[10/30, 10:03 AM] Surwase Bsnl: 🖊 *साहित्य दर्पण Whatsapp ग्रुप* 📝
द्वारे आयोजित
🗽साहित्य दरबार वैचारिक लेखमाला स्पर्धा🗽
••••••••••••••
^^^^^^^^^^^^^^^^
📆 दिनांक - _3010/2016_
🛢 वार - रविवार
~~~~~~~~~~~~~~~~
🕰 वेळ - सकाळी 10:00 ते 7:00
*लोप पावत चाललेली भारतीय संस्कृती*
================
💥 संकल्पना :--↓↓
श्री.ना सा येवतीकर सर
*****************
💥 संयोजक --↓↓
श्री आप्पासाहेब सुरवसे
******************
💥 परीक्षक :-सौ. जयश्री जोगदंड बीड
💥संकलन - संतोष शेळके
~~~~~~~~~~~~~~
💥 ग्राफिक्स :- -------*
****************
🔦 स्पर्धेचे नियम -
💥ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे....
💥 आपला लेख किमान 100 आणि कमाल 500 - 700 शब्दांच्या मर्यादेत असावे.
💥 स्वनिर्मित लेख असावा. कॉपी नसावी
💥 लेखाखाली आपले पूर्ण नाव, गाव मोबाईल नंबर आणि email id अवश्य लिहावे.
💥स्पर्धेतील निवडक लेख संयोजक वृत्तमानपत्रातून प्रकाशित करतील याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी ..
💥 या स्पर्धेचा निकाल ग्राफिक्स सह खालील blog वर आणि आपल्या साहित्य दर्पण वर पाहण्यास दिनांक _31ऑक्टोबर 2016_ रोजी सायंकाळी 9:00 pm वाजता मिळेल. त्यासाठी वारंवार चौकशी करु नये.
www.nasayeotikar.blogspot.com
💥ग्रूपच्या बाहेरील लेखक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात...
📩 त्यासाठी .
🎾 खालील पैकी कोणत्याही एका मोबाईल नंबरवर किंवा फ़ेसबुक वर आपले लेख पोस्ट करावे ....
👤 आप्पासाहेब सुरवसे,लाखणगांवकर
📱 09403725973
👤 नासा येवतीकर, धर्माबाद
📱 09423625769
👤 श्री मारुती खुडे सर माहुर
📱09823922702
[10/30, 10:47 AM] ghanashyam borade: * विषय - *लोप पावत चाललेली भारतीय संस्कृती*
भारत आणि भारतीय संस्कृती खूप महान आहे हे भारतात राहणार्या माझ्या तमाम देश बांधवास सांगायची गरज नाही . किंबहुना हे वाक्य प्रत्येक सुजान नागरिकासाठी नवीन नाहीच ,कारण काजव्यासम संबंध संस्कृतीमध्ये चकाकणारी , स्वच्छ ,निर्मळ, समृद्ध म्हणून ओळखल्या जाणारी भारतीय संस्कृती संपूर्ण जगात अव्वल आहे. आणि हो आहेच ते पटवून देण्याची जास्त गरज वाटत नाही . भारतीय स्वातंत्र्यानंतर नव्हे तर स्वातंत्र्यापुर्वीही भारतीय संस्कृतीचा डंका जगभर पसरलेला होता आणि तो आजही आहे किंबहुना यापुढेही राहणारच.
परंतु काळानुरूप जस जशी विज्ञान विविध क्षेत्रात प्रगती करत आहे , दररोज नवनवीन तंत्रज्ञानाचा
शोध लागून भौतीक सुविधा वाढत चालल्या आहेत . खेडी पाडी, शहरे
सोयी सुविधांनी अधिक समृद्ध व आर्थिक दृष्ट्या भक्कम होत चालली आहेत . अर्थात जसजशी भारत देश इतर देशाच्या मानाने प्रगती करत आहे तस तसा तो भारतीय संस्कृतीची पायमल्ली सुद्धा करताना दिसतो आहे ,त्याचाच परिपाक म्हणून की काय या एकविसाव्या शतकात संस्कृती जोपासनारी माणसे बोटावर मोजण्या इतकी शिल्लक राहिली आहेत , बाकी सर्व धांगड धिंगाच.
संस्कृती म्हणजे खर्या अर्थाने आचार ,विचाराचे आचरण , सत्य असत्याची जाणीव , चांगल्या वाईट मधला फरक , रहाण सहान, बोली भाषा , मान सन्मान , थोर लहानाची जाणीव . एकंदरीतच सर्वांगीन दृष्टीने सुसंस्कृत होणे होय. संस्कृती ही खर्या अर्थाने व्यक्ती पासुन सुरू होते , त्यानंतर समाज , गाव, शहर ,देशपर्यंत पोहचते. तिचा सांभाळ कसा करायचा ? हे व्यक्तीपरत्वे ठरते .परंतू लोकशाही मार्गाने चालणार्या भारत देशात नको त्या गोष्टीचे अवाजवी स्वातंत्र्य लोकशाहीने बहाल केल्याने त्याचा प्रत्यक्ष परिणाम संस्कृतीवर झाला आणी समाजातला प्रत्येक घटक वाटेल तसा वागू लागला . आजच्या समाजात बदलत्या रूढी परंपरा नुसार प्रत्येकजण वागत आहे , त्यामध्ये अधिकाधिक पाश्चिमात्य संस्कृतीचा वापर होताना दिसतो . आपल्या भाषेत त्याला मॉडर्ण , फॅशन वगैरे शब्द आहेत , परंतु त्यामुळे कला जोपासने सोडाच विद्रुपता समोर येत चाललीय. म्हणून सामाजिक अस्थिरता वाढीस लागली आहे . व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण होत आहे माणूस माणसाला माणूस समजायला तयार नाही , मोठ्याचा आदर नाही . घरातील संवाद मुक बहीरे झाले . अति शिकलेले वाया आणि शिक्षित शिक्षितच राहिले . त्यामुळेच की काय भारतीय संस्कृती लोप पावत चालली आहे .
आज देशावर परकीय देश घुसखोर्या करतोय देशात काही ठिकाणी आर्थिक विषमता दिसते . दूसरीकडे 2020 पर्यंत देश महासत्ता बनु पाहतो आहे अश्या वेळी सर्वांनी एक होऊन संस्कृती टिकवण्याची देश समृद्ध करायची गरज आहे . म्हणून संस्कृती टिकवायची असेल तर समाजातील प्रत्येक स्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आहे नव्हे संस्कृतीचा अर्थ समजून सकारात्मक पाऊले उचलने गरजेचे आहे .
म्हणून म्हणावसं वाटतं
*गरज आहे आज**
*संस्कृती जोपासण्याची*
*तिळमात्र होणार नाही*
*प्रगती अन्यथा देशाची*
घनश्याम बोह्राडे
बुलडाना
मो . 8308432625
स्पर्धेसाठी लेख
[10/30, 11:00 AM] nagorao yeotikar: *लोप पावत चाललेली भारतीय संस्कृती*
*भारतीय संस्कृती वाचविण्याची गरज*
भारतीय संस्कृतीला एक परंपरा आहे, इतिहास आहे. पाश्चिमात्य देश भारतीय संस्कृतीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातुन पाहतात. भारतीय आदर्श संस्कृती विषयी अभ्यास करण्यासाठी विदेशातील अनेक ज्ञानी लोक याठिकाणी येऊन गेल्याचे इतिहासात पुरावे मिळतात. येथील कुटुंब पध्दत असेल किंवा येथील सण, उत्सव साजरा करण्याची पध्दत यास जगात तोड नाही. पुरातन काळापासून चालत आलेल्या परंपरा आणि रीतीरिवाज आज ही जशास तसे चालू आहेत. ज्यामुळे देशात एकता आणि समानता दिसून येत आहे. मात्र याचे प्रमाण जरासे कमी झाल्याचा भास काही छोट्या मोठ्या घटनेवरुन दिसून येत आहे. त्यामुळे भारतीय संस्कृती लोप पावते काय ? अशी भीतीयुक्त शंका देखील मनात डोकावत आहे.
*वृध्दाश्रमाची आवश्यकता आहे ?* -
एखाद्या वस्तुचे काम संपले की त्यास आपण अलगद बाजूला करतो. कारण त्याची गरज आपणास नसते आणि त्याव्यतिरिक्त आपले काम सुध्दा भागते. आज समाजात घरात वृध्द असलेल्या व्यक्ती च्या संदर्भात अशीच धारणा दिसून येत आहे. प्रत्येक घरात ही वृध्द मंडळी नकोसे वाटत आहेत, ज्यानी आपले पालनपोषण केले, लहानाचे मोठे केले, स्वतः च्या पायावर उभे केले, त्या जन्मदात्या मातापित्यास आपल्या पासून दूर ठेवण्याचे कृत्य आजची मुले करीत आहेत. आपल्या घरापेक्षा वृध्दाश्रममध्ये आनंदात राहु शकतात असा विचार करणारी मुले आज आढळून येतात. यास कोणती संस्कृती म्हणायची. पशू आणि पक्षी आपल्या पिलाना जन्म घालतात. त्यांना सक्षम करेपर्यंत त्यांची काळजी घेतात. जेव्हा ते स्वतः चे पोट भरून घेऊ शकतात तेंव्हा त्यांचा काही एक संबंध राहत नाही. ही पशू-पक्ष्याची प्रथा विदेशात मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे. तिथे कोणी कोणाचे आई-बाबा नसतात. तीच प्रथा हळूहळू भारतात येते की काय ? असे वाटू लागले आहे. मुला-मुलींचे लग्न झाले की घरात वाद होण्यास सुरु होत आहे. समाजातील नैतिक मुल्याची घसरण होत आहे. घरात नव्याने आलेली सून सासू-सासरे यांना आई-वडीलासमान मानायला हवे तर नक्की वाद होणार नाहीत. तसेच आई-वडील सुध्दा घरात नव्याने आलेल्या सूनेला आपल्या मुलींसमान मानल्यास वादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत. एकमेकाना समजून घेऊन वागल्यास कोठे ही असे कौटुंबिक समस्या दिसणार नाही. पण समजूतपणा दिवसेंदिवस कमी कमी होत चालले आहे. त्यामुळे तर पूर्वापार चालत आलेली परंपरा लोप होते की काय असे वाटत आहे. मातृदेवो भव आणि पितृदेवो भव असे म्हणणारे आपल्या आई-बाबावर अत्याचार करीत आहेत.
ही संस्कृती टिकविण्याचे काम सण आणि उत्सव करीत असतात.!
ग्रामीण भागात आज ही प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. प्रत्येक सण एक आगळेवेगळे वैशिष्ट्य घेऊन येतो आणि त्यातून भारतीय संस्कृतीची झलक बघायला मिळते. लोकांमध्ये असलेली एकता ही या विविध धर्माच्या सण आणि उत्सवाच्या वेळी दिसते. पण फक्त ग्रामीण भागात. शहरी भागात मात्र हे दिसत नाही. इथे प्रत्येक जण स्वार्थी आपमतलबी जीवन जगतात. सण आणि उत्सव त्यांच्या घरापुरते मर्यादित असते. त्यांना इतर लोकांच्या सुखी किंवा दुःखी जीवनाशी काही घेणे देणे नसते. आपल्या परिवारापुरते विचार करणाऱ्या ह्या शहरी भागातील लोक भारतीय संस्कृती रसातळाला नेत आहेत असे म्हणणे थोडे धाडसाचे ठरेल पण चुकीचे ठरणार नाही असे वाटते. आपल्या भारतीय संस्कृतीला शहरी भागातुन म्हणावे तसे प्रतिसाद मिळत नाही आणि याच ठिकाणी पाश्चिमात्य संस्कृती विस्तारली जात आहे. प्रसार माध्यम आणि इतर भौतिक सुविधा मिळाल्यामुळे लोक आळशी झाली. शेजाऱ्यावर प्रेम करा हा संदेश तर यांच्या फाटक वरुन कळेल की ते किती प्रेम करतात. ज्याना शेजाऱ्याचे नाव माहित नसते तो शेजाऱ्यावर वर काय प्रेम करणार ? सुख-दुःखात आणि अडीअडचणीत मदत करतो तो आपला शेजारी, हीच आपली संस्कृती आहे. जे की लोप होत आहे. शाळेत गुरुजीं मुलांना शिकावतात की शेजाऱ्यापाजाऱ्या लोकांना संकट काळात मदत करावी ही आपली खरी संस्कृती. तेच गुरुजीं प्रत्यक्षात कोणालाच मदत करत नाहीत. यावरून काय शिकावे ? पूर्वीचे गुरुजी जसे बोलत तसे वागत, त्यामुळे त्यांच्या बोलाण्याला किंमत होती, दर्जा होता, समाजात मान सन्मान होता. या उलट आज दिसत आहे. गुरुजी फक्त पुस्तक आणि अभ्यासापुरते बोलत आहेत. त्यामुळे त्यांचा दर्जा कमी झाला, मान सन्मान कमी झाला आहे. या सर्व बाबी म्हणजे भारतीय संस्कृती लोप होत चालल्याचे चिन्ह आहे आणि त्यास वाचविणे व जगविणे अत्यंत गरजेचे आहे.
*नाते संबंधात दुरावा* - नाते संबंध संस्कृती मधील एक अनोखा संगम मानले जाते. परंतु आज संबंध कमी होत चालले आहे असे दिसून येते. मुले आई-बाबाना दूर करीत आहेत. भावा-भावात वाद वाढत आहेत. सखे कोणी कोणाचे राहिले नाहीत. प्रत्येक नाते जपले गेले तर ही भारतीय संस्कृती टिकेल आणि वाढेल असे वाटते.
नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
nagorao26@gmail.com
[10/30, 11:15 AM] Nita Arasule: लोप पावत चाललेली भारतीय संस्कृती
शुभम करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा |
शत्रू बुद्धीविनाशाय दीप ज्योती नामोस्तुते ||
संध्याकाळी देवाजवळ सांजवात केल्यानंतर असे आज आवर्जून मुलांना सांगावे लागते, कारण आजच्या यंत्र युगात कोणीच भारतीय संस्कृतीचे द्योतक असलेली जेवणाआधी श्लोक वदनी कवळ घेता असो कि देवाची प्रार्थना करतानाचे श्लोक म्हणताना चुका होतात किंवा पाठच नसतात, असे श्लोक कुणाला म्हणण्याची आज गरज वाटत नाही यावरून लक्षात येते कि भारतीय संस्कृतीच्या अनेक बाबी जनामानातून नाहीश्या होत आहे. सकाळी तुळशीला पाणी घालून पूजणे, सूर्यनमस्कार करणे याची कथा व महत्त्व आपणाला माहितच नसते, जेवताना जमिनीवर बसणे व हाताने जेवणे यामुळे पोटातील नभी चक्र सुरु होऊन पचनास मदत होते तर हाताने जेवल्यास बोटांचे कौशल्य विकास पावते. पुरातन काळापासून नवजात अर्भकास नवे कोरे कपडे न वापरता जुने मऊ सुती कपडे देतो कारण त्वचा आजार होऊ नये किंवा कपड्यातील केमिकलचा त्रास होऊ नये. बिंदी लावणे, नमस्कार करणे, पाया पडणे यातून मेंदूतील भागांना रक्त पोहचून आताच्या भाषेत रिफ्रेश होतो अशी लहान लहान गोष्टीचा विचार करणारी आपली संस्कृती थोर आहे.
आपल्या संस्कृतीचे खास वैशिष्ट्य आहे ते पितृसत्ताक कुटुंबव्यवस्था होय. यात पित्याच्या घरी मुलांचे पालन पोषण करून त्यांचा जीवनाला नवा आयाम दिला जातो पण संस्कृतीच्या वैदिक काळातही नसलेली हुंडा, बालविवाह सती ,केशवपन चालीरिती सुरु झाल्या समाजाला अवकळा आली. अठराव्या शतकात व भारतात स्वातंत्र्यकाळात पुरोगामी विचाराचा पुरस्कार करून नको असलेल्या चालींना कायदे करून बंदी केली हेच उत्तम ! पण आवश्यक असलेल्या परंपरा पालन तितकेच गरजेचे आहे !! तर अशा अजरामर संस्कृतीचा आढावा थोडक्यात घेवू.
भारतीय संस्कृती हि जगामध्ये सर्वाती जुनी व समृद्ध अशी विविधतापूर्ण आहे. जगात नाईल संस्कृती, मेसोपोटेमिया संस्कृती यांना समकालीन असून आपली संस्कृती हि सिंधू संस्कृती म्हणून ओळखली जाते. नावाश्मयुगापासून माणूस समूहात राहू लागला समाज निर्मिती झाली संस्कृती निर्माण केली आणि संस्कृती म्हणजे समाजातील जगण्याच्या पद्धती होय, यात भाषा, पोशाख, खाण्याचे पदार्थ व सवयी, सण व उत्सव, कला -काव्य, कथा, संगीत, नाटक, नृत्य, चालीरिती परंपरा या अनेक घटकांचा समावेश होतो. या आपल्या संस्कृतीचा आज आपण एक घटक आहोत, त्यांचा अंगीकार आपण प्रत्येक प्रसंगात करतो. संस्कृती परिस्थितीनुसार बदलते किंवा नवे रूप घेते, याचा अर्थ संस्कृती समाजाला सापेक्ष असते. हडप्पा आणि मोहोनजदडो या ठिकाणी रेल्वेकरिता खोदकाम सुरु केल्यानंतर भारतीय संस्कृतीचे अवशेष सापडू लागले, यात प्रामुख्याने सात नगरे एकाखाली एक सापडली,हि नगरे सुबद्ध नगररचना, संरक्षक भित व द्वार, सांडपाण्याची व्यवस्था, गोदाम- कोठारे, स्नानगृहाची रचना, दागीने ,अलंकार यांचा वापर ,भांडी-शोभेच्या वस्तू, लहान मुलांची खेळणी, अशी अनेक वैशिष्ट्य दिसून आली. पण आजच्या भारतात आपणाला ग्रामीण आणि शहरी अशी दरी दिसून येते शिवाय गलिच झोपडपट्ट्या, उघडी गटारे, कोसळणाऱ्या भीतीची इमारती पाहतो. म्हणजे आपल्या संस्कृतीचे बाबी लोप पावताना आजच्या जीवनात दिसत आहे.
त्यानंतर भारतीय संस्कृती हि अगदी जुनी आणि संपन्न असून पूर्ण जगात सभ्य संस्कृती म्हणून नावाजलेली आहे! आपली संस्कृती बौद्ध, जैन धर्मं नंतर मुस्लिम संस्कृतीचा मिश्रण करत पद्धतीचा समावेश करत विस्तार होत गेली. वैदिक काळात खास उच्च स्तराला गेली म्हणजे संस्कृतीचे पालन प्रत्येक राजा असो कि प्रजा यांच्या वागण्यातून दिसून येत आसे न्यायव्यवस्था सर्वाना सारखी असे, वचन हि शब्द प्रमाण असत म्हणून दशरथाने कैकयीला वाचन दिल्याने भरताला राजपद दिले तर राम वचनासाठी वनवासात गेला तर पत्नीचा धर्म म्हणून सीता ही श्रीरामासोबत वनवासात गेल्या. पण आज आपण पाहतो कि वचं आणि कायदे यांना पहाता देत कशी मोडता येतील आणि फसवेगिरी आणि खोटेपणाचा सुळसुळाट दिसून येतो. लक्ष्मणही राजवैभव सोडून बंधुप्रेमखातर वनवासात गेला आणि वहिनी सीतेला माता म्हणत आदर आणि वागणूक ठेवली पण आज आपण पाहतो नात्याचा आदर न ठेवता संपत्तीचा वारसाहक्क मिळविण्यासाठी भावाभावात हाणामारी आणि कोर्टात केस चालतात. मातृ-पितृदेवो म्हणणारी आपली संस्कृतीत आईवडीलांचा अपमान होताना आज पहातो. गुरु शिष्याचे नाते कसे निभावावे सांगणारी गुरुकुल शिक्षण पद्धती नसली तरी गुरूचा आदर आणि शिष्यासोबत आपुलकी असावी. अतिथी देवो भव म्हणत पाहुण्यांचा मानसन्मान करणारी आपली संस्कृती नको म्हणत पाहुण्यांना टाळण्याच्या अनेक संधी शोधत असतो.
लज्जा हा स्त्रियांचा दागिना असणारी व सभ्यतेचे द्योतक असलेली आपल्या संस्कृतीत पोशाख रचना आहे . साडी आणि पूर्ण अंग झाकणारी वस्त्रे आपल्या भारतीय हवामान आणि वातावरण रचनेनुसार होती परंतु आधुनिकतेचा पुरस्कार करत आता सर्व तरुण आणि तरुणी यांनी पाचीमात्त्य अंगप्रदर्शन करनारी पोशाख टाळणेच बरे कारण यातून अनेक अपमानस्पद संकटाना मुलीमुलाना सामोरे जावे लागत आहे. म्हणुनच उपायापेक्ष प्रतीबंध योग्य ! भारतीय संस्कृतीची सर्व जगाला अमूल्य देणगी असणारी संस्कार हि महत्त्वाचे आहेत. स्त्रियांचा सन्मान अशी संस्काराची बालपणात रुजवणूक केली तर बलात्कार प्रकरण, हत्याकांड किंवा आत्महत्या प्रकरण उद्भवणारच नाहीत!
आपली संस्कृतीत वेद काळात पंचमहाभूताचा अभ्यास करून अग्नी, जल, वायू, यांना पुजतो परंतु कर्मकांडाचे स्तोम माजले आणि यज्ञ आणि अंधश्रध्येपायी लोकांना अज्ञानाच्या खाईत लोटले तसे आपली संस्कृती हि मधील खालत चक्रव्यूहाचा गर्तेत सापडली. आधुनिक विज्ञानाचे शोध आणि तत्वाची उकल आपणाला रामायण आणि महाभारत काळात वेदरचनाकारांनी देवून ठेवली तरी आपण आज आपल्या अद्वितीय संस्कृतीला दुर्लक्ष पाचीमात्त्याचे अनुकरण करत आहोत यासारखे अजून काय वाईट ! आर्यभातानी शून्याचा शोध लावला आणि संख्यासाहात्राचा विकास झाला आणि आज आपल्याच शाळेतील मुलांना संख्या वाचनलेखन येत नाही ! रावणाकडे पुष्पक विमान होते हे आज आपणाला आजही केरलाच्या वस्तूसंग्रहालयात पाहायला मिळते पण भारत शासन तंत्रज्ञानविकासासाठी इतर देशाचे सहकार्य घेत आहे. आजच्या संस्कृतीचे वारसदार भरकटले असून त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे खास शालेय वयातच आपल्या ‘ संस्कृतीची ओळख आणि व्यवहार ‘ अभ्यास करण्यास हवा.
भारतीय संस्कृती आदर, अहिंसा, शेजार धर्म, भूतदया, सत्य आणि नम्र वागणूक शिकवते. याचा रोजच्या जीवनात अवलंबन केल्यास आपले व्यक्तिमत्त्व सभ्य आणि उच्च दर्जाचे होते. निता आरसुळे,@४५
[10/30, 11:20 AM] +91 95529 80089: साहीत्य दरबार स्पर्धा...
लोप पावत चाललेली भारतीय संस्कृती...
धावपळीच्या जीवनात मानव हा मशीन होत चालला आहे. सकाळी बटन दाबले म्हणजे कामाला लागुन व पैशांच्या मागे धावुन संवेदना , भावना ,माणुसकी बोथट होत आहे सोबतच भारतीय संस्कृती विसरत चालला आहे व त्याच्या ऊलट पाश्चात्य संस्कृतीची धार तेज होऊ पाहत असुन ती आपल्यांचा , आपलेपणाचा , नात्यांचा , त्यागाचा आणि आपल्या संस्कृतीचा बळी घेऊ पाहत आहे. संस्कृती लोप पावतांना तो आपले आरोग्य , मानसिक स्वास्थ्य यापासुन दुर जातांना संस्कृतीमुळे प्राप्त झालेला आनंद , सुख , आप्त यांपासुन दुरावला जात आहे.
"फास्टफुडशी जुळले नाते
कपड्यांचे अंगावर झाले ओझे ।
भारतीय संस्कृती पाऊ लागली लोप
देशात मज वाटु लागले परदेशी"
विविध सण जे आपल्या महान संस्कृतीचे द्योतक ते साजरे करतांना किंवा त्यावेळेस बनविले जाणारे मेनू , पदार्थ मग ते मकर संक्रांत वेळेस तिळाचे लाडु , हिवाळ्यातील मेथीचे लाडु , ऊन्हाळ्यातील लिंबु शरबत वा दिवाळी , दसर्यातील विविध पदार्थ असे असतांनाआपण पाश्चात्य संस्कृतीला बळी पडुन विविध विकारांना आमंत्रण देत आहोत .
भारतीय संस्कृतीत " अतिथी देवो भवः " मानले जाते परंतु संस्कृती लोप पावतांना " अतिथी कब जाओगे "याची वाट पाहतांना दिसतात.एकत्रित कुटूंब पद्धती जो आपल्या संस्कृतीचा पाया त्यापासुन आपली नवी पिढी कोसो दूर जाऊन "हम दो हमारा एक" पर्यंत सिमीत झालेली दिसुन येते व सासु ' सासरे जे आपल्या घराचा "आधारस्तंभ" यांना अडथळा वाटायला लागला व त्यांना "प्रायव्हसी" च्या भुताने झपाटलेले दिसते .
आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेले लोककला, लोकसंगीत जे लोकभाषेद्वारा लोकापर्यंत पोहचुन एक नाते निर्माण करते त्यात धनगरी , पोतराज , जोगणी, डोमारी , समर गीते व कव्वाली या कलावंतांच्या आवाजातील प्रामाणिकपणा ,आपलेपणा ,पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटणारी ,ह्रदयात साठवुन ठेवावी असा हा लोककलेचा ठेवा सध्याच्या गाण्यांमध्ये व डिजेच्या कर्णकर्कश आवाजात शेवटचा घटका मोजतांना दिसतात.
" मराठी व हिंदीची वाटे लाज
हिंग्लीश आम्ही बोलतो ।
खेळ चाले रस्त्यात नवरा अस्वल
तर दरवेषी असते बायको ।।"
परकीयांना हेवा वाटावा असा आयुर्वेदाचा व योगाचा ठेवा लोक विसरत चालले असुन पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाने आपल्या भारतीय संस्कृतीचा लोप होतांना दिसत आहे.
"संस्कृतरुपी" हा वृक्ष अधिक बळकट व ताकदवान होऊन बहरण्यासाठी या वृक्षाला आधार पाहीजे तो आपल्या सगळ्यांचा , एकात्मता , अखंडता , आपलेपणा या मुळांचा जो याला घट्ट धरुन ठेवतील त्यासाठी प्रेमाचे , सामंजस्याचे खत देऊन त्याची मधुर फळे चाखावी हिच ईच्छा.....
नरेंद्र म्हस्के , शिरपूर ( धुळे ) @ 65
[10/30, 11:36 AM] minakshi: 🙏स्पर्धेसाठी🙏
लोप पावत चाललेली भारतीय संस्कृती
संस्कॄति म्हणजे चांगल्या विचारांची कृती करणे,चांगले विचार स्वतःबरोबर दुस-याच्या मनावरही रुजवने,जोपासने,त्याचे संवर्धन करणे होय.सत्य असत्याची जाणीव असणे,
चांगले वाईट,घातक विघातक या गोष्टींची जाणीव असणे म्हणजे संस्कृती जोपासणे होय.
अभिमानाची गोष्ट म्हणजे आपली भारतीय संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ समजली जाते.आपल्या भारतीय सण समारभ,भारतीय ग्रंथ,रूढ़ी,परंपरा,चालीरीती या सर्वांचा
घातलेला मेळ म्हणजे संस्कृती।
पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती असायची.घर कस बाळगोपाळानी भरलेल,गजबजलेल असायच .एकमेकांची सुख दुःख वाटून घेतल जायच.घरातील चिमुकल्याना संस्कारांची शिदोरी आजी आजोबांकडून मिळायची.आजी आजोबा हेच लहांन चिमुकल्यांच् आवडत खेळण असत.पण आजची परिस्थिति काही वेगळीच् दिसते.मुलांच् तासनतास् मोबाइल वर गेम खेळण,आई वडिलांना उलट उत्तर देण,रात्र रात्र तरुण मूल मूली पार्टीत मशगूल होताना दिसतात तेव्हा वाटत याना आपल्या संस्कृतीच काही भानच राहील नाही.
आपल्या समृद्धिशील देशात,
उगम होतोय विकृतिचा।
कोणालाही राहील नाहीं भान,
लोप होतोय भारतीय संस्कृतीचा।
जस जसा आपला देश समृद्धिकडे वाटचाल करू लागला खरा पण दुसरीकडे माणसातली माणुसकीच हरवत चालली आहे.'मी',माझ,फक्त मी ही त्याची स्वार्थी प्रवृत्ती बळावत चालली आहे.
आज एकही वर्तमानपत्र दिसत नाही ज्यात बलात्कार,माराणारी,खून,
दरोडे ,आत्महत्याआशा बातम्या नाहीत.हे सर्व कशामुळे घड़तय?का?
कोण करतय?कशासाठी?याच एकमेव उत्तर म्हणजे आपली लोप पावत चाललेली आदर्श संस्कृती म्हटल तर काही वावगे ठरणार नाही.
आजकालचा माणसात देण्याची वृत्ती नसून फक्त घेन्याचीच वृत्ती दिसते.मी कसा श्रीमंत होईल यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरु आहे.या स्पर्धेत जिंकन्यासाठी आजचा माणूस स्वतः च्या जीवाशीच,आपल्या जीवलग माणसांशीच जीवघेणा खेळ खेळतोय.
कधी कळणार यांना पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा मनाने श्रीमांत व्हायला हव.जसे महात्मा फूले मनाने श्रीमंत होते म्हणून तर त्यांनी देशातील बिकट परिस्थितितही सर्व जाती धर्मातील मुलींच्या शिक्षणासाठी शाळा काढली .आंबेडकरानी दलितांच्या उद्धारासाठी आपल् आख्ख आयुष्यच पणाला लावल.महर्षी कर्वे आयुष्यभर विधवा महिलांसाठी कार्य करत राहिले.हे आठवल की वाटत कुठे गेले हे विचार त्यांचे संस्कार?कुठे गेली आपली संस्कृती?
लोकमान्य टिळकानी लोकांनी एकत्र यावे यासाठी शिवजयंती ,गणेशोत्सव हे उत्सव सुरु केले खरे पण सध्या तो उद्देश् लोप पावला गेला आणि जात -धर्म या नावाखाली एकमेकांचा वैरी झाला.
हे सर्व अनर्थ जर थांबवायचे असतील.आणिआपल्या देशाला जागाच्या यशोशिखरावर पोहचवायचे असेल तर जगात आपल्या देशाची ओळख करुन देणारी आपली आदर्श संस्कृती जपली पाहिजे.
जपून ठेवला पाहिजे
भारतीय संस्कृतीचा ठेवा।
नाहीतर कळणारही नाही.
परदेशी शत्रु घात करेल केव्हा।
🙏जय हिंद🙏
मीनाक्षी माळकर
68
[10/30, 1:04 PM] 9 Subhadra Sanap: *📕साहित्य दरबार वैचारिक लेखमाला*📕
➖➖➖➖➖➖➖➖➖
*लोप पावत चाललेली भारतीय संस्कृती*
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
*जहॉ डाल डाल पर सोनेकी चिडियॉ करती है बसेरा*।
*वो भारत देश है मेरा*
या गीताच्या बोला प्रमाने भारत हा देश महान आहे .भारत हा सांस्कृतिक, ऐतिहासिक,आध्यात्मिक,व शेती प्रधान देश आहे. या देशाला महान अशी संस्कृती आहे. रामायण, महाभारत याच देशात घडले. महान ॠषी पतंजली याच देशातील. अशा या महान देशातील इतिहास जानुन घेण्यासाठी आपल्याकडे परदेशी लोक येतात. पण ! आपले काय?
आजचा चिंतनाचा विषय खरच फार सुंदर आहे .आपण आपली संस्कृती आपल्याच हाताने नष्ट करतोय का? याचाही विचार करायला हवा. पुर्वी कसे एकत्र कुटुंब असायची घरात आजी, आजोबा ,काका ,काकु, आत्या, पै पाहुण्यांशी वर्दळ असायची आणी या वातावरनातुन नकळत संस्कृती जतन व्हायची .पण आज या फ्लँट सिस्टिममध्ये हम दो हमारे दो या चौकोनी कुटुंबात पाचव्याला जागाच नाही याचा परिणाम असंस्कारी पिढी निर्मान होत आहेत हे आपण विसरुन चाललोत . आपल्या संस्कृतीत आत्या असते, काका असतात ,मावशी असते, हे आता मुलांना पुस्तकातुन शिकवले लागते ही शोकांतीका आहे
भारतीय सण हे याच संस्कृतीचे जतन करण्याचे स्रोत आहेत .आणी आपण ती संस्कृती जाणीवपुर्वक जतन केली पाहिजे सणवार हे सगळ्या कुटुंबासोबत *आपल्या* घरी साजरे करावेतच . आता दिपावली सण आहे पहा या सणाची संस्कृती पहिला दिवस *वसुबारस* या दिवसी गोठ्यातील जनावराना ओवाळायचे *दिन दिन दिवाळी गाईम्हशी ओवाळीते* असे म्हणते मुक्ती प्राण्याविषयी कृतज्ञता यातुन दिसते . दुसरा दिवस *धनत्रयोदशी* या दिवशी धन्वंतरीची उपासऩा करुन घरात कोणीही आजारी असु नये अशी प्रार्थना करायची . तिसरा दिवस *अभ्यंगस्नान* या दिवशी पहाटेच उठुन अंगाला उटणे तेल लावुनआंघोळ करायची . यामधुन एकच सांगीतले जातेय आपण रोज लवकर उठावे सकाळी उठणे आरोग्याच्या दृष्टीने फार महत्वाचे असते. त्यानंतर *भाऊबीज* बहीण भावाच्या अतुट प्रेमाचा सण, किती या सणामधील उद्दात्त हेतु !पण आज आपण हे सण फक्त देखावा म्हणुन साजरी करतोय मनाने खुप दुरवरुन गेलेलो असतोच . भावाने बहीणीचा ओवाळणी द्यायची असते आणी बहीनीने ती आनंदाने स्विकारावी पण तीथेही पसंती नापसंती ,हेवादावा, अनेक तर्हा आणी यातुनच मनं दुरावली जातात हे मला आवर्जुन सांगावेसे वाटते.
भारतीय संस्कृती मध्ये आई वडील गुरु यांना देव मानलेले आहे. परंतु सद्य स्थितीत आपण जर पाहिले तर आईवडीलांशी किती प्रामाणिक राहतात .मी तर असे म्हणेल कि शेतकरी असलेली मुलगा तरी आईवडीलांना कसा तरी सांभाळतो पण नोकरी निमित्य बाहेरगावी रहाणारे किती सुपुत्र आईवडीलांची सेवा करतात. मी याप्रसंगी एक वाचनात आलेला प्रसंग सांगु इच्छिते. एक वयस्कर जोडपे होते एकुलता एक मुलगा अमेरिकेत स्थायिक झालेला होता .आईवडील भारतातातच एकटेच रहात होते . मुलगा खुप दिवस आलेला नव्हता आणी एक दिवस मुलगा आला. आईवडीलांना खुप आनंद झाला. आल्यावर मुलाचे सांगीतले की ,आता तुम्ही खुप थकलात, मी तुम्हाला अमेरिकेत घेवून जानार आहे कारण माझ्यशिवाय तुम्हाला कोनीच नाही. आई वडीलांनाही खुप बरे वाटले. मग मुलगा म्हटला आता आपल्याला जायचे आहे ,तर मग हे घर आपन विकुन टाकु .कारण आता या घराची गरज नाही .अाणी माझे ही परत येणे होनार नाही. आईवडीलांना लगेच परवानगी दिली कारण त्यांचे तरी मुला शिवाय कोन होते ?आणी तो तर आईवडीलांना घेवून चालला होता . झाल घर फार मोठे व मोक्याच्या जागी होते लगेच खुप मोठी किंमत घराला मिळाली . सगळे व्यवहाराचे झाले आणी परत जाण्याचा दिवस उजाडला .आईबाप आनंदात होते ;कारण त्यांना आता आपल्या मुलासोबत सुरक्षित आयुष्य जगायला मिळणार होते .सगळ्या शेजारीपाजारी चे निरोप साश्रुनयनांनी घेवुन हे तिघे आईवडील व मुलगा विमानतळावर गेले . मुलाने आईवडीलांना सांगितले तुम्ही इथे बाहेर बसा मी आत जावून येतो .थकलेले मायबाप तिथेच बसले. बराच वेळ झाला मुलगा काही येईना तेव्हा आई म्हणते अहो जरा विचारा बरं . म्हातारे वडील उठतात व विमानतळाच्या ऑफिसच्या दारात जावुन विचारात "अमेरिकेला जानारे विमान किती वाजता आहे हो साहेब" त्यावेळी ते अधिकारी सांगतात बाबा एक तास झाला ते विमान जावुन बाबा काय समजायचे ते समजले . थरथरत्या पावलांनी ते म्हातारीजवळ आले म्हातारीन विचारलं कुठेय आपला बाळ ?अजुन किती वेळ आहे? पण बाबाच्या तोंडुन शब्द फुटत नव्हते .मुलगा तर गेला. पण जातांना फसवुन गेला. घरदार विकुन पैसा घेवुन गेला. ते तसेच दिवसभर बसुन होते रस्तयावर. उपाशीच होते कुठे जावे हा प्रश्न होता ? काही लोकांनी पाहिले वर्गणी गोळा करुन एका वृध्दाश्रमाशी त्यांना नेवुन सोडले . आता सांगा कशाला हवाय मुलगा ? कुठे चाललीय आपली संस्कृती ज्या श्रावण बाळाने आईवडीलांना पायी कावडीने काशीयात्रा घडवली त्याच देशातील ही मानुसकी ?कुठे आहाेत आपण? का लोप पावत चाललीय ही संस्कृती? याचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे
आज आपण पहातो जिकडे तिकडे जातीयता .हा या जातीची ,तो या जातीचा, आणी या जातीय तेढ्यातुन वाढतोय वैरभाव . अनेक संकटे आहेत काही मानव निर्मित तर काही नैसर्गिक या संकटाशी खंबीरप णे यांना करण्यासाठी गरज आहे सामुदायीक एकीची आणी संस्कारक्षम पिढी हे करु शकते
आज मुलगी सुरक्षित नाही किती किळसवाणे प्रकार रोज घडताहेत कोनतीही संस्कारक्षम मुलगा मुलाची छेड काढणार नाही. कोपर्डीप्रकार असो किंवा इतर ठिकानचे अत्याचार यातील नराधमावर जर त्यांच्या आईवडीलांनी वेळीच संस्कार केले असते तर आज ही वेळ आली नसती . यासाठी मुलांना काही कमवुन ठवू नका फक्त सुसंस्कारित पिढी घडवा मुलगा मुलगी समान माना मुलीचा जन्मदर वाढवा त्यांना आहे त्या परिस्थितीत जगायचे शिकवा नैतिकमूल्ये त्यांच्या अंगी रुजवा
आपण कसे वागतो ? काय करतो? हे आपली मुल पहातात व त्यांच्या बालमनावर ते कोरल जातं म्हनुन आपले स्वत: चे वर्तन चांगले ठेवा मुल चांगली निघतील. संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी हे करण काळाची गरज आहे. वडीधार्याचा आदर गुरुचा सन्मान करा . घरात कष्टाचं आनलेलंच मुलांना खावु घाला भ्रष्टाचार करुन मिळवलेल्या पैशातुन संस्कांर मिळणार नाहीत हे लक्षात घेतले पाहीजे आपल्या संस्कृतीचे जतन करा. आपल्या सुखात इतरांना सामावुन घ़्या. शेजारी जवळपास जे दु:खी कष्टी आहेत, त्यांच्या मदतीला धावुन जा. अडल्या नडल्यांना होता होईल ती मदत करा नक्कीच वेगळ्या अनुभुतीचा आनंद मिळेल
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खेडकर सुभद्रा त्रिंबकराव बीड (अनु क्र,२०) मो न ९४०३५९३७६४)
[10/30, 1:36 PM] +91 99230 45550: लोप पावणारी कृषिसंस्कृती
मानवी संस्कृती समजून घेण्यासाठी आधी आपल्याला मानवाच्या आदिम काळापासून ते आजपर्यंतचा प्रवास अभ्यासावा लागेल . मानवी उत्क्रांतीत नवेनवे शोध लागत राहिले आणि मानवाला वेगवेगळ्या नव्या परिप्रेक्षाची दालने खुली झाली .माणूस भूक भागवण्यासाठी कंद , मुळे खाऊ लागला .जंगलातील प्राण्यांची शिकार करून आपल्या पोटाची सोय करू लागला . स्त्री-पुरुष समूहाने राहू लागली . शिकारीची कामे पुरुषमंडळी करायची तर कंद-मुळे गोळा करणे , फळ आणणे अशी कामे स्त्रिया करायच्या .
फळांच्या बिया जमिनीत पडून त्यापासून रोप येत असलेलं पाहून माणसाला शेती करण्याचा शोध लागला .तो फिरती शेती करू लागला . आपल्या जवळच्या साधनसामग्रीचा वापर करून त्याने शेतीला पूरक असणारे प्राणी पाळायला सुरुवात केली . शेतीसाठी मनुष्यबळ आवश्यक असल्याने तो आता समूहाने राहू लागला .मग लज्जा रक्षणार्थ वस्त्रांची निर्मिती झाली . तो कपडे परिधान करून आपले अंग झाकू लागला . पुढे ऊन ,वारा व पाऊस यांच्यापासून स्वतःच्या संरक्षणार्थ घरं निर्माण झाली . माणसं टोळ्यांनी वावरणारी आता स्थिर जीवन जगू लागली .
या काळात भाषेची निर्मिती झाली त्यातून पुढे कला , नृत्य , संगीत यांची निर्मिती झाली .
सर्व संस्कृतीची जननी म्हणजे 'कृषिसंस्कृती' होय . शेतीची कामे झाल्यावर मनोरंजन म्हणून रात्री नृत्य, संगीत यात मग्न व्हायचे . स्त्री-पुरुष समानता होती . सर्व संस्कार मौखिक परंपरेने चालत असत . पुढे लिपीचा शोध लागला .अरण्यलिपी म्हणून ती प्रसिद्ध झाली . ही सारी संस्कृती नद्यांच्या खोऱ्यात उदयाला आल्या .सिंधू नदीच्या खोऱ्यात सिंधू संस्कृती उदयाला आली पुढे तीचे हिंदू संस्कृती असे नामकरण झाले . हडप्पा व मोहंजोदडो ही संस्कृती उदयाला आली .
आपली संस्कृती पर्यावरणपूरक आहे . झाडे-झुडपे , नद्या-ओहोळ , डोंगर-दऱ्या यांना दैवत मानू लागला . शेतीसाठी जे उपयुक्त असेल त्याला देव म्हणू लागला . यातून एक समृद्ध संस्कृती उदयाला आली . तिला आपण वैदिक संस्कृती म्हणतो .
तर अशा या कृषी संस्कृतीतून , पर्यावरणपूरक हितसंबंधातून आपण मार्गक्रमण करत आपली संस्कृती जोपासली आहे . पण आजचे चित्र भयाण आहे . हीच शेती संस्कृती शेवटच्या घटका मोजत आहे . शेतीमातीची नाळ कुठेतरी क्षीण होत आहे . जिकडे तिकडे सिमेंट काँक्रीटचे जंगल वाढत आहेत . आपण ज्याला प्रगतीचे गोंडस नाव देत आहोत .जग जवळ आल्याचे बोलत आहोत तिथे आपण माणूस म्हणून कितीतरी तोकडे ठरतो आहोत .
माझा विरोध प्रगतीला नाही . यशाचे नवेनवे क्षितिज आपण पादाक्रांत करायला हवेत . एक वैश्विक नातं निर्माण व्हायला हवे . पण होत असणारा पर्यावरणाचा ऱ्हास टाळायला हवा .संस्कृतीचे विद्रुपीकरण रोखायला हवे . आज झपाट्याने फोफावणारी संकोचित मनोवृत्ती भयावह आहे . स्त्रियाना समानतेची व सुरक्षिततेची जाणीव देणारी समाजव्यवस्था असायला हवी .गार्गी , लोपामुद्रा यासारख्या स्त्रियांनी समृद्ध केलेली ही संस्कृती आहे .
जग जवळ आलं पण माणसं एकमेकांपासून दूर जात आहेत .
कृषी संस्कृतीचा पाया असणारा शेतकरी हवालदिल आहे . तो त्याच्या वारसदारांना शेतीपासून दूर करण्यासाठी प्रयत्न करीत आहे कारण शेती व्यवसायाची अनिश्चितता त्याला समजून चुकली आहे . शेती संदर्भात शेतकऱ्याची ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे . शेतकऱ्याला , कृषिजगताला न्याय मिळाला तरच संस्कृती टिकेल अन्यथा ही अराजकता साऱ्याच संस्कृतींना गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही .
फक्त भुकेच्या शोधात फिरणाऱ्या माणसाने आज सारी क्षेत्र त्याच्या पराक्रमाने हातच खेळणं बनवली आहेत . आता आणखी प्रगती होईल नवे तंत्रज्ञान विकसित होतील पण कृषिसंस्कृती जर जोपासली नाही तर आपली कहाणी त्या मिडास राजासारखी होईल .ज्याला हाताच्या स्पर्शाने वस्तूला सोनं करता येत होतं पण त्याला तहानभुकेने व्याकुळ व्हावं लागलं . तेव्हा प्रगती करू पण शेती-मातीची जोपासना करत .माणुसकी जपत ...
संस्कृती रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आपण सर्वांनी मूळ संस्कृती समजून घ्यायला हवी . जिचा उगम शेतीतून झाला तिला जोपासायला हवे . फांद्यांच्या रक्षणापेक्षा मुळाचे रक्षण करायला हवे . 'इवलेसे रोप लावीयले द्वारी , त्याचा वेलू गेला गगणावरी' असा आशावाद पेरणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा देश .ही इथली संस्कृती ती आपण सारे जोपासू या ...
- ऋषिकेश गंगाधरराव देशमुख शिळवणीकर
संपर्क : ९९२३०४५५५०
[10/30, 2:25 PM] +91 86980 67566: लोप पावत चाललेली भारतीय संस्कृती
माणसाचं वय वाढत जातं आणि सोबत आठवणीचं गाठोडं राहतं. गाठोड्यातील एकेक
आठवणी प्रसंग येईल तशा बाहेर येत असतात. कधी टोचणाऱ्या बोचणाऱ्या तर कधी मनाला प्रसन्न करुन सोडणाऱ्या आठवणी. डोळ्यात पाणी आणणाऱ्या तर कधी हळव्या करायला लावणाऱ्या आठवणी तर कधी जून्या बालपणीच्या विश्वात घेऊन जाणाऱ्या आठवणी. जगामध्ये भारतीय संस्कृती महान आहे. तीचे अनोखेपण तेवढेच महान आहे. भारतीय राहणीमान असो वा भारतीय खानपान असो सर्वच बाबी या अनोख्या आहेत. शिवाय भारतीय सण समारंभाबाबत संपूर्ण जगाला नेहमीच आकर्षण असते. पण जग बदलतं म्हणजे नेमक काय...? माणसं तर बदलतात. त्यांचे आचार विचार आणि एकूणच जीवनमान बदलत जाते. मग त्या त्या देशाची संस्कृतीही बदलत जाते.तेच नेमकं आपल्या संस्कृतीबाबत होत आहे. मी झाले आहे म्हणत नाही,होत आहे म्हणतो आहे. कारण कांही प्रमाणात का असेना कांही जण का असेना पण संस्कृतीचे पालन करताना दिसतात. पण दुर्दैवं या गोष्टीचं आहे, की संस्कृती लोप पावत चालली आहे. नेहमीच सर्वत्र सांगितली जाणारी प्रवृती, विकृती आणि संस्कृतीची गोष्ट, जी अशी की.. आपल्याला जेवढी भूक आहे तेवढेच खाणे म्हणजे प्रवृती, भूकेपेक्षा अधिक खाणे वा खात राहणे म्हणजे विकृती आणि भूक असतानाही आपल्या घासातील घास भूकेल्याला देने म्हणजे संस्कृती. पण आता आपलपोट्या जगात ही हीच संस्कृती नष्ट होताना दिसते आहे आणि आपले ताट भरलेले असतानाही दुसऱ्याच्या ताटातील ओढून घेण्याची अजब प्रवृती जन्माला येत आहे. मान मर्यादा, लीनता, शालीनता, आदर सन्मान, आपुलकी, जवळीकता या अधिष्ठानावर विराजीत झालेली भारतीय संस्कृती आज लोप पावत आहे.एकत्रीत कुटूंबातून आज्या पंजाकडून होणारे संस्कार दुर्लभ झाले. आजी आजोबा नातेच उसनवारीवर असल्याने पुरवणी येईना. नवरा बायकोचा टूमटाम संसार विरझन टाकलेल्या दुधासारखा झाला... !एकत्रीत कुटुंबाऐवजी एकाच घरात अनेक चूली पेटू लागल्या. खरं तर चूल आज आहेच कुठे म्हणा. भारतीय संस्कृतीची ठळक वैशिष्टये जाणवतील अशा कांही आणि खास बाबी होत्या. त्यापैकीच चूल ही एक. चूल व तिच्याशी संबंधीत आविलं, सरपण ,काथवट , तवली , घमेलं या आणि अशा अनेक बाबी ज्या भारताच्या ग्रामीण संस्कृतीचं दर्शन देतात, जातं, उखळ, उतरंड, कनगी,झाप, खुरवडा ,डाळज, तळघर, चिरेबंद, पडवीt. इ.. या गोष्टीचा शब्दांनेही वापर केला तर आजची पिढी अनभिज्ञ नजरेनेच बघते. ही बाब भारतीय संस्कृती लोप पावत चालली आहे याचीच आहे. हे केवळ वस्तू व वास्तू बाबत झाले. पण जे सण समारंभ हा देखील संस्कृतीचाच भाग आहे, ते सण समारंभसुद्धा आवडीने सवडीने व सोयीनेच
साजरे केले जातात. त्यात सर्वच सणांचा समावेश होतो. पण प्रामुख्याने जर आपण केवळ दसरा दिवाळीचा विचार केला तर, दसऱ्याला अगर दिवाळीला किंवा वर्षातून एकदा तरी परिसर परत्वे घराचा कानाकोपरा शेण मातीनं सारवून घेऊन घरातील चिंधी न चिंधी ( कपडे ) धुवून घेतले जात. पण आज बदललेल्या जीवनशैलीत कोणाकडेही येवढा वेळ नाही. शिवाय आजकाल शेणामातीनं सारवून घेण्यासारखी घरं ही राहिली नाहीत. या निर्जीव बाबी सोडल्या तर माणूस सुद्धा सांस्कृतीक परंपरा पाळताना दिसत नाही. दिवाळी सर्वांच्याच घरी असते पण एकमेकांना फराळाला बोलवण्याची रित आता कोणी अवर्जून पाळताना दिसत नाही.जग बदलत असताना आपण रितीभातीतच अडकून राहायचे काय ?असाही प्रश्न निर्माण केला जातो. पण ठिक आहे बदल हा निसर्गनियम असतो तरीही आपल्या संस्कृतीनं दिलेले महान असे संस्कार आपण सोडता कामा नये हे मात्र निश्चित खरं आहे. कारण संस्कृतीच जतन करणे हे हरेक येणाऱ्या पिढीचं कर्तव्य आहे. संस्कृती वाचली तर संस्कार वाचतील, संस्कारक्षम तरूणच देश घडवतील.
श्री. हणमंत पडवळ
मु.पो. उपळे (मा.)ता. जि. उस्मानाबाद.
8698067566.
क्र : 48
[10/30, 4:39 PM] 13 Babu Disuza: ::लोप पावत चाललेली भारतीय संस्कृती ::
परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे आणि जग त्याप्रमाणे बदलत असते. आपले अस्तित्व टिकविण्यासाठी बदलणे अपरिहार्य असते. जे बदलत नाहीत ते लोप पावतात.
आपण जेव्हा भारतीय म्हणतो तेव्हा आपणास नेमके काय म्हणायचे असते? Indian आणि Hindu या संकल्पनांचा अंतर्विरोध इथे दिसतो. जग "भारतीय" म्हणत नाही तर आपल्या संस्कृतीला "हिंदु" म्हणून ओळखते. धर्मनिरपेक्षतेचा चष्मा चढविल्याने आपण "हिंदु" शब्द वापरणे टाळतो आहोत असे वाटते.
सत्याचरण, थोरांना /ज्येष्ठांना मान देऊन वंदन, पूजा अर्चना द्वारे मूर्तिमंडन, स्त्रियांना नीतींचे बंधन आदि गोष्टींना पारंपरिक रूप तथाकथित हिंदु संस्कृती ने दिले. परंपरांमध्ये होत जाणारा बदल रुढीप्रियांना मान्य नसला तरी कालमानानुसार हे क्रमप्राप्त ठरते.
संस्कृती म्हणजे नेमके सांगायचे तर प्रचलित जीवनपध्दती जिथे धर्मावर आधारित तत्वप्रणाली सशक्त रूपात प्रकट झालेली असते. पाश्चिमात्य जगाच्या दृष्टीकोनातून पाहताना असा वैचारिक गोंधळ उडणे स्वाभाविक आहे.
कालबाह्य रूढी सोडून देणे म्हणजे संस्कृतीची सनातन पकड ढिली करणे होय. कट्टर धर्मवादी प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करतात आणि छिद्रान्वेषी वृत्तीने दोष मोठे करून दाखवितात. स्त्रीची शालीनता, परस्पर भार्तृभाव, प्राण्यांविषयीची अत्यंतिक कळकळ, देवाचे अस्तित्व मान्य करून पापभिरू होणे, सत्शीलता ही भारतीय संस्कृतीची म्हणून म्हणता येतील अशी कांही वैशिष्ट्ये होत. पाश्चात्य अंधानुकरणाने स्वैर वर्तन करणे भारतीय म्हणणा-या संस्कृतीला मान्य नाही. इथे अंधश्रद्धा अभिप्रेत नाही तर पर्यावरण पूरक जीवनशैलीचा भारतीय तत्वज्ञानाने केलेला अंगिकार महत्वाचा. खरे तर स्वार्थी सुप्ताकांक्षा या संघर्षाला प्रेरित करते असे म्हणता येईल.
दोन वेगवेगळ्या संस्कृती सामंजस्याने नांदताना परस्पर प्रभाव पडतो आणि त्यामुळे संकर घडतो. असा संकर स्विकारणे कालाप्रमाणे कमी जास्त होते. मुळ स्वरूप बदलल्याने शुध्दतेचा दुराग्रह धरणारे याला विरोध करतात आणि संस्कृती लोपली असा टाहो फोडतात. मात्र हे खरे नाही. "जीवो जीवस्य जीवनम्" हे सूत्र स्विकारले की सारे कसे सुसह्य होते.
संस्कृती लोप पावत चालली असा संस्कृती रक्षकांचा नसता गहजब आहे. जुने सोडून नव्याचा अंगिकार करत आजची जीवनशैली गतीशील होत आहे. हे समर्थन नव्हे तर अवडंबर माजविणा-या प्रथा मोडीत काढून कर्मकांडाबाहेर पडून आजचे सुजाण जन आपल्या सोयीचेच संस्कार फक्त स्विकारत आहेत. महानगरांत , मोठ्या शहरांत अशांची संख्या लक्षणीय झाली आहे. जगण्यात एकसूरीपणा आला तरी आधुनिकतेने संस्कार, संस्कृती च्या नांवाखाली खर्चिक ठरणा-या तत्सम बाबींना फाटा दिला आहे हे मान्य करायला हवेच.
संस्कार जतन करणे जणू मध्यमवर्गाची जबाबदारी झाली आहे. दायित्वाच्या या ओझ्याखाली मध्यमवर्ग पिचला आहे. उच्चभ्रू, श्रमजीवी वर्गास संस्कारांशी, संस्कृतीशी कांही देणेघेणे नसते. संस्कारांची जबाबदारी धूर्ततेने शिक्षकांवर ढकलून संस्कार जपायला हवेत म्हणणा-या दांभिकांनी स्वतः संस्कारांपासून, संस्कृतीपासून पळ काढला आहे. अशा ढोंगींचा बुरखा फाटेल म्हणून संस्कारांची, संस्कृतीची गरज उगाळली जाते आहे.
वैश्विकरित्या सर्व संस्कृती एकत्र येताना आपले स्वत्व कांही तरी न्यून होणारच. मानवी मूल्ये सर्व संस्कृतींमध्ये आहेत. समाईक तत्वे घेतली तर धार्मिक दुराभिमान गळून पडेल. अंधभक्तांच्या दुकानदारीला धक्का पोहोचेल म्हणून उगाच संस्कृती लोपते म्हणत बागुलबुवा उभा केला जातो.
इथे कोणीच संस्कार हिन नसतो. संस्कृतीची दिखाऊ लक्षणे वेगळी केली तरच मूळ गाभ्याची यथार्थ जाणीव होईल. जैन, बौद्ध, शिख, पारशी, मुस्लीम, ख्रिस्ती आदिंनी आपला समाज बनला आहे. या सर्वांच्या धर्मातील उपयुक्त, मानवी हितकारक गोष्टींचा अंतर्भाव, अवलंब केला तर आणि तरच भारतीय संस्कृती टिकेल. अन्यथा, संस्कृती टिकवा केवळ पोपटपंची ठरेल.
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे
मो. 9890567468
@39
स्पर्धेसाठी
[10/30, 4:50 PM] Manisha Wani: ।।स्पर्धेसाठी।।
।।लोप पावत चाललेली संस्कृती।।
संस्कृती कधीही लोप पावत नसते,लोप पावते ती माणसाची विचारधारा.संस्कृती जन्माला घालणारे ही माणसचं होते.हिंदू संस्कृती ही अती प्राचीन आहे हे आपणा सर्वांना माहितच आहे.त्या वेळच्या प्रसंगानुरूप व परिस्थिती नुसार ज्या रुढी व परंपरा चालत आल्या त्यांनाच आपण आपली संस्कृती म्हणून स्विकारले आहे.परिस्थितीनुरूप जर काही प्रथा बदलत गेल्या तर त्यात गैर काहीच नाही.आपण उगाचच बाऊ करत असतो.
साधीच उदाहरण घ्या--
१)आधी प्रत्येक घरात तीन-चार मुलं तरी असायचीत.पण वाढती महागाई व एकत्र कुटूंब पद्धती लोप पावत असल्याने,महिलांना नोकरी करावी लागते,एक किंवा दोन मुलच जेमतेम वाढवली जातात तर हा पण बदल आपण स्विकारलाच ना?उलट ज्या घरात तीन किंवा जास्त मुलं दिसलीत तर आपण लगेच डोळे विस्फारून पाहतो त्या कुटूंबाकडे.म्हणजेच काय तर महिलांनी नोकरी करणं हे आपल्या संस्कृतीत ग्राह्य नव्हतं तरी आपण ते स्विकारलं
२)पूर्वीच्या काळी एकत्र कुटूंब पद्धती होती.महिला डोक्या वरून पदर घेत.पुरूषां समोर,वडिलधाऱ्यां समोर येत नसत.परंतू आता महिला नोकरीला जाणार म्हटल्यावर पदर काय साडीच नाहिशी होत आहे.जर ऑफिसला एखादी स्त्री साडी नेसून गेली तर तिच्याकडे पुरूषां पेक्षा कर्मचारी बायकाच असा कटाक्ष टाकतात जणू काही तीने तोकडेच कपडे घातलेत की काय असं त्या साडी नेसणाऱ्या स्त्रीला वाटतं.दोन तीन पुरूष तर येवून वाढदिवसाच्या शुभेच्छाही देवून जातात. तर साडी न नेसणं ही काळाची गरज आहे.
३)पुर्वी हिंदू संस्कृती प्रमाणे वृद्धांची सेवा त्या घरातील मुले,सुना आणी नातू मिळूनच करत होते.परंतू आता इतक्या छोट्या घरात,सासू-सासरे राहणं शक्यच नाही,शहरातली हवा व जीवन पद्धती गावाकडच्या लोकांना रूचत नाही. बरेच मुलं तर परदेशात स्थायिक झालेत तिकडे आई वडील येत नाहीत मग एकच पर्याय उरतो--- वृद्धाश्रम.
तिकडे मुलाला सुद्धा काळजी रहात नाही आई वडिलांची व इतडे आई वडिलांना समवयस्क मित्रमंडळी भेटते तर त्यांचाही वेळ सत्कारणी लागतो.तर वृद्धाश्रमाचा एवढा बाऊ करायचं काहीच कारण नाही.पुर्वी म्हातारी लोकं हसत हसत सांभाळली जात होती,भरल्या घरात सर्वच सेवा करत होते,आता ते नोकरी करणाऱ्या,छोट्याशा व स्वतंत्र विचारसरणीच्या घरात अशक्य आहे.तरी मला वाटतं ज्यांचे आईवडिल वृद्धाश्रमात राहात आहेत त्या मुलांकडे घृणायुक्त नजरेने व त्यांच्या आई वडिलांकडे सहानुभूतीने बघू नये.त्यात संस्कृतीचा ऱ्हास व्हायचा प्रश्नच येत नाही.हिला एक नवीन संस्कृती म्हणून आपण स्विकारू शकतो,जशा वरच्या दोन्ही रुढी आपण विरोध करून का असेना पण स्विकारल्या आहेतच.
४)तसेच अजून बरेच किस्से आहेत.उदाहरण द्यायचं झालं तर,लग्न संस्कृती,जातीतच लग्न करणे,मंगळागौरीची प्रथा,श्राद्ध करणे व इतरही अनेक प्रथा अशा आहेत ज्या साठी नोकरदार महिलांना वेळच नसतो.तरीही बऱ्याच महिला वेळ मिळेल तसं ह्या प्रथा पुर्ण करायचा पुरेपूर प्रयत्न करत असतात.ज्यांना शक्य नाही होत त्या सोडूनही देतात तर अशा महिलांना संस्कृती पाळली नाही म्हणून दोष देवू नये.
आपण सहजच म्हणून जातो,आजकालची मुलं असच करतात,हेच करत नाही किंवा ऐकतच नाही,तर हे म्हणणं कितपत योग्य आहे?
आपण जगलो किंवा वाढलो ती वेळ व ती परिस्थीती आजच्या परिस्थितीपेक्षा खूपच बदलली आहे.आताची मुलं शिक्षण घेतांना जो मानसीक त्रास सहन करत आहेत तो आपण नाही अनुभवला.नोकरी मधे आज त्यांना जे ताण व जबाबदारी असते तिची फक्त कल्पनाच केलेली बरी.तर अशा बिकट परिस्थितीतून ते जात असतांना आपण त्यांचा मानसिक ताण कमी कसा होईल व त्यांच्यावर घरची जबाबदारी जितकी कमी टाकता येईल ह्याची खबरदारी घरातल्या वृद्ध लोकांचीच आहे.
जर बदलत्या परिस्थिती नुसार आपण मानसिक बदल करत गेलो व नवीन रूढी व परंपरा स्विकारल्या तर संस्कृती लोप नाही पावणार परंतू ती नवीन आकार घेईल.
ह्या बदललेल्या संस्कृतीचा हसत हसत स्विकार करणे हाच एक पर्याय आपल्या कडे आहे अन्यथा पिढ्यांमधली दरार ही दिवसेंदिवस वाढतच जाईल व माणूस दिवसागणिक मानसिक रुग्णाचा शिकार होत जाईल.तरी हे सर्व टाळायचं असेल तर बदल स्विकारायची मानसिकता दाखवा व त्यावर अंमल करा.
सरते शेवटी मी एकच सांगेन,तीच तीच माती जर पीक काढण्यासाठी वापरली तर जमिनीचा कस कमी होत जातो,अशा वेळेस खालची माती वर व वरची खाली करणे हाच पर्याय आपल्या हाती राहतो.त्याच प्रमाणे संस्कृतीच्या बाबतीतही तेच करावं,
।।काही धरावं तर काही सोडावं
असेच आपण जगत रहावं
बदल हा निसर्ग नियम आहे
सकारात्मकतेने जगत रहावं।।
धन्यवाद...
...........…समाप्त...........
सौ.मनिषा वाणी.
सुरत.३०.१०.२०१६.
०९४२६८१०१०९.
@२
[10/30, 4:59 PM] Sunil Vilas: *स्पर्धेस*
*लोप पावत चाललेली भारतीय संस्कृती*
स्वतःकडे जे जे आहे ते ते स्वतःसाठी राखून ठेवणे ही मानवी प्रकृती,आहे त्यापेक्षाही अधिकची अपेक्षा करणे ही विकृती आणि जे जे आहे ते ते स्वतःस गरजेइतके ठेवून उपेक्षितांना देणे ही संस्कृती.देण्याचा आनंद हा भारतीय संस्कृतीचा मुळ गाभा.पूर्वीपासून आदर,प्रेम,संस्कार,नितिची-चारित्र्याची शिकवण,भूतदया हे सर्व देणे नि जपणे ही गोष्ट म्हणजे संस्कृती आहे.निसर्ग हा संस्कृती चा आद्यगुरु आहे.निसर्ग हा पर्यावरणातील सर्व घटकांना आपल्याकडे जे जे आहे त्याची मुक्तहस्ते निरपेक्ष भावनेने देत उधळण करतो नि चराचरात आनंद भरून टाकतो. अ आपल्या कृतीने,कर्तुत्वाने,वृत्ती-प्रवृत्तिने ,आचरणाने इतरांच्या चित्तवृत्ति उल्हासित करता येणे हीच खरी संस्कृती होय, जी या भारतवर्षात अनादिकालापासून नांदत आली आहे. आश्रम,गुरूकुल,एकत्रित कुटूंबे,शेजारी,लहान गावे ही संस्कृती निर्मिती,संवर्धन नि दृढीकरणाची प्रमुख स्थाने पूर्वी ओसंडून वाहत होती.याच्या प्रवाहात अनेक सद्विचारांची निर्मिती होऊन या विचारांनी समाजजीवनात सुसंस्कृतीची रुजवण केली.
मनुष्य हा समाजशील प्राणी आहे.सुसंस्कृतीचे जतन केल्यानेच मनुष्याच्या सामाजिकतेची जोपासणा आजतागायत झालेली दिसून येते.जेव्हा- जेव्हा,जिथे-जिथे संस्कृतीचे अध:पतन झाले तिथे त्या समाजाचा पर्यायाने मानवाचा विनाश घडल्याचे इतिहासापासून आपणांस पाहायला मिळते. संस्कृतीच्या निर्मितीत मानवाचा मोठा वाटा आहे.निसर्गदत्त लाभलेल्या भौतिक सुविधांचा,जीवनाचा आपल्या प्रयत्नांनी योग्य तो बदल घडवून सर्वांसाठी आनंदप्राप्ती,उपयुक्ततता निर्माण करणे म्हणजे संस्कृती.
फार वर्षापूर्वी गावे होती आणि तीही लहान होती पण या लहान गावात राहणारी माणसे परस्परांजवळ होती,मनाने मोठी नि निर्मळ होती.गाव म्हणजे जणू एक अख्खे मोठे कुटुंबच होते.मंदिरात भजन-किर्तने होत असत,पारावर गप्पा व्हायच्या, घरा-घराची सुख-दु:खे ही गावाची सुख-दु:खे व्हायची.माणसं माणसाला जपायचीत.पणजी -पणजोबा,आजी-आजोबा या कुटुंबाच्या वटवृक्षाच्या छायेत सारे कुटूंब भरून पावलेले असे. या ज्येष्ठांच्या बोलण्याचालण्यातून,नित्य वर्तनातून भारतीय संस्कृती व्यक्त होत असे.
संगीत,साहित्य,धर्म,मानवता,तत्त्वज्ञान आणि विज्ञान यांच्या संवर्धनात आनंद शोधणे हे संस्कृतीचे सार आहे.ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटो असे मानत असे की आत्म्याचे संस्करण हाच संस्कृतीचा कळस आहे.मानवाच्या ठायी असणारे दुस-याप्रती उन्नत आणि उदात्त भाव हेच या भारतीय संस्कृतीचे अधिष्ठान आहे. एकपत्नी,एकवचनी श्री प्रभू राम , श्रीकृष्णाची गीता, कर्णाचे औदार्य,एकलव्याची गुरुभक्ती, ज्ञानेश्वरांचे पसायदान,संतांची शिकवण ,जिजाऊंचे संस्कार,शिवरायांच्या मातृभक्ती,महात्मा गांधीजींचीअहिंसा,क्रांतीकारकांचा त्याग व बलिदान या सर्वांत भारतीय संस्कृती सामावलेली आहे. संस्कृती ही जगण्यात असते सांगण्यात नसते. *संस्कृती ही आईच्या दुधाप्रमाणे असते.*मानवाचे भरण-पोषण निरपेक्षपणे करण्याचे कार्य संस्कृती करते.जन्मने नि जगणे ओघाने घडते,ती एक प्रकृती असते पण कशासाठी जगावे हे या प्रश्नाचे उत्तर संस्कृतीच्या झोपडीत शोधावे लागते. आज चंगळवादी,सुधारणावादी जगात या कुटिराचे मुल्य लोप पावत चालल्याचे प्रकर्षाने जाणवते.
ज्ञानविज्ञानाच्या बळावर स्वतःला प्रगत म्हणवणारी आजची विकृती भारतीय संस्कृतीचा -हास करू पाहत आहे.क्षणिक सुखाने जगावे कसे हे या आधुनिक जगातील सुधारणा सांगत आहेत पण कशासाठी नि कोणासाठी जगायचे, जीवनाचे शाश्वत सुख कशात आहे हे संस्कृतीच सांगते.पैशाने विकत घेता येणारी सुखे मानवाच्या आयुष्यातुन उठवत आहेत याउलट संस्कृतीने लाभणारे सुख मानवाचे आयुष्य घडवते हेच आजचा मानव विसरून सुधारणेच्या नावाखाली ऊर फुटेस्तोवर नुसताच धावत आहे.विज्ञानाच्या क्रांतीने जग भौतिकदृष्टया जवळ आले आहे पण या प्रगतीने माणूस माणसांपासून दुरावला आहे.बाह्य आनंदात रमलेल्या माणसाने आत्मिय सुख,आनंद नक्कीच गमावला आहे.आपली संस्कृती ही आपल्या असण्यात असते. सुधारणा ही आपल्या दिसण्यात असते. असणे नि दिसणे यांत दिसण्याने असण्यावर आज मात केली आहे. भारतीय संस्कृती हे साक्षात जीवनदर्शन आहे.पण आजकाल हे लोप होत आहे.वर्तमान युगात भौतिक प्रगतीचा वेग वाढला आहे पण समाजाची सांस्कृतिक पातळी खालावली आहे.चिरेबंदी वाडे,लहान घरे असणारी लहान गावे नि त्यातील असणारा कौटुंबिक जिव्हाळा लयास जाऊन फ्लँट,बंगले,शहरे यांत स्वतःच्याच भावविश्वात रमलेल्या,नात्यागोत्यांचा विसर पडलेला माणूस आधुनिकतेत स्वतःला अक्षरश: भरडत आहे. आज जगातील सुधारणेच्या नावाखाली स्वतःच्या आयुष्याला स्वतःच छळलेले लोक भारतीय संस्कृतीचे आचरण करून जीवनाचा आनंद सोहळा करत आहेत पण पिकते तिथे विकले जात नाही,दुरून डोंगर साजरे या उक्तींप्रमाणे आपण भारतीय आधुनिकीकरणाची पट्टी स्वतःच्या डोळ्यांना बांधून भारतीय संस्कृतीच्या लख्ख प्रकाशातून अधोगातीच्या अंधाराकडे वाटचाल करत आहे.अस्तव्यस्त शहरीकरण,विभक्तकुटुंबे,वाढतेवृद्धाश्रम,अनाथालये,पाळणाघरे,वाढती व्यसनाधिनता,बालगुन्हेगारी,शिक्षणाचे बाजारीकरण,वाढता भ्रष्टाचार,बदलती आधुनिक जीवनशैली,भ्रमनिरास करणारी ऐहिक सुखे ,हरवलेली संवेदना या सगळ्यांच्या प्रबळतेपुढे भारतीय संस्कृतीचे आकाश मळभले आहे.
वर्तमान युगात आधुनिकतेची कास धरून जगासोबत प्रवास करणे जरी गरजेचे असले तरी हा प्रवास भारतीय संस्कृतीच्या गाडीतून व्हायला हवा.यामुळे अपघात न घडता समस्त मानव कल्याणाच्या ध्येयापर्यंत पोहचणे नक्की होईल.आधुनिक विश्वाच्या सुधारणांचा रथ कितीही वेगाने धावला तरी त्याचे सारथ्य भारतीय संस्कृतीकडून व्हावे.
जय हिन्द-जय भारतीय संस्कृती!
-----सुवर्णविलास (40)
[10/30, 5:06 PM] +91 99752 32602: साहित्य दरबार लेखमाला
*लोप पावत चाललेली भारतीय संस्कृती*
संस्कृती म्हणजे mode of life, जीवन जगण्याची रीत म्हणजे संस्कृती पण या लहानश्या वाक्यात संस्कृतीची व्याख्या करण योग्य ठरणार नाही. संस्कृतीचा हेतुच आहे की जगण नैतिक रीत्या व्यवस्थित रहाव.
अनेक विद्वानांनि संस्कृतीची व्याख्या वेग वेगळ्या प्रकारे सांगितली आहे त्यात रामधारी सिंह दिनकर यांच्या अनुसार संस्कृति म्हणजे मानवी जीवनात अशी व्यापली आहे जशी फुलात सुगंध आणि दुधात तुप असतय. संस्कृति ही एक दोन दिवसात निर्माण होत नसते तर युगा युगांत निर्माण होते.
संस्कृती ही त्या देश्याची ओळख असते. संस्कृतीन समाज घडतो समाजातील नैतिक मूल्य जगासमोर येतात एकुन काय तर माणसात माणसाची व समाजात समाजाची ओळख ही संस्कृती मुळे असते.
भारतीय संस्कृती ही जगातील अति प्राचीन संस्कृति पैकी एक आहे. प्राचीन संस्कृतीत भारतीय संस्कृती, रोम संस्कृती, यूनानी संस्कृती, मिस्र संस्कृती, इत्यादि संस्कृती येतात.
पण सध्या धावपळीच्या जीवनात सर्वच संस्कृति लोप पावत आहेत त्यात भारतीय संस्कृती ही पिछाडीवर नाहीए. भारतीय संस्कृती ही जगन्याला खरा न्याय मिळवून देते. भारतीय संस्कृतीची रचना ही सर्वांगाने परिपूर्ण संस्कृति आहे व तिचि व्याप्तिहि तितकिच मोठी आहे. भारतीय संस्कृति ही सर्व शास्त्रांना स्पर्श करणारी संस्कृती आहे विज्ञानशास्त्र, अर्थशास्त्र, सामाजिक शास्त्र यांना विस्तृत रीत्या स्पर्श करते.
संस्कृती ही एका पिडिन दुसऱ्या पीड़ीकड सोपवयची असते नक्की त्यात काळानुरूप वस्तुनिष्ट बदल होत जातील. कला, साहित्य, वास्तुविज्ञान, शिल्पकला, दर्शन, धर्म, संगीत आणि विज्ञान या सर्वांमुळे संस्कृति स्पष्ट होत असते.
भारतीय संस्कृतिला साहित्याने खुप कनखर केल आहे प्राचीन वेदाने व नंतर संत साहित्याने त्यात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यात अनेक विधींचा समावेश आहे पण आता त्या खुप कमी प्रमाणात वापरात आहेत.
भारतीय संस्कृतीने जगला अहिंसा, भुतदयाची शिकवण दिली आहे पण सध्या देशात अनेक जागी हत्याकांड, बलात्कार, मुक्या प्रान्यांची हत्या तस्करी सरास होत आहे हे आपल्या संस्कृती लोप पावन्याच लक्षण नाहीत काय?. आम्ही मूर्ति पूजा करतो त्यात ही आमचा प्रेमभाव आहे. आम्ही नद्या, नाले विहिर यांची सुद्धा पूजा करतो कारण आमच्या संस्कृतीची शिकवण आहे.
पूर्वी दिवाळीत लेकमात्या माहेरला आल्या की सर्व जण संध्याकाळी एकत्र जमुन अनेक खेळ खेळायचे, गौळणी म्हणायचे पण आता ती जागा बहुतेक टीव्ही ने व त्यातील मालिकेने घेतली आहे.
अश्या लहान मोठ्या सणासोबत अनेक लहान सहान परंपरा जोडलेल्या होत्या पण अनेक लहान परंपरा नष्ट झाल्या आहेत. भारतीय संस्कृतिला चुकीच्या प्रथाही चिकटल्या होत्या. जसे हुंडा, सती जाण्याची प्रथा पण पुरोगामी विचार वादयांनि संस्कृतीत सुधारना घडवून आनल्या व आजही आणत आहेत. समाजसुधारक सोबत ते संस्कृती सुधारक सुद्धा आहेत. अश्या काही अनिष्ट परंपरा व अंधश्रद्धानी भारतीय संस्कृतीच नाव खराब केल आहे ज्या संस्कृतिन आम्हाला स्त्रीपूजा शिकवली, ज्या संस्कृतिन दुर्गा पूजा शिकवली ती संस्कृति कधीच आपणास स्त्रीभ्रुण हत्या शिकवणार नाही.
भारतीय संस्कृती लोप जात आहे यासाठी काही जण पाश्चात्य संस्कृतिला दोषी ठरवत पण त्यात म्हणाव तितक तथ्य नाहिए संस्कृतित काळानुरूप योग्य सुधरना करण गरजेच असतय त्यात आपण अपयशी ठरत आहोत. तस काही क्षेत्रात योग्य सुधारना झाल्या आहेत.
अनेकता मधे एकता ही भारताची ओळख आहे अश्यात ही संस्कृतीचा फार मोठा वाटा आहे अनेक धर्म, जाती पाती असताना सुद्धा भारतीय संस्कृतीन त्यांना एका धाग्यात गुंतवल आहे.
भारतीय संस्कृति इतकी विस्तृत आहे की तिचा पूर्ण लोप होण अशक्य आहे. भारतीय संस्कृतिन जगला अनेक मुल्यांची देणगी देली आहे.
अमोल अलगुडे
स क्र 51
Aalgude777@gmail.com
[10/30, 6:37 PM] Kishor Jhote: *लोप पावत चाललेली भारतीय संस्कृती*
भूक लागली असताना खाणे ही प्रकृती, भूक नसताना खाणे ही विकृती तर भूक लागलेली असताना आपल्या ताटातील दुसऱ्यास देणे ही संस्कृती. हीच आपली संस्कृती होय.
भारत हा जेंव्हा जंबुद्विप म्हणून प्रसिध्द होता अगदी तेंव्हा पासून एक प्राचिन संस्कृती या देशात होती. बौध्द काळ हा तर या संस्कृती मधील सुवर्ण काळ म्हणता येईल. विविध आक्रमण परतवली काही पचवली देखील.
शिक्षण अधिकार सामान्य व्यक्तीला मिळला आणि लिखीत स्वरूपात ज्ञान साठवणे सुरू झाले पाली भाषा ही ज्ञान भाषा व सर्वसामान्य बोली भाषा होती. मात्र बौध्द संस्कृती नष्ट झाली आणि इतर अनेक परकीय आक्रमण झाली आहेत त्यामुळे वेगवेगळी स्थित्यंतरे स्विकारली बदलाव होत गेले तरी बरेचसे चांगले संस्कार आजही आपणास पाहण्यास मिळतात.
पाश्चिमात्य सांस्कृतिचा बराचसा पगडा आमच्यावर पडलेला दिसतो, या साठी सर्वस्वी जबाबदार ही आजची प्रसारमाध्यमे व व्यापारीकरण आहे. कॉर्पोरेट सेक्टर मधे सर्वत्र अनैतीकता दिसून येते.
खाजगीकरण, उदारीकरण, जागतीकरण या गोंडस नावे व विज्ञान तंत्रज्ञान प्रसार माध्यम यातूनही संस्कृती लोप पावत चालली आहे. परंतू या बाबीकडे लक्ष नाही.एक स्लो पॉईझन म्हणता येईल असे घडत आहे. शहरीकरण यातून गाव ओस पडली त्यातून गावचे व एकत्र कुटुंब पध्दतीचे संस्कार दूर राहीले, तर ग्रामिण भागात डिजीटल इंडिया च्या गैरवापरातून तेथील संस्कार देखील थिजलेले दिसत आहेत.
भौतिकता व यांत्रीकता मधे आज प्रत्येक गुरफाटत चालला आहे. घरात एक व बाहेर एक असे दुहेरी कोष प्रत्येक व्यक्ती स्वतःभोवती तयार करत आहे आणि त्या कोषात राहणे त्याला आवडत आहे. निती, आचार, विचार सर्वत्र आज भेसळ होत आहे. मी व मला दुसऱ्याचे काही घेणे देणे नाही. अनैतिकता तर किती माजली आहे. दररोज दैनिकात खून, दरोडा, आत्महत्या , बलात्कार , विवाहबाह्य संबंध अशा बातम्या वाचतो. सर्व वातावरण गढूळ झालं आहे असे वाटते. यास सर्वाधीक जबाबदार टेलिविजन म्हणता येईल. डीशचा शोध लागला आणि अधोगती होत गेली. स्मार्ट फोन ही दुसरी कारण असलेली वस्तू म्हणता येईल. अर्थात काय पहावे हे जरी आपल्या हातात असले तरी ते ही सहज उपलब्ध होत असल्याने तसलं पाहणं जास्त पसंद केले जाते. पुन्हा एकदा येतो आपण ते संयुक्त कुटुंब पद्धतीकडे तेंव्हा एवढया समस्या नव्हत्या . संस्कार आपोआप होत होते.
माणसं सोडून आपण वस्तूंना किंमत दयायला लागलो. त्यामुळे संस्कृती ची किंमत आपणास वाटेणासी झाली. स्वार्थ प्रवृत्ती वाढत चालली आहे. हम दो हमारे दो हे फॅमिली प्लॅनिंग बाबतीत ठिक पण संयुक्त कुटुंबापासून दूर जाणे हा मतलबी अर्थ आपण घेतला आहे.
यांत्रिकतेचा जास्त वापर केल्याने भावना संवेदना गोठत आहेत व आपल्यापणाच्या भावना संपत आहेत. जीवनातील खरा आनंद आपण विसरत चाललो आहे. अखेर जेंव्हा जाग येते तेंव्हा हातून सर्व निसटलेले असते.आपला देश जसा महान तशी आपली संस्कृती महान आहे. मातृसत्ताक पध्दतीचे पाईक आपण. प्राणीमात्रावर देखील प्रेम करणारे आपण आज मात्र पशूप्रमाणे वागत आहोत.
संस्कृती म्हणजेच संस्कार अन् त्याचे एकच उदाहरण देतो , एका शेतकऱ्याला आपली बैल जोडी विकायची असते. बरेच गी-हाईक येतात. तो शेतकरी एकच प्रश्न विचारतो तुम्हाला काही व्यसन, सवय आहे का? उत्तर नकारार्थी येत होते तो बैल जोडी विकत नव्हता. एक व्यक्ती येतो व मला तंबाकू खायची सवय आहे, असे सांगतो तो शेतकरी त्या व्यक्तीला बैलजोडी विकतो.
त्याचा मित्र विचारतो का रे चांगली किंमत येत असून आधी चा सौदा मोडलास आणि कमी पैशात या तंबाकू खाणाऱ्याला का दिसील बैलजोडी? त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले, तो म्हणाला अरे बाबा इतर कोणाला व्यसन नव्हते. म्हणजे ते माझ्या ह्या बैलजोडी कडून दिवसभर न थांबता काम करुन घेतलं असतं, आता हयो तंबाकू खायला थोडा वेळ तरी थांबल ना? तेव्हडाच माझ्या बैल जोडीला आराम मिळल, शेतकरी डोळं पुसत म्हणाला. मित्राच्या डोळ्यात ही पाणी आले. केवढा हा जिव्हाळा व प्रेम. त्यामुळे येणारे डोळ्यात पाणी आणि हेच डोळ्यात पाणी येणे आमचे संस्कार व त्यातूनच आमची संस्कृती सुदृढ होत होती.
पण आज प्राणीमात्रांबद्दल तर सोडाच आमच्या जवळच्या व्यक्ती बददल देखील डोळ्यात पाणी येत नाही.
हे पाणी येणे जेंव्हा बंद झाले आहे तेंव्हाच आमची संस्कृती कुठेतरी लोप पावत चालली आहे. असे मला तरी वाटते.
किशोर झोटे @32
जि.प.प्रा.शाळा ढोरकीन तांडा,
कें.ढोरकीन ता. पैठण जि. औरंगाबाद
मो.9423153509
Samyakharshali@gmail.com