Saturday, 15 October 2016

मुक्त कविता स्पर्धा

[10/15, 10:05 AM] Manisha Wani sdarpan: ।।स्पर्धेसाठी।।

।।तूच पिता तूच दाता।।

तुजविण आहे मी निराधार
तुजविण कोण वाहे हा भार?

दिला संकटात मज आधार
परी मानले ना तुझे आभार
बाबा राहू दे हे कर्ज उधार
तुजविण आहे मी निराधार
तुजविण कोण वाहे हा भार?

बालपणी केले उच्च संस्कार
तूच जन्मदाता तूच निरंकार
उरलेत आता ते सोपस्कार
तुजविण आहे मी निराधार
तुजविण कोण वाहे हा भार?

तारूण्यात चढवले अलंकार
कर्तव्यनिष्ठेने केला अविष्कार
बाबा माझ्या जगाचा जाणकार
तुजविण आहे मी निराधार
तुजविण कोण वाहे हा भार?

अश्रूंना मी नाही रोकणार
हिंमत कदापि नाही हारणार
खात्री मजला तूच तारणार
तुजविण आहे मी निराधार
तुजविण कोण वाहे हा भार?

सौ.मनिषा वाणी.
सुरत.१५.१०.२०१६.
०९४२६८१०१०९.
@2
[10/15, 10:31 AM] Santosh shelke sdarpan: ___स्पर्धेसाठी____

*आम्ही लहान असताना..*

लपंडाव खेळताना
तलावात पोहताना..

शिवला नाही मनाला
कधीच जाती भेद,
आम्ही लहान असताना... |

शाळेत डब्बा चोरून खाताना
दाताने तोडलेली गोळी खाताना...

कधी असे वाटलचे नाही
उष्ट खाल्ल्याने  बाटु,
आम्ही लहान असताना...|

गणेश उत्सवात नाचताना
ईदला एकमेकां भेटताना..

सण  कधीच नव्हता
वेगळा आम्हांला,
आम्ही लहान असताना...|

मोठे झाल्यावर, वावरताना
पाहिली माणसे दुरावताना...

पण केव्हाच दुरावलो नाही
जाती - धर्माच्या भांडणात,
आम्ही लहान असताना...|

पाहिले मोर्चे, दंगली घडताना
माणूस धर्म जातीत भांडताना...

खरच बरं ! अडाणीच होतो
अशा गोष्टींपासुन,
आम्ही लहान असताना...|

ठरवलंच, आता हारायचे नाही
माणूस "माणसात "जोडताना..

घेऊन धडा माणुसकीचा
शाळेत शिकलेला,
आम्ही लहान असताना...|

✍🏻 संतोष ए. शेळके / कर्जत, रायगड.. @24
[10/15, 10:40 AM] Nirmale Abasaheb sdarpan: *  कलाम *

अग्निपंख देवूनि
अमर झाले  कलाम
त्यांना सलाम
      भारतीयांचा !
जन्मभर बनले
देशाचे रक्षक
मनाने शिक्षक
       होवूनिया !
करुनि संशोधन
लावले कितीशोध
त्यांचा थोडा बोध
     घेवू आज !
विज्ञान तंञज्ञानाची
घेवूनिया साथ
समृद्धीची वात
       पेटवली !
होवूनि राष्ट्रपती
केली त्यांनी सेवा
नसे कधी हेवा
       त्यांच्यापाशी !
कितीतरी मोठी
भूषवली पदे
राहिले साधे
     जन्मभर !
कधी न मानला
जात अाणि धर्म
कलामांचे कर्म
        आकाशाएवढे !
घेवूनि प्रेरणा
वाचूया पुस्तक
करुया मस्तक
      शक्तिशाली !

   -आबासाहेब निर्मळे.
पेठ,वडगांव कोल्हापूर
9028090266.
(मुक्त कविता स्पर्धेसाठी कविता)
क्र-३१
[10/15, 11:26 AM] Borhade bldhn shitya darpn: . . कविता -बायको ...

कशीही असली राव तरी
आपलीच बायको बरी असते
काळी असो किंवा गोरी
आपलीच बायको परी दिसते .

कथरीना सारखी नसली तरी
हिरोईन पेक्षा कमी नसते
वानाने नाही पण गुणाने
आपलीच बायको बरी असते .

पडद्यावर नव्हे तर घरात
तुमच्याच तालावर नाचत असते
थोडसं काही बिनसलं की घर
डोक्यावर घेणारी बायको असते.

नोकरी , घरकाम सांभाळून
संसार चालवायला धडपडते
ती दुसरी कोणीही नाहीतर
तुमची अर्धांगीनी ,घरवाली
तुमच्या हक्काची बायको असते.

घनशाम बोह्राडे बुलडाना
समुह क्रमांक 19
*स्पर्धेसाठी कविता*
[10/15, 11:53 AM] shashikala Bankar sdarpan: स्पर्धेसाठी कविता
*पुस्तके*

*देतात जीवनाला आकार पुस्तके ही
वाटेत वेदनांच्या आधार पुस्तके ही

घेण्यास मज भरारी देतात हात हाती...
करतात स्वप्न माझे साकार पुस्तके ही

ज्ञानास गोडवा हा संधीस साधण्याचा
होतात रोज आता पाभार पुस्तके ही

जन्मास येत आहे शिवबा जणू नव्याने
गर्भात पेरण्याला संस्कार पुस्तके ही

ज्ञानामृतास प्राशू गोडीच अविट आहे
आनंद रुजवणारी उपहार पुस्तके ही

.... सौ. शशिकला बनकर भोसरी
© हक्क स्वाधीन*
@35
[10/15, 12:47 PM] Sunil Aswale sdarpan: 👉मुक्तकविता स्पर्धेसाठी

       *नातं*

ठरवुनही तुला टाळणं,
मला कधी जमलच नाही,
तुला पाहिल्याशिवाय,
जीव माझा कधी रमलाच नाही.

ठरवुनही आबोला तुझ्याशी,
कधी धरता आलाच नाही,
मनमुराद तुझ्याशी बोलल्याशिवाय,
मन माझं कधी भरलंच नाही.

ठरवुनही तुझ्या नयनी पाणी,
मला पाहवत नाही,
तु खळाळून हसल्याशिवाय,
मन माझं कधी फ़ुललच नाही.

ठरवुनही तुझ्यावर माया न करण,
मला कधी जमलंच नाही,
तुझ्याच मायेने मोठा कधी झालो,
मला कधी कळलंच नाही.

नातं आपलं बहीण-भावाचं,
इतकं प्रेमळ असतं,
मला कधी उमगलच नाही,
सासरी गेल्यानंतर तू,
मला मात्र आता मुळीच,
करमत नाही.....

*------ सुवर्णविलास(40)*
[10/15, 1:38 PM] Narendra Mhaske sdarpan: मुक्त कविता स्पर्धेसाठी.....
             #   हेच खरे   #
अंधार पळविण्या म्हणतात
दिवा व वात समर्थ हवी,हेच खरे
वार्‍याच्या भितीने येथे किती
                गडप झाले ।।
देशभक्ती जपण्या म्हणतात
त्यागभावना असावी, हेच खरे
देशभक्तीच्या नावाखाली येथे किती
                 जिहाद झाले ।।
माणुस बनण्या म्हणतात
माणुसकी नित्य जपावी,हेच खरे
हव्यासापोटी येथे किती
                  पशूच झाले ।।
नरेंद्र म्हस्के , शिरपूर ( धुळे )@ 65
[10/15, 1:40 PM] Kavita shinde sdarpan: दुष्काळ

किती काळ लोटला
तरी दुष्काळाचं सावट
हटतं नाही

किती केल्या देवाला
पूजा अर्चना तरी
पाऊस काही पडत
नाही

भेगाळलेल्या जमीनी
कडे पाहून जीव तीळ
तीळ जळतोय

अन्ना वाचून शेतकरी उपाशी
मरतोय

पाण्यासाठी दाही दिशा
वणवण शेतकरी भटकतोय

आटलेल्या विहरी कधी तरी
पाण्याने भरतील या आशेने
वाट बघतोय

पण पाऊस काही पडत नाही
किती काळ लोटला
तरी दुष्काळाचं सावट काही
हटतं नाही

कविता शिंदे ........६७
[10/15, 1:43 PM] Hole Rohidas sdarpan: ..मुक्त कविता स्पर्धेसाठी ..

.......आरक्षण ........

आई आपली बहिण आपली
आधी करु या इज्जतीचं रक्षण
जो तो पेटून उठला अन
थैमान घालतंय आरक्षण ...!!१!!

बघा हा खेळ खुप महागाचा
बलात्कारी विळख्याचं करा निरीक्षण
जो तो पेटून उठला अन
थैमान घालतंय आरक्षण ,..!!२!!

संस्कारीक स्ञी या मातीची
उपकाराने जागृत व्हा केलेले औक्षण
जो तो पेटून उठला अन
थैमान घालतंय आरक्षण ...!!३!!

निष्ठूर होतोया मानवा तु
आणी तुच करतोय नारीचं शोषण
जो तो पेटून उठला अन
थैमान घालतंय आरक्षण ...!!४!!

मुह मे राम बगल मे छुरी
मोर्चे आंदोलन तुझेच निषेध भाषण
जो तो पेटून उठला अन
थैमान घालतंय आरक्षण ...!!५!!

घडवा तीला ,करा सन्मान
होऊ द्या स्वावलंबी ,द्या शिक्षण
जो तो पेटून उठला अन
थैमान घालतंय आरक्षण ....!!६!!

देश पेटवायला निघाले अतिरेकी
नाही ठिक दिसत गद्दारांचे लक्षण
जो तो पेटून उठला अन
थैमान घालतंय आरक्षण ....!!७!!

गाडून टाक माणसा दहशतवाद
माणसा बरोबर होतंय देशाचं ही भक्षण
जो तो पेटून उठला अन
थैमान घालतंय आरक्षण ....!!८!!

संपला पाहिजे छळवाद, फुटीरवाद
माणूस नावाची करुन दवा प्राशन
मग माग माणसा विश्वासानं
माणसा माणसाला माणुसकीचं आरक्षण ....!!९!!

रोहिदास होले ...७१
गोपाळवाडी ,दौड...पुणे
१५/१०/२०१६
[10/15, 2:18 PM] soni nirmala sdarpan: स्पर्धेसाठी..

नको खूप सुंदर बरी तू असावी
मला वाटते की परी तू असावी

कसा भास होतो मनाला कळेना
नको स्वप्न आता खरी तू असावी

कसा दूर राहू जरा सांग मजला
नको संगती पण घरी तू असावी

गुलाबी मधुर ती अशी रात यावी
खुळया श्रावणाची सरी तू असावी

दिले खूप आहे मला जिंदगी ने
प्रिये जीवनी या तरी तू असावी

निर्मला सोनी. (28)
[10/15, 2:28 PM] Amol algude sdarpan: स्पर्धेसाठी

शब्दांनि जोडतो
मि जात आहे
शब्दांनि सोडतो
मि कात आहे

वाटते मानुसकीची
सध्या कपात आहे
पाहतो चौहिकड
नराधम अफाट आहे

वापरून जात धर्म
तो गाजवितो बात आहे
दानव रूपी नेता
वावरतो समाजात आहे

            अमोल अलगुडे
                स क्र   51
[10/15, 2:51 PM] Sunil Bende sdarpan: 🍂मुक्त कविता स्पर्धा 🍂

    *स्मशान वैराग्य*

जवळचा एक मिञ अकाली वारला
अगदी तरूण वयात
गेलो अंत्यविधीला विचार आला
अचानक मनात

काय सोबत जाते माणसाच्या
सर्व येथेच राहते
पण मनुष्यजात सदैव स्वतःचा
स्वार्थच पाहते

यात काही अर्थ नाही करावी
ईश्वराची भक्ती
साधून घ्यावी आपण याच देही
सायुज्य मुक्ती

मन वैराग्याने गेले होते भरून
विटली आसक्ती
ठरवले आजपासून सोडावी सम्पत्ति
लक्ष्मी,  धन भक्ती

परत आलो स्नान करून पूजेला
बसलॊ निवांत
तोच आला भंगारवाला नेण्यास रद्दी
पण मी शांत

त्याने भाव सांगितला रद्दीचा आणि
तो मी ऎकला
अाता तुम्हाला सांगतो माझा तर
संयमच सुटला

भंगारवाल्याशी वाद घालून घेतले
थोडे पैसे जास्त
मगच जिव निवांत झाला लागलो
देवपूजेला मस्त

@ २१ सुनिल बेंडे
    *नाथसेवक*
            😎😎😎
[10/15, 2:55 PM] Neeta Aandhle Kavya: 🌷स्वच्छता अभियान🌷
जागोजागी कच-यांचे ढिग
पसरले होते गल्लोगल्ली
स्वच्छतेची सगळीकडे
केली होती पायमल्ली
रोगाचा प्रार्दुभाव दिसत होता घरोघरी
डेंग्यू,मलेरियाच्या डासांने
उच्छाद मांडला दारोदारी
नद्यांचे रूप ओंगळ
दिसत होती गटारगंगा
तेही नसे थोडके म्हणून
काठावर प्रातःविधी साठी रांगा
सोन्याहून पिवळा देश माझा
दिसतो का कुठे ते सांगा
सोनीयाचा एक दिवस
मग असा उगवला
मोदीजींच्या स्वच्छता अभियानाने
सारा देश जागवला
स्वच्छतेचे महत्व
नागरिकांना समजले
खराटा, झाडू हातात घेऊन
सगळे रस्त्यावर उतरले
उरात भरला देशाविषयी अभिमान
प्रत्यक्षात उतरले स्वच्छ भारत अभियान.
   🌹नीता आंधळे🌹
        अहमदनगर
[10/15, 3:23 PM] Meena Sanap sdarpan: 📗साहित्य दर्पण व्दारा आयोजित 📕
  ****************************  
         मुक्त कविता
दिनांक -----15---10----2016
     
    वाचन प्रेरणा
****************************

वाचाल तर वाचाल
शिकाल तर टिकाल
जिथे जिथे दिसेल पुस्तक ,
तिथे तिथे होऊ नतमस्तक

जिथे असेल साठा पुस्तकांचा
नसेल तोटा तिथे समृद्धीचा
वाचन करुन मिळेल ज्ञान
उंचावेल आपुले जीवनमान

पुस्तकांशी करुया मैत्री
मिळेल ज्ञानाची खात्री
वाचनाने स्थिर होईल मती
घडेल आपुल्या विकासाला गती

वाचन करा वाचन करा
म्हणती थोर विभूती
सकळ जन होई शहाणे
शिक्षणाने होई प्रगती

शाहु , फुले , आंबेडकर
शिक्षणाने मिळाला जगी मान
ज्ञानाने झाले समाजाचे भान
किर्ती मिळाली दिव्य ते ज्ञान

प्रेरणादिनी प्रेरणा घेऊ
वाचनाने जीवन समृद्ध  करु
ग्रंथ हेचि आपले मानु गुरु
कास साफल्याची धरु

****************************
मीना सानप बीड  @ 7
स्पर्धेसाठी
9424725865
[10/15, 3:44 PM] pushpa Sadakal sdarPan: स्पर्धेसाठी

               विरंगुळा.

गट्टी जमली ज्येष्ठांची
मैफिल भरली गप्पा गोष्टींची.

आयुष्याच्या या  संध्याकाळी
मुखमंडलावर तृप्तीची झळाळी.

कामधंदा जबाबदारीत होते व्यस्त
आता स्वतःसाठी  जगतात मस्त.

रोज रोज  हरिपाठ एकत्र
तन मन  होई त्यांचे पवित्र

एकमेकांत गप्पा रंगतात छान
विचार विनिमयातून  कामे महान.

घर प्रपंचातून नव्हती सुटका
आता मात्र  रोज फेरफटका .

मनासारखं जगतात थोडं
आयुष्याची सोडवतात कोडं.

सरत्या आयुष्याला ही हसू कोवळे
बिनधास्त आता नाही सोवळे.

संसारातून  काढून मन
गोळा करतात   विचार धन.

वेळ  असतो आता भरमसाठ
चहा नाष्ट्याचा  रोज हरिपाठ.

वाढदिवस,सत्कार समारंभातूनी
आनंदाचा उपभोग मनामनातूनी.

योगासने प्राणायाम करतात
तब्येतीचं मुल्यमापन जोपासतात.

उठवून   हास्याची   लहर
आनंदाचा यांचा केवढा कहर.

असा  असे दिनक्रम  आगळा
जेष्ठ नागरिकांचा हाच विरंगुळा.

        पुष्पा सदाकाळ भोसरी
      @ 50.9011659747.
[10/15, 4:15 PM] sau. Subhadra Khedkar sdarpan: *  *स्पर्धेसाठी मुक्त कविता*
➖➖➖➖➖➖➖➖
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

       *    *कोजागिरी*
कोजागिरीच्या उजेड राती
शरदाच टिपूर चांदणं
वाचन प्रेरणेच्या ध्यासाने
मनावर  साक्षरतेच गोंदणं

लखलखत्या अनोख्या राती
प्रत्येकजन जागतो
सरस्वती लक्ष्मीच्या आराधनेत
भक्तगण नाचतो

उज्वल ह्या दिवसाचा
अनोखा कसा योगायोग
अंधाराला पळवतो कसा
चांदव्याचा संयोग

आटलेले क्षीर आणिक
ज्ञानामृताचा थेंब कसा
देतो शरीर मनाला उभारी
भासतो दोन्हीचा संगम कसा

वाचन प्रेरणेने प्रेरीत झाली
दुध पिवुनी पुष्ट झाली
अशी कोजागीरी आज
माझ्या अंगणी आली

       खेडकर सुभद्रा बीड (२०)
मो नं (९४०३५९३७६४)
[10/15, 4:18 PM] padwal Hanmant Kavya: " घन बोले "
परवा परवाचीच गोष्ट आठवा जरा
कसा गोरामोरा झाला होता चेहरा
शोधत होत्या नं डोळ्यांच्या बाहुल्या
गर्भाळ ढगांच्या दाट दाट साऊल्या.....॥
    आता कसं लगीच उंडारताय
    मला शिव्या घालून बोलताय....
    अर्जव, नवस, धावा सारेच केले
    पण शोधा जरा असे दिस का आले....॥
चूका तुमच्या, माझ्या माथी मारता
पीकत नाही म्हणून जीवानिशी मरता...
तुम्हासाठी गळून पडलो व्याकूळ होऊन
लगेच गेलात वैतागून नि बोलता कातावून....॥
    कासावीस तुम्ही, तडफड मायीची बघवना
    बरसल्या वाचून माझा जीव राहवना....
    येवढ्यात कांही शिकलात तर बरं होईल
    कालच्या व्यथेवर हिरवं सपान सजून जाईल..॥
                       
                       श्री. हणमंत पडवळ.
          मु.पो. उपळे( मा.) ता. जि.उस्मानाबाद.
                   8698067566
                      क्रः 48.

मुक्तकविता सर्धाकरिता
[10/15, 5:02 PM] Jayshree Jogdand sdarpan: जाणू या धातू अधातु
🔩 धातू -अधातु🚪
धातू म्हणे देणे माझी प्रवृत्ती
अधातु तू आहेस उणा
म्हणूनच मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉनशी
भागीदारी करतोस पुन्हा-पुन्हा

धातू अधातूंची झाली अशी भांडणं
अधातु म्हणे धातूंना समजावताना मर्म
ऊन,वारा, पाऊसाशी होताना संपर्क
गंजतोस तेव्हा कुठे जातो तुझा धर्म

धातू धातूंची होते एकी अन
दिसले त्यांना विद्दुत विलेपनचे घर
लागले चमकू दाग दागिने जेव्हा
दिला एका धातूचा दुसऱ्या धातुवर थर******

दोन किंवा अधिक धातूंचे
केले ठरावीक मिश्रण अन नवीन
मिळालेल्या धातूचे नाव ठेवले संमिश्र
अली नवी चकाकी अन क्षरणाची झाली घसरण*****

जोगदंड जयश्री
@ jj 62****

  🎯स्पर्धेसाठी🎯
[10/15, 5:07 PM] Meera Sanap sdarpan: 🕊मुक्त कविता🕊
**************
स्पर्धसाठी
***********
निसर्ग-किमया
🍁🍁🍁🍁🍁

रानोरानी हिरव्या रान
पक्षी गाती छान
सुदंर चोहीकडे पक्क्षी बागडती।
त्यांची रित भारी महान.

इकडून तिकडे तिकडून इकडे
आकाशी भरारी घेते छान
पाने फुले फळे यांची
सेवन करती छान।।

पोपट पक्क्षी चिमणीताई
हे मोठे रूबाबदार
घरट्यासाठी शोध घेती
घरटे बांधूनी जीवनाचा आधार।।

रानोरानी फुले बहरती
वरती त्यांच्या फुलपाखरे बागडती
सुंदर सुंदर असे वृक्ष
नयन दिपून जाती।।

मीरा खेडकर @(6)बीड
[10/15, 5:13 PM] Kulthe snehlata sdarpan: 🌹शुभ्र रात्र 🌹
कोजागिरीची शुभ्र रात्र
ठरावी जीवनात उज्ज्वल
नष्ट व्हावा अंधःकार
व्हावे राष्ट्र प्रज्वल.....
मी तू पणा संपावा
रान व्हावे एकतेचे
पातेलभर शुभ्र दूधात
प्रतिबिंब शितलतेचे....
नसो भांडण धार्मिकतेचे
करु नये कोणी बंड
असाच राहावा भारत
सदोदित अखंड. ....
स्त्री पुरूष एकता जपावी
मनाने आणि तनाने
कोणी नसावा लिंगभेदी
गाऊ गीत सुस्वराने...
गाऊ गीत सुस्वराने..
***********************
स्नेहलता कुलथे
मोबा 7588055882
क्र.37🌹
[10/15, 5:20 PM] Yevtikar Sahitya darpan: *मुक्तकविता स्पर्धा*

शुभ्र शरद चांदण्याच्या
प्रकाशात चालल्या गप्पा-टप्पा
कुणी करतो कविता तर
कुणाच्या रंगल्या गप्पा

मध्यरात्रीपर्यंत सर्वच्या बघा
निघत असे गमतीजमती
जो तो आपाआपली गोष्टी
सांगून वेळ पहा झुलवती

अश्यातच तुझे येणे झाले
जसे नायक येतो कठीण प्रसंगी
मला लगेच वाटले होते की
मिळाली तुला पाहण्याची परवानगी

त्या चांदण्या राती तुझा
उजळला असा चेहरा
कोजागिरीचा चंद्र ही
पाहून झाला कावरा-बावरा

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
09423625769

*स्पर्धेसाठी समर्पित*
[10/15, 5:46 PM] Sangeeta Bhandawle sdarpan: मुक्तकविता
(स्पर्धेसाठी)

पुस्तके करतात हितगुज
सुख दु:खाच्या क्षणाच्या
साठवतात त्यात आठवणी

कधी प्रेमाच्या कविता
कधी विरहाची गाणी
सोबतीला देतात साथ
पुस्तकातीलच आठवणी

मनातील सुंदर मनाचे
चित्र उतरते त्यात
नवविचारांचे वाण
असते पुस्तकात

भगतसिंगाने वाचायला पुस्तके मिळावी
म्हणुन केले उपोषण तुरुंगात
फाशीवर चढतानाही गुंग
होते पुस्तके वाचनात

भगतसिंगानेही जपले
वेड वाचनाचे
फासावर चढतानाही
वाचन करत होते पुस्तकाचे

जोतिबांना  मिळाली प्रेरणा
"राईट्स ऑफ मँन" पुस्तकातुन
डॉ आंबेडकर विश्वरत्न झाले
"बुद्ध चरित्र" पुस्तक भेट मिळाले म्हणुन

संगीता भांडवले
वाशी,उस्मानाबाद
(१६)
[10/15, 5:59 PM] Pawar Gajanan Sdarpan: *मुक्त कविता स्पर्धा*
☘☘☘☘☘
बाळ मुक्ताई मुक्ताई
ज्ञानराजाची बहिणी..!
पाठीवरती घेई ज्ञाना
सोपान गाई गोड गाणी..!!

पांडुरंगी गीत गाता
होई अमृताचा वर्षाव..!
आकाशी चंद्र पौर्णिमेचा
दिसला निवृत्ती गुरूदेव..!!

कोजागरीचं चांदण
घेता ठाव अभंग वेचून..!
मुक्ताईचे फुलले हास्य ,
ज्ञानेश्वरी जाई रंगून..!!

मुक्ताईची शिकवणी
चांगदेवाशी लाभली..!
बालक रूपातील लेकरू
गुरू मुक्ताई शोभली..!!

धन्य धन्य मातापिता
विठ्ठल रुक्मिणी..!
अविरत ज्ञान पाझरते
लख्ख प्रकाशली धरणी..!!
☘ गजानन पाटील पवार @81
🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃
[10/15, 6:07 PM] Kalpana Jagdale sdarpan: *_मुक्त कविता स्पर्धेसाठी_*

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

*अ जावून स चा आदर व्हावा*
*******************

पोटातच मुली मारणारे     सुशिक्षित आडाणी
त्यांच्याच तोंडी असते
बेटी बचाव ची गाणी ||1||

सुनेस जळले जाते
काही लाखासाठी
स्त्रीरूपी देवीची उपासना   
करती नवसपुर्तीसाठी ||2||

चौकांचौकांत लचके तोडणाऱ्या
नजरा आहेत खिळल्या
नराधमांची ही पापकृत्य
आजवर आहे गिळल्या ||3||

कधी संपणार हा नारी
तुझा गं वनवास
किती पिढ्या बनून
राहशिल गं दास ||4||

सन्मान आता स्त्रीचा नि
स्त्रीत्वाचा व्हावा
अबलातला अ जावून
स चा आदर व्हावा || 5||

🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
*कल्पना जगदाळे@8★बीड🖊*

🔹🔸🔻🔹🔸🔻🔹🔸
[10/15, 6:19 PM] yogeeni chaterjee sdarpan: मुक्त कविता स्पर्धेसाठी 
🌟⭐🌝🌟🌝⭐🌟

शरद पुनव राती
किरण हे अमृतमयी
मानवावर करुणा
आगळीच सुखमयी

उतरवीत अमृत
दुधात आज या रात्री
प्यायला त्याला मिळे
आरोग्याची खात्री

लक्ष्मी आली दारी आज
पुसती को जागरती ?
जागतो जो पुनवेला
वैभव धन हो प्राप्ती

योगिनी चॅटर्जी #52
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
[10/15, 6:21 PM] Kulkarni Bandopanth Sdarpan: 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
मुक्त कविता स्पर्धेसाठी

         *मधुचंद्र*

*एक प्रश्न नेहमीचाच,*
*चंद्र नेमके किती असतात..!*
*दिसतो तो संख्येत एक,*
*दिसतात अनेक  प्रसंगात..!*

*शुक्लात दिवसा जोडून,*
*कृष्णात पल्याड निद्रेच्या..!*
*यात मधुचंद्र कोणता,*
*उगे पुनवेला वा अवसेला..!*

*बंद खोलीत चंद्र येईना,*
*नभात मधु तयार होईना..!*
*मधु असे चंद्र असताना,*
*वा तो काळखी लपताना..!*

*चंद्र कलेकलेने वाढतो,*
*कलेकलेतच तर झुरतो..!*
*मग मधु सोडतो कधी,*
*वाढतो तेव्हा वा कमी होतो..!*

*कदाचित् हा मधुचंद्र,*
*अलग कुणीतरी भलताच..!*
*शुक्ल कृष्ण भेदाविण,*
*बारमाह सम न बदलताच..!*

*नव जोडीना त्यात मधु,*
*जुन्यानां मनाचा करवीता..!*
*पिऊन मधु वावरताना,*
*मनात राहते मनात व्यथा..!*

*तरीही प्रश्न अनुत्तरीत,*
*चंद्र मनात का मन चंद्रात..!*
*भेट दोघांची जरी सतत,*
*का तिचा सहभाग मधुचंद्रात..!*

*चंद्र बिचारा तो एकटा,*
*फिरतो नेमाने, पाहतो जादू..!*
*मधुचंद्रात नसतो मधु,*
*औषध तो देण्या हर्ष मन अधु..!*

                 बंडोपंत कुलकर्णी सोलापूर
                 समूह क्रमांक 13
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
[10/15, 6:36 PM] Wankhede vrushali Sdarpan: ✨✨🎼🎼✨✨🌴🌴
✨मुक्त कविता ✨

सख्या, चंद्रमा आज खिन्न कीती?
त्यालाही प्रितीचा मिजास कीती
तुझ्या --माझ्या विरहाची त्याला
रितसर कहानी सांगावी कशी?

प्रीतीच्या संवेदना पोर्णिमेत साठल्या
वेदना साऱ्या गोजागिरीत गोठल्या
ओठावरी स्वर हे गोठून गेले कीती
सांग मिलनाची आस तुझी खंडली कशी?

काळजात आक्रंद-लटकी त्या हाका
तुझ्याच साठी रुसला माझा शृंगार साठा
धूंडाळते अजूनही मी त्या काचर्या क्षणाला
कशी सावरु रे कुणी जानेल का मनाला?

सोबतीला उरली फक्त तुझी छाया
मीठी सैल झाली कशी मिलनाची ती माया
रम्य सांज अधुरी येऊन परतली कशी?
पोर्णिमेत नभाख़ाली लीन मी उभी एकली तुझी सखी********

*वृषाली वानखड़े*✍🏻......
🌴✨अमरावती✨🌴
**********75***********
[10/15, 6:40 PM] kishor: मुक्तकविता स्पर्धा साठी

वाचन प्रेरणा

वाचन प्रेरणेने ज्योतीबा पेटले
शिवबाच्या समाधीला शोधले
जाणून खरी गोम धर्माची हसले
सत्यधर्मची कवाडे उघडून दिले

केळुसकर गुरुजींचे बुध्द चरित्र
बाल भीवाने शाळेतच वाचले
१९५६ ला नागपूर दिक्षा भुमीवर
बुध्द धम्माला संजीवीत ते केले

दिड दिवसात हकलपट्टी शाळेतून
अण्णाभाऊ ते चेतूनी उठले
साहित्याच्या सम्राटापुढे मग
शेषनागानेही शिष झुकवले

सावित्रींच्या शाळेत मुलींच्या
गोडी वाचनाची मुलींना लागे
आम्हास धर्मच नाही मुक्ता साळवे
निबंधात ठामपणे मत ते मांडे

ताराबाईंची स्त्री पुरुष तुलना
डोळयांत अंजन आजही घाले
वाचन प्रेरणेने पाहा सकल जन
वेळोवेळी नव नवा इतिहास घडे

किशोर झोटे @ 32,
औरंगाबाद.
[10/15, 6:43 PM] Pranali Kakde sdarpan: स्पर्धेसाठी...✍�

   ⛓ *माझा लढा*⛓

माझा लढा
न्यायमंदिरात डोळे मिटून न्याय देणाऱ्या
न्यायदेवतेशी नाही
माझ्याच मनात घर करुन बसलेल्या
अत्याचार सहन करण्याच्या प्रवृत्तीशी आहे
माझा लढा माझ्याशीच आहे

माझा लढा
ज्ञानाशी नाही विज्ञानाशी नाही
माझ्याच सज्ञानी घरात पाय रोवून
सैराट वावरणाऱ्या अज्ञानी अंधश्रद्येशी आहे
माझा लढा माझ्याशीच आहे

माझा लढा
पौरुषत्वाशी नाही
आपल्याच कुटुंबातील कोवळ्या स्त्रित्वाचा
नाश करणाऱ्या निष्ठुर निर्दयी समाजाशी आहे
माझा लढा माझ्याशीच आहे

माझा लढा
दहशत खोरांशी नाही
माझ्याच सोबत वैरी वेशात वावरनाऱ्या
केसाने गळा कापनाऱ्या जिवलगांशी आहे
माझा लढा माझ्याशीच आहे

माझा लढा
वयोपरत्वे येणाऱ्या वृद्धत्वाशी नाही
वृद्ध मात्यापित्यास मरनासन्न अवस्थेत
सोडणाऱ्या कृतघ्न सग्या सोयरयांशी आहे
माझा लढा माझ्याशीच आहे

           ✍� प्रणाली काकडे✍�
             समूह क्रमांक pk38

2 comments: