆🏿←~*_
_*कल्पना जगदाळे@8★बीड*_🖊

🌹उरी लागलेला घाव
     लावला धुडकाऊन
     दहशतवादाच्या आगीत
     धगधगणार कावून🌹
स्नेहलता कुलथे
क्र37

दहशदवादाच पाणी आता डोक्यावरून चालल आहे ..
धगधगणारी आग शांत करण्यासाठी फक्त सिंधूला अडवण्याचा विचार का करत आहे?





_*~→👆🏿स्पर्धेसाठी👆🏿←~*_
_*कल्पना जगदाळे* *@8*

हि स्पर्धेस घ्यावी

सहभागी स्पर्धकांचे आभार...
धन्यवाद..💐💐💐🙏

1 comment: